उदरभरण नोहे: हल्ली कुठे आणि काय खाल्ले?
आपण ऐसी अक्षरेचे सदस्य नवनवीन पुस्तके वाचत असतो, नवनवीन संगीत/व्याख्याने वगैरे ऐकत असतो, नाटके/चित्रपट/व्होडीयो/दृकश्राव्य कार्यक्रम बघत असतो. इतकेच नव्हे, तर त्याबद्दल ऐसीवर लिहून इतरांनाही जे जे उत्तम वाटले त्याबद्दल सांगून त्याचा आस्वाद घ्यायला उद्युक्त करतो, त्याच बरोबर जे जे अनुत्तम त्याबद्दल सावधही करतो. याच बरोबर आपल्यातील अनेक पाककृती आणि छायाचित्रणातही एकत्रितपणे काहीतरी उपक्रम राबवताना दिसतात. यासगळ्यात पदार्थ बनवणार्याप्रमाणे जातीच्या खवैय्याकडे दुर्लक्ष होऊ नये असे वाटले आणि त्यातूनच या धाग्याची कल्पना सुचली.
आपण रोजचे जेवण जेवतोच, पण त्याच बरोबर वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये नवनवीन पदार्थ चाखत असतो. हॉटेलांतच नाही तर सणासुदीच्या निमित्ताने किंवा कधी सहज लहर आली म्हणून किंवा कधी एखादा जिन्नस स्वस्तात मिळाला म्हणून घरीच काहितरी नवा, सुग्रास पदार्थ बनतो.
हा धागा अशाच तुम्हाला आवडलेल्या/नावडलेल्या पदार्थांवर चर्चा करण्यासाठी आहे. इथे हल्ली तुम्ही कुठे आणि काय खाल्ले? ते तुम्हाला आवडले का? असल्यास का? नसल्यास का? जर हा पदार्थ घरी स्वतः बनवला असेल / त्याची पाकृ माहित असेल तर तो कसा बनवला? जर हा हॉटेलात खाल्ला असेल तर ते हॉटेल कुठे आहे? पदार्थाची किंमत काय होती? हॉटेलचा अॅम्बियन्स कसा होता वगैरे हवां ते लिहू शकता. पदार्थाचा फोटो असेल तर उत्तमच.
अर्थातच हे फक्त खाण्याबद्दल नाहि तर पिण्याबद्दलही आहे
असो मी सुरवात एका सूप पासून करतो.
'मिन्स्ट्रोन सुप' हे काही माझं फारसं आवडतं सुप नव्हे. पण काही दिवसांपूर्वी कोथरूडच्या 'ऋग्वेद'मध्ये हे सुप चाखून बघितलं आणि चक्क आवडलं. प्रत्येक ठिकाणी 'सिझनल' भाज्या घालून - म्हंजे उरलेल्या? - हे सूप प्यायलं आहे. इथे मात्र टोमॅटो, बीट, गाजर वगैरे एकमेकांना पुरक भाज्यांना वाटून रवाळ सूप, वर क्रीम, तिखटपणाला केवळ मिरपूड वगैरे स्वरूपात समोर आलं आणि आवडून गेलं.
तुम्हीही सांगा की "हल्ली तुम्ही कुठे आणि काय खाल्ले?"
स्व
हे खाणं स्वखर्चानं की प्रायोजित आहे हेही लिहायचं आहे का?
वाचकांला किती जळवायचं आहे
वाचकांला किती जळवायचं आहे त्यावर डिपेन्ड आहे
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
आम्ही रोजच बाहेर खातो
आम्ही रोजच बाहेर खातो त्यामुळे या धाग्यावर भाग घेण्यात काही अर्थ नाही.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
वा! मग तर तुम्ही भाग घेतलाच
वा! मग तर तुम्ही भाग घेतलाच पाहिजे
कुठे काय चांगलं मिळतं ते तरी कळेल
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
रोज
>>कुठे काय चांगलं मिळतं ते तरी कळेल
रोज खाल्ल्यावर चांगलं सुद्धा कंटाळवाणं वाटू लागतं.
(मी सध्या अशा ठिकाणी राहतो जिथे जं म रस्त्यापेक्षाही जास्त हॉटेल आहेत. पण शेवटी दोनचार ठिकाणापेक्षा जास्त ठिकाणी जाववत नाही. कदाचित वय झाल्यामुळे असेल ).
तरीही.....
बंगलोरमध्ये मणी'ज दम बिर्याणी खाल्ली ती चांगली असते. एक म्हणजे हाफ बिर्याणी मिळते जी माफक खाणार्याला बरोबर पुरते. चव छान असते. त्याची बंगलोरात तीन चार आउटलेट्स आहेत.
टॅको बेल मध्ये नाचोज (शेव बटाटा पुरी) आणि बीन्स बरीटो (राजमा पोळी) खाल्ले ते आवडले नाहीत. त्याची विचित्र चव अपील झाली नाही.
आणखी एका ठिकाणी फालाफेल की कायतरी लेबेनीज खाल्ले. डाळवड्यासारखे पण भरपूर धने असलेले. ते आवडले.
आणखी जुन्या एअरपोर्ट रोडला हैदराबादी बिर्याणी मिळते. एकूण बंगलोरात बिर्याणी (बंगलोरी भाषेत बिरियानी - BIRIYANI) प्रकार रस्तोरस्ती दिसतो. बहुतेक वेळा चांगली असते.
आवडलेला प्रकार म्हणजे पूर्वी इजिपुरामध्ये रहात होतो. तेथे मेन रोडवर एक हातगाडीवाले कुटुंब बटाटेवडे आणि डाळवडे विकते. एक इंची आकाराचे वडे मिळतात. सुमारे एक रुपयाला एक वडा ते खायला जाम मजा यायची.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
पुण्यात जअॅझ बाय द बे मधे
पुण्यात जअॅझ बाय द बे मधे खाल्लेले नाचोज मला पण आवडले नव्हते. अर्धकच्चा पापड खातोय असं वाटलेलं.
डेक्कनपाशी एका गाडीवर बर्फाचा गोळा त्यावर ड्रायफ्रुटस् वगैरे टाकुन दिलेला. तो प्रकार पण आवडला नव्हता.
आतापर्यँत अॅम्बीअन्स खूप आवडला असं एकच ठिकाण स्टोन वॉटर ग्रिल, कोरेगाव पार्क. आम्ही हापिसच्या पैशाने गेलेलो, रांगोळी स्पर्धा जिँकल्याने :-D. ४ लोकांच बील ७ हजार. तेपण फक्त ड्रिँकस आणि सीफुड स्टार्टस् आणि थोडासा मेन कोर्स :-(. तिथे एक व्होडका+किवी कॉकटेल छान होत. आणि कलकत्ता पान नावाचं कॉकटेल येडपट होतं
कोरेगाव पार्क मधेच संजीव कपुरच यलो चिलीज आहे. ते काही खास नै. ड्रिँकस् सोबत शेंगा, चखणा नै दिला कायपण. का विचारलं तर म्हणे आरोग्याच्या दृष्टीने वाईट म्हणुन
येलो चिलीज च्या समोरच पोस्ट ९१ आहे. तिथला बफे छान होता. आणि मी कधी गेले नाही पण कोयलाचा अॅम्बीअन्स पण बाहेरुन छान वाटलेला.
बाकी रोडसाइडला मिळणारे चिकन मोमो कधीपण छान लागतात.
मुंबईतले कोयला
कोयला वरून मुंबईतल्या कोयलाची आठवण झाली.
तिथे जाताना एकदम अरबस्तानात आहोत की काय असे वाटावे असे व इतके अरबी पायघोळ झगे घातलेले सहा सव्वा सहा फुट टगे सोबत काळ्या, निळ्या, पिवळ्या वगैरे मखमली पट्टीच्या किनारा असलेल्या बुरख्यांसोबत / भोवती घोंगावत असतात.
मात्र वर गेले की गच्चीवर मोकळी हवा, ग्रीलचा दर्प .. अहा! जेवण अतिशय छान असतं फक्त बुकींग केलेले हवे आणि बिल भरणारी व्यक्ती सोबत हवी
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
कोरेगाव पार्कातलं कोयला उत्तम
कोरेगाव पार्कातलं कोयला उत्तम आहे. क्वालिटी छान आहे, लै कै महाग नै.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मस्त धागा!
अनेक दिवस कोणीतरी असा धागा सुरू करेल म्हणून (आळशीपणाने) वाट पहात होते. स्वयंपाक बनवताना कौशल्ये लागतात तसेच कल्पकताही लागते जी आमच्याकडे अंमळ कमीच आहे त्यामुळे इतरांनी काय बनविले, कोणते जिन्नस वापरले वगैरे गोष्टी वाचून स्फूर्ती येते.
काल गुढीपाडव्याला पुरीबरोबर 'गूळशेला' नावाचा विदर्भी पदार्थ केला होता. कामावरून दमूनभागून आल्यावर काही फार मोठा घाट घालायची इच्छा राहिली नव्हती म्हणून पट्कन खीर-पुरी बनवायचा विचार केला पण शेवया संपल्या असल्याने बेत बदलून 'गूळशेला'बनवला. ही साधारण लाल भोपळ्याची खीर म्हणता येईल, इथे मिळणारा बटरनट स्क्वॉश त्यासाठी मस्त उपयोगी येतो. भोपळ्याच्या फोडी तुपावर परतून वाफवून घ्यायच्या, त्या शिजल्या की चांगल्या कुस्करून घ्यायच्या. दुसरीकडे चमचाभर तुपात थोडी (२ चमचे) कणिक भाजून त्यात गार दूध घालून त्याचा 'देशी व्हाईट सॉस' बनवायचा आणि त्यात भोपळ्याचा गर मिसळायचा, गूळ चिरून घालायचा, वेलदोड्यची पूड आणि चिरलेले बदामाचे काप घातले की झाला 'गूळशेला' तय्यार.
अलिकडे एका स्थानिक शेतकर्याकडे सी.एस.से. खाते सुरू केले आहे (अदितीच्या भाषेत भाज्याचा उकाडा...:-))त्याने चक्क मोहरीची पाने पैदास केली आहेत. मग 'सररो का सांग' आणि 'मक्की दी रोटी' बनवायला चांगले कारण मिळाले. मक्की दी रोटी मी चक्क भाकरीसारखी करते. मक्याच्या पीठात थोडीशी कणिक मिसळून आधण घालायचे आणि त्याची चक्क भाकरी बनवायची.
अदितीने माझ्या पावाच्या धाग्यावर भाकरी बनवण्यात अपयश आल्याचे लिहिले होते तिला हा प्रकार बनवून पहाता येईल्...पण मक्याचे पीठ भारतीय दुकानांतून आणलेले चांगले कारण ते छान बारीक दळलेले असते.
अवांतर: मोहरीची पाने.
सरसोंका साग' माझीही आवडती भाजी आहे. ताज्या मोहरीच्या पानांची छानच लागते. मोहरीची पाने उगवणेही खूप सोपे आहे. कुंडीतही मुठभर मोहरी घालून उगवता येतात. नंतर त्याला नाजुक शेंगा येतात. ओल्या मटारीच्या शेंगांचे मिनीव्हर्जन असल्यासारख्या. त्यात मोहरी धरते. त्या तिथेच फोडल्या, की नवीन मोहरीची पाने तय्यार. बर्याचदा हे शेंगा फोडण्याचे कामही पक्षी अथवा खारी परस्परच करतात.
अरे वा!
उगवून पाहिली पाहिजेत मोहरीची पाने. आता हा अतिशय लांबलेला हिवाळा संपेल तेंव्हाच काही प्रयोग करता येतील.
आज पुन्हा 'सरसोंका साग' बनवला गेला आणि यावेळेस फोटो काढायचेही लक्षात राहिले.
हे आले जळवणारे
हे आले जळवणारे &*^%$####)())**&!!!!!!!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
त्या 'सरसोंका साग'ची तुझी
त्या 'सरसोंका साग'ची तुझी पाकृ देशील का? आमच्या भाज्यांच्या उकाड्यात मागे येत होता मोहरीचा पाला; तेव्हा तो मी इतर भाज्यांबरोबर थोडा थोडा टाकून संपवला.
नाहीतर सोपा (पक्षी: बॅचलर) उपाय म्हणजे कोबी, बीट, गाजर, टोमॅटो आणि ज्या हाताला लागतील त्या भाज्या कुकरमधे उकडायच्या. शिटी वाजायला आली की गॅस बंद. कुकर उघडला की मिक्सरमधून तो सगळा लगदा स्मूथ करायचा. त्यात धने-जिरे पावडर आणि मीठ घालायचं. पावाला चीज चोपडून त्याच्याबरोबर हादडायचं. या सुपाचा रंग भाज्यांप्रमाणे बदलतो आणि बहुतेकदा अनाकर्षक असतो. पण धने-जिरेच्या पावडरीमुळे नावडत्या भाज्याही पोटात जातात.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
सरसोंका साग
मोहरीचा पाला चिरून घ्यायचा (मी साधारण २ जुडी पाने घेतली पण हे सगळं अंदाजे... मोहरीच्या पाल्याची चव आवडत असेल तर उत्तमच पण नाहीतर त्यात थोडा पालक मिसळला तरी चालते.) एक मोठा कांदा चिरून तो थोड्या तेलावर किंवा लोण्यावर परतून घ्यायचा. त्यात १ मिरची, तीनचार पाकळ्या लसूण आणि इंचभर आले याचे वाटण घालायचे आणि थोडे परतून मग त्यात मोहरीचा पाला घालायचा आणि थोडे पाणी घालायचे. त्याला थोडेसे (१ मोठा चमचा) मक्याचे पीठ लावायचे आणि झाकून पाने अगदी मऊ होईपर्यंत शिजवून घ्यावीत.
नंतर थोडे गार झाल्यावर भाजी मिक्सरवर थोडी वाटून घ्यायचे(फार बारीक वाटून नये). थोड्या लोण्यावर ही भाजी परत थोडी परतायची आणि मीठ वगैरे घालून सारखी करायची. आवडत असल्यास गरम मसाला घालावा, मी बहुतेक वेळेस घालत नाही. या भाजीत पालक पनीर सारखेच पनीरही घालतात.
भला उनका सरसों का साग मेरे पालक पनीर से ....
ह्म्म्म्म्...
'ऐसीअक्षरे'वर राजकारणी (किंवा पोलीस) बहुधा (फारसे) नसावेत. अन्यथा, 'हल्ली कुठे, काय आणि किती खाल्ले' असे शीर्षक कदाचित अधिक सयुक्तिक ठरले असते, असे वाटते.
असो.
उत्तम धागा
उत्तम धागा. यात भर घालणे जमेल.
काल सकाळी सात-साडेसातला कराडच्या गजानन रेस्टॉरंटमध्ये मिसळपाव खाल्ला. गजानन हे अगदी आमच्या कॉलेजच्या दिवसांपासून चविष्ट पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. हॉटेल कळकट आहे आणि म्हणूनच (अर्थातच) पदार्थ उत्तम असतात. अगदी घरगुती, तोंडात रेंगाळत राहील अशी चव. चकलीचे तुकडे, खोबरे, भरपूर कांदा घातलेली मिसळ, ताजा पाव, ग्लासातून दिलेला बेताचा गोड चहा. एक शिग्रेट. रिकामा रस्ता. गाडीतल्या प्लेअरवर 'आपकी याद आती रही रातभर'...
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
>>आपकी याद आती रही रातभर
>>आपकी याद आती रही रातभर
च्या मारी, आता ऐकणे भाग आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
उत्तम मिसळ मिळणारी ठिकाणं
मिसळ्चा विषय काढल्यामुळे ही यादी आठवली
उत्तम मिसळ मिळणारी काही ठिकाणं:
१) अण्णा बेडेकर, पुणे
२) मनशक्ती के॑द्र, लोणावळा
३) मामलेदार, ठाणे
४) मूनमून मिसळ, डो॑बिवली
५) संजिवनी- माडिवाले कॉलनी, टिळक रोड, पुणे
६) रामनाथ-साहित्य परिषदे जवळ ,टिळक रोड, पुणे
७) श्री- शनिपारा जवळ, पुणे
८) नेवाळे- चिंचवड, पुणे
९) जयश्री- बजाज ऑटो समोर अकुर्डी. पुणे
१०) दत्त स्नॅकस , पळस्पे फाटा.
११) कुंजविहारी, ठाणे स्टेशन
१२) जुन्नर बस स्थानक.
१३) फडतरे, कलानगरी.
१४) अनंताश्रम, जेल रोड, इंदौर
१५) गोखले उपहार गृह, ठाणे
१६) भगवानदास, नाशिक
१७) फडतरे मिसळ कोल्हापुर
१८) गरवारे कॉलेज समोर काटाकिर्र, पुणे
१९) प्रकाश, दादर
२०) दत्तात्रय, दादर
२१) वृंदावन, दादर
२२) आस्वाद, दादर
२३) आनंदाश्रम, दादर
२४) मामा काणे, दादर
२५) आदर्श, दादर
२६) समर्थ दादर(पूर्व)
२७) पणशीकर (गिरगाव)
२८) विनय (गिरगाव)
२९) बालाजी स्नँक सेंटर चिंचवड, पुणे
३०) शामसुंदर- सातपुर एम आय डी सी ( अतिशय सुंदर मिसळ) नाशिक
३१) अंबिका - पंचवटी कारंजा ( काळ्या मसाल्याची मिसळ) नाशिक
३२) तुषार - कोलेज रोड (गोड ब्राह्मणमिसळ) नाशिक
३३) कमला विजय - दहिपुल (ब्राह्मणमिसळ) नाशिक
३४) गारवा - अंबड (लाल मिसळ) नाशिक
३५) अलंकार - मेनरोड ( मिसळी पेक्षा वडारस्सामस्त) नाशिक
३६) गुरुदत्त- शिंगाडा तलाव ( कच्चा मसाला मिसळ) नाशिक
३७) मिसळपाव सेंटर - नेहरु उद्यान (रिक्षावाल्यांचा फर्स्ट चोइस) नाशिक
३८) श्रीकृष्ण - तुळशीबाग, पुणे
३९) वैद्य उपाहार गृह - फडके हौद चौकाजवळ, बुधवार्/रविवार पेठ , पुणे
४०) खासबागचीमिसळ कोल्हापुर
४१) चोरगे मिसळ कोल्हापुर
४२). बावड्याची मिसळ कोल्हापुर
४३) मोहन ची मिसळ कोल्हापुर
४४) टेंबे उपहारगृह- ठाकुरद्वार, मुंबई
४५) छत्रे उपहारगृह- मुगभाट लेन च्या दारात.मुंबई
४६) प्रकाश (जोगळेकर), सिक्कानगर - फडकेवाडी मंदिरा समोर
४७) सर्वोदय लंच होम ... करि रोड पुला खाली (डिलाइल रोडची बाजू)
४८) लोअर परळ स्टेशन (पश्चिम) च्या बाहेर पडल्यावरनेताजी लंच होम
४९) बाजीराव रोड वर भिकारदासमारोती जवळ तापीकर काकांचे होटेल, पुणे
५०) जुन्नर मध्ये एक उंब्रज नावाचे छोटे गाव आहे. तिथे "दांगटांची मिसळ"
५१) पेणला चावडी नाक्यावर तांडेलची मिसळ
५२) हॉटेल ज्योती, सोलापुर - पुणे महामार्गावरील भिगवण गाव
५३) बावड्यातली मिसळ कोल्हापुर
५४) बादशाही मिसळ, पुणे
५५) अलका टॉकीजसमोर, कोल्हापूर
५६) नगर रस्त्यावर सरदवाडीची मिसळ
५७) शनिवार पेठेतील "रामदास' पुणे
५८) वायंगणकर (मारुती मंदिर) रत्नागिरी
५९) दत्त मिसळ (टॉकीजवरची / गांध्याची मिसळ) रत्नागिरी
६०) माऊली हॉटेल (KBS होस्टेल समोर) रत्नागिरी
६१) जोगळेकर, दौंड
संदर्भ
अधिक माहितीस्तव सादर..
उपरिनिरर्दिष्टपैकी १५ ) गोखले उपाहार गृह मिसळ हिचा हल्लीच स्वाहाकारापूर्वी काढलेला फोटो. अॅडिशनल तर्री वेगळीच:
मस्त धागा! शक्य असेल तेव्हा
मस्त धागा! शक्य असेल तेव्हा फोटोपण टाकावेत ही विनंती.
घरी केलेल्या पदार्थांचा
घरी केलेल्या पदार्थांचा उल्लेखही चालेल, का फक्त रेस्टॉरंट रिव्ह्यू हवेत?
य निमित्ताने सांगतो घरी,
य निमित्ताने सांगतो घरी, मित्रांकडे, शेजारी, मागून आणलेले, चोरून खाल्लेले, रेस्टॉरन्टमध्ये पैसे देऊन/न देता/कॉप्लीमेंटरी खाल्लेले, बार पासून ते सत्यनारायणाच्या पुजेत कुठेही व कसेही प्यालेले तीर्थ, पॉटलक पासून देशी भोंडल्यापर्यंत कुठेही खाल्लेले वैग्रे वैग्रे असे काहीही चालेल
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
आहा खाणे
परवाच बाणेर रोडला 'रश अवर्स' मधे मेक्सिकन चिकन रोल खाल्ला. आहा. अगदी बॉस्टनमधे चाखलेल्या (आम्हीही आम्रिकेत गेलो होतो हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे, प्लीज नोट.) मेखिकन जेवणातील (हो 'याचा उच्चार असाच असतो बावळटा' अशी शिकवणीसुद्धा तिथेच घेतली गेली होती.) मसाल्याची आठवण झाली.
I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de
आता रश अवर्सची वारी करणे आले.
आता रश अवर्सची वारी करणे आले. आभार!
बाकी आम्हालाही फ'हि'ता ची शिकवण अशीच मिळाली होती.. आम्रिकेत गेलो होतो ना तेव्हा!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
या विषयावर धागा काढण्याबद्दल
या विषयावर धागा काढण्याबद्दल संपादकांना सांगावे म्हणून कितीक दिवस मनात होते पण समहौ झाले नाही. त्यामुळे हा धागा पाहून लै समाधान झाले. तर लोकहो मी नुकते खाल्लेले काही पदार्थ म्हंजे धारवाड स्पेशल बाबूसिंग ठाकूर पेढा (१८५३ पासून प्रसिद्ध), आवलक्की आणि सप्पिन सारु-अन्ना व मांडे फ्रॉम माळमड्डी, धारवाड.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
पेढा
एकट्यानं हा पेढा खाल्ला? माझ्यासाठी आणला नाही? नोडतेनं निनगं...
मधलेक हेळबेकागित्तु री, मत्तु
मधलेक हेळबेकागित्तु री, मत्तु कुडा ना वब्ना तिंतिद्वी
इरली ईसरे इदु तिन बिडी, येन अंती
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
संताप!
#}%%~||<>^*}{]]<<|?%>*"¥*%}|{.|][|%##?€#<<#<|\?.%##~. ......
J)
+++++++++++++++++++++++++
++++++++++++++++++++++++...
शांत ब्रेडधारी रुची, शांत
शांत ब्रेडधारी रुची, शांत तुमचे ब्रेडविषयक धागे बघून आमची काय प्रतिक्रिया होत असेल ते बघा मग
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
रूची बागेतची तलवार हातात
रूची बागेतची तलवार हातात धरून, दातओठ खात बॅटमनच्या मागे लागलेली आहे. आणि तो आपल्या मास्क सांभाळत जीवाच्या भीतीने पळत सुटला आहे असं काहीसं दृष्य डोळ्यासमोर आलं.
असो. 'अवांतर' श्रेणी मिळू नये म्हणून पुढे लिहीते आहे. आमच्याकडे विकेण्ड आला की बरोबर हवा तापते आणि विकडेजना तापमान कमी होतंय असं सुरू आहे. दिवसभर उन्हात भटकून भूक फार लागत नाही, आणि भूक लागली तरी खाण्याची फार इच्छा नसते. सूर्य मावळण्याआधी गॅस पेटवण्यापेक्षा एकीकडे इंटरनेट चिवडत बिस्किटं, ब्री (चीज) आणि टोमॅटो खाल्ले.
फोटो जुनाच आहे, पण 'रेसिपी' बदललेली नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मस्त आहे हो हे बिस्कीट कम चीज
मस्त आहे हो हे बिस्कीट कम चीज (ज्यादा)
@अमुकः भारीच
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अजरामर प्रसङ्ग (अवान्तर)
एका अजरामर महाभारताची (पाहा मिनिटे १:४५ ते १:५५) आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद हे वाल्गुदमानवा !
+१
+१
नुकताच "पॅन फ्राईड फ्वे ग्रा
नुकताच "पॅन फ्राईड फ्वे ग्रा (Foie Gras) विथ पायनापल & लाईम कॉम्पोते, जिंजरब्रेड क्रम्बल, ब्लिनी अॅन्ड स्ट्रॉबेरी ग्लेझ" असा एक पदार्थ खाण्यात आला. बदकाच्या युकृतातली चरबी तळून बिस्किटे, जिंजर ब्रेडचा चुरा व स्ट्रॉबेरी ग्लेझ करून दिले होते. चरबीचा थोडासा कडवट, तुरटपणा आणि स्ट्रॉबेरी व बिस्किटांचा गोडवा यांच्या संयोगाने एक अनवट चव अनुभवायला मिळाली.
Foie Gras उर्फ फ्वा ग्रा
'फ्वा ग्रा' म्हणजे बदकाच्या यकृतातली चरबी नव्हे, तर ज्याच्या अंगात पुष्कळ चरबी आहे अशा बदकाचं यकृत. ज्यांना यकृताची चव आपल्याकडच्या कलेजीच्या पदार्थांमुळे माहीत असेल त्यांना ती चव ओळखीची वाटेल. चरबी वाढण्यासाठी बदकांना भरमसाठ खायला घातलं जातं. त्यामुळे आजकाल काही लोकांचा याला विरोध आहे. मला वाटतं कॅलिफोर्नियामध्ये 'फ्वा ग्रा'वर बंदी आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
फ्वा तर फ्वा
कलेजी मी खाल्लेली आहे (कोंबडीची व बकर्याची) पण यात कलेजी सारखे घट्ट टेक्श्चर नव्हते तर चरबी सारखे पिवळसर आणि लिबलिबित होते. खूप खाऊ घातलेल्या बदकाचे यकृत असे होत असेल तर कल्पना नाही.
शिवाय मागवायच्या आधी ते काय असते असे विचारल्यावर ती यकृतातली चरबी असते असेच सांगितले गेले होते.
आहे बरोबर तरी
बरोबर. पोत बदलतो, पण कलेजीची चव आहे ते कळतं. खूप खाऊ घातल्यामुळे यकृत आकारानं वाढतं आणि त्यातलं चरबीचं प्रमाण वाढतं. त्यामुळे पोत ओशट होतो. अधिक माहिती इथे मिळेल.
सांगणाऱ्याला माहीत नसेल किंवा भाषेची अडचण असू शकेल. चरबट यकृत हे अधिक योग्य वर्णन व्हावं.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
हम्म. फॅट लिव्हरच्या ऐवजी तो
हम्म. फॅट लिव्हरच्या ऐवजी तो लिव्हर फॅट म्हणाला असेल. इंग्रजीचे तसेही इकडे फार हाल होतात.
बळेच खाऊ घालून यकृत तसे करतात हे कळल्याने आता परत खाईन असे वाटत नाही. त्यापेक्षा चोकोलेट फाँद्यू झकास होते मग.
मॅक्डोनल्डस् आणि केएफसी वगैरे लोकसुद्धा खूप खाऊ घालून कोंबड्यांना लठठ करतात असे ऐकून आहे.
स्रोत पाहावा लागेल
बळे खाऊ घालूनच फ्वा ग्रा बनवलं असेल असं नाही. ते कुठे बनलेलं आहे त्यावर ते अवलंबून आहे.
जाताजाता : प्राण्यांना नक्की कसं वागवल्यामुळे ते क्रूर ठरतं किंवा ठरत नाही हा बाकी मूलत: तत्त्वज्ञानातला विषय आहे त्यामुळे त्यावर इथे काही बोलत नाही. (उदाहरणार्थ, भारतात कुठेही कोंबड्यांना ज्या प्रकारे वागवलं जातं ते पाहाता 'ते क्रूर असतं आणि म्हणून कुणीही चिकन खाऊ नये' असं सहज म्हणता येईल असं वाटतं.)
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
क्रूर आहे म्हणून नव्हे तर तो
क्रूर आहे म्हणून नव्हे तर तो लठ्ठ करण्याचा प्रकार एका व्हिडिओत पाहून ओंगळवाणा वाटला होता म्हणून.
अगदी वेगन लोकांमुळे प्राण्यांचा रहिवास नष्ट होणे हा ही क्रौर्याचाच प्रकार म्हणता येईल. त्यामुळे प्राणी खाणे आणि क्रौर्य यांची सांगड घालत बसण्यात अर्थ नाही.
ह्या विकांताला
१) समुद्र किनारी असलेल्या एक रेस्टॉरंट मधे छान वारा, सुरेख चांदणे पडलेल्या एका निरभ्र रात्री ( हो काँक्रीट जंगलात फार अभावाने ग्रह तारे आकाश दिसते) ,दोन मित्रांबरोबर बियर, चखणा - फिश मंच्युरियन, ग्वाकामोले हे देसी चायनीय व देसी मेक्सीकन चवीचे चखणे, चिकन विंदालू, कढई पनीर, नान हे माफक जेवण. अन्न फार ग्रेट नसले तरी समुद्र किनारा, वारा, रात्रीचे सुंदर आकाश दिसणे व अर्थात दोस्तमंडळी याने जास्त मजा आली.
२) मिक्स्ड हर्ब बटार्ड + रोमेन लेट्युस + सनड्राईड टोमेटो चीज स्प्रेड, + व्हर्जीनिया हॅम असे एक सॅडविच घरीच चॉकोलेट मिल्क बरोबर
२.१) स्कोन + नॉन सॉल्टेड बटर + ब्लूबेरी जाम + कॉफी
३) एका इंडोनेशीयन हाटीलात, पाडांग भागातील रुचकर जेवण - चित्र विकीवरुन
----------
भारतीय (शक्यतो बाहेर खाताना भारतीय खाण्याला कमीत कमी प्राधान्य देतो) थाई, फ्रेंच, इटालियन, साउथ इस्ट एशीयन [इंडोनेशीयन(यात देखील जावा सुमात्रा बेटामधील विविध प्रकारचे म्ह्णजे आपल्याकडे कोकणात, देशावर, पुण्यात, कोल्हापूरात, नागपूरात इ तसे वेगवेगळे. काही भाग गोड प्रभाव काही तिखटजाळ), मलेशीयन पर्नाकन, व्हिएतनाम, कंबोडीया] पद्धतीचे, टर्कीश /लेबनीज/मिडील इस्टर्न, मेक्सीकन, जनरिक वेस्टर्न, जपानीज, चायनीज,....... अजुन वेगवेगळे काय आहे बरे?
अफ्रीकन एकदाच चाखले आहे व विसरलो आहे ती चव. खायला हवे.
फोई ग्रा, कॅव्हीआर प्रकरण काय जमले नाही बॉ. स्टेक कधी मधे. पण नॉनव्हेजात जास्त करुन प्राधान्य सीफूड
आयुष्याची पहीली दोन दशके वरणभात-अळूची भाजीला कवटाळण्यात गेली त्यामुळे अजुन बॅकलॉग भरायचा आहे.
साग्र संगीत जेवणाचा लुफ्त तर आहेच! पण वरणभाताने सवय लावली की कसे कल्पना नाही पण
१) गरम गरम पोळी + तूप (किंचित मीठ)
२) वरण भात,
३) बगेट किंवा क्रोसॉन्ट + नॉन सॉल्टेड बटर + दोन कप एक्प्रेसो
४) साधा डोसा
असे अगदी साधे पदार्थ खाउन पण तृप्त व्हायला होते.
खाण्यासाठी जन्म आपुला...
ऋषिकेश तुझ्या अभ्यासु धाग्यांना दरवेळी प्रतिसाद द्यायला जमतेच असे नाही म्हणून मुद्दाम मोठा प्रतिसाद दिला. आता लंघन/हलका आहार करतो काही दिवस
आम्हीही सर्व प्रकारचे सामिश
आम्हीही सर्व प्रकारचे सामिश भोजन करत असलो तरी विष्णुच्या प्रथम अवताराला अधिक पुजणारे
प्रतिसाद मस्तच आहे. काही पदार्थ तर ऐकलेलेही नाहित, चाखणे सोडा!
हलका आहार म्हणजे काही छान सलाड लाभलं तर तेही येऊ दे इथे!
बाकी आता तुम्ही हर्ब असे लिहिल्याने तुम्हाला नव्या बाजुकडून शिक्षा मिळाणार आहे
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
किंचित दुरुस्ती (अतिअवांतर)
.....बाकी आता तुम्ही हर्ब असे लिहिल्याने तुम्हाला नव्या बाजुकडून शिक्षा मिळाणार आहे...
...........'नव्या बाजुकडून' नव्हे, बरं का मास्टर ऋषिकेश. ' 'न'वी बाजू ' कडून !
- ठिगळे ('सर'!).
किंचित दुरुस्ती (अतिअवांतर)
'मिन्स्ट्रोन' नव्हे, बरं का मास्टर ऋषिकेश. मिनेस्ट्रोनी! मिनेस्ट्रोनी!!
- 'न'वी बाजू ठिगळे ('सर'!).
(बाकी चालू द्या.)
मस्त!!
मस्त!!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मेंगलोर करी
नुकताच नळस्टॉपजवळ असलेल्या 'कलिंगा' मध्ये चक्क निरामिष खाण्याचा योग आला. तसं कलिंगा मत्स्यावतारांसाठीच जास्त प्रसिद्ध आहे.
पण व्हेज पाहिजे होतं तर "व्हेज गस्सी" नामक पदार्थ खाऊन पाहिला. वेगवेगळ्या भाज्या घातलेली मेंगलोर करी आणि अप्पम ..
जोडी मस्त होती.. दुर्दैवाने नीर दोसा मिळाला नाही. ही गस्सी केरला पराठाबरोबरही मस्त लागते.
'ऋग्वेद' एकूणात मस्तच आहे. कुठलाही पदार्थ चांगला असतो. पण पूर्वी पनीर पटियाला हा आवडीचा होता. पापडाचे आवरण करून त्यात तळलेले पनीर जरा वेगळ्या चवदार ग्रेव्ही मध्ये.. असं फार इतर ठिकाणी पाहिलं नाही आणि इतकी झकास आणि कन्सिस्टंट (मराठी?) चवही इतरत्र नाही..
कालच कोरेगाव पार्क मध्ये 'प्रेम' इथे खाल्लेले कबाब मस्त होते आणि नेहमीप्रमाणे सिझलरही .. पनीर शाश्लिक खाऊन पाहिलं.. थोडा पोटॅटॉ चिप्स ने विरस केला पण बाकी पनीर, इतर भाज्या आणि वरचा मसाला बेष्ट होता..
एक सरप्राईज म्हणजे मित्राने मागवलेले मसाला ऑमलेट.. मी आजवर खाल्लेल्या सर्वोत्तम मसाला ऑमलेटमध्ये पहिल्या तीनात येईल.. केवळ अप्रतिम.. इतकी साधी गोष्ट एखादा / दी शेफ इतकी मस्त बनवू शकतो / ते..
:)
यावरून आठवलं
माझ्या एका कलीगच्या मते "दिर्घ काळ चालणार्या, काठिण्यपातळीच्या चरमसिमा गाठलेल्या पाककृतीं इतकेच किंवा कांकणभर अधिक कौशल्य कमीत कमी वेळात अन् पहिल्या फटक्यात "पर्फेक्ट" लिंबु सरबत बनवायला लागते. त्यातही लिंबु सरबताची चव न घेता पाहुण्यांना सर्व करणार्याला/रीला हॅट्स ऑफ!"
बाकी, कलिंगात माझा व्हेजचा अनुभव तितकासा चांगला नव्हता. आता कधी तिथे गेलो की "व्हेज गस्सी" खाऊन बघेन.
बाकी शाश्लिकपुरते: 'याना'कडचे शाश्लिकसाठी मेरिनेशन - अन् त्या मुळे येणारा स्वाद मला सर्वात आवडतो.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
कलिंगा छान आहे. पण निसर्ग इज
कलिंगा छान आहे. पण निसर्ग इज बेस्ट!!!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
कलिंगात भरल पापलेट, गोष्त
कलिंगात भरल पापलेट, गोष्त बोटी कबाब आणि चिकन विंदालू आवडले होते पण त्याला फार वर्षं झाली.
काही दिवसांपूर्वी साऊथ इंडीज,
काही दिवसांपूर्वी साऊथ इंडीज, युनिव्हर्सिटी रोड (पुणे सेंट्रल ला लागूनच्या इमारतीत आहे) इथे दुपारचे बफे जेवण घेतले. ४००-४५० च्या घरातली किंमत. साऊथ इंडियन शुद्ध शाकाहारी जेवण, विशेषतः केरळी पद्धतीचे.
स्टार्टर्सः रवा बोंडा, बटाटे फ्राय करून केलेली कैतरी डिश, लहानशी मुळगापुडी इडली (चटणीने माखलेली).
सोबत ग्लासात भरून रसम.
हे सर्व अनलिमिटेड, पाहिजे तितके खा.
मेन कोर्सः ५-६ मस्त भाज्या, पण नाव विचारू नका, ते म्हंजे जिभेला खरचटायचं काम व्हेजिटेबल स्ट्यूसकट अनेक व्हरायटीज. आणि कशातही बटाटा म्हणून नाही.
त्यासोबत तीन ऑप्शन्स म्हंजे छोटा डोसा, केरळा पराठा(परोट्टा) आणि आप्पम. मी बाकी सोडून वट्ट आप्पम हादडले. तिथले आप्पम खूप मस्त लागतात, नाद नै करायचा त्यांचा.
नंतर भात २ प्रकारचा: एक साधा भात आणि एक कोकोनट राईस. सोबत सांबारदेखील. सगळे एकदम गरमागरम.
शिवाय सोबत ताजी फळे उदा. कलिंगड, सलाड, कडधान्ये, इ. कौतुके आहेतच.
डेझर्टः दोन प्रकारच्या खिरी. मस्त होत्या. आणि व्हॅनिला आईस्क्रीमही.
एकूणात प्रचंड तृप्त झालो. फिल्टर कॉफी तेवढी हवी असल्यास वेगळी घ्यावी लागते. मला कॉफी प्रकरणात इंटरेस्ट नसल्याने मी घेतली नाही.
शनिवार-रविवार दुपारी १२ ते ३ या काळात कधीपण जा, अन मजा करा. सर्व्हिस आणि अन्नाचा दर्जा दोन्हीही अतिशय मस्त आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
आहाहा
वाल्गुदेया, आपलं तुपलं अप्पम् बाबत जमलं गड्या. केरळी वा गोवन मसाल्याचे कोणतेही चिकन आणि अप्पम्, आहाहा. बाकी सगळं झक मारतंय सालं. परवाच 'कलिंगा'ला हाणलं मस्तपैकी. तिकडे ठेसनाजवळ 'कोकोनट'मधे एक मस्त मिळतं.
I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de
ऐला या काँबोबद्दल इतक्कं
ऐला या काँबोबद्दल इतक्कं ऐकलंय पण कधी खाल्लं नै अजूनपर्यंत पण आता हादडतो नक्कीच!!!! एक आप्पम-स्पेशल कट्टा करू कधी जमल्यास, काय म्हणता?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
एरवीच
गोवन / मेंगलोर लाल करी आणि अप्पम / नीर दोसा हे जीवघेणं काँबिनेशन आहे..
बाकी केरळी जेवणासाठी त्या इंडिजला भेट द्यायला हवी..
बंगळुरात एक लहानसं हॉटेल आहे व्हाईटफिल्ड रस्त्याला.. गोलकोंडा चिमनी.. गेल्याच महिन्यात तिथले "तंगडी कबाब" लै आवडले होते..
एकूण चांगलं आहे कबाब आणि चिकन / मटन मसाला डिशेस..
आता तर अजूनच इच्छा बळावलीये
आता तर अजूनच इच्छा बळावलीये सहीच.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
४००-४५० च्या घरातली किंमत
४०० ते ४५० हा आता 'रिजनेबल रेट' मानला जातो काय?
नाही, अजून तरी हा रेट हाय
नाही, अजून तरी हा रेट हाय एंडच आहे. रेट आणि मेनू पाहिल्यावर कधीतरी एखादवेळेस जायचे हे ठिकाण आहे हे खरे तर स्पष्टच आहे, नैका
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
धन्यवाद
मलाही तीच शंका होती. हे वाचून हायसे वाटले. आजकाल हे वेगवेगळे कट्टे व खाद्यपदार्थांचे दर पाहिल्यावर नियमित पगार मिळून आणि फारशी खर्चिक नसलेली जीवनशैली पत्करून सुद्धा आपण दररोज अधिकाधिक गरीब होत चाललो आहोत की काय अशी शंका येत राहते. सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांमुळे निश्चितच दुःखाचा प्रसार जास्त होत आहे या निष्कर्षाशी मी सहमत आहे.
सोशल नेटवर्किंग
अंशतः सहमत आहे. दु:खाची कारणे अर्थातच प्रत्येकासाठी भिन्नभिन्न.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
एकंदर हा धागा त्रासदायक तरीही
एकंदर हा धागा त्रासदायक तरीही हवाहवासा ठरणार असं दिसतय...
दुर्वाँकुर मधे संकष्टीला अमर्याद पुपो मिळते का? दिवसभर की फक्त चंद्रोदयानंतर?
"दत्तात्रय"
या विषयाशी संबंधित अशी नुकतीच वाचलेली एक बातमी : "'दत्तात्रय'ची चव हरपणार; दादरचे मराठमोळे हॉटेल बंद होणार"
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/19571672.cms
या बातमीवरची पहिलीच (किमान चालू क्षणी तरी पहिलीच दिसणारी) "आनंद" हे नाव घालून दिलेली प्रतिक्रिया मार्मिक आहे. ती इथे डकवतो :
"हॉटेल मालक वागळेंनी स्वत: आत्मपरीक्षण करावे. याच हॉटेल पासून १ मिनिटांच्या अंतरावर असलेल्या प्रकाश हॉटेलला मिळणा-या उदंड प्रतिसादाचा अभ्यास करावा व आपण नेमके कशात कमी पडत आहोत ते शोधावे उगाच हॉटेल बंद करण्याचा दोष मराठी माणसांवर लादू नये. आजही दादर भागात आस्वाद, तृप्ती, प्रकाश, जिप्सी यासारखी महाराष्ट्रीयन पदार्थ देणारी हॉटेल्स चांगली चालू आहेत. मराठी माणसाला अपेक्षित चव जर दत्तात्रय हॉटेल देणार नसेल तर ती चूक कोणाची. मराठी माणसाची कि वागळेंची."
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
+११११११११११११. एकदम मार्मिक
+११११११११११११.
एकदम मार्मिक आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मागे एका ठिकाणी वाचले
मागे एका ठिकाणी वाचले होते......
मराठी खाद्यपदार्थांचे हॉटेल मराठी माणसाला टारगेट करून कधीच चालणार नाही. त्यांनी नॉन मराठी कष्टमर ओढायला हवा.
बंगलोरमध्ये गोली वडापाव आणि जंबोकिंग वडापाव चांगले चालतात. (त्यांचा वडापाव आपल्यासारखा नसला तरी). त्यांचा टारगेट ग्राहक मुंबईतही आणि इतरत्रही नॉनमराठी माणूस असतो.
मालवणी हॉटेलांनी सुद्धा यात यश मिळवले आहे असे वाटते. अनेक नॉन मराठी लोक मालवणी जेवण जेवायला जातात. याचे कारण कदाचित नॉनव्हेज हे असू शकेल.
दुसरा एक विचार ....
थालिपीठ, कोथिंबिर वडी, मोदक, साबुदाणा वडा/खिचडी, पुरणपोळी यांचा (मराठी) ग्राहकवर्ग कोण? कनिष्ठ मध्यमवर्ग (कदाचित आर्थिक कारणांमुळे) हे पदार्थ घरीच बनवून खातो. हॉटेलात जाऊन हे पदार्थ खाणारा वर्ग म्हणजे सुखवस्तू वर्ग. त्याला हल्ली कुटुंबासोबत जाऊन हॉटेलात जाण्यासाठी जो "अॅम्बियन्स" हवा असतो तो खास मराठी हॉटेले पुरवत नाहीत असे वाटते.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
सहमत आहे. मराठी जेवणाला
सहमत आहे.
मराठी जेवणाला पंजाबी सारखा रीच, हेवी फिल येत नाही. मग कमीतकमी चोखीधानी सारखं रॉ, रस्टीक अपील तरी आणावं. सिँहगडवर पीठलं भाकरी आवडीने खातात की सगळेजण.
>>मराठी खाद्यपदार्थांचे हॉटेल
>>मराठी खाद्यपदार्थांचे हॉटेल मराठी माणसाला टारगेट करून कधीच चालणार नाही.<<
पुण्यात अनेक मराठी हॉटेल्स जोरात चालू आहेत, प्रत्येक ठिकाणी जाणार्या क्लासनुसार मराठी जेवण मिळतं, त्यातली बरीचशी 'थाळी' प्रकारात आहेत. श्रेयस, रसोई, दुर्वांकुर, मयुर, जनसेवा, पुना गेस्ट हौस, स्वीट होम(हे बहूदा बंद झालं), अवारे खानावळ, सात्विक थाळी, जयश्री, गिरीजा, सुकांता, ऋतुगंध हि काही ठिकाणं, अभक्ष्यासाठी पुरेपुर कोल्हापुर, तिरंगा, महेश लंच होम वगैरे ठिकाणं, त्यातल्या बर्याच रेस्टॉरंटच्या दर्जाबाबत/चवीबाबत प्रश्न आहेतच, पण त्यामुळे त्यांचा धंदा बसल्याचे दिसत नाही.
>>थालिपीठ, कोथिंबिर वडी, मोदक, साबुदाणा वडा/खिचडी, पुरणपोळी यांचा (मराठी) ग्राहकवर्ग कोण? कनिष्ठ मध्यमवर्ग (कदाचित आर्थिक कारणांमुळे) हे पदार्थ घरीच बनवून खातो. हॉटेलात जाऊन हे पदार्थ खाणारा वर्ग म्हणजे सुखवस्तू वर्ग. त्याला हल्ली कुटुंबासोबत जाऊन हॉटेलात जाण्यासाठी जो "अॅम्बियन्स" हवा असतो तो खास मराठी हॉटेले पुरवत नाहीत असे वाटते.<<
रेस्टॉरंटमधे तर खातोच, पण दुकानातून आणुन हे पदार्थ खाणारा वर्ग देखील खूपच मोठा आहे. 'अॅम्बियन्स' वाले चवीसाठी तडजोड करायला तयार असतात अस पहाण्यात आहे, वर बॅटमनने नोंदवलेल्या साऊथ ईंडिज मधे जौन साउथी खाणारे वैशाली/रुपाली/शुभम/शिवसागरच्या मानाने नगण्य आहेत, अर्थात तिथे ईंडिजसारखी व्हरायटी मिळत नाही, पण गेलाबाजार शिवसागरमधे नीर-डोसा मिळतो जो पुण्यात इतरत्र फारसा मिळत नाही.
थाळी हॉटेलांना-मेस-खाणावळींना
थाळी हॉटेलांना-मेस-खाणावळींना आश्रय देणारे ब्याचलर असतात (त्यांना अॅम्बियन्सचे फारसे कौतुक नसते).
मराठी खाद्यपदार्थ म्हणून माझ्यासमोर जेवणाचे पदार्थ आले नव्हते तर स्नॅक म्हणून खाल्ले जाणारे पदार्थ आले. मूळ बातमीतले दत्तात्रय हॉटेल हे बहुधा तशा स्नॅकफूडचे हॉटेल होते. (म्हणजे तिथे थाळी मिळत असेलही).
तसेही श्रेयस आणि रसोईचा अॅम्बियन्स चांगला (म्हणजे आजच्या सुखवस्तू वर्गाला हवा तसा) आहेच. ते त्या साउथ इंडिजशी इक्विव्हॅलंट असतील.
अॅम्बियन्स महत्त्वाचा की कसे याची कसोटी म्हणजे या धाग्यावर जन्तेने जे खाद्यपदार्थ खाल्ल्याचे लिहिले आहे ते चांगला अॅम्बियन्स नसलेल्या हॉटेलात जाऊन खायला फारसे लोक तयार होणार नाहीत.
काही खास चवीची हॉटेले चालतातही. चल रे मिसळ खाऊ असे म्हणून दोन मित्र मामलेदारकडे जातील पण कुटुंबासह तिथे जाणार नाहीत. त्यांच्यासाठी वेगळे आमंत्रण हॉटेल काढावे लागते.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
कुटुंब घेउन गचाळ जागी फार लोक
कुटुंब घेउन गचाळ जागी फार लोक जात नाहीत ह्याबद्दल सहमत आहे.
अॅम्बियन्स नसल्याने सध्या तरी कोणाचे काही बिघडलेले नाही, मुंबईमधे एसी आणि उत्तम सर्व्हिस हा सुखवस्तु अॅम्बियन्सचा किमान पात्रतेचा निकष असल्याचे मला वाटते, पुण्यात तसं नाही, पुरेशी स्वच्छता व लोकेशन हे दोन निकष अॅम्बियन्स म्हणून सुद्धा पुरतात. मुंबईमधे निलकमल खुर्ची उत्तम अॅम्बियन्समधे चालेल का ही शंका आहे, पुण्यात तो मुद्दा तसा दुय्यम आहे. मुंबईला गोमंतक जसे फार उत्तम अॅम्बियन्स नसलेले आहे तरी ते चालते(चालते नं आता?) त्याचप्रमाणे पुण्यातही ही मराठी हाटेले चालतात.
पण अमराठी लोक मराठी खाणं खायला फारसे जात नाहीत हे मान्य, त्याला अपवाद फक्त काही मांसाहारी जेवणावळींचा असावा. घाटी जेवणावळ मालकांची उदासिनता, धंदा करण्याचं नसलेलं कसब आणि घाटी जेवणाबद्दल फारसं वलय नसल्याने होत असावं.
मार्मिक प्रतिक्रिया
याच प्रतिक्रियेसारख्या इतरही काही मार्मिक प्रतिक्रिया तिथे वाचायला मिळाल्या.. उदा. मिसळ मिळेल पाव नाही त्याऐवजी पुरी खा हा अनुभव एकाला आला.
मिस्टर वागले, कसे संगू तुम्हाला , दहा दिवसा पूर्वी तिकड गेलेलो , आमचे सम्पूर्ण कुटुंब होते, आठ लोक होतो. मिसल पाव मगवला , आम्हाला सांगितले फक्त मिसाल मिलेल पाव नही तेवट, चाट पडलो, मिसाल कशा बारो बर खनार ? वेटर म्हणला पूरी आहे. सर्वंना पूरी नको होती, सर्वा उथलो आणि दुसर्या होटेल मधे गेलेओ. पाव ठेवले असते टर कही बिघाडले असते का ? कधी सामाज्ञार ह्या लोकंना ? प्लीज़ बदला काआला प्रमाने , त्तर च धंदा हो इल साहीब.
वागळे जी खूप वाईट वाटले बातमी वाचून… मराठीची एवढी सेवा फक्त ११ शतकात ज्ञानेश्वरानी केली होति… त्यानंतर वागळेच …सगळी हॉटेले भन्नाट चालत असताना, आणि तेथे कर्मचारी मिळत असताना फक्त ह्या मराठी माणसाचे हॉटेल चालू नये म्हणजे काय … हा अन्याय आहे…आणि मराठी आहे म्हणून त्यांना कर्मचारीही मिळत नाही, मराठी आहे म्हणून लोक तेथले (बेचव) अन्न खायला पण तयार नाहीत…मराठी मराठी मराठी मराठी मराठी मराठी … वागलेजी तुम्ही सरळ ते हॉटेल भाड्याने द्या आणि आरामात काहीही काम न करता भाड्यावर जगा …. समजू दे मराठी लोकांना पन…शिकवच आम्हा सर्वाना धडा, द्याच आम्हाला शिक्षा….
हा शेवटचा परिच्छेद वाचून
हा शेवटचा परिच्छेद वाचून अजितदादांच्या आत्मक्लेषाची साथ पसरली आहे का काय अशी शंका आली. खवचटपणाचा कहर आहे!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
इतिहासाची पुनरावृत्ती?
हम्म्म्म्म्... 'मिसळपाव मिळत नसेल, तर मिसळपुरी खा!'????
मारी आन्त्वानेतबाईंची, का कोण जाणे, पण, याद आली. ((त्याही) गेल्या बिचार्या!)
असो.
आम्हालापण एका टग्या*ची आठवण
आम्हालापण एका टग्या*ची आठवण झाली.
*हा उल्लेख "हो मी टग्या आहे" असे जाहीर बोलणार्या आणि अलिकडेच "पाणी नाहीतर...." असा काही उपाय सुचवणार्या एका धडाडीच्या नेत्याबद्दल आहे. कोणा जाल ऐडीबद्दल नाही.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
सुरमई थाळी..
कनगुटकर हॉटेल, काशिद अलिबाग रस्त्यावर. सुरमई थाळी. कालच खाल्ली. झकास. बाकी आणखी काही अपलोडवतो जमेल तसे.
धाग्याबद्दल धन्यवाद. कुठे गेलो की उपयोगी पडेल.
कल्याणीनगरात बिग सिनेमाजवळ
कल्याणीनगरात बिग सिनेमाजवळ "मरकेश" नामक एक मध्यपूर्वेकडच्या पद्धतीच्या डिशेस मिळणारे छोटेसे पण मस्त हाटेल आहे. पहिल्या मजल्यावरती थोडीशीच पण अस्सल अरबीछाप वाटावी अशी बैठकव्यवस्था आहे. खाली बाहेर बरेच लोक बसू शकतात. मेन अॅट्रॅक्शन म्हंजे श्वार्मा/शोर्मा आणि फालाफेल. बाकी चिकन-मटन आयटम्स पण मस्ताड एकदम अँड विथ रीझनेबल रेट्स.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मोरक्कन
माराकेश म्हणजे मोरक्कन पद्धतीचं हाटिल दिसतंय. आमच्या शहरात काही वर्षांपूर्वी याच नावाचं (आणि बैठकींचं हाटिल होतं. दुर्दैवाने ते अलीकडेच बंद पडलं.
येस्स काहीसं तसंच.
येस्स काहीसं तसंच.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
सुरेख धागा आहे!!
धागाकर्त्याला अनेक धन्यवाद. मुंबईतली खादाडीची स्थानं परिचयाची आहेत पण पुण्यात आल्यावर कुठे काय खायचं याची चांगली माहिती मिळते आहे. थॅन्क्स!
आता आमचा अनुभव सांगायचा तर काही दिवसांपूर्वी सान-डियागोला सुट्टिसाठी गेलो होतो. तेंव्हा आपले नंदनराव आम्हाला जुन्या सान्-डियागो गावातल्या एका अस्सल मेक्सिकन रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेले होते. आजवर नाही म्हंटलं तरी जवळजवळ बावीसएक वर्षे तरी मी मेक्सिकन फूड खातोय, पण तिथे जे फूड मिळालं त्याला तोड नाही. मी मागवलेला चिली रेलेनो अफलातून होता. त्यातली मिरचीही अगदी फ्रेश्, गुबगुबीत होती आणि आतलं सारणही सुरेख मेक्सिकन मसाल्याचा स्वाद देणारं होतं, उगाच तिखटजाळ नव्हतं. त्यात चीजदेखील अगदी योग्य प्रमाणात वापरलं होतं, उगाच अमेरिकन पदार्थांसारखं ओसंडून वहात नव्हतं.
माझ्या पत्नीने मागवलेले चिकन तमालेही अतिशय रुचकर, योग्य प्रमाणातच वाफवलेले (फार जास्त चिवट नाहीत की कमी गिळगिळीत पीठ लागणारे असे नाहीत)होते. वरचं मक्याच्या पीठाचं आवरण देखील अगदी पातळ तलम होतं.
हो, आणि श्रामो, हे जेवण नंदन प्रायोजित होतं!!!
आम्हां उभयतांनाही हे जेवण बेहद्द आवडलं. त्यामुळे आता त्या जेवणासाठी तरी वारंवार सान-डियागोला गेलं पाहिजे असं म्हणत आहोत!!
(नंदनच्या कपाळावर पडलेल्या त्रासिक आठ्या मला इतक्या दूरून एलएतूनही स्पष्ट दिसताहेत!!!!)
मेक्सिकन
सीमेलगत असल्यामुळे सॅन डिएगोत मेक्सिकन खाणं उत्तम मिळतं. तमाम 'ऐसी'करांना आग्रहाचे निमंत्रण आहेच
[तीच गत अॅरिझोनातल्या तुसाँची. उदा. 'मि निदितो*' ('पक्षी': माझे घरटे) नावाचे रेस्तराँ]
धाब्यासारख्या लहान लहान मेक्सिकन रेस्तराँतूनही बर्याचदा चविष्ट खाणं मिळतं. या रविवारी दुपारी घरचा डाळ-भात + अशाच एका हाटिलात मिळणारा हा अखंड तळलेला तिलापिया असा योग जुळून आला.
(*संस्कृत 'नीड'वरून. पहा टागोरांच्या विश्वभारतीचे बोधवाक्यः 'यत्र विश्वं भवत्येकनीडम्')
भाग्यवान
भाग्यवान हो तुम्ही...
आमच्या नशिबी नंदनकडून एखादं पुस्तकच येतं.
बाय द वे, समस्तांसाठी: तो प्रायोजक तुमचाच मित्र असेल तर अशी पिडांसारखी नोंद पुरेशी आहे. पण हा प्रायोजक ती खानावळ, हाटेल, रेस्तरां असेल तर ती नोंद ठळक करा बरं... मुद्दाम अक्षररंग करडा केला, हमखास वाचलं जाण्यासाठी.
काय करता!
आम्ही पडलो भोगवादी सुखासीन. आम्हाला नंदन खाऊपिऊ घालतो.
तुम्ही पडला समाजाच्या भल्यासाठी झटणारे वगैरे. मग भोगा आपल्या कर्माची फळं.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
मँगोज
एक-दोन महिन्यांपूर्वी मी मालाड (प.) येथील मँगोजमध्ये गेले होते. इथे गोवा आणि मंगलोर या भागातील कॅथलिक पदार्थ मिळतात असं कळलं होतं.
आम्ही तिथे नीर डोशासोबत ग्रीन चिकन ग्रेव्ही आणि पोर्क बाफत ('बापट' नव्हे. बाकी, याचा उच्चार कस करायचा?) खाऊन पाहिले. जोडीला बीफ कटलेट होतेच. सगळेच पदार्थ आवडले. विशेषतः पोर्क खाताना मजा वाटली, कारण ते नुसते खाल्ल्यावर, डोशासोबत खाल्ल्यावर आणि भातात कालवून खाल्ल्यावर चव वेगवेगळी लागत होती.
सॉसेज पुलाव ही इथली खासियत आहे. आता पुढच्या वेळी गेल्यावर सॉसेज पुलाव आणि बीफ टंग रोस्ट खायचा इरादा आहे. नंतर तिथले कॅरॅमल कस्टर्डही चाखून पाहिले, पण ते फारसे आवडले नाही.
इथे एकूणातच नेहमीपेक्षा वेगळे पदार्थ मिळतात. वरच्या दुव्यावरील मेन्यू जरूर पहा.
इथल्या पदार्थांइतकेच मला तिथले वातावरणही आवडले. तशी ती जागा छोटीशीच आहे. जेमतेम ४ टेबलं मावण्याइतपत. बाहेर लाकडी डेकवर आणखी दोन-तीन टेबलं. बसण्यासाठी खुर्च्यांऐवजी बिनपाठीचे लाकडी बाक (वर दिलेल्या दुव्यात तुम्हाला छायाचित्रे पहायला मिळतीलच). ही व्यवस्था फारच आवडली. खोलीचा आणि ताटांचा वगैरे रंगही आकर्षक. स्वच्छ. तिथे लावलेली गाणी सोडता बाकी शांत. शिवाय फारसे खर्चिकही नाही.
फक्त एकच सल्ला: तिथे जायचे असेल, तर दिवस आणि वेळ नीट बघून जा. ते दिवसातला फारच कमी वेळ उघडे असते. शिवाय ते सोमवारी बंद असते. आणि सॉसेज पुलावसारखे काही खास पदार्थ खायचे असतील, तर दुपारी लवकर गेलेलं बरं. आम्ही साधारण दोन वाजता पोहोचलो होतो आणि त्यापूर्वीच पुलाव संपून गेला होता.
राधिका
बापट-साने
वा, उत्तम सुचवणी! पुढल्या खेपेत नक्कीच चाखून पाहीन. थेट मुंबईत अपूर्व किंवा महेश लंच होमला जाण्याऐवजी ही सोय बरी आहे.
बाकी बाफत आणि सान्ने (इडलीचा मंगळुरी अवतार) हे दक्षिण कोकणस्थ कॉम्बो अतिशय रुचकर
च्यायला. तो नीर डोसा लै
च्यायला. तो नीर डोसा लै मस्ताड वाटोन राहिला आहे. आता आप्पम, आंबोळी यांबरोबरच यासाठीही झुरणे आले. [स्पष्टीकरणः मिळत नाही म्हणून नव्हे तर लौकरात लौकर जाऊ म्हणून झुरणे] बाकी लंगडी घालणारी कोंबडी असो नैतर विष्णूचा पहिला/तिसरा अवतार असो, हे काँबो जबराटच दिसतंय सालं!! मुंबापुरीत येईन तेव्हा या ठिकाणाचा विचार आवर्जून करणेत येईल, बहुत धन्यवाद राधिका
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
उन्हाळा!
विकांताला घरी एका परिचिताचे केळवण होते. बर्याच दिवसांनी सुग्रास पंचपक्वान्नांचे जेवण जेवलो! (पक्वान्ने: खीर, पुरण, गुलाबजाम, उकडीचे मोदक (हे सगळे घरी बनवलेले) आणि हैद्राबादचे पेपर स्वीट पाचवे)
शिवाय पाडव्यापासून सिझनचे आंबे येऊ लागले होते. भाव जास्त असल्याने अर्धा एक डझन आणले जात होते. काल रत्नाग्रीहून पहिली पेटी आली
शिवाय पन्हे, आंब्याची डाळ, कोकम/वाळा/आवळा इ. सरबते वगैरेचा मारा अव्याहत चालु आहेच
माठात घालायला विकांताला वाळा मिळवल्याने ते नवे सुख अॅड झाले आहे
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
जस्ट टेस्टी
ससा कुठे खायला मिळेल ते शोधताना मला जस्ट टेस्टीचा शोध लागला. तिथे ख्रिसमस, न्यु यिअर आणि ईस्टर या तीन सणांच्या काळात सशाचे पदार्थ मिळतात असं कळलं होतं. त्यामुळे २०१२चा ख्रिसमस आणि ३१ डिसेंबर यांच्या मध्ये कधीतरी आम्ही मित्रमंडळी तिथे गेलो. झोमॅटोवर याचा पत्ता नीट दिलेला नसल्याने आणि ही जागा लोकांना फारशी माहीत नसल्याने तिथे जायला बरीच तंगडतोड आणि शोधाशोध करावी लागली. पण तिथलं चविष्ट जेवण जेवल्यावर मात्र त्या सर्व श्रमांचं आणि त्रासाचं काही वाटेनासं झालं.
तिथे मुख्यत्वे केरळी पदार्थ मिळतात. वर्षभर, तिथे चिकन, बीफ हे मिळतंच, शिवाय ’करिमीन’ हा केरळी मासाही मिळतो. ’चिकन मायेकेप्यार्ती’ आणि ’बीफ कोटलम’ हे दोन केरळी वाटणारे पदार्थ त्यांच्या मेनुकार्डवर दिसले. ख्रिसमससाठी खास म्हणून त्यांच्याकडे तीन पदार्थ होते-
रॅबिट (फ्राय/रोस्टेड)
डक (फ्राय/रोस्टेड)
बटेर (quail) फ्राय
आम्ही रोस्टेड रॅबिट, रोस्टेड डक, सुरमई आणि बटेर फ्राय असे चार पदार्थ अप्पमसोबत खाल्ले. सर्व पदार्थ केरळी पद्धतीने केले होते. चव उत्कृष्ट होती.
हे ससे आणि बटेर खास केरळहून मागवले जातात असं तिथल्या मालकाने सांगितलं. त्यांपैकी ससा ब्रॉयलर जातीचा नसून, कोणत्यातरी परदेशी जातीचा होता. या दोन्ही गोष्टी मारून, शिजवून विकणे कितपत कायदेशीर आहे याचा मात्र अंदाज तेव्हा येत नव्हता, पण कायदेशीर असल्याचे मागाहून कळले. (यानिमित्ताने पडलेला प्रश्नः एखाद्या विशिष्ट प्राण्याचे/पक्ष्याचे मांस खाणे कायदेशीर आहे की नाही हे कसे जाणून घ्यायचे? तो प्राणि/पक्षी संरक्षित आहे का, त्याचे मांस कच्चे अथवा शिजवून विकणे यासाठी खास परवानगी लागते का अशा वेगवेगळ्या गोष्टी येथे महत्त्वाच्या असू शकतात. गुगलवर शोधायचा प्रयत्न केला परंतु खात्रीशीर माहिती सापडली नाही. कुणाला माहीत असल्यास कृपया सांगावे.)
प्रमाणाच्या अंदाजासाठी सांगायचं झालं तर, चौघांत मिळून हे एवढे पदार्थ नीट खपले. यांतले रोस्टेड रॅबिट, रोस्टेड डक हे पदार्थ भरपूर प्रमाणात होते. बटेर तळहातावर मावेल एवढा छोटा होता. किंमतीच्या दृष्टीने बघायचे झाल्यास, माणशी २००/२१० एवढे बिल झाले. त्यामुळे त्या दृष्टीनेही ही जागा आम्हाला चांगली वाटली. तसे ते रेस्तरॉं फारच लहान आहे. त्यात फक्त तीन टेबलं आहेत. स्टीलची भांडी आणि स्वस्त प्लास्टिकची ताटं असा साधाच जामानिमा होता. पण पुरेशा प्रमाणात स्वच्छ होतं. तिथली कॉफीसुद्धा छान होती (फिल्टर कॉफी नसली तरी). एकुणात, एक छान अनुभव. जमल्यास दरवर्षी तिथे जाण्याचा माझा विचार आहे.
तुम्हाला तिथे जायचे असल्यास, तिथली माहिती-
पत्ता- वरील दुव्यावरील पत्त्यात खुणेची जागा सांगितलेली नाही, ती थॉम्सन गॅस सर्व्हिस अशी आहे. याच्या समोर हे रेस्तरॉं आहे.
संपर्क क्र.-०२२ २८३५१३१३ (खास ससे खाण्यासाठी जायचे झाल्यास, जाण्यापूर्वी ते उपलब्ध आहेत का हे फोन करून विचारावे असे तिथल्या माणसाने सांगितले आहे)
राधिका
मदत हवी आहे
१. पुण्यात दाक्षिणात्य पद्धतीचा मत्स्याहार करायचा असला, तर चांगलं ठिकाण कोणतं? शिवाजीनगरचं बांबू हाऊस, मालधक्क्याजवळचं कोकोनट ग्रोव्ह, नळ स्टाॅपजवळचं (केरळ महोत्सवी) कलिंग माहीत आहेत. महेश लंच होम, निसर्ग, लालन सारंगचं मासेमारी यांच्याकडे एखादी घश्शी वगैरे मिळते तीदेखील चाखली आहे. त्याहून वेगळं आणि शक्यतो मूळ चवीशी अधिक प्रामाणिक असलेलं हवं आहे. खोबरेल तेलातला स्वयंपाक असला तरीही चालेल. पूर्वी रास्ता पेठेत (अपोलोसमोर एका गल्लीत) एक होतं. (नाव बहुधा अंजली) त्यांची चव खास होती, पण ते बंद पडलं.
२. पुण्यात विविध प्रकारची (पौर्वात्य/पाश्चात्य/भूमध्यसागरी/मध्यपूर्वेकडची) सॅलड्स चांगली मिळतील, अशी ठिकाणं हवी आहेत.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
अभक्ष्याचं माहीत नाही पण
अभक्ष्याचं माहीत नाही पण बरीचशी (पाश्चात्य/युरोपिअन) सॅलड्स मॅरिअटच्या(सेनापती बापट रोडवरचे, आत्ता जे.ड्ब्लूमधे विलिन झाले आहे ते) स्पाईस-किचन मधे मिळतात असे ऐकले आहे, थोडफार पाहिलं आहे, त्याआधी सॅलड्स खाणारी मंडळी दोराबजीला जाऊन पण खात असत, त्याचा प्रत्यक्ष अनुभव नाही.
रेडीमेड सॅलाड
रेडीमेड सॅलाड्स माहीत नाही पण ग्रीन टोकरीबद्दल वाचनात आले होते. अनुभव नाही. घरपोच सेवा उपलब्ध आहे म्हणे.
त्यांच्या संस्थळावर सिलेक्शन बरेच आहे, काही घटक जसे खुस्खुस, मासा/चिकन, तुमचे आवडते व्हिनेगर, पेस्तो आणून वगैरे उरलेले पदार्थ ग्रीन टिकरीतले घेउन सॅलाड घरी बनवू शकता जर पुणे तिथे सॅलाड उणे निघालेच तर
फिश करी राईस
नारायण पेठेतलं (सुधीर भटांचं) 'फिश करी राईस' कसं आहे, काही कल्पना?
पेडावणासारखे अस्सल कोकणी शब्द आणि चिकन थालिपीठ/इडली फिश करी हे कॉम्बो वाचून त्याबद्दलची उत्सुकता वाढीस लागली आहे.
चांगलं
फिश करी राईस चांगलं आहे. फार्फार ग्रेट नसलं तरी कमी पदार्थ पण उत्तम चव मेंटेन ठेवलेली आहे.
शिवाय थाळी व्यवस्थित - भरगच्च नसली तरी भरपेट - असते.
शिवाय हल्लीच्या "लै भारी अॅम्बियन्स"च्या (म्हंजे काय सापेक्ष आहे तरी) जमान्यात काहिशी उडपी इष्टाईल रचना खटकते. शिवाय पूर्वी मासळीचा वास पाण्याच्या पेल्यांना येत असे. गेल्या दोनेक भेटिंमध्ये ही तृटि जाणवली नाही.
अब चौकात उंडारून झाल्यावर मत्साहाराची पर्वणी असल्याने अनेकदा जाणे होते.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
शेफ मिलिंद सोवनींचे 'एप्रिल
शेफ मिलिंद सोवनींचे 'एप्रिल रेन' औंधमध्ये सुरु झाले आहे.
अद्याप स्वानुभव नाही पण सोवनींनी अनेक वर्षे सिंगापुरात काढल्याने पौर्वात्य मत्स्याहार व सॅलड्स असतील असे वाटते.
कोणी जाऊन आले असल्यास माहिती द्यावी.
कैराली आणि 'हार्डरॉक कॅफे'
पुण्यात खडकीतल्या अंबेडकर चौकात 'कैराली' नावाची केरळी खानावळ आहे.तिथे केरळा परोट्टा आणि केरळी चवीच्या भाज्या यात स्वस्तात मस्त जेवण होतं. पुणे विद्यापीठात रहात असाल आणि तिथल्या कॅंटीन्सना वैतागलेले असाल तर ही जागा उत्तम आहे.
कोरेगाव पार्क मधली 'हार्डरॉक कॅफे' ही महागडी पण चांगली जागा आहे. भारतीय जेवणाला कंटाळलेले परदेशी पाहुणे असतील तर त्यांना न्यायला उत्तम.
भारी!!! जातोच तिथे आता.
भारी!!! जातोच तिथे आता. बायदवे तिथे अप्पम किंवा रसम मिळतं का हो?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
चायला
अप्पम अन् रसमचं इतकं प्रेम आहे तर सौथकडे का नाही येऊन राहत... मी बेंगलोर मध्ये इतकं रस्सम अप्पम करत नाही तितकं पुण्यात चाललंय असे दिसतंय
आदतसे मजबूर बघा पण गड्या
आदतसे मजबूर बघा पण गड्या आपला गाव बरा हेही तितकेच खरे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अप्पम नाही मिळत बहुतेक. पण
अप्पम नाही मिळत बहुतेक. पण थाळी मिळते त्यात रसम असू शकेल. मी थाळी घेतलेली नाही.
धन्यवाद. ट्राय करेन एकदा.
धन्यवाद. ट्राय करेन एकदा.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
एबीसी फार्म्स पुणे येथील
एबीसी फार्म्स पुणे येथील स्विस चीज गार्डन या हाटेलीत जाऊन स्विस चीज फॉन्ड्यू खाणं ही एक अॅडिक्टिव्ह कल्पना आहे. अत्यंत सुंदर मिळतो. (ज्यांना हा प्रकार आवडतच नसेल त्यांच्यासाठी काही म्हणू शकत नाही). यातली गंमतीची गोष्ट अशी, की नुकतेच स्वित्झर्लंडला जाणे झाले असता तिथल्या फॉन्ड्यू स्पेषल हॉटेलातल्या फॉन्ड्यूची टेस्ट घेतली तेव्हा ती पुण्यातल्या स्विचिगा-एबीसी फार्म्सच्या चवीपेक्षा अनेकपट डावी वाटली.
अर्थातच चव डेव्हलप होण्याचा भाग आहेच. पण स्वित्झर्लंडमधला फॉन्ड्यू बेचवच होता. एबीसी फार्म्समधले हे ठिकाण अद्याप केलं नसेल तर जरुर ट्राय करा.
सर्जापूर रोड
सर्जापूर रोडच्या सुरुवातीला कुसुम म्हणून एक छोटेसे रेस्टोरंट आहे. तिथे मंगळूर अन् केरला स्टाईल पदार्थ झकास मिळतात. तिथल्या खोबरं अन् कढीपत्ता भरपूर वापरलेल्या ड्राय चिकनचा मी लै पंखा आहे. या वेळेस मेंगलोर पद्धतीची कोरी रोटी खाल्ली.
पातळ रश्शात हळद आणि कढीपत्त्याची जाणीव होईल इतपत प्रमाणात अस्तित्व होतं. रोटी म्हणजे तांदळाचा पापड सदृश्य पदार्थ दिलेला. त्याचे लहान तुकडे करून त्यावर ग्रेव्ही आणि एकजीव करायचं अन् हाणायचं !!! आधी कोरडी रोटी आणि पातळ रस्सा फुल क्रंची लागत होतं. पण सगळं एकत्र आल्यावर काय टेस्ट आली सांगू महाराजा!!!!!!
बंगळूरात जस्ट इट.इन लिहिलेले जे रेस्टो दिसतात त्यातले बरेच चांगले आहेत अन् स्वस्त पण आहेत. फार जास्त नाही, पण दोन तीन ठिकाणचा चांगला अनुभव आहे.
मजा माडि लेको!!
मजा माडि लेको!!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अखेर पारा उंचावला....
सहा महिन्यांच्या प्रदीर्घ हिवाळ्यानंतर आज अखेरीस पारा उंचावला आणि बदलत्या हवामानाबरोबर जिभेचे चोचले कसे आपोआप बदलतात हे जाणवून मोठी मौज वाटली. बार्बेक्यू चालू करून त्यावर बदकाची सॉसेजेस* आणि कणसे वगैरे भाजेपर्यंत थोडे मेयोनेज बनविले आणि ताज्या पावावर चोपडले. ताज्या भाज्या चिरून त्यावर ऑलिव्ह तेल आणि थोडे चांगले बाल्सामिक व्हिनेगर शिंपडून साधेसे सॅलेड बनविले. कन्यारत्नाला स्मूदी हवी होती म्हणून तीही बनवून झाली...चारपाच स्ट्रॉबेरीज, थोड्या फ्रीजरमधल्या रासबेरीज, आंबा, दोनतीन चमचे दही आणि गोडीला 'आगावे' सिरप...मिक्सरला फिरवले, झाले. झटपट, सोपे आणि तरी चविष्ट जेवण!
* सी.एस.ए. मेंबरशीप ज्या शेतकर्याकडून घेतली आहे तो बदकेही ठेवतो त्यामुळे आजकाल बदकांचा आणि बदकाच्या अंड्यांचा स्वयंपाकात खूप वापर होतो. अव्हनमध्ये सावकाश शिजवलेल्या बदकाच्या तंगड्या चविष्ट लागतातच आणि पाश्चात्य पद्धतीने मेडीयम रेयर शिजवलेले डक ब्रेस्टही वारूणीच्या सॉसबरोबर बनवते पण भारतीय पद्धतीने बदक फारसे शिजवलेले नाही. कोणाकडे काही खास भारतीय पाककृती असल्यास जरूर सांगा.
सॉसेज् बद्दल प्रश्न
तयार सॉसेज् बार्बेक्यू करण्याआधी पाण्यात उकडवून / वाफवून घेता की पाकिटातून काढून तेल्/लोणी लावून सरळ ग्रिल् वर ?
सरळ ग्रीलवरच.
अमुक, मला सॉसेजेस सरळ ग्रीलवर भाजलेलेच आवडतात. पोर्क सॉसेजेस किंवा डक सॉसेजेसमधे इतकी चरबी असते ़की वेगळे तेल वगैरेही घालावे लागत नाही. ओव्हनमध्ये ग्रील केले तरी चांगले होतात.
ब्रुन मस्का बन ओम्लेट गूड लक
ब्रुन मस्का बन ओम्लेट गूड लक मध्ये
http://sphotos-f.ak.fbcdn.net/hphotos-ak-ash4/302067_555567557799822_214...
दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम
ओ हा बन मस्का वाटतो.
ओ हा बन मस्का वाटतो. ब्रूनमस्का नाही.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
इन्संलाता दि पोल्पो
'इन्संलाता दि पोल्पो' म्हणजे 'ऑक्टोपसचं सॅलड' एड्रिअॅटिक समुद्रातल्या त्रेमिती द्वीपांवर 'बेल्ले मारे' या जागी खाल्लं. खूप आवडलं. त्यावर घातलेलं ऑलिव तेल इटलीतल्या 'पुल्यीआ' प्रांतातलं होतं-चव मस्त होती.मला ऑलिव तेलाच्या चवीची काही पारख करता येत नाही, पण या सॅलड मध्ये असलेलं तेल कहीतरी खास होतं एवढं जाणवलच.
इन्संलाता नव्हे
इन्संलाता नव्हे... इंसालाता.
(अवान्तर : 'आद्रिआतिको'किनारी असलेला 'कास्तेल्लो दि मिरामारे' पाहिलात का ?)
इन्संलाता नव्हे...
इन्संलाता नव्हे... इंसालाता.---जरूर. ऐकू आले तसे लिहिले होते (अनु:स्वार "कसं?" मध्ये आहे त्याप्रमाणे होता, अं उच्चारासाठी नाही. असो.).
(अवान्तर : 'आद्रिआतिको'किनारी असलेला 'कास्तेल्लो दि मिरामारे' पाहिलात का ?)
नाही. बराच लांब आहे हा किनारा. प्रवास रावेन्ना ते तेर्मोली यामध्ये लागणार्या किनार्यात न थांबता केला. 'ग्रान सास्सो' आणि 'सान मारीनो' प्रवासात बघितल्याचं आठवतय.
तांखुल आणि मैतेई
This comment has been moved here.
राधिका