ठिपक्यांची मनोली (मुनिया)

गेल्या १० वर्षां पासुन आमच्या घरी मुनिया येतात. ऊन्हाळा संपुन पावसाळ्याची चाहुल लागली की लगेच हजर होतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला त्यांची घरटी बांधण्याची लगबग सुरू होते. शरिराच्या आकारापेक्षा ६ ७ पट मोठ्या आकाराचे गवताचे पाते आणुन घरटी करतात. त्यांच्यासाठी आम्ही बाल्कनीत बाजरी ठेवतो. एका वेळेस ७०-८० च्या थव्याने येतात. मुनिया ४ महिने तरी रोज येतात. मुनियांना आठवड्याला ४ ते ५ किलो बाजरी लागते. दिवसतुन तिनदा खायला घालावं लागतं. (बाजरी खाताना त्या सांडवतातही भरपुर आणि खाल्लेल्या बाजरीचे फोलपटं खाली पडतात. जरा कुठे खुट्ट झालं कि लगेच उडुन जातात तेव्हा, त्यांच्या पंखांनिही बाजरी खाली सांडते. त्यामुळे दिवसातुन दोनदा बाल्कनी झाडावी लागते.)
फोटो क्र. ४ : बाजरी संपली कि सगळे वाट बघत बसतात.
फोटो क्र. ५. मुनियाचं पिल्लू असं दिसतं. पुर्वी मुनिया आमच्या खिडकित घरटं देखील करायच्या.
फोटो क्र. ६. आमच्या घरी मांजर आहे म्हणुन खिडकीला अशी कायमस्वरूपी जाळी लावून घेतली. या काळात आम्ही बाल्कनिचा वापर करत नाही. फक्त सकाळी एकदा झाडांना पाणी घालायला जातो. बाल्कनिचं दारही सतत बंदच ठेवतो.

अवांतरः
फोटो क्र. ७ : मुनिया आल्या कि शिक्रा देखील हजेरी लावुन जातो.
फोटो क्र. ८ : मागच्या वर्षी सनबर्डने बाल्कनित घरटं केलं होतं. ती कायम घरट्यात बसुन असायची. आमचा वावरही होताच पण तिने बिंधास्त घरटं बांधलं. अगदी हाताला लागेल अश्या अंतरावर.
फोटो क्र. ९ : दोन वर्षांपुर्वी हा सनबर्ड बाल्कनित रोज झोपायला यायचा. साधारण ६-७ महिने येत होता.

या मुनियाच्या नावाविषयी थोडसं : जरी आमच्याकडे मुनिया १० वर्षांपासुन येत असल्या तरिही या जातीचं नेमकं नाव काय हे पुस्तक उघडुन वाचलं नाही. (निव्वळ आळशीपणा) कारण त्यांचा विणिचा हंगाम, घरटी कोणत्या गवताची आणि कशी बांधतात हे स्वतः रोजच बघत होते. काल हा लेख टाकल्यावर ही चुक लक्षात आली. फेसबुकवर स्केली ब्रेस्टेड मुनिया हा उल्लेख वाचला आणि मिही काहीही अभ्यास न करता हे नाव इथे टाकलं. पक्ष्यांबद्दल ४ पुस्तकांमधे मुनियां विषयी वाचत असता कळंलं की या ठिपक्यांच्या मुनिया आहेत. इंडियन स्पॉटेड मुनिया. स्केली ब्रेस्टेड मुनिया हा शब्दच या पुस्तकांमधे नाही. काही लोक स्केली ब्रेस्टेड मुनियाच म्हणत असतील तर त्यांच्यासाठी ही दुरुस्ती. आणि मी सुद्धा चुकीच नाव पसरवलं म्हणुन सॉरी. मारुती चितमपल्ली यांनी लिहिलेल्या पक्षिकोश मधे यांच्यासाठी मराठी शब्द मनोली आहे. ठिपक्यांची मनोली, काळ्या डोक्याची मनोली इ.

field_vote: 
4.333335
Your rating: None Average: 4.3 (3 votes)

प्रतिक्रिया

सुंदर. सकाळी सकाळी आमच्या खिडकीतल्या गवती चहाच्या पातीचा धागा धागा सोडवून नेणारे मुनिया आणि वटवट्या हे दोन पक्षी. मानेला झटके देत पातीचा धागा सोडून घेत, तो चोचीत घेऊन भुरकन उडून जाणारी मुनिया पाहिली की सकाळ रवीवारची सुंदर सकाळ असल्यासारखं वाटतं (कारण तेव्हा मला फक्त रवीवार सकाळीच एवढा मोकळा वेळ असायचा.;))
पक्ष्यांची छान व्यवस्था केलीय तुम्ही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गवताच्या पातीचा धागा चोचीत घेऊन उडून जाणारी मुनिया बघितली कि मला स्वर्गिय नर्तकाची आठवण येते Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी काही स्वर्गातली नर्तिका बघितली नाही त्यामुळे "नो कॉमेंट्स"

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्वर्गिय नर्तक हे पक्ष्याचं नाव आहे ओ. Asian Paradise Flycatcher
http://tnresources.org/wp-content/uploads/2015/03/asian-paradise-flycatc...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अरे बापरे, अज्ञानात सुख असते असे म्हणतात ते काही खोटे नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अज्ञानात सुख?? अहो अश्या ज्ञानात तर सुख असतं ना? इतक्या सुंदर पक्ष्याबद्द्ल माहिती तर असायलाच हवी..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नशीबवान आहात. खाउची सोय केली तरी पक्षी येतीलंच याची खात्री नसते. १० वर्ष येतायंत म्हणजे आता त्या पक्षांच्या कळपामधे तुमच्या बाल्कनीची नोंद "कायमस्वरूपी खाण्याचा स्त्रोत" अशी झालेली असणार - त्यांच्या पुढच्या पिढ्यामधे सुद्धा !! घरट्यांचा फोटो पण द्याल का? या वरच्या फोटोंबद्दल थोडे प्रश्न;
- ते परळ दिसतायत तरी खरेखुरे, मातीचे. प्लास्टीकचे नव्हे. मातीचे असले तर त्याना भोकं कशी पाडली हिरवे दोर गुंफायला? बाय द वे, अशा ब्राईट रंगाला, हिरवे दोर, साधारणतः पक्षी बुजतात. मुनिया झुंडीने वावरतात त्यामुळे धीट असाव्यात !
- एखाद्या परळात पाणी पण ठेवता?
- तिसर्‍या फोटोला ही खास दाद Smile अजून जरा एका बाजूने उजेड असताना - सकाळचं/संध्याकाळचं कोवळं उन - काढता आला तर जरूर ईथे द्या.
- पाचवा फोटो, पिल्लाचा. डावीकडे पुढे पान आहे, आउट ऑफ फोकस झालेलं. ते कसलं? त्यावर 'ब्लिस्टर्स' आहेत असं वाटतंय!
- सहावा फोटो. जाळीसमोर कसल्या शेंगा टांगल्यात? आयलंडस वरचा एक BBCचा कार्यक्रम होता त्यात पाहील्यातशा वाटतायत. आणि पुढे टांगलेले तीन....दिवे?

या मुनिया बडबड्याही असतील बहुदा. ??

ता.क. जरा जास्तच प्रश्न झालेत खरे. पण ती जरा 'ऑफ हॅन्डेड दाद' समजा ;-))

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

बाल्कनीची नोंद "कायमस्वरूपी खाण्याचा स्त्रोत" अशी झालेली असणार.. हे खरंय. आणि तो पुर्ण विचार करुनच त्यांना खायला घालायला सुरुवात केली. विचार म्हणजे की आपण हे घर बदलणार नाही आणि मुनिया वर्षानुवर्ष येउ शकतील.
- ते परळ मातीचेच आहेत. हे खरंतर माठावर झाकायचे मातीची झाकणं आहेत. हँड ड्रिल मशिन वापरुन त्यांना छिद्रं केली. कुंड्यांखाली ठेवायला किंवा पक्ष्यांसाठी काठं असलेली मातीची परळं मिळतात पण हे असं दोरीला लटकवल्यावर त्यांची काठं सुटुन येतात. ती तितकी मजबुत नसतात. प्लॅस्टीक किंवा राही म्हणतात तसं विणलेली शिंकाळी वापरता येणार नाहीत कारण ती वजनदार नसतात. एकाच परळातल्या १५-२० मुनिया जेव्हा एकाचवेळी उडतात तेव्हा ती खाली झटका देउन उडतात म्हणुन ते परळही वजनदार असलं पाहिजे जेणेकरुन ते स्थिर राहील, तो झटका सहन करू शकेल. दोरीचा रंग दुसरा मिळेना. त्यातल्या त्यात हिरवा म्हणून हा घेतला.
- मुनिया पावसाळ्यातच येतात म्हणुन या काळात परळात पाणी ठेवत नाही. बाकिचे ९ महिने आम्ही परळात पाणी ठेवतो. (५-६ वेगवेगळ्या ठिकाणी ठेवतो. उन्हाळ्यात तर न चुकता दिअवसातून दोनदा पाणी घालण्याचे उद्योग करतो)
- मुनिया इतक्या जवळ असल्या तरी फोटो काढणं महा अवघड. जरा जरी चाहुल लागली की उडुन जातात. इथे सगळ्यांना दाखवायचे म्हणुन महत्प्रयासाने काढलेत फोटो. आणि त्या खात असताना त्यांना त्रास द्यायला नकोसं वाटतं. त्यामुळे 'सकाळचं/संध्याकाळचं कोवळं उन' जरा अवघडच आहे.
- आउट ऑफ फोकस झालेलं पान म्हणले आपलं नेहमीचं फर्न आहे.
- जाळीसमोर गार्वीच्या शेंगा टांगल्यात. पुढे टांगलेले ते मातिचेच दिवे आहेत. (कुंभारवाड्यात आहेत खूप) आम्ही घरी त्यात घरीच बल्ब बसवले. दिवाळीला, सणासुदीला लावतो. झगमग सुंदर दिसतात.

या मुनिया खूप बडबड्या आहेत. खूपच मंजुळ आवाज असतो. सर्व प्रकारच्या मुनियांना लव्ह बर्ड सारखं पाळल्या जातं ते त्यांच्या मंजुळ आवाजासाठीच. इतका गोड आवाज तासन्तास आइकत रहावासा वाटतो. खासकरून दुपारच्या वेळेला सगळं शांत असतं तेव्हा.

हि हँड ड्रिल मशिन : http://www.amazon.in/VISKO-226-Hand-Drill-Machine/dp/B016OMEM74?tag=goog...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तो पुर्ण विचार करुनच त्यांना खायला घालायला सुरुवात केली. विचार म्हणजे की आपण हे घर बदलणार नाही आणि मुनिया वर्षानुवर्ष येउ शकतील.

'thumbs up' emoji here.

त्यामुळे 'सकाळचं/संध्याकाळचं कोवळं उन' जरा अवघडच आहे.

Lol व्हिडीओ कॅमेरा लाउन ठेवा दोन-तीन तास. You would be amazed to see some of the fantastic views that you might have missed otherwise.

इतका गोड आवाज तासन्तास आइकत रहावासा वाटतो.

पाच-दहा मिनिटांचं रेकॉर्डींग देउ शकाल का? नेटवर नाहि सापडलं.

परळाची आयडीया मस्त आहे. मी बर्ड फीडर एका बारीक तारेला टांगतो - खारीना शह म्हणून क्लुप्त्या करायला लागतात त्यातली ही एक! त्यावर फार वजन टांगायचं नाहिये. त्यामुळे प्लास्टिकच्या 'बशीत' थोडे दगड ठेवतो. पक्षी उडून जातात तेव्हा बर्‍यापैकी जोरात ढकलतात बशीला. तेव्हा डचमळली नाही म्हणजे झालं ईतपत वजन ठेवायचं दगडांचं. हे काल-आजचे पाहुणे - नटहॅच, टिटमाउस आणि गोल्डन ओरिओल (डावीकडची 'अग' आणि उजवीकडचे 'अहो' - कुठे लक्ष आहे कोण जाणे! )...

