सूचना

अपग्रेडच्या कामासाठी भावेप्र शुक्रवार (७ ऑक्टोबर) ते रविवार (९ ऑक्टोबर) संध्याकाळपर्यंत ऐसी अक्षरे अनुपलब्ध असेल. काम लवकर पूर्ण झाल्यास संस्थळ आधीच सुरू होईल. तसदीबद्दल क्षमस्व.

"भक्ति"

सकाळी दोन वाफाळते कॉफीचे कप
समोरासमोर टेबलावर ठेवा: एक स्वतःसाठी
एक देवासाठी. (देव समोरच्या खुर्चीत बसेल!).
विचारा त्याला : शर्ट कुठला घालू, बस घेऊ
का ट्रेन, ऑफिसातल्या खन्नाला चीत कसे करू,
मुलाला अभ्यासाला कसे लावू?
"तो" काय म्हणतोय ते लक्ष देऊन ऐका : उत्तरे मिळतीलच.
रिलायन्सचा शेअर, बाबांचे हार्ट ,
आईचा कॅन्सर , सर्वासर्वात "तो" बाप आहे म्हणतात.
लक्ष देऊन ऐका , हवे तर नोट्स घ्या,
बैठकीच्या शेवटी समोरचा कॉफी कप
संपलेला दिसला तर घाबरून ओरडू नका,
"थँक्यू" म्हणा आणि चला ऑफिसात!
गुड डे !
xxx
(अमेरिकेतील "Evangelical" ख्रिस्चानिटी चे एक रूप!)

field_vote: 
0
No votes yet