अलिकडे काय पाह्यलंत? - ४

दुसरा धागा बराच मोठा झाल्यामुळे तिसरा धागा सुरू करत आहे.
याआधीचे भाग: | |

मी काल "द हेल्प" (२००९) नावाचा चित्रपट पाहिला. १९६० च्या दशकाच्या सुरवातीच्या काळातील अमेरिकन समाजव्यवस्थेत कृष्णवर्णीयांचे शोषण ही नेहमीची गोष्ट होती. अशावेळी लेखिका बनू पाहणारी नायिका तिच्या दोन कृष्णवर्णीय हेल्पर्सच्या मदतीने "द हेल्प" या नावाने एक कॉलम चालवते ज्यात या कृष्णवर्णीयांना भेडसावणार्‍या प्रश्नावर लेखन असते. या निमित्ताने तिचे व तिच्या मेड्समध्ये तयार झालेले मनोज्ञ नाते, त्यावेळच्या परिस्थितीवर फार ड्वायलाग बाजी न करता मारलेले शेरे, कधी आनंदामुळे तर कधी घृणेमुळे मनात घर करून राहणारे लहान प्रसंग लक्षात राहण्यासारखे आहे. चित्रपटाचा वेग मात्र संथ आहे. ज्यांना संथ चित्रपट आवडत नाहीत त्यांचा विरस होईल.

या चित्रपटाला चार ऑस्कर नॉमिनेशन्स होती तर सपोर्टिंग अ‍ॅक्ट्रेस या कॅटेगरीमध्ये ऑक्टाव्हिया स्पेन्सर हिला ऑस्कर प्राप्त झाले.

तुम्ही अलीकडे काय पाह्यलंत?

field_vote: 
0
No votes yet

लॉरेन्स ऑफ अरेबिया हा पिच्चर पाहिला. मस्त आहे एकदम. अंमळ संथ पण पिक्चरायझेशन का काय म्हणतात ते लै भारी आहे. लॉरेन्स आणि प्रिन्स फैजल या व्यक्तिरेखा विशेष हिट्ट आहेत. शेरिफ "आली" सुद्धा भारीच. नेफूद वाळवंट क्रॉस करतानाचा सीन असो किंवा फैजलच्या छावणीवर हवाई हल्ला होतानाचा सीन असो, सर्वच अप्रतिम. ड्वायलाक अन बाकीच्या गोष्टीसुद्धा अप्रतिम. नादच खुळा. मजा आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

त्या वाळवंटाचा संक्षिप्त इतिहास वाचण्याच्या काही वर्ष आधीच 'लॉरेन्स ऑफ अरेबिया' पाहिला होता. मलाही आवडला होता.

---

'बर्फी' बघण्याचा एक प्रयत्न अर्धवट सोडून दिला. ऑटिस्टीक मुलीची आई बेवडी आणि बाप जुगारी एवढं वाईट दाखवलंच पाहिजे का? अजूनही आपल्याकडे लोकांच्या पाप-पुण्याच्या कल्पना भयंकर आहेत, त्यातून ऑटीझमबद्दल अजून आपल्याला नीट माहित नाही. त्यात असं काही दाखवण्याची गरज आहे का? 'स्पेशल' पात्रांची नावंही अशी 'स्पेशल'च पाहिजेत का? बर्फीचं नाव राजेश किंवा राजेंद्र असतं तर चाललं नसतं का? किंवा झिलमिलचं नाव मुमताज किंवा माला असं काहीतरी! नॉर्मल माणसांची नावं मात्र श्रुती, सुधांशु अशी काहीतरी.

त्यातून तो रणबीर कपूर आजोबाने केलेल्या चार्ली चॅपलिनच्या नकलेची नक्कल करतो तसला काही पाचकळपणा असण्याची आवश्यकता होती का? रणबीर प्रियांकाला पळवून स्वतःच्या घरी आणतो तेव्हा तिच्या लेंग्याची नाडी सोडून द्यायला लाजतो. "बाबा रे, स्वतः आधीच एवढा पाचकळपणा केल्यानंतर आता कशाला उगाच हजला जाण्याचा पवित्रा?" आणि हा पिच्चर ऑस्करसाठी पाठवला?

सिनेमॅटोग्राफी मात्र जेवढा पाहिला तेवढी आवडली. प्रियांकाने काम चांगलं केलं आहे; बहुदा ऑटीस्टिक मुलीचं विश्वही चांगल्या प्रकारे दाखवलं असावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हम्म आता बर्फी बघेन असे नै वाटत Smile धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

'बर्फी'तली उरलीसुरली गम्मत / नाविन्य सम्पवायचे असेल तर हे पाहा -
तुलना १
तुलना २
तुलना ३

इतकेच नव्हे तर 'बेनी अ‍ॅण्ड जून' चित्रपट, 'आमेली'ची रङ्गसङ्गती, सूत्रसङ्गीत, इ. गोष्टी 'इंस्पायर' होण्याकरिता आहेतच.

इतके सगळे ढापलेले असताना ऑस्करला पाठवणे म्हणजे अमोल पालेकर 'गोलमाल' मध्ये म्हणतो तसे, 'लोग पैरोंपे कुल्हाड मारते हैं, मैने तो कुल्हाडी पे ही पैर मार दिया' असे काहीसे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अलिकडचे भारतीय चित्रपट पाहताना "सिग्रेट पिणं धोकादायक आहे" किंवा "अमुक स्टंट्स हे व्यावसायिकांनी सुरक्षेची काळजी घेऊन केलेले आहेत. ते घरी किंवा असुरक्षित व्यवस्थेमधे करण्याचा प्रयत्न करू नये" किंवा "हा सिनेमा बनवताना कुठल्याही प्राण्याला इजा झालेली नाही" या धर्तीची डिस्क्लेमर्स पाहतो.

माझ्या मते तसं आणखी एक डिस्क्लेमर द्यायला हवं : "हा चित्रपट कुठल्याही प्रतिष्ठित महोत्सवाला किंवा जिथे म्हणून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरची चिकित्सा होऊ शकेल अशा ठिकाणी पाठवणें अभिप्रेत नाही."

"बर्फी"सारख्या चित्रपटांना त्याचा फार उपयोग होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

रणबीर कपूर आणि प्रियांका चोप्रा वगैरे मंडळी बर्फीला राष्ट्रीय पुरस्कारही न मिळाल्याने नाराज झाली होती असे वाचले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चला, म्हणजे आपली सिस्टम एवढीही टुकार नाही तर!

प्रियांका चोप्रा नाराज झाली हे एकवेळ (एकवेळच!) समजून घेता येण्यासारखं आहे. रणबीर कपूर कशाबद्दल? एक-आड-एक पिच्चरमधे करतो तसा माकडपणा करण्याची दखल सरकारी पातळीवर न घेण्याबद्दल? चित्रपटातला जेवढा भाग आवडला होता, त्यातलाही थोडा (म्हणजे पार्श्वसंगीत) ढापलेला आहे म्हटल्यावर काय ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

रणबीरच्या माकडचाळ्यांना बळी न पडलेली एक तरी भारतीय तरुणी सापडली ह्याचा भयंकर आनंद झालाय.
सुंदर पोरी ज्यादिवशी "दिल तो पागल हय" आणि "कुछ कुछ होता हय" ह्या भिकारपटांना भिकार म्हणावयास शिकतील त्यादिवसापासून देशाचे भवितव्य उज्ज्वल आहे असे समजावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आणंद वैग्रे असूदे, पण भिकारपटांना भिकार म्हण्णार्‍या सर्व पोरी कुरूप अस्तात की काय असे हे वाचून वाटावयास लागले आहे Wink कुठे गेला तुझा सेण्स ऑफ फेअरणेस मणोबा आँ?

बाकी काही सौंदर्याच्या ताजमहालांबद्दल बोलावे तितके कमीच आहे. आत बुद्धीचे थडगे असले तरी उभयपक्षी फरक पडत नै. कारण ताजमहालावरच तं त्यांचा ट्यार्पी अवलंबूण असतो.

(शिणिक) बॅटमॅण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बर्फी मला (खूप नाही पण बर्यापैकी) आवडला. सिनेमटोग्राफी आणि कथानक तीन काळात ज्याप्रमाणे पुढेमागे होत राहते ते आवडलं.
बहुदा माझ्या फार अपेक्षा नसाव्यात या चित्रपटाकडुन, त्यामुळे आवडला असेल.
रणबीर, प्रियंका, एलेना कोणीच आवडत नाही मला, पण चित्रपट बोअर अजीबात झाला नाही आणि डोक्यातदेखील गेला नाही.
बादवे मुलीँना आवडणार्या हिरोँबद्दल एवढी जेलसी का असते म्हणे मुलांना? फारच जळकट कमेँटा मारतात कोणा हिरोची तारीफ केली तर Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जेलसीच असते असं समजायचं कारण नाही. खरंच नसेल आवडत रणबीर त्यांना.

इतक्या तिरक्या कमेण्टला इतकं बोअरिंग सरळ उत्तर देण्याचं कारणः
मला ऐश्वर्या राय अज्याबात आवडत नाही. थंड, भावहीन, अ‍ॅन्ग्युलर नाचणारी, आरड्याओरड्याला अभिनय समजणारी ओव्हररेटेड नटी आहे ती. पण असं म्हणायची चोरी. च्यामारी, पोरींना ऐश्वर्याचा मत्सर वाटतो, असं म्हणतात. तिचा आणि कसला कर्माचा मत्सर, मला काही टेस्ट आहे की नाही, असं ओरडावंसं वाटतं. म्हणून इथे (नाईलाजानं) वरील बापय मान्सांची बाजू घेन्यात आलेली हाए.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

हम्म Biggrin
ऐश्वर्या मलादेखील नाही आवडत आणि रणबीर देखील नाही आवडत.
पण माझी कंमेँट 'फार' तिरकी नव्हती आणि 'फक्त' वरच्या बाप्यांना उद्देशुनदेखील नव्हती. मला खरंच कुतुहल आहे. कधीकधी विनाकारण फारच तुटुन पडतात त्या हिरोवर बाप्ये लोक्स.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रणबीर ला बघितलं की नीतू सिंह ची जरा जास्तच आठवण येते. तिचा चेहरा हनुवटी खेचून लांब केला गेला आहे, आणि त्यामुळे अचानक नाक लांब, आणि डोळे जरा जास्तच एकमेकाजवळ आले आहेत, असा काहीसा भास होतो. असे केल्यास तिच्या चेहर्‍यावर जो आश्चर्याचा भाव असेल, तोही त्याच्या भुवयांमध्ये सतत दिसतो. फारच विचित्र सगळं. पुढे वडिलांसारखा गोलसर होत जातो, आणि स्वेटर घालून पोट लपवायचा प्रयत्न करतो का हे बघायला हवे.
मला त्याचा "रॉकेट सिंहः सेल्समन ऑफ द यर" खूप आवडला होता मात्र.

(मेघनाच्या ऐश्वर्याबद्दलच्या कॉमेंट बद्दल +१. दीपिका पडुकोण ही अलिकडची ऐश्वर्याच वाटते, ऑल बोन स्ट्रक्चर बट नो एक्सप्रेशन)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धोन्योबाद!
मला 'रॉकेट सिंग' तर आवडला होताच, शिवाय 'वेक अप सिद'पण आवडला होता. नि 'रॉकस्टार'मधला रणबीरपण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

हा हा रणबीरच्या चेहर्याच समिक्षण आवडलं.
ऐश्वर्या, दिपीका साठी देखील सहमत. त्यातल्या त्यात ऐशपेक्षा दिपीका कितीतरी हॉट आणि स्मार्ट वाटते, अभिनय विसराच.
पण ठिकठाक दिसणारा, बर्यापैकी अभिनय करणारा, तीस किँवा कमी वय असलेला रणबीर शिवाय दुसरा कोणी 'हिरो' आहे का? इमरान खान ला अभिनय अजीबात येत नाही आणि रणवीर सिँग कुरुप आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिशीच्या पलिकडे तरी कोण आहे? इर्रर्रर्रफान खान तेवढा आहे. बाकी खान, कुमार, बच्चन-रोशन सगळे बाद.
दुष्काळी परिस्थिती आहे खरी.
Smile

मेघना, मला वेक अप सिड मधेही रणबीर चं अभिनय आवडलं होतं. पण चित्रपटभर त्याला (त्याच्या पात्राला) कॉन्वेंटच्या भाषेत सांगायचे झाले तर "वन टाइट स्लॅप" द्याविशी वाटत होती. च्यायला अंड उकडता येत नाही म्हणून दिवसभर उपाशी?? आणि ती काँकोणा ही कशी लगेच विरघळली ते ऐकून. (इथेच चुकते, इ. इ....)
जरा जास्तच गोग्गोड. पण अचानक सिड एका भाईच्या फंद्यात सापडलेला दाखवून इंटरवल नंतर सिनेमा तिरक्याच दिशेने नेला असता तर काय झाले असते याचा विचार करून थोडी करमणूक करून घेतली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL
भाईच्या फंदात पडून.... हाहाहा!
होय, गोग्गोड होता तो सिनेमा. मान्य.
आता अजून एक कबुली देतेचः मला त्यातली कोंकणा अ-ग-दी आवडत नाही. एक मिनिट, मला कोंकणा आवडते, रेंज, अभिनय, निवड वगैरे सगळं मान्य आहे. पण तिच्या सगळ्या भूमिकांमधून एकच एक प्रकारचे मॅनरिझम्स दिसतात असं हल्ली वाटतं. शिवाय वय वाढणारी, लग्नाळलेली, पण आधुनिक विचारांची वगैरे मुलगी आता बास्स्स्स की. वैताग झाला.
त्या सिनेमात मला खर्री आवडली होती ती आजूबाजूची पात्रं. शेजारीण - आपली अतिशा नाईक, सिदची ती ढब्बी मैत्रीण, सुप्रिया पाठक...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आता अजून एक कबुली देतेचः मला त्यातली कोंकणा अ-ग-दी आवडत नाही. एक मिनिट, मला कोंकणा आवडते, रेंज, अभिनय, निवड वगैरे सगळं मान्य आहे. पण तिच्या सगळ्या भूमिकांमधून एकच एक प्रकारचे मॅनरिझम्स दिसतात असं हल्ली वाटतं. शिवाय वय वाढणारी, लग्नाळलेली, पण आधुनिक विचारांची वगैरे मुलगी आता बास्स्स्स की. वैताग झाला.

अगदी, अगदी!! १००% सहमत. त्यातल्या त्यात ही भूमिका तिने "लक बाय चांस" मधे चांगली केली होती. त्या सिनेमाचा शेवटही मला खूप आवडला होता. पण आता या पर्सोनाचा कंटाळा आलाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>>त्यातल्या त्यात ही भूमिका तिने "लक बाय चांस" मधे चांगली केली होती. <<<<

(घसा खाकरत ) http://muktasunit.blogspot.com/2009/04/blog-post.html

असो. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

रोचना आणि मेघना दोघींना वरच्या संपूर्ण चर्चेबद्दल +१. 'रॉकेट सिंग' मलाही आवडला म्हणूनच वरच्या प्रतिसादात माकडपणा "एक आड एक" चित्रपटात करतो असं म्हणावं लागलं.