Nuthatch
Titmouse
Golden oriole

आणि ही ती उपद्व्यापी बया. या निरुपद्रवी पोजवर जाउ नका, त्या बारीक तारेवर टांगलेल्या फीडरवर कसा डल्ला मारायचा त्याचं चिंतन चालू आहे !
Squirrel relaxing, plotting next move!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

अरेव्वा.. मस्त आहेत फोटो. अहो फारच आवडलेत. या पक्ष्यांची मराठीतली नावं काय?
विडिओ काढण्याचा प्रयत्न केला या विकेंडला, पण आता त्यांची घरटी विणून, अंडी उबवणं सुरू झालंय त्यामुळे बाल्कनितली गर्दी फारच कमी झालीये. आठवडाभरात काढते विडीओ. आवाज ऐकवेन नक्की.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मराठीतली नावं ..... नाही बुवा सांगता येणार. जालावर थोडीफार शोधाशोध केली पण नाही सापडली. I would be very surprised if we do find names - मराठीत काय कींवा कुठल्याही आपल्या भाषेत काय.

So here is one more Q - पिल्लं पण येतात 'परळामधे जेवायला'? बहुदा नसावीत. आणि पिल्लाना भराभर वाढायचं असतं त्यामुळे पक्षी त्याना साधारणतः अळ्या/कीडे वगैरे तत्सम प्रोटीनयुक्त खाउ भरवतात. त्यामुळे त्या काळात त्याना बाजरी भरवत नसावेत बहुदा. Just wondering की नव्या पिढीला परळातल्या बाजरीची ओळख कधी होते? चार बुजुर्ग जातायत तर त्यांच्याबरोबर आपणपण जाउया या 'झुंड लॉजिकने'?

पेट स्टोअरमधे छोट्या पक्ष्यांचा चिवचिवाट चालू असतो - बहुदा फिंचेस असतात ते. त्यांच्या सारख्या या मुनियापण बोलत असतील असा कयास आहे...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

मी नावं शोधायचा प्रयत्न करते. 'परळामधे जेवायला' पिल्लं नाही येत. तुम्ही जे म्हटलंय ते अगदी बरोबर आहे. चार बुजुर्ग जातायत तर त्यांच्याबरोबर आपणपण जाउया या 'झुंड लॉजिकने' हेच लॉजिक आहे. पेट स्टोअर मधे जास्त करून लव्ह बर्ड्स आणि मुनियाच मिळतात. मुनियाचे वेगवेगळे प्रकार या पुस्तकात तुम्ही बघू शकता.
आणि त्या खारुताईला देता का हो काही खायला? खारोटीला देखील पाळता येतं, मस्तपैकी अंगाखांद्द्यावर खेळतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शेंगदाणे, बदाम, काजु आनंदाने खाइल की खार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खार कशाला, मलाच पाळा. मी पण आनंदाने खाईन शेंगदाणे, बदाम आणि काजू!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हाहाहा. इतका चावका/चावरा पेट नको आम्हाला Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खारीला बदाम आणि काजू? अजाबात न्हाई! कारण? कारण की मी "खारूताई", "खारोटी" लिहिताना आधीचे दोन शब्द गाळतो - "जळ्ळी मेली" Smile ईतकं त्राग्याने लिहायचं कारण म्हणजे बर्ड-फीडरची फार नासधूस करतात त्या. खारीना वेगळं खायला घातलं, अगदी बर्ड-फीडरमधे मिक्सड् सीडस् आणि खारीला सूर्यफुलाच्या बिया अशी त्यांची चंगळ केली तरी त्या....येस, जळ्ळ्या मेल्या खारोट्या बर्डफीडर कुरतडायचा तो कुरतडतातच !! फार हुशार असतात. "बर्ड फीडरच्या बाजूला सहा फुटांवरच्या फांदिवरून उडी मारली आणि बर्ड फीडरला धरता नाही आलं तरी त्या धक्क्याने थोड्या बिया खाली पडतात त्या वेचून खाता येतात. झाल्या की परत जाउन उडी मारायची" - हे ज्ञान मिळवण्याईतकी अक्कल असते. सगळ्याच खारीना नव्हे. पण एका खारीला हा उलगडा झाला की तिचं बघून बाकीच्या पण हा उद्योग शिकतात.

