पर्सनल फायनान्स - भाग ५ - कर्ज

गेल्या भागात आपण सुरुवात कशी करायची ते बघितले. आता या भागात बघुया कर्ज.
पूर्वीच्या काळात कर्ज म्हणजे अगदीच वाईट असे मत होते. कर्ज द्यायचे नाही आणि घ्यायचे नाही अशी सर्वसाधारण मनोवृत्ती होती. चार घास कमी जेऊ, पण शांतपणे झोपू, उगीच डोक्यावर कर्ज कशाला? असा विचार सामान्य मध्यमवर्गीय (विशेषतः मराठी माणूस) करायचा. याउलट गुजराथी, मारवाडी हे लोक बिनदिक्कत कर्ज घेतात, हे आपण बघितले आणि मराठी माणूस जसाजसा विचार करू लागला, तसातसा कर्जाबद्दलचा तिटकारा (taboo) कमी-कमी होऊ लागला.

कर्ज घेण्याचा मुख्य फायदा म्हणजे लिवरेज. (leverage). स्वतःचे कमीत-कमी (कधीकधी शून्य) पैसे गुंतवून आपण नवीन वस्तू विकत घेऊ शकतो, घरासाठी किंवा शिक्षणासाठी कर्ज घेऊ शकतो. कधी-कधी क्रेडिट कार्ड कंपन्या शून्य टक्के दराने पण कर्ज देऊ करतात, याचा वापर तुम्ही लिवरेजसाठी करू शकता. आता काही लोक म्हणतात की क्रेडिट कार्डचे कर्ज म्हणजे वाईट, पण गृहकर्ज/बिझनेस लोन म्हणजे चांगले (कारण त्याच्यामुळे तुम्हाला घर मिळते आणि शिवाय इन्कम टॅक्सवर सवलत पण मिळते). काही-काही कर्जावरील व्याज हे इन्कम टॅक्सवर सवलत देणारे असते. म्हणजे समजा: तुम्ही १०% दराने गृहकर्ज घेतले आणि त्याच्यावर तुमचे ३०% टॅक्स दराने ३% इन्कम टॅक्सचे पैसे वाचले, तर एफेक्टीव्ह व्याजदर पडला ७%.

माझ्या मते कर्ज चांगले किंवा वाईट नसते. ते वाईटच असते कारण तुम्हाला त्याच्यावर व्याज द्यावे लागते. कर्ज उपयुक्त (useful) आहे की नाही ते बघणे जास्त महत्वाचे. तुम्हाला ७% दरापेक्षा इतर गुंतवणूकीत जर जास्त परतावा मिळत असेल तर मग इतरत्र गुंतवणूक करणे जास्त चांगले. जर ते पैसे तुम्ही फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेऊन त्याच्यावर ४% कमावणार असाल, तर ७% दराचे कर्ज फेडणे चांगले. एक गोष्ट लक्षात ठेवा: ७% हा after-tax परतावा आहे, त्यामुळे तुलना करताना after-tax returns चीच तुलना करा. टॅक्स दिल्यानंतर तुमच्या खिशात किती पैसे उरतात किंवा तुमच्या खिशातून जातात, ते सगळ्यात महत्वाचे आहे. (what you keep after taxes matters.)

कधी-कधी काय होते की तुम्हाला कर्ज नको असते, पण उलट तुम्हीच इतरांना कर्ज द्यायला तयार असता. अशा वेळी तुम्ही काय करायचे? तुम्ही बाँड खरेदी करू शकता. बाँड म्हणजे तुम्ही कंपनीला दिलेले कर्ज, ज्याच्यावर कंपनी तुम्हाला व्याज देते. कधी-कधी तुम्ही सरकारला पण कर्ज देऊ शकता. (उदा. ट्रेजरी बाँड किंवा म्युनिसिपल बाँड वगैरे). बाँडबद्दल माहिती वेगळ्या लेखात बघू. हल्ली इतर लोकांना मायक्रो-क्रेडिट देण्याचा पर्याय पण आता उपलब्ध आहे (उदा. ग्रामीण बँक, किवा वगैरे), पण यात रिस्क जास्त असते कारण असे कर्ज बहुतेक वेळा तारणविरहित (unsecured) असते.

तुम्ही बँकेकडून कर्ज घेताना बँक बघते तुमची पत (credit rating), गॅरंटी देणारा कोणी आहे का किंवा तारण आहे का (whether loan is secured or unsecured), तुमची कर्ज फेडण्याची क्षमता (ability to repay loan), सध्याची आर्थिक परिस्थिती (current net worth). अर्थातच तुम्ही जर इतरांना कर्ज देणार असाल तर तुम्ही पण याच गोष्टी बघायला पाहिजेत. पत (credit rating) ही व्यक्तीची बघतात तसेच कंपनीची, देशाची वगैरे पण बघतात. त्यासाठी वेगवेगळ्या संस्था आहेत (उदा: CRISIL, S&P वगैरे). पत जितकी चांगली तितके तुमचे कर्जदर चांगले. अमेरिकेत तुमचा क्रेडिट स्कोर ८००+ असेल तर तुम्हाला सर्वोत्तम दराने कर्ज मिळू शकते, कंपनीची पत AAA असेल, तर कमीत-कमी व्याजदर देऊन पण ते पैसे उभे करू शकतात.

साधारणपणे कर्ज म्हणजे ग्राहकासाठी असते क्रेडिटकार्डचे कर्ज, गाडीसाठी घेतलेले किंवा घरासाठी घेतलेले कर्ज. सरतेशेवटी मुद्दा राहिला तो म्हणजे तुम्ही कर्ज काढून त्या पैशाचे करणार काय? जर तुम्ही कर्ज काढून ते पैसे वापरून तुमचा भविष्यातील कॅश फ्लो म्हणजे पर्यायाने तुमची net worth वाढवणार असाल, तर ते चांगले. उदा. पुढील शिक्षण ज्याच्यामुळे तुम्हाला भविष्यात अधिक पगार/पैसे मिळणार आहेत, धंदा करून भविष्यात अधिक पैसे मिळणार असतील तर, घर विकत घेणार असाल तर (हा मुद्दा विवाद करण्याजोगा (debatable) आहे, वेगळ्या लेखात बघू).

याउलट ते पैसे जर depreciating asset उदा: कार, मोटरसायकल, फर्निचर वगैरे विकत घेण्यासाठी खर्च करणार असाल आणि तुम्हाला कर्ज आवडत नसेल तर शक्यतो रोख रक्कम देऊन (paying cash) किंवा शून्य टक्के व्याजदराने हप्त्यावर मिळाली तर तशी घ्या. जर ती वस्तू घ्यायचीच असा ठाम विचार असेल, तर मग कर्जामुळे किती रक्कम अधिक द्यावी लागेल याचापण निर्णय घेताना विचार करा.

इतर माहिती:
१. काहीकाही कंपन्यात पतपेढ्या (credit unions) असतात, ज्यात तुम्हाला खूप माफक दराने कर्ज मिळू शकते. (उदा: L&T कंपनीत अशी एक पतपेढी आहे).
२. तुमची पत चांगली असेल तर क्रेडिट कार्ड कंपन्या १८ महिन्यापर्यंत शून्य दराने कर्ज देऊ करतात. अर्थात त्याचा उपयोग तुम्ही अतिशय सावधपणे करू शकता, पण ट्रान्सफर फी किती आहे, मिनिमम पेमेंट आहे का आणि इतर नियम एकदम बारकाईने वाचून बघा. तसेच अश्या प्रकारचे कर्ज घेतल्याने तुमचे क्रेडिट रेटिंग तात्पुरते का होईना, खाली येऊ शकते ते लक्षात ठेवा.
३. तुम्ही EPF (?नक्की माहित नाही) किंवा 401(k) मधून कर्ज काढू शकता, पण हे अतिशय धोक्याचे ठरू शकते. या कर्जाचे पैसे तुम्ही स्वतःलाच देणार आहात, असा युक्तीवाद बर्‍याचदा केला जातो. पण लक्षात ठेवा की ही गुंतवणूक तुमच्या निवृत्तीसाठी आहे आणि तुम्ही कर्ज काढले तर तुमची गुंतवणूक तितकीच कमी होत आहे आणि चक्रवाढ व्याज पण त्या कमी रकमेवरच कार्यरत आहे. तुम्ही नोकरी सोडली किंवा कंपनीने काढून टाकले, तर 401(k) चे सर्व कर्ज व्याजासकट एकदम द्यावे लागते, अन्यथा early distribution समजून त्याच्यावर टॅक्स आणि early withdrawal penalty लागू होते.

थोडक्यातः
१. कर्ज चांगले किंवा वाईट नसते. ते उपयुक्त आहे की नाही, ते बघा.
२. तुमची पत (credit rating) ही कर्ज घेण्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे.
३. कर्ज काढून तुम्ही त्या पैशाचा वापर कसा करता, याचा विचार करा.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
3.2
Your rating: None Average: 3.2 (5 votes)

प्रतिक्रिया

चांगली माहिती असली तरी विस्कळीत वाटली.

सध्यातरी गृहकजांपैकी एसबीआयच्या "मॅक्स गेन" च्या तोडीची स्कीम दिसलेली नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

येस SBI मॅक्स गेन बेस्ट आहे. माझ्या माहितीनुसार तसा प्रोडक्ट सिटीबँकने सगळ्यात पहिल्यांदा बाजारात आणला.
बाकी लेख चांगला आहे. प्रतिसाद, चर्चेतून अजून माहिती मिळेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारतातील गृहकर्जांच्या सध्याच्या स्कीमबद्दल मला माहिती नाही, त्यामुळे काही सांगू शकत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मलाही माहीती थोडी (किंचित) विस्कळीत वाटली.
(१) ४०१क मधून कर्ज कधीच काढू नये, पिरीअड अशा टाइपचे वाचल्याचे स्मरते. कारण खूप फाइन तर बसतोच परत भविष्यातील तरतुदीला नख लागतं.
(२) कर्जाचा स्नोबॉल इफेक्ट वाईट असतोच. त्याबद्दल विशेष लिहीलेले दिसत नाही.
(३) कर्ज फेडताना, लहान कर्जे आधी फेडावीत - असे वाचल्याचे स्मरते. मागील कारणमीमांसा आत्ता आठवत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कर्ज फेडताना, लहान कर्जे आधी फेडावीत - असे वाचल्याचे स्मरते.

याचे उत्तर एकदम ब्लॅक & व्हाईट असे देता येणार नाही. कर्ज किती शिल्लक आहे, त्याचा एफेक्टीव व्याजदर तुम्हाला किती बसतोय आणि कॅश फ्लो वर काय परिणाम होईल, ते बघावे लागेल. उदा: समजा, मी गाडीसाठी २% दराने कर्ज घेतले आहे, ज्यात महिना हप्ता आहे $७०० आणि शिल्लक कर्ज आहे $३०,०००. याशिवाय घराचे कर्ज आहे ३% दराने, ज्यात महिना हप्ता आहे $१५०० आणि शिल्लक कर्ज आहे $३५,०००. मला बोनस मिळाला $३५,००० तर मी गाडीच्या कर्जाचे ३० हजार आणि घराच्या कर्जाचे ५ हजार फेडण्याऐवजी, घराचे संपूर्ण कर्ज फेडून टाकेन कारण त्यामुळे माझा कॅश फ्लो $१५०० ने वाढेल. (अजून चांगले उदाहरण सुचले नाही). सांगायचा मुद्दा आहे की it depends.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

२. तुमची पत (credit rating) ही कर्ज घेण्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे.

हे मी नेहमीच ऐकतो/वाचतो. पण भारतात हे लागू होतं का ?
दरम्यानच्या काळात मी काही घरांचे व्यवहार केलेत.
माझा अनुभव असा :-
क्रेदित रेटिंग cibil स्कोर वगैरे छान, व्यवस्थित होते. (साडेसातशेहून बराच अधिक स्कोर होता.)
पण बाहेरच्या देशात "तुमचा क्रेडिट स्कोर छान आहे म्हणून देतो थोडे स्वस्तात कर्ज" असे कोनी म्हणाले नाही;
भावबाजी करण्याचा प्रयत्नही केला; पण उपयोग नाही.
भारतात तरी मला आलेला अनुभव म्हणजे कर्ज देणार्‍यांचा ब्युरोक्रॅटिक माइंडसेट आणि "सब घोडे बारा टक्के" असे वागवणे.
उदा :-
आमची ब्यांक सध्या अमुक अमुक टक्के दराने कर्ज देत आहे. पटत असेल घ्या; नैतर चालू पडा.
(विविध राष्त्रियीकृत व icici सारख्या खाजगी पण मोठ्या ब्यांकेतही हाच अनुभव आला.
lichfl वगैरे nbfc(non banking finance corporation) पण त्याच लायनीवर.)
( ग्राहकाच्या ऐपतीनुसार व हिष्ट्रीनुसार कर्ज देण्याच्या रकमेत व व्याजाच्या दरात काही घंटा फरक पडणार नाही.
म्हणजे, तुमची हिष्ट्री वाईट असेल, तर त्रास नक्कीच होइल, पण हिष्ट्री चांगली आहे; म्हणजे वाजवी/competitive व्याजाचे दर लागू होतीलच असे नाही.
)
भारतातली व्यवस्था अजून पूर्ण मॅच्युअर व्हायची आहे म्हणून हे असे असावे का ?
की हा केवळ माझाच अनुभव आहे(पक्षी :- माझ्या सादरीकरणात्/पाठपुराव्यात काही कमी पडले म्हणून मी ब्यांकींग सुविधेचा पूर्ण लाभ उचलू शकलो नाही ? ठाउक नाही. बर्‍याच लोकांचे अनुभव ऐकेन, तेव्हाच काय ते नेमके मत बनवता येइल. तोवर माझा अनुभव भारताच्या बाबतीत प्रातिनिधिक आहेच, असेही ठामपणे म्हणू शकणार नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

काही वर्षांपूर्वी केवळ हौस (किंवा खाज) म्हणून मॉर्टगेज लोन ऑफिसरचे लायसेन्स घेतले होते, तेव्हा शिकलेल्या गोष्टी. क्रेडिट रेटिंग चांगले असतील तर तुम्हाला ऑलरेडी टॉप टियरचे दर मिळतील. सर्वांचे दर "जवळपास सारखेच" असतात कारण कर्ज देण्याचे क्षेत्र काँपिटिटीव आहे आणि टॉप टियरचे कर्ज फॅनी-मे कडून सुरक्षित असते, त्यामुळे जास्ती कटकट करून हातातले लोन का घालवा, असा विचार करून सर्व बँका safe-side बघतात. त्यामुळे तुम्हाला फरक जाणवत नाही किंवा कळून येत नाही. अर्थात टॉप टियर आहे म्हणून बँक नुकसानीत तुम्हाला कधीच कर्ज देणार नाही (म्हणजे मार्केट रेटपेक्षा स्वस्तात). बहुतेक फरक हा जंक फीज (ज्या लपलेल्या असतात) त्यातून होतो. क्रेडिट रेटिंग खराब असेल तर मात्र हा फरक जाणवण्याइतपत दिसून येतो, कारण बँकेला तुमचे कर्ज नंतर रेटिंगनुसार सेकंडरी मार्केटमध्ये विकायचे असते आणि ते बँकेसाठी अधिक फायद्याचे असते. त्यामुळे तिथे घासाघीस जास्त होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कर्ज घेणे फायदेशीर आहे की नाही यामध्ये चलनवाढीचाही विचार व्हावा. आज जो ईएमाय आवाक्याबाहेरचा वाटत आहे तो काही वर्षाने आवाक्यातला वाटू शकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

चलनवाढीची भिती असेल तर फिक्स दराचे कर्ज घेऊ शकता. जर भविष्यात प्राईम लेंडिंग रेट (पर्यायाने कर्जाचे दर) वाढले, तर तुमच्या दृष्टीने कर्ज स्वस्त आहे. जर प्राईम लेंडिंग रेट (पर्यायाने कर्जाचे दर) कमी झाले, तर रिफायनान्स करायचा पर्याय असतो.

रिफायनान्सचा खर्च करायचा नसेल तर दुसरा पर्याय म्हणजे व्हेरिएबल दराने कर्ज घेणे. अर्थात भविष्यात काय होणार ते सांगू शकत नाही, त्यामुळे ती रिस्क तुम्ही घेता. या कारणामुळे व्हेरिएबल दर साधारणतः फिक्स दरापेक्षा कमी असतात. (तुमचा मासिक हप्ता कमी असेल, त्यामुळे मोठे कर्ज मिळू शकते.)

तुम्ही म्हणता ते काही अंशी बरोबर आहे, कारण आत्ताचा मासिक हप्ता काही वर्षांनी लहान वाटतो, कारण तोपर्यंत उत्पन्न पण वाढते. माझ्या मते कॅश फ्लो बघणे पण जरुरीचे आहे. केवळ शून्य टक्के दराने व्याज मिळते, म्हणून ३-४ कर्जे घेतली तर व्याजापोटी खर्च नसेल, पण प्रत्येकाचा मिनिमम हप्ता भरता-भरता सगळे उत्पन्न खर्च होईल आणि खिशात खडखडाट, असे होऊ शकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगली माहिती. मात्र काही लहानसहान त्रुटी जाणवल्या.
- गुजराथी मारवाड्यांचं पाहून मराठी माणूस कर्ज घ्यायला लागला हे काही बरोबर वाटत नाही. कर्ज घेण्यासाठी एका नियमित उत्पन्नाची गरज असते, आणि व्याज परवडण्याजोगं असावं लागतं. म्हणजेच स्वतःची आर्थिक स्थिती आणि बाह्य कर्जरूपी पैशाची उपलब्धता या दोन्ही गोष्टी असाव्या लागतात. गेल्या काही दशकांत व्याजांचे दर मोठ्या प्रमाणावर खाली आले आहेत, आणि स्थिर नोकऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे.
- 'माझ्या मते कर्ज चांगले किंवा वाईट नसते. ते वाईटच असते कारण तुम्हाला त्याच्यावर व्याज द्यावे लागते. ' ही दोन वाक्यं परस्परविरोधी आहेत. कर्जासाठी व्याज द्यावं लागणं हे वाईट असेल तर राहण्यासाठी घरभाडं देणंही वाईटच का? थोडक्यात तुम्ही या आर्थिक बाबींकडे केवळ खर्च आणि त्यातून मिळणारे आर्थिक रिटर्न्स एवढंच पाहत आहात. ते कर्ज घेतल्यामुळे काही गोष्टींचा आनंद त्या कर्जाच्या काळापर्यंत घेता येतो त्याचा हिशोब कुठेच येत नाही. म्हणजे लोक कर्ज का घेतात याचा विचार न करता केवळ आकडेमोड करणं पुरेसं नाही.
- '401(k) मधून कर्ज काढू शकता, पण हे अतिशय धोक्याचे ठरू शकते.' हेही अर्धसत्य आहे. खरं तर इतर कोणी कर्ज देत नसताना स्वतःच्या सेव्हिंगचाच बॅंक म्हणून वापर करणं हा एक उत्कृष्ट पर्याय आहे. अवाच्या सवा कर्ज काढू नये, ४०१क ची गुंतवणुक संपवून टाकू नये हेही बरोबर आहे. पण त्यातला अल्पसा भाग कर्ज म्हणून घेतलं तर त्याचं व्याजही टॅक्सडिडक्टेबल होतं. म्हणजे थोडक्यात तुम्हाला कमी खर्चाने कर्ज मिळतं. आणि गुंतवणुक चक्रवाढीने वाढणार नाही हे तर ठीकच आहे, पण ते कर्ज घेण्याचा आत्ताचा जो फायदा होतो तोही जमेत धरला पाहिजे. (४०१क चे फंड्स जे लोक मॅनेज करतात त्यांनी पद्धतशीरपणे 'हे धोकादायक आहे' वगैरे सांगितलेलं आहे - ज्यात त्यांचा व्हेस्टेड इंटरेस्ट असतो.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१.

गुजराथी मारवाड्यांचं पाहून मराठी माणूस कर्ज घ्यायला लागला

वरील वाक्य असे वाचावे: याउलट गुजराथी, मारवाडी हे लोक बिनदिक्कत कर्ज घेतात, हे आपण बघितले आणि मराठी माणूस जसाजसा विचार करू लागला, तसातसा कर्जाबद्दलचा तिटकारा (taboo) कमी-कमी होऊ लागला.

२.

'माझ्या मते कर्ज चांगले किंवा वाईट नसते. ते वाईटच असते कारण तुम्हाला त्याच्यावर व्याज द्यावे लागते. ' ही दोन वाक्यं परस्परविरोधी आहेत

क्षमस्व. हे वाक्य स्वल्पविरामासहित असे वाचावे. माझ्या मते कर्ज चांगले किंवा वाईट नसते; ते वाईटच असते कारण तुम्हाला त्याच्यावर व्याज द्यावे लागते.
(स्वगतः ऐसीवर इतकी चिकित्सा होते, हे माहीत न्हवते. आंतरजालावर मी अजून सखोल अभ्यास करण्याची आवश्यकता आहे.)

राहण्यासाठी घरभाडं देणंही वाईटच का?

It depends. पुण्यात माझा एक्स-बॉस राहायचा त्या जागेची तेव्हा किंमत होती ५० लाख रुपये. मनात आणलं तर तो तशीच जागा रोख पैसे देऊन (कर्ज न घेता) विकत घेऊ शकत होता, पण तो घरभाडं भरत होता महिना १५ हजार रुपये. मी पण तेच केलं असतं.

३.
- ४०१(क) चे व्याज टॅक्सडिडक्टेबल नसते. टॅक्सडिडक्टेबल होण्यासाठी ते IRS च्या नियमानुसार जाहीर व्हावे लागते, म्हणून गृहकर्जावरील व्याज टॅक्सडिडक्टेबल असते, पण क्रेडिटकार्डावरील व्याज टॅक्सडिडक्टेबल नसते. तुमच्या माहितीत एखाद्या ४०१(क) चे व्याज टॅक्सडिडक्टेबल असेल, तर मला कल्पना नाही. (अधिक माहितीसाठी IRS section 72(p) बघावा).
- ४०१(क) चे कर्ज घेतले तर तुमचे pre-tax पैसे कर्ज म्हणून तुम्हाला मिळतील, पण ते फेडताना मुद्दल आणि व्याज हे after-tax पैशातून भरावे लागेल. नंतर जेव्हा ते पैसे ४०१(क) मधून विद्ड्रॉ कराल तेव्हा त्याच्यावर टॅक्स भरावा लागेल म्हणजे झाले डबल्-टॅक्सेशन. (Strictly speaking, this is not double taxation. If you didn’t borrow from the 401k plan but you borrowed from a bank, you’d have to pay the bank back with after-tax dollars as well. Instead of saying you will be double taxed, we should just say that a 401k loan is not tax deductible, plain and simple.)
- माझ्या कंपनीत (प्राइम + १) दराने मला ४०१(क) चे कर्ज मिळते आणि HELOC वर मला प्राइमने कर्ज मिळते, तर मी स्वस्तातलेच कर्ज घेईन. (शिवाय त्यात ४०१(क) च्या कर्जाचे इतर तोटे नाहीत जे लेखात लिहिले आहेत).
- उरता उरली आनंदाची बाबः ४०१(क) चा उद्देश आहे की निवृत्तीनंतरची सोय बघणे. आनंद हवा असेल, तर ४०१(क) चे कर्ज घेऊन ते फेडत बसण्यापेक्षा आयुष्यात मजा मारून दिवाळखोरी (bankruptcy) जाहीर करण्याचा सोपा मार्गही उपलब्ध आहे.

(४०१क चे फंड्स जे लोक मॅनेज करतात त्यांनी पद्धतशीरपणे 'हे धोकादायक आहे' वगैरे सांगितलेलं आहे - ज्यात त्यांचा व्हेस्टेड इंटरेस्ट असतो.)

४०१क फंड मॅनेजरचा मूळ उद्देश असतो Assets Under Management (AUM) वाढवणे, कारण फंडाचा एक्स्पेन्स रेशिओ हा संपूर्ण AUM वर लागू होतो ज्यातून त्यांना उत्पन्न मिळते. आपल्या फुटकळ व्याजामुळे त्यांना फारसा काही फरक पडत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मराठी माणूस विचार करू लागला यापेक्षा जसजशी मराठी माणसाची पत वाढली असं मी म्हणेन...

कर्ज वाईटच - हा युक्तिवाद चुकीचा वाटतो. कर्ज फायदेशीर, सोयीस्कर किंवा तोट्याचं असू शकतं.

४०१क चं व्याज टॅक्स डिडक्टिबल नसतं हे दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद.

'डबल टॅक्सेशन होतं' ही शुद्ध गंडवागंडवी आहे. पूर्वीच्या ४०१क बद्दलच्या लिटरेचरमध्ये हा युक्तिवाद दिसायचा. आता दिसत नाही. याचं कारण सोपं आहे - डबल टॅक्सेशन होत नाही. मी १००० रुपये कर्ज घेतलं, आणि दुसऱ्या दिवशी ते फेडून टाकलं. तर डबल टॅक्सेशन कुठून आलं? किंवा ४०१क मधून कर्ज घेतलं, आणि बॅंकेकडून कर्ज घेऊन ४०१क चं फेडून टाकलं, तर मी एक कर्ज फेडून दुसरं घेतलं. या उदाहरणात डबल टॅक्सेशन कुठे दिसतंय? तुम्हाला कदाचित व्याजाविषयी म्हणाायचं असेल... पण मुळात ४ टक्क्यांनी, हक्काने कर्ज मिळण्याची सोय आहे तेव्हा तिच्याकडे धोका म्हणून बघणं योग्य नाही इतकंच. माझं घराचं आणि गाडीचं कर्ज गळ्यापर्यंत होतं, त्यामुळे कुठचीच बॅंक कर्ज द्यायला तयार नव्हती. अशा वेळी ४०१क मधून त्यातले १०% कर्ज म्हणून घेणं खूपच सोयीचं झालं.

४०१क च्या मॅनेजर्सना तुमच्या व्याजाची पडलेली नसते, पण खूप लोकांनी त्यांच्या अकाउंटमधून १०-१५ टक्के मुद्दल कर्ज म्हणून काढून घेतले तर त्यांना मॅनेज करण्यासाठीची अमाउंट कमी होईल. त्यामुळे ते बोंबलून कर्ज काढणं कसं वाईट, जास्तीत जास्त कॉंट्रिब्यूशन करणं कसं चांगलं वगैरे सांगत असतात.

असो. लेखमाला चालू असू देत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

४०१क च्या मॅनेजर्सना तुमच्या व्याजाची पडलेली नसते, पण खूप लोकांनी त्यांच्या अकाउंटमधून १०-१५ टक्के मुद्दल कर्ज म्हणून काढून घेतले तर त्यांना मॅनेज करण्यासाठीची अमाउंट कमी होईल. त्यामुळे ते बोंबलून कर्ज काढणं कसं वाईट, जास्तीत जास्त कॉंट्रिब्यूशन करणं कसं चांगलं वगैरे सांगत असतात.

सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ४०१(क) मध्ये जास्तीत जास्त $५०,००० कर्ज घेता येते. (A participant loan must meet several rules under IRC Section 72(p) to prevent the law from treating it as a taxable distribution. The amount of the loan can't be more than 50% of the participant’s vested account balance up to a maximum of $50,000.)

तुमच्या कंपनीत ४०१(क) काढला म्हणजे कंपनी प्लॅन स्पॉन्सर असते. त्यांना ERISA चे नियम पाळावे लागतात. ते एक अ‍ॅडवायझरी कमिटी नेमतात. या कमिटीचा उद्देश म्हणजे कंपनीची फिड्यूशिअरी ड्यूटी पाळणे आणि तो प्लॅन पार्टिसिपंटच्याच फायद्यासाठी चालवणे. प्लॅनचे अ‍ॅसेट्स एका ट्रस्टमध्ये असतात आणि ते सांभाळायला रेकॉर्ड कीपर फंड कंपनी असते. कुठली फंड कंपनी निवडायची, कुठले फंड प्लॅनमध्ये द्यायचे, हे काम अ‍ॅडवायझरी कमिटी बघते. (माझ्या कंपनीत या वर्षी मी अ‍ॅडवायझरी कमिटीत होतो, म्हणून ही माहिती कळली). या सर्व प्रकारात निगोसिएशन्स प्रचंड चालतात, त्यापुढे ४०१क च्या लोन प्रोसेसिंगसाठी आम्ही $५० फी घेऊ, वगैरे प्रकार हसत-हसत माफ होतात. म्हणून म्हटले की ४०१क च्या लोनचे व्याज हा प्रकार फंड मॅनेजरसाठी अक्षरशः चिल्लर आहे.

