बागकामप्रेमी ऐसीकर : २०१५ धागा - ५

याआधी: भाग १ | भाग २ | भाग ३| भाग ४
व्यवस्थापकः याआधीच्या धाग्यांवर वर १००पेक्षा जास्त प्रतिसाद झाल्याने नवीन धागा काढतोय.

बॉरबोटी (चवळीचा प्रकार) शेंगा, आज सकाळी:

कोहळ्याच्या वेलीला पहिलं फूल आलं:

आज बर्‍याच वेगवेगळ्या शेंगा लावल्या - चवळी, घेवडा, पावटा. पुन्हा एकदा दोडका लावलाय, अजून दोन-तीन भेंडीच्या बिया पेरल्या, आणि वांगी (एक लांबलचक निळसर वांगं, एक इथला देशी "बुलेट बेगुन" म्हणून प्रकार आहे). पालेभाज्यांसाठी माती तयार करून ठेवली, पुढच्या आठवड्यात लावीन. बॉरबोटी बहरलेली पाहून माझा मूड चांगलाच सुधारला आहे Smile पाऊस असाच चांगला जोरात राहील अशी आशा आहे.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

वा ! सुंदर दिसत्ये चवळी आणि कोहळ्याचे फूलही.
बाजारात हीच 'चवळी' पाहिली आहे. बारीक पण डार्क हिरवी चवळी गेल्या काही वर्षात पाहिलेली नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्हाला परत उत्साही बघून आनंद झाला. माझ्याकडे मात्र पूर्ण पिकलेली पहिली ब्लूबेरी कोणितरी पळवून नेली आहे Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बेरी पळवणारी मी नव्हेच. झाडाभोवती तारांचं कुंपण टाकून पहा, एखादा मोशन-सेन्सर मॉनिटरींग कॅमेरा लावा आणि झाडाभोवती पिंजरे, सापळे लावून बघा काय होतंय.

रोचना, तुझे फोटो आवडले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आणलीये जाळी. पण लावायला लगेच जमेल असं वाटत नाही. असो. माझ्या साध्या टोमॅटोलाही फळ धरलंय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुला होमलँड सिक्यूरिटीत कन्सल्टंट म्हणून घेतात का गं?

माझी गच्ची-बाग असल्यामुळे ससे-खारींचा उपद्रव नाही, मात्र किडे भरपूर आहेत. एक स्टिंक-बग सारखा दिसणारा भला मोठा लालसर किडा काल दिसला. वर पम्पकिन बीटल्स आहेतच. त्यांच्यावर शेणाचा काढा (!) करून फवारा मारावा असा सल्ला शेजारच्या माळ्याने दिला - आता पुन्हा फ्रेश शेणाच्या शोधात. खरंच, एक गाय गच्चीवर ठेवता आली तर फार बरं झालं असतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शेणाचा काढा>>> _/\_

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

खळ ( स्टार्च पेस्ट) पातळ शिंपडा .स्प्रेअर वापरता तर गरम पाण्याने धुवा.खळ वाळल्यावर किड्याचे पाय आवळतात.टोमेटो मिरची वर खळ पडली तरी अपायकारक नाही .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चांगली कल्पना आहे - प्रयोग करून कळवते. अशा उपायांची एक यादीच करायला हवी.
खाली बॉरबोटीच्या दाण्यांचा फोटो पाहिलात का? वालीचार प्रकार वाटतोय का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

किड्याचे पाय आवळतात ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्यापेक्षा एक मांजर पाळा!
(तुमची जर आर्थिक मुबलकता असेल तर ह्या अदिती मांजरीलाच पाळा!!!!)
Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नव्या धाग्याला वर काढणारा प्रतिसाद Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मागे कधितरी कुंडीत टाकलेल्या बियांमधून भोपळी मिरचीचे रोप आले आहे. गेले काही आठवडे ते काही तण असावे असे समजत होते पण नंतर मिरचीचे असावे असे पानांवरून वाटले म्हणून वाढू दिले. आता त्याला बारीक कळ्या आल्या आहेत.बघू पुढे मिरची धरते का ते.
त्याच कुंडीत आधी मेलनचा वेल होता. एक मेलन वाढलं पण त्याला एका किड्याने पोखरलं, मग मी ते काढून घेतल. वेलही कापून टाकला. तिथेच आता लाल भोपळ्याचे बी उगवले आहे. त्यामुळे एकाच कुंडीत भोपळी मिरची आणि लाल भोपळा असे झाले आहे.
एक फुलं आलेल्या स्टेजला आहे तर दुसर्‍याला अजून तीन पानंच आली आहेत. कधीपर्यंत दोन्ही टिकतात ते कळेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्ही दाखवलेल्या शेंगांना आमच्या कोकण-गोव्याकडे वालीच्या शेंगा म्हणतात (त्यात वाल नसून चवळी असली तरीही!)
या शेंगांची ओलं खोबरं आणि मिरी घालून केलेली भाजी ही तांदळाच्या पेजेबरोबरची एक पारंपारिक डेलिकसी आहे तिथे!!!
(सोबतीला भाजलेल्या सुक्या बांगड्याचा खोबरेल लावलेला तुकडा! अहाहा!!!!)
Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गेले दहा-बारा दिवस सुट्टीवर घराबाहेर होतो. त्यादरम्यान बागेत बरीच उलथापालथ झालेली निरिक्षणास आलेली आहे.
सविस्तर वृत्तांत नंतर.....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वर म्हंटल्याप्रमाणे सुट्टीवरून परत आल्यावर बागेतले बदल....
देअर इज अ गुड न्यूज अ‍ॅन्ड अ बॅड न्यूज!
प्रथम बॅड न्यूज!
आमचा गवती चहा सुकून गेला....

DSC_0661

बाकीच्या बागेला स्प्रिंकलर सिस्टम असल्याने आमच्या गैरहजेरीतही वेळेवर पाणी मिळत राहिलं. पण हा कुंडीत असल्याने याच्यासाठी पाण्याची विशेष सोय करायला विसरलो....
आता महिनाभर परत पाणी घालत राहिलं पाहिजे म्हणजे पुन्हा पुन्हा फोफावेल....
पण सध्यातरी मी आणि घाटावरचा भट आर इन द सेम पोझिशन!! Smile

आता गुड न्यूज!
जातेवेळी छोटे असलेले हिरवे टोमॅटो येईपर्यंत मोठे होऊन पिकले होते. इतके जड झाले होते की ती डहाळी मोडायला आली होती. पण मी त्यांचा झाडावरच फोटो घेण्या अगोदरच आमच्या बेटर हाफने ते तोडून घरात आणले...
DSC_0651

अजून झाडांवर काही चेरी आणि बीफस्टेक टोमॅटो आहेत...
DSC_0657

DSC_0656

मागे मी मिरच्यांच्या झाडांना भरपूर फुलोरा आल्याचं लिहिलं होतं. त्या फुलांच्या आता मिरच्या झाल्या आहेत. प्रत्येक झाडाला सरासरी ६० याप्रमाणे सहा झाडांना मिरच्या आल्या आहेत....
DSC_0655

DSC_0652

DSC_0654

आता मला संकेश्वरला मूव्ह व्हायला हरकत नाही!!! Smile

बाकी फळ्झाडांमध्ये पीच आणि पेअरला फळं आली आहेत...
DSC_0017

DSC_0001

डाळिंबाच्या झाडाला सध्या एकच कच्चं डाळिंब लागलेलं आहे. सफरचंद आणि हवायन पेरूला अजून फुलं आहेत, फळं तयार झालेली नाहीत...

मी पूर्वी फोटो दिलाय की नाही ते आठवत नाही. पण लॅन्डस्केपिंगची आवड असल्याने मी माझ्या बॅकयार्डमध्ये एक झरा/ओढा करून घेतलेला आहे. डिझाईन माझं. आणि मी स्वतः कॉन्ट्रॅक्टरच्या माणसांबरोबर चिखलात बरबटून घेउन तो तयार केलेला आहे. हे दोन फोटो रोचनासाठी!!! Smile

DSC_0050

DSC_0048

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रसन्नता आणि जळजळ दोन्ही बरोबर प्रमाणात होत आहे, पिडां, दिस इज सिंप्ली फॅब्युलस! पीच आणि पेअर कसे वापरणार? जॅम, क्रंबल, टार्ट, तसेच?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकदम भारी आहे .फळं चोरता येत नाहीत याचं दु:ख होतंय त्याचं उट्ट फोटो चोरून केलं आहे.
इकडे हिरव्या मिरच्या १०० ते १२० रु किलो आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डाळींबाचेही फोटो टाका की! त्या फळावर आमचा विशेष जीव आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्त फोटो. पीच आणि पेअर बघून तर तोंडाला पाणी सुटले. का कोण जाणे, १ महिन्यापूर्वी आमच्याकडे लावलेल्या पीच आणि प्लमच्या झाडांची बरीचशी पाने गळून गेली आहेत. टेक्सासच्या उन्हाळ्यात ही झाडे तग धरतील का अशी शंका वाटतेय आता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उदय, तुम्ही टेक्सास मध्ये कुठे राहता ह्यावर ही झाडे तग धरतील कि नाही ह्या वर अवलंबुन आहे.
ऑस्टीन मध्ये मुख्यतः जमिनीखाली एक दोन फुटांवर लाइम स्टोन लागतो, त्यामुळे इथे झाडं रुजताना जरा वेळ लागतो. डॅलस आणि ह्युस्टन ला त्या मानाने बराच पावसामुळे झाडं चांगली मुळ धरतात.

पीच ला साधारण फेब्-मार्च च्या काठावर फुलांचा मोहोर येतो, मग जसं जसं जमिनीचं तापमान वाढतं तसतशी पानं यायला सुरुवात होते, आणि मग पुढे अति प्रचंड उन्हाळा नसेल तर मे पासुन हळु हळु फळांचे कोंब फुटायला लागतात.

फळं पूर्ण पिकायला बरेच दिवस लागतात. पण तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जर पानं गळत असतील तर एकदा होम डेपो किंवा लोव्ह्स मध्ये चौकशी करुन विचारुन घ्या. किड लागली नाहीये ना त्याचीही पाहाणी करा.

--मयुरा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पीच, पेअर आणि प्लमची पानं हिवाळ्यात गळून जातात आणि स्प्रिंगमध्ये नवीन पालवी येते.
तुमची भर उन्हाळ्यातच पानं गळावीत हे जरा विचित्र आहे. कदाचित पहिलं वर्षं असल्यामुळे असेल, शॉक अ‍ॅबसॉर्बन्स ....
पुढल्या स्प्रींगमध्ये काय होतं ते बघूया, मग त्यावरून निदान करता येईल....
आत्ता पाणी घालत रहा आणि फॉलच्या सुरवातीला खताचा एक स्ट्रॉन्ग डोस द्या....
बाकी ईश्वरचरणी!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाह! तुमची बाग म्हणजे आनंदाचा डोह आहे!
झक्कास!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वा ! फळं 'रसाळ' , 'गोमटी' ह्या विशेषणांना सार्थ करतील अशी आहेत ! गवती चहा उगवेलच परत.
झराही सुंदरच, पण फोटो दिवसा काढलेले असते तर आण्खीन छान वाटले असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

झराही सुंदरच, पण फोटो दिवसा काढलेले असते तर आण्खीन छान वाटले असते.

हियर यू गो!!!
IMG_0191

IMG_0189

त्या झर्‍याच्या शेजारी जो एक मोठा पक्ष्यासारखा आकार दिसतोय तो चार पाईनच्या झाडांना एकत्र लावून त्यांना एका जायंट क्रेन पक्ष्याचा आकार देण्याचा माझा प्रयत्न आहे. अ‍ॅज ईफ, द बर्ड हॅज कम टू द स्ट्रीम!! सध्या ते वर्क इन प्रोग्रेस् आहे, पूर्ण झालं की मग त्याचा फोटो टाकीन....

पण सध्या त्या झर्‍याच्या जवळ एक खाट (खरोखर इंडियन खटिया, आमच्या इथे एका पंजाब्याच्या दुकानात मिळाली!!) टाकून एखादं पुस्तक वाचत दुपारभर लोळणं हा माझा वीकेन्डचा कार्यक्रम आहे!!! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्थानिक मटेरियल असो वा नसो, झाडांचा पक्षी बनवणारा कन्सलटंट आता मला परवडेल की नाही याबद्दल शंका वाटू लागली आहे!!
पिडां, याला पाणी पुरवठा कसा करता? पाणी रीसाइकल होते का? मला तुमच्या दुष्काळी प्रदेशाची भारी काळजी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

झाडांचा पक्षी बनवणारा कन्सलटंट आता मला परवडेल की नाही याबद्दल शंका वाटू लागली आहे!!

तुमकू हम बोला ना की खास तुमकू डिज्जाईन फ्री में बनाके देगा, बोलेतो दोस्ती भी कोई चीज होती है!!! Smile

याला पाणी पुरवठा कसा करता? पाणी रीसाइकल होते का?

होय, पाणी रिसायकल होते. त्यातल्या सर्वात खालच्या स्टेपच्याही खाली पाण्याचा रिझर्व्हॉयर आहे. तिथून ते पाणी पंपाने सर्वात वरच्या स्टेपवर नेऊन सोडलं जातं. पंप जमिनीखाली असल्याने दिसत नाही.
तसंच त्या रिझर्व्हॉयरला ऑटो ओपन व्हॉल्व्ह लावलेला आहे. त्यामुळे जर पाणी कमी झालं (बाष्पीभवनामुळे वगैरे) तर तो आपोआप ओपन होतो आणि वॉटर लाईनमधून पुरेसं पाणी घेऊन पुन्हा लेव्हल भरली की आपोआप बंद होतो.
पंप असल्याने हा झरा आपल्याला हवा तेंव्हा चालू/बंद करता येतो. मी याच्यावर रात्रीसाठी लायटिंगही केलं होतं पण मग ते मला फारच कृत्रिम वाटायला लागल्यामुळे काढून टाकलं.

हा झरा केल्यानंतर माझ्या शेजार्‍याने येऊन बघून गेल्यानंतर मग कंपाउंडच्या पलीकडे त्याच्या आवारात एक हॅमक लावून घेतली आहे. म्हणतो की, "मधल्या झाडांमुळे तुझा स्ट्रीम दिसत जरी नसला तरी त्याच्या खळखळाटाचा सूदींग आवाज ऐकत पडून रहायला खूप बरं वाटतं!!"
मी म्हंटलं की अधूनमधून बार्बेक्यू करून आम्हाला बोलाव, म्हणजे झाली फिट्टंफाट!! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमचा उत्साह बघून मलाही अंमळ उत्साह आला आहे. पण त्यावर काम भागत नाही, थोडी पीचेच पाठवा ना इकडे.

सध्या कुंड्यांमध्ये वांगी-टोमॅटो पिकवून ऐष सुरू आहे. पण लवकरच जमिनीत वाफे आणि आणखी काय काय उद्योग करता येतील ते पाहिलं पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

छान दिसतोय झरा ! पाइनचा क्रेन बनवायची कल्पनही सुंदर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पिडां, फोटो पाहून कॅलिफोर्निया ट्रिपची तिकिटे बुक करायला हवी आहेत असे वाटले. कधी येऊ? Smile काय अशक्य सुंदर बाग आहे! पीच आणि पेअरचे काय बनविता? प्रिजर्व वगैरे करता का?
थोडे उतरलेल्या किंवा खाली पडून गेलेल्या पेअरची पेरी ही (पेअर सायडर) बनविता येईल ना?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फोटो पाहून कॅलिफोर्निया ट्रिपची तिकिटे बुक करायला हवी आहेत असे वाटले. कधी येऊ?

कधीही या!
मागल्या वेळेस गेटी म्युझियम/ नाटकं वगैरे न बघता आला असतात तर सगळं बघायला मिळालं असतं! Smile
काही हरकत नाही, आता कधीही या!

पीच आणि पेअरचे काय बनविता? प्रिजर्व वगैरे करता का?

पीच, पेअर (आणि इतर फळं) कंटाळा येईस्तोवर खातो आणि इतरांना वाटतो. प्रिझर्व्ह वगैरे करत नाही कारण मग ती संपत नाहीत.
स्ट्रॉबेर्‍या, रास्पबेर्‍या खाऊन संपतात पण इतर फळं खाऊन संपत नाहीत.

थोडे उतरलेल्या किंवा खाली पडून गेलेल्या पेअरची पेरी ही (पेअर सायडर) बनविता येईल ना?

होईल कदाचित! पण कोण करत बसणार? आम्ही ती फेकून देतो. कारण नाहीतर ती जमीन अ‍ॅसिडीक करतात.

डिस्क्लेमरः इथे कुणाला वाटेल की काय हा माजुरडेपणा! पण तसं काही नाही. फळ्झाडं फळं देतांना तुमच्या भुकेचा/सीझनचा विचार करत नाहीत. झाडावरची सर्व फळं ही एक्-दोन आठवड्यातच पक्व होऊन गळू लागतात. मग तुम्ही जितकी शक्य असेल तितकी खायची, झाड तुमच्यासाठी थांबत नाही. मी एक वीस वर्षांपूर्वी माझ्या एका वॉशिंग्टनमध्ये रहाणार्‍या मित्राच्या घरी गेलो होतो. त्याच्या आवारात एक रेड डिलिशियस अ‍ॅपलचं मोठं, ३० फूट उंचीचं झाड आहे. मी गेलो तेंव्हा ते झाड फळांनी अगदी लगडलेलं होतं, काही सफरचंदं भेगाळून जमिनीवर पडलेली होती. जवळजवळ हजारेक फळं तरी असावीत. मी त्याला उत्साहाने विचारलं की इतक्या सफरचंदांचं तुम्ही काय करता? तो म्हणाला की जमेल तितकी खातो आणि उरलेली फेकून देतो! तेंव्हा मलाही वाटलं होतं की काय हा माजुरडेपणा! (मी स्टुडंट होतो तेंव्हा!!) पण आता मला त्याचं म्हणणं पटलंय!!! देअर इज नथिंग यू कॅन डू अबाउट इट!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही फळे स्थानिक मार्केटात विकता येतात काय? का तसे करायचे तर मोठी उस्तवार आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अगदी स्थानिक मार्केटात नाही पण फार्मर्स मार्केट भरतं तेंव्हा गाळा भाड्याने घेऊन विकता येतील.
पण तितका हाताशी वेळ नाही आणि ती आवडही नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सविस्तर वृ ची वाट पाहत आहे.
बाकी मांजर पाळल्याने किडे कसे काय कमी होतात ? ती किड्यांवर फिस्कारली की किडे उडतात ? किड्यांचे पाय आणि पंख खळ वाळली की आखडतात ( हलवता येत नाहीत)हा शब्द हवा आहे. हा प्रतिसाद "इथे कोणता मराठी शब्द चपखल बसेल " इथेही हलवता येईल.
फक्त आर्थिक उदंड असणाय्रा घरातच राहू शकणाय्रा अदिति मांजर प्रजाति ( species ?) बद्दल अनभिज्ञ आहे.--[[:शनिवार, 04/07/2015 - 12:42 |त्यापेक्षा(Score: 1) पिवळा डांबिस पुण्य: 2 त्यापेक्षा एक मांजर पाळा! (तुमची जर आर्थिक मुबलकता असेल तर ह्या अदिती मांजरीलाच पाळा!!!!))]

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाकी मांजर पाळल्याने किडे कसे काय कमी होतात ? ती किड्यांवर फिस्कारली की किडे उडतात ?

हा हा हा!! Smile
ती अदिती तिथे ब्लूबेरी चोराला पकडण्यासाठी मोशन सेन्सर कॅमेरे, सापळे, पिंजरे वगैरे हाय टेक उपाय सुचवतेय तेंव्हा तिला चिडवण्यासाठी तसं लिहिलं होतं!!!! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हाय टेक म्हणजे "हाय (चोरा), टेक (बूड)" असे उपाय असावेत बहुधा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तो झरा बघून विशेष निर्वाण पावल्या गेले आहे. घरच्या बागेत मातु:श्रींनी थोडे प्रयोग केलेत, यद्यपि लै नाहीत. पण आवार असूनही हे कै केले नाय. मस्त मज्या आली बघून.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मग करा मातु:श्रींना आग्रह! आणि स्वतः घाम गाळायचीही तयारी दाखवा. मग होतील मातु:श्री प्रसन्न!! Smile
थोडं खर्चिक काम आहे, मला मटेरियलपेक्षा लेबर कॉस्ट दुपटीने आली.
पण भारतात लेबर स्वस्त असल्याने जर स्थानिक मटेरियल वापरलं तर जमून जावं....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

घरी राहणेच फार होत नाही, सबब कुठला झरा अन काय...पण येस, फ्यू ईयर्स डौन द लाईन मेबी... Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पावटा, घेवडा, चवळी चे कोंब - चेक.
भेंडीची नवीन रोपं - चेक.
पालक, कोलमी, पुईं शाक - चेक.
वांगी - नो कोंब.
कोहळ्याला मादी फूल - छ्या.
पडवळ - पुन्हा घेवडा असल्याचा आयडेंटिटी क्राइसिस.

POIDH - विकेंडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ती आपली शेताला चौकोन पाडून 'कवायती शेती' करणारी ताई कुठे गायब झाली?
मिसिंग हर!!!!
Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पालक लावल्यावर त्याच्याकडून दोनदा पाने घेऊन झालीयेत. पुन्हा पाने येताहेत. एकदा पालक लावल्यावर पाने आता घेण्यायोग्य नाहीत हे कसे ठरवायचे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

एकदा पालक लावल्यावर पाने आता घेण्यायोग्य नाहीत हे कसे ठरवायचे?

ते तुम्ही कोण ठरवणार? ते तुमच्या 'पाल्याने' ठरवायचं!!!!!!
Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा हा हा, एक नंबर!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पानं घेत राहिलात तर अजून पानं येत राहतील. नाहीतर थोड्या दिवसांनी बिया येतील. त्यामुळे पूर्ण झाडच खुडायचे नसेल तर बाहेरून पानं घेत राहा.
(आणि एखादा फोटो टाका की!)

(पिडांचा सल्ला लाँग-टर्म आहे, हा तात्पुरता उपाय आहे!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पालकाची पाने खुडणे कधी थांबवावे ?
या फोटोत फुलाचा दांडा आलेला दिसत आहे. फुले येऊन बी वाढण्यासाठी पाच सहा पाने रोपावर हवीतच.

अर्थात शेंड्याकडे छोटासा फुलाचा दांडोरा दिसला की पाने काढू नये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता अधिकृतपणे उन्हाळा सुरु झालाय आणि बागेला थोडे रंगरूप येऊ लागलेय. पालक, मेथी, मोहरी, चार्ड वगैरे भाज्यांचा वाफा चांगलाच बहरला आहे. काल ताज्या पालाकाचे पालक पनीरही खाऊन झाले.
053
दुसऱ्या वाफ्यात लावलेले मटार, बीन्स चांगले फुटभर उंच झाले आहेत, काही टोमॅटोंना फळे आणि बहुतेक रोपांना फुले आली आहेत. मागे दिसणार्या लसणाला आता फुले (स्केप्स) आले आहेत त्यामुळे या स्केप्सची (पातीची) चटणी दिवसाआड करता येतेय.

042

तिसऱ्या वाफ्यातल्या दोन वाग्यांना फुले आली आहेत आता फळांची प्रतिक्षा आहे.करंट्सना आणि गूजबेरीला यावर्षी फळ आले नाही पण पुढच्या वर्षापर्यंत झाडे स्थिरावतील अशी अपेक्षा आहे.

044 054

बागेत निरनिराळी फुलेही लावली आहेत. पियोनीच्या नवीन लावलेल्या रोपाला कळी आली होती ती नेमकी मी बाहेरगावी असताना उमलली. इतरही फुले फुलली आहेत, त्या पिवळ्या फुलांवर नेहमी मधमाश्या चिकटलेल्या असतात.
041 040 033 045
याच वर्षी लावलेल्या हनीबेरीजलाहीच्या तीन रोपांना आठ-दहा बेरीज आलेल्या खाल्ल्या. याच वर्षी लावलेले नवीन सफ़र्चंदाचे आणि चेरीचे झाडही ठीकठाक दिसतेय. आठवडाभर परगावी गेलेली असताना शेजारी पाणी घालतोय की नाही म्हणून थोडी धागाधूग होती पण परतल्यावर सगळे ठीक दिसतेय.
डावीकडून हनीबेरीज, चेरी आणि नॅन्किंग चेरी (अगदी छोट्या आणि जरा आंबट चेरीजची स्थानिक जात)
045 048 049

सामुदाईक बागेतल्या वाफ्याला सुटी वरून आल्यावर भेट दिली आणि धक्काच बसला. एका आठवड्यात बटाट्याच्या आणि सोरेलच्या झाडांनी पूर्ण वाफ्यावरच अधिक्रमण केले होते. सोरेल चार-पाच फूट वाढून बियांवर गेलेले आणि बटाट्यांनी आपल्या आजूबाजूच्या सगळ्या रोपांचा सूर्यप्रकाश तोडलेला!
035
तासभर घातल्यावर वाफा पुन्हा नीटनेटका झाला पण पुढल्या वर्षी बटाट्यांची चूल वेगळीच मांडायची आणि त्यांना स्क्वेअर फूट गार्डनिंगमधून हाकलायचे अशी खूणगाठ बांधली आहे. या वाफ्याताल्या ढबू मिरचीच्या रोपाला एक ढबू मिरचीपण आली आहे हे नजरेतून आधी सुटलेच होते, पाहिल्यावर मस्त वाटले. तिथेले मटार, बीट, बीन्सही चांगले वाढले आहेत.

039

यावर्षी परसात जिथे जागा मिळेल तेथे बटाटे लावले होते, तेही व्यवस्थित वाढतायत आणि मेथीपण ठीक वाढते आहे.
047 046

या सगळ्याला दृष्ट लावायला काल इथे जोरदार गारपीट झाली पण सध्यातरी त्यामुळे फार नुकसान झालेलं दिसत नाही. एकून आमच्या बाग-विश्वात सगळे आलबेल आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुझ्या एव्हढ्याश्या चेरीला फळं आलेली बघून गंमत आणि कौतुक वाटलं. माझं चेरी काही ढिम्म हलत नाहिये!!!
लसणीला फुलं आली पण? लसूण तयार व्हायला दीडेक वर्ष लागतं असं ऐकून होतो. कॉन्ग्रॅच्युलेशन्स!!
तुझ्या आणि रोचनाच्या सांगण्यावरून या वीकमध्ये बटाटा लावायला घेणार आहे, बघू काय होतंय ते!!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लसूण मी हिवाळ्याआधी ऑक्टोबरमधे पेरला होता. त्यासाठी पाणी देण्याखेरीज खरंतर इतर काहीच काम केलं नाही, तो गुमान एप्रिलमधे उगवून आला आणि आता फुलेही आली. ती उमलण्याआधीच कापून वापरतेय म्हणजे गड्ड्यांची चांगली वाढ होईल. पाने पिवळी पडायला लागली की लसूण उकरायचा. सोपे काम आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वॉव! ताज्या लसणाच्या पातीची चटणी!
आठवूनच अं.ह. झालो.
आता करणे आले!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

रेसिपी प्लीज.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

लसणीची पात, कोथिंबीर, जिरं पावडर, मीठ मिक्सरमधून काढायचं. पराठ्यांबरोबर मस्त लागते चटणी. (ही आमच्या यादवकाकूंची पाककृती.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आहाहा, सगळे बहरलेले वाफे पाहून प्रसन्न वाटले. एस्पेशली पालेभाज्यांचा.
आमच्या घरी बॉरबोटी खाऊन लोक कंटाळले. मी म्हटलं भेटघोड्याच्या तोंडात पाहू नका! हा विनोद आहे, असा काही वाक्प्रचार मराठीत नाही हे माहित आहे....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा भाषांतरीत विनोद/वाक्प्रचार आहे काय? (तुझ्यामुळे मलापण हे खूळ लागलंय, म्हणून तुझ्या मागेमागे सुरूय.)

रुची, फोटो सुंदर आहेत. तुझे आणि पिडांकाकांचे फोटो बघून बागकामासाठी आणखी उत्साह आला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Don't look a gift horse in the mouth! (आयतं मिळतंय त्याबद्दल कृतज्ञता दाखवा, नसती तक्रार करू नका!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अभिनंदन ! बागेचं रंगरूप फारच सुंदर दिसतय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मळा मस्त फुललेला दिसत आहे. फोटो बघून मलाही हुरूप आला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बागेचे फोटो पाहून फारच चांगला मूड आला.चेरुकल्या मस्तच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काय एकेकाच्या बागा फुल्ल्यात त्या.... फोटो पाहून दिल गार्डन गार्डन हो गया!!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सध्या हिरवी असलेली लाल भोपळी मिरची

आणि ही हिरवीच असलेली आणि असणारी भोपळी मिरची

हॉट काऊहॉर्न पेपर

दुकानात गेल्यावर माझ्या मुलाचा बकरी मोड ऑन झाला. वेगवेगळ्या जातींचे बेझिल, रोझमेरी इ. चवींची पारख केल्यावर लेमन बामची चव जिंकली. तेव्हा ते विकत घेणे आले. आता पाककृतीही शोधायला लागेल.

कोणाला माहिती असतील तर सांगा.

काही दिवसांपूर्वीच आणलेले मोगर्‍याचे झाड.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मिरच्या चांगल्या वाढताहेत की! माझी जानेवारीत लावलेली अजून ही ढिम्मच आहे. मला वाटतं मोजेक वाइरस धरलाय, पण उपटून टाकवतही नाही.
लेमन बाम ला किंचित पुदिन्याची/लिंबाची, पण अगदी हलकी, मिश्रित चव आणि वास असतो - त्याचा चहा करतात, किंवा पुदिन्यासारखाच 'काँटिनेंटल' पाककृतींमधे (रोस्ट चिकन, फिश) वापरतात. त्याच्या चोथ्याला किडे चावले तर मलमम्हणून वापरतात असं ऐकलंय, पण कधी प्रयोग केला नाही.
पुदिन्यासारखेच खूप पसरते, त्यामुळे कुंडीतच राहू दे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इथे रापडले.www.herbsociety.org/factsheets/Lemon%20Balm%20Guide.pdf

त्यात तुम्ही म्हणता तो बग बाईट्सचा उल्लेख आहे. मी लगेच प्रयोग करून पाहिला. उपयोग झाला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मोगर्याची पाने कशी हिरवीगार आहेत आणि एवढ्याश्या मोगर्यालाच गजरा करता येईल एवढ्या कळया आल्या आहेत की! तुमच्याकडे उन्हाळ्यात मोगरा बाहेरच ठेवता येत असेल ना? इथे माझा मोगरा उन्हाळ्यातही घरातच असतो, त्याला खूप कळ्या आल्या आहेत पण पाने फारच पिवळी पडली आहेत, झाड अजिबात निरोगी वाटत नाहीय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मोगरा उन्हाळ्यात बाहेर तर हिवाळ्यात आत ठेवते.
या झाडाकडे पाहिलं की मला दुकानात भेटलेले गोर्‍या आजी-आजोबांचे जोडप आठवत. आजी एका छोट्याश्या झाडाकरता एवढे पैसे खर्च करतायत हे आजोबांच्या पचनी पडत नव्हते. तेव्हा झाडांवर एवढ्या कळ्या नव्हत्या. आजी अडून बसल्यात हे बघून "करा काय वाट्टेल ते!" असं तणतणत आजोबा निघून गेले. आजींनी हताश चेहेर्‍याने माझ्याकडे पाहिलं, तेव्हा कोणे एके काळी एका अनुभवी भारतीय आजींनी(आता हयात नाहीत.) दिलेला कानमंत्र मी त्यांना दिला. "नवरे सग्गSळे सारखेच. माझा, तुझा, तिचा, हिचा..त्यांना फारसं मनावर घ्यायचं नसतं!" आजींनी पटल्यासरखं हसून झाड उचललं. त्यांच्याही झाडाला आता अशा कळ्या आल्या असाव्यात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान आहेत फोटो! आवडले.
बाकी "मुलाचा बकरी मोड ऑन" कसा करायचा याची प्रोसीजर पाठवा!
माझ्या मुलाचा "वाघ मोड" त्याच्या ८व्या-९व्या महिन्यात (चिकनसूप खायला लागल्यापासून) जो ऑन झालाय तो अजूनही ऑफ व्हायला काही तयार नाही!!!! Smile
त्याच्या पोटात भाज्या कशा जाणार या चिंतेने आम्ही ग्रस्त असतो आणि वेगवेगळ्या आयडिया लढवत असतो!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्याला 'वाघ-बकरी' चहा पाजा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तो च्या-कापी पीत नाय!:)
बाकी चहाच्या ब्रॅन्डला 'वाघ-बकरी' नांव देणार्‍या चहावाल्याच्या कल्पनादारिद्र्याची कीव करावी तेव्हढी थोडीच आहे!!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पराठे जिंदाबाद! पराठे (ठेपले सदृश) वापरून आमच्या लेकीला सगळ्या पालेभाज्या, बीट, मुळा, गाजरासारखे कंद, अगदी दुधी वगैरेसारख्या भाज्यासुद्धा पोटात जातात. दुसरा पर्याय सूप्स (पण त्यात फायबर नै, इतरही सत्व कमीच). नाहीतर पुलाव, सँडवीचेस वगैरे करत असालच Smile

(खरंतर हे मी पिडांकाकांना सुचवणे म्हणजे काजव्याने वगैरे आहे.. पण पिडां नाही तर इतर कोणाला उपयोग होईल म्हणून लिहिले)

वेगवेगळ्या उसळी हा एक दुसरा चांगला पर्याय आहे.

तर्‍हेतर्‍हेच्या भाज्यांची पेस्ट घालुन केलेली धिरडी, इडल्या वगैरे कमी उपयुक्त पण नपेक्षा बरे असे काही आणखी पर्याय आहेत.

गाजर, बीट वगैरे गोडसरपदार्थांना पोळीच्या लाडवात मिक्स करून (शिवाय खजूर वगैरेही टाकून) दिल्यास काहीवेळा 'खपतात' Wink

फळे खूप खातो का? असल्यास भाज्या कमी खाल्यांची चिंता नसावी (नसल्यास आता खायला लागण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. बाळांना मीठ द्यायच्या आधी फळे दिली तर फळांकडे खूप ओढा असतो असा स्वानुभव)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आम्ही सुद्धा हेच करतो. पराठे ज़िंदाबाद. किंचित शिजवलेली, थोडं तिखटमीठ लावलेली बाकीची कडधान्यं सुद्धा आवडतात. मुगाचं धिरडं आम्ही नेहमी करतो, पण भाज्यांची पेस्ट घालून कधी केले नाही - करून पाहते. एरवी आयर्न/प्रोटीन साठी दोशाच्या पिठात नाचणीच्या पिठाचा चमचा घालतो, आणि पोरं त्याला "लाल दोसा" म्हणतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी कधीतरी पोळ्यांत नाचणी घातली होती. घरी आलेल्या एका पोराने 'चॉकलेट घातलेल्या पोळ्या' म्हणून त्या खाल्ल्या. वर पुन्हा घरी गेल्यावर आपल्या आई-आजीच्या मागे लागला, चॉकलेट घातलेल्या पोळ्या हव्या म्हणून. सुगरणींना कामाला लावलं म्हणून मी खूष!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

दुधीभोपळ्यापुरते बोलायचे तर सांबारात त्याच्या फोडी कातिल लागतात एकदम.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

दुधी भोपळाच म्हणायचे आहे का? कारण सांभारात कोहळा ( वास्तुशांतीला बली ऐवजी वापरतात तो ,पेठा करण्यासाठी वापरतात,कुष्मांड)असतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आं? काय की. आम्ही तरी आमच्या लाडक्या आंध्रा मेशीत दुधीभोपळाच चापत आलेलो आहोत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मॅन्युअल नाहीये हो! वेगवेगळ्या वासाचे पदार्ध, चुरगळलेली सुगंधी पानं नाकाजवळ धरली की तो ऑटोऑन होतो. चव आणि वासाची इंद्रिये एकत्र काम करतात ना! http://www.brainfacts.org/sensing-thinking-behaving/senses-and-perceptio...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वेज कटलेट न आवडणारा वाघ अजुन ऐकला नाही.
काही खास द्रव्य ( विटमिन वगैरे ) असणाय्रा भााजा-

१)कोथिंबिर: बारीक चिरून दही,मिठ,साखर,मिरी,जिरे पाउडर ,पुदिना मिक्स करून 'डिप्' करायचे.हे कोणत्याही अगदी बेचव फळांच्या तुकड्यांवर टाकले की छान लागते.( सी विटमिन)
२)पालक पाने,लेट्युस पाने,माठाची पाने उकळून ते पाणी सुपात टाकणे.( ए विटमिन).
३)बाकी तंतुयुक्त(फाइबर) भाजा कटलेटमधून.
४)टोमॅटो सॅास फार खातातच वेगळे नकोच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आयचा घो, हे भलतंच झालं!!!!
मित्रमैत्रिणींनो, मी तो प्रतिसाद एक विनोद म्हणून लिहिला होता हो!!!!
Sad

बिलेटेड ह. घ्या, ह. घ्या, त्रिवार ह. घ्या!!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अहो तुम्ही विनोद म्हणून केला असेल पण अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे म्हणून लिहितायतं. Smile
खाण्याच्या सवयींच्या बाबतीत आम्ही मात्र अतिशय सुदैवी पालक आहोत कारण आमचे पोर पाला आणि मांसमच्छी सारख्याच उत्साहाने खाते. अगदी खेकडे, कालव, गोगलगाय यांपासून ते मुळा, मोहरी, केल कशाबद्दलच काही तक्रार नाही. त्यात भाज्या घरच्या असल्या आणि त्या लावण्यात सहभाग असला तर खायला जास्त उत्सुक असतात हे ही एक आहे पण सध्या पीक बरेच येत असल्याने भाज्या अजून विविधतेने कशा वापरता येतील याबद्दल लोकांचे प्रतिसाद वाचायला आवडतायत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक कांदा कुजल्यासारखा झाला होता आणि पात फुटली होती, म्हणून कापायच्या/काँपोस्टात टाकायच्या ऐवजी मातीत पुरला. त्याची पात काही दिवस वाढून सुकली. खणून पाहिलावर हे दिसले.

बाजूच्याच कुंडीत कलोंजी पेरली आहे, पण पात न येता तणच उगवलं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऊष्ण आणि दमट हवेत(मुंबई,कोकण किनारपट्टी)कांदा कुजतो.कांद्याचा अर्धा भाग मातीच्या वर राहील असा १नोव्हेंबरला लावा-थंडीच्या सुरवातीला.कंपोस्टातली उष्णता फार झाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खणून पाहिलावर हे दिसले.

आम्हाला काहीच नाही दिसले...
Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हां, आता दिसले!! Smile
थॅन्क्स!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाकी "मुलाचा बकरी मोड ऑन" कसा करायचा याची प्रोसीजर पाठवा!

प्रकार तसा अवघड नाही, पण पेशंन्स हवा. (तसं तुम्हा शेतकरी लोकांकडे पुष्कळ मोकळा वेळ असतो त्यामुळे प्रॉब्लेम नाही!) तुमच्या लाईफस्टाईलमध्ये थोडाफार बदल करावा लागेल इतकंच. तर हे घ्या मॅन्युअल. प्रत्येक स्टेप काळजीपूर्वक केलीत तरच फळ मिळेल अन्यथा तक्रार करायला येऊ नये!

१. रोज सकाळी सुर्योदयाच्या वेळेला वडील आणि मुलांनी १२ सुर्यनमस्कार घालावेत. (घालताना सुर्यनामाचा जप करणे आवश्यक आहे.)
२. चतुर्थी, एकदाशी आणि पोर्णिमेला उटणं आणि शिकेकाईचा वापर करून सर्वांनी अभ्यंगस्नान करणे.
३. सकाळी संध्या, १०८ वेळा गायत्री मंत्र, अथर्वशीर्ष आणि रामरक्षा यांचे पठण पाल्यांस करावयास लावणे.
४. वारांनुसार आरत्या, मंत्रपुष्पांजल्या वगैरेचे पठण सर्वांनी करावे.
५. रोज सहकुटुंब शुभंकरोती वगैरे म्हणावी.
६. सकाळी उठल्यावर "कराते वसते लक्ष्मी" आणि रात्री निजेला जायच्या अगोदर "समुद्रवसने देवी" यांचे नित्यनेमाने पठण करावे.
९. जेवणाची सुरवात साधं वरण, तूप-मीठ-लिंबू भात याने करावी. (मुलांनी जर नियम पाळले नाहीत शिक्षा म्हणून अधूनमधून पालक, चूका, कारलं वगैरे कंटाळवाण्या भाज्या जेवणात कराव्यात)
१०. रोज नित्यनेमाने चार दिवस सासूचे, होणार सुन या घरची वगैरे सोज्ज्वळ आणि सात्विक कार्यक्रम सहकुटुंब पहावेत.
११. सुटीकरता अष्टविनायक, गणपतीपुळे वगैरे ट्रीप्स योजाव्यात.
१२. रोज सकाळी कपाळावरती अष्टगंध उगाळून लावावे. (स्त्रीयांनी टिकल्या वापरू नयेत. कुंकूच लावावे. अ‍ॅलर्जी असल्यास कुंकू भाजून घ्यावे फायदा होतो.)
१३. गुरूवारी कांदा आणि लसूण आहारात टाळावा. मंगळवारी साबुदाना खिचडी आणि शनीवारी राजगिरा किंवा भगर इत्यादीचे सेवन करावे.

वरील गोष्टीं नियमाने वर्षभर केल्यास अर्धी लढाई जिंकलात. पुढील मार्गदर्शन वर्षभरानंतर प्रामाणिकपणे अंमल केलेल्यांनाच केले जाईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

अनुभवाचे बोल दिसत आहेत. तुझी स्मरणशक्ती फार चांगली आहे का स्वतःबद्दल काही माहिती लपवून ठेवल्येस?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

शेवटी चाड वगैरे असलेले आमच्यासारखे विरळाच, नाही का.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

तरीच आम्ही मांसभक्षी झालो Tongue

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आमचं काय नाय, आम्ही बापडे पाळू मुलांसाठी काहीपण.
पण तुझं हे मॅन्युअल इंग्रजीत भाषांतरित करून, तू सांगितलंयस असं म्हणून, लेकाला देत आहे...
पुढल्या वेळेस आमच्याकडे आलास की बघ तो तुझाच खिमा करून पावाबरोबर खातो की नाही ते!!!!
Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुढल्या वेळेस आमच्याकडे आलास की बघ तो तुझाच खिमा करून पावाबरोबर खातो की नाही ते!!!!

पालक तुमच्यावर भलतेसलते प्रयोग करू लागले तर कसे वागावे याचाही वर्कशॉप आम्ही चालवतो. त्याबद्दल इथे काही लिहीत नाही. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

आले तथाकथित विज्ञानवादी निळे आऊट ऑफ क्लोझेट आलेच. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एनाराय अन फारिन रिटर्न्ड् पालकांकरता खास सूचना. शुद्ध मातृभाषेतच संवाद करा. असलं मोडकं तोडकं मराठी अन विंग्रजी कटाक्षाने टाळा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

रात्री निजेला जायच्या अगोदर "समुद्रवसने देवी" यांचे नित्यनेमाने पठण करावे.

अहो समुद्रवसने श्लोक सक्काळी जमीनीवर पाय ठेवण्यापूर्वी म्हणतात. हे असं होतय ना विज्ञानवादी पूर्ण ना धड पुराणमतवादी Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे पहा, श्रद्धा असणं महत्त्वाचं. तुमच्यासारख्या किरकोळ गोष्टींवर वादविवाद करणार्‍यांमुळेच संस्कृतीचा ऱ्हास होत आहे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

ब्याण्णव.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्र्याण्णव.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चौर्‍याण्णव.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पंच्याण्णव.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शहाण्णव.
च्यायला, या ऐसी प्रशासनाच्या!!!
शंभर प्रतिसाद होईपर्यंत नवीन धागा काढायचा नाही म्हणे!!!!
Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सत्याण्णव.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अठ्ठ्याण्णव.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नव्याण्णव.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आणि शंभर!
चला आता नवीन धागा काढायला लोक मोकळे झाले!!!
अदिती, तू गडावर तोफांचे आवाज काढायला आता हरकत नाही!!!!!!!!
Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0