विज्ञान-काल्पनिका लेखक रे ब्रॅडबरी यांचे निधन

विज्ञान-काल्पनिका आणि अद्भुतकथांचे विख्यात लेखक रे ब्रॅडबरी यांचे निधन झाले आहे. ते ९१ वर्षांचे होते. आधुनिक तंत्राधिष्ठित जीवनाविषयीच्या काल्पनिका लिहून विज्ञान काल्पनिका या अप्रतिष्ठित साहित्यप्रकाराला साहित्याच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे श्रेय ब्रॅडबरी यांना दिले जाते. 'फॅरनहाइट ४५१'(१९५३), 'मार्शियन क्रॉनिकल्स'(१९५०) यांसारख्या त्यांच्या पुस्तकांनी जगभरातल्या वाचकांना मोहित केले होते. एडगर अ‍ॅलन पो, ज्यूल्स व्हर्न, अ‍ॅल्डस हक्स्ली, एच्.जी.वेल्स यांच्या लिखाणाचा ब्रॅडबरी यांच्यावर प्रभाव होता.

'फॅरनहाईट ४५१' या कादंबरीचे नाव कागद ज्या तापमानाला जळू लागतो त्यावरून घेतले होते. पुस्तकांवर बंदी आहे असे काल्पनिक जग त्यात आहे. कादंबरीविषयी लेखक म्हणतात :

In writing the short novel Fahrenheit 451 I thought I was describing a world that might evolve in four or five decades. But only a few weeks ago, in Beverly Hills one night, a husband and wife passed me, walking their dog. I stood staring after them, absolutely stunned. The woman held in one hand a small cigarette-package-sized radio, its antenna quivering. From this sprang tiny copper wires which ended in a dainty cone plugged into her right ear. There she was, oblivious to man and dog, listening to far winds and whispers and soap opera cries, sleep walking, helped up and down curbs by a husband who might just as well not have been there. This was not fiction

या कादंबरीवर बेतलेला त्याच शीर्षकाचा चित्रपटही (१९६६) गाजला होता. सुप्रसिद्ध फ्रेंच दिग्दर्शक त्रूफो यांनी तो दिग्दर्शित केला होता. ब्रॅडबरी यांच्या नावाने विज्ञान काल्पनिका किंवा अद्भुतकथा असणार्‍या पटकथेला पारितोषिक दिले जाते. टर्मिनेटर २, इन्सेप्शन अशा काही गाजलेल्या चित्रपटांच्या पटकथाकारांना ते मिळाले आहे.

'न्यूयॉर्कर'मध्ये नुकताच आलेला त्यांचा एक आत्मचरित्रात्मक ललित निबंध - टेक मी होम

त्यांच्याविषयीचे काही लेख :
http://www.nytimes.com/2012/06/07/books/ray-bradbury-popularizer-of-scie...
http://www.nytimes.com/2012/06/07/books/ray-bradbury-who-made-science-fi...
http://www.guardian.co.uk/books/2012/jun/06/ray-bradbury-sci-fi-author-dies
http://www.guardian.co.uk/books/2012/jun/06/ray-bradbury

field_vote: 
0
No votes yet