गन कंट्रोल अर्थात बंदूक नियंत्रण लॉबी आता भारतातही
दुसर्या एका धाग्यावर बंदुकीच्या परवाना धारकांची कैफियत आपण वाचली. भारतात बंदुक वापरणं खूप अवघड आहे हे आपल्याला माहिती आहेच. त्यात हे असले परवाने घ्यायला लागल्यामुळे वापर अजुनच अवघड होतो. टीव्ही किंवा अगदी प्रार्थमिक बातम्या, सिनेमे पाहिले तरी आपल्याला हे समजेल की अमेरिकेत बंदुकीचा वापर सढळ होतो. बंदुकीच्या वापरावर नियंत्रण आणू नये असं तिथे साक्षात संविधान सांगतं. आपल्या कॉन्स्टिट्युअंट असेंब्लीला हे का नाही सुचलं असा प्रश्न साहाजिक आहे. आता ओबामासारखे बंदुक नियंत्रक बंदुकीच्या वापरावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत असतात. पण त्यांचे दिवस आता भरत आले आहेत. आपल्याकडे आता 'मिनिमम गव्हर्नन्स' या घोषणेखाली आलेलं नवं सरकार हे बंदुक नियंत्रण शिथील करेल अशी आशा आहे.
तर, जेव्हा ते शिथील होइल तेव्हा, भारतातही बंदुक भरपूर वापरली जाइल. तो वापर नीट व्हावा यासाठी काही गाइडलाइन्स आम्ही तयार करत आहोत. वेगळी गन कंत्रोल लॉबी आपल्याकडे तयार होऊ नये यासाठी आपणच ती आधी तयार करू.
या लॉबीने काही बंदुकवापराची काही तत्वे तयार केली आहेत.या यादीत भर टाकल्यास आम्ही ते नक्की विचारात घेऊ.
१. बंदूक रेग्य्लरली स्वच्छ करावी. अस्वच्छ बंदूक खराब होऊ शकते.
२. बंदूक वापरायची असेल तेव्हाच बाहेर काढावी.
३. फॉरिन बनावटीच्या (विशेषतः अफ्रिकन) बंदुकांशी तूलना करू नये. बंदुकीने तिचे कर्तव्य नीट बजावल्याशी मतलब.
४. शिकार न जमल्यास बंदुकीला दोष देऊ नये. शिकार येईना बंदुक वाकडी अशी म्हण तयार होईल नाहीतर.
५. बंदूक चाल्वण्याची शॅडो प्रॅक्टीस फार करू नये. नाहितर ऐन शिकारीला बंदुक बंद पडेल.
६. सिगारेटच्या धुरानं शिकार लवकर येते असं काही विद्वान सांगतील. पण त्याचा फार वापर करू नका. फार धुरानं बंदूक चालेनाशी होते.
७. दोन बंदुकधारी एकमेकांची शिकार करतायत असं कधी कधी दिसू शकतं. त्यात अचंब्यासारखं काही नाही.
मला काही प्रश्न आहेत. त्या
मला काही प्रश्न आहेत. त्या दुसऱ्या लेखावर विचारले होते, पण उत्तरं मिळाली नाहीत म्हणून इथे विचारतो.
एक म्हणजे आपल्याकडची पिस्तूल दाखवून मुलींना इंप्रेस करता येतं का? मी गॅंग्ज ऑफ वासेपूर नावाच्या सिनेमात एक गाणं ऐकलं होतं. त्यात तसे उल्लेख होते म्हणून विचारतो आहे.
दुसरा म्हणजे संभाजी महाराजांच्या तलवारीचं वजन चाळीस किलो की साठ किलो होतं म्हणतात, तसं विशेष वजनदार पिस्तुलं बाळगणारांचा इतिहासात काही उल्लेख आहे का?
तिसरा म्हणजे पिस्तुल बाळगण्याने ते बाळगणारावर काही हल्ले वगैरे होतात का? तसं होत असेल तर कारणीभूत असलेलं हे कारण नाकारण्याचा अट्टाहास होतो का?
- प्रत्येकाची बंदूक वापरायची
- प्रत्येकाची बंदूक वापरायची वेळ व पद्धत वेगळी असते. त्यामुळे इतरांच्या पद्धती दिसल्याच तरी त्याचा अवलंब आपल्याला तसाच करता येईल या भ्रमात राहून दु:ख करू नये
- बंदुंकींचा नियमित वापर करणेही आवश्यक आहे. अगदीच शिकार मिळाली नाही तर मात्र अंधारात (किंवा तो ही मिळाला नाही तर उजेडातही) शॅडो प्रॅक्टिस करायला कचरू नये.
