अलीकडे काय पाहिलंत? - २३
रघुराम राजन यांनी दिलेले रामनाथ गोएंका भाषण. पण सध्याचा आर्थिक (भारतीय व जागतिक) वातावरणाबद्दल ची त्यांची टिप्पणी. जरा जास्तच टेक्निकल आहे. (मला यातल्या काही गोष्टी समजल्या नाहीत. पण तरीही त्यांनी अर्थशास्त्राची पार्श्वभूमी नसलेल्यांच्यासाठी काही वाक्ये पेरलेली आहेत. )
.
.
.
आर्थिक वृद्धी च्या आघाडीवर
आर्थिक वृद्धी च्या आघाडीवर मरगळ का आहे समस्त विश्वात (भारत याला अपवाद आहे असे म्हणावेसे वाटते.) या प्रश्नाची जी उत्तरे आहेत त्यातले एक - १) जगातल्या अनेक देशांमधे ageing ची समस्या डोके वर काढते आहे. लेबर फोर्स तरूण नाही - (रुचिर शर्मा यांच्यामते), २) महत्वाचे शोध की ज्यांच्यामुळे वृद्धी जोरात झाली/होऊ शकली ते झालेले आहेत. यापेक्षा महत्वाचे शोध लागत नाहियेत (हा रॉबर्ट गॉर्डन यांचा आडाखा). वेगळ्या शब्दात फेसबुक व ट्विटर हे काही फार मोठे टेक्नॉलॉजिकल अॅडव्हान्सेस नाहियेत (फोन, टेलिग्राफ, कार, विमान). पण मुख्य मुद्दा हा आहे की उत्पादकता वाढत नैय्ये.
रिफॉर्म्स च्य आघाडीवर अनेक बाबी अशा आहेत की ज्या एस्टॅब्लिश्ड व संघटित मंडळींच्या हितंसंबंधांना मारक आहेत. त्यामुळे स्ट्रक्चरल रिफॉर्म्स कठिण होऊन बसतात कारण Jean-Claude Juncker म्हणतात त्याप्रमाणे - We all know what to do, we just don’t know how to get re-elected after we’ve done it..
मल्ल्यांचा थेट उल्लेख न करता - बेजबाबदार कर्जदारांना कठोर दंड करा पण त्यांच्या कंपन्या ह्या दोषी नाहीत हे लक्षात ठेवा व दंड/शासन करणे हे त्या आजारी कंपन्यांपासून वेगळे काढा व त्या आजारी कंपन्यांना रिस्ट्रक्चरिंच्या मार्गावर जाऊ द्या. त्यांना गोंजारू नका.
भारतात उत्तरोत्तर सर्व्हिस सेक्टर वाढत जाणार आहे हे नॅचरल आहे. व गेली अनेक वर्षे विश्वातल्या सप्लाय चेन्स ची लांबी कमी होत आहे. चीन हा पूर्वी खूप अॅसेम्ब्लर टाईप होता आता तसे नाही. आता ते अॅडव्हान्स्ड प्रॉडक्ट्स सुद्धा बनवतोय.
ढेरेशास्त्री - राकुंनी १ डॉलर
ढेरेशास्त्री - राकुंनी १ डॉलर म्हणजे २५ रुपये का नाहीत असा खडा सवाल केला होता इथेच, ह्या ऐसी च्या मैदानावर. आणि तुम्ही डॉलर बरोबरचा एक्चेंज रेट इन्फ्लेशन च्या प्रमाणात होयला पाहिजे असे म्हणताय. राकु जरी अॅक्टीव्ह नसले तरी तुमचे प्रतिसाद वाचतच नाहीत असे समजु नका.
असं आम्ही नाय. र.रा. म्हणत
असं आम्ही नाय. र.रा. म्हणत होते.
त्यांच्या उदाहरणातून. समजा उमेरिकेत एखादी गोष्ट १ डोलरला बनते. भारतात ६३ रु. ला समजा हाच आत्ताचा एक्स्चेंजरेट आहे. पुढच्या वर्षी अमेरिकेत तीच वस्तू १ डॉलरला बनेल. (तिथले इन्फ्लेशन ० आहे समजू.) आपल्याकडे ५ % इन्फ्लेशनने ती आता ६६ ला बनेल. जर १ डॉलर = ६३ राहिलं तर आपलं उत्पादन महाग होइल. हे अॅट सेम प्रॉडक्टिव्हीटी.
या उदाहरणात खालील गृहितकं
या उदाहरणात खालील गृहितकं आहेतः
१) अमेरिकेत बनणारी वस्तू आणि भारतात बनणारी वस्तू या एकमेकांच्या "पर्फेक्ट सब्स्टिट्यूट्स" आहेत.
२) दोहोंचं कॉस्ट स्ट्रक्चर सारखं आहे आणि ते बदलणार नाही.
२अ) इकॉनॉमी ऑफ स्केल दोन्हीकडे सारखंच आहे.
३) तंत्रज्ञानात कोणताही बदल होणार नाही, जेणेकरून नफा वाढवता येईल.
४) फ्री ट्रेड आहे (पक्षी: ट्रेड आणि नॉन ट्रेड ब्यारियर्स नाहीत. भारताकडूनही आणि अमेरिकेकडूनही.)
५) अमेरिकन कंपनीला भारतात ती वस्तू बनवणारी सबसिडियरी कंपनी काढण्याची गरज वाटत नाही. (कारण तशी स० कं० काढली तर अपफ्रंट गुंतवणूक करावी लागेल, आणि ती वसूल करण्यासाठी भारतीय स० कं०कडूनच वस्तू घेणं भाग पडेल.)
६) ती वस्तू बनवण्यासाठी कोणतीही बौद्धिक संपदा लागत नाही, किंवा लागणारी बौ० सं० दोहोंकडे समप्रमाणात उपलब्ध आहे.
७) ...
एवढ्या सगळ्या बाबी पूर्ण होणार असल्या तरच या हिशोबाला काही अर्थ आहे.
प्रत्यक्षातः असं नाय होत. जवळजवळ सगळ्या गोष्टींत (कमोडिटी मार्केट हा कदाचित अपवाद) "पर्फेक्ट सब्स्टिट्यूट्स" ही कविकल्पना असते. तंत्रज्ञानात बदल होतात. सबसिडी किंवा काऊंटरव्हेलिंग कस्टम ड्यूटीसारखे ब्यारियर बसतात. वगैरे.
भारतात उत्तरोत्तर सर्व्हिस
भारतात उत्तरोत्तर सर्व्हिस सेक्टर वाढत जाणार आहे हे नॅचरल आहे
क्यु, गब्बु क्यु?
आधीच उत्पादक अर्थव्यवस्थे च्या फेज मधे न जाता आपण थेट सेवा क्षेत्रात उडी घेतली आहे असे तुला नाही का वाटत?
सेवा क्ष्रेत्र आधारीत अर्थव्यवस्थेंसाठी दुसर्या कुठल्या तरी अर्थव्यवस्थेत उत्पादन करुन घेणे गरजेचे असते, अमेरीका, युरोप ला चीन, भारत मिळाले उत्पादन करुन घेण्यासाठी, म्हणुन त्यांना सेवा क्ष्रेत्र वाढवता आले. भारताला कोण उत्पादक राष्ट्र मिळणार? आफ्रीका? ते अजुन तरी शक्य वाटत नाही. आणि समजा मिळाले तर १३० कोटी भारतीय एकमेकांना कुठल्या सेवा देणार?
अन्यधान्य उत्पादक क्षेत्रात
अन्यधान्य उत्पादक क्षेत्रात गणले जात नाही, ते शेती म्हणुन पकडले जाते. आपण शेती अर्थव्यवस्थेकडुन एकदम सेवा अर्थव्य्वस्थेत उडी मारली.
जीडीपी मधे उत्पादक क्षेत्राचा वाटा ५ वर्षापूर्वीच्या चीन, किंवा ५०-६० वर्षापूर्वीच्या अमेरीके इतका बघितला आहे का?
पूर्वी शेती आणि मायनिंग चा वाटा जास्त असायचा, कदाचित थोडा काळ उत्पादक क्षेत्राचा वाटा थोडा वाढला, पण लगेचच सेवाक्षेत्रानी त्याला मागे टाकले. पुढारलेल्या देशांची सायकल फॉलो झाली नाही.
मुख्य म्हणजे, १२५ कोटी लोकांना पुरेसे साबण, कपडे, गाड्या, घरे जर देण्याइतकी अर्थव्यवस्था विकसीत झाली असती तर ती नक्कीच उत्पादक अर्थव्यवस्थेच्या फेज मधुन गेली असती.
डोसानॉमिक्स
सेवा क्ष्रेत्र आधारीत अर्थव्यवस्थेंसाठी दुसर्या कुठल्या तरी अर्थव्यवस्थेत उत्पादन करुन घेणे गरजेचे असते, अमेरीका, युरोप ला चीन, भारत मिळाले उत्पादन करुन घेण्यासाठी, म्हणुन त्यांना सेवा क्ष्रेत्र वाढवता आले. भारताला कोण उत्पादक राष्ट्र मिळणार? आफ्रीका? ते अजुन तरी शक्य वाटत नाही. आणि समजा मिळाले तर १३० कोटी भारतीय एकमेकांना कुठल्या सेवा देणार?
सेवांचे दोन ड्रायव्हर्स आहेत (भारतात) - १) अनेक सेवा ह्या निर्यात केल्या जाऊ शकत नाहीत (उदा. केशकर्तन, प्लंबिंग, रंगारी, ड्रायव्हर, स्वयंपाकी, बागकाम करणारे वगैरे), २) प्रचंड लोकसंख्या (म्हंजे सेवा पुरवणार्या कामगारांचा मुबलक पुरवठा). रघुराम राजन यांनी Balassa–Samuelson effect चा उल्लेख केलेला आहे तो रोचक ... अतिरोचक आहे. मस्त मस्त. अवश्य वाचणे. Balassa–Samuelson effect चा दुसरा उल्लेख त्यांनी इथे केलेला आहे - डोसानॉमिक्स. (ज्या मुलीने तो प्रश्न रघुराम राजन यांना विचारला तिचा चेहरा थोडासा मेघना भुस्कुटे सारखा आहे.)
आऊटसोर्सिंग चा जमाना अमेरिकेत आल्यावर अनेक लोक बेरोजगार झाले (कारण कामगारकपात). त्यावेळी मासिकांमधे अनेक लेख यायचे. त्यात एकात न्यु जर्सी मधल्या एका माणसाने सांगितले होते की त्याने रंगारी व्हायचा निर्णय घेतलेला आहे कारण अमेरिकेतील घरांच्या भिंती भारतातून किंवा चीन मधून रंगवून दिल्या जाणे कठिण असते.
हे बरं आहे. कामगार एकदा Manufacturing आले की त्यांची साल्यांची युनियन करायची प्रवृत्ती वाढते. आजकाल सेवा क्षेत्रातल्या कामगारांची सुद्धा गुर्मी वाढत चाललेली आहे .
----
आधीच उत्पादक अर्थव्यवस्थे च्या फेज मधे न जाता आपण थेट सेवा क्षेत्रात उडी घेतली आहे असे तुला नाही का वाटत?
शॉल्लेट. आमचे मित्र रमताराम सुद्धा याच्याशी सहमत असतील असा कयास आहे.
(भारतात IT हे मुख्यत्वे IT enabled Services आहे. मुख्यत्वे म्हंजे संपूर्ण नव्हे.)
पण भारतीय वातावरणास पूरक नाही (याची कारणे वर दिलेली आहेत). अमेरिकेत १९०५ मधे अंदाजे ५०% लोक कृषि क्षेत्रात होते. १९५० मधे ते प्रमाण ३०% आले. १९७५ पर्यंत १०% कृषि, ५०% उत्पादन व बाकीचे सेवा क्षेत्रात होते. पण अमेरिकेत एवढी मोठी लोकसंख्या नव्हती व आजही नाही. आज अमेरिकेत ४% पेक्षा कमी लोक कृषि क्षेत्रात आहेत. (नंबर्स चुकीचे असतीलही पण भावनाओंको समझो.). The world's output is getting lighter and lighter असं काहीतरी अॅलन ग्रीनस्पॅन सुद्धा म्हणाले होते.
(उत्पादन (Manufacturing) च्या सेक्टर वर मोदी भर देत आहेत ते कितपत स्वागतार्ह आहे त्याबद्दल शंका उपस्थित करायला खूप वाव आहे.)
मग 'मेक इन इन्डियाला' सुट्टी?
मग 'मेक इन इन्डियाला' सुट्टी? का दोन्ही सेक्टर्स वाढणार?
दोन्ही एकत्र वाढू शकतात.
जस जशी आर्थिक वृद्धी होत जाईल तसतशी लोकांची क्रयशक्ती वाढेल व सर्व्हिसेस ची मागणी वाढत जाईलच. पण मॅन्युफॅक्चरिंग हे सुद्धा समांतररित्या वाढू शकतेच. चीन ची स्पर्धा असेल आपली पण आपण स्पर्धा करू शकतोच.
अलीकडे काय पाहिलंत?
टीव्हीएफ (द व्हायरल फीवर) या ऑनलाईन निर्मिती संस्थेने प्रदर्शित केलेल्या मालिका कोणी पाहतं का ?
अरुणभ कुमार आणि त्याच्या काही साथीदारांनी चालवलेली ही संस्था गेल्या काही वर्षांपासून जास्ती करून बॉलीवूड, मालिका, न्यूज चॅनल्स यांचं विडंबन करण्यासाठी जास्त प्रसिद्ध होती. त्यांचे टीएमओ ..... (द मेकिंग ऑफ .....) या शीर्षकाचे असलेले विडीयो युट्यूब वर बरेच पसंद केले गेले. त्यांचे आणखीही बरेच विनोदी व्हिडियो आहेत. या संस्थेतील बरेच कलाकार आणि दिग्दर्शक हे आयआयटीयन्स आहेत. स्वत: अरुणभ कुमार हा आयआयटी मधून बाहेर पडलाय.
त्यांच्या काही विडीयोंपैकी एक इथे पाहता येईल.
आणखीन एक , इथे
गेल्या वर्षीपासून या संस्थेने 'टीव्हीएफ ओरीजीनल्स' या शीर्षकाखाली स्वत: मालिकांची निर्मिती करण्यास सुरुवात केलीये.परमनंट रूममेट्स आणि पिचर्स नावाच्या दोन मालिका त्यांनी रिलीज केल्यात. अल्पावधीतच या दोन मालिकांनी प्रचंड लोकप्रियता मिळवलीये. डेली सोपला वैतागलेल्या लोकांना या मालिकांचा वेगळेपणा आवडून गेल्यामुळे त्यांना पसंती मिळत आहे.
अर्थात अनेक शिव्या वगैरे असल्यामुळे त्या टीव्हीवर दाखवणं अशक्यच. पण तरीही केवळ जालावर प्रसिद्धी असूनही त्यांची वाढलेली लोकप्रियता नक्कीच कौतुकास्पद आहे.
प्रत्येक मालिकेचे वेगवेगळे सिझन्स टप्प्याटप्प्याने प्रदर्शित करण्याची इंग्लिश मालिकांची स्टाईल इथे अवलंबली गेलीये. पण यात ते कमालीचे यशस्वी झालेत. पिचर्सचा ५ भागांचा पहिला सिझन पूर्ण झालाय आणि दुसऱ्या सीजनची लोक आतुरतेने वाट पाहतायत.
परमनंट रूममेट्सच्या दुसऱ्या सिझनचे २ भाग नुकतेच प्रदर्शित झाले. आता तिसरा भाग येईल.
दोन्ही मालिकांची कथा तशी वेगळी वगैरे नाही. साधीच पठडीतली आहे. पण ती मांडण्याची पद्धत मात्र लक्षणीय आणि निश्चितच खास आहे.
परमनंट रूममेट्स ही लॉंग डीस्टन्स रिलेशनशिप ते लिव्ह इन असा प्रवास करणाऱ्या एका जोडप्याची तर पिचर्स ही 'स्टार्ट-अप' च्या धडपडीत असलेल्या चार मित्रांची गोष्ट आहे. सध्या भारतात स्टार्ट अप्सचं वारं असल्याचं बरोबर ओळखून टीव्हीएफने हा विषय कॅच केलाय.
दोन्ही मालिकांच्या पहिल्या भागाचा धागा खाली देतोय. जर आवडला तर नक्की पाहा. निदान एकदा तरी पाहावाच अश्या या मालिका आहेत.
परमनंट रूममेट्स - इथे पाहता येईल
पीचर्स - इथे पाहता येईल
मसान पाहिला. फार भारी आहे.
मसान पाहिला. फार भारी आहे. "तू किसी रेल सी गुजराती है" गाणं पण आवडलं. फक्त त्या मुलीला अपघातात खपवलं नसतं तर फार बरं झालं असतं. यूं क्लिशों के दाग...
"चलो दिल्ली" नावाचा सिनेमाही पाहिला. विनय पाठक फार उत्तम काम करतो.
हल्ली हिंदी चित्रपटांतलं स्थळदर्शन फार रोचक होत चाललं आहे. मसानमधलं बनारस, दम लगा के हैशामधलं हरिद्वार, बऱ्याच चित्रपटांतील दिल्ली, वगैरे.
दुसरं निरीक्षण म्हणजे सत्तरच्या दशकात जसे मिडल ऑफ द रोड सिनेमे होते (अमोल पालेकर प्रभृतींचे - पूर्ण कमर्शियल पण नाही आणि प्रायोगिकही नाही) तसे आता परत येताहेत.
अवांतरः हिंदी सिनेमांतले पोलिस एकतर हास्यास्पद तरी असतात (अंदाज अपना अपना) नाहीतर डेडपॅन लुक देणारे डरावने असतात (मसान).
मसान
मसान मधली लव्ह स्टोरी छान घेतली होती. तो जत्रेतील फुग्यांचा सीन एकदम आवडला होता.
अवांतराबाबत - सहमत आहे. अपवाद कदाचित सलीम-जावेद यांच्या स्क्रिप्ट्स्चा. त्यांचे पोलिस सहसा चांगले, काम करणारे (कदाचित जास्तच काम करणारे) असत. शोले, दीवार, जंजीर, दोस्ताना, डॉन, शक्ती, शान - कोठेही पोलिसांचे कार्टून केलेले नाही.
आमचा क्लास वायला; आम्ही फेअर & लव्हली
असा प्रकार बेकायदेशीर नसेल का चिंजं?
ISSUES OF U.S. COPYRIGHT LAW RELATING TO THE USE OF MOVIES IN THE CLASSROOM
no license from the copyright holder is required when a teacher at a public school or non-profit educational institution uses a lawfully purchased or rented copy of a movie in classroom instruction. It doesn't matter who purchased or rented the film, so long as it was legally obtained.
कुलुपे मोडणे -
In Title 17 of the U.S. Code of Federal Regulations, Section 201.40 the Librarian of Congress determined that "during the period from November 27, 2006 through October 27, 2009, the prohibition against circumvention of technological measures that effectively control access to copyrighted works set forth in 17 U.S.C. 1201(a)(1)(A) shall not apply to persons who engage in noninfringing uses of . . .
(1) Audiovisual works included in the educational library of a college or university's film or media studies department, when circumvention is accomplished for the purpose of making compilations of portions of those works for educational use in the classroom by media studies or film professors."
no license from the copyright
no license from the copyright holder is required when a teacher at a public school or non-profit educational institution uses a lawfully purchased or rented copy of a movie in classroom instruction. It doesn't matter who purchased or rented the film, so long as it was legally obtained.
तसे तर टॉरेंटादि सायटीवरून डौनलोडवलेले मटेरियलही कुणीतरी लॉफुली विकतच घेलेले नसते काय? प्वाइंट हा की शाळाकॉलेजाने टॉरेंट वापरून अशी कॉपी घेतल्यास ते लीगली परमिटेड आहे?
प्वाइंट हा की शाळाकॉलेजाने
प्वाइंट हा की शाळाकॉलेजाने टॉरेंट वापरून अशी कॉपी घेतल्यास ते लीगली परमिटेड आहे?
बहुदा टोरंट आदि मार्ग वापरून मिळवलेली कॉपी पहाणं हे मुळातच कायदेशीर नसलं तर शैक्षणिक संस्थांनी ती वापरणं कायदेशीर कसं ठरेल?
अवांतर : चिंतातुर जंतू यांनी "डाऊनलोड" वगैरे करण्याबद्दल उल्लेख केलेला आहे/पृच्छा केलेली आहे असं दिसलं नाही.
बहुदा टोरंट आदि मार्ग वापरून
बहुदा टोरंट आदि मार्ग वापरून मिळवलेली कॉपी पहाणं हे मुळातच कायदेशीर नसलं तर शैक्षणिक संस्थांनी ती वापरणं कायदेशीर कसं ठरेल?
ढोबळमानाने दोन बाबी आहेत -
- कायदेशीर असणं
- rigorously ए्फोर्स केलं जाणं
एखाद्या व्यक्तीने करणं हे बेकायदेशीर असेल सुद्धा पण ते प्रोसेक्युट करण्यातून कंटेंट ओनर ला काय मिळणारे (लिटिगेशन चा खर्च वजा जाता) - १) प्रतिशोध, २) क्षतिपूर्ती, ३) सिग्नलिंग ?
पण हे शैक्षणिक संस्थेने केलं तर त्यातून क्षतिपूर्ती मिळण्याची शक्यता वाढते. त्याहीपेक्षा सिग्नलिंग चे फायदे होतात.
हाउस ऑफ लाईज - अॅमेझॉन प्राईम वर ही सिरीज
अॅमेझॉन प्राईम वर ही सिरीज आहे. त्याचा पहिला सीझन पाहिला. मॅनेजमेण्ट कन्सल्टण्ट्स च्या रोजच्या कामातले बारकावे उपहासाने/विनोदाने दाखवले असतील असे सुरूवातीला वाटले. पण तेवढे प्रभावी झालेले नाही. ऑथेण्टिक वाटत नाही. दुसरे म्हणजे टॉप लेव्हल मॅनेजमेण्ट कन्सल्टिंग हा टीपिकल व्हाईट मॅन जॉब आहे (ते 'ओल्ड बॉइज क्लब' वगैरे). तेथे ब्लॅक लीड कॅरेक्टर हे 'प्रातिनिधीक' वाटत नाही. डॉन चीडल मला आवडतो पण इथे तो मिसकास्ट वाटतो (जॉन हॅम किंवा व्हाईट कॉलर मधल्या निक सारख्या लोकांना परफेक्ट होईल रोल हा). त्यात एका एपिसोड मधे सगळी धमाल बसवायची म्हणून प्रत्येक मॅनेजमेण्ट असाइनमेण्ट खूप सुलभीकरण (oversimplification) केलेली वाटते. प्रत्येक क्लायंट कंपनीत मुख्य पदावरच्या बायका म्हणजे टोटल निंफो. तो सगळा मॅनेजमेण्ट, कन्सलटन्सी 'गेम' खूप ट्रिवियलाइज करून दाखवला आहे.
मॅनेजमेण्ट कन्सलटन्सी मधे चालणारे असंख्य प्रकार खूप डीटेल मधे, अगदी डिलबर्ट सारखे नाही तरी किमान नर्मविनोद, उपहास वापरून दाखवता आले असते. तसे काही आहेतही. पहिला सीझन बर्यापैकी बघणेबल वाटला. पण आता कंटाळा आला.
सुरूवातील आवडल्याने याचे मूळ पुस्तकही आणले आहे. ते कसे आहे ते वाचून सांगतो.
Eye in the Sky नावाचा एक
Eye in the Sky नावाचा एक चित्रपट पाहिला. काही दहशतवादी जे एका घरात एकत्र आलेले असतात त्यांना ड्रोन मधून एक बाँब टाकून मारण्याची (अमेरिकन व ब्रिटिश सैन्याची) तयारी चाललेली असते व त्याच वेळी त्या घराजवळ एक लहान मुलगी ब्रेड विकायला आपले दुकान थाटून बसते. व ती त्या बाँब च्या परिघाच्या क्षेत्रात येणार असते व म्हणून - बाँब टाकायचा की नाही व केव्हा टाकायचा यावरून एक प्रचंड मूल्यसंघर्ष होतो त्याबद्दलचा चित्रपट.
मौनराग
महेश एलकुंचवार ह्यांच्या "मौनराग" ह्या ललित-लेखसंग्रहातील दोन लेखांवर आधारित "मौनराग" हा आविष्कारनिर्मित कार्यक्रम काल संध्याकाळी रवींद्र नाट्यमंदिराच्या पु. ल. देशपांडे मिनीथेटरात पाहिला. आधी चंद्रकांत कुलकर्णी ह्यांनी लेखकाला बालपणापासून मृत्युबद्दल वाटणार्या गूढ आकर्षणाविषयी लेखाचे अभिवाचन केले. पाऊण तासाच्या अभिवाचनानंतर पाच मिनिटांचे मध्यांतर झाले. मग आले सचिन खेडेकर. वयाच्या बाराव्या वर्षीच कुटुंबाने केलेल्या स्थलांतरामुळे गावच्या घराची झालेली ताटातूट, व त्यामुळे पुढील ३८ वर्षे उरी वागवलेली भळभळती, दुखरी जखम; ही घालमेल, ह्या वेदना ह्या केवळ आपल्या आहेत, कुटुंबातील इतरांना आपली इतकी तगमग का होते आहे हे समजतही नाही, आपणच अती हळवे आहोत की इतर माणसे कोडगी हा सतत पडणारा प्रश्न; तब्बल ३८ वर्षांनंतर गावी जाऊन ते घर पुन्हा पाहिल्यावर उचंबळून आलेल्या भावना; हे सारे खेडेकरांनी अत्यंत जुजबी नेपथ्य असलेल्या त्या छोट्या रंगमंचावर आपल्या अभिनयसामर्थ्याच्या बळावर ज्या विलक्षण ताकदीने उभे केले आहे त्याला तोड नाही.
"मौनराग" हा लेखसंग्रह मी पूर्वी वाचला होता, व तो मला अतिशय आवडला होता. एलकुंचवारांची भाषा, त्यांची लेखनशैली ह्यांचा मी चाहता आहे. तेव्हा कार्यक्रमाला जाताना मनात धाकधुक होतीच. कुलकर्णी व खेडेकर त्यांच्या लेखनाला न्याय देऊ शकतील का? "मौनरागा"च्या माझ्या मनावरील ठशाला गालबोट तर लागणार नाही ना? उत्तम साहित्याच्या रंगमंचीय किंवा पडद्यावरील आविष्काराविषयी तो पाहण्याआधी कोणत्याही वाचकाच्या मनात असे अनेक प्रश्न उठतातच. माझी भीती साफ खोटी ठरली. खेडेकरांनी आपण काय ताकदीचे व संवेदनशील नट आहोत हे सिद्ध केलेच; पण एका जागी मांडी घालून बसलेल्या चंद्रकांत कुलकर्णींनी केवळ आवाजाच्या चढ-उतारातून, लयीतील बदलातून, शब्दफेकीतून, शब्दांबरोबरच शब्दा-शब्दातील व वाक्या-वाक्यामधील अवकाशातून एलकुंचवरांच्या मौनरागाचे व्यक्तापलीकडील अव्यक्त, मौन अंतरंग देखील प्रभावीपणे उलगडून दाखवले.
गेलो होतो काहीशा साशंक मनाने, परंतु एक विलक्षण, समृद्ध करणारा, भारावून टाकणारा कार्यक्रम पाहिल्याचे समाधान घेऊन घरी परतलो.
प्रशांत दामले आणि राहुल
प्रशांत दामले आणि राहुल देशपांडे यांनी पुनरुज्जीवित केलेले गो.ब.देवलांचे 'संगीत संशयकल्लोळ' कालच पाहिले. खरतर राहुल देशपांडेला लाइव्ह ऐकणे हा मुख्य हेतु होता तो सार्थ झालाच पण प्रशांत दामलेनेही त्याच्या खास टचने नाटकातील विनोदाला चारचाँद लावले.. फार पूर्वी दूरदर्शनवर बालगंधर्वांच्या जन्मशताब्दीला संगीत नाटकं दाखवण्याचा सपाटा लावला होता, तेव्हा कंटाळवाणे वाटले होते (अर्थात वयानुरूप कमी समज असल्यानेही असेल तेव्हा.. ). पण या संचाने खूपच रंगतदार प्रयोग केला..
काल अलुअर्जुनचा सरैनोडु पाहिला
धमाल नृत्ये, तडाखेबंद अॅक्शन च्या जिवावर अलु अर्जुनने अक्षरशः चित्रपट तोलला आहे. कथा विशेष नाही पण पर्फॉर्मन्स जबरा. मोठ्यापडद्यावर डोळ्याचे पारणे फिटले. सब्टायटल्स सोबत असल्यामुळे ओळ अन ओळ कळत होती. हॄतीक वगैरे बच्चे पण नाहीत याच्या समोर. मज्या आली. मंध्यंतरापुर्वीचा अॅक्शन सिन जबरा.
Interview of Camille Paglia.
Interview of Camille Paglia. Camille Paglia ह्या लेखिका आहेत. अनेक विषयांवर त्यांनी लिहिलेले आहे असे मी ऐकून आहे. कला, सांस्कृतिकता, राजकारण, स्त्रीवाद वगैरे. प्रखर स्त्रीवादी अशी काहीशी ओळख आहे त्यांची.
३ पर्याय आहेत -
१) वरील लिंक वर मुलाखत वाचू शकता
२) वरील लिंक वर मुलाखतीचा ऑडिओ (पॉड्कास्ट) ऐकू शकता
३) खाली व्हिडिओ पाहू शकता
.
.
.
.
पूर्ण मुलाखत ऐका-वाचायचा
पूर्ण मुलाखत ऐका-वाचायचा कंटाळा आला आहे कारण विषय पॉप कल्चर, सिनेमा वगैरे फार आवडीचा नाही. पण पहील्या ३१/२ मिनीटातच चमक्दार वाक्ये सापडली-
I think a true intellectual should be always beyond partisanship and always critiquing the premises of your own friends and allies.
beauty is an incredibly important human principle
तपशीलात दडलेली गाढवे
>> गब्बर ला गाढव असे संबोधून गाढवांची बदनामी केल्याबद्दल चिंजं चे खाते निस्सारित का काय ते करण्यात यावे अशी व्यवस्थापनास विनंती.
चूक. 'हे चित्र प्रसृत करून गब्बरच गब्बरला गाढव म्हणू पाहतोय' असं मी म्हटलंय. त्याउलट, 'मला गाढवं सुंदर वाटतात' असंही मी म्हटलंय ;-)
टायगर चा बागी बघितला.
एकदम तगडी अॅक्शन. द-रेड, एंटर द न्यु ड्रेगॉन शी समानता दाखवणारी अॅक्शन असली तरीही एकदम अप्रतिम...! आणी छम छम छम गाण्यातल्या स्टेप्स सुधा मस्त. खुप दिवसांनी एखादा मार्शल आर्ट चित्रपट बघताना मजा आली. मारधाडपट आवडणार्यांनी चुकवु नये असा चित्रपट. तोडलस/ जिंकलंस मित्रा टायगर. हिरोपंती बघितल्यानंतर टायगर बायकी हिरो वगैरे वगैरे भासला होता ती इमेज त्याने संपुर्ण पुसुन टाकली.
