२०१४ लोकसभा निवडणुका: पर्याय व अंदाज (भाग - २)

भाग: ||

आता आपण २०१४ लोकसभा निवडणुकांसाठी दुसरी शक्यता विचारात घेऊया
शक्यता २: काँग्रेस विरोधी राष्ट्रव्यापी लाट मात्र भाजपासाठी राष्ट्रव्यापी लाट नाही.

पुन्हा इथे आपण एकेक गटाचा विचार करूयात.
लहान राज्ये व केंद्रशासित प्रदेश
या राज्यांच्या २८ जागांच्या निकालात फार मोठा फरक अपेक्षित नाही.
काँग्रेसविरोधी लाट केंद्रशासित प्रदेशात चंडीगढची भाजपाकडे तर पाँडेचेरी पीएमकेकडे (द्रमुकचा जोडीदार) जाण्याची शक्यता आहे. शिवाय विधानसभा निवडणूकीत हिमाचल प्रदेश व उत्तराखंड येथे काँग्रेस-भाजपा तोडीस तोड असली तरी काँग्रेस विरोधी लाट आल्यास बसपचे अधिक फावण्याची शक्यता वाढते. थोडक्यात २६ पैकी ८ च्या आसपास जागा काँग्रेस तर ६ जागा भाजपाकडे असतील असे म्हणता यावे तर उर्वरित ७-८ जागा इतर पक्ष व अपक्षांकडे जाऊ शकतील.

पूर्व
आसामचा विचार केला तर काँग्रेसविरोधी लाट आल्यास एखादी जागा आसाम गण परिषदेला किंवा भाजपाला मिळू शकेल (कोण उमेदवार उभे राहतात त्यावर आगप किती नुकसान करू शकेल ते ठरेल). तर पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या मनमानी कारभारामुळे कमी होणारी मते काँग्रेस करून घेऊ शकली नाही तर तो फायदा थेट डाव्यांना होईल व त्यांच्या जागा (सर्व डावे पक्ष + फॉरवर्ड ब्लॉक मिळून) १८-१९ पर्यंत वाढू शकतील.

युपी-बिहार
झारखंड राज्यातील पहिली काही वर्षे चांगले सरकार चालवल्यानंतर भाजपाने झारखंड मुक्ती मोर्च्यासोबत काडीमोड घेतला होता. मात्र काँग्रेसविरोधी लाटेचा भाजपा फायदा करून घेऊ शकली नाही तर झामुमो किंवा जदयु/ राजद आणि अपक्ष हे पक्ष ५-७ जागा घेऊ शकतील. बिहारमध्ये जदयु व भाजपा दोघांच्याही जागा वाढू शकतात. उत्तर प्रदेशात काँग्रेसविरोधी लाट + काही नक्कीचे मतदारसंघ असे विचारात घेतले तर काँग्रेस ८ जागांच्या खाली जाणार नाही असे म्हणता यावे.

उत्तर
उत्तरेला दिल्लीमध्ये जर काँग्रेसविरोधी लाट आली आणि जरी (भाजपाच्या बाजूने लाट नसली तरी) मतदार भाजपाच्या बाजूने पूर्ण वजन टाकू शकतात. हरियाणात चौटाला यांच्या पक्षाला काँग्रेस विरोधी लाटेचा थेट फायदा होऊ शकेल. एकुणात काँग्रेस विरोधी लाट असल्यास उत्तरेला भाजपा आणि त्याचे मित्रपक्ष वरचढ ठरतील असे वाटते.

पश्चिम
काँग्रेसविरोधी लाटेनंतरही गुजरातमध्ये भाजपाला फार मोठा फायदा व काँग्रेसला तोटा होणे कठीण दिसते. मात्र मध्यप्रदेशात बसपाला उत्तरेकडील ३ जागा मिळू शकतील तर भाजपालाही मार्जिनल फायदा होईल. काँग्रेस विरोधी लाटेत महाराष्ट्र आणि राजस्थान भाजपाला अधिक चांगले यश देऊ शकतात. अश्या परिस्थितीत काँग्रेस व राष्ट्रवादी युती कायम ठेवून लढतील असे गृहीत आहे. तसे न झाल्यास काँग्रेसची संख्या अजून कमी व त्याचा थेट फायदा राष्ट्रवादीला होऊ शकतो.

दक्षिण
कर्नाटकात काँग्रेसविरोधी लाट आली तरी भाजपाला पहिल्या शक्यतेपेक्षा दोन जागांचा फायदा होऊ शकेल. शिवाय येड्युरप्पांना शिमोगा मतदार संघ मिळू शकेल. दुसरीकडे आंध्रात तेलुगू देसम पक्षाला अत्यंत सुगीचे दिवस येतील. तामिळनाडूत अण्णा द्रमुक तर केरळात डाव्यांच्याही जागा चांगल्या प्रमाणात वाढलेल्या दिसतील.

आता या प्रदेशातील खासदारांची काँग्रेस, भाजपा, तिसरी आघाडी, चौथी आघाडी आणि इतर अशी गटविभागणी केल्यास २०१४ मध्ये असे चित्र दिसते:

पूर्व

राज्य एकूण संख्या काँग्रेस भाजपा तिसरी आघाडी चौथी आघाडी इतर
आसाम १४ २(आगप)
ओधिशा २१ १(डावे) १६(बिजद)
पश्चिम बंगाल ४२ १८(डावे) १६(तृकॉ)
छत्तिसगढ ११ १०
एकूण ८८ ११ १८ २१ ३२
युपी-बिहार

राज्य एकूण संख्या काँग्रेस भाजपा तिसरी आघाडी चौथी आघाडी इतर
बिहार ४० १५ २(राजद) २१(जदयु) १(अपक्ष)
झारखंड १४ ३(झामुमो)
उत्तर प्रदेश ८० १५ ३६ (सप, रालोद) २१ (बसप)
एकूण १३४ १० ३७ ४१ ४२
उत्तर

राज्य एकूण संख्या काँग्रेस भाजपा तिसरी आघाडी चौथी आघाडी इतर
दिल्ली
हरयाणा १०
जम्मू आणि काश्मीर १(नॅकॉ) ३(पीडीपी)
पंजाब १३ ९(शिअद)
एकूण ३६ १४ १५
पश्चिम

राज्य एकूण संख्या काँग्रेस भाजपा तिसरी आघाडी चौथी आघाडी इतर
गुजरात २६ १९
मध्य प्रदेश २९ १६ ३(बसप)
महाराष्ट्र ४८ १० १२ १०(राकॉ) १४(शिसे) २(मनसे)
राजस्थान २५ १६
एकूण १२८ ३३ ६३ १० १७
लहान राज्ये / केंप्र

राज्य एकूण संख्या काँग्रेस भाजपा तिसरी आघाडी चौथी आघाडी इतर
केंद्रशासित
हिमाचल प्रदेश
उत्तराखंड २(बसप)
गोवा
पूर्वोत्तर (आसाम सोडून) ११
एकूण २८ १०
दक्षिण

राज्य एकूण संख्या काँग्रेस भाजपा तिसरी आघाडी चौथी आघाडी इतर
आंध्र प्रदेश ४२ २२(टिडिपी)
कर्नाटक २८ १६ ३(जद)
केरळ २० १४(डावे)
तामिळनाडू ३९ १०(द्रमुक) २८(अद्रमुक)
एकूण १२९ ३० ११ २७ ५१ १०

आता यातून सर्वसाधारण चित्र काय दिसते


काँग्रेस भाजप तिसरी आघाडी चौथी आघाडी इतर
९६ १५४ १०४ १५९ ३०


गट संख्या
सद्य यूपीए ११२
सद्य एन्डीए १९८
यूपीए+तिसरी आघाडी+इतर+बसपा २५६
तिसरी आघाडी + चौथी आघाडी + इतर २९३
एन्डीए+चौथी आघाडी+इतर ३४३

तेव्हा काँग्रेसविरोधी लाट असली तर काँग्रेसचा सत्ता स्थापनेचा मार्ग बंद होईल हे स्पष्ट दिसते. पण माझ्या अंदाजानुसार केवळ तिसर्‍या आघाडीचा सत्तास्थापनेचा मार्गही तितकासा सुलभ नसेल. सगळे छोटे पक्ष मिळून बिगर काँग्रेस-बिगर भाजपा सरकार स्थापले जाऊ शकेलही पण त्याला बसपा आणि तृणमूलचा बाहेरून पाठिंबा असेल. जर शिवसेना + मनसे, बिजद, शिरोमणी अकाली दल व जदयु यापैकी एकाही पक्षाने सहभागास किंवा पाठिंब्यास नकार दिला तर या सरकारला काँग्रेसच्या बाहेरून पाठिंब्याशिवाय गत्यंतर नसेल. अश्या परिस्थितीत पुन्हा २-३ वर्षात निवडणुका होतील असे वाटते.

दुसरी शक्यता अशी की, अश्या परिस्थितीत सध्याच्या एन्डीएला जुन्या एन्डीएतील घटक-पक्षांनी (चौथी आघाडी: बिजद, तेलुगू देसम, अण्णा द्रमुक, तृणमूल) मदत केली तर भाजपा नेतृत्वाखाली सरकार थापले जाऊ शकेल. (अर्थातच मोदी व्यतिरिक्त नेता म्हणून अडवाणी किंवा त्यांच्या आशीर्वादाने सुषमा स्वराज याचे नेतृत्त्व करतील.) इथेही असे सरकार किती टिकेल ते त्या नेतृत्त्वावर अवलंबून असेल म्हणा!

आता आपण पुढील शक्यता विचारात घेऊया:

शक्यता ३: काँग्रेस विरोधी राष्ट्रव्यापी लाट शिवाय भाजपासाठी धृवीकरण घडून मोठी लाट.
या शक्यतेवर भाष्य करण्याआधी विभागवार कल बघूया

लहान राज्ये व केंद्रशासित प्रदेश
या राज्यांच्या २८ जागांच्या निकालात फार मोठा फरक अपेक्षित नाही.
केंद्रशासित प्रदेशात लक्षद्वीप सोडल्यास कोणत्याही जागी काँग्रेस येईलसे वाटत नाही. शिवाय हिमाचल प्रदेश व उत्तराखंड काँग्रेस विरोधी लाट आणि त्यात भाजपाच्या मताचे धृवीकरण शक्य झाल्यास भाजपाला थेट फायदा होईल. पूर्वोत्तर राज्यांत अरुणाचल सोडल्यास काँग्रेस आपले गड राखू शकणार नाही असेही वाटते, मात्र तिथे भाजपाचे फार अस्तित्व नसल्याने काँग्रेसला फार तोटा होणार नाही. थोडक्यात २६ पैकी ६ च्या आसपास जागा काँग्रेस तर ९ जागा भाजपाकडे असतील असे म्हणता यावे.

पूर्व
आसामचा विचार केला तर धृवीकरणाचा काही फायदा भाजपाला मिळू शकेल. तर ओडीसा व प. बंगालमध्येही त्यांना तुरळक यश मिळवता येईल. छत्तिसगढ सारख्या ठिकाणी भाजपाला व्हाईट वॉशशी शक्यता केवळ याच सिनारिओमध्ये तयार होते.

युपी-बिहार
धृवीकरणामुळे झारखंडमध्ये भाजपाला आणि कदाचित जदयुला फायदा होऊ शकेल तर झामुमो, काँग्रेस व राजद चे फारसे काही चालणार नाही. बिहारमध्ये जदयु व भाजपा दोघांच्याही जागा वाढू शकतात, मात्र जदयुच्या तळ्यात-मळ्यांत भूमिकेमुळे भाजपाला फायदा अधिक होईल. राजद तर्फे स्वतः लालू प्रसाद एखादी जागा जिंकू शकले तरच नाहीतर राजदचे प्रतिनिधित्व लोकसभेत नसेलच. उत्तर प्रदेशात काँग्रेसविरोधी लाट + भाजपाचे धृवीकरण झाल्यास भाजपाला बराच मोठा फायदा संभवतो, अर्थातच याचा थेट फटका सपा, बसपा या पक्षांना होईल.

उत्तर
हरयाणात चौटाला यांच्या पक्षाला काँग्रेस विरोधी लाटेचा थेट फायदा होऊ शकेल पण भाजपाने धृवीकरण शक्य केल्यास त्यांनाही त्याचा तितकाच फायदा होईल. एकुणात काँग्रेस विरोधी लाट असल्यास उत्तरेला भाजपा आणि त्याचे मित्रपक्ष वरचढ ठरतील असे वाटते.

पश्चिम
भाजपाने धृवीकरण केल्यास काँग्रेसला आपला येथील नीचांक दिसण्याची शक्यता निर्माण होते. तर मध्यप्रदेशातही भाजपाला अ‍ॅन्टीएन्कम्ब्न्सी वर मात करता येईल. अश्या परिस्थितीत महाराष्ट्रात राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र निवडणूक लढवतील असे वाटत नाही. त्यामुळे महायुतीला इथे फार फायदा करून घेता येणार नाही. मात्र राजस्थान भाजपाला बरीच मदत करेल.

दक्षिण
धृवीकरण झाल्यास दक्षिणेत, कर्नाटकात भाजपा दोन अंकी संख्या गाठू शकेल. शिवाय आंध्रातही शहरी भागांत ५-६ जागांवर निसटता विजय मिळवता येईल. मात्र तामिळनाडू आणि केरळात अजूनही अण्णा द्रमुक आणि डाव्यांचाच फायदा होईल.

आता या प्रदेशातील खासदारांची काँग्रेस, भाजपा, तिसरी आघाडी, चौथी आघाडी आणि इतर अशी गटविभागणी केल्यास २०१४ मध्ये असे चित्र दिसते:

पूर्व

राज्य एकूण संख्या काँग्रेस भाजपा तिसरी आघाडी चौथी आघाडी इतर
आसाम १४
ओधिशा २१ १(डावे) १३(बिजद)
पश्चिम बंगाल ४२ १५(डावे) १६(तृकॉ)
छत्तिसगढ ११ ११
एकूण ८८ १० २७ १६ २९
युपी-बिहार

राज्य एकूण संख्या काँग्रेस भाजपा तिसरी आघाडी चौथी आघाडी इतर
बिहार ४० १९ १(राजद) २०(जदयु) १(अपक्ष)
झारखंड १४ ११ ०(झामुमो)
उत्तर प्रदेश ८० २७ २४ (सप, रालोद) १९(बसप)
एकूण १३४ १० ५७ २५ ३९
उत्तर

राज्य एकूण संख्या काँग्रेस भाजपा तिसरी आघाडी चौथी आघाडी इतर
दिल्ली
हरयाणा १०
जम्मू आणि काश्मीर १(नॅकॉ) ३(पीडीपी)
पंजाब १३ ९(शिअद)
एकूण ३६ १५ १७
पश्चिम

राज्य एकूण संख्या काँग्रेस भाजपा तिसरी आघाडी चौथी आघाडी इतर
गुजरात २६ २५
मध्य प्रदेश २९ २० १(बसप)
महाराष्ट्र ४८ १३ १०(राकॉ) १४(शिसे) ३(मनसे)
राजस्थान २५ २०
एकूण १२८ २३ ७८ १० १५
लहान राज्ये / केंप्र

राज्य एकूण संख्या काँग्रेस भाजपा तिसरी आघाडी चौथी आघाडी इतर
केंद्रशासित
हिमाचल प्रदेश
उत्तराखंड
गोवा
पूर्वोत्तर (आसाम सोडून) ११
एकूण २८ १३
दक्षिण

राज्य एकूण संख्या काँग्रेस भाजपा तिसरी आघाडी चौथी आघाडी इतर
आंध्र प्रदेश ४२ २४(टिडिपी)
कर्नाटक २८ १५ १० २(जद)
केरळ २० १५(डावे)
तामिळनाडू ३९ १०(द्रमुक) २९(अद्रमुक)
एकूण १२९ २५ १५ २७ ५३

आता यातून सर्वसाधारण चित्र काय दिसते


काँग्रेस भाजप तिसरी आघाडी चौथी आघाडी इतर
७७ २०५ ८२ १५३ ३०


गट संख्या
सद्य यूपीए ९८
सद्य एन्डीए २४८
यूपीए+तिसरी आघाडी १५९
एन्डीए+इतर २७८

तेव्हा काँग्रेसविरोधी लाट असली आणि भाजपा जर काँग्रेसविरोधी मतांचे रूपांतर आपल्या बाजूने करून घेत धृवीकरण करू शकली तर एन्डीएचे सरकार येईल हे स्पष्ट आहे. इतकेच नव्हे तर भाजपा आपली वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करू शकेल तर काँग्रेसला आपल्या कारकीर्दीतील सर्वात वाईट पराभव स्वीकारावा लागेल. प्रश्न राहतो की भाजपा हे धृवीकरण कसे करू शकेल?

आता एक उर्वरित शक्यता आणि या विविध शक्यता कशा व कधी येऊ शकतील? त्या याव्यात व न याव्यात म्हणून चाललेले प्रयत्न कोण करत आहे? कसे करत आहे? आदींचा धावता आढावा आपण पुढील अंतिम भागात घेणार आहोत.

(क्रमशः)

भाग: ||

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

नेहमीप्रमाणे चांगला लेख.हा प्रतिसाद केवळ पोच देण्यापुरता आहे.वेळ मिळेल त्याप्रमाणे मी या चर्चेत भाग घेणार आहेच.पहिल्या भागावरील प्रतिसादही पेंडिंग आहे.

मला वाटते की २०१४ मध्ये या लेखात दिलेल्या दोन परिस्थितींच्या मध्ये परिस्थिती असेल.उत्तर प्रदेशात भाजपला बर्‍याच जागा मिळतील असे मलाही वाटते.याचे कारण आकडेवारीनिशी स्पष्ट करायचे आहे आणि त्याविषयी लेखही लिहायचा आहे.त्यासंदर्भातली माझी आकडेवारी गोळा करण्याचे काम सध्या चालू आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********वि.जे.क्लिंटन**********

मस्त. वाचतो आहे. भारतातल्या राजकारणाविषयी काही स्पष्ट माहिती नसल्यामुळे असे ऍनालिसिस म्हणजे पर्वणीच ठरते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0