A4 कागदाचा आकार कसा ठरवला गेला? [इतिहास] [गणित]

आतापर्यंत बऱ्याचदा आपण A4 कागद वापरला असेल. या कागदाची लांबी व रुंदी कशी ठरवली गेली?

ई. स. १९२० मधे जर्मनीत कागदाच्या आकाराचे प्रमाणीकरण (standardization) करण्यासाठी German Institute for Standardization (Deutsches Institut für Normung किंवा DIN) या संस्थेने A सीरीज (अनुक्रम) चा पहिल्यांदा अवलंब केला. यात A0, A1, A2, A3, A4, A5 ... हे आकार प्रमाणित करण्यात आले.

A सीरीज चे वैशिष्ट्य असे की यातल्या कोणत्याही अनुक्रमाच्या कागदाची मधून घडी घातल्यास आपल्याला सीरीज मधला पुढचा आकार मिळतो.

a

.
.
याचा फायदा असा की तुमच्याकडे जर A१ आकाराचा कागद असेल तर त्यापासून सहजतेने A२, A३ .. आकाराचे कागद कापता येतील.

या सिरीज चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यापैकी प्रत्येक आकारात लांबी - रुंदी चा अनुपात (रेशो - ratio) हा समान असतो. असे करण्यामागचे कारण हे की समजा तुम्ही एखादे पत्र किंवा चित्र दोन वेगवेगळ्या आकारांच्या कागदांवर छापले, तर लेखन/चित्र दोन्ही बाजूंनी समप्रमाणात स्केल होईल आणि सारखेच दिसेल. A0 कागदाचे क्षेत्रफळ 1 वर्ग मीटर (1m2) ठरवले गेले.

वाचकास कोडे - लांबी रुंदी चा हा रेशो किती असला पाहिजे हे तुम्ही शोधू शकता का?
.
.
.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

चांगली माहिती.

लांबी = रुंदी गुणिले वर्गमूळ (२)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

छानच. हे माहीत नव्हते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लांबी : रुंदी = २:१

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ए४ साइजचा कागद २१०मिमि बाय २९७ मिमि असतो. ह्यात तर हे प्रपोर्शन नाही.
एनीवे कागद आणि प्रिंटिंगचा विषय म्हणून.. डेमी साइज कागद १८ इच बाय २३ इंच असतो. त्याचा १/४ हा ए४ पेक्षा थोडा मोठा असतो. तो २२५ मिमि बाय २९० मिमि असतो. तो कट करुन ए४ वापरला जातो. आपला कम्प्युटर प्रिंतर सोडून कमर्शिअल प्रिंटिंगमध्ये ए४ हे माप न वापरता १/४ वापरले जाते. त्याचा ए३ (हाफ डेमी) हा ११.५ इंच बाय १८ इंच असतो. तो फुल्ल साइज १२ बाय १८ काउंट करतात. पेपर मार्केटमध्ये जवळपास सगळे कागद डेमी, डबल डेमी ह्या साइजमध्ये मिळतात. काही कागद, स्पेशली स्टिकर पेपर आणि ग्लॉसी हे १५ बाय २० साइजमध्ये असतात. कार्डस २२ बाय २८ ह्या साइजमध्ये मिळतात. काहि खास कागद (लेजर पेपर, एक्झीक्युटिव्ह बॉन्ड, चेक पेपर) हे १७इंच बाय २७ ईंच मध्ये मिळतात. त्याचा १/४ हा लीगल साइज म्हणतात. कागदाची जाडी ही जीएसएम मध्ये मोजली जाते. ग्रॅम / स्केवर मीटर. आपला झेरॉक्स पेपर हा ७० जीएसएम असतो. व्हि कार्डस वगैरे २५० ते ३५० जीएसएम असतात. जास्त जाडीचे कार्डस किलोग्राम मध्ये मोजतात. जेके ११ केजी, जेके १४ केजी वगैरे.
प्रिंटिं मशीन्स ह्या बाहेरच्या (जर्मन, जापनीज) मेक असतील तर त्या १९ बाय २५, २० बाय ३० वगैरे साइजच्या असतात. भारतीय मशीन्स मात्र १० बाय १५, १५ बाय २०, २०बाय ३० अशा असतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>ए४ साइजचा कागद २१०मिमि बाय २९७ मिमि असतो. ह्यात तर हे प्रपोर्शन नाही.

आहे की. २१० x १.४१४ = २९६.९......... वर्गमूळ (२) = १.४१४

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

च्यामारी असे असते होय. मला खरच माहीत नाही हे वर्गमूळ वगैरे. (अर्थात एवढे गणित येत असते तर विंजीनेर झालो नसतो का? Wink )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

@अभिजीत - इंटरेस्टिंग माहिती!

@सर्व - बरोबर उत्तर वर्गमूळ(२) आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझा तर्क:-
टेबलाचे माप 1:1.5. अथवा 1:1.4 गुणोत्तरात बरे वाटते.
चित्र फिर लांबुडकं नको आणि चौरस ( square )नको तर 1 :: 1.4 गुणोत्तर बरे दिसते.
कॅम्रा भिंगाची गोल प्रतिमा मिळते त्यातून बय्रापैकी मोठे लांब रुंद चित्र 1::1.3 गुणोत्तर ठेवून मिळते>>4 :3 >>1:1.3333
( VGA = 480X640.
qVGA =240X320
QVGA =1920X2560 )are all 1:1.3333
A0 size one metre square ठेवली तर ( 10000 centimetres square) तर A4 चा आकार झाला 625 cm square ( सोळापट लहान )
यातून
21x28
21x29 cmचे कागद 1:1.333 अथवा 1:1.4 गुणोत्तराचे मिळतील.

1:1.5. , 1:1.7 इत्यादी कागदाची साइज ठेवण्यात ( 16:9 panorama वगैरे) पुढे कॅम्रा इन्लारजमेंटमध्ये इमेज लॅास होतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिती आवडली. बाकी या जर्मनांना एकूणच स्टँडर्डायझेशनची हौस फार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं