सध्या काय वाचताय? - भाग १७

बऱ्याचदा एखादे पुस्तक आवडते, वाचता वाचता त्याबद्दल थोडेफार सांगावेसे वाटते, पण सविस्तर समीक्षक लेख लिहायचा उत्साह किंवा वेळ नसतो. तरीही, अशा चर्चेने नवीन पुस्तकांची ओळख होते, दुसऱ्यांना ती शोधून काढावीशी वाटतात, आणि कोणी वाचून त्याबद्दल सविस्तर मत मांडल्यास नवीन चर्चेचा धागाही निघू शकतो. धागा जिवंत राहिला की प्रत्येक दोन-तीन दिवसांनी डोकावून नवीन प्रतिसाद वाचायला मजा येते. स्थळाच्या नियमांप्रमाणे चर्चेत भाग घेणाऱ्यांनी फक्त शीर्षक एवढेच न देता, पुस्तक-लेखाबद्दल एक-दोन का होईना ओळी लिहाव्यात अशी अपेक्षा आहे.
=========

.
Ruth C. White यांचे हे पुस्तक वाचून झालेले आहे. परत पारायण करणार आहे. बायपोलर बद्दल अनेक पुस्तके आहेत ज्यामध्ये "वैयक्तिक अनुभव" = OPersonal Account मांडलेले आहेत पण वरती उल्लेख केलेल्या पुस्तकात स्वतःच्या आजाराविषयी लेखिकेने अत्यंत मोघम उल्लेख केलेला आहे रोग्याच्या वागणूकीत काय बदल स्वागतार्ह आहे यावर कटाक्षाने भर दिलेला आहे. SNAP अ‍ॅप्रोच बद्दल वाचलेले होते. या पुस्तकातही तोच अ‍ॅप्रोच सांगीतलेला आहे.

SNAP = Sleep, Nutrition, Activity and People

Sleep - आजार बरा होण्याच्या प्रोसेस मधील अत्यंत महत्त्वाचा पैलू आहे. पुरेशी झोप झाली नाही तर अन्य लोकांना जितका मूड-स्विंग्सचा त्रास होतो त्यापेक्षा अनेक पटींनी बायपोलरच्या रुग्णास होतो. शिवाय बरे होण्याच्या आधी स्लीप डिसॉर्डर्स व बायपोलर हे हातात हात घालूनच नांदताना दिसतात. शरीरातील circadian सिस्टीम (घड्याळ), निद्रा कंट्रोल करते. ही सिस्टिम बायपोलरच्या रुग्णांमध्ये फॉल्टी असते. प्रकाश-अंधार यांच्या तालावरती हे घड्याळ चालते. तेव्हा वेळेवर (नो मॅटर व्हॉट) झोपणे व ऊठणेसुद्धा हे या रुग्णांकरता अत्यावश्यक असते.

Nutrition - सकस व योग्य आहार हा शरीराइतकाच मेंदूकरता आवश्यक आहे. भरपूर प्रतिकारशक्ती, अन्नातील सुयोग्य घटकांनीच वाढू शकते. तेव्हा Recommended आहार हा बायपोलरच्या रुग्णांकरता आवश्यक असतो.

Activity - ठरावीक वेळी व्यायाम हा प्रचंड महत्वाचा घटक म्हणता येइल. चालण्याच्या व्यायामात प्रत्येक टाकलेले पाऊल हे रुग्णास अधिक चांगल्या दर्जाचे आयुष्य देण्यास उपकारक ठरते.

People - रुग्णाला सपोर्ट देणार्‍या सकारात्मक लोकांची अतिशय गरज असते. शिवाय मूड्स्विंग्स चा जोवर अवेअरनेस रुग्णास येत नाही तोवर कोणीतरी मॉनिटर करुन दिशा देणारे असेल तर अत्युत्तमच.

रुग्णाने - झोप, आहार्,व्यायाम व तदनुषंगीक दुसर्‍या दिवशीचा मूड याचे जर्नल ठेवले तर खूप उपयोगाचे पडू शकते नव्हे ठेवलच पाहीजे.

अर्थात हे सर्व घटक पूरक झाले मुख्य लाइन ऑफ ट्रीटमेन्ट औषधोपचार ही असते. रुग्णास औषधांचे कॉकटेलच घ्यावे लागते - मूड स्टॅबिलायझर + स्लीप मेडिकेशन + अँटी-कन्व्हल्सन्ट्स + अँटी सायकॉटीक. अन या आजारातील सर्वात अवघड भाग असतो असे कॉकटेल सापडणे व लागू पडणे. तोपर्यंत ट्रायल-एरर ने रुग्ण जेरीस येतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा औषधे नियमित घेणे , कधीही बंद न करणे. कारण बरेचदा "मॅनिया/उन्माद" ही इतकी सुखावह अवस्था असते - Enthusiasm + high libido + energy + confidence अक्षरक्षः जगाच्या माथ्यावर पाय रोवून उभे राहील्यासारखे वाटते अन मग ही अवस्था हरवू नये या लोभाने काही रुग्ण औषधे बंद करतात. जे की घातक असते कारण Wherever there is high, there is low (= abysmal depression)

ही डिसॉर्डर बरी होत नाही पण अत्यंत कुशलतेने १००% मॅनेज केली जाऊ शकते.

पुस्तकास माझे ५/५ गुण. तंतोतंत वर्णन + सोपी भाषा!!!

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

मी बायपोलर नसल्याने वरील विषयावर मतप्रदर्शन करू शकत नाही.
पण मी सध्या श्री. शेषराव मोरे यांचं " कॉन्ग्रेस आणि गांधींनी अखंड भारत का नाकारला?" हे पुस्तक वाचतोय.
या पुस्तकावर/विषयावर इथे अगोदर चर्चा झाली असल्यास क्षमस्व, पण मला हे पुस्तक अती ईंटरेस्टिंग वाटलं, त्यातले विचार बर्‍याच प्रमाणात पटले ही!!!!
ज्यांनी हे पुस्तक वाचलं असेल त्या नि:पक्ष जाणकारांचे विचार वाचायला आवडतील...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुस्तक नाही पण त्याविषयीचा एक विस्तृत लेख वाचला होता. त्यातील विवेचनही पटणेबल होते.

ज्यांनी हे पुस्तक वाचलं असेल त्या नि:पक्ष जाणकारांचे विचार वाचायला आवडतील...

अर्थात, मी स्वतः 'नि:पक्ष' ह्या क्याटेगरीत मोडतो किंवा कसे याबद्दल साशंक असल्यामुळे पास!! Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुस्तक नाही पण त्याविषयीचा एक विस्तृत लेख वाचला होता.

वाचा, पुस्तकही मिळवून वाचा.
माझा सल्ला म्हणाल तर इट इज अ‍ॅन एक्सपेंडिचर वर्थ मेकिंग!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा तो लेख
http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id...

लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीत वाचला होता.

पुस्तकही मिळवून वाचा.
माझा सल्ला म्हणाल तर इट इज अ‍ॅन एक्सपेंडिचर वर्थ मेकिंग!!

नक्कीच. पुस्तकातले विचार थोडक्यात मांडता आले तर लिहा. वाचायला आवडेलच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यस्स. हाच तो लेख. धन्यवाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लिंकवरचं लिखाण वाचलं. अ‍ॅक्च्युअली हा स्वतंत्र लेख नसून त्या पुस्तकातल्याच मोरे यांनी केलेल्या विश्लेषणातील उतारे आहेत.
पण त्यांच्या पुस्तकातील विस्तृत मुद्द्यांचा चांगला सारांश आहे.
माझे टंकनश्रम वाचवल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. Smile
एक विचार इंटरेस्टिंग वाटला तो म्हणजे प्रत्यक्ष फाळणी ही गांधी/ कॉन्ग्रेस तर सोडाच पण खुद्द जिनांनाही नको होती.
अखंड भारतात मुसलमानांना ५०% सत्ता मिळवण्यासाठी त्यांनी पुढे केलेली ही एक निगोशियेटिंग पोझिशन होती. कॉन्ग्रेस फाळणी कधीच मान्य करणार नाही अशीच त्यांची अपेक्षा होती.
पण प्रत्यक्षात बरेच कमी अल्पसंख्य असलेल्या मुस्लिमांना अखंड भारताची ५०% सत्ता देणं हे मान्य नसल्याने काँग्रेसने विभाजनाची मागणी मान्य करून जिथे स्थानिक लेव्हलवर अगोदरच 'पाकिस्तान' होतं तेव्हढं अनि तितकंच मान्य करून जिनांची अडचण केली.
लेखकाने एक जुना श्लोक दिला आहे,
'सर्वनाशे समुत्पन्ने, अर्धं त्यजति पंडित:'

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुस्तक वाचले आहे नी या बाबतीत इतरत्र वाचलेल्या माहितीची किंचीत भर आहे पण जाणकार नाही.
आणि त्याहून महत्त्वाचे आम्ही* नि:पक्ष अजिबातच नाही Tongue
तेव्हा पास! Smile

* स्वतःला आम्ही म्हणण्यावरून परवा टिव्हीवर सहज लागलेला नवा खुबसूरत आठवला. तो नायक खानदानी घराण्यातला वगैरे असल्याने हमें वगैरे म्हणाला की किरण खेर बै लगेच "हमे? और कौन है तुम्हारे साथ? मल्टीपर्सन डिसॉर्डर है कय तुम्हे" विचारतात तो ठ्ठो!ऽऽ संवाद आठवला Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

स्वतःला आम्ही म्हणण्यावरून परवा टिव्हीवर सहज लागलेला नवा खुबसूरत आठवला. तो नायक खानदानी घराण्यातला वगैरे असल्याने हमें वगैरे म्हणाला की किरण खेर बै लगेच "हमे? और कौन है तुम्हारे साथ? मल्टीपर्सन डिसॉर्डर है कय तुम्हे" विचारतात तो ठ्ठो!ऽऽ संवाद आठवला

जुन्या पठडीतले वैचारिक लेखक/ संपादक स्वतःला संबोधतांना आम्ही असेच संबोधत असत.
पण तुमच्या (आणि कोणशीशी ती किरण खेरच्या) दृष्टीने टिळक/चिपळूणकरांपासून ते माधव गडकरींपर्यंत सर्वजण 'मल्टीपर्सन(?) डिसॉर्डर' असलेलेच म्हणायचे!!!
ते जाऊ द्या...
त्यापेक्षा जर तुम्ही पुस्तक वाचलंय म्हणता तर त्यावरचे तुमचे विचार वाचायला अधिक आवडलं असतं....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अहो तो संवादाचं टैमिंग, तिचा खास पंजाबी टोन वगैरे अनेक गोष्टींनी जमून आलेला विनोद आहे. इतक्या शिरेसली नै घ्यायचं Smile

--
फाळणी आवश्यक झाली होती (झाले ते चांगले की वाईट हे वेगळे) असे माझे मत हे पुस्तक वाचायच्या आधीपासून होते. म्हणून म्हटले मी ते पुस्तक 'नि:पक्ष मनाने वाचले नाहीये.
या पुस्तकाने त्याला पुष्टी दिलीच पण तुम्ही म्हणता तसे जीनांचा खेळ फसला याची जाणीव/शंकाही याच पुस्तकातील मुद्दीसुद मांडणीने पुष्ट केली.

जर जीनांना फाळणीच हवी होती तर ते इतक्या चर्चा फेर्‍यांना तरी कशाला राजी झाले असते. आधी मला माझे राष्ट्र द्या नंतर बोलु असा स्टँड घेणे त्यांना काही अवघड नव्हते. पण फाळणीचे जनतेच्या दृष्टीने "पाप" त्यांनाही माथी नकोच होते. पाकिस्तानात ते "पाप" अजूनही नेहरू/गांधींच्या माथी आहे आणि आपल्याकडे जीनांच्या. यावरून मला तशी शंका येतच होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नाय रे, मी शिरेसली घेत नाय.
पण तुझ्याकडून जर ते पुस्तक तू वाचलंयस असं म्हणालास म्हणून जरा अधिक सविस्तर प्रतिक्रियेची अपेक्षा होती, इतकंच! Smile

मी पूर्वी बॉस्टनला रहात असतांना माझ्या कंपनीच्या कृपेने मला हार्वर्ड विद्यापीठाच्या लायब्ररीची मेंबरशिप होती.
मेम्बरशिप अत्याधुनिक सायंटिफिक मटेरियल वाचण्यासाठी कंपनीने पैसे खर्चून मिळवली होती, पण माझं मन वढाय वढाय!!! Smile
तेंव्हा तिथे या विषयावर ब्रिटिश लेखकांनी लिहिलेलं विश्लेषण वाचलं होतं (त्यातले काही ग्रंथ ह्या पुस्तकाच्या बिब्लियोग्राफीतही आहेत!)
तेंव्हाच सत्य हे कुठेतरी आपल्याला कॉन्ग्रेस सरकारने शिकवल्याच्या आणि हिंदूबंधूवाले धुरळा उठवत असल्याच्या मध्ये कुठेतरी आहे हे समजलं होतं!!
पण मराठीत ह्या विषयाला डायरेक्ट अ‍ॅड्रेस करणारं हे पुस्तक वाचनात आलं, म्हणून त्याविषयी मुद्दाम लिहिलं.

सर्व मराठी लोक हे पुस्तक वाचतील अशी मला सुतराम आशा नाही. पण ज्यांनी ते लठ्ठ (आणि काही ठिकाणी बोअरिंग) पुस्तक वाचण्याचे कष्ट घेतलेत त्यांचं तरी काय मत आहे हे जाणून घ्यावसं वाटलं!
(अर्थात हे पिवळ्या डांबिसाच्या बेअरिंगशी अजिबात सुसंगत नाही, पण कधीकधी बेअरिंग सोडावसं वाटतं त्यातली ही एक बाब, इतकंच!!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विलास सारंगांचे "एंकीच्या राज्यात" वाचतेय. जस्ट सुरू केलंय, आवडतंय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाचल्यानंतरच्या अभिप्रायाच्या प्रतीक्षेत!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

(डॉ. सॅक्स यांच्याबद्दल अधिक माहिती)

या लेखातूनः

NEXT to the circle of lead on my table is the land of bismuth: naturally occurring bismuth from Australia; little limousine-shaped ingots of bismuth from a mine in Bolivia; bismuth slowly cooled from a melt to form beautiful iridescent crystals terraced like a Hopi village; and, in a nod to Euclid and the beauty of geometry, a cylinder and a sphere made of bismuth.

Bismuth is element 83. I do not think I will see my 83rd birthday, but I feel there is something hopeful, something encouraging, about having “83” around. Moreover, I have a soft spot for bismuth, a modest gray metal, often unregarded, ignored, even by metal lovers. My feeling as a doctor for the mistreated or marginalized extends into the inorganic world and finds a parallel in my feeling for bismuth.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

क्लास!!! सिंपली सुपर्ब.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

http://ecx.images-amazon.com/images/I/41YD0T77PHL._SY344_BO1,204,203,200_.jpg

हे पुस्तक आज लायब्ररीत मिळालं. पहीली २ प्रकरणे - ३३ पाने अविरत वाचून झाली. इतिहासाची बरीच उजळणी झाली - हरताळ - रौलेट अ‍ॅक्ट - साबरमती आश्रम - असहकार चळवळ - चोरीचौरा गावात पोलीसांना जाळल्याची घटना व त्यामुळे मागे घेतलेली असहकार चळवळ - जालियनवाला बागेत, जनरल डायरने केलेले अमानुष हत्याकांड, स्वराज्य चळवळ -
.
इंदिरा गांधींनी परदेशी वस्तूंच्या होळीत, बाहुली चा त्याग करणे / जाळणे - आदि परिचयाच्या घटना आहेतच.
.
पण साबरमती आश्रमातील दिनक्रम, कमला नेहरु - स्वरुप देवी (जवाहरलाल यांच्या मातोश्री) यांचे सासू-सून संबंध, कमला नेहरुंना झालेला टी बी, जवाहरलाल नेहरुंचे आधीचे श्रीमंती जीवन, इंग्लंडमधील शिक्षण, एकंदर सुबत्ता अन नंतर स्वराज्य मोहीमेत उडी घेतल्यावरती रहाणीमानात झालेला प्रखर बदल.
मोतीलाल नेहरु - जवाहरलाल नेहरु यांच्यामधील खालावत जाणारे संबंध, गांधीजींनी वेळोवेळी कौटुंबिक क्षेत्रातही, नेहरुंना केलेल मार्गदर्शन.
.
पुस्तक खालीच ठेववत नाहीये. अत्यंत वाचनिय पुस्तक लायब्ररीत "फुकट्या सेक्शनमध्ये" मिळाले आहे.
_____________________
तीसर्‍या प्रकरणात कमला नेहरुं च्या फेमिनिस्ट स्वभावावर प्रकाश टाकला आहे. महमूद म्हणून जवाहरलाल यांचे मित्र कमला नेहरु यांना उर्दू शिकवण्याकरता येत पण विरोधाभास असा की महमूद यांनी स्वतःच्या मुलीस शाळेत घातले नव्हते. कमला नेहरु टीबी च्य उपचारार्थ जिनिव्हामध्ये असताना महमूद यांना लिहीलेल्या पत्रात त्या म्हणतात - मुलींना शिकवल्याखेरीज आपला देश स्वतंत्र कसा होणार? तुम्ही परदा पद्धतीत मुलींना सडवता, त्यांच्यातल्या विचारक्षमतेलाच नख लावता. हेच का तुमचं कर्तव्य की मुलींन जगात आणून , एकाकी जनावरासारखं सोडून द्यायचं? माझ्या दृष्टीत सर्व पुरुष पापी आहेत. आणि असा एक दिवस येइल, की तुम्हा पुरुषांना , स्त्रिया पर्द्यात ठेवतील."
.
कमला नेहरुंना स्वतःला शिकायला न मिळाल्याचे नेहमी वैषम्य वाटे. पत्रात त्या म्हणतात "मुलींना वाचवलं पाहीजे त्यांची आयुष्य अशी व्यर्थ जाता कामा नयेत. त्यांना त्यांच्या उर्मींचा (पॅशन) विकास करावयास मिळायला हवी".
.
स्वतः इंदिरा गांधींनी स्वतःला कधीच स्त्रीमुक्तीवादी हे विशेषण लावले नाही परंतु त्यांनी हे मान्य केले की आईच्या स्त्रीमुक्तीवादी विचारांचा स्वराज्य मोहीमेवर सुपरीणाम झाला.
____________
मोतीलाल नेहरुंनतर जेव्हा जवाहरलाल काँग्रेसचे प्रमुख बनले तेव्हा त्यांना ते पद देण्याच्या समारंभात्/सभेत , मोतीलाल नेहरुंनी पर्शिअन २ ओळी म्हणून दाखविला ज्याचा आशय होता - जे कार्य बाप करु शकत नाही, ते पुत्र करुन दाखवतो. अन या वाक्याचा संबंध पुढे नेहरु घराणेशाहीशी जोडला जाऊ लागला.
.
चवथ्या प्रकरणात उल्लेख केलेल्या जवाहरलाल यांनी इंदिरास लिहीलेल्या एका पत्रात, जवाहरलाल यांचा धर्मविषयक दृष्टीकोन कळतो. "धर्म हा भीतीमधून निर्माण झाला आणि भीतीमधून उत्पन्न झालेली कोणतीही गोष्ट ही चांगली असू श्कत नाही. आपण पहातोच की धर्माच्या नावाखाली माणूस , माणसाचे डोके फोडतो. काही लोक देवळात जाऊन कोण्या काल्पनिक संकल्पनेस फुले वहातात, प्रसाद वाटतात." या त्यांच्या उल्लेखावरुन हेच दिसते की जवाहरलाल नेहरु हे नास्तिक होते, अर्थात अन मानवतावादीही होते. पुढे लाहोर मध्ये झालेल्या एका सभेत २६ जानेवारी हा महत्त्वपूर्ण (परत वाचून सांगते) दिवस ठरविण्याचा उल्लेख येतो, तीसर्‍या प्रकरणात कॉग्रेस च्या एका सभेत "हिंदी" ही राष्ट्रभाषा ठरवली जाण्याचा उल्लेख आहे.
.
पुढे "सायमन परत जा" आंदोलन तसेच "दांडीचा मीठाचा सत्याग्रह" याचा उल्लेख आहे. जरी समुद्रपाण्याचे इवलेसे मीठ तयार करणे ही एक क्षुल्लक घटना होती तरी त्यामुळे संपूर्ण देश एकवटला/एक झाला (गॅल्व्हनाइझ्ड). तसेच आतापर्यंत फक्त आनी बेझंट व सरोजिनीदेवी नायडू या स्त्रियांचे प्रतिनिधीत्व करत असल्या तरी जवाहरलाल यांनी उल्लेख केलेला पुढे दांडीयात्रेनंतर स्त्री स्वातंत्र्यसैनिकांचा "प्रपात" (अ‍ॅव्हलांच) आला. त्याच काळात या स्त्रियांचे प्रतिनिधीत्व कमला नेहरु यांनीही घेतल्याचे दिसते. तसेच कमला नेहरु व पांडे म्हणून एक सैनिक यांचे ब्रेन्चाइल्ड होती "वानरसेना" जिचे नेतृत्व १२ वर्षाच्या इंदिराने केले. कमला नेहरुंनी शाळाअंना भेट देऊन १५,००० मुलामुलींची सेना निर्माण केली जिचे नेतृत्व इंदिराने केले. या वानरसेनेची प्रथमप्रथम ही कामे होती की "शिधा गोळा करणे, स्वातंत्र्यसैनिकांकरता अन्न शिजविणे, झेंडे बनविणे" पण पुढेपुढे या सेनेचा अधिकाधिक उपयोग होऊ लागला जसे ही मुले पोलिसचौक्यांवर पहारा ठेवून, गुप्तहेरगिरी करु लागली. पोलीस-प्रमुखांच्या ऑर्डर्स चूपचाप स्वातंत्र्यसैनिकांना पोचवू लागली. अन पोराटोरांक्डे पोलीस लक्ष कसले देताहेत त्यामुळे सर्व ऑर्डर्स आपसूक स्वातंत्र्यसैनिकांना मिळू लागल्या.
________
पाचव्या प्रकरणात पूना पॅक्ट बद्दल उल्लेख आहे आणि गांधीजींचे आमरण उपोषण हे इंदिराने दिलेल्या संत्र्याच्या रसाने तुटले असा उल्लेख आहे. आमरण उपोषणाचे व अहिंसा मूल्य आचरणात आणण्याचे महत्व या प्रसंगातून त्यावेळी १५ वर्षीय इंदिरास कळले असे उल्लेखिले आहे. पुढे फिरोझ गांधींशी ओळख आदि माहीती येईल. जवाहरलाल नेहरुंचा पालक म्हणून जो उल्लेख व कामगिरी, सल्ले येतात ते स्पृहणीयाच आहेत. उदा - स्वतः योगा, व्यायाम आदि बाबींत रुचि घेणारे नेहरु, नेहमी इंदिराला सांगत (प्रत्यक्ष अथवा पत्रातून) की तू कमीत कमी सकाळी जॉगिंग केलेच पाहीजेस. अतिनाजूक अथवा लठ्ठपणा तुझ्यात येता कामा नये आणि प्रकृतीची हेळसांड हा एक गुन्हा आहे.
.
गृहजीवन सदैव उलथापालथीचे गेलेल्या इंदिराच्या जीवनात "काश्मीर" चे स्थान अत्यंत शांती व प्रेरणादायक दाखविले आहे. किंबहुना सतत अस्थिरतेखाली जगणार्‍या त्यांच्या जीवनात एकच स्थिर मूल्य/घटना/जागा आहे अन ती म्हणजे काश्मीर. भारतीय (पुण्याची जहांगीर वकीलांची शाळा + अलाहाबादची सेंट मेरी शाळा, बंगालची शांतिनिकेतन) व काही युरोपीअन शाळांमध्ये जरी इंदिरा गांधी शिकल्या तरी शांतिनिकेतन इतका प्रभाव अन्य कोणत्याच शाळेने टाकलेला दिसून येत नाही. पण जवाहरला नेहरुंचे मात्र तक्रारवजा मत हेच होते की शांतिनिकेतनमध्ये जीवनोपयोगी कौशल्ये शिकवण्यापेक्षा कला,नृत्य आदि जास्त शिकवले जाते.
.
इंदिरा गांधी साधारण १२ वर्षाच्या असताना, जेव्हा एकदा मोर्च्यात कमला गांधी चक्कर येऊन पडतात तेव्हा फिरोझ गांधी ते त्वरेने त्यांना पाणी आणून देतात व कमला गांधींच्या कार्य+व्यक्तीमत्वाने इतके प्रभावित होतात की तत्काळ कॉलेज सोडून स्वातंत्र्यलढ्यात भरती होतात. नंतर ते बरेचदा कमाला नेहरुंबरोबरच प्रवास आदि करताना दाखविले आहेत. पुढे इंदिरा गांधी १६ वर्षाच्या झाल्यावर त्यांनी इंदिरा गांधींना प्रपोझ केले आहे. पण आश्चर्य म्हणजे इंदिरा गांधींना ते फक्त स्वातंत्र्यलढ्यातील एक युवक या नात्याने धूसर माहीत आहेत. म्हणजे त्यांच्या भावनिक, बौद्धिक अथवा कोणत्याही पातळीवरची देवाणघेवाण नाही. पुढे पुस्तकात कमला नेहरु व फिरोझ गांधी यांचे संबंध असू शकल्याचा संदेह व अफवा उल्लेखिलेल्या आहेत. फिरोझ गांधींचे आई-वडील हे त्यांच्या स्वातंत्र्य चळवळीच्या विरोधतच दाखविले आहेत व एकदा तर त्यांनी महात्मा गांधींना विनवणी केलेली आहे की फिरोझना स्वतंत्र्यचळवळीपासून परावृत्त करावे. पण याचा परीणाम उलटच झालेला दिसतो - गांधीजी उत्तर देतात की फिरोझ सारखे ७ तरुण त्यांना मिळाले तर ७ दिवसात ते स्वराज्य आणून दाखवतील. फिरोझच्या BA आथवा MA पदवीला पुढे कोणी विचारणार नाही तर त्याने स्वातंत्र्यलढ्यात काय कामगिरी बजावली यास महत्त्व येईल.
.
पाचव्या प्रकरणात कमला नेहरुंची प्रकृती अतिशय ढासळलेली दाखवलेली असून शेवटच्या काही दिवसात त्यांनी नैष्ठिक ब्रह्मचर्य पाळल्याचा उल्लेख येतो. स्वतः नेहरु धार्मिक नसल्याने हा कमला नेहरुंचा निर्णय, नेहरुंना आवडलेला नसल्याचा उल्लेख येतो.
____
सहावे प्रकरण अतिशय डिप्रेसिंग आहे आणि या प्रकरणामध्ये कमला नेहरु यांच्या मृत्युचे, त्यावेळी व नंतरच्या इंदिरा गांधींच्या मनस्थितीचे वर्णन येते. पुढे सातवे प्रकरण फिरोझ गांधी जे की लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिकत असतात त्यांच्या इंदिरा गांधींशी होणार्‍य भेटीगाठी व त्यांचे गुप्त प्रेम यांच्याशी संबंधित तर आहेच परंतु या प्रकरणात नेहरुंचे पद्मजा नायडुंशी (सरोजिनी नायडु यांच्या कन्या) असलेले अफेअर व त्यास असलेला इंदिरा गांधींचा विरोध ची ही झलक आहे.
.
उपप्रतिसाद न आल्यास हीच पोस्ट संपादित करत राहीन. आज जवळजवळ १० तास हे पुस्तक वाचतेय आता उरलेले उद्या किंवा पुढच्या वीकेंडला ...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बुच लागू नये म्हणून उपप्रसाद देत नैय्ये. पण पुपुल जयकर यांनी लिहिलेले व अशोक जैन यांनी मराठीत भाषांतर केलेले इंदिरा गांधींवरचे पुस्तक पण वाचनीय आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद. मिळाल्यास वाचीन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाचलंय आणि संग्रही आहे.
तुमच्या अभिप्रायाशी सहमत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डु. प्रकाटाआ

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मीही उपप्रतिसाद देत नाहीय.
मी दोन्ही पुस्तकं वाचली आहेत. मला पुपुलचं अधिक आवडलं. तसंतर दोन्ही पुस्तकांतून आपल्याला आधी ठाउक असलेलीच माहिती येते. पण पुपुलचं पुस्तक अधिक 'घरगुती' आहे (असं तेव्हा वाटलं होतं आणि नंतर दुसरं पुस्तक वाचल्यावरही तेच मत आहे.) शैली कॅथरिनची अधिक चांगली आहे पण मॅटर पुपुल जयकरांचे. आता सगळे लक्षात नाही, पण इंदिरा गांधींच्या वैयक्तिक आवडीनिवडी म्हणजे कपडे, खाणे वगैरे, घरातल्यांशी संबंध, मूड्स, या गोष्टीत जयकरांचे पुस्तक बरे वाटते. बाकी राजकीय जीवन हे अतिचर्चित असल्याने त्या विषयी काही खास 'इन्साइट्स' पुस्तकांतून मिळत नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'अ वर्ल्ड विदाऊट वर्क' हा प्रदीर्घ लेख वाचला. ड्रोन, सेल्फ ड्रायविंग कार्स, सेल्फ चेक आऊट किऑस्क वगैरे गोष्टी आता अगदी अंगणात आल्या आहेत. लवकरच हे सर्व प्रकार सर्वमान्य झाल्यावर निम्म्याहून अधिक नोकऱ्या करण्यासाठी रोबो/मशीन्स वापरल्या जातील. ही परिस्थिती आल्यावर जी सामाजिक स्थित्यंतरं घडू शकतात त्याचा अंदाज घेणारा हा लेख छान आहे.

इथं कुणी वाचला असल्यास यावर आणखी वेगळी मतं वाचायला आवडतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नोकरीविना जग

हे होईलच असे गृहित धरणे किंवा अनुमान काढणे संयुक्तिक नाही.

James Sherk and Lindsey Burke explain that technology and innovation will not impoverish the masses by eliminating the need for human labor; quite the opposite.

Many Americans worry that automation will significantly reduce the need for human employees. This is highly unlikely to happen. Automation reduces the need for humans in particular tasks, but employees have historically moved to new or different sectors of the economy as a result. Little evidence suggests this time is different. Technological advances have reduced the demand for employees in routine jobs and increased the demand for employees in non-routine jobs. They have not reduced the need for human labor overall. Further, the rate of automation has slowed over the past decade.

---

Baylor University’s Per Bylund explains that robots will indeed destroy more and more jobs currently performed by humans and that such progress is today, and will be tomorrow, a great blessing – just as it has been in the past.

Automation also leads to greater efficiency and abundance that raises living standards for all of us. Sticking with the example of agriculture, technological advancement has led to an unprecedented abundance and diverse selection of foods. According to a United Nations report, “the number of hungry people decline[d] globally by more than 100 million over the last decade and by 209 million since 1990-92.”

---

बाय द वे - निम्म्याहून अधिक नोकऱ्या करण्यासाठी रोबो/मशीन्स वापरल्या जातील - असे जर झाले तर क्यापिटलिस्टांनी लेबर चे केलेले शोषण निम्म्याहून अधिक नाहीसे होईल की. "कमी" पगारात काम करवून घेणे, कामाचे तास अव्वाच्या सव्वा ठेवणे, पगार वेळेवर न देणे, सुट्टी न देणे, रजा द्यायला काकूं करणे - हे शोषणाचे प्रकार निम्म्याहून कमी होतील. नैका ??? निम्म्याने कमी झालेले शोषण - असे भविष्य ( "अच्छे दिन" ) असेल तर - ते नकोय का तुम्हाला ????????

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाय द वे - निम्म्याहून अधिक नोकऱ्या करण्यासाठी रोबो/मशीन्स वापरल्या जातील - असे जर झाले तर क्यापिटलिस्टांनी लेबर चे केलेले शोषण निम्म्याहून अधिक नाहीसे होईल की. "कमी" पगारात काम करवून घेणे, कामाचे तास अव्वाच्या सव्वा ठेवणे, पगार वेळेवर न देणे, सुट्टी न देणे, रजा द्यायला काकूं करणे - हे शोषणाचे प्रकार निम्म्याहून कमी होतील. नैका ??? निम्म्याने कमी झालेले शोषण - असे भविष्य ( "अच्छे दिन" ) असेल तर - ते नकोय का तुम्हाला ????????

हा हा हा. हा युक्तिवाद भारी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

दुसरा व जास्त टेक्निकल युक्तिवाद हा आहे की - लेबर कडे जसा अनुभव वाढतो तसा त्याचा पगार वाढतो. हे अर्थातच गृहितक आहे. सरसकटीकरण आहे असे म्हंटले तरी चालेल. रोबो च्या वाढलेल्या अनुभवाबद्दल त्यास अधिक तनख्वा द्यायला लागत नाही. त्यामुळे रोबो जरी महाग असला तरी त्याची टोटल कॉस्ट ऑफ ओनरशीप विचारात घेतली पायजे. रोबो ला २४*७*५२ काम करायला लावता येते ( मेंटेनन्स चे तास सोडले तरी ते २४*७*५० धरता येतील.). बेनिफिट्स (आरोग्य विमा वगैरे) नाही. मरम्मत्/रखरखाव्/मेंटेनन्स चा खर्च विचारात घ्यायला लागेलच.

पण रोबो ची कॉस्ट (cost of operating the robot per unit of time) ही लेबर कॉस्ट मानली तरी लेबर कॉस्ट कमी कमी होत जाईल असा माझा कयास आहे. (तपासायला लागेलच.) पण इन्पुट कॉस्ट्स कमी असतील तर विक्री किंमत कमी करण्यास भाग पाडण्याचे काम स्पर्धा प्रक्रिया करेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

थिंकिंग , फास्ट and स्लो वचतो आहे.लेखकाला नोबेल पारितोषिक मिळाले आहे ,म्हणून वाचायाल घेतले. बोलण्यापूर्वी १० आकडे मोजावे एवढाच पुस्तकाचा आशय . निर्णय घेताना 'संथ' 'मंद' विचार करावा हा सर्वसाधारण विचार भरपूर पाणी घालून पातळ करून लिहिला आहे.

मला समजले नाही आणि अजिबात आवडले नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उदय यांना खूप आवडले आहे ते पुस्तक. मला ओके वाटले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तंत्रज्ञानात जशीजशी प्रगती होते आहे तशी नोकरी करणाऱ्या पुरुषांची संख्या कमी होत आहे. योगागोयाने फॉर्च्युन मासिकाच्या ताज्या अंकात यावरच कवरस्टोरी आली आहे. या दशकात तर तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा वेग भलताच वाढला आहे. क्लाऊड कंप्युटिंग, मल्टिटेनंट डेटासेंटर्स वगैरेंमुळे कॉस्ट ऑफ कंप्युटिंग आता झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे माणसांच्या नोकऱ्यांची संख्या कमी होणार यात काहीच शंका नाही.

लेख

अर्थात याचा अर्थ नोकरी नसणाऱ्यांना आर्थिक चणचण भासेल असा नक्कीच नाही. गवर्मेंटला कंपन्यांकडून आणि श्रीमंतांकडून संपत्तीचा वाटा काढून घेऊन तो रिकामटेकड्यांना वाटावाच लागेल. अन्यथा ग्राहकांची संख्या कमी होऊन हा सगळा डोलारा दोलायमान होऊ शकतो.

बाय द वे - निम्म्याहून अधिक नोकऱ्या करण्यासाठी रोबो/मशीन्स वापरल्या जातील - असे जर झाले तर क्यापिटलिस्टांनी लेबर चे केलेले शोषण निम्म्याहून अधिक नाहीसे होईल की. "कमी" पगारात काम करवून घेणे, कामाचे तास अव्वाच्या सव्वा ठेवणे, पगार वेळेवर न देणे, सुट्टी न देणे, रजा द्यायला काकूं करणे - हे शोषणाचे प्रकार निम्म्याहून कमी होतील. नैका ??? निम्म्याने कमी झालेले शोषण - असे भविष्य ( "अच्छे दिन" ) असेल तर - ते नकोय का तुम्हाला ????????

हो पण कंपनीत तयार झालेला माल रोबो/मशीन्स विकत घेऊ शकणार नाहीत. आणि नोकरी नसलेले लोक तुमच्या कंपनीत तयार झालेला माल विकत कसा घेतील. त्यासाठी क्यापिटलिष्टांवर जास्त करआकारणी केली पाहिजे. त्यांची संपत्ती रिकामटेकड्यांना वाटली पाहिजे. ते हवंय का तुम्हाला?

(बा.द.वे. मी युनियन वगैरे गोष्टींचा कट्टर समर्थक नाही)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह्या ग्राफ चा संबंध तंत्रज्ञानाच्या प्रगती पेक्षा बायका नोकरी करुन घर चालवू लागल्या ह्याच्याशी असावा. नवरा घरी बसलाय आणि बायको नोकरी करुन घर चालवते आहे असे पूर्वी न दिसणारे चित्र आता थोडेफार दिसू लागले आहे. माझ्याच ओळखीत अशी ३ उदाहरणे आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वरचा आलेख अमेरिकेतील पुरुषांचा होता. थोडं शोधलं तर बायकांचा वाटा गेल्या पंधरा वर्षात स्थिर राहिला आहे. मात्र पुरुषांचा वाटा कमी होतोय. (यामागचं एक कारण बायकांचे सॉफ्ट स्किल्स पुरुषांपेक्षा जास्त चांगले असतात असं वाचनात आलंय)

वाटा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तेच तर मी सांगीतले. ह्या काम करणार्‍या बायकांच्या काही नवर्‍यांनी घरी बसुन आराम करण्याचे पसंत केले म्हणुन पुरुषांची टक्केवारी कमी झाली आणि बायकांची तशीच राहीली.
मला इतकेच म्हणायचे होते की पुरुषांचा टक्का कमी होण्यात तंत्रज्ञानाचा काही संबंध नाहीये. मुळातच पुरुष जात आयतोबा असल्यामुळे संधी मिळाल्यावर लगेच कामधंदा करणे बंद केले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुळातच पुरुष जात आयतोबा असल्यामुळे संधी मिळाल्यावर लगेच कामधंदा करणे बंद केले.

काहीही हां अनु (छ्या राव, ईकारान्त नाव नाही.)!!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अर्थात याचा अर्थ नोकरी नसणाऱ्यांना आर्थिक चणचण भासेल असा नक्कीच नाही. गवर्मेंटला कंपन्यांकडून आणि श्रीमंतांकडून संपत्तीचा वाटा काढून घेऊन तो रिकामटेकड्यांना वाटावाच लागेल. अन्यथा ग्राहकांची संख्या कमी होऊन हा सगळा डोलारा दोलायमान होऊ शकतो.

ह्म्म. केनेशियन आहात म्हणाकी.

-----

हो पण कंपनीत तयार झालेला माल रोबो/मशीन्स विकत घेऊ शकणार नाहीत. आणि नोकरी नसलेले लोक तुमच्या कंपनीत तयार झालेला माल विकत कसा घेतील. त्यासाठी क्यापिटलिष्टांवर जास्त करआकारणी केली पाहिजे. त्यांची संपत्ती रिकामटेकड्यांना वाटली पाहिजे. ते हवंय का तुम्हाला?

ग्रीस चा कित्ता गिरवायचा म्हणताय ? आपण तयार आहोत ब्वा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'जिहाद, गुलाल आणि सारीपाट' हे किशोर बेडकीहाळ यांनी संपादित केलेलं, वसंत पळशीकर यांच्या लेखांचं पुस्तक वाचत आहे. हिंदू-मुस्लिम संबंधांची दलवाई, बेन्नूर, कुरुंदकर, अ. भि. शहा, स. ह. देशपांडे यांनी जी मांडणी केली; तिचा परामर्श घेणारे-टीका करणारे हे लेख आहेत. अजून सुरुवातच आहे. पण पुस्तकाचा सूर साधारण असा आहे: "केमाल पाशासारखे धडाकेबाज उपाय भारतासारख्या देशातली जातीयता कदापि समूळ नष्ट करू शकणार नाहीत. ते लोकशाहीलाही मारकच आहे. किंबहुना कुरुंदकर-दलवाई-शहा यांची मांडणी भारतीय मुस्लिम समाजाला न्याय देणारी नव्हती. त्यातून स. ह. देशपांडेंसारख्या हिंदुत्ववादी विचारांना आयतं (आणि अनावश्यक) समर्थन तेवढं उचलता आलं."

वाचणं जड जातं आहे, पण इंट्रेष्टिंग तपशील आणि दृष्टिकोन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

किंबहुना कुरुंदकर-दलवाई-शहा यांची मांडणी भारतीय मुस्लिम समाजाला न्याय देणारी नव्हती. त्यातून स. ह. देशपांडेंसारख्या हिंदुत्ववादी विचारांना आयतं (आणि अनावश्यक) समर्थन तेवढं उचलता आलं."

रोचक वाक्य आहे. मुसलमानांना आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडेल अशी कुठलीही मांडणी, निव्वळ हिंदुत्ववाद्यांना सोईस्कर ठरेल म्हणून अन्यायी? अतिरोचक आहे खरे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वाच पुस्तक आणि मग ठरव.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

तुम्ही सारांश मांडा जमल्यास. तूर्तास जे उद्धृत केलेय त्यावरून तरी असेच दिसतेय खरे. जर तसे नसेल तर काय आहे, हे सांगावे अशी विनंती. जमेल तेव्हा आम्हीही पाहूच पुस्तक वाचून.

निव्वळ हिंदुत्ववाद्यांना सोयीस्कर होईल म्हणून तथ्यपूर्ण मांडणीकडेही दुर्लक्ष करावयाचे या ट्रेंडचे हे अजून एक उदाहरण म्हणून रोचक वाटले इतकेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

म्हणून होम्सभाऊ म्हणतात, हाती विदा आल्याखेरीज निष्कर्षांच्या विटा भाजू नयेत! असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मी त्या एका वाक्याबद्दल बोलतोय असे स्पष्ट लिहूनही पुस्तकाबद्दल निष्कर्ष काढला हा निष्कर्ष तुम्ही काढलेला पाहून चिकार करमणूक झाली. या सिच्वेषनला होम्स, बाँड किंवा अजून कुणाचा एखादा क्वोट असेल तर जोडायला हरकत नसावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जनरली कुरुंदकरांच्या तात्विक मांडणी बद्दल कायम कौतुक करायचे आणि ती कशी बरोबर असते हे सांगायचे. पण मुसलमानांचा विषय आला की कुरुंदकर सुद्धा अन्याय करणारे ठरतात. हे फारच रोचक आणि भोचक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा हा हा, एकदम परफेक्ट ओ. त्यात परत एक वाक्य उद्धृत केल्यावर फक्त त्यावर कमेंट केली तरी पुस्तक वाच असे म्हणून बोळवण करायची, हेही तितकेच उद्बोचक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>>किंबहुना कुरुंदकर-दलवाई-शहा यांची मांडणी भारतीय मुस्लिम समाजाला न्याय देणारी नव्हती.

पळशीकरांना काय अपेक्षित होतं ते त्यात आलं आहे का? असल्यास ते काय होतं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

Mission impenetrable: are Hollywood blockbusters losing the plot ?

From Fast & Furious to the Avengers, Terminator and Jurassic World, the trend for ridiculously over-complicated storylining is out of control this year. Is it time for a purge ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कुंभमेळ्याच्या सुमारास साधुसंतांच्या आखाड्यांबद्दल बातम्या येतात. त्या आखाड्यांबद्दलच मेघना ढोके लोकमतमध्ये लेखमाला लिहित आहे.

पर्वणी
खालसावाली भीड
फक्कडभाई
संसार त्यागणारा मोह
आखाडों का भी पेट होता है.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पहिला लेख आवडला. आता इतर वाचतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

पुढचे भाग -
जलता जल

‘हट’योगी

खांद्यावरचं डोकं डोक्याखालची उशी

फ्लड लाईट्सच्या कृत्रिम उजेडातली एक जागी रात्र

(सगळे दुवे एकत्र मिळावे म्हणून व्यवस्थापकीय अधिकारात आधीचेच प्रतिसाद संपादित करून दुवे देत राहीन.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेख वाचतोय. जितके वाचले तितके आवडले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"कुण्या एकाची भ्रमणगाथा" आणि "स्मरणगाथा" वाचताना ह्यातलं थोडं जग दिसलं होतं, त्याची आठवण झाली.
तेव्हापासून -साधू कुणी का बनत असेल, त्यांचं साधूपणानंतरचं जगणं, वागणं, नियम - ह्याबद्दल जाम कुतूहल आहे.
{ अवांतर -थोडीशी टोकाची गोष्ट म्हणजे अघोरी साधू -त्यावर ही एक डॉक्युमेंटरी पाहिली होती.}

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भाग वाचले. पैकी "हठ-योगी" आवडला. इच्छा-भोजनाची वाट पहणारे साधूबुवा. विचित्रच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्व दुवे एकत्रित करून दिल्याबद्द्ल अदितीला धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ओह!
मला आज ही साइट सापडलीये.त्यामुळे कोणत्या कॅन्डिडेटने कोणता मुद्दा उचलून धरलाय ते कळतय एकंदर.
आज हॅपी अवर डिबेट आहे वाटतं फॉक्स न्युजवरती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हाहाहा मस्त आहेत दोन्ही दुवे. टेड क्रुझ अन स्कॉट वॉकर - खरच आवडली त्यांची तडफ आणि पॉझिटिव्ह एनर्जी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

करा मज्ज्या !!!

तुम्ही रिपब्लिकन दिसताय.
ओबामाकेअर अन ओबामा ने ज्या रीतीने मिडलईस्ट हँडल केले आहे - त्या टीकेवर जास्त भर आहे त्यांचा.
___
याउलट डेमोक्रॅटिक्स - प्रो अ‍ॅबॉर्शन आणि व्होटींग मेड इझी - हे २ इश्यु घेतलेले दिसताहेत.
_________
आत्ता क्लोझिंग स्टेटमेन्ट्सची फीत पाहीली पैकी -
US Senator Marco Rubio (Florida) यांचे अमेरीकन ड्रीम एक्स्पान्ड करण्याचे आश्वासन लेम वाटले.
Businessman Donald Trump (New York) - खूप झोडपलय ओबामा सरकारला. अमेरीका सर्वच फ्रंटवरती मागे पडतेय असे उदाहरणांसहीत दाखवलय.
US Senator Ted Cruz (Texas) - ते स्वतः सत्तेवर आल्यावर काय काय बदल करतील त्याचे ट्रान्स्परन्ट चित्र स्पष्ट केले आहे.
.
.
___________
कोणी GOP Debate पाहीली का? प्लीज मुद्दे मांडावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विलास सारंगांची 'एन्कीच्या राज्यात' कादंबरी वाचली. या आधी सारंगांच्या काही इंग्रजी लघुकथा वाचल्या होत्या, आणि आवडल्याही होत्या, पण ही कादंबरी नक्कीच त्यांची श्रेष्ठ कलाकृती आहे. मूळ कथा आणि फॉर्म दोन्हींच्या दृष्टीने कमालीची संयमता, कुठेही पाल्हाळ नाही, नेमक्या अंसेंटिमेंटल वर्णनांत मानवी अस्तित्वावर, संबंधांवर गंभीर भाष्य. सध्या एवढेच; वेळ मिळाला तर अधिक विस्तृत लिहीन. पण माझ्या आवडत्या कादंबर्‍यांच्या यादीत भर पडली! आता 'तंदूरच्या ठिणग्या' वाचायला घ्यायचं म्हणतेय.

पण त्या आधी अमेरिकन कादंबरीकार बार्बरा किंगसॉल्वर चे "अ‍ॅनिमल, वेजिटेबल, मिरेकल" वाचतेय. लेखिका व तिच्या परिवाराने एक वर्ष आपल्याच शेतजमिनीत उगवणार्‍या भाजी-पाला-फळं, व आसपासच्या परिसरातील शेती उत्पन्नावर जगण्याच्या प्रयोग केला, त्याचे हे मनोगत. अमेरिकेतील खाद्यसंस्कृतीचे औद्योगीकरण आणि अल्पभूधारक शेतीचा र्‍हास, नैसर्गिक, जैवी शेतीचे पर्याय, वगैरेंवर भाष्य करणार्‍या पुस्तकांमधे हे क्लासिक समजले जाते. त्यातली बरीच माहिती मला आता परिचित असल्याने फक्त लेखिकेच्या व्यक्तिगत अनुभवांचे भाग लक्ष देऊन वाचतेय, त्यामुळे पानं भरभर उलटली जातायत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी गेल्या वीकान्ताला जव्हारच्या बीजबँकेत जाऊन आले. त्याबद्दल सविस्तर सांगीन. त्यामुळे फारच जवळचं वाटलं हे पुस्तक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

डीटेल्स प्लीज!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'एन्कीच्या राज्यात' हा माझ्या मते मराठी कादंबरीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. विलास सारंगांचा 'सोलेदाद' कथासंग्रह वाचला आहे का? किंवा नॉनफिक्शनमध्ये 'सिसिफस आणि बेलाक्वा'? माझ्या मते त्या काळातलं त्यांचं लेखन अधिक सकस होतं.
जाता जाता : भाऊ पाध्यांची 'बॅ. अनिरुद्ध धोपेश्वरकर' वाचली आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

नाही, नाही आणि नाही. पाध्येंच्या कथा चिक्कार वाचल्या आहेत (वासुनाका, वगैरे). सारंगांचे या आधी सर्जनशीलता आणि लिहीता लेखक, आणि अजून एक समीक्षकीय निबंधसंग्रह वाचला आहे. सोलेदाद वाचायचे आहेच; मी women in cages आणि अजून एक कथासंग्रह वाचलाय (आता लगेच नाव आठवत नाही). एकूण त्यांचे मराठी लेखन इंग्रजीपेक्षा नक्कीच सकस वाटले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"सोलेदाद" आणि "सिसिफस आणि बेलाक्वा" ही दोन्ही पुस्तके सध्या प्रिंट मध्ये दिसत नाहीत. ती कुठे मिळवावित? त्यामुळे त्या काळातले लेखन सकस होते यावर विचार करता येत नाहीय. ललित साहित्यात सारंग नंतर मिथ कडे जास्त झुकले असं तुम्हाला वाटतं का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

मला ही मॅजेस्टिक मधे बाकीची (अलिकडची) सगळी पुस्तकं मिळाली, पण ही नाही मिळाली. बुकगंगावर पण उपलब्ध नाहीत. कुठे लायब्ररीत मिळाली तर पहायला हवे.
जंतूजी, एन्कीच्या राज्यातच्या महत्त्वाबद्दल भी थोडा खुल के बोला जाए..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>> एन्कीच्या राज्यातच्या महत्त्वाबद्दल भी थोडा खुल के बोला जाए..

खरं तर 'कोसला' + 'हिंदू' आणि 'एन्कीच्या राज्यात'ची तुलना करायला हवी. पुष्कळ रोचक साम्यस्थळं आणि काही महत्त्वाचे फरक आहेत. उदा :
ग्रामीण नायक - मल्टिनॅशनल एक्स्पोजर असलेला नायक
प्राचीन संस्कृती आणि आताचं जगणं ह्यांना ताडून पाहत आत्मचिंतन करणारा एकलकोंडा नायक
जगता जगता अस्तित्ववादी प्रश्न पडून गोंधळलेला / पेचात पडलेला / अडकलेला नायक
नायकाच्या आयुष्यातल्या स्त्रियांशी त्याचं असलेलं नातं
राजकीय पार्श्वभूमीचा नायकावर होणारा परिणाम
वगैरे वगैरे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हो, अस्तित्ववाद, व्यक्ती=समाज यांच्यातील संबंध, एकलकोंडा नायक, बंद/मो़कळ्या अवकाशाचे वर्णन, बरीच साम्यस्थळं आहेत. खासकरून कोसला आणि एन्कीच्या राज्यात मधे. हिंदूत काही प्रश्न तेच असले तरी शैली वेगळी आहे, आणि मूल्यचौकटही.
काही वर्षांपूर्वी मुक्त शब्दच्या दिवाळी अंकात नितीन रिंढ्यांचा सारंग आणि नेमाड्यांवर तुलनात्मक लेख आला होता. कोणाकडे पीडीएफ आहे का? पुन्हा वाचायला आवडेल; माझी प्रत कुठे आहे कोण जाणे.

सुटी जवळ येता येता बाहेर जाण्याबद्दल वाचकाची उत्सुकता वाढवून मग शेवटची निराशा कादंबरीत अगदी संयम ठेवून, सुरेख आखली आहे. प्रमोदबद्दल ही वाचकाची (किमान या वाचकाची) आस्था हळूहळू वाढत जाते. मला शेवटही खूप आवडला (शेवट हा एरवी सगळ्यांचा गंडतोच). मुकर्जी, खुदेर आणि प्रमोद यांच्यातली इतिहासावरची चर्चा मला त्रोटक वाटली; आणि हमीदचे पात्र थोडे ढाच्यातले वाटले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'एन्कीच्या राज्यात'मध्ये भारतीय वास्तवाच्या बाहेरचा परिसर असल्यामुळं आणि 'कोसला' आणि 'हिंदू'त (थोडं पाकिस्तान सुरुवातीला असलं तरी, साधारणपणे) भारतीयच वास्तवातला परिसर असल्यामुळं संस्कृतीबद्दलच्या तुलनेत काय काय फरक असेल? शिवाय हे नायक जातीय उतरंडीच्या मधल्या कप्प्यातले आहेत, हेही त्यात भर म्हणून. संस्कृतीबद्दलच्या मुद्द्याची पुरेशी माहिती नसल्यामुळं मत देता येत नाही. पण दुसरं एक थोडंसं जाणवलेलं- १) स्त्रियांशी असलेल्या नात्याचा उल्लेख तुम्ही केला आहे. त्यातलं सेक्सपुरतं निरीक्षण-- एन्कीत सेक्स हा घटक नायकाच्या वृत्तीच्या संबंधात अधिक ठळकपणे अनुभव म्हणून आलेला जाणवला. कोसलात अनेक कारणांमुळं तसं काही नाही. हिंदूतही एकूण समाजाच्या बाबतीत चित्रण-वर्णन म्हणून काही असलं, तरी नायकाच्या बाबतीत ठळक अनुभव म्हणून काही नाही (प्रसिद्ध झालेल्या पहिल्या भागात तरी, पुढं काही असेल तर माहीत नाही). २) 'आपले लोक' याबद्दल सारंगांच्या नायकाला कुठंच काही जोडून घेण्याचा मुद्दाम प्रयत्न करायचा असल्यासारखं वाटलं नाही. कोकणात, महाराष्ट्रात, अमेरिकेत, आखातात कुठंही तो अलिप्त. त्या तुलनेत नेमाड्यांच्या नायकांना (विशेषकरून हिंदूतल्या) हे 'आपले लोक' कोण आहेत याची चाचपणी करायचेय, असं वाटलं. - या दोन मुद्द्यांमुळं दोघांच्याही नायकांच्या एकटेपणाचा पोत वेगवेगळा होत असेल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माफ करा पण सध्या हे वाचतोय.
घाटात फुटला घाम लेखावरील प्रतिक्रिया वाचून मला डायबिटीसचा हार्टअटॅक आला. एवढं भयानक विनोदी बरेच दिवसात वाचनात आलं नव्हतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जुना आहे लेख, पण अर्थातच जुने ते सोने या उक्तीला सार्थ ठरवणारा.

एक कोम्मेन्त

मी पण परवाच पृथ्वीवरून प्लूटो वर फिरायला निघालो होतो. ज्यूपीटर च्या घाटात बघतो तर काय ... यानाच्या ब्रेक खाली चंद्र ... मी लगेच यान कडेला घेतला आणि मंगळावर गाडीत चढलेल्या अलीएन फमिली ला विचारला कोणी आणला चंद्र .. कोणी सांगायला तर नाही.. असो,तर मग चंद्र यानातून काढला आणि परत त्याच्या कक्षेत ठेवला..

अरे मी पण असाच एकदा ज्युरासिक पार्क मध्ये गाडी चालवत होतो, तेव्हड्यात ब्रेक खाली एक छोटा डीनोसोर आला, काही करा ब्रेक काही लागत नव्हता, पण बर झाल आमच्या गाडीत एक दुसरा टी- रेक्स होता त्याने त्याला खाल्ल आणि म आरामात ब्रेक लागला .. आणि हो त्या टी- रेक्स ने मला खाल्ल नाही कारण Harry Potter पण सोबतच होता त्याच्या झाडूवर बसलो आणि प्राण वाचले

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प्रोफेसर व्ही.जी.हतळकर/हटलकर यांचे 'रिलेशन्स बिटवीन द फ्रेंच & द मराठाज़' वाचत असताना पुढील धमाल किस्सा वाचनात आला. (पान क्र. ६९)

डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया येथून हे पुस्तक डौनलोडवलेले आहे.

Barcode - 99999990290834
Title - Relations Between The French And The Marathas
Subject - Devotional
Author - Batalkar,V.G.
Language - english
Pages - 314
Publication Year - 1958

(रिपीट करत असल्यास सांगावे)

गोष्ट आहे १७४० ची. तंजावरच्या मराठी राज्यावर हल्ले होत होते, त्यासाठी तंजावरच्या राजाने सातारच्या शाहू छत्रपतीकडे मदत मागितली. शाहूने आपला रघूजी भोसले नामक सरदार तिथे पाठवला. त्याने सर्व शत्रूंना हरवले, राज्य पुन्हा एकदा बिनघोर केले. त्या लढायांत फ्रेंचांनी मराठ्यांविरुद्ध स्टान्स घेतल्याने रघूजी पाँडिचेरीवर हल्ला करणार म्हणून फ्रेंचांनी पूर्ण तयारीही केली होती. पण डुमास नामक फ्रेंच प्रतिनिधीने वाटाघाटी केल्याने रघूजी निवळला. रघूजी निवळण्याचे एक कारण म्हणजे डुमासने दहा खंबे भरून अस्सल उंची फ्रेंच वाईन रघूजीकडे पाठवली होती. ती वाईन मिसेस रघूजींना इतकी आवडली की रघूजीला फर्दर सप्लाय मिळवण्याकरिता फ्रेंचांशी वाटाघाटी कराव्या लागल्या. अजून तीस खंबे वाईन घेऊनच रघूजी सातार्‍यास परतला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

2 of the 3 Ws are in action here. Wow.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अचानक कुठूनशी ही कादंबरी हातात आली.
अर्धी वाचली, आणि मनात "हिंदू.."शी तुलना केलीच, ते एक असो.
विदर्भात घडणारी गोष्ट आहे. १९७० च्या दशकातलं गावातलं एक ब्राह्मण कुटूंब, त्यांची शेती, कुळं, आपसातली नाती, गावाबाहेर पडलेले इतर भाऊ, घरातल्या लोकांची टिपिकल तरीही कुतूहल चाळवणारी धुसफूस आणि तरीही एकमेकांवर असलेलं प्रेम, शहर आणि गावातल्या रहाण्यातला फरक असं आणखी बरंच काही.
सगळ्यात आनंददायक आहे ती लोकांची वर्‍हाडी बोली Smile
.
एकंदरीत पुस्तक मस्त वाटतंय. पूर्ण केल्यावर अजून काही लिहीन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एय! मीपण 'मुखवटा'ची 'हिंदू'शी तुलना केली होती. 'तुंबाडचे खोत'शीही आणि एलकुंचवारांच्या 'युगान्त'शीही. बोलीबद्दल - आत्यंतिक सहमती. प्लीज लिहीच! (याच कादंबरीवर एक आख्खं पानभर छापून म्हणे केतकरांनी त्यांच्या काळातल्या मटाचा त्रयस्थ उच्चभ्रूपणाचा आब घालवला होता आणि मटाला माणसात आणलं होतं. म्हणे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

:इट अ‍ॅंड रन माय अनलाइकली जर्नी टु अल्ट्रामॅरेथॉन ग्रेटनेस" ही स्कॉट ज्युरेक या असामान्य माणसाची अत्यंत रोचक, विलक्षण अशी जीवन कहाणी आहे. स्कॉट ज्युरेक हा अल्ट्रारनर आहे. अल्ट्रारनींग म्हणजे जहॉ मॅरेथॉन खत्म होती है वहॉसे अल्ट्रारनींग शुरु होती है. या पुस्तका अगोदर मलाही मानवी रनींग ची मर्यादा म्हणजे मॅरेथॉन वा फ़ार तर ट्रायथलॉन इतकीच माहीती होती. मागे सकाळ मध्ये पुण्याच्या एका तरुण डॉक्टरने ट्रायथलॉन साठी केलेल्या प्रयत्नांवर एक सुंदर लेख वाचला होता. नुकतच सुपरमॉडेल मिलींद सोमण ने हि एक ट्रायथ्लॉन यशस्वीरीत्या पुर्ण केलीय वयाच्या पन्नासाव्या वर्षी त्याची हि बातमी ताजी च आहे. तर अंतर इथे सर्वात महत्वाची बाब आहे फ़ुल मॅरेथॉन चे अंतर २६.२ मैल इतके असते. ( किलोमीटर मध्ये ४२ की.मी.). चुकभुल देणे घेणे. अल्ट्रारनींग स्पर्धेचे अंतर वेगवेगळे पण सर्वसाधारण ५० ते १०० ते १३५ ते १५० मैल देखील अनेकदा असते. आणि इथेच अर्थातच मानवी क्षमतेचा शारीरीक मानसिक अक्षरश: कस लागतो. शिवाय अल्ट्रारनींग रोड वर तशी कमीच पण अत्यंत खडतर अशा नैसर्गिक जागांवर खेळली जाते प्रचंड चढ उतार असलेल्या टेकड्या, बर्फ़ाळ प्रदेश, अती उष्ण हवामान, अती खडकाळ दुर्गम प्रदेशात व जमीनीवर धावत जाउन हे अंतर पार करण्याचे आव्हान असते. तर ज्युरेक हा अशा अनेक एकाहुन एक खडतर अल्ट्रारनींग च्या जगात अत्यंत खडतर समजल्या जाणारया स्पर्धा जिंकणारा ग्रेट रनर आणी हे त्याच आत्मचरित्र. त्याने इतके रेकॉर्ड करुन ठेवलेले आहेत की मला हळुहळु त्याची माहिती मिळतेय. पुस्तक संपवल्यावर मी नेट वर त्याचा अधिक शोध घेतला तेव्हा कळल की त्याने काय काय पराक्रम केलेले आहेत. उदा. वेस्टर्न रेस १०० हार्डरॉक १०० तर तो जिंकलेला आहेच पण त्याने जो एक रेकॉर्ड केला आहे तो साधारण असा की एका दिवसात त्याने साडे सहा फ़ुल मॅरेथॉन एका दिवसात धावणे असे प्रकार केलेले आहे. ती फ़ारच मोठी यादि आहे असो.

तर तो मला माणुस म्हणुन हि फ़ार आवडला अगदि प्रांजलपणे तो त्याची कथा सांगतो त्याची बालपणाची गरीबी असल्याने खडतर परीस्थीती, वडिलांचा अत्यंत कडक सैनिकी शिस्तीचा स्वभाव, आईच अत्यंत कठिण अस आजारपण त्यात त्याने घेतलेली आईची काळजी, केलेली सेवा या कठीण कष्टमय बालपणामुळे आणि आईला आपल्या डोळ्यापुढे हळुहळु खंगत जाताना पाहण्याने अत्यंत मनस्वी स्वभावाच्या या मुलाच्या मनावर होणारा परीणाम. त्याचा वाचनात रमणारा स्वभाव हे सर्व फ़ार सुंदरपणे पुस्तकात आलेल आहे. पुढे वडिलांनी आईला नर्सिंगहोम मध्ये पाठवण इ. या अत्यंत नकारात्मक वातावरणातुन या सर्व वेदनेतुन तो जो एस्केप चा मार्ग निवडतो तो म्हणजे रनींग म्हणजे हि लीटरली रन्स अवे फ़्रॉम सॉरो ऑफ़ लाइफ़. त्या सर्वाच रनींग शी झालेल कनेक्शन खुप रोचक आहे मुळातुन वाचण्यासारख आहे. वडिल त्याला खुप सारी लाकडे रचुन ठेवण्याची व इतर अशी अनेक भयंकर अवजड कामे लष्करी शिस्तीत करवुन घेत.त्यावेळी तो जेव्हा तक्रार करत असे तेव्हा वडिल त्याला म्हणत "समटाइम्स यु जस्ट डु थिंग्ज" मात्र हेच खडतर बालपण व अशी कामे यातुन त्याच्यातला एन्ड्युरन्स कसा डेव्हलप झाला याच फ़ार रोचक त्या जडण घडणीच वर्णन तो करतो. व समटाइम्स यु जस्ट डु थिंग्ज या अपरिहार्यतेलाच तो जगण्याच एक सुत्र बनवतो. त्याच अस्तित्ववादी विचारसरणी कडे आकर्षीत होण ब्रदर्स कॉरमॉजॉव च वाचन आणि ५० मैल धावण हे आलटुन पालटुन करण इ. वर्णन येतात. त्याच्या आयुष्यात आलेली अनेक इंटरेस्टींग माणसं त्याचा जीवश्चकंठश्च रनर मित्र डस्टी, ड्स्टी चा प्रचंड आक्रमक स्वभाव उद्दामपणा स्वत:च्या गाडीच्या टपावर तो लिहीतो हे मिस्टर डोन्ट लाफ़ युवर डॉटर माइट बी इनसाइड इ. डस्टी ने पुढे आयुष्यभर दिलेली अप्रतिम साथ, त्याच्या गावातला हिप्पी डॅन त्यांच्या बरोबर केलेली रनींग त्याच्या रनींग वर विचार करण वा वाचन करण्यावर हिप्पी डॅन ने केलेली कानउघाडणी, हिप्पी डॅन चा स्वत:चा भार पृथ्वी वर कमीत कमी पडावा यासाठी चाललेले प्रयत्न. त्याचा सिंप्लीसीटी चा आग्रह या दोन्ही वल्लींच वर्णन हि रोचक आहे,

ज्युरेक ने हे सर्व यश प्राप्त करण्यासाठी केलेले कठोर परीश्रम घेतलेली ट्रेनींग मती गुंग करणारी आहे तो म्हणतो माझे शरीर एक लॅबोरेटरी झाले होते. त्याचा नॉनव्हेजीटेरीयन कडुन व्हेगन पर्यंतचा प्रवास आश्चर्यजनक आहे. या सर्व जीवघेण्या अल्ट्रामॅरेथॉन च्या रेसेस त्याने पुर्णपणे शाकाहाराचा अंगिकार करुन जिंकलेल्या आहेत, अनेकांनी त्याला वेड्यात काढल तरी तो स्वत:च्या आहारावर अनेक संशोधन करुन फ़र्म राहुन हे सर्व कस साध्य करतो ते वाचण्यासारख आहे. प्लांट बेस्ड डाएट हा त्याचा मुलाधार आहे. पुस्तकात प्रत्येक प्रकरणानंतर त्याने अनेक सुंदर एकाहुन एक व्हेज पदार्थांच्या रेसेपीज दिलेल्या आहेत. खव्वय्यांसाठी कुकींग प्रेमी साठी हा एक मोठा ठेवा आहे. खर म्हणजे पुस्तक नावाप्रमाणेच रनींग आणि रेसीपीज च मस्त कॉकटेल आहे. लहानपणी आजारी आईला सांभाळत व लहान भावंडासाठी स्वत: स्वयंपाक करत करत तो एक उत्कृष्ठ कुक बनतो. व अनेक सुंदर व स्वत:च्या हेवी रनींग ला शरीराच्या अतीरीक्त न्युट्रीशियस फ़ुड ची पुर्तता करण्यासाठी अनेक एनर्जेटीक शाकाहारी डिशेस त्याने शोधलेल्या शिकुन घेतलेल्या आहेत.

अल्ट्रारनर्स ज्या असामान्य पद्धतीने शरीराच्या मर्यादांशी च दोन हात करुन जगतात ते हादरवुन टाकणारे आहे. अत्यंत लॉंग डिस्टन्स रनींग ने होणारे शरीरावरील मेंदुवरील परीणाम ते हाताळतांना अनेक ठीकाणी केलेला अतिरेक याची वर्णने अनेक वर्णने मती गुंग करणारी पुस्तकात येतात. एक झलक पहा नेमक काय होत

Yet there’s a reason why top marathoners aren’t flocking to the sport, and it’s not just the lack of cash and prizes. Although the pace of an ultra is slower, maintaining that effort for hours and hours can leave the best of us huddled at the side of the road, dry heaving. For one thing, there’s the cumulative loading on the muscles and bones. Every time the foot hits the ground, the quadriceps and calf muscles have to lengthen to absorb the shock of the impact, and that adds up when you go a hundred miles, whether you’re barefoot or in Brooks, running or walking, slapping your heel or landing on your toes. Downhills are the worst of all. When you see runners shuffling across the Badwater finish line, it’s not because they’re too tired to push off, it’s because they’re too sore to land.

Even if you’re able to keep food down under these conditions, you’ll eventually hit the famous “wall” where the glycogen energy stores in your liver and muscles are depleted. In a marathon, the wall comes at the tail end of the race, but in an ultra, it’s not even at the midpoint and it happens many times. You’ll have to spend hours in the catabolic state where your body is forced to burn fat, protein, and even its own muscles to ensure adequate energy reaches the brain.

A cascade of stress-related hormones floods the body in response to the sustained exertion. Blood tests after ultras have shown elevated cardiac enzymes, renal injury, and very high levels of the stress hormone cortisol, the proinflammatory compound interleukin-6, and creatine kinase, a toxic byproduct of muscle breakdown. That’s a lot for the immune system to handle. Approximately one in four runners at the Western States gets a cold after the race, and this is in the height of summer!

Most of all, the ultra distance leaves you alone with your thoughts to an excruciating extent. Whatever song you have in your head had better be a good one. Whatever story you are telling yourself had better be a story about going on. There is no room for negativity. The reason most people quit has nothing to do with their body.

या पुस्तकात दाखवलेली रनींग ची अध्यात्मिक बाजु ( हो अध्यात्मिकच पण व्यक्तीगत उच्चतम मानसीक पातळीवरचा अनुभव या अर्थाने आपल्या स्टॅन्डर्ड अर्थाने नाही ) हा भाग निव्वळ अप्रतिम. अत्यंत इन्स्पायरींग अत्यंत मनस्वी भाग. त्याने केलेल्या चिंतनाच त्याच्या या संदर्भातील हे उतारे बघा

I wanted more—more victories, more speed, more spiritual development. I wanted more answers, and I thought ultrarunning could provide them. I pored over texts, exploring the link between endurance sports, altered states of consciousness, and wisdom—books like Running Wild: An Extraordinary Adventure of the Human Spirit, by John Annerino; Running and Being: The Total Experience, by George Sheehan; and The Marathon Monks of Mount Hiei, by John Stevens. The monks call their practice of Tendai Buddhism kaihogyo, an extensive daily pilgrimage through the mountainous terrain that encompasses hundreds of remote shrines, sacred peaks, stones, forests, glades, and waterfalls. To these monks, the sacred is everywhere.

The most devoted complete a 25-mile run every day for a thousand consecutive days. They wear straw sandals and carry a knife at their waist, to be used to kill themselves should they fail to continue. After five years, they conduct a nine-day fast, after which their senses are heightened to such a degree that they can hear ash fall from an incense stick. In the seventh year of their pilgrimage, the monks undertake the “Great Marathon” of 52.5 miles a day every day for a year. This extended circuit includes not only the rarified holy sites on Mount Hiei but also the crowded streets of downtown Kyoto. Each monk, as he runs past noodle bars and strip clubs, stops to give his blessing to the people in the city hurrying about their business. Each of the writers spoke of rewards beyond speed, beyond endurance, beyond victory.

आणि हा एक उतारा

Rick and many others helped teach me the great paradox of distance running. It’s a solitary activity, and to be a champion one must block out nearly everything except the next step and the next, and the one after that. Notwithstanding the thick ties that bind runner and pacer, teamwork doesn’t enter the strategic or tactical considerations of top ultrarunners.
And yet.
And yet ultrarunners—even the fiercest competitors—grow to love each other because we all love the same exercise in self-sacrifice and pursuit of transcendence. Because that’s what we’re all chasing—that “zone” where we are performing at the peak of our abilities. That instant when we think we can’t go on but do go on. We all know the way that moment feels, how rarely it occurs, and the pain we have to endure to grab it back again. The longer an ultrarunner competes, I believe, the more he grows to love not only the sport, not only his fellow ultrarunners, but people in general. We all struggle to find meaning in a sometimes painful world. Ultrarunners do it in a very distilled version. I had learned that by the time I met Rick.

पुस्तकात इतक काही आहे की बरच इथे मांडण अर्थातच शक्य नाही म्हणजे ज्या प्रसिद्ध अल्ट्रारनींग रेसेस होतात त्या जागांची महती तेथील अत्यंत खडतर नैसर्गिक परीस्थीती उदा बॅडवॉटर रेस, किंवा हार्डरॉक १०० उदा, हार्डरॉक १०० ची हि वैशिष्ट्ये पहा या रेस मध्ये स्पर्धकाला ११ माउंटन पासेस येतात.यातील ६ हे १३००० फ़ुट पेक्षा अधिक उंचीचे यात १४००० फ़ुटाची एक अगदि सरळ चढण आणि एकुण ६६००० फ़ुटांची उतरंड पार पाडावी लागते. ( माउंट एव्हरेस्ट च्या चढ उतारा पेक्षा जास्त अंतर ) हे सर्व पुर्ण करण्यासाठी मॅक्सीमम वेळ दिला जातो ४८ तास. यात एक कमरेपर्यत खोल दोन नद्यांची क्रॉसींग एक अक्खी रात्र जागरण वुइथ रनींग काहि ठिकाणी थेट ३०० फ़ुट खोल दरीत कोसळण्याचे चांसेस, .इ. बॅडवॉटर च्या वेळी अनेकांचे झालेले मृत्यु अपघात शरीरावर झालेले परीणाम

यात एका रारामुरी नावाच्या इंडियन आदिवासी जमातीच एक विलक्षण विश्व समोर येत, हे जगातील सर्वश्रेष्ठ प्राचीन रनर्स ,ज्युरेक ने त्यांच्या बरोबर धावलेल्या एका कॉपर कॅनियॉन अल्ट्रामॅरेथॉन च वर्णन निव्वळ थरारक ज्युरेक ला एक जण निमंत्रण देतो व या आदिवासीं बरोबर तो त्यांची रेस आयोजित करतो. त्यासाठी त्याने केलेली तयारी त्या महान आदिवासी रनर्स जमाती वर बॉर्न टु रन हे जगप्रसिद्ध पुस्तक आलेल आहे तेच हे रारामुरी जे टाराहुमारा नावाने देखील ओळखले जातात. त्यांच्यातला एक सर्वश्रेष्ठ रनर यात सामील होतो तो आणि ज्युरेक यांच्यातील स्पर्धा रनींग हेच जीवन असलेले रारामुरी इंडियन्स त्यांच असामान्य जीवन, आहार, धावण्याची अमानवी क्षमता इ. च वर्णन ग्रेट आणि ती रेस इ. यावर एक स्वतंत्र भन्नाट प्रकरण पुस्तकात येत,

तर अल्ट्रारनींग च एक आगळ वेगळ विश्व हे पुस्तक दाखवुन देत जिथे मानवी प्रयत्नांची पराकाष्ठा दिसते. हे सर्व इतक रोमांचक आहे की एकदा तुम्ही मुळातुन पुर्ण पुस्तक वाचाच आफ़्टर ऑल ट्रेलर मध्ये कितीक पिक्चर दाखवणार आणि कितीक स्टोरी सांगु नाही का ? मी देखील आता ज्युरेक आणि अल्ट्रारनींग बद्द्दल माहिती गोळा करतोय
शेअर करा प्लीज इफ़ यु फ़ाइंड समथींग मोअर !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

अरे काये हे, लैच जबरदस्त. वाचणार म्हणजे वाचणारच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मुरलीधर खैरनार यांनी लिहिलेलं "शोध" नावाचं पुस्तक सध्या चर्चेत आहे. शिवकालीन इतिहासावर आधारित डॅन ब्राऊन स्टाईल थ्रिलर आहे म्हणे. कोणी वाचलं आहे का? कसं आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मैने वाचा है!
पुस्तक आवडलं आहे. पुस्तकाबद्दल काहीही लिहीलो तर स्पॉयलर्स होतील असं वाटल्याने ते टाळतो आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सगले हेच बोल्तायत राव. त्वरित वाचायला पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

'आवरण' सारख्या बटबटीत पुस्तकानंतर डॅन ब्राउनछान म्हटले की भितीच वाटते Wink

(आवरणपेक्षा सहा सोनेरी पाने वाचावे, त्याहून कितीतरी अधिक माहिती आणि उत्तम शैली दोन्ही!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आवरण आणि सहा सोनेरी पाने या दोहोंमध्ये बटबटीत कशाला म्हटलेय हे पाहता आकलनाबद्दल काही गंमतीशीर व उद्बोचक अर्थनिर्णयन करायला पुष्कळ वाव आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

दोन्ही पुस्तकं वाचायला पाहिजेत.
सावरकरांचं फारसं काही वाचलं नाही.
पण पर्व वाचून भैरप्पांचा मोठा फ्यान झालो आहे. त्या पुस्तकावरून तरी भैरप्पा "बटबटीत" लिहीतील ह्यावर विश्वास बसणं कठीण आहे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण इस्लामिक अत्याचाराची वर्णने आली रे आली की बटबटीतपणाचा शिक्का बसलाच म्हणून समजा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

(पुस्तक न वाचताच उगाच एक कमेंट करतोय. भैरप्पा बटबटीत लिहीत नाहीत उलट subtle लिहीतात हे गृहितक सत्य आहे असं समजा.)
तेव्हा आता भैरप्पांनी लिहिलेली अत्याचाराची वर्णनं जर बटबटीत वाटत असतील, तर खरे खुरे अत्याचार काय असतील? Tongue
.
पण पर्व वाचलंच असेल ना इथे लोकांनी? काय जब्राट पुस्तक आहे. महाभारत पहिल्यांदा असं अगदी खरंखुरं वाटलं. कदाचित तसंच घडलं असेल असंही वाटून गेलं!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तेव्हा आता भैरप्पांनी लिहिलेली अत्याचाराची वर्णनं जर बटबटीत वाटत असतील, तर खरे खुरे अत्याचार काय असतील?

अलैबरल्यम्! असैकुलर्यम्! ROFL

पण पर्व वाचलंच असेल ना इथे लोकांनी? काय जब्राट पुस्तक आहे. महाभारत पहिल्यांदा असं अगदी खरंखुरं वाटलं. कदाचित तसंच घडलं असेल असंही वाटून गेलं!

अगदी असेच म्हणतो. काय विस्तीर्ण क्यानव्हास आहे तो, बापरे! इतकी वर्षे चालू असलेली व्यवस्था 'संपत आल्याची' भावना जागोजागी प्रखर होते. त्या समाजातले ताणेबाणे ज्या ताकदीने दाखवलेत त्याला वट्ट कुठेच तोड इल्ले. मूळ कन्नडमध्ये एकदा पूर्ण वाचायची आहे. (आणून ठेवलीये पण तेवढी व्होक्याब पायजे, त्याकरिता मुहूर्त लागला पाहिजे वगैरे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एकदा काय ते ठरवा बुवा. एकदा म्हणता "गंमतीशीर व उद्बोचक अर्थनिर्णयन करायला पुष्कळ वाव आहे" आणि इथे अर्धफुटी प्रतिसाद देऊन का थांबता? हाच का तो पुष्कळ वाव?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

एक वाव म्हणजे एकच वाव, इथे पहा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

wow हा नॉर्मल वाव
wwwooooooooooowwww (उच्चारी awwwwww सारखा करावा) हा झाला पुष्कळ वाव
.
आणि हा अख्खा प्रतिसाद म्हणजे बाष्कळ वाव.
कळ्ळे मगे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाष्कल की शाकल?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सध्या उस्मानिया विद्यापीठाच्या सायटीवर मिळालेलं 'महाराष्ट्र दर्शन' नावाचं गोनीदांचं पुस्तक वाचतो आहे. रसाळ भाषेतली महाराष्ट्राची ओळख वाचायला मजा येते आहे. महाराष्ट्रातल्या शेतीवर लिहिताना ते एका पिकाविषयी लिहितात -

"...श्रीविठ्ठलाची मूर्ति कमरेवर हात ठेवून या पिकाची उंची दाखवते. गणपति वरदहस्तानें पानांचा आकार दाखवतो. तथागत बुद्ध चिमूट मिटून याच्या सेवनाचें प्रमाण सांगतात. अन् हनुमंत चपेटा उगारून धाक दाखवतो, कीं जो या वल्लीचे सेवन करणार नाहीं, त्याचें थोबाड मी इकडून तिकडे करून टाकीन!

पण ही केवळ थट्टा झाली. पिकाचें नांव तंबाखू..."

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आंतरजालावर हे कठीण विनोद सापडले. रोचक वाटले कुणी अर्थ सांगु शकेल का ?
कळले तर हसुन घेउ थोड , तस हसण्यासाठी इतका जोर लावण हाच मोठा विनोद आहे
मै जानता हु मगर यु ही....

1. Einstein, Newton and Pascal are playing a rousing game of hide and seek. Einstein begins to count to ten. Pascal runs and hides. Newton draws a one meter by one meter square in the ground in front of Einstein then stands in the middle of it. Einstein reaches ten, uncovers his eyes, and exclaims “Newton! I found you! You’re it!” Newton replies “You didn’t find me. You found a Newton over a square meter. You found Pascal!”

2. A mathematician and an engineer decided they’d take part in an experiment. They were both put in a room and at the other end was a naked woman on a bed. The experimenter said that every 30 seconds they could travel half the distance between themselves and the woman. The mathematician stormed off, calling it pointless. The engineer was still in. The mathematician said “Don’t you see? You’ll never get close enough to actually reach her.” The engineer replied, “So? I’ll be close enough for all practical purposes.”

3. A buddhist monk approaches a burger foodtruck and says “make me one with everything.” The buddhist monk pays with a $20 bill, which the vendor takes, puts in his cash box, and closes the lid. “Where’s my change?” the monk asks. The vendor replies, “change comes from within”.

4. Jean-Paul Sartre is sitting in a cafe revising his first draft of Being and Nothingness. He says to the waitress, “I would like a cup of coffee please. No cream.” the waitress replies, “I’m sorry sir, but we’re out of cream. How about with no milk?”

5. Noam Chomsky, Kurt Godel and Werner Heisenberg walk into a bar. Heisenberg turns to the other and says “Obviously this is a joke, but how can we tell if it’s funny?” Godel replies “We can’t know that because we’re inside the joke.” Chomsky says “Of course it’s funny, you’re just telling it wrong.”

6. It’s hard to take kleptomaniacs and puns seriously. Why? They take things literally.

7. What do you get when you cross a joke with a rhetorical question?

8. Three logicians walk into a bar. The bartender asks “Do all of you want a drink?” The first logician says “I don’t know.” The second logician says the same. The third says “Yes!”

9. A Roman walks into a bar and asks for a martinus. “You mean a martini?” asks the bartender. The Roman replies, “If I wanted a double, I would have asked for it.”

10. Another Roman walks into a bar, holds up two fingers, and says “Five beers please!”

11. A logician’s wife is having a baby. The doctor hands the baby to the dad. His wife asks if it’s a boy or girl. The logician replies “Yes.”

12. Boy I tell ya, entropy ain’t what it used to be.

13. How do you tell the difference between a plumber and a chemist? Ask them to pronounce unionized.

14. Why do engineers mix up Christmas and Halloween? Because Oct 31 = Dec 25

15. Pavlov is at a bar enjoying a pint. The phone rings and he shouts “Oh! I forgot to feed the dog.”

16. Helium walks into a bar and orders a beer. The bartender says, “Sorry, we don’t serve noble gases here.” Helium doesn’t react.

17. Shrodinger’s cat walks into the bar and doesn’t.

18. A Higgs Boson walks into a church. The priest says “We don’t allow Higgs Bosons in here.” The Higgs Boson replied, “Well, without me, you can’t have mass.”

19. A programmer’s wife asks him to pick up a loaf of bread and, if they have eggs, get a dozen. The programmer comes home with a dozen loaves of bread.

20. There’s a band called 1023MB. They haven’t had any gigs yet though.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

बरेचसे इंजिनेरिंग्/फिजिक्स प्रांतातले आहेत, ते कळले.
४ कळला नाही- सार्त्रच्या काहीतरी existentialism वर आहे असं वाटतंय.
१५ वा भारी आहे (विज्ञानयुगमधे "कोण कुणाच्या फिरक्या घेतंय?" नामक कथा वाचली होती ती आठवली. कोणी वाचलीये का?)
१९ आणि २० पटले!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

4. Jean-Paul Sartre is sitting in a cafe revising his first draft of Being and Nothingness. He says to the waitress, “I would like a cup of coffee please. No cream.” the waitress replies, “I’m sorry sir, but we’re out of cream. How about with no milk?”

>> ४ कळला नाही- सार्त्रच्या काहीतरी existentialism वर आहे असं वाटतंय.

विनोद समजावून सांगणं मुळातच कठीण असतं; त्यात फ्रेंच इन्टेलेक्चुअल विनोद समजावणं (तेही अ‍ॅन्ग्लो-सॅक्सन संस्कृतीशी परिचित माणसाला!) आणखीच कठीण Wink पण काही मदत -

 1. मनुष्य स्वतंत्र असतो का? अस्तित्ववादानुसार मनुष्याला स्वातंत्र्याची शिक्षा झालेली आहे - l'homme est condamné à être libre.
 2. त्याला निर्णयस्वातंत्र्य असतं का? ते असो किंवा नसो, निर्णय घ्यावे लागतातच. म्हणजे तेसुद्धा माणसाला भाग पडतं.
 3. मग 'फ्री विल' आहे का? तर तीसुद्धा असतेच, आणि तिचं तसं (म्हणजे तिला परिपूर्ण करणार्‍या अनेक घटकांच्या नसण्यासकट) असणं हीच एक शिक्षा आहे.
 4. म्हणजे एखाद्या घटकाच्या 'नसण्या'तूनही कशाचं तरी अस्तित्व सिद्ध होतं.
 5. To be, or not to be, that is the question: Whether 'tis Nobler in the mind to suffer The Slings and Arrows of outrageous Fortune, Or to take Arms against a Sea of troubles, And by opposing end them: to die, to sleep वगैरे

ह्या सगळ्याला एकत्र करून ह्या चौकटीत बसवलं आहे -
'क्रीम नसणं'च्या अस्तित्वाचा पर्याय तुम्हाला नाही; मग त्याऐवजी 'दूध नसणं'च्या अस्तित्वाचा उपलब्ध पर्याय तुम्ही स्वीकाराल का? म्हणजे तुम्ही त्याची निवड कराल का? त्यानं तुम्हाला मिळू शकणार्‍या कॉफीचं, पर्यायानं तुमच्या निवडस्वातंत्र्याचं आणि पर्यायानं तुमच्या अस्तित्वाचंही - नक्की काय होतं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

बरं झालं गणपती घरी असताना हा जोक आला, थोडी बुद्धी मागूनच घेतो आता.
थोडक्यात "तुम जो हो.. वो तुम नही हो. वोह जो है वोह वोह नही है. मै जो हू- क्या मै मै हू या मै भी वो नही जो मै हू."
अंदाज अपना अपनाच्या डायलॅक मधे एवढा गहन अर्थ असेल असं वाटलं नव्हतं!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>> थोडक्यात "तुम जो हो.. वो तुम नही हो. वोह जो है वोह वोह नही है. मै जो हू- क्या मै मै हू या मै भी वो नही जो मै हू."

अंहं तसं नाही ते. 'तुम जो हो वो वोह जो नही है उसके नसणे से हो और वोह जो नही है उसकी बजाय वोह अगर होता तो मै मै नही होता जो मै हूं'
कुछ कळा?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

नका हो, एवढा मनस्ताप नका करून घेऊ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

किती मार्मिक असाव विश्लेषण
आणि किती विनोदी असाव
खालच्या व वरच्या दोन्ही प्रतिसादांसाठी
दंडवत स्वीकारावा
_/\_
अजुन एक थोडी गळे पडु विनंती
ते थोडं
7. What do you get when you cross a joke with a rhetorical question?

याचं विश्लेषण करुन दिल असत तर आनंद वाटला असता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

Rhetorical_question - A rhetorical question is a figure of speech in the form of a question that is asked in order to make a point rather than to elicit an answer.
उदा : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?
ह्या प्रश्नाचं उत्तर कुणी देणं अपेक्षितच नाही. ते प्रश्नातच आहे.

What do you get when you cross a क्ष with a य? ही विनोदाची एक विधा आहे (genre).
उदा : What do you get when you cross a karate expert with a pig?
A pork chop.

पण विनोदाच्या ह्या प्रकारात काही तरी उत्तर येतं तेव्हाच विनोद पूर्ण होऊ शकतो. मात्र, ह्या प्रकारातल्या विनोदाचा आणि Rhetorical_questionचा जेव्हा संकर होतो तेव्हा... आता कळलं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

जंतु जी
खुप च सुंदर उलगडुन दाखवलय हो तुम्ही
हॅट्स ऑफ टु यु सर
ईश्वर तुमच्या आवडत्या माणसाला लवकरात लवकर इन्स्टीटयुट च्या संचालकपदी आणो
किंवा किमान नावडत्याला तरी परत पाठवो
इस उम्मीद के साथ
पुनश्च धन्यवाद

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

ओह असं आहे होय Smile
कळलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आई ग्ग! बाप रे !!! चिंता __/\__

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

4. Jean-Paul Sartre is sitting in a cafe revising his first draft of Being and Nothingness. He says to the waitress, “I would like a cup of coffee please. No cream.” the waitress replies, “I’m sorry sir, but we’re out of cream. How about with no milk?”

ह्या विनोदाचे देशी रुपांतर ऐकले ते खालीलप्रमाणे
एक मद्राशी(!) अ‍ाणि एक सरदार (हुश्श) एक्सप्रेस रेलवेने प्रवास करत असतात. डब्यात स्थिरस्थावर झाल्यावर सरदार एक पाण्याने भरलेला ग्लास आणि दुसरा रिकामा ग्लास काढून बाहेर ठेवतो.
मद्राशी सहप्रवासीः पाजी, हा पाण्याचा ग्लास कशासाठी?
सरदारः जर तहान लागली तर.
मद्राशीः आणि रिकामा?
सरदारः तहान नाही लागली तर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी प्रत्यक्ष अनुभवलेला एक किस्सा:

एक गोडुला गुजराती तरूण पानाच्या टपरीवर आला.

गोगुत: बनारस सादा पान द्या
पानवाला: (पान बनवायला लागतो)
गोगुत: (एका रँडम डबीकडे बोट दाखवत) ते काय आहे?
पानवाला: तीनशे
गोगुत: तंबाखू असते का त्यात?
पानवाला: हो
गोगुत: असं करा, मला मसाला पानच द्या.

मी आणि पानवाला हतबुद्ध होऊन एकमेकांकडे पहायला लागलो. गोगुत मसाला पान घेऊन निघून गेला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

14. Why do engineers mix up Christmas and Halloween? Because Oct 31 = Dec 25

हा विनोद (इंजिनयर असूनही) कळला नाही बॉ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

http://www.rapidtables.com/convert/number/octal-to-decimal.htm
ऑक्टल टू डेसिमल कन्व्हर्ट करा Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हेक्झाडेसिमल

अगदी पांचट आहे तो जोक. बरेचसे पांचट आहेत, खरंतर. असो.

आणि, इंजिनीअरांना उगाचच मध्ये आणलंय. सार्त्र कशाशी खातात याचा अन इंजिनीअरांच्या काय संबंध? त्यांना फारतर आर्द्र विचारा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

Three logicians walk into a bar. The bartender asks “Do all of you want a drink?” The first logician says “I don’t know.” The second logician says the same. The third says “Yes!”

मस्त मस्त!!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पायपीट हे सतीश काळसेकरांचं पुस्तक वाचलं. लोकवाङ्मय गृहाचं प्रकाशन आहे.
मुख्यत्वे हिमालयाच्या रस्त्यांवरून लेखकाने गेल्या चाळिसेक वर्षांत केलेल्या मुशाफिरीमधले ते अनुभव आहेत. क्वचित हिमालय सोडून माथेरानसारख्या सफरींबद्दलही लेखक लिहितो. पण पुस्तकातला प्रवास नक्की कुठल्या भागांमधून केलेला आहे हे फारसं महत्त्वाचं नाही. त्या प्रवासामागचा नजरिया खरा दिलचस्प आहे. आरक्षणाशिवाय जनरल डब्यांतून केलेल्या प्रवासाची वैशिष्ट्यं, त्यातून येणारे प्रवाशांच्या बदलत्या खिशांचे आणि मनोवृत्तीचे अंदाज, एकूण पर्यटनाकडे पाहण्याचा बदललेला दृष्टिकोण, स्थानिक भूगोलाकडे पाहण्याची दृष्टी, नेहमीच्या सुखसोयींपेक्षा निराळ्या सुखांकडे (आणि काही गैरसोयींकडे आणि खोळंब्यांकडे!) पाहणारी लेखकाची तिरकी आणि सहनशील नजर, काही चकित करणारे विलक्षण योगायोग (एकाच भागातल्या दोन सफरींमध्ये एकाच वळणावर एकच लंगडा कोल्हा पुन्हा दिसणे), अगदी आडवाटेच्या अशा पहाडी चवी, प्रवासातच जुळून येणारी औटघटकेची आणि आयुष्यभराची मैत्रं... असे अगदी अनवट अनुभव या पुस्तकातून मिळतात.
काळसेकरांची अनाग्रही, आर्जवी, (कर्णिकांनी इथे जिला अस्सल म्हटलं आहे तशा प्रकारची) अस्सल मराठी भाषा मुळातून अनुभवावी अशी. त्यावर बोनस म्हणून शेवटच्या प्रकरणात लेखकाची त्रोटक तपशील टिपणारी डायरी आहे. तिच्यात लेखकाच्या एरवी सामाजिक शिष्टाचारामुळे बंदिस्त राहणार्‍या रंगेल, मिश्किल स्वभावाच्या काही जागा दिसतात (स्नानाच्या वेळी पाहिलेल्या स्त्रियांच्या देहाचं रसग्रहण, काही मित्रांच्यात एकमत होऊन प्रवास खंडित होऊ नये म्हणून खेळलेलं राजकारण, धुरावलेलं आणि राख मिसळलेलं बोकडाचं मटण, इत्यादी) आणि या सगळ्या लेखनाला निराळीच खुमारी येते.
निराळ्या वाटेनं प्रवास करणार्‍या भटक्यांना आणि असल्या भटकंत्या नुसत्या शब्दांतून अनुभवायला आवडणार्‍या वाचकांनाही आवडावं, असं पुस्तक आहे. एकसाची प्रवासवर्णनं वाचून नजरेला आलेला चिकटा गेला एकदम!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

शेवटच्या प्रकरणात लेखकाची त्रोटक तपशील टिपणारी डायरी आहे. तिच्यात लेखकाच्या एरवी सामाजिक शिष्टाचारामुळे बंदिस्त राहणार्‍या रंगेल, मिश्किल स्वभावाच्या काही जागा दिसतात (स्नानाच्या वेळी पाहिलेल्या स्त्रियांच्या देहाचं रसग्रहण, काही मित्रांच्यात एकमत होऊन प्रवास खंडित होऊ नये म्हणून खेळलेलं राजकारण, धुरावलेलं आणि राख मिसळलेलं बोकडाचं मटण, इत्यादी) आणि या सगळ्या लेखनाला निराळीच खुमारी येते.

बाकी पुस्तक एकीकडे आणि ते परिशिष्ट १ एकीकडे. दोनदोन तीनतीन शब्दांची अर्धीमुर्धी वाक्यंव "।" वापरून तोडलेली. On the fly केलेल्या नोंदी. प्रवासी कोण, कुठून आले यावर कोणतंही ब्याकग्राऊंड लेखन नाही. मनातले बरेवाईट भाव स्पष्ट नागडेपणाने कागदावर शिंपडून टाकले आहेत. बेष्ट ताजं लेखन.

बाकी पुस्तकात बरीच पुनरावृत्ती आहे. हिमालय, हरमिश, स्वस्तातील प्रवास वगैरे तेचतेच वाचून नंतर वैताग आला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

On the fly केलेल्या नोंदी. प्रवासी कोण, कुठून आले यावर कोणतंही ब्याकग्राऊंड लेखन नाही. मनातले बरेवाईट भाव स्पष्ट नागडेपणाने कागदावर शिंपडून टाकले आहेत. बेष्ट ताजं लेखन.

Paul Theroux चे 'द ग्रेट रेल्वे बझार' आठवले. लंडन ते इस्तंबूल ते भारत ते व्हिएतनाम ते जपान ते परत ट्रान्स-सैबेरियन मार्गाने लंडन या सार्‍या (बव्हंशी) रेल्वे-प्रवासाचं वर्णन जेमतेम ३०० पानांत आटोपतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आबा, फिट्टूस! Wink

नंदन, हे वाचायच्या लायनीत आहे कवाचं! आता पुढच्या आठवड्यात.

मी सध्या अपरूटेड वाचते आहे. खूप दिवसांनी साधी आणि सुंदर अद्भुतकथा मिळाली आहे.
***

सुंदर आहे अपरूटेड. जंगलं आणि युद्धं आणि राजे आणि प्रेम आणि जादू... अनेकपदरी गोष्ट आहे. साधीसुधी क्लासिक प्रेमकथा. एका साध्याशा खेडवळ मुलीला तिच्यातली जादू सापडल्यावरच्या तिच्या खडतर आणि रोमांचक प्रवासाची कथा. जंगलं आणि माणसं यांच्या रस्सीखेचीची कथा. युरोपियन संस्कृतीतल्या साध्यासुध्या पारंपरिक पाककृती आणि तिथले हिवाळे आणि तिथला निसर्ग आणि तिथल्या धनगरी संस्कृती आणि तिथल्या जंगलांचा विशिष्ट स्वाद. जादू म्हणजे जादूची छडी आणि मोठ्ठा आवाज या लोकप्रिय समजापलीकडे जाणारी लयबद्ध जादू. निसर्गाच्या चमत्काराच्या जवळ जाणारी. तिच्या या रूपाला साजेशी पोशन्स आणि चार्म्स आणि उमलती फुलं आणि दोन सुहृदांच्या जादूचा मिलाफ... अहाहा! मजा आ गया!

यातल्या नायिकेचा अनघड-अल्लड-जिवंतपणा आणि तिच्या शिक्षका्ची पुस्तकी-तार्किक-कठोर दृष्टी यांच्यातल्या ठिणग्या बघताना कितव्यांदातरी ती फुलराणी-पिग्मॅलियन-माय फेअर लेडी-प्रीटी वुमन आठवून आली आणि अजूनच मजा आली. त्या गोष्टीतल्या कितीतरी पाककृती मुद्दाम शोधून पाहिल्या. zhurek सारखी रायचं पीठ आंबवून करण्याची आंबट-ओशट-खारट आणि पारंपरिक पोलिश सुपं, सफरचंदांचे पातळ सोनेरी काप आणि त्यावर ओतलेला जाड मध, शिळे होऊन कोरडे पडलेले पावाचे कुरकुरीत तुकडे, bili सारखी आंबवलेली-खारवलेली फळं भरून करतात ती धिरडी... हे सगळं हुडकून हुडकून वाचायला नि निरखायला फार म्हणजे फारच मजा आली. आता हे सगळं चाखायला केव्हा मिळेल कुणास ठाऊक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

तुला ही कादंबरी आवडावी!

rivers

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक नंबर आहे ही संपूर्ण सीरिज. फॉक्सग्लोव्ह समर नंतरचं लेटेष्ट पुस्तक येऊ घातलं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

तत्काळ वाचणेचे करण्यात येईल..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

सध्या मी ग्रंथालयातून घेतलेले, http://www.amazon.com/The-Private-Sea-LSD-Search/dp/B000V00PC2 - The Private Sea: LSD & the Search for God नावाचे पुस्तक वाचत आहे. आपल्याला ते ऑनलाइनही मिळू शकेल. बरच रोचक पुस्तक आहे. यात लेखकाने म्हटले आहे की लहानपणीपासून जे कंडिशनिंग झालेले असते ते LSD सारखे ड्रग्ज काढून टाकतात. मेंदूतील एक बंद दालन उघडले जाते. ज्याप्रमाणे खिडकी उघडली की आपल्याला देखावा दिसतो तरी आपण खिडकी हे देखाव्याचे कारण आहे असे म्हणत नाही, जसे मनोरुग्णांना शॉक दिल्याने, त्यांच्या व्यवहारात शहाण्यासुरत्यांची तर्कसुसंगती येते परंतु आपण शॉक हे तर्कसुसंगतीचे कारण धरत नाही. ती असतेच फक्त दृगोचर होते, तिचे भान येते त्याचप्रमाणे LSD हे काही अध्यात्मिक्/पारलौकिक अनुभवांचे कारण नाही. हे फक्त निमित्त आहे एक वेगळी रिअ‍ॅलिटी आपल्यापुढे उघडे करण्याचे. ही रिअ‍ॅलिटी नेहमी आहेच.
.
लेखक उदाहरण देतो की - लहानपणी आपण "स्टॉप" खूण बघतो, आणि आपल्याला वाटतं किती सुंदर लाल चमकणारा गोळा आहे. जसजसे मोठे होतो तसेतसे लाल "दिवा", "थांबा" आदि अ‍ॅब्स्ट्रॅक्ट कंडिशनिंग होत जाते. LSD हे कंडिशनिंग काढून टाकते. नेहमीची रिअ‍ॅलिटी ही जर स्पॉटलाइट असेल तर LSD घेऊन आलेली रिअ‍ॅलिटी ही फ्लड्लाईट असते. हीच उपमा चपखल आहे.
.
जपानी गुरु हेच कंड्शनिंग काढून टाकण्यासाठी KOAN नावाची कोडी सोडवतात. ही कोडी अशा प्रकारची असतात- एका हाताने टाळी वाजविल्यास कसा आवाज येइल? तुम्हाला हा चेहरा मिळण्याआधी तुमचा चेहरा कसा होता? अर्थात कोड्यांमध्ये तर्काला वाव नाही आणि हेच उद्देश्य आहे या कोड्यांचे- तर्काच्या परे जाणे. तुम्ही जपनी झेन गुरुस विचारले की व्हॉइड काय आहे? वास्तव म्हणजे काय? तर तो फक्त एखाद्या चेंडूला किक देईल किंवा स्वतःच्या पापणीवर फटका मारेल. अर्थात हेच आहे - वास्तव "आहे". It is just "being".. "आहे"
.
एका सायकिअ‍ॅट्रिस्टचा LSD घेऊन आलेला अनुभव (नीरीक्षकाने टेप केलेला) अत्यंत रोचक आहे - म्हणजे त्याने फुलाकडे तासनतास पहाणे आणि त्याला भास होणे की आंतरिक प्रकाशाने ते फूल तेजस्वी आहे.एकाच लाकडाचे टेबल, लहान मेज, खुर्ची हे जणू एकाच कुटुंबातील वाटणे, भिंती आत्मप्रकाशाने पण कमी अधिक झळाळताना दिसणे. आदि.
.
अनेक LSD घेतलेल्या लोकांना - त्यांनी प्रत्यक्ष "Godhead" penetrate केल्याचा साक्षात अनुभव येतो. सबकॉन्शसच्या ज्या मर्यादेपर्यंत फ्रॉइड, जाऊन परत फिरला, त्याच्याने जाववले नाही , तेथे या द्रव्याचे प्रयोग केलेले लोक बिनदिक्कीत जातात. आणि हाच कळीचा मुद्दा आहे, थिऑलॉजिस्ट तसेच सायंटीस्ट दोघांना वाटते आहे की LSD हे ड्रगच , देवाच्या अस्तित्वावरती काही प्रकाश टाकला तर टाकू शकेल.
.
या पुस्तकात LSD द्रव्याचा "स्पिरिच्युअल" पैलू अभ्यासला आहे. अजुनही वाचतेच आहे. altizer यांच्या "God is Dead" नामक विचारधारे बद्दल माहीते आहे. altizer यांची मुलाखतच पुस्तकात सापडते - altizer यांच्या मते, फार पूर्वी transcendental देव होता. म्हणजे अध्यात्मिक प्रतलावरचा देव. पण त्याने एकदा स्वतःला जिजझ ख्राइस्ट मध्ये empty केले. पुढे त्याला सूळावर तर चढविले परंतु त्याचे resurrection झाले नाही. अर्थात तो देव परत अध्यात्मिक प्रतलात गेलाच नाही. तो इथेच घटाघटात राहीला. आणि अजुनही तो वाढतोच आहे, विस्तारतोच आहे, "evolve" होतो आहे. बरेच असे भाग आहेत जिथे तो पोचला नाही. पण सांगायचा मुद्दा "देव" ज्याला म्हणतो तो "अध्यात्मिक" प्रतलावरचा निर्गुण देव मेलेला आहे. God is dead
.
जसजसे अधिक वाचेन आणि जर कळले तर याच प्रतिसादात पोस्ट करेन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लहानपणी आईने सांगीतलेले कोरले गेले होते की "लागा चुनरीमे दाग, छुपाऊं कैसे, घर जाऊं कैसे" या गाण्यात काहीतरी सांकेतीक तत्वज्ञान आहे. वरवर वाटतो तो अर्थ नाही त्या गाण्याचा. पुढे विचार करताना, कळले - हे गाणे मृत्युचे रुप वर्णन करते. बाबुल, पिता म्हणजे प्रत्यक्ष ईश्वर आणि माहेरी जाणे म्हणजे - मृत्यु असा काहीसा अर्थ आहे.
नंतर अजुन एक कविता भा.रा. तांब्यांची अधिक स्पष्टपणे मृत्युचा संकेत देणारी वाचनात आली, ती म्हणजे - "घन तमी शुक्र बघ राज्य करी"

मना, वृथा का भिशी मरणा ? दार सुखाचे हे हरीकरुणा !
आई पाहे वाट रे मना | पसरुनी बाहू, कवळण्या उरी

या कवितेमध्ये मृत्युस "हरीकरुणेचे द्वार" म्हटले आहे. ईश्वरास आई.
अर्थात अनेक कविंना मृत्यु या संकल्पनेने मोहविले आहे. हे जे गूढ आहे ते सांकेतिक अथवा प्रत्यक्ष उपमांद्वारे उलगडण्याचा प्रयत्न कवींनी केलेला दिसतो.
.
अशीच एक लोभस इंग्रजी कविता वाचनात आली, जिचा सारांश असा होता -
एक पब आहे. इथे वेळ घालवण्याकरता संध्याकाळचे बरेच वृद्ध सखेसोबती जमतात. बरच वय झालेल्या या वृद्धांमध्ये कोणाला कॅन्सर आहे, कोणाला हृदयविकार तर कोणाला स्ट्रोक. पण सारेजण दु:खाला कवटाळून न बसता, खरं तर भविष्याचा विचारही न करता, मजेत वेळ घालवत आहेत. रोज इथे जमायचे, बीअर पीत, हास्यविनोद करत कालक्रमणा करायची हा इथला दस्तुर आहे. काही वयाने जास्तच वृद्ध मात्र कधीकधी फिलॉसॉफिकल मूडमध्ये विचार करतात , स्वतःचे बालपण आठवतात - असेच आपण सवंगडी जमत असू, गप्पा, खेळ भरात येत असे आणि नेमकी झोपायची वेळ होत असे. मग काय विचारता, आई-बाबांपैकी कोणीतरी बखोटीला धरुन नेत असे. पण त्या दिवसाची, आपली खेळण्याची हौस मात्र पुरी झालेली नसे - कोणाला टेडी बेअर हवा असे, तर कोणाला बाजा, कोणाला अजुन गप्पा मारायच्या असत तर कोणाला झोपायला जायचेच नसे. पण आपल्या कांगाव्याला, रडारडीला भीक न घालता आई मुटकुळं बांधून, दमदाटीने घेऊन जात असे.

Perhaps the older ones allow some inkling
into their thoughts. Being hauled, as a kid, upstairs to bed
screaming for a teddy or a tinkling
musical box, against their will. Each Joe or Fred
wants longer with the life and lasses
And so their time passes.

आता आपण सारेजण वयाने वाढलो. खरं तर आपल्या नकळत वार्धक्य आले. आणि आता बोटींग पूलचा मालक, नंबर पुकारणार- नंबर ८०....नंबर ६७ आणि त्या-त्या नंबराला कांगावा/रडारड न करता एक्झिट घ्यावी लागणार. आता कळतय वार्धक्याला दुसरे बालपण का म्हणतात ते.

Second childhood: and 'Come in, number eighty!'
shouts inexorably the man in charge of the boating pool.
When you're called you must go, matey,
so don't complain, keep it all calm and cool,

.
ही कविता खालील दुव्यावरती सापडेल - http://writersalmanac.publicradio.org/index/index.php?date=2001/10/29

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या गीतात तत्त्वज्ञान आहे, पण ते मृत्यूचे नाही. अर्थ काहीसा असा आहे :
इथे बाबुल म्हणजे पितारूपी ईश्वर. त्याने बिदाई करून या दुनियेत म्हणजे सासरी पाठवले. पण मी सासरच्या या मायाजालात रमून गेले. नको नको ते डाग माझ्या कोर्‍या करकरीत चुनडीला लावून घेतले. ईश्वराने दिलेला देह कुकर्मांनी डागाळून टाकला. आता मी माझ्या पित्याला माझे तोंड कसे दाखवू? मूळचा पवित्र (कोरा बदन) आत्मा ह्या मोहजालात गुरफटला आणि देहभोगाचे त्यावर लिंपण झाले. आता मी या लिप्ताळ्यासकट परमात्म्यापर्यंत कशी पोहोचू? सासरी जाताना म्हणजे या दुनियेत येताना सद्वर्तनाची वचने दिली होती पित्याला, ती सर्व विसरून गेले. आता मी पित्याच्या डोळ्यांना डोळे कसे भिडवू?
जन्म घेतल्यावर आत्मा स्वस्वरूप विसरतो आणि भोगात रमतो. थकले रे नंदलाला या गाण्याचा अर्थही थोडासा असाच आहे.
स्वतःला स्त्रीरूपात कल्पून ईश्वर हा जणू प्रियकर आणि त्याच्या मिलनाची आस लागलेली, विरहाग्नीत होरपळणारी अशी ही सखी हा भाव सूफी संगीतात वारंवार दिसतो. काही ठिकाणी याला मधुराभक्ती म्हणतात.
ज्ञानेश्वरांच्या 'चंदनाची चोळी माझे अंग अंग पोळी, कान्हो वनमाळी वेगी भेटवा का' या प्रकारच्या विराण्या प्रसिद्धच आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सिरियसली लिहिलाय का प्रतिसाद? "लागा चुनरी में दाग" ला खरंच इतका गहन अर्थ आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मला विनोदी लिहिता तरी येतं का? Wink
इथे पाहा. शेवटचे कडवे स्पष्टच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्हाला ट्रोल करत नाहीये, कृ० गैरसमज नसावा. पण असे अर्थ अनेक गाण्यांतून जुळवता येतात. ..लाईज इन द आईज ऑफ बिहोल्डर हे याही बाबतीत खरं असावं.

आता उदा० म्हणून हे पहा:

गोली मार भेजे में...
इथे "भेजा" हे अज्ञानाचं, विषयांचं प्रतीक आहे, आणि "गोली" हे सद्गुरूचं प्रतीक आहे.

.. के भेजा शोर करता है
म्हणजे अज्ञानाच्या गलबल्यामुळे परमतत्त्वाचा आवाज मानवाला ऐकू येत नाही. विषयवासनेच्या पुटांमधून झळझळीत असं परमतत्त्व झाकोळलं गेलं आहे.

.. भेजे की सुनेगा तो मरेगा कल्लू... मामा
म्हणजे विषयलोलुपतेच्या मागे लागून कल्लू (म्हणजे माणूस) तात्पुरता मरेल, पण...

.. तू करेगा दूसरा भरेगा कल्लू... मामा
त्याला मोक्ष मिळणार नाही. दूसरा (म्हणजे दुसरं शरीर) गतजन्मातली पापं धूत बसेल. चक्र चालू राहील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

ते खरच असावं. मीही प्रवचनांमधून हाच अध्यात्मिक अर्थ ऐकलेला आहे.
अवांतर :-
हे संत लोक शिरेसली त्यच अर्थानं बोलायचे की मग उलट आम पब्लिकलाच हौस होती संत लोकांनी काही म्हटलं तरी अध्यात्माशी संबंध जोडायची ; हे समजत नाही.
एकनाथांच्या वर्ल्ड फेमस ओळी आहेत वैतागलेल्या सुनेच्या भूमिकेतून लिहिलेल्या. लोकं त्याचाही अध्यात्मिक अर्थ आहे असं म्हणतात बुवा .
ह्या त्या ओळी :-
सत्वर पाव गे मला । भवानीआई रोडगा वाहिन तुला |
सासरा माझा गावी गेला । तिकडेच खपवी त्याला |
सासू माझी जाच करती । लवकर निर्दाळी तिला |
जाऊ माझी फडफड बोलती । बोडकी कर ग तिला |
नणंदेचे पोर किरकिर करिते । खरूज होऊ दे त्याला |
दादला मारुन आहुती देईन । मोकळी कर गे मला |
एकाजनार्दनी सगळेचि जाऊं दे । एकटीच राहू दे मला |
.
.
तर भाविक लोक प्रत्येक गोष्टीचा असा अध्यात्मिक अर्थ काडह्तात.
तर दुसरीकडे पुरोगामी, विवेकवादी, क्वचित नास्तिकही संतांचाच वारसा सांगतात.
ही मंडळी बोलायला लागली की संतांनी फुल्टाइम एजन्सी घेतली होती की काय कार्ल मार्क्सची ; असं वाटायला लागतं.
संतांची हे तोंड फाटेस्तोवर स्तुतीही करतात; आपण त्यांचाच वारसा वगैरे पुढे नेतोय वगैरे म्हणतात.
पण कैक संतांचे किस्सी, दावे वगैरेबद्दल सोयीस्कर मौन बाळगतात.
संतांनी ज्या 'ईश्वर' नामक कल्पनेचा ध्यास घेतलाय ती वगळून संतांबद्दल बोलणं म्हणजे
"शिवाजी महाराजांची घोडेस्वारी जबरदस्त होती; ते तरबेज होते" किंवा त्यांचा समकालीन चित्रातून जाणवनारा ड्रेसिंग सेन्स उत्तम होता; आणि शिवराय हे व्यक्तीमत्व तेवढ्याच भागाशी संबंधित आहे; असा हास्यास्पद दावा केल्यासारखं आहे.
अरे ? प्रशासन, लष्करी नेत्रुत्व, धोरणीपणा आणी इतर कित्येक गोश्टी का लपवता रे लबाडांनो ?
ड्रेसिंग सेन्स ह्या एकाच गोष्टीत अडकवता काय ?
( साले संघी सुद्धा आंबेडकर नि गांधींचं नाव घेतात. आणि सोयीस्कर (खरं तर एकूण कामाच्या दुय्यम पण संघाला सोयीचा ) असा भाग उचलून धरतात.
भागवत काका, सुदर्शन अंकल वगैरे सगळेच "आंबेडकरांचच कार्य आम्ही पुधे नेतोय" म्हणतात मोठम्पोठ्यानं.
मग ह्यांचे नेते आंबेडकरांच्या हयातीत जनसंघांत होते की रिपब्लिकन पक्षात; तेही सागून टाका म्हणावं.
)

असो. मला माझं जालिय अस्तित्व प्यारं आहे. गप्प बसतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

होय करेक्ट खूप छान सांगीतलत राही. इथे ईश्वरास वडील=बाबूल मानले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मिपावरची श्रीगणेशलेखमाला वाचली. विषय एकदम कल्पक आहे मालिकेचा.

http://www.misalpav.com/node/32977

मृत्युंजय, अभ्या आणि पेठकरकाका यांचे लेख खास आवडले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

होय. अतिशय सुंदर झाली आहे ती लेखमाला. मलाही ते लेख अधिक आवडले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

http://jaddeyekabir.com/2012/05/20/become-a-moth/
.
http://www.poetryfoundation.org/learning/guide/240200#poem

Lay your head on my chest and let me tell you
What sorrow is, what love is, where grief is.
Let me tell you of this weary bird,
So long away from its nest in yearning for you.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गोनिदांचे 'स्मरणगाथा' वाचतोय. मजा येतेय. आज उद्याकडे वाचून संपलं की घरातील गणपती गेलेल्या मखराकडे पाहिल्यावर जस भकास वाटतं तसं वाटेलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गोनीदा म्हणजे गोनीदाच ओ. मजा तर येणारच निश्चित. काय अनुभव आणि काय भाषा, वा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मला कुणा एकाची भ्रमणगाथा हे आधीचे पुस्तक फार म्हणजे फार आवडले होते त्या काळात. नंतरच्या स्मरणगाथेमध्ये बर्‍याचश्या वेगळ्या आठवणी आणि थोडीशी भ्रमणगाथासुद्धा आहे. पण भ्रमणगाथेची 'सटल'ता नाही. शिवाय तेव्हा नर्मदापरिक्रमा आत्ताइतकी बोकाळली नव्हती. त्यामुळे थोडेसे साहस, थोडीशी अद्भुतता, बरेचसे नावीन्य आणि कळेल न कळेल असा रोमान्स. छान वाटलं होतं. त्या काळात गोनींनी पछाडलंच होतं. शितू, पडघवली, कर्णायन (ही मृत्युंजय आणि राधेयपेक्षा कितीतरी अधिक आवडली होती.) अजून नाही जागे गोकुळ (नाव बरोबर आहे का? कुब्जेवरची दीर्घकथा) आणि मग पवनाकाठचा धोंडी, माचीवरला बुधा वगैरे रांगच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कर्णायन मी नाही वाचलेली. आता मिळवणे आहे. मला सर्वाधिक आवडली भ्रमणगाथा. तुमच्या मताशी तंतोतन्त सहमत. मग पडघवली. मग माचीवरला बुधा आणि मग मृण्मयी. शीतूचा शेवट अगदीच 'हा' आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

शीतूचा शेवट अगदीच 'हा' आहे.

अर्र... असहमत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

घडत्या इतिहासाची वाळु विलास सारंग यांचा कविता संग्रह
अप्रतिम ओरीजनल कविता
अत्यंत वेगळ्या शैलीतल्या
युनिक

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

एखादी आवडलेली टंका की. अशी साखरेची चव सांगून, बोलून, विषद करुन, गोडी कशी कळावी?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Henry David Thoreau, Hypocrite

मी हे वाचलं नैय्ये अजुन. पण - For your eyes only.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अत्यंत रोचक आहे. अ-ति-श-य!!! भरपूर अगदी तटतटून तुडुंब माहीती व रोचकता आहे. चार पंचमांश वाचून झाले आहे. पण परत तेच नीट वाचणार आहे मग पुढे जाइन.
___
समंनी हा धागा वेगळा काढावा. म्हणजे हा लेख, फुटकळ माहीतींच्या गर्दीतही चटकन शोधता येइल.
___
पण "sensuality" कटाक्षाने किंबहुना तिरस्कारयुक्त टाळणारा Thoreau खालील कविता कसा काय लिहीतो?
.
I think awhile of Love, and while I think,
Love is to me a world,
Sole meat and sweetest drink,
And close connecting link
Tween heaven and earth.
.
मला प्रेम आणि sensuality इक्वेट करायची नाहीये. दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. पण त्या कवितेत जो "Sole meat and sweetest drink" उल्लेख आहे त्याबद्दल बोलते आहे. परत तो नार्सिसिस्ट व अ‍ॅबॉलिशनिस्ट आनि रॅडिकल सेल्फ-डिनायल चा जर पुरस्कर्ता होता तर त्याने ही कविता लिहीलीच कशी? का २ Thoreau होते? Sad
_________
आमच्याकडे स्नोफ्लेक्स पडू लागलेत. या मौसमाचे आज पहील्यांदा पाहीले. अशा छानशा थंडीत, वाचण्याकरता "walden - henry david thoreau" घेतले आहे. गब्बर, पहीलाच चॅप्टर "इकॉनॉमी" आहे.
___
ऑनलाइन पुस्तक सपडलं - http://thoreau.eserver.org/walden00.html#toc

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

http://www.theminimalists.com/
हा ब्लॉग रोचक वाटतोय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रोचक. थोडाफार Mr Money Mustache सारखा वाटतोय. योगायोग म्हणजे आज लंचमध्ये मॉलमध्ये गेलो होतो तेव्हा हे पुस्तक विकत घेतले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Fifth Column: Literary politics?

If there is one thing that the writers’ revolt has proved it is that freedom of expression in India has never been more robust.

-------------------------------------------

New Old World: An Indian Journalist Discovers the Changing Face of Europe ______ Pallavi Aiyar

हे पुस्तक कोणी वाचलेले आहे का ? असल्यास अभिप्राय काय ??

-------------------------------------------

UC Berkeley to fire 'love letter to learning' professor

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

If Someone Says "You Complete Me," RUN!: Whoopie goldberg आज वॉलमार्ट मधून हे पुस्तक घेतलं. It's hilarious & perfect for some airhead/lovelorn fools like ........ me who else? Wink
___
६ प्रकरणं वाचून झालेली आहेत. चिवड्याचे बोकाणे भरत ,भरपूर हसत, लोळत पुस्तक वाचते आहे......Man!This is what I call a weekend!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फार छान.
ज्या मुद्द्यांची यादी दिली आहे, त्यातले मुद्दे महत्त्वाचे आहेतच, पण जागतिकीकरणामुळे व सोशल मेडियामुळे (जरी ते आभासी मानले तरी) निर्माण होणारे प्रश्नही महत्त्वाचे आहेत. त्यांचाही या अंतर्भाव व्हावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0