Permalink Submitted by 'न'वी बाजू on रविवार, 03/03/2019 - 21:52.
फारच रोचक प्रकार आहे.
(रोचक खरी, परंतु) शिळी बातमी. यावर येथे (आणि बहुधा इतरत्रसुद्धा) अगोदर चर्चा झालेली आहेसे वाटते. (चूभूद्याघ्या.)
अर्थात, चर्वितचर्वणास प्रत्यवाय नाहीच. किंबहुना, चर्वितचर्वण करायचे नाही म्हटले, तर 'व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्'-न्यायाने, कोणीही कधीही काहीही लिहावयास नको. त्यामुळे, चालू द्या. (फक्त, हे बहुधा आधीही झालेले आहे, या देजा वू भावनेचा ज़िक्र करावासा वाटला, इतकेच.)
Permalink Submitted by उज्ज्वला on रविवार, 03/03/2019 - 22:25.
होय. २०१६ साल पाहिले तेव्हा बातमी शिळी याची जाणीव होती. मला आज प्राप्त झाली आणि म्हणूनच "उपलब्ध आहे" असा शब्दप्रयोग केला.
मी ऐसीवर येऊन फक्त दहा महिने झालेत. त्या कालावधीत तरी नव्याने वा उत्खनन मार्गे ही माहिती पाहण्यात आली नव्हती
Permalink Submitted by सामो on गुरुवार, 07/03/2019 - 20:23.
वाचला तो धागा. ती भाषा कसली गोड आहे कानाला. अर्थात बंगाली इतकी नाही गोड. पण प्रचलित मराठी सारखी 'राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा' सारखी नाही.
माझी तेलुगु मैत्रिण मला म्हणायची - ठ, भ, ढ वगैरे जोरकंस उच्चार फार वाटतात तुमच्या भाषेत.
Permalink Submitted by शशिकांत ओक on सोमवार, 25/03/2019 - 15:23.
त्याच त्या तंजाउरी बोलीत गप्पा मारत असत. एक घडलेला किस्सा मी त्यांना तंजाउरीतून सादर करायला दिला होता. काही कारणानी ते तसेच राहिले. त्यात हैयो हैयैयो यांनी भर घालून लेखन केले होते.
पूमबुहारचे भीषण समुद्रस्नान...
असे त्याचे नाव होेते. वेगळा धागा काढून तो नवीन वाचकांसाठी किस्सा सादर करेन.
२४ एप्रिल जन्मदिवस : यंत्रमागाचा शोध लावणारा एडमंड कार्टराईट (१७४३), लेखक अँथनी ट्रॉलॉप (१८१५), सिनेदिग्दर्शक रॉबर्ट वीनं (१८७३), चित्रकार विलेम द कूनिंग (१९०४), सिनेअभिनेता, लेखक, निर्माता व दिग्दर्शक राजा परांजपे (१९१०), द. भारतीय अभिनेता राजकुमार (१९२९), अभिनेत्री शर्ली मॅक्लेन (१९३४), गायिका व अभिनेत्री बार्बारा स्ट्राइसंड (१९४२), डीएनएमधली माहिती आरएनएमध्ये प्रसारित होते हे शोधणारा नोबेलविजेता रॉजर क्रॉनबर्ग (१९४७), फॅशन डिझायनर जाँ-पोल गोल्तिए (१९५२), लोककलावंत तीजन बाई (१९५६), क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (१९७३) मृत्युदिवस : लेखक डॅनिएल डीफो (१७३१), गायक दीनानाथ मंगेशकर (१९४२), चित्रकार जामिनी रॉय (१९७२), उद्योगमहर्षी शंतनूराव किर्लोस्कर (१९९४), अभिनेत्री, नाट्यदिग्दर्शिका व निर्माती पर्ल पदमसी (२०००)
--
जागतिक प्रयोगशाळा-प्राणी दिन
भारतीय जलसंपत्ती दिन.
प्रजासत्ताक दिन : गाम्बिया (१९७०)
वंशविच्छेद स्मृती दिन : आर्मेनिया
लोकशाही दिन : नेपाळ
१८०० : 'अमेरिकन लायब्ररी ऑफ कॉंग्रेस'ची स्थापना
१८९१ : ऑस्कर वाइल्डलिखित पुस्तक 'द पिक्चर ऑफ डोरिअन ग्रे' प्रकाशित.
१९१४ : पुंज सिद्धांतामधला महत्त्वाचा फ्रँक हर्ट्झ प्रयोग जर्मन भौतिक संघटनेसमोर दाखवला गेला.
१९१५ : आर्मेनियन वंशविच्छेद - इस्तंबूलमध्ये आर्मेनियन वंशाच्या २५० बुद्धिवादी आणि नेत्यांना अटक; पुढे ऑट्टोमन साम्राज्यभर झालेल्या आर्मेनियन वंशविच्छेदाची ही सुरुवात होती. सुमारे ८ ते १५ लाख मृत. आजही तुर्कस्तानात ह्या हत्याकांडाच्या उल्लेखाला तुर्कस्तानचा अवमान केल्याच्या आरोपाखाली शिक्षा होऊ शकते.
१९२२ : ब्रिटिश साम्राज्य बिनतारी (रेडिओ) टेलिग्राफने जोडण्याची योजना कार्यान्वित; इंग्लंडमधून कैरोशी संदेशवहन सुरू.
१९२३ : सिगमंड फ्रॉईडने त्याचा मानसशास्त्रीय सिद्धांत Das Ich und das Es (The Ego and the Id) या शीर्षकाखाली प्रसिद्ध केला. त्यात मांडलेल्या इगो, इड आणि सुपर-इगोच्या संकल्पनांनी आधुनिक मानसशास्त्राचा पाया घातला.
१९६७ : रश्याचे अंतराळयान सोयुझ-१ कोसळून अंतराळवीर व्लादिमिर कोमारोव्ह मृत्युमुखी
१९७० : चीनचा पहिला उपग्रह 'डॉँग फँग हॉँग-१'चे प्रक्षेपण
१९८१ : आय.बी.एम.ने पहिला वैयक्तिक संगणक प्रदर्शित केला.
१९९० : खगोलातल्या अनेक महत्त्वाच्या घटनांचे प्रथम निरीक्षण करणाऱ्या हबल अवकाशदुर्बिणीचे प्रक्षेपण
२००५ : जगातला पहिला क्लोन केलेला कुत्रा जन्माला आला.
२००६ : नेपाळचा राजा ग्यानेंद्रने ४ वर्षांपूर्वी बरखास्त केलेल्या संसदेला पुन्हा मान्यता दिली.
२०१३ : बांगलादेशातील सर्वात भीषण औद्योगिक अपघात - औद्योगिक इमारत कोसळून ११२९ कामगार ठार; २५०० जखमी.
प्रतिक्रिया
...
(रोचक खरी, परंतु) शिळी बातमी. यावर येथे (आणि बहुधा इतरत्रसुद्धा) अगोदर चर्चा झालेली आहेसे वाटते. (चूभूद्याघ्या.)
अर्थात, चर्वितचर्वणास प्रत्यवाय नाहीच. किंबहुना, चर्वितचर्वण करायचे नाही म्हटले, तर 'व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्'-न्यायाने, कोणीही कधीही काहीही लिहावयास नको. त्यामुळे, चालू द्या. (फक्त, हे बहुधा आधीही झालेले आहे, या देजा वू भावनेचा ज़िक्र करावासा वाटला, इतकेच.)
होय. २०१६ साल पाहिले तेव्हा
होय. २०१६ साल पाहिले तेव्हा बातमी शिळी याची जाणीव होती. मला आज प्राप्त झाली आणि म्हणूनच "उपलब्ध आहे" असा शब्दप्रयोग केला.
मी ऐसीवर येऊन फक्त दहा महिने झालेत. त्या कालावधीत तरी नव्याने वा उत्खनन मार्गे ही माहिती पाहण्यात आली नव्हती
मी आज ऐकली.
मी आज ऐकली.
इक्क्ड
इक्क्ड चांगल चर्चा जालती बघा. तुम्हास आवडत असेल तर वाचू शकतं.
तंजावर मराठी
वाचला तो धागा. ती भाषा कसली
वाचला तो धागा. ती भाषा कसली गोड आहे कानाला. अर्थात बंगाली इतकी नाही गोड. पण प्रचलित मराठी सारखी 'राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा' सारखी नाही.
माझी तेलुगु मैत्रिण मला म्हणायची - ठ, भ, ढ वगैरे जोरकंस उच्चार फार वाटतात तुमच्या भाषेत.
जया राव यांनी हौसेने पॉडकास्ट चालू केले होते.
त्याच त्या तंजाउरी बोलीत गप्पा मारत असत. एक घडलेला किस्सा मी त्यांना तंजाउरीतून सादर करायला दिला होता. काही कारणानी ते तसेच राहिले. त्यात हैयो हैयैयो यांनी भर घालून लेखन केले होते.
पूमबुहारचे भीषण समुद्रस्नान...
असे त्याचे नाव होेते. वेगळा धागा काढून तो नवीन वाचकांसाठी किस्सा सादर करेन.
एका नजरेत - शशि ओक
माझा अस्तित्वा
जया राव यांनी हौसेने पॉडकास्ट चालू केले होते.
एका नजरेत - शशि ओक