- काही प्राणी शिकारीसाठी नसतात हे लक्षात ठेवावे. दिसला प्राणी की उचलली बंदूक असे करू नये.
- वापर करत नसताना बंदूक व्यवस्थित बंद करून ठेवावी. काही वेळा उत्तम शिकार नजरेस पडली तरी शिकारीचीही एक वेळ आणि माहौल असतो ते लक्षात ठेवावे.
- उघड्यावर शिकार करणे बहुतांश देशांत गुन्हा आहे हे लक्षात ठेवावे.
काहीही हं मे!बंदूक नसली तर
काहीही हं मे!
बंदूक नसली तर सावजाला चुचकारता येईल, गंडवता येईल, त्याला अगदी वश करून घेता येईल. हाताचा वापर करून शिकारीचा प्रयत्न करता येईलही पण बंदूक नसली तर जे काही होईल त्याला शिकार म्हणता येणार नाही.
अर्थात दोन सावजांनी एकमेकांची केलेली शिकार यातून वगळावी लागेल, मात्र त्यांच्या शिकारीची प्द्धतच वेगळी असल्याने सामान्य पद्धतीबरोबर त्याची तुलना करता येणार नाही.
मात्र त्यांच्या शिकारीची
मात्र त्यांच्या शिकारीची प्द्धतच वेगळी असल्याने सामान्य पद्धतीबरोबर त्याची तुलना
ऋ, असं नाही हा बोलायचं. सगळ्या पद्धती सामान्यच असतात. ही सामान्य, ती अतीसामान्य, ती असामान्य असं डिस्क्रिमिनेशन चुकीचं आहे हे काय माहित नाही होय तुला?! शिकार्याला आणि सावजाला रोलची अदलाबदल करत शिकार शिकार खेळायचं असेल तर खेळू द्यावं. तसा तू पुरोगामी आहेस. फक्त तो 'सामान्य' शब्द.. हं! ;)
परंपरा आणि उज्वल इतिहास
'प्राचीन भारतातल्या शिकारी परंपरा' हा प.पु.वा.वा. बापट यांचा ग्रंथ वाचा आणि मग बोला. आपल्या प्राचीन इतिहासात बंदूका होत्या (आणि बाणही होते...अधिक प्रभावी!), शिकार होती, शिकारी होते, सावजं होती आणि शिकारीच्या असंख्य सोप्या आणि अवघड तंत्रांचा सखोल अभ्यासही होता. अर्थात परकीयांचे अनुकरण करून आपल्या इतिहासाचं आणि परंपरांच महत्व विसरायचं हे नेहमीचंच आहे म्हणा.
गोळी झाडल्यावर बंदुकीतून धूर
गोळी झाडल्यावर बंदुकीतून धूर निघत राहातो, त्याला स्मोकिंग गन असं म्हणतात. अशा धुराचे कण कपड्यांना चिकटून राहिले तर ते शिकाऱ्याविरुद्ध पुरावे म्हणून वापरले जाऊ शकतात. एका माजी अमेरिकन प्रेसिडेंटला अनुभव आहे याचा.
काही सावजं मेली एक गोळी झाडून मरत नाहीत...
परवान्याविना शिकार हा गुन्हा.
परवान्याविना शिकार हा गुन्हा.
आता म्हणाल की शमा-परवान्यातला परवाना का? नाही. दारू पिण्याचा जसा विशिष्ट परवाना लागतो तसा शिकार करण्यासाठीही विशिष्ट परवाना काढणं समाजमान्य आहे. नाहीतर गेल्या वर्षी त्या कोणत्याश्या सिंहाची शिकार करणारा तो इसम कोण ... बराच बदनाम नव्हता का झाला!
ओबामांना बंदुकींच्या वापरावर
ओबामांना बंदुकींच्या वापरावर नियंत्रण हवेय तर हिलरींना सगळ्यांच्या बंदूका काढून घ्यायचायत असा घणाणाती आरोप करत "मेरी बंदूक मै नही दुंगा!" अशी गर्जना ट्र्म्प साहेबांनी केलीये म्हणे
जवळजवळ प्रत्येक वेळेलाच
जवळजवळ प्रत्येक वेळेलाच बंदुकधारी शिकार्याला आपण शिकारी आहोत असे वाटत असते. खरे तर ते उलटे असते, खरे शिकारी सावजांची रुपे घेतात आणि स्वताला शिकारी समजणार्या बंदुकवाल्याला सावज बनवतात.
पण ह्या सावजांचे रुप घेतलेल्या खर्या शिकार्यांचा मनाचा मोठेपणा हा की ते बंदुकधारी सावजाला आपण शिकारी असल्याचा खोटा का होईना पण आनंद मिळवून देतात.
बंदूक रेग्य्लरली स्वच्छ करावी ?
बंदूक रेग्य्लरली स्वच्छ करावी ?
म्हणजे ती कशी काय ? ती स्वतःच साफ करुन घ्यायची की आणखी कोणाकडून ? शिवाय चांगल्या बंदुकीला साफ नाही केले तरी अमूक वेळेनंतर ती स्वतःच साफ होते अशा काही सेल्फ हिलींगवाल्या बंदुका देखील असतात म्हणे.
बंदूक वापरायची असेल तेव्हाच बाहेर काढावी.
हे बरोबर. पण वापरायची असेल तेव्हाच बाहेर काढायची की बाहेर काढल्यावर तिचा वापर करायचाच करावा याबद्द्ल संभ्रम आहे.
फॉरिन बनावटीच्या (विशेषतः अफ्रिकन) बंदुकांशी तूलना करू नये. बंदुकीने तिचे कर्तव्य नीट बजावल्याशी मतलब.
हे लाखमोलाचे. उगाचच न्युनगंड येतो.
शिकार न जमल्यास बंदुकीला दोष देऊ नये. शिकार येईना बंदुक वाकडी अशी म्हण तयार होईल नाहीतर.
पण शिकार न जमल्यास आजुबाजुचे लोक बंदुकीवरच शक घेतात. आता तुमच्या लेख त्यांच्या तोंडावर फेकून मारता येईल.
बंदूक चाल्वण्याची शॅडो प्रॅक्टीस फार करू नये. नाहितर ऐन शिकारीला बंदुक बंद पडेल
काहीही हं श्री ! उलट प्रॅक्टीस मेक्स बंदूक परफेक्ट हा सुविचार तुम्ही वाचला नाही वाटतं !
सिगारेटच्या धुरानं शिकार लवकर येते असं काही विद्वान सांगतील. पण त्याचा फार वापर करू नका. फार धुरानं बंदूक चालेनाशी होते.
अगदी उत्तम निरिक्षण. मागे कोणत्यातरी मासिकात एक डॉक्टर सेम टु सेम सांगत होते.
दोन बंदुकधारी एकमेकांची शिकार करतायत असं कधी कधी दिसू शकतं. त्यात अचंब्यासारखं काही नाही.
होय. होय. आणि अशा शिकारीत वावगं काही नाही असं समाजमत तयार होतय खरं !
ट्रंपला समर्पित हे पुस्तक
Assumed this was about Rubio. Instead it’s a rich tapestry of love loss and terrible intimacy-BORING AND NOT FOR ME pic.twitter.com/t90tPWEXIY
— Trump Reviews (@LitCritTrump) March 15, 2016
ओह शूट हा धागा आता कळला मला.
ओह शूट हा धागा आता कळला मला. ;)
___
मलाही एक प्रश्न आहे - बंदूकधारकांना त्यांच्या बंदूकीला काही लाडाचे नाव ठेवलेले आवडते असे काही आहे का?
जसे "हाऊ टू लुझ अ गाय इन १० डेज" मध्ये हिरॉइन नाव ठेवते - "प्रिन्सेस सोफिया" =)) आणि त्या नावाने हिरोचा एकदम विरस होतो व त्याची शिकारीची इच्छाच मरते. :D
क्र. ७ पुढे चालू एका बंदूकीने
क्र. ७ पुढे चालू
एका बंदूकीने दुहेरी शिकार किंवा दोन सावजेच ('वर्मावर बोट' ठेवून वगैरे) एकमेकांची शिकार करताना दिसली तरी अचंबित होऊ नये.
काहीवेळा सावजेच खेळण्यातल्या बंदुकींनी खेळताना दिसतील.