संसद: बजेट सत्र २०१३ (उत्तरार्ध)
याआधी आपण २०१२ चे मान्सून सत्र २०१२ च्या हिवाळी अधिवेशनात आणि यंदाच्या बजेट सत्राच्या पहिल्या भागात काय प्रस्तावित होते, काय झाले याचे वार्तांकन इथे वाचले. उद्या, २१ फेब्रुवारी २०१३ पासून बजेट सत्र सुरू झाले. त्याचा उत्तरार्ध आज २२ एप्रिलपासून झाला आहे. यापैकी सुट्ट्या व विकांत सोडले तर १३ दिवस संसदेचे कामकाज चालेल.
अर्थातच या सत्रात वित्तविषयक घडामोडींना प्राधान्य दिले जाते असा पायंडा आहे. यातील काही ठळक प्रस्तावित विधेयके अशी आहेतः
१. वित्त बिलात विरोधकांनी पास केलेल्या सुधारणा.
२. इन्शुरन्स आणि पेन्शन मध्ये थेट परकीय गुंतवणुकीच्या योजनेत बदल करणारी विधेयके
२. अन्न सुरक्षा बिल
४. फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट (सुधारणा) विधेयक आणि द कंपनीज् बिल
जी.एस.टी. (गुड्स आणि सर्विस टॅक्स) लागू करण्यासाठीचे विधेयक या सत्रात मांडल्या जाणार्या विधेयकांच्या यादीत नाही.
हे सत्र एकूण ३४ दिवस प्रस्तावित होते व ते दोन भागांत विभागलेले असते. या दरम्यान ३९ विधेयकांवर संसदेत चर्चा होऊन त्यावर मतदान/मंजुरी घेण्याची प्रस्तावित योजना आहे तर २० बिले केवळ विचारार्थ पटलावर मांडली जातील.
या सत्रासंबंधीच्या माहितीचे आदान-प्रदान करण्यासाठी, एकूणच संबंधीत राजकारणावर चर्चा करण्यासाठी, या उत्तरार्धात मांडलेल्या बिलांवर ऐसीच्या सदस्यांची मते समजून घेऊन त्यावर साधकबाधक चर्चा करण्यासाठी हा धागा सुरू करत आहे. यात शक्य तितके दररोज 'काल' काय झाले आणि 'आज' संसदेपुढे कोणता कार्यक्रम प्रस्तावित आहे, याची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहेच. शिवाय या धाग्यावर या सत्राशी निगडित राजकारणावरही चर्चा व्हावी असे वाटते. रेल्वे बजेट आणि सर्वसाधारण बजेट वर चर्चा करण्यासाठी २५ तारखेपासून वेगळा धागा उघडण्यात आला होता, त्याचा वापर करावा. मात्र त्याव्यतिरिक्त जेव्हा विधेयके सादर होतील तेव्हा त्यावर आपापली मते इथेच द्यावीत अशी विनंतीही करतो
रोजची माहिती त्याच दिवशी देणे, दररोज शक्य होईलच असे नाही मात्र प्रयत्न जरूर करणार आहे. शिवाय काही महत्त्वाच्या विधेयकांवर यापूर्वी माहिती दिली नसेल तर तीही प्रतिसादांत देण्याचा प्रयत्न करेनच.
या व्यतिरिक्त काहींनी व्यनींतून सूचना केल्याप्रमाणे पुढील तक्ता अद्ययावत ठेवण्याचाही प्रयत्न केला जाईल:
दिनांक | पहिले सत्र (जेवणाच्या सुट्टीपूर्व) | कायदेविषयक सत्र (जेवणाच्या सुट्टीनंतर) | आज प्रस्तावित विधेयके | आज मंजूर विधेयके |
सोम २२ एप्रिल | राज्यसभा: गदारोळात प्रश्नकाळ काही काळ तहकूब त्यानंतर प्रश्नकाळाच्या अॅडजर्ममेंट मोशनला दाखल करून घेण्यावर एकमत होईपर्यंत प्रश्नकाळ समाप्त. नंतर कार्यालयीन कामकाजाने पेपर्स, काही रीपोर्टस पटलावर ठेवले गेले. लोकसभा: गदारोळ, रीपोर्टस पटलावर ठेवणे व गृहमंत्र्यांचे बंगळूर स्फोटाबद्दल निवेदन याव्यतिरिक्त कामकाज नाही |
राज्यसभा: स्त्रियांवरील व मुलांवरिल अत्याचार प्रश्नाबात अत्यंत सम्यक चर्चा लोकसभा: कामकाज नाही |
राज्यसभा: विचारार्थ २, मंजूरीसाठी ५ लोकसभा: विचारार्थ २, मंजूरीसाठी ३ |
राज्यसभा: ० लोकसभा:विचारार्थ २ |
मंगळ २३ एप्रिल | गदारोळ. दोन्ही सभागृहात कामकाज नाही. | गदारोळ. दोन्ही सभागृहात कामकाज नाही. | राज्यसभा: विचारार्थ २, मंजूरीसाठी ५ लोकसभा: रेल्वे बजेट डिमान्ड आणि कट मोशन्स |
कामकाज नाही |
बुध २४ एप्रिल | सुट्टी | सुट्टी | सुट्टी | सुट्टी |
गुरू २५ एप्रिल | राज्यसभा: लोकसभा: |
२३ एप्रिल २०१३ चा प्रस्तावित कार्यक्रम
२३ एप्रिल २०१३ चा प्रस्तावित कार्यक्रम
राज्यसभा
११:०० वाजता कामकाज सुरू होईल आणि प्रश्नोत्तरांचा तास सुरू होईल.
शिवाय काही कार्यालयीन रिपोर्ट्स व सूचना पटलावर ठेवले जातील
=========
त्यानंतर महिलांवरील अत्याचारासंबंधी काल सुरू झालेली चर्चा आज पुढे चालेल. अजून ११ वक्त्यांचे भाषण होणे बाकी आहे.
=========
विचारार्थ सादर बिले:
पर्यावरण मंत्री श्रीमती जयंती नटराजन The Wild Life (Protection) Amendment Bill, 2013 पटलावर विचारार्थ मांडतील.
भारत आणि बांगलादेश यांच्यामधील करारानुसार प्रशासकीय सोयीच्या दृष्टिकोनातून बांगलादेशमधील काही प्रदेश भारतात विलीन होत आहेत तर भारतातील काही प्रदेश बांदलादेशसोबत संलग्न होणार आहेत. यासंबंधीचे ११९वे घटनादुरूस्ती विधेयक परराष्ट्रमंत्री श्री सलमान खुर्शीद विचारार्थ संसदेपुढे मांडतील.
विचारार्थ आणि मंजुरीसाठी सादर बिले:
National Accreditation Regulatory Authority for Higher Educational Institutions Bill, 2010.
लोकसभेत सादर केलेले हे बिल श्री सी.पी.जोशी आज राज्यसभेपुढे मंजुरीसाठी मांडतील. सदर बिल इथे वाचता येईल.
गेल्या सत्रात श्री. व्ही. नारायणसामी यांनी मांडलेले The Whistle Blowers Protection Bill, 2011 विचारार्थ आनि मंजूरीसाठी राज्यसभेपुढे मांडले जाईल.
याव्यतिरिक्त पुढिल बिले चर्चा व मंजुरी प्रस्तावित आहेत (कंसात विधेयक मांडणार्या मंत्र्यांचे नाव देत आहे)
The Judicial Standards and Accountability Bill, 2012. (श्री अश्विनी कुमार)
The Architects (Amendment) Bill, 2010.(श्री कपिल सिब्बल)
The Pesticides Management Bill, 2008. (श्री शरद पवार)
=================
या व्यतिरिक्त बंगलोर बॉम्बस्फोटासंबंधीचे निवेदन गृहमंत्री राज्यसभेपुढे ममांडतील
लोकसभा
११:०० वाजता कामकाज सुरू होईल आणि प्रश्नोत्तरांचा तास सुरू होईल.
शिवाय काही कार्यालयीन रिपोर्ट्स व सूचना पटलावर ठेवले जातील.
=====
त्यानंतर कलम ३७७ खाली प्रश्न विचारले जातील किंवा पटलावर मांडले जातील. कलम ३७७ खाली विचारले जाणारे प्रश्न (शुन्य प्रहर वेगळा). या नियमाखाली विचारल्या जाणार्या प्रश्नांना मंत्र्यांवर तिथल्या तिथे उत्तर द्यायचे कायदेशीर बंधन नसते.
====
त्यानंतर शेवटी रेल्वे बजेट २०१३-१४ वरील डिमान्ड्स आणि कट मोशन्सवर चर्चा होईल व चर्चेच्या नंतर मतदान प्रस्तावित आहे.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
सध्याची भाजपा आणि डाव्यांची
सध्याची भाजपा आणि डाव्यांची मागणी/भुमिका बघता संसदेचे कामकाज चालेल असे वाटत नाही.
कामकाज चालु न देणे हे देखील विरोधकांकडील एक समर्थ हत्यार असते. (दुधारी असले तरी).
तेव्हा या धाग्यावर पुढील अपडेट जर कामकाज चालले तर दिला जाईल.
मात्र असा गोंधळ घालून कामकाज बंद पाडणे तुम्हाला योग्य वाटते का? या व अश्या प्रश्नांवरील किंवा एकूणच सध्याच्या संसदीय राजकारणावरील चर्चेचे स्वागत आहे.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
३० तारखेला विरोधकांच्या
३० तारखेला विरोधकांच्या सभात्यागानंतर फायनान्स बिल लोकसभेत मंजूर केले गेले.
मात्र श्रीमती स्वराज यांच्या भुमिका स्पष्ट करणार्या भाषणात काँग्रेस सदस्यांनी व्यत्यय आणला व दोन मिनिटे झाल्यावर सभापतींनी श्रीमती स्वराज यांचा माईक बंद केला. यामुळे विरोधीपक्षनेत्या भडकल्या असून लोकसभा सभापती अथवा संसदीय कार्यमंत्र्यांनी बोलावलेल्या कोणत्याही बैठकीत भाजपा यापुढे सहभागी होणर नाही असे त्यांनी घोषित केले आहे.
तसेच युपीएच्या चेअरपर्सन व काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी व्यत्यय आणण्याचा कट रचला असाही आरोप श्री मती स्वराज केला आहे.
तेव्हा आता या सत्रात संसदेचे कामकाज होईलसे वाटत नाही.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
०२ मे
काल राज्यसभेत फायनान्स बिल मंजूर झाले.
विरोधकांनी आपापली भुमिका मांडत सभात्याग केला आणि मग हे बिल मंजूर केले गेले. लोकसभेच्या विपरीत इथे विरोधी पक्षनेते श्री अरूण जेटली यांना सरबजीत सिंग पासून ते चीन प्रश्नावर, कोळसा घोटाळ्या पासून ते जेपीसी प्रश्नावर बोलता आले आणि मग प्रत्येक पक्षांनी आपापली भुमिका मांडली. श्री जेटली यांचे भाषण प्रभावी होते.
लोकसभेत गदारोळात कामकाज होऊ शकले नाहि. मात्र सरकारने "अन्न सुरक्षा विधेयक" चर्चेसाठी दाखल करायचा अयश्स्वी प्रयत्न जरूर केला. बहुदा आज हे बिल दाखल करायचा अजून एकदा प्रयत्न होईल.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
०६ मे
०६ मे रोजी सुद्धा राज्यसभेचे कामकाज गदारोळात होऊ शकले नाही.
मात्र लोकसभेत NATIONAL BANK FOR AGRICULTURE AND RURAL DEVELOPMENT (AMENDMENT) BILL विचारार्थ सादर केले गेले.
याव्यतिरिक्त सरकारची ज्या बिलावर मोठी आशा आहे अश्या "Food Security Bill" सादर होऊन त्यावरील चर्चेला प्रारंभ झाला. यावर अन्न वितरण मंत्री प्रो.के.व्ही.थॉमस यांनी बिल सादर केले. श्री संजय निरूपम यांनी या बिलाला अनुमोदन करणारे भाषण केले. त्याव्यतिरिक्त तृणमूल काँग्रेसचे दिनेश त्रिवेदी यांनी बिलात बदल सुचवत पाथिंबा देणारे भाशन पटलावर ठेवले. राष्ट्रवादीचे डॉ. संजीव नाईक यांनी विधेयकाचे समर्थन करणारे एका परिच्छेदाचे 'भाषण' केले. शेवटी काँग्रेसचे श्री भक्त चरण दास भाषण करत असताना डॉ. व्यास यांना सभागृह ७ मे पर्यंत तहकूब करावे लागले.
आज सरकार सदर विधेयक लोकसभेत मंजूर करून घेण्याचे प्रयत्न करेल असे दिसते.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
आज संसदेचे बजेट सत्र तहकूब
आज संसदेचे बजेट सत्र तहकूब करण्यात आले. आता पुढील भेट मान्सून सत्रात
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!