हुशार दिसण्यासाठी काय कराल?
आत्तापर्यंत बहुतेक लोकांचा असा समज होता की हुशार दिसण्यासाठी चष्मा वापरणं अत्यावश्यक आहे. यामुळे सुंदर आणि हुशार दोन्ही एकाच वेळी दिसू पाहणाऱ्या स्त्रियांची अडचण होत होती, अशी आमची व्यक्तिगत तक्रार आहे. चष्म्याशिवाय आपल्याकडे कोण पाहतंय ते दिसत नाही आणि चष्मा घातला तर कोणीच पाहत नाही अशी ही 'ग्यान'बाची मेख आहे. शिवाय आम्ही हुशार, आमच्यावर सरस्वती प्रसन्न त्यामुळे लक्ष्मी काय आमच्या वाट्याला फारशी येत नाही. (हा कार्यकारणभाव आपणच जोडून सोयीस्कररित्या संस्कृती स्वीकारायची. किंवा आपण म्हणू ती संस्कृती - मेघना आणि ऋ) तर अडचण अशी होते की मग कॉण्टॅक्ट लेन्सेस वापरण्याचा पर्याय फारसा सोयीचा असत नाही. हुशार दिसू पाहणाऱ्या लोकांच्या परंपरेनुसार वेंधळ्या असणाऱ्यांनाही लेन्सेस घालता येत नाहीत; मोडकी का होईना, दृष्टी असणं महत्त्वाचं.
तर अश्या प्रकारच्या लोकसमजुतींमध्ये किती तथ्य आहे हे शोधण्याचा निर्णय आम्ही* घेतला. एकेकाळी सिद्ध न करता येणाऱ्या गोष्टींबद्दल बोलताना गणिती, तत्त्वज्ञ लोक "हे तर सगळ्यांना माहित आहेच" असं म्हणून सिद्ध करण्याची जबाबदारी झटकून मोकळे व्हायचे. पण आता चांगले दिवस आले आहेत, गणित, विज्ञानाला हो! त्यामुळे सगळं सिद्ध करावं लागतं. म्हणून आम्ही* काही लोकांचे चष्मावाले आणि बिनचष्म्याचे फोटो अनेक लोकांना दाखवले आणि या दोन फोटोंमध्ये कोण जास्त हुशार दिसतं असा प्रश्न विचारला. या विदेतून असा निष्कर्ष निघाला की चष्मा असण्या-नसण्यामुळे व्यक्ती हुशार दिसतेच असं नाही. ५२% लोकांच्या मते सूर्यप्रकाशात पाहिल्यावर चष्मा घालणारे लोक हुशार दिसतात तर ५३% लोकांच्या मते कृत्रिम उजेडात चष्मा न घालणारे लोक हुशार दिसतात. या दिसण्यामागचा सांस्कृतिक संदर्भ घालवण्यासाठी आम्ही ३७ निरनिराळ्या संस्कृतीमधल्या लोकांची मतं मागवली होती. त्यामुळे चष्मा वापरण्याची संस्कृती असणं किंवा या संस्कृतीला परकी समजण्याचा बायस आमच्या विदेत नाही.
काय केल्यामुळे हुशार दिसू यासाठी आम्ही निरनिराळे प्रयोग केले. पण सध्या एकमेव ट्रेंड आहे. तब्बल ७५% लोकांच्या मते ICHR चे, 'लोकनिर्वचित' प्रमुख वाय. सुदर्शन राव यांच्या शेजारी माणूस उभा राहिल्यास हुशार दिसतो. या आकड्यात नैसर्गिक आणि कृत्रिम उजेड असा काही फरक पडत नाही. खात्री करून घेण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या वयोगटाच्या आणि चष्मा लावण्याबद्दल साशंक असणाऱ्या नियंत्रित गटालाही प्रश्न विचारून आमच्या विदेच्या अस्सलपणाची खात्री करून घेतली आहे.
लोकांना हुशार दिसण्याचा सोस असणं काही नवीन नाही. आणि दस्तुरखुद्द आम्हीही त्याला अपवाद नाही. लोकांची हुशार दिसण्याची गरज पूर्ण करण्यासाठी बाजारात वाय. सुदर्शन राव यांचे लाईफसाईज किंवा कमी आकाराचे बाहुले आणावेत अशी आमची योजना आहे. आम्ही या प्रकल्पासाठी व्ही.सी. (venture capitalist) शोधत आहोत. वाचकांनी मोठ्या प्रमाणावर आमच्या प्रपोजलास उचलून धरल्यास आम्ही लोकशाही पद्धतीने व्ही.सी. शोधण्याचा कायदेशीर प्रयत्न करू याची हमी देतो.
*आम्ही म्हणजे खरंतर बोरोविट्झने घेतला. आम्ही त्याचे आजन्म ऋणी असू.
प्रतिक्रिया
:-D
रिक पेरीऐवजी मी सारा
रिक पेरीऐवजी मी सारा पेलीनबरोबर उभा राहिलो तर चालेल काय?
कुठे रहाता त्यावर अवलंबून
कुठे रहाता त्यावर अवलंबून अाहे. अमेरीकेत असाल तर पेरी सोयीचा, रश्यात राहत असाल तर पेलिन.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
रिक पेरी आणि साराह मामींच्या
रिक पेरी आणि साराह मामींच्या मधोमध उभे रहा व पाठीमागे बुश काकांना हुभे करा.
™ ग्रेटथिंकर™
हिंदी सिनेमा
हिंदी सिनेमांत तरी, हिरो/हिरवीण हुशार दाखवायचे असल्यास त्यांना चष्मा घालण्यात येतो. विशेषतः जितेंद्र्,धर्मेंद्र हे जर हुशार वाटावे असे दिग्दर्शकाला वाटत असेल तर त्यांना चष्मा घालण्यात येतो. शिक्षक, प्रोफेसर म्हणजे चष्मा हवाच. त्याने दुहेरी फायदा होतो. चष्मा सांभाळताना त्यांच्या 'जंपिंग जॅक' हालचालींवरही आपोआप मर्यादा येतात.
प्रत्यक्ष व्यवहारांत मात्र, ज्यांना ज्यांना आपण विचारवंत आहोत असे ठामपणे वाटत असते, ते सगळे दाढी वाढवतात.
हुशार दिसण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे, चेहेर्यावर कायम मंदस्मित ठेवावे. पण ते 'मंद' या अर्थाने नव्हे, नाहीतर तुम्ही, रामानंद सागर यांच्या रामायणातल्या रामासारखे दिसाल.
पर्याय उपलब्ध नाही!
दाढी वाढवायचा पर्याय आम्हाला उपलब्ध नाही काय करावे?
मूळात धाग्यात सुंदर आणि हुशार दिसण्यास हमखास उपयुक्तं अश्या चष्म्याचा धागाकर्तीच्या मते उपयोग होत नाही हा मुद्दा घेतलेला असताना तुम्ही वर दाढी वाढवा सांगताय.
म्हणजे अक्षरशः पुन्हा दाढी न करता झालेल्या जखमेवर मीठ चोळताय.
आणि तरिही लोक तुम्हाला मार्मिक श्रेणी देतायत हा हुशार आणि सुंदर दिसू पहाणार्या ५०% जनतेचा घोर अपमान आहे.
+१
या निषेधाशी सहमत होण्यावाचून पर्याय नाही.
जेएनयूवाल्या, डाव्या विचारसरणीच्या, उदारमतवादी बायका मोठी, स्टीरीओटिपिकल टिकली लावतात. त्यातून आपण बंगाली नाही म्हणजे ही आपली परंपरा नाही. आपण मोठी टिकली लावून फिरू या.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
अतिशय सहमत! फक्त टिकली गोलच
अतिशय सहमत! फक्त टिकली गोलच असावी. उभी असल्यास हिंदी सिरेलीतली खलनायिका आणि आडवी लावल्यास गावाकल्डी प्रेमळ आज्जी वाटू शकता.
:)
झकास.
मर्म पोचलं!
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
हुशारी - काही उपाय.
हुशार दिसण्याचा सोप्पा उपाय म्हणजे "स्पेस सायन्स" बद्दल बोलणे. दुराभिमानी भारतीय भारताच्या गर्वस्थलांची लिस्ट स्पॅम मारतात त्यात टिपिकली एक वाक्य असते - "ढिमकाने ढिमकाने टक्के नासाचे शास्त्रज्ञ भारतीय आहेत." वास्तविक यांच्या पाट्या टाकण्यात नि मिडल इस्ट मधे ऑयल एक्सप्लोरेशन करण्यात काहीच फरक नाही. उलट मिडल इस्ट मधले काम फार कमी बजेट मधे नि कमी रिडंडन्सीजमधे नि जास्त रिस्क घेऊन, जास्त डोके लावून करावे लागते. पण त्या गरीब बिचार्या मिडल इस्ट वाल्यांना काही प्रतिष्ठा नाही.
अजूनही एक मार्ग आहे. तो म्हणजे उत्क्रांतीचा. म्हणजे चर्चेत फटकन स्पेस सायन्स आणणे कठिण असते. पण उत्क्रांतीची व्याप्ती अनिर्बंध आहे. अगदी कुणी हॅलो हॅलो केले कि "Do you know why we are evolved to hail each other in this fashion ...?" असे चालू करावे. एक मिनिटात हुशारीचे प्रमाणपत्र हातात.
आता इतके पुरे नाही ठरले तर सर्वात सोपा उपाय. रामबाण. इतर सर्वाना मूर्ख मानणे. असे केल्यावर आपल्याला हुशार होण्यापासून काहीही परावृत्त करू शकत नाही.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
=))
लेख आवडला, तितकीच प्रतिक्रियासुद्धा आवडली.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
हेच म्हणतो. लेख आणि
हेच म्हणतो. लेख आणि अरूणरावांची प्रतिक्रिया __/\__
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
लेख अन हा प्रतिसाद, दोन्ही
लेख अन हा प्रतिसाद, दोन्ही धन्य _/\_
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
(No subject)
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
अगम्य इंग्रजी बोलणे हा हुशार
अगम्य इंग्रजी बोलणे हा हुशार दिसण्याचा राजमार्ग आहे-स्वामीग्रेटथिंकरानंद
(उपरोक्त सुविचार भारतीय उपखंडातच लागू होऊ शकतो.)
™ ग्रेटथिंकर™
हे अगदी मान्य. हल्लीच्या
हे अगदी मान्य.
हल्लीच्या इंग्रजी शाळा या अशाच अगम्य इंग्रजी बोलायला शिकवत असल्याने, वर्षाच्या सुरूवातीला, आपली अपत्ये हुशार 'दिसावीत' यासाठी कित्येक पालक सकाळी सकाळी त्या शाळांच्या फॉर्मच्या रांगेत दिसले होते.
काल शाळेसाठी वर्षाला ५ लाख भरण्याची जाहिरात करण्याची सवय असलेल्या एका शेजार्याच्या मुलाला त्याच्या थोर्थोर आईच्या सल्ल्याने These are a cats लिहिताना पाहिले. त्या तै (त्याची आई) सुद्धा तितक्याच "चांगल्या" म्हणवल्या जाणार्या शाळेत शिक्षिका आहेत हे लक्षात घेता या शाळांच्या चांगुलपणाची खात्रीच पटली
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
कहर मार्मिक!
कहर मार्मिक!
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
"It is better to keep your
"It is better to keep your mouth closed and let people think you are a fool than to open it and remove all doubt." - Mark Twain
हुस्शार दिसायला हवा असला, तर
हुस्शार दिसायला हवा असला, तर मी आरशात पहातो. मला एक दिसतो.
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
कुठे खरीदला आरसा?
कुठे खरीदला आरसा?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
किंवा
किंवा किती चढवल्यावर असे वाटण्याची शक्यता आहे; आम्हालाही मार्गदर्शन करा
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
Mirror of Erised
'हॅरी पॉटर'मधला Mirror of Erised आठवला
नाही हो,
त्या एरिसेडच्या आरशात आपल्याला हवे ते दिसते.
माझं वेग्ळंय. मी तसा लहानपणापासूनच हुशार आहे किनै?
म्हणून तसाच दिसतो अजूनही.
मग आरसा कोणताही असो
स्वगतः काय दिवस आलेत.. भल्याभल्यांना सगळं विस्कटून सांगायला लागतं आजकाल.
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
निषेध!
वाय. (आणि झेड सुद्धा) सुदर्शन राव ह्यांच्याबद्दल २५% लोकांचं अनूकूल मत असल्याचं लिहिल्याबद्दल निषेध.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
दीड महिन्यापूर्वी भाजप्ला
दीड महिन्यापूर्वी भाजप्ला ३०%पेक्षा जास्त मतं मिळाली याचा विचार करता तुम्ही खरंतर माझ्या नावाचे फ्लेक्स लावायला हवेत. पण आपली विचारसरणी मोनोलिथिक नाही ना; विचार करा आपली एक व्होटबँक बनली तर काय होईल.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
असं म्हणा!
नुसतं बाजूला उभे न रहाता
'इंडियन स्पेस प्रोग्राम इज परफेक्ट एक्झाम्पल ऑफ माय विजन ऑफ मॉडर्न इंडिया ' असे म्हणावे
ख्खिक्क!
तुमचा कडवेपणा वाढू लागलेला दिसतोय.
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-