अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरंतर, ऐसी अक्षरेवर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी बातमी नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं.
तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.
चौथ्या धाग्यात ९०+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.
लैंगिक संबंधविषयक संशोधनामुळे प्रसिद्ध झालेल्या 'मास्टर्स अॅन्ड जॉन्सन' ह्या जोडगोळीतील डॉ. व्हर्जिनिया जॉन्सन यांचे निधन झाले आहे.
डेव्हिड
यंत्रमानव चित्रकार पण चित्रकला हुबेहुब मानवासारखी.
अजाबात नाही समजली!
Pope Francis reaches out to gays
त्यात काय?
अहो ह्यातच सगळं काही आलं. ;-)
बातमी म्हणणं तितकंसं योग्य
बातमी म्हणणं तितकंसं योग्य होणार नाही पण म.टा.मधे आलेले असल्याने या धाग्यात लिहितोय. राजेश घासकडवी यांचा म. टा. मधला कणीदार साजुक तुपासारखा लेख आवडला.. :) "धार"दार लेखन.. वाचला छापील पेपरात. पण इथे स्कॅनऐवजी लिंक डकवतो.
http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/21499017.cms
अरे वा! @राजेश: हा लेख तिथे
अरे वा!
@राजेश: हा लेख तिथे परवानगी घेऊन आला आहे का?
बाकी, अभिनंदन! :)
अभिनंदन
छापील लेखकांचे (लेखकरावांचे ;)) अभिनंदन.
पण या लेखाचे वृत्तपत्रीय संस्करण काळजीपूर्वक करायला हवे होते. 'नगरीनिरंजन' यांच्या मताचा उल्लेख त्या नावासकट असलेला आढळला.
इथेही मटाच्या उसंडु. :(
सहमत.
घासूगुर्जींचे अभिनंदन!
पण लेख वाचताना सदस्यनाम जस्सेच्या तस्से पेष्टवलेले पाहून वाईट वाटलं. उसंडु हीच डिफॉल्ट स्टेट आहे असे वाटतेय.
संपादकीयाच्या एकदम बाजूला
संपादकीयाच्या एकदम बाजूला पानाच्या वरील भागात, म्हणजे प्राईम लोकेशनवर आला आहे लेख. आनंद झाला. मला आधी वाटलं की राघांनी तिथे नवीन सदर चालू केलंय. तसं असेलही.. :)
हो. ननिचा उल्लेख टोपणनावाने आला आहे हे झालंच, पण तिथे वाचकाच्या दृष्टीने तो संदर्भविरहीत ठरतो आहे.
दुधात साखर आपलं पोळीवर तूप
दुधात साखर आपलं पोळीवर तूप :)
सदर...
सदरच असावे अशी आशा आहे. याच लेखमालेत प्रास्ताविक वगळता एकूण चार लेख आहेत. त्यातला हा पहिला असावा.
;-)
नगरीनिरंजन हे ही प्रसिद्ध लेखक, विचारवंत असावेत अशी शंका येते. व्होल्तेअरने म्हटलेलं आहे, किंवा पुलंच्या शब्दात सांगायचं तर ... तसं नगरीनिरंजन यांचाही उल्लेख.
नगरीनिरंजन यांचेही प्रसिद्धीबद्दल अभिनंदन.
:-)
हा हा हा! लेखात चार्वाक व न्यूटननंतर आलेले नाव पाहून मटाच्या उसंची छाती झाली नसेल ते काढायची. =))
राजेश घासकडवींचे अभिनंदन!
एकदम मान्य! आपले ज्ञान
एकदम मान्य! आपले ज्ञान कंपिटीटीव सतहला आणण्यासाठी आज कितीतरी लोकांनी या लोकोत्तराचे नाव गुगलले असेल. तिथे काही दाद लागत नाही पाहून आजोबांना नगरीचे अभिजन, महाजन तसे 'निरंजन' कोण हे शेवटचे विचारुन घेतले असेल.
थोडक्यात
थोडक्यात काय, तर इथुन पुढे लेख लिहताना अशी नावं पेरताना थोडी काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे नगरीनिरंजन, राजेशघासकडवी वगैरे नावं वैचारिक लेखात खपून जातील. विसुनाना, तिरशिंगराव वगैरे नावं कोणत्याश्या प्रसिद्ध विनोदीलेखकाच्या लेखन समीक्षेत म्हणून खपून जातील. विक्षिप्त अदिती वगैरे नाव कुठेही खपेल असे वाटत नाही. नाही, काय सांगा उद्या आमचा पण लेख यायचा हो छापून, तेव्हा काळजी घेतलेली बरी. ;-)
कंपिटिटिव सतहला भाषाविषयक
भाषाविषयक प्रश्नांचा इतका खल करूनही मराठी (अशुद्ध, संदिग्ध कशीही असली तरी) "सतह"च्या पातळीला गेलेली पाहून सद्गदित झालो.
बढोतरी
बॅटमॅनजी,
आम्ही मराठी हलकसं तेज लिहायला बघतो, तेव्हा तिच्यात हिंदीची बढोतरी होते.
हिंदीची थोडीबहुत बढोतरी
हिंदीची थोडीबहुत बढोतरी झाल्याची तकलीफ नाही, पण त्या वाक्यात मात्र निचली सतह पार केलेली दिसल्यामुळे तो साराच मसला एकदम गौरतलब झाला, लियाजा केलेली ती एक तकरार होती. एकदम डिस्कव्हरी च्यानेलकडे गौर फर्मावत असल्याचा एहसास झाला.
पैर लागू उस्ताद!
=))
पैर लागू उस्ताद!
मसला
या 'मसला'वरून एक (उर्दूविषयक) शंका आहे. पण त्याविषयी पुन्हा कधीतरी. (कदाचित व्यनिने.)
+१ घासकडवीँचे अभिनंदन! आणि
+१ घासकडवीँचे अभिनंदन! आणि नगरीनिरंजन यांचेपण अभिनंदन!
अभिनंदन
घासकडवींचे अभिनंदन!
पाकिस्तानचे नवे अध्यक्ष
मम्नून हुसैन पाकिस्तानचे नवे अध्यक्ष म्हणून निवडले गेले
फ्रेंचांचं बागेतप्रेम ओसरतंय?
फ्रेंचांचं बागेतप्रेम ओसरतंय? मुंग्यांनी मेरुपर्वत तर गिळला नाही?
ही बातमी समजली का ?
तर्कतीर्थांनी नवीन धागा काढला !
http://www.aisiakshare.com/node/2006
असाही यूपीएचा प्रचार...
सायकल वरून भारतभर यूपीएचा प्रचार करणार्या या जोडप्याबद्द्ल काय म्हणावे ?
मराठीत बोलल्याने मुलीचा संसार
मराठीत बोलल्याने मुलीचा संसार टांगणीला.
अवघा रंग एक झाला!
आज सोमवार, आठवड्याचा पहिला दिवस, त्याची सुरुवात एक चांगल्या विषयापासून करावी म्हणून काही लिहावे म्हणून इथे आलो तोच आजच्या महाराष्ट्र टाईम्स मध्ये एका बातमीचे पान समोर आले. आणि काय लिहायचे तेच विसरलो. कदाचित माझी …… सुन्न ……
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/21608869.cms?
राजनेत्यांचा निर्णय सुज्ञपणाचा
संसदेत आणि इतर विधिमंडळांत विविध पक्षांत गुन्हेगारांचे प्रमाण वाढले आहे ही दु:खाची बाब आहे हे सर्वानाच म्हणायचे असावे आणि त्यात काही गैर नाही.
परंतु गुन्हेगारी पार्श्वभूमीचे (जी अचूक भाषा न्यायालयाने वापरली आहे ती इथे घाला) लोक संसदीय प्रक्रियेत भाग घेऊ शकत नाहीत असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय खासदारांच्या अधिकारांमधे ढवळाढवळ करणारा वाटतो. भारतीय लोकशाहीमधे जे काही घटनाविरोधी आहे ते सगळे बेकायदेशीर आहे आणि दंडनीय आहे असे आहे. याला फक्त 'घटने बाहेरचे पण घटनेत सुधार सुचवू इच्छिणारे' तेवढेच अपवाद आहे. गोम अशी आहे कि काय 'घटनाविरोधी आणि म्हणून बेकायदेशीर आहे' आणि काय 'संरचनात्मक सुधारणा सुचवणारे पण तांत्रिकदृष्ट्या सध्याच्या घटनेच्या बाहेरचे ' आहे हे न्यायालय ठरवते.
राजकीय मतभिन्नता आणि त्यातून मिळणारी न्यायालयीन शिक्षा राजकीय बदलाच्या आड येऊ नये म्हणून सांसदांचे राजकीय अधिकार सहसा अशी न्यायालयीन शिक्षा असो वा नसो, अबाधित राहतात. हे तत्त्व जगात सर्वत्र पाळले जाते. यात सर्वोच्च न्यायालयाने लूडबूड केली आहे, ती काढून टाकायली हवी. राजकारण्यांचे या दिशेने योग्य पाऊल आहे.
उदा. समजा उद्या हिंदीच भारताची सरकारी(?) भाषा बनावी म्हणून ३०० खासदारांनी त्यांचे मतदारसंघ ठप्प केले (गुन्हा केला) तर न्यायालयाने त्यांचा संसदेतील मतदानाचा हक्क अबाधित ठेवला पाहिजे.
गुन्ह्यासाठी खासदाराचा संसदेत मत देण्याचा अधिकार काढून घेणे तार्किक पण नाही. गुन्हा केल्यासाठी त्याला कायद्याप्रमाणे वेगळी सजा मिळत असते. मी सिग्नल तोडले म्हणून पावती फाडणे ठीक, ऊगाच काही संबंध नसलेला माझा एक अधिकार (उदा. कॉलेजात जाणे) काढून घेणे सयुक्तिक नाही.
अंततः गुन्हेगार संसदेत जाऊ नयेत याची काळजी घेणे हे नागरीकांचे कर्तव्य आहे. ते न्यायालयावर देण्याचा परिणाम इतर कोणत्या परिस्थितीत फार महाग पडू शकतो.
+१
+१
+१०० :) अगदी सहमत!
अभ्युत्थानमधर्मस्य
>>अंततः गुन्हेगार संसदेत जाऊ नयेत याची काळजी घेणे हे नागरीकांचे कर्तव्य आहे. ते न्यायालयावर देण्याचा परिणाम इतर कोणत्या परिस्थितीत फार महाग पडू शकतो.
+१००.
पण भारतीय बुद्धिजीवी वर्गाची मानसिकता कोणीतरी भगवान श्रीकॄष्ण येऊन (त्यांना अन्याय वाटतात असे) सर्व अन्याय दूर करून सज्जनांचे राज्य स्थापन करेल अशी असते. म्हणून न्यायालयाने असे काही केले की त्यांना आनंद होतो.
कधी ते भगवान टी एन शेषन असतात, कधी अण्णा हजारे, कधी नरेंद्र मोदी असतात. :(
वॉशिंग्टन पोस्ट
'वॉशिंग्टन पोस्ट' हे प्रतिष्ठित वृत्तपत्र अॅमेझॉनचा मालक जेफ बेझॉसने विकत घेतले. 'बॉस्टन ग्लोब'च्या विक्रीनंतर दोन दिवसांतच आलेली ही बातमी.
इन्स्टाग्रॅम आणि टम्ब्लर यांच्या १ बिलियनहून अधिक विक्रीमूल्यांच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक माध्यमांना लागलेल्या उतरत्या कळेवर टिप्पणी करणारं हे बोलकं ट्विट -
Amazing that today a 2-year-old start-up sells for $1 billion and a 135-year-old newspaper sells for $250 million.
"शाकाहारी" गोमांस
सध्या पाश्चात्य माध्यमांमध्ये कल्चर्ड गोमांसाची चर्चा सुरू आहे.
What's the beef? Cultured meat remains a distant dream
स्टेम सेल्सबद्दल संशोधनाबद्दल धार्मिक ख्रिश्चनांचा विरोध अजूनही असावा, पण गोमांस आणि बर्गरबद्दल त्यांची वक्तव्य सापडली नाहीत.
अरे वा!
हल्ली गोमांसातसुद्धा 'कल्चर्ड', 'ब्याकवर्ड' (दोन्ही 'ड' पूर्ण) असे असते वाटते?
पूर्वी असे नव्हते. आमच्या काळात, आम्ही गोमांसभक्षक सगळेच ब्याकवर्ड.
कालाय तस्मै नमः|
मॉन्टी पानेसरची गटारी?
इंग्लंडचा क्रिकेट खेळाडू मॉन्टी पानेसर ह्याला मद्यप्राशन करून सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातल्याबद्दल दंड झाला. काही रोचक तपशील -
१. ब्रायटन हा समलिंगी लोकांमध्ये लोकप्रिय असलेला बीच रिसॉर्ट आहे. तिथे एका नाइटक्लबात 'गे प्राइड' चालू होता.
२. नाइटक्लबमधल्या काही महिलांनी मॉन्टीविरुद्ध तक्रार केली म्हणून बाउन्सरांकरवी त्याला हाकलण्यात आलं.
३. इमारतीच्या गच्चीवर जाऊन मॉन्टीनं त्या बाउन्सरांवर लघवी केली.
चांगले आहे.
क्रिकेटनंतर नेमबाजीपटू म्हणून नाव काढावयास सदर सद्गृहस्थांस आता हरकत नसावी.
ब्रायटन
चार वेळा ब्रायटन वारी झाली (कंपनीच्या कामाकरीता, गैरसमज नकोत ;)). तेव्हा ब्रायटन ह्या शहराबाबत चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून हा प्रतिसाद.
ब्रायटन हे गे कॅपिटल ऑफ युरोप आहे, हे नि:संशय. खास गे मंडळींसाठीचे पब्स आणि क्लब्स इथे आहेत, हेदेखिल खरे. पण येथिल बीचवर फक्त गे मंडळीच असतात हे खरे नाही. हे एक सुप्रसिद्ध पर्यटन स्थळदेखिल आहे. खाडीपलीकडे फ्रान्स. त्यामुळे इथे फ्रेन्च मंडळीदेखिल बरीच आहेत. बारीक रेतीऐवजी छोट्या दगडांचा (पेबल) देखणा समुद्रकिनारा, हे या शहराचे वैशिष्ट्य.
आता ब्रायटन शहरासंबंदी घडलेल्या काही घटना -
१. १७ व्या शतकातील ब्रिटिश राजकारणातील धामधुमीत (ऑलिवर क्रॉमवेलचा काळ), दुसरा चार्ल्स याचे फ्रान्सला पलायन हे ब्रायटनमधून झाले.
२. अॅलिस इन वंडरलॅन्डचा लेखल लुईस कॅरोल याचे घर (हे आवर्जून दाखवले जाते)
३. ८० च्या दशकात मार्गारेट थॅचर यांच्या मंत्रीमंडळ बैठकीवर आयरीश दहशवाद्यांनी केलेला हल्ला इथेच झाला.
४. आणि लास्ट बट नॉट द लीस्ट - ब्रायटनचा सागरकिनारा हे सावरकरांच्या "ने मजसी ने" ह्या सुप्रसिद्ध कवितेचे रचनास्थळ आहे.
(ब्रायटनप्रेमी) सुनील
अमेरिकन होमलँड सिक्युरिटी
अमेरिकन होमलँड सिक्युरिटी डिपार्टमेंटने 'स्वस्त पडतात' म्हणून 1.6 अब्ज काडतुसे खरेदी केलीत.
एकूणच अमेरिकेच्या पोलिसांच्या लष्करीकरणाबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.
'अल काईदाच्या' धमकीमुळे सगळीकडे सुरक्षा व्यवस्था वाढवणे, अर्बन वॉरफेअरच्या ड्रिल्स करणे, होमलँड सिक्युरिटीवाल्यांकडे चिलखती गाड्या आणि रणगाडे असणे या सगळ्या गोष्टी म्हणजे निव्वळ अतिरेकी कारवायांच्या भीतीने केलेली तयारी नाही असे काहींना वाटू लागले आहे. अर्थात त्यांना कॉन्स्पिरसी थियरिस्ट म्हणून दुर्लक्ष केले पाहिजे हे ओघाने आलेच.
दरम्यान ही संधी साधून अनेकांनी लेख पाडायला सुरुवात केली आहे.
http://www.huffingtonpost.com/john-w-whitehead/swat-team-mania-the-war-a_b_875967.html
http://www.globalresearch.ca/the-militarization-of-america-2/5343952
GMO पिकं आणि भारतीय
GMO पिकं आणि भारतीय पॉलिस्यांबद्दल 'द हिंदू'मधला हा लेख वाचला:
Nip this in the bud
यासंदर्भात गेल्याच आठवड्यात फ्युच्युरामाने टिंगल केली होती. याचा एवढाच भाग यूट्यूबवर मिळाला.
टाईप वन डायबेटीक मुलाची शाळेतून हकालपट्टी!
या संदर्भात ही बातमी वाचनात आली. विश्वास ठेवायला कठीण जावं अशी बातमी आहेच पण त्या अनुषंगाने इतरही काही प्रश्न पडले,
१) शाळेच्या मुख्याध्यपकांना मुलांना शाळेतून काढण्यासाठी काही निकष पाळावे लागत नाहीत का? त्यांना त्यासाठी शिक्षण मुख्यालयाकडून काही स्पष्ट मर्यादारेषा मिळतात का?
२) रोजच्या व्यवहारात वैद्यकीय उपचारांची (औषधे / इंजेक्शने) यांची गरज भासणार्या मुलांसाठी इतर शाळांत काय सोयी असतात?
३) ऑटिस्टिक किंवा इतर खास गरजा असलेल्या मुलांना भारतीय शाळांतून प्रवेश मिळतो का? किंवा नाकारला जाऊ शकतो का?
४) भारतात लहान मुलांमधे टाईप वन डायबेटीस वाढत असल्याचा बातमीत उल्लेख आहे. त्यासाठी प्रसारमाध्यमांनी काही जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे का?
आपल्यापैकी कोणाकडे याविषयी काही सांगण्यासारखे असल्यास जरूर सांगा.
पथेटिक!
अगदी अपंग मुलांसाठी म्हणून चालवलेल्या शाळांतही काही फार आदर्श परिस्थिती आहे, अशातला भाग नाही. मतिमंद मुलींनी जर १८व्या वर्षांनंतर गर्भाशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करवून घेतली नाही, तर शाळेत/वर्कशॉपमध्ये येण्यास आडकाठी करण्याची भूमिका मुंबईतल्या एका मतिमंद मुलांसाठी चालवण्यात येणार्या शाळेने घेतली होती. शस्त्रक्रियेचे साईड-इफेक्ट्स, पालकांच्या निवडीचा हक्क यापेक्षाही संभाव्य बदनामीची भीती मोठी.
लाईफ ऑफ पाय(स)
उत्तर अॅरिझोनातल्या एका कट्टर धार्मिक कुटुंबाने गर्भपात, समलैंगिकता, चर्चवर असणारे सरकारी नियंत्रण (!) आणि या सार्या गोष्टींसाठी सक्तीने वसूल केला जाणारा कर ह्या गोष्टींना कंटाळून अमेरिका सोडण्याचा निश्चय केला आणि आपल्या दोन लहान मुलांना घेऊन शिडाच्या होडीतून किरिबाती देशाच्या दिशेने कूच केलं. काही महिन्यांनी, पॅसिफिक महासागरात वाट/दिशा चुकलेल्या अवस्थेत, अन्नपाण्याचा साठा संपत आलेला असताना सुदैवाने व्हेनेझुएलाच्या नौदलाने त्यांची सुटका केली. (बातमीचा दुवा)
सोन्यावरील आयात करात वाढ
वित्तमंत्र्यांनी काल संसदेत केलेल्या निवेदनानंतर लगेच सरकार कामाला लागलेले दिसते आहे.
सोन्यावरील आयात कर तब्बल १०%नी वाढवला आहे. त्यासोबत काही इतर धातूंवरील एक्साईज करातही वाढ केली आहे.
दुरुस्ती
आयात कर "१० टक्क्यांनी" वाढला नसून ८ टक्क्यांवरून १० टक्के झाला आहे. (२ टक्के वाढ- किंवा मूळ कराच्या २५% वाढ)
अखिल वैश्विक मराठी आंजाला
अखिल वैश्विक मराठी आंजाला पडलेल्या ट्रोल आणि छळवाद यांच्या विळख्यातून सुटण्याचे काही मार्ग दिसायला लागले आहेत. (या प्रस्तावनेकडे दुर्लक्ष करून कृपया पुढची लिंक उघडावी.)
Psychology's answer to trolling and online abuse
इच्छा आहे तिथे मार्ग आहे
मराठी आंतरजालावर वावरणाऱ्या अनेक उपद्रवींना मानसिक उपचारांची गरज असते हे खरं असेल कदाचित, पण असं त्यांना स्वतःला वाटत नाही तोवर त्या उपायांचा काय उपयोग? ;-)
एकीकडे चिंतातुर जंतू, सन्जोप
एकीकडे चिंतातुर जंतू, सन्जोप राव असे लोक 'दुनियादारी', वगैरे मेलोड्रामांना नावं ठेवताना दिसत आहेत. दुसर्या बाजूला 'दुनियादारी'ने बराच गल्ला जमवल्याच्या बातम्याही दिसत आहेत. 'चेन्नई एक्सप्रेस'च्या नावाने शंख करणारे चिक्कार फेसबुक अपडेट्सही दिसले (यडपट लोक, शाहरूखचा शिणेमा बघायला जातातच कशाला! पण ते एक असो.) आणि पुन्हा याच शिणेमाने गल्ला जमवल्याच्याही बातम्या. मला फेसबुकावर असं वेडंबागडं चित्र का दिसावं हे सुचवणारं हे एक पुस्तक परीक्षण न्यू सायंटिस्टमधे वाचलं.
Nudges towards the online world beyond Facebook
जालावरचे लोक समाजाशी नाळ
जालावरचे लोक समाजाशी नाळ तुटलेले असतात असं म्हणावं का?
"जालावरचे लोक" यात बरेच
"जालावरचे लोक" यात बरेच वेगवेगळे व्यक्तीविशेष येतील; हे लोक कंपू जमा करतात एवढं निश्चित म्हणता येईल. जेवढी जगावेगळी आवड तेवढा कंपू लहान.
एकदाचा 'दुनियादारी' पाहिला.
एकदाचा 'दुनियादारी' पाहिला. पहिला अर्धा भाग बघायला मजा आली. दुसरा अर्धा पुरा गंडलेला - गडगडलेला वाटला. मुळातली गोष्ट 'फिल्मी' होती, हे तर मान्यच.
सिनेमा चालण्याबद्दलः
बटबटीत, हिंदी सिनेमाचं अंधानुकरण करणारा... ही विशेषणं 'दुनियादारी'ला लावता येतील नि ती खरीही असतील. पण लोकांना हिंदी नि इंग्रजी भाषेत बघायला जे जे आवडतं, ते ते सगळं आपल्या भाषेतून मिळालं, तर खूप हवंहवंसं असतं - आवडतं याचा मला प्रत्यय आला. काय जिवंत गर्दी होती थेटरातली, वा, मजा आली! आता यावर 'बसा मग आपल्याच भाषेच्या डबक्यात डुंबत. बाहेर काही पाहूच नका. संकुचित, प्रादेशिक, अस्मितावादी...' इत्यादी शेलके अहेर होतीलच.
पण दर्जाबद्दलचे आरोप मान्य करूनही - मराठी सिनेमा असा जोरदार चालतो आहे, हे मला सुखावून गेलं.
Et tu, Brute?
Where gold rusts, what about iron?
+१
हिंदी सिनेमाला जाणारा मराठी प्रेक्षक खेचून घ्यायचा असेल तर हिंदीत मिळणारा मसाला मराठीत देणे भाग आहे.
सौदिंडियन सिनेमाच्या यशाचे तेच रहस्य आहे.
एकदा मोठा प्रेक्षकवर्ग निर्माण झाल्यावर अल्पसंख्यांक चोखंदळांसाठीही चित्रपट निघ्तच राहण्याचीही शक्यता वाढते.
मराठीने हिंदीशी स्पर्धा केलीच पाहिजे असे माझे फार काळापासूनचे नम्र मत आहे.
दुनियादारी - तुलना नक्की कशाशी?
शंभर+ कोटींचा धंदा करणारा आजचा तद्दन धंदेवाईक हिंदी चित्रपट किंवा त्याच दर्जाचे दाक्षिणात्य चित्रपट ह्यांच्याशी तुलना केली, तर 'दुनियादारी' हा 'दिसायला' अतिशय दळभद्री दिसतो. तो स्वस्तात केलेला सिनेमा आहे हे अगदी उघड आहे. विशेषतः आजच्या युगात उत्तम तंत्रज्ञान सर्वांना उपलब्ध असताना हे अधिकच खुपतं. उघड मध्यमवयीन दिसणारे नायक-नायिका हिंदीतही आहेत, पण ते नायक असले पोट सुटलेले नाहीत, तर चांगले सिक्स-पॅक आहेत; त्या नायिका आपली फिगर व्यवस्थित सांभाळून कचाकच नाचतात. इथे ह्या सुजलेल्या घोड्यांना कॉलेजतरुण म्हणून सहन करायचं, वर साधारण आमिर-माधुरीच्या काळातल्यासारखी, म्हणजे वीसेक वर्षांपूर्वीच्या संवेदनांची कॉलेजकथा सहन करायची आणि वर सिनेमा 'एंजॉय' करून हिट करायचा! एवढाच जर मराठी माणसाचा आवाका असेल, तर मला त्याचं सुख किंवा अभिमान वगैरे अजिबात वाटत नाही.
टीप - तुलना तद्दन धंदेवाईक सिनेमाशी केली आहे ह्याचा अर्थ तद्दन धंदेवाईक हिंदी किंवा दाक्षिणात्य सिनेमा मला अभिमानास्पद वगैरे वाटतो असा कृपया घेऊ नये.
सहमत आहे
इथे ह्या सुजलेल्या घोड्यांना कॉलेजतरुण म्हणून सहन करायचं, वर साधारण आमिर-माधुरीच्या काळातल्यासारखी, म्हणजे वीसेक वर्षांपूर्वीच्या संवेदनांची कॉलेजकथा सहन करायची आणि वर सिनेमा 'एंजॉय' करून हिट करायचा! एवढाच जर मराठी माणसाचा आवाका असेल, तर मला त्याचं सुख किंवा अभिमान वगैरे अजिबात वाटत नाही
+ १
'दुनियादारी'वरचे सगळे आक्षेप
'दुनियादारी'वरचे सगळे आक्षेप मला मान्य आहेत. त्याचं समर्थन नाही.
पण 'खावी तर तूपरोटीच खावी, नपेक्षा उपाशी राहावं' हा बाणेदारपणा सगळ्या प्रकारच्या प्रेक्षकांकडून अपेक्षणं अगदी अनरिअलिस्टिक आणि अनावश्यकही आहे. काही प्रकारच्या लोकांना 'पुणे ५२' कळतो, आवडतो. काही प्रकारच्या लोकांना 'कदाचित' कळतो नि आवडतो. काहींना 'नवरा माझा नवसाचा' पुरतो. तशी 'दुनियादारी' ही काही लोकांची आवड आहे. त्यांना ज्या प्रकारचा जॉनर आवडतो, त्या प्रकारचा जॉनर मराठीत नव्हता. तो मिळाला.
दर्जाबद्दलचे प्रश्न उपस्थित करणं, टीका करणं... ही समीक्षकांची जबाबदारी आहे. त्यांनी ती पार पाडावी. उद्या कदाचित अभिरुची बदलेल, वाढेल, सिनेमेही अधिक चांगले निघतील. तोवर समीक्षकांच्या पसंतीस उतरत नाही, म्हणून लोकांनी त्यांच्या भाषेत मिळणारा सिनेमा पाहूच नये - नि पाहिला, तर त्याबद्दल आपण 'हाय रे दैवा, काय ही अभिरुची...' असा विलाप करावा - हे काय बरं नाही!
समजुतीचा घोटाळा?
काहीतरी समजुतीचा घोटाळा होतो आहे. माझा आक्षेप जाँरबद्दल नाही, तर सादरीकरणातल्या दळभद्रीपणाबद्दल आहे. थोडी कल्पकता, थोडा चकचकीतपणा, पटकथा-संवाद ह्यांच्यावर थोडं काम केलं असतं तर त्यांच्या मदतीनं आहे ते टिनपाट कथानकसुद्धा निदान आताइतकं लाजिरवाणं दिसायचं टळलं असतं. आजच्या धंदेवाईक हिंदी सिनेमाला उचलून धरणारा मराठी प्रेक्षकच मराठीत ह्याला दाद देतो आहे, हे म्हणजे 'आपला तो बाब्या'छाप तडजोडीची कमाल आहे. म्हणूनच मी माझ्या मते चांगल्या मराठी सिनेमाशी नाही; तर पिटातल्या प्रेक्षकांच्या मते चांगल्या हिंदी सिनेमाशी तुलना करतो आहे.
सिनेमा बरा आहे असं नाही. पण
सिनेमा बरा आहे असं नाही. पण त्या प्रकारचं मराठीत दुसरं कुठे काय आहे? इतकाच मुद्दा.
चकचकीत सादरीकरण
'दुनियादारी'चे सादरीकरण चकचकीत असते तर तो मला आवडला असता असे मला तरी वाटत नाही. अगदी ग्राम्य उपमा वापरायची तर कितीही सजवले तरी मढे ते मढेच. आणि 'दुनियादारी' चे व्यावसायिक यश हा (माझ्या तरी) आक्षेपाचा प्रातिनिधिक मुद्दा आहे. काल एका पुस्तक प्रदर्शनात गेलो होतो. तेथे शिरवळकरांच्या पुस्तकांचा नव्या जोमाने मांडलेला स्टॉल होता. 'दुनियादारी' च्या प्रती वर, अगदी ठळकपणे मांडलेल्या होत्या. त्यावर लोकांच्या अगदी उड्या पडत होत्या असे नाही,(नशीब!) पण या चित्रपटामुळे शिरवळकर वाचणे आणि आवडणे ही एक नवी फॅशन येते की काय अशी भीती वाटू लागली आहे.
आणि यावर कृपया 'सामान्य जनतेची मचूळ, कोमट आयुष्ये, त्यांची दु:खे, चार घटका विरंगुळा' असले चोथा समर्थन कोणी करु नये. हे समर्थन मुळातच लंगडे आहे. एकूण समाजाच्या अभिरुचीचे थिल्लरीकरण हा माझ्या दृष्टीने तरी 'दुनियादारी' च्या व्यावसायिक यशामागचा 'मॅक्रो' मुद्दा आहे.
आपण दोन निरनिराळ्या
आपण दोन निरनिराळ्या मुद्द्यांवर वाद घालतो आहोतसे दिसते. आपापल्या जागी दोन्ही ठीकच. पुरे.
गुजरात मॉडेल - आर्ट गॅलरीवर हल्ला
'अमदावादनी गुफा' ह्या अहमदाबादेतल्या प्रतिष्ठित कलादालनात चाललेल्या भारतीय-पाकिस्तानी कलाकारांच्या एकत्रित प्रदर्शनावर तथाकथित विश्व हिंदू परिषदेच्या गुंडांनी हल्ला केला आणि कलाकृतींची नासधूस केली. पूर्वी हे कलादालन 'हुसेन-दोशीनी गुफा' म्हणून ओळखलं जाई. तेव्हा १९९८ साली इथे हुसेन ह्यांच्या चित्रप्रदर्शनावर हल्ला झाला होता. नंतर २००६ साली पुन्हा एकदा हल्ला झाला होता. भारताच्या भावी पंतप्रधानांनी आपली जमातवादी प्रतिमा घासूनपुसून साफ करायची कितीही पराकाष्ठा केली, तरी ती पुरी पडणार नाही ह्याची काळजी त्यांचे अनुयायी घेत आहेत असं दिसतं.
परिणाम की पार्श्वभूमी?
स्वातंत्र्यदिना निमित्त जोमदार भाषणाचा हा परिणाम की पार्श्वभूमी?
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना अटक
ह्या संबंधात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना अटक झाली आहे. प्रवीण तोगडियांनी त्याबद्दल ट्विटरवर तक्रार केली आहे.
गुजराती नेत्याची प्रतिमा
गुजराती नेत्याची प्रतिमा कधीही स्वच्छ होणार नाही याच्याशी सहमत. पण अशी पहिली घटना झाली तेव्हाच धर्म वगैरे न बघता कडक कृती करण्यास चुकलेल्या सेक्युलर नेत्यांची प्रतिमा कधी बदलणार?
आताही कारवाई होणार नाहीच. तेवढं नैतिक धैर्य आपल्या सेक्युलर सरकारकडे आहे?
डॉ नरेंद्र दाभोळकर यांची पुण्यात हत्या
सदर बातमी व त्यावरील प्रतिसाद इथे हलवले आहेत.
इन सिंक
शास्त्रीय संगीताची आवड एखाद्या माणसाला कुठंपर्यंत घेऊन जाऊ शकते या प्रश्नाचं उत्तर आहे, घरदार गहाण ठेवून स्वत:चं म्युझिक चॅनल काढण्यापर्यंत!
शास्त्रीय संगीतासाठी नवा च्यानेल!
पण चॅनेल भारी आहे. पाहातेय मी
पण चॅनेल भारी आहे. पाहातेय मी काही दिवस!
जादूटोणाविरोधी विधेयकाचा वटहुकूम काढण्यावर मंत्रिमंडळाचे एकमत
जादूटोणाविरोधी विधेयकाचा वटहुकूम काढण्यावर मंत्रिमंडळाचे एकमत
या बातमीनुसार महाराष्ट्र
या बातमीनुसार महाराष्ट्र शासनाने अधिनियम काढुन "जादु-टोणा" कायदा संमत करण्याचे ठरवले आहे.
दाभोलकरांची हत्या हा यामागचा कॅटॅलिस्ट दिसतो. पण हेही नसे थोडके.
(प्रत्यक्ष अंमलबजावणीवेळी पोलिसांना टेबलाखालुन मलिदा घेण्याचे एक नविन साधन मिळेल.)
अभाविप कार्यकर्त्यांची ‘FTII’च्या विद्यार्थ्यांना मारहाण
पुण्याच्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात (एनएफएआय) आनंद पटवर्धन दिग्दर्शित ‘जय भिम कॉम्रेड’ ही फिल्म, त्यावर चर्चा आणि नंतर कबीर कला मंचाचं सादरीकरण असे कार्यक्रम काल झाले. त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे आयोजक असलेल्या फिल्म इन्स्टिट्यूटच्या (FTII) विद्यार्थ्यांना मारहाण केली. कबीर कला मंच ह्या कथित वादग्रस्त संघटनेचा कार्यक्रम आयोजित केला हे मारहाणीमागचं कारण होतं. पोलिसांनी आधी आमच्याकडून माहिती घेतली आणि नंतर मारहाण होत असताना ते समोर ढिम्म राहिले असा दावा करणारा विद्यार्थी -
कबीर कला मंचाची थोडी माहिती,
कबीर कला मंचाची थोडी माहिती, कबीर कला मंचाच्या बंदीमागची समिकरणं नक्की कोणती आहेत ते निटसं समजत नाही, त्याबद्दल काही माहिती असल्यास ती पुरवावी हि विनंती.
कबीर कला मंच
कबीर कला मंचातल्या काही लोकांवर नक्षलवादी असल्याचा आरोप आहे. प्रकरण न्यायालयात आहे आणि गुन्हा अद्याप सिद्ध झाला नसावा. गूगलवर सर्च करा.
नक्षलवाद्यांना कंप्लीट झोडपले
नक्षलवाद्यांना कंप्लीट झोडपले पाहिजे, नाहीतरी ही कीड उरलेला ५०% भारतही खाईल.
नक्षलवाद्यांना का
नक्षलवाद्यांना का नक्षलवादाला?
न्यायालयात गुन्हा सिद्ध झालेले नक्षलवादी का सरकारला (पक्षी राजकारण्यांना, त्यांच्या हितसंबंधींना) डोकेदुखी ठरू शकतात असे आरोपी?
नक्षलवाद्यांना, झाडून
नक्षलवाद्यांना, झाडून
सजा
सजा कोणाला द्यायची? चोराला कि चौर्यकर्माला? असा तो प्रश्न आहे. सजा चोरलाच द्यायची असते. आमचे चिदंबरम् साहेब छान पावले टाकत होते पण सरकारमधल्या आणि देशातल्या अतिशहाण्यांनी रोखले. नक्षल बेल्ट मधे भारताचे राज्य नाही. भारताचा तिथे जो प्रभाव आहे त्याला हाय वे रूल म्हणतात. म्हणजे राष्ट्रीय हायवे पासून ५०० मी आत आले सरकारला किंमत शून्य. मी भारताच्या शत्रूराष्ट्राचा प्रमुख असतो तर नक्षल राज्याला मान्यता देऊन टाकली असती.
शेवटी ज्याचं जळतं त्याला कळतं.
बिहार सरकारने आम्हाला पटना सोडून ५० किमी च्या जिल्ह्यात जायला मज्जाव केला. का तर म्हणे तुम्हाला काही झालं तर आमचं सेक्यूरिटी रेकॉर्ड खराब होईल. सरकारचं त्या भागाचं सगळं बजेट परत जातं. तिथे कोणी रस्त्याचं कंत्राट पण घेत नाही. मी इम्फाळला जातो तेव्हा मेव्हणा मला घरातच राहायची जवळजवळ ताकिद देतो. बाहेर गेलास तर मरशील. कारण मुठभर अतिरेक्यांनी लोकांना वेठीला धरलं आहे. लष्कर हायवे राखण्यात मग्न असतं. मणिपूर भारतात आहे हा भारताचा खोटा दावा आहे. सरकार आपल्यासारख्या शहरातल्या लोकांना अर्धवट माहिती देऊन मूर्खात काढतं. कधी दिल्ली गुवाहाटी रोडने, रेलने जाऊन पाहावी. रेल्वे भारत सरकारची आहे आणि तिचे कोणते नियम आहेत हे कळणार नाही.
आणि या नक्षलांचा कोणता तात्विक विरोध नाही. काहीही तात्विक असण्याचे दिवस संपले आहेत. कंपन्या त्यांना व्यवस्थित खंडण्या देतात म्हणून जिथे प्रचंड नक्षली हिंसा माजली आहे तिथे अक्षरश: शून्य लोक कंपन्यांचे मरतात. सरकारी लोक आणि त्यांच्या हिंसेला विरोध करणारे लोक मरतात. छत्तिसगडच्या काँग्रस अध्यक्षांना या विरोधानेच प्राण गमवावा लागता. आणि कोण्याही 'शहाण्याची' सहानूभूती त्यांना मिळाली नाही. मूलाच्या कानावर बंदूक ठेऊन घरातली सर्व संपत्ती घेऊन जाणे, पैसे दिले नाही म्हणून बापाला मारले हे प्रकार माझ्या दोन मित्रांच्या बाबतीत झाले आहेत. गुवाहाटी ते इंफाळ रस्ता स्वर्गसुंदर आहे, पण त्यावर जितके लोक मारले गेले ते पाहता माझी पत्नी गेल्या ७ वर्षात एकदाही गेली नाही, तो रस्ता मणिपूरची नाळ असूनही! माझा मुलगा जेव्हा जन्मला तेव्हा ५-६ अतिरेकी डॉक्टरला खंडणी मागायला आले होते, ते मी प्रत्यक्ष पाहिले आहे.
नक्षलवाद ही भारताकडून पिडल्या गेलेल्या लोकांची भारताविरुद्ध सशस्त्र क्रांती असती तरी मेरीट पाहून तिला पाठींबा दिला असता. पण हा तत्वहिन असा सशस्त्र खंडणी गोळा करण्याचा धंदा आहे. ज्याच्या कडे शस्त्र नाही तो या धंद्याचे लक्ष आहे आणि त्याचा अंतिम लाभार्थी कोण आहे हे ठाऊक नाही. नक्षलवाद्याला आपण गुन्हा करत आहोत हे माहित असते, आणि क्वचित नसले तरी त्याचे समर्थन करणे चूक आहे. जास्त संख्यने लोक गुन्हा करतात तेव्हाही तो गुन्हाच राहतो. या खंडणीच्या व्यवसायाचे बारकावे हा या धाग्याचा विषय नाही.
नक्षली लोक हिंसा करतात यात
नक्षली लोक हिंसा करतात यात वेगळं काही सांगण्यासारखं नाही.
इथे चर्चा सुरू आहे ती नक्षलवादासंबंधी कथित आरोपांबद्दल. विशिष्ट लोकांनी काही गैरकृत्य केलेलं आहे हे सिद्ध झालेलं नाही त्यामुळे "नक्षलवाद्यांना झोडपून काढा" हे वाक्य त्यांना लागू होत नाही. "झोडपून काढा" ही भावना कितीही तीव्र आणि लोकमान्य असली तरीही न्यायालयात, कायद्याच्या नियंत्रणाखाली अव्हेरली जाईल. तेव्हा अपेक्षाभंगाची तयारी ठेवावी हे उत्तम.
चोरी आणि नक्षलवाद यांची थेट तुलना करणं योग्य वाटत नाही. चोरी, दरोडे या गोष्टी नक्षवादासारख्या सुसंघटीत नाहीत. नक्षली प्रभावाखाली असणार्या भागांतल्या सामान्य लोकांची दोन्ही बाजूंनी पिळवटलं जाण्याची कुचंबणा होते तशी ज्या भागात चोर्या होतात त्यांची होत नाही. एका चोराला पकडून शिक्षा झाली तर बहुदा अजून काही लोक चोरी करण्यापासून परावृत्त होत असतील; नक्षलवादाबाबत असं होईलच असं नाही. त्यामुळे चोरी आणि नक्षलवाद यांची तुलना यात नक्षलवाद या समस्येचं थिल्लरीकरण होतं.
आळशांचा राजा यावर अधिक महत्त्वाचं लिहू शकतात.
"नक्षलवाद्यांना झोडपून काढा"
अगदी अचूक. मान्य.
माझा अभाविपचा अनुभव वेगळा आहे. मी कसा पुरोगामी आहे हे दाखवायला जायच्या नादात मला अभाविपचा विरोध करणे पटणार नाही.
१९८७-८८ मधे सिमीवर बंदी नव्हती. सिमीने उदगीरमधे त्यावेळी जीपच्या चार चाकांना तिरंगे (भगवा नव्हे) उलटे टांगले आणि पाकिस्तानचा (इस्लामचा नव्हे) झंडा फडफडावत फेरी काढली. मी स्वतः ती पाहिली आहे. अभाविप या एकाच संघटनेनेच ती रोखायचा (रस्त्यावर आणि पोलिसात) प्रयत्न केला. कोणाला सजा झाली नाही, प्रकरण निस्तरले गेले.
मी मोठा झालो, सेक्यूलर झालो आणि साहजिकच अभाविपबद्दल तुच्छतेने बोलायला लागलो. And a surprise was waiting for me.
गेल्या दोन्-तीन वर्षात पुणे, बंगलोर येथे झालेल्या बाँबस्फोटांमधे intense उदगीर कनेक्शन होते. मी चकित झालो.
वाचा http://www.dnaindia.com/pune/1711967/report-german-bakery-blast-baig-as…
जास्त गुगलाल तर जास्त बातम्या मिळेतील. शिवाय खुद्द उदगीरमधे बाँबस्फोट झाला, दंगली झाल्या. ते कोणाच्या खिजगणतीही नाही. स्थानिक वृत्तपत्रांत छोटीशी नोंद.
मला धक्का बसला. मी पुन्हा उदगीरच्या माध्यमांच्या सेक्यूलर चष्म्यातून आलेल्या अभाविपच्या चकमकींच्या, त्याला हिन आणि तुच्छ लेखणार्या, बातम्या वाचायला लागलो. संभ्रम वाढला. मग मी माझ्या तिथल्या 'नॉट सो सेक्यूलर' मित्रांना विचारले आणि प्रकार किती अराष्ट्रीय आहेत हे कळले. माझे सेक्यूलर असल्याचे दाखवणे माझ्या राष्ट्राच्या हिताच्या आड येत असल्याने मी संशयाचा फायदा अभाविपला देणे चालू केले. अर्थात् तो सर्वत्र बरोबर असेल असे नाही.
आता कबीर मंचाबद्दल. कबीर आणि कला दोन्हींसाठी मला आदर आहे. पण एका विशिष्ट प्रकारचा खाकी-झोळी लूक देणारे, व्यवस्थित शिकलेले, इ इ लोक सत्कृतदर्शनी 'थोर कार्याला वाहून घेतलेले', इ इ असे दिसतात. बरेच खरोखरीच असतात. पण बरेच brainwashed असतात, भ्रष्ट असतात किंवा कोणता तरी agency interest कॅरी करत असतात. त्यांच्या अराष्ट्रीयतेच्या स्वरुपाची कल्पना सहज येत नाही. या मंचासारखे 'दलित' कला फोरम म्हणजे सर्वण राष्ट्रवाद्यांना टीका करायला अवघड जागा! अशा जागांचा ते आश्रय घेऊ शकतात. 'नक्षलवाद्यांना सहानुभूतीचा आरोप' असता तर जाऊ द्या म्हटले असते, पण 'नक्षलवादी असल्याचा आरोप' आहे. तो गंभीर वाटतो.माझ्यामते पोलिस कितीही भ्रष्ट असले तरी काही विशिष्ट वेळी त्यांना त्यांची शपथ आठवते आणि ते मख्ख उभे राहतात. पोलिस शांत उभे राहिले कि पुन्हा माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकते. अन्यथा काँग्रसच्या राज्यात पोलिसांना अभाविपला बडवायचे आदेश असतात.
अर्थात् कबीर कला मंच हा शब्दच मी या पहिल्यांदा या धाग्यात वाचला आहे, तेव्हा मी त्याच्याबद्दल अनुचित बोलणे अयोग्य.
काही लोक स्वतःला धर्मनिरपेक्षतेची, अर्थनिरपेक्षतेची, राज्यनिरपेक्षतेची सर्व महान मूल्ये कळली आहेत असे समजतात आणि इतरांची भूमिका हिन समजतात, एकांगी भूमिका घेतात. तेही अयोग्य.
आणि व्यक्तिगत अपेक्षाभंगाच्या बाबत म्हणाल तर त्याने काय फरक पडतो? अभाविपचा गैरसमज झालेला निघो, मंचाचे लोक चांगले निघो, त्यांना सजा न होवो अशी आमचीच इच्छा आहे.
नक्षलवादाचा प्रश्न कसा सोडवावा याबद्दल मी बोलू नये. मला त्यातले काही कळत नाही. पण नक्षलवादी त्या त्या जनसंख्येच्या १% पेक्षा कमी आहेत, नक्षलवाद त्यांची उपजिविका आहे, चालू कायद्याने गुन्हा आहे. छत्तिसगढमधल्या काँग्रेसच्या निवडणूक पथकाची चाळणी करून त्यांनी भारतीय संघराज्याचा उघड अपमान केला आहे. कितीतरी जवान आणि पोलिसांना मारले आहे. भारत सरकारचा कर प्रतिबंधित करून नक्षल कर लावला आहे. पूर्वेच्या राज्यांना पश्चिमेपेक्षा अर्थिक दृष्ट्या मागास ठेवले आहे. या http://www.aae.wisc.edu/mwiedc/papers/2011/Singhal_Saurabh.pdf लिंक मधले ग्राफ चाळा. वर त्यांची कोणती तात्विक भूमिका/मागणी नाही. त्यांची सेना १०-२० वर्षांची मुले हीच ५०% पेक्षा जास्त सेना आहे. त्यांनी १०-१२ राज्यांत आजपर्यंत १२००० लोक मारले आहेत.
काश्मिर, ईशान्य भारत आणि नक्षल भारत मिळून भारताचा ५०% एरिया होतो. औरंगजेबानंतर महरौलीच्या (दिल्लीत जिथे कुतुब मिनार आहे) पुढे 'हिंदुस्तानके' मोगल बादशहाचा वचक नव्हता. माझ्या राष्ट्रपतींचा असा भविष्यात अवमान होऊ नये अशी इच्छा आहे. म्हणून चिंदंबरम् यांनी लष्कर पाचारण करून जे त्यांच्याशी युद्ध चालू केले त्याचे मी समर्थन करतो. नमते घेतले तर कुणीही डोके वर काढते आणि देशाच्या पिडा वाढतात.
मार्मिक ही श्रेणी कमी पडावा
मार्मिक ही श्रेणी कमी पडावा असा प्रतिसाद. सेक्युलर आहोत असे दाखवायच्या अहमहमिकेत नको त्या घटकांना सॉफ्ट कॉर्नर दिला जातो. ते पॉइंट आऊट केलेच पाहिजे. भले मग कोणी काही बोलो.
बाकी सगळं राहूच दे. पण
बाकी सगळं राहूच दे. पण सेक्युलर आहोत असं 'दाखवल्यामुळे' काही बक्षीस / प्रमाणपत्र / पुरस्कार वगैरे मिळत असल्याचं माझ्या ऐकिवात नाही.
उलट सर्वधर्मसमभावाचा अर्थ 'आपल्या चार भिंतींत आणि इतर कुणालाही त्रास होऊ न देता आपापला धर्म पाळण्याचं स्वातंत्र्य' असा असला, तरीही तूर्तास सर्वधर्मसमभाव म्हणजे 'आपापल्या नाजूक धर्मभावना जोपासण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी हवे ते करण्याचे स्वातंत्र्य' असा लावला जातो. नि त्यामुळे सेक्युलरिझम / सर्वधर्मसमभाव हा पुरेसा बदनाम शब्द आहे.
असा बदनाम शब्द स्वत:साठी वापरायचा झालाच, तर तो चांगला झाडूनपुसूनझटकून घ्यावा लागतो. अशात खरंच सेक्युलर नसताना तसं असण्याची जाहिरात कोण करणार आहे नि तसं करून काय मिळवणार आहे?
बाकी सगळं राहूच दे. पण
असा दावा मीही कधी केला नाही. पण विशेषतः जालसमाजात कूल पॉइंट्स मिळवण्यासाठी सध्या जे आयडिऑलॉजिकल प्याकेज स्वीकारण्याची फ्याशन आहे त्यात ह्या बर्याचशा गोष्टी बर्याचदा गळ्यात गळे घालून असतात. सेक्युलर-डावे-नक्षलसहानुभूतिदर्शक-सोयीस्कर राष्ट्रविरोधक हे प्याकेज कैक ठिकाणी एकत्र दिसते.
डिस्क्लेमर( वैताग आहे पदोपदी असे डिस्क्लेमर देणे म्हंजे पण खोडसाळ-निरर्थक-भडकाऊ असा श्रेण्यांचा मारा होण्याअगोदर दिलेला बरा.):
सर्वच ठिकाणी असे असते असे नाही. या गोष्टी वरकरणी पाहता श्वा-युवा-मघवा पठडीतल्या वाटतील आणि बादरायण पाणिनीचा खिताब आम्हास देऊन कोणी मोकळे होऊ पाहतील, पण जे दिसते ते सांगतो. जण्रल सहानुभूतींची वर्गवारी ही वर सांगितल्याप्रमाणेच कैकवेळेस पाहिली आहे.
तस्मात या विचारपद्धतींना विरोध करणारे कसे मूर्खागमनी आहेत इ.इ. मारा कोणी केल्यास तो गैरलागू आहे. जे दिसते तेच सांगतोय. जालावर अशा लोकांची सहानुभूती उघडी पडते कैकदा.
खर्या सेक्युलरांबाबतीत खरेच आहे, तदुपरि झोड-संप्रदायी लोकांसाठी कूल पॉइंट्स मिळवण्याचा तो एक जलद मार्ग असतो. त्यामुळे त्याचे महत्व मोठे आहे हे नाकारून चालणार नाही. असो.
डिस्क्लेमर (व्याप्तिनिर्देश /
डिस्क्लेमर (व्याप्तिनिर्देश / जिम्मानकार (दोन्ही शब्दांचे श्रेय अमुक यांना आहे.) आवडला. बाकी आपलं उगाच (अज्जीच? बादवे: अज्जीच हा शब्द नेमक्या कुठल्या अर्थानं वापरतात?) जनरलायझेषण. तितपतच सिर्यसली घेतलं. :)
(No subject)
:)
बातम्या बातम्या मधे
http://www.newsbharati.com/Encyc/2013/3/16/Udgir-tense-after-miscreants… ही उजव्या विचारसरणीच्या माध्यमाची बातमी
http://marathi.yahoo.com/%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%B0%…
ही धर्मनिरपेक्ष माध्यमाची बातमी.
दोन्ही बातम्यांतील फरक रोचक आहे. तेच गाव. तसेच झेंडा प्रकरण. इथेही अभाविपचा उल्लेख आहे. फक्त हे २०१३ आहे.
हा खरा भारत आहे.
कसे अगदी अॅलर्जी असल्यागत
कसे अगदी अॅलर्जी असल्यागत "विशिष्ट रंग" वगैरे शब्दप्रयोग आहेत. हॅरी पॉटरचे चाहते धर्मनिरपेक्षतावादी माध्यमांत असल्याचे माहिती नव्हते.
मुंबईत सामूहिक बलात्कार
एका इंग्रजी नियतकालिकात प्रशिक्षणार्थी छायाचित्रकार म्हणून काम करणाऱ्या तरुणीवर गुरुवारी सायंकाळी लोअर परळ परिसरात चार जणांनी सामूहिक बलात्कार केला. ही तरुणी सायंकाळी सहाच्या सुमारास वार्ताकनासाठी लोअर परळ येथील शक्ती मिल कंपाऊंड येथे गेली असताना ही घटना घडली.
स्त्रीद्वेष कंटीन्यूज...
एकीकडे बलात्कारासारखे हिंस्त्र, लैंगिक स्वरूपाचे गुन्हे स्त्रियांविरोधात होतात (पुरुषांवरही बलात्कार होतात याची जाणीव आहे.) आणि त्याबद्दल निषेध इ. गोष्टी घडतात. दुसरीकडे एका राजकीय पक्षाचा hepp नेता स्त्रियांचा आडूनआडून अपमान करतो आणि त्याबद्दल फार कोणाला निषेधही नोंदवावासा वाटत नाही. हिंसा झाली तर शिक्षा, पण आचरट बकवास करण्याबद्दल निषेध तरी होणार का? आणि मटावाले म्हणे, "बांगड्या पाठवा" हा आराराबांना सणसणीत टोला आहे.
आबांच्या घरी बांगड्या पाठवाः राज
आणि याच त्या विधानाचा व्हीडीओ:
अवांतर
महाराष्ट्र कोणत्याही अर्थाने इतर कोणत्याही भारतातल्या राज्यापेक्षा किंवा जगातल्या कोणत्याही मागास प्रांतापेक्षा पुरोगामी असू शकतो याची जी थोडीफार शंका असायची ती राज ठाकरेंच्या प्रसिद्धीने पूर्णतः मिटली आहे.
बलात्कार आणि लैंगिकता
हा विषय चोथा झालेला आहे, पण एक कुतुहल म्हणून विचारतो, बलात्काराचा लैंगिकतेशी संबंध नाही. लैंगिक उपासमारीने बलात्कार होत नाहीत, बलात्कार हा पुरुषी वर्चस्व सिद्ध करण्याचा मार्ग आहे असे म्हणणार्यांचे मत अद्यापही तसेच आहे का?
www.timesofindia.com/india/No
www.timesofindia.com/india/No-change-in-exemption-limit-in-new-tax-code…
लिमीट इंफ्लेशनशी कोरीलेट करायची कल्पना यायला हवी होती. जी काही तूट येतेय ती वेगळ्या पद्धतीने नाही का भरुन काढता येणार? उदा सध्या २ ते ५ ५ ते १० अशी बेरीज करत करत tax लागतो. त्याऐवजी सरळ max रेटने काढायचा. म्हणजे १२ लाख taxable कमाई येत असेल तर त्याने २ ते १२ अशा १० लाखवर ३०% ने tax भरायचा.
कळ्ळ नाही.. जरा इस्कटून
कळ्ळ नाही.. जरा इस्कटून सांगा!
माझ्या अंदाजाप्रमाणे
सध्याचे स्लॅब
२- ५ -> १०%
५.०१ तो १० > २०%
१० च्या पुढे -> ३०%
नवीन सुचवलेले स्लॅब (पण मान्य न केलेले)
३ - ५ -> १०%
५.०१ तो १० > २०%
१० च्या पुढे -> ३०%
तुट - २ ते ३ मधले जे लोक सुटून जातील त्यांच्या वाचलेल्या टॅक्स मुळे.
तुम्ही म्ह्णताय त्या पद्धतीने "तूट" च काय, सरकारला वरती अजून टॅक्स मिळेल पण सामान्य माणसाच्या खिशाला भगदाड पडेल की!
तुम्ही म्ह्णताय त्या पद्धतीने
तुम्ही म्ह्णताय त्या पद्धतीने "तूट" च काय, सरकारला वरती अजून टॅक्स मिळेल >> हे होईल की नाही शंका आहे, कारण कोणत्या ब्रेकेटमधे किती लोकं आहेत माहीत नाही.
पण सामान्य माणसाच्या खिशाला भगदाड पडेल की! >> सामान्य की श्रीमंत??
माझं म्हणणं असंय की सध्याच लिमीट २लाख फारच कमी आहे. त्यामुळे ते इंफ्लेशननुसार दरवर्षी वाढवावे आणि जास्त ब्रेकेटवाल्यांकडुन ती तूट भरुन काढावी.
१२ लाख taxable इनकम चा tax ३००००(किँवा २००००)+१०००००+६०००० अशाऐवजी सरळ २७०००० (लिमीट ३लाख पकडलय) करा.
हे जर जास्त वाटत असेल तर ३०%च्या ऐवजी २५% ने करा. पण बेसीकली २लाख लिमीट वाढवा.
हे कदाचित कोणाला रोचक वाटेल.
हे कदाचित कोणाला रोचक वाटेल.
आमेली ब्रॉडवेवर
२००१ साली आलेला, विक्षिप्त विनोदासाठी प्रसिद्ध असणारा फ्रेंच चित्रपट आमेली आता ब्रॉडवेवर येणार आहे.
Amélie to become Broadway musical
आयर्लंडमध्ये पहिला कायदेशीर गर्भपात
'सविता हलप्पनवार' घटनेनंतर बर्याच धामधुमीतून आयर्लंडमध्ये आलेला नव्या कायद्याअंतर्गत, महिलेचा जीव वाचविण्यासाठी गर्भपात करण्यात आला.
'हिंदू' मधील बातमी.
त्याला पुरवणी म्हणून 'आयरिश् टाईम्स्' मधील बातमी.
अमेरिकेतही गर्भपातासंदर्भात
अमेरिकेतही गर्भपातासंदर्भात चर्चा, कायदे यामुळे हा विषय जोरात आहे. अमेरिकेत २० आठवड्यांच्या आतला गर्भ काढणं कायदेशीर आहेच. त्यापुढच्या गर्भपातासंदर्भात जी चर्चा सुरू आहे त्यासंदर्भात हा एक लेखः
Mark Ruffalo's pro-choice stance on abortion rights sets a powerful example
रोचक. त्याच संदर्भात एक
रोचक.
त्याच संदर्भात एक प्रस्ताव - गर्भाबद्दल(ठेवणे किंवा पाडणे) आईचा हक्क मान्य आहेच, पण गर्भाबद्दल वडिलांचा हक्क काय असायला हवा? आणि तो तसा का असायला हवा ह्यावर कायद्यात तरतूद/स्पष्टीकरण असायला हवे असं माझं मत आहे.
अर्थ ओव्हरशूट डे.
या वेळी अर्थ ओव्हरशूट डे आणखी अलीकडे म्हणजे २० ऑगस्टलाच साजरा झाला.
अधिक माहिती: http://www.footprintnetwork.org/en/index.php/GFN/page/earth_overshoot_day/
अमेरिकन लोकांसारखे सगळ्यांचे राहणीमान झाल्यास चार पृथ्वी लागतील म्हणे.
दरम्यान युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनने २०५० च्या लोकसंख्येच्या अंदाजाचा किमान आकडा वाढवला आहे.
http://www.worldwatch.org/node/6038
असो. शास्त्रज्ञ काहीतरी तोडगा काढतीलच. आपण कशाला काळजी करायची फुकटची?
निराळाच अर्थ!
मी "अर्थ ओव्हरशूट डे" याचा मराठी "अर्थ" लावून शीर्षकाचा अर्थ चांगलाच "ओवरशूट" केला!