ल्युसिल क्लिफ्टन यांच्या २ कविता

"कविता" हा माझा जीव की प्राण असा साहीत्यप्रकार आहे.
कवितांमध्ये असलेली भावना चेतविण्याची क्षमता हाच पैलू नाही तर थोड्या शब्दांत खूप काही मांडण्याची आणि मनावर शाश्वत छाप सोडण्याची क्षमता हे कवितेचे अन्य पैलूदेखील अतिशय आकर्षक आहेत. अतिशय अर्थवाही असा हा साहीत्यप्रकार मला खूप आवडतो याचा अर्थ कळतोच असे नाही. वेड मात्र जबरदस्त आहे.
मी आजवर वाचलेल्या सर्वोत्तम कवितांपैकी एका कवितेबद्दल हा धागा आहे. "आर्ट इज नॉट आर्ट अनटिल इट डिस्टर्ब्स यु" हे वाक्य या पुढील कवितेबद्दल तंतोतंत खरे आहे. ल्युसिल क्लिफ्टन या कवयित्रीची पराकोटीची दाहक, इन्टेन्स कविता म्हणून मला "शेपशिफ्टर पोएम" ही कविता अतिशय आवडते. अतिशय वेगळ्या विषयावरील ही कविता वाचकाच्या हृदयात भीती, घृणा, वात्सल्य आणि करुणा यांचा कल्लोळ माजवते, या सर्व भावना एकाच वेळी उद्दीपीत करते.
या विषयावर मी वाचलेली ही पहीलीच कविता. माझा ल्युसिल क्लिफ्टन या कवयित्रीला , तिच्यातील प्रतिभेला तसेच स्वतःची कहाणी जगापुढे मांडण्याकरता लागणार्‍या धैर्याला कडक सॅल्यूट. विषय सांगत नाही. कविता वाचल्यावर उमगेलच.
_____ shapeshifter poem - Lucille Clifton____________

the legend is whispered
in the women's tent
how the moon when she rises
full
follows some men into themselves
and changes them there
the season is short
but dreadful shapeshifters
they wear strange hands
they walk through the houses
at night their daughters
do not know them
2
who is there to protect her
from the hands of the father
not the windows which see and
say nothing not the moon
that awful eye not the woman
she will become with her
scarred tongue who who who the owl
laments into the evening who
will protect her this prettylittlegirl
3
if the little girl lies
still enough
shut enough
hard enough
shapeshifter may not
walk tonight
the full moon may not
find him here
the hair on him
bristling
rising
up
4
the poem at the end of the world
is the poem the little girl breathes
into her pillow the one
she cannot tell the one
there is no one to hear this poem
is a political poem is a war poem is a
universal poem but is not about
these things this poem
is about one human heart this poem
is the poem at the end of the world
______

वरील धागा हा अन्य संस्थळावर पूर्वप्रकाशित आहेच. इथे (मला आठवते त्याप्रमाणे) पहील्यांदा टाकला आहे. जर एखाद्या प्रतिसादामध्ये ही कविता मी नमूद केली असेल तर निदान आठवत तरी नाही.
आज परत ल्युसिल क्लिफ्टनचे समग्र कवितांचे पुस्तक वाचत असताना, तिने भोगलेले हे दु:ख अन त्रास , परत तोच विषय एका अन्य कवितेतून सामोरा आल. अन परत एकदा चर्र झाले. ती कवितादेखील खाली देत आहे.
फक्त काहीतरी भडक लिहायचे हा हेतू नसून, अतिशय वेगळ्या व बोल्ड विषयावरील कविता वाचकांपर्यंत (इंग्रजी कविता आवडणार्‍या) हा हेतू आहेच अन लिहावसं वाटलं हादेखील. अर्थात स्पष्टीकरणाची गरज नसूनही देते आहे.