कोंकोणाच्या 'ओंकारा' आणि 'मिक्स्ड डबल्स' या दोन्ही चित्रपटांमधल्या भूमिका या स्टीरीओटाईपपेक्षा वेगळ्या आहेत. काही प्रमाणात 'मिर्च'सुद्धा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ROFL

पण तिच्या सगळ्या भूमिकांमधून एकच एक प्रकारचे मॅनरिझम्स दिसतात असं हल्ली वाटतं. शिवाय वय वाढणारी, लग्नाळलेली, पण आधुनिक विचारांची वगैरे मुलगी आता बास्स्स्स की. वैताग झाला

आता तिला ढीग नवयौवनेची, किंवा स्लिम ट्रीम किंवा स्वच्छंदी 'हॉट' मुलीची भुमिका करायची असेल.. कसं जमायचं? Wink

शिवाय आजुबाजूच्या पात्रांबद्दल सहमती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

इरफान हिरो नै ना पण.. अभिनेता आहे. खान, कुमार आता ५० चे होत आले. त्यांना रिप्लेस करायला नको का कुणी? तरुणांसाठी कतरीना, दिपीका, अनुष्का आहेत. तरुणीँसाठी नको का कोणी चॉकलेट लवर बॉय? सध्या तरी रणबीर ती गरज पुरी करतोय. आणि खान लोकांपेक्षा बरीच बरी व्हरायटी आहे त्याने निवडलेल्या चित्रपटात. परत वर्षातून एकच चित्रपट करतो बहुतेक.
मी कधी टिव्ही पहात नाही, पण कॉफी विथ करण मधे तो आणि इमरान आलेले, तो एपिसोड पाहील्यावर मला रणबीर खूप स्मार्ट/चालु वाटला. क्राउड, मिडीया, पब्लिक रिलेशन हँडल करता येतं त्याला नीट.
असो लै झालं रणबीर राज कपुर पुराण आता थांबते Smile
वेक अप सिद मधला कहानी मे ट्विस्ट ची आयडीआ भारीय Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'लॉरेन्स ऑफ अरेबिया'हा चित्रपट Col. T.E.Lawrwnce ह्याच्या 'Seven Pillars of Wisdom' ह्या पुस्तकावर आधारित आहे. पुस्तकामध्ये त्याने पहिल्या महायुद्धात मध्यपूर्वेतील वाळवंटात तुर्की फळीच्या मागे जाऊन अब्दुल अझीझ इब्न सौद आणि अन्य अरब प्रमुखांना तुर्की सत्तेविरुद्ध उठवले त्याचा आत्मवृत्तान्तवजा इतिहास आहे. ५०-६० वर्षांपूर्वीपर्यंत ह्या पुस्तकामागे ते एक classic असल्याचे आणि स्वतः T.E.Lawrwnce ह्याच्या मागे तो एक romantic personality असल्याचे वलय होते ते मात्र सध्या कमी झाल्यासारखे वाटते. (सध्याचे हीरो इंग्लंडातून नाही तर अमेरिकेतून येतात हे त्याचे कारण असावे.)

पुस्तक बरेच मोठे पण वाचनीय आहे. पुस्तकाला Seven Pillars of Wisdom हे whimsical नाव का दिले आहे ह्याचा मात्र पत्ता लागत नाही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

५०-६० वर्षांपूर्वीपर्यंत ह्या पुस्तकामागे ते एक classic असल्याचे आणि स्वतः T.E.Lawrwnce ह्याच्या मागे तो एक romantic personality असल्याचे वलय होते ते मात्र सध्या कमी झाल्यासारखे वाटते. (सध्याचे हीरो इंग्लंडातून नाही तर अमेरिकेतून येतात हे त्याचे कारण असावे.)

सध्याचे हीरो अमेरिकेतून येतात आणि कलोनिअल काळ हा ग्लोरियस वगैरे मानत नाहीत सध्या म्हणूनही असेल.

बाकी ही पुस्तकाची माहिती मला नवीन आहे- धन्यवाद.

अवांतरः या लॉरेन्ससारखाच खार्टुम येथे गॉर्डन नामक एक अधिकारी होता त्याच्या आयुष्यावर पण एक पिच्चर आहे तो पाहिला मध्ये. पण तो लै बोअर आहे. पूर्ण पिच्चरमध्ये गॉर्डन हा इतका मोठा का, त्याला इतका मोठा सन्मान मिळण्यालायक त्याने नेमके काय केलेय याचा उलगडा होत नै. त्यामुळे बोअर झाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ह्याच्याविषयी बरेच वर्षांपूर्वी अ‍ॅलन मूरहेडच्या The Blue Nile ह्या पुस्तकात वाचले होते. दक्षिण ध्रुवाच्या स्कॉटसारखा खार्टूम वेढ्यातील आपल्या मृत्यूमुळे तो विक्टोरियन ब्रिटिशांचा हीरो झाला आणि लोक त्याला Gordon of Khartoum असे ओळखू लागले कारण ब्रिटिश साम्राज्याच्या त्या माध्याह्न काळात आपल्या ज्या गुणांमुळे ब्रिटिश राष्ट्र इतके वर आले असे त्यांना वाटत होते ते सर्व गुण गॉर्डनमध्ये त्यांना दिसले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद Smile

बाकी हा अ‍ॅलन मूरहेड म्हंजे परमपूज्य रिचर्ड फ्रान्सिस बर्टन साहेबांचा चरित्रकार होता रैट्ट? बाळ सामंतांच्या शापित यक्षमध्ये याचा उल्लेख अंधुक आठवतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तोच तो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Seven Pillars of Wisdom मधील वर्णिलेली एक घटना म्हणजे लॉरेन्स आणि त्याचे अरब सहकारी ऑटोमनांनी बांधलेल्या हेजाझ-मदीना रेल्वेवरील एक गाडी उडवून देतात. चित्रपटातहि ही घटना दाखविली आहे.

माझ्या वाचनानुसार ह्या गाडीचे डबे आणि इंजिन अजून १०० वर्षांनंतर तेथेच वाळवंटात पडून आहेत. आत्ताच जालावर शोधल्याप्रमाणे माझी आठवण खरी आहे आणि गाडीचे डबे आणि इंजिन आजहि तेथेच पडलेले आहेत. त्यांची छायाचित्रे:

वरील चित्रे येथून घेतली आहेत. अधिक माहिती तेथेच पहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजूनच रोचक!! बहुत धन्यवाद Smile

(एल-ऑरेन्सचा फॅन) बॅटमॅन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मागील धाग्यात उल्लेख केल्याप्रमाणे काटकोन त्रिकोण हे दोन अंकी नाटक कालच पाहिलं.
खूपच उत्तम वगैरे नसलं तरी खूपच थोर वगैरेही वाटलं नाही. "व्यवस्थित " वाटलं.
मोहन आगाशे, संदेश कुलकर्णी आण केतकी थत्ते प्र्मुख भूमिकेत.
खरेतर फुटपट्टी कुठली लावता, त्यावर तुम्हाला आवडणं अवलंबून आहे. थोड्याफार अशाच विषयावर जाणार्‍या "बागबान" ह्या बटबटित चित्रपटाशीच तुलना करायची, तर त्याहून लाखपट चांगलं आहे. जाउबाई जोरात, यदाकदाचित हे फार पूर्वी पाहिले होते, "ते आवडले नव्ह्ते" इतकच डोक्यात आहे. त्यातुलनेत हे खूपच छान. प्रशांत दामलेंच्या हल्लीच्या टेम्प्लेटपणापेक्षाही, तोच तोच पणा जाणावर्‍अय नाटकांपेक्षाही सरस. पण इतर काही चांगल्या संहिता, सादरीकरणं ह्यांच्याशी तुलना केली तर तितक्या उंचीचं हे नाही (माकडाच्या हाती शँपेन, फायनल ड्राफ्ट, तुझे आहे तुजपाशी,ध्यानीमनी वगैरे).तरीही बरचसं चांगलं आहे.
हल्ली विनोदी नाटकांची मागच्या दशकभरात व्यवसायिकमध्ये जी लाट आली आहे(सही रे सही, यदाकदाचित च्या आसपासपासून) त्या तुलनेत नि गर्दीत अप्रतिम आणि असलच तर थोडसं चर्चा करावं असं वगैरे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

नाटक पाहिलेय हे आधी. चांगले आहेच, पण ट्विस्टचा अतिरेक केलाय ते जरा डॉक्शात गेलं. बाकी ड्वायलॉक वैग्रे उत्तमच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नमकीन आणि सत्यकाम हे अलिकडे पाहिले. संजीव कुमारचे काही पहावे वाटले म्हणून आधी नमकीन आठवला-तो पाहिला. निदान तिसर्‍यांदा असेल. नेहमीप्रमाणेच खूप आवडला. गुलजारच्या खास शैलीतला माझा हा एक आवडता चित्रपट.
नंतर जालावर शोध घेता समोर 'सत्यकाम' हा कधीही नाव न ऐकलेला चित्रपट आला. शर्मिला टागोर, 'तरूण' धर्मेंद्र, संजीवकुमार हे कलाकार आहेत म्हणून बघायला घेतला.ह्रिषिकेश मुखर्जींचा आहे चित्रपट. चित्रपट एकूण सुखांतात संपतो (अडमुठ्या 'बुजुर्गांचे' मतपरिवर्तन, नायिकेला आधार वगैरे)...पण 'सत्यप्रिय' नायकाची शोकांतिकाच होते. एकदा बघायला काहीच हरकत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'नमकीन' हा माझाही आवडता चित्रपट. त्यातील सञ्जीवकुमारचा 'तीसरी-पहली-दुसरी'चा गोन्धळ, विजेचे बटन, पाल, इ. चे प्रसङ्ग अनेकदा आवर्जून पाहिले आहेत. बारीक बारीक तपशिलान्त गुलज़ार आणि सञ्जीवकुमार दोघेही भाव खाऊन जातात. बोलता बोलता वाक्य अर्धवटच सोडून देण्याची लालाची लकब खासच. किरण वैराळेसारखी गुणी अभिनेत्री आता काय करते कुणास ठाऊक.

मात्र आधीचा छान सन्थ माहोल बनवल्यावर आपण त्यात रुळत असताना चित्रपटाचा शेवट मात्र झटकन होतो, तेवढेच एक थोडे उणे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किरण वैराळे तेव्हाच्या चित्रपटातून सह अभिनेत्री म्हणून दिसली आहे.'भूमिका' मधली स्मिता पाटिलची मुलगी, 'अर्थ' मधली शबानाची हॉस्टेल मधली मैत्रीण या इतर भूमिका लगेच आठवल्या. मुख्य भूमिका असलेले चित्रपट असतील तर पहाण्यात नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गुलझारच्या बाकी चित्रपटासारखा ’नमकीन’ पण छान आहे. नमकीन मधील "राह पे रहते है" हे गाणे प्रचंड आवडते. एकदा पुणे-सोलापुर हायवेवर ट्रक ड्राईव्ह कराताना हे गाणे ऎकण्याची इच्छा आहे. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मूळ रचना स्टुडिओत बनताना आर्. डी. च्या आवाजात इथे ऐकायला मिळेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्तच!

