बुद्धी

बुद्धी आचके देत होती त्यापूर्वी थोडा वेळ मी हा प्रश्न केला होता.
हे असं का?
मग उत्तर मिळालं -
हे मला विचारतोस?
माझ्या हाताने मी एकही बाण सोडलेला नाही.
माझ्या उर्मीने मी एकही बळी घेतलेला नाही.
माझी स्वयंसिद्ध अर्चना तू थांबवलीस.
आणि आता तुझे भोग माझ्या माथी मारतोस?
तुझा बळी जातोय तोही माझ्यामुळे नव्हे.
गंमत इतकीच की तुझं असणं माझ्या असण्यावर अवलंबून आहे.
आणि तुला वाटतं की माझं जाणं तुझ्या हातात आहे.

हताश होऊन मी म्हटलं,
माय माझी, मी नाही गं ते केलं.
तू मला सगळं दिलंस. माझ्या भल्याकरताच दिलंस.
पण माझ्या अबोध दुःखाच्या वेळी मात्र तू मला एकटं टाकायला नको होतंस.
सगळ्याच धनुष्यांची प्रत्यंचा सारखी नसते हे तुला कळलं नाही.

मग बुद्धी शेवटचं हसून गेली.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (3 votes)

प्रतिक्रिया

कविता आवडली
बुद्धी आणि बुद्धु किती जवळचे शब्द आहेत नाहि Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कविता आवडली. ह्याचा अंत कसा आणि कुठे, असा मोठ्ठा फिलॉसॉफिकल आणि काहीसा अस्वस्थ करणारा प्रश्न ही करुन गेली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गंमत इतकीच की तुझं असणं माझ्या असण्यावर अवलंबून आहे.
आणि तुला वाटतं की माझं जाणं तुझ्या हातात आहे.

हे

गंमत इतकीच की माझं असणं तुझ्या असण्यावर अवलंबून आहे.
आणि तुला वाटतं की तुझं जाणं माझ्या हातात आहे.

असं हवं होतं काय?

कारण तोच नसला तर ती नसणार आहे हे ढळढळीत सत्य आहे अन ती बुद्धी असल्याने तर्कदृष्ट्या योग्य तेच बोलेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

कविता आवडली. बुद्धी हे आपलं अवजार की आपल्या अस्तित्वाचा, वेगळा न करता येणारा घटक? अबोध दुःखाच्या वेळी आपण तिचा त्याग करतो, की तीच सोडून जाते... तुझ्या दुःखाचा गुंता तूच सोडव म्हणून? असे प्रश्न कविता वाचताना आपोआपच उभे रहातात. वस्तुनिष्ठतेचं कुत्रं धरलं तर चावतं, आणि सोडलं तर पळतं. तरीही धनंजय यांच्या लेखात आलेल्या वस्तुनिष्ठतेच्या अहंमन्यतेबाबत 'प्रत्येक धनुष्याची प्रत्यंचा सारखीच नसते हे' भाष्य ही कविता करते. हे अज्ञेयवादी विधान कलात्मक पद्धतीने इथे मांडलेलं आहे.

"There are more things in heaven and earth, Horatio,
Than are dreamt of in your philosophy."

याची आठवण झाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कविता आवडली. मी आणि बुद्धी यांच्यातलं द्वैत मात्र थोडं विचारात पाडणारं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हाय क्वालिटि लिटरेचर... Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

''मी तंबाखु खाणारच''

अतृप्त आत्मा (तुमचा आयडी रोचक आहे..), धन्यवाद. (बाकी अतृप्त आत्म्याचे खरेच आभार मानले पाहिजेत..अन्यथा इतक्या कविता, लेख, चर्चा, वाद-विवाद यांचा उगम दुसरा कुठला?)

अदिती, आभार..'बुद्धी आणि मी यातलं द्वैत' हा मुद्दा विचारात पाडणारा आहे. पण मला असं वाटतं की माणसाची एक क्षमता या अर्थी बुद्धी हाही माणसाचा एक अवयवच नव्हे का? माझा हात आणि मी वेगळाच ना? मी माझ्या सर्व अवयवांशी जोडला गेलेलो आहे (आणि म्हणूनच सगळे अवयव शाबूत ठेवणं अत्यावश्यक. विचार करण्याइतकाच सकाळ्चा व्यायाम आवश्यक!)पण मग या सगळ्या अवयवांपासून बनलेला 'मी' कोंण? कुठे असतो? अर्थात, माणसाच्या सर्वात जवळ, सतत सोबत असते ती जाणीव, विचारशक्ती...त्यामुळे त्या अर्थी मी म्हणजेच माझी जाणीव, माझी बुद्धी असं म्हणता येईल...

राजेशनीसुद्धा हाच प्रश्न विचारला आहे - 'बुद्धी हे आपलं अवजार की आपल्या अस्तित्वाचा, वेगळा न करता येणारा घटक?' राजेश, धनंजय यांचा लेख अजून वाचला नाही...आता वाचेन. प्रतिसादाबद्दल आभार..

पाषाणभेद..धन्यवाद. तुमचा मुद्दाही विचार करण्यासारखा आहे. फक्त मी तुझं असणं माझ्या असण्यावर अवलंबून आहे असं म्हटलं कारण बुद्धीविहीन मनुष्य हा जवळ्जवळ नसल्यातच जमा आहे. (अर्थात हे कलात्मक अंगाने झालं. प्रत्यक्षात तुम्ही म्हणत आहात त्याप्रमाणे आधी मनुष्य संपेल आणि तो संपला म्हणून बुद्धी संपेल...)

ऋषिकेश, व्हाईट बर्च...धन्यवाद. ऋषिकेश, हो..बुद्धी आणि बुद्दू दोन्ही शब्द जवळचे आहेत खरे...(बुद्धी असणार्‍यांना अहंकार होऊ नये म्हणून केलेला भाषिक इलाज... Lol

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी आणि माझी बुद्धी वेगळे अशी कल्पना करणे अवघड गेल्याने प्रतिसाद दिला नव्हता.
"मी" ही जाणिव बुद्धीमुळेच आहे असे मला वाटते (कमी बुद्धीच्या प्राण्यांना स्वत्वाची जाणिव नसते म्हणतात.) त्यामुळे माझी बुद्धी की बुद्धीमुळे मी हे अजून मला न सुटलेले कोडे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0