भाग १ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७| ८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, ऐसी अक्षरेवर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी बातमी नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं.
तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.
आधीच्या धाग्यात १५०+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.
==============
भारतीय ऑलिंपिक समितीला नव्या निवडणुकींनंतर पुन्हा जागतिक ऑलिंपिक समितीने मान्यता दिली. आता भारतासाठी यंदाचे हिवाळी ऑलिंपिक हुकले तरी येते समर ऑलिंपिकचे रस्ते पुन्हा उघडले आहेत
वेंडी डॉनिजर यांचे हिंदूंवरचे पुस्तक भारतात अनुपलब्ध
पेंग्विननं वेंडी डॉनिजर यांचं 'द हिंदूज' हे पुस्तक भारतातून काढून घेतलं आहे.
अरे देवा. हिंदू देवदेवतांचं
अरे देवा. हिंदू देवदेवतांचं फ्रॉइडियन सायको-काहीतरी-काहीतरी करणारं पुस्तक! वर त्यात यादी करण्याइतक्या फॅक्च्युअल चुका. सकृद्दर्शनी एका बेकार पुस्तकाला सेन्सॉरशिपचं वलय मिळाल्यासारखं वाटतं. (हे मत पुस्तक न वाचता, केवळ ही बातमी वाचून तयार केलेलं आहे. तेव्हा ते तितक्याच गंभीरपणे घ्यावं).
त्या बाईंना हे पुस्तक लिहिण्यासाठी कुठच्या संस्थेने मदत केली होती का?
फेसबुक कृपा - हेच पुस्तक
फेसबुक कृपा - हेच पुस्तक डाऊनलोड करता येईल असं दिसतंय. चक्क चक्क ही फाईल उघडली आणि त्यात मजकूर दिसतो आहे.
दुसऱ्या बाजूला, अभिव्यक्तीस्वातंत्र्य किती ताणता येईल हे दिसेल, अशी एक बातमी कालच वाचनात आली. 'Dumb Starbucks': comedian Nathan Fielder reveals he set up parody store
अपडेट - फार काळ हे दुकान चाललं नाही.
'Dumb Starbucks' Closed By Health Department Officials
पुस्तक सेन्सॉर केले गेले
पुस्तक सेन्सॉर केले गेले नाही. म्हणजे कुठल्याही कोर्टाचा असा निर्णय नाही. एका संस्थेच्या लीगल नोटिस ला उत्तर म्हणून प्रकाशकानेच ते मागे घेऊन त्याच्या प्रती नष्ट करण्याचे कबूल केले आहे. पुस्तक आता विकत घेता येणार नाही. पण ते वाचण्यास इच्छुक असल्यांना ते इथून उतरवून घेता येईल. इथे ही उपलब्ध आहे.
ही याचिका भरणारी संस्था "शिक्षा बचाओ आंदोलन", व याचिका त्यांच्या वेब्साइट वर आहे:
वेंडी आणि तिच्या विध्यार्थी
वेंडी आणि तिच्या विध्यार्थी यांच्या एकंदरीत संशोधनावर एक critical लेख :
http://creative.sulekha.com/risa-lila-1-wendy-s-child-syndrome_103338_b…
हिमाल साऊदेशियन मधील या
हिमाल साऊदेशियन मधील या पुस्तकाचं परिक्षण रोचक आहे
दीना नाथ बत्रा
या आधी दीनानाथ बत्राजींनी दिल्ली युनिवर्सिटीच्या इतिहास सिलेबस मधून ए.के. रामानुजन यांचा रामायणवरील लेख काढून टाकण्यास दिल्ली हाय कोर्टात याचिका केली होती.
सरकरी परीक्षांच्या हिंदी पेपरांमध्ये इंग्रजीत काही प्रश्न विचारल्याबद्दल, आणि एन-सी-ई-आर-टी च्या पाठ्यपुस्तकांमधील मजकूराविरुद्धही बत्राजी कोर्टात गेले आहेत.
दोन पैसे
एकूण सोशल नेटवर्कवर इतिहास तज्ञांमधे ह्यावर होणारा वाद बघता इथे जंतू/रोचना/बॅटमन ह्या लोकांचे मत रोचक ठरेल. त्यांना ते व्यकत करण्याबद्दल विनंती.
मी, ंमी हे पुस्तक अजून वाचले
मी,
ंमी हे पुस्तक अजून वाचले नाही, त्यामुळे त्यावर भाष्य करत नाही. पण इतर संस्कृत आणि प्राचीन भारताचा इतिहास जाणणार्यांकडून ऐकले आहे की ते प्रचंड रोचक आहे, त्याचा व्याप मोठा आहे, लिहीण्याची शैली फारच सुवाच्य आहे, आणि जात, वर्ण, लिंग, रेस वगैरेच्या चौकटींना प्राधान्य देणारे आहे. हिंदू धर्माच्या संहितांमधल्या कॉम्प्लेक्सिटींवर, विसंवादी स्वरांवर बोट ठेवणारे, आणि त्यातून त्याच्या समृद्धीकडे पाहणारे आहे. त्यात चुका आहेत - फॅक्च्युअल, आणि अनुवादाच्या, असे सगळे आवर्जून सांगतात - पीडीएफ मिळाले की इथे डकवीन. गो पु देशपांड्यांनी पुस्तकाचे लिहीलेले परीक्षण येथे वाचता येईल, प्रशंसा-टीकेचे चांगले मिश्रण आहे! लूडो रोचर या संस्कृतज्ञाने लिहीलेले परीक्षण इथे वाचता येईल. दोघे ही शैलीबद्दल म्हणतात की डोनिगर एखाद्या पौराणिक कथाकाराने किंवा कीर्तनकाराने इतिहास सांगतात.
देशपांडे:
रोचर:
पण वरील याचिके मधे सुचवल्या प्रमाणे हिंदू धर्माचा, धर्मियांचा अपमान करण्यासाठी लिहीले गेले असे याचिकेतच दिलेल्या उदाहरणावरून तरी वाटत नाही.
ऐसीकर "किंबहुना सर्वसुखी"
ऐसीकर "किंबहुना सर्वसुखी" यांनी हे पुस्तक वाचले आहे; ते चर्चेत सहभागी होऊन अधिक सांगतील अशी आशा आहे.
धन्यवाद
धन्यवाद रोचना.
देशपांडे आणि रोचरचे परिक्षण रोचक आहे, विशेषतः देशपांडे म्हणतात ते
फारच रोचक वाटले. आणि रोचर म्हणतो ते
शैव/माध्व/वैष्णव वादाच्या पार्श्वभुमीवर जरा आम जनतेसाठी भडकाऊ असेलसे वाटते पण देशपांडे त्यामागची भुमिका स्पष्ट करतात
'किंबहूना सर्वसुखी' ह्यांच्या प्रतिक्रीयेच्या प्रतिक्षेत.
कुमकुम राय यांचे परीक्षण इथे
कुमकुम राय यांचे परीक्षण इथे डकवले आहे. अवश्य वाचावे. पुस्तकातल्या चुकांची चांगली कल्पना येते, त्याच्या चांगल्या-वाइट बाजूंचे बॅलेन्स्ड परीक्षण आहे. राय देखील म्हणतात की लेखनाची मजेदार शैली ही जमेची बाजू आहे, पण चुकांची यादी चिंताजनक आहे. वापरलेल्या संज्ञांमधला विसंवाद, सपाटीकरण इत्यादी पाहिले तर बाकी सगळे खाली ठेवून लगेच पुस्तक वाचून काढावेसे काही वाटत नाही.
असो. पेंग्विन ने या आधी ही अनेक बाद पुस्तकं छापली आहेत. त्यांनी कुठल्याशा धमकीपोटी पुस्तक मागे घेऊन रद्द करण्याची कबूली देणे हे फारच शोकास्पद आहे.
धन्यवाद
ह्या प्रतिक्रियेबद्दल अनेक धन्यवाद.
धन्यवाद.
लेखाच्या दुव्यासाठी धन्यवाद.
वेंडीची एक छोटी पण रोचक मुलाखत पाहिली,त्यावरून पुस्तकाबद्दलच्या त्यांच्या प्रेरणा स्पष्ट होतात.
या मुलाखतीतला एक उल्लेख मला फार रोचक वाटला तो म्हणजे "कामसूत्र वाचल्यानंतर ज्याने ते लिहिले त्याला स्त्रीयांबद्दल बराच आदर असला पाहिजे" असा निष्कर्ष. मी कामसूत्राचा इंग्रजी अनुवाद वाचला होता पण त्यावरून माझे वैयक्तिक मत अगदी उलटे झाले होते. पाककृतींमध्ये जसे 'एक वांगे घ्या' म्हणतात तशा पद्धतीने कामसूत्रात एक 'स्त्री घ्या' असे उल्लेख आलेत असे मला वाटले होते :-) पुस्तकाच्या लेखकाचा वैयक्तिक कल काय आहे ते सांगू शकले नाही पण वर्णव्यवस्थेतली उतरंड आणि पुरुषप्रधान संस्कृती त्या पुस्तकातून अगदी उघड होते असे मला वाटले होते. पुराणातल्या कथा, त्यातली अवास्तव वर्णने वगैरेमधून सत्य शोधण्याची किंवा गोष्टी रचण्याची पध्दत रोचक असली तरी वस्तुनिष्ठ नव्हे तर व्यक्तीसापेक्ष आहे असे वाटते. हे वादग्रस्त असले तरी त्यामुळे पुस्तक मागे घेणे शोकास्पद आहे हे खरेच आहे.
या दुव्याबद्दल आभार. मुलाखतीत
या दुव्याबद्दल आभार.
मुलाखतीत वेंडी म्हणतात की कोणी प्रचलित धर्माविरोधात बोलले म्हणून त्यांचा आवाज दडपणं या जुन्या हिंदू वाङमयामधे होत नाही. आता मात्र हिंदूधर्म"प्रेमी"असे आवाज दडपण्यासाठी एवढे प्रयत्न करत आहेत. 'द हिंदू'मधून
The group also argued that the book was inaccurate, presenting a “shallow, distorted, non-serious presentation of Hinduism filled with heresies” and that it reduced Hinduism to a narrative of “a woman hungry for sex” or what one reviewer described as an “overeroticized” account of the religion.
जोतिष
जवळपास निम्म्या अमेरिकन लोकांना वाटतं कि अॅस्ट्रॉलॉजी विज्ञानाचा एक प्रकार आहे.
अॅस्ट्रॉलॉजीला ज्योतिष
अॅस्ट्रॉलॉजीला ज्योतिष पेक्षा फलज्योतिष अधिक योग्य शब्द वाटतो.
+
'ज्योतिष' हा शब्द अॅस्ट्रॉनॉमी आणि अॅस्ट्रॉलॉजी दोहोंनाही सारखाच लागू पडतो. तेव्हा बरोबर.
तेलंगणावरुन पेटलेल्या
तेलंगणावरुन पेटलेल्या संसदेतल्या वादात नेत्यांनी एकमेकांवर हल्ला करण्यासाठी पेपर स्प्रे वापरले गॅस मास्कही सोबत नेलेले सापडले.
संसदेच्या आत हे सर्व, रस्त्यावर नव्हे.
http://www.ndtv.com/article/cheat-sheet/mps-at-their-worst-yank-mics-us…
अतिशय खेदजनक आहे हे त्याच
अतिशय खेदजनक आहे हे :(
त्याच गोंधळात तेलंगाणा विधेयक विचारार्थ सादरही झाले म्हणे!
त्याच गोंधळात तेलंगाणा विधेयक
"विचार" करणार हे?!!!!!
:D :D :D :D :D =))
-- बाकी, सद्य सरकारने हा
:)
--
बाकी, सद्य सरकारने हा तेलंगाणा प्रश्न जितका ढिसाळपणे हाताळला आहे त्याला तोड नाही! त्यात कमलनाथसारख्यांना संसदीय कार्यमंत्री वगिरे केल्यावर याहून वेगळे अपेक्षितही नाही म्हणा
हुश्श
ह्या असल्या वाईट विधेयकावर मी मुततो असे म्हणत कुणी संसदेत जाहिर मुतले नाही.
कीम्वा कुणी जाहिर त्यावर ओकारी वगैरे केली नाही किंवा त्यावर जाहिर...
नको...ते फारच घाण होइल.
असो.
तर अजून काय काय गलिच्छ केले नाही ह्यातच मी आपले समाधान मानून घेतोय.
प्रगलभतेकडे अत्यंत चांगली वाटचाल सुरु आहे असे दिसते.
लोकशाहीच्या वास्तवाचा मर्मज्ञ
http://www.loksatta.com/vishesh-news/man-who-found-core-of-real-democra…
डॉ. रॉबर्ट डाल यांचा आणि त्यांच्या कामाचा अल्पपरिचय करुन देणारा हा लेख.
अण्णा आणि
अण्णा आणि ममता।
http://indianexpress.com/article/india/politics/anna-hazare-to-campaign…
की आश्चोज्जो!!!
की आश्चोज्जो!!!
एकटे टायगर
चीन देशी शांघाय शहरी व्ह्यालेंटाईन दिवशी कपलांवर सूड उगवण्यासाठी सिंगलांनी थेट्रातील प्रत्येक ओळीतील एकाआड एक तिकिटे बुक करून कपलांना वेगळे बसण्यास भाग पाडून कळायचे बंद केले.
http://world.time.com/2014/02/14/chinese-singles-sabotage-valentines-da…
मजेशीर
अमेरिकेत अनेक चित्रपटगृहांमधे असं करू देत नाहीत. तिकीट काढताना, काही भाग फक्त जोडप्यांसाठी राखीव ठेवलेला असतो, तिथे बसायचं असेल तर दोन किंवा चार तिकीटं काढावी लागतात. कम्युनिष्ट देशात काही बाबतीत जास्त स्वातंत्र्य आहे. ;-)
हा हा हा पण समजा दोनचार
हा हा हा ;)
पण समजा दोनचार तिकिटे सिंगलांनीच काढली तर? तसेही करता येत असेल, नै का?
करता येईल. पण...
करता येईल. पण चीनच्या तुलनेत गर्दीचा अभाव, लोकसंख्येची कमी घनता आणि करमणूकीच्या साधनांची उपलब्धता यामुळे अशी मस्करी कदाचित फार चालणारही नाही. हे असं मात्र बरंच दिसतं -
20,000 Tons Of Pubic Hair Trimmed In Preparation For Valentine's Day
आणि न्यूयॉर्करमधून -
pub(l)ic ट्रिमिंग अन तेही
pub(l)ic ट्रिमिंग अन तेही कांदापुरीत पाहून डोळे पाणावले.
तसेही, कांदापुरीत डोळे पाणावणे हे क्रमप्राप्तच, नाही का?
केजरीवालांनी राजीनामा दिलाय
केजरीवालांनी राजीनामा दिलाय म्हणे?
फेबु अकौंट वापरले म्हणून
फेबु अकौंट वापरले म्हणून सिरियात एका पोरीला दगडांनी ठेचून ठार मारण्यात आले.
http://daily.bhaskar.com/article/WOR-syrian-girl-stoned-to-death-for-us…
http://timesofindia.indiatime
http://timesofindia.indiatimes.com/home/science/Adultery-may-be-the-key…
कन्सेन्श्युअल व्याभिचाराचे फायदे.
http://world.time.com/2014/02
http://world.time.com/2014/02/12/sex-lies-and-hinduism-why-a-hindu-acti…
वेंडी डॉनिगर च्या पुस्तकाचा वाद मोठाच झालेला आहे. त्याबद्दल ची दिनानाथ बत्रांची मुलाखत. की बत्रा यांचे पुस्तकावर कोणते आक्षेप आहेत.
राजीव नाईक यांची पुण्यात व्याख्याने
कै. रा. श्री. जोग स्मृती व्याख्यानमाला - 'आज : भाषा : नाटक' - वक्ता राजीव नाईक - दिनांक २०, २१, २२ फेब्रुवारी २०१४, रोज दुपारी ३:३० वाजता, मराठी विभाग, पुणे विद्यापीठ.
याचं काही दस्तावेजीकरण होतं
याचं काही दस्तावेजीकरण होतं काय? मला अशक्य इंट्रेस्ट आहे. पण पोटापाण्याच्या मागे जाणं भाग आहे. :(
दस्तावेजीकरण
कल्पना नाही पण मराठी विभाग किंवा ललित कला केंद्र ह्यांपैकी कुणी तरी ती रेकॉर्ड करण्याची शक्यता आहे.
आणि मला ते रेकॉर्ड मिळण्याची
आणि मला ते रेकॉर्ड मिळण्याची शक्यता?
भारताचे मंगळयान मिशन कसे
भारताचे मंगळयान मिशन कसे स्वस्तात मस्त आहे त्याबद्दल - http://www.nytimes.com/2014/02/18/business/international/from-india-pro…
अहो ते स्वस्तात झाले कारण
अहो ते स्वस्तात झाले कारण त्याला बालाजीचे अधिष्ठान आहे म्हटलं......
मुस्लिमांना दत्तक घेण्याचा हक्क
http://timesofindia.indiatimes.com/india/Supreme-Court-gives-Muslims-ri…
मुस्लिम व्यक्तिगत कायद्यात दत्तक घेण्याची तरतूद नाही पण मुस्लिम लोक दत्तक घेऊ शकतात असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे.
बातमीत जास्त डिटेल्स कळले नाहीत. पण निकालातील एक वाक्य लक्षवेधी आहे.
The apex court said on Wednesday that the laws of land has to get primacy over personal law till the country achieves Uniform Civil Code as provided in Article 44 of the Constitution.
The SC bench said the right to adoption is conferred by a law and operation of this cannot be stultified by a personal law dictate.
माझ्या माहितीप्रमाणे सध्या हिंदू लोक जे दत्तक घेतात ते हिंदू अॅडॉप्शन अॅण्ड मेंटेनन्स अॅक्ट खाली घेतात. म्हणजे हिंदू व्यक्तिगत कायद्यानुसारच घेतात. कोर्ट ज्याला लॉ ऑफ द लॅण्ड म्हणते (ज्यानुसार दत्तक घ्यायचा हक्क मिळतो) ते कोणते हे मलातरी कळले नाही.
चौकशी करायला हवी.
अधिक माहिती काढली. जुवेनाइल
अधिक माहिती काढली.
जुवेनाइल जस्टिस अॅक्ट नावाचा एक कायदा आहे जो सर्वांना लागू आहे. त्या कायद्याअंतर्गत कोणीही व्यक्ती दत्तक घेऊ शकते.
अधिक माहिती काढत आहे पण....
या कायद्याअंतर्गत दत्तक घेतल्यास अॅपॅरंटली बालकास वारसा हक्क लागू होतो. आणि त्या तरतुदी बहुधा हिंदू सक्सेशन अॅक्ट प्रमाणे आहेत. [मुस्लिम व्यक्तिगत कायद्यानुसार मुस्लिम बालक जन्मतःच समादायाद (कोपार्सेनर) बनत नाही. परंतु या कायद्यांतर्गत दत्तक घेतलेले मूल समादायाद बनते असे काहीतरी आहे].
डॉ. मॅक्झीन बर्नसन यांचे भाषण
आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या निमित्ताने भाषण -
वक्त्या - डॉ. मॅक्झीन बर्नसन
विषय - मातृभाषेतून शिक्षण देण्याचा आग्रह धरताना आपण चुकलो का?
ठिकाण : न्यू कन्व्होकेशन हॉल, डेक्कन कॉलेज, पुणे
वेळ : शुक्रवार २१ फेब्रुवारी, दु. ३:३० वा.
डॉ. बर्नसन फलटणच्या प्रगत शिक्षण संस्थेच्या संस्थापक आणि नामवंत शिक्षणतज्ज्ञ असून सध्या TISS हैदराबाद येथे प्राध्यापिका आहेत.
मला शीर्षकाचा नीट अर्थ लागला
मला शीर्षकाचा नीट अर्थ लागला नाही (मातृभाषेतून शिक्षण घेतलं नाही म्हणून...)
मातृभाषेतून शिक्षण देण्याचा आग्रहच चुकीचा होता, की आग्रह धरण्याची पद्धत चुकीची होती (ज्यामुळे आग्रह असफल झाला?)
अॅबस्ट्रॅक्ट
व्याख्यानाच्या ह्या अॅबस्ट्रॅक्टवरून ते स्पष्ट होईल -
We need to ask what has gone
We need to ask what has gone wrong – whether our position was fundamentally flawed and needs to be jettisoned completely.
या प्रश्नाचे पार्शल उत्तर network effects मधे आहे. विशेषतः मल्टि साईडेड network effects च्या संकल्पनेमधे. (अर्थात नेटवर्क इफेक्ट्स वापरून समस्येवर तोडगा काढता येईल असे मला म्हणायचे नाही. मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की मल्टि साईडेड network effects ची संकल्पना वापरून व त्या लेन्स मधून पाहिल्यास - व्हॉट वेंट राँग - या प्रश्नाचे उत्तर शोधण्यास मदत होऊ शकते.)
तंजावर मराठी लोकांनी आपली
तंजावर मराठी लोकांनी आपली बाषा जतन करासाटी एक पॉडकास्ट काडले असंन.
उदंड संतोष ज़ाला ऐकूनं. तुम्हीही ऐकावेचं अशी विनंती सगळांना करतों.
http://tanjavurmarathi.podomatic.com/
लैच भारी
लै भारी प्रकल्प आहे हा. मस्त मजा आली ऐकायला.
असेच म्हणतो. लै मजा आली.
असेच म्हणतो. लै मजा आली.
मस्त की रे
मस्त की रे.
महामहिम शिवाजी गायकवाड ऊर्फ रजनीकांत ह्याच मराठी भाषेत बोलतात असे ऐकले आहे.
होय.
होय.
नक्की?
नक्की?
माझ्या माहितीनुसार, रजनीकांत हे टँजो-मराठी समाजातील नव्हेत. तर, बंगळूरस्थित मराठी भाषकांच्या दुसर्या-तिसर्या पिढीतील. आता पूर्णतः तमिळ समाजाशी एकरूप झाल्यामुळे त्यांची मराठी तमिळ-मिश्रीत झाली असली तरी ती पॉडकास्टमध्ये ऐकल्यासारखी टँजो-मराठी नसावी.
ओके
मलाही खात्री नाहिच. फक्त ऐकिव माहिती आहे.
दुरुस्तीबद्दल आभार.
अर्र हो की. साली तपशिलातली
अर्र हो की. साली तपशिलातली चूक कशी काय झाली. :( असो.
हे हे भारीच. बाकी शशीकांत ओक
:) हे हे भारीच. बाकी शशीकांत ओक म्हणजे नाडीकार का?
अर्थातच.
अर्थातच. :)
...
पॉडकाष्ट (थोडीशीच) ऐकली. रोचक आहे.
तरी या पॉडकाष्टवरील ही जी कोणती भाषा आहे, ती बर्यापैकी कळते; 'मराठी' समूहात समाविष्ट करता येण्याइतकी जवळचीही वाटते. माझा वैयक्तिक (दीडदमडीचा) जो अनुभव आहे, तो याहून थोडा वेगळा, विपरीत आहे.
म्हणजे झाले काय, की फारा वर्षांपूर्वी, कॉलेज/हॉष्टेलच्या दिवसांत, माझा एक मित्र असे. तमिळनाडूतला. मूळ तंजावुरचे किंवा कसे, याबाबत कल्पना नाही, परंतु पिढ्यानपिढ्यांपासून तमिळनाडूत स्थायिक. (त्याचे) वडील नैवेलीला नोकरीला होते, सबब नैवेलीत वाढलेला. अशीच कधीतरी हॉष्टेलच्याच कोठल्यातरी कार्यक्रमात ओळख झाली. मला येऊन (इंग्रजीतून) विचारू लागला, की तू मराठी आहेस का, मीही मराठी आहे, म्हणून. म्हटले हो. मग मराठीतून संभाषणाचा प्रयत्न केला, तर हा काय बोलतो ते मला समजेना, नि मी काय बोलतो ते त्याला कळेना. मग त्याचे एकेक वाक्य विस्कटून एकेक शब्द सुटासुटा करून ऐकायचा प्रयत्न केला, तर अधूनमधून एखादा शब्द तेवढा काय तो ओळखीचा निघायचा, पण वाक्य तरीही अगम्य ठरायचे. हॉष्टेलच्या त्यापुढील उर्वरित वर्षांत आम्हा दोघा 'मराठी' माणसांचे संभाषण शक्य तोवर इंग्रजीतून चाले.
एकदा यानेच उत्साह दाखवला, म्हणून माझ्याजवळची पु.लं.ची क्यासेट याला ऐकवण्याचा प्रयत्न केला. एक तर याच्या पूर्णपणे डोक्यावरून गेली, आणि प्रत्येक वाक्य समजावून सांगण्याचा माझा उत्साह पुढेपुढे मावळू लागला, म्हणून मग तो नाद सोडून दिला.
हा (वसति)गृहस्थ नियमितपणे घरी आईवडिलांना पत्रे लिहीत असे. बहुतांशी इंग्रजीतून, पण त्यातील आईस लिहिण्याचा कौटुंबिक मजकूर 'मराठी'तून - तमिळ लिपीमध्ये! आईची पत्रेही तमिळलिप्यंकित 'मराठी'तून येत. (ही माहिती त्यानेच मला एकदा पुरविली होती.)
पुढे हा मनुष्य नोकरीधंद्यानिमित्त मुंबईस होता, असे कळते. (बहुधा अजूनही असावा.) तेथे त्याचे कसे चालत असे, कोण जाणे. बहुधा इंग्रजीतून काम भागवत असावा. (तसेही मुंबईत मराठी कोण बोलते म्हणा! ;))
हे बाकी रोचक आहे खरे.
हे बाकी रोचक आहे खरे. पॉडकाष्टातील भाषेची अजून 'हेव्विली' तमिळीकृत आवृत्ती म्हणावी लागेल.
तंजावरकर मराठी भाषिक (बहुतेक
तंजावरकर मराठी भाषिक (बहुतेक देशस्थ ब्राह्मण, राव आडनाव लावणारे) सोडूनही अजून मराठी समाज तमिळनाडूत असावा. काही वर्षांपूर्वी मुंबई विद्यापीठाच्या एका कॉन्फरन्स मधे एक पेपर ऐकला होता. वायव्य तमिळ नाडूच्या काही गावांत स्थित जुन्या मराठी समाजाचे त्यात चित्रण होते - हे व्यंकोजी किंवा नंतरच्या पेशवाईच्या काळात कारकूनीसाठी गेलेले ब्राह्मण नसून कुठल्यातरी स्वारीवर सैन्याबरोबर गेलेल्या लोकांचे वंशज आहेत, बहुतेक मराठे-कुणबी. यांचा तंजावरकरांबरोबर फारसा संपर्क नव्हता, व त्यातील बरीच मंडळी शेतकरी आहेत. मराठा म्हणून स्वत:ची अस्मिता बाळगून आहेत, आपल्या स्थलांतराची आठवण अंधुक का होईना आहे, आणि थोडी मराठीही बोलतात. ही मराठी कितपत तंजावरमराठीशी मिळती-जुळती आहे ठाऊक नाही. पण पेपरातल्या मजकूराबद्दल एवढेच आता आठवते. पण ही मंडळी तंजावरची नाहीत, वेगळी आहेत, हे ठासून सांगितलेलं आठवतं.
माझे स्मरण बरोबर असेल तर त्या
माझे स्मरण बरोबर असेल तर त्या गावाचे नाव 'मराठीपळ्या' असे आहे. सकाळमध्ये त्याबद्दल लेख आल्याचेही आठवते आहे.
http://article.wn.com/view/WNAT7aff32035985cfbef79657508c8f5d2b/
दुसरे गाव असावे
पण हे "मराठीपळ्या" कर्नाटकात कुठेतरी आहे असे दिसते. मी ऐकलेल्या पेपरात तमिळ नाडूतली गावं होती. दुर्दैवाने लेखिकेने पेपर कुठे छापला आहे का हे माहित नाही.
ओह अच्छा. मग माहिती नाही.
ओह अच्छा. मग माहिती नाही.
पुण्यात विनोद दोशी नाट्यमहोत्सव
आजपासून पुण्यात सहावा विनोद दोशी माट्यमहोत्सव सुरू होतो आहे. दर वर्षी ह्या महोत्सवात पुणेकरांना काही ताजी उल्लेखनीय नाटकं पाहायला मिळतात. अधिक माहिती त्यांच्या फेसबुक पानावर मिळेल.
दुवा
दुवा इथून उघडत नाही.
तपशील कळाल्यास आभारी राहिन.
(स्थळ, वेळ वगैरे माहिती)
लोकसत्तामधून
लोकसत्तामधल्या जाहिरातीचा हा दुवा,
काळा दिवस
हाच तो काळा दिवस, मग आपल्याला व्हिसा वगैरेसाठी अप्लाय करणे वगैरे त्रास सुरु झाले.
रक्ताच्या एका थेंबात ...
This Woman Invented a Way to Run 30 Lab Tests on Only One Drop of Blood
आणि याच एलिझाबेथ होम्सची मुलाखत - Creative Disruption? She's 29 and Set to Reboot Lab Medicine
लोकांना विम्याशिवाय परवडेल अशा किंमतीत, अमेरिकेत रक्तचाचणी, ती ही चटकन आणि खूप कमी रक्त वापरून बनवण्याचं तंत्रज्ञान एलिझाबेथने शोधलं. आता तिची कंपनी तिने काढली आहे. प्रत्येक घरापासून पाच मैलांच्या आत रक्तचाचणी करता येईल अशी सोय देण्याची तिची महत्त्वाकांक्षा आहे.
प्रत्येक घरापासून पाच
प्रत्येक घरापासून पाच मैलांच्या आत रक्तचाचणी करता येईल अशी सोय देण्याची तिची महत्त्वाकांक्षा आहे.
क्या बात!
ऐला हा जबरी प्रकार आहे!
ऐला हा जबरी प्रकार आहे! भारीच.
हात्तेच्या
सगळेच मिळमिळित उपप्रतिसाद आलेत.
मला खालीलपैकी एका प्रतिसादाची अपेक्षा होती :-
१.इतरत्र फेमिनिझ्म, स्त्रीवाद वगैरे गळे काढत फिरण्यापेक्षा अशा माहितीपूर्ण बातम्या दिल्यात तर किती बरं होइल ?
२.स्त्रीवादाच्या नावानी ओरडणार्या दांभिक स्त्रीवाद्यांनी ह्या संशोधक - उद्योजक स्त्रीकडून काहीतरी शिकणं अवश्यमेव आहे.
(आणि लागलिच ह्या वाक्याच्या defenseमध्ये " स्त्रीवाद्यांचा आदरच आहे. मी फक्त दांभिक स्त्रीवाद्यांबद्दल म्हटले" वगैरे वगैरे )
३.एखाद्या स्त्रीनं एखादं काम केलं म्हणून मुद्दाम वेगळी दखल घेतली जात आहे. बहुसंख्य वैज्ञानिक संशोधन हे पुरुषांकडून झालय हे स्त्रीवादी मान्य का करत नाहित.
.
.
.
;)
असो जोक्स अपार्ट, कामाची महत्ता खरोखर मोठी आहे.
कमर्शियल पातळीवर हे अधिकाधिक लोकांना लवकरात लवकर उपलब्ध होवो.
उपलब्ध करुन देणार्याचे भले होवो.
बोल वत्सा तुला कुठली श्रेणी
=))
बोल वत्सा तुला कुठली श्रेणी देऊ =))
१.इतरत्र फेमिनिझ्म, स्त्रीवाद
१.इतरत्र फेमिनिझ्म, स्त्रीवाद वगैरे गळे काढत फिरण्यापेक्षा अशा माहितीपूर्ण बातम्या दिल्यात तर किती बरं होइल ?
मनोबा, आय मे बी मिसिंग युअर प्वाईंट.
पण स्त्रीमुक्तीवादी मंडळी सर्वात कमी हिंसक मार्गाने प्रचार करतात. म्हंजे आचार्य पोफळे गुरुजींच्या नेमके विरुद्ध. असे माझे निरिक्षण आहे.
त्यांचे सर्वात जहाल अस्त्र म्हंजे लाटणे मोर्चा. कदाचित म्हणूनच लोक त्यांना टरकून नसतात. आपण ज्वालाग्राही पदार्थ असल्याशिवाय इतर लोक टरकून वागत नाहीत.
ओये
चेष्टा म्हणून प्रतिसाद होता.
तो स्त्रीवाद्यांबद्दल नव्हताच.
स्त्रीवाद्यांबद्दल इथे जे बोलतात, ते कसे बोलू शकतात ह्याबद्दल होता.
न्यायव्यवस्था
आपल्या अनावश्यक टिपण्ण्यांमुळे प्रश्न निर्माण होऊ शकतात याची न्यायव्यवस्थेला प्रथमच जाणीव झालेली दिसते.
शहाबानो प्रकरण अशाच एका अनावश्यक टिपण्णीतून उद्भवले असे माझे मत आहे.
सहमत
राजीव गांधींच्या बाबतीत एक चक्र पूर्ण झालं असं म्हणता येईल.
'परामर्श'
पुणे विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागातर्फे प्रकाशित 'परामर्श' नियतकालिकाचे १९७९ ते २००६दरम्यानचे अंक डिजिटल स्वरूपात उपलब्ध केले गेले आहेत. ते इथे पाहता येतील. अनेक महत्त्वाच्या लोकांचे लेख त्यात वाचायला मिळतील. मजकूर युनिकोडात नाही, तर जुने अंक स्कॅन करून डिजिटायझेशन केलं आहे. त्यामुळे मजकूर शोधणं अंमळ कटकटीचं आहे, पण हेही नसे थोडके.
विविध ज्ञान विस्तार
शोधयुक्त नसले तरी हे फारच चांगलं आहे!
कोणी जुन्या विविध ज्ञान विस्ताराचे अंक असेच उपलब्ध करून दिले तर काय उपकार होतील! जयकर लायब्ररीत बरेच अंक स्कॅनही केलेले आहेत. फक्त एकत्र करून कुठे तरी चढवायचा प्रश्न आहे. विस्ताराचे कॅटलॉगही पुण्याच्या मंडळात आहे, आणि त्यांच्या लायब्ररीत सगळे अंक आहेत बहुधा.
जाता जाता, ब्रिटिश लायब्ररीच्या "endangered archives programme" अंतर्गत अनेक मराठी हस्तलिखितं जालावर उपलब्ध आहेत. रामायण, गुरुचरित्र, अमृतानुभव, केकावली, अभंगांचे बाडे, रामदास, एकनाथ, वगैरेंचे बरेच लेखन आहे.
दोघांचेही अतिशयच आभार!
दोघांचेही अतिशयच आभार!
अतिउत्तम डिजिटवले आहे. विविध
अतिउत्तम डिजिटवले आहे. विविध ज्ञान विस्तार, काव्येतिहाससंग्रह, निबंधमाला, इ.इ. नियतकालिके अशीच डिजिटाईझ व्हावयास हवीत.
मज्जाय बॉ
बादवे, गंमत पहा :-
अण्णा हजारे धुतल्या तांदळाचे आहेत. त्यामुळे धुतल्या तांदळाच्या दिदिंना ते सपोर्ट करताहेत.
आता दिदीसुद्धा छत्त्तीसगडात धुतल्या तांदळाच्या शिबू सोरेन प्रणीत धुतल्या तांदळाच्या सरकारला सपोर्ट करताहेत.
हे शिबू सोरेन सरकार इतकं धुतलय तांदळाचं आहे की खुद्द राजद, कॉंग्रेस ह्यांच्या स्वच्छ स्वच्छ, साफ सुथरी
मंडळीही त्यांना सपोर्ट करताहेत.
मज्जाय बुवा.
सगळाच कसा सज्जनांचा हा महामेळावा हा.
ही घ्या बातमी :-
http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5102212806173593336&S…ताज्या बातम्या&NewsDate=20140303&Provider=-&NewsTitle=झारखंडमधील दोन पक्ष तृणमूलमध्ये विलीन
झारखंडमधील दोन पक्ष तृणमूलमध्ये विलीन
रांची- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झारखंड जनाधिकार मंच आणि राष्ट्रीय कल्याण पक्ष हे दोन पक्ष आज तृणमूल कॉंग्रेसमध्ये विलीन झाले. जनाधिकार मंचाचे आमदार बंधू तिर्की आणि कल्याण मंचाचे चामरा लिंडा यांनी तृणमूल कॉंग्रेसचे सरचिटणीस मुकुल रॉय यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. या दोन पक्षांच्या आगमनामुळे झारखंडमध्ये आमच्या पक्षाचे अस्तित्व निर्माण झाले आहे, असे रॉय यांनी सांगितले. कॉंग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांच्याप्रमाणेच या दोन्ही आमदारांनी विद्यमान सोरेन सरकारला पाठिंबा दिला आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख शिबू सोरेन यांचे सुपुत्र लालू सोरेन यांनीही तृणमूलमध्ये प्रवेश केला आहे.
बाकी जाऊदे पण झारखंडसाठी ही
बाकी जाऊदे पण झारखंडसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे
नवे राज्य बनल्यापासून एकही स्थिर सरकार न पाहणार्या या राज्याला त्या झामुमो/भाजपा/काँग्रेस बरोबर एक असा मजबूत (व सांस्कृतिकदृष्ट्या तितकाच जवळचा) पर्याय मिळत असेल तर तेथील राजकीय रचना बरीच बदलेल व भविष्यात झामुमोचे तळ्यात-मळ्यात संपून (किंवा झामुमोच संपून) एक स्थिर सरकार या प्रदेशाला मिळेल अशी आशा करता यावी.
अवश्य
स्वच्छतानिष्ठांची मांदियाळी आधीच जमली आहे.
आता स्थैर्यनिष्ठांची जमण्यास उशीर तो कितीसा ?
लोटला स्वच्छतेचा जनप्रवाहो.
च्यायला, प्रतिसाद देतो न देतो
च्यायला, प्रतिसाद देतो न देतो तोवर श्रेणीदाते हज्जर!!!!
सरकारी स्वागतार्ह
सरकारी स्वागतार्ह पाऊल
शिवाय
medical examination of victims besides outlawing the two-finger test performed on them, dubbing it as unscientific.
यावर येतील डॉक्टरांचे मत वाचायला आवडेल
+१
+१
रविवारच्या (२ फेब्रु १४) सत्यमेव जयते मध्ये हे मांडले होते. परंतु सुप्रीम कोर्टाने यापूर्वीच अशा प्रकारचे अनेक निकाल दिलेले आहेत. बळी महिलेचे चारित्र्य (संभोगाची सवय) हा बचावाचा मुद्दा असू शकत नाही असे कोर्टाने स्पष्ट केलेले आहे.
अवांतर:
त्या कार्यक्रमात दोन सामाजिक कार्यकर्त्यांनी १८० अंशातले मुद्दे मांडले. "बळी तपासणीसाठी आल्यावर घडलेल्या गुन्ह्यासंबंधाने डॉक्टर निरनिराळे प्रश्न विचारतात. कुठे केले, कसे केले वगैरे. जणू तिच्यावर तो बलात्कार पुन्हा होतो." असे एकीचे म्हणणे होते. [असे प्रश्न विचारायला नकोत असे म्हणणे होते].
दुसरीने डॉक्टर पुरेसे प्रश्न विचारत नाहीत त्यामुळे पुरावा नीटपणे गोळा होत नाहीत. अधिकाधिक प्रश्न विचारून माहिती घ्यायला हवी असे तिचे म्हणणे होते.
कोर्टाशी सहमती
कोर्टाशी सहमती आहे.
वेश्यव्यवसाय करणार्या व्यक्तीनेसुद्धा तिच्या मर्जीविरूद्ध संभोग अर्थात बलात्कार केल्याची तक्रार केल्यास त्या व्यक्तीचा व्यवसाय लक्षात न घेता निकाल द्यावा हा दंडक योग्यच वाटतो.
सहारा
सहाराश्री सुब्रोतो रॉय तिहार जेलमध्ये. सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांच्या या बातमीत वाचायला मिळालेल्या तीव्र प्रतिक्रिया माध्यमांमध्ये प्रथमच वाचल्या.
http://indianexpress.com/article/india/india-others/subrata-roy-police-…
व्यवस्थेतील
व्यवस्थेतील मोठ्या धेंडापैकी कुणीतरी सुब्रतो रॉय ह्यांच्यामुळं दुखावलं गेलय असा वाटायला लागलय.
न्यायालय आणि खटले वगैरे निमित्तमात्र आहेत.
शक्य
शक्य आहे.
सहाराच्या या स्कीममध्ये (डिबेंचर्स) काही कोटी छोट्या गुंतवणुकदारांनी गुंतवणुक केली आहे. हे गुंतवणूकदार फेक* (अर्थातच बेनामी) आहेत असा रि़अर्व बँक आणि सेबीचा संशय आहे (किंवा या दोघांना खात्री आहे).
गुंतवणूकदारांना पैसे परत करा असा आदेश सेबीने दिला आहे. गुंतवणूकदार फेकच असल्याने सहारा या गुंतवणूकदारांना पैसे परत करू शकत नाहीये. [के वाय सी चे नॉर्म पुरेसे कठोर नसताना झालेल्या गुंतवणुकी आहेत]. त्यामुळे सहाराची गोची झाली आहे.
*बड्या धेंडांचा पैसा फेक नावांनी गुंतवला गेला आहे.
दोन्ही असावे. क्रिकेट टिमची
दोन्ही असावे.
क्रिकेट टिमची स्पॉन्सरशिपही परवडेनाशी झाल्याने आर्थिक प्रश्न असेलच, त्यात (की त्यामुळेच) कोणाला तरी निवडणुकांच्या काळात हे आणखी पोसणे जड होऊ लागले असेल.
