One Night Stand आणि आपण सगळे

५ वर्षांपूर्वीची गोष्ट . नवीन नौकरी . Office चा एक इवेन्ट . पार्टी एका उच्चभ्रु हॉटेल मध्ये . मी आणि माझा मित्र -कम -सहकारी एकत्रच गेलो . पार्टी एकदम रंगात आली असतानाच हा एकदम दिसेनासाच झाला . मी त्याला फोन केला . तर त्याने तो उचललाच नाही . थोड्या वेळाने त्याचा मेसेज आला कि त्याला काही अर्जंट काम निघाल्यामुळे त्याला एकदम जावे लागले . उद्या ऑफिस मध्ये भेटूयात . असेल काही काम म्हणून मी हि फारस लक्ष दिल नाही . दुसर्यादिवशी हा गडी ऑफिस मध्ये एकदम खुशीत . मी त्याला विचारले , "काय रे मित्रा , कुठे गायबला होतास काल ?" तो म्हणाला ," कुणाला सांगणार नसशील तर सांगतो ." माझी उत्सुकता चाळवली . मित्र पुढे म्हणाला ," आपल्या HR मधली ती अबक मुलगी आहे ना तिच्यासोबत माझ्या flat वर गेलो होतो . माझा flatmate सध्या बाहेरगावी आहे आणि मी एकटाच आहे ." मला धक्का बसला .

मी ," आयला भारी रे ! कधीपासून चालू आहे ? लग्न वैगेरे कधी करताय मग ?"

तर तो ," वेडा झालायस का ? ते तितक्या पुरतच होत . काही serious नाही आहे ."

परभणी सारख्या ठिकाणाहून आलेल्या मला सगळ्यात पहिले सांस्कृतिक वैगेरे म्हणतात तसा धक्का बसला . आणि नंतर त्या धक्क्याची जागा हेव्याने घेतली . One Night Stand या गोष्टीशी आलेला हा माझा पहिला संबंध .

आताशी हा लिंगो बर्याच वेळा कानावर पडतो . आणि या प्रकारच्या गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे हे स्पष्टच आहे . मला स्वतहाला या नातेसंबंधांच्या कदाचित सगळ्यात छोट्या फॉर्म बद्दल कुतूहल आहे . म्हणजे योनिशुचीतेबद्दल कुठलेही वांझोटे प्रोटेस्ट माझ्या मनात नाहीत पण अशा एखाद्या नात्यात (?) आलेल्या लोकांबद्दल कुतूहल नक्कीच आहे . म्हणजे असे पाहा की शारीरिक आकर्षण हाच एखाद्या नात्याचा (मग तो किती पण short span चा असेल) पाया असू शकतो का ? का मुळात तमाम आपली महान भारतीय संस्कृती वादी म्हणतात तस या नात्यांना काही शेंडा बुडखा नसतो ? या अशा गोष्टींमुळे आपल्या महान संस्कृती ला धक्के बसतात का? आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे भारतीय समाजमनात sex किंवा इतर कुठल्याही अधिभौतिक गोष्टीचा मजा घेण्याबद्दल जो प्रचंड अपराधगंड आहे त्यामुळे one Night Stand सारख्या गोष्टींमुळे आपल्या तकलादू मुल्य व्यवस्थेला
धक्के बसतात का ?

माझ निरीक्षण अस आहे की अनेक ठिकाणासारखा इथे पण इंडिया आणि भारत असा divide झाला आहेच . एका बाजूला शहरांमध्ये हा phenomena वाढत असताना संस्कृती रक्षकाना अर्थातच हा भारतीय संस्कृती वरचा घाला वाटत आहे . समाजात यामुळे एक sexual anarchy येईल अशी भीती त्यांना वाटते. आपल्या मुली (नोट -मुलांची त्याना काळजी नाही ) बिघडतील असे पण त्याना वाटते .

बर हा stand कायम दोन अविवाहित लोकांमध्ये च होईल असे काही नाही . अशी काही अट नाही . म्हणजे एखादा विवाहित पुरुष किंवा स्त्री एखाद्या अविवाहित पुरुष किंवा स्त्री सोबत पण अनेकदा रात्र घालवू शकतात . सिनिकस असे पण म्हणू शकतात हा विवाह संस्थेच्या मुळावरच घाला आहे . Where is the sanctity of marriage ? या अवघड प्रश्नांची उत्तर फार गुंतागुंतीची आणि प्रत्येकापुरती वेगवेगळी आहेत . माझ्या अनुभवाच्या कक्षेत आलेल्या लोकांची जेवढी अशी प्रकरण मी पाहिली आहेत तेवढ्यावरून मी माझ्यापुरती काही उत्तर बनवली आहेत .

सर्वात महत्वाच म्हणजे या अशा नात्यात असलेल्या एकमेका कडून असणार्या शुन्य अपेक्षा . हि सर्वात सुंदर गोष्ट आहे . न कसले राग , न कसले लोभ , ना कसल्या आणि कुठल्या तरी insignificant तारखा लक्षात ठेवण्याचे ओझे . आपल्या दोघाना या क्षणी एकमेकांची गरज आहे . आपण ती पूर्ण करूया आणि लेट्स अपार्ट ऑन गुड नोट . साध आणि सरळ . काही लोकाना हे खूप कोरड वाटू शकत पण पहिलेच नमूद केल्याप्रमाणे to each his /her own .

आणि किती लोक अशी संधी समोर आल्यावर ती सोडतील ? मग ती विवाहित असो वा अविवाहित . याच उत्तर आपणच आपल्या मनाशी ताडून बघाव . नात्याचं पावित्र्य , आपली संस्कृती , कुणाला कळल तर, आणि लोक काय म्हणतील हे प्रश्नांचे ब्रम्ह राक्षस मानगुटीवरून उतरवून . मला वाटत बहुतेक लोकांच उत्तर नाही असेच असेल .

भानू काळे यांच्या बदलता भारत या पुस्तकात अतिशय सुंदर para आहे तो quote करण्याचा मोह आवरत नाहीये . : आपला देश अंतर्विरोधानी एवढा भरलेला आहे की कुठल्याही एका चौकटीत या देशाचे संपूर्ण वास्तव सामावले जाणे अशक्य वाटते .

इथल्या विविधातेबद्दल असे गमतीने म्हणतात की या देशाबाबत केलेलं कुठलेही विधान खरे असू शकते आणि त्या विधानाचा व्यत्यास हि तेवढाच खरा असू शकतो .

आम्ही अणु उर्जा वापरतो , तसेच शेण गोळे हि वापरतो .

इथे धारावी आहे तसेच मलबार हिल पण आहे .

पाण्याचा एकही नळ नसलेल्या शाळा आहेत तसेच स्विमिंग पूल असलेल्याही आहेत .

हा देश गरीब आहे , हा देश संपन्नही आहे .

भानू काळे यांचे हे विधान अजून पुढे न्यायचे ठरवल्यास या देशात आणि समाजव्यवस्थेत one night stand ला पण जागा आहे आणि विवाह संस्थेला पण असे म्हण्यास हरकत नसावी . भारतीय व्यवस्थेने पहिले विरोध करून नंतर विधवा विवाह , संगणक आणि जागतिकीकरण पचावलेच की .
कदाचित काही वर्षांनी हे मोठ्या शहरांमध्ये असणारे लोण छोट्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात पण जाईल . त्याचा वेग कमी जास्त असू शकतो .

लेखाच्या सुरुवातीला ज्या मित्राचा उल्लेख आहे त्याची परवा फेस बुक वर मैत्री विनंती आली . मी लगेच त्याची friend लिस्ट चाळून बघितली . त्यात "ती ' पण होती . दोघांची पण लग्न झाली होती . वेगवेगळ्या लोकांसोबत .

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3.75
Your rating: None Average: 3.8 (4 votes)

आधी इथे ह्यावर बरंच चर्वितचर्वाण झालं असणार आहे.
वरकरणी बघता -
"अविवाहित अशा १८+ असलेल्या दोघांनी जर पूर्ण विचार करून रात्र रंगवायची ठरवली असेल तर काहीच हरकत नाही."
आता अविवाहित, त्यात परत पूर्ण विचार वगैरे करून कोण असल्या गोष्टी करीत असेल? तेव्हा ते सोडून द्या.
पण शरीरसुख - ह्या बाबतीत प्रयोग करण्याला आपल्याकडे बंदीच आहे. चांगदेव चतुष्टयात म्हटल्याप्रमाणे "पोरापोरींना खुल्लमखुल्ला एकमेकांवर चढू द्या."
त्याशिवाय काही खरं नाही.
विवाहितांसाठी जर एकाच व्यक्तीने असं केलं तर तो morally गुन्हाच ठरावा, नाही? तिथेही जर एकमेकांच्या संमतीने पतीपत्नी अशा रात्री रंगवत असतील तर काहीच प्रॉब्लेम नाही.
थोडक्यात फालतू प्रेम वगैरेच्या नावाखाली कपडे काढायला बघण्यापेक्षा सरळसोट " तुझ्याबरोबर झोपायचं आहे, चलणार का?" हा प्रश्न उत्तम वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नक्कीच.
पण नंतर त्यातून निर्माण होणार्‍या बायप्रॉडक्टबद्दल निर्माण होणार्‍या समस्यांबद्दल समाजाने स्थापलेल्या संस्थांकडे जाऊन निवाडा मागू नका ही विनंती.

बायप्रॉडक्ट = समस्या, प्रश्न या अर्थी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत.

पण वन नाइट स्टॅण्डवाले अशी दाद मागायला जाणार नाहीत असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

+१
किंबहुना समाजाने स्थापलेल्या संस्थांमध्ये बांधले न गेल्यामुळे त्या संस्थांना धोका पोचतो अशी ओरड समाजच करताना दिसतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> शारीरिक आकर्षण हाच एखाद्या नात्याचा (मग तो किती पण short span चा असेल) पाया असू शकतो का ? <<

हो. का नाही?

>> का मुळात तमाम आपली महान भारतीय संस्कृती वादी म्हणतात तस या नात्यांना काही शेंडा बुडखा नसतो ? <<

एका रात्रीचंच आयुष्य असलेल्या नात्याच्या नावातच शेंडाबुडखा नसणं अभिप्रेत नाही का?

>> या अशा गोष्टींमुळे आपल्या महान संस्कृती ला धक्के बसतात का? <<

ज्यांना आपल्या महान संस्कृतीतला सेक्सची मजा घेण्याचा भाग टाळायचा आहे त्यांना धक्के बसत असतीलही. संस्कृतीला काही प्रॉब्लेम नाहीए.

>>आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे भारतीय समाजमनात sex किंवा इतर कुठल्याही अधिभौतिक गोष्टीचा मजा घेण्याबद्दल जो प्रचंड अपराधगंड आहे त्यामुळे one Night Stand सारख्या गोष्टींमुळे आपल्या तकलादू मुल्य व्यवस्थेला धक्के बसतात का ? <<

ज्यांना तो अपराधगंड आहे त्यांना धक्के बसतीलही. मुळात भारतात एकच एक अशी मूल्यव्यवस्था आहे हेच एक मोठं मिथक आहे.

>> बर हा stand कायम दोन अविवाहित लोकांमध्ये च होईल असे काही नाही . अशी काही अट नाही . म्हणजे एखादा विवाहित पुरुष किंवा स्त्री एखाद्या अविवाहित पुरुष किंवा स्त्री सोबत पण अनेकदा रात्र घालवू शकतात . सिनिकस असे पण म्हणू शकतात हा विवाह संस्थेच्या मुळावरच घाला आहे . Where is the sanctity of marriage ? <<

मुळात एकमेकांविषयी शारीरिक आकर्षण वाटत नसतानाही लग्नं टिकवून ठेवली जावीत अशी अपेक्षा आणि वर लैंगिक एकनिष्ठतेची अपेक्षाही ठेवली जाते तेव्हा कुठे जाते ही sanctity?

>> आणि किती लोक अशी संधी समोर आल्यावर ती सोडतील ? मग ती विवाहित असो वा अविवाहित . याच उत्तर आपणच आपल्या मनाशी ताडून बघाव . नात्याचं पावित्र्य , आपली संस्कृती , कुणाला कळल तर, आणि लोक काय म्हणतील हे प्रश्नांचे ब्रम्ह राक्षस मानगुटीवरून उतरवून . मला वाटत बहुतेक लोकांच उत्तर नाही असेच असेल . <<

इथे तुम्हीदेखील कोणती तरी एकच मूल्यव्यवस्था सगळ्यांवर लादता आहात आणि समाजातलं मूल्यवैविध्य नाकारता आहात असं वाटत नाही का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

Where is the sanctity of marriage ?

sanctity पेक्षाही सुरक्षिततेचा मुद्दा अधिक महत्त्वाचा, विवाह भविष्यातील आधाराची शक्यता वाढवतो, विवाहबाह्य संबंध ह्या सुरक्षिततेसाठी धोकादायक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लैंगिक वर्तणुक ही समाजाने इतक्या मोठ्या प्रमाणावर नियंत्रित केलेली आहे की तीकडे सतत सामाजिक दृष्टिकोनातूनच पाहिलं जातं. खरं तर या सामाजिक चौकटीतही उत्क्रांतीने घडवलेल्या मूळ प्रेरणा कार्यरत असतात. मेट सिलेक्शन बद्दल बरंच लिखाण झालेलं आहे. या अभ्यासाचा सामाजिक आणि उत्क्रांतिक अनुषंगाने आढावा घेणारा एक उत्तम पेपर सापडला. त्यात काही अभ्यासांविषयी लिहिलेलं आहे. कंसात माझी टिप्पणी आहे.
- स्त्रिया ओव्ह्युलेशनच्या जवळ असतात तेव्हा अधिक 'मर्दानगी' चेहरे पसंत करतात. जितक्या लांब असतील तितके 'गोड' चेहरे पसंत करतात. यातून आकर्षणामागे असणारी जैविक कारणं आहेत - केवळ समाजाने सांगितलेली सौंंदर्याची मोजमापं नाहीत - हे सिद्ध होतं. (याचा अर्थ असाही काढता येतो की सर्वसाधारणपणे स्त्रियांना प्रेमळ, काळजी घेणारे पुरुष जोडीदार म्हणून हवे असतात. याचं कारणही अर्थातच जैविक आहे. डॉकिन्सच्या सेल्फिश जीन मध्ये या मेट सिलेक्शनचा गेम थियरीने केलेला अभ्यास सादर केलेला आहे. त्यात त्याने म्हटलेलं आहे की जर काळजी घेणारा पुरुष जोडीदार म्हणून मिळाला आणि वन नाइट स्टॅंडसाठी कदाचित 'मर्दानगी' पुरुष मिळवता आला, तर दोन्ही डगरींवर पाय ठेवता येतो. स्त्री-पुरुषांचे एकमेकांविषयीचे अनेक संबंध मेट सिलेक्शन थियरीने समजून घेता येतात.)

- दुसऱ्या एका अभ्यासात अनेक स्त्री-पुरुषांना चार प्रकारच्या नात्यांसाठी २४ वेगवेगळ्या निकषांबाबत विचारलं. ही चार नाती १ डेट, लैंगिक संबंध, स्टेडी रिलेशनशिप आणि लग्न अशी होती. अर्थातच दोन्ही गटांचे निकष या चढत्या क्रमाने अधिकाधिक कठोर बनत गेले. स्त्रियांचे अधिक सरळपणे, सातत्याने चढत गेले तर पुरुषांचे तिसऱ्या आणि चौथ्या पायरीला वाढले. नंतर हाच अभ्यास दुसऱ्या गटाने वन नाइट स्टॅंडची पायरी घालून केला. त्यातही त्यांना हेच निष्कर्ष मिळाले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे लैंगिक संबंधांपर्यंतच्या पायऱ्यांपर्यंत स्त्रिया व पुरुष दोन्ही गट शारीरिक आकर्षणाला खूप महत्त्व देताना दिसले. याउलट पुढच्या पायऱ्यांवर स्त्रिया पुरुषांचं सामाजिक स्थान वगैरे गोष्टींना अधिक महत्त्व देतात.

- या वरील अभ्यासाची पुढची पायरी म्हणजे उपलब्धता. काहींनी असं मत मांडलं की मेट सिलेक्शनसाठीचं 'बजेट' कमी असतं तेव्हा शारीरिक आकर्षण हा किमान मुद्दा येतो. याउलट जर लोकांना चांगल्या गुणांसाठीचं जास्त बजेट मिळालं तर इतर गुणांचाही त्यात अंतर्भाव होतो.

असो, वन नाइट स्टॅंडविषयी लिहिताना थोडं वहावायला झालं. पण मुद्दा असा आहे की समाजाने तयार केलेल्या विवाहासारख्या संस्था या केवळ अॅप्रोक्झिमेशन आहेत. वन नाइट स्टॅंड फक्त शहरांतच होतात याबद्दलही मला तितकीशी खात्री नाही. कारण चिंतातुर जंतूंनी लिहिल्याप्रमाणे भारतीय समाज असा कुठच्याच बाबतीत एकसंध नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

A woman’s value as a mate has been
linked through both the social and evolutionary
perspectives to age and physical attractiveness, whereas a
man’s value is determined through wealth and status.
Since women have less control over their own biology
than a man might exert over his status, women appear to
be more vulnerable to negative affective consequences,
such as body dissatisfaction, low self-esteem and
depression. In addition, across time, a man’s potential to
amass wealth increases as he ages, whereas a woman’s
potential to maintain youth and beauty decreases.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वसाधारणपणे सहमत आहे.

थोडा नागडा जीवशास्त्रीय विचार...

>>- स्त्रिया ओव्ह्युलेशनच्या जवळ असतात तेव्हा अधिक 'मर्दानगी' चेहरे पसंत करतात. जितक्या लांब असतील तितके 'गोड' चेहरे पसंत करतात. यातून आकर्षणामागे असणारी जैविक कारणं आहेत - केवळ समाजाने सांगितलेली सौंंदर्याची मोजमापं नाहीत - हे सिद्ध होतं.

यात "प्रुरुषी सौंदर्याची मोजमापं" असं म्हणायचं आहे का? पक्षी- मर्दानगीची चिह्ने वगैरे?
ओव्ह्युलेशनपासून दूर असलेली स्त्री काय पसंत करते याच्याशी पुरुषातल्या "नरा"ला काही इंटरेस्ट नसतो. नर नेहमी मर्दानी दिसण्याचा प्रयत्न करतो कारण कुठली ना कुठली स्त्री ओव्ह्युलेशनजवळ असणार. तिला आकर्षक वाटणे गरजेचे असल्याने कायम मर्दानी दिसणे हाच मापदंड.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ओव्ह्युलेशनपासून दूर असलेली स्त्री काय पसंत करते याच्याशी पुरुषातल्या "नरा"ला काही इंटरेस्ट नसतो. नर नेहमी मर्दानी दिसण्याचा प्रयत्न करतो कारण कुठली ना कुठली स्त्री ओव्ह्युलेशनजवळ असणार. तिला आकर्षक वाटणे गरजेचे असल्याने कायम मर्दानी दिसणे हाच मापदंड.

हे इतकं सोपं नाही. मेट सिलेक्शनसाठी गेम थियरी वापरून याबद्दल खूप खोलात जाऊन विचार करता येतो. त्यासाठी सेल्फिश जीन मध्ये एक आख्खा चॅप्टर आहे, तो मुळापासून वाचावा अशी सूचना करतो. मी काही वाक्यात थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो.

अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर पुरुषांचे 'स्ट्रॉंग' आणि 'पॅरेंट' असे दोन प्रकार कल्पूया. (इतकं काळं पांढरं नसतं, पण आयडियल रेझिस्टर, आयडियल कपॅसिटर वगैरे गृहित धरतो तसं). गेम थियरीमध्ये या दोन स्ट्रॅटेजीज बनतात. प्राथमिक विचारासाठी एकाच ठिकाणचे दोन वेगवेगळे जीन जे पुरुषाला स्ट्रॉंग किंवा पॅरेंट बनवतात असं समजता येतं. म्हणजे या स्ट्रॅटेजीज व्यक्तीच्या नसून जीन्सच्या आहेत असं इथे समजायचं आहेे.

स्ट्रॉंग - आक्रमक, पुरुषी, मर्दानगी देखणा, बलदंड, कुठच्याच स्त्रीशी 'लग्न' न करणारा (लॉंग टर्म रिलेशन न पाळणारा)
पॅरेंट - प्रेमळ, मवाळ, गोड दिसणारा, कमी शक्तीवान, स्त्रीशी एकनिष्ठ असणारा

स्त्रियांमध्येही दोन प्रकार कल्पू
प्रॉमिस्क्युअस - कुणाबरोबरही संभोग करणाऱ्या
कॉय - निवड करायला वेळ घेणाऱ्या, निष्ठा मागणाऱ्या

या व्यवस्थेत आपल्या मुलाकडे स्ट्रॉंग जीन देणं स्त्रियांसाठी फायद्याचं असतं. कारण एकतर त्यांच्यात फिटनेस अधिक असतो, आणि ते स्त्रियांसाठी आकर्षक असतात. मात्र त्यांच्यापासून झालेल्या मुलांचा संभाळ करायला स्ट्रॉंग पुरुष त्यांच्याबरोबर रहात नाहीत, हा तोटा आहे. त्यामुळे त्यांची मुलं जगण्याची शक्यता कमी होते. ही हाय रिस्क हाय गेन स्ट्रॅटेजी आहे - कारण नशीब चांगलं असेल तर ती पोरं टिकतीलही, मग जेनेटिक दृष्ट्या फायदाच फायदा. पॅरेंट जीन असलेला पुरुष निवडण्याचा फायदा असा की आपल्या मुलांचा फिटनेस कमी असला तरी त्यांना वाढवायला मदत करणारा बाप असला की ती टिकून राहण्याची शक्यता वाढते. ही सेफ पण कमी रिटर्नवाली स्ट्रॅटेजी आहे.

आता प्रॉमिस्क्युअस स्त्रियांचा प्रॉब्लेम असा असतो की त्यांना जवळपास नेहमीच स्ट्रॉंग लोक भेटतात, आणि त्यांच्या मुलांना बाप मिळत नाहीत. म्हणून प्यूअर प्रॉमिस्क्युअस आणि प्यूअर कॉय स्ट्रॅटेजीज असल्या तर कॉय स्ट्रॅटेजी नेहमीच जिंकते. पण या दोन प्यूअर स्ट्रॅटेजीजपेक्षाही अधिक चांगली स्ट्रॅटेजी म्हणजे बहुतांश काळ कॉय, पण ओव्ह्यूलेशनच्या वेळी प्रॉमिस्क्युअस. या स्ट्रॅटेजीचा फायदा असा होतो, की निवड करून पॅरेंट जोडीदार मिळवता येतो, आणि अधूनमधून चोरूनमारून स्ट्रॉंग कडून चांगले जीनही मिळवता येतात. अशी दोन्ही डगरींवर पाय ठेवण्याची प्रवृत्ती जेनेटिकली प्रोग्राम्ड असणं हा नागडा जीवशास्त्रीय विचार आहे.

अर्थात हे एक मॉडेल आहे. आणि यातही 'सर्व स्त्रिया अशाच असतात' असं गृहितक नाही. चांगल्या मॉडेलमध्ये या दोनही स्ट्रॅटेजीज वेगवेगळ्या प्रमाणात मिक्स असलेलं स्त्रियांचं आणि पुरुषांचं पॉप्युलेशन घेऊन एकंदरीत जीन पूल कसे इव्हॉल्व्ह होतील हे तपासता येतं. तसंच हे अपुरं मॉडेलही आहे. याचं कारण प्रामुख्याने पॅरेंट स्ट्रॅटेजीबरोबरच स्त्रीने एकनिष्ठा पाळण्यासाठी असणारी वर्तणुकही जोडली जाते. (स्त्रीला पडद्यात ठेवणाऱ्या पुरुषप्रधान मानसिकतेचं मूळ कदाचित इथे असेल. कदाचित सनातन लिबरल-कॉंझर्व्हेटिव्ह लढाही स्ट्रॉंग/प्रॉमिस्क्युअस वि पॅरेंट/कॉय यांतून आला असू शकेल. अर्थात हा केवळ कल्पनाविलास आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्रिया ओव्ह्युलेशनच्या जवळ असतात तेव्हा अधिक 'मर्दानगी' चेहरे पसंत करतात. जितक्या लांब असतील तितके 'गोड' चेहरे पसंत करतात.

हे सांगितलंत ते बरं झालं. यातला गर्भित सल्ला असा (पन इंटेंडेड) की ज्यांना लैंगिक संबंध हवे आहेत पण पोराबाळांचा लबेदा नको आहे अशा पुरुषांनी चेहरा नेहमी गोड ठेवावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

उलट गोड चेहर्याने दुसर्या पुरुषांच्या पोराबाळांचा लबेदा सांभाळायला लागेल ना! Smile लॉजिकही गलत है!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्त्रिया ओव्ह्युलेशनच्या जवळ असतात तेव्हा अधिक 'मर्दानगी' चेहरे पसंत करतात. जितक्या लांब असतील तितके 'गोड' चेहरे पसंत करतात.

"शास्त्रज्ञांनी" पुरुषी चेहर्‍यांचे जे मर्दानी व गोड असे वर्गीकरण केले आहे त्याचे थोडे बेसिक्स मिळतील का? सँपल्स? स्वतः काय आहोत ते कसे ओळखावे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

या प्रयोगांपैकी एकात एकच चेहरा फोटोशॉप करून गोड ते मर्दानगी असा दहा पायऱ्यांमध्ये बदलत नेलेला होता. मला एकदा एक दुवा सापडला होता जिथे हे फोटो होते. आत्ता सापडत नाहीये. पण मला आठवतं आहे त्याप्रमाणे, काहीसा गोलसर चेहरा, बारीक हनुवटी, मोठे डोळे, गोलसर भुवया, लहान ओठ/जबडा हे 'गोड' चेहऱ्यांचे गुणधर्म होते. तर अॅंग्युलर चेहरा, रुंद हनुवटी, बारीक डोळे, आडव्या भुवया, मोठा जबडा हे मर्दानगी चेहऱ्याचे गुणधर्म होते. पुढील चित्रांत हा फरक थोडा स्पष्ट केलेला आहे. पहिल्या चित्रातले डावीकडचे पाच चेहरे चांगली रेंज दाखवतात. दुसऱ्या चित्रात दोन टोकं दाखवलेली आहेत.

हा प्रयोग अनेक वेळा झालेला आहे. या दुव्यावर गेल्या काही वर्षांत झालेल्या प्रयोगांबद्दलच्या बातम्या आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या प्रयोगात एक फॉल्ट असा आहे की, sexual behavior जेव्हा उत्क्रांत झाले तेव्हा मनुष्य ट्रायबल अवस्थेत होता ,बहुतांश पुरुषांना दाट लांब दाढी मिशी असणार, त्यामुळे उपरोक्त चेहर्यातले feminine to musculine बदल फसवे असावेत,
याऊलट पुरुषांचा आवाज स्त्रीयांवर जास्त प्रभाव टाकतो. ज्याचा आवाज डीप /खर्जातला आहे त्याला स्त्री प्रेफर करते.
http://blogs.scientificamerican.com/anthropology-in-practice/2012/01/03/...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

आवाजाबद्दल (प्रभाव) अतिसहमत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा चांगला मुद्दा आहे. मला वाटतं दाढीमिशांसहितही हे आकाराचे त्यातून प्रतीत होणाऱ्या वृत्तीचे भेद दिसून येत असावेत. दुसरी गोष्ट अशी आहे की चेहऱ्याचा आकार हा केवळ एक, आणि काहीसा स्टॅटिक क्ल्यू आहे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे डीप/खर्जातला आवाज हा दुसरा क्लू - टेस्टॉस्टरोनचं प्रमाण अधिक असण्याचा - हाही महत्त्वाचा असतो.

आणखीन एका प्रयोगात चेहऱ्याकडे न पाहता केवळ वासांवरून स्त्रियांना कोण आकर्षक वाटतो हे तपासून पाहिलं. त्याचा संबंध त्यांनी चेहऱ्याच्या आकाराशी लावला. ज्या पुरुषांचे चेहरे सिमेट्रिकल होते त्या पुरुषांचा वासही स्त्रियांना आकर्षक वाटल्याचं दिसून आलं. चेहऱ्याच्या सिमेट्रीचा संबंध थेटपणे फिटनेसशी लागतो - सुरचित चेहरा म्हणजे योग्य जडणघडण, आणि बेढब किंवा वेडावाकडा चेहरा म्हणजे जन्मतः व्यंग किंवा वाढताना झालेली हेळसांड. याचा अर्थ फिटनेसबद्दलचे क्लू अनेक वेगवेगळ्या मार्गांनी येतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचे सगळे प्रतिसाद अगदी मान्य आहेत.
पण होतं काय की थोबाड+आवाज+वास आणि त्यावरून केलेला स्वभावाचा अंदाज मेळ खातीलच असे नाही. तो शत्रू चेहर्याचा मनुष्य हळवा, प्रेमळ वगैरे असू शकतो आणि अँड्रोजीनी लूकवाला म्यानिपुलेट करणारा, हट्टी, हेकेखोर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सांख्यिकी वापरून मिळालेले निष्कर्ष एकेका व्यक्तीसाठी वापरले तर अर्थातच चुका होऊ शकतात.

फिटनेट दाखवणाऱ्या गोष्टींमध्ये फक्त चेहेऱ्याची ठेवण, आवाज वगैरे गोष्टीच येतात असं नाही. टिकून राहण्यासाठी (survival) साठी ज्या गोष्टी आवश्यक नाहीत, उदा - दृश्यकला, विद्रटपणा, गणित, (*किंवा मराठी आंजावरच्या वांझोट्या चर्चा) इ, त्यांमध्ये प्रावीण्य दाखवणं यातून सुद्धा फिटनेस किती कमी-जास्त आहे ते समजतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

क्या बात है!!! अगदी अगदी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेहर्‍यावरचे केस, आवाज वगैरे वापरूनही याविषयी प्रयोग झाले आहेत, होत आहेत. ज्या प्रयोगात आवाजाचा परिणाम पाहतात त्यात चेहरा दाखवत नाहीत त्यानुसार फक्त आवाजाचा परिणाम वेगळा काढता येतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

या दुव्यावर एका प्रयोगात वापरलेल्या चेहऱ्यांना फ्रेंड (F1), लव्हर (F2), एनिमी (F3) असं रेट केलेलं आहे. त्यांना हेही आढळून आलं की जे शॉर्ट टर्म मेट साठी जे चेहऱ्यांना स्कोअर दिले गेले, ते अॅट्रॅक्टिव्ह या गुणाला दिलेल्या स्कोअर्सइतकेच होते.


Figure 2. Mate selection and personality traits. Using a movie that morphs a very masculine male face (frame 1 of 700) into an androgynous face, the facial pictures and vertical lines indicate the mean location of participants' dominant male (DOM), short-term mate (STM), long-term mate (LTM), average male (AVM) and androgynous face (AND) selections, with respect to experimentally assigned personality traits. F1 (‘Friend’ factor) is composed of positive attributes such as sensitive, helpful and trustworthy. F3 (‘Enemy’ factor) consists of undesirable attributes like selfish, controlling and threatening. The ‘Lover’ factor (F2) includes sexually exciting, supportive and healthy. The STM selection appears to be the best ‘good-genes’ choice (Lover factor), while avoiding the negative traits associated with high degrees of masculinity (Enemy factor). The LTM selection appears to trade off some ‘good genes’ attributes in favor of those required for a good friend and good father (included in F1).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्वभाव नि चेहरा यांची पण लिंक असते का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

त्यात त्याने म्हटलेलं आहे की जर काळजी घेणारा पुरुष जोडीदार म्हणून मिळाला आणि वन नाइट स्टॅंडसाठी कदाचित 'मर्दानगी' पुरुष मिळवता आला, तर दोन्ही डगरींवर पाय ठेवता येतो.

पाय ठेवता येतो हे मान्य पण किती निसरडी डगर आहे ती. जर स्त्रीच्या नवर्‍याला तिची प्रतारणा कळली अन तो जर पूर्ण डेव्हॅस्टेट झाला तर???? हेच पुरषाबाबत ही, स्त्री डेव्हॅस्टेट झाली तर?
"वन नाईट स्टँड" पेक्षा "स्विन्गर्स" मला बरे वाटतात. दोघांनी एकमेकांना मोकळीक दिलेली असते कोणी एकजण प्रतारणेमुळे "डेव्हॅस्टेट" होण्याचा धोका नसतो.
___________
जर वन नाईट स्टँड करायचा आहे तर पहील्यांदा डिव्होर्स घ्यावा कारण त्यानी विश्वासघात टळतो. असे माझे मत आहे. बिट्रेयल इज अ सिरीअस क्राईम अगेन्स्ट लव्हड वन.
अर्थात डिव्होर्सचा निर्णयच फार अवघड आहे हे मान्य पण मग दुसर्‍याचा विश्वासघात करण्याचा निर्णय सोपा असतो असं का??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जनरली मुला मुलींना १४ वर्षापासून सेक्स करावा वाटतो. आजच्या समाज व्यवस्थेत ३० च्या आसपास माणसे सेटल होतात. मग इतकी १६ वर्षे कशी काढायची? दरम्यानच्या काळात मनुष्य जितक्या विचारांतून जातो, त्याने त्याचे 'निष्ठाविषयक' विचार नष्ट होतात.
---------------------------
समाजात लग्न करताना लैंगिक अनुरुपता पाहायची सोय नाही. मग आपल्या फँटसी कुठे साकार करा?
------------------------
आजकाल कामाचे स्वरुप असे आहे कि पती पत्नीला किती काळ दूर राहावे लागेल सांगता येत नाही. बायको ऑनसाइटवर ६ महिने गेली. पुढे?
-----------------------------
नवरा बायको एकत्र वेळ फार कमी घालतात. मंजे दोघे घरी असतात तेव्हा काम इ करत असतात. मोकळे नसतात. त्यामानाने ऑफिसातले कलिग आरामात भेटतात. त्यांचेसोबत काळही चिकार घालायला मिळतो. म्हणजे कोणाशी किती मैत्री करायची याबद्दल पूर्वग्रहदोष नसेल तर ऑफिसच्याच लोकांशी जास्त घट्ट मित्री व्हायची शक्यता आहे.
------------------------
लोकांनी अलिकडे देव व धर्म यांच्याजागी विज्ञान हा वैचारिकेतेचा आधार मानला आहे. विज्ञानाप्रमाणे लैंगिक निष्ठेला काहीच अर्थ नाही.
---------------------
वन नाइट स्टँड ही फार जुनी मानवी वॄत्ती आहे. ती फक्त अधिकृत नव्हती इतकेच. म्हणजे सेक्स केला तरी कोणालाच सांगायचे नाही. आज किंचिंत फरक आहे. विवाहापूर्वी वा नंतर घेतलेल्या वन नाइट स्टँड्ला रिकग्निशन हवे आहे. आम्ही सांगू नी नवर्‍याने (वा बायकोने), समाजाने त्याला दुराचार नाही म्हटले पाहिजे. 'लफडे' व 'चान्स' म्हणून प्रतारणा नको.
---------------------------
हे असं काही होतं यात आश्चर्य करायसारखं काहीच नाही. प्रश्न केवळ समाजानं याला चालना द्यावी का हा आहे. म्हणजे 'हॉटेल वन नाईट स्टँड' असावे का, वन डे स्टँड ची लिव असावी का, इ इ
------------------------------
एकदा तो असावा असं म्हटलं तर बेडरूममधे त्याचं स्वरुप कसं असावं याचे संकेत समाज प्रस्थापित करेल, पण ते मॉनिटर करता येणार नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आजकाल कामाचे स्वरुप असे आहे कि पती पत्नीला किती काळ दूर राहावे लागेल सांगता येत नाही. बायको ऑनसाइटवर ६ महिने गेली. पुढे?
-----------------------------

+१०००

विवाहापूर्वी तुम्ही काय करता याच्यावरही जोडीदाराने का म्हणून टॅब ठेवावा? किंबहुना अननुभवी (पक्षी नवखा = लेम)* जोडीदार नक्की कोणाला हवा असतो ते पहाणे रोचक ठरावे.
* - संपूर्ण व्यक्तीगत मत आहे हे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंबहुना अननुभवी (पक्षी नवखा = लेम)* जोडीदार नक्की कोणाला हवा असतो ते पहाणे रोचक ठरावे.

ती 'योनिशुचिता' वगैरे भानगड सोडून देऊ, परंतु लग्नाच्या मार्केटात प्रथमवरापेक्षा बिजवराला अधिक भाव असल्याबद्दल किमानपक्षी ऐकलेले तरी नाही.

'शिश्नशुचिता' अशीही काही भानगड असते काय?

..............................................................

ज्या कारणाकरिता काही समाजांमध्ये सुंतेची प्रथा आहे, त्या (वाच्य)अर्थाने नव्हे.

अतिअवांतर: जो 'वाच्यार्थ' नव्हे, त्यास 'अर्वाच्यार्थ' येणेंकरोन संबोधता यावे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाच्यर्थ अन अर्वाच्यार्थ Smile
__/\__

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे आठवलं Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

आता प्रत्येक नाईटला स्टँड शिफ्ट करायचा म्हणजे औघडे. नकोच शिंची ती कटकट ! आता वयोमानानुसार फार हलवाहलवी जमत नाही हो !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता वयोमानानुसार फार हलवाहलवी जमत नाही हो !

ROFL हाण्ण तेजायला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ग्रेट माइण्ड्स थिंक अलाइक (/ फूल्स सेळ्डं डिसग्री), या उक्तीचे उत्तम उदाहरण! (माझा खालील प्रतिसाद पहा!)

- (ड्यामफूल) 'न'वी बाजू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शीर्षकाचे आणि लेखाचे प्रयोजन समजले नाही.

झोपतेसमयी शय्येशेजारी नाइट्ष्ट्याण्ड असावा किंवा नाही, असल्यास एकच असावा की (दोन्हीं बाजूंस) दोन, हे सर्व ज्यानेतिने शयनकक्षातील उपलब्ध जागेनुसार आणि ज्याच्यातिच्या आवडीनुसार/सोयीनुसार घेण्याचे निर्णय आहेत, अत एव ज्याचातिचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याच्या सार्वजनिक चर्चेचे प्रयोजन काय?

शिवाय, आपण सर्वजण ठिकठिकाणी विखुरलेले असल्याकारणाने - कोणी अटलांटात तर कोणी पुण्यात, कोणी बॉष्टनात तर कोणी ठाण्यात, कोणी विस्कॉन्सिनात तर... असो; यू गॉट माय पॉइंट. - आपल्या सर्वांमध्ये एकच समाईक नाइटष्ट्याण्ड शेअर करणे कदाचित व्यवहार्य होणार नाही, असेही (चालू पद्धतीस अनुसरून कळकळीने वगैरे) सुचवू इच्छितो.

इत्यलम्|

........................................................................

प्रेफरेबली दुसर्‍याबरोबर, हेमावैम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आई ग!!! ROFL ROFL हाण्ण!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणजे असे पाहा की शारीरिक आकर्षण हाच एखाद्या नात्याचा (मग तो किती पण short span चा असेल) पाया असू शकतो का ?

मुळात वन नाईट स्टँड हे भारतीय रुढार्थाने "नाते" - 'रिलेशनशिप' नसते. तो फक्त एका रात्रीचा "संबंध" असतो.
तेव्हा नात्याचे निकष या गोष्टीला लावणे गैर.

बाकी राहता राहिला प्रश्न संस्कृतीचा. ती प्रवाही असते, तिचा ठाम, ठोस असा काही निकष नाही. तिला धक्का वगैरे काही बसत नाही, बदल होत असतात नी ते अनेक "मी" घडवतात. तुम्हाला योग्य वाटेल ते करत रहावे. तुमच्यासारख्या अनेकांना ते योग्य वाटले तर संस्कृती बदलते, नाहितर तुम्ही संस्कृतीच्या बाहेर फेकले जाता.

जोवर कायदेशीर व जैविक अशा भल्याबुर्‍या परिणामांना मार्गाने सामोरे जायची तयारी आहे तोवर अश्या सज्ञान व्यक्तींच्या संबंधात काहिच वावगे वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नीतीमत्तेच्या कल्पना काल आणी स्थल सापेक्ष असतात. आणि हल्ली त्या भराभर बदलतात. योनिशूचिता ही संकप्लनाच मोडीत निघत आहे.
फार वाईट वाटुन घेऊ नका हो ! चालायचंच ! आणी हे कोणीही थांबवु शकत नाही. पुढची पिढी या गोष्टीला सरावेल आणि अडचण येणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

One Night Stand आणि आपण सगळे
आपण सगळे????!!!

One Night Stand ह्या प्रकाराची समूहकृतीही प्रचलित असल्याचे आजच समजले.
धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

समुहकृती फारशी नवी नसावी - तुलनेने कमी प्रचलित असेल (किंवा कानावरतरी फारच क्वचित पडते)
मुंबईत आमच्या सोसायटीतले एक जोडपे "जरा बदल" म्हणून तिसर्‍या व्यक्तीला एका रात्रीपुरते शयनगृहात प्रवेश देते अशी कुजबुज आम्ही ज्यु कॉलेजमध्ये असतानाच कानावर आली होती. चांगली निम्नमध्यमवर्गीय सुशिक्षित वस्ती!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पहिल्या वाक्याला +१. मीपण तेच लिहीणार होते.
मंजे दोन/अधीक कंसेंटींग अडल्ट्स काय करतायत यात आपला किंवा इतर कोणाचाही काय संबंध येतो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डोक्याचे दही झाले.

काही निष्कर्ष. त्यातले अनेक आततायी ठरतील अशी शक्यता गृहीत धरुनचः

१. मर्दानगी, राकट चेहरा, मर्दानी लुक इत्यादि सामान्य सामाजिक चर्चेत एमसीपीची लक्षणे ठरत असली तरी जेनेटिक बिनेटिक ब्याक्ग्राउंड लावून केलेल्या चर्चेत ती "फिटनेस" आणि "गुड जीन्स"ची लक्षणं ठरतात.
२. मर्द राकट दिसणारे, मर्द राकट चेहर्‍याचे पुरुष स्त्रियांना तातडीच्या अन तात्पुरत्या लैंगिक संबंधांच्या पातळीवर आवडतात.
३. उत्तम सामाजिक स्थान, लाँग टर्म पोराबाळांची काळजी घेणारा अराकट पुरुष हा लाँग टर्म साथीदार म्हणून उत्तम असतो पण त्याचे जीन्स बळकट गुड आणि फिट नसतात. त्याच्याशी नाते म्हणजे जीन्सशी तडजोड. अर्थात, दीर्घकाळ राखणदारीसाठी उपयुक्त पुरुष हा राकट, मर्द , मर्दानी चेहर्‍याचा नसतो. कारण मर्दानी चेहर्‍याचा मनुष्य दीर्घकालीन राखणदार नसतो. पण याचा अर्थ स्त्रिया स्वार्थी असतात असा नव्हे. हे तर जेनेटिक्स किंवा गेम थियरी किंवा ...

४. उत्तम सामाजिक स्थान, दीर्घकाळ साथ देणे, पोराबाळांची जबाबदारी दीर्घकाळ घेणे, पसरट, राकट मर्दानी चेहरा नसणे, फताडे ओठ नसणे इत्यादि ही "बॅड जीन्स"ची लक्षणे आहेत. किंवा अगदी बॅड नसली तरी "गुड जीन्स"पेक्षा (आय मीन, राकट, एकदा उपभोगून सोडणार्‍या "गुड" जीन्सपेक्षा) जरा कमी क्वालिटीच्या फिटनेसची आहेत. (वळूबीज गुणन प्रक्षेत्रात याहून बरी क्वालिटी मिळत असावी)

५. राकट मर्दानगी मनुष्य अधिक फिट असतो.
६. मानवाची अनेक हजार वर्षांची सोशल लाईफस्टाईल केवळ एक मुखवटा आहे. रणांगणे, फिटनेस आणि मर्दानग्या पूर्ण री-डिफाईन झाल्या आहेत हे अमान्य.. त्याखाली प्रत्यक्षात अजूनही मर्दानी फिटनेस आणि जंगलच्या कायद्याची, अश्मयुगीन व्याखेतली "जीन" लॉजिक्सच आहेत.
७. पण पण पण.. स्त्रियांना राकट धसमुसळे मर्दानी डॉमिनेटिंग पुरुष आवडतात असे म्हणणार्‍या कादंबर्‍या निकृष्ट, पीतसाहित्य आणि मिसगायडिंग असतात. तिथे नवा काळ लागू.
८. राकटपणे "परस्त्री"शी संग करण्याचा प्रयत्न करणार्‍या "गुड" जीन्सना आजकालचे मुखवटावाल्या समाजाचे बुरसटलेले कायदे लावून तुरुंगात टाकतात आणि अत्यंत हीन समजतात. स्त्रीच्या चॉईसनुसार केल्यास ते गुड जीन्स आणि चॉईसविरुद्ध केल्यास तातडीने ते नीच बनतात. म्हणजे जीन्स ही शारिरीक बाब नसून बिहेवियरल आणि कायदेशीर बाब आहे.
९. मुद्दा क्रमांक आठ हे बलात्काराचे समर्थन आहे. खेदजनक.. शी...आजच्या काळात.. समाज..कधी सुधारणार.. कायदा, सिस्टीम काही आहे की नाही..इ.
१०. जन्मभर लग्न करुन पोरेबाळे सांभाळणार्‍या वर्गाचे जीन्स अत्यंत बुळे आहेत. त्यांची टेस्टोस्टेरॉन लेव्हल नगण्य आहे. अ‍ॅक्च्युअली ते जीन्स घालण्याइतकेसुद्धा मर्दानी नाही. आम्हीही त्यातच मोडत असल्याने आम्ही आजन्म पायजम्यातच रहावे हे उत्तम.

हे सर्व लिहून मी मनाने तरी राकट मर्दानी ठरेन का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अय्या, तुमच्या डोक्याचे दही झाले म्हणून तुम्ही दुसर्‍यांना विरजण पास-ऑन करताय का?

बाकी ते सगळे जाऊ दे पण वरती म्हटलेय तसे २ प्रकारात वर्गीकरण (वरती दिलेल्या निकषांवर नसले तरी) हे (मनातल्या मनात) आपोआप होतेच! "बॉयफेंड" मटेरिअल व "हजबंड" मटेरिअल!

"बॉयफेंड" + "हजबंड" मटेरिअल कॉम्बो मिळून गेले तर सोने पे सुहागा! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

"बॉयफेंड" + "हजबंड" मटेरिअल कॉम्बो मिळून गेले तर सोने पे सुहागा!

कसं शक्य आहे..??

१. बॉयफ्रेंड मटेरिअल = मर्दानी, भावनाहीन, केवळ अधिकाधिक स्त्रिया मिळवण्याची इच्छा ठेवणारा, फिट जीन्स (टाईट कपडे नव्हे, गुड जीन अशा अर्थाने), ज्यास्त टेस्टोस्टेरॉनवाला, पोराबाळांना निर्माण करण्यात आरंभशूर पण दीर्घकाळ न सांभाळणारा.

२. हजबंड मटेरियलः बायकी चेहर्‍याचा, नाजुक जिवणीचा, नोकरीधंद्यात बर्‍यापैकी कमावता, पोरांना नातवंडांपर्यंत सांभाळणारा, म्हातारपणची सोय करणारा, रोजच्यारोज संसार हाकून साथ देणारा.

क्र. २ चे जीन्सच वेगळे (इन्फिरियर).. ते असलेला बुळ्या इसम, क्रमांक १ चे मटेरियल कसा ठरु शकेल. तुम्ही एकाच वेळी सोने आणि अ‍ॅल्युमिनियम हा एकच धातू निघाला तर किती उत्तम असं म्हणताहात.

आणि हे दोन धातू मिसळले तर ती नुसतीच उपयुक्ततेसाठी केलेली भेसळ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोन धातू मिसळले तर ती नुसतीच उपयुक्ततेसाठी केलेली भेसळ.

असं कसं? गरज ही शोधाची जननी आहे हो!

सोने आणि अ‍ॅल्युमिनियम = गोल्ड्मिनियम Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

हेच . हेच सगळे डोक्यात आले. पण नेमके लिहिता येइना म्हणून मोठा प्रतिसाद द्यायच्या फंदात पडलो नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

जीन टाकून घातलास ना पायजमा मग ??

ये आता वाचत बसूया.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL
ROFL ROFL

बास बास! धाग्याचे सार्थक झाले.. उत्तम दहि जमले आहे ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हे सर्व लिहून मी मनाने तरी राकट मर्दानी ठरेन का?

किती तो इच्यार करावा! निम्मी राकट मर्दानगी हिकडंच संपते. त्यापेक्षा कोमल जनानी गुणधर्मांची तितकीच विस्तृत यादी द्या, तेवढीच असिमेट्री दूर होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

"राकट" अशी श्रेणी दिली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमचा सगळा राकटपणा तुम्हांस बहाल करून नि-राकट जाहलो तरी आपले उपकार फिटणार नाहीत. _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हाहाहा निष्कपट ऐकले होते पण हे नि-राकट Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्या 'स्टॅन्ड'चे (शिर्षकातल्या आणि काही प्रतिसादातल्या) काहीही होवो पण विदासम्राट धाग्यावर आले की 'डोक्याचे दही झाले म्हणून समजा' ह्या माझ्या मताला दुजोरा मिळाला आज Biggrin

- (दह्यापेक्षा योगर्ट आवडणारा) सोकाजी

--------------------------------------------------
हे मज पामराचे आपले वैयक्तिक मत हो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अलिकडे 'शास्त्रज्ञांना' सामाजिक विज्ञान विकसित करायची फार घाई लागलेली आहे. चार हायपोथेसिस घ्या, चार लोकं घ्या नि काही बाही प्रश्न विचारा. आलेल्या उत्तरांतून काही ना काही संशोधन निघणारच. ते नै का म्हटलं आयुर्वेदात - काय काय (पालापाचोळा) घ्या, कसा कसा कुटा, भुगा करा, पिळा, कोणाला तरी पकडा नि पाजा. काय ना काय तरी होणारच. अगदी तस्संच!!!
http://www.sciencedaily.com/releases/2014/08/140818095210.htm?utm_source...
हा कालचा शोध.
http://www.sciencedaily.com/releases/2014/08/140818135210.htm?utm_source...
हा आजचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

काय काय (पालापाचोळा) घ्या, कसा कसा कुटा, भुगा करा, पिळा, कोणाला तरी पकडा नि पाजा. काय ना काय तरी होणारच. अगदी तस्संच!!!

हाहाहा ROFL कसली हसतेय!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सलीम टु झांगीरः हाओ रे, मै उत्ता तो भी करा, तू क्या करा रे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

http://www.sciencealert.com.au/news/20141808-26038.html
अजून एक.

There’s now overwhelming evidence that parents’ bad habits can be passed on to their children genetically, according to Australian researchers.

This means that parents' bad habits, such as poor diet or drinking too much alcohol, could be passed on to their children, even if they are healthy during pregnancy or shortly before conceiving.
बोल्ड केलेला भाग विशेष रोचक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

चार लोक जमवून कैतरी प्रश्न विचारून विदा गोळा करणारे अन त्याआधारे निष्कर्ष काढणारे शास्त्रज्ञ जर चु* असतील, तर तेवढेही न करता निव्वळ 'हे पहा हे चु*, पहा यांचे तथाकथित संशोधन' अशा पर्दाफाश केल्याच्या आवेशात लिंका डकवणार्‍यांना काय म्हणावे ते समजत नाही. चालूद्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

_____/\______
हा हा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चार (शे, हजार, लाख, कोटी, बिलियन) लोक जमवून कैतरी प्रश्न घेऊन विधी करणारे (जसे विपश्यना) अन त्याआधारे निष्कर्ष काढणारे शास्त्र-अज्ञ जर चु* असतील, तर तेवढेही न करता निव्वळ 'हे पहा हे चु*, पहा यांचे तथाकथित तत्त्वज्ञान' अशा पर्दाफाश केल्याच्या आवेशात त्यांना महामूर्ख समजणारांना काय म्हणावे ते समजत नाही. चालूद्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

रिअ‍ॅक्शनरी उत्साहात वाहवण्याची फेटिषच असेल, तर आमचे काही म्हणणे नाही. पण नसेल तर शेवटी अशा भानगडीत स्वतःचेच हसे होते. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मी तुमचेच लॉजिक वापरले आहे. नि हसे फक्त माझे एकट्याचे होणार? खर्‍याची दुनिया राहिली नै म्हणायचं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ते लॉजिक कुठवर वापरायचे हेही पाहणे गरजेचे आहे. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तुम्ही जेथवर वापरणार किमान तेथवर तरी आम्हाला वापरू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

वापरू द्या??? तुम्हांला अटकाव करणारा मी कोण म्हणे? ते एक असोच.

पुढची चर्चा व्यनितून करू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे या धाग्यातून.

