काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १८ मार्च २०१९

महिनाभर सारथी सपोर्टशी मेलामेली केली.
हा त्यांचा मेल आयडी: sarathi@nic.in
मेल सपोर्ट अतिशय चांगला आहे. तुमची क्वेरी सोडवण्याचा ते त्यांच्या परीने खरंच प्रयत्न करतात.

पण इथे मात्र त्यांनी सांगितलं की: आर. टी. ओ. लाच जाऊन तुमची क्वेरी रिसॉल्व्ह करा.
मी परत आर. टी. ओ. ला पिंग-पॉंगलो.
केतन सुद्धा जेन्युइनली विचारात पडला,

"सिस्टीममध्ये तर तुमचे रेकॉर्ड्स सगळे बरोबर आहेत.
तुम्ही ट्रान्सपोर्ट लायसन्स तर काढलंय ते २०२० पर्यंत व्हॅलिड आहे.
(मी ट्रान्सपोर्ट लायसन्स २०१७ ला काढलेलं ते ३ वर्षांसाठीच असतं. मग रिन्यू करावं लागतं.)...
मग..."

आणि खिडकीच्या बाहेर माझी आणि आत त्याची एकाच वेळी ट्यूब पेटली.

झालं काय की माझं नॉर्मल ड्रायव्हिंग लायसन्स जे १९९८ ला काढलेलं. ते २०१८ ला एक्सपायर झालं.
आता माझ्याकडे खरं तर २०१७ पासून ट्रान्सपोर्ट ड्रायव्हिंग लायसन्स असल्याने एन. टी. (नॉर्मल) लायसन्स रिन्यू करायचं काही कारण नव्हतं.
बाय द वे. आपले लेटेस्ट ऑनलाईन डिटेल्स कोणीही ह्या वेबसाईट वर जाऊन बघू शकतो बरं का.
फक्त लायसन्स नंबर आणि जन्म तारीख टाकायची.
हे पहा माझे लायसन्स डिटेल्स:

application

त्यांच्या ऑनलाईन सॉफ्टवेअरमध्ये कोड असा असणार.

if there are mutiple licenses and any license is expired:
disable badge option.

खरं तर तो कोड असा हवा.

if there are mutiple licenses and ALL licenses are expired:
disable badge option.

मी आणि केतननी एकमेकांकडे बघितलं.
पुढे काय करायचं ह्याचं उत्तर आम्हाला दोघांनाही माहिती होतं.

एक तर सारथी वेबसाईटशी भांडून वरचा बग फिक्स करून घ्यायचा.
(जे काही फारसं शक्य वाटत नव्हतं.)

किंवा
झक मारत मुदलात गरज नसतानाही नॉर्मल एन. टी. लायसन्ससुद्धा रिन्यू करून घ्यायचं.
---------------------

मी घरी जाऊन तावातावात सारथी सपोर्टला मेलही लिहिलं. नितीन गडकरींनाही कॉपीमध्ये ठेवलं वगैरे.
पण सपोर्टनी थंडपणे आर. टी. ओ. ऑफीसलाच जायला सांगितलं.
गडकरी साहेब त्यांचा तो @nic.in चा मेल आयडी ते बघत नसणार बहुतेक.
एन. टी. लायसन्सच रिन्यू करावं लागणार.

आता नेक्स्ट स्टेप:
ह्या तीन वर्षांत मी ४० क्रॉस केल्यामुळे लायसन्स रिन्यू करण्याआधी फिटनेस सर्टिफिकेट Smile

क्रमश:

आधीचे दुवे:
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: उपोद्घात
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २८ नोव्हेंबर २०१६
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ नोव्हेंबर २०१६
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ३१ जानेवारी २०१७
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ मार्च २०१७
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २०१८
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९ उत्तरार्ध
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ५ व १२ जानेवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ फेब्रुवारी २०१९

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet