आनंददायक चॅनल

आज शिवप्रीत सिंग यांचा चॅनल (https://www.youtube.com/channel/UCKwaFldGnEyuPVzuL3oO3BA) लावुन सुंदर शबद बाणी ऐकत बसले होते. कानांना 'हेड फोन' लावले होते. शिवप्रीत यांचा आवाज म्हणजे मूर्तिमंत माधुर्य आहे आणि त्यांच्या चाली म्हणजे असीम शांती. अक्षरक्षः आनंदडोहात डुंबत होते. आसपासचं भान तर अशा वेळी रहातच नाही. संगीतासारखा उच्च आनंद नाही. नवरा पहात होता व म्हणाला - इतकी मान डोलावते आहेस. तंद्री लागली आहे. या जगातच नाहीयेस. ठीक आहेस ना? कुठे हरवलीयेस?

त्यावेळी मला, स्वयंपाक करायचा आहे, ऑफिसचं काम, कपड्यांच्या घड्या - कश्शाकश्शाचा विचार मनात येत नव्हता. वेळ आणि जग transcend झाले होते.

नंतर मनात विचार आला. आपण सारेच जण, मनातही तर आपण एक ना एक चॅनल लावुन बसतो - बरेचदा काहीतरी अनप्लेझंट, डूखी, कुढे, दु:खी किंवा त्रासदायकच असतो. मन ईश्वराने दिले कशाला आहे? खरच आपल्याला हवा तो आनंददायक चॅनल मनात लावता येइल का? रोज निदान १ तास?
अरे खरच कदाचित यालाच मेडिटेशन/ उपासना म्हणतात Smile मनाला वळण लावायचे, मनात एक शांत, आनंदमय चॅनल लावणे. शिवप्रीत चॅनल Smile

चला तर मग एक वेळ ठरवु यात ज्या वेळी अतिप्रसन्न चॅनल लावायचा. फक्त आपली वेळ. असीम शांतिदायक चॅनलची वेळ. खरं तर आपले विचारच योग्य दिशेस, चॅनेलाईझ करण्याची वेळ नाही का! फाईन ट्युनिंगची, मन-शरीर स्वास्थ्य जपण्याची वेळ.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet