मनापासून विनंती करतो की...

जरा माझे स्पष्ट मत लिहू का?

अलीकडे 'ऐसी'वर बिनबुडाचे वावदूक आणि वितंडवादी धागे फार येऊ लागले आहेत आणि काही ठराविक जणांच्या ठराविक शब्दांतील शिवीगाळीपलीकडे त्यतून काहीहि निष्पन्न होतांना दिसत नाही. हे धागे कोणते असावेत आणि त्याचे निर्माते कोण हे लिहिण्याची आवश्यकता नाही. जाणकार जाणतातच. दर्जेदार आणि भरीव चर्चा सुरू करणारे धागे क्वचित बघायला मिळतात. गेल्या पाच सहा महिन्यातील ही स्थिति असावी.

त्याच्याहूनहि अधिल वाईट म्हणजे दुसर्‍यावर खोटे लिहिण्याचे - पुरावा नसतांना - आरोप करणे, काही वैयक्तिक जवळीक नसतांना दुसर्‍यांचे एकेरी उल्लेख करणे, ग्राम्य शब्द - गाढवाच्या *** घालतो - हेतुपुरःस्स्रर वापरणे, असल्या निषेधार्ह वृत्ति दिसू लागल्या आहेत.

हे असेच चालू राहिले तर काही नवे, चांगले वाचायला मिळेल अशा अपेक्षेने येथे येणारे विचारी लोक दुरावतील, येथे येण्याचे थांबतील आणि केवळ भांडकुदळ लोक शिल्लक उरतील असे वाटते.

भाषेपुरते बोलायचे तर 'गाढवाच्या *** घालतो' असली भाषा आमच्या तोंडातून वा लिहिण्यातून कधीहि बाहेर पडत नाही कारण ते अमंगल आहे अशी शिकवणूक आम्हाला लहानपणापासून मिळाली आणि आमच्या पुढच्या पिढयांना आम्ही तेच शिकवीत असतो. असे काही minimum standard चांगल्या संस्कारांवर विश्वास असणार्‍यानी स्वेच्छेने पाळले पाहिजे असे मला वाटते.

काव्यशास्त्रविनोदेन कालो गच्छति धीमताम्}
व्यसनेन तु मूर्खाणां निद्रया कलहेन वा||

पहा तुम्हाला पटते आहे का!

field_vote: 
4.875
Your rating: None Average: 4.9 (8 votes)

सर्वांसमोर आरसा धरल्याबद्दल धन्यवाद.

ज्या ३-५ व्यक्तींबरोबर आपण दिवसातला जास्तीत जास्त वेळ काढतो त्या व्यक्तींसारखे आपण बनतो म्हणतात. हे आधुनिक युगात व्यक्तींसारखेच संस्थळांना लागू पडावे.

आत्मपरीक्षण , संयम, शिस्त ही मूल्ये तितकीही जुनाट नाहीत. पण विसर पडतो.

जास्त काही बोलत नाही कारण उन्मादाच्या भरात मी देखील मूर्खासारखा तो वाक्प्रचार वापरला आहे.
चूकीचच आहे ते. अमंगल अन घृणास्पदच आहे या विचारास +१००

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

स्त्रीमुक्ती, लग्नातील बलात्कार, उदगीर, पुरोगामित्व, लैंगिक अनुभव वगैरे विषय ब्याकबर्नरवर टाकले तर निदान मला इतर (राजकारण, विज्ञान, अर्थशास्त्र वगैरे) विषयांवरील वितंडवाद आणि वावदूक धागे चालतील. पण अत्यंत आणि सतत वैयक्तिक टीका कधीच नको. एक शिवी दिली काय आणि दहा शिव्या दिल्या काय तितकाच इफेक्ट होतो. मग उगीच दहा शिव्या कशाला द्यायच्या बॉ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

संस्थळ हे साधन आहे अन त्याचा उपयोग काय अधोरेखित करण्याकरता कोण वापरतं यातून त्या व्यक्तीचीच लायकी (तात्पुरती अवस्था) कळते.
काहीजण पेन्सिल लिहीण्याकरता वापरतात काहीजण कानातील मळ काढण्याकरता Sad - (श्रेय अव्हेर-प्रसाद ताम्हणकर)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

अतिशहाणा साहेबांशी सहमत. मुद्द्यांवरून गुद्दे वगैरे बघायला मला तरी मजा येते- पण वैयक्तिक टीकेत दम नाही. आणि तीही प्रेडिक्टेबल!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

+१

अगदी मनातलं बोललात. बरेचदा चर्चेत भाग घ्यावासा वाटतो शेवटपर्यंत वाचल्यावर, चर्चा ज्या दिशेला जातेय ते पाहिल्यावर login करावसं सुद्धा वाटत नाही.

minimum standard चांगल्या संस्कारांवर विश्वास असणार्‍यानी स्वेच्छेने पाळले पाहिजे असे मला वाटते.

अगदी अगदी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चांगले वाचायला मिळेल अशा अपेक्षेने येथे येणारे विचारी लोक दुरावतील, येथे येण्याचे थांबतील आणि केवळ भांडकुदळ लोक शिल्लक उरतील असे वाटते.

प्रति. अरविंद कोल्हटकर यांस
विचारी / चांगल्या लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे. ते फार लवकर हार मानतात. या संस्थळावरच नाही तर एकूण जगाकडे पाहिले तर हेच आढळेल. संस्थळापुरते बोलायचे झाले तर भांडकुदळ लोकांकडे आणि त्यांच्या धाग्यांकडे दुर्लक्ष करावे. मात्र चांगले धागे काढणार्‍यांनी / त्यावर चर्चा करणार्‍यांनी थांबू नये. या संस्थळावरच नव्हे तर जगात सगळीकडे चांगल्या लोकांसाठी जागा आहे. मात्र जगात जीवांची गर्दी इतकी झाली आहे की 'अपनी जगह बनानी पडती है बॉस' ! अर्थात हे माझ्यासारख्याने तुम्हाला सांगणे म्हणजे जरा अतीच आहे हे मान्य पण कधी कधी देव बालमुखे पण बोलतो हो !