धन्यवाद Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो...खासच आहे हे गाणं.
"एकदा पुणे-सोलापुर हायवेवर ट्रक ड्राईव्ह कराताना हे गाणे ऎकण्याची इच्छा आहे. " जरूर पूर्ण होवो तुमची इच्छा :).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'फ्लॅशबॅक ऑफ ए फूल' हा डॅनियल क्रेग चा वेगळा चित्रपट बघितला. उतरणीला करिअर लागलेल्या एका नटाच्या पूर्वायुष्याची गोष्ट आहे. डॅनियल सोडून सगळ्या लोकांची कामे आवडली. त्याच्या चेहेर्‍यावर, शेवटच्या प्रसंगातही काही भाव दिसले नाहीत. संपूर्ण सिनेमात 'बाँडगिरीला' कुठेही वाव नाही. साधेपणा आणि उत्कृष्ट छायाचित्रणासाठी आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डिजँगो (जँगो हा खरा उच्चार, पण शुद्ध मराठी उच्चार असाच आहे, इलाज नाही Wink ) अनचेन्ड हा टिपिकल वेस्टर्न पिच्चर पाहिला. चित्रण, डायलॉग सगळे मस्त. म्यूझिकसुद्धा लैच भारी. क्रिस्टॉफ वॉल्ट्झ, जेमी फॉक्स,लिओनार्डो डिकॅप्रिओ या सर्वांनी आपापले रोल्स मस्त वठवले आहेत. क्वेंटिन टॅरेंटिनोचा पिच्चर, मग तो भारी असलाच पाहिजे असे एक सिनेफ्रीक मित्र म्हणत असल्याने गेलो बघायला. अपेक्षाभंग आजिबातच झाला नाही. त्यात परत वेस्टर्नपट म्हंजे आपल्या खास जिव्हाळ्याचा विषय. मग काय मज्जाच मज्जा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कॉलेजात असताना टॅरेंटिनोचे चित्रपट आवडत होते. बहुदा सगळेच चित्रपट मी पाहिले आहेत. अगदी हमरीतुमरीला येऊन टॅरेंटिनोच्या चित्रपटांवर चर्चा केल्या आहेत. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये त्याच्या चित्रपटातील 'भारीपणा' हा बेगडी वाटू लागला आहे. त्याच्या इतर चित्रपटांप्रमाणेच याही चित्रपटातील सर्वांचा अभिनय छानच आहे. मात्र टॅरेंटिनोची शैली आता अतिपरिचित आणि त्यामुळे फारच प्रेडिक्टेबल वाटते. (निदान मला तरी). एखादी स्टायलिश पद्धतीने, सुंदर सजवलेली मात्र आत्मा नसलेली बाहुली पाहिल्यासारखे वाटते. मग असे असताना असे इथे कोणाला जाणवले आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हम्म..मी त्याचे लै पिच्चर न पाहिल्यामुळे आणि वेस्टर्न पट आवडण्यामुळे तुम्ही म्हणताहात तो अनुभव मला आला नाही असे वाटतेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वेस्टर्नपट मलाही आवडतातच. मात्र टॅरेंटिनोच्या सर्वच चित्रपटांमध्ये अतिरेकी शिवीगाळ, हिंसाचार आणि ड्रग्जचे उदात्तीकरण वगैरे पाहायला आता नको वाटते. बहुदा त्याचे इतर सर्व चित्रपट पाहिले की मग उबग येऊ शकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्रिस्टॉफ वॉल्ट्झची संवादफेक विशेष आहे, संवाद फारसे भारी नसताना क्रिस्टॉफची शैली खिळवून ठेवते. तसंच glorious bastards मधले त्याचे संवादही खास.

बाकी चित्रपट मसालापट वाटला, शेवट फारच मसालेदार होता. अर्थात क्विंटनचे चित्रपट साधारण तसेच असतात, पण हा विशेष रुचला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वॉल्ट्झचे काम झकासच आहे. इनग्लोरियस बास्टर्ड्समधील कामही मस्त होते. हा चित्रपट पाहिल्यानंतरच मला टॅरेंटिनो ऑवररेटेड वाटू लागला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'माँक' या अमेरिकन मालिकेच्या आठही सीझन्सचे सगळे भाग (शंभरहून अधिक) टॉरंटवरुन डाऊनलोड करुन पाहिले. तो एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे, म्हणून जागा राखून ठेवतो. वेळ बराच गेला, पण चार घटका सुखाच्या गेल्या इतकेच म्हणतो. बाकी ते कला वगैरे आपल्याला काही कळत नाही. याआधी 'कोलंबो' ने असाच अनुभव दिला होता. जमेल तेंव्हा 'माँक'वर स्वतंत्रपणे लिहीन म्हणतो. दरम्यान इतर कुणी लिहिले तर स्वागतच. इतर कुणी कुठे आधीच लिहिलेले असेल तर कृपया ते निदर्शनास आणून द्यावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

माँक मलाही फार आवडलेली मालिका आहे. मी सगळे भाग पाहिलेले नाहीत पण मिस्टर माँक आणि नतालीच्या जोडीचा फ्यान आहे.
माँकचे काम करणार्‍या टोनी शलुब या अभिनेत्याने पत्नीच्या खुनाचे दु:ख असलेला, OCD असलेला डिटेक्टीव्ह इतका चांगला केलाय की तो तसाच आहे असे वाटते.
यावर नक्की लिहाच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नताली पुढे येते काय? मी बहुदा पहिले १० भाग पाहिले आहेत तोपर्यंत तरी शॅरोनाच त्याची जोडीदार आहे. छान दिसते पण जास्त वेळ तिचे बोलणे ऐकले की डोके दुखायला लागते. माँकचे काम करणारा टोनी शलुब फारच छान काम करतो. OCD चे क्षण अक्षरशः जगल्यासारखा वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माँकच्या पहिल्या काही भागांमध्ये त्याची असिस्टंट / नर्स शेरोना आहे. नंतर हे काम करणार्‍या नटीने पैशांवरुन वाद घातला आणि त्यामुळे तिला या मालिकेतून हाकलून दिले. त्यानंतरच्या उरलेल्या सर्व भागांत नॅटली टीगर ही माँकची असिस्टंट आहे. नोस्टाल्जिया वगैरेसाठी अगदी शेवटीशेवटी एका भागात ('मि.माँक अ‍ॅन्ड शेरोना') ती परत येते.
शेरोनाचा रोलच तसा उथळ, बटबटीत आहे. त्या मानाने नॅटली ही अधिक सूज्ञ, मॅच्युअर आहे.
असो, पण यावर परत कधीतरी...
अवांतरः शेरोना सुंदर दिसते हे ठीक. पण तिचा नेमका हाच फोटो (ज्यात ती फारशी सुंदर दिसत नाही!) का डकवला असावा याचे कुतुहल आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

या संकेतस्थळावर डकवलेले कोणीतरी काढलेले खऱ्या सौंदर्याचे फोटू बघून शॅरोनाचा हा फोटोही सुंदर वाटला. Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फास्ट अँड फ्युरियस - ६ चे ट्रेलर्स इकडेतिकडे दिसू लागल्याने, उजळणी म्हणून आधीचे पाच भाग मागील वीकेंडला पाहून घेतले. यापूर्वी फक्त टोक्यो ड्रिफ्ट हा भाग मी पाहिला होता असे वाटते. या चित्रपटांच्या नावांबाबत माझा गोंधळ होतो आणि सगळ्या चित्रपटांमध्ये गाड्याच गाड्या असल्याने कथेचीही सरमिसळ होते. असो. पाच भांगांपैकी फास्ट फाईव्ह सरस वाटला. बिकीनीतील सुंदर स्त्रिया, वेगाने धावणाऱ्या गाड्या, चटपटीत ऍक्शन, वगैरेयुक्त फुल टाईमपास या एकमेव हेतूने केलेले हे चित्रपट आहेत. मात्र या पाचपैकी विन डिझेल नसलेले दोन चित्रपट रटाळ वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>टॅरेंटिनोची शैली आता अतिपरिचित आणि त्यामुळे फारच प्रेडिक्टेबल वाटते. (निदान मला तरी). एखादी स्टायलिश पद्धतीने, सुंदर सजवलेली मात्र आत्मा नसलेली बाहुली पाहिल्यासारखे वाटते. मग असे असताना असे इथे कोणाला जाणवले आहे का?<<

सहमत. पल्प फिक्शनची मजा आताच्या टारांटिनोला नाही. (जॅन्गो आणि बास्टर्ड्स दोन्ही पाहिले आहेत.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सहमत, पल्प फिक्शन मस्त होता. नॉन-लिनिअर चित्रपट पहिल्यांदाच पाहिला आणि आवडलाच, लांबलचक आणि रोचक संवाद हे क्विंटिनच्या चित्रपटाचे वैशिष्ट्य राहिले आहे. ख्रिस्टोफर वॉकेनचा पल्फ फिक्शन मधला मोनोलॉग मस्त आहे. किल-बिल पण चांगला होता, मसालेदार असला तरी सादरीकरण झकास होते.

Pulp Fiction - Christopher Walken

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या प्रतिसादामुळे The Phantom of Liberty हा चित्रपट पाहिला. खरं सांगायचं तर कशाचा कशाशी काय संबंध ते काहीही समजलं नाही. असा संबंध जोडत बसावा का नाही असा प्रश्न मुळात विचारावासा वाटला.

एकापाठोपाठ एक गोष्टी घडत जातात. त्याचा एकमेकांशी काहीही संबंध नसतो. ज्या गोष्टी घडत जातात त्या ही विनोदी, विचित्र आहेत. सुरूवातीला आणि शेवटीही लोकांच्या घोषणा "स्वातंत्र्य मुर्दाबाद", समोर हजर असलेल्या मुलीबद्दल ती हरवली आहे अशी तक्रार पालकांनी पोलिसांकडे नोंदवणं आणि पोलिसांनीही ती लिहून घेणं, मलमूत्रविसर्जनाबद्दल वरच्या लिंकमधल्या प्रतिसादात उल्लेख आहेच, पोलिस अकॅडमीतल्या अतिशय बेशिस्त आणि बालिश पोलिसांना नीतीमत्ता, मूल्य कशी बदलती असतात हे शिकवणं, चर्चमधल्या महत्त्वाच्या गोष्टी वापरून धर्मगुरूंनी जुगार खेळणं असं काय वाट्टेल ते या चित्रपटात आहे. एका गोष्टीत एका खुन्याला मृत्युदंड होतो आणि बाकीचे लोक त्याच्याशी तो कोणी प्रसिद्ध अभिनेता वगैरे असावा अशा पद्धतीने वागतात. प्रचंड उकाडा असताना उघडे बसलेले पुरुष कित्येकदा बघितले असतील, इथे एक स्त्री अशी उघडी बसून आरामात पियानो वाजवते आहे आणि तिचा भाऊ तिच्याकडे गाण्यांची फर्माईश करतो आहे...

या चित्रपटाचं डीव्हीडी कव्हरही विनोदी आहे. गुलाबी आणि फ्लोरोसंट हिरव्या रंगात स्वातंत्र्यदेवतेचा हात आणि तिची मशाल आहेत. काहीही पवित्र नाही, आपण ज्यांवर विश्वास ठेवतो ती मूल्य शाश्वत नाहीत, आपण जे गृहित धरून चालतो ते काहीही गृहित धरण्यात अर्थ नाही असं काही दिग्दर्शकाला सांगायचं आहे का?

टीव्हीवर दिसणारे रंग या चित्रात दिसतात त्यापेक्षा जास्त भडक (पक्षी: अश्लील) आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>खरं सांगायचं तर कशाचा कशाशी काय संबंध ते काहीही समजलं नाही. असा संबंध जोडत बसावा का नाही असा प्रश्न मुळात विचारावासा वाटला.<<

ब्युन्युएलचं इतर काम किंवा सर्रिअलिझमच्या व्यापक चौकटीबाहेर पाहिला, तर चित्रपट थोडा दुर्बोध म्हणता येईल; पण त्याला त्याची एक सुसंगती निश्चित आहे. जमलं तर कधी तरी त्याविषयी लिहीन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

घनचक्कर या चित्रपटाचा ट्रेलर आता पाहिला. विद्या बालनच्या तोंडचे (बजाना है, कारपेंटर वगैरे) संवाद ऐकून मेनस्ट्रीम हिंदी चित्रपट भलताच बोल्ड होत आहे असे दिसते
https://www.youtube.com/watch?feature=player_detailpage&v=ClncY3AQxeg#t=30s

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१९७२ सालचा कुमार शहानीदिग्दर्शित 'माया दर्पण' parallel cinema गटातील म्हणता येईल असा सिनेमा यूट्यूब दिसला (१० भागांत) आणि तेथून तो पाहिला. १९७२ चा पहिला राष्ट्रीय पुरस्कार ह्याला मिळाला होता पण त्याला काही प्रसिद्धि मिळावी असे त्यात काहीच नाही. परंपरेमधून बाहेर पडण्याची इच्छा नसलेला सुखवस्तु बाप, घुसमटणारी त्याची मुलगी आणि अखेर तिने मिळविलेली एक प्रकारची मुक्ति ही गोष्ट अतिशय कमी पात्रे, कमी नेपथ्य आणि कमी संवादांच्या मार्गाने सांगण्याचा प्रयत्न आहे. अधिक खोलवर समीक्षेसाठी पहा http://theseventhart.info/2010/05/23/flashback-78/

१९६२ साली मोंदो काने नावाची एक डॉक्युमेंटरी पाहण्यात आली होती तीहि अलीकडेच यूट्यूबवर दिसली. त्या काळात, जो आजच्या ५० वर्षे पूर्वीचा आहे, जगभर वेगवेगळ्या टोळी-समूहांमधून जाऊन आपल्याला विचित्र वाटणार्‍या चालीरीतींचे केलेले चित्रण येथे दिसते. त्याबरोबरच मागे मधूनमधून थोडी sarcastic वाटावी अशी commentaryहि आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१) The Spirit of the Beehive हा स्पॅनीश चित्रपट पाहिला. सहा वर्ष वयाची मुलगी 'Frankenstein' चित्रपट पाहुन भुत, आत्मा खरच असतो का हे पाहण्यासाठी तिच्या पेक्षा काही वर्षानेच मोठ्या असण्यार्‍या बहिणीच्या सांगण्यावरुन दुर शेतातील एक पडक्या घरात जाते. तिथे तीची भेट आसरा म्हणुन आलेल्या एका जखमी सैनीकाशी होते. चित्रपट आवडला. मुलीने सुरेख काम केले आहे.

२) Pickpocket फ़्रेंच चित्रपट. पॅरीसमध्ये आजारी आईला एकटं सोडुन हॉटेलमध्ये एकांतात राहणारा नायक वेळ जात नाही म्हणुन पाकिटमारी करतो. पाकिट चोरताना दाखवलेल्या कला भारी आहेत.:-) पुढे हीच कला त्याचे व्यसन बनते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकदाचा 'विकी डोनर' पाहिला. ठिक वाटला. जितकी हाईप केली आहे तितका वेगळा वाटला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

विकी डोनर मला अजीबात आवडला नाही. एक मुलं होण्यासाठी जंग जंग पछाडणं ही भावनाच मला समजत/ पटत नाही, त्यामुळे चित्रपटाची थिमच डिस्कार्ड होते. परत त्या सासुसुनेचे व्हिस्की पितानाचे पंजाबी डायलॉग, जे फार फार विनोदी आहेत म्हणे, मला एक अक्षर कळाले नाही त्यातले. पण तो हिरो चांगला दिसतो. पंजाबी मुश्टंडा नौजवान Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुलं होणं वगैरे वगैरे सोडा, पण आम्हाला तर बॉ