"काय वर्ष होतं यार!"

काय वर्ष होतं यार
काम थोडे , भावना फार!

आठवतात ते टोमॅटो
अल्कोहोलने पुसलेले ?
आठवतात ते मित्र सारे
व्हायरसमुळे रुसलेले?
छद्म-विज्ञान सर्वत्र
आणि नागरिक फसलेले?
काय वर्ष होतं यार!
काम थोडे , भावना फार!

सोफ्यावरती बसून पाहिली
तांब्याची ती गोलाई
फ्लॅट स्क्रीन टीव्हीच्या
चित्रांमधली नवलाई
हळूहळू लक्षात आले
आपण लकी आहोत फार
काय वर्ष होतं यार !
काम थोडे , भावना फार!

शहरात दिसू लागली आहे
आता हिरवळ थोडीफार
पुतळ्यांभोवती जमू लागलेत
टूरीस्टही आता चार!
म्हणतात व्हॅक्सिन-विजयाची
न्यूयॉर्कमध्ये निघेल वरात
मीच का मग बसून राहू
तुम्हीच सांगा, आपल्या घरात?
सामील व्हावे उडवित टोपी
आहे माझा असा विचार
काय वर्ष होतं यार,
काम थोडे , भावना फार!
काम थोडे , भावना फार!

xxx

field_vote: 
0
No votes yet