ती हिंगाची ज्यादा चिमूट - मुळ लेखक गवि
या प्रतिसादानिमित्ताने मनात खूप काळापासून असलेला एक विचार जागा झाला.
अगदी प्रचलित पदार्थच, पण एखाद्या व्यक्तीच्या हातून इतरांपेक्षा अत्यंत जास्त चांगले बनतात. अगदी आउटस्टँडिंग.
ती व्यक्ती अन्य सर्वच पदार्थांबाबत सुगरण (चवीच्या दृष्टीने आणि आवड या दृष्टीनेही) असेलच असं नव्हे.
उदा. एखादा नातेवाईक फक्त पिझ्झाच छान करतो.
कोणाचे साधे पुडिंगही लक्षात राहते.
कढी हा तर किती नेहमीचा पदार्थ, पण अन्य बराचसा स्वयंपाक न येणारे माझे बाबा खरोखर अत्यंत उत्कृष्ट कढी बनवायचे.
उकडलेल्या बटाट्याची भाजीसुद्धा करणार्या व्यक्तीनुसार अतिसामान्य बेचव ते "हे काय, संपलीसुद्धा, अर्र" अशा मोठ्या रेंजमधली असते.
याहून जास्त मुद्दा मांडण्यची गरज नाहीच. सिंप्ली पुट, या विषयावर लोकांनी टिप्स द्याव्यात इतकाच विनंतीवजा मुद्दा आहे. पण केवळ हाताला चव आहे असं नसतं.. त्या व्यक्तीचा त्या पाककृतीत एक काहीतरी खास बदल किंवा अॅडिशन असते.
एका कोणाचीतरी साबुदाण्याची खिचडी प्राणप्रिय म्हणावी इतकी मऊसूत आणि खमंग होत असताना त्याविषयी अन्य एका स्त्रीकडे बोलले असता "हॅ.. तूप अन दाणकूट ढप्पळभर घातले की मऊ होईलच खिचडी.." असे उत्तर मिळाले.
पण हे बरोबर नाही.. तूप जास्त किंवा दाणकूट जास्त घातल्याने जर खिचडी उत्तम होत असेल तर कधीतरी तशी करुन खाण्याची इच्छा आहे.
बटाट्याच्या भाजीत हिंगाची चिमूट नेहमीपेक्षा जास्त मोठी घातल्याने तो घमघमाट स्वर्गीय होणार असेल.. किंवा फणसाच्या नेमक्या मधल्या स्टेजला भाजी केल्याने ती जास्त चविष्ट होणार असेल आणि अन्य स्टेजला कडू होणार असेल तर ते माहीत हवे.
"ती हिंगाची ज्यादा चिमूट" अश्या काहीशा नावाने एक धागाच काढायचे मनात होते. पण हा प्रतिसाद पाहून इथेच टंकले..
======
व्यवस्थापकः या विषयावर अधिक अंगाने + पदार्थांवर चर्चा व्हावी, विविध पाककृती करताना वापरल्या जाणार्या गोष्टी (जणू खांसाहेबांच्या चिजा :) ) या चर्चेतील प्रतिसादातून खुल्या व्हाव्यात या उद्देशाने तसेच भविष्यात शोधायला सोपे जावे म्हणून धागा वेगळा काढत आहोत. लेखकाला आवश्यक वाटल्यास चर्चाप्रस्ताव अधिक व्यापक / बांधीव करू शकेलच. मुळ प्रतिसाद इथे होता.
व्यवस्थापकः मुळ लेखकाला श्रेणीदान करता यावे म्हणून मूळ लेखकाच्या परवानगीने धाग्याचा लेखक बदलला आहे.
Taxonomy upgrade extras
साबुदाणा भिजणे हे वाटते तितके
साबुदाणा भिजणे हे वाटते तितके सरळसोपे नसावे.
जास्त पाण्यात भिजला तर गिचका / गोळा / जेली होते.
कमी भिजला तर गाभ्यात कडक राहिल्याने दाताखाली येतो.
माझ्या आजीने मला सांगितलं होतं की साबुदाणा पाण्यात बुडवून ठेवायचा नाही. त्यावर एकदाच जेमतेम बुडेल इतके पाणी ओतून चाळणीवर घेऊन अधिकचे पाणी लगेच काढून टाकायचे.
हे मला असे समजले. आता आजी नाही, त्यामुळे तेव्हा जे तिने सांगितले त्यानुसार आताही करतो. गिचका होत नाही पण चवही येत नाहीच.
मऊ खिचडी करायचे आणखी काही
मऊ खिचडी करायचे आणखी काही उपाय
-- खिचडी शिजत आल्यावर त्यात चोचवलेली काकडी पेरली तर त्याचे बाष्प खिचडी मऊ ठेवायला मदत करते
-- खिचडी मंद आचेवरच भाजणे + सतत फ्लेम कमी जास्त न करणे
-- आवडत असेल तर दाण्याच्या कूटासोबत (अधिक आवडत असेल तर ऐवजी) ओल्या खोबर्याचा वापर करणे. खिचडी हमखास मऊ
-- माझ्या एका मामेबहिणीच्या सासुबाई खिचडी भिजवताना त्यात लिंबाची लहान फोड पिळत, आंबटपणा खोलवर मुरतही असे आणि खिचडी मऊ होई (ती त्यामुळेच असा त्यांचा दावा)
समांतरः
-- खिचडी उपासाविना खायची असेल तर वेरीयेशन म्हणून माफक पुदीना लावून बघा, भन्नाट लागते (पुदिना उपासाला चालतो की नाही मला नाही माहित)
-- टोमॅटो खिचडीही बरी लागते (मला फार आवडत नसली तरी प्रत्येकाची चव वेगळी) मात्र ती टेक्श्चरला अतीव छान होते
ओतलेले पिठले आणि पेरलेले
ओतलेले पिठले आणि पेरलेले पिठले या दोन्ही प्रकारांनी मी पिठले बनवले आहे. पण ओतलेले पिठले मला कमी क्लिष्ट वाटल्याने त्यावर स्थिरावलो.
पीठ पाण्यात आधीच मिसळून ते हाताने नीट एकजीव करुन मग तयार फोडणीवर एकदम ओतणे म्हणजे ओतलेले पिठले
आणि
फोडणीवर पाणी घालून ते उकळल्यावर वरुन पीठ भुरभुरत ढवळणे म्हणजे पेरलेले पिठले अशी माझी समजूत आहे. ती चुकीची असू शकेल.
पेरलेल्या पिठल्यात इन्व्हेरिएबली गुठळ्या होत असल्याने आणि बराच वेळ ढवळल्याने मनगटे दुखत असल्याने ते टाळून ओतलेले पिठलेच करतो.
मी पिठल्याच्या फोडणीत जास्त कांदा आणि कढीपत्ता घालतो. आणि पिठले शिजत असताना शेवटाला त्यात दही घालतो. त्यामुळे दह्यातले पिठले जास्त चांगले लागते असा अनुभव आहे. दही घालण्याची वेळ बदलावी का? शिवाय या पिठल्याचा दाटपणा नेमका हवा तसा (घट्ट सुके किंवा पळीवाढ) येण्यासाठी पाण्याचे नेमके प्रमाण अजून फिक्स झालेले नाही. कधीकधी पिठल्याची क्वांटिटी प्रचंड जास्त होते आणि ते ओतण्याच्या स्टेजपर्यंत लक्षात येत नाही.. हाही एक उर्वरित प्रॉब्लेम आहे.
पेरलेले पिठले का आवडत नाही?
पेरलेले पिठले का आवडत नाही? काही अनुभवाच्या टिपाः ;) थोडा झुणक्यासारखा पोत ठेवला आणि गुठळ्या शिजतील इतपत उकळवले तर छान लागते. पेरलेल्या पिठल्यात कांदा टाकू नका. त्याने पिठल्याला गोडसरपणा येतो. (नंतर हवा असल्यास तोंडी लावायला कच्चा कांदा घ्या) व हिरव्या मिरचीऐवजी लाल मिरचीची फोडणी द्या. भाजलेले शेंगदाणे भरडसर वाटून पेरलेल्या पिठल्यात टाकले तर आणखी एक चवबदल.
पेरलेले पिठले चवीला
पेरलेले पिठले चवीला आवडतेच..पण करायला त्रास होतो. कितीही मोडल्या तरी गुठळ्या होतात आणि भरपूर पीठ थोडे थोडे करुन पेरत राहायला बराच वेळ लागतो. मुख्य म्हणजे जरा दाट व्हायला हवे असेल तर फार म्हणजे फारच जास्त वेळ पीठ अॅडवत बसावे लागते.
सुरुवातीला टाकलेले पीठ जास्त शिजले आणि शेवटी पाचदहा मिनिटांच्या अंतराने टाकलेले शेवटचे पीठ कमी शिजले अशी येररही होत असेल काय? (सुरुवातीची भजी जळणे आणि शेवटची कच्ची = भजीघाणा येरर(!?) )
भाजलेल्या शेंगदाण्याचे भरड कूट हे नवीन आहे. नक्की करुन पाहिले जाईल.
नाही
गुठळ्या हा प्रॉब्लेम नसून यूएसपी आहे. गुठळ्या अगदी लहान हव्यात (फार तर मटकीच्या दाण्याएवढ्या). आणि त्या चांगल्या शिजल्या पाहिजेत. गुठळ्या जास्त मोठ्या होऊ नयेत यासाठी पीठ पेरायला बराच वेळ लागतो हे खरे आहे. पण दोन तीन माणसांसाठी पाच ते सात मिनिटे वाढतात असा अनुभव आहे. सरावाने जमेल. पाहिजे तर तुम्ही पीठ पेरत असताना बायको किंवा इतर कोणाला तरी पाणी ढवळत ठेवायला सांगा. पाणी ढवळत राहिले तर गुठळ्यांचा आकार कमी होतो.
कमीजास्त शिजले आहे असा अनुभव आला नाही.
आणखी एक व्हेरिएशन
ओतलेल्या पिठल्याचे आणखी एक व्हेरिएशन ट्राय करुन पाहा. खोलगट भांड्यात झुणक्यासारखे हलवता येईल असे पातळ करण्याऐवजी त्याचे बॅटर घट्ट ठेवून तव्यावर टाका. मात्र हे पिठले मेन कोर्ससाठी कोरडे वाटण्याची शक्यता आहे. दुसरी पातळ भाजी असल्यास तोंडी लावायला म्हणून ठीक आहे. चांगले खरपूस होत असल्याने चटकदार लागते. (खरवड आवडत असल्यास तीही मिळते)
बिनदह्याचे
बिनदह्याचे पिठले करण्याचे एक व्हेरिएशन म्हणजे त्यात चवीपुरते काळे मिरे टाकणे किंवा ताजे आले किसून टाकणे.
काळे मिरे टाकले नसल्यास हिरव्या मिरच्या टाकून पाहता याव्यात, लाल तिखट वापरु नये.
अर्थात ही रेशिपी मी करुन पाहिलेली नाही. आमच्याकडे येणार्या मावशी अचानक कधीकधी मूड असल्यास आम्हा पोरांना असे पिठले करुन देत.
रेशिपीचे हे त्यांनी सांगितलेले मला आठवते तसे वर्णन आहे.
थोडे व्हेरीएशन
याबद्दलचे मी काही बदल करतो ते देतो:
१. पीठ आधी नुसते तव्यावर/कढईत भाजून घेतो व पुन्हा वेगळे काढतो. पिठले अधिक खरपूस लागते
२. एकूण घ्यायच्या पाण्यात अर्धे भाजलेले पिठ मिक्स करून ठेवतो. मग फोडणीत कांदा जस्ट गुलाबीसर व्हायला लागला की उरलेले अर्धे पिठ थेट फोडणीत घालतो गुठळ्या मोडणे सोपे होते. खमंग वास सुटला की आधी जे अर्धे पीठ+पाणी कालवले आहे (खरंतर इथे पाणी खूप वाटते कारण पीठ अर्धेच असते पण ते तसेच असते) ते घालतो. इथे गाठीही कमी होतात नी चवही खरपूस लागते.
३. मिरच्यांचे मोठे तुकडे पोटात उभे चिर देऊन टाकतो
झुणका!
>>एकूण घ्यायच्या पाण्यात अर्धे भाजलेले पिठ मिक्स करून ठेवतो
घट्ट झुणक्यासाठी हे योग्य प्रमाण आहे.
खोलगट तव्यात(पदार्थ व्यवस्थित हलवता येईल असा जाड बुडाचा) हे मिश्रण टा़कण्यापूर्वी गुठ्ळ्या मोडण्यासाठी अंडे फेटायची स्प्रिंग वापरता येईल. किंवा रवीने (स्प्रिंग असणारी, दाबल्यावर फिरणारी रवी असेल तर कमी कष्ट) भरपूर घुसळता येईल.
झुणका हिरव्या मिरचीने खूप खमंग होत नाही, (पातळ पिठल्याला मिरची हवी) त्यासाठी लाल तिखटच हवे. लाल तिखट म्हणजे केवळ मिरचीची पूड नव्हे, तर लवंगी + ब्याडगी मिरच्यांचा मसाला. लाल-ति़खट बेसनाचे मिश्रण करताना किंवा फोडणीच्या वेळेस असे दोन्ही वेळेस घालता येते. लाल तिखटाच्याही गुठळ्या फोडाव्यात.
बेसनाला तेल थोडे जास्त लागते, त्या हिशोबाने भरपूर तेल घ्यावे. तेलावर मर्यादा असल्या (किंवा नसल्या) तर झुणका भाकरीबरोबर बरा! इथे म्हंटल्याप्रमाणे कांद्याचा झुणक्याला येणारा गोडसर पणा घालवण्यासाठी तो मी कोथिंबिरीबरोबर अगदी शेवटीच टाकतो. हा कांदा बारीक चिरलेला. चिरलेल्या कांद्याऐवजी अति लहान लहान छोटे आख्खे कांदे पेरुन केलेला झुणकाही मस्त. (झुणका जास्त माणसांसाठी करणार असाल तर छोटे आख्खे कांदे असा एक माझा ठोकताळा आहे). झुणका निवांत शिजू द्यावा. बेसनाचे पाणीदार मिश्रण फोडणीत ओतल्या ओतल्या लगेच हलवायला सुरुवात करायची. भरपूर हलवावे. वड्या पाडण्या इतका घट्ट झाल्यावर सर्व तव्यावर पसरून मंद ते मध्यम अशा बदलत्या आगीवर झुणका शिजू द्यावा. त्याखाली जितक्या वेळेस करप आणता येईल तेवढा झुणका खमंग. खालची करप ठार काळी पडू देऊ नये. तपकिरी झाली की ती उरलेल्या झुणक्यात हलवून मिसळून टाकावी. हे बर्याचदा करावे. झुणका झाकूनही शिजू द्यावा. रंग अति तपकिरी न होऊ देता तो शिजल्यावर उतरला की मग कोथिंबीर कांदा यांची पेरणी!
