पुस्तकः लिटररी कल्चर्स इन हिष्ट्री- रीकन्स्ट्रक्शन्स फ्रॉम सौथ एशिया

लिटररी कल्चर्स इन हिष्ट्री- रीकन्स्ट्रक्शन्स फ्रॉम सौथ एशिया नामक जगड्व्याळ पुस्तक वाचायला घेतले. ब्रिटिशपूर्व काळातील भारतीय उपखंडातल्या साहित्य प्रसवणार्‍या विशिष्ट संस्कृती कुठल्या, त्यांची मूल्ये कोणती, व्हर्नाक्युलर अन कॉस्मॉपॉलिटन भाषांशी त्यांचा संबंध कसा इ.इ.इ. असंख्य विषयांचा परामर्श घेतलेला आहे. प्रत्येक भाषेला एकेक प्रकरण आहे. मराठी, ओरिया, पंजाबी अन काश्मिरी वगळल्यास सर्व मुख्य भाषा कव्हर केल्यात-अगदी नेपाळ, तिबेट आणि लंकेसकट. त्यातले कन्नड साहित्याचे प्रकरण नुकतेच काहीसे वाचले. धाग्यात उल्लेखिलेल्या नागराज यांनीच ते प्रकरण लिहिले आहे. विवेचन इतके माहितीपूर्ण अन शिस्तबद्ध आहे की शेल्डन पोलॉकची आठवण झाली. (तो या पुस्तकाचा मुख्य एडिटर आहे) अन कन्नड साहित्याबद्दल उत्सुकता नव्याने पैदा झाली. कन्नडमधील साहित्यनिर्मितीची सुरुवात, साहित्यसंस्कृतीमधील अंतःप्रवाह, त्यातल्या विविध संकेत अन प्रतिमासृष्टींचा एकमेकांशी होणारा संघर्ष अन त्यामागची कारणे, वचनकारांसारख्या रिबेल लोकांचा राजाश्रित साहित्यिकांवर पडलेला प्रभाव, इ. इ. डीटेल्स फार समृद्ध करणारे आहेत. मराठीलाही असा नागराज मिळायला पाहिजे असे वाटत राहते ते वाचून. कदाचित असेलही, मला तूर्त माहिती नाही.

तमिळ साहित्याचे प्रकरणही तितकेच रोचक आहे. त्याचा बराच भाग स्वामिनाथन अय्यर यांच्या कर्तृत्वाचे वर्णन करण्यात खर्ची पडला आहे. ते म्हंजे इतिहासाचार्य राजवाड्यांचे तमिळनाडूतील कौंटरपार्ट वाटतात. राजवाड्यांनी महानुभाव साहित्य उजेडात आणले तसे यांनी संगम साहित्य तसेच शिलप्पधिकारम अन मणिमेगलाइ ही महाकाव्ये उजेडात आणली. हे वाचून तर मी हतबुद्धच झालो. ब्रिटिश काळात जर राजवाडे, अय्यर अन हरप्रसाद शास्त्री (सर्वांत प्राचीन बंगाली साहित्य चर्यापद याचे शोधकर्ते) असे लोक नसते तर कायकाय आपल्या स्मृतीतून निसटलं असतं काय माहिती. औघड आहे.

==========

संपादकः यावर अधिक तपशीलात चर्चा व्हावी व याच्याशी समांतर विषयांवर व एकूणच साहित्याच्या अभ्यासाशी संबंधित माहिती सगळ्यांसमोर यावी या हेतूने धागा वेगळा काढत आहोत

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

माहितीपूर्ण पोस्ट.
जरा प्रस्तुत पुस्तकाच्या प्रकाशनाबद्दलची माहिती, कुठून विकत घेतले, किंमत , पृष्ठसंख्या लिहिण्याची तसदी करावी ही विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

या पुस्तकाची संपूर्ण पी.डी.एफ येथे आहे. ती नेहमी सापडेलच याची खात्री नाही. जर का डाउनलोड झाले नाही, तर मला व्य.नी. पाठवावा, ईमेलने पाठवता येईल.

बॅटमॅन, पुस्तक खरोखर एक खजिना आहे. त्यातील उर्दू - हिंदी च्या इतिहासावरचे लेख तर अप्रतिम आहेत. शम्स-उर-रहमान फारूकी़ यांचा उर्दू च्या उगमाचे विवेचन, आणि हरीष त्रिवेदी यांचे हिंदीच्या विस्ताराचे विश्लेषण, या दोन्हींमधल्या नाजुक फरकातच दोन्ही भाषांच्या गुंतागुंतीचा इतिहास पहायला मिळतो! मुजप्फर आलम यांचा फारसी वरचा लेखही चांगला आहे.

नागराज यांचा लेख त्यांच्या अकाली निधनामुळे, त्यांच्या व पॉलोक यांच्या शिष्याने, पृथ्वीदत्त चंद्रशोभी यांनी, संपादित केला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@ मुक्तसुनीतः

येस्स, libgen.org वर हे पुस्तक नक्कीच मिळू शकेल. जर विकत घ्यायचे असेल तर अ‍ॅमेझॉनवर घेता येईल. मी तिथूनच घेतले. पाने साधारण हजारेक भरतील. किंमत ९०-१०० डॉलरच्या आसपास जाते. पण लाइफटाइम वाचावे इतपत वर्थ नक्कीच आहे.

अ‍ॅमेझॉनची लिंक.

@रोचना:

नागराज यांचा अकाली मृत्यू झाला हे माहिती होतं. दुर्दैव, दुसरे काय? मला वाटते शेल्डन पोलॉकने की अजून कुणीतरी मृत्युलेखही लिहिलाय त्यांच्याबद्दल. बाकी हिंदी-उर्दूच्या वाटेला अजून तरी गेलो नाही-जाईन लौकरच. नाही म्हणायला फारसीचा लेख थोडाफार चाळला. तोही चांगला वाटला. सध्या तेलुगुचे प्रकरण चाळतोय, त्यात चित्रकाव्यासारख्या भानगडी मस्त दिल्या आहेत, मजा येतेय एकदम. पण मराठीवर असं काम झालं पाहिजे असं वाटतं. तुमच्या पाहण्यात असं एखादं मराठी/इंग्रजी पुस्तक आहे का? असल्यास वाचायला लै आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वेल्चेरु नारायण राव यांनी जितकी तेलुगु साहित्यसेवा केली आहे, तितकी कदाचितच कोणी केली असेल. माणूस मस्त लिहीतो. मला त्यांचे तर्क नेहमी पटतातच असे नाही, पण भाषेबद्दल एक आस्था आणि गंभीर, अभ्यासू दृष्टीकोन बाळगूनही तिच्याबद्दल, साहित्यिकांबद्दल एकाच वेळेला हलक्या-फुलक्या विनोदी शैलीत लिहीतात, ती वाचताना कमालीचा आनंद येतो. त्यांनी केलेलीतेलुगू काव्यांची इंग्रजी भाषांतरे, आणि त्यांच्या प्रस्तावनाही अतिशय वाचनीय आहेत.

पॉलोक आणि कं. या प्रकल्पात भाषा, साहित्य आणि इतिहास या त्रयीबद्दल काही विशिष्ट प्रश्न विचारतात: या त्रयीतल्या मुख्य संज्ञांच्या व्याख्या आणि ऐतिहासिकतेपासून सुरुवात करतातः

This body of scholarship...has bequeathed us problems at virtually every level of conceptualization.... What, after all, do we mean by “literature,” the primary analytical category in all this scholarship? What is South Asia or India or Bengal? What authorizes the boundaries of these regions...and what sanctions these as sensible ways of delimiting an account of literature? The same questions apply to the languages themselves: What do we mean by Hindi or Urdu, Malayalam or Gujarati, when used as a category for charting the historical process of which it is in fact the outcome? What constitutes the substance of the history that supplies the framework of description and understanding in all these histories of literature? What, in other words, can it possibly mean to think of literature as a historical phenomenon?

याला गेल्या पन्नास वर्षातल्या युरोपीय साहित्यिक चर्चेचा संदर्भ आहे:
What is crucial for historical literary scholarship is not the fact that the literary is a functional rather than an ontological category, comprising something people do with a text rather than something a text truly and everlastingly is, but the fact that people are
constantly induced to do whatever that something is, and to do it variously because “every specific situation is historical.”.... The key question thus becomes not whether to define or not to define, but how to make the history of definition a central part of our history of the literary. Definitions of the literary in cultures such as those of South Asia.... would not only take account of both the semantic and pragmatic aspects, but ask directly how such definitions were formed and, once formed, were challenged; whether they were adequate or inadequate to the existing textual field, and by what measure and whose measure of adequacy; whether, and if so, how, they excluded certain forms even while—and precisely by— including others.

The critique applied to definitions of textual forms can be extended to every other element of literary history. Geocultural and sociopolitical templates, identities of languages, narratives of history—all are used in ways that beg most of the important questions. Categories and conceptions that literature itself helps to produce are typically presupposed to be conditions of
its historical development....This means not only that these frameworks are wholly contingent and variable, but also that they are in part the outcome of the very processes they are charged with retrospectively organizing. To understand literature in relationship to a place, accordingly, is as much a matter of understanding how literature can create places as it is a matter of understanding how it is created by them.

As for the history in which literature is embedded in South Asian literary histories, one of several modes of European
temporality has typically been adopted: the purely serial, almost annalistic mode, whereby texts follow each other over the centuries (as if sequence were somehow meaningful in itself, or were somehow safely situated beyond meaning); or, more problematically, the story of the birth of the nation or region or community...whereby the nation or region or community that marks a contingent end point becomes the necessary end point, and, in this way, often the starting point. It is this last dimension, where literary history manifests itself as national history, that has made it so difficult to perceive any of the generative literary processes that transcend or escape the national.

माझे वाचन या क्षेत्रात तेवढे खोल नाही त्यामुळे चू.भू.द्या.घ्या, पण पॉलोक ज्या यादीछाप (आधी यादवकालीन, मग महानुभाव, मग वारकरी, मग बखरी, मग केशवसुत, मग....) आणि लक्ष्यवादी (टिलियोलॉजिकल, इतिहासातील सर्व प्रवाहांना वर्तमानात अस्थित्वात असलेल्या एकाच चौकटीत बसवण्याचा प्रयत्न) चौकटींचा उल्लेख करताहेत, त्या मराठी साहित्याच्या अभ्यासाला बर्‍यापैकी लागू होतात. मराठी साहित्य, मराठी, महाराष्ट्र, या संज्ञांचा, त्यांच्या ऐतिहासिकत्वाचा सखोल अथवा चिकित्सक विचार न घडता त्याच्या उगम, विस्तार, उदय, लोप, र्‍हास या कथानकातून त्यांच्यात फक्त माहितीची भर पडते - चिकित्सक विश्लेषण घडते, पण माइक्रो लेवेल वर, या चौकटीला गृहित धरूनच.
म्हणून कदाचित पॉलोक यांनीच विधान केले की त्यांनी खूप शोधूनही त्यांना समाधानकारक वाटेल असा मराठीसाठी लेखक त्यांना सापडला नाही.

आता हे विधान खरोखर मराठी साहित्याच्या अभ्यासाला किती लागू आहे यावर दुमत असू शकते - मराठी साहित्याचा चिकित्सक अभ्यास अनेकांनी केला आहे. यात विद्रोही प्रवाह आहेत, वाद-विवाद आहेत, पण ते अशी व्यापक चिकित्सक ऐतिहासिक पद्धत वापरत नाहीत. एकूण भारतीय भाषिक साहित्येतिहासाला, किंवा जागतिक पातळीवरच्या साहित्येतिहासचर्चेला, मराठीचा विचार करताना अन्य भाषिक इतिहासालाही समोर ठेवून विचार करण्याकडे त्यांचा फारसा कल नाही, असे प्रथमदर्शनी दिसते.

जुन्या साहित्येतिहासापासून पॉलोक आणि कं. त्यांचा निराळा मार्ग आखतात तो पहा:
New forms of critique have been generated in other fields of South Asian studies that over the past twenty years have profoundly reshaped thinking in at least three important domains: our moral no less than intellectual orientation in general to the object of inquiry; our awareness of the epistemological no less than political violence of colonialism; and, more broadly, our appreciation of the limitations of an area-based structuring of research. Contemporary analyses of colonialism have shown how new Indian pasts with real-life social consequences, such as the traditionalization of the social order by the systematic miscognition of indigenous discourses on caste, were created by colonial knowledge. They have demonstrated at the same time how discourses such as nationalism that were borrowed from Europe entered into complex interaction with local modes of thought and action that, through a process not unlike import substitution, appropriated, rejected, transformed, or replaced them....Crucially, this approach would seek to avoid reproducing the problems of earlier literary historiography. But it would also mean taking seriously the insights of colleagues in related fields of scholarship.... Most important of all, this search would mean learning to think in a historical-anthropological spirit: trying to understand what the texts of South Asian literature meant to the people who wrote, heard, saw, or read them, and how these meanings may have changed over time.

सत्ताकेंद्रांशी, सामाजिक विषमतेशी, राजकीय विचारविश्वांशी साहित्याचे गुंतागुंतीचे संबंध हे मराठी साहित्याच्या अभ्यासात आघाडीचे प्रश्न राहिले आहेत. पण मूळ संज्ञांच्या आधुनिक, वर्तमान व्याख्यांना, व इतिहासाच्या एकांगी प्रवासाला गृहित धरूनच या प्रश्नांची चर्चा झाली आहे - या साहित्यात कोणत्या जातीचे लोक सहभागी होते? अमुक अमुक लेखक किंवा लेखन किती ब्राह्मणी होते किंवा ते किती राष्ट्रवादी होते? मराठी ही मायबोली तर मग तिचे यादवकालीन, मराठेकालीन, पेशवेकालीन, इ. स्वरूप काय? हे पुरोगामी का ते प्रतिगामी? हे इतिहासलेखनाचे काळे युग तर ते सुवर्णयुग, इ. इ. इ.

या मागोव्यात अर्थातच मी खूप सरसकटीकरण केलं आहे. पण सांगायचा मुद्दा हा, की पॉलोक ज्या रोचक, विशिष्ट ऐतिहासिक-चिकित्सक संवाद-चर्चेचा उल्लेख करत आहेत, त्यात सहभागी व्हायचा, आणि मराठी, साहित्य, इतिहास या संज्ञांपासून मराठी साहित्याचा व्यापक विचार करण्यात रस मराठी साहित्याच्या अभ्यासकांत आहे की नाही, हे ठाऊक नाही. ती इंग्रजीतच व्हायला हवी असे अर्थातच नाही - पण मराठीतही ते होत आहे की नाही हे मला जाणून घ्यायला मला ही "लै" आवडेल!

(घाईत बडवले, कृ. शुद्धलेखन, व्याकरण, चुका माफ करणे)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विस्तृत प्रतिसादाबद्दल बहुत धन्यवाद.