______ moonchild - Lucille Clifton_________________

whatever slid into my mother's room that
late june night, tapping her great belly,
summoned me out roundheaded and unsmiling.
is this the moon, my father used to grin.
cradling me? it was the moon
but nobody knew it then.

the moon understands dark places.
the moon has secrets of her own.
she holds what light she can.

we girls were ten years old and giggling
in our hand-me-downs. we wanted breasts,
pretended that we had them, tissued
our undershirts. jay johnson is teaching
me to french kiss, ella bragged, who
is teaching you? how do you say; my father?

the moon is queen of everything.
she rules the oceans, rivers, rain.
when I am asked whose tears these are
I always blame the moon.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

या

the moon understands dark places.
the moon has secrets of her own.
she holds what light she can.

आणि

the moon is queen of everything.
she rules the oceans, rivers, rain.
when I am asked whose tears these are
I always blame the moon

ओळी विशेष आवडल्या. विषय खरचं दचकवणारा.
तुझं कविताप्रेम वाखाणण्यासारखं आहे. किती वेगवेगळ्या विषयांवरच्या वेगवेगळ्या कवींच्या कविता माहिती आहेत तुला! (मला तुझा हेवा वाटतो. Smile )

(असं वाचतेस म्हणून मनःशांती शोधावी लागते तुला. Smile )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुझ्या प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद अंतरा.
_____
ल्युसिलची ती पहीली कविता वाचेपर्यंत मला माहीतच नव्हते की "चाइल्ड अ‍ॅब्युझ" या विषयावर कविता ही कोणी करु शकते. "The language of life - Bill Moyers" या पुस्तकात मुलाखतीत ल्युसिल छान सांगते - जरी "shapeshifter poem" मधील मुलगी ही मीच असले तरी ती माझी "identity" नाही. ना त्या कवितेतील वडील ही माझ्या वडीलांची "संपूर्ण identity" आहे. अन पुढे ती बरच लिहीते. पैकी एक जरुर कृतज्ञतेने सांगते - I inherited from him so many strong & good qualities, including stubbornness, strength, intelligence & curiocity. He was a remarkable man.
_____
भारतात असताना "बिटर चॉकलेट" पुस्तक वाचून अशीच अस्वस्थ झाले होते. खरं तर लहान मुलांसाठी काही करावं अशीच इच्छा पूर्वी होती, मी सोशल वर्क ची पदवी वगैरेही शोधत होते. पण काही कारणांनी तद्दन व्यवहारी/स्वगल्लाभरु व्यवसायात शिरले. अन ते ठीकही आहे. सोशल वर्क फील्डमध्ये काम करायला, फक्त इच्छा नाही तर अफाट धैर्य पाहीजे.
____
ल्युसिलच्या कविता वाचताना तिच्यातील माणुसकी अन एक "लाईट"/प्रकाश अन क्लॅरिटी जाणवते. ल्युसिल म्हणजेच लाईट. आफ्रिकन अमेरीकन या कवयित्रीने वर्णद्वेषाविरुद्धही कविता लिहील्या आहेत. आई बद्दल तर इतक्या सुंदर कविता आहेत, स्वतःच्या मुला-मुलींबद्दलही.
____
कविता आपल्यातल्या रानटीपणाला "टेम" करते हा माझा अनुभव आहे. त्यामुळे सातत्याने कवितेच्या सान्निध्यात रहावेसे वाटते हे ही खरे आहे. पण मजा तेव्हा दुणावते जेव्हा कविता कोणाबरोबर तरी आपण शेअर करतो त्या व्यक्तीलाही ती भावते Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सोशल वर्क फील्डमध्ये काम करायला, फक्त इच्छा नाही तर अफाट धैर्य पाहीजे. >> खरंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता आपल्यातल्या रानटीपणाला "टेम" करते हा माझा अनुभव आहे

चांगली कविता आपल्यातला तथाकथित सुसंस्कृतपणा "टेम" करते. असा माझा अनुभव आहे.
Smile Smile Smile
  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझाच धागा परत वर काढते आहे. आज परत या कविता वाचल्या आणी तितकीच डिस्टर्ब झाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचून अस्वस्थ झालो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काल ऐसी चाळत होते आणि हा धागा सापडला. अति अति डार्क विषय आहे खरा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0