भारतीय लक्ष्मीला
भारतीय लक्ष्मीला आंतरराष्ट्रीय 'वुमन ऑफ करेज' पुरस्कार मिळाला
लोकसब्न्हा निवडणुका जाहिर,
लोकसब्न्हा निवडणुका जाहिर, आचारसंहिता लागू!
महाराष्ट्रात १०,१७ व २४ एप्रिलला मतदान!
सगळ्या जागांचे निकाल १६ मे रोजी
कळीचा प्रश्न
हे उत्तमच. फक्त एकच बारीक (परंतु कळीची) शंका:
'लोकसब्न्हा' म्हणजे नेमके काय? हा सार्वजनिक हमामसारखा काही प्रकार आहे काय?
हल्ली सार्वजनिक हमामांच्यासुद्धा निवडणुका वगैरे असतात? चांगले आहे. आमच्या वेळी असे नव्हते. सत्तरच्या दशकात... (वगैरे वगैरे.)
बाकी, सार्वजनिक हमामांच्या (निवडणुकांच्या) 'आचारसंहिता' म्हणजे नेमक्या काय असतात म्हणे? 'इस हमाम में सब (उमेदवार) नंगे' असलेच पाहिजेत, वगैरे काही?
अहो हमामांच्या निवडणूका
=))
अहो हमामांच्या निवडणूका उन्हाळ्यात का ठेवतील?
किंवा असही असेल. उन्हाळ्यात निवडणूका घेऊन लगेचच्या ताज्या ताज्या पावसात आंघोळ करायला नवनिर्वाचित सदस्य तयार !
फिल्म आर्काइव्ह फिल्म सर्कल
मागे एकदा ऐसीवर नॅशनल फिल्म आर्काइव्हबद्दल प्रश्न विचारला गेला होता असं आठवतं. फिल्म आर्काइव्हतर्फे 'फिल्म सर्कल' हा उपक्रम चालवला जातो. एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ ह्या काळासाठीचं त्याचं वार्षिक सभासदत्व आता खुलं झालं आहे. फॉर्म्स इथे किंवा आर्काइव्हच्या कार्यालयात मिळतील. ह्या उपक्रमाअंतर्गत दर शनिवारी संध्याकाळी सहा वाजता आर्काइव्हमधला एखादा चित्रपट दाखवला जातो. शिवाय, विविध दूतावासांच्या सांस्कृतिक विभागांतर्फे किंवा इतर सांस्कृतिक संस्थांतर्फे अनेक चित्रपट दाखवले जातात. (उदा : महिला दिनानिमित्त ७ ते ९ मार्चदरम्यान एक महोत्सव आहे. शिवाय, मॅक्स म्युल्लर भवनातर्फे दर महिन्याच्या चौथ्या गुरुवारी जर्मन सिनेमे दाखवले जात आहेत.) फिल्म सर्कलच्या सभासदत्वावर दर वर्षीच्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या प्रवेशिकांवरही सवलत मिळते. इच्छुकांनी लाभ घ्यावा.
पहिला दुवा उघडला.
http://www.nfaipune.gov.in/forms.htm हा दुवा उघडला.
मात्र त्यातले आतले दुवे उघडत नाहित इथून.
तोवर उत्सुकता म्हणून प्रश्न :- ह्याचे चार्जेस किती आहेत ?
घरी जाउन तपासेपर्यंत धीर धरवत नाही.
वार्षिक शुल्क रु.१५०० आहे.
वार्षिक शुल्क रु.१५०० आहे.
फिल्म सर्कल सदस्यत्वाचा फॉर्म
APPLICATION FOR FILM CIRCLE MEMBERSHIP एवढा एकच दुवा फिल्म सर्कलसाठी उपयुक्त आहे. तो उघडतो आहे.
आभार. आताच NFAI ला फोन केला
आभार. आताच NFAI ला फोन केला होता.
फॉर्म सोबत दोन पासपोर्टसाईझ फोटो, फोटो -आयडीची झेरॉक्स लागते.
फी १५०० रुपये आहे, कॅश स्वीकारतात.
८ मार्च
D2R तर्फे "अभिव्यक्त" हा कार्यक्रम.
दिनांक ८ मार्च.
वेळ रात्री साडे नऊ.
स्थळ बालगंधर्व.
ह्या अंतर्गत दोन खेळ आहेत :-
.
"आषाढ शुक्ल पक्ष ११ "
(फिरोदिया करंडक २०१४ मधील अंतिम फेरित पोचलेले. )
.
.
स प महाविद्यालयाचे " प्राणीमात्र " (२०१२ पुरुषोत्तम करंडक विजेते )
ह्याचे इतर यश :-
१.उत्तुंग करंडक विजेता २०१३
२.best experimental play in Purushottam karandak २०१२
३.प्रबोधन करंडक २०१३
४.बारामती मराठी साहित्य संमेलन येथे सादर
.
.
तिकिट :- १५०, १२० , १००
ह्या तारखेस मी पुण्यात नसेन. त्यामुळे जाणार नाही.
माहितीबद्दल धन्यवाद.
माहितीबद्दल धन्यवाद.
छोट्यांसाठी कॅलक्युलस
This comment has been moved here.
सामाजिक एकतेच्या नावाखालचा नॉन्सेन्स
This comment has been moved here.
फास्ट ट्रॅक सर्वोच्च न्यायालय!
This comment has been moved here.
हे वाचा
स्त्रियांना गणित जमत नाही असं तुमचं म्हणणं असल्यास हा रिसर्च पेपर वाचा(निदान अॅब्स्ट्रॅक्ट वाचा), पुरुषांच्या स्वतःला लै भारी म्हणवून घेण्याच्या सवयीमुळे हा समज समाजात रुजला आहे असे ह्यांचे म्हणणे आहे.
+१
सोफी कोव्हालेस्क्या, एम्मी नोएदर, इ. जब्री उदा. पाहिली की बैकांना गणित जमत नै हा दावा किती पोकळ आहे हे कळून येतेच.
'तुमचा' हा प्रतिसाद बघुन
'तुमचा' हा प्रतिसाद बघुन अनेकांचे डोळे पाणावले असणार ;)
बास का आता
बास का आता :D