पण ईतकी कडकड करून पण त्याना खायला मात्र घालतो हां. आणि दगड मारायचे, बर्डफीडर टांगलेल्या हुकला ग्रीज फासायचं असला काही आचरटपणा पण नाही करत. पण खारी म्हणजे...जळ्ळ्या मेल्या !!

त्याना अगदी काजू/बदाम नाही पण शेंगा, सूर्यफुलाच्या बिया, मका देतो. You know what, I am very glad you asked about it - त्यावरनं आठवलं की गोनीदांचा बुधा ("माचीवरला बुधा" मधला) त्याच्या खारीना तांदूळ द्यायचा. आत्तापर्यंत डोक्यातंच आलं नाही! उद्याचा खारखाउ - तांदूळ Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

खारोट्यांचे अजुन फोटो टाका. खारोटीला पाळणं हि माझ्या अधु-या ईच्छांपैकी एक ईच्छा..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही भोळी-भाबडी, निष्पाप खारोटी. असले फोटो बघून लोकाना त्या पाळाव्याशा वाटतात Wink
s1

"शेपटीवाल्या प्राण्यांची भरली एकदा सभा" या गाण्यातली खार "माझ्या शेपटीची मल्लाच बंडी" म्हणते ते हे. थंडीच्या अशा शेपटीची शाल पांघरून उन कधी येतंय त्याची वाट बघत बसतात.
s2

अक्षरशः दोन नखानी लटकत मका खाणं चाललंय.
s3

या अशा एक-दोन फोटोंवरून मी पेन्सिल स्केचेस करायचा प्रयत्न केला होता - "सोपंय की हे" असं वाटून.......काय झालं? "सोप्प नाहीये" हा उलगडा झाला BiggrinBiggrin
s4
तुम्ही विचारलंत म्हणून हे फोटो दिलेत खरे. पण खारींची खरी मजा त्यांचे खेळ बघण्यात. एक मिनीट काही स्वस्थ बसवत नाही त्याना! आणि "टिनेजर पिल्लं" असतील तर अर्धा-पाउण तास रिकामा बघूनच त्यांच्यावर नजर टाकावी. तेवढी बर्ड-फीडरची नासधूस टाळता आली तर बरं Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

माझ्या शेपटीची मल्लाच बंडी हा फोटो खासच आवडला. ती असं करते हे माहित नव्हतं. सगळेच फोटो आवडले.

पण खारींची खरी मजा त्यांचे खेळ बघण्यात.

हेही १०० टक्के खरं. फोटोंसाठी खूपखूप धन्यवाद. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आमच्या इथे सुद्धा अगदी सकाळी उजाडण्यापूर्वी दोन जातींच्या छोट्या पक्ष्यांची लगबग असते. पण अजिबात जवळ जाता येत नाही, दिवा लावता येत नाही. जरासा आवाज झाला की ते भुर्र्कन उडून जातात आणि दुसर्‍या दिवसाच्या पहाटेपर्यंत पुन्हा फिरकत नाहीत.
पक्षी आणि फोटो दोन्ही सुंदर.
भोकं पाडलेली परळं मिळतात. (निदान मुंबईमध्ये.) नाही तर विणलेली शिंकाळी वापरता येतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सातव्या फोटोत तर शिक्रा आहे. मुनिया बुजत नाहीयेत त्याला बघून ? ( तो शिकारी पक्षी आहे ,,,)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अहो तो मुनियांची शिकार करायलाच येतो एखादेवेळेला. (रोज नाही येत. वर्षातुन एकदाच दिसतो). सहजिकच मुनिया उडून जातात तो आला कि. त्या कशाला थांबतील तिथे. (फोटो वेगवेगळ्या वर्षी काढलेत. फोटो क्र. १,२,३,४ आणि ६ आत्ता परवा काढलेत.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

झकास.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भारीयेत फोटो आणि तुमची काळजी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद. Smile
तुम्ही 'घर करायला.गवत लावा' असं सांगितलं होतं. आमच्या आसपास भरपूर मोकळी जागा आहे आणि भरपूर गवतही आहे म्हणून गवत लावत नाही (नाहितर तेही केलं असतं).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फोटो दिसत कसे नाहीत? बाकिच्यांना दिसत आहेत का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सई

आता दिसतायेत का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हो आता दिसतायत. ३ रा फोटो खासच. कसा काय काढलात? म्हणजे फोटो काढताना आवाजाने/चाहूलीने त्या पक्षांनी बरी पोझ बदलली नाही.
पक्षांनी खाताना सांडलवंड केलेली बरीच आवरावी लागत असेल ना? या आवराआवरीच्या व्यापासाठी विशेष कौतुक तुमचं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सई

लपुन काढला फोटो. Smile
पक्षांनी खाताना सांडलवंड केलेली बरीच आवरावी लागत असेल ना?.. हो.. दिवसातून तिनदा बाल्कनी झाडतो, दोन ते तीन वेळेस खायलाही घालावं लागतं. आई-बाबा घरीच असतात, म्हणून हे शक्य होतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अप्रतिम फोटो आहेत मे. लिहीत जा. हा लेख खूपच आवडला.
तो शिक्रा बहीरी नाही पण एक प्रकारचा ससाणाच वाटतो आहे. "स्वर्गय नर्तक" पक्षी केवढा गोड आहे दिसायला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पीले परों वाली
सलेटी नन्ही चिड़िया
मुलायम रोऔं से ढकी है तुम्हारी छाती
दाना चुगने के क्रम में
तुम
मेरे कितने पास आ गयी हो
फिर भी
नहीं गया है तुम्हारा डर
मेरे प्रति यह वेवजह आशंका
आखिर क्यों है?
चुगती हो कुछ दाने
जाती हो ऊपर
उस पेड़ पर बने अपने घोंसले में
रुकती हो वहां कुछ क्षण
नन्ही चोंच में डालकर वे कण
वापस आती हो
चुगती हो अगला दाना
मैं भी तो बीनती हूँ दाल
बच्चों की रसोई के लिए

आओ मेरे पास
समझो मैं
नहीं जानती मेरी भाषा
मैं कहां समझ पाती हूँ
मन की सात तहों के भीतर बैठा
हमारे चेतन का स्वामी
एक ही है अदृश्य अगोचर
वह जो रचयिता है इस मैं उस तुम का
आओ बैठो मेरी कुर्सी के हत्थे पर
खा लो कुछ दाने इसी थाली से
ले जाओ
चोंच में भरकर कुछ और दाने

नन्ही चिड़िया !

- ईला कुमार

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अहाहा.. काय सुंदर कविता आहे. अगदी मझ्या मनातल्या भावना मांडल्यात. तूमने मेरा दिन बना दिया. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फारच छान आहेत फोटो आणि पक्षांची काळजी घेण्याची तुमची आस वाखाणण्यासारखी आहे, दहा वर्षे हे पक्षी तुमच्या बागेत येतायत म्हणजे तुम्ही त्यांच्यासाठी एक खासगी अभयारण्यच तयार केलंत की Smile
बाकी बागेत येणार्या पक्षांच्या हालचाली, त्यांचे वेगवेगळे कॉल्स ऐकतात तासन तास कसे जातात ते कळत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाल्कनी आहे, तिसर्‍या मजल्यावर घर आहे माझं. बाग नाहिये, बाल्कनितच भरपूर झाडे लावल्याने बरेच पक्षी येतात.
'पक्षांच्या हालचाली, त्यांचे वेगवेगळे कॉल्स ऐकण्यात तासन तास कसे जातात ते कळत नाही', हे अगदी १०० टक्के खरं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक चिडिया, अनेक चिडियां,
दाना चुगने आयी चिडियां...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Biggrin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शहरातल्या बाल्कनीतल्या बर्डफीडरमुळे पुन्हा भावनिक जवळीक मिळालेल्या एका जोडप्याची ही सुंदर गोष्ट या धाग्यासाठी अगदी समर्पक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सवडिने वाचते. धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जोडप्याची आणि धाग्यातली ह्या दोन्ही गोष्टी छान.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

फोटो आणि मुनियांसाठी उघडलेलं अन्नछत्र, दोन्ही मस्त.

मुनिया हा पक्षी नक्की कसा असतो हे माहीत नव्हतं. मला ते नाव माहीत होतं तेही
'चलत मुसाफिर ले लिया रे पिंजडेवाली मुनिया' या लोकगीतामुळे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुनियांच्या अनेक जाती आहेत. त्यापैकी ही एक Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काल वॉक घेताना "सुतारीण बाई" दिसल्या. झाडावरती टकटकाट चालला होता. इतकी गोड होती.
मध्यंतरी वॉक घेतानाच सुतार पक्ष्याची जोडी दिसली होती Smile एकदम एनर्जेटिक!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लकी आहात Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

होय इथे ८ महीने बर्फ असतो पण उरलेले ४ महीने अतिशय निसर्गरम्य असतात. खूप पक्षी दिसतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भारीच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या वर्षी देखील मुनिया ने आमच्या खिडकीत घरटं केलं. आता पिल्लं उडून गेलेत म्हणून घरटं बाहेर काढून त्याचे फोटो काढले.
पहीला फोटो : फर्नच्या पानांमधे गुंफलेलं घरटं
दुसरा फोटो : घरट्याचं तोंड
तिसरा फोटो : घरटं बाहेर काढल्यावर असं दिसतं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी वाट बघतोय बरं....मुनियांची गाणी ऐकायला मिळतील म्हणून !!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

https://scontent-ort2-1.xx.fbcdn.net/v/t1.0-0/s480x480/14980734_1553059048044595_4303520464449957062_n.jpg?oh=0d4ff1e9a6a5faef004a6c186c292f67&oe=5897BA01

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुनिया म्हणजे मराठीतील मैना. हिलाच साळुंकी असे म्हणतात. साळुंकी असा मराठीत सर्च दिला तरी गुगलवर साळुंक्या दिसतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपने तो मेरी आँखे खोल दी।।।।

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझी एक‌ मैत्रिण‌ बर्ड‌ फिड‌र्स‌ आणि शेल्ट‌र्स‌ ब‌न‌व‌ते. हे स‌ग‌ळे ती टाकाऊ गोष्टींपासून‌ किंवा नैस‌र्गिक‌ गोष्टिंपासून‌ ब‌न‌व‌ते हे विशेष‌.
बांबूचे, मातीचे, टेट्रापॅक‌चे, नार‌ळाच्या क‌र‌व‌ंट्याचे व‌गैरे अस‌तात‌.
या स‌ग‌ळ्याच्या कार्य‌शाळा ही ती घेत‌ अस‌ते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

अरे वा! चांगला उपक्रम..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्पॉटेड मुनियाची खास वैशिष्ट्यं म्हणजे एकाच घरट्यात एकाहून अनेक जोड्या एकावेळी नांदणं *(विणीकरिता), आणि एकाच घरट्याचा त्याच किंवा वेगवेगळ्या मुनियांकडून पुनर्वापर. या दुर्मिळ आणि विचित्र सवयी आहेत. तस्मात् ते सोडून गेले असं मानून घरटी उपटून काढू नका.

* वेगवेगळ्या जोड्यांनी एकत्र चिकटून बांधलेली घरटी मोठी (लांब) आणि एकाला एक जोडल्याप्रमाणे असू शकतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

+१..
आमच्याकडे एकाला एक जोडून अशी ३ घरटी होती. त्यांचा विणिचा हंगाम आणि पावसाळा संपला कि त्या परत येत नाहीत. ४-५ महिन्यांत ती घरटी विसविशीत होतात मगच आम्ही ती काढतो. जुन आला कि परत त्यांची घरटयांची लगबग सुरु होते.. साधारणपणे पावसाळ्याचे ४ महिने मुनिया आमच्याकडे येतात..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा पक्षी खायला कसा लागतो?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0