प्रति अंतराआनंद यांस

बरेचदा चर्चेत भाग घ्यावासा वाटतो शेवटपर्यंत वाचल्यावर, चर्चा ज्या दिशेला जातेय ते पाहिल्यावर login करावसं सुद्धा वाटत नाही.

असे करु नये. चर्चा ही पाण्याच्या प्रवाहासारखी असते. बरेच जण प्रवाहपतीत असतात आणि पाणी जसे वाहते तसे ते वाहत जातात. मात्र पाण्यातील काही प्रवाह आपली वेगळी वाटदेखील शोधतात. त्याचप्रमाणे वाहत चाललेल्या धाग्याला फाटे फोडण्याचे आणि चर्चेचा रोख दुसरीकडे वळविण्याचे कसब प्राप्त करणे गरजेचे आहे. याबाबतीत ट्रोलांना गुरु मानावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रतिसाद आवडला मुटके साहेब...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

पटतय. जे चुकीच आहे त्या कडे डोळेझाक करण्याचा मध्यमवर्गीय संस्कार कधीतरी सोडायला हवाच.
पण नेहमी व्यवस्थित युक्तीवाद करणारे लोकंही "मी नाही बुवा पुरोगामी" चा सूर आळवताना दिसले याचं वैषम्य वाटलं खरं. अर्थात, काळ-कामाची व्यस्त गणितं कोणालाच चुकलेली नाहीत म्हणून लांबलचक युक्तीवाद करत बसणं अशक्य झालं असंही असू शकतं.

वाहत चाललेल्या धाग्याला फाटे फोडण्याचे आणि चर्चेचा रोख दुसरीकडे वळविण्याचे कसब प्राप्त करणे गरजेचे आहे.

नक्कीच प्रयत्न करेन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खूप सुंदर आणि मार्मिक प्रतिसाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"संस्कृती गेली गाढवाच्या गावात" असे म्हणणे योग्य कारण इथे कर्म संस्कृती आहे.
"प्रतिसाद गेला गाढवाच्या गांडीत" असे म्हणणे अयोग्य कारण इथे कर्म प्रतिसाद आहे.
असो. विचारधारा आपापली.
-------------------------------
http://www.aisiakshare.com/node/3421
http://www.aisiakshare.com/node/137
http://www.aisiakshare.com/node/3001?page=2
शिव्या देणे भूषण आहे,
http://www.aisiakshare.com/node/3187
बायकांनी देणे अजून मोठे भूषण आहे.
http://www.aisiakshare.com/node/1582
आईवरून शिव्या घालणे देखिल योग्य आहे.
http://www.aisiakshare.com/node/3650?page=2#comment-85839
http://www.aisiakshare.com/node/1620
दलितांनी वापरणे हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार!

मात्र खोटारड्या माणसाला शिव्या घालणे चूक!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

या प्रतिसादाला मार्मिक श्रेणी दिली आहे. इतरांनी दिलेली 'खोडसाळ' श्रेणी न्यूट्रलाइज करायला...

अ‍ॅज संभाषण अशा शिव्या देऊ नयेत याच्याशी मात्र सहमत आहे. ललितलेखनात पात्राचे संभाषण म्हणून शिव्या येऊ शकतात.

पण अरुण जोशी सामान्यत: (नियमितपणे) अशा शिव्या प्रतिसादातून देत नाहीत हेही तितकेच खरे आहे. त्यामुळे त्यांनी एखाद्या प्रतिसादात शिवी वापरली असेल तर त्यावरून लेख पाडण्याची गरज नव्हती.

शिवाय कुणीतरी हीच शिवी संस्कृत भाषेतून वापरलेलीसुद्धा ऐसीवर पाहिली आहे.

माझी आणि अरुण जोशींची मते जुळत नाहीत. तरी त्यांच्या अभिव्यक्तीवर मर्यादा येणे योग्य नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

माझी आणि अरुण जोशींची मते जुळत नाहीत. तरी त्यांच्या अभिव्यक्तीवर मर्यादा येणे योग्य नाही.

+१
सदर वाक्य अजोंइतकेच कोणालाही लागु आहे आणि सहमत आहे.

सदर धाग्यात एक उदा दिले असले तरी कोल्हटकर गेल्या काही काळापासून जमा झालेला त्रागा व्यक्त करत आहेत असे वाटले. ते केवळ अजोंना टारगेट करत आहेत असे वाटले नाही, एकुणच बदललेल्या चर्चाविषय, भाषा व वातावरण याबद्दल बोलत असावेत असा माझा समज आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अलीकडे 'ऐसी'वर बिनबुडाचे वावदूक आणि वितंडवादी धागे फार येऊ लागले आहेत आणि काही ठराविक जणांच्या ठराविक शब्दांतील शिवीगाळीपलीकडे त्यतून काहीहि निष्पन्न होतांना दिसत नाही. हे धागे कोणते असावेत आणि त्याचे निर्माते कोण हे लिहिण्याची आवश्यकता नाही. जाणकार जाणतातच.