माझ्या कंपनीत ४०१क प्लॅन अ‍ॅसेट्स १.६ बिलियन डॉलर आहेत आणि ७००० पार्टीसिपंट आहेत. आमच्या प्लॅनमध्ये सर्वात कमी एक्स्पेन्स रॅशिओ असलेला फंड आहे ५ बेसिस पॉइंट (म्हणजे एक्स्पेन्स रॅशिओ = ०.०५%; १०० बेसिस पॉइंट म्हणजे १%). प्रत्यक्षात खूप कमी लोक ४०१क मधून कर्ज घेतात. पण आपण समजू निम्मे लोक म्हणजे ३,५०० लोकांनी कर्ज घेतले आहे आणि ते पण मॅक्झिमम प्रत्येकी $५०,०००. म्हणजे झाले १७५ मिलिअन मॅक्स कर्ज (३,५०० गुणिले $५०,००० प्रमाणे). आता ५ बेसिस पॉइंटने फंड कंपनीला १७५ मिलिअनवर मिळाले असते $८७,५००, जे लोकांनी कर्ज घेतल्यामुळे मिळणार नाहीत. ही रक्कम रेकॉर्ड कीपर (फंड कंपनी)च्या दृष्टीने चिल्लर आहे, यात एका अ‍ॅनालिस्टचा पगार पण येणार नाही. फंड कंपनीचा इंटरेस्ट असतो: १.६ बिलियन डॉलरवर ५ बेसिस पॉइंटने त्यांना मिळतात $८००,००० प्रत्यक्षात बरेचसे पैसे अजूनही महागड्या फंडांमध्ये लोकांनी गुंतवलेले असतात, ज्याच्यामुळे त्यांना मिलियन्सची फी मिळते. तो खरा त्यांचा फायदा.

टीपः १. तुमच्या कंपनीचा ४०१क किती चांगला आहे ते बघण्यासाठी ही वेबसाइट बघता येईल.
२. तुमच्या कंपनीच्या ४०१क चे नियम जाणून घेण्यासाठी Summary Plan Description (SPD) वाचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतर अनेक फंडांचे खर्च ५ बेसिस पॉइंटपेक्षा कितीतरी जास्त असतात... कमीतकमी खर्चाचे फंड बहुतेक वेळा इंडेक्स फंड असतात, त्यांना अनालिटिकल पॉवर फारच थोडी लागते. असो.

१७५ मिलिअनवर मिळाले असते $८७,५००

पण १.६ बिलियनमधले १७५ मिलियन गेले तर त्यांना ११% कमी मिळतात! तेव्हा ८७,५०० हा निश्चितच लहान आकडा नाही, कारण त्यांना त्या १.६ बिलियनमधून फक्त ८००,००० मिळतात.

मी जर ४०१ क फंड मॅनेजर असेन तर निश्चितच 'लोकहो, फंडातून पैसे काढू नका. जास्तीत जास्त गुंतवा. तुम्हाला कल्पना नाही क्यवढा मोठ्ठा तोटा होतो ते...' असं पटवण्याचा प्रयत्न करेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही फक्त वादासाठी वाद घालताय का? ४०१क कसा चालवायचा ते प्लॅन स्पॉन्सर ठरवतो, ते फंड मॅनेजरचे काम नाही.
१७५ मिलियन कर्ज आणि $८७,५०० व्याज हा worst-case scenario आहे. प्रत्यक्षात ते खूप कमी असणार. एका व्यक्तीच्या $५०,००० कर्ज गुणिले ०.०५% = $२५ डॉलरसाठी फंड मॅनेजर इतकी डोकेफोड करेल का? पुढच्या वर्षीपासून ४०१क चे स्टेटमेंट नीट वाचले तर त्यात तुम्ही अ‍ॅड्मिनिस्ट्रेशनसाठी किती पैसे स्वत:च्या खिशातून फंड मॅनेजरला देता, ते स्पष्ट कळेल, जे थेट त्यांच्या खिशात जातात (इतके दिवस या फीज लपलेल्या असायच्या). फंड मॅनेजर या हमखास फीजसाठी कष्ट करेल की त्याच्यासाठी not guaranteed, फुटकळ $८७,५०० साठी कष्ट करेल?

शिवाय इतर म्यचुअल फंड त्यांच्या एक्स्पेन्स रेशिओमधून रेकॉर्ड कीपरला (फंड मॅनेजर कंपनीला) किकबॅक देतात, हे तुम्हाला माहितच असेल. तो पण फंड मॅनेजरसाठी उत्पन्नाचा प्रकार असतो. (आता आम्ही ती १००% किकबॅक प्लॅनला परत मिळेल असा क्लॉज टाकला आहे.) Fund managers have bigger fish to fry than worry about loan fees or lost income on loans.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वादासाठी वाद नाही, मी जेन्युइन शंका विचारली होती. ४०१ क बाबत जे सल्ले फिडेलिटी वगैरेंकडून येतात त्यात प्रामुख्याने
- तुम्हाला वाटतं त्यापेक्षा जास्त पैसे रिटायरमेंटसाठी लागतील.
- ४०१ क मधून कर्ज काढणं कसं तोट्याचं आहे
हे दोन मुद्दे वारंवार दिसलेले आहेत. आणि त्यातही 'डबल टॅक्सेशन' वगैरे ठार चुकीचे मुद्दे दिलेले दिसायचे. त्यामुळे संशय आला होता. फंड मॅनेजर्सचं उत्पन्न त्यांच्या हाती असलेल्या फंड्सशी समानुपाती असेल असं एक ढोबळ गृहितकही घेतलं.

असो. तुम्ही एकंदरीत चांगली माहिती देत आहात. लिहीत रहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे सर्व अज्जिबात माहीत नव्हतं. मला आवडली ही माहीती, धन्यवाद उदय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वरील वाक्य असे वाचावे: याउलट गुजराथी, मारवाडी हे लोक बिनदिक्कत कर्ज घेतात, हे आपण बघितले आणि मराठी माणूस जसाजसा विचार करू लागला, तसातसा कर्जाबद्दलचा तिटकारा (taboo) कमी-कमी होऊ लागला

तसे नसावे
पूर्वी नोकरदार माणसाला कर्जे मिळणेच कठीण होते. तुम्ही बॅकांमध्ये कामाला असाल तर सहज कर्ज मिळे अन्यथा खूप तापही असे आणि व्याजदरही जास्त होता.
अर्थव्यवस्था जसजशी ओपन होऊ लागली तसतसे दरही कमी झाले, कर्ज मिळणे सुकर होऊ लागले.

मराठी जनतेत नोकरदार कर्ज घेऊ शकत नसत ते त्यामुळे. महाराष्ट्रात स्थायिक झालेले गुजराती, मारवाडी हे सहसा व्यापारी असल्याने त्यांना अ‍ॅसेट्स तारण ठेवणे तुलनेने सोपे होते, त्यामुळे ते अधिक कर्ज घेताना दिसत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

चुकीच्या जागेवरील प्रतिसाद काढला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचे, सविताचे आर्थिक शहाणपणाचे धागे आमच्यासारख्या नवख्यांना उपयुक्त ठरतील ह्यात शंका नाही.
निदान काही मुद्द्यांचे थेट उत्तर मिळाले नाही तरी हिट्स मिलतील, विचारांची दिशा मिळेल असे वाटते.
इकॉनॉमिक टाइम्समधील लहान लहान टिप्स मला कामाच्या वाटतात.
(अर्थात हे पिंच ऑफ सॉल्ट घ्यावे हे वेगळे सांगणे नलगे.)
आर्ह्तिक बाबींचे संकलन एकत्र रहावे म्हणून मला आवडलेल्या काही टिप्स इथे देत आहे. (गृह कर्जाशी संबंधित नसले तरी.)

http://economictimes.indiatimes.com/wealth/insurance/analysis/five-wrong...

DNA मध्ये दोनेक वर्षापूर्वी दररोज सदर येत असे अपनापैसा डॉट कॉमच्या हर्ष रुंगठा ह्यांचे.
तेही आम आदमीच्या नजरेतून व नवख्यांसाठी कामाचे वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

काही लोकांना डोक्यावर कर्ज नसेल तर ते फार अस्वस्थ होतात. आपली कर्तबगारी लयाला चालली आहे की काय असे वाटायला लागते. आपण त्या अल्पसंतुष्टी माणसांच्या पंगतीत तर जात नाही ना? अशी शंका त्यांना यायला लागते. डोक्यावर कर्ज असले की कस बर असतय. कर्ज फेडण्यासाठी का होईना पैशे कमवायची प्रेरणा जागृत रहाते. अर्थात काही लोक कर्ज हे फेडण्यासाठी नाही तर बुडवण्यासाठी काढतात हा भाग अलाहिदा. मी तर अस ऐकून आहे की कर्ज कसे बुडवावे याचा सल्ला काही गुंतवणुक सल्लागार फार अभ्यासपुर्ण देतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/