गृहीणी बायांना एखादा पदार्थ
गृहीणी बायांना एखादा पदार्थ केला की तो इतरांना खायला घालायचा भारी सोस असतो. कसा झालाय? अस विचारल्यावर कुणी वाईट झालाय अस म्हणणार आहे का? मी चांगला झालाय पण मला आवडला नाही असे उत्तर दिले की दुष्ट वाटते. मी बायकोला नेहमी सांगतो की खवैय्या नसलेल्या माणसाला( म्हणजे मी) पदार्थ दिल्यावर त्याने स्वतः हून चांगला झालाय असा प्रतिसाद दिला की पदार्थ चांगला झालाय असे समजावे.
काही खवैये चलाख पुरुष मात्र वहिनी मामी काकू आत्या अस करुन तोंड फाटेस्तोर स्तुती करतात व आपल्याला हवा तो पदार्थ पदरात पाडून घेतात.
+१
बराबर बोले.
तोच प्रकार "जरा चव घेउन बघ"चा. आता परमेश्वराने माझ्या जीभेला तसलं काही शिकवलंच नाही तर काय करणार? म्हणजे चव चांगली का वाईट ते समजतं. पण पुढ्चे बाउन्सर झेपत नाहीत.
"मीठ कसं आहे?" "तिखट लागेल का?" "साखर तर जास्त नाहिये ना?" - आय्च्यान समजत नाही. बरं, हे सांगूनही फायदा नाही. माझ्याकडे तुच्छ केविलवाणा कटाक्ष टाकून दुसरं सावज हेरायला बाया पसार होतात.
मी पुढल्या जन्मी वाईन टेस्टर होणार आहे बहुतेक.
लहानपणी आईनी वाढलं की इतकी
लहानपणी आईनी वाढलं की इतकी तल्लीन तंद्री लागायची. आई विचारायची "अगं कसं झालय ते तरी सांग" शेवटी तिला समजावून सांगीतलेलं आठवतय "आम्ही तन्मयतेने खातोय, गप्प गप्प, त्यातच तू चवीचं यश समजायचस." अन ते खरही होतं - मॅनर्स पाळायचं भान तर रहायला हवं :)
____
मी पहील्या घासाला व्यक्तीचे डोळे कसे चमकतात ते पहाते. ही पद्धत कधीच फेल गेलेली नाही. रसनेवर झालेल्या पहील्या घासाच्या हल्ल्यानंतर डोळे खोटं बोलूच शकत नाहीत. :)
!
आई विचारायची "अगं कसं झालय ते तरी सांग" शेवटी तिला समजावून सांगीतलेलं आठवतय
हात् साला! इथेदेखील???
(बहुत विचाराअंती:) पहिली थियरी क्यान्सल!
...
"मीठ कसं आहे?" "तिखट लागेल का?" "साखर तर जास्त नाहिये ना?" - आय्च्यान समजत नाही.
हे फोरप्लेची अपेक्षा व्यक्त करणे असावे, अशी शंका अलीकडे येऊ लागली आहे.
माझ्याकडे तुच्छ केविलवाणा कटाक्ष टाकून दुसरं सावज हेरायला बाया पसार होतात.
हम्म्म्म्म्... / हात् कपाळकरंट्या!
मी पुढल्या जन्मी वाईन टेस्टर होणार आहे बहुतेक.
या जन्मीची अशी अवस्था आणि पुढल्या जन्मीची स्वप्ने... असो.
भारतीय पदार्थांची गंमत अशी की
भारतीय पदार्थांची गंमत अशी की कुटाणा जास्त आणि रीझल्ट शुन्य, एकुन किती पदार्थ चविष्ट क्याट्यागरीत येतात?
बहुतेक भारतीय पदार्थांची चव व्यक्तीगणीक बदलत जाते, हा एक अवगुणच असावा. तेल तापवा, त्यात कांदा लसुण परता वगैरे वगैरे ,यात बरेचदा कुणी कमी जास्त परतले की चवच बदलते.
रस्सा हा आणखी एक अवगुण, तेलकट जळजळ फोडणीचा वास असलेले रस्से... आय हेट रस्सा.... या रस्सा प्रकाराने भारतीय निकृष्ट तब्येतीचे असतात असे संशोधन वाचले होते .पातळ आहाराने तितकेसे पोषन मिळत नाही ,ह्युमन गट्स पातळ आहारासाठी बनलेले नाहीत.
या उलट पाश्चात्य पदार्थ व काही प्रमाणात ओरीएंटल पदार्थ सेमीसॉलीड प्रकारात येतात ,असे पदार्थ आपल्या आतड्याशी सुसंगत आहेत. बरेच पदार्थ शॅलो फ्राइड असतात, स्टीम वा बेक केलेले असतात. ब्रेड, ताज्या फळभाज्या ,चीज, बेकन, सॉसेज ,वेगवेगळे सॉस ,अंडे पास्ता मॅकरोनी पिकल्स इत्यादी पदार्थ फक्त 'असेंबल' करायचे असतात. यातील बरेच 'पार्ट' रेडीमेड असतात, ते वापरल्याने असेंबल पदार्थाची चव (सँडवीच ,बर्गर) फारशी बदलत नाही, पोटही भरते व त्यातुन पोषनही चांगले मिळते. आधुनिक पाश्चात्य आहारापुढे आपल्या पातळ भाज्या आणि रस्से हूँ आहेत
अरेच्या त्याच पाश्चात्यांनी
अरेच्या त्याच पाश्चात्यांनी लिहिलेल्या सेल्फ हेल्पांमध्ये तर कडधान्ये थोडी असावीत, पालेभाज्या असाव्यात, डाळी असाव्यात, मांस असावे, कच्चे काहितरी असावे वगैरे दिलेले असते. वरण, भात, भाजी, पोळी, चटण्या, कोशींबिरी, एखादे तळप, एखादे गोड अशा भारतीय जेवणात आम्हाला ते अनायसेच मिळत असल्याने आम्ही त्या फुक्कटच्या सेल्फ हेल्पांना हिंग लाऊनही विचारत नव्हतो. चला म्हणजे ती पुस्तके तुमच्या मते दिशाभूल करत होती तर! ;)
पण केवळ हाताला चव आहे असं
पण केवळ हाताला चव आहे असं नसतं.. त्या व्यक्तीचा त्या पाककृतीत एक काहीतरी खास बदल किंवा अॅडिशन असते.
