टेक्निकल रायटींगबद्द्ल माहिती हवी आहे.

' Technical writing / instructional designing ' या क्षेत्राबद्द्ल माहिती हवी आहे.

(१) या क्षेत्रातले नोकर्‍यांचे तसेच फ्रीलान्सिंग कामाचे स्वरुप, संधी याबद्द्ल माहिती हवीय.

(२) या क्षेत्रात कामासाठी स्वत:ला तयार करायचे असेल तर कोणती कौशल्ये शिकायला हवीत?आणि कशी?

(३) टेक्निकल रायटिंग (नुसतं software Tools नव्हेत तर content generation) चे प्रशिक्षण देणार्‍या चांगल्या संस्था कुठ्ल्या? यातले online courses करायचे असल्यास कोणत्या संस्थेचे करावेत?

आंतरजालावरून शोधलेल्या काही संस्था म्हणजे TECHTOTAL ,TWB , TECHNOWRITES आणि ibruk.
यापैकी ibruk मुंबईत असल्याने जवळ. पण पुण्याच्या TECHNOWRITES मध्ये कोर्सेसची विविधता दिसून येते.
(lionbridge या संस्थेने काही वर्षांपूर्वी एक छोट्या कालावधीचा अभ्यासक्रम झेवियर्स मध्ये घेतला होता असं आठवतय.)

तसंच कुठल्या प्रसिध्द नसलेल्या पण चांगल्या संस्था आहेत का?
कृपया, या क्षेत्रातल्या जाणकारांनी/अनुभवी व्यक्तीनी मार्गदर्शन करावे.

Instructional designing बद्द्ल
(१) ह्या क्षेत्राच्या वाढीस खुप वाव आहे असं म्ह्टलं जातं. पण शालेय अभ्यासक्रम शिकवणारे विडियोज पाहिले तर त्यात कल्पकता, विषय उलगडून सांगणे, concept स्पष्ट करणॆ या गोष्टी नावालाही दिसून येत नाहीत.
(२) corporate training साठी ह्या प्रकारचे मटेरिअल (वेब बेस्ड, CD वगैरे) तयार केले जाते का? त्याचे प्रमाण किती आहे?

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

अंतरानंदा माफ करा, मला टेक्निकल रायटींग बद्दल विशेष माहीती नाही. पण हा धागा टेक्निकल असल्याने, माझ्या आय टी (डेव्हलपमेन्ट क्षेत्रातील एका मुद्द्याबद्दल मी एक लेख लिहीला होता. लेख सो सो च आहे. अवांतरही आहे. तो इथे टाकून देते आहे.) ज्यांना या विषयावर माहीती असेल त्यांनी आपापले विचार जरुर मांडावेत.

अजून एक - अंतरानंदा, जर धागा हायजॅक होत आहे असे आपल्याला वाटले तर मी हा प्रतिसाद उडवेन (वेळ पडल्यास समं ना विनंती करुन) Smile

___________________________

अॅजाइल नावाच्या संगणकीय विकसन पद्धतीने, संगणकीय विकसन (सॉफ्ट्वेअर डेव्हलप्मेन्ट) क्षेत्रात एक वेगळच वारं नक्कीच आणलं. बहुसंख्य कंपनींमध्ये यापूर्वी जी वॉटरफॉल पद्धत वापरली जात असे, ती जाऊन अनेक कंपनींनी अॅजाइल पद्धत स्वीकारली, अनेक कंपन्या ही पद्धत स्वीकारत आहेत.
२००१ साली ११ ते १३ फेब्रुवारी या काळाच्या दरम्यान, युटाह च्या वॉसॅक पर्वतावरील स्नोबोर्ड रिसॉर्टच्या लॉजमध्ये १७ मित्र जमले होते.गप्पाटप्पा, खाणेपीणे, आराम व स्कीईंग आदिंव्यतिरीक्त एक सुप्त महत्त्वाकांक्षेने प्रेरीत झाले होते हे लोक. काय होती ती महत्त्वाकांक्षा? सर्वानुमते, सामायिकरीत्या अवलंबता येणारी नवीन संगणकीय विकसन कार्यपद्धती शोधून त्यावर चर्चा करुन ती फायनल करायचा घाट होता. इतके सारे ऑर्गनायझेशनल अॅनर्किस्ट (संगणक संस्थांशी संबंधित क्रांतीकारक) इतिहासात कदाचित प्रथमच एकत्र आले असावेत. अॅलिस्ट्र कॉकबर्न यांचेप्रमाणेच अनेकांचे हेच मत होते की या भेटीतून डोंगर पोखरुन उंदीर निघाला तरी पावले. परंतु नियतीला काही वेगळेच मंजूर होते. एका विलक्षण घटनेचा उदय या भेटीच्या गर्भी दडला होता अन ती घटना होती -अॅजाइल नावाच्या कार्यपद्धतीच्या घोषणापत्राची निर्मीती. जेव्हा या घोषणापत्राचा अंतिम मसुदा लिहीला गेला तेव्हा इतिहासात नोंद व्हावी असा तो क्षण होता. कारण आतापर्यंतच्या वॉटरफॉल विकसनपद्धतीहून अगदी वेगळी अशी अॅजाइल विकसनपद्धत संगणक क्षेत्राला मिळाली होती.
प्रथम पाहू वॉटरफॉल पद्धतीची सूत्रे - बिंदू अ कडून बिंदू फ कडे जाणारी सरळ-रेषीय पद्धत अशी ही कार्यपद्धती असून वाटेत पाण्याच्या जणू एखाद्या ओढ्याप्रमाणे, ही पद्धत अ-ब-क-ड-इ-फ असे विविध बिंदू एकदाच आणि एकदाच स्पर्श करत जाते. काय आहेत हे मध्यंतर बिंदू?
(१) Conception(कल्पनेचा उगम)
(२) Requirement (अपेक्षा)
(३) Analysis (विश्लेषण)
(४) Design(संरचना)
(५) Construction(बांधणी)
(६) Verification(चाचणी)
(७) Implementation(पूर्णत्व)
(८) Maintainance(अनुरक्षण)
वॉटरफॉल कार्यपद्धतीमध्ये,प्रत्येक टप्पा एकदा आणि एकदाच स्पर्शिला जातो, एकदा ओलांडला की पुन्हा मागे वळणे नाही.
वॉटरफॉल पद्धतीचा एक फायदा हा की, बांधणीकार (Developers) व ग्राहक यांना काय उत्पादन तयार होणार याची प्रथमपासूनच, पूर्ण कल्पना असल्याने, नियोजन व संरचना रोखठोक असतात. प्रकल्पाचा वाव (Scope) प्रथमपासूनच ठरलेला असल्या कारणाने,प्रकल्पाच्या प्रगतीचा वेग मोजणे, सहजसाध्य असते. काही फक्त पुनरावलोकने (Review) व संमती (approvals )करता ग्राहकानुमती लागते बाकी संघ, स्वतंत्र रीत्या काम करुन प्रकल्प पूर्ण करतो. तसेच संरचना विशिष्ठ टप्प्यात पार पडल्यामुळे अनेक तुकड्यांचे कोडींग, समांतर रीत्या करता येते.
मुख्य तोटा हाच की सगळा प्रकल्प झाल्यावर, प्रकल्प मनाजोगता झालेला नाही असे ग्राहाकास असे वाटू शकते अन तेव्हा बराच उशीर झालेला असतो.

याउलट अॅजाइल पद्धतीमध्ये, "संरचना" हा टप्पा अनेक लहान, साध्य एककामध्ये विभागला जातो. रचनाकार या लहान एककावर काम करतात. अत्यंत लवचिक अशी ही पद्धत आहेच कारण वेळोवेळी ग्राहकाचे मत विचारात घेतले जाते, ग्राहकाच्या प्रतिसादानुरुप, जर अपेक्षा (Requirement) बदलल्या तर, रचना बदलून, तिच्यात आवश्यक ती सुधारणा करुन, पुन्हा काम सुरु करता येते. अर्थात कार्यपद्धतीच्या अंगभूत लवचिकतेमुळे, अपेक्षांमधील बदल लवकरात लवकर राबवून, प्रकल्पाचे तारु नवीन दिशेस सहज वळविता येते. तसेच अजून एक फायदा हाच की, वेळोवेळी ग्राहकाचा सहभाग असल्या कारणाने, सगळा प्रकल्प झाल्यावर, प्रकल्प मनाजोगता झालेला नाही असे ग्राहाकास वाटू शकण्याची शक्यता खूपच मोठ्या प्रमाणात कमी होते.

आता व्यवहारात ही पद्धत कशी राबविली जाते त्याचा थोडक्यात वृत्तांत - कंपनीनुरुप थोडाफार बदल घडू शकतो पण साधारण मूळ साचा हाच. -
प्रकल्प सुरु झाला की २-२ आठवड्याच्या भागांत तो विभागला जातो. या सप्ताहद्वयीस अॅजाइलच्या भाषेत, स्क्रम असे म्हणतात. त्या त्या स्क्रममध्ये अपेक्षांचे एकक विभागलेले असते. प्रत्येक स्क्रमच्या सुरवातीला, या अपेक्षा-एककांचा रिव्ह्यू होतो, त्यावर चर्चा घडते. अन मग सुरुवात होते संरचनेला. संरचनेचे ठराविक, लहानसे एकक पूर्ण झाले की डेमॉन्स्ट्रेशन (वस्तुपाठ) व यशस्वी चाचणी होते. ग्राहक व टीम दोन्ही वस्तुपाठामध्ये अंतर्भूत होतात. एकदा, सर्वानुमते यशस्वी ठरले की, उत्पादन या लहान एकक सुधारणेसहीत शिपेबल (अर्थात पूर्ण) होते.
प्रत्येक स्प्रिंट्मध्ये, सकाळी संघ सदस्यांचे चे १५ मिनीटांचे लहानसे "हडल (एकत्र जमणे)" असते. प्रत्येक सदस्य पुढील ३ गोष्टी या हडलमध्ये नमूद करतो - (१) त्याने आदल्या दिवशी काय काम केले (२) आज कोणत्या टास्क वरती तो काम करणार आहे (३)कामात काही समस्या असल्यास त्या कोणत्या.
अशा रीतीने सकाळी प्रत्येकाला त्याचा दिनक्रम माहीत होतो. तसेच प्रत्येक सदस्याचा टास्क हा बोर्डावर "टू डू" भागात लिहीला जातो. जेव्हा टास्क संपतो तेव्हा हाच टास्क "डन" भागात हलवला जातो.
अॅजाइल कार्यपद्धतीमध्ये, दस्त-ऐवज तसेच इमेल्स यांपेक्षा जास्त भर असतो तो आमने सामने संवादावर. फोन करा, मेसेंजर वर संपर्क साधा पण इमेल्स टाळा अशी निकाल-प्रवण पद्धत अॅजाइल पद्धत असल्याने कामे पटापट मार्गी लागतात.
आणखी एक संकल्पना आहे "स्वार्मिंग" म्हणजे एखाद्याच टास्क वरती जास्तीत जास्त (शक्यतो सर्व) सदस्यांनी काम करुन तो टास्क पूर्ण करणे/ यशस्वी
करणे.
प्रत्येक स्प्रिंटनंतर त्या त्या स्प्रिंटचे सिंहावलोकन हा देखील महत्त्वाचा टप्पा असतो. त्यात प्रत्येक सदस्य कागदी चिठ्ठीवर पुढील काही गोष्टी नमूद करतो - झालेल्या स्प्रिंटमध्ये,
(१) कोणत्यी गोष्टी यशस्वी झाल्या (Continue doing)
(२) कोणत्या गोष्टींमध्ये सुधारणा हवी (start doing)
(३) कोणते बदल सुचवू इच्छिता (stop doing)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0