देव्युपासना: बंगाली कविता:- भाग २

कवितांचा आढावा घ्यायचा तर इतके विविध भाव कालीच्या कवितांमध्ये आढळतात की सगळ्याकरता एकेक बकेट करावी लागेल आणि मग परत कुणाचा पायपोस कुणास उरणार नाही. तरी स्थूलमानाने पुस्तकामध्ये कवितांची वर्गवारी केलेली अहे तदनुसार कविता येत जातील. कॉपीराईट कायद्याचा भंग होऊ नये म्हणुन प्रत्येक कवितेतील, काही ओळी गाळलेल्या आहेत.
पहीला प्रकार आहे ज्यात कवि त्याच्या मनामध्ये देवीचे रुपडे, तिची प्रतिमा पहातो आणि ती जशीच्या तशी कवितेत उतरविण्याचा प्रयत्न करतो. आता देवीच अशी रौद्र म्हटल्यावर या प्रकारातील बहुसंख्य कविता या तिचे रणांगणातील भीतीदायक रुप वर्णन करणार्‍याच आहेत.
महाराजाधिराज महताबचंद यांची-
.
Who is this, all alone? Whose woman is She,
shining like the moon, inky black? She's dread of face,
with blood streaming from Her mouth
and from Her tongue
clamped between Her teeth—yet She's young
and the flying streams of hair on that terrible body
shine. A pearl necklace swings at Her throat,
a girdle of human hands encircles Her waist.
Her breasts, plump and jutting out,
and the rest of Her monstrous body
are covered with rivers of blood. I see Her
children's corpses at Her ears, a half-moon on Her forehead, naked.
.
.
.
lothes are horrifying, and so is She, standing on Bhava's chest
with Her right foot forward. In every direction on the cremation grounds
the jackals howl and Sahkari cackles horridly.
Candra says: Promise me
that at my end I can meditate on You like this
Oh three-eyed Kali.
.
दुसर्‍या एका कवितेमध्ये रामप्रसाद सेन वर्णन करतात -
देवीचे केस सैराट मोकळे सुटलेले आहेत. तिच्या आसपास प्रेतांचा खच तर पडला आहे. तिच्या राक्षसगणांचे, भूतगणांचे थैमान रणांगणावर चालू आह. तिच्या मैत्रिणी नग्न रुपात तिच्या सेवेस आहेतच पण स्वतः देवीही आकाश व दशदिशा हेच वस्त्र ल्यालेली आहे. आणि ती अनेक हत्ती, घोडे, रथ एकामागे एक गिळत विजयोन्मादात रणागणावरुन चालली आहे. अशी ही रणरागिणी काली मला भवसागर पार करण्यास मदत करो.
.
कमलाकांत भट्टाचार्य यांचीही अशाच अर्थाची ही कविता-
Jackals are dancing
among the corpses and non corpses
making horrid noises. Joining them
She cackles
a hideous laughter
and places Her feet
on the corpse-like Siva
tousling Her long
thick hair.
Kamalakanta (the poet) stares
absorbed
not even blinking his eyes.
.
तर अन्य एका कवितेत हेच कमलाकांत भट्टाचार्य देवीला क्रीडारत अशा सौम्य उन्मादक स्वरुपात स्वत:च्या हृदयकमळावर आरुढ पहातात. म्हणजे किती विविध रुपांनी कवि त्यांच्या प्रेयसाची मानसपूजा करत असतात हे कळून येइल. कधी ही रणरागिणी भावावस्था तर कधी उन्मादक प्रेयसी रुपातील.
So forgetful Mahadeva,
You have fallen in love!
You got her footprints
and now there is no separating you:
staring, staring,
you worship her.
.
.
.
Who knows the greatness of either of you -
you sky-clad sixteen year old,
and you naked Tripurari?
There is no end
to the bliss of Madana's bewitcher
lying lazily under the woman's hold,
he thirsts for the taste of love play
saying endearing things
he makes love to the beautiful one
in the lotus heart of Kamalakanta
.
देवीच्या चरणकमलांचा स्पर्श शंकरांना झाल्याने ते किती भाग्यवान आहेत अशा अर्थाचे पद्य बर्‍याच कवितांमध्ये आढळते. तसेच कविच्या हृदय कमळाचा (तंत्र मार्गातील अनाहत चक्र) उल्लेखही वारंवार येतो. व या कमळावरील शिव-शक्तीची संमोहक कामक्रीडा हा उल्लेखही वारंवार जाणवतो.
.
नंतर एका कवितेत रामप्रसाद सेन हे काळभैरवाचे दर्शन अंतचक्षूंनी घेतात. रामप्रसाद म्हणतात भर मध्यरात्री काळ्याकुट्ट अंधारात भैरव माझ्याकडे यायला, मला घाबरवायला निघाला आहे. हा भैरव कसा आहे तर तो "जय काली" असा जयघोष करीत नाचत, डमरु वाजवत व समवेत विद्रुप शिवगणांना, पिशाच्चांना घेऊन मला भिववण्यास येतो आहे. तो जटाधारी आहे, त्रिशूळ हातात घेऊन येणार्‍या त्याच्याही कपाळावरती चंद्रकोर आहे. तो आक्रमक आहे कधी साप तर कधी वाघ, कधी अस्वल असे वेगवेगळे रुप धारण करत तो माझ्या अंगावर झेपावतो आहे. पण कालीच्या साधकाला कसली भीती? माझे चित्त तसूभरही विचलित होत नाही आणि भैरव प्रसन्न होतो. तो मला बातमी देतो की तुझ्या मंत्राचा कालीने स्वीकार केलेला आहे. तू विजयी झाला आहेस.
.
भैरवाचे चित्र-

http://asubedi.org/images/20120428223225_kb1l.jpg
.

The world-mother's police chief
goes strolling
in the dead of night.
"Victory to Kaali! Victory to Kaali!" he shouts
clapping his hands and bab-bam!
striking his cheeks.
Ghosts, goblins and corpses roused by spirits
also roam about, In an empty house
at the crossroads
they hope to unnerve the devotee.
.
.
.
.
First he resembles a snake
then a tiger
then a huge bear!
This may alarm the devotee:
Ghosts will kill me!
I can't sit a second more!
He is turning toward me
blood-red eyes!
But can a true practitioner
fall into danger? The police chief is pleased:
"Well done!Well done!Kali
of the grisly face
has empowered your mantra.
You have conquered now and forever!"
Poet Ramprasad the slave
floats in a sea of bliss.
What can trouble a practitioner?
Are frightful scenes a threat?
He stays sitting on the hero's seat
with Kali's feet
for a shield.
.
एका कवितेत कमलाकांत भट्टाचार्य देवीला विनवतात की काली देवी तुझा पाय कोणावर पडतो आहे ते तर बघ. तू तुझ्याच पतीला तुडवते आहेस. तो जो की भूतनाथ आहे, तुझा प्राणप्रिय वल्लभ ज्याच्यावर केलेली टीका सहन न होऊन तूच पूर्वी एकदा आगीत उडी घेतली होतीस. आज तू नकळत त्याच्यावरच थयथय नाचते आहेस. बस कर ही माया. अति झालं यावेळेस.कृपा कर तुझी ही माया दूर कर.
म्हणजे कविला हे जग व त्यातील संकुचितपणा, स्वार्थ, माया-मोह सर्वाचा वीट आला आहे व त्याला आता विशालतेचा, आईमध्ये विरुन जाण्याचा ध्यास लागला आहे. जिने हे मायापटल आच्छादिले तीच ते दूर करु शकते. म्हणून तो शंकरांची उपमा मात्र घेऊन हीच विनवणी करत आहे की पुरे, आता सहन होत नाही.
.
अन्य एका अशाच कवितेमध्ये रामप्रसाद सेन म्हणतात की -आईच्या पायांखाली शंकर थोडीच आले आहेत? काहीतरीच बोलू नका, मार्कंडेय ऋषींनी चंडी पुराणात सांगून ठेवले आहे की राक्षससेनेचा विध्वंस करत आई गतीमान होती तेव्हा एक राक्षसाचे पोर तिच्या पायाखाली आले व केवळ तिच्या स्पर्शाने ते शिवतत्व पावले, शंकर बनले. कोणी पत्नी तिच्या पतीस अशी पायाखाली तुडवेल थोडीच अन मग हळूच आपली मागणी पुढे कर कवि (रामप्रसाद) म्हणतात- पण मी तर शंकर नाही ना आई. मी तर क्षुल्लक दास आहे, मग माझ्या हृतकमलावर पाय ठेवण्यास दिरंगाई का?
.
आईने किती परोपरीने आपणास त्रास दिला आहे हे तिला सांगुन खरं तर तिला गिल्टी भावना देऊन मनासारखे म्हणजे तिचे चरणकमळ प्राप्त करण्याची आसही अनेक कवितात दिसून येते. जसे की ही कविता जिच्यात रामप्रसाद आईला दूषण देतात की अनेकांना तू चांगलंचुंगलं खायला घालतेस, त्यांना धनैश्वर्याने समृद्ध करतेस मला, तुझ्या भक्ताला मात्र निर्धन भुकेकंगाल ठेवतेस. हाच का तुझा न्याय आणि मग असं बरच वाक्ताडन झाल्यावर तेच स्वतः मान्य करतात की नाही नाही, मी तुला विसरलो आणि मग दु:खाच्या खाईत बुडलो.
.
महेन्द्र्नाथ भट्टाचार्य देखील देवीला वेठीला धरत, गिल्टी भावना देत,असेच काहीसे म्हणतात की काय हे कशी आई आहेस तू! मी तुझ्या बेजबाबदार वर्तनाने अवाकच झालो आहे. आणि तू म्हणे जगदंबा (अंबा म्हणजे आई). तुझ्या लेकराला ना घालायला नीट वस्त्रे ना खायला काही. त्यात तो दिवसरात्र बघतो काय तू स्वतःच्याच नादात शंकरावरती नाचते आहेस.तू मला इतक्या प्रकारे त्रास देऊनही, मला भौतिक जगात भारवाही हमाल बनवुनही, आई मी तुला क्षमा केलेली आहे. मी तरीही आई-आई याच नावाने टाहो फोडतो आहे. आता नक्कीच तू माझ्यावर अशी कृपा करशील की तुझे नाव घेत जर मला मृत्यु आला तर ब्रह्मरंध्रातून माझा प्राण जाईल व मला मोक्ष लाभेल. ( माझ्या म्हणजे शुचिच्या माहीतीनुसार प्राण विविथ द्वारांतून जातो.पण जेव्हा तो टाळूतून निघुन जातो तेव्हा मग माणसास पुनर्जन्माचा फेरा चुकतो)
.
नजरुल इस्लाम यांची एक मोहक कविता आहे. जिच्यात ते आईला आईपण शिकवु इच्छितात की चल आपण भातुकली खेळू आणि मग तू बघ मी बाहुल्यांवर कसे प्रेम करतो, त्यांना कसा लळा लावतो, तू माझ्याकडुन हे मातृत्वाचे धडे घे.
Let's be girls maa.
and play with dolls;
come into my playroom.
I will take the mother's role, so I can
teach you how.
If you make one dull or wretched
hold him to your bossom;
who else will ease his pain?
.
.
.
but all play games of hide-and-seek,
crying as they leave at night, returning with morning.
This little boy,
you made him cry
you made him fear.
Now love away his fear,
cease to make him cry-
Or casting you he will run away.
When this play is finished
lull him to sleep,
hold him in your arms.

या कवितेतील रात्रीचा व दिवसाचा लपंडाव हा जन्म मृत्युचा खेळ आहे. ही कविता मला फार आवडते कारण कवि आईला वात्सल्याचे धडे देत देत, तिच्या कुशीत विसावा घेण्याची आशा बाळगुन आहे.
.
अशा अनेक कविता आहेत, नाना भाव आहेत, देवीला वेठीस धरण्याचे, तिच्यावरती विसंबण्याचे, स्वतःला तिच्या हाती सोपवुन देण्याचे, तिला वाक्ताडन करुन दटावण्याचे - सर्वच्या सर्व अतिशय लोभस वाटतात. अशाच काही कविता पुढील भागात देईन.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

विवेचन आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile
ह्या सर्व कविता मूळ बंगालीत आहेत की इंग्रजीतच?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उल्का

बंगाली कविता आहेत ज्या की अनुवादित केलेल्या आहेत. अनुवादकर्त्यांचे नाव देते थोड्याच वेळात.
_______
Rachel Fell McDermott
____
हे ते पुस्तक ज्यातुन मी कविता दिल्या आहेत - http://www.amazon.com/Singing-Goddess-Poems-Kali-Bengal/dp/0195134346

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भक्तांचं देवाशी असलेलं जिव्हाळ्याचं, आपलेपणाचं, हक्काचं नातं दर्शवणार्‍या कविता, अभंग मराठीतही आहेत. विठाई माऊली वगैरे. पण कालीवरच्या या कविता त्याहूनही वरताण दिसताहेत! कवितेतल्या वेगळ्याच प्रांताची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.

नजरुल इस्लाम यांची एक मोहक कविता आहे. जिच्यात ते आईला आईपण शिकवु इच्छितात की चल आपण भातुकली खेळू आणि मग तू बघ मी बाहुल्यांवर कसे प्रेम करतो, त्यांना कसा लळा लावतो, तू माझ्याकडुन हे मातृत्वाचे धडे घे.

'आमार कालो मेये' हीपण नजरुल इस्लाम यांची अशीच एक कविता आहे. (ऐका) 'गाई पाण्यावर आल्या'ची आठवण करून देणारी. त्यात कालीला वात्सल्याने 'माझी रागीट पोर गं ती' म्हटलं आहे. कुणीतरी नावं ठेवली (शिव्या दिल्या) म्हणून रागारागाने तिने अंगाला (काळी)शाई फासून घेतली आहे. रागाच्या भरात तिने वस्त्रं नेसलेली नाहीत, की दागिने ल्यालेले नाहीत, पण तोच वेश किती सुंदर आहे, तिचा रागावलेला चेहराच हसर्‍या चेहर्‍यापेक्षा सुंदर दिसतो वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फारच गोड चार्वी. अजुन ऐकली नाही पण नक्की ऐकेन. किती सुंदर भावना आहेत. मला म्हणुन त्या कविता आवडताहेत. भावना इतक्या नितळ आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0