भारतीय नौदलाचा उत्कर्ष - सुल्तान एम. अली

सदर लेख Indian Naval Surge या सुल्तान एम. अली यांच्या लेखाचा स्वैर अनुवाद आहे. मूळ लेख पाकिस्तानमधील वृत्तपत्र द नेशन मध्ये प्रकाशित झाला आहे. तो आंतरजालावर इथे वाचता येईल. लेखातील विकिपीडियाचे दुवे मी दिलेले आहेत - मूळ लेखात नाहीत.
सदर अनुवाद करून योग्य त्या श्रेयासह ऐसीअक्षरेवर प्रकाशित करण्यासाठी मूळ लेखकाकडून अनुमती घेतली आहे व गरज पडल्यास सदर विरोप ऐसीअक्षरेच्या संस्थापकांसमोर सादर करू शकतो
============

भारतीय नौदलाचा उत्कर्ष
-सुल्तान एम. अली

अमेरिकेच्या डिफेन्स न्यूज या दैनिकाला मुलाखत देताना, पाकिस्तानाला भारताच्या आण्विक शक्तीने युक्त, अण्विक शस्त्रे बसविण्याची क्षमता असल्या पाणबुडीमुळे दक्षिण आशियामध्ये बदललेल्या सामरिक समीकरणांबद्दल, पाकिस्तानसाठी वाढलेल्या धोक्याबद्दल विचारले असता, पाकिस्तानी नौदलाचे (पा. नौ. ) प्रमुख अॅडमिरल आसिफ संदिला, यांनी उत्तर दिले की " भारताच्या नौदलाची संयोजना बघता, का केवळ आमच्यासाठीच नव्हे तर संपूर्ण हिंदी महासागरातील सत्तांसाठी काळजीचा विषय आहे"

भारतीय नौदलाची (भा. नौ. ), प्रत्यक्षात अतिशय निळ्या समुद्रातील आरमारी तांडा उभारण्यासाठी, भव्य वृद्धीकरणाची योजना आहे. या अतिभव्य योजनेमध्ये स्थानिक आणि भाडेतत्त्वावर घेतलेल्या अश्या दोन्ही प्रकारच्या आण्विक पाणबुड्यांसोबतच, आण्विक शस्त्रे डागता येण्याची क्षमता असणाऱ्या इतर अनेक व्यवस्था समाविष्ट आहेत ज्यामुळे भारतीय आण्विक माऱ्याच्या क्षमतेचे त्रिकूट - हवेतून, जमिनीवरून आणि पाण्याखालून - पूर्ण होणार आहे. भारताच्या आण्विक पाणबुड्यांची सुरवात पूर्व यू. एस. एस. आर. कडून १९८७ मध्ये १० वर्षाच्या भाडेतत्त्वावर घेतलेल्या 'चक्र' प्रकारातील आण्विक पाणबुडीने झाली होती. त्याच्या अमूल्य अनुभवाची परिणिती १९९८ मध्ये विशाखापट्टणम येतील शिपिंग सेंटर मध्ये आधुनिक तांत्रिक वेसल - Advanced Technology Vessels (ATV)- देशी आण्विक पाणबुडी- बनविण्याच्या इच्छेत झाली. भारतीय शास्त्रज्ञांचा दावा आहे की ते देशी बनावटीचा ९० मेगावॉटचा प्रेशराईज्ड वॉटर रिअॅक्टर (PWR), एटीव्ही (ATV)च्या नौकापृष्ठावर बसविण्यात यशस्वी झाले आहेत. मात्र, असे दिसते की हे प्रेशराईज्ड वॉटर रिअॅक्टर (PWR) रशियाकडून मिळवले आहे. १९९६ च्या मध्यापर्यंत या ATV प्रकल्पावर १८५७लाख अमेरिकन डॉलर्स खर्च झाले होते आणि आता त्याचा खर्च ३. ७ बिलियन डॉलर्सवर पोचला आहे

भारताकडे सद्यस्थितीत १४ कार्यरत पाणबुड्या आहेत, तसेच भा. नौ. ने सहा स्कॉर्पीयन पाणबुड्या घेण्यासाठी फ्रान्सबरोबर करार केला आहे. या पाणबुड्या भारतीय गोदीतच बांधल्या जात आहेत आणि साधारणतः २०१८ पर्यंत त्या भारतीय ताफ्यात दाखल होतील असे दिसते. भारतीय सुरक्षा समितीने सध्याच्या फ्रान्सच्या मदतीने बनविण्यात येणाऱ्या या सहा पाणबुड्यांसोबत आणखी सहा पारंपरिक पाणबुड्यांच्या खरेदीला मान्यता दिली आहे. स्वतंत्र भारतीय बनावटीची पहिली ATV आय. एन. एस. अरिहंतचा PWR गेल्यावर्षी सुरू झाला आहे, तसेच त्याच्या सागरी-चाचण्या लवकरच संपून २०१२च्या अखेरच्या सुमारास अरिहंतला सामावून घेतले जाईल. याचबरोबर दुसरीकडे तीन फॉलो-ऑन आण्विक पाणबुड्यांच्या संरचनेचे काम जोमात चालू आहे, अन त्यातील दुसऱ्या पाणबुडीच्या रिअॅक्टरची बांधणी रशियाच्या मदतीने सुरू आहे. दुसरी पाणबुडी आय. एन. एस. अरिंदम २०१५ पर्यंत सागरी चाचण्यांसाठी तयार होईल असे अपेक्षित आहे. भारतीय नौदलाच्या या पाणबुड्यावर सुरवातीला ७५० कि. मी सागरीका (K-१५) या SLBM (Submarine Launched Ballistic Missiles) तैनात असणार आहेत आणि नंतरच्या काळात सध्या तयार होत असलेल्या ३५०० किमी च्या K-४ SLBM जोडल्या जातील. INS/M अरिहंतमध्ये एकावेळी बारा ७५०किमीच्या सागरिका SLBM किंवा चार K-4 SLBM घेऊन जाण्यासाठी चार स्लॉग्स आहेत. दरम्यान, भा. नौ. ने रशियन अकुला-II प्रकारच्या दोन आण्विक पाणबुड्या रशिया कडून भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत, कारण त्यांना दीर्घकालात तीन SSBNs आणि चार SSNs (आण्विकशक्तीने मारा करणाऱ्या पाणबुड्या) हव्या आहेत. असे समजले जाते की २०१५पर्यंत भारताच्या ताफ्यात साधारणतः ३० पारंपरिक पाणबुड्या असतील.

हिंदी महासागरात दाखल होणाऱ्या या आण्विक पाणबुड्यांचे परिसरावर गंभीर परिणाम होणार आहेत. यामुळे स्थानिक व सार्वत्रिक देशांत/नौदलात भारताचा दर्जा अधिक उंचावणार आहे, तसेच पा. नौ. च्या तुलनेत सध्या अरबी समुद्रात असणारे सुरक्षेचे गणित भारतीय नौदलाच्या बाजूने झुकणार आहे. चायनीज, ऑस्ट्रेलियन, इंडोनेशियन आणि इतर स्थानिक नौदलासाठी धोका कैकपटीने वाढणार आहे. आण्विक पाणबुड्यांमुळे जगभरात दूरवरच्या पाण्यात असलेल्या प्रतिपक्ष माऱ्याच्या टप्प्यात तर येतोच शिवाय इंधन भरण्यासाठी किंवा बॅटरी रिचार्ज करण्यासाठी अनेकदा पृष्ठभागावर यावे लागत नसल्याने अधिक खोलवर बराच काळ कोणालाही न समजता थांबता येते. प्रत्यक्षात, त्यांच्यामुळे आण्विक मिसाईल्स बसवल्याने त्यांची शक्ती पटींमध्ये वाढते, अन भा. नौ. ची पाकिस्तानच्या तटापासून व्यवस्थित दूर अंतरावरून पाकिस्तानात खोलवर मारा करण्याची क्षमता यांच्या समावेशाने अधिकच वाढते

भा. नौ. च्या इतर संपादित गोष्टीमध्ये 'एअरक्राफ्ट कॅरिअर' अॅडमिरल गोर्ष्कोव - ज्याचे नामांतर आय. एन. एस. विक्रमादित्य केले आहे- १६ मिग-२९K/KUBs आणि ६ ते ८ KA-31 AEW हेलीकॉप्टर्स सोबत आहे. याशिवाय भारत आपल्या नौदलासाठी तीन अजून देशी बनावटीचे 'एअरक्राफ्ट कॅरिअर' बनवीत आहे. याव्यतिरिक्त अधिक नौदल बेसेस बनविण्याबरोबरच, ३ कलकत्ता श्रेणीचे 'डिस्ट्रॉयर्स' आणि 'गायडेड मिसाईल फ्रिगेट', चार ASW कॉर्व्हेटस, चार सरयू श्रेणीच्या क्रियाशील गस्ती नौका (Operational Patrol Vessels), चार लँडिंग प्लॅटफॉर्म डॉक्स बनविण्याची, तसेच दोन ऑस्प्रे श्रेणीचे सुरुंग शोधक व आठ P8-I लांब पल्ल्याची सागरी गस्त घालणारी विमाने अमेरिकेकडून भाड्याने घेण्याची योजना आहे.

या भव्य उभारणीकडे बघता पाकिस्तानी नौदलापुढे खडतर आव्हान आहे.. भारतीय नौदलास नौकेस-नौका या पद्धतीने गाठणे शक्य नसले तरी पाकिस्तानी नौदलप्रमुख त्यांच्या मुलाखतीत म्हणाले की "आमचे या उभारणीकडे लक्ष आहे आणि आम्ही युद्धनितीक समतोल साधण्यासाठी योग्य ते उपाय योजत आहोत. " तेव्हा देशाने आपले नौदल उभारण्यासाठी बरीच गुंतवणूक करणे आवश्यक आहे.

field_vote: 
3.75
Your rating: None Average: 3.8 (4 votes)

प्रतिक्रिया

भारताची strategy पाकिस्तानकडून चीनकडे (प्रमुख शत्रू) नुकतीच बदलल्याची सगळीकडे चर्चा आहेच.

हा लेखही बरच काही सांगून जातो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कुणीतरी काहितरी करतय शेवटी हे बघून बरं वाटलं. पण सातरकरांच्या दुव्यातील लेखाचं शीर्षक काळजीत टाकून गेलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

भारत-पाकिस्तान-चीन यांच्यातल्या राजनैतिक आणि युद्धनैतिक संबंधांची माहिती मला पुरेशी नाही. या लेखामुळे तीत थोडी भर पडली. पाकिस्तानच्या वृत्तपत्रांत भारतीय नौदलाच्या उत्कर्षाबद्दल भीतीयुक्त माहिती येणं साहजिकच आहे. तसंच पाकिस्तानी नौदल प्रमुखांनी काहीसा चिंतायुक्त आत्मविश्वास दाखवणंही साहजिकच आहे. (भारतात हेच चीनच्या बाबतीत होईल याची खात्री आहे). तरीही भारत संरक्षणाच्या दृष्टीने योग्य ती पावलं उचलत आहे हे वाचून बरं वाटलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा लेख पाकिस्तानमधील वृत्तपत्रात आल्याने काळजीयुक्त स्वरात असला तरी त्याद्वारे मिळणार्‍या माहितीचे संकलन मला आवडले - महत्त्वाचे वाटले म्हणून याचे भाषांतर केले आहे. आपल्या सामरिक शक्तीची माहिती देणारे लेखन असते ते आपला न्यूनगंडच अधिक दाखवते. "आपली तयारीच नाही, पाकडे बघा कसे जय्यत तयारीने असतात" इथपर्यंतची वक्तव्ये सर्रास ऐकू येतात त्यावर हा लेख उतारा ठरावे

भारतीय नौदलास नौकेस-नौका या पद्धतीने गाठणे शक्य नसले

यावरून मात्र भारतात पाकिस्तान आणि इथे भारताचा बागुलबुवा उभा करून सामरिक शक्ती वाढवायचे दिवस मात्र संपलेले दिसतात

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माहितीच्या संकलनाच्या दृष्टीने लेख आवडला. ज्या कारवाईच्या दिवसाच्या निमित्ताने भारतात 'नौदल दिवस' साजरा केला जातो, त्या '७१ च्या युद्धातल्या 'ऑपरेशन ट्रायडेंट'ची आठवण या निमित्ताने झाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पाकिस्तानला, पाकिस्तानी नागरिकाला एवढी सविस्तर माहिती मिळू शकते भारतीय नौदलाच्या तयारीची हेही काळजीच वाटल.

आणि जसं आपण आपल सामर्थ्य कमी लेखतो आणि पाकिस्तान/चीन कसे आपल्यापेक्षा पुढे आहेत म्हणून संरक्षण खर्च वाढवतो, तसाच काहीतरी हेतू पाकिस्तानचाही नसेल का? म्हणजे भारतीय तयारी जास्त आहे म्हणून पाकिस्तानही जास्त तयारी करणार. एकूण काय साधन बदलणार युद्धाची पण युद्ध अपरिहार्य आहे असे संकेत मिळतात यातून.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पाकिस्तानला, पाकिस्तानी नागरिकाला एवढी सविस्तर माहिती मिळू शकते भारतीय नौदलाच्या तयारीची हेही काळजीच वाटल

यातील बरिचशी माहिती भारतीय सुरक्षा मंत्रालयानेच जाहिर केलेली आहे. वेळोवेळी वाचलेली आठवते..
जर घोषित तयारी इतकी असेल तर अघोषित, गुप्त वगैरे तयारी असणारच! (असा विचार करायला आवडते Smile )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

जर घोषित तयारी इतकी असेल तर अघोषित, गुप्त वगैरे तयारी असणारच! (असा विचार करायला आवडते )

विचार आवडतोय,
हृषिदा आपले या संदर्भात बरेच वाचन दिसतंय तर एक तुलनात्मक अभ्यास इथेच टाका की

पण आपल्या सबमरीन्स बहुतांश रशिया किंवा इतर देशांकडून विकत घेतलेल्या असतात.. डेव्हलपमेंट कॉस्ट पूर्णपणे वाचत असली तरी टेक्नोलोजिकली थोड्या जुन्या असतात...विमानांबद्दल थोडे माहिती आहे,त्यात आपली परिस्थिती फारशी चांगली वाटली नाही..
या विषयावर वाचण्यात येईल ..
यात परत आमचेच प्रिय मंत्री लोकं असल्यामुळे खरे किती ,भ्रष्टाचार किती हा परत वेगळा प्रश्न डोक्यात येतो ...

(मुन्शीपाल्टीच्या खात्यात उंदीर मारायच्या पोस्ट वर असलो म्हणून काय झाले Smile
Tongue :द

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख इथे दिल्याबद्दल धन्यवाद.

"आपले सरकार हातावर हात ठेवून बसले आहे, तिकडे चीन बघा झपाट्याने आपलं लष्करी सामर्थ्य वाढवतो आहे" असलीच भावना पाकिस्तानातही असल्याचे पाहून गम्मत वाटली. (इस्रायली लोकही ईराणकडे बोट दाखवून कदाचित असंच म्हणत असावेत).

भारतीय आणि पाकिस्तानी जनता 'एकच' आहे हे मनोमन पटले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आपले सरकार हातावर हात ठेवून बसले आहे ह्यापेक्षा अचूक शब्दांत सांगायचा यत्न करतो.
भारत सरकार काहीही करत नाहिये असे नाही; हे मान्य. पण भारत एक सेकंद पुढे जातो तेव्हा जग(वाचा बलाढ्य/प्रगत हितशत्रू) मिनिटभर पुढे गेलेले असतात.
..
"आपले सामर्थ्य १९४७ पेक्षा सातपट वाढलेले असते; तेव्हा जगाचे पंचवीसपट झालेले असते" अशी ती तक्रार आहे.
किंवा, सामर्थ्य वआढवले असले, तरी वाढलेले सामर्थ्यही फारच तोकडे आहे अशा धाटणीचे आम्हा नकारात्मक लोकांना म्हणावेसे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

वर दिलेल्या माहितीत म्हटल्याप्रमाणे नुकतीच भारताने के-१५ क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी केली आहे.
त्यासंबंधीची माहिती इथे वाचता येईल.

या बद्दल भारतीय नौदलाचे, भारत सरकारचे आणि पर्यायाने आपले सगळ्यांचे अभिनंदन! Smile

आणि आता के-४ च्या नौदलीय चाचणीसाठी शुभेच्छा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

भारताच्या नौदलाची संयोजना बघता, का केवळ आमच्यासाठीच नव्हे तर संपूर्ण हिंदी महासागरातील सत्तांसाठी काळजीचा विषय आहे">>> ह्या सत्ता म्हणजे मालदीव, मादागास्कर, श्रीलंका म्हणायचे असेल पाकीस्तान ला Smile

पाकीस्तान भारताशी तुलना करत असेल तर ते समजण्या सारखे आहे, पण भारतानी पाकिस्तान च्या तयारी कडे बघुन खुष व्हावे हे कठिण आहे. भारताचा दुसरा शेजारी काही करत नाही हे सुदैव आहे भारताचे.

आणि पाकिस्तान हा एक देश नाही, २० मुस्लिम देशांची ताकद मिळवा त्यांच्यात.
सगळे रामभरोसे आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अशी इतकी सगळी तयारी असून १० जण नौका घेऊन २६ नोव्हेम्बर २००८ ला कुलाब्याला पोहोचलेच !
की २००८ नन्तर ही सगळी तयारी सुरू झाली ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Necessary Evil!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0