अगदी मान्य. बरेचदा मी सुद्धा कोणाकडून काही पाकृ घेतली आणि अगदी तशीच्या तशी कृती फॉलो केली तरी चव मात्र निराळीच येते, वाईट असते असं नाही पण अगदी तशी चव नसते. घरी माझ्या हातचा आल्याचा चहा सगळ्यांना आवडतो (झैरात), तेच चहाचं प्रमाण घेऊन इतर कोणी बनवला तरी अगदी तसा चहा बनत नाही कारण सगळ्यात महत्त्वाचं आलं नेमकं चहात कधी टाकतो आपण - म्हणजे चहाचं आधन(?) ठेवल्या ठेवल्या की उकळी आल्यावर की दुध टाकल्यावर? शिवाय आलं कसं टाकताय? - किसून, फोडी/तुकडे करुन की ठेचून (किसलेल्या आल्याची चव जास्तच चांगली लागते. वेलदोड्याच्या बाबतीतही तेच - नुसते वेलदोड्याचे दाणे किंवा अख्खे टाकण्यापेक्षा ते सालासहीत जरा भरड कुटून टाकल्यास मस्त अरोमा येतो चहाला). बाकी मग चहाला उकळण्यासाठी दिलेला वेळ, दुधं नेमकं केव्हा टाकायचं ह्याच्या हिशोबांमुळेही प्रत्येकाच्या हातच्या चहाची चव वेगळी लागतेच.
मला खानदेशी काळी आमटी प्रकार फार अवडतो. एका खानदेशी मित्रा कडून पाकृ घेतली- त्यात बेसीक मसाल्याची पद्धत म्हणजे कांदा, लसूण, सुकं खोबरं, डाळ्या, सुक्या मिरच्या खरपूस ब्राऊन होईपर्यंत भाजून मग त्याचं वाटणं करुन तो मसाला वापरायचा. मी दोनदा करून पाहिलं घरी पण अगदी तशी चव आलीच नाही. मग लक्षात आलं की मी कांदा/लसूण्/खोबरं/डाळ्या/मिरच्या हे तेलावर खरपूस भाजत होतो तेही त्यांचे काप करून (अर्थात डाळ्यांचे नाही). मग मित्र म्हणाला की ते डायरेक्ट विस्तवावर अख्खा कांदा/लसूण/ खोबर्याची वाटी भाजतात, गरम तव्यावर मिरच्या आणि डाळ्या भाजतात मग त्याचं वाटण करतात. मी तशी कृती केली आणि ९०-९५% चव अगदी त्यांच्या काळ्या आमटी सारखी झाली :) तेव्हा पासून हे अगदी फिट्ट्ं ध्यानात घेतलं आहे की नुसतं लागणारं सामान आणि वरवर कृती घेऊन उपयोग नाही प्रत्येक उप-कृती चे तपशील पण तेवढेच महत्त्वाचे असतात आणि त्याने खूप फरक पडतो.
माझा एक बालीश प्रश्न ,बाहेरचे
माझा एक बालीश प्रश्न ,बाहेरचे पदार्थ व घरचे पदार्थ यांच्या चवीत जमीन अस्मानाचा फरक का असतो?, घरी केलेले पदार्थ ,भेळ भजी वडे पाणीपुरी पावभाजी कचोरी यांची चव व त्येच पदार्थ बाहेर खाल्ले तर मिळणारी चव यात बराच फरक असतो ,बाहेरच्या पदार्थात सिक्रेट इन्ग्रेडीएण्ट वगैरे असतो काय?
माझे अनभ्यस्त मतः होय फरक
माझे अनभ्यस्त मतः होय फरक असतो.
मात्र बाहेर चवीसाठी, रंगांसाठी व/वा वासासाठी वगैरे वापरले जाणारे ते 'सिक्रेट इन्ग्रेडीयन्ट' नेहमी शरीरास उपकारक असेलच किमान अपायकारक नसेलच याची खात्री देता येत नाही. शिवाय पदार्थ घरी करताना निर्मितीचा जो आनंद मिळातो त्याची मजा वेगळीच वगैरे आहेच
हे सिक्रेट इन्ग्रेडीएन्ट थोडे
हे सिक्रेट इन्ग्रेडीएन्ट थोडे अपायकारक असतील ,तरीही त्यांची माहीती मिळाल्यास पदार्थाला चांगली चव देता येईल व असे पदार्थ रोज कुठे खातो आपण?
MSG वापरल्याने पदार्थाला चव येते असे ऐकुन होतो, परंतु बर्याच पदार्थात ते टाकून पाहीले, काही विशेष फरक पडला नाही.
असे सिक्रेट इन्ग्रेडीएन्ट ,सिंथेटीक ,नॉन सिंथेटीक माहीती असतील तर इथे शेअर करावेत.
-ऑम्लेटसाठी अंडे फेटताना
-ऑम्लेटसाठी अंडे फेटताना त्यात थोडे दूध घालण्याची सूचना ऐकली होती पण आणखी कोणीतरी सांगून खात्री करेपर्यंत ती आचरणात आणलेली नाही. या चमचाभर दुधाने ऑम्लेट आणखी लुसलुशीत आणि हलके होते असे ऐकले. मीठ-मसालेदार एग बॅटरमधे दूध ?
-माशाचे काप त्याला मसाला फासून झाल्यावर थोडावेळ फ्रीझमधे ठेवतो. नंतर परततो. अश्याच एका टिपवरुन हे सुरु केले. त्यामुळे टेक्निकली प्रक्रियेत काय घडते माहीत नाही पण आउटकम म्हणजे मसाला तव्यावर विलग न होणे, कुरकुरीतपणा वाढणे आणि मसाल्याची चव माश्याशी जास्त एकजीव होणे असे फरक जाणवले.
-लसूण सोलणे हा अत्यंत कंटाळवाणा भाग असतो. ती साले नखाने उकरत बसणे चांगले वाटत नाही. मी जरा मोठ्या आकारचे लसूण घेऊन पातळ सुरीने पाकळीचे चिरुन दोन भाग करतो, की मग दोन्ही शकलांची साले फटकन निघतात.
असली जबरदस्त केमिकल्स कुठे
असली जबरदस्त केमिकल्स कुठे मिळतील ते सांगा :-P
http://www.usatoday.com/story/money/business/2014/02/05/subway-fast-foo…
ऑम्लेटसाठी अंडे फेटताना त्यात
ऑम्लेटसाठी अंडे फेटताना त्यात थोडे दूध घालण्याची सूचना ऐकली होती पण आणखी कोणीतरी सांगून खात्री करेपर्यंत ती आचरणात आणलेली नाही. या चमचाभर दुधाने ऑम्लेट आणखी लुसलुशीत आणि हलके होते असे ऐकले. मीठ-मसालेदार एग बॅटरमधे दूध ?
मीठ-मसालेदार एग बॅटरमधे दूध ? हे ऐकायला वाटतं खरं विचित्र पण मी ट्राय केलय आणि ऑम्लेट खूप फ्लफी होतात हा स्वानुभव आहे. मी केवळ एक चमचा दुध घालतो दोन अंड्यासाठी/फेटताना. जरुर करुन पहा.
ऑम्लेट साठी अंडे फेटताना त्यात चिमूटभर आल्याचा किस घातल्याने चव छान होतेच पण पचनालाही मदत होते. अंडे गरम असते त्यात ऑम्लेट म्हंटले की आपण २-३ ऑम्लेट्स तर अगदी सहज गट्टम करतो, तेही डबल-ऑम्लेट्स म्हणजे एकदम चार ते सहा अंडे पोटात जातात त्यामुळे कधी कधी पोट दुखणे, अपचन, अॅसिडीटी हे प्रकार होतात पण प्रत्येक ऑम्लेट मधे केवळ चिमूटभर आल्याचा किस टाकल्याने (सोबतीला हळद असल्यास उत्तम - पण काही लोकांना ऑम्लेट्चा पिवळा रंग आवडत नाही) असा त्रास होत नाही -पुन्हा एकदा स्वानुभव :)
अंडी आणि लसूण
मीठ-मसालेदार एग बॅटरमधे दूध ?
फ्रेन्च टोस्टचे देशी (पक्षी नमकीन) वर्जन बनवताना मी तेच करतो! दूधात अंडे फेटून त्यात किंचित मीठ (साखरेऐवजी) घालतो. मस्त लागते!
मी जरा मोठ्या आकारचे लसूण घेऊन पातळ सुरीने पाकळीचे चिरुन दोन भाग करतो, की मग दोन्ही शकलांची साले फटकन निघतात.
लसूण पाकळ्या मुठीने फक्त ठेचा. साली ऑपॉप विलग होतात. काऽऽही करावे लागत नाही!
मीठ-मसाला आणि दूध...
ऑम्लेटच्या ब्याटरमध्ये कधी दूध घालून बघितलेले नाही, पण...
मीठ-मसालेदार एग बॅटरमधे दूध ?
कन्सेप्च्युअली, व्हाय नॉट?
कधी पालकचे कांदा-मिरी-मीठ-तुपाची फोडणी दिलेले, दूध घातलेले सूप प्यायला आहात?
सुंदर लागते.
(अतिअवांतर: फार पूर्वी माझ्या एका मित्राला हेच सांगण्याचा प्रयत्न केला, तर ऐकून घ्यायला तयार नव्हता. 'ह्यॅ:! दुधात कधी मीठ घालतात काय! सांगूच नकोस!' म्हणे. प्रीकन्सीव्ड नोशन्स!)
-----------------------------------------------------------------------------------
(ऑम्लेटच्या ब्याटरमध्येसुद्धा आता इतके जण सांगत आहेत, तर दूध घालता येत असायला हरकत नसावी.)
कांदेपोहे / बटाटेपोहे
कांदेपोहे / बटाटेपोहे बनवण्यात हातखंडा वेगळेपण असलेले कोणी आहेत का? कोंकणात फिरत असताना एका खेड्यातल्या घरी गेलो होतो. होते रुक्ष कामच पण घरातल्या पुरुषांमधे कामाची चर्चा चाललेली असताना अनपेक्षितपणे आतून त्या घरातल्या काकूंनी गरमागरम खोबरे पेरलेले पोहे आणले. अशी काही चव होती की अहाहा. मी आयुष्यात प्रथमच अनोळखी घरात पूर्ण निर्लज्ज होऊन "मला अजून एकदा पोहे हवेत" असे सेकंड हेल्पिंग मागून घेतले. त्यात त्यांनी किंचित जिरे की बडीशेप काय जाणे पण घातली होती. कृती विचारुन घेण्यास मात्र शक्य झाले नाही त्यावेळी.
(मी फारच अगाऊ पणे सारखेच
(मी फारच अगाऊ पणे सारखेच प्रतिसाद देतोय त्यामुळे अगाउची माफी, पण काय करणार आदत से मजबूर - खाण्याचा/पाकृ चा विषय निघाला की स्वतःचे मतं देण्यापासून मी स्वतःला थांबवूच शकत नाही :( )
त्यात त्यांनी किंचित जिरे की बडीशेप काय जाणे पण घातली होती.
उत्तर भारतात पोह्यांमधे बडीशेप टाकतात आणि फार सु़ंदर चव येते पोह्यांना. मध्य-प्रदेशात(इंदोर) गेलो असतांना तिथले पोहे खाताना काहीतरी वेगळे लागताहेत हे जाणवत होतं एकतर तिथे पोहे असे वाफेवर ठेवतात त्यामुळे ते अधिक मोकळे आणि कमी ऑईली असतात पण चवीतल्या वेगळेपणाचं मुळ कारण बडीशेप होतं हे ध्यानात आलं. तेव्हा पासून मी देखील बर्याचदा पोहे करतांना फोडणीत बडीशेप टाकतो (मी बडीशेप जरा भिजवून मग टाकतो फोडणीत म्हणजे उग्र वाटत नाही आणि बडिशेपेचा मंद वासही छान वाटतो).
हे खमंग काकडी नेमके काय आहे?
हे खमंग काकडी नेमके काय आहे? फक्त पुण्यातच हा शब्द ऐकला आहे. पण ट्राय करणे झाले नाही.
पुण्यातल्या अनेक मंगुश हॉटेलांतल्या /रस्त्याकडेच्या उत्तम साचिखिबद्दल सहमत.
पण या धाग्यात आपल्याला स्वतःला बनवून खाणेबल माहिती हवी आहे.
कुठे काय चांगले (रेडीमेड) मिळते ते ऐकून माहिती चांगली मिळते पण नुसते अॅसिड खवळते पोटात.
आप्पाचई खिचडी-काकडी हा इतर
आप्पाचई खिचडी-काकडी हा इतर अनेक पुणेरी गर्दीच्या ठिकाणांप्रमाणे ओव्हरहाईप्ड प्रकार आहे असे नम्रपणे सुचवू इच्छितो
+१००००००
हे ठिकाण अच्युत गोडबोलेंनी त्यांच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे अतिशय कळकट/ घाणेरडं आहे. त्यात भर म्हणून तिथले माजोरडे लोक (फक्त हॉटेलातलेच (हॉटेल कस्लं ते म्हणा) नाहीत तर तिथे खायला येणारे पण अतिशय माजोरडे).
त्यापेक्षा कल्याणी नगर मधे, शास्त्री चौकाजवळ एक कल्याणी नावाचंच उपहार गृह होतं (ते मोठं कल्याणी वेज रेस्टॉरंट नव्हे) तिथे साबुदाणा खिचडी अप्रतिम मिळायची. एका छोटा वाडगा म्हणावा अश्या भांड्यात भरपूर खरपूस दाणे-कूट घालून केलेली खिचडी केवळ अप्रतिम होती. चांगलं तर चालत होतं ते उपहार गृह पण का कोणास ठाऊक अचानक बंद झालं :(
नाशिकला सायंतारा म्हणून एक जागा आहे. तिथले साबुदाणा-वडे अप्रतिम आणि त्याबरोबर येणारी 'अनलिमिटेड' चटणी म्हणजे तर - केवळ स्वर्ग :)
पोहे नारळ्याचा पाण्यात
पोहे नारळाच्या पाण्यात भिजवावेत, पोहे किती भिजतात त्यावरही चव ठरते ,आचारी लावून पोहे केलते तेव्हा त्यांनी पोह्यात परताना एक पूड टाकली होती, जीरे बडीशेप धणे काळे मीठ असे काहीतर मिक्स असावे, नो आयडीया
अजून एक, भेळेबरोबर ज्या मिरच्या मिळतात तश्या घरी तळलेल्या वा वाफवलेल्या लागत नाही, कमी तिखट मिरची वापरली तरी चवीत फरक नाही. कशा कराव्यात या मिरच्या?
लै दा ट्राय केल्यात या
लै दा ट्राय केल्यात या मिरच्या, आधी वाफावणे, मग तळणे मीठ टाकणे, लिंबु पिळणे ,हळद टाकून वाफावणे. षष्प चव येत नाही त्यांना, मला तर अशी शंका आहे की स्ट्रीट फूड व रेस्तराँ वगैरेना सिंथेटीक अँडेटीव्ह्स, केमिकल्स सप्लाय करणारी एखादी सप्लाय चेन वगैरे असावी.जिचा कारभार कॉमन पब्लिकला ठाऊन नसावा.
रस्त्यातले वडापाववाले कॉमन
रस्त्यातले वडापाववाले कॉमन पब्लिकच आहेत की..
स्ट्रीट फूड / फास्ट फूड / रेस्तराँ या व्यवसायांत मिळून किती लोक काम करत असतील. एका शहरात काही हजार, आणि राज्यभरात लाखभर तरी?
एखादे सीक्रेट व्यवसायातल्या हजारो लाखो सामान्य लोकांमधे ज्ञात पण बाकीच्या काही लाख सामान्यांपासून सीक्रेट असे राहू शकेल का? शक्यता कमी आहे.
अर्थात प्रत्येक प्रसिद्ध वडापाववाल्याचे काहीतरी ट्रेड सीक्रेट (स्वतःपुरते) असू शकते हे मान्य व्हावेच. आपण फक्त अंदाज करु शकतो:(उदा. श्रीकृष्ण बटाटवडा दादरप. यांचे खडेमीठ आणि बहुधा आलेलसूण यांचे किंचित ओलसर बटाटा सारणात केलेले मिश्रण, दत्त स्नॅक्स यांच्या बटाटवड्याचा चपटा आणि बेताचा आकार (क्रिस्पी आणि आतपर्यंत तळला जाण्याच्या हेतूने) + त्यांची लाल चटणी इ.इ. )
मुळात बटाटेवडा प्रसिद्ध होण्याचा लसावि म्हणजे तो सदैव ताजा आणि गरमागरम सर्व्ह करु शकणे. रीफ्राईड वडा देणे, किंवा "मीडियम गरम आहे" असे सरळ खोटे बोलून गारगोळा वडा गिर्हाईकाच्या हातात ठेवणे = कधीच प्रसिद्ध न होण्याची तयारी आणि धंद्याचे दीर्घकालीन नुकसान.
गवि तुमचे लॉजिक बरोबर आहे,
गवि तुमचे लॉजिक बरोबर आहे, मलाही हा प्रश्न पडतो कि असे काय ट्रेड सिक्रेट असते जे सामान्यांना अनरीचेबल आहे. पण सामान्य लोकांना फक्त सिंथेटीक अँडेटीव्ह्स वगैरे माहीत नसते, त्यामुळे माझा हा तर्क कि असे केमिकल्स वापरत असावेत.
ह्या लिंकवरुन तर्क
http://www.pbs.org/pov/foodinc/fastfoodnation_03.php
कदाचित बाहेर मिळणार्या
कदाचित बाहेर मिळणार्या तळलेल्या खार्या मिरच्या ह्या त्यांच्या त्या सततच्या गरम होत असलेल्या तेलातल्या घाण्यात तळल्यामुळे चविला वेगळ्या लागत असाव्यात. शिवाय हे लोक मिरच्या त्याच तेलात तळतात ज्यात बटाटा वडे/समोसे तळलेले असतात म्हणुन मिरच्यांना ती एक वेगळी चव येत असावी जी घरी तळल्यावर येत नाही. हा माझा केवळ अंदाज आहे म्हणा, पण तुम्ही म्हणतात तसे छुपे प्रकारही असावे ;)
"पोहे नारळाच्या पाण्यात
"पोहे नारळाच्या पाण्यात भिजवावेत"
या वरुन ओल्या नारळात भिजवलेले/दडपलेले "दडपे पोहे" नावाचा अतिशय चविष्ट असा कोकणातला पदार्थ आठवला. त्याच्याही खुप सार्या कृती असतील, पण आमच्या कडे पोहे चांगले भाजून मग भरपूर नारळ (ओला) घालून करतात. त्याची चव म्हणजे आहाहा !!!
यात हातसडीचे पोहे वापरले आणि तिखट्पणासाठी फोडणीची मिरची वापरली तर चव आणखीनच आहाहा होते.
हेच पोहे न भाजता बरेच जण करतात, पण ते ओल्या नारळामुळे चामट होतात लगेच.
बराच घोडा होईपर्यंत मला चहा
बराच घोडा होईपर्यंत मला चहा आणि म्यागी सोडून काही करता येत नसे. पण एक वर्ष घरापासून लांब रहायला लागलं, स्वैपाक स्वहस्ते करायलाच लागणार अशी चिन्हं दिसू लागली. बटाट्याची भाजी आणि मु. डा. खिचडीवर वर्ष काढायची तयारी मी मनोमन केली होती.
अशा स्थितीत मला अक्षय नामक रूममेट भेटला. परक्या देशात भारतीय रूममेट मिळाल्यानेच मी सुखावलो होतो. हा इसम भलताच भारी निघाला. बौद्धिक संपदा कायद्यांच्या क्षेत्रात त्याचं नाव आदराने घेतलं जातं. त्याने फँटसी जॉनरमध्ये लिहिलेलं एक पुस्तक प्रकाशित झालं आहे, दुसरं पेंग्विनकडून प्रकाशनाच्या मार्गावर आहे. सध्या युनायटेड नेशन्समार्फत इराणमध्ये गेला आहे. हा इसम काहीही करू शकतो यावर माझा घट्ट विश्वास आहे.
तर अक्षय उत्तम स्वैंपाक करतो. "उत्तम"च्या अ़क्षयच्या व्याख्येमध्ये चवीबरोबरच योग्य इन्ग्रीडियंटस आणणे, स्वैपाकाचं नियोजन (वेळेच्या आणि उपकरणांच्या दृष्टीने), पसारे न घालता सांडलवंड न करता केलेला प्रत्यक्ष स्वैपाक, उपकरणे नीट घासून ठेवणे, प्रेझेंटेशन वगैरेही येतं. आणि हे सगळं आपण काहीतरी मोठ्ठी जिकीरीची गोष्ट करतोय असा आव न आणता सहजतेने केलेलं असायचं.
माझं पुढचं पाकप्रशिक्षण अक्षयच्या तालमीत झालं. गुरुचरणी घेतलेल्या (आठवल्या तितक्या) टिप्सः
- मिठाच्या ऐवजी/बरोबर बर्याच पदार्थात (विशेषतः नॉन्व्हेज पदार्थात) शेंदेलोण उत्तम लागतं
- लसूण सोलताना दोन्ही टोकं धरून पिळल्याची अॅक्शन करायची. विरुद्धदिशेला लावलेल्या जोरांमुळे पापुद्रे चटकन निघतात
- लसूण चिरण्यापेक्षा ठेचून घालावा
- बटाटे सालासकट वापरले तर वेगळी चव येते
- आंबटपणा आणण्यासाठी लिंबाऐवजी आमचूर घालणे
(अजून आठवतील त्याप्रमाणे लिहीत जाईन.)
त्याच्या भात्यात "धुरी देणे" अशी एक वेगळीच क्रिया होती. एकदा ढोकळ्याला त्याने बडीशेप आणि धणे यांची धुरी दिली होती. जी काय प्रचंड भारी चव आली होती, आठवणीनेच पोटात गलबललं...
अंशतः गुरुदक्षिणा म्हणून त्याला वाटण लावलेली कढी, मिसळीचा कट आणि महाद्या हे शिकवलं होतं.
लोखंडी तव्यावर धने बडीशेप इ.
लोखंडी तव्यावर धने बडीशेप इ. टाकून गॅस मोठा करावा. थोड्या वेळाने ते जळून त्यातून धूर यायला लागतो. मग जो पदार्थ धुरावायचा आहे तो (इथे: ढोकळा) एका चाळणीत किंवा रो(व)ळीत घेऊन त्या धुरावर धरावा.
- धुरावायचा पदार्थ जितका सच्छिद्र तितकं धुरावणं जास्त चवदायक.
- धूर देणारा आणि घेणारा, दोन्ही पदार्थ वारंवार फिरवावे / उलटेपालटे करावे लागतात
- घरात लय धूर होतो
हम्म. म्हंजे मला झणझणीत मधून
हम्म. म्हंजे मला झणझणीत मधून जो अर्थ अभिप्रेत आहे तोच तुला मसालेदार मधून अभिप्रेत आहे असं दिसतंय.
चमचमीत आणि चटपटीत असेही दोन भाग करता येतील. जरा तिखट-आंबटावर असलेले पदार्थ म्ह. चटपटीत, तर तेलातुपाचे आधिक्य असलेले पदार्थ चमचमीत. नाकातोंडातून धूर काढणारे म्ह. झणझणीत. असं काहीसं माझ्या मनातलं वर्गीकरण आहे.
...
इडलीकरिता 'राइस केक्स', गुलाबजामकरिता 'चीज़ बॉल्स इन शुगर सिरप' वगैरेंची आठवण झाली.
(देशी रेष्टारण्टाच्या मेनूतून. अजून कुठून?)
ईईईईईईईईईईईईईईईईई!
(हे असले वाचून, समजत असलेल्या भाषेतला पिच्चर सबटायटलसहित पहावा लागला, तर जे काही होते, ते होते. एक तर सबटायटल अफलातून असतात, नि त्यामुळे (१) प्रचंड डिस्ट्रॅक्शन होते, नि (२) त्यातून जो विनोद निर्माण होतो, त्याने मूळ पिच्चर पाहाण्याची इच्छा मरते.)
नाइलाज
पण मी म्हणते समजत असलेल्या भाषेचे पिक्चर बघायचे कशाला सबटायटलवाले?
क्याशेट/डीव्हीडीवर पाहिले, तर कधीकधी समजत असलेल्या भाषेतले पिच्चरसुद्धा जबरदस्तीने सबटायटलांसहित येतात.
'शोले'तली 'हे, धिस फ्रेण्डशिप' किंवा 'व्हेन द ट्रेन लीव्ज़ द स्टेशन, इट प्रोसीड्स टू इट्स डेस्टिनेशन' वगैरे अजरामर गाणी 'पाहिलेली' आहेत.
(पूर्वी हेच देशी रेष्टारण्टांतले मेनू वाचून होत असे. आता ती ट्रान्स्लेशने 'वाचायची नाहीत' म्हणून स्वतःला ट्रेन केलेले आहे. पण ती 'शाही टोकरी से'-छाप क्याटेगरी-टायटले अजूनही डोक्यात जातात.)
!
पण मग ते काट्या चमच्याने खावेसे वाटेल!
टिपिकल सबकॉण्टिनेण्टल भीड नि कन्वेन्शन्यालिझम!
'आमच्या'कडे (बोले तो, कन्झर्वेटिवां-क्यापिटालिष्टांनी नि संकीर्ण राइटविंग्यांनी पूर्णपणे विकत/ताब्यात घेऊन पूर्ण चुथडा करण्यापूर्वीच्या अद्याप टिकून असलेल्या अमेरिकेत) असले काही नसते. काट्याचमच्याने खावेसे वाटले, काट्याचमच्याने खा. हाताने खावेसे वाटले, बिनधास्त हाताने खा. नो प्रॉब्लेम. सूट युअर कन्वीनियन्स.
(किती दिवस टिकते, बघायचे.)
आमीन!!!! (कोलकाता आमच्या
आमीन!!!!
(कोलकाता आमच्या प्रिय शहरांपैकी एक आहे हे कबूल करूनसुद्धा) प्रत्येक शहर कोलकात्याच्या मार्गास लागो- हा लेफ्टिष्ट बायप्रॉडक्टच म्हणावा लागेल. तसे जर झाले (गॉड फॉरबिड) तर सगळे हुच्चभ्रू आत्ता आहे त्याच्या दुप्पट वेगाने भारत सोडायच्या मागे लागतील अन रष्टिकतेचे गोडवे गात वांझोट्या चर्चाकारांच्या फारिनफंडेड परिषदा भरवत बसतील. कोट्यवधी 'फडतूस' मेले तरी त्यांना त्याचे काय होय! या लोकांना गरिबांबद्दल चार बुके लिहून पोट भरणे सुकर व्हावे म्हणून त्यांची स्थिती बदलू नये अशीही इच्छा असल्यास नवल वाटणार नाही.
...
इथे'ही' म्हणजे?
घरोघरी क्यापिटलिस्ट कंझर्व्हेटिव्हांच्याच चुली होणारेत असे (इच्छा नसूनही) प्रेडीक्ट करताय काय?
व्हायच्या बाकी काय राहिल्याएत?
'घटना' नावाची काही चीज कागदोपत्री आहे खरी, पण ती (तेवढी 'सेकंड अमेंडमेंट' नावाची चीज वगळल्यास) टॉयलेट पेपरहून अधिक प्रभावी राहिलेली असण्याबाबत प्रचंड साशंक आहे. (सेकंड अमेंडमेंटसुद्धा - बोले तो, शस्त्रास्त्रांवर बंदी नाही - तुम्ही पांढरे असल्याखेरीज व्यवहारात लागू नाही.) बाकी, काँग्रेस आणि सुप्रीम कोर्ट विकली गेलेली आहेतच (हे पब्लिकमध्ये उघडपणे बोलले जाते); तेवढी प्रेसिडेन्सी - तूर्तास तशीही कुचकामी - विकली गेली, की मामला खतम.
फॉक्स न्यूज नि रेडियो टॉक शो सर्किट्समधून जो प्रचार चालतो (प्रसंगी उघडउघड रेसिस्ट), खोटारडेपणा चालतो, तो गोबेल्सला लाजवेल असा आहे.१ (ऐकणारे नि ऐकून भारावणारे नि उचलून धरणारे मूर्ख हवे तेवढे सापडतात.) मेनस्ट्रीम माध्यमे इनडिफरंट आहेत.
भारतीयांना हे कळणार नाही कदाचित. तुमचे उजवे तुलनेने (अजून तरी) मवाळ आहेत. (असे वाटते. चूभूद्याघ्या. टचवूड.)
(आमच्या 'डाव्यां'तही काही दम नाही राहिलेला म्हणा. पण उजव्यांना मत देता येत नाही - सुइसाइडल आहे - म्हणून डेमोक्र्याटांना मत द्यायचे, इतकेच.)
जाऊ द्या. किती बोलायचे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------
(अर्थात, ही माझे अडाणी मते. पण चित्र सुंदर नाही, लक्षणे एकंदरीत चांगली नाहीत, हे निश्चित.)
==============================================================================================================
१ इथे गब्बर सिंग नावाचा आयडी येऊन 'फडतूसां'बद्दल जे काही बडबडत असतो, ते फॉक्स न्यूज नि राइट विंग रेडियो टॉक शो सर्किटवर जे काही चालते, त्याची कल्पना येण्यासाठी चांगले - परंतु मिळमिळीत, भरपूर पाणी घातलेले, आणि तुलनेने बरेच सभ्य - उदाहरण समजावे.
कन्झर्वेटिवां-क्यापिटालिष्ट,
कन्झर्वेटिवां-क्यापिटालिष्ट, राइट विंग/लेफ्ट विंग गेले चुलीत!
आम्ही आम्हाला हवे तसे करतोच(घराबाहेर पडताना सुद्धा अगदी लेटेस्ट ट्रेन्डी कपडेच पाहिजे असे नाही शेवटी जे काय घातलंय ते आत्मविश्वासाने कॅरी करता येणे महत्वाचे!) आपण करू ती स्टाइल!
फक्त येत नाही म्हणून कोणत्या प्रकाराने खाता येणार नाही असे होऊ नये म्हणूस शिकून मात्र सर्व घेतलेय - चॉपस्टिकने राइस खाणेसुद्धा!
पण असली फॅन्सी नावे वाचली की नजरेसमोर टेबलावर नजाकतीने पेश केलेला पांढर्याधोप डिश मधला रंगीबेरंगी पदार्थ येतो, तो बघून रस्टीक(बोले तो हाताने, ताव मारून वगैरे) पद्धतीने खाण्याची इच्छाच होणार नाही हे सांगतेय!
...
कन्झर्वेटिवां-क्यापिटालिष्ट, राइट विंग/
लेफ्ट विंगगेले चुलीत!
तुमच्या तोंडात तूपसाखर पडो. (तेवढे लेफ्टविंग वगळल्यास. तूर्तास त्यांचाच काय तो आधार आहे. पुढेमागे कौंटरवेट न राहून तेही माजले की मग त्यांनाही चुलीत घालायला हरकत नाही, पण सध्या राहू द्या.)
बाकी, 'रष्टिक' इज़ अ ष्टेट ऑफ माइण्ड, एवढेच बोलून मी आपली रजा घेतो. (शिवाय, दुसरा तो रष्टिक, आपण ते मनस्वी, असाही एक सोयिस्कर दृष्टिकोन बाळगता येतोच - नि कधीमधी बाळगतोसुद्धा - पण तेही एक तूर्तास असो.)
काटा आणि सुरी.
'न'वी बाजूंचे अमेरिका या विषयावरचे प्रतिसाद वाचायला मिळाल्यामुळे "काटा-चमचा" हे कॉंबिनेशन सविताला माफ. 'न'बांना ही त्रुटी लक्षात आली नाही; हे माफ करण्यासाठी अमेरिकेत काही राम राहिला नाही, या विषयावर त्यांना अजून दोन-चार प्रतिसाद लिहावे लागतील. (पण त्यासाठी आणखी एखादं फर्ग्युसनकांड होण्याची आवश्यकता नाही.)
पातेले जाड बुडाचे आणि
पातेले जाड बुडाचे आणि बिर्याणीच्या लेयर्स ७५% भाग व्यापतील एवढ्या आकाराचे असल्यास चांगला दम बसतो. अॅल्युमिनीअम किंवा कल्हई केलेले तांब्या/पितळ्याचे असल्यास बेस्ट.
स्मोकी फ्लेवर हवा असल्यास वाटीत पेटता कोळसा ठेऊन त्यावर चमचाभर तूप सोडावे अन् ती वाटी बिर्याणीवर ठेऊन मग झाकण कणकेने सील करावे.
या काही पाककृती www.maayboli.com/node/48693
www.maayboli.com/node/16224
दम देणे याचा अर्थ मंच आचेवर
दम देणे याचा अर्थ मंच आचेवर पदार्थ शिजू देणे, बरेचदा बिर्याणी किंवा मटण अशा पद्धतीने करतात, दम देण्यासाठी खरे तर रांजण वापरतात, रांजणात पदार्थ (बिर्याणी/ मटण) कोळश्याच्या धगीवर शिजू देतात, काही पदार्थांना तर ओव्हरनाईट दम देतात ,जवळपास आठ दहा तास रांजणात ते विस्तवाच्या मंद आचेवर शिजतात ,दम पदार्थ करताना रांजणावर झाकण ठेऊन कणकेच्या साह्याने झाकण सिल करतात, फ्लेवर बाहेर जावू नये यासाठी.
छोले मसाला
छोले करताना आपण कांदा आणि टोमॅटो ची पेस्ट वापरतो. ही पेस्ट करताना कांदा आणि टोमॅटो तेलातुन परतुन घ्यावेत ग्रेव्ही ला चांगली टेस्ट आणि कलर येतो. तेलातुन न परतता तशीच पेस्ट केल्यास कांद्याला वास येतो व टोमॅटो चा लाल रंग जसा च्या तसा न राहता फिकट होतो.
ग्रेव्ही तयार करताना त्यामध्ये उकडलेली तुरी ची डाळ (रवी ने एकजीव घुसळुन)मिसळतो. ग्रेव्ही थोडीशी घट्ट आणि चवीला एक नंबर लागते.
~यन्त्रमानव.
...
बदाम आणि काजू फ्रीजमध्ये???
कधी नाही!!!
बाहेर ठेवल्यास न टिकण्याचे (बोले तो, खराब होण्याचे; खाल्ले न जाण्याचे नव्हे) काहीच कारण मला तरी दिसत नाही. (कच्चे शेंगदाणे फ्रीजमध्ये ठेवता काय?)
उलटपक्षी, फ्रीजमध्ये (बरेच दिवस) ठेवल्यास (नंतर बाहेर काढल्यावरसुद्धा) खाल्ले न जाण्याची शक्यता १००%.
(भाजण्याचीही गरज नसावी, असे वाटते.)
आदूबाळ, रोज मोजून २ ३च खाणार
आदूबाळ, रोज मोजून २ ३च खाणार आहे. या वेगाने १ किलो साधारण ७ ८ महिन्यात संपेल.
मनोबा, एक आठवड्यात १ किलो बदाम आणि १ किलो काजू :O _/\_ :-D
नवी बाजू, हम्म. यू आर रैट. काही लोकं पोहे, रवा वगैरे फ्रिजरमधे ठेवतात ऐकलेल आणि सध्या पावसाळा, दमट हवेमुळे बाहेर मऊ पडतील अशी शंका आली म्हणून विचारलं :-)
साबूदाणा खिचडी मऊ होण्यामागे
साबूदाणा खिचडी मऊ होण्यामागे ४-५ तास साबूदाणा भिजवलेला असणे असं एक कारण सांगितलेलं गेलं होतं मला. त्यामुळे शॉर्ट नोटीसवर केली गेलेली खिचडी एवढी खास लागत नाही.