आम्हीपण पाहिला. श्टोरीत काय
आम्हीपण पाहिला. श्टोरीत काय नवीन नाही (बडे बाप की बेटी + गरीब बेटा). जरासा बॉलिवुडी मसालाही आहे, तो आवडला नाही, पण टिपिकल हिंदी सिनेमापेक्षा बराच अधिक वास्तववादी वाटल्याने एकंदर पिच्चर आवडला. ते समीक्षक लोक चित्रभाषा चित्रभाषा म्हणतात ती छान वापरली आहे. काही ठिकाणी सत्यजित रायांची नक्कल केल्यासारखी वाटली, उदा. रेल्वेचे दृश्य, शेतातले (उसाचे?) तुरे. बोलीभाषेचा सहज वापर आवडला (आव न आणता/ अतिशयोक्ती न करता/ विडंबन न करता). कथेचा शेवट आणि शेवटचं दृश्य फार फार अंगावर आलं, फँड्रीसारखंच. काही ठिकाणी नेहमीची गोड लव्ह स्टोरी वाटत असणार्या या पिक्चरला शेवटामुळे खोल अर्थ/परिमाण मिळतं असं मनात आलं. खूप बारीक सारीक गोष्टी दाखवल्या आहेत, त्या अगदी चपखल वाटल्या, उदा. स्कूटरवर मुलाचं नाव लिहिलेलं असणं.
सैराटची एक समीक्षा
सैराट बघितलेला नाही. त्याबद्दल एक लेख वाचनात आला.
“Sairat”… An epic reimagining of the typical love story touches (and crushes) the heart
सैराटबद्दल नागराज मंजुळे - अशी साकारली ‘सैराट’मधील स्ट्राँग आर्ची
सैराट बघितलेला नाही (फँड्री सुध्दा).
बघायची इछ्चा नाही, कारण ग्रामीण पार्श्वभुमीचे चित्रपट आवडत नाहीत. पण दबावाला बळी पडुन कदाचीत हा बघेनही. स्ट्राँग आर्ची लेख मात्र आवडला, (मुळातच) निर्मळ व्रुत्तीच्या असणार्या पुरुषांना अॅब्युज करण्यात स्त्रिअभिव्यक्तीच्या करमणूकप्रधान टाळ्या घेणार्या कंगणा रणॉट स्टाइल अविष्कारापेक्षा हे ३.१४ पट चांगले आहे.
काल सैराट पहावा लागला
मी नेहमीच रडत असतो की मराठी चित्रपटाना कलात्मकतेचे फार येड. हां चित्रपट त्याचे मूर्तिमंत उदाहरण. चित्रपट पुरस्कार मिळवणार सर्व लोक वाहवा करणार आम प्रेक्षक चित्रपट दुर्लक्षीत करणार हे सर्व असेच चालत राहणार म्हणून मी अजुन रडणार...
परंतु एखादी मसाला प्रेमकथा निवडावी अन ते सर्व प्रसंग मात्र समांतर सिनेमाच्या पध्दतीने चित्रीत करावेत म्हणजे कलात्मकता कुरवाळणारे पब्लिक खुश. अख्खा चित्रपट कलात्मक काढायचा अन वर एकदम व्यावसायिक गाण्याची फोडणी द्यायची म्हणजे आम जनता खुश... मराठी चित्रपटासाठी यशाचा हां नवा फोर्म्युला सैराट सेट करणार.
मला चित्रपट आवडला. न्हवे आर्ची आवडली. शी इज डिफिकल्ट, कुल. तिचे डोळे अतिशय बोलके. ती सोडली तर इतर कोणालाही चार पेक्षा जास्त शब्द असलेली संवादवाक्ये वाट्याला नाहित. आणि झींगाट गाणे तर जबराट. गाणे थेटर डोक्यावर घेते. चित्रपटगृहात हे गाणे दोनदा लावत होते( प्रताप सांगली) परंतु याआठवाड्यापासून ते बंद केले आहे आणि ती सुचना लेखी स्वरूपात तिकिट काढताना व्यवस्थित दिसेल आशा मोठ्या अक्षरात फ्लेक्स करून लावली आहे.गाणे सुरु होण्यापूर्वी थेटरमधे लाईट लागतात आणि सर्व लोक आपल्या खुर्चीसमोर अथवा मोकळ्या जागेत उभे राहतात क्षणात लाईट बंद होतात अन पडद्यावर गाण्याला सुरुवात होते अन अचानक थेट्रात विशेष डिस्कोलाईटची योजना कार्यन्वित केलि जाते त्यानंतर जो एकच जल्लोष सुरु होतो थेटर डोक्यावर घेतले जाते लोक बेभानपणे नाचत आहे अन या गदारोळात डिस्कोलाईटमुळे पडद्यावर एक सेकंदही गाणे बघता येत नाहित याचे वैषम्य फारउशीरा लक्षात येते
प्रत्येक धर्म स्त्रियांचे दमन
प्रत्येक धर्म स्त्रियांचे दमन करतो. फक्त दहशतवादाचा धर्माशी काहीही संबंध नसतो. धर्म ही अफूची गोळी असते. फक्त दहशतवाद्यांना ती अफू चढली, आणि त्यांनी निष्पापांना मारले की ती अफू नसते. कारण धर्माचा व दहशतवादाचा काहीही संबंध नसतो.
एक विशिष्ट शांतीप्रिय धर्म सोडून बाकी सगळे धर्म अगदी दुष्ष्ष्ट वैट्ट वगैरे आहेत. त्यात हिंदू धर्म तर फारच वैट्ट.
मि. सेल्फरिज
ही ब्रिटिश सिरीयल, अमेरिकेत अॅमेझॉन प्राइम वर आहे. एकाच एपिसोड मधे टोटली हुक्ड! जबरदस्त नाट्य आहे. जेरेमी पिवेन (Entourage मधला आरी गोल्ड. किंवा कार्स मधे सुरूवातीला मॅक्वीन ट्रक मधून चाललेला असताना त्याच्याशी बोलणारा हायपर एजंट - त्याचा आवाज अनेकांच्या लक्षात असेल) लीड रोल मधे आहे. बरोबर अनेक ब्रिटिश लोक. विसाव्या शतकाच्या सुरूवातीला लंडन मधे डिपार्टमेण्टल स्टोअर चालू करतो तो (तो स्वतः अमेरिकन असतो). अतिशय चार्मिंग दिसणारे (त्यातली अॅग्नेस टाउलर कोणालाही आवडेल अशी आहे), ब्रिटिश मॅनर्स सतत दाखवत वावरणारे लोक, १९१० च्या आसपासचे लंडन हे सगळे खिळवून ठेवते. त्याचबरोबर कथेतील ड्रामाही चांगला आहे. लोक "कन्व्हेन्शनली" प्रसंगानुसार, सवयीनुसार चांगले वा वाईट दाखवले आहेत, उगाच ओढूनताणून ग्रे शेड्स वगैरे प्रकार नाही. त्यांचा वाईटपणाही स्वाभाविक्/सहज वाटतो. संवादही मस्त आहेत. एका कंपनीचा, लोकांचा लीडर म्हणून सेल्फरिज ची इमेज जबरदस्त दाखवली आहे. जेरेमी पिवेन आरी म्हणूनही आवडला होता, इथेही प्रचंड प्रभावी रोल आहे.
