Skip to main content

प्रेस्टिट्यूट्स, मोदीद्वेष्टे, विचारजंती, सिक्युलर - बातम्या

अनेक लोक अनेक वेळा अनेक ठिकाणी काहीतरी निरर्थक, चक्रम, विक्षिप्त आणि मूर्खपणाची विधानं करतात. कधीकधी या 'निरर्थक, चक्रम, विक्षिप्त आणि मूर्ख'पणांपायी नसताना हातापायीही होते. कधी हे प्रकरण तिथेच न थांबता दंगे होतात, ऑफिसं तोडली जातात, हल्ले होतात, बसेस जाळल्या जातात, खूनही पडतात. आजकाल या 'निरर्थक, चक्रम, विक्षिप्त आणि मूर्ख'पणा करण्यात प्रेस्टिट्यूट्स, मोदीद्वेष्टे, विचारजंती, सिक्युलरना ऊत आलेला आहे. तर हा धागा अशांची विधानं, कृत्यं, घोषणा वगैरेंची चेष्टा किंवा निषेध यांचं एकत्रित संकलन करण्यासाठी काढलेला आहे. यात काही काळ जुन्या बातम्याही चालतील - गेल्या दोनतीन वर्षांतल्या - पण अगदीच काहीतरी अनमोल रत्न असल्याशिवाय त्यामागे जाऊ नये.

हिंदुत्ववादी, संस्कृतीरक्षक, कट्टर राष्ट्रवादी संघटनांना, आणि मोदीभक्त वगैरेंनी केलेल्या 'निरर्थक, चक्रम, विक्षिप्त आणि मूर्ख'पणाबद्दलच्या बातम्या इथे मांडू नये, त्यासाठी स्वतंत्र धागा काढलेला आहे.

सुरूवात करायला मला चटकन बातमी सुचत नाहीये, पण दोन्ही लेख एकाच वेळी प्रसिद्ध व्हावे यासाठी मी हा धागा लवकर प्रकाशित करतो आहे. इतर लोक यावर सुरूवात करून भर घालू शकतील याची खात्री आहे.

अरविंद कोल्हटकर Fri, 25/09/2015 - 22:41

प्रेस्टिट्यूट्स, सिक्युलर, विचारजंती, मोदीद्वेष्टे वगैरेंनी केलेल्या...

क्षणभर वाटले की तुम्हाला 'प्रॉस्टिट्यूट' म्हणायचे असावे पण लगेच लक्षात आले की त्यांना 'सिक्युलर, विचारजंती, मोदीद्वेष्टे' ह्यांच्याबरोबर बसवायचे काहीच कारण असू शकत नाही. त्या बिचार्‍या रोजचे पोट कसे भरेल ह्या चिंतेत असतात, त्यांचे काय हिंदुत्व, मोदीविचार इत्यादींशी नाते?

जालावर शोध घेता लक्षात आले की गोर्‍यांना जमले नाही इतक्या सफाईने आपण भारतीयांनी हा अतिशय अन्वर्थक शब्द इंग्रजांच्या भाषेला दिलेला आहे आणि तोहि अगदी अलीकडे. जनरल वी के सिंग ह्यांनी खोडसाळ आणि दिशाभूल करणार्‍या वृत्तसंस्थाना हे नाव दिले आहे. शब्द त्यांनीच निर्माण केला की आणखी कोठून तो आला आहे हे मात्र कळले नाही.

श्रीगुरूजी Fri, 25/09/2015 - 23:34

“Modiji only talks to those wearing suit and boot… Look at Modiji. Everyday he wears new clothes, he wears 15 lakh suit. Jitna wo janta se kam baat karte hain, jitna wo aap se door jaate hain, utna unke kapde ache bante hain. Unpe chamak aati hain,” he said. “When he talks about employment, you would not find youth or workers next to him… you will find bureaucrat on one side and businessmen on the other,” said Rahul.

- २० सप्टेंबर २०१५ रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावरील एका सभेत बोलताना पप्पूने असे विनोदी उद्गार काढले.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 26/09/2015 - 02:17

In reply to by श्रीगुरूजी

लिंका द्या की हो. श्रीगुरुजी असा आयडी घेऊन येता तर तुमच्या पप्पूवाणीवर असाच विश्वास ठेवायचा का?

ग्रेटथिंकर Sat, 26/09/2015 - 09:09

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

वि.आ. ,श्रीगुरुजी हा आरेसेसचा सरसंघचालक होता हे आपल्याला ठाऊक आहे काय? गोळवळकर त्याचे नाव, अत्यंत धुर्त माणुस सावरकर नंतरचा
(त्याच्या नावाने आय्डी घेतलेले काय कपाळ पुरावे देणार)

श्रीगुरूजी Sat, 26/09/2015 - 17:58

In reply to by ग्रेटथिंकर

ग्रेटथुंकर,

गोळवलकर गुरूजी काय तुमचे घरगडी होते का शाळेतले लंगोटीयार? त्यांचा एकेरी उल्लेख केला आहे म्हणून विचारतोय.

अवांतर - त्यांच्या नावाचा आणि माझ्या आयडी नामाचा काहीही संबंध नाही. असल्यास तो योगायोग समजावा.

ग्रेटथिंकर Sat, 26/09/2015 - 18:05

In reply to by श्रीगुरूजी

श्रीगुरुजी ....... अरेरे विसरलोच,,, तुम्ही ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे भक्त ना, त्यांचेच नाव घेतले असावे आपण, जय जय रघुवीर समर्थ

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 26/09/2015 - 20:50

In reply to by ग्रेटथिंकर

श्रीगुरूजी आणि ग्रेटथिंकर, दोघांनीही व्यक्तिगत पातळीवर असणारी भांडणं जाहीर व्यासपीठावर करू नयेत अशी विनंती.

'ऐसी अक्षरे'ची धोरणं, मार्गदर्शक तत्त्वे इथे सापडतील.

श्रीगुरूजी Sat, 26/09/2015 - 23:18

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सुरूवात ग्रेटथिंकर नामक व्यक्तीने खालील प्रतिसादाने केलेली आहे.

वि.आ. ,श्रीगुरुजी हा आरेसेसचा सरसंघचालक होता हे आपल्याला ठाऊक आहे काय? गोळवळकर त्याचे नाव, अत्यंत धुर्त माणुस सावरकर नंतरचा
(त्याच्या नावाने आय्डी घेतलेले काय कपाळ पुरावे देणार)

या वाक्यात गोळवलकर गुरूजींचा एकेरी उल्लेख आहे, सावरकरांचाही एकेरी उल्लेख आहे आणि माझ्यावरही व्यक्तिगत टीका आहे.

हा प्रतिसाद २६/०९/१५ या दिवशी ०९:०९ यावेळी प्रकाशित झाला. हा प्रतिसाद प्रकाशित झाल्यानंतर ८ तास उलटून गेल्यानंतर सुद्धा संपादक मंडळापैकी कोणीही आक्षेप घेतलेला नव्हता. गोळवलकर गुरूजी व सावरकर यांचा एकेरी उल्लेख संपादक मंडळाला मान्य असावा असेच यातून दिसते. अर्थात गोळवलकर गुरूजी आणि सावरकर यांची विचारसरणी वेगळी असल्याने इथे एकेरी उल्लेख चालत असावा.

मी या प्रतिसादाला उत्तर दिले ते १७:५८ या वेळी (म्हणजे मूळ प्रतिसाद प्रकाशित झाल्यावर सुमारे ९ तासांनी). तोपर्यंत त्या प्रतिसादात कोणालाही काहीही वावगे वाटले नव्हते याचे वाईट वाटते.

माझे कोणाशीही वैयक्तिक भांडण नाही. भांडण म्हणून नाही तर गोळवलकर गुरूजीचा एकेरी उल्लेख केल्याने मला प्रतिसाद लिहावा लागला.

प्रतिसाद आक्षेपार्ह असल्यास काढून टाकण्याचा अधिकार संपादक मंडळाकडे आहेच.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 27/09/2015 - 00:07

In reply to by श्रीगुरूजी

'ऐसी अक्षरे'वर देव, ब्राह्मण, शिवाजी, गोळवलकर, याकूब मेनन, मार्क झुकरबर्ग, राहुल गांधी, अशा बऱ्याच लोकांचा एकेरी उल्लेख होतो. कोणत्याही व्यक्ती/समाजाचा एकेरी उल्लेख करू नये असं 'ऐसी अक्षरे'चं मार्गदर्शक तत्त्व नाही. सदस्यांना ज्यांचा उल्लेख एकेरीत होऊ नये असं वाटत असेल तर तसं लिहिण्याचं अभिव्यक्तीस्वातंत्र्य त्यांना आहे. मात्र असं करताना अन्य सदस्यांचा किंवा व्यक्तींचा अपमानव्यंजक नामोल्लेख करणं हे व्यक्तिगत पातळीवर उतरणं आहे. ते करण्यासाठी 'ऐसी अक्षरे' हे व्यासपीठ उपलब्ध नाही.

निष्कारण उपेक्षित आणि पीडीत असण्याचा कांगावा सोडा. भांडाभांडी करण्यासाठी खरडवह्या, व्यक्तिगत निरोप, खरडफळा वगैरे जागा आहेत. तिथे या शाळकरी मारामाऱ्या सुरू ठेवल्यास तंबी मिळणार नाही.

ही सगळी चर्चा इथे अवांतर आहे. तेव्हा तीसुद्धा आवरणं योग्य.

श्रीगुरूजी Sun, 27/09/2015 - 13:13

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

'ऐसी अक्षरे'वर देव, ब्राह्मण, शिवाजी, गोळवलकर, याकूब मेनन, मार्क झुकरबर्ग, राहुल गांधी, अशा बऱ्याच लोकांचा एकेरी उल्लेख होतो. कोणत्याही व्यक्ती/समाजाचा एकेरी उल्लेख करू नये असं 'ऐसी अक्षरे'चं मार्गदर्शक तत्त्व नाही. सदस्यांना ज्यांचा उल्लेख एकेरीत होऊ नये असं वाटत असेल तर तसं लिहिण्याचं अभिव्यक्तीस्वातंत्र्य त्यांना आहे.

वा! वा! हे मार्गदर्शक तत्व वाचून आनंद जाहला. यापुढे हे नक्की लक्षात ठेवीन.


मात्र असं करताना अन्य सदस्यांचा किंवा व्यक्तींचा अपमानव्यंजक नामोल्लेख करणं हे व्यक्तिगत पातळीवर उतरणं आहे. ते करण्यासाठी 'ऐसी अक्षरे' हे व्यासपीठ उपलब्ध नाही.

हेही वाचून आनंद जाहला.


निष्कारण उपेक्षित आणि पीडीत असण्याचा कांगावा सोडा.

छॅ! मी असले फालतू आणि मानभावी कांगावे कधीच करीत नाही.


भांडाभांडी करण्यासाठी खरडवह्या, व्यक्तिगत निरोप, खरडफळा वगैरे जागा आहेत. तिथे या शाळकरी मारामाऱ्या सुरू ठेवल्यास तंबी मिळणार नाही.

ग्रेटथिंकरने पहिला प्रतिसाद याच धाग्यावर दिला आहे. त्यामुळे त्या प्रतिसादाला इथेच उत्तर देणे क्रमप्राप्त होते. जर तो पहिला प्रतिसाद खरडवही, व्यनि, खफ इ. ठिकाणी टाकला असता तर नक्कीच तिथे उत्तर दिले असते. पण पहिला प्रतिसाद या धाग्यावर पण त्याला उत्तर मात्र दुसरीकडे असे कसे चालेल? मुळात ही व्यक्तिगत भांडाभांडी नव्हतीच. एका सार्वजनिक धाग्यावर लिहिलेल्या वाक्यांना त्याच धाग्यावर दिलेले ते उत्तर होते.


ही सगळी चर्चा इथे अवांतर आहे. तेव्हा तीसुद्धा आवरणं योग्य.

बरोबर! राहुलची वाक्ये दिल्यावर गोळवलकर गुरूजी व सावरकरांचा एकेरी उल्लेख करून विनाकारण त्यांचा प्रतिसादात उल्लेख करणे योग्य नव्हते. त्यामुळे उत्तर द्यावेच लागले. वरील प्रतिसाद योग्य नसतील तर प्रतिसाद काढून टाकण्याचे अधिकार संपादक मंडळाकडे आहेतच. माझे विचार संपादक मंडळाच्या विचारांशी जुळणारे नसतील तर माझे सदस्यत्व स्थगित करणे किंवा रद्द करणे हा देखील अधिकार संपादक मंडळाकडे आहेच.

श्रीगुरूजी Sat, 26/09/2015 - 17:59

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

लिंका द्या की हो. श्रीगुरुजी असा आयडी घेऊन येता तर तुमच्या पप्पूवाणीवर असाच विश्वास ठेवायचा का?

ओह! मी कधीही पुराव्याशिवाय लिहित नाही. पप्पूची ही मुक्ताफळे अनेक माध्यमातून प्रसिद्ध झाली होती. अनेक वाहिन्यांवर दाखवित होते. त्यामुळे लिंक द्यायची गरज वाटली नाही.

आता मागत आहात म्हणून देतो लिंक.

http://indianexpress.com/article/india/politics/live-this-fight-is-for-…

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 05/10/2015 - 02:19

In reply to by श्रीगुरूजी

ओह! मी कधीही पुराव्याशिवाय लिहित नाही.

ऐसीवर कुणीही पुराव्याशिवाय बोलत नाही. मीच एकटी खोटारडी आहे, पुराव्याशिवाय बोलते.

राजेश घासकडवी Sat, 26/09/2015 - 22:35

In reply to by अनुप ढेरे

अहो पंधरा लाखांची काय बात करता? तो मोदींनी घातल्याबरोबर त्याची किंमत वाढून ४.३ कोटींना विकला गेला! चक्क ४२००% वाढ. आहात कुठे? आणि तुम्हाला पन्नास टक्के वाढीची पडलीय! खरं तर मोदींनी आपले कपडे असेच अधूनमधून विकायला काढले तर भारताचे आर्थिक प्रश्न चुटकीसरशी संपतील! नाहीतर ते गांधीजी! एक धोतर घालून राहायचे. व्हिजनच नव्हती त्यांना.

नितिन थत्ते Sat, 26/09/2015 - 23:32

In reply to by राजेश घासकडवी

गांधीजींना काय बोलायचं काम नाय हां. एक तर ते पटेल आणि मोदी यांच्याप्रमाणेच गुजरातचे सुपुत्र होते. शिवाय १९६९ पासून ते प्रातःस्मरणीय* पुरुष सुद्धा आहेत.

*भले भगतसिंगाच्या फाशीचा निर्णय ब्रिटिशांनी गांधीजींवर सोडला** असून सुद्धा त्यांनी भगतसिंगाला फाशी जाऊ दिले असेल.

**हा लेटेष्ट शोध आहे.

अनुप ढेरे Sun, 27/09/2015 - 07:58

In reply to by राजेश घासकडवी

बास का राव, गांधीजी एक लाख पाउंडाचा चरखा वापरायचे की! झालच तर मिलियन डॉलरचा चष्मा, चपला पण वापरायचे.

ए ए वाघमारे Tue, 29/09/2015 - 17:27

In reply to by राजेश घासकडवी

हा दहा लाखाचा आकडा कुठून आला याचे मला फार कुतूहल होते. या आकड्याच्या व्युत्पत्तीबद्दल रोचक माहिती इथे मिळाली. जरूर वाचा आणि हासा.

अवांतर: हे www.opindia.com वाले कोण आहेत ते माहीत नाही परंतु ते दर महिन्यात मेनस्ट्रीम मीडीयाने मारलेल्या भपार्‍यांची यादी प्रसिद्ध करतात. हे मुळातूनच वाचण्यासारखं असतं.

मराठी मेनस्ट्रीम मीडीयासाठीही असं काहीतरी करण्याची वेळ आलेली आहे.उदा.मागच्या आठवड्यात एबीपी माझावर संध्याकाळच्या बातम्यात 'अभिनेता जॅकी श्रॉफ' याचे निधन झाल्याची 'जग्गू भय्या गेला' अशी टॅगलाईन लावून हेडलाईन्समध्ये बातमी झळकली. कोणाची तरी अंतयात्राही दाखवली. मला धक्काच बसला. नंतर सविस्तर बातमी पाहावी म्हणून मी पूर्ण अर्धातास पापणी न लवता टीव्हीसमोर बसून होतो.पण बातमी आलीच नाही. नंतर हेडलाईन्समधूनही काढून टाकण्यात आली. क्रॉसचेक केले तर इतर कुठल्याच चॅनेलवर ती बातमी नव्हती. असो.

जयदीप चिपलकट्टी Sat, 26/09/2015 - 01:09

> आजकाल या 'निरर्थक, चक्रम, विक्षिप्त आणि मूर्ख'पणा करण्यात प्रेस्टिट्यूट्स, मोदीद्वेष्टे, विचारजंती, सिक्युलरना ऊत आलेला आहे.

मी या विधानाचा निषेध करतो. प्रॉस्टिट्यूटस् या (सहसा) स्त्रिया असल्यामुळे त्यांच्या व्यवसायाला समाजमान्यता मिळण्याचा आग्रह धरावा, पण प्रेस्टिट्यूटस् हे (सहसा) पुरुष असल्यामुळे त्यांचा तुम्ही हेटाळणीने उल्लेख करावा यातून तुमचा पुरुषद्वेष्टेपणा दिसून येतो.

घाटावरचे भट Sat, 26/09/2015 - 09:15

आता हातात पॉपकॉर्न घेऊन बसावे. अर्थात कोणत्या धाग्यावर अधिक प्रतिसाद येणार, हे सांगायला ज्योतिषाची (किंवा शास्त्रज्ञाचीही) गरज नाही म्हणा....

श्रीगुरूजी Sat, 26/09/2015 - 18:23

In reply to by घाटावरचे भट

+ १

तिरशिंगराव Sat, 26/09/2015 - 10:19

http://timesofindia.indiatimes.com/india/PM-Modi-signing-on-Tricolour-s…

मोदींचा हा आवडता खेळ आहे. आधी काँग्रेसवाल्यांना डिवचायचं, आणि गदारोळ सुरु झाला की आधीच तयार केलेलं उत्तर समोर करायचं!
नीट लक्ष दिलंत तर असे दिसून येईल की त्यांच्या प्रत्येक परदेशवारीत असे वाद घडवून आणले आहेत.

राजेश घासकडवी Sat, 26/09/2015 - 18:21

In reply to by तिरशिंगराव

तुम्ही चुकीच्या धाग्यावर प्रतिसाद टाकला आहे का? कारण या बातमीत फेक्युलर, खान्ग्रेसींनी केलेला थयथयाट आणि प्रेस्टिट्यूटांनी त्याला दिलेली अकारण नकारात्मक प्रसिद्धी दिसते खरी. पण तुम्ही तो मोदींचा दोष म्हणून दाखवत आहात. फेक्युलर कुठचे!

तिरशिंगराव Sun, 27/09/2015 - 10:26

In reply to by राजेश घासकडवी

हा मोदींचा दोष दाखवण्याचा प्रयत्न नाही. त्या नटखट नंदलालाच्या जशा गोड तक्रारी होतात, तशी ही तक्रार आहे. आगामी मोदीचालिसात त्याला स्थान मिळू शकेल.
नमो नमो.

साती Thu, 24/03/2016 - 21:07

In reply to by अनुप ढेरे

प्रेश्या शब्दाला लाईक करण्यात येत आहे.

यात एकदम मराठी अर्क (मराठी स्पिरीट) जाणवतोय.

वेश्या शब्दाशी साधर्म्याबरोबरच, भांडी घासणारा तो घाश्या, लेखकाला 'पेनघाश्या' , बसून आळशीपणा करणार्‍याला 'गां*घाश्या' अश्या अस्सल मराठी उपाध्या आहेत.
त्यातही हा प्रेसमध्ये /प्रेसद्वारे काम करणारा 'प्रेश्या' शब्द फिट्ट बसतोय.

चिंतातुर जंतू Sat, 26/09/2015 - 12:29

राहुल गांधी म्हणजे 'प्रेस्टिट्यूट्स, मोदीद्वेष्टे, विचारजंती, सिक्युलर' वगैरेपेक्षाही ह्या धाग्यापुरतं सांगायचं तर लो हॅन्गिन्ग फ्रूट आहे.

अस्वल Sun, 27/09/2015 - 22:12

औरंगाबादचं नाव बदलायचंच असेल तर दारा शुकोहचं नाव द्यावं - सदानंद मोरे.

दारा शिकोह हा औरंगजेबाचा मोठा भाऊ होता. पण तो धर्मनिरपेक्ष होता. त्यामुळे त्याचे नाव या शहराला देणे संयुक्तिक ठरेल

आमच्या बाजूचे काकासुद्धा धर्मनिरपेक्ष आहेत, मग सोसायटीला त्यांचं नाव देऊया?

अनुप ढेरे Fri, 02/10/2015 - 11:55

आज दारू आणायला गेलो सकाळी. दुकानं बंद. चौकशी केली तर कळालं की आज दारू विक्रीला बंदी आहे. बीफ, मांस झाल्यावर आता हे. काय चाल्लय यार हे!

अनुप ढेरे Sat, 03/10/2015 - 15:35

http://www.ndtv.com/mumbai-news/mumbai-play-called-off-after-objections…
बातमीची हेडलाइन रोचक आहे. एखाद्या झुंडीला विशिष्ट धर्म असतो. पण हा बॅन मागणारे केवळ 'रिलिजस गृप' अशा जनरिक टर्मखाली येणारे असतात.

चिमणराव Sat, 03/10/2015 - 20:16

वेळेप्रमाणे सेक्युलर वगैरे सत्ताधिशांना व्हावे लागते-
शेवटचा मोगल( नामधारी ) झफरला १८५७ च्या उठावात पुन्हा सत्ता मिळण्याची स्वप्ने पडू लागली होती.तिलंगा( =हिंदू सैनिक ) आणि मुसलमान सैनिकांत फूट पडली तर आपली संधी वाया जावू नये म्हणून इदच्या दिवशी सर्व मुसलमानांना गाय मारण्यावर बंदी आणण्याचा फतवा काढला होता. प्रत्येकाकडच्या गायींची मोजदाद अगोदर केली होती. ती फर्माने दिल्लीच्या पुरातत्व विभागात "म्युटिनी पेपर्स" विभागात

अजूनही आहेत. लालूप्रसाद यादव यांनी "बीफ खाणारे हिंदू" याबद्दल काहीतरी नवीनच वक्तव्य करून रणांगणात उडी घेतली आहे.तिकडे पप्पुसाहेबांनी सुट कोटाचा नवीन मुद्दा काढावा असं वाटतं..

अनुप ढेरे Sun, 04/10/2015 - 17:10

In reply to by गब्बर सिंग

आधार कार्ड हे रिपॅकेजिंगच मोठं उदाहरण आहे. किंवा मोदींचा मोठा यु-टर्न आहे आधार. आधी खूप झोडपलं होतं आधारला त्यांनी. राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात वगैरे म्हणून. पण आता आधार एनरोलमेंटसाठी जोरदार प्रयत्न चालू आहेत. जन-धन, नरेगा, गॅस सबसिडी जे शक्य आहे ते 'आधार'शी जोडायचा प्रयत्न चालू आहे. सुप्रीम कोर्टात रिव्यू पिटीशन वगैरे पण चालू आहे. आधार लिकिंगने २५०० कोट रुपये वाचले गेल्या वर्षात असं वाचलं. मेनली गॅस सबसीडीमुळे.

'आधार'बाबत काय बदललं याच स्पष्टीकरण नक्कीच सरकारने द्यायला हवं.

.शुचि. Tue, 06/10/2015 - 09:57

भारतीय मुस्लिमांच्या दुर्दशेकडे संयुक्त राष्ट्र संघाने लक्ष द्यावे- आझम खान
.
हाण्ण तेजायला!!! डायरेक्ट युनो!!

भँ आई मला अमक्यानी माल्लं :( .... :( ,,, तू ओलल ना त्याला.

गब्बर सिंग Tue, 06/10/2015 - 10:09

In reply to by .शुचि.

चार पाच महिन्यांपूर्वी (MQM चे) अल्ताफ हुसेन यांनी असे आवाहन केलेले होते की बलुचिस्तान व सिंध ह्यांच्या स्वातंत्र्यसंग्रामात रॉ ने (म्हंजे भारताने) मदत करावी. त्याप्रमाणे.

.शुचि. Tue, 06/10/2015 - 10:35

In reply to by गब्बर सिंग

हां सापडलं - http://www.samaa.tv/pakistan/2015/05/altaf-hussain-apologizes-for-raw-s…
.
त्याच लाइनीवरती आता आझम खानही माफी मागतील - मी सिरीअस नव्हतोच म्हणून.
गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली हाकानाका.
___
आधीच अमेरीका टपली आहे हिंदू/मुस्लिम व एकंदर काश्मीर प्रकरणात नाक खुपसायला. एशियात तळ हवाच आहे त्यांना. (बरोबर आरोप आहे ना? की आजचं माझं लक फार स्ट्रेच झालय? झोपायची वेळ झालेली दिसतेय =)).)
त्यात हे आझम अजुन आ बैल मुझे मार करताहेत.

गब्बर सिंग Tue, 06/10/2015 - 10:53

In reply to by .शुचि.

ऑ ?

अशिआत चिकार तळ आहेत त्यांचे. आख्खे पाचवे आरमार बहारिन मधे आहे. दिएगो गार्सिया आहे.

इराक व अफगाणिस्तानात काय गोट्या खेळतात काय अमेरिकन सैनिक ?? जपान मधे ओकिनावा , झालंचतर द. कोरियात पण.

(फिलिपिन्स, ऑस्ट्रेलियात पण कै कै चाललेले असते.)

तिरशिंगराव Wed, 07/10/2015 - 13:32

In reply to by राही

नक्की माहिती असेल तर आपणही युनोला तक्रार करावी.

राजेश घासकडवी Thu, 08/10/2015 - 15:38

In reply to by चिंतातुर जंतू

होना, हेच विचारजंत मोदीद्वेष्टे लोक हिंदू धर्मातले दोष दाखवतात, तेव्हा इतरांविषयी बोलत नाहीत. आणि आता मोदी कोणाविषयी बोलत नाहीत त्याबद्दल तक्रार करताहेत. काय बोलतो ते बरोबर आहे की नाही हे पाहा ना! काय बोलत नाही यातल्या चुका काढायच्या म्हणजे कहर आहे.

चिंतातुर जंतू Thu, 08/10/2015 - 17:58

In reply to by अनुप ढेरे

चला बुवा जीव भांड्यात पडला...

Mr. Modi said that games were being played for political reasons. "I want to appeal to everyone to not listen to hate speeches," Mr.Modi said.

गब्बर सिंग Fri, 09/10/2015 - 00:13

In reply to by अनुप ढेरे

“I have said it earlier also. Hindus should decide whether to fight Muslims or poverty. Muslims have to decide whether to fight Hindus or poverty....Both need to fight poverty together.... The country has to stay united,” Modi said while addressing an election rally here.

मै गरीब का दिल हूं वतन की जुबां (हेमंतदांनी मस्त गायलंय. पडद्यावर प्रेमनाथ आहे.)

गरीबीचा मस्त वापर राजकारण्यांनी व हिंदी चित्रपटसृष्टीने केलेला आहे. इट इज अ‍ॅन एक्सलंट ब्रँड. मिल्क इट. इंदिराजींंनी "गरीबी हटाओ" चा नारा दिला तो सु.....

----

घटनेवर भाष्य केले पण त्यात काही दम नाही. त्यातून कोणतीही अशी विशिष्ठ भूमिका व्यक्त होत नाही. तुम्ही इग्नोअर करा - एवढेच. (जे मला हवे त्याप्रमाणेच आहे. )

----

Mr Mukherjee, while addressing a function on Wednesday, had said, “I firmly believe that we cannot allow the core values of our civilisation to be wasted and the core values is what, over the years, the civilisation celebrated diversity, promoted and advocated tolerance, endurance and plurality.”

विविधतेचे, प्लुरलिझम चे ढोल वाजवले की झाले.

भारतात नृत्याचे किमान चार प्रकार (स्कूल्स म्हणावेसे वाटते), संगीताची दोन स्कूल्स, २० पेक्षा जास्त भाषा, ५० पेक्षा जास्त डायलेक्ट्स, किमान २० वेगवेगळी क्युसिन्स, १ कोटी पेक्षा जास्त पूजनीय देवदेवता, किमान चार-पाच प्रकारचे पेहेराव आहेत. आणखी किती विविधता हवी ??? (विश्वात कोणता असा देश आहे की जिथे इतकी विविधता आहे ? आणि इतकी विविधता असूनही व तिचे इतके गुणगान करूनही आपण अविकसित देश आहोत अशी भावना आपल्यात आहेच ना ??? )

आता लगेच विविधता ही समस्या नसून विविधतेप्रति असलेली असहिष्णुता ही समस्या आहे - असा दावा होईलच.

ए ए वाघमारे Sat, 17/10/2015 - 09:25

प्रा.राम शेवाळकर त्यांच्या महाभारतावरील व्याख्यानात म्हणत 'महाकवी जे सांगतो त्यापेक्षा ज्याबद्दल मौन बाळगतो किंवा त्रोटक सांगतो ते अधिक महत्वाचं असतं' याच चालीवर तथाकथित प्रेस्टिट्यूट्स, मोदीद्वेष्टे, विचारजंती, सिक्युलर इ.इ. मिडीया ज्या बातम्या दाबतो त्या अधिक महत्वाच्या असतात.

उदा. संजीव भट्ट केस मध्ये या व्यक्तीसोबतच मिडीया, विरोधी पक्ष ,एनजीओस यांना खोटा ठरवाणारा निकाल मा.सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्याची लिंक
http://supremecourtofindia.nic.in/FileServer/2015-10-13_1444718418.pdf

निकालपत्र मुळातून वाचण्यासारखं आहे.

मी छापील वर्तमानपत्रे वाचणे सोडून दिल्यामुळे टाइम्स, एक्स्प्रेस, हिंदुस्तान टाईम्स, द हिंदू, लोकमत वगैरे वृत्तपत्रांनी ही बातमी कुठल्या पानावर, किती कॉलमची,कुठल्या भाषेत छापली वा छापलीच नाही व एनडीटीव्ही, आयबीएन, हेडलाईन्स टुडे इ. वाहिन्यांनी किती पॅनेल चर्चा घेतल्या याची माहीती मला नाही. कृपया जाणकारांनी ती द्यावी.

मराठी वा हिंदी वृत्तवाहिन्यांवर प्राईमटाईममध्ये एकही पॅनेलचर्चा मला दिसली नाही. झी न्यूजवर झाली असेल तर मला कल्पना नाही.

धागाकर्त्यांनी

आजकाल या 'निरर्थक, चक्रम, विक्षिप्त आणि मूर्ख'पणा करण्यात प्रेस्टिट्यूट्स, मोदीद्वेष्टे, विचारजंती, सिक्युलरना ऊत आलेला आहे. तर हा धागा अशांची विधानं, कृत्यं, घोषणा वगैरेंची चेष्टा किंवा निषेध यांचं एकत्रित संकलन करण्यासाठी काढलेला आहे.

असं म्हटलं आहे.यात बातम्या दाबणे हा पण क्रायटेरिया टाकायला हवा.

संजीव भट्ट यांनी मिडीयाचा कार्ड कसे वापरले हा खूपच गंभीर निष्कर्ष मा.न्यायालयाने काढलेला आहे.
मिडीयात आलेल्या बातम्यांवरून/चर्चांवरून आपण इथे वा अन्यत्र फोरम्सवर तावातावाने भांडतो पण त्या बातम्या मुळातून खर्‍या किंवा वास्तवावादी असतात का?

मोदी किंवा भाजपा /संघ कितीही धर्मवादी, फॅसिस्ट असले तरी त्यांचा सिलेक्टीव आणि टार्गेटेड विरोध कराणार्‍या मिडियाला 'मोदीद्वेष्टे' वा 'प्रेस्टीट्यूटस' असे का म्हणू नये,असंच मिडीयाचं हे वर्तन पाहून वाटतं.

आता कुणी मोदींनी मा. न्यायालयही 'मॅनेज' केलं असं म्हणू नये म्हणजे झालं. तेवढंच एक ऐकायचं राहिलंय. (हे मोदीप्रेमाने नव्हे तर उद्वेगाने म्हणतो आहे.)

अनुप ढेरे Sat, 17/10/2015 - 09:31

In reply to by ए ए वाघमारे

पूर्ण सहमत.
३-४ वर्षापूर्वी महेश भट यांनी सुद्धा बहुधा मोर्चा काढला होता संजीव भट यांच्यावर अन्याय होतोय म्हणून. अनेक लोकांनी गळे काढले होते. आता काहीही चर्चा दिसत नाही या निकालाबद्दल.
तीच गोष्ट परवाच्या अजून एका निकालाबद्दल. काँग्रेस सरकारने प्रमोद महाजनांवर तद्दन खोटे आरोप केले आहेत असा निकाल सीबीआय न्यायालयाने दिला आहे.
The court has said the CBI’s argument was “distorted and fabricated”, and “there is no doubt that the chargesheet has been filed for extraneous reasons”.
२जी घोटा़ळ्याची जबाबदारी आधीच्या सरकारवर ढकलायला झीरो लॉस थिअरी फेम कपील सिब्बल यांनी हे करवलं अस जेटली म्हणतायत.

फर्नांडिस, संजीव भट आणि हा २जी निकाल याबद्दल अगदीच चिरकुट कव्हरेज दिसलं. इंटरनेट आणि टीव्हीवर.

सुधीर Sat, 17/10/2015 - 11:11

In reply to by ए ए वाघमारे

प्रेस्टीट्यूट म्हणून हिणवल्या गेलेल्या एक्सप्रेस ने ती बातमी पहिल्याच पानावर छापली होती.
http://epaper.indianexpress.com/613449/Indian-Express-Mumbai/14-October…
टाईम्स मध्ये सुद्धा ही बातमी होती.
http://epaperbeta.timesofindia.com/index.aspx?EID=31804&dt=20151014

मी फक्त प्रिंट मिडिया वाचतो (टाईम्स, एक्स्प्रेस, बिझनेस स्टॅ.), (आणि क्वचित वेबसाईट) पण चोवीस तास न्यूज चॅनल एक मिनीटही पाहत नाही. जागेची मर्यादा असली तरी प्रिंट मिडिया महत्वाची बातमी दाबून ठेवते असं मला वाटत नाही. प्रिंट मिडिया (एक्सप्रेस, टाईम्स) आकस ठेऊन छापते असेही मला वाटत नाही. पण संपादकाची मतं आपल्याला पटली नाहीत तर हमखास कुठला तरी शिक्का बसतोच.

तिरशिंगराव Thu, 24/03/2016 - 10:52

संघीयांना येता जाता, 'अर्धी चड्डीवाले' असे हिणवणार्‍या प्रेस्टिट्यूटस नी , ते फुल पँट घालणार, या बातमीवर रवंथ करण्यांत धन्यता मानली.

http://timesofindia.indiatimes.com/india/RSS-image-makeover-Full-pants-…

गब्बर सिंग Mon, 28/03/2016 - 20:33

In reply to by अनुप ढेरे

अशी कोणतीही एजन्सी (प्रसारमाध्यमांना रेग्युलेट करणारी) भारतात नैय्ये हे मस्त आहे. तसेच त्या सुब्रमण्यम स्वामीला सुद्धा आवरलं पायजे. तो भारतीय प्रसारमाध्यमांच्या परदेशी मालकी/संपादक असण्यावर निर्बंध आणू पाहतोय.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 29/03/2016 - 01:57

In reply to by गब्बर सिंग

अशी कोणतीही एजन्सी भारतात नाही याबद्दल आनंदच आहे. पण त्यांनी केलेली टीका रास्तच वाटते.

(अमेरिकन माध्यामांत आरडाओरडा करत नाहीत हे खरंच. पण रेसिस्ट जोकर ट्रंपबद्दल जेवढं बोलतात आणि तीन-तीन प्रायमऱ्या जिंकणाऱ्या सँडर्सबद्दल किती कमी वेळ घालवतात हे पाहता भारतीय माध्यमांनीही अमेरिकन माध्यमांचा आदर्श अजिबात धरू नये असं वाटतं.)

गब्बर सिंग Tue, 29/03/2016 - 03:35

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

(अमेरिकन माध्यामांत आरडाओरडा करत नाहीत हे खरंच. पण रेसिस्ट जोकर ट्रंपबद्दल जेवढं बोलतात आणि तीन-तीन प्रायमऱ्या जिंकणाऱ्या सँडर्सबद्दल किती कमी वेळ घालवतात हे पाहता भारतीय माध्यमांनीही अमेरिकन माध्यमांचा आदर्श अजिबात धरू नये असं वाटतं.)

सब कुछ हो रहा है तरक्की के इस जमाने मे मगर...
ये क्या गझब है के आदमी इन्सान नही होता

हा दोष माध्यमांचा नाही. हा दोष (असलाच तर) जनतेचा आहे. यावर व्यवस्थित संशोधन झालेले आहे. माध्यमं एक्झॅक्टली तेच बोलतात जे लोकांना हवं असतं. त्याच विषयावर, व तेवढंच बोलतात जे लोकांना हवं असतं.

माध्यमांना कसं समजतं की लोकांना काय हवंय ते ? उत्तर - टीआरपी. प्रेक्षकाने केलेल्या प्रत्येक कृतिला अ‍ॅनॅलिटिक्स लावले जाते. अर्थात अ‍ॅनॅलिटिक्स हा अ‍ॅडव्हान्स्ड भाग झाला. अगदी साधं "चॅनल बदलणे" - या कृतितून त्यांना समजतं की तुम्हास ते कंटेंट आवडले नाही ते. माध्यमं ही प्रामुख्याने - बहुतेकांना जे आवडतं ते कंटेंट - विकण्याच्या धंद्यामधे आहेत. बहुतेकांना फारसं न आवडणारं कंटेंट त्यांच्या इच्छेविना त्यांच्या गळी उतरवण्याच्या धंद्यामधे नाहीत. They are in the business of monetizing your attention. Eyeballs.

ऋषिकेश Tue, 29/03/2016 - 09:09

In reply to by अनुप ढेरे

कन्हैय्या प्रकरणात मिडीयाने जे काही केले (आल्टर्ड व्हिडीयो दाखवणे, लोकक्षोभ चेतवण्यासारखी भाषा वापरणे, अत्यंत बायस्ट वार्तांकन होणे) ते बघितल्यावर कितीही इच्छा असली तरी याचे खंडन करायला तितका जोश उरत नाही :(

दुसरे असे की पाकिस्तानी (छापील) मिडीयाही मी फॉलो करत असतो. त्यांचे वार्तांकन व विषयांतील विविधता भायतीय मिडीयाच्या तोडीस तोड होती. गेल्या वर्षा दोन वर्षात भारतीय मिडीयाप्रमाणे तिथेही अमेरिकी वर्तांकनपद्धतीचा (लोकांना काय हवंय ते देणे) प्रादुर्भाव जाणवतो आहे ही या पत्रकात व्यक्त केलेली चिंता वैध आहे.

गब्बर सिंग Tue, 29/03/2016 - 08:29

Jamiat Mega conference: ‘No need for certificate of nationalism… a Muslim is Indian by choice’

सर्टिफिकेट ची डिमांड कमीकमी होत चाललेली आहे हे काही बरोबर नाही.

(पुढच्या वेळे भाजपावर सेकुलर नसल्याचा व कम्युनल असल्याचा आरोप कराल तेव्हा हे लक्षात ठेवा बर्का की .... भाजपाला तुमच्या कडून "सेक्युलर आहे" अशा सर्टिफिकेशन ची आवश्यकता नाही.)

अनुप ढेरे Tue, 29/03/2016 - 09:30

In reply to by गब्बर सिंग

जाळीची टोपी घालणं (अथवा ती न घालणं म्हणजे नॉन-सेक्युलर असणं ) ही सेक्युलॅरिझमची व्याख्या करणारे लोक आठवले.

ए ए वाघमारे Tue, 29/03/2016 - 12:04

In reply to by गब्बर सिंग

मध्यंतरी दिल्लीत सूफी मुस्लिमांचं एक संमेलन झालं. त्यात मोदींनी चांगलं जवळपास तासभर भाषण केलं जे मी लाईव्ह पाहिलं(ऑफकोर्स डीडी न्यूजवर).नंतर इतर वाहिन्या पाहिल्या तर ते अनेकांनी तुकड्यातुकड्यात लाइव्ह दाखवलं,नाही असं नाही.पण फक्त माझ्या आठवणीप्रमाणे एबीपी न्यूजने 'पारंपरिक' पद्धतीची चर्चा आधीच काही मुस्लीम विद्वांनांना स्टुडिओत तयार ठेवून घेतली. बहुधा त्यांची आशा मोदी काहीतरी आक्षेपार्ह बोलतील अशी असावी पण मोदी फार चतुर आहेत हे आपण जाणतोच. मग वाहिन्यांनी मोदींच्या आगमनावेळी (स्थानिक बहुसंख्य मुस्लीम श्रोत्यांतून)'भारत माता की जय'च्या घोषणा कश्या देण्यात आल्या हेच(अपेक्षेप्रमाणे आधीच्या कंसातील मुद्दा दुर्लक्षून)थोडावेळच चघळले.

बाकी मोदी नेमके काय म्हणाले, त्यांच्या या आऊटरीचचे महत्व आणि राजकीय-सामाजिक अन्वयार्थ यावर काही फारशी अ‍ॅकेडमिक चर्चा झालेली निदान मला तरी दिसली नाही.इतर वेळी कोणा साध्वी-महंताला छोटीशी भगवी शिंक जरी आली तरी माध्यमांना फ्ल्यू होतो जो निदान तीन चार दिवस तरी उतरत नाही.स्वत: टोपी न घालताही मोदींनी इस्लामचं कसं कौतुक करता येतं,काही कानपिचक्या कशा देता येतात हे दाखवून दिलं.इतकं कौतुक की शेवटी श्रोत्यांनी त्यांना स्टॅंडींग ओवेशन दिलं.आता कुणी म्हणतील की सूफी लोक काही खरेखुरे मुस्लिम नाहीत...असू द्या चालायचंच.

ए ए वाघमारे Tue, 29/03/2016 - 16:11

In reply to by ऋषिकेश

बहुधा हेच ते भाषण असावे..माझ्याकडे विडिओ स्ट्रीम होत नाहीत.त्यामुळे कन्फर्म करता आले नाही.

UNCUT World Sufi Forum 2016 | Narendra Modi Speech FULL Video

किंवा हे वाचा: full-text-of-pm-narendra-modis-speech-at-world-sufi-forum-1288303

अनुप ढेरे Tue, 29/03/2016 - 11:03

http://indianexpress.com/article/india/india-news-india/kanhaiya-kumar-…

Asserting that there is a difference between 2002 riots and 1984 Sikh massacre Kanhaiya alleged that Gujarat violence was carried out through state machinery while the other was caused due to mob frenzy.

साधु साधु! ८४च्या हत्याकांडामध्ये मतदार याद्या वगैरेंचा अजिबात वापर केला नव्हता रे सेक्युलर पार्टीच्या नेत्यांनी. आता झाड पडल्यावर ३००० शीख लोकं मरणारच. त्याला एवढं सिरियसली का घ्यायचं? बडे बडे शेहेरोंमे ऐसी छोटी बातें होती ही रेहेती है.

“There is difference between emergency and fascism. During emergency, goons of only one party were engaged into goondaism, in this (fascism) entire state machinery is resorting to goondaism.

आणिबाणीमध्ये पोलिसांनी काहीही केलं नव्ह्तं बरका माझ्या फेलो कॉम्रेडांनो! मिसा वगैरे कशाचाही वापर केला गेला नाही. कोर्ट कचेरीचे अधिकार काढले गेले नव्हते. सरकारद्वारे केलं गेलेलं ते सक्तिचं फॅमिली प्लॅनिंग आपल्या भल्यासाठीच होतं बाळांनो. असे कसे बोल लावता माझ्या आदर्श नेत्याच्या आज्जीला?

राहुल गांधींबरोबरच्या बैठकीचा परिणाम इतका लवकर दिसेल असं वाटलं नव्हतं. राहुलजींचा चार्म आहेच तसा मुळी!

गब्बर सिंग Tue, 29/03/2016 - 11:34

In reply to by अनुप ढेरे

कन्हैय्या कुमार हे माओवाद्यांचे पोस्टरबॉय. तिकडे पश्चिम बंगाल मधे इलेक्शन्स जवळ आलीयेत ना !!!

चिंतातुर जंतू Tue, 29/03/2016 - 11:40

In reply to by अनुप ढेरे

कन्हय्या कुमार हा ओव्हररेटेड आहे. आधी रोहित वेमुला प्रकरणात आणि नंतर जेएनयूमध्ये सरकारनं बावळटपणा केला नसता तर तो कोण आहे हे देशाला समजण्याची अजिबात आवश्यकता नव्हती. एका बाजूचा मसीहा जर मोदी, तर मग दुसऱ्या बाजूसाठी मोदी म्हणजे जणू कंसमामा आणि त्याचं निर्दालन करायला आलेला कन्हैय्या ह्या दोन्ही मांडण्या बालिश आहेत. भारतीय राजकीय संभाषित काय पातळीवर आलेलं आहे ह्याचंच हे द्योतक आहे.