विषय सर्वथा...! (निमित्त : 'पु पु पिठातली उर्फ भाषाभीरूची गोष्ट')
विषय सर्वथा...!
(निमित्त : 'पु पु पिठातली उर्फ भाषाभीरूची गोष्ट')
'पु पु पिठातली उर्फ भाषाभीरूची गोष्ट' ह्या कथेचा अंकातला दुवा
प्रत्येक साहित्यकृतीची जन्मकथा आणि लेखनप्रक्रिया वेगळी असते आणि मनाच्या वावरात कथाबीज कुठे गवसलं, रुजलं, अंकुरलं आणि त्याचा विकास कसा झाला ही प्रक्रिया दर वेळी आठवतेच असं नाही. परंतु काही साहित्यकृतींच्या बाबतीत मात्र काही गोष्टी ठळकपणे आठवतात. जसं की, 'पु पु पिठातली उर्फ भाषाभीरूची गोष्ट' ह्या कथेची जन्मकथा.
माझ्या बाबतीत कथा (खरं तर कोणतंही लिखाण) आधी लिहिली आणि शीर्षक नंतर दिलं असं सहसा घडत नाही. किंबहुना नेमकं शीर्षक सुचेपर्यंत लिखाणाचा हवा असलेला ओघ मला सापडता सापडत नाही. चाचपडायला होतं. त्यातही काही वेळा असंदेखील घडतं, की मुळात जुळलेलं शीर्षक, हे लिहिणं सुरू केल्यानंतर मध्येच तितकं समर्पक वाटेनासं होतं. मग विचारप्रक्रियेत आणखी वेगळं शीर्षक जुळतं आणि ते पक्कं ठरलं की त्यानुसार कथा पुन्हा पहिल्यापासून लिहावी लागते. त्यामुळे शीर्षक सुचणं ही माझ्यासाठी अत्यंत मर्मवेधक अशी सखोल प्रक्रिया असते, जी त्या कथाद्रव्याभोवती जमा झालेल्या आशयद्रव्याचा परिपाक अशा स्वरूपाची असते. मला शीर्षक हे कथादेहाची शेंडी अशा स्वरूपात हवं असतं, की जिला धरून तो देह उचलला / उकलला जावा. तर शीर्षकाबद्दलची माझी प्रक्रिया एवढी जटील आहे. मनात खूप घुसळण होऊन ते अवतरतं. अर्थातच ते माझं मलाच सुचावं लागतं. परंतु ह्या कथेच्या बाबतीत मात्र जरा वेगळं घडलं. ते असं, की हे शीर्षक मुळात मला सुचलं नव्हतं. त्याचा उगम माझा मित्र युसुफ शेख ह्याने मला सुचवलेल्या दोन शब्दांमध्ये होता. जे शब्द होते 'पिठाची पुची'.
आता जरी 'योनीच्या मनीच्या गुजगोष्टी'मध्ये ह्या शब्दाचा जाहीर आणि सामुदायिक गजर होत असला तरी ही कथा १९८५ साली - म्हणजे ३० वर्षांपूर्वी - लिहिली, तेव्हा हे शीर्षक असलेली कथा प्रकाशित होणं जवळपास अशक्य होतं. त्यामुळे हे शीर्षक बदलणं मला अनिवार्य वाटलं. शिवाय युसुफने सुचवलेल्या त्या शीर्षकातून मला जाणवलेला अनुस्यूत अर्थ वाचकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करणं माझ्यासाठी खूपच महत्त्वाचं होतं. त्यासाठीदेखील शीर्षकात समर्पक बदल करायलाच हवा होता. साहजिकच कल्पकतेचा कस लावण्यासाठी पूर्ण वाव होता. थोडक्यात काय, तर युसुफने सुचवलेल्या दोन शब्दांमध्ये कथाबीज असल्याचं मला जाणवलं होतं, जे माझ्या बाबतीत तरी सहसा घडत नाही. पण युसुफच्या बाबतीत ते घडलं ह्याचं कारण आमचा रॅपो हे होतं. त्यामुळे ह्यापुढची प्रक्रिया सांगण्यापूर्वी युसुफ आणि माझ्यातील अंडरस्टँडिंगबद्दल लिहितो.
युसुफ हा मला माझ्या नोकरीच्या ठिकाणी म्हणजे 'बँक ऑफ इंडिया'च्या बॉम्बे ऑफीसमध्ये भेटलेल्या मोजक्या मित्रांपैकी एक. त्याचा-माझा परिचय वाढला तो दोघांनाही असलेल्या साहित्याच्या ओढीतून. युसुफचं शालेय शिक्षण हे कराड-ढेबेवाडीजवळील काळगावमध्ये झालेलं, पण तिथे असतानादेखील तो 'सत्यकथा' हे तेव्हाचं आघाडीचं वाङ्मयीन मासिक वाचायचा. नंतर तो मुंबईला आला आणि नायगाव इथे राहायला लागला. साहजिकच तो वेळ मिळाला की साहित्याच्या ओढीमुळे 'मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालया'मध्ये जायला लागला. तिथे मनोहर ओक, तुलसी परब, नामदेव ढसाळ, राजा ढाले असे तेव्हाचे 'हट के' लिखाण करणारे लोक आणि 'लघु-अनियतकालिकं' ह्यांच्याशी त्याची ओळख झाली. सांगायचंच तर, नामदेव ढसाळच्या 'गोलपिठा' ह्या पहिल्याच कवितासंग्रहाच्या प्रकाशनसमारंभाला युसुफ हजर होता. स्वतः युसुफदेखील त्याच्या अत्यंत सुंदर हस्ताक्षरामध्ये मिताक्षरी कविता करत असे. त्या कुठे-कुठे प्रकाशितदेखील होत होत्या. परंतु त्याच्या लिखाणाचा वेग तसा फारसा नव्हता. त्याचं वाचन मात्र सतत चालू असायचं. मराठी आणि इंग्रजी, दोन्ही.
आमच्या ग्रुपमध्ये साहित्य-संस्कृतीवर सतत गप्पागोष्टी व्हायच्या. हेमंत कर्णिक, विश्वास पाटणकर, गोपाळ आजगावकर, सुधीर प्रधान हे माझे कॉलेजच्या दिवसांपासूनचे साहित्यप्रेमी मित्रदेखील माझ्यामागोमाग नेमके बँक ऑफ इंडियातच लागले होते आणि त्या काळात बँकामध्ये आजच्याइतकं कामदेखील नसे. त्यामुळे दिवसभरात आम्ही नाश्ता, जेवण आणि किमान दोन वेळा चहा पिण्यासाठी एकत्र भेटत असू. भेटलो की सहसा 'शिळोप्याच्या' नव्हे, तर साहित्य, संस्कृती, समाजकारण, राजकारण अशा क्षेत्रांमधील अनेक विषयांवर अटीतटीने, हमरीतुमरीवर येत गप्पा व्हायच्या. त्यात आमच्या वयानुसार लैंगिकता / स्त्रीपुरुष संबंध हा विषय अधनंमधनं अर्थातच असायचा. आणि त्यावर बोलतानादेखील खुसखुशीत असलं तरी सपक नव्हे; तर आपल्या परीने तात्त्विक, मौलिक, मार्मिक बोलण्याचा सगळ्यांचा प्रयत्न असायचा.
जसं की एकदा - 'दोन माणसांची मनं जुळली असता शरीरं जुळली, तर त्यात समाजाला आक्षेपार्ह काय वाटावं?' ह्यावर जोरजोरात चर्चा होऊन बहुमताने ठराव पास होण्याच्या पायरीवर असताना कुणीतरी विचारलं, की "समजा एखादी स्त्री - मन जुळणं तर सोडूनच द्या, पण ते काय असतं हे कळायच्या आधीच - शरीरं जुळवायला तयार असली, तर तुम्ही तयार होणार का नाही?" हा प्रश्न समोर आल्यावर मनं जुळायचा उदात्त हेतू लटका / फोल असल्याचं जाणवून त्या चर्चेतली हवाच निघून गेली, आणि मग 'ह्या बायका साल्या, मनं जुळल्याशिवाय शारीरिक संबंधांना तयार होत नाहीत' ह्या पूर्वापार पुरुषी अडचणीकडे चर्चा वळली. असो. तर हा एक मासला झाला, एवढंच.
तर आमच्या ह्या गप्पांमध्ये काही वेळा एकमेकांवर एवढ्या तावातावाने तुटून पडलं जायचं, की ह्या गप्पासत्रांचे जे श्रोते असायचे त्यांना वाटायचं - आता हे भांडणारे एकमेकांचं पुन्हा तोंड पाहणार नाहीत. परंतु दोन-चार तासांनी सगळं टोळकं पुन्हा जमायचं आणि वाद-संवाद पुन्हा नव्याने सुरू व्हायचा. संध्याकाळीदेखील गाड्यांची गर्दी कमी होईपर्यंत फोर्टातील वेगवेगळ्या ठिकाणी भटकण्याकडे आमचा कल असायचा. त्यात बाहेरचे मित्रदेखील असायचे. वैचारिक धुमाकूळ चालायचा.
आमच्यातील बहुतेक जण मुंबईत वाढलेले असले, तरी युसुफचं बालपण कराडला आणि विश्वासचं बालपण दापोलीला गेलेलं होतं; ते आम्हां हेलरहित मुंबईकरांना गुंगवून टाकायचे. हा युसुफ तेव्हा 'श्याम मनोहर, विलास सारंग आणि अनिल डांगे' ह्या तीन आघाडीच्या कथाकारांच्या कथांवर बारकाईने लक्ष्य ठेवून असायचा. ह्यांच्या कथा तेव्हा 'सत्यकथे'मध्ये धडाधड छापून येत असत. त्यावर जोरजोरात चर्चा चालायची. हे तीनही कथाकार माझेदेखील कॉलेजच्या दिवसांपासून आवडते होते. त्यामुळे आमच्या गप्पांमध्ये मराठी नवकथेचा विषय हटकून असायचा. मी तेव्हा कविता लिहायचो. माझी प्रत्येक कविता आणखी कुणी वाचली न वाचली, तरी युसुफ आवर्जून वाचायचा. त्यात काही सूचनादेखील करायचा. कॉलेजच्या आसपासच्या वर्षांमध्ये लिहिलेल्या 'हौशी' स्वरूपाच्या कवितांचा माझा जो एकमेव संग्रह आहे, त्यातील कवितांची निवड युसुफनेच केली होती.
नंतर मी कवितांबाबत असमाधान वाटून कथा लिहायला लागलो. तेव्हादेखील त्यातलं आशय-विषयांचं वेगळेपण युसुफला बरोबर जाणवत होतं. आमच्या रॅपोविषयीचा उल्लेख सुरुवातीला केला आहेच. तर त्यामुळे शहरी ते ग्रामीण पातळीवरच्या लैंगिक दांभिकतेतून उद्भवणार्या मनोगंडांबद्दल आमच्यात बर्याचदा बोलणं व्हायचं. दरम्यान युसुफला प्रमोशन मिळून तो बिहारमधील भागलपूर येथे गेला. बँकेतील बहुतांश लोक तेव्हा बिहारसारख्या राज्यात बदली झाली, की जणू नरकात जावं लागतंय अशा सुरात बोलायचे. युसुफचा खाक्याच वेगळा होता. तो राजकीयदृष्ट्या पहिल्यापासूनच सजग होता. त्यामुळे बिहारसारख्या राजनीतिपटू वातावरणात तो मस्त रमला. शिवाय त्याच्या ग्रामीण पिंडालादेखील बिहार, परका तर सोडूनच द्या, पण जवळचा वाटला होता. त्यात त्याचं कुटुंब इथे मुंबईतच होतं आणि हा पठ्ठ्या तिकडे एकटा सडाफटिंग. वर्षातून दोन-चार वेळा तो आला, की आमच्या अर्थातच गाठीभेटी होत आणि आतल्या गोटातल्या गप्पा. त्यावर तो एकदा मला म्हणाला की, "बाबा, तुझ्या स्टाइलमध्ये 'पिठाची पुची' ह्यावर एक कथा लिही." ह्याउप्पर तो मला एका शब्दाने बोलला नाही. पण मला त्यातली आच/गोम नेमकी जाणवल्यासारखं वाटलं आणि ऐकताक्षणी डोक्यात ते बीज रुजलं.