http://www.cinemasofindia.com
http://www.cinemasofindia.com/
हे फिल्म्स डिव्हिजनचे संस्थळ पाहाण्यात आले. फिल्म्स डिव्हिजनचे बहुतेक सर्व नवे-जुने चित्रपट येथे चकटफु पाहायला मिळतील. नाममात्र पैसे देऊन डाऊनलोडही करता येतील. (फिल्म्स डिव्हिजन म्हणजेच एन.एफ.डी.सी. ना?)
लेमन ट्री
लेमन ट्री (२००८) दिग्दर्शक :इरान रिकलीस
इझरायली सीमेलगतच्या पॅलेस्टिनी गावात रहाणारी विधवा सलमा, आपल्या पूर्वजांनी लावलेल्या लिंबाच्या बागेची प्रेमाने काळजी घेत, तुटपुंज्या उत्पन्नावर समाधानात एकटीच रहात असते. रसरशीत लिंबाने लगडलेल्या बागेतून लिंब तोडून त्याच लोणचं, सरबत करते.निगुतीने केलेलं चवदार सरबत तिने आलेल्या पाहुण्याला दिलं की तो तृप्त होऊन त्याची तारीफ केल्याशिवाय रहात नाही.त्या देखण्या ,कणखर स्त्रीच्या हातून सरबत प्यायला मिळावे असा क्षणिक मोह आपल्यालाही पडू लागतो . अकस्मात सीमेपलीकडे एक नवनियुक्त,इझरायली संरक्षण मंत्री रहायला येतो आणि या शांततेचा अंत होतो. सुरक्षेच्या कारणास्तव सत्ता थंडपणे आपली दहशत जमवू लागते. लिंबाच्या झाडांना कुंपण लागतं आणि मधोमध वॉच टाॅवरची स्थापना होते.सलमाला तिच्या बगिच्यात जायची परवानगी नसते.ती कुंपणावर चढून हट्टाने जाते तेंव्हा सतर्क गार्ड तिला बाहेर काढतात आणि अशाने तिला चुकून (?) गोळी लागून हकनाक मृत्यू येईल की काय अशी भीती वाटते .
ती वकिलाकडे जाते आणि झाडे तोडण्याच्या नोटीसला कोर्टात आव्हान देते. या कणखर आणि अबोल स्त्रीचा इझरायली सत्तेशी संघर्ष सुरु होतो. मंत्र्याची पत्नी मीरा ,झाडे तोडण्याची कारवाई कठोर आणि अनावश्यक आहे असे म्हणते. मीराला तिच्याविषयी सहानुभूती वाटते.सत्तेपुढे शहाणपण चालत नाही याचा प्रत्यय येतो. सलमाला तिची मुलं आणि काही गावकरी केस मागे घेण्याचा सल्ला देतात पण तिचा निश्चय ठाम असतो.तरुण वकील तिला साथ देतो आणि त्यांच्यात अनोखा बंध निर्माण होतो. तिचं सुसंस्कृत, मर्यादशील वावरणं अतिशय मोहक आहे.
दोन देशांना विभागणार्या प्रचंड भिंतीचे बांधकाम,सिनेमात प्रत्यक्ष हिंसा नसतानाही दहशत निर्माण करतं.सलमाच्या भूमिकेत 'हिअम अब्बास' हिने अद्वितीय काम केलं आहे. कमीत कमी संवाद असूनही विलक्षण बोलका चेहेरा आणि देहबोलीने ती मंत्रमुग्ध करते.सत्यकथेवर आधारित हा सिनेमा अविस्मरणीय आहे.
आभार.
कल्पनाच्या रेकमेंडेशनमुळे हा चित्रपट बघितला.
ह्या चित्रपटाबद्दल नक्की काय लिहावं असाही प्रश्न पडला होता. त्यात काय आणि किती आवडलं आहे ह्याची यादी द्यायची तर आख्खा चित्रपटच लिहून काढावा लागेल.
सलमा अरब, कमी शिकलेली, रीतभात पाळून परपुरुषांसमोर डोकं झाकणारी, गरीब पण परिस्थिती कितीही वाईट असली तरीही स्वाभिमानी आणि पाठीचा कणा कायम ताठ असणारी. मिरा ज्यू, सुशिक्षित, इस्रायली संरक्षण मंत्र्याची बायको, तंग जीन्स-शर्ट घालणारी, सुस्थित आणि तरीही स्वतःच्या भावनाही नीट व्यक्त करू न शकणारी. असे फरक असले तरीही दोघींची आयुष्यं शेवटी उजाड होणार का काय, अशी भीती सतत लागून राहते. पण चित्रपट तसा नकारार्थी नाही. सलमाच्या छाटलेल्या लिंबांना पालवी फुटते, मिरा आपल्या नवऱ्याला सोडून स्वतःचं आयुष्य शोधायला घराबाहेर पडते.
कल्पना म्हणते ते अगदी पटलं, दोन देशांना विभागणाऱ्या प्रचंड भिंतीचे बांधकाम, सिनेमात प्रत्यक्ष हिंसा नसतानाही दहशत निर्माण करतं. संवेदनशील माणसाला ही हिंसा अंगावर येईल अशी आहे. मिराचा नवरा, संरक्षणमंत्री, हा संपूर्ण चित्रपटभर जबाबदारी टाळणारा, बालिश वागणारा, पाचपोच कमीच असलेला इसम; त्यानेच ती भिंत बांधण्यासाठी पुढाकार घेतलेला असतो. पण भिंत तयार होते तेव्हा ती त्याच्याही अंगावर येते.
---
हा चित्रपट बघून अतिशय सुन्न झाले होते. आणि दीड तासांत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी हिलरी आणि ट्रंपचा पहिला वादविवाद सुरू झाला. तो संपूर्ण बघितला. मला बरेचदा हसू आवरत नव्हतं; सोबत कोणी टवाळ लोक असते तर कॉमेंट्स करून दंगा केला असता. मग वाटलं, ट्रंप निवडून आला किंवा न आला, त्याच्या रेसिस्ट, सेक्सिस्ट, मुस्लिमविरोधी, हिस्पॅनिकद्वेष्ट्या भूमिकेला केवढा पाठिंबा मिळत आहे! हे सगळं दिसतंय, ट्रंप चारचौघांत बिनदिक्कत थापा मारतो, खोटं बोलतो आणि तरीही मोठ्या प्रमाणावर लोकांना तो राष्ट्राध्यक्षपदी हवा आहे. तो जिंकेल का नाही, ह्या प्रश्नाला फार महत्त्व नाहीच. त्याची बुद्धीद्वेष्टी, माणूसघाणी भूमिका कधीच जिंकायला लागली आहे.
ह्या अशा काळात आपण राहतोय आणि त्यामुळे फार कोणी खचून गेले आहेत असं दिसत नाही. 'लेमन ट्री'मधल्या सलमाला, इस्रायली संरक्षणमंत्र्याविरोधात कज्जे करण्याचं, समोर बंदूकधारी शिपाई असतानाही स्वतःच्याच लिंबाच्या बागेत चोरून जाऊन पाणी घालण्याचं धैर्य कुठून येतं; हा प्रश्न थोडासा सुटला.
ट्रेसपास अगेन्स्ट अस
मायकल फास्बेंडर आणि ब्रेंडन ग्लीसन यांच्या भूमिका असलेला 'ट्रेसपास अगेन्स्ट अस' हा सिनेमा अलिकडे एका फिल्म फेस्टिवलमधे पाहिला. वास्तविक या सिनेमाला बर्याच समीक्षकांनी झोडपलंय आणि त्यांच्यावर विश्वास टाकला असता तर मी सिनेमा पहायला गेलेच नसते. पण गेले ते बरं झालं कारण मला सिनेमा आवडला मे बी धिस इज जस्ट माय आयरिश प्रिज्युडिस! , मायकल फास्बेंडरच्या मी प्रेमात आहे आणि ब्रेंडन ग्लीसनला कोणतीही भिकार भूमिका दिली तरी तो त्याचं सोनं करतो असा अनुभव आहे म्हणून गेले. काही थरारक चेसेस, गुन्हेगारी विश्वातल्या सदस्यांचे परस्परसंबंंध दाखविणारी किंचित विनोदी पटकथा, उत्तम अभिनय अशा बर्याच जमेच्या बाजू या सिनेमात दिसतात. समीक्षकांचा मुख्य आक्षेप आहेत की ही पात्रे फार ढोबळ रंगात रंगविली आहेत आणि ती पुरेशी इंटरेस्टिंग नाहीत, हा आक्षेप मला फारसा पटलेला नाही. त्याचं मुख्य कारण असं की ज्या ट्राव्हलर कम्युनिटीजच्या गुन्हेगारी विश्वाबद्दल हा सिनेमा आहे त्याच्या मानसिकतेबद्दल, त्या समाजाच्या विशिष्ट जीवनपद्धतींबद्दल, नातेसंबंधांबद्दल दिग्दर्शकाला पुरेशी जाण आहे असं मला सिनेमा पहाताना जाणवलं आणि त्यातल्या काही छोट्या छोट्या प्रसंगांमधून, विनोदांमधून ही पात्रे आपल्या तॄटींंसह पण बर्याच दिलखेचक रंगात मला भेटली. अर्थात हा निव्वळ कलात्मक दॄष्टीकोनातून जोखायचा झाला तर बराच ढोबळ आहे हे खरंच आहे पण निरस मात्र नक्कीच नाही. फास्बेंडर किंवा ग्लीसन फॅन असाल आणि गुन्हेगारी विश्वावर आधारित सिनेमे पहायला आवडत असतील तर सिनेमा अवश्य पहावा असा आहे.
अलीकडे काय पाहिलंत? - २३
सध्या न्यु जर्सीत मुक्काम असल्याने, २६ तारखेला झालेली, अमेरिकन प्रेसिडेंट च्या निवडणूकी संदर्भातील, दोघा उमेदवारांची 'जुगलबंदी' टीव्ही वर बघता आली. त्यामानाने हिलरी क्लिंटन यांची उत्तरे देण्याची तयारी खूपच चांगली होती, त्यामानाने डोनाल्ड ट्रंप, फारच कच्चा वाटला. स्थानिक व्रुत्तपत्रातुन सुद्धा, डोनाल्ड ट्रंप ची तयारी कशी भरकटलेली होती याचे रकाने च्या रकाने भरून माहीती येत आहे. त्यावर नवीन धागा टाकण्याचा विचार आहे.
जरूर
हिलरी ही शिक्षणाने वकील आहे आणि त्यातही बिलबरोबर अनेक वर्षे राहून आणि स्वतः न्यूयॉर्क राज्याची सिनेटर म्हणून तिला डिबेटिंगचा बराच अनुभव आहे...
त्याउलट डॉनल्ड ट्रंप हा आजवरचं आयुष्य बिझिनेसमन म्हणून जगला आहे, ह्या इलेक्शनचा अनुभव हा त्याचा पहिलाच डिबेटिंगचा (प्रायमरीज धरून) अनुभव...
ह्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत.
त्यावर नवीन धागा टाकण्याचा विचार आहे.
जरूर टाका, धमाल येईल....
:)
नाव घेण्याची भिती
नाव घेण्याची भिती वाटते.
व्यनि करा, आम्हाला जर पटलं तर आम्ही घेऊ की ते नांव!
आम्हाला भीती वाटत नाही
कारण ९२वी एअरबॉर्न प्रोटेक्ट्स मी!!!
:)
अवांतरः गेल्या वर्षी आमच्या नंदनच्या कृपेने मिरामार सान डियागोला अमेरिकन एअर फोर्सचा पॉवर शो पाहिला. आयच्यान सांगतो, ते सामर्थ्य पाहून मनोमन थरारून गेलो. तेंव्हापासून कोणी फुटकळ अन्य देशीयांनी अमेरिकेला आव्हान द्यायची भाषा केली की राग यायच्याऐवजी हसूच येतं.
:)
त्यांनी अर्थशास्त्राची
त्या पेरलेल्या वाक्यांचे झाड करुन त्याची फळे जर इथे खायला दिली असतीस तर बरे झाले असते गब्बु.
माझ्या सारख्या लोकांना ऑफिसातुन यु ट्युब वगैरे बघणे शक्य नसते, अश्या दीनदलित लोकांना उपयोग होइल.