असे नमुने पाहता वरकरणी साळसूद प्रतिसाद असला तरी रोख समजायला विच्यारवंत असायची गरज नसते हो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

+१, माझ्यामते बोलण्यात चतुर लोक किंवा वकिली टाईप लोक बरोबर दुसर्याला फटकारतात आणि सरळ सरळ लिहिणारे पोलिटीकलि करेक्ट न लिहिता अडकतात. तसेही एकदा कानफाट्या नाव पडले की ते मिटणे कठीणच असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- इथे कुणाच्याही अभिव्यक्तीवर कोणत्याही मर्यादा नाहीत. बहुमतानं प्रतिसादाची श्रेणी ठरते. कोणताही प्रतिसाद अप्रकाशित केला जात नाही. फार फार तर दुसरीकडे हलवला जातो.
- कोल्हटकरांच्या प्रस्तुत 'पाडलेल्या' लेखात शिवीचा उल्लेख असला, तरी ते फक्त शिवीला उद्देशून बोलत नाहीयेत हे पुरेसं स्पष्ट आहे.
- माझा शिव्यांना जराही विरोध नाही. पण कोणत्याही प्रकारच्या लेखावर त्याच त्या प्रकारच्या प्रतिक्रिया देण्याला, सदस्यांना उचकवण्याचा प्रयत्न करण्याला, आणि एकूणच वादाचं स्वरूप वैयक्तिक करण्याच्या रूढ होणार्‍या पायंड्याला आहे. मीसुद्धा या प्रकारच्या दोषात अडकले आहे, असं गेल्या काही महिन्यांच्या ऐसीवरच्या एकूण लेखनाकडे पाहताना दिसतं.

त्यामुळे अरुणजोशींच्या अभिव्यक्तीवर मर्यादा येताहेत, या तुमच्या प्रतिसादातून सूचित होणार्‍या मताशी संपूर्ण असहमती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आपल्या सद्य स्वाक्षरीतील "पुरोगाम्यांच्या विरोधातील आमची सारी शस्त्रे म्यान करण्यात आली आहेत." या विधानास "नेमकी कोठे?" असा प्रतिसवाल (तसाही येथे म्हटले तर 'अवांतर' आहेच, पण) किमानपक्षी या धाग्याच्या संदर्भात तरी 'खोडसाळ' ठरावा काय? (किंवा, कदाचित, 'भडकाऊ'?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असे काही minimum standard चांगल्या संस्कारांवर विश्वास असणार्‍यानी स्वेच्छेने पाळले पाहिजे असे मला वाटते.

आपण चुत्या, गांडू, भेंचोद असे शब्द वापरू शकतो हे ऐसीवर एक गौरवाचे लक्षण मानले जाते असे जाणवते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

भाषेपुरते बोलायचे तर 'गाढवाच्या *** घालतो' असली भाषा आमच्या तोंडातून वा लिहिण्यातून कधीहि बाहेर पडत नाही

या वाक्प्रचारापुरतेच बोलायचे तर अशाच अर्थाचे वाक्य अगदी गाढव आणि जघनमंडळासकट एका ऐसीकर सदस्याच्या स्वाक्षरीतही आहे. तेव्हा कुठे गदारोळ झालेला दिसला नाही. आत्ताच काय झालं मग एकदम?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

स्पष्ट प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. तुमचा आक्षेप ज्यांना ग्राह्य वाटतो असे इतरही सदस्य आहेत असं प्रतिसादांवरून किंवा खाजगीत व्यक्त झालेल्या काही मतांवरून वाटतं. ह्याला अनुषंगून एक नुकताच वाचनात आलेला विचार इथे उद्धृत करावासा वाटतो -

पूर्वीची शहाणी माणसं म्हणायची की मूर्खांची गर्दी असेल तिथे शहाण्याने तोंड उघडू नये. आता ही म्हण बहुधा बदलावी लागेल. मूर्खांची गर्दी असेल तिथे मूर्खपणाला बहुमताचे अधिष्ठान मिळण्याचा धोका असल्याने शहाण्याने विरोधी सूर जिवंत रहावा म्हणून बोलले पाहिजे, खूप बोलले पाहिजे. अन्यथा जे समोर येते तेच खरे मानून चालण्याची सवय असलेला आळशी समाज मूर्खांच्या हातचे बाहुले बनून राहतो. प्रत्येक सुज्ञ स्वराने सातत्याने बोलत रहायला हवे, नेहेमीच बोलत रहायला हवे. मूर्खांचा गलबला असेल, द्वेषाने विषारी झालेल्यांची सद्दी असेल तिथे आपला स्वर शक्य तितका उंचावून बोलत रहायला हवे अन्यथा त्या गलबल्यालाच संगीत समजू लागतात सामान्य लोक आणि विषाला अमृत.

स्रोत

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सेव्हॉयर/सेव्हियर काँप्लेक्स नसलेले खूप कमी प्रतिसाद बघावयास मिळतात इथे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

"समवन इज राँग ऑन दि इंटरनेट" सिंड्रोम इनेस्केपेबल आहे. पण व्यक्तिशः मला अतिशय कंटाळा आला आहे चर्चांच्या गुर्‍हाळांचा. फुटकळ विदूषकी लिहिण्याकडे घरवापसीची वेळ आली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उत्तम विचार. शहाणे लोक सर्वांना आपल्यातले वाटले पाहिजेत. त्यासाठी शहाणपणासोबतच जरा चातुर्य (चाटुर्य नव्हे हेही मान्यच आहे..) वापरले पाहिजे. शहाण्यांकडे ते असतेच, फक्त बाहेर काढले पाहिजे इतकेच.
बराच काळ निरीक्षण करुन एकदम इतकावेळ सर्व मूर्खांची गंमत, सिनेमा, पर्दाफाश इ इ पाहात असल्याची जाणीव करुन देणे यापेक्षा शक्य तेवढ्या स्टेप्समधे तिथल्यातिथे सहभाग घेऊन जाणवलेला विरोधाभास दाखवून देण्याने मूर्खांच्या मनात शहाण्यांविषयी जजेस किंवा पासदार किंवा मुतव्वा अशी भावना न राहता त्यांना फॉलो करण्याची इच्छा होऊ शकते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बराच काळ निरीक्षण करुन एकदम इतकावेळ सर्व मूर्खांची गंमत, सिनेमा, पर्दाफाश इ इ पाहात असल्याची जाणीव करुन देणे यापेक्षा शक्य तेवढ्या स्टेप्समधे तिथल्यातिथे सहभाग घेऊन जाणवलेला विरोधाभास दाखवून देण्याने मूर्खांच्या मनात शहाण्यांविषयी जजेस किंवा पासदार किंवा मुतव्वा अशी भावना न राहता त्यांना फॉलो करण्याची इच्छा होऊ शकते.

या निमित्ताने स्वयंघोषित जालसेव्हियर लोकांनी आत्मपरीक्षण करणे सर्वांत जास्त गरजेचे आहे असे सुचवतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आत्ता बघितलं की गाढवाच्या *#^##त घातलेला प्रतिसाद आमचाच होता, म्ह़णून ही प्रतिक्रिया.
आमचं खरंच काही म्हणणं नाही. कुठला प्रतिसाद कुठे घालायचा, त्यासाठी प्रत्येकाने आपापली (आवडती?) जागा खुशाल निवडावी.

एक रूखरूख लागून राहिली ती म्हणजे अतिशय सभ्य शब्दांत व्यक्त केलेल्या माझ्या स्तुतीपर प्रतिसादाच्या नशिबी ही जागा आली.
असो. एकेका प्रतिसादाचं प्राक्तन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असा धागा कोल्हटकरांसारख्या बहुआयामी व्यक्तीला काढावासा वाटावा हे प्रत्येक ऐसीकराला आत्मपरिक्षण करण्यास पुरेसे ठरावे - ठरेल अशी आशा करतो.
आभार!

माझ्याकडून यापुढे मौजमजेचे धागे सोडल्यास जाहिर प्रतिसादांत वैयक्तिक टिपणी, कोणाचेही एकेरी उल्लेख होणार नाही व आलेल्या धाग्यांमध्ये काहितरी यशाशक्ती यशामती सकारात्मक भर घातली जाण्याचा पूर्ण प्रयत्न चालु राहिल (आधीही असा प्रयत्न असे, आता फक्त तेवढेच) अशी ग्वाही देतो.

चर्चा त्याच त्य मुद्यांभोवती फिरू नये यासाठी माझे मत ठामपणे मांडले तरी कोणत्याही एका मुद्द्यावर ३ पेक्षा अधिक (व स्वतः न काढलेल्या धाग्यावर एकूण सर्व मिळून ६ पेक्षा अधिक) प्रतिसाद देणार नाही असेही स्वतःपुरते टार्गेट ठेवतो आहे.

वैयक्तिक गप्पा, टिपण्या, एकेरी उल्लेख वगैरे खरडवही/व्यनीतूनच करेन.

रोखठोक पुनश्च आभार

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

खरये! बहुआयामी पितामहांना ऐसीचं वस्त्रहरण बघवलं नसावं.

ग्राम्य हा शब्द विषेश ठोचला.
---(ग्राम्य संस्कारी) सिफ़र

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुद्दाम हा विषय काढून, त्याबद्दल बोलण्याबद्दल आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सतीश वाघमारेंच्या लेखनाबद्दल कोल्हटकर काय म्हणतात पहा -
http://www.aisiakshare.com/node/1582

प्राध्यापक सतीश वाघमारे ह्यांच्या लेखनातील नित्याची शिवीगाळ आणि त्याचे समर्थन ज्यांना आवडत नसेल त्यांनी सन्माननीय प्राध्यापकांच्या असल्या लिखाणावर प्रतिक्रिया देऊ नये असे मी सुचवितो.

मागे 'उपक्रम'मध्ये एका सदस्याने स्त्रियांबद्दल असेच अनुदार उद्गार काढले आणि त्याचे निर्लज्ज समर्थनहि केले. तेव्हांपासून त्यांच्या लिखाणाकडे दुर्लक्ष करायला वाचकांनी सुरुवात केली आणि त्या सदस्याचे लिखाण त्यामुळे बंद झाले असे आठवते. कोणीहि काहीहि आव आणला आणि बेपर्वाई दाखविली तरी आपले लिखाण लोकांनी वाचावे आणि त्यावर लिहावे असे प्रत्येक लेखकास वाटते आणि म्हणूनच तो आपला वेळ खर्च करून येथे लिहीत असतो. निष्काम कर्मयोगी कोणीच नाही.

माझ्यापुरते मी हे बरेच दिवस करीत आहे. येथे अगदीच राहवले नाही म्हणून इतरांनाहि ही सूचना करीत आहे. एखाद्याने आपल्यासमोर कपडे काढायचेच ठरविले तर आपण काय करू शकतो? फारसे काही नाही, कपडे काढणारा आणखीनहि चाळे सुरू करेल पण डोळे बंद करून घेणे हे तर आपल्या हातात आहे की नाही?

मग त्यांना न उल्लेखता आणि इतर काही विरोधकांना उल्लेखून वाघमारे म्हणाले -

या संस्थळावर व्यक्त होण्यासाठीच्या आवश्यक निकषांमधे मी बसणारा नाही. तसेच ते निकष मला मानवणारे नाहीत. त्यामुळे यापुढे मी इथे लिहिणार नाही. कसलाही सहभाग घेणार नाही. माझ्याकडून ज्यांची मने दुखावली गेली त्यांनी त्यांची मने दुखावण्याचा माझा हेतु कधीच नव्हता. यावर विश्वास ठेऊन उदार मनाने मला माफ करावे ही नम्र विनंती. इथे खूप चांगल्याही व्यक्ती भेटल्या ज्यांच्या चर्चेतून निश्चितच माझे विश्व समृध्द झाले. त्यांचे मनापासून आभार मानतो. इथे लिहिण्याची संधी दिल्याबद्दल अँडमिन्सचे मनःपूर्वक आभार.
नमस्कार _____/\_____

---------------------------
कोल्ह्टकरांचे संस्कार हे गोल्ड स्टँडर्ड संस्कार आहेत का?
--------------------

बिनबुडाचे वावदूक आणि वितंडवादी धागे

धाग्यांच्या विषयाच्या गांभीर्यांची कल्पनेचा आयाम देखिल कोल्हटकरांस ठावा नसावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आपले म्हणणे ज्यांना समजायचे त्यांना समजले आहे आणि मान्य आहे. ते आपल्याला जाहीर सपोर्ट करत आहेत.

सदस्यांच्या इतरत्र केलेल्या लेखनाचे पुरावे शोधून अधिक काही साध्य होणार नाही. आपला वेळ (फुकट) जाईल इतकेच.चिल

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हेच म्हणतो.. अजो, तुम्ही सादर केलेल्या एक्झिबिट्समधून (!) तुमचा मुद्दा लक्षात आलेला आणि पटलेला आहे आणि तुम्ही मूळ स्वभाव सोडून आता असे "एक्स्ट्रीम सत्याचे प्रयोग" करत राहण्याची आवश्यकता नाही. मूळरुपात कृपया प्रकट व्हा आता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ROFLROFLROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मूळरुपात कृपया प्रकट व्हा आता.

यही तो मै कह रहा हूं.

अदृष्टपूर्वं हृषितोऽस्मि दृष्ट्वा
भयेन च प्रव्यथितं मनो मे ।
तदेव मे दर्शय देव रूपं
प्रसीद देवेश जगन्निवास ।।45।।

किरीटिनं गदिनं चक्रहस्त
मिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव ।
तेनैव रूपेण चतुर्भुजेन
सहस्त्रबाहो भव विश्वमूर्ते ।।46।।

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शिवी या एका शब्दावर बोट ठेवून इथे खाली जे काही भवति न भवति चालले आहे त्याला उद्देशूनः

मानवी समाजातील नियम गुंतागुंतीचे असतात. नियम, नियमांना असलेले अपवाद, अपवादांना असलेले अपवाद, वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये वापरण्याचे निरनिराळे नियमांचे उपसंच (आणि त्यांचे अपवाद इत्यादी), बदलत्या स्थळकाळानुसार बदलते नियम (आणि त्यांचे अपवाद इत्यादी)... असे त्यांचे स्वरूप असते. खेरीज ते मोठ्या प्रमाणावर व्यक्तिविशिष्ट आणि बदलते असतात. आपण जसजसे समाजात वावरायला शिकतो, तसतसे हे नियम आत्मसात करत जातो. हे गुंतागुंतीचे स्वरूप ध्यानी न घेतले नाही, की मग 'मागे तुम्ही अमुक अमुक योग्य म्हणाला होतात, आता कसं बदलून चालेल?' किंवा 'मागे तुम्ही अमुक अमुक अयोग्य म्हणाला होतात, आता गपचूप तेच चालू ठेवा.' असले युक्तिवाद सुरू होतात. वर त्यातली गुंतागुंत दाखवून द्यायला कुणी शहाणा पुढे आलाच, तर त्याची 'दुटप्पी' म्हणून संभावना करण्याचा सोपा मार्ग असतोच.

सध्या हे असेच इथेही चाललेले दिसते.

यातून नक्की काय साधते आहे? काही सदस्यांना असे वाटते की त्यांच्यावर अन्याय होतो आहे. पण बाबांनो, हे आहे हे असे आहे. 'बघा बघा तुम्ही किती दुटप्पी / अन्यायी / दांभिक.... बॉ बॉ बॉ...' अशा बोंबा मारून काहीच होणार नाही. लोक जर खरोखर निर्लज्जपणे दुटप्पी असतील, तर ते बदलणार नाहीतच. त्यांना तुम्ही किती काळ नि किती किंमत द्याल? मधल्यामधे हे फार कंटाळवाणे मात्र होत चालले आहे. पुरोगामी (का मष्ण्ये अजून कुणी असतील ते) लोक वायझेड आहेत, याबद्दल इथल्या बहुसंख्यांची खातरी पटली आहे. आता कृपया बोंबा थांबवाव्यात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

.....

धन्यवाद

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

असा बेनिफिट ऑफ डौट सर्व बाजूंना दिला जाईल तो सुदिन. सध्या तरी तो फक्त एकाच बाजूला दिला जातोय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

'पुरोगामी वायझेड आहेत' हा (पुरोगाम्यांना) बेनेफिट ऑफ डौट आहे???

'Never attribute to malice that which can be adequately explained by stupidity' अशा अर्थाने काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसीवरचे पुरोगामी हे खरे पुरोगामी आहेत की छुपे फॅसिस्ट आहेत हा प्रश्न आहे ( ते वाय्झेड असले तरी हरकत नाही )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

थोडे उन्नीसबीस करायला पुरोगामी लोकांनाच यात वाव आहे अशा अर्थी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

(शियरली औट ऑफ द प्युरेष्ट स्पिरिट ऑफ रेसिप्रॉसिटी):

पार्श्वगामी लोक(सुद्धा) यज्ञात झोपणार्‍यांतले आहेत.

आता ठीक? (अ‍ॅज़ इन, झाली फिट्टंफाट?)

................

बोले तो, बिगरपुरोगाम्यांना जे काही म्हणत असतील ते.

श्रेयअव्हेर: अपौरुषेयं इदं न मम| (संस्कृत व्याकरणाची...२अ)

२अ '...चूभूद्याघ्या.' असे मला म्हणायचे होते. पण मध्येच उगाच तळटीप तोडायची हुक्की आली. असो चालायचेच, इ.इ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ROFL

फिट्टंफाट कधीच होत नसते. पण प्रतिसादामुळे मज्या आली हेही नसे थोडके.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

फिट्टंफाट कधीच होत नसते.

द्याट्स द स्पिरिट!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या प्रतिसादाकरता 'न'वी बाजू यांना मागचे काही अपराध माफ करण्यात येत आहेत. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

'आत्ताच्या आत्ता माफी मागे घ्या!' अशी मी मागणी करतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता कृपया बोंबा थांबवाव्यात.

यांच्या डोक्यावर कोणीतरी थंड पाणी ओता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अलीकडे 'ऐसी'वर बिनबुडाचे वावदूक आणि वितंडवादी धागे फार येऊ लागले आहेत आणि काही ठराविक जणांच्या ठराविक शब्दांतील शिवीगाळीपलीकडे त्यतून काहीहि निष्पन्न होतांना दिसत नाही. हे धागे कोणते असावेत आणि त्याचे निर्माते कोण हे लिहिण्याची आवश्यकता नाही. जाणकार जाणतातच. दर्जेदार आणि भरीव चर्चा सुरू करणारे धागे क्वचित बघायला मिळतात. गेल्या पाच सहा महिन्यातील ही स्थिति असावी.

इथे श्री. कोल्हटकर यांच्या मताशी असहमती नोंदवतो. जर धाग्याचा विषय मतांचे ध्रुवीकरण करणारा असेल तर त्यावरील चर्चाही टोकाच्या मतांच्या आधारेच होणार. याचा अर्थ ऐसीवर सगळे गुडी-गुडी धागेच यावेत की काय? आजवर मी श्री. कोल्हटकरांचं ऐसीवरील जे लेखन मी वाचले आहे, ते बहुतांशी सांस्कृतिक इतिहासातील घटनांसंबंधी आणि काहीसं esoteric आहे. त्यावर लोकांचा संवादी/विसंवादी प्रतिक्रिया देण्याइतका अभ्यास असण्याची शक्यताच मुळात कमी असते. त्यामुळे त्यांच्या धाग्यावर 'वा वा' , 'लेख आवडला', 'नवीन माहिती मिळाली' याच प्रकारचे प्रतिसाद बहुधा येतात. आता 'ऐसी'वर सगळे असेच धागे येत राहावेत किंवा सर्व धाग्यांवर कायम असेच प्रतिसाद येत राहावेत अशी त्यांची अपेक्षा आहे काय? मला तर आत्तापर्यंत ज्या ज्या धाग्यांवर धुमशान झालेलं आहे त्या सगळ्या धाग्यांतून नवीन काहीतरी हाती लागलेलं आहे.

माझ्या मते ज्याने त्याने आपल्या या संस्थळाकडून काय अपेक्षा आहेत ते पुनश्च तपासून पाहिला हवं. जर एखाद्या धाग्यातून या अपेक्षा पूर्ण होत नसतील तर धाग्याकडे दुर्लक्ष करावं आणि सारखंच असं व्हायला लागलं तर संस्थळाकडे काही काळ दुर्लक्ष करावं (मी स्वतः मिपावरचा वावर मध्यंतरी अशा कारणांसाठी बंद केला होता). आणि लोकांशीच संवाद साधायचा असेल तर खव/व्यनि आहेच.

संस्थळाचे चालक योग्य त्या ठिकाणी योग्य ती कारवाई करत असतातच. पण स्पष्टच सांगायचं तर, श्री. कोल्हटकरांच्या ज्येष्टतेचा मान राखूनही असे म्हणावेसे वाटते की उगाच मनापासून विनंतीच्या नावाखाली लोकांना फंडे मारण्याचे प्रयत्न डोक्यात जातात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जर सध्याच्या धाग्यांबद्दल आक्षेप असेल तर स्वतःच नवीन धागे काढणे हे उपदेशापेक्षा कधीही श्रेयस्कर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जर सध्याच्या धाग्यांबद्दल आक्षेप असेल तर स्वतःच नवीन धागे काढणे हे उपदेशापेक्षा कधीही श्रेयस्कर.

फक्त ते धागे उपदेशपर नसावेत एवढीच माफक अपेक्षा....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऊप्स मला तसंच म्हणायचं होतं. धन्यवाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

का बुवा?

त्यांना अभिव्यक्तिस्वातंत्र्य नाही काय? त्यांचे म्हणणे कितीही पटले नाही तरी? (आणि तूर्तास आणि या धाग्यातले तरी त्यांचे म्हणणे मला पटलेले नाही.)

त्या उपदेशांकडे दुर्लक्ष करण्याचे स्वातंत्र्य तुम्हांआम्हांस उपलब्ध नाही काय?

तेव्हा, खुशाल काढू देत त्यांना उपदेशपर धागे. आपण त्या उपदेशांकडे दुर्लक्ष करून, ('धागा आहे, घाला गोंधळ!'च्या शुद्ध सोनेरी स्पिरिटमध्ये) त्याच धाग्यांत खाली यथेच्छ गोंधळ घालू. कसें?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्यांना जसे धागा काढून मनातले विचार बोलून दाखवण्याचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे तसे उपदेश न करणे हे जास्त श्रेयस्कर असे सांगण्याचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य आम्हांसही आहेच ना.

बाकी तुमच्याशी सहमत आहेच म्हणा. पण एक मत नोंदवावेसे वाटले, इतकेच. (पक्षी: हात शिवशिवत होते टंकायला.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

(पक्षी: हात शिवशिवत होते टंकायला.)

मग आम्ही तरी आमचा उपरस्थित प्रतिसाद नेमके काय म्हणून टंकला असे वाटले तुम्हाला?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हम्म, तेही आहेच म्हणा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

त्यांना जसे धागा काढून मनातले विचार बोलून दाखवण्याचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे तसे उपदेश न करणे हे जास्त श्रेयस्कर असे सांगण्याचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य आम्हांसही आहेच ना.

नक्कीच आहे.
या मंथनातून लोक तारतम्याने ठरवतील की शिव्यांच्या उल्लेखाची अपरिहार्यता व सहजता यात आपण नेमके कुठे आहोत? आमच्याकड लोहाराच्या शंकर्‍या व मुसलमानाचा पाप्या हे एकमेकांना अत्यंत घाण घाण शिव्या द्यायचे कारण त्याशिवाय त्यांना परस्परांची घट्ट मैत्री व्यक्तच करता येत नव्हती. ज्या पार्श्वभूमीवर हे घडायच त्यात हे कुणाला गैर वाटत नव्हत. तुच्छता व द्वेषापोटी शिव्या देणे व प्रेमाने शिव्या देणे यातला फरक तेथील जनतेला सहज समजत होता.
आमच्या कार्यालयात एकाला दाराची चौकट डोक्याला लागली त्याने वेदनेने कळवळून त्या चौकटीला आईमाई वरुन शिव्या घातल्या. थोड्या वेळाने मी त्याला हसत सांगितले अरे बाबा ती चौकट निर्जीव असल्याने त्याला आई नाही व दुसरे म्हणजे म्हणजे जरी सजीव असती तरी तो विशिष्ट अवयव प्रत्येकाच्या आईला आहे. म्हणून तर आपण जन्माला आलो ना| मग तोही ओशाळून हसू लागला.
आपण शिव्या बिनधास्त देतो म्हणजे आपण लई भारी अशा समजापोटी देखील काही लोक शिव्या देतात. कारण त्यांच्या मते ती विद्रोही अभिव्यक्ती आहे. आणि अभिव्यक्तीच्या अशा खंद्या पुरस्कारात त्यांना धन्यता वाटते. काही लोक पालुपदासारखे शिव्या देतात कारण संभाषणाची वीण सांधण्याचा तो दुवा असतो. त्यात शिवी चा अर्थ अभिप्रेत नसतो. रावसाहेबांच्या शिव्यातील निरागसता पुलंचे वाचक जाणतातच.
कोल्हटकरांच्या लेखाने आत्मपरिक्षण झाले असेल तरी त्यांचा हेतु साध्य झाला. आत्मपरिक्षणाला प्रवृत्त करणे म्हणजे उपदेश करणे असे नव्हे. आणि जरी उपदेश वाटला तरी त्यांना तो अधिकार आहे.मानणे न मानणे हा आपलाही अधिकार आहे.
कापडाच्या आतमदी आपन सम्दे भोंगळेच आस्तोय म्हनुन काय भोंगळच वावरायच का? हा सवाल मात्र आहे खरा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

प्रतिसाद आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

धागा आहे, घाला गोंधळ!'च्या शुद्ध सोनेरी स्पिरिटमध्ये त्याच धाग्यांत खाली यथेच्छ गोंधळ घालू. कसें?

ROFLROFL __/\__

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

उगाच मनापासून विनंतीच्या नावाखाली लोकांना फंडे मारण्याचे प्रयत्न डोक्यात जातात

+११११११११११

उगाच समतोलपणासाठी समतोलपणा ज्यांना हवाय त्यांनी पुढचा भाग वाचला नाही तरी चालेल.

हे "विक्षीप्त" वाक्य चालुन इथे जाते Sad

रादर प्रतिक्रीयेच्या नावाखाली आपल्या मनातला पराकोटीचा द्वेष कसा दाखवुन द्यायचा ह्याचे "संघभेट - एक छोटा वृत्तां"" ही प्रतिक्रीया म्हणजे उत्तम उदाहरण आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे "विक्षीप्त" वाक्य चालुन इथे जाते

अहो चालायचंच. किती म्हटलं तरी बायस असणारच की. काय म्हटलंय यापेक्षा कोणी म्हटलंय यावरच लोक फोकस करताना दिसतात (आणि अन्यत्र नेमके त्याच्या विरुद्ध वागण्याचा पुरस्कार करतात- पण विचार व कृती यांचा काहीच संबंध नसतो अशा सावळ्यागोंधळाचेही इथे समर्थन करण्यात आलेय तेव्हा त्यानुसार ते ठीकच आहे म्हणा.). त्यात नवीन ते काय. शेवटी मायनॉरिटीच्या हक्कांबद्दल किती बोंबलले तरी इथेही तोच प्रकार आहे. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

परंपरा प्रतिष्ठा अनुशासन... संस्थळावर हवेच. मोहब्बते मोड ऑफ. Wink

खालील ओळ सर्वांना उद्देशुन.
WTF यार ? अतिरेक करु नका... मिठ जास्त पडले तर जेवण खारट होते याचे भान ठेवले म्हणजे झाले. इतकीच अपेक्षा आहे. अन्यथा AI- Roast म्हणून तुनळीवर च्यायनेल सुरु करावा लागेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

कुठल्याही संकेतस्थळावर सर्व सदस्य सगळ्या content वर सर्वकाळ खुश आहेत असा युटोपिया अस्तित्वात येण्याची सुतराम शक्यता नाही . मराठी संकेत स्थळांवर तर नाहीच नाही . काही सदस्य खुश असणार काही नाखूष . Part and parcel of the game . मग तक्रार करून काय हशील ? काहीकाळ संकेत स्थळ ऑटो पायलट मोड वर चालवायची कल्पना कशी वाटते ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

काहीकाळ संकेत स्थळ ऑटो पायलट मोड वर चालवायची कल्पना कशी वाटते ?

म्हणजे? मग तूर्तास नक्की कोठल्या मोडमध्ये चालू आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोल्हटकरांना संस्थळाचे वातावरण कसे असावे ते सांगायचा पूर्ण अधिकार आहे.
----------------
पण हे करताना त्यांनी होलिअर दॅन दाऊ पावित्रा घेतला आहे.
--------------
काय बोलले चालले एवढ्याकडे लक्ष आहे पण मूळ कारण काय आहे आणि ते कसे दूर करावे याकडे नाही.
-------------------------
पण तरीही त्यांनी एक चांगली विनंती केली आहे. "सर्वांनी" लक्षपूर्वक ध्यानात घ्यावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

गागां प्रकरणी आम्ही तुम्हाला पाठिंबा दिलेला आहेच. मात्र

हे करताना त्यांनी होलिअर दॅन दाऊ पावित्रा घेतला आहे.

याच्याशी पूर्ण असहमत. कोल्हटकरांनी ज्या पद्धतीने मांडले आहे त्यातून त्यांची सदिच्छा दिसून येते.

काय बोलले चालले एवढ्याकडे लक्ष आहे पण मूळ कारण काय आहे आणि ते कसे दूर करावे याकडे नाही.

एखादी गोष्ट त्यांच्या काही धारणांमुळे त्यांना खटकली आणि बदुतेक बराच काळ वाटत असलेल्या इतर गोष्टींच्या पार्श्व्भूमीवर ते केवळ लेखासाठी तात्कालिक कारण झाले. त्यांनाच काय, तेच तेच मुद्दे उगाळणार्‍या अशा वादांचा त्यांच्याप्रमाणे बर्याच लोकांना कंटाळा आलेला आहे. सर्वांना तो आलेला नाही , हे वाद ज्या प्रमाणात चालताहेत त्यावरून लक्षात येते.

पण तरीही त्यांनी एक चांगली विनंती केली आहे. "सर्वांनी" लक्षपूर्वक ध्यानात घ्यावी.

अगदी सहमत. त्यात तुम्ही, आम्ही, इतर सगळेव आले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोल्हटकरांनी दाखवलेला आरसा माझ्यासाठीच आहे असे मानून चालतो, तसे केल्याने माझे नुकसान काहीच नाही, झाला तर फायदाच होईल.
शिवीला शक्यतो तोंड न लावण्याचाच प्रयत्न राहील.
आणि प्रत्येक प्रतिसाद प्रकाशित करण्यापूर्वी नक्की मुद्द्याच्या प्रतीवादासाठी आहे की व्यक्तीच्या प्रतीवादासाठी आहे हे तपासून पाहिले जाईल अशी हमी देतो.
बाकी संस्थळाचे स्वरूप कसे असावे, शिवी विरुद्ध ओवी की शिवी हीच ओवी, कोण कोणास काय केव्हा म्हणाले, इत्यादी परिसंवादात भाग घ्यायला माझा अभ्यास तोकडा पडतो हे मान्य आहेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रतिसाद फार आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

शिवीला शक्यतो तोंड न लावण्याचाच प्रयत्न राहील.

स्वतःस अर्धवट असे संबोधणे ही शिवी आहे की ओवी ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

याला फारतर आत्मज्ञान असे म्हणता येईल Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यावरुन आठवले लहानपणी पालकांना थेट विचारलच होतं की मूर्ख-बावळट-नालायक व हलकट यापैकी शिव्या कोणत्या. Biggrin कारण तेवढाच स्पेक्ट्रम माहीत होता.
उत्तर मिळाले होते - यातील फक्त "हलकट" ही शिवी आहे Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

कोल्हटकरांचा एकूणच मुद्दा चर्चेकरता सुपिक वातावरण असावे, चर्चा हेल्दी असावी असा आहे. हा मुद्दा प्रतिसादांतील शिवी देणे योग्य का अयोग्य वगैरे किरकोळ वादांत हरवल्यासारखा वाटतो.

एक वाचक या नात्याने मला जर बहुसंख्य वेळ वितंडवादच मिळाला आणि माझ्या वेळेचे खोबरे झाले तर अशा ठिकाणी पुन्हा यावे का नाही हा विचार मी करणारच. एखाद्या संस्थळावर जर अभ्यासू, माहितगार सदस्य असतील मात्र ते बहुसंख्य वेळ वायाच घालवत असतील तर माझ्या स्वार्थापोटी मीही असाच सल्ला देण्याची शक्यता आहे.

केपलर जेव्हा टायको ब्राहेकडे त्याने केलेल्या ग्रहांच्या परिवलनाच्या नोंदीकरता गेला तेव्हा टायकोसारखा हुशार माणूस मेजवान्या वगैरे शौक करण्यात पुष्कळ वेळ घालवतो म्हणून केपलरने नाराजी व्यक्त केली. ग्रहांच्या गतीचा शोध लावण्यात आयुष्य घालवणार्‍या केपलरचे हे मत समजण्यासारखेच आहे, पण म्हणून मेजवान्या वाईट आहेत असा अर्थ कोणी काढला तर तो हास्यास्पद होईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0