चतुर उपाय

"किती उशीर भेंजो, अर्धा तास वाट बघतोय."

"अरे आज फ्लॅटब्रेडवाल्या मावशी उशीरा आल्या. मग त्यांचं आटपल्यावरच चहा मिळाला."

"फ्लॅटब्रेड!?"

"हो. म्हणजे त्या कधी फुलके करतात आणि कधी भाकऱ्या. म्हणून एकच काॅमन नाव."

"पण हे खरंय. त्यांच्या वेळेत बदल झाला की अजून कन्फ्यूजन होतं."

"हो रे. ताईच्या घरी हाच प्रकार आहे. सकाळी चपातीभाजी बनवायला एक मावशी येतात. दुपारी मुलांना गरम खाणं हवं म्हणून एक आजी येऊन आमटीभात लावतात. आणि संध्याकाळी कायतरी सूप सलाड पराठे खातात त्यासाठी एक काकू येतात."

"अरे पण तिघींशी कोऑर्डिनेशन करण्याऐवजी बारा तासाच्या एकच महाराजा - आपलं, महाराणी - नियुक्त करायच्या ना! तुझी ताई आणि भावजी बक्कळ कमावतात."

"पैशाचा प्रश्न नाहीये. ते दोघे कधी वर्कफ्राॅमहोम करतात. मुलांचा अभ्यास असतो. ताईचे सासूसासरे, जीजूचे सासूसासरे येऊनजाऊन असतात. त्या महाराणी बारा तास घरी असल्या तर ऑकवर्ड होणार. टू बीएचके असला तरी काय?"

"बेस्ट आयडीया सांगतो!"

"बोल."

"घरी पाहुणे रहायला असले की आपण काय करतो. टाईमपासला सद्गुरू स्टाॅलला येतो. बरोबर?"

"ताई काय मुलांना सद्गुरू स्टाॅलला पाठवणार? काहीही बोलतोस भेंजो!"

"ऐक रे. मधे बोलू नको."

"हां बोल."

"आणि वीकेंडला टीपीला आपण कुठे जातो? सिंहमेंढी टी लाऊंज!"

"मग?"

"त्या महाराणींना सांगायचं - आठ वाजता घरी या आणि डब्यासाठी चपातीभाजी करा. नऊ-साडेनऊला आटपलं की सिंहमेंढीत जा. चहा प्या, एसीत बसून यूट्यूब बघा. मग बारा वाजता परत या. आमटीभात वगैरे बनवा, तुम्हीपण जेवून घ्या. मग दोन वाजता परत सिंहमेंढी. परत चहा प्या, एसीत चिल करा, कादंबरी वाचा. सहा वाजता या. रात्रीचं जेवण बनवा, आणि आपल्या घरी जा. म्हणजे त्यांनापण चिल करायला वेळ मिळेल आणि घरच्यांनापण ऑकवर्ड होणार नाही."

"आयडीया वाईट नाही भेंजो. सिंहमेंढीच्या चहाचे पैसे एक्स्ट्रा दिले की झालं. आजच ताईला फोन करून सांगतो."

"डन. चल आता चहा प्यायला जाऊ."

"उन्हं आलीयंत. सद्गुरू स्टाॅलला उकडणार. सिंहमेंढीतच जाऊ भेंजो."

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

सिंहमेंढी ह्या शब्दासाठी पूर्ण कथा रचली असावी अशी शंका मला यायला लागली आहे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

देनिसचा चतुर उपाय आठवला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-ताराबाई
टिप टिप चांदणी

शीर्षकाची कल्पना त्यामुळेच सुचली Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व फॉ हो करणाऱ्या आणि टू बी एच के त राहणाऱ्या सुखवस्तू कुटुंबातल्या ताईच्या भावाच्या मित्राचे नाव "भेंजो?". व्वा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाव नव्हे. 'चवैतुहि'सारखा, संभाषणातला filler.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0