पांडव आणि राम ह्यांचे आदर्श.

'पांडव/राम हे वंद्य आहेत ही तर भारतीय संस्कृतीची आधारभूत भूमिका' असे आजच दुसर्‍या एका धाग्याच्या प्रतिसादात मी लिहिले. तेथपासून ही पुढील विचारधारा निर्माण होते.

पांडवांनी राज्याचा वाटा मिळविण्यासाठी कौरवांशी निकराचे युद्ध केले आणि अपरिमित जीवनहानीनंतर त्यांनी नुसता वाटाच नाही, पूर्ण राज्य ताब्यात घेतले ही महाभारताचे मुख्य कथानक. त्यांनी हे जे केले त्याबद्दल सर्व भारतीय त्यांची स्तुतिगीते गात आले आहेत. अशा स्तुतीला ते कितपत पात्र होते आणि, त्याच्याहि पुढे जाऊन, आपल्या वर्तणुकीमधून त्यांनी पुढच्या पिढयांना काय शिकवणूक दिली आणि त्या शिकवणुकीतून पुढच्या पिढयांना कितपत लाभ अथवा नुकसान झाले?

पांडवांच्या पूर्वीच्या अनेक पिढयांकडे नजर टाकता असे दिसते की भारतात बापाकडून मुलाकडे राज्य primogeniture (थोरला मुलगा हा सर्वोत्तम वारस) मार्गाने संक्रमित होत असे. कुरुकुलातहि भरतापासून हीच पद्धति चालू होती. (पांडवांच्या पूर्वीच्या कुरुकुलातील राजांची नावे महाभारतातील आदिपर्वाच्या अध्याय ९४ आणि ९५ येथे पहा - गांगुली भाषान्तर). कौरवपांडवांच्या काळच्या अधिक जवळ आल्यावर दिसतात शंतनूचे दोन मुलगे चित्रांगद आणि विचित्रवीर्य. चित्रांगद गंधर्वांशी लढतांना पडला आणि विचित्रवीर्य राजा झाला. त्याचे तीन मुलगे - धृतराष्ट्र, पंडु आणि विदुर. धृतराष्ट्र अंध असल्याकारणाने तो जरी राजा झाला तरी कारभार प्ंडु करीत असे. ऋषीच्या शापामुळे पंडूला स्वत:चे पुत्र होणार नाहीत असे दिसल्यावर पंडु विरक्त होऊन वनवासात गेला आणि त्याच्या सूचनेवेरून कुंतीने तीन आणि माद्रीने दोन देवांपासून पुत्रोपत्ति करून घेतली तेच पाच पांडव.

हे सर्व लक्षात घेतले की पांडवांचा राज्याचा वाटा मागण्याचा दावा पोकळ होता असे दिसते. ते औरस होते वा नव्हते हा विचार न करताहि पांडवांची अर्ध्या वाटयाची मागणी प्रस्थापित ’राजाच्या थोरल्या मुलाचा हक्क’ ह्या तत्त्वाच्या संपूर्ण विरोधात होता. ’पंडूने काही काळ राज्य केले’ हाही विचार येथे करता येत नाही कारण थोरला भाऊ असतांना पंडु केवळ त्याचा regent म्हणून राज्य करीत होता आणि त्यामुळे त्याच्यापासून पांडवांकडे कोणताच अधिकार संक्रमित होत नाही.

तरीही पांडवांनी इतके मोठे युद्ध केले. ’इतिहास विजेते लिहितात’ ह्या तत्त्वानुसार अर्थातच पांडव हे तत्त्वासाठी भांडणारे आणि कौरव त्यांना विरोध करणारे दुष्ट हा विचार प्रस्थापित झाला पण तो योग्य होता का?

हा प्रश्न केवळ पांडवांच्या झगडून वाटा मिळविण्याइतकाच मर्यादित नाही. त्यातून पुढे मालमत्ता ही संपूर्ण कुटुंबाची आणि प्रत्येक पिढीतील पुरुष सदस्याला त्यातील भाग तोडून मागण्याचा अधिकार आहे ह्या विचाराला चालना मिळाली आणि हा विचार नाना स्मृतींमध्ये ग्रंथबद्ध होऊन भारतीय संस्कृतीचा एक भाग बनला.

भारताच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने हा विचार विनाशकारक ठरला असे दिसते. एकतर जुन्या मालमत्तांचे लहानलहान तुकडे पडत गेल्याने व्यक्तींची आर्थिक क्षमता पिढीमागून पिढी घसरत गेली. मोठ्या मालमत्तांमधून होणारा भांडवलाचा संचय होऊ शकला नाही. दुसरीकडे काहीतरी भाकरतुकडा घरातच उपलब्ध व्हायची शाश्वती मिळाल्याने धडपड करून बाहेर पडण्याला आणि नवे प्रदेश, नवी क्षितिजे शोधण्याला काही अर्थ राहिला नाही. युरोपीय संस्कृतींमध्ये कुटुंबाच्या समाईक मालकीची आणि पिढी-दरपिढी वाटपाची पद्धत नव्हती. मिळकतदार घराण्यांमध्ये सर्व मिळकत बहुतांश थोरल्या मुलाला मिळत असे. अन्य मुलांना स्वत:च्या उपजीविकेचे मार्ग शोधायला लागत असत. काहीजण सैन्यात, काहीजण वकिली-वैद्यकी-चर्च अशा व्यवसायांचे शिक्षण घेऊन तर काहीजण अमेरिका-पूर्वेकडचे देश असे आपापले मार्ग चोखाळत. ह्यातून त्यांचा वैयक्तिक लाभ तर होईच पण त्यांच्या त्यांच्या देशांचा प्रभावहि दूरवर पसरे. ह्यातील काहीच आपल्याकडे घडले नाही आणि त्याला कारण महाभारताने आपल्यापुढे ठेवलेला ’वाटणी मागणे आणि त्यासाठी वेळप्रसंगी एकमेकांच्या उरावर बसणे योग्यच’ हा धडा.

पांडवांप्रमाणे राम हा आपला एक आदर्श. पण त्याचे वागणे सर्वकाळ आदर्शवत् होते काय? सीतात्यागाच्या बाबतीत त्याचे वर्तन मला वैयक्तिक पातळीवर निंदनीय आणि राजा म्हणून कर्तव्यच्युति दर्शविणारे वाटते.

रावणाच्या पराभवानंतर आणि वधानंतर सीता रामाकडे परत आली आणि त्याने तिला आपले पावित्र्य सिद्ध करण्यासाठी अग्निदिव्य करून दाखवायला सांगितले. (फेमिनिस्टांचा पहिला आक्षेप येथेच आहे पण माझा मुद्दा तो नाही.) ती दिव्याला उतरली आणि हे रामाने स्वत: पाहिले. तरीहि काही वर्षांनंतर एका धोब्याने काही शंका व्यक्त केली आणि एव्हढयावरून त्याने सीतेचा त्याग केला. ’स्नेहं दयां च सौख्यं च यदि वा जानकीमपि। आराधनाय लोकानां मुञ्चतो नास्ति मे व्यथा॥’ असे त्याचे कारणहि दिले.

लोकाराधन राजाने करावे हे योग्यच आहे पण त्याला किती महत्त्व द्यावे? ’काहीहि करेन पण लोकाराधन करेन’ इतक्या टोकाला ते नेणे योग्य आहे काय? राजाची अन्यहि कर्तव्ये असतात. प्रजेच्या अधिकारांचे रक्षण हे एक राजाचे महत्त्वाचे कर्तव्य आहे. आपल्या पावित्र्याची सत्यता आणि शीलावर डाग न लागणे हा सीतेचा अधिकार होता आणि रामाला तो ठाऊक होता. तरीहि रामाने येथे त्याची पायमल्ली करून लोकाराधनाला प्राधान्य दिले. त्याने हे योग्य केले काय? ’आपल्या सिंहासनाला धक्का पोहोचू नये’ म्हणून त्याने अबलेचा बळी दिला असे म्हणता येईल काय?

आपणांस काय वाटते?

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3.2
Your rating: None Average: 3.2 (5 votes)

रामाबद्दलच्या सर्व आक्षेपांशी सहमत आहे. तपश्चर्या करणार्‍या शंबूक नामक शूद्राचे डोके उडवणे हा अजून एक आक्षेप मी त्यापुढे जाऊन जोडेन. लोकरञ्जनासाठी इतक्या थराला जाणे माझ्यालेखी सर्वथा अयोग्य. रामाच्या जागी कृष्ण असता तर त्याने त्या धोब्यावरच खोटानाटा आरोप लगावून त्याला अयोध्येबाहेर हाकलले तरी असते नाहीतर शुद्धता सिद्ध करायला अग्निपरीक्षा तरी करायला लावली असती असे माझे प्रामाणिक मत आहे.

बाकी पांडवांवरचे आक्षेप जरा हुकलेले वाटतात. म्हणजे मूळ दावा पोकळ असेलही, पण विशेषतः त्याचा पुढील इतिहासाशी लावलेला संबंध. मला अशी सरणी नेहमी रंजक आणि अतिशय चुकीची वाटत आलेली आहे. गेल्या २००-३०० वर्षांतल्या काही घडामोडींमुळे युरोप अख्ख्या जगाच्या डोक्यावर बसला. राव मेले आणि पंत चढले. मग राव का मेले तर ते मरायच्याच लायकीचे होते, पंतांचा त्यात काही संबंध नाही असे म्हटल्यासारखेच दिसते. प्रिमॉजेनिचर पद्धतीमुळे युरोपचा जर फायदा झाला तर गेली हजारो वर्षे तो व्हायला पाहिजे होता. पण ट्रोजन युद्धापासून आत्तापर्यंतचा काळ पाहिला तर वसाहतवाद अन ग्रीकोरोमन काळ (हेही पूर्णपणे खरे नाही) सोडला तर युरोप गंडलेलाच होता.

भारताच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने हा विचार विनाशकारक ठरला असे दिसते. एकतर जुन्या मालमत्तांचे लहानलहान तुकडे पडत गेल्याने व्यक्तींची आर्थिक क्षमता पिढीमागून पिढी घसरत गेली. मोठ्या मालमत्तांमधून होणारा भांडवलाचा संचय होऊ शकला नाही. दुसरीकडे काहीतरी भाकरतुकडा घरातच उपलब्ध व्हायची शाश्वती मिळाल्याने धडपड करून बाहेर पडण्याला आणि नवे प्रदेश, नवी क्षितिजे शोधण्याला काही अर्थ राहिला नाही. युरोपीय संस्कृतींमध्ये कुटुंबाच्या समाईक मालकीची आणि पिढी-दरपिढी वाटपाची पद्धत नव्हती. मिळकतदार घराण्यांमध्ये सर्व मिळकत बहुतांश थोरल्या मुलाला मिळत असे. अन्य मुलांना स्वत:च्या उपजीविकेचे मार्ग शोधायला लागत असत. काहीजण सैन्यात, काहीजण वकिली-वैद्यकी-चर्च अशा व्यवसायांचे शिक्षण घेऊन तर काहीजण अमेरिका-पूर्वेकडचे देश असे आपापले मार्ग चोखाळत. ह्यातून त्यांचा वैयक्तिक लाभ तर होईच पण त्यांच्या त्यांच्या देशांचा प्रभावहि दूरवर पसरे. ह्यातील काहीच आपल्याकडे घडले नाही आणि त्याला कारण महाभारताने आपल्यापुढे ठेवलेला ’वाटणी मागणे आणि त्यासाठी वेळप्रसंगी एकमेकांच्या उरावर बसणे योग्यच’ हा धडा.

यातल्या अधोरेखित वाक्यांना आक्षेप आहे. नवे प्रदेश, नवी क्षितिजे शोधणे हे कैक वेळेस घडले आहे.

१. अख्ख्या सेंट्रल एशिया भागात भारतीय व्यापार्‍यांचे भले मोठे जाळे मध्ययुगात होते. (एकच संदर्भ: इंडियन्स इन इन १७ & १८वे शतक)

२. आग्नेय आशियात शेकडो वर्षे कितीतरी भारतीयांची आवकजावक सुरू होती.

३. १७ व्या शतकापासून किंवा जरा आधीपासूनच दक्षिणेत बरेच मराठी लोक घुसले होते. १८व्या शतकात तर मराठे अख्ख्या भारतभर पसरले होते. कितीतरी मराठी लोक आपले नशीब आजमावायला महाराष्ट्र सोडून भारतभर राहिले होते.

४. भांडवलाच्या संचयाबद्दलच बोलायचे झाले तर जगत्शेठ, उमीचंद, खोजा वाजिद, सुरतेचे बोहरा लोक, यांसारखे अनेक श्रेष्ठी वर्षानुवर्षे होत आलेले आहेत. कितीक बौद्ध लेण्यांच्या पेट्रन्समध्ये असे श्रेष्ठी असल्याची नोंद आढळते. त्र्यंबक शंकर शेजवलकरांच्या लेखसंग्रहात एका भारतभर आपल्या पेढ्यांचे नेटवर्क असणार्‍या आणि इंग्रजांना कैक लढायांत पैसे किंवा अन्य प्रकारे मदत करणार्‍या एका गुजरातेकडील अतिपॉवरफुल व्यापारी घराण्याची माहिती आलेली आहे. इटलीमधील मध्ययुगीन काळातल्या "मेडिची" परिवाराचाच हा अवतार म्हणावा लागेल.

तस्मात ही कारणमीमांसा अतिशय सरसकट असल्याने मला चूक वाटते. महाभारताचा प्रभाव स्मृतीग्रंथांवर आणि समाजावर पडला हे खरे आहे, पण तो प्रभाव इतका ताणणे तर्कसुसंगत आणि तथ्याला धरून नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बॅटमॅनशी सहमती दर्शवावी वाटते.
शिवाय ललितादित्य या काश्मिरी राजाने तुर्कस्तानवर हल्ला केला. http://en.wikipedia.org/wiki/Lalitaditya_Muktapida
अशोक व चंद्रगुप्ताचे राज्य पश्चिमेकडे होते. आसामच्या ताब्यात बर्मा आणि बर्माच्या ताब्यात आसाम असे बरेचदा घडले आहे असे वाचल्याचे आठवते.

शिवाय असलेल्या राज्यपद्धतीस विरोध करणे, नवी राज्यपद्धती रुजवणे यात काही गैर नसावे. जुन्या राज्यपद्धतीत चांगली मूल्ये डावलली जात, ती पद्धत सुधारली, तर तसे करणारांस वेगळे मूल्यमापन वापरावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सहमत. एक लहानशी दुरुस्ती: ते तुर्कस्तान म्हंजे ग्रीसच्या पूर्वेकडचे तुर्कस्तान अर्थात सध्याचा तुर्की देश नव्हे तर ज्याला "चायनीज तुर्कस्तान" म्हणतात तो भाग, म्हणजे इराणच्या उत्तरेकडचा भाग. अर्थातच तेही राज्यविस्ताराच्या अंडर येतेच.

यात अजून एक उदाहरणः राष्ट्रकूट राजांची राजधानी उत्तर कर्नाटकातले मान्यखेट ऊर्फ मालखेड होती. अन सलग दोनेकशे वर्षे ते दक्षिणेला पार रामेश्वरम्-श्रीलंका ते उत्तरेला बुंदेलखंड, पश्चिमेला गुजरात तसेच पूर्वेला बंगालपर्यंत गेलेले होते. चोऴ राजांचे एक्स्पान्शन तर जगप्रसिद्धच आहे.

इतके सारे असताना इन्सुलारिटीचा आरोप वाचून मजा वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

राष्ट्रकूट राजांची राजधानी उत्तर कर्नाटकातले मान्यखेट ऊर्फ मालखेड होती>>> मालखेड नव्हे मळखेड.(कलबुर्गी ऊर्फ गुलबर्ग्याजवळच्या या खेड्यात मी जाऊन आलेलो आहे. तिथे आता उत्तरादी मठाचे मोठेच काम सुरू असते.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओह अच्छा, माहितीकरिता धन्यवाद Smile निव्वळ इंग्रजी स्पेलिंगवरूनच मराठी स्पेलिंग बनवायला गेलं की असंच होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

महाभारताच्या युद्धाबद्दल मला गंमत वाटते ती अशी की आजूबाजूचे सगळे राजे तिथे मारामारी करायला आले. हे राजे, त्यांची राज्यं आणि तिथल्या सामान्य लोकांचा (यांना लोकशाहीच्या अभावामुळे नागरिक म्हणावं का?) या लढाईशी फार संबंध होताच असं नाही. (हे अमेरिकेत १८७०-८० च्या दशकात घडलेल्या लिंकन परगण्यातल्या मारामारीसारखं वाटतं. दोघांची मारामारी सुरू झाली तेव्हा प्रत्येकाने दोघांपैकी एकाची बाजू घेतली. या मारामारीतलं बिली द किड हे पात्र प्रसिद्ध आहे.)

शिवाय प्रत्यक्ष हस्तिनापूर राज्यातल्या लोकांना काय हवं होतं, सुरूवातीला धृतराष्ट्र आणि नंतर दुर्योधन राजे म्हणून कसे होते याचा काहीही विचार नाही. म्हटलं तर लोकशाही ते तत्त्व फार अलिकडच्या काळातलं. पण राजघराण्यातल्या दोन-चार लाडल्यांच्या अट्टाहासाखातर किती लोकांचा जीव गेला, युद्धाचे परिणाम किती लोकांनी, कसे भोगले याबद्दल कोणालाही काहीही म्हणावंसं वाटत नाही! अगदी मुत्सद्दी, तत्त्वज्ञान सांगणार्‍या कृष्णालासुद्धा कसली पर्वा, तर आपली आतेभावंडं राज्यावर आली पाहिजेत. या कृष्णाला देव मानणार मात्र कोण, युद्धात चिरडले जाणारे सामान्य लोकच.

ब्रिटीशांविरोधात नाविकांनी बंड केलं होतं तसं कौरव-पांडवांविरोधात सामान्य सैनिकांनी बंड केलं असतं तर? "जा तुमच्या घरच्या वाटण्या करायच्या त्या करा, आम्हाला नाही त्यात पडायचं! नाहीतरी तो अर्जुन्या रडारड करणार कशाबद्दल? तर आप्तांवर बाण चालवावे लागणार याबद्दल! आमच्या जीवाची पर्वा त्याला नाही तर आम्ही कशाला त्याच्या न्याय्य-अन्याय्य मागण्यांची, त्याला त्याच्या बायकोवर झालेल्या अन्यायाचा बदला घ्यायचाय, त्याची पर्वा करावी? बघ म्हणावं स्वतःचं स्वतः काय ते! नाहीतरी स्वतःला थोर्थोर धनुर्धर म्हणवतोसच ना! दाखव आता तुझ्या गांडीवात किती ताकद आहे ते!" (स्वगतः आज पहिल्यांदा त्या धनुष्याच्या नावाचा योग्य वापर करता आला.)

---

रामायणातला रावणाला मारल्यानंतरचा भाग, सीतात्याग वगैरे प्रक्षिप्त आहे असं म्हणतात. पण यातून फारतर वाल्मिकीची सुटका होते. ज्यांनी कोणी या शंबूक, धोबी-सीतात्याग वगैरे गोष्टी लिहील्या आणि ज्यांनी त्या पुढे चालवल्या त्यांनाही यात काही आक्षेपार्ह वाटलं नाही. तुलसीदासानेही 'ढोर, गँवार, शूद्र, पशु, नारी, ते सब ताड़न के अधिकारी' असं लिहीलं, पण तरीही तुलसीदास संत वगैरे वगैरे.

'इतिहास विजेते लिहितात' हे खरंच. आणि लोकही चिकीत्सा न करता तेच खरं, आदर्श वगैरे मानतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

"नाहीतरी स्वतःला थोर्थोर धनुर्धर म्हणवतोसच ना! दाखव आता तुझ्या गांडीवात किती ताकद आहे ते!"

अच्छा!

म्हणजे, पूर्वी गिरगांव, मुंबई ४ येथून प्रसिद्ध होणार्‍या गोष्टींच्या कोठल्याही पुस्तकातील राजकन्येचे अपहरण करणार्‍या राक्षसाचा जीव कोठेतरी दूर लपवून ठेवलेल्या एखाद्या मण्यात नाहीतर रत्नात असे, जेणेंकरोन त्याच्या अंगावर कोणी थेट तलवारीने वार केले, तरीही त्यास काऽहीही होत नसे, परंतु आमच्या हीरो राजपुत्रास तो मणी नाहीतर ते रत्न सापडून त्याने ते चिरावयास सुरुवात केली, की लग्गेच याच्या शरीरातून रक्ताच्या चिळकांड्या उडो लागून तो भेसूर ओरडू लागत असे, नि राजपुत्राने त्या मण्याचे दोन तुकडे केले रे केले, की गतप्राण होऊन तो (बोले तो, राक्षस) धाडकन पडत असे (नि मग कुठली ती राजकन्या नि कुठला तो राजपुत्र सुखाने नांदू लागत)...

...तद्वत अर्जुनाची ताकद त्याच्या गांडीवात होती काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुलसीदासानेही 'ढोर, गँवार, शूद्र, पशु, नारी, ते सब ताड़न के अधिकारी' असं लिहीलं, पण तरीही तुलसीदास संत वगैरे वगैरे.

१. मीरेचेही तेच कि. नवर्‍याचा किती का मानसिक छळ होईना, कृष्णच माझा नवरा म्हणून कोठेही सांगायची. पण तरीही संत. सगळेच संत बरखास्त केले पाहिजेत. प्रत्येकाची एक चूक त्यासाठी पुरेशी ठरावी. डार्वीनबाबामुळे महायुद्धे झाली, म्हणून सारे शास्त्रज्ञही, प्रत्येकी एक चूक काढून, खारीज करावेत.

२. ढोर आणि पशू आजही ताडन के अधिकारी आहेत. उलट त्यांच्या यांत्रिक कत्तलींचे कारखाने आहेत. सौख्य हे बुद्धीचे फंक्शन ठरवून गवार लोकांची मस्तच होत असणारी चम्पी आपण रोज पाहतो. स्त्रीया व शूद्र बद्दल तुलसीदास बोलला हे त्याचे निरीक्षण आहे कि सल्ला आहे? शिवाय मला कधी कधी 'ताडन के अधिकारी' मंजे 'ज्यांना मारायचा अधिकार आहेत ते' असे वाटते.

'इतिहास विजेते लिहितात' हे खरंच. आणि लोकही चिकीत्सा न करता तेच खरं, आदर्श वगैरे मानतात.

म्हणूनच का आज सगळं उघडं होतंय? इतिहास कोणीही लिहो, सहसा सत्य (काय झाले) लिहिले जाते, पण त्याचा दॄष्टीकोन वेगळा मांडला जातो. एकलव्य, शंबूकाची कथा गाळायला फार कष्ट पडले नसते. तीन सत्यांमुळे रामाला पूर्वीसारखे न पाहता त्याची निगेटीव कशी दिसेल तसे पाहणे अन्यायकारक आहे. आणि हाच रामाला लावलेला फॉर्म्यूला सर्वाना लावला तर इतिहासातले सगळेच लोक महाहरामखोर दिसतील. १६ वर्षाच्या मायनर (पर)स्त्री सोबत गांधीजी, स्वतः म्हातारे आणि भारतात प्रसिद्ध नेते असताना, नागडे झोपले हे त्यांना कचर्‍यात काढायला पुरेसे आहे. काय म्हणता, उतरवायचे का सगळे फोटो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मी सोडून इतर कोणी/कोणाला मारायचं याबद्दल मीरा काहीही बोलली नाही. तिने तिच्या अखत्यारित स्वतःच्या आयुष्याचं जे काही करायचं ते केलं, त्याची तुलना तुलसीदासाशी कशी करणार?

डार्वीनबाबामुळे महायुद्धे झाली, म्हणून सारे शास्त्रज्ञही, प्रत्येकी एक चूक काढून, खारीज करावेत.

डार्विनआधी युद्ध झाली ती काय डार्विनच्या भूतामुळे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

१. मीरा- मीरेने नवर्‍याला न सोडता त्याची अखंड बदनामी केली. त्याला शरीरसुख दिले नाही आणि सर्वांना माझा नवरा कृष्ण आहे असे सरळ सांगायची. हे वर्तन नि:संशय संताचं नाही.
२. डार्वीन - हा युक्तिवाद 'काल अरुणने बुंदीचा लाडू खाल्ला' असे कोणी खरे खरे म्हटले तर 'त्यापूर्वीचे बूंदीचे लाडू अरुणचे भूते खात होती का?' असे विचारल्यासारखे आहे. म्हणजे अगदी अभिषेक मनु संघवी पण अजून असा युक्तिवाद करताना ऐकले नाहीत इतका नॉव्हेल आहे.
३. गाधीजींचे सरकारी दफ्तरांतले आणि पोलिस स्टेशनातले फोटो उतरवण्यावर सहमती आहे का?