वेलचेरु नारायण राव यांबद्दल थोडे थोडे आधी वाचले होते, माणूस जबराच दिसतोय एकदम. तेलुगुचा चॅप्टर नीट वाचेन नक्की. बाकी, युरोपीय साहित्यचर्चेतले आवडलेले मुद्दे म्हणजे

What is crucial for historical literary scholarship is not the fact that the literary is a functional rather than an ontological category

The key question thus becomes not whether to define or not to define, but how to make the history of definition a central part of our history of the literary. Definitions of the literary in cultures such as those of South Asia.... would not only take account of both the semantic and pragmatic aspects, but ask directly how such definitions were formed and, once formed, were challenged; whether they were adequate or inadequate to the existing textual field, and by what measure and whose measure of adequacy; whether, and if so, how, they excluded certain forms even while—and precisely by— including others.

This means not only that these frameworks are wholly contingent and variable, but also that they are in part the outcome of the very processes they are charged with retrospectively organizing. To understand literature in relationship to a place, accordingly, is as much a matter of understanding how literature can create places as it is a matter of understanding how it is created by them.

आणि युरोपियन मॉडेल्स भारताला लावल्यामुळे काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात याची कबुलीही रोचक आहे.

As for the history in which literature is embedded in South Asian literary histories, one of several modes of European
temporality has typically been adopted: the purely serial, almost annalistic mode, whereby texts follow each other over the centuries (as if sequence were somehow meaningful in itself, or were somehow safely situated beyond meaning); or, more problematically, the story of the birth of the nation or region or community...whereby the nation or region or community that marks a contingent end point becomes the necessary end point, and, in this way, often the starting point. It is this last dimension, where literary history manifests itself as national history, that has made it so difficult to perceive any of the generative literary processes that transcend or escape the national.

पोलॉकच्याच संस्कृतवरच्या पुस्तकात नॅशनॅलिझम बद्दल काही भारी रोचक विचार मांडलेत, त्यात या अधोरेखित मुद्द्याचा परामर्श विस्तृतपणे घेतला आहे.

आणि पोलॉक & कं. चा वेगळा अ‍ॅप्रोच कुठला त्याचे हे सार अगदी भावले.

Most important of all, this search would mean learning to think in a historical-anthropological spirit: trying to understand what the texts of South Asian literature meant to the people who wrote, heard, saw, or read them, and how these meanings may have changed over time.

कधीकाळी मनात अस्पष्टपणे असणार्‍या आक्षेपाला मूर्तरूप देऊन त्याची विस्तृत चिकित्सा करणार्‍यांचे आभार मानावेत तितके थोडेच.

शिवाय,

आता हे विधान खरोखर मराठी साहित्याच्या अभ्यासाला किती लागू आहे यावर दुमत असू शकते - मराठी साहित्याचा चिकित्सक अभ्यास अनेकांनी केला आहे. यात विद्रोही प्रवाह आहेत, वाद-विवाद आहेत, पण ते अशी व्यापक चिकित्सक ऐतिहासिक पद्धत वापरत नाहीत. एकूण भारतीय भाषिक साहित्येतिहासाला, किंवा जागतिक पातळीवरच्या साहित्येतिहासचर्चेला, मराठीचा विचार करताना अन्य भाषिक इतिहासालाही समोर ठेवून विचार करण्याकडे त्यांचा फारसा कल नाही, असे प्रथमदर्शनी दिसते.

मराठीबद्दलचे हे विचारही विशेष पटले. जुने मराठी साहित्य जवळपास इन्सुलर असल्याच्या थाटात सगळे चाललेले असते आणि ऑल ऑफ अ सडन युरोपियन इंपोर्ट घेतल्याचे दाखवले जाते. मधले ग्रे एरिया आजिबात दाखवले जात नाहीत.

आणि एक मुद्दा आधी लक्षात आला नव्हता, पण नंतर जरा विचार केला तेव्हा वाटले, की महाराष्ट्र सारस्वतात अन्य भाषांशी असलेल्या अन्योन्य संबंधांचा विचार केला गेलेला नसला तरी बेसिक चौकट तशी ठीकठाक आहे. विशेषतः जुन्या साहित्यकारांच्या लेखी त्यांचे साहित्य म्हंजे नक्की काय प्रकार होता हे तिथे काही अंशी तरी सांगितले गेले आहे असे वाटते. वर उल्लेखिलेल्या प्रमाणे ते अ‍ॅनलिस्टिक प्रकारचे जास्त आहे असे वाटते. शिवाय नागराज यांनी वचनकारांचा केला तसा महानुभावांचा अ‍ॅनॅलिसिस यांनी केलेला दिसत नाही. पण जुन्या साहित्यकारांची मनोगते, संस्कृतबरोबरची आणि क्वचित्प्रसंगी इंग्रजीबरोबरची तुलना, इ. गोष्टींमुळे सारस्वताच्या रूपाने ती सुरुवात थोडी तरी झालीये असे वाटते. विशेषतः समर्थांची काही स्फुटे उद्धृत करून ती आशयदृष्ट्या इंग्रजी स्टाईलला जवळ कशी आहेत हे दाखवणे मला आवडले. अन्य भाषांबद्दल बोलायचे तर तसेही काही उल्लेख आहेत. फक्त तो फोकस असा नाही, इतकेच.

मराठीतले समीक्षाविषयक वाचन अत्यल्प असल्याने बाकी कुणी असं लिहिलंय किंवा नाही ते माहिती नाही. सारस्वताबद्दल तुमचे मत काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

महाराष्ट्र सारस्वत सारखे प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे आहेत, आणि भावे, राजवाडे, इ. च्या काळातल्या मंडळींनी खूप कष्ट घेऊन ही माहिती एकत्र केली, त्याला एक पद्धतशीर आकार दिला, यात काही संशय नाही. त्यात भाव्यांची लेखनशैलीही त्या मानाने चिकित्सक आणि वाचनीय आहेच.

असे असूनही, सारस्वत सारख्या क्युमुलेटिव, आणि भाषिक-प्रादेषिक अस्मितेतून प्रेरित प्रकल्पांना पॉलोकच्या वरची टीका खासकरून लागू आहे. "हिस्टरी ऑफ अमुक-अमुक लिटरेचर" या दृष्टीकोनाची (मग ती फ्रेंच असो वा इंडियन असो वा मराठी) विस्तृत टीका पॉलोक यांच्या प्रस्तावनेत आहेच. आणि सारस्वतही खूप जुने झाले; ज्या राष्ट्रवादी काळात आणि संदर्भात त्याला सुरुवात झाली तो काळ आता राहिला नाही. "हे सर्व आमच्या भाषेतही आहेत, बरं का, ही पहा समृद्धी" याच्या पलिकडे जाऊन साहित्य, इतिहास आणि भाषा या त्रयीबद्दल नवे प्रश्न निर्माण व्हायला हवेत असे त्यांचे म्हणणे आहे. (ढेरे, पठाण, कोत्तापल्ले, तुळपुले, वगैरेंची कामगिरी आहेच, पण विशिष्ट क्षेत्रांत. आणि काही लेखांचा अपवाद वगळता "मराठी वाङ्मयाचा इतिहास" चे खंड याच क्युमुलेटिव, क्रमावर चौकटीत बसतात. अशी जर समकालीन पुस्तके असतील, तर ऐसीकरांनी अवश्य सुचवावीत!)

नवीन प्रश्न मांडायचे उदाहरणः नागराज यांनी कन्नड शिलालेखांचे केलेले अत्यंत ताजे विश्लेषण. हा सर्वात जुना शिलालेख, इथून कन्नड मायबोलीची सुरुवात, हा यादवकालीन की शिवकालीन, या पलिकडे त्यातील भाषावापराचा, गृहित सत्ता-संबंधांचा, तर्क मांडण्याच्या शैलीकडे बारीक लक्ष देऊन तत्कालीन "सामाजिकते" बद्दल, शिलालेखांच्या राजकीय संदर्भाचा कन्नड काव्याशी रोचक संबंध जोडतात. साहित्य आणि राजव्यव्यस्थांच्या अन्योन्य संबंधांवर आधारित एका विशिष्ट कालात संस्कृत सोडून कन्नड सारख्या देशी भाषेवर भर का दिला गेला, यावर प्रकाश टाकतात.

अन्य भाषांचा संदर्भ असणे म्हणजे अमुक अमुक इंग्रजी सारखे किंवा संस्कृतोत्पन्न आहे हे दाखवणे असे मला म्हणायचे नव्हते. तर आपल्या भाषेच्या, साहित्याच्या इतिहासविवेचनात उद्भवणारे प्रश्न अन्य भाषांतही आहेत का, तेथील वाद-चर्चा, साम्य-फरक, इत्यादींमधे रस असणे, आणि या व्यापक दृष्टीकोनातून आपल्या विषयाकडे नव्याने पाहणे असे होते. उर्दू वरच्या लेखात फ्रॅन प्रिचेट उर्दू साहित्य नेमके कोण वाचत-ऐकत होते, व या वाचक-श्रोता वर्गात झालेल्या बदलांचा साहित्यनिर्मितीवर नेमका कसा प्रभाव पडला हे दाखवतात. यातील मराठी शाहिरी काव्य किंवा पंडिती काव्याच्या नव्या अभ्यासाला लागू होईल असे घेण्यासारखे काही आहे का? आलम साहेब फारसी मुघल साम्राज्यात नेमकी कशी वापरली गेली हे पाहतात - मराठा राज्य व मराठी यांच्या नेमक्या संबंधाचा पुन:शोध घेण्यासाठी यात काय धडे असतील - यात ग्वाल्हेर आणि पुणे आणि तंजावर यात फरक जाणवतो का? त्यावरून मराठीच्या राजकीय अवताराचे, आणि १९व्या शतकात धडून आलेल्या बदलांवर काही प्रकाश पडू शकतो का? वगैरे वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"हे सर्व आमच्या भाषेतही आहेत, बरं का, ही पहा समृद्धी" याच्या पलिकडे जाऊन साहित्य, इतिहास आणि भाषा या त्रयीबद्दल नवे प्रश्न निर्माण व्हायला हवेत असे त्यांचे म्हणणे आहे. (ढेरे, पठाण, कोत्तापल्ले, तुळपुले, वगैरेंची कामगिरी आहेच, पण विशिष्ट क्षेत्रांत. आणि काही लेखांचा अपवाद वगळता "मराठी वाङ्मयाचा इतिहास" चे खंड याच क्युमुलेटिव, क्रमावर चौकटीत बसतात. अशी जर समकालीन पुस्तके असतील, तर ऐसीकरांनी अवश्य सुचवावीत!)

