उदरभरण नोहे: हल्ली कुठे आणि काय खाल्ले? - २
उदरभरण नोहे: हल्ली कुठे आणि काय खाल्ले? : भाग १
आपण ऐसी अक्षरेचे सदस्य नवनवीन पुस्तके वाचत असतो, नवनवीन संगीत/व्याख्याने वगैरे ऐकत असतो, नाटके/चित्रपट/व्होडीयो/दृकश्राव्य कार्यक्रम बघत असतो. इतकेच नव्हे, तर त्याबद्दल ऐसीवर लिहून इतरांनाही जे जे उत्तम वाटले त्याबद्दल सांगून त्याचा आस्वाद घ्यायला उद्युक्त करतो, त्याच बरोबर जे जे अनुत्तम त्याबद्दल सावधही करतो. याच बरोबर आपल्यातील अनेक पाककृती आणि छायाचित्रणातही एकत्रितपणे काहीतरी उपक्रम राबवताना दिसतात. यासगळ्यात पदार्थ बनवणार्याप्रमाणे जातीच्या खवैय्याकडे दुर्लक्ष होऊ नये असे वाटले आणि त्यातूनच या धाग्याची कल्पना सुचली.
आपण रोजचे जेवण जेवतोच, पण त्याच बरोबर वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये नवनवीन पदार्थ चाखत असतो. हॉटेलांतच नाही तर सणासुदीच्या निमित्ताने किंवा कधी सहज लहर आली म्हणून किंवा कधी एखादा जिन्नस स्वस्तात मिळाला म्हणून घरीच काहितरी नवा, सुग्रास पदार्थ बनतो. हा धागा अशाच तुम्हाला आवडलेल्या/नावडलेल्या पदार्थांवर चर्चा करण्यासाठी आहे. इथे हल्ली तुम्ही कुठे आणि काय खाल्ले? ते तुम्हाला आवडले का? असल्यास का? नसल्यास का? जर हा पदार्थ घरी स्वतः बनवला असेल / त्याची पाकृ माहित असेल तर तो कसा बनवला? जर हा हॉटेलात खाल्ला असेल तर ते हॉटेल कुठे आहे? पदार्थाची किंमत काय होती? हॉटेलचा अॅम्बियन्स कसा होता वगैरे हवां ते लिहू शकता. पदार्थाचा फोटो असेल तर उत्तमच.
अर्थातच हे फक्त खाण्याबद्दल नाहि तर पिण्याबद्दलही आहे
भाग १ बराच लांबल्याने, वाचनाच्या सोयीसाठी, तेथील राधिका यांच्या प्रतिसादाचे रुपांतर, संपादकीय अधिकारात, पुढिल भागात करत आहोत.
======================
आजच आम्ही सांताक्रूज पूर्व भागातील किंग चिलीमध्ये गेलो होतो. हे हॉटेल चालवणारे लोक आहेत ईशान्य भारतातले. तेथील मेनूकार्डावर आपल्याला मुख्यत्वे चायनीज, काही मंगोलियन आणि काही थाई पदार्थ दिसतात. परंतु, 'तुमच्याकडचे पारंपारिक जेवण आम्हाला हवे आहे' असे सांगितल्यावर तिथे तांखुल नागा आणि मैतेई लोकांचे खास असे काही थोडे पदार्थ मिळतात. हे पदार्थ मेनूकार्डावर नसतात.
यातलेच तीन पदार्थ आम्ही आज चाखून पाहिले- इरुम्बा (की इरोम्बा. नेमका उच्चार आठवत नाही), उकळलेल्या भाज्या आणि पोर्क ग्रेव्ही. पैकी इरुम्बा म्हणजे बटाट्याचे तोंडीलावणे होते. हा मैतेई पदार्थ असून त्यात त्यांचे काही पारंपारिक पदार्थ घातले जातात. आम्ही खाल्लेल्या इरुम्ब्यात त्या भागात उगवणारी खास, वेगळी मश्रुम्स घातली होती. प्रत्यक्ष मश्रूमची चव जरी मला आवडली नसली, तरी त्यामुळे बटाट्याला जी थोडी वेगळी चव आली होती, ती मात्र आवडली. पोर्कसुद्धा उत्तम शिजले होते आणि खाताना मजा आली. या पदार्थांच्या चवी मला फारशा आवडल्या नाहीत, पण सर्व पदार्थांचा पोत खूप छान होता. एकूणच खूप वेगळ्या प्रकारचे जेवण जेवल्याचे समाधान मिळाले. तिथे परत एकदा भेट देऊन त्यांच्या पारंपारिक पद्धतीने बनवलेली चिकन खायचा आता माझा बेत आहे.
हे हॉटेलदेखील छोटेसेच आहे. स्वच्छ आहे. शांत आहे. आणि फारसे महागही* नाही.
*माणशी १७० रु. पण आम्ही मोठ्या संख्येने तेथे गेलो होतो. दोघे-तिघेच जण गेल्यावर माणशी खर्च बहुधा वाढेल.
स्लो फूड मुव्हमेंट
स्लो फूड च्या धर्तीवर अशी एखादी शाखा पुण्या/मुंबईत जिथे जास्त सदस्य आहेत तिथे सुरु करता येईल काय? मोठा ग्रुप जमला तर विविध पद्धतीचे अन्नप्रकार त्या त्या पद्धतीचे अन्न बनवणार्या स्पेशिलिटी शेफ/ रेस्टॉरंटशी ठरवून महीन्यातून एक दिवस यथेच्छ भोजन करता येईल.
दुवा १ - स्लो फूड इंटरनॅशनल
दुवा २ - मुंबईतील स्लो फूड
रात्रभर खूपशी दारु प्यावी. मग
रात्रभर खूपशी दारु प्यावी. मग पहाटे पहाटे कल्याणच्या दूध नाक्यावर जावे. मलई-पाव, खिमा पाव आणि पाया सूप. सगळं कसं ऊन ऊन. पण ज्यांना 'बडे' चं मांस चालत नाही त्यांनी तिथे जाउ नये.
पंचवटी गौरव
पंचवटी गौरव नावाच्या 'ओव्हर हाईप्ड' थाली प्रकारातील उपहारगृहात पैसे वाया घालवले.
ना धड राजस्थानी, ना धद मराठी असे अर्धवट जेवण तेथे मिळते.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
पंचवटी गौरव बकवास... दिलेल्या
पंचवटी गौरव बकवास... दिलेल्या पैशाची वसुली एकदम झुरो.
त्यापेक्षा (मुंबईत असल्यास) कान्सार काठियावाडी थाळी या ठिकाणी जा. साधाच पण चवदार मेन्यू.
स्थळ अहमदाबाद हायवेवर घोडबंदर रोडच्या फाट्याच्या जंक्शनवर हॉटेल फाउंटनच्या शेजारी.
आभार. मी मुंबईत नसलो तरी स्थळ
आभार. मी मुंबईत नसलो तरी स्थळ मुंबईतील निवासाच्या जवळ असूनही माहित नव्हते. आता तिथे गेलो की नक्की जाईन.
बाकी राजधानी, पंचवटी गौरव वगैरे स्थळे ओव्हर हाईप्ड आहेत हे नक्की
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
आंध्र थाळीच्या आठवणीने उदास
आंध्र थाळीच्या आठवणीने उदास होऊन 'साउथ इंडीज'मध्ये गेले. थाळी मागवली. भाताचा ढीग आला. तूप दूरवर दिसेना. शेवटी वेटरास बलाऊन तूप मागितले. तर 'आम्ही तूप सर्व करत नाही' असे सांगण्यात आले.
थू असल्या तथाकथित रीजनल स्पेशालिटी देणार्या खानावळींवर.
मुंबईत कुठे अस्सल आंध्र थाळी मिळते काय? मी कुठेही जायला तयार आहे.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
साउथ इंदिज?
पुण्यात ते ई स्क्वेअर च्या समोर आहे तेच?
तिथे परवा जाणं झालं होतं.
आप्पम चांगले दिले होते(अनलिमिटेड) आणि सोबत ब्नारळाच्या दुधात शिजवलेला कुठलासा सूप्-वरणसदृश चविष्ट पदार्थ(हा थाई तोम्-खा सूप ह्या प्रकाराच्या बराच जवळ जातो, पण चवील सौम्य्,सात्विक आहे.). शिवाय फिल्टर कॉफीही मस्त होती.
मला ते जेवण आवडलं. आंध्र नसून केरळी स्टाइल वाटलं.
पण जरा जास्तच महागही आहे.(थाळीमागे ६००रुपये म्हणजे जरा जास्तच आहेत. हां पण ती व्हरायती इतरत्र तशी/तितकी नाही मिळणार.)
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
सकाळी गेलो की एक तर रेटही कमी
सकाळी गेलो की एक तर रेटही कमी अन व्हरायटीपण अजून जास्त मिळते. आणि येस्स, आंध्र नसून ते केरळी होते.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
दो ठिकाणे तशी सर्वज्ञात..
नुकतेच फर्ग्युसन कॉलेजसमोरच्या कॅफे चोकोलेडमधे चॉकोलेड बी आणि चॉकोलेड एम (अनुक्रमे कॅड - बी आणि कॅड एम) दोन्ही प्यायले (की खाल्ले) उत्तम वाटले आणि आवडले. सबब छायाचित्र काढले.
शिवाय काटाकिर्रची कीर्ती ऐकून स्थलांतर झालेले ठिकाण शोधून काढले, पण हाय रे देवा. तिथे बाहेर दीडदोनशे लोक रांग लावून उभे होते. वेटिंग लिस्ट लिहून घेणार्या व्यक्तीच्या वहीची दोनेक पाने वाट पाहणार्या नावांनी व्यापली होती. किमान एक तास तरी दरवाज्यापर्यंत पोचणार नाही हे लक्षात येऊन केवळ वास घेऊन परत निघालो.
ओव्हरहाइप्ड
दोन्ही ठिकाणे, दोन्ही पदार्थ ओव्हरहाइप्ड वाटतात. म्हणजे ती वाईट आहेत असे नाही, पण इतके त्यात कौतुक करण्यासार्कहे काय आहे तेच आजवर समजले नाही.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
काटाकिर्र..
'काटाकिर्र' हे काय प्रकरण आहे ? काय मिळते तिथे ?
हे प्रकरण
या ठिकाणी पुण्यात कोल्हापुरी नावाने भलतीच मिसळ विकली जाते.. कोल्हापुरात मिसळ खाल्ली असली तर अजिबात जाऊ नका... उगाच नाव झालेलं आहे. आणि पुण्यात मिसळ खायला बरीच चांगली ठिकाणे आहेत.
काटाकिर्र
कोल्हापूरला जाऊन प्रत्यक्ष उत्तम मिसळ चापण्याचा योग आला नाही.
पण म्हणून काटाकिर्र वाईट नक्कीच नाही. गेल्याच महिन्यात दणक्यात हाणली होती.. आणि चव नक्कीच चांगली होती.
टेबलावर सोडलेल्या कट/तर्रीचा कप /वाडगा पावाबरोबर संपवल्यावर मस्तच वाटली.
एकदा ट्राय करायला तर काहीच हरकत नाही.
अगदी मामलेदार / फडतरे नसेल तरी वाईट नक्कीच नाही..
माझा पुण्यात पहिला क्रमांक श्री उपाहारगृह शनिपार यालाच आहे. पण दुसर्या क्रमांकावर काटाकिर्र येतंच..
चॉकोलेड
चॉकोलेड हा काय पदार्थ आहे? थंड बोर्नविटावर टाकलेले चॉकलेटचे तुकडे?
काटाकिर्र ची दुसरी ब्रान्च
काटाकिर्र ची दुसरी ब्रान्च कमिन्स कॉलेज रोड ला आहे ..छोटं दुकान आहे ..तिथे पण गर्दि असते ..पण कर्वे रोड पेक्षा कमी ! बेडेकर मिसळ ची पण एक ब्रान्च जवळच कमिन्स कॉलेज- कर्वे स्त्री शिक्षण संस्थे जवळ आहे ! .. दोन्हिकडे ओरिजिनल ब्रान्चेस पेक्षा नंबर लवकर लागतो !
------
मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे
भले तरी सोडू कासेची लंगोटी ,नाठाळाच्या माथी हाणू काठी
http://veedeeda.blogspot.in/
शाहजी'ज पराठा आणि इतर
मधे एकदा शाहजीज पराठा मध्ये जाणे झाले. पूर्वी मला उगीच आपल्याला खाण्याची लै ठिकाणं माहिती आहेत असे वाटायचे. फर्ग्युसनजवळचा चैतन्य पराठा, रेल्वेस्टेशन जवळचा नंदूज् पराठा खाउन मी खुश होतो.
शाहजी मध्ये जी क्याटेगरी मिळाली ती ह्या दोन्हीहून भन्नाट होती. वेगळ्याच पद्धतीने , काहीसा कुरमुरित पराठा तिथे खायला मिळाला . भन्नाट वाटला.
शिवाय चूर चूर नान का तत्सदृश नावाचा आयटम अप्रतिम होता.
मी पनीर खात. पुण्यातील मी खाल्लेल्या ९९% ठिकाणचे पनीर हे रबरसदृश कण्नकेचा गोळा खावा तसे लागत असल्याने मी टाळतो. चंदिगड, गुरगाव इथले लुसलुशीत, काहिसे तुपाळ पनीर मात्र मी मिटक्या मारित खाल्ले होते, सलग सहा महिने, न कंटाळता!
तर सांगायची गोष्ट हीच की अगदी त्याच धाटणीचे चविष्ट पनीर सुद्धा शाहजी मध्ये मिळाले.
तर ह्या सर्व क्याटेगरीत मी शाहजीला १००% गुण देइन.
.
लस्सी पण मस्त होती तिथली, पण अशी "ऑलो टाइम ग्रेट" वगैरे वाटली नाही. नुस्ती "मस्त","छान" वगैरे वाटली.
.
नंदूज् मध्ये ज्याने त्याने आपल्या रिस्कवर जावे. तिथला पराठा हा अत्यंत चविष्ट असला तरी पूर्ण खाववत नाही इतका तेलकट्/तुपकट्/लोणकट असतो. तिथे एक पराठा घ्यावा, पाच -सात जणांनी मिळून चवीपुरता खावा. म्हणजे मग हार्ट प्रॉब्लेम वगैरेंचे टेन्शन येणार नाही.
.
फर्ग्युइसन, चैतन्य पराठा सुपरिचित अस्लयाने त्याबद्दल अधिक लिहित नाही, तो सुद्धा आवडतो, इतकेच लिहितो.
.
जंगली महाराज रोडवरील दक्षिणायन मधील पोंगल हा पदार्थ अप्रतिम आहे. सात्विक, कमी तिखटातेलाच्या प्रकारांतील एक सर्वोत्कृष्ट अन्न म्हणून त्याचा समावेश करावा असे वाटते. त्यातला साधेपणा आवडतो. तिथलीही फिल्टर कॉफी आवडली.
.
आणि हो, मधे एका गाडीवर दोन अंडी फोडून नुसतीच भाजून खाली(हाल्फ फ्राय पलटी मारुन खाल्ले), त्यावर फक्त थोडी मिरपूड आणी किंचित मीठ इतकेच भुरुभुरु पसरले. बस्स....
दिवस अगदिच मजेत गेला उरलेला.
.
पुण्यात आल्यापासून दहिवडा खाण्यस तरसलो होतो. माझ्या मूळ गावी दहिवडा बर्याच ठिकाणी मिळे. पुण्यात मिसळ्,इडली, मेदु वडा सांबार सहजी सापडला, पण दहिवडा शोधून शोधून थकलो.
शेवटी कर्वे पुतळ्याजवळ शीतल मध्ये आणि जुन्या मुंबै-पुणे रस्त्यावर एक शीतल आहे तिथेही दहिवडा मिळाला. आवडला.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
त्याच रात्री आपटे रोड येथील
त्याच रात्री आपटे रोड येथील शाजीत गेलो होतो. चुरचुर नान, आलू चीज पराठा, मेथी पराठा हे तीन प्रकार ट्राय केले. मद्य वगैरेची सोय चांगली आहे पण चुरचुर नान मधे चुरचुर म्हणण्यासारखे चुरचुरीत किंवा खुसखुशीत काही नव्हते. तंदुरी आलू पराठाच होता, फक्त कुस्करलेला.
मेथी पराठा तव्यावरचा होता, तो चांगला होता. त्यात मेथीची प्युरी वापरलेली दिसत होती त्यामुळे मेथीची कोणतीही कन्सिस्टन्सी नव्हती, फक्त हिरव्या रंगाचा आणि मेथीच्या स्वादाचा चांगले पदर सुटलेला भलामोठा पराठा.
चीज आलू पराठा उत्तम होता.
सोबत जिमलेट बरे बनवले होते.
छास लोटी म्हणून प्रकार घेतला. आतापर्यंत प्यायलेल्यातल्या सर्वोत्तम ताकांपैकी एक. काय मसाला होता. व्वाह.
पण चुरचुर नान काही भयंकर आवडले नाही. मुख्य प्रॉब्लेम हा की प्रत्येक पराठा १८० ते २२० रुपयांच्या रेंजमधे. पण सिंगल पराठा उपलब्ध नाहीच. पराठा = कंपल्सरी थाळी. प्रत्येक पराठा हा त्याच त्या सहा वाट्यांच्या जलतरंगासोबत "थाळी" म्हणून दोनशे रुपयांच्या घरात पेश करायचा ही कोणती स्टॅटेजी?
आणखी एखादा पराठा ट्राय करायचा असला की पुन्हा संपूर्ण थाळी ? १८० ते २०० रुपये?
छे. वेस्टेज.
आपटे रोड...
मुख्य प्रॉब्लेम हा की प्रत्येक पराठा १८० ते २२० रुपयांच्या रेंजमधे
यप्स. ह्यासाठीच चुकून एकदा तिथे एकटा गेलो होतो, तेव्हा रेट कार्ड पाहून सरळ उठून आलो होतो.
.
मी गावातलं शाह्जी म्हणतोय, तिथे शिंगल शिंगल पराठे मिळतात. मग दोस्तांनीही तिकडच नेलं होतं.
.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
अरे माझ्या देवा एवढे महाग
अरे माझ्या देवा एवढे महाग
आमच्या काळी फर्ग्युसन चा चैतन्य पराठा २०रुपयात मिळायचा. दही, बटर, लोणचं, कांदा...
५ वर्षाँपूर्वी ४० ४५ रु ला होता वाटतं...
आतासुद्धा
आतासुद्धा चैतन्य ५५-६० रुपयात देतो. (काही पराठे ५०रु मध्येच असावेत, आलू पराठा वगैरे. पणी मी सदैव पनीर परठा, हरियाली पराठा, पालक पराठा पसंत करतो, ते ६०ला असतात.)
मूळ पेठांमधलं शाहजीसुद्धा ह्याच रेंजच्या असपास आहे. आपटे रोड मधलं शाहजी कुठल्या तरी पॉश हॉटेलचं अॅनेक्स म्हणून नुकतच उभं केलय. तिथे येणर्या पॉश ग्राहकाने वस्तू पुरेशा महाग नाहित म्हणून त्या चांगल्या नाहित असा ग्रह करुन घेउ नये ह्यासाठी ते मुद्दम महाग ठेवलं असावं.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
हा आता केवळ एक नॉस्टाल्जियाच
हा आता केवळ एक नॉस्टाल्जियाच मानावा लागेल, पण कदाचित काही क्लू मिळेल अशा आशेने लिहितोयः
मी बारा वर्षांपूर्वी पुण्यात असताना फर्ग्युसन कॉलेजसमोर कॉलेजच्या विरुद्ध बाजूला (अगदी समोर नसेल कदाचित) एक राहत्या जागेत, खोलीतल्या ओट्यावर गॅसची शेगडी ठेवून एक बाई पराठे बनवून द्यायच्या. बसण्यासाठी तिथेच दाराबाहेर चिंचोळा पॅसेज होता आणि त्यात तीनचार पत्र्याच्या फोल्डिंग खुर्च्या. यांची आणखी एक खूण म्हणजे त्या घरचं पांढरं लोणी द्यायच्या आलू पराठ्यासोबत. अमूल बटर नव्हे.
नंतर ती बिल्डिंग / जागा / पॅसेज वगैरे सगळंच अदृश्य झालं. काळाचा रोडरोलर फिरतच असतो सगळ्यावर. पण ती जी काही टेस्ट होती ना आलू पराठ्यांची, ती कधीच विसरणार नाही. उत्तम प्रमाणात हिरवी मिरची, कोथिंबीर आणि सर्व काही नीटपणे घातलेलं सारण आणि खुसखुशीत भाजलेला तव्यावरचा, जणू आपल्या घरातला असावा तसा, पराठा थेट प्लेटमधे.
अजूनही त्या बाई हे पराठे कुठे देत असतील तर प्रचंड आनंद होईल. तेवढ्यासाठी पुण्याला येतो हवं तर.
सहमत
ह्या बाईंकडे मीदेखील पुष्कळ पदार्थ खाल्ले आहेत. त्यांच्या पराठ्याचं सारण हे मराठी बटाटेवड्यासारखं असायचं म्हणून मला ते आवडायचं. संकष्टीला उकडीचे मोदकसुद्धा खास गुळातले असायचे. (आणि खोटं कशाला सांगू? त्या बाईंच्या सुबक गोर्याघार्या रूपाला एक छान बाज होता तोदेखील मला आवडे.) इमारत पडल्यानंतर त्या गायब झाल्या. ही जागा रूपालीशेजारी होती. आता तिथे बरिस्ता वगैरे आहे. असो.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
+१
माझी आणी माझ्या मित्राची अतिशय आवडती जागा होती हि. इथे थालपीठ मस्त मिळायचे ते पण घरगुती लोण्याबरोबर. सगळ्याच पदार्थांना सात्विक चव असायची. इतर अनेक मराठि पदार्थांच्या बरोबरिने इथे फ्रँकी पण मिळायची.
असो.
पांथस्थ.
अगदी अगदी..
थालीपीठसुद्धा उत्कृष्ट..
आपल्यासारखीच इतरजणांना ही जागा माहीत आहे, ते तिथे गेलेले आहेत आणि त्यांना ते आठवतं आहे ही इतकी जाणीवदेखील अगदीच गडप झालेल्या ठिकाणाबाबत जरा बरे वाटण्यासारखी आहे.
छाया पराठा एक श्रद्धास्थान
नॉस्टॅल्जिया वरुन छाया पराठा एक श्रद्धास्थान आठवले.
पिंपरीतील मासुळकर कॉलनीमध्ये छाया पराठा नामक एक अगदी टपरी म्हणता येणार नाही पण छोटंसं हॉटेल आहे. तिथे जबरदस्त पराठे मिळत असत. तपन आणि सपन नावाचे दोन बंगाली बंधू ते चालवत असत असे आठवते. त्या तुलनेत पुण्यातले चैतन्य, नंदू वगैरे लोकप्रिय पराठे हे अगदी जाडजूड आणि थबथबीत वाटत. छायामधले पराठे साधारणपणे पुरणपोळीइतके किंवा किंचित कमी जाड असत आणि तरीही सारण कमी वाटत नसे. शिवाय इतर ठिकाणी पराठे हे चिवट किंवा रबरी वाटतात तसे कधीही वाटले नाही. पराठ्यांचे परफेक्शन त्याला सापडले होते असे वाटते. तव्यावरुन थेट ताटात येणाऱ्या गरमागरम पराठ्यासोबत छोल्यांची एक विशिष्ट भाजी आणि दही, लोणी, पुदिना चटणी, कांदा वगैरे मिळत असे. पाचसहा वर्षापूर्वी २५ रु. मध्ये दोन पराठे मिळत असत असे आठवते. सिंगल पराठा मागवण्याची सोय होती (सात किंवा आठ रुपये असावा.) त्याच्याकडे स्पेशालिटी म्हणून अंडे आणि चिकन-मटण यांचे स्टफिंग असलेले पराठेही चवबदल म्हणून छान वाटत. दोन माणसांचे दणकून जेवण १०० रु च्या पुढे जात नसे. शिवाय टिपीकल पंजाबी भाज्या (व्हेज व नॉनव्हेज) आणि पुलाव बिर्याणी वगैरे प्रकार मिळत असत पण ते एवढे विशेष नव्हते.
पिंपरीत आंबेडकर चौकात रॉक्सी नावाचे एक इराणी टाईप हॉटेल आहे. त्याच्याकडचे चिकन मुगलाई फारच छान असे.
या दोन ठिकाणची चव बदलली आहे किंवा कसे हे कुणाला माहीत आहे का?
पिंपरीतील मासुळकर कॉलनीमध्ये
मी D Y Patil मधे असतांना इथे अनेकदा पराठे खाल्ले आहेत. इतर ठिकाणी मिळणार्या तेलाने थबथबलेल्या जाडजुड पराठ्यांच्या तुलनेत हे पराठे एकदम मस्त असायचे. पुदिना चटणी आणी गोड दह्याबरोबर काय मजा यायची खायला. ७-८ पराठे खायचे नंतर मस्तपैकी बनाना मिल्कशेक प्यायचा आणी मित्राच्या रुमवर जाउन ताणुन द्यायची. अहाहा काय दिवस होते. पुछो मत!
बंड गार्डन पुल संपल्यावर पोलीस चौकी लागते तिच्या समोर एक ईराणी हॉटेल आहे. तिथे चिकन करी आणी ईराणी रोटी एकदम रापचिक मिळायची. आता ते हॉटेल आहे कि नाहि माहित नाहि. बरेच दिवस तिकडे जाणे झालेले नाहि.
धन्यवाद
आपल्यासारखीच इतरजणांना ही जागा माहीत आहे, ते तिथे गेलेले आहेत आणि त्यांना ते आठवतं आहे ही इतकी जाणीवदेखील अशा ठिकाणाबाबत जरा बरे वाटण्यासारखी आहे.
(श्रेयअव्हेरः गवि)
आपटे रोडलाही शाजी आहे???
आपटे रोडलाही शाजी आहे??? न्यूज टु मी!!!!!!!!!! बाकी मेन लक्ष्मी रोडवरचं वरिजिनल शाजी स्वस्त आहे एकदम मग त्या तुलनेत. पराठा थाळी १२० पुढे जात नाही. प्लस नुस्ता पराठाही ट्राय करता येतो.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
चुरचुर
अहो गवि, तुम्हीच उत्तर दिलेत. कुस्करणेला 'चुरणे' असाही एक शब्द आहे की. चुरचुर म्हणजे चुरलेला! थोडक्यात सेमी-डायजेस्टेड.
शाहजी पराठा
पराठा आवड्ला. आपटे रोडला एका ४ किंवा ५ तारे असलेल्या हॉटेल मध्ये खाली रेस्टॉरंट आहे एसी आणि ठि़कठाक इंटिरिअर .. त्यामुळे महाग असणार सहा टेबलांच्या रविवारातल्या लहान जागेपेक्षा.
पण पराठ्यापेक्षाही त्या जलतरंगातले पदार्थ आवडले विशेषत: दाल माखनी आणि राजमा.. एक पनीरची भाजी पण उत्तम होती..
लस्सी बरी होती. विशेष काहीच नाही. पण पराठा थालि संकल्पना आवडली.
हे शहाजी कुठे आले
हे शहाजी कुठे आले म्हणे?
.
कॅड बी व तत्सम + काटाकिर्र ओव्हर हाईप्ड +१
.
चंदूज लोणकट +१
.
शीतलमधले क्लब स्यांडविचही बरेच बरे असते. मला आवडते. त्यांच्या पावभाजीचा दर्जा आताशा खालावला आहे मात्र.
.
परवा करिश्मा चौकातल्या किमयामध्ये व्हेज क्लब स्यांडविच खाल्ले. तेही आवडले. तेथील गंगाजमुनाही पाणचट नव्हते.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
लक्ष्मी रोडवर एकदम एका
लक्ष्मी रोडवर एकदम एका कोपर्यात. सोपा पत्ता: दगडूशेठ कडून पासोड्या विठ्ठल. तिकडून सरळ जायचे. गुरुद्वारा कुठेय अशी पृच्छा केली की सांगतील तो राईट टर्न घेणे. मग लक्ष्मी रोड लागेल. तिथून वॉकेबल अंतरावर शाहजी आहे. कन्फ्यूज झाल्यास लक्ष्मी रोडवर कुणालाही विचारावे. खूप लहान आणि नजरेत न भरण्यासारखे आहे. वट्टात ६ टेबलं फक्त.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
शीतल
कर्वे पुतळ्याजवळच्या शीतलमध्ये बरेचदा जाणे होते. आणि तिथले सर्व पदार्थ उत्तम चवीचे असतात आणि अतिशय कन्सिस्टंट असतात असा अनुभव आहे.
यात पंजाबी भाज्या, पाव भाजी, दक्षिण भारतीय पदार्थ इ. सर्व आले.
गेल्या दोन तीन महिन्यात हे सर्व किमान एकदा तरी चाखून झाले. सगळेच आवडले.
शीतलमध्ये पुण्यातला सर्वात बेस्ट दही वडा मिळतो..
इस्ट इंडियन फूड फेस्ट
पश्चिम पार्ल्यात इस्ट इंडियन फूड फेस्ट चालू आहे असे कालच कळले. कोणाला तपशील माहीत आहेत का?
राधिका
मिसळपाव!
काल एका मैत्रिणिकडे आम्ही २०-२५ जणांनी धाड टाकल्यावर तिने मिसळपाव बनवली होती. एका कोल्हापूरकराची बायको असल्याची साक्ष देणारी ती मिसळ इतकी फर्मास होती की पुछो मत!
त्याची रेशिपी मागवली आहे. तिला मुहुर्त्त लागल्यावर शेअर केली जाईल
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
सांदण!
काल अनेक दिवसांनी (जवळजवळ वर्षभराने) घरी बनलेले फणसाचे सांदण खाल्ले.
यंदाच्या उन्हाळ्याचा खास असा हाच पदार्थ राहिला होता.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
एम टी आर आणि ब्राम्हिन्स कॉफी बार बंगलोर
रविवारी बंगळुरातल्या मूळ एम टी आर - मावल्ली टिफीन रुम, लालबाग इथे ब्रंचचा योग आला.
लालबागेत तीन तास चालल्यावर दणकून भूक लागली होती.
मावल्ली टिफिन रुम या मूळ रेस्टॉरंटची स्थापना इथे १९२५ मध्ये याच नावाने झाली आणि तेव्हापासून ते त्याच ठिकाणी अव्याहतपणे चालू आहे.
लालबागेच्या त्या बाजूच्या भागाला मावल्ली असे नाव आहे त्यावरुन हे एम टी आर नाव पडले.
रवा इडली, साधा डोसा, मसाला डोसा, गुलाबजाम आणि कॉफी असा मल्टी कोर्स ब्रेकफास्ट झाला.
एका डिलचा भाग म्हणून हे एकूण १०० रुपयांना पडले.
रवा इडली अप्रतिम होती. त्याचा इतिहास असा सांगण्यात आला की महायुद्धाच्या काळात तांदूळ मिळेना त्यामुळी गिर्हाइकांच्या अपेक्षे इतक्या इडल्या बनवणे अशक्य झाले. तेव्हा पर्याय म्हणून रवा इडली बनवली. त्यात सुधारणा करत आत्ताचे स्वरुप आले. रवा इडली ही एका प्लेटमध्ये एकच मोट्ठी इडली येते आणि इथे कर्नाट्कात रवा इडली / रव्वा डोसा याबरोबर सांबाराऐवजी बटाटा कुर्मा / रस्सा भाजी असते. ती एक वेगळीच चव आहे.
इथली हिरवी नारळाची चटणी केवळ अप्रतिम आहे.
प्रत्येक गोष्टिबरोबर एक अगदी लहान वाटी येते ज्यात पातळ (गरम केलेले) साजूक तूप असते. ते इडली / डोसा/ बिशीबेळे भात इ. वर घालून खायचे.
जबरा चव येते पण भयंकर जड असतात सर्व पदार्थ. फार खाऊ शकत नाही.
साधा दोसा सुद्धा जाड होता आणि कट डोसा असा अर्धा कट करून फोल्ड करून आला. तो बरा होता. मसाला डोसाही कट होता. तो चांगला होता.
कॉफी चांदीच्या टम्बलर मध्ये म्हणजे दक्षिणेत ज्या लांबट पेल्यात येते तशी आली. ती उत्तमच होती.
पण बंगळूरात सर्वोत्तम कॉफी ब्राम्हिन्स कॉफी बार शंकर मठ रोड इथे मिळते आणि त्याखालोखाल हट्टी कापी..
ब्राम्हिन्स कॉफी बार ही खूप जुनी आणि फार तर १० गुणिले १५ फूट इतकीच जागा आहे. उभ्यानेच खायचे. चारच पदार्थ पाहिले आहेत नेहमी - इडली, वडा, कॉफी आणि चहा.
त्या तोडीचे पदार्थ हैदराबाद, बंगलोर, पुणे इथे एका ठिकाणी मिळणे अवघड आहे. काही दुखर्या जागा जसे वैशाली, चटणीज वगैरे सोडता.
अतिशय उत्तम वडा आणि चटणी.
अतिशय स्वस्त आहेत. आणि बाहेर एक आजोबा एक छोटा हंडा आणि ओगराळं घेऊन बसलेले असतात. त्यांच्याकडे डिश घेऊन गेलं की ते त्यातून ओगराळ्याने चटणी वाढतात. मी तिथे सांबार पाहिलं नाही कधी.
कॉफीचे डिकॉशन बनवण्यासाठी तांब्याचे बनवलेले छोटे बंब आहेत . अगदी आपल्याकडच्या जुन्या पाणी तापवायच्या बंबांसारखेच दिसणारे.
कॉफीच्याच नावाने असल्याने असेल कॉफी खूपच उत्तम आहे. मूड बदलून जावा इतकी उत्तम आहे.
अतिशय मानसिक तणावात असताना सुद्धा तिथे गेल्यावर एखादा वडा आणि कॉफी हे अत्यंत उल्हसित करतात असा अनुभव आहे.
एम टि आर ! पंगत स्टाइल चं
एम टि आर ! पंगत स्टाइल चं जेवण !
वन ऑफ माय फेवरेट प्लेसेस इन बंगळुरु !
------
मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे
भले तरी सोडू कासेची लंगोटी ,नाठाळाच्या माथी हाणू काठी
http://veedeeda.blogspot.in/
घरी रात्रीचं बंगाली-मराठी
घरी रात्रीचं बंगाली-मराठी मिश्रित जेवणः
लूची (मैद्याच्या पुर्या), सध्या इथे सीझन मध्ये असलेल्या हिमसागर आंब्यांचा आम्रस, बटाट्याची भाजी, छोलार डाल (चण्याची डाळ, ओलं खोबरं, मनूका आणि जिरे घातलेली), आणि कांदा-लसूण मसाला लावून बेक केलेला खास कलकत्तेकर भेटकी मासा.
मजा आली!
भेटकी !
ताट मस्त दिसते आहे !
भेटकी हा मला फार आवडलेला मासा. माझ्या एका बंगाली मित्राने कसल्याश्या (त्यावेळी मला जेवण तयार करण्यात रस नसल्याने 'कसलेसे' कोरड्या रवाळ मिश्रणात घोळवून तळून काढला होता. भन्नाट चव होती. डाळ-भात आणि मासा.. बस्स.
(भेटकीवरून एक अवांतर आठवले. १५-२० वर्षांपूर्वी, प्रेसिडन्सी कॉलेजात 'भेटकी' हे डाकनाम [टोपणनांव] असलेला एक बटबटीत डोळ्यांचा, जाड भिंगवाला चष्मा असणारा, मळके कपडे, उंची साधारण साडेचार फूट आणि दारू किंवा गांजाच्या नशेत कायम तर्र असलेला एक इसम 'राहत' असे. कॉलेजात राहत असे म्हणजे दिवस-रात्र कायम पडीक असे. थोडक्यात 'रंग दे बसंती' मधील आमीर जसा शिक्षण संपल्यावरही पडीक असे, तसा. या इसमाला कुटुंब होते पण का कुणास ठाऊक, तो कॉलेजमध्येच राहिला. कुणाला त्याचा त्रास नसे. कँटीन, आवार, मित्रांचे घोळके, इ. त्याची सापडण्याची ठिकाणे. भेटकी माश्याच्या डोळ्यांचे त्याच्या बटबटीत डोळ्यांशी असलेले साम्य त्याला 'भेटकी' नांव देऊन गेले. वयाने कितीही लहान मुले प्रेसिडन्सीत आली तरी हा त्यांचा मित्र. कुणीही त्याची थट्टा करावी, खांद्यावर हात टाकून गप्पा माराव्यात, एकच सुट्टा मिळून ओढावा, असा हा प्रेसिडेन्सिमित्र होता. त्याबद्दल हे सर्व बरेच ऐकले होते. मग प्रत्यक्ष एकदा प्रेसिडेन्सीत जाणे झाले त्यावेळी या सगळ्या गोष्टी याची डोळां पाहायला मिळाल्या आणि हस्तांदोलनही झाले ! आता त्याची काय अवस्था आहे माहीत नाही पण जिवंतपणी दंतकथा बनून गेलेला एक माणूस म्हणून कायम लक्षात राहील.. )
वाह!
+१००
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
ब्यॅपोक तो! एइगुलोर मोद्धे
ब्यॅपोक तो! एइगुलोर मोद्धे आमेर रॉश छाडा शॉब किछुई अॅकसाथे खेते पारि. भेटकी माछ तो आमार दारुन भालो लागे, इलिशेर मोतो काँटा-फाँटा नेई आर खेते बिशाल नॉरोम-जाहेतु मोजा चॉरोम
ऑबान्तोरः हिमशागोर आम खेते कॅमोन? आमादेर हापूश आमेर मोतो ओदिके कोन-टा आम भालो पावा जाय? लँगडा तो आमि शुनेछि तॉबे बेशिरभाग कोनो आम खाई नि
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हिमशागोर आम
'हिमसागर' हे आंब्याचे नांव ??
(हा प्रतिसाद बॅटमॅन यांच्या या प्रतिसादास उद्देशून आहे.)
होय रोचना यांच्या प्रतिसादात
होय रोचना यांच्या प्रतिसादात त्यांनी उल्लेख केलेलाच आहे, मीही कोलकात्यात असताना हे नाव ऐकलेले आहे. पण खाण्याचा योग काही आला नाही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हो, हिमसागर आंब्याचे नाव आहे.
हो, हिमसागर आंब्याचे नाव आहे. हा आंबा फारच रसाळ आणि गोड असतो. या वर्षी काही ओळखीच्यांनी त्यांच्या बागेतले, झाडावरच पिकवलेले आणून दिले, फारच छान होते. फार दिवस बाजारात दिसत नाही: मे-जून च्या मधोमध एक महिनाभर, साधारण. मग लंगडा आणि दशेहरी येतात. हिमसागरची चव थोडी दशेहरी सारखीच असते, पण त्याच्यापेक्षा मोठा असतो. लंगडा अधिक पिवळट्ट आणि कमी गोड, पण कमालीचा चविष्ट असतो.
पण हापुस-पायरीसारखा घट्ट नसल्यामुळे या आंब्यांचा आम्रस थोडा पाणेदार होतो, आणि आम्रखंड वगैरे साठी वापरता येत नाही.
(भेटकी - अमुक, हे फार कॉमन टोपणनाव आहे. माझ्या एका विद्यार्थिनीचं ही नाव आहे, सगळे तिला वर्गातही तसेच हाक मारतात. भेटकी, पार्शे, तोपशे (सत्यजीत राय यांच्या फेलूदा कथांमधे त्याच्या चुलत भावाचं हेच नाव आहे) ही सगळी माशांची नावं मुलांनाही देतात, मग पन्नाशीत गेल्यावर ते तोपशे-दा वगैरे होतात! आणि तुम्ही वर्णिलेल्या इसमाचा एक "टाइप" ही इथे फार कॉमन आहे - काही इथेच पडिक असतात, काही प्रेसी हून दिल्लीला जे.एन.यू ला जातात :-)!)
गेल्या काही दिवसांत ट्राय
गेल्या काही दिवसांत ट्राय केलेली ठिकाणे:
हाटेल कलिंगा निअर नळस्टॉप. सुरमई घस्सी विथ आप्पम अॅण्ड नीर दोसा. घस्सी ठीकठाक. नीर दोसा जब्री, पण आप्पम गंडलेला फुल्टू. नरमाईचा लवलेश नाही.
हाटेल तारीफ इन परिहार चौक औंध. चिकनं-मटनं. पाया सूप, रान मसाला आणि नॉनव्हेज प्लॅटर. चव खल्लास होती सगळ्याची. रान मसाला मात्र गंडला होता जरा.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
माझ्या सासूबाई पाया मस्त
माझ्या सासूबाई पाया मस्त करतात. कमीत कमी मसाला वापरुन चव येऊ देणे हे कठीण काम आहे. उग्र तर लागता कामा नये पण बोन-मॅरो सूप ची चव तर हवी.
बोन मॅरोची चव इथेही लागली
बोन मॅरोची चव इथेही लागली होती. मस्त लागलं होतं ते सूप.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
बोन-मॅरो ???
हे काय प्रकरण बॉ???
कोणाला जमल्यास पाकृ मिळेल ?
बोन मॅरो म्हंजे हाडांतला मगज.
बोन मॅरो म्हंजे हाडांतला मगज. मटनच्या लेगपीसच्या नळ्या फोडून चोखल्या की त्याचा स्वाद येतो. चांगला लागतो आणि लै पौष्टिक असतो असे म्हंटात.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अले बाप्ले!
अले बाप्ले, अस्संय व्हय!
नक्की खरड करते आईंना विचारुन
नक्की खरड करते आईंना विचारुन
खरड कशाला धागाच काढा की..
खरड कशाला धागाच काढा की.. त्यात टाकायच्या फटुच्या निमित्त्ताने तुम्हालाही करून बघायला मिळेल ते वेगळंच!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
रान मसाला?
ये रान मसाला क्या हई?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
बकर्याची अख्खी तंगडी
बकर्याची अख्खी तंगडी भाजून-शिजवून मसाले इ. लावून सर्व्ह केल्या जाते. ४-५ लोकांना रग्गड होतं ते प्रकरण.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
कुठे काय खाऊ नये!
हे 'तारीफ' प्रकर्ण घासफूस लोकांसाठी एकदम बिनकामाचं आहे. आपल्याबरोबर येणार्या लोकांच्या गप्पांमधे रस असून खाण्यात लक्ष जाणार नसेल तरच घासफूस लोकांनाही त्रास होत नाही.
एखाद्यावर/एखादीवर सूड घ्यायचा असेल तर परिहार चौकातल्या 'पोलका डॉट्स'मधे त्याला/तिला रिसोटो खायला घाला. आयुष्यभर तुम्हाला नावं ठेवली जाणार याची खात्री. (मी एकाला रिसोटो कसा सुंदर भात असतो वगैरे सांगितलं. नंतर "या इथला मला फार आवडला नाही; पण तुला हवं तर तू खाऊन पहा. तसंही तुला मसालेदार खायला आवडतं, मला आवडत नाही. प्रत्येकाच्या चवी वेगवेगळ्या...!" असं सांगितलं. आता कधीही पोलका डॉट्सचा विषय निघाला की तो माझ्या नावाने बोटं मोडतो म्हणे!)
---
ऑस्टीनातल्या कर्बी लेन कॅफेमधे लेमन-पॉपी सीड पॅनकेक खाल्ले. हे नेहेमी मिळतातच असं नाही, त्यामुळे असतात तेव्हा गोडासारखे खाल्ले जातात. नेहेमीच्या गोड घावनांमधे मधेच आंबट-गोड चव मस्त लागली. ते लिंबूस्वादाचं कसं काय जमवतात ते कोणाला माहित्ये का?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
लिंबूस्वादाचं कसं काय जमवतात ..
..लिंबूस्वादाचं कसं काय जमवतात ..?
दोन प्रकारे.
१. पीठ तयार करतानाच लिंबाचा रस आणि बारीक सालटे टाकतात. हे पॅनकेक्स् जाड प्रकारातले.
२. पीठ नेमहीचेच मात्र पॅनकेक्स् घावनाप्रमाणे पातळ तयार करतात. मग साखरेचा पाक करून त्यात खूप लिंबाचा रस टाकून मिश्रण तव्यावर रटरटत असतानाच तयार पॅनकेकची चतकोर घडी करून तो आंबट-गोड मिश्रणात सोडतात आणि लपेटून टाकतात. मग थोड्या वेळाने ते आंबट-गोड मिश्रण शोषले गेले की पॅनकेक थेट आपल्या ताटात. या प्रकारचा पॅनकेक डेझर्ट् म्हणून अधिक खाल्ला जातो.
पंचम पुरीवाला..
पंचम पुरीवाला या ठिकाणाविषयी मराठी संस्थळावर एकदोन लेख वाचून नुकताच खास तिथे गेलो.
बझारगेट, बोरीबंदर स्टेशनानजीक, या ठिकाणी हे हॉटेल आहे.
पुरीचे बरेच प्रकार गरमागरम ताजेताजे बनत असतात. मी मसाला पुरी आणि साधी पुरी हे पाहिले.
भरपूर वेगवेगळी तोंडीलावणी होती. लाल भोपळ्याची भाजी, पालक, कढी पकोडा, राजमा, बटाटा पातळभाजी, छोले, पनीर, मेथी, रायते, खीर, आमरस वगैरे
सर्व प्रकार पुरीसोबत खायचे अशी पद्धत. हे सर्व एकेक प्लेट मागवणे शक्य नसल्याने बर्याच मुख्य पदार्थांचा समावेश असलेली डिलक्स थाळी मागवली. मला वाटते साधी थाळी ५०, स्पेशल ८०, डिलक्स १००, पंचम थाळी १२०(यात आणखीही बरेच काही पदार्थ असतात) अशी रचना होती.
मी डिलक्स थाळी घेतली ती अशी:
यात मसाला पुरी होती. म्हणजे पुरीच्या आत कचोरीप्रमाणे मसाल्याचा एक थर. गरमागरम असल्याने पुर्या खुसखुशीत होत्या. नंतर आमरसही मागवला. त्यासोबत साधी पुरी. तीही छान होती.
मसाला पुरी;
अधिक बाजू:
-ताजे, गरमागरम अन्न, निदान पुर्या तरी ताज्या.(उपसा असल्याने)
-बरीच तोंडीलावणी उपलब्ध असल्याने चवीत व्हरायटी.. नुसत्या पुरी-बटाटा भाजीची चव चारपाच घासांनंतर मोनोटोनस होते.
-गर्दी, गरमी असूनही स्टाफ आणि मालक तुलनेच बरेच सौजन्यशील. सर्व्हिस अशा रोडसाईड ठिकाणाच्या मानाने अनपेक्षितरित्या चांगली.
उण्या बाजू:
- आजूबाजूला अस्वच्छता. खरकटी गटारं, दुर्गंधी.. यामुळे बाहेरच्या सेक्शनमधे बसून खाणं अशक्य होऊ शकतं. मला पोटमाळ्यावरची जागा मिळाली म्हणून तुलनेत बरं.
-बर्यापैकी गर्दी होती. एकेका अत्यंत छोट्या टेबलाला चारचार जोडीजोडीच्या कनेक्टेड लोखंडी खुर्च्या आणि अत्यंत अंग चोरुन जाण्याइतक्या छोट्या जागेत हॉटेल असल्याने स्पेशल टेबलची चैन नाही. तेव्हा तीन जणांची फॅमिली असेल तर चौथी खुर्ची आणखी कोणातरी अनोळख्यासोबत चिकटून बसत शेअर करावी लागेल. प्युअर खानावळ स्टाईल.
-सध्याच्या (उन्हाळा) दिवसात भट्टीसारखी उष्णता. पंखे बर्यापैकी निष्प्रभ. तितक्याश्या जागेतच सदैव मोठ्या शेगड्या आणि मुदपाकखाना चालू असल्याने शेगडीची अॅडिशनल उष्णता आणि तेलाचा धूर पसरलेला.
-आमरस प्रोसेस्ड /डबाबंद चवीचा होता. ताजा / चालू मोसमातल्या आंब्याचा वाटत नव्हता.
एकूणः प्रचंड आउट ऑफ द वर्ल्ड नाही. पण चविष्ट, पोटभरीची जागा. अँबियन्स वगैरेला फाट्यावर मारायचे झाल्यास एकदा जाण्यासारखी. किंबहुना, तिकडच्या भागात गेलोच असू तर मात्र आवर्जून एकदा जायला हरकत नाही.
धागा आवडला !
खाणं आणि गाणं याची आवाड असल्या मुळे हा धागा आवडला !
मी हि माझ्या ब्लॉग वर पुण्यातल्या काहि खाद्द भ्रमंतीन बद्दल लिहिलं आहे. http://veedeeda.blogspot.in/
खवय्यां कडुन मला माहिती अशी हवी आहे :
१) कच्च्या फणसाची भाजी कुठल्या हॉटेल / खानावळी मधे मिळते का ? पुणे-मुम्बई मधे ?
२) फणसाच्या वेगवेगळ्या पदार्थां साठि स्पेशल दुकान / हॉटेल कोणती ?
३) कोकणातल्या वेगवेगळ्या गावां-शहरां मधे शाकाहारी जेवणा साठि प्रसिध्द हॉटेल्स ची लिस्ट बनवतो आहे .. जर कोणाला माहित असेल तर कृपया सांगा !
धन्यवाद !
------
मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे
भले तरी सोडू कासेची लंगोटी ,नाठाळाच्या माथी हाणू काठी
http://veedeeda.blogspot.in/
१) कच्च्या फणसाची भाजी
१) कच्च्या फणसाची भाजी मेन्यूवर रेग्युलर ठेवणारे हॉटेल माझ्या बर्यापैकी खाद्यभ्रमंतीत मी तरी पाहिलेलं नाही. पण साधारणतः घरगुती पोळीभाजी केंद्रे, खानावळी, इत्यादि ठिकाणी सीझनमधे प्रसंगोपात्त ही भाजी बनते. हुकमी हवी असेल तर अशा ठिकाणी आधी विनंती करुन / ऑर्डर देऊन काहीशा मोठ्या क्वांटिटीत बनवून मिळते. मी नुकतीच या मार्गाने किलोभर भाजी मिळवली (२०० रु किलो) दोन नातेवाईकांत मिळून पुरवली. कधीकधी हे लोक नेमकी केव्हा ही भाजी रेग्युलर जेवणात बनवणार आहेत तो दिवस तुम्हाला सांगतील, त्या दिवशी जाऊन पार्सल घेऊ किंवा तिथेच खाऊ शकता.
२) फणसाचे पदार्थ म्हणजे मुख्यतः तळलेले गरे, फणसपोळी हे कोणत्याही घरगुती पदार्थांच्या दुकानात मिळतात. योजक / देसाई वगैरे ब्रँडेड आणि असंख्य अनब्रँडेड उद्योगांतर्फे हे बनतात. मात्र फणसाचे आईसक्रीम "नॅचरल्स"च्या शाखांमधे आणि ठाण्यात "टेम्प्टेशन्स" - राम मारुती रोड इथे मिळते. (टेम्प्टेशन्समधे शहाळे, मिरची, विडा आणि अन्य अनवट फ्लेवर्सही मिळतात. सिताफळ मस्तानी मस्ट ट्राय.)
३) कोंकणातल्या हॉटेलांविषयी मिसळपाव संस्थळावर एक भरपूर मोठा धागा होता. म्हणजे तो धागा फक्त कोंकणातल्या हॉटेलांना वाहिलेला नव्हता. महाराष्ट्रात किंवा बाहेरही कोणती उत्तम हॉटेल्स आहेत याचं ते जबरदस्त मोठं आणि फर्स्टहँड कलेक्शन होतं (आहे). त्यात कोंकणातल्या हॉटेल्सचंही बरंच समावेशक कलेक्शन आहे.
धागा सापडला तर लिंक देतो.
.....
काही लिंका मिळाल्या..
http://misalpav.com/node/4731
http://www.misalpav.com/node/4710
आणखीही एक धागा होता. आता सापडत नाही.
ऐ अ वरची खुद्द ही चालू असलेली सीरीजही या बाबतीत उपयुक्त आहे. याचा आधीचा भाग पहा.
धन्यवाद ग वि
१) अशा घरगुती खानावळी - हॉटेल्स मी शोधतोय पुण्या मधे .. फार फार पुर्वी बादशाहि (टिळक रोड)ला उन्हाळयात फणसाची भाजी हमखास असायची .. आज कल नसते ( महागाई ). तुम्हि कुठुन मिळवलीत १ किलो फणसाची भाजी ? त्या ठिकाणी मी हि चौकशी करुन पहातो.
२) नॅचरल्स मधलं फणसाचं आइस्क्रिम नक्कि ट्राय करीन .. आजच !
३) हो आता मिसळपाव.कॉम वर पण सदस्यता घेतली आहे .. वाचतो
मालवणी - कोकणी अश्या प्रकारची हॉटेल्स हि जास्त करुन सि-फुड , मासे वैगरे साठि असतात. मी त्यापैकि काहि हॉटेल्स मधे हि विचारुन पाहिले .. पण फणस भाजी मिळत ना..हि !
कोकणातल्या घरगुती खानावळींची एक वेगळीच चव असते ..मी लवकर कोकण सफरी ला जाण्याचा बेत आखतोय तेव्हा उपयोगी पडेल हि लिस्ट.
------
मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे
भले तरी सोडू कासेची लंगोटी ,नाठाळाच्या माथी हाणू काठी
http://veedeeda.blogspot.in/
मला ठाण्यात मिळाली होती.
मला ठाण्यात मिळाली होती. पुण्याचे ठाऊक नाही. साधारणतः हे पोळीभाजी केंद्रवाले लोकलच असतात. गावाबाहेर फार प्रसिद्ध नसतात.
फणसाची उस्तवार फार असते आणि सोलण्याच्या बाबतीत ते एक मोठं किचकट (आणि चिकट) प्रकरण असल्याने सहजासहजी कोणी हॉटेलात त्याची भाजी करायला जात नाहीत. ज्यांना स्पेशालिटी ठेवायची आहे ते घरगुतीवाले एखाददोन वेळाच करतात पूर्ण सीझनमधे. तुम्ही सरळ "आम्हाला एकदीड किलोची आगाऊ ऑर्डर नोंदवायची आहे, तेव्हा बनवून द्या" अशा पद्धतीने मागून पहा. तीनचार घरात मिळून २ किलो वगैरे मागितलीत तर खास तुमच्यासाठीही करेल एखादी घरगुती बिझनेस करणारी व्यक्ती.
व्हीअेतनमीज सॅलड रोल्स रोल्स आणि अॅस्परॅगस सूप.
अलीकडेच भाजीबाजारात एका स्टॉलवर मिळणारे व्हीअेतनमीज सॅलड रोल्स खाल्ले आणि खूप आवडले, बनवायला खूपच सोपे आहेत हे लक्षात आले आणि मुलीनेही आवडीने खाल्ले. मुलीला कच्च्या भाज्या खाऊ घालायची एवढी नामी युक्ती समजल्यावर ते बनवून पाहणे सहाजिकच होते. बाजारात मिळणारे तांदळाचे कागद (राईस पेपर) आणायचे, पाण्यात दोन मिनिटे भिजवायचे आणि पोळपाटावर पसरून त्यात आवडणाऱ्या भाज्या, शेंगदाण्याचे भरड कूट, कोथिंबीर वगैरे सारण भरून त्याची सुबक वळकटी वळली की झाले तय्यार! हे रोल्स बुडवून खायला व्हिनेगर, गूळ, कोथिंबीर, मिरची वगैरे घालून एक आंबटगोड सॉसही बनवला होता.
सध्या सीझनमध्ये असलेले अॅस्परॅगस बाजारात छान, ताजे मिळताहेत त्यामुळे त्याचे सूप बनविले होते तेही छान झाले होते.
तीळदार 'होल्डॉल'
एकूण हे तीळदार 'होल्डॉल'च की ! मस्त दिसत आहेत.
मी आधी फोटो पाहिला, आणि
मी आधी फोटो पाहिला, आणि डावीकडे नाव दिसायच्या आधीच "हा रुचीचा असावा" असं वाटलं. बरोब्बर! तुझ्या फोटोतल्या प्रकाश-मांडणीची आता छान ओळख झाली आहे. रोल्स मस्त दिसताहेत; इथे मिळाले तर करून पाहते, खूप दिवस खाल्ले नाहीत. बर्कलीत असताना नेहमी करून खायचे. त्यावर दाण्यांची पातळ चटणी, अर्थात पीनट सॉस लावून खायला ही खूप आवडतं. थोडी फोडणी घालून पचडी-स्टाइल करायलाही हरकत नाही, ना?
'लोऊ माल्नाती'चा 'डीप डिश् पीत्सा'
शिकागोला जाऊन 'लोऊ माल्नाती'चा 'डीप डिश् पीत्सा' खाल्ला नाही तर आग्र्याला जाऊन ताजमहाल न बघता परतण्यासारखे आहे, असे म्हणतात. तेंव्हा यावेळी तो हादडायचाच असा चंग बांधून गेलो. हाटलात पिवळे-लाल असे उष्ण रंग आणि एक प्रकारचा उबदारपणा. शिकागोत वारं भारी. त्यामुळे कुठलाही उबदारपणा हवाहवासाच वाटतो. त्यात भर म्हणून पीत्स्याचा दरवळ !
मग मेनुकार्डावर एक भिरभिरती नजर - किंमतींवर. तो प्रसिद्ध 'बटरक्रस्ट डीप डिश् पीत्सा' यू.एस्.डी. ८ ला. तो मागवला, तशी वेट्रेस म्हणाली, की या पीत्स्यासाठी अर्धा तास वेळ लागेल. मग इकडे तिकडे इतरांचे पीत्से न्याहाळत, कॅमेरा तय्यार करत वेळ घालवला. भिंतींवर 'लोऊ माल्नाती' चा छोट्या दुकानापासूनचा पीत्साप्रवास छायाचित्रांतून होता. (मला एकदम 'पुष्पक विमानम्' चित्रपटातल्या हॉटेल मालकाची आठवण झाली ). मग खरोखरीच अर्ध्या तासाने तो ६ इंच व्यासाचा आणि १ इंच खोल असा तबकडीदार पीत्सा पुढ्यात आला.
तगडा पण अतिशय खरपूस असा बेस होता. लोणी वितळलेले वाहत होते. चीज, टोमॅटो, सलामी असा मसाला मध्यभागी भरलेले ते एक छोटे ताटच होते म्हणा ना ! चव सर्वसाधारण पीत्स्यासारखीच वाटली पण प्रचंड रसरशीत ताजेपणा होता. त्या जाड मिश्रणातून बेस पर्यंत दात रोवून तुकडा तोंडात मोडून घेतला की अगदी सहज विरघळतो. बेस हाच सर्वोच्च मानबिंदू वाटला.
केवळ ६ इंच असल्याने आणि एकाने समाधान न झाल्याने दुसरा मागविण्याचा विचार होता पण तो रहित केला. हाटलातून बाहेर पडल्यावर काही वेळाने तो योग्य निर्णय असल्याची खात्री पटली कारण त्या एकाच छोट्या पीत्स्याने पोट बरेच भरल्याचे थोडे उशीराच जाणवले. एकूण खूप काही थोर वाटला नाही पण अश्या प्रकारचा पीत्सा प्रथमच खाल्याने जरा वेगळेपणामुळे लक्षात राहिला. आता पुन्हा जाणे झाले तर थिन् क्रस्ट् पीत्सा मागवून पाहणार. 'लोऊ माल्नाती' सच्चा पीत्सावाला असल्याची खात्री तेंव्हाच पटेल.
शिकागोला जाऊन 'लोऊ
अरेरे! "हन्त हन्त" वाटते आहे. आम्ही माहितीअभावी या ताजमहालाचा अनंद घेतलाच नाहि म्हणायचा. आता योग येईल / येऊ देईनसे वाटत नाही
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
अरेरे! "हन्त हन्त"
अरेरे! "हन्त हन्त"
...........अहो, इतके काही मनास लावून घेवू नका बरे !
त्याऐवजी बिड्डफोर्ड (मेन) या ठिकाणी जाऊन ताजा लॉब्स्टर् किंवा लॉब्स्टर् रोल् मागवा, असे सुचवेन. पीत्से इथे-तिथे, मागे-पुढे कधीतरी मिळतील पण हे ताजे शेवंड तुमचे तुम्ही निवडून, तुमच्या समोर उकडवून घेवून योग्य प्रकारे फोडून कसलाही मसाला न लावता निव्वळ वितळविलेल्या खारट लोण्यात बुचकळून खाण्यात जी काही जिव्हातृप्ती होते, ती केवळ अवर्णनीय !
खत्री आहे एकदम!!!! वर्णन
खत्री आहे एकदम!!!! वर्णन वाचूनच पचंड तोंपासू. भारतात हे मिळत असण्याची शक्यता कमीच दिसतेय, आम्रिकेत अन त्यातही शिकागोत कधी चुकूनमाकून गेलोच तर हे लक्षात ठेवेन, धन्यवाद
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
पिझ्झ्याचा विषय निघालाच आहे
पिझ्झ्याचा विषय निघालाच आहे तर पॉप टेट्समधल्या (ठाणे, मुलुंड, पवई इ इ) पिझ्झ्याचे हे दोन अप्रतिम प्रकारः अनुक्रमे पेशावरी चिकन पिझ्झा आणि फॅब फाईव्ह (पॉप टेट्स स्पेषालिटी)
तो लू मल्नाती आहे. मलाही
तो लू मल्नाती आहे.
मलाही डीप-डिश आवडत नाही, पण शिकागोमधला थिन-क्रस्ट खास नसतो, म्हणजे न्यु-यॉर्क स्टाईल आवडत असेल तर. शिकागो थिन-क्रस्ट जरा क्रिस्पी असतो.
विंडि-सिटी स्पेशल खायचे असेल तर (आणि बीफ चालत असेल तर) इटालियन बीफ सँडविच खाणे हे माझे रेकमेंडेशन. आठवणीने आत्ताच भूक लागली
पॅनकेक्स
आज सकाळचा नाश्ता: मध आणि लँगडा आंब्यांसहित ताकातले पॅनकेक्स:
हे कसे करता?
हे कसे करता?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
ताकातली धिरडी असा देशी
ताकातली धिरडी असा देशी शब्दप्रयोग करण्याऐवजी त्यांनी पॅनकेक म्हटले असावे. केळ्याच्या थालीपीठालाही बनाना पॅनकेक म्हणतात काहीवेळा.
थोडं जाड धिरडं घातलं की पॅनकेक..
असं मला वाटत आलेलं आहे.
यंदा आम्ही उकडीच्या मोदकांना डेसिकेटेड कोकोनट डंपलिंग्ज म्हणण्याचे योजत आहोत. त्यावरील रवाळ तुपाला फाईन डाईन शब्द सुचवा..
किंबहुना, धिरडे, घावणें, पानग्या,फदफदे, सागुती (याचे इंग्रजी मेन्यूकार्डावर xacuti बनल्याचे ऑलरेडी पाहिले आहेच), उंडे, सांदण, धपाटे, घारगे अशा असंख्य पदार्थांना फा.डा. आल्टर्नेट शोधायला हवेत..!!
ही आयडिया छान आहे! रवाळ
ही आयडिया छान आहे!
रवाळ तुपासाठी "क्लॅरिफाइड बटर ग्लेझ" चालेल का? "कोकोनट डंपलिंग्स विथ क्लॅरिफाइड बटर ग्लेझ"? आधी "हँड क्राफ्टेड" किंवा "आर्टिसनल" जोडले तर उत्तमच.
मध आणि आंबा??
मध आणि आंबा?? इतकं गोडट्ट!!!! कसं खाता बुवा?
अवांतर: लँगडा पहिल्यांदा कळलं नाही. मराठी पद्धतीने लंगडा लिहावे असे वाटते.
आम्हाला आवडतं बुवा! आधी मध
आम्हाला आवडतं बुवा! आधी मध घातलं, मग शेजारी आंबा चिरून ठेवला होता, तोच "टॉपिंग" म्हणून घातला. छान लागला.
ऋ - मी "बटरमिल्क पॅनकेक" ला ताकातले पॅनकेक म्हटले, एवढेच. कृती मार्था स्टीवर्ट ची वापरली, पण घरी ताक होतं ते वापरलं.
अवांतरः बंगाली घरात ताक कितपत
अवांतरः बंगाली घरात ताक कितपत बनते? कोलकात्यात असताना बहुतेक सर्व जण्रल हाटेलात दोयिर घोल ऊर्फ ताक मिळत नसे तस्मात शंका होती/आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
फारसे बनत नसावे. मी तरी
फारसे बनत नसावे. मी तरी पाहिलेले नाही. याचे कारण काय नक्की माहित नाही, पण तूप कढवायची कृती इथे वेगळी असते - सायीचं लोणी (आणि ताक) न काढता सायीलाच विरजण लावून ते कढवले जाते असे कोणीतरी सांगितले होते. पण हे ही प्रत्यक्षात पाहिले नाही. दोईएर घोल म्हणजे फक्त घुसळलेले पातळ लस्सी सारखे असते - टेक्निकली ताक नसते.
पनीर करताना राहिलेले पाणी जिरे-मीठ अथवा साखर घालून खायची मात्र प्रथा सर्वत्र आहे.
धन्यवाद
शंकानिरसनाबद्दल धन्यवाद. दोईएर घोल म्हंजे पातळ लस्सीच-बरोब्बर, आत्ता लक्षात आले. डनलॉप ब्रिजजवळच्या एका गल्लीतला दूधवाला, ताक मागितले तर तसे करून द्यायचा. ते टेक्निकली ताक नव्हेच. तिथे ताकासाठी दाही दिश्या फिराव्या लागत असल्याने डॉस्के फिरत असे अधूनमधून.
विरजणाची पद्धतच वेगळी आहे हे रोचक आहे.
रोचक आहे. हेही कधी ऐकले नव्हते. बाकी या स्लिपला बांग्ला स्लिप म्हणावे काय खावार जॉलवरून मजेशीर आठवणी जाग्या झाल्या.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
स्लिप् ऑफ् बंग !
या स्लिपला बांग्ला स्लिप म्हणावे काय
..............नव्हे.. स्लिप् ऑफ् बंग !
आवडल्या गेले आहे!
आवडल्या गेले आहे!
पण शुद्धलेखनात गडबड झालेली दिसतेय, ते बङ्ग पाहिजे ना
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
बंग - बङ्ग
शुद्धलेखनापेक्षा शुद्धोच्चारांच्या प्रयोगाची गुडचापी गुंडाळून बरेच दिवस झाले. मिहिरसाहेबांना विचारा.
नेहमीप्रमाणे परसवर्णप्राधान्य
नेहमीप्रमाणे परसवर्णप्राधान्य इथे दिसले नाही म्हणून विचारले
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
तिथे ताकासाठी दाही दिश्या
वा वा इंद्राचं अन तुझं दु:ख समान झालं की बॅट्या. (संस्कृतेमध्ये श्लोक आहे ना तक्र शक्रस्य दुर्लभम का काहीतरी :प)
भोजनान्ते च किं पेयम्?१
भोजनान्ते च किं पेयम्?१ जयन्त: कस्य वै सुतः?२
कथं विष्णुपदं प्रोक्तम्?३ १तक्रम्, २शक्रस्य, ३दुर्लभम् ||
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
पाककृतीत अंडं आणि ताक एकत्र
पाककृतीत अंडं आणि ताक एकत्र पाहून जरा विचित्र वाटलं. 'ऑल परपझ फ्लोर' म्हणजे नक्की कसलं असतं? मैदा,तांदळाचं पीठ , की आणि काही?
दिसायला छान आहेत धिरडी.
ऑल पर्पज फ्लोर म्हणजे मैदा.
ऑल पर्पज फ्लोर म्हणजे मैदा.
अमेरिकेतलं "बटरमिल्क" म्हणजे दुधात लॅक्टिक अॅसिड बॅक्टेरिया घालून फरमेंट केलेलं पेय - त्याची चव ताकापेक्षा थोडी अंबट-कडवट असते. अमेरिकेतील दक्षिणेकडच्या बर्याच बेकिंग कृतींमधे अंड्यांबरोबर वापरले जाते.
मी सहज ताक वापरून पाहिलं, पण चवीत फारसा फरक जाणवला नाही.
पास्ता !!!
घरातील मोठ्यांना नमस्कार, लहान भावंडांना आशीर्वाद...
परवाच पुना क्लब मधे पास्ता खाण्याचा योग आला... आवडला!!!!
बघा पट्तोय का....
चीजकेक
हल्ली चीजकेकचं अगदी वेडच लागलंय. 'फ्रेंड्ज'मधला एक भाग पाहिल्यापासून हा चीजकेक दिसतो कसा आननी अशी उत्सुकता होती. तो अखेर इथे खायला मिळाला. तिथे मी खाल्ला तो बेक्ड चीजकेक. त्याची चव स्वर्गीय आहे. आतापर्यंत दोनदा खाल्लाय. दोन्ही वेळी चव उत्तमच. आहे मात्र बराच महाग. एक तुकडा १४० रु.चा! दुर्दैवाने त्याचा फोटो माझ्याकडे नाही. तिथलाच ब्लूबेरी चीजकेक मात्र तद्दन बकवास (अगदी हाडाच्या गोडखाऊ मंडळींचंही हेच म्हणणं पडलं.)
भारीतला ब्लूबेरी चीजकेक खायचा असेल, तर सरण्यात जावे. 'सरण्या'बद्दल एक सविस्तर प्रतिसाद नंतर लिहायचाय. सध्या फक्त तिथल्या ब्लू.ची. बद्दलच (सोबतच्या फोटोतल्या) लिहिते. खाली बिस्किटाच्या चुर्याचा थर, त्यावर दाणाभर मीठ जास्त असलेलं चीज आणि त्यावर मस्तसा ब्लूबेरी सॉस. अहाहा! आत्तापर्यंत तीनदा खाल्लाय. तिन्ही वेळी तितकाच भन्नाट. हा वरचा चीजकेकच्या मानाने स्वस्त आहे. फोटोत दाखवलेला तुकडा ५० रु.ला मिळतो.
आता थिओब्रोमा, चीजकेक रिपब्लिक, लव्ह अँड चीजकेक आणि ससानिया (इथला लेमन चीजकेक मिळतो फक्त ३० रु.त) येथे जायचे आहे. जमेल तसतसे फोटो टाकेनच.
राधिका
आणखी दोन ठिकाणे
गेल्या महिन्यात आणखी दोन ठिकाणचे चीजकेक खाल्ले. थिओब्रोमामधला न्यू यॉर्क ची.के. अगदीच गोग्गोड आणि बकवास होता. लव्ह अँड चीजकेक येतील चीजकेक (कोल्ड लेमन आणि बेक्ड ब्लूबेरी) चांगले होते पण उगाच महाग होते.
एकूणात सरण्या आणि पाटीसेरी यांना पर्याय नाही असं सध्यातरी वाटतंय.
राधिका
२५ रु.त सामिष जेवण
टीपटॉपमध्ये ४० रु.त चिकन इ.चे कबाब खायला मिळतात असं कळल्यावर मी आणि माझी एक मैत्रीण त्या भागात मुद्दाम काहीतरी काम काढून तिथे गेलो. तिथे आम्ही बीफ कलेजाचे कबाब खाल्ले. एका प्लेटमध्ये कलेजाचे मध्यम आकाराचे पंधराएक तुकडे. सोबत हिरवी चटणी. मस्त चव. चिकन आणि मटणाच्या कलेजापेक्षा थोडा उग्र वास वाटला.
नंतर जवळच्याच एका रसवंती गृहातून उसाचा रस घेऊन (१० रु. ग्लास) प्यायलो. या दोन्हींमुळे माणशी २५ रु. इतक्या खर्चात छान, भरपेट जेवण झाले.
राधिका
न्याहरी.
हा स्मूदी प्रकार अलिकडे फारच आवडायला लागला आहे. अनेकदा अननस, आंबा अशी फळे कापली की मी ती फ्रीजरमध्ये टाकून देते, स्ट्रॉबेरीज, ब्लूबेरीज वगैरे फळेही छान फ्रीज होतात. स्मूदी बनवताना ही अशी फ्रोजन फळे, थोडेसे दही, गोडीला मध किंवा अगावे सिरप किंवा साखर वगैरे घालून ब्लेंडरमधे थोडे फिरवले की झाले. या स्मूदीलाच पूर्ण न्याहरी बनवायचे झाले तर त्यातच थोडे ग्रनोला घालाता येते. बागेतले थोडे पेपरमिंट तोडून आणून त्यावर छान दिसेल म्हणून घातले तर त्याचा स्वादही मस्त लागला (नेहमीच्या पुदीन्यापेक्षा या पेपेरमिंटचा स्वाद थोडा वेगळा असतो जो थोड्या गोड पदार्थांबरोबर चांगला लागतो). हा फोटू,
आहाहा!!
सुंदर फोटू!!
कूल !
'आता रूचीचे चांगल्या खटकेबाजीबद्दल कितीवेळा हाबार्स मानायचे!' (प्रेरणा)
हा फटू पाहून भूक चाळवल्या
हा फटू पाहून भूक चाळवल्या गेली आहे!!! हे अस्ले फटू टाकून जळवल्याबद्दल निषेध असो!!!
तरी बरं, अस्सल, मऊ अन जबर्दस्त, एकदम तोंडात टाकल्यावर वितळणारा असा मैसूरपाक नुकताच खाल्ला नैतर आमचं काही खरं नव्हतं बघा :evil:
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
खूप दिवसांनी आज कैरीचे झटपट
खूप दिवसांनी आज कैरीचे झटपट लोणचे अन रायते (कैरीचा गर + गूळ अन वर हिंग, मोहरी, कढीलिंबाची फोडणी) बनविले. फार मस्त झालं होतं. आंबेमोहोर भात मिस केला पण असो जे मिळाले तेही नसे थोडके : )
कैरीचे लोणचे!!!!
कैरीचे लोणचे!!!! तोंपासू!!!!!!!!!!!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
धागाकर्तीने इरोम्बा मधे पोर्क
धागाकर्तीने इरोम्बा मधे पोर्क असल्याचा उल्लेख केला आहे. साधारणतः एखाद्या प्रांताची डिश इतरत्र सादर करताना खानावळीचे मालक अशी सूट घेतात. पारंपारिक मणिपूरी इरोम्बा मधे केवळ ओला/सुका मासा असतो. चिकन देखिल नसते.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
गैरसमज
मी असे म्हटलेले नाही.
राधिका
पून्हा वाचल्यावर लक्षात आले.
पून्हा वाचल्यावर लक्षात आले. चूक सुधारल्यासाठी आभार.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
फेमस डेव्ह्ज
This comment has been moved here.