मुळात मला हे जाणवलं, की कथेचा नायक हस्तमैथुनासाठी पिठातून योनी काढतो असं दाखवणं शक्य असलं; तरी तंतोतंत ह्या शीर्षकाची कथा लिहिली, तर ती प्रकाशित करणं जवळपास अशक्यप्राय आहे आणि ह्याचं कारण आहे - ते स्वतःसकट बहुतेकांच्या मनात असलेली भाषेच्या वापराविषयीची भीती - किंवा भीडभाड म्हणू या हवं तर. कारण बोला किंवा बोलू नका, लैंगिक व्यवहार तर अनंत काळापासून सुरू आहेतच आणि असणारही आहेत. लैंगिक व्यवहार हे एक कालातीत / त्रिकालाबाधित सत्य आहे. भीती आहे ती त्यांच्या उच्चाराची, जी 'पिठाची पुची' ह्या युसुफसूचित शब्दांतून अधोरेखित झाली होती. तर ह्यातून कथा सुचायच्या सुरुवातीलाच एक अर्थपूर्ण परिमाण हाती आलं. भाषेची भीती आणि हा भाषाभीरुतेचा मुद्दा लैंगिक उल्लेखांच्या संकोचाच्या मुळाशी असल्याने तो कानामागून येऊन तिखट होऊन बसला. मग काळाच्या ओघात ह्या विषयाशी निगडित असं आशयद्रव्य हळूहळू जमा होऊ लागलं. अर्थात आशयद्रव्य जमा होण्याचा क्रम प्रत्यक्ष घडणकाळातदेखील सलग / रेषीय नोंदवला जाणं शक्य नसतं. कारण बर्याचदा लिहिण्याच्या ओघात काळाशी जी कसरत सुरू असते, त्या प्रक्रियेतून तो साकारत असतो. तरीही अंदाजाने आणि आठवतं त्यानुसार असं म्हणता येईल, की ज्या अर्थी युसुफने हे शीर्षक नोकरीनिमित्त परगावी गेलेला असताना आणलं होतं, त्या अर्थी नोकरीनिमित्त कुटुंबापासून दूर परगावी गेलेला एकटा राहणारा नायक हा तिथूनच सुचला असणार.
आता पुढचा महत्त्वाचा धागा होता तो भाषाभीरुतेसंबंधी आशयद्रव्याची जुळवाजुळव होण्याचा. मी ज्या बैठ्या चाळींच्या वस्तीत राहतो होतो, त्या आठ चाळींमध्ये सुमारे नव्वद टक्के बिर्हाडं ही ब्राह्मणांची होती आणि आसपासची कुडाच्या झोपड्यांची जी बकाल वस्ती होती, त्यामध्ये बव्हशांने भरणा होता तो कोकणी, मालवणी गिरणीकामगारांचा. त्यांच्या तोंडात सातत्याने लैंगिक उल्लेखांशी निगडित शिव्या असत, ज्या मी जिथे राहत होतो त्या ब्राह्मण वस्तीत खूपच क्वचित / तुरळक दिल्या जात. शिव्या देणं हे चुकीचं आहे असा संस्कारदेखील आमच्या भटवाडीतील घराघरांतून केला जाई. त्यातून भेंडी-गवारी ह्या भाज्यांचे उच्चार आवेशाने करून त्या भाज्यांना शिव्यांपर्यंत पोहोचवणे अशा पळवाटा काढलेल्या जाणवायच्या. 'रूट कनाल' केलेल्या ह्या शिव्यांची मजल आयचा घो, बापाचा ढोल, मग हळूहळू आजीचा तंबोरा, आजीच्या दुर्वा इथपर्यंत जायची. त्यातल्या त्यात 'आयला / च्यायला' हे सरसकट उच्चारले जायचे. पण एखादा कुणी त्यादेखील आईवरून दिलेल्या शिव्या असल्याची जाणीव करून द्यायचा. तर एकुणात काय, आसपासच्या वातावरणात - आणि पर्यायाने त्या संस्कारांमध्ये वाढलेल्या मनात - भाषिक सोवळंओवळं होतं. माझ्या घरात आई तर शिव्या देणं शक्यच नव्हतं, पण वडीलदेखील - एरवी लैंगिक विषयांवर मोकळेपणे बोलणारे होते तरी - फार तर 'शष्प' हा शब्द उच्चारत; पण त्यांच्या तोंडून 'झाट / शाट' हे शब्ददेखील मी कधीही ऐकले नव्हते. आमच्या वस्तीतले वडीलधारे एकूणातच कमी शिव्या देणारे / सहसा अर्वाच्य न बोलणारे होते. त्यामुळे होळीला मोठी मंडळी जेव्हा 'आकाशातून पडली बाटली आणि अमुकतमुकची गांड फाटली' अशा हाळ्या देत, तेव्हा त्या ऐकताना मोठं अप्रूप वाटत असे.
पण माझा वावर हा आमच्या वस्तीपुरता सीमित नव्हता. मी आसपासच्या बकाल, मालवणीबहुल वस्त्यांमध्ये वावरत असे. शिवाय बांद्रा प्लॉट ही मुस्लीम वस्ती. तेथील हिजड्यांचा सवतासुभा - येथेदेखील बऱ्याचदा जाणंयेणं असायचं. तिथे जी भाषा ऐकू यायची, त्या पार्श्वभूमीवर आमच्या वस्तीतील भाषेला भिणं मला साहजिकच जाणवलेलं - खरं तर खटकलेलं - होतं आणि माझ्या जाणिवेमध्ये शिरलेलं होतं. त्यातून गणेश आणि नारभट ही पात्रं मनामध्ये घडवली गेली. ही पात्रं आमच्या वस्तीतील कुणी रेडीमेड विशिष्ट व्यक्ती नव्हत्या. तर ती तेथील संबंधित वातावरणातून घडवलेली प्रातिनिधिक स्वरूपाची व्यक्तिमत्त्वं होती. किंबहुना ह्या कथेतील बहुतांश भाग हा घडलेला नव्हता, तर पात्रांप्रमाणेच प्रसंगदेखील 'लैंगिकतेसंबंधातील भाषाभीरुता' ह्या सूत्राच्या अनुषंगाने कल्पनेतून साकारलेले होते.
त्या काळात अनेक बायका मला अशा सोज्ज्वळ चेहेऱ्याने वावरताना दिसत, की त्यांना जणू लैंगिक संबंध न ठेवताच मुलं व्हायची किमया देवदयेने अवगत झालेली आहे, असं वाटावं. आणि मला बिथरायला व्हायचं. हे असले स्त्रीपुरुष आपापसांत तरी लैंगिक बाबतीत मोकळेपणे बोलत असतील का ह्याविषयी मी आजही साशंक होतो आणि मला आतून कुठेतरी वाटतं, की ह्या सगळ्या तथाकथित मर्यादशील वागण्याबोलण्याचा ह्यांच्या लैंगिक व्यवहारांवर - आणि परिणामी मानसिकतेवर - निश्चितच काहीतरी अनिष्ट परिणाम होत असेल. गणेशच्या बाबतीत तो परगावी एकटा पडला असताना हे अनिष्ट परिणाम उफाळून येणं मला शक्य वाटलं. मग ती दबलेली-बुजलेली लैंगिकता चाळवली जाण्यातून सुगंधा हे पात्र सुचलं आणि तिला बघून मनात मिटक्या मारताना पिठाबद्दल जाणवलेल्या लैंगिक भावनेतून त्याच्या हातून साकारली जाणारी योनी सुचली! तिला तो मनातल्या मनातदेखील पुची असं म्हणून धजत नाही. त्याला ''योनी' हे कसं देवीसारखं वाटतं' आणि तिथेच त्याचं सगळं बिनसतं. आपल्या मनातील नकोनकोशी, पण तरीही झुगारता न येणारी, घुसमट त्याला अस्वस्थ करते. त्या तिरीमिरीत तो पत्र लिहितो आणि त्याला कोंडलेली वाफ बाहेर सोडायची वाट सापडते.
तर अशा रीतीने 'पिठाची पुची' ह्या थेट शीर्षकाने कथा लिहायला खुद्द माझंच मन धजावेना; त्यातून माझ्या डोक्यात लैंगिकता आणि भाषिक सोवळेओवळेपणा ह्यांतील संबंध नव्याने अधोरेखित झाला आणि त्या अनुषंगाने ही कथा रचली गेली. युसुफने सुचवलेल्या शीर्षकात ह्या कथानकाचा मागमूसदेखील नव्हता.
एकंदरीत काय, तर युसुफच्या शीर्षकामुळे मला लैंगिकता ह्या विषयावर कथावस्तू उभारण्याचं सुचलं; पण त्यातून जाणवलेल्या भाषिक भीतीमुळे त्या कथावस्तूचा रोख बदलला. त्यामुळेच आपल्या मुलामध्ये अशी भाषाभीरूता येऊन त्याचं मन भरकटू नये अशा विचाराने, त्याच्यावर असे कोंदट संस्कार होऊ नयेत ह्यासाठी, कथेचा नायक मनाचा हिय्या करून बायकोला पत्र लिहितो खरा; पण त्याच्या मनात असलेले शब्द, 'पु पु पुच्चीतला', स्वतःच्या बायकोला लिहिलेल्या खाजगी पत्रातही लिहायची हिंमत काही त्याला होत नाही; तो 'पु पु पिठातली' असं लिहितो. आणि त्यानुसार कथेचं शीर्षक अवतरलं, ते 'पु पु पिठातली (उर्फ भाषाभीरूची गोष्ट)' असं.
---
कथेची जडणघडण सर्वसाधारणपणे अशी आहे. आता मुळात प्रश्न असा आहे, की ही कथा मला लिहावीशीच का वाटली? ह्याचं कारण असं होतं, की लैंगिक कोंडमारा / कुचंबणा ह्यांमुळे मेटाकुटीला आलेली, रुळावरून गाडी घसरलेली अनेक माणसं मला आसपास दिसत होती आणि हेदेखील जाणवत होतं, की ह्या माणसांच्या दुरवस्थेचं कारण लैंगिकतेमध्ये आहे हे बहुतेकांना उमगतच नाहीये. त्या काळात माध्यमांचा उगम झालेला नव्हता आणि वर्तमानपत्रांतूनदेखील ह्या विषयावर फार तर 'ताईचा सल्ला' वगैरे सदरांमध्ये जो काही तुरळक मजकूर येत असेल तेवढाच सेक्सशी संबंधित मजकूर असायचा! त्यामुळेच हा विषय वाचकांच्या समोर आणणं मला अत्यंत गरजेचं वाटलं.
शीर्षकामध्येच 'भाषाभीरूची गोष्ट' असा स्पष्ट उल्लेख करूनही ह्या कथेमध्ये भाषेची भीती / सोवळेओवळेपणा ह्यावर ठेवलेला रोख वाचकांपर्यंत कितपत पोचेल ह्याबाबत मी काहीसा साशंक होतो आणि एका भिक्षुकाचा मुलगा पिठातून योनी तयार करतो व तिच्याशी रमतो, हे वाचक कसं घेतील हे जाणून घेण्यासाठी मी उत्सुक होतो. त्यामुळे मी ही कथा सर्वप्रथम माझ्या वडिलांनाच दाखवली.
माझे वडील हे जरी साहित्याचे वाचक नव्हते, तरी भाषेचे - विशेषतः संस्कृतचे - व्यासंगी होते. त्यांनी वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षापर्यंत पाठशाळेमध्ये संस्कृतचं रीतसर अध्ययन केलेलं होतं. ते वैय्याकरणी / काव्यतीर्थ होते. ह्या पार्श्वभूमीवर ते सनातनी / कर्मठ असतील असा ग्रह साधारणपणे होऊ शकतो. परंतु प्रत्यक्षात ते तसे अजिबात नव्हते. ते माझ्याशी कुठच्याही विषयावर आडपडदा न ठेवता बोलायचे. लैंगिकतेवर चर्चेबाबत ते खूपच मोकळे होते. मला त्यांनी लहानपणी गांधीजींचं कामजीवन वाचून दाखवलं होतं. मात्र ते अचकटविचकट कधीही बोलत नसत. माझ्या अंदाजानुसार त्यांच्या जाणिवेमध्ये संस्कृत साहित्यातून जो शृंगाररस पाझरला होता, तेवढ्या मर्यादेमध्ये ते बोलत. माझ्या लिहिण्यात (माझ्या मते) जी काही संयत लैंगिकता येते, तिचं श्रेय माझ्या वडिलांनी माझ्याबरोबर साधलेल्या मोकळ्या संवादालादेखील जातं.
माझे वडील आणि नारभट यांच्यामध्ये एक साम्य होतं. ते म्हणजे माझ्या वडिलांनीदेखील 'शष्प'सोडून कोणतीही शिवी / अपशब्द उच्चारल्याचं मला तरी आठवत नाही. साहजिकच 'पु पु'मधील लैंगिक उल्लेख त्यांना आक्षेपार्ह वाटले नाहीत. पण मला वाटलं होतं, की ते त्यातील भाषिक भागाबद्दल काहीतरी बोलतील. तसं ते काही बोलले नाहीत. ते म्हणाले, की "ही नवकथा आहे, त्यामुळे त्यातलं मला काही कळत नाही, पण तू पिठातून मात्र बरोबर काढलं आहेस." माझ्यासाठी ही प्रतिक्रिया जरी अपेक्षेनुसार नव्हती, तरी वाईटही नव्हती. किमान एका भिक्षुकाच्या मुलाने असं वागणं आणि पिठातून योनी काढणं हे त्यांना हिडीस तरी वाटलं नव्हतं. पण त्यातून माझ्या कथेचा रोख दृष्टीआड होईल की काय, अशी शक्यता माझ्या मनात बळावली. नंतर ती कथा 'स्पंदन' नावाच्या दिवाळी अंकात स्वीकारली गेली, तेव्हादेखील त्यात जी रेखाटनं काढली गेली त्यांमध्ये देवळावरची पताका आणि योनी हेच घटक ठळकपणे रेखाटले गेले होते. विशेषतः योनीचं चित्र इतकं डोळ्यात भरत होतं की मलाच थोडं अस्वस्थ व्हायला झालं. पण विचार केल्यावर मला पटलं, की ह्यातील लैंगिकता आणि भाषिक भीतीचं अंतःसूत्र चित्रामध्ये आणणं हे तसं अवघडच होतं. साहजिकच माझी भिस्त आता होती, ती चोखंदळ वाचकांवरच. मात्र नंतर ही कथा आवडलेले - नावडलेले आजवर जे कुणी भेटले, त्यांच्या बोलण्यातून 'लैंगिकता आणि भाषा' हा मुद्दा क्वचितच कधी आला असेल!
आणि अलीकडलीच गोष्ट. तपशिलात थोडं उन्नीस-बीस होत असूही शकेल. पण घडलं ते असं, की मुंबई विद्यापीठामध्ये झालेल्या एका चर्चासत्रामध्ये मराठीतील एका नामवंत कवयित्री, समीक्षक वगैरे असणाऱ्या प्राध्यापिकेने मराठीतील काव्यात्म साहित्यावर बोलताना, महानगरी साहित्यावर कोरडे ओढताना 'त्यात लैंगिकता असल्याने ते लक्ष्य वेधून घेतं' असा मुद्दा मांडला आणि त्यासंबंधात तोंडसुख घेताना मराठीतील एका लेखिकेच्या जोडीने माझ्या कथांचीदेखील उद्धारगत केली; ज्यावरून फेसबुकवर त्यांची भरपूर खिल्ली उडवण्यात आली. ते मला कसंसंच वाटलं आणि मी मग ती चर्चा तात्त्विक अंगाकडे वळवण्याचा प्रयत्न केला. कारण मला एकुणातच व्यक्तीपेक्षा संबंधित घटित आणि त्यातून डोकावणारी वृत्ती / प्रवृत्ती अधिक महत्त्वाची वाटते. माझ्या कथांबद्दल असे लैंगिकतेशी निगडित भलेबुरे ताशेरे हे मी अधनंमधनं ऐकत असतोच. ह्याआधीही आणखी एका समीक्षकांनी माझ्या एका कथासंग्रहाबद्दल लिहिताना, त्यातील लैंगिकतेविषयी नापसंती व्यक्त करून "मुलं झोपल्यावर वाचायला ह्या कथा पालकांनी हरकत नाही!" असा गमतीशीर सल्लादेखील पुस्ती म्हणून जोडला होता. त्यामुळे मला त्या प्राध्यापिकाताईंच्या वक्तव्यामध्ये आपल्या वाचकांच्या मानसिकतेचं प्रतिनिधित्व सापडल्यासारखं वाटलं. शेवटी प्रत्येकाची अभिरुची, धारणा ही त्याच्यावर कुटुंबातून, समाजातून झालेल्या संस्कारांशी निगडित असते. तेव्हा ह्यानिमित्ताने आपल्या वातावरणाचा लैंगिकतेविषयीचा झाडा घेणं अधिक कामाचं ठरेल.
विज्ञान जसं तर्कशुद्ध, वस्तुनिष्ठ, पुरावाधिष्ठित संशोधन करत असतं; तशीच भाषादेखील नेणिवेच्या पातळीवर आकलनकार्य करतच असते. प्रत्येक भाषेत अशी उदाहरणं सापडतील. मराठीपुरतं बोलायचं तर Time आणि Space ह्या दोन्ही संज्ञांसाठी 'अवकाश' हा शब्द योजला जाणं हे मला आइनस्टाइनच्या सापेक्षतेच्या सिद्धांताशी समांतर वाटतं आणि माझ्या अंदाजाने ते आइनस्टाइनपूर्व काळापासून कदाचित / बहुधा संस्कृतमधून चालत आलेलं असावं. आपल्या विषयाच्या संदर्भात बोलायचं, तर 'काम' हा शब्द घ्या. तो आपल्या भाषेत Sex आणि Work ह्या दोन्ही अर्थी योजला जातो. तसाच मराठीतील 'विषय' हा शब्द. ज्या भाषेमध्ये 'विषय' हा एकच शब्द Subject आणि Sex ह्या दोन्ही अर्थी योजला जाण्याची जाण होती; त्या भाषेत -
'सुसंगती सदा घडो,
सुनजवाक्य कानी पडो,
कलंक मतीचा झडो,
विषय सर्वथा नावडो'
यासारखं खुळचट आणि गुळमट कवन रुजावं ही गोष्ट मला लैंगिकतेबाबतचं इथलं वातावरण समजून घेण्याच्या दृष्टीने लक्षणीय गोष्ट वाटते.
त्यामुळेच तर परदेशी साहित्य, फ्रॉइड, र. धों. कर्वे, साहित्यशास्त्र (रससिद्धांत) वगैरेंची ओळख असतानादेखील त्या प्राध्यापिका विद्यापीठीय पातळीवरील चर्चासत्रामध्ये - एखाद्या दुकानाच्या पायरीवर - किंवा त्यांना ग्रामीण हवं तर झाडाच्या पारावर बसून - गावगप्पा कराव्यात तशा - 'सेक्स'सारख्या मूलगामी प्रेरणेवर बोलू धजल्या ह्याचं मला फारसं काही वाटलं नाही. त्याही असल्या दांभिक वातावरणाच्या बळी असल्यामुळे त्यांचं असं बोलणं मी जरा अधिक गंभीरपणे आणि समंजसपणे घेतलं. एवढंच, की आपल्या साहित्याची ही स्थिती मला काहीशी चिंताजनक वाटते.
एखाद्या लेखनाच्या साहित्यातील 'लैंगिकते'विषयी साधकबाधक बोलायला काहीच हरकत नाही. किंबहुना समीक्षेने त्याची दखल घ्यावीच. पण जीवनामध्ये थेट आपल्या जन्मापासून असलेलं लैंगिकतेचं स्थान मान्य असेल, तर जीवनाचं प्रतिबिंब साहित्यात उमटतं हे लक्ष्यात घेता लैंगिक उल्लेखांनाच 'अब्रह्मण्यम' ठरवणं हा दांभिकतेचा कळस झाला. माझ्या ज्या प्रकाशित कथा आहेत, त्यांत लैंगिकतेवर रोख असलेल्या कथा किती आहेत, अशा संख्याशास्त्रीय विचारापासून खरंतर सुरुवात करायला हवी. त्यानंतर जो लैंगिक भाग आहे, त्याचा गुणात्मक विचार व्हायला हवा, वगैरे वगैरे.
वि. स. खांडेकरांची 'ययाति' वयात येताना वाचल्यानेदेखील असेल कदाचित, पण मी पिवळी पुस्तकं तर सोडूनच द्या, पण काकोडकर वगैरे लेखकदेखील फारसे कधी वाचलेले नाहीत. (नाही म्हणायला 'श्यामा' ही कादंबरी तिच्यावर झालेल्या खटल्यामुळे चाळली होती, तेवढंच माझं काकोडकरांचं वाचन असावं बहुदा), बाकी माझ्या तरुण वयात 'ब्लू फिल्म' बघितल्या जायच्या, त्यांच्या वाटेलादेखील मी आपणहून चुकूनही गेलो नाही. आता ह्या नव्या जमान्यात मात्र ज्यांना 'पॉर्न' म्हटलं जातं; अशा चित्रफिती, फोटो विविध माध्यमांधून सामोरे येत असतात. ते क्वचित डोळ्यांसमोरून जातात. तर त्यावरून माझा ग्रह असा झाला आहे, की 'जे मनातील कामभावनेला चाळवतं, खतपाणी घालतं, आंजारतं-गोंजारतं ते म्हणजे पॉर्न'. नैसर्गिक कामभावनेविषयी विचाराला प्रवृत्त करेल असं त्यात काही न दिसल्याने व्यक्तिशः मला जरी त्यात फारसा रस वाटत नसला, तरी आणखी कुणाला त्यात रस वाटण्यात मला तरी काहीही आक्षेपार्ह / वावगं वाटत नाही. किंबहुना जाणीवनेणिवेत, कळतनकळत सतत खदखदती असलेली, तात्पुरती तृप्त होणारी आणि पुन्हा ’ये रे माझ्या मागल्या’ म्हणत चाळवणारी कामवासना विचारात घेता पॉर्न पाहिलं जाणं हे अटळच आहे. आणि पॉर्न तर सोडूनच द्या, पण आपलं अस्तित्व टिकवण्याच्या धडपडीमध्ये दर्शकांना / प्रेक्षकांना गुंतवण्यासाठी, गुंगवण्यासाठी, त्यांच्या मनातील कामवासना आणि हिंसाचार ह्यांना चाळवण्याचा प्रयत्न जाहिरात, चित्रपट, टीव्ही अशी माध्यमं सतत करतच असतात. ती आता आपल्या कुटुंबात / घरात राजरोस शिरलेली आहेत. तर अशा वेळी काही कलाकृती ह्या लैंगिकतेवर विचार करायला लावणाऱ्या असणे हे समाजमनाच्या संतुलित आणि निरामय वाढीसाठी आवश्यक आहे.
'वाचकावर घडणारा परिणाम हा लेखकाच्या नियंत्रणाबाहेर असल्याने तो त्याची जबाबदारी घेऊ शकत नाही', असा वैधानिक इशारा देऊन मला असं स्पष्ट करावंसं वाटतं, की मी लिहीत असताना वाचकांच्या मनातील कामभावनेला चाळवणारी कामोद्दीपक (erotic) स्वरूपाची वर्णनं सहसा करत नाही. तर लैंगिक गंड / बारकावे वाचकांना जाणवावेत असा माझा रोख असतो. ह्या प्रक्रियेत लैंगिकतेच्या काही अस्पर्श, हळव्या भागांना स्पर्श होणं हे ओघानेच घडतं, आणि माझ्या मते वाचकांना नेमकं तेच खटकतं. हा मुद्दा स्पष्ट करणारी 'पु पु पिठातली (उर्फ भाषाभीरूची गोष्ट)' ही कथा मला माझ्या तथाकथित आक्षेपार्ह लैंगिक कथांची अर्ककथा वाटते. 'कामोत्तेजक म्हणजे पॉर्न' असं ढोबळपणाने म्हटलं तर ही कथा मला अजिबात कामोत्तेजक वाटत नाही, तर कामोत्तेजनेच्या मुळाशी जाणारी - म्हणजे पॉर्नवरचा उतारा स्वरूपाची वाटते!
नैसर्गिक प्रेरणा आणि सामाजिक धारणा ह्यांमध्ये कामवासनेची होणारी ओढाताण विचारात घेता तथाकथित विकृती ही मानवी मनाची प्रकृती होणं हे दिवसेंदिवस अटळ होत चाललं आहे. तेव्हा पॉर्न हे वाढतच जाणार आणि त्याला निर्बंध घालायची कल्पना ही अव्यवहार्य अशा अर्थी खुळचट ठरणार. त्यासाठी 'विषय सर्वथा नावडो'सारखी भंकस शिकवण झुगारून देऊन थेट आपल्या स्वतःच्या मनापासून आसपासच्या कामव्यवहाराकडे डोळसपणे पाहता यायला हवं. त्यामुळेच वात्स्यायनाचं कामसूत्र किंवा खजुराहोची मैथुनशिल्पं वगैरेंचा दाखला देऊन कोणे एके काळी आपली संस्कृती लैंगिकतेच्या बाबतीत कशी निकोप होती आणि इंग्रजांनी तिला दांभिक केलं वगैरे अन्वयांमध्ये मला तरी कधीही स्वारस्य वाटलेलं नाही.
माझ्या जाणत्या वयापासून आसपास दिसणारा समाज निरखणं-पारखणं-जोखणं; आणि त्याची पाळंमुळं-संस्कृती शोधायची झाल्यास, मला ज्ञात असलेल्या माहितीचा माझ्या कल्पनाशक्तीने जो अन्योन्य संबंध लागेल तो अर्थ लावणं, एवढंच मला महत्त्वाचं वाटतं. ह्या धारणेनुसार मला असं दिसतं, की आपल्या आसपासच्या अनेकांची जीवनं ही कामवासनेने उद्ध्वस्त / निकामी होत आहेत आणि ह्याची पाळंमुळं आपण सेक्स ह्या विषयावर जो 'अळीमिळी गुपचिळी' स्वरूपाचा व्यवहार करतो, त्यामध्ये खोलवर पसरलेली आहेत. आपल्या आर्थिक आणि लैंगिक व्यवहारांबद्दल आपण सहसा बोलत नाही. कारण आपल्याला ते एकूणच जोखमीचं, आपमतलबाला धक्का पोहोचवणारं वाटतं. हे विषय टाळले, की आपण गुपचूप अनिर्बंध वागायला मोकळे असतो. ते ठीकच आहे. पण त्यामुळेच कुणी सेक्सबद्दल काही वर्मावर बोट ठेवणारं बोलू लागला की त्याची बदनामी करण्याकडे किंवा त्याला अनुल्लेखाने मारण्याकडे आपला कल असतो. हे दोन्ही मार्ग चुकीचे आहेत, कारण लैंगिक उल्लेखांना बदनाम करणं हे सत्याकडे पाठ फिरवून जगण्यासारखं आहे. आणि अनुल्लेखाने मारणं ही शेवटी तात्पुरती मलमपट्टीच असते, जी सेक्सच्या बाबतीत ती मुळीच कामाची नाही. सेक्सवर खुलेआम मोकळेपणानं बोलणं हाच ह्या, आयुष्यात खर्या तर महत्त्वाच्या, पण आकाराने टीचभर असलेल्या, विषयाचं नियमन करण्याचा राजमार्ग आहे. त्याबद्दल सामाजिक पातळीवर जेवढा मोकळेपणा येईल, तेवढा विकृतीचा संभव कमी होईल. म्हणूनच वैयक्तिक जीवनात भले अवघड असेल, पण साहित्यात तरी लैंगिकतेचे अनेक पैलू, बारकावे, गंड ह्यांना स्थान मिळालं पाहिजे. आचारविचारांतील कामव्यवहाराला नागडंउघडं करणं हे मला साहित्याचं एक महत्त्वाचं प्रयोजन वाटतं.
-- तर आता ह्या टिपणानंतर 'पु पु पिठातली'कडे 'एका भाषाभीरू समाजाची गोष्ट' म्हणून पाहिलं जाईल ही (कदाचित भाबडीही असणारी) आशा!
प्रतिक्रिया
वाक्यन वाक्य महत्त्वाचे
वाक्यन वाक्य महत्त्वाचे वाटले. अजिबात भारवाही वाक्य नाही. जर एखादं मिस झालं तर महत्त्वाचे मिस होते आहे.
____
कालच डोक्यात गुंजत होतं अरे कोणीतरी लैंगिक आऊटलेट न मिळून होणार्या घुसमटीबद्दल लिहा. का मीच लिहू? आपला हा लेख वाचून एकदम हव्या त्या प्रश्नास वाचा फोडल्यासारखे वाटले.
____
हे कथेच्या जन्माचे स्वगत फार आवडला
मूळ कथा छान हे निरूपण
मूळ कथा छान
)
हे निरूपण स्वतंत्र धागा म्हणून अंकात येण्याचे प्रयोजन कळले नाही. हे काय प्रतिसादात किंवा अंकाबाह्य धागा म्हणूनही चालले असते. अंकाच्या विषयासाठी अवांतर लेख (जे जे अनावश्यक घुसडलेले ते ते पोर्न असं संपादिकाबाई का म्हणताहेत ते या धाग्यामुळे पटले
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
कोनाडयात दिवा ठेवून त्याभोवती तोंड ओवाळणे
"कोनाडयात दिवा ठेवून त्याभोवती तोंड ओवाळणे" असा हा लेखनप्रपंच. तुमच्या साहित्यनिर्मितीमागची प्रक्रिया कशी आहे ते वाचकांनी विचारेपर्यंत धीर धरा की! ती प्रक्रिया सगळ्या जगासमोर अनाहूतपणे आत्ताच मांडण्याइतकी महत्त्वाची आहे असे तुम्हाला का वाटते आहे?
आता थोडे (अनावश्यक) तपशील. तुमची निर्मितिप्रक्रिया जी असेल ती असो पण ते करतांना मराठी भाषेबाबत सोपे कॅचेस द्यायचे काय कारण?
<विज्ञान जसं तर्कशुद्ध, वस्तुनिष्ठ, पुरावाधिष्ठित संशोधन करत असतं; तशीच भाषादेखील नेणिवेच्या पातळीवर आकलनकार्य करतच असते. प्रत्येक भाषेत अशी उदाहरणं सापडतील. मराठीपुरतं बोलायचं तर Time आणि Space ह्या दोन्ही संज्ञांसाठी 'अवकाश' हा शब्द योजला जाणं हे मला आइनस्टाइनच्या सापेक्षतेच्या सिद्धांताशी समांतर वाटतं आणि माझ्या अंदाजाने ते आइनस्टाइनपूर्व काळापासून कदाचित / बहुधा संस्कृतमधून चालत आलेलं असावं. आपल्या विषयाच्या संदर्भात बोलायचं, तर 'काम' हा शब्द घ्या. तो आपल्या भाषेत Sex आणि Work ह्या दोन्ही अर्थी योजला जातो. तसाच मराठीतील 'विषय' हा शब्द. ज्या भाषेमध्ये 'विषय' हा एकच शब्द Subject आणि Sex ह्या दोन्ही अर्थी योजला जाण्याची जाण होती; त्या भाषेत -
'सुसंगती सदा घडो,
सुनजवाक्य कानी पडो,
कलंक मतीचा झडो,
विषय सर्वथा नावडो'
यासारखं खुळचट आणि गुळमट कवन रुजावं ही गोष्ट मला लैंगिकतेबाबतचं इथलं वातावरण समजून घेण्याच्या दृष्टीने लक्षणीय गोष्ट वाटते.>
मराठीमध्ये 'अवकाश' हा शब्द Time आणि Space ह्या दोन्ही संज्ञांसाठी 'अवकाश' हा शब्द योजला जाणे हे संस्कृतातून आले असावे असा तुमचा तर्क. अवकाश ह्या शब्दाला लक्षणाशक्तीमुळे अर्थाच्या अनेक छटा आहेत, जशा संस्कृतमध्ये अनेक शब्दांना असतात. संकल्पना अधिक स्पष्टतेने मांडतांना मराठी आणि संस्कृतमध्ये दिक् आणि काल अशा स्पष्ट संज्ञा आहेत. 'दिक्कालासहि अतीत झालो' असे केशवसुत सांगून गेले.
'विषय" ह्या शब्दाचे तेच. ह्या शब्दालाहि अनेक अर्थ आहेत. पाच ज्ञानेन्द्रियांना जाणवणारे असे शब्द-स्पर्श-रूप-रस-गंध हे त्या त्या ज्ञानेन्द्रियाचे 'विषय'. त्यातून लक्षणेने sexual pleasure असा अर्थ त्याला चिकटला. ह्यापलीकडे त्यामागे काहीहि गूढ नाही आणि मराठीच्या 'काम'विषयक भाबडेपणाची सूचना करणारा अर्थ त्यातून काढायची काहीहि गरज नाही. असले काही 'अलीकवैदग्ध्य' दर्शविल्याने आम्ही तुम्हाला 'मूलगामी विचार करणारा दार्शनिक' वगैरे म्हणू असे अजिबात नाही.
काम हा शब्द Sex आणि Work ह्या दोन्ही अर्थी योजला जातो ह्यात तुम्हाला काही खोल अर्थ दिसतो. तसे काही नाही. ह्यातील एक काम म्हणजे 'कर्म' ह्या मूळ संस्कृत शब्दाचे तद्भव रूप आहे आणि दुसरा 'काम' हा मूळ संस्कृत 'काम' (इच्छा) हा शब्द आहे. ध्वनिसाम्यापलीकडे त्यातून अळेबळे खोल अर्थ काढून काही मौलिक विचार निर्माण केल्याचा आभास हास्यास्पद आहे.
तुम्ही 'पिठाची पुची' हा शब्दप्रयोग सहजपणे करता हे तुमच्या विचारांच्या मोकळेपणाचे प्रतीक असले तर असू द्या पण तसे करतांना जाता जाता मोरोपंतांसारख्या भाविक, सत्प्रवृत्त कवीची 'खुळचट आणि गुळमट' अशी gratuitous खिल्ली उडवण्याचे काही प्रयोजन दिसत नाही. ते 'पिठाची पुची' हा शब्दप्रयोग सहजपणे करू शकले नसते हे खरे आहे. पण तुम्ही तुमच्याच वडिलांच्या दिलेल्या उदाहरणाकडे पहा. तेहि 'शष्प' ह्यापलीकडे जाऊ शकत नव्हते. त्यासाठी त्यांचीहि तुम्ही अशीच कुचेष्टा करणार काय?
मोरोपंतांच्या 'सुसंगति सदा घडो' ह्या 'खुळचट आणि गुळमट' कवनाच्या जागी शाळेतील मुलांना योग्य लैंगिक वातावरणात वाढविण्यासाठी तुमच्या 'पु पु पिठातली उर्फ भाषाभीरूची गोष्ट' ह्या कथेचा धडा घालावा असे तुम्हाला सुचवायचे आहे काय? प्रत्येक गोष्टीची आपापली स्वतःची योग्य जागा असते. मोरोपंतांच्या 'सुसंगति' श्लोकाची योग्य जागा शाळेची प्रार्थना हीच आहे. ती तशी असण्यामध्ये वावगे काय आहे हे मला कळत नाही.
"कोनाडयात दिवा ठेवून
अगदी सहमत कोल्हटकर आजोबा. दिवा कसला उदबत्ती पण नाहीये.
तुम्ही 'पिठाची पुची' हा
भाविक व सत्प्रवृत्त हा मुल्यनिर्णय घेण्याचा निकष विशीष्ट शब्द व विशीष्ट भाषा विशिष्ट शैली वापरण्याशी सरळ संबंधित असतो काय ?
म्हणजे या व्याख्येनुसार तुकाराम कबीर भाविक सत्प्रवृत्त ठरतात की नाही ?
मला प्रश्न पडलाय मोरोपंत संदर्भात मुल्यनिर्णय जो दिला तो कसा ?
म्हणजे gratuitous खिल्ली सारखीच ही gratuitous ही स्वैर स्तुती आहे का ?
जशी सुवासिनींची स्वैर स्तुती केली जाते तशी.
शब्द शब्द जपून टाक
जर भाषा आणि शैली वापरण्याशी सत्प्रवृत्ती जोडायची झाली, तर मग तुकारामाबद्दल बोलताना त्याच्या वापरातले लंड, रांड, चोट, सिंदळीचा वगैरे शब्द कुठे नेऊन सोडायचे?
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
"कोनाडयात दिवा ठेवून
समंनी विचारलेले असू शकते ही एक शक्यता आहे की.
कोल्हटकरांशी सहमत. पंतांना
कोल्हटकरांशी सहमत. पंतांना काही बोलायचं काम नाही.
बायदवे याला विनोदी श्रेणी देणारा मूर्ख तरी असावा किंवा डोक्यावर पडलेला तरी असावा.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मुंगी व्याली?
अभिव्यक्तिस्वातंत्र्य देण्याघेण्यात एक गोष्ट अंतर्भूत असते आणि ती म्हणजे न वाचण्याचं स्वातंत्र्य. ज्याला कथेविषयी अधिक जाणण्यात रस आहे तो हे टिपण वाचायला स्वतंत्र आहे त्याचप्रमाणे ज्याला त्यात रस नाही तो हे न वाचण्याला स्वतंत्र आहे. तसंच, ज्यांना कथा वाचण्याआधी हे वाचावंसं वाटेल आणि ज्यांना हे कथा वाचल्यानंतर वाचावंसं वाटेल असे लोकसुद्धा आपल्या इच्छेनुसार वागायला स्वतंत्र आहेत. असं असताना ह्या पद्धतीची शेरेबाजी अप्रस्तुत वाटते. इथल्या ज्येष्ठ सदस्यांनी अशा प्रकारे व्यक्त होणं हे तर अधिकच खेदजनक आहे.
ज्या महाराष्ट्रात सभ्यासभ्यपणाच्या काटेकोर रीतींनी आताआतापर्यंतच्या अनेक पिढ्यांची लँगिक आयुष्यं नासवली१ त्या महाराष्ट्रात मूळ कथा खरं तर काही तरी मूलगामी म्हणू पाहते आहे. लेखकाला ती सुचण्यामागे नक्की काय काय होतं हे वाचण्याची उत्सुकता कथेच्या अनेक चाहत्यांना असेल ह्याविषयी खात्री आहे.
१. हे व्यक्तिगत मत नाही. अनेक लैंगिक तज्ज्ञ ह्याची ग्वाही देतात.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
भाषेचे खेळ
तांबे फेसबुकवर बरेचदा बोली आणि ग्रांथिक भाषेच्या खेळाबद्दल लिहितात. मला त्या विषयात गती नाही. कधीतरी लैंगिकता, त्यामागचं विज्ञान असंही ते लिहितात; त्यातलं मी थोडंबहुत वाचलेलं आहे. मला ते जमेल तेवढं वस्तुनिष्ठ पद्धतीने समजून घेणं जमतं; माझा पिंड तसा आहे. तांबेंचा पिंड निराळा आहे; ते व्यक्तिनिष्ठ पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करतात. कधीकधी त्यात एक गूढगहनाची छटा डोकावते असं मला वाटतं. ह्या गूढगहनपणाबद्दल माझ्या मनात काहीशी नकारात्मक भावना असते. पण त्यांचं लेखन वाचून, त्यांच्याशी गप्पा मारून काय उद्दिष्टाने हे असं लिहीत असतील याची कल्पना येते.
मला वाटतं की वस्तुनिष्ठ विचार करण्यात मला जशी गंमत वाटते तशीच तांबेंना गूढगहनपणात वाटत असेल. वस्तुनिष्ठ पद्धती फार कोरडी आहे अशी नकारात्मक भावना कदाचित त्यांच्याकडे असेल. (तरीही त्यांनी ह्या कथेमागची गूढगहनता कमी केलीच.) मग कोणाचं खरं?
तर दोघांचंही खरंच. आपल्याला कशा प्रकारे एखाद्या वस्तूकडे, कलाकृतीकडे, शब्दांकडे बघायचं आहे हे आपापलं ठरवावं. 'अवकाश' ह्या शब्दाच्या खेळातून मला गंमत वाटली; त्या शब्दाला time आणि space हे दोन अर्थ कोणत्या उगमातून आले याचा विचार करून ती गंमत संपेल असं वाटतं. (त्या हिशोबात लक्षणाशक्ती हा शब्द मला परका वाटतो हे उत्तमच.) मला सापेक्षतेचा सिद्धांत समजतो, त्यामुळे ती शब्दांची गंमत आणखी मजेशीर वाटत असेल कदाचित. अशी गंमत वाटण्यातली निरागसता अगदी पार संपू नये असं वाटतं. त्यामुळे एरवी मी स्वतःला रोबॉटिक, वस्तुनिष्ठ मानते; तसं असण्यात आनंदही मानते. तरीही याचं टोक गाठून कमालीची खवचट (cynic) बनलेले नाही याबद्दल दिलासा वाटला तो हे टिपण वाचताना 'अवकाश' ह्या शब्दामुळे.
तांब्यांच्या फेसबुक मैत्रयादीत आल्यापासून बरेच दिवस, महिने 'हे काय चाललं आहे!' इथपासून 'यातही काही गंमत असू शकते' असा माझा प्रवास झाला. सुरुवातीला पॉर्न वाटणाऱ्या गोष्टी पुढे इरॉटिक वाटतात; "ऑबॉबॉ, काय ती गलिच्छ शिल्पं" असा लहान वयातला बाऊ सरून आता त्यांत सौंदर्य शोधता येतं, तसंच काहीसं झालं. (अंकातला किणीकरांचा लेख, कामासाठी का होईना, पुनःपुन्हा वाचताना मजा आली.)
पॉर्न, इरॉटिका, लैंगिकता असे घट्ट कप्पे करता येत नाहीत; वस्तुनिष्ठ कसोट्याही तयार करता येत नाहीत याची जाणीव पॉर्नबद्दल वाचताना झाली. संपादकांना जे टिपण अंकासाठी महत्त्वाचं वाटतं ते इतर काहींना 'अश्लील' वाटतं; त्या संदर्भात तेंडुलकरांच्या वाक्याचा अश्लील१ आणि गुळगुळीत२ वापर हे सगळं अंकाच्या विषयाला साजरंच.
हे टिपण संपादकांनी मागवून घेतलेलं आणि आपल्या अखत्यारीत छापलेलं. त्या संदर्भात कथा आणि टिपणलेखकाला "कोनाडयात दिवा ठेवून त्याभोवती तोंड ओवाळणे" म्हणणं ही सुद्धा भाषाभीरूताच म्हणावी का? ही भाषाभीरूता आपल्या सगळ्यांत थोड्याबहुत प्रमाणात असतेच. (नसली तर नकारात्मक श्रेण्यांनी सत्कार होताना दिसतो.) ह्या टिपणामुळे, त्यावरच्या प्रतिक्रियांमुळे मी मुद्दाम ह्या विषयाचा विचार करायला सुरूवात केली. त्याबद्दल सर्व संबंधितांचे आभार.
१. अंकाच्या प्रकाशनाआधी मी इथे निश्चितच निराळा शब्द वापरला असता; पण तेंडुलकर थ्यँक्यू!
२. गुळगुळीत (चकचकीत) ते भारदस्त नाही असा एक भाषिक आणि मुखपृष्ठीय अर्थही नव्याने आकळला.
---
तरीही 'विषय सर्वथा नावडो'वर टीका करण्याबद्दल तांब्यांचा निषेध. ह्या काव्यपंक्ती शाळेत शिकवल्या तेव्हा मला 'विषय' हा शब्द ढिम्म कळला नव्हता; समजला तेव्हा बरीच करमणूक झाली होती. तेव्हा स्मरणरंजन करण्याचा ऐसी अक्षरीय गुन्हा करून तांब्यांचा निषेध करणं अगत्याचं आहे. निदान त्यातल्या भाषिक खेळाबद्दल थोडी आत्मीयता वाटली पाहिजे. (इथे इमोटिकॉन वापरणं अश्लील वाटतंय म्हणून नाही.)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
कोल्हटकरांनी आपले प्रतिकूल मत
कोल्हटकरांनी आपले प्रतिकूल मत व्यक्त करणे हे बहुधा अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या कक्षेत येत नसावे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
वाचून गंडलो
पण भाषाभीरू ही जी संकल्पना coin केली आहे ती पालकांसाठी गरजेची आहे, भाषाभीरू असलंच पाहिजे.
योग्य वयात, योग्य ते शिक्षण, योग्य त्या भाषेत देणे श्रेयस्कर. कथेतील नायक भाषाभीरू होता व त्याला वडील कारणीभूत असावेत असे थोडेसे वाटले. या लेखातून या म्हणण्याला पुष्टी मिळाली. दुसरा काय ऑप्शन आहे? मोकळेपणा वेगळा आणि मुलांना शिव्या द्यायला शिकवणे वेगळे. प्रॅक्टीकली मला समजावून द्यावे की पाल्याला शिव्या शिकवायच्या असतील तर कशी सुरुवात करावी आणि का करावी. योग्य वयात आल्यावर योग्य भाषेत (सो कॉल्ड सोज्वळ भाषेत) लैंगिक संकल्पना समजावून द्याव्यात, पण मुलांना चार शिव्या माहीत नाहीत, घरात त्या दुयायची परवानगी नाही म्हणून विकृती निर्माण व्हायची शक्यता असेल तर समजावे की ती या ना त्या कारणाने होणारच होती.
तीन-चार वर्षाच्या मुलाला कोणी आजी-आजोबा वगैरे गेले तर, देवाघरी गेले असेच सांगतात. त्यांचे शरीर थंड पडलं आहे, ते मेलेत, त्यांना आता आपण जाळूया, असे सांगायचे का? किंवा बाळ कसे जन्मते याचे "साधारण" खरे उत्तर दहा वर्षाच्या मुलाला देता येते. आणि वयात येतान reproduction system शिकताना they can do 2+2, 4. भाषाभीरुता सोडून तुझ्या आईच्या पुच्चीत, बाबांनी त्यांच्या लवड्यातून चीक सोडला मग त्यामुळे पुढे तुझा जन्म झाला असे शिकवणार का? (बायदवे पुची वगैरे म्हणजे शिव्या शिकायचा केलेला निव्वळ प्रयत्न आहे, ही खरी भाषाभीरुता, शिवी देताना पुच्चा, with extra stress on च्चा असे म्हणावे.) मुलांना मारामारी करु नका असे शिकविणे योग्य आहे यात दुमत नसावे. असे शिकविल्याने हिंसेविषयी अनामिक ओढ निर्माण होवून हिंसक विकृती निर्माण होण्याची शक्यता असली तर that's the risk we ought to take.
सामजिक मोकळेपणा येणे गरजेचे आहे - पण परत यात practically नक्की काय अपेक्षित आहे? ज्यांना खुलेपणाने बोलायचे आहे ते गेले कित्येक वर्ष बोलत आहेत, पण ईसमास जिथे ते बोलणे comfortable आहे तिथे तो बोलणार, चौकात उभे राहून
अशा गप्पा मारल्याने काय साध्य होणारे. खाली वाक्य काही झेपले नाही. "त्या काळात अनेक बायका मला अशा सोज्ज्वळ चेहेऱ्याने वावरताना दिसत, की त्यांना जणू लैंगिक संबंध न ठेवताच मुलं व्हायची किमया देवदयेने अवगत झालेली आहे, असं वाटावं" बायकांनी कसं वावरणं अपेक्षित आहे - काल हा काय भारी झवला, कळूदे लोकांना, मी पाय फाकवतंच चालते?
गणेशचा प्रॉब्लेम भाषाभीरुपणाने निर्माण झाला असे म्हणणे धाडसाचे ठरेल, आपण असा एखादा घाण शब्द बोललो तर नारभट रागावेल म्हणून मनातसुद्धा न म्हणणे हे मनाची ताकद कमी असण्याचे लक्षण आहे, भाषेचा काय संबंध? घरी शुद्ध मराठी आणि मित्रांच्यात, ए लव्ड्याशिवाय एकमेकाला हाक न मारणारी आम्च्यावेळी असंख्य मुले होती आणि अजूनही आहेत, त्यांच्या अनेक आईवडीलांना(pun intended) हे शब्द माहीतही नसतील पण त्याने त्यांच्या लैंगिक जीवनात काही फरक पडला नसावा. असे दुहेरी जगणे आम्हालाही नॉर्मल वाटायचे, तसेच आईवडिलांना पण रात्री झवणे आणि दिवसा मुलांसमोर सात्त्विक वागणे नॉर्मल वाटत असावे - त्यात गैर काय?
पॉर्नवर कोणी बंदी घालत नाही, आणि घातली तरे ते मिळतच राहणार.
एकूणात काय करावे याच्या tangible steps द्याव्यात , असे पाहिजे, तसे पाहिजे असलं नको.
मुलाला पु पु पिठतला हे नुसत रुपक असलं तर ठीके, पण सत्यात अस काही करायचं तर कसे करायचे याच्या concrete steps द्याव्यात.
+११११११११११११११११११११११११
एकुणातच हे स्वत:च्या भीरुतेचं पॉर्न रंगवलेलं आहे. असलं पॉर्न लय बोरिंग असतंय.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
दुहेरी जगणं
तांब्यांच्या कथेच्या संदर्भात पाहिलं तरीही इथे मुद्दा अधिक व्यापक असावा आणि निव्वळ भाषा आणि लैंगिकतेबद्दल राहात नसावा. माझ्या आसपासच्या (सदाशिव पेठी) जगात दुहेरी जगण्याचे असे अनेक प्रकार दिसत आणि अजूनही दिसतात - उदाहरणार्थ, सिगरेट प्यायची पण आईवडिलांपासून लपवून. मग घरी जाताना मिंट खाऊन जायचं म्हणजे तोंडाला वास मारणार नाही आणि घरच्यांना संशय येणार नाही. किंवा, लैंगिक तज्ज्ञांशी बोलल्यानंतर असं कळतं की भारतातले बहुतेक समलैंगिक पुरुष लग्न करतात, बायकामुलांसह सुखी संसाराचं चित्र घरच्यांसाठी आणि समाजासाठी उभं करतात आणि मग आडून अनेक पुरुषांशी संबंध ठेवतात. त्यातून एड्स होणं, तो बायकोला होणं, मूल जन्मतःच एड्सग्रस्त असणं आणि त्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त होणं इथपर्यंत प्रवास झालेली अनेक उदाहरणं रोज ससूनच्या एड्स वॉर्डमध्ये आजही दिसतील. एकदा ह्या दुहेरी जगण्याची सवय झाली की त्यात काय गैर आहे किंवा नक्की कोणत्या पातळीपर्यंत हा दुभंग न्यायचा हेच समजेनासं होतं.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
कुठे हा शिवीसंबंधित बुळेपणा
कुठे हा शिवीसंबंधित बुळेपणा आणि कुठे ती झाकलेली समलैंगिकता? एकाचे महत्त्व अधोरेखित करण्याकरिता दुसर्याचा हवाला देणे म्हणजे श्वानं युवानं मघवानमाह ची आठवण झाली एकदम. श्वा, युवा, मघवा यांचा एकमेकांशी काही संबंध नाही परंतु विभक्तीचे प्रत्यय तेवढे सेमटुसेम लागू होतात. त्यातलाच हा प्रकार. दुहेरीपणा दिसतोय म्हणून कशाचा कशालाही संबंध जोडणे. इथे ओशाळला बादरायण!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
तुम्ही म्हणालात
तुम्ही म्हणालात -
"तांब्यांच्या कथेच्या संदर्भात पाहिलं तरीही इथे मुद्दा अधिक व्यापक असावा आणि निव्वळ भाषा आणि लैंगिकतेबद्दल राहात नसावा".
मग चर्चाच संपली. आमचा प्रतिसाद exclusively भाषेसंदर्भात आहे. (एकदोनवेळेला एकडेतिकडे भरकतला असला तरी
मुद्दा व्यापक असला, तर असे वाटते की तो चुकीच्या संदर्भाने समजावण्याचा प्रयत्न केला आहे. सिगरेट वगैरे तुम्ही जे म्हणालात वर ते सगळं खरं आहे, पण पालकांनी भाषा बदलल्याने हे प्रॉब्लेम सुटणारेत का. भाषेचा आणि पालक-पाल्यांचे नाते पारदर्शक असणे याचा काहीही संबंध नाही. (वरील लेखातच एक गंमत दिसून येते की, कधी शिव्या न देणारे असले तरी लेखकाचे वडिलांशी चांगले मोकळेपणाचे संबंध होते). शिव्या देणारे किंवा गुळमाट पुस्तकी बोलणारे दोन्ही प्रकारच्या पालकांनी, जर, तुम्ही कुठल्याही गोष्टीविषयी आमच्याशी बोलू शकता असा विश्वास निर्माण केला तर बर्याच (शब्द चुकलाय) विकृती टळतील.
आमचा मूळ मुद्दा - या सर्वाचा भाषेशी, सोज्ज्वळ दिसण्याशी काहीही संबंध नाही.
भाषा, संवाद, संभाषित
मुद्दा निव्वळ भाषेपुरता घेतला तरीही तो पालक-पाल्य संबंध इतकाच मर्यादित नसावा. अशोक केळकर म्हणून एक भाषातज्ज्ञ होते. त्यांच्या लिखाणात इंग्रजी शब्दांसाठी चपखल मराठी प्रतिशब्द येत. अगोदरपासून अस्तित्वात असलेले ते शब्द इतरांना माहीत तरी नसत किंवा कधी कधी ते केळकरांनीच घडवलेले असत. त्याविषयी त्यांना विचारलं तर ते म्हणत की मराठीत असे शब्द असले तरीही मराठी संभाषितच (डिसकोर्स) इतकं मर्यादित आहे की ह्या संकल्पनांविषयी (उदा. वैज्ञानिक किंवा मानव्य शाखांमधल्या संज्ञा आणि संकल्पना) बोलण्याची त्यात फारशी कधी कुणाला वेळच येत नाही. त्यामुळे शब्द असूनही कुणाला माहीत पडत नाहीत. आणि अर्थात, शब्द नसलेच तर ते घडवण्याची गरजही भासत नाही. म्हणून मग त्या संकल्पनाही लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. ह्याउलट, ते शब्द वापरण्याची आपल्यावर वेळ यावी ह्यासाठी संभाषित व्यापक करायला हवं. इतर विषयांप्रमाणे लैंगिकतेबाबतही संभाषिताचं तसंच काहीसं होत असावं. जर विशिष्ट विषयांवर मोकळा संवादच नसेल, तर अनेक शब्द मोकळेपणे वापरले जात नाहीत आणि शब्द मोकळेपणे वापरले गेले नाहीत तर संकल्पनांविषयीचं ज्ञान मर्यादित राहतं. ही एक प्रकारची कॅच-२२ परिस्थिती होते. मराठीत दलित आणि ग्रामीण साहित्य लिहिलं जाऊ लागलं तेव्हा असं काहीसं दिसलं. अनेकदा वस्तूंसाठी किंवा संकल्पनांसाठी ग्रामीण किंवा दलित भाषांमध्ये जे शब्द होते ते पुण्याच्या ब्राह्मणांना माहीत नसत. कारण ते विश्व त्यांचं नव्हतं. पण ते विश्व आणि ते शब्द मराठी साहित्यात येणं अंतिमतः मराठीला समृद्ध करणारं होतं. समाजातल्या कोणत्याही दोन घटकांमध्ये जर संवाद मोकळा असला तर विचारांची देवाणघेवाण अधिक मोकळेपणे होऊ शकते. ही देवाणघेवाण जितकी मोकळी तितकी नात्यामध्ये अधिक सघनता आणि मोकळेपणा येऊ शकेल आणि परकेपणा कमी होऊ शकेल. पालक-पाल्य संबंधांपुरतं बोलायचं झालं, तर दोन पिढ्यांमधल्या संबंधांमधला हा फरक आताशा स्पष्ट दिसतो. आज एखादा विशीतला मुलगा किंवा मुलगी आपल्या आजोबांशी ज्या विषयांवर बोलताना दिसतात त्यांतले अनेक विषय ते आजोबा आपल्या वडिलांसोबत बोलू शकत नसत. त्यांना विचारलं तर ते म्हणतील की आम्हाला वडिलांचा धाक वाटे, किंवा तसंच काही तरी. त्यांच्यात प्रेम नव्हतंच असा त्याचा अर्थ नाही, पण संवाद तितका मोकळा नसे असं ते पश्चातबुद्धीनं मान्य करतील.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
बाकी प्रतिसाद एक नंबर आहे,
बाकी प्रतिसाद एक नंबर आहे, पणः
(लोकांकडे) संभाषित नाही म्हणून शब्द नाहीत ... हे पटण्यासारखं आहे.
पण शब्द नाहीत म्हणून त्या संकल्पनाही लोकांपर्यंत पोहोचत नाहीत ... हे काही पटलं नाही.
मुळात सगळ्या संकल्पना मराठीत आल्याच पाहिजेत हा हट्ट का आहे? (तुम्हालाच असं नाही, पण 'मराठी ज्ञानभाषा झालीच्च पाहिजे' वाल्या लोकांसाठी हा प्रश्न आहे.)
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
शक्यता
पोहोचतच नाहीत इतकं हे ठाम विधान नाही, पण तशी शक्यता मात्र असते. एक उदाहरण देतो - लोकांशी बोलताना अनेकदा लक्षात येतं की हिजडा आणि ट्रान्सजेंडर / ट्रान्ससेक्शुअल ह्यांत फरक असतो हे अनेकांना माहीत नसतं. आपल्याकडे हिजड्यांना काही एक सांस्कृतिक संदर्भ आहे, पण ट्रान्सजेंडर / ट्रान्ससेक्शुअल हे त्याहून वेगळे असतात. जर सार्वजनिक संभाषितात त्यांच्यासाठी वेगळा मराठी प्रतिशब्द रुळला तर हे हिजड्यांपेक्षा काही तरी वेगळं आहे हे लोकांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वाढते. जर ते पोहोचलं तर कदाचित सुशिक्षित-सुसंस्कृत आणि एरवी उदारमतवादी असणारे लोक ट्रान्सजेंडर / ट्रान्ससेक्शुअल लोकांकडे आज ज्या नजरेनं पाहतात ती बदलेल.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
एक नंबर प्रतिसाद. तुम्ही आता
एक नंबर प्रतिसाद. तुम्ही आता सायकल चे दुकान बंद करा, तुम्हाला मर्सीडीज ची डीलरशिप देण्यात येतीय.
लोळगेंची सायकल कंपनी बुडणार
या कल्पनेनेच कसनुस वाटतय.
लोळगे कृपया मर्सीडीज ची ऑफर नाकारावी ही विनंती.
तुम्ही गेलात तर आम्हाला भाड्याने सायकली कोण देणार ?
शिवाय मर्सीडीजमध्ये गेल्यावर तुमची जनसामान्यांशी नाळ तुटणार
नको नको
लोळगे परत या लोळगे परत या
मर्सीडीजपण
डीलरशिप द्या हो, सायकल दुकान पण चालू ठेवू
+१
पेशव्यांनी इतकी पॉवर आल्यावरही श्रीवर्धनची देशमुखी आपल्याकडेच ठेवली तशातलाच हा प्रकार. मूळ सोडायचे नाही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
दुहेरी जगण्याची भलामण
दुहेरी जगण नॉर्मल वाटणे हे कीती भयावह आहे. म्हणजे आपण दुहेरी वागतो
याची लाजिरवाणी का होइना जाणीव असणे याच्या पुढे जाऊन हे नॉर्मलच आहे असे वाटणे.
त्याचे समर्थन करणे. एक एक पायरीने स्खलन आहे. तेंडुलकर एका मुलाखतीत म्हणाले होते. मला सध्याची लोक सांगतात तुमची नाटके बघुन धक्का बसत नाही काहीच वाटत नाही ते म्हणतात ठीक आहे मात्र काहीच न वाटणं हे ही कीती भयावह आहे.
रोजच मरतात लोक युद्धात तेव्हा मरण स्वस्त वाटु लागत तस.
दुहेरीपणा मिरवण्याचे दिवस आलेत.
दुहेरी जगण नॉर्मल वाटणे हे
म्हणजे काय करायचं म्हणता मग? आईवडिलांपुढेही मुलांनी मुक्तकंठाने शिव्या द्यायच्या? की आईवडिलांनी मुलांसमोरच संभोगक्रिया करायची?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मिरवण्याचे दिवस
मिरविणे आणि असं असतच, ते असं नसल्याने काही विशेष फरक पडत नाही यात अंतर आहे. पहिला मुद्दा भाषेसंदर्भात होता, घरी वेगळी भाषा, मित्रांच्यात वेगळी भाषा कारण दोन्ही प्रकारच्या नात्यात फरक आहे. आपण असे बोललो तर घरी आवडणार नाही, त्यांना दुखावण्यापेक्षा आपण मित्रांच्या असे बोलावे - काय फरक पडतो.
) साधा मुद्दा आहे, तेंडुलकर कुठे आले इथे.
दुसरा पालक आणि मुले यांचे एकमेकांसमोर वागणे. ते दुहेरी नसेल तर कसे असावे याचा पर्याय सुचवावा. साहित्यात वाचायला ठीक आहे पण किबोर्डवरुन उठून एखाद्याने मुलांना सांगावे - आज रात्री जागे राहा, आमचे वेगळे रुप दाखवतो.
मुले आणि पालक यांच्यातील मोकळेपणाला अशा दुहेरीपणामुळे काही बाधा येत नसावी. उलट, याने होणारा फायदा हा की आईवडीलांचे नाते एकमेकांशी वेगळे आणि आपल्याशी वेगळे याची मुलांना जाणीव होवून त्यांना त्यांच्या नात्यात राहून काही अधिकार घेण्याची मुभा आहे, तिथे आपले हट्ट करणे अयोग्य आहे हे कळते. (योग्य वयात आल्यावर)
प्रत्येक बाबतीत कसला आलाय तात्विक kiss? (
बरं जय तेंडुलकर, नाही वागत दुहेरी - Actually काय करायचे मग?
लोळगे
मुद्दा पटविण्यासाठी उदाहरण द्याव लागत हो तेंडुलकर नसतील चालत तर दुसर देतो.
किस च्या बाबतीत म्हणाल तर आश्चर्य वाटलं अहो
बाल की खाल निकालना हा आपल्या एकुण मराठी समाजाचा व त्यातही विशेषत्वाने मराठी संस्थळांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे.
तुम्ही त्यावर कस ऑब्जेक्शन घेऊ शकता फार तर कुठल्या बाल ची खाल काढावी इतक सुचवु शकता
पण किस नाही घेतला तर वैचारीक मैथुन कसे होणार ? मग निर्मीती कशी होणार ?
या मुद्द्यालाही तुम्ही किसु शकता मात्र हे बंद करण शक्य नाही.
दुसर जी दांभिकता आहे दुहेरी जगण्यातली त्याने काय कशी कुचंबणा होते माणसाची तेच मोठ्या प्रभावीपणे संवेदनशीलतेने तांबे यांनी कथेत दाखवलेल आहे.
किमान दुहेरीपणा मिरवु नये.
प्रॅक्टीकली मग आम्ही काय करु ?
जे पटेल ते करा
तो तुमचा प्रश्न आहे.
चक्क चक्क
कथेविषयी आम्हाला काय प्रॉब्लेम नाहीये हो, मिटक्या मारत वाचली. ते फिक्शन आहे, नंतर लेखात जे स्पष्टीकरण आले त्याविषयी "प्रॅक्टीकली मग आम्ही काय करु ?" या प्र्श्नाला "जे पटेल ते करा" असे उत्तर असेल तर, चला मग हेच मिरवू असेही उत्तर देता येईल. पण मुळात मागे म्हणल्याप्रमाणे, हे आम्हाला मिरवणे वाटत नाही.
तुम्हाला वाटतं तेवढं भयानक नाहीये ही दुहेरी वृती - आईवडील मुलांसमोर शिव्या देत नाही, मुले आईवडीलांसमोर देत नाहीत. प्रश्न मिटला.
गांडचे ढुंगण झाले, त्याचे नंतर बम, अॅस्, अर्सही होउ घातले आहे त्याने काय फरक पडतो. (गांड शब्द वापरात होत तेव्हा क्ष्य्झ शब्द वापरणे वाईट समजत असतील कदाचित)
ढुंगण शब्द वापरातून हद्दपार होउ नये असे भावनिकरीत्या आम्हाला वाटते पण अर्थात त्याच्या वापराचा इन जनरल विकृती कमी होणे-बिणेशी काही संबंध नाही
वापरायची भाषा बदलून, नातेसंबंध बदलतील, लैंगिक विकृती कमी होतील असे आम्हाला वाटत नाही.
रोग नव्हे लक्षण
ठराविक भाषा (न) वापरणं हा "रोग" नसून लक्षण आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
ठराविक
ठराविक भाषेची कुचेष्टा करणं - मग ती ग्राम्य, बहुजन अभिजन, आपली, परकी कसलीही असो, हे रोगाचे लक्षण आहे.
एखाद्याला हवी तशी भाषा त्याने दुसर्यांवर न लादता वापरली तर त्याच्यात एखाद्या रोगाची लक्षणे पाहणे चूक आहे.
१००% सहमत. आजवरचा इतिहास
१००% सहमत. आजवरचा इतिहास पाहता कोणी कोणावर भाषा लादली आहे ते पाहा. गावंढ्या माणसाला कुचेष्टेने हसणे हाही भाषा लादण्याचा प्रकारच असतो. त्याच लादण्याबद्दल चाललंय सगळं. कोणी इथे आग्रह करत नाहीय की शिवराळ बोला.
मूळ प्रतिसाद लैंगिक मोकळेपणा
मूळ प्रतिसाद लैंगिक मोकळेपणा व घरात वापरण्यात येणारी भाषा याबाबत होता. त्यात मला शिवराळ बोलण्याचा थोडाफार आग्रह जाणवला.
वरील प्रतिसाद फक्त रोग-लक्षण प्रतिसादावर होता.
सो कॉल्ड शुद्ध भाषा इतरांवर लादणारे मंद आहेत, बर्षानुवर्षे तसे झाले ते चूक आहे. तसेच शहरी लोकांच्या भाषेची चेष्टा करणेही चूक आहे.
प्रोप्रायटर साहेब
इतका सोपा पण नाही हो विषय. शब्द बदलण्याने काय फरक पडतो ?
अहो शब्दाच्या बदलामागे जे काय कारणीभुत होत असत जो काय सामाजिक राजकीय सांस्कृतिक फोर्स असतो तो काहीच नसतो का तुमच्या मते. शब्दाच्या आग्रहामध्ये असलेला पॉवर प्ले तुम्हास जाणवलाच नाही कधी ? त्यांचा काहीच परीणाम नाही ?
थेर हा एका समुदायाने एका भावनेने वापरलेला शब्द दुसरा समुदाय थेरडा या बदलत्या भावनेने वापरतो त्यामागची इर्ष्या ताण काहीच तुमच्यापर्यंत पोहोचत नाही का ?
जो कोणी महाभाग भले तरी देऊ गांडिची लांगोटी ला कासेची हा पर्याय सुचवतो तो केवळ निरागस कवि मनाचा यमकेच जुळवत असतो त्यामागे काही आग्रह काही फोर्स नसते का ?
स्वतःला निगर न म्हणवुन घेण्याचा आग्रह काय फरक पडतो रे काळ्या तुला इतका सहज उडवता येतो का ? त्यामागे शब्द जरी असला तरी नुसता त्याचा विचार करावासा तुम्हास वाटत नाही का ?
शब्दांना त्यामागील बदलाच्या घटकांना फोर्सेसना तुम्ही काहीच मानत नाही.
शीट राव
शीट बसवली की झाल टेकवा तशरीफ अन मारा पॅडल इतक सोप्प
दुहेरीपणा खुपतच नाही इतका बोथट झालाय तर ठीकाय
नाही हो.
प्र्श्न शब्द कुठे बदलायचा हा आहे. प्रौढांनी असली भाषा लहान मुलांसमोर जाणीवपूर्वक वापरल्याने प्रश्न सुटणारेत का?
निगर शब्द बदलला आणि गुलामी गेली असे झाले का? निगर शब्दाचेच उदाहरण घेतले तर, दोन काळे लोक एकमेकाला निग्गा म्हणू शकतात पण गोरा ते म्हणाला तर वर्णद्वेषी ठरेल. बाजूच्या वस्तीतले काळे एकमेकाला निग्गा म्हणतात पण माझा बाप मात्र लहानपणापासून मला ब्लॅक, आफ्रीकन-अमेरीकन असे काहीबाही शिकवत असे, अशी तक्रार करुन चालेल का?
"शीट बसवली की झाल टेकवा तशरीफ अन मारा पॅडल इतक सोप्प" - हे तर सोप्प नाहीचे मालक, सायकल शिकण्यासाठी मेहनत घ्यावी लागते, दोन तासात सायकलवर तोल सांभाळणे जमत नाही, १०-१० दिवस जातात. काहींची तर वर्ष जातात. शिकवल्या शिव्या, घालविला भाषाभीरुपणा, संपली विकृती असे आहे का?
आमच्या मते वरील लेख म्हणजे संदर्भासहीत स्पष्टीकरण आहे - त्यात स्पष्टीकरण योग्य आहे पण वर दिलेला भाषेचा संदर्भ चुकीचा आहे.
मुद्दा संगोपनासंदर्भात आहे, गांडरांडबिंड असले सगळे शब्द मुलांसमोर मोकळेपणाने वापरता येणे ही क्षमता महत्त्वाची नसून ते शब्द ऐकल्यावर मुलांना थेट याचा अर्थ काय हो, असा बिनदीक्क्त सवाल विचारण्याइतकी मोकळीक नात्यात निर्माण करण्याची क्षमता महत्वाची आहे.
मुळात हे दुहेरी वागणे आहे हेच
मुळात हे दुहेरी वागणे आहे हेच पटण्यासारखे नाही.
त्या त्या नात्याप्रमाणे कंसीस्टंसी आहेच्/असणारच.
मुलांशी बोलताना एक दिवस शिव्या आणि दुसर्या दिवशी ओव्या असे.
किंवा एका मुलाशी बोलताना शिव्या आणि दुसर्या मुलाशी बोलताना ओव्या.
असे काहीतरी असेल तर त्याला दुहेरी वागणे म्हणता येइल
मारवाजी, नाभिनिरीक्षक लेखन
मारवाजी, नाभिनिरीक्षक लेखन जजमेंटल न होता केलेलंच लोकांना रुचतं. जे काय चाललंय, होतंय त्यात अवमूल्यन होतंय असं कोणीच मान्य करत नाही. ह्याउलट प्रगती होतेय असं म्हटलं की लोक खूश.
तुकारामाच्या काळात स्वच्छ शब्दांत गांडीला गांड म्हणायचे. आमच्या आईबापाच्या पिढीपर्यंत ढुंगणावर फटके हाणू का वगैरेपर्यंत चालायचं.
परवा आमच्या एका व्हॉट्सॲप ग्रुपवर एकाने तो "ढुंगणाचा अफजलखान होईल" वाला ज्योक टाकला तर "ई ई" करत दोन-चार म्हैला ग्रुप सोडून चालत्या झाल्या. असंच मग साध्या शब्दा ऐवजी संस्कृत किंवा इंग्लिश शब्दांचे हातमोजे घालून हे घाणेरडे अवयव आणि घाणेरड्या कृती हाताळायच्या. मग नुसती पावलं बघून तापणार्या मुसलमानासारखे झालो की त्याला सुसंस्कृत म्हणायचं.
यावरुन कुंदेराच्या कादंबरीतील एक प्रकरण आठवलं
अनबेअरेबल लाइटनेस ऑफ बिइंग या Milan Kundera च्या विलक्षण कादंबरीत तो एका संकल्पनेविषयी बोलतो.
ते पॉलिटीकल संदर्भातील असल तरी इथे बर्यापैकी लागु होते.
इन शॉर्ट इथे
To begin, Kundera asserts that kitsch is an aesthetic ideal "in which shit is denied and everyone acts as though it did not exist" (6.5.4). He's not just speaking literally here, but about all the bad, disgusting, negative, violent, depressing things in the world. "Kitsch excludes everything from its purview which is essentially unacceptable in human existence" (6.5.5).
इन डिटेल इथे
http://www.shmoop.com/unbearable-lightness-of-being/kitsch-symbol.html
http://katiejbates.blogspot.in/2006/12/how-does-milan-kundera-define-kit...
बाकी हातमोजे म्हणजे
भले तरी देऊ कासेची लांगोटी
किंवा ते कुठल्या मुर्ती होत्या त्यांचे लिंग वगैरे फोडलेले आठवत नाही संदर्भ नेमका.
प्रश्न
हा नक्की काय प्रकार आहे?
+१
हेच म्हणतो. जमल्यास व्यनि करावा, धन्यवाद.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
व्यनि करण्याइतका हा नाहीय तो.
व्यनि करण्याइतका हा नाहीय तो. तसा टुच्चाच आहे.
"अफजलखानाचा वध" नाटकात शिवाजीच्या भूमिकेत घुसलेला बालनट घरी आल्यावर आईला म्हणतो, "माँसाहेब आम्हाला शी लागली आहे." तर त्याची आई म्हणते, "शिवबा, वाघनख्या बाहेरच काढून ठेवायला विसरु नका; नाहीतर ढुंगणाचा अफजलखान होईल."
अर्र. टुच्चाच निघाला
अर्र. टुच्चाच निघाला तर.
एनीवे, या मेसेजवर ग्रूप सोडून निघणार्या बायका म्हणजे "चहा-कॉफी सारख्या उत्तेजक पेयांपासून दूर राहणार्या" क्याटेगरीतल्या असाव्यात. अडाण**पणा पर्सोनिफाईड.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मला आवडला!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
दणदणीत! मार्मिक श्रेणी अपुरी
दणदणीत! मार्मिक श्रेणी अपुरी वाटावी असा प्रतिसाद!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
एक गमतीशीर प्रकार
मूळ कथा आणि लेख आवडले. त्यातलं "जीवनाच्या अन्य संदर्भांप्रमाणे भाषेमधेही मोकळेपणा आला तर ते आरोग्यकारक ठरू शकेल" हे कळत-नकळत सांगितलेलं थीम आवडलं.
या सर्व प्रकारांतून एक गंमत सुचते. असे शब्द/शब्दप्रयोग तपासणे की जे मला अंगणात वापरता येतील पण परसात येणार नाहीत. किंवा एखादी गोष्ट व्यक्त करण्याकरता मी अंगणात एक नि परसात दुसरा शब्द वापरेन.
उदाहरणार्थ
Penis : वडीलधार्यांसमोर याचा उल्लेख करण्याचा प्रसंग आलाच तर "तिकडे पुढे खालच्या ठिकाणी" वगैरे. शाळकरी दिवसांपासून बनलेल्या मित्रांसमोर बोलताना लंड, लवडा, बुल्ला, बाबूराव. Dick. सामाजिक संदर्भातल्या कमीजास्त ओळखीच्या स्त्रीपुरुषांशी बोलताना Penis. मुलांशी बोलताना पीपी, वीवी वगैरे. (भारतातील मराठी लोक मुलांशी बोलताना नूनू वगैरे म्हणताना आठवतं)
Anus , Anal areas : वडीलधार्यांसमोर याचा उल्लेख करण्याचा प्रसंग आलाच तर "तिकडे पुढे मागच्या ठिकाणी" वगैरे. शाळकरी दिवसांपासून बनलेल्या मित्रांसमोर बोलताना गांड, बोचा, कुल्ले ढुंगण Ass, Butt. सामाजिक संदर्भातल्या कमीजास्त ओळखीच्या स्त्रीपुरुषांशी बोलताना Butt. मुलांशी बोलताना पूपूची जागा. (भारतातील मराठी लोक मुलांशी बोलताना कुल्ले वगैरे म्हणताना आठवतं)
Testicles : वडीलधार्यांसमोर याचा उल्लेख करण्याचा प्रसंग आलाच तर "तिकडे पुढे खालच्या ठिकाणी" वगैरे. शाळकरी दिवसांपासून बनलेल्या मित्रांसमोर बोलताना गोट्या, Bollocks, Testies, Balls. सामाजिक संदर्भातल्या कमीजास्त ओळखीच्या स्त्रीपुरुषांशी बोलताना Testicles. मुलांशी बोलताना Balls. (भारतातील मराठी लोक मुलांशी याबद्दल कुणी बोलताना आठवत नाही)
Breasts : वडीलधार्यांसमोर याचा उल्लेख करण्याचा प्रसंग आलाच तर "बाईची छाती" वगैरे. शाळकरी दिवसांपासून बनलेल्या मित्रांसमोर बोलताना "बाईचे बॉल(!)" , स्तन , उरोज, Tits, Boobs, Fun-balls. सामाजिक संदर्भातल्या कमीजास्त ओळखीच्या स्त्रीपुरुषांशी बोलताना . मुलांशी बोलताना Breasts. (भारतातील मराठी लोक मुलांशी याबद्दल कुणी बोलताना आठवत नाही)
असो. यादी वाढवता येईल. मला माझ्याशीच काही गोष्टी लिहिता लिहिता तपासून पाह्यच्या होत्या म्हणून ही गंमत करून पाहिली.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
भाषा बदलणे.
तिरके तिरके प्रतिसाद झाले की वाचायला अडचण होते म्हणून इथे प्रतिसाद.
भाषा मुद्दाम बदलावी असा आग्रह नाही. लैंगिकता दडपली गेली नाही तर विकृती कमी दिसतील. लैंगिकता दडपण्याचं एक लक्षण म्हणजे एकही अपशब्द न घाबरता बोलता न येणं. लैंगिकतेचं प्रदर्शन आपण आपल्या मैत्रांमध्येही सदासर्वकाळ करत नाही. परक्यांसमोर कधीच नाही. आई-वडील ह्या दोन्हींच्या मध्ये कुठेतरी येतात. पाळी आली की मुलींशी काही बोलावं लागतंच; अशा गप्पा मोकळेपणाने होत असतील तरीही अतिशय औपचारिक स्वरूपाच्या असतात. ह्या लैंगिकतेमध्ये 'मला जॉन अब्राहमकडे बघून काय काय होतं' अशा गप्पा येत नाहीत. थोडक्यात, अपशब्द वापरत असू तरीही सगळ्यांसमोर सगळे अपशब्द आणि सगळ्या प्रकारच्या लैंगिक गप्पा मनाने मोकळे लोकही करत नाहीत.
गणेशला शिव्या देतानाची वडलांची/वडलांच्या घरातली शिस्त, पळी-पंचपात्रीचं पावित्र्य आठवत राहतं आणि तो स्वतःच स्वतःला दडपत राहतो. नारभट कदाचित आपल्या काळानुसार चाबरट असतीलही; पण ते त्यातलं काहीही गणेशसमोर, कोणत्याही पद्धतीने दाखवत नाहीत. योग्य वयात आल्यावरही गणेशला नैसर्गिक आणि चारचौघात स्थान असलेल्या (म्हणजे तो LGBTQ सुद्धा नाही) लैंगिकतेचा स्वीकार करता येत नाही. स्वतःला मूल होईस्तोवर तो आपल्या वडलांच्या छायेतून बाहेर पडू शकत नाही. आपले वडील हे कोणीतरी थोर व्यक्ती आहेत; त्यांच्या मनात लैंगिकता अजिबातच नाही; आणि आपण त्यांच्या (ह्या प्रतिमे)सारखं असलं पाहिजे असा काहीसा अनैसर्गिक आग्रह गणेशच्या मनात आहे हे दिसत राहतं.
म्हणूनच मला कथा वाचताना 'कपलिंग'मधला जेफ आठवत होता. जेफवर कसलीही भाषिक दडपणं नाहीत. तो मित्रांसमोर बिनदिक्कत वाट्टेल ते शब्द वापरतो; वाट्टेल त्या फँटस्या सांगतो. तरीही चारचौघांत आपल्या नकळत आपण नको ते शब्द बोलून बसू ह्याची भीती त्याला आहे. तो असा बावचळलेला का आहे ह्याचीही चर्चा मालिकेत आहे. (तुफान विनोदी मालिका आहे, बाकी काही नाही तरी किमान डोकेबाज करमणूक म्हणून तरी जरूर बघाच.)
तोंडातून एक शिवी काढू न शकणारा गणेश आणि भलत्या ठिकाणी भलते शब्द बोलू अशी भीती असणारा जेफ हे एकाच कारणामुळे दयनीय वाटतात. पालकांच्या 'गंमतीदार' वागण्यामुळे आणि समाजाच्या अपेक्षा स्वतःवर नको तेवढ्या प्रमाणात लादून घेऊन ते स्वतःचं नुकसान करून घेतात. गणेश लैंगिकता नाकारणाऱ्या समाजात राहतो; त्याला अपराधगंड अधिक आहे. जेफ मोकळ्या समाजात राहतो; तो करुण असूनही विनोदी बनतो.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मूळ कथा आणि त्या कथेच्या
मूळ कथा आणि त्या कथेच्या जन्माबद्दलच्या लेखकाच्या विचारप्रक्रियेचा लेख एकत्र येणं मला समर्पक वाटतं. लैंगिक अभिव्यक्ती हा पॉर्नचा व्यापक प्रकार (सुपरसेट) आहे. ही अभिव्यक्ती दडपली जाते, आणि त्यामुळे जीवन खुरटतं. लेखक ज्याला भाषाभीरुता म्हणतो त्याला मी 'अभिव्यक्तीभीरुता' म्हणेन. पॉर्नवर बंधनं घालणाऱ्या समाजात ही अभिव्यक्तीभीरुता इतकी बळावते की अभिव्यक्तीसाठी असलेले शब्दच मनातून नाहीसे होतात. याच बंधनांचं उदाहरण लेखकाला त्याची कथा लिहितानाही आला. कथासूत्र प्रत्यक्षातही घडताना दिसतं त्यामुळे ते अधोरेखित होतं.
अभिव्यक्तीसाठी हक्काचे शब्द नसले की माणसाची अवस्था बायकोपासून दूर असलेल्या गणेशाप्रमाणे होते. आणि मग त्याला पिठाची पुच्ची बनवावी लागते. त्यातच मोकळेपणाचं समाधान मिळवावं लागतं, ही दुरावस्था आहे.
मूळ कथा माझी फार आवडती.
मूळ कथा माझी फार आवडती. (दुसरी तांब्यांची मला फार आवडती गोष्ट म्हणजे 'लाल नदीचं मूळ'. त्याबद्दल परत कधीतरी.) तिच्या जन्मकथेचं टिपण वाचायला मिळणार म्हणून मला फार भारी वाटलं होतं. ते वाचल्यावर अजिबात निराशा झाली नाही. याच अंकात इतरत्र कुठेतरी नोंदल्याप्रमाणे अतृप्त वासनांच्या आणि भाषिक अभिव्यक्तीचा थेट संबंध असतो, असं मला प्रकर्षानं वाटतं. त्यावर हे टिपण प्रकाश टाकतं. त्यानं या अंकाला परिपूर्णताच आली आहे.
लोळगे (पूर्ण लिहायला लई वेळ लागतोय, म्हणून इतकंच) वर म्हणताहेत, त्यानुसार विचार करून पाहिला. मला वाटतं, आपण विशिष्ट संदर्भचौकटीत विशिष्ट भाषा आणि निर्बंध पाळतो या मूलभूत गृहीतकाबद्दल लेखकाची तक्रार नसावी. तर जीवनाचा अविभाज्य भागच असलेला असा शरीरसंबंधांचा भाग जणू अस्तित्वातच नाही असं समजून जगायची एक विशिष्ट पद्धत मध्यमवर्गात - विशेषकरून सवर्ण मध्यमवर्गात - रुळलेली होती, त्या पद्धतीबद्दल तक्रार असावी. या 'आपल्याला एक हात मुळी नाहीच्च-काय गरज असते त्याची-हाताबद्दल बोलू नका-बॉबॉबॉ-फार वाईट' छापाच्या लपवाछपवीबद्दल एक प्रकारचा राग असावा; जो हिंसक-अचकटविचकट-वाह्यात भाषिक अभिव्यक्तीतून वाट काढून बाहेर पडत असावा. अशा प्रकारच्या बेरजा-वजाबाक्या सगळ्याच समाजांतून होत असतात आणि त्या मुळापासून - हातच्यासकट - समजून घेणं हेच लेखकलोकांचं काम असावं - जसं ते इथे लेखकाचं (आणि काही प्रमाणात त्याच्या, न-लेखक असलेल्या, मित्राचंही) आहे.
हे समजून घेणं इंट्रेष्टिंग आहे - अशा अर्थी, की फिक्शन लेखकानं काहीही लिहिलं की त्याची मुळं त्याच्या आत्मचरित्रात शोधायला धावत सुटण्याची खोड अलीकडे बरेच जणांना लागलेली दिसते. लेखकाच्या व्यक्तिगत आयुष्यातल्या फरकांमुळे आणि त्याच्या रागांचे-दडपणुकीचे स्रोत निराळे असण्याच्या जाणिवेमुळे - या असल्या चरित्रहुडकू लोकांना चाप बसतो. ते मला अत्यंत मनोरंजक वाटतं.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
ओके.
कथा तशी लंबर वन आहे. पण हा लेख जरा चिंगम टाईप वाटला.त्या निमित्ताने झालेली मारवा-लोळगे चर्चा आवडली!
==================
भूतकाळातील आस्वल्य.