हे पूर्ण मान्य!

नवीन प्रश्न मांडायचे उदाहरणः नागराज यांनी कन्नड शिलालेखांचे केलेले अत्यंत ताजे विश्लेषण. हा सर्वात जुना शिलालेख, इथून कन्नड मायबोलीची सुरुवात, हा यादवकालीन की शिवकालीन, या पलिकडे त्यातील भाषावापराचा, गृहित सत्ता-संबंधांचा, तर्क मांडण्याच्या शैलीकडे बारीक लक्ष देऊन तत्कालीन "सामाजिकते" बद्दल, शिलालेखांच्या राजकीय संदर्भाचा कन्नड काव्याशी रोचक संबंध जोडतात. साहित्य आणि राजव्यव्यस्थांच्या अन्योन्य संबंधांवर आधारित एका विशिष्ट कालात संस्कृत सोडून कन्नड सारख्या देशी भाषेवर भर का दिला गेला, यावर प्रकाश टाकतात.

काही अंशी शेल्डन पोलॉकनेही हे विश्लेषण संस्कृतवरच्या पुस्तकात एका सेपरेट च्याप्टरमध्ये केलेले आहे. कल्चर-पॉवर काँप्लेक्सबद्दल त्याचे विचार भारी रोचक वाटले.

बाकी सहमत-साहित्याची "सामाजिकता" इन टर्म्स ऑफ द टार्गेट ऑडियन्स आणि रिलेटेड गोष्टी तपासणे हे बहुत रोचक आहे. "फॉर्म्स ऑफ नॉलेज इन अर्ली मॉडर्न साऊथ एशिया" या पोलॉक & कं. च्या लहानशा पुस्तकात एक ब्रजभाषा पाठशाळेचे उदाहरण यासंदर्भात खूप आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

इतके मोठे नसले तरी काही लहान-लहान कामं मराठीत होताहेत.
त्यातील हे पाच खंड :
१. स्त्री साहित्याचा मागोवा खंड १ - इ.स. १८५० ते १९५०
२. स्त्री साहित्याचा मागोवा खंड २ - इ.स. १९५१ ते २०००
३. स्त्री साहित्याचा मागोवा खंड ३ - इ.स. १८५० ते २०००
४. भारतीय भाषांतील स्त्री साहित्याचा मागोवा १८५० ते २००० खंड १
४. भारतीय भाषांतील स्त्री साहित्याचा मागोवा १८५० ते २००० खंड २

दुसरे एक काम आठवले ते मराठीतून इतर भाषांमध्ये व इतर भाषांमधून मराठीत अनुवादित झालेल्या पुस्तकांची सूची.
ही नागपूर येथील एक संशोधक बाईंनी केली आहे. ( पहिले नाव वीणा. आडनाव आठवत नाहीये आत्ता. क्षमस्व.)
याच स्वरूपाचा राष्ट्रीय पातळीवरील प्रकल्प डॉ. गणेश देवी यांनी सुरू केला होता. आता तो कुठवर आला आहे याची कल्पना नाही.

भाषांइतक्याच बोली व लिखित साहित्याइतकंच लोकसाहित्यही महत्त्वाचं आहे, हे अधोरेखित करत एक मोठा प्रकल्प डॉ. गणेश यांनी सुरू केला. त्यातील काही काम बडोद्याच्या भाषा या त्यांनी स्थापन केलेल्या संस्थेतर्फे होत आहे आणि काही काम साहित्य अकादेमीच्या एका स्वतंत्र विभागातर्फे. आदिवासी मौखिक साहित्य व कला यांच्या अभ्यासाचा हा प्रकल्प आहे. त्यात अनेक पुस्तकं, मासिकं, सीडीज ( संगीताचा अभ्यास मांडणार्‍या ) प्रकाशित करण्यात आलेली आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय करू आता धरूनियां भीड
नि:शंक हे तोंड वाजविलें
नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण
सार्थक लाजोनि नव्हे हित

वा! हे उत्तम आहे!.हे पुण्यात नेहमीच्या लायब्रर्‍यांमध्ये उदा. मसाप मिळू शकेल काय? मिळाल्यास वाचेन म्हणतो खंड एखादा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एकूणच चर्चा प्रतिसादांतून मौलिक माहिती मिळते आहे.
वर रोचना यांनी दिलेल्या दुव्यावरून पुस्तक उतरवून घेतले आहे. बरेच मोठे आहे. हळू हळू एकेक प्रकरण रिचवावे लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

'स्पॅरो' या संस्थेने खूप चांगले डॉक्युमेंटेशन केले आहे. ते केवळ छापिल पुस्तके इतके मर्यादित न ठेवता इतर पद्धतींनीही केले आहे हे वैशिष्ट्य. छायाचित्रे, मुलाखतींचे व्हीडिओज, पोस्टर्स अनेक प्रकार आहेत. हे अर्थात प्रामुख्याने लेखिका व इतर काही कलावंत स्त्रियांविषयी केलेले काम आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय करू आता धरूनियां भीड
नि:शंक हे तोंड वाजविलें
नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण
सार्थक लाजोनि नव्हे हित

भाषा ही संस्था तुलनेत अलीकडची आहे. पण भारत भवन व ललित कला अकादेमी या जुन्या संस्था आहेत. ललित कला अकादेमीने केलेले चित्रकारांविषयीचे डॉक्युमेंटेशन महत्त्वाचे आहे. त्यातली एक चांगली गोष्ट म्हणजे मराठीत 'चिन्ह' हे मासिक प्रकाशित करणार्‍या सतीश नाईक यांनी आपल्याकडील अक्षरशः हजारो कात्रणे ललित कला अकादेमीला दिली. ( महाराष्ट्रात असे काही काम करता येणे अवघड हे त्यांना दिसले असावे.) त्यामुळे त्या विषयावरील सारे काही दिल्लीला पहायला मिळू शकेल.
भारत भवनच्या वाचनालयात देशातील सर्व भाषांमधील कवितासंग्रह पाहण्यास मिळतात. लेखक -कवींची छायाचित्रे, हस्ताक्षराचे नमुने व स्वाक्षर्‍याही पाहण्यास मिळतात. लोककला व चित्र-शिल्पकलेचे नमुनेही त्यांच्या संकलनात आहेत.
महाराष्ट्राबाबत काही कोश आता 'विवेक' या मासिकातर्फे येताहेत. पण त्यांच्या संपादक मंडळावरील लोक बायस व मुडी आहेत. त्यामुळे चरित्रकोशात त्यांनी आपल्या मर्जीनुसार नावे घेतली वा टाळली. सुधीर जोगळेकर यांनी लोकसत्ता मध्ये सुरुवातीच्या खंडावर लिहिलेल्या परीक्षणात अशा काही राहिलेल्या नावांची यादी दिली होती, हे स्मरते. चित्र-शिल्पकारांचा कोश याच आठवड्यात प्रकाशित झाला आहे. तो अजून पाहण्यात आला नाही. पण त्याची अनुक्रमणिका पाहता तो व्यवस्थित असावा असे वाटते आहे. चित्रकार सुहास बहुलकर यांनी हे मोठे काम केले आहे.
विश्वकोशमंडळाने कन्याकोश नावाचा एक कोश केला आहे. पण तो मी अद्याप पाहिला नाही. त्यातील काही नोंदी तपासल्या होत्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय करू आता धरूनियां भीड
नि:शंक हे तोंड वाजविलें
नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण
सार्थक लाजोनि नव्हे हित

ललित कला अकादेमीने केलेले चित्रकारांविषयीचे डॉक्युमेंटेशन महत्त्वाचे आहे.

याचे नाव समजेल का? विक्रीसाठी मुंबई/पुण्यात उपलब्ध आहे का? कुठे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

+१.

असेच म्हणतो. ज्या संस्थांचा नामोल्लेख केलाय त्यांचे पत्ते, णंबर, इ. दिल्यास तिकडे जाऊन बघता येईल काय काय आहे ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

इथे आलो की कसं व्यासंगी लोकांत मिसळता आलं असं वाटतं.
(व्यासंगी लोकांना आमच्यात मिसळून काय वाटतं, वाटत असेल ह्याची आम्ही फिकीर करत नै.)
चांगली चर्चा सुरु आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

पॉलोक यांचे संशोधन मुख्य संस्कृत काव्य आणि हळे कन्नड साहित्यावर असले, तरी एकंदरित भारतीय भाषा-संशोधनावर त्यांनी बरेच काही लिहीले आहे. त्यांच्या दोन लेखांचा दुवा खाली देते. हे वादग्रस्त ठरले होते, पण त्यांच्यात बरेच काही विचारप्रवर्तक असे आहे. खासकरून मराठीला ही "अभिजात" भाषेचा दर्जा मिळावा या मागणीच्या संदर्भात, आणि एकूणच इंग्रजी-ग्लोबलाइजेशन इ. च्या मार्‍याखाली मराठी सारख्या देशी भाषांची अधिकाधिक होत जाणार्‍या कुंचबणे बाबतीत सर्वत्र चालू असलेल्या चर्चेसंदर्भातही.

काही सदस्यांबरोबर अन्यत्र थोडी चर्चा झाली होती, पण सर्व ऐसीकरांनी ते वाचून आपले विचार मांडावेत अशी इच्छा आहे:

क्राइसिस इन द क्लासिक्सः
There have been no successors to any of the pre-independence generation of Sanskrit scholars, the sort who mastered their discipline and thought conceptually about it and wrote for an international audience: S. N. Dasgupta, S. K. De, Mysore
Hiriyanna, P. V. Kane, S. Radhakrishnan, Venkata Raghavan, C. Kunhan Raja, V. S. Sukthankar, are the first in a long and distinguished list from across India (I leave aside the loss of the great tradition of pandit learning, which is now virtually extinct). There have been no major Sanskrit projects in India since the completion of the critical edition of the Ramayana at Baroda more than 30 years ago. All the great classical series (such as Anandasrama, Trivandrum, Gaekwad, Madras) have been more or less discontinued, and as a result the manuscripts in those collections are no longer being published. Indeed, there have been few
new Indian editions of complex Sanskrit texts at all from among the scores of important manuscripts that lie unpublished in archives. In the area of hermeneutics (Mimamsa), for example, I know of no one in India today capable of editing works like those edited just a generation ago by P. N. Pattabhirama Sastry or S. Subrahmanya Sastry. (The same holds for many other areas of classical studies; with the death of A. N. Upadhye in 1975 and H. C. Bhayani in 2000, the editing of Prakrit and Apabhramsha works seems to have died too.)....
The situation is no different in the other classical languages, as I learned in the late 1990s when I organized a project on the histories of South Asian literary cultures (Pollock 2003). Our core group of colleagues was looking for others to join us who possessed a deep historical understanding of a regional language, conceptual skills, and the capacity to communicate their knowledge effectively. We were able to locate only four qualified scholars in India, and identified no one for a host of
languages, including Assamese, Marathi, Newari, Oriya, and Panjabi.

द रियल क्लासिकल लँग्वेज डिबेटः
There is another Sanskrit proverb that tells us it is far easier to tear down a house than to build it up (asakto ham grharambhe sakto ham grhabhanjane). The great edifice of Indian literary scholarship has nearly been torn down. Is it possible, at this late hour, to build it up again? India has shown itself capable of achieving pre-eminence in anything it sets its mind to. Consider the Indian Institutes of Management, of Science, and of Technology. Universities and companies and organisations around the world compete for the graduates of the IIMs, IISs, IITs. Why should India not commit itself to build the same kind of institute to serve the needs of its culture — not just dance and art and music, but its literary culture? Why should it not build an Indian Institute of the Humanities devoted not just to revivifying the study of the classical languages, but to producing world-class scholarship, as a demonstration of what is possible, a model for universities to follow, and a source of new scholars to staff those universities? It is not too late. The reward of success would be incalculable; the cost of failure would be catastrophic.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वर उल्लेखिलेले दोन्ही लेख आधी वाचले होते. तादृश वाचन नसल्याने लेख किती प्रमाणात निराशावादी आहे ते माहिती नाही. पण भारतात तरी असे कोणी सक्सेसर्स असतील तर कधी पुढे आले नाहीत असेच म्हणावे लागेल. काही चांगले लोक हे व्हर्नाक्युलर भाषांमध्येच लिहितात, त्यांचा ऑडियन्स मर्यादित असतो. जरासे अवांतर उदाहरण द्यायचे झाले तर शिवचरित्रकार श्री. गजानन मेहेंदळे सरांचे देता येईल. त्यांच्या एकूण विद्वत्तेबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. त्यांनी इंग्रजीत शिवचरित्र लिहिलेय पण ते इतके फेमस झाले नाही. त्यांचा ऑडियन्सदेखील बाय अँड लार्ज महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे. पोलॉकही असेच म्हणतो की काही थोडे चांगले लोक आहेत पण त्यांचा ऑडियन्स त्यांच्या विद्वत्तेच्या तुलनेत लै मर्यादित आहे.

बाकी अमेरिकेतील संस्कृत अभ्यासाची ५०/६० वर्षे अशा काहीशा शीर्षकाचा लेख मध्ये वाचला होता, त्यात जरा परिस्थिती बरी दिसतेय असे वाटते साधारणपणे. पण भारतातील क्लासिकल स्टडीजच्या परिस्थितीबद्दलचे भाष्य सहजी खोडता येण्याजोगे वाटत नाही. डेक्कन कॉलेजसारखे अपवाद मान्य करूनसुद्धा.

आणि ह्युमॅनिटीजवरचा फोकस कमी किंवा जवळपास नसल्यात जमा आहे हेही खरेच. कोलकात्यातले सेंटर फॉर स्टडीज इन सोशल सायन्सेस हे कॉलेज चांगले आहे असा रिपोर्ट ऐकलाय पण बाकी अजून किती कॉलेजेस त्या लेव्हलची आहेत हे पहायला आवडेल.

भारतापुरती तरी या अवनतीची कारणे पहायला आवडतील. पोलॉकने सांगितल्याप्रमाणे नेहरूप्रणीत भौतिकवाद "धरणे ही उद्याची मंदिरे" इ., काही प्रमाणात अँटी-ब्राह्मण भावना अशी काही कारणे पटतात, पण यापलीकडे जाऊन याचा विस्तृत मागोवा कुणी घेतला असेल तर पहायला नक्की आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं