दृष्टिक्षेप

दृ
-------
दृष्टीच्या दोषात आता
सर्व काही माफ आहे
चोरुन पाहण्याची आता
आयतीच सोय आहे

मी कधी पाहिले न तिजला
थेट बोक्या सारखे
भेटणे सहज झाले
कुणी न येई आडवे

असे असले तरीही
जळजळीत नजरेत तुझिया
अंगार फुलला सभ्यतेचा का कडकडीत हरताळ सजला

मी कधी न म्हटले तुला की
भेटणे अनिवार्य आहे
कधीतरी हसलीस तर
उपकाराचे वाहीन ओझे

त्या ओझ्यावर प्रेम माझे
टाळण्यातही गंमत आहे
पुन्हा पुन्हा एकच खेळ
काळजातला पीळ वाढे

अरुण कोर्डे

field_vote: 
0
No votes yet