महान लोकांनी महान असावे अशी अपेक्षा करताना सामान्य लोकांनी क्रूर होऊ नये अशी अपेक्षा अवाजवी आहे का? आपल्या आयुष्यात आपण किती चूका करतो आणि लोकांच्या नैतिकानैतिक वर्तनाची क्षमतांची चाचणी घेणारे प्रसंग आले आपण काय वर्तन केले असते हे दहादा विचार करून पाहावे. मूलतः महान असण्यासाठी निसर्गाने कोणतीही प्रजाती बनवली नाही, तरी लोक इतके महान असतात, यात थोडा आनंद मानू नये का?

रामायणाचे शुद्धीकरण केले (म्हणजे काल्पनिक भाग काढून टाकला) तर पूर्ण कथेत तो माणूस जसा वागला आहे त्याला 'वाईट' म्हणणे अन्याय्य आहे. आणि गेल्या शतकातल्या सर्वात महान माणसाच्या आदर्शाला जर आपण वाईट म्हणायला तर ते पाप्याच्या पितरांनी टायसनला दुर्बल म्हटल्यासारखे आहे.

कोण आहे रे तिकडे? ती ऋषिकेशची स्वाक्षरी जरा वाचून दाखवा पाहू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

१. मीरा - १५-१६ व्या शतकात बंडखोरी करणार्‍या स्त्रीला संत म्हणायला मी तयार आहे. "माझ्या इच्छेविरोधात माझं लग्न लावून देऊ शकाल, पण दुसर्‍या व्यक्तीला माझा नवरा म्हणण्यापासून मला कसं रोखणार?" ही तिची बंडखोरी मला प्रशंसनीय वाटते. आपल्याकडे २० व्या शतकातही जबरदस्तीने भलत्याशी लग्न लावून देणे, हे प्रकार प्रत्यक्षात दिसतात त्यामुळे १४-१५ व्या शतकात तिने केलेली बंडखोरी अधिक महत्त्वाची वाटते. (हे फक्त मुलींच्या लग्नाच्या बाबतीतच होतं नाही. यासंदर्भातला विनय पाठकची प्रमुख भूमिका असणारा 'अंतर्द्वंद्व' नावाचा हिंदी चित्रपट चांगला आहे.) व्यक्तिस्वातंत्र्य हे मूल्य उच्च मानत असल्यामुळे, त्यासाठी बंडखोरी करणारी मीरा मला आवडते. व्यक्तिगत आवडीनिवडीच्या पातळीवर तिच्या भजनांना लावलेल्या चाली, आणि ते संगीतही मला आवडतं.

२. उत्क्रांती/डार्विनमुळे युद्ध कशी काय झाली हे समजलं नाही? उत्क्रांती बाकीच्या प्राण्यांनाही तेवढीच लागू आहे, पण त्यांच्यात नाही काही युद्धबिद्ध होताना दिसत. एकाच जातीचे नर एकमेकांशी विणीच्या हंगामाच्या वेळेस भांडताना दिसतात, तेवढंच.

३. गांधीजींच्या फोटोंबाबत प्रश्नाचा रोख समजला नाही. (व्यक्तिशः मला तो फोटो असला-नसला काही फरक पडत नाही.)

रामायणाचे शुद्धीकरण केले (म्हणजे काल्पनिक भाग काढून टाकला) तर पूर्ण कथेत तो माणूस जसा वागला आहे त्याला 'वाईट' म्हणणे अन्याय्य आहे.

असं काही मी तरी म्हटलेलं नाहीये. राम कसा वागला यापेक्षा त्याच्या कोणत्या वर्तनाच्या वर्णनाचं उदात्तीकरण होतं याकडे माझा रोख आहे. राम प्रत्यक्षात होता का नव्हता हे ही माहित नाही तर तो वाईट, का कसा हे ठरवणंही फार लांबचं.

अवांतरः इयत्ता दहावीच्या इतिहासाच्या परिक्षेत पहिल्या/दुसर्‍या महायुद्धाची कारणं लिहा, असा दहा मार्कांचा प्रश्न येणारच अशी पैज मैत्रिणींसोबत मारून ती जिंकली होती. दुर्दैवाने त्या प्रश्नाचं उत्तर, "डार्विनमुळे" असं लिहावं असं शिकवलं गेलं नाही आणि सुचलंही नाही. पाच अक्षरांत दहा मार्क, हे दहावीत फारच चांगलं डील झालं असतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

१. मीरा संत तर जाऊच द्या, ती एक रॅशनल व्यक्तिपण नव्हती. तिचे वागणे इतके उलटसुलट आहे कि तिने एका राजाचे जीवन बर्बाद केले असा अर्थ काढता येतो. असे माझे तिच्या सामान्य जीवनाबद्दलचे वाचन आहे. तरीही मी तिला महान संत म्हणतो. एखादा अपराध क्षम्य.
२. डार्वीन, वॉर, युजेनिक्स, हिटलर, आफ्रिकन/अमेरिकन युद्धे या टर्म्स एकत्र गुगला. दहावी पर्यंत आम्हाला रामाचे कितीतरी उल्लेख सहन करावे लागले पण शंबूक अगदी अलिकडे वाचण्यात आला. तुकारामाच्या शिव्या पण. 'आणि ग्रंथोपजिविए' चा अर्थ पण. त्याने माझ्या त्यांच्या प्रतिमांना जबर्‍या धक्का बसला, पण असे नव्हतेच असे मी दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमाचे आधारे म्हणू जात नाहीय.
३. गांधीजी, irrespective of the example I have cited, आपल्याला महान वाटतात का असा तो प्रश्न आहे.

राम प्रत्यक्षात होता का नव्हता हे ही माहित नाही तर तो वाईट, का कसा हे ठरवणंही फार लांबचं.

आपल्याला राम नव्हता असे जेव्हा म्हणायचे असते तेव्हा काल्पनिक माणसाच्या दुर्गुणांना दुर्लक्षुन त्याला आदर्श मानणार्‍या लोकांवर टिका अभिप्रेत असते असे का? जेव्हा होता असे म्हणायचे असते तेव्हा राम आणि त्याला मानणारे लोक दोहोंवरही टिका अभिप्रेत असते असे का? कारण राम नव्हता असे माझे सबल मत आहे आणि 'होता कि नव्हता' या मताबद्दलही आदर आहे, तेव्हा त्याला 'आदर्श कि नाही' म्हणून ऐरणीवर घेतले कि मी त्याची ट्रीटमेंट कशी करायची याबद्दल पूर्णतः नॉनप्लस होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

१. राजाच्या जीवनाची काय ती किंमत, मीरेच्या इच्छा-आकांक्षा, निवड, आयुष्याची नाही असं म्हणायचं का? समजा मीरा रॅशनल व्यक्ती नव्हती तर तिच्याशी लग्न करणार्‍या राजाची काय पत म्हणायची?
२. अहो गूगल करायचं तर डार्विन आणि क्रिएशनिझम याबद्दलही एकत्र लिखाण सापडेल. गूगल केलं तर उडणारा शेवई राक्षसही सापडेल; मग काय लगेच तो खरा मानायचा का? लोकांना बरंच काही म्हणायचं असतं, आणि इंटरनेटवर बरंच काही सापडतं. म्हणून ते सगळं खरं, ग्राह्य, योग्य असतं असं नाही. डार्विनबद्दल हे असं (काहीबाही/कैच्याकै) गूगलण्यापेक्षा डार्विनने लिहीलेली पुस्तकं (Journey of Beagle, On the origin of species) वाचणं अधिक सुज्ञपणाचं आहे.
३. गांधीजी आणि राम ही तुलना, या संदर्भात, मला मान्य नाही. राम ही व्यक्ती प्रत्यक्षात होती याचा काहीही पुरावा नाही, त्यामुळे रामावर टीकाटिप्पणी ही लोकसमजूतींवर टीकाटिप्पणी अशी वाचावी लागते. प्रत्यक्ष राम हा फक्त प्लेसहोल्डर आहे. गांधीजींवर केलेली टीकाटिप्पणी ही मात्र त्यांच्यावरच केलेली असते. त्यामुळे अजूनही Does not compute.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

समजा मीरा रॅशनल व्यक्ती नव्हती तर तिच्याशी लग्न करणार्‍या राजाची काय पत म्हणायची?

हे म्हणजे आयुष्यातल्या एका निर्णयावरून अख्ख्या आयुष्याचे मूल्यमापन करण्याचा प्रकार झाला. अतिशय हास्यास्पद आणि अर्थातच चूक.

बाकी चालू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एका माणसाच्या आयुष्य, निर्णयापेक्षा दुसर्‍याचं आयुष्य, निर्णय महत्त्वाचे ठरवायचेच असतील तर मग कोण किती "पाण्यात आहे" याचंही मूल्यमापन केलेलं बरं.

बरं हा एक निर्णय म्हणजे घराला रंग कोणता लावायचा किंवा कोणता फोन विकत घ्यायचा, अशा प्रकारातला नाही; आयुष्याचा प्रश्न आहे. होणार्‍या बायकोवर हे लग्न लादलं जातंय आणि राजा (किंवा राजपुत्र) असूनही भोज हे सगळं घडू देतो तर मग त्याच्याबद्दल काय बरं बोलावं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

एका माणसाच्या आयुष्य, निर्णयापेक्षा दुसर्‍याचं आयुष्य, निर्णय महत्त्वाचे ठरवायचेच असतील तर मग कोण किती "पाण्यात आहे" याचंही मूल्यमापन केलेलं बरं.

म्हंजे कुणी गाय मारली म्हणून मी वासरू मारणारच तर. चालूदे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

व्यक्तिगत आवडीनिवडीच्या पातळीवर तिच्या भजनांना लावलेल्या चाली, आणि ते संगीतही मला आवडतं.

ही कृष्णप्रेमाविण मीरेची कल्पना रोचक आहे. इथे आपण 'चालीच' आणि 'संगीतच' असे शब्द वापरलेले नाहीत, पण तसा वास येणाराला येतोच. हे वाक्य म्हणजे 'मला केळाचं अन्नमूल्य आणि चव यांच्यात रस नाही पण त्याचा आकार आणि त्याच्या गाभ्याचा पांढराशुभ्र रंग सुखावतो' असं म्हटल्यासारखं आहे. निरिश्वरवादाचा आणि निर्धर्मतेचा इतका अट्टाहासाने, वारंवार करावा वाटणारा उल्लेख वाखाणण्याजोगा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

रामायणाचे शुद्धीकरण केले (म्हणजे काल्पनिक भाग काढून टाकला) तर पूर्ण कथेत तो माणूस जसा वागला आहे त्याला 'वाईट' म्हणणे अन्याय्य आहे.

रामायणातली अस्त्रे, शाप, इ. सगळे काढून टाकले तरी सीतात्यागाचा ठपका बसायचा तो बसतोच-शंबूकाचाही ठपका आहेच, पण तो एकवेळ काळानुरूप म्हणून सोडून देऊ. अग्निपरीक्षा का काय ती सार्वजनिकपणे घेऊनही सीतेचा त्याग करण्याची कृती कैच्याकै होती असे माझे मत आहे. नंतरच्या राज्यकारभारात भलेही तिची मूर्ती शेजारी बसवली असेल, भलेही दुसरे लग्न केले नसेल, एकबार बूंद से गयी वो हौद से नही आती. इथे तर जातानाच हौदाने गेलीये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

"मीरेने नवर्‍याला न सोडता त्याला शरीरसुख दिले नाही, हे वर्तन नि:संशय संतांचे नाही"
विषयसुखात अधिक रस नसणे, किंबहुना त्याप्रति वैराग्य असणे, हेच तर संतांचे एक (एकमेव नव्हे) लक्षण आहे.
शिवाय संत हे त्या त्या काळातले बंडखोरही असतात. त्या त्या काळातल्या समाजहितविरोधी रूढींच्या विरोधात अनेक संतांनी बंड केले आहे.
नवर्‍याला शरीरसुख नाकारण्याचा मीरेचा निर्णयही असाच एक बंडखोर निर्णय आहे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात डॉ.रखमाबाई यांनी नवर्‍याला काँज्युगल राइट्स नाकारल्याच्या कारणाने त्यांच्यावर घातलेल्या फिर्यादीचा खटला मुंबई इलाख्यात, भारतभर आणि इंग्लंडातही गाजला. टिळकप्रभृतींनी रखमाबाईच्या विरोधात नाके मुरडली. विसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जर ही घटना इतकी खळबळकारक आणि संतापजनक ठरली तर सोळाव्या शतकात ती किती क्रांतिकारी ठरली असेल याचा अंदाज घेता येतो.
मांडलेल्या प्रपंचाचा त्याग आपल्या ध्येयशोधासाठी किंवा विवक्षित ध्येयपूर्तीसाठी करणार्‍या अनेक पुरुषांना संतपद आणि गौरवप्राप्ती झाली, हे आपण वर्तमानातही पाहातो.
मग सोळाव्या शतकातल्या मीरेनेच असे काय मोठे पाप केले?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत आहे.

समांतरः इथे मीरेचे माहित नाही, मात्र एकुणातच "एसेक्श्युअल्स" किंवा "डेमिसेक्श्युअल्स" (बर्‍याच अधिक मर्यादेहून प्रेमभावना असल्याशिवाय संभोगेच्छा न होणारे) ना समलिंगी/उभयलिंगी/भिन्नलिंगी/तरललिंगी यांच्यापेक्षाही अधिक मनस्ताप व प्रसंगी अवहेलनेला सामोरे जावे लागते. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

या प्रवृत्तीचा जळजळीत निषेध असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कालच मकी यांनी लिहीलेला "डॉ रखमाबाई - एक दीपशिखा" नावाचा छान लेख वाचला. एक मिनीट दुवा देते.
_____
http://aisiakshare.com/node/2220

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

लेख आवडला!
असेच काहीसे विचार करून निशाण नावाची एक कविता लिहीली होती ते आठवले.
मिसळपाववरच्या काही धर्माभिमानी लोकांना ते आवडले नव्हते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पांडव हे जसे बाहेरच्या लोकांपासून झालेले पुत्र होते तसेच कौरवही मूळ वंशाचे नव्हतेच. धृतराष्ट्र, पंडु हेही नियोग पद्धतीनेच झाले होते. विदुर हा तर नियोग पद्धतीने झालेला दासीपुत्र होता. म्हणजे यापैकी कोणीही शंतनुचे खरे वंशज नव्हते. त्यामुळे हस्तिनापुरावर यापैकी कोणाचाच हक्क नव्हता. होता तो फक्त भीष्माचा.
माझा एक मित्र, महाभारताला 'अ स्टोरी ऑफ बास्टर्डस' म्हणत असे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण ते एवढं उघडंवाघडं जीवशास्त्रीय सत्य 'बीज-क्षेत्र न्याय' या नावाखाली चालवून घेतलं. (आपल्याला हव्या त्या लोकांचं वर्तन कोणालाही खटकू नये म्हणून तसे नियम बनवायचे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

रामायण आणि महाभारत ही मौखिक परंपरेने चालत आलेली, वेळोवेळी भर पडत गेलेली काव्यं आहेत हे लक्षात घ्यायला हवं. कौरव पांडवांच्या कथेत जेते चांगले, हरलेले वाईट हे निश्चितच लिहिलेलं आहे. रामरावणाच्या कथेतही तेच आहे. यापलिकडे येणाऱ्या नैतिक टिप्पण्या या वेळोवेळी उत्क्रांत होत गेल्या असाव्यात याबद्दल शंका वाटत नाही.

कदाचित मूळ कथेत रावणाने सीतेला पळवून तिला ठेवून घेतलं असंही असू शकेल. तिची योनीशुचिता जपण्यासाठी अग्निप्रवेशाची कथा नंतर आली असणं सहज शक्य आहे. तेवढं पुरेसं नाही म्हणून की काय, तर धोब्याच्या म्हणण्यावरून सीतेला टाकणं हीही कथा नंतर आली असू शकेल. तसं असेल तर समाजाची बदललेली मूल्यं कथांमधून परावर्तित झालेली दिसतात असं म्हणता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुळात रामायण व महाभारत ही तत्कालिन काही सत्य पात्रे, स्थळे वापरून लिहिलेली 'ललित' काव्य आहेत असे मला वाटते. काही प्रत्यक्ष प्रसंग तर बर्‍याचशा कल्पना इतके बेमालूम मिसळल्या आहेत की या महाकाव्यांच्या एकूण एक कवींचे कौतूकच वाटत आले आहे (अर्थातच दोन-तीनशे वर्षात तयार झालेल्या काव्याला अनेक कवी असणार व्यास वगैरे केवळ कंसेप्टचे पायोनियर असावेत Wink ).

त्याचबरोबर त्या काव्यांचा उपखंडच नव्हे तर उपखंडासोबत सुदूर आग्नेय आशियापर्यंत असलेला प्रभाव चकीत करणारा आणि ग्राह्य आहे हे मान्य आहे.

मात्र प्रस्तूत लेखन एखाद्या कवीने आपल्याच नायकाला चांगले का रंगवले? हा प्रश्न विचारताना दरम्यानच्या काळाला विचारात का घेत नाहीये हे समजले नाही. महाभारताच्यावेळची नितीतत्त्वे, राजतत्त्वांचे त्यावेळच्या काव्यात स्वाभाविक प्रतिबिंब पाडणार्‍यांना, त्या काव्यातील पात्रांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्यापेक्षा तत्कालीन नितीमत्ता आताच्या/नंतरच्या काळातही कशी योग्य आहे हे सांगणार्‍या आताच्या/त्या त्या काळातील वाचाळवीरांना गुन्हेगार ठरवले पाहिजे असे मला वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नंतरच्या राज्यकारभारात भलेही तिची मूर्ती शेजारी बसवली असेल, भलेही दुसरे लग्न केले नसेल >> नेहमी हेच ऐकलय, पण एकदा कुठेतरी दुसरीपण होती वाचल्यासारखं वाटतय. चंद्र कायतरी नाव...

माझा एक मित्र, महाभारताला 'अ स्टोरी ऑफ बास्टर्डस' म्हणत असे. >> हा हा हे आवडले. रामबंधु पण फळ खाल्ल्यानेच झालेले ना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रामबंधु ROFL ROFL एकदम मसाला ब्रँड वैग्रे आठवला ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>>एकतर जुन्या मालमत्तांचे लहानलहान तुकडे पडत गेल्याने व्यक्तींची आर्थिक क्षमता पिढीमागून पिढी घसरत गेली.

जमिनीच्या वाटण्या हा ब्रिटिशकालीन वारसा आहे का? मध्ययुगात खोत/सामंत/जमीनदार/जहागीरदार हे जमिनींचे मालक* नसत. जमीन नेहमीच सार्वजनिक मालकीची असे. त्यावर शेतकरी शेती कसत असत. शेतीच्या उत्पन्नातला सरकारी कराचा वाटा जहागीरदाराने घ्यायचा आणि त्या बदल्यात राज्याच्या गरजेसाठी सैन्य बाळगायचे अशी पद्धत होती. शिवाजीला पुणे-सुपेची जहागिरी दिली याचा अर्थ त्या भागातली जमीन शिवाजीच्या मालकीची झाली असे होत नसे. पुणे सुपे भागातले सरकारी उत्पन्न (शेतीवरील आणि व्यायार्‍यांवरील कर) शिवाजीने घ्यायचे आणि त्यातून आदिलशहाला** लागेल तेव्हा सैन्य पुरवायचे आणि आदिलशहाच्या मोहिमांना साथ द्यायची अशी व्यवस्था होती. त्या जहागिरीच्या परस्पर संभाजी-राजाराम यांच्यात वाटण्या करण्यास शिवाजी मुखत्यार नसे.

तसेच अनेक देवस्थानांना, ब्राह्मणांना गावे/जमिनी दान केलेल्या असत. त्याही त्या देवस्थानांच्या किंवा ब्राह्मणांच्या मालकीच्या नसत. त्या त्या जमिनींवरच्या उत्पन्नाचा सरकारी वाटा देवस्थानांनी आणि ब्राह्मणांनी घ्यायचा असे.

वाटण्या होत असतील तर जंगम मालमत्तेच्या (रोकड- जडजवाहिर) होत असत.

ब्रिटिश राज्य आल्यावर त्यांनी त्यांच्या संकल्पनेनुसार "जमीन दिली" याचा अर्थ जमीन "एक्स्क्लू़इव्ह*** वापरासाठी मालकी हक्काने दिली आहे" असा लावला. त्यानंतरच जमिनीची वाटणी/विक्री/गहाणवट शक्य झाली.

अर्थात तोच सुमार होता जेव्हा भांडवलशाहीचा उदय होत होता. वाटण्यांमुळे भांडवलसंचय झाला नाही हे खरेही असेल. पण त्याचवेळी ब्रिटिश धोरणांमुळे भांडवल संचय होऊनही फायदा झाला असता की कसे ते ठाऊक नाही.

*खूप वर्षांपूर्वी वाचले आहे. त्यामुळे एक्झॅक्ट डीटेल आठवत नाहीत. पण कन्सेप्ट अशी होती.
**शिवाजी खरे तर जहागीरदार नव्हता (राजवाड्यांच्या भाषेत शहाजीचा पोटमोकासेदार-sub-tenant होता).
***या बदललेल्या अर्थामुळे भरपूर वाद निर्माण होऊ लागले आणि त्यामुळे (ब्रिटिश) कायदा जाणणार्‍या जमातीला सुगीचे दिवस आले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

इतिहासकालीन व्यक्तींना आधुनिक मूल्यांच्या आधारे मोजण्याचा उद्योग निरथक वाटला.
या हिशोबाने उद्या एखाद्याने शिवाजीराजांना आठ बायका होत्या या निकषाच्या आधारे त्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले तरी आश्चर्य वाटणार नाही.
आधुनिक युग अवतरण्यापूर्वी स्त्रिया/गुलाम्/जनता ह्या वस्तू/पाळलेले प्राणी होते. या वस्तू विकणे, विकत घेणे, जुगारात पणाला लावणे, जिंकणे, तपासून पाहणे इत्यादी कृती त्या त्या काळाला अनुसरुन होत्या असे म्हणण्यास पुरेशी जागा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

<इतिहासकालीन व्यक्तींना आधुनिक मूल्यांच्या आधारे मोजण्याचा उद्योग निरर्थक वाटला.>

मला नाही वाटत की हा धागा सुरू करण्यासाठी मी काही 'आधुनिक' मूल्ये वापरून प्राचीनांच्या वर्तनाची चिकित्सा करीत आहे.

प्रथम पांडव घ्या. पांडवांच्या स्वतःच्या कुलात, तसेच आपणांस माहीत असलेल्या अन्य प्रसिद्ध राजकुलात (रघुवंशात वर्णिलेले रघूंचे कुल, चंद्रगुप्ताचा मौर्य वंश, नंतरचा गुप्त वंश) primogeniture हाच राज्य संक्रमित होण्याचा नियम होता. कोठे भाऊबंदकी झाली असलीच तर ती अपवादात्मक आणि तिचे महाकाव्ये रचून कोणी समर्थन केले आहे असे दिसत नाही. धृतराष्ट्राचे राज्य त्याच्या मुलाकडेच जायला हवे. धृतराष्ट्र अंध होता म्हणून त्याचा धाकटा सावत्रभाऊ विदुर ह्यानेहि कधी राज्याची हाव दाखविली नाही. येथे एकाएकी पांडवांचा दावा कोठून उत्पन्न झाला? आणि त्याचे समर्थन करायला राजनीतिकुशल कृष्णापासून सर्वजण का धावले? धृतराष्ट्राच्या राजसभेतील अन्य तीन आदरणीय वृद्ध, भीष्म, द्रोण आणि कृप, ह्यांनीहि पांडवांची बाजू न घेता कौरवपक्षाकडून युद्ध केले. प्रस्थापित पद्धतीविरुद्ध उठणे ह्याला सार्वकालीन नाव 'राजद्रोह' असेच आहे आणि ते पांडवांनी केले. बरे, तसे करण्यासाठी चालू राज्य काही अन्यायकारक आणि जाचक होते असेहि कोठे लिहिलेले नाही. 'दुर्योधन', 'दु:शासन' अशा नावांमुळे ते काही प्रकारचे खलनायक आसावेत असे सर्वसामान्यांना वाटू शकेल पण त्यात काही अर्थ नाही. ते अर्थ चांगल्याच प्रकारचे आहेत. 'दुर्योधन' म्हणजे ज्याच्याशी युद्ध करणे दुष्कर आहे तो. 'दु:शासन' म्हणजे ज्याला काबूत आणणे दुष्कर आहे तो. जनसामान्यांची दिशाभूल करणारी ही नावे पांडवधार्जिण्या कथेकर्‍यांनीच निर्माण केली असावीत अन्यथा कोणता बाप आपल्या मुलांना अशी 'दु:'प्रत्ययाने प्रारंभ होणारी नावे बुद्ध्याच देईल?.

थोडक्यात म्हणजे पांडवांनी अरेरावी केली, त्यांना ती पचली आणि त्यांच्या भाटचारणांनी त्यांची स्तुतिस्तोत्रे गायला जी तेव्हा सुरुवात केली ती अजून संपत नाहीत. Show me the man and I will show you the rule ह्याचे उत्तम उदाहरण. महाभार ज्यामुळे निर्माण झाले अशा ह्या पांडवांनी केलेल्या अरेरावीवर व्यासांपासून आजपर्यंत सगळेच तोंडात मिठाची गुळणी धरून का बसले आहेत असा माझा सरळसरळ आक्षेप आहे. ह्यात 'आधुनिक' मूल्यांचा प्रश्न आलाच कोठे? का 'तातकूप' म्हणून आम्ही खारट पाणी बिनतक्रार पीत राहावे अशी अपेक्षा आहे?

पुढचा राम. रामाच्या काळातहि आपल्या पत्नीचे रक्षण करणे हे त्याचे वैयक्तिक कर्तव्य होते आणि प्रजेचे - ज्यामध्ये पत्नीहि समाविष्ट आहे - रक्षण करणे हे राजा म्हणून त्याचे सार्वजनिक कर्तव्य होते. ह्या दोन्हीपेक्षा लोकाराधन हे अधिक महत्त्वाचे कर्तव्य आहे असे कोणीहि तेव्हाहि म्हटले नाही आणि आजहि म्हणत नाही. प्राचीन भारतातील राजांची कालिदासाच्या पुढील श्लोकात दिसतातः
प्रजानां विनयाधानाद्रक्षणाद्भरणादपि|
स पिता पितरस्तासां केवला जन्महेतवः||रघुवंश १.२४.
(प्रजेचे वर्तन नियमबद्ध ठेवणे, प्रजेचे रक्षण आणि पोषण करणे ह्या मुळे तो (दिलीप) त्यांचा पिता झाला होता आणि प्रजाजनांचे आईवडील हे केवळ त्यांना जन्म द्यायला कारणीभूत झाल्यासारखे होते.)

चाणक्याच्या अर्थशास्त्रात लोकाराधन वा समानार्थी शब्द सापडतच नाही. सारांश म्हणजे लोकानुरंजन हे सर्व कर्तव्यांच्या वरचे कर्तव्य आहे असे त्या काळातहि कोणी म्हणत नसे.

ह्या लोकानुरंजनाच्या मागे धावून रामाने आपल्या प्रमुख कर्तव्यांकडे दुर्लक्ष केले ही बाब निदर्शनास आणण्यात चूक काय आहे? ह्यामध्य कोठले 'आधुनिक' मूल्य बळेबळे रामावर लादले जात आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रामायण आणि महाभारत दोन्हीही (जसेच्या तसे) घडलेले आहे असे मानायचे कारण नाही. कदाचित ती केवळ काव्येही असतील आणि नंतर अनेक कवींनी (कॉपीराईटची दखल न घेता) त्यात आपापली कल्पना घुसडली असेल.पण यातून जे जीवन मांडलेले आहे तेच आदर्श आहे आणि ते आपल्या संस्कृतीचे 'धर्म'ग्रंथ आहेत असे (अजूनही) मानायचे का? आदर्श जीवनमूल्ये कोणती ते स्वतंत्रपणे ठरवता येत असे आणि आता तर नक्कीच येते.
विशेषतः महाभार॑ताचा एक भाग असलेली 'श्रीमद्भग्वद्गीता' हा एक मोठेच तत्त्वज्ञान सांगणारा स्वतंत्र ग्रंथ आहे असाही एक गैरसमज आढळतो. मुळात ते एका अनिश्चित कालखंडाच्या पूर्वीच्या/ त्याकाळी प्रचलीत असलेल्या / त्यानंतर घुसडल्या गेलेल्या अनेक विचारप्रणालींचे गोंधळात टाकणारे कडबोळे आहे. त्यातले खंडन/मंडन चांगलेच गंडलेले आहे. दोन अध्यायांतल्या विचारात विसंगती आहे. एवढेच कशाला? एकाच अध्यायातल्या दोन श्लोकांतही विचारसातत्य नाही. तरीही जिथे हवे तिथे सोयिस्करपणे भग्वद्गीतेत भगवंतांनी असे सांगितले आहे/तसे सांगितले आहे अशी अवतरणे फेकता येतात आणि कोणत्याही प्रकारच्या विचारांचे/वर्तनाचे समर्थन करता येते. (उदाहरणे अनेक विद्वानांनी दिलेली आहेत.)
तरीही गीतेतल्या वैचारीक गोंधळाला नावे ठेवली की अनेकांचे पित्त खवळते किंवा 'तुला गीता कळलीच नाही', 'अमूक तमूक महान संत गीतेला हे समजत-ते समजत', 'तू कोण उलट मत देणारा?' असे ऐकून घ्यावे लागते.
पुढे पुराणांतरी कथांमधून दिसणारे जीवन तर आजच्या समाजाच्या निकषांवर विकृत म्हणता येईल असे आहे. त्या केवळ कथा आहेत असे मानले तरी कुणा परव्हर्टाच्या डोक्यातून असल्या सडक्या कल्पना निघाल्या असतील असा प्रश्न पडतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सीतात्यागाच्या कथेबाबत इरावती कर्वे यांच्या लेखनात त्यांनी मांडलेले विचार काहीसे असेच होते.

रामाच्या चरित्राला आणखी उजळ बनवण्यासाठी त्याच्या (कथाकाराच्या) दृष्टीने रामाचा आणखी एक गुण म्हणून धोब्याच्या गॉसिपची आणि त्यानंतरच्या सीतात्यागाची कथा त्या कथाकाराने मूळ रामायणात घुसडली आणि रामाच्या चारित्र्यावर नसलेला एक डाग उत्पन्न झाला. घुसडणार्‍या कथाकाराचा रामाचे चारित्र्य कलंकित करण्याचा हेतु नव्हताच आणि त्याच्या काळातील (म्हणजे कथाकाराच्या काळातील, रामाच्या नव्हे) मूल्यांपैकी एक त्याने रामाच्या नावावर खपवले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

रामाला येनेकेनेप्रकारेण आदर्श ठरवायचे म्ह्णून त्याच्या जीवनातील अप्रिय भाग हा प्रक्षिप्त आहे असे का मानायचे? खराखुरा राम कसा होता हे कोणास ठाऊक आहे? तो 'होता' किंवा 'नव्हता' हे तरी कोणास ठाऊक आहे?

आपल्याला आदर्श म्हणून दाखवला जातो तो उपलब्ध रामायण कथेतला राम. त्याची 'एडिटेड वर्जन' नाही.

(हे सर्व उकरून काढण्याचा हेतु इतकाच की रामकथेवर बर्‍याच मोठया जनतेचा शब्दशः विश्वास आहे. त्याच्या जन्मस्थानावरून नवे रामायण बनू शकते. त्याचा वानरांनी बांधलेला सेतु हा अक्षरशः त्याच्या नावावर दगड तरंगले असे मानणार्‍या लोकांना खराखुरा वाटते, भूगर्भ शास्त्राला दिसतो तसा तो नाही ही त्यांची खात्री आहे आणि ही खात्री तो 'सेतु' थोडा फोडून जहाजांना सुरक्षित मार्ग बांधण्याच्या प्रस्तावाच्या आड येऊ शकण्याइतका weighty factor आहे. अशा सश्रद्धांना थोडा विचार करण्यास प्रवृत्त करावे हाच हेतु.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>रामाला येनेकेनेप्रकारेण आदर्श ठरवायचे म्ह्णून त्याच्या जीवनातील अप्रिय भाग हा प्रक्षिप्त आहे असे का मानायचे?

तो भाग प्रक्षिप्त आहे हे संशोधित आवृत्ती संपादित करणार्‍या तज्ञांनी म्हटले आहे. आणि ते काही रामाच्या चारित्र्यावरील कलंक धुण्यासाठी नाही. कारण (उत्तरकांड वगळून) उरलेल्या रामायणात सुद्धा रामाला (आधुनिक मूल्यांनुसार) दोषी ठरवायला पुरेशा घटना (सीतेच्या अग्निदिव्यासह) आहेत.

रामाला आदर्श ठरवण्यासाठी अप्रिय भाग प्रक्षिप्त ठरवला असे नसून उलट रामाला आदर्श ठरवण्यासाठी कथाकारांनी नवे नवे प्रसंग घुसडले आहेत.

मी रामाचे मुळीच समर्थन करीत नाही.

कंसातल्या भागाशी सहमतच आहे आणि ते समज धरून ठेवून काहीतरी वाद उकरणे हे चूकच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

'....कोणत्याही प्रकारच्या विचारांचे/वर्तनाचे समर्थन करता येते. '
खोडसाळ मोड चालू: असा ग्रंथ लोकप्रीय होईल नाहितर काय तुम्ही रेफर करताय तो आदर्शवाद(किंवा तत्सम काहीतरी कडू औषधसमान) ? खोडसाळ मोड बंद.

तसे प्रत्यक्षात असलेल्या वैचारिक कडबोळ्याला कडबोळ्यासारखेच एखाद्या ग्रंथाने दाखवले तर त्यात तत्त्वज्ञान नाहीच असे का म्हणावे ?

स्वगतः तसा इथे गीते बद्दल 'खवळलेल्या पित्ताने' लिहिलेला प्रतिसाद मला अवांतर वाटला आहे...पण अनेकांना तो मार्मिक वाटलेला असताना अवांतर म्हटलं की 'तुला प्रतिसाद कळलाच नाही' असे ऐकून घ्यावे लागेलसे दिसते. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या धाग्याची रोज कॉपी काढून ठेवतो आहे. कायद्याच्या दृष्टीने काय आक्षेपार्ह आहे याचा वकिली सल्ला घेतो आहे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रामायण व महाभारत या कथा खर्‍या आहेत की खोट्या हा विषय वेगळाच आहे. पण चर्चेपुरते त्या कथांना सत्यकथा मानले तर मला मूळ लेखात एक विसंगती जाणवली. आता ह्याला विसंगती म्हणावी की मतभेद की काय हेही नेमके समजत नाही आहे. असो! चु भु द्या घ्या. पण....

१. पांडव आणि राम यांच्या ज्या कॄत्यांवर लेखात टीका झालेली आढळते (परंपरा / अधिकार नसताना राज्य मिळवण्यासाठी मोठी प्राणहानि करून युद्ध जिंकणे आणि एका सामान्य नागरिकाच्या आग्रहावरून पत्नीला अग्निदिव्य करायला भाग पाडणे) ही कृत्ये 'तशीच्यातशी' घेतली तर टीकेस पात्रच आहेत.

२. समजा ती तशीच्यातशी न घेता एका मोठ्या कथानकाचा भाग म्हणून घेतली तर पांडवांनी केलेले युद्ध हे काही प्रमाणात तरी समर्थनीय ठरू शकेल कारण दुर्योधन व युधिष्ठिर यांच्यात युधिष्ठिर मोठा असणे, द्रौपदीवस्त्रहरण, पांडवांना उगाचच जाळून टाकण्याचा कौरवांनी केलेला प्रयत्न अशी काही कारणे तरी आहेत.

३. तिसरे म्हणजे, आजच्या समजुतींच्या चौकटीतून तेव्हाच्या घटनांकडे पाहणे हेही एक चुकीचे वाटत आहे. आज युद्ध, जीवितहानि ह्या गोष्टींना जगभरातून (लार्जली) विरोध होताना दिसतो, पण तेव्हा युद्ध ही आम बाब होती. तसेच, आज स्त्रीचे चारित्र्य ही काही सिद्ध करण्याची बाब राहिलेली नाही (पुन्हा लार्जली) जशी ती तेव्हा प्रामुख्याने (व दुर्दैवानेही) मानली जायची.

४. मात्र मला जाणवलेली विसंगती ही, की राम व पांडवांच्या ज्या कृत्यांवर मूळ लेखात टीका केलेली आहे, त्याच कृत्यांसाठी कुठेतरी त्यांचा आज आदर्श ठेवला जातो असे गृहीत धरल्यासारखे झालेले आहे. प्रत्यक्षात राम व पांडव यांचा आदर्श भिन्न कारणांसाठी ठेवला जातो.

राम - आई वडिलांचे म्हणणे प्रमाण मानणे, त्याग, धर्मयुद्ध, 'रामराज्याची' स्थापना!

पांडव - कर्णाचा वध सोडून धर्मयुद्ध, शौर्य, पत्नीचा सन्मान राखण्यासाठी जिवाची बाजी लावणे इत्यादी!

मात्र हे सगळे लिहीत असतानाच माझ्या मनात आलेले विचार आणखीन तिसरेच आहेतः

पांडवांबाबतः

१. द्यूत खेळायचे कारणच काय होते?
२. पत्नीला द्यूतात लावण्याची संस्कृती कोणती?
३. पाच पतींमध्ये एक पत्नी विभागून प्राप्त करण्याची संस्कृती कोणती?

तसेच, कुंतीला कर्ण पूत्र म्हणून लाभणे ही नीतीमत्ता कोणती? ते तिने वेळीच सांगितले असते तर दुर्योधन आणि युधिष्ठिर हे एकमेकांशी मुळात भांडलेच कसे असते? युधिष्ठिराने तर कर्ण ज्येष्ठ पूत्र आहे म्हंटल्यावर हक्कच सोडला असता राज्यावरचा!

महाभारतात स्त्रीचा अपमान किंवा आज ज्याला अनीती म्हंटले जाते तो बर्‍यापैकी भरलेला आहे. (रामायणात निदान तसले काही प्रकार फारसे नाहीत, सीतेचे अपहरण सोडले तर. अपहरण आणि भर दरबारात वडीलधार्‍यांसमोर एखाद्या स्त्रीचे वस्त्रहरण यात फरक आहे).

असो, एकुणच गोंधळ वाढेल असेच वाटत आहे.

सर्वांना दसर्‍याच्या शुभेच्छा!

-'बेफिकीर'!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोकाराधन राजाने करावे हे योग्यच आहे पण त्याला किती महत्त्व द्यावे? ’काहीहि करेन पण लोकाराधन करेन’ इतक्या टोकाला ते नेणे योग्य आहे काय? राजाची अन्यहि कर्तव्ये असतात. प्रजेच्या अधिकारांचे रक्षण हे एक राजाचे महत्त्वाचे कर्तव्य आहे. आपल्या पावित्र्याची सत्यता आणि शीलावर डाग न लागणे हा सीतेचा अधिकार होता आणि रामाला तो ठाऊक होता. तरीहि रामाने येथे त्याची पायमल्ली करून लोकाराधनाला प्राधान्य दिले. त्याने हे योग्य केले काय? ’आपल्या सिंहासनाला धक्का पोहोचू नये’ म्हणून त्याने अबलेचा बळी दिला असे म्हणता येईल काय?

राम तेव्हा काही देवरुपात नव्हता. अन मनुष्यरुपात चूका या होऊ शकतात किंबहुना होतातच. त्या दृष्टीकोनातून वर्तन चूकीचे असले तरी अश्लाघ्य (बरोबर आहे का शब्द?) म्हणता येणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

वर काही सदस्यांनी मीरेवरुन वाद घातला आहे. मीरा ही रॅशनल की इररॅशनल यापेक्षा ती सेन की इनसेन ह्याचा विचार करायला हवा. आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार, जर तिला कृष्णाचे भास होत असतील तर तिला सिझोफ्रेनिक म्हणावे लागेल. आणि ती बिचारी तशी असेल तर तिच्या वागण्याचं मूल्यमापन सामान्य व्यक्तीप्रमाणे करता येणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण ते वीष अक्चुअल मध्ये अमृत झालं का? तसं असेल तर ती स्किझो नव्हती. का कोणीतरी ते पेले बदलले सुदैवाने? असेलही ती स्किझो पण काव्य तर उत्तम प्रसवू शकली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

पण भरताने त्याच्या मुलांपैकी कुणालाही राजेपद न देता एका सामान्य व्यक्तीला 'भुमन्यु' ला उत्तराधिकारी केले होते असं काहितरी महाभारत (जुनी मालिका - राही मासूम रजा वाली) मध्ये दाखवले होते. त्यात समय बनलेला हरीश भिमानी हेदेखिल म्हणाल्याचं आठवतंय कि तेव्हापासून या वंशात ज्येष्ठ्तेपेक्षा योग्यतेला महत्व आले. अर्थात नंतरच्या राजांना आपल्या मुलाशिवाय कोणिच योग्य दिसले नाहि हि गोष्ट अलहिदा

रामाचे म्हणावे तर त्याने आणि सीतेनेदेखील प्रस्थापित मर्यादांचे कसोशिने पालन केले, अगदी टोकाला जाउन, आणी त्याची किंमत चुकवली. कुठल्याही मर्यादेला कधिही आव्हान दिले नाही. यात त्याची मर्यादा मानावी की म्हणूनच पुरुषोत्तम म्हणावे हा ज्याचा त्याचा प्रश्न!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुका म्हणे आता, उरलो उपकारापुरता