अलीकडे काय पाहिलंत? - ६
अलीकडे काय पाहिलंत? यातला पाचवा भाग मागे पडल्याने हा नवीन भाग सुरु करत आहे.
मंगलाष्टक वन्समोर पाहिला. (पहावा लागला - काय करणार! दिवस काय सांगून येतो का - तर ते असो.) एकुणच फार अपेक्षा ठेऊन गेलो नव्हतो पण नसलेल्या अपेक्षांपेक्षाही टुकार चित्रपट निघाला. एखाद्या चित्रपटात कथासुत्र/प्रसंग प्रेडिक्टेबल असतील तर समजू शकतो. बॉलिवूड काय किंवा मराठी काय वर्जिनल आड्यांची कमी आहे हे स्वीकारले आहे. पण इथे पटकथा, संवाद, अॅक्टिंग, कॅमेरा, इतकेच काय गाण्याचे बोलही अत्यंत प्रेडिक्टेबल, नीरस व कंटाळवाणे आहेत. एका सीनमध्ये तर "आता ती मागे उभी असेल बघ!" हे आजुबाजुच्या किमान ६ ते ७ लोकांनी मोठ्यानं सांगितलं असावं!
बरं मुक्ताबर्वेच्या अभिनयासाठी जावं तर तोही काही प्रसंगी हास्यास्पद म्हणावा असा 'शिरेस' चेहरा करून ती बसलेली दिसते. या सगळ्या गोंधळात व्यक्तींचे घेतलेले क्लोजअप्स, मेकप व वेशभुषा एवढ्याच काय त्या जमेच्या बाजू ठराव्यात. गुरू ठाकूर सोडल्यास इतरांनी गाणि लिहिणं सोडलंय की काय असं वाटु लागलंय.. तीच ती शब्द योजना, फिरवलेली यमके, उसवलेले धागे आणि जुळलेल्या गाठी ऐकून कानात गाठ बसल्यासारखं झालं आहे
राहता राहिला जोश्यांचा स्वप्नील. त्याने आपले वजन मुळात ७२ किलो(च) असल्याचा आणि चित्रपट संपेपर्यंत ६५ किलो झाल्याचा दावा करणे याहून विनोदी प्रसंग अख्या मराठी चित्रसृष्टित नसावा. अभिनय सोडल्यास त्याने जवळजवळ प्रत्येक गोष्ट यथास्थित पार पाडण्याचे कसब आहे असा समज त्याचे विविध "शो"ज वरील बोलणे ऐकून झाला होता. पण नेमका या चित्रपटात न-अभिनय करावा लागल्याने त्याचाही नाईलाज झाला असावा.
बाकी, जर चित्रपटाचे टायटल इतके रिमोटली साधर्म्य असणारे ठेवायचे होते तर चित्रपटातील पांढर्या व्हाईट्ट रंगाच्या अतिरेकामुळे सदर चित्रपटाचे नाव (केस आणि वर्णसोडल्यास पांढर्यावाईट्टपणाची कमाल केलेल्या) "केशर मडगावकर" ठेवल्यास तितकेच अनुचीत/उचीत वाटले असते.
मद्रास केफे पाहतेय. याची कथा,
मद्रास केफे पाहतेय. याची कथा, त्यातल्या कोणत्या घटना खर्या आणि कोणत्या काल्पनिक असे कुठे सविस्तर वाचायला मिळेल का?
बाब्बौ
लैच वैतागलेले दिसता पिच्चरला.
ग्राम्य भाषेतील शेरा :- शेण खाल्ल्यावर कडवट लागतय म्हणू ने रे बाळा. खान्यापूर्वी इचार करावा.
.
मला मुंबै पुणे मुंबै छान ,फ्रेश वाटला. थेट्रात जाउन पाहिला. तरी मंगलाष्टकचा विचारसुद्धा केला नाही.
.
तुम्ही लोकं मंगलाष्टक वगैरे वगैरे पाहता, ७२ मैल पहात नाही आणि मराठी सिनेमा अगदि छी थू करण्याच्या लायकीचा समजता असे आताच एकाला ऐकवले.
मी अशात ग्रॅव्हिटी पाहिला. जेवधे प्रचंड कौतुक होते आहे, तितका भारी वाटला नाही.
एकुणात आवड, पण असा फार थोर, ऑल टाइम ग्रेट वगैरे वाटला नाही.
त्यात एक वेगलीच गोष्ट जाणवली. ती काय होती? त्यासाठी कथा सांगावी अलगेल थोडिशी:-
कथासूत्र आहे अंतराळप्रवासाबद्द्दल. अंतराळात प्रवास करताना अचानक एका अपघाताने तीन अंतराळयात्री यानापासून दूर जातात.
अंतरळ्...अॅब्सोल्यूत व्हॅक्युम. तुम्ही खरोखरीच, शब्दशः पृथ्वीपासून तुटले आहात. लवकरच जवळचा ऑक्सिजनही संपणार आहे.
तो संपण्यापूर्वी तुम्हाला परतायचे आहे. जवळच्या अंतराळ स्थानकात जाय्चे आहे. त्यात घुसुन योग्य त्या प्रकारे ते स्थान्क निय्म्त्रित कराय्चे आहे.
त्यातला एक भाग घेउन पृथ्वीच्या वातावरनात, हजारो किलोमीटार उंचीवर शिरायचे आहे. त्यानंतरही समस्या संपत नाहित.
वातावरणात तुमचे तो यानचा भाग रॉकेटसारखा सूं सूं करत थेट पृथ्वीकडे काही शे-हजार किलोमीटर प्रतितास च्या वेगाने येतो, तो जिथे कुठे
समुद्रात आदळेल तिथून बाहेर येउन तुम्हाला जीव वाचवायचाय.
ह्या सार्या प्रवासात सारेच, तिघेजण ते करतात असे नाही. केवळ एकच जीव पृथ्वीपर्य्म्त पोचून वाचू शकतो, अपल्य जिद्द , कौशल्य व काहिशा नशिबाने.
आता ह्य सार्या कथाप्रवासात जो शेवटचा यशस्वी जीव मी म्हणालोय, तो बाय दिफॉल्ट कित्येकांना कथेचा नाय्क, म्हणजे हिरो, म्हणजे एखादे पुरुषपात्र वाटते.
पण ग्रॅव्हिटी ह्या चित्रपटामध्ये मात्र त्यांनी सहजतेने ती एक स्त्री दाखवली आहे. ती ही स्त्री नायिका म्हटल्यावर तरुण रसरशीत, टीनेजरच्या जवळ जाणारे(आणि पर्यायाने आकर्षक)
व्यक्तिमत्व तिचे नाहिये. ती एका मुलाची आई आहे. तिचा मुलगा चारेक वर्शाचा असताना दगावलाय. ती कुशल, हुशार आहे म्हणूनच ह्या मोहिमेत निवडली गेलिये हे स्पश्टच आहे.
पण तिच्याकडे हिम्मत आणि प्रसंगावधानही आहे.आपल्याकडे असे कणखर्,मजबूत व्यक्तिमत्व म्हटले की पुरुषप्रतिमा डोळ्यासमोर येते. त्यापेक्षा हे वेगळे वाटले.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
ग्रॅव्हिटी ऑल टैम नसला तरी लै
ग्रॅव्हिटी ऑल टैम नसला तरी लै ग्रेट आहे. नाद नै करायचा.
बाकी पुणे मुंबै पुणे मध्ये अन्य कुठल्याही शॉव्हिनिझमला जागा नसल्याने आम्ही तो पिच्चर फाट्यावर मारलेला आहे. दीज पुणेमुंबै पीपल अँड देअर इन्ब्रीडिंग
कूपामंडूकिझम!! यक्क्स.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
शेण खाल्ल्यावर कडवट लागतय
हम्म्म!!! कळेल कळेल!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
मुळात
त्या बर्वीणकाकूला लोक सहन कसे करू शकतात कळत नै. असो.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
छे! याचा काही प्रतिवादही करणे
छे! याचा काही प्रतिवादही करणे नको वाटते आहे... असो.
तू 'एक डाव धोबीपछाड' हा शिणेमा, 'कबड्डी कबड्डी' हे नाटक, 'घडलंय बिघडलंय' ही मालिका पाहिली आहेस काय?
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
फार कै पाहिले नैये. जेवढे
फार कै पाहिले नैये. जेवढे पाहिले त्यातही लै कै खास नै वाटलेली. मुळातच आवडत नसल्याने "मुक्ता"फळे बरवी येणार कैशी
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
असो. होतं असं कधीकधी! बस
असो. होतं असं कधीकधी! बस खाली.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
होतं असं कधीकधी! बस
हाहाहा
कं ओ कं करता गरीब
कं ओ कं करता गरीब बिचार्यांना असं?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अलिकडे
ऐसीवर 'अलिकडे काय पाहिलंत'-६ ? याच शीर्षकाचे दोन धागे पाहिले.
आम्हीही तिरशिंगरावांवर
आम्हीही तिरशिंगरावांवर स्त्रीसदृश आयडीनाम (तिमा) घेतल्याचा आरोप केल्याचे मिपावर पाहिले
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
धर्म
आज "धर्म" नावाचा सिनेमा नेटफलिक्स वर पाहीला.
हिन्दू-मुस्लिम दंग्याची पार्श्वभूमी असलेला हां सिनेमा, पंकज कपूरने समर्थ अभिनयाने पेलला आहे. "चतुर्वेदी" शैव ब्राह्मणाचे व्यक्तीचित्रण अतिशय इंस्पायरींग झाले आहे. जोडीला स्तोत्रे व मधुर मंत्रोच्चार असलेले सुश्राव्य संगीत हा बेरीज मुद्दा. शास्त्रीय संगीतावर आधारीत ही गाणी तसेच अन्य मंत्र ऐकायला अतिशय गोड वाटतात. चतुर्वेदी ब्राह्मण दाम्पत्य (पंकज कपूर व सुप्रिया पाठक ) एका लहान अनाथ मुलाला ब्राह्मण मूल समजून वाढवते पण हा मुलगा (कार्तिकेय) थोडा मोठा झाल्यावर त्याची मुस्लीम आई येऊन त्याला घेऊन जाते. पण त्या लहानशा घटनेने या ब्राह्मणाच्या घरी काय उलथापालथ होते व त्याला "धर्म" म्हणजे काय हे कोणत्या प्रसंगातून कळते ते पहाण्यासारखे आहे.