मार्गदर्शक तत्त्वे

  • जोवर शिष्टपणाची मर्यादा पाळली जाते, आणि कोणाविषयी बदनामीकारक, कायदेबाह्य, अगर संस्थळाला हानिकारक ठरू शकेल असे लिखाण होत नाही तोपर्यंत लेखकांचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य जपण्याचा प्रयत्न केला जाईल.
  • अशा मर्यादांची जाणीव ठेवण्याची जबाबदारी लेखकांची व प्रतिसादकांची आहे. लेखनवस्तूच्या गरजेनुसार काही प्रमाणात अशिष्ट मानलेले शब्दप्रयोग येऊ शकतात. तसे वापरण्याची गरज आहे हे दाखवून देण्याची जबाबदारी लेखकाची असेल.
  • प्रसंगी आपल्या लेखनावर कठोर टीका होऊ शकते हे लेखकांनी ध्यानात ठेवावे. अशा टीकेकडे खिलाडू वृत्तीने, तीतून शिकण्याच्या उद्दिष्टाने पाहावे.
  • प्रतिसाद संतुलित असावेत. लेखनाचा सांगोपांग विचार करून वाईटाबरोबर चांगले काय हेही सांगावे. व्यक्तिगत टीकाटीप्पणी टाळावी.
  • चर्चा खेळीमेळीने व्हाव्या. चर्चेत विचारांचे खंडन वा मंडन करावे, ते विचार मांडणाऱ्या सदस्यांबद्दल टीका नसावी.
  • अर्वाच्य, असांसदीय शब्दप्रयोग चर्चांना व्यक्तिगत पातळीवर नेऊ शकतात, तेव्हा असे प्रयोग टाळावेत.
  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

????
????
????
????
????
????
????
????

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

This comment has been moved here.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

दीर्घकालीन रडारवर बरं का आदूबाळ. पोरांची शी शू दीर्घकाळ काढू शकणारे बकरे डिटेक्टर रडार.

तातडीच्या रडारवर नव्हे. तेव्हा लड्डू फूटने मत दिजिए मन में..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पोरांची शी शू दीर्घकाळ काढू शकणारे

इतक्या दीर्घकाळ शी शू करणारे शिशू पैदा करणार्‍या बायकांच्या डीएनेमध्ये डिसेंटरी जीन असावासं वाटून गेलं.

डिसेंट-री प्रतिक्रिया येणारच Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ए बॅट्या काहीतरीच आपलं Smile तुला माहीते का किती हगणं-मुतणं असतं लहान बाळांचं Smile पोट इतकं छोटं असतं की जरा दुदु प्यालं नाही की बाहेर टाकतात. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गविंच्या प्रतिसादातील 'दीर्घकाळ' या शब्दामुळे किंतू आला हो, बाकी काही नाही.

(स्वस्रीयमूत्रसिंचित) बॅटमॅन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अगं बाई Smile तेच मला त्या शब्दाचा अर्थच लागत नव्हता. आता लागला. धन्यवाद Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निराकट आणि निर्मर्दानी प्रश्न विचारल्यावर दीर्घकालीनच असणार ना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

दीर्घकालीनच

दीर्घकाळ शी शू काढायची तर कालीनही दीर्घच हवी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

विषयाचं सर्वांनी भान राखावं आणि फक्त "रात्री रंगणार्‍या" गोष्टी या धाग्यावर चर्चाव्यात (दही / योगर्ट वाचायला आम्ही या धाग्यावर येत नाही ;))अशी सुचना करुन मी माझे २ शब्द संपवते Wink ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(संजोपरावांना या प्रतिसादातील चूक न काढण्याची विनंती करत...) अहो, विषयाचा रंग बदलताय आपण!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

"विषय" सर्वथा नावडो मधल्याच विषयाचाना? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"विषय" सर्वथा नावडो

पसायदान बर्‍याचदा ऐकलं, वाचलं आहे. त्याच्यात "भूतां परस्परें जडो" ला र्‍हायमिंग "विषय सर्वथा नावडो" ऐकल्याचं स्मरत नैयय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सुसंगती सदा घडो सुजनवाक्य कानी पडो,
कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडो!!!

च्यायला मग जगायचं कशाला एवढं सगळं नावडतय तर ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्या बात कही है!
हे म्हणजे अत्तराच्या दुकानात जाऊन नाक बंद करून जगण्यासारखं आहे!

पुलंच्या "तुझे आहे तुजपाशी"मधला एक संवाद आठवला.
काकाजी : "स्थितप्रज्ञ! तो बघ, तो गाढव चाललाय ना सडकेवरून, तसा दिसतो स्थितप्रज्ञ!
ज्याला आनंद नाही, दु:ख नाही, लाज नाही, लज्जा नाही, जो आंब्याच्या फोडी आणि कागद एकाच चवीने खातो, तसा दिसतो स्थितप्रज्ञ!"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दहि योगर्ट आणि आता 'रात्री रंगणारी गोष्ट ' मेंदी'कडे चर्चा वळवली जातेय, अर्रर्र चांगल्या वाचनंदावर विरजन पडले राव!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

हाहाहा मेंदी ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरोखरीच ग्रेटथि़ंकर आहात. 'रात्री रंगणारी गोष्ट' म्हटल्यावर आमच्यासारख्याच्याच्या पापी मनात कदापिही मेहेंदी आली नसती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

वीर्याचं विरजण भारी हाय, सारिकाताई भाई हाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अदिती हे बाकी कै च्या कै!! Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तू लोकांना दिलेला दम वाचून मला हे आठवलं - विकतचं विरजण, शीर्षकापुरतंच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वेल दम गंमत म्हणून दिलेला .... भाई बिई नाय आपण Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असो चर्चा पूर्ण वाचून झाली आहे. डोक्याच्या दह्यापासून विषय पूर्णच वाहवत गेला आहे.
असो आता जास्ती वेळ न दवडता मी काही गोष्टी कॉपी पेस्ट करतो.
“In The Moral Animal, Robert Wright laments, "A basic underlying dynamic between men and women is mutual exploitation. They seem, at times, designed to make each other miserable."

Don't believe it. We aren't designed to make each other miserable. This view holds evolution responsible for the mismatch between our evolved predispositions and the post-agricultural socioeconomic world we find ourselves in. The assertion that human beings are naturally monogamous is not just a lie; it's a lie most Western societies insist we keep telling each other.”
― Cacilda Jethá, Sex at Dawn: The Prehistoric Origins of Modern Sexuality

हा दुसरा परिच्छेद.तुम्हारी बॉडी मै इतने छेद करेंगे पता नाही चलेगा सांस कहासे ले ओर पादे कहासे- श्री श्री चुलबुल पांडे(दबंग)

Readers acquainted with the recent literature on human sexuality will be familiar with what we call the standard narrative of human sexual evolution, hereafter shortened to the standard narrative. It goes something like this:

1. Boy Meets girl,

2. Boy and girl assess one and others mate value, from perspectives based upon their differing reproductive agendas/capacities. He looks for signs of youth, fertility, health, absence of previous sexual experience and likelihood of future sexual fidelity. In other words, his assessment is skewed toward finding a fertile, healthy young mate with many childbearing years ahead and no current children to drain his resources.

She looks for signs of wealth (or at least prospects of future wealth), social status, physical health and likelihood that he will stick around to protect and provide for their children. Her guy must be willing and able to provide materially for her (especially during pregnancy and breastfeeding) and their children, known as "male parental investment".

3. Boy gets girl. Assuming they meet one and others criteria, they mate, forming a long term pair bond, "the fundamental condition of the human species" as famed author Desmond Morris put it. Once the pair bond is formed, she will be sensitive to indications that he is considering leaving, vigilant towards signs of infidelity involving intimacy with other women that would threaten her access to his resources and protection while keeping an eye out (around ovulation especially) for a quick fling with a man genetically superior to her husband.

He will be sensitive to signs of her sexual infidelities which would reduce his all important paternity certainty while taking advantage of short term sexual opportunities with other women as his sperm are easily produced and plentiful.

Researchers claim to have confirmed these basic patterns in studies conducted around the world over several decades. Their results seem to support the standard narrative of human sexual evolution, which appears to make a lot of sense, but they don't, and it doesn't.”
― Cacilda Jethá, Sex at Dawn: The Prehistoric Origins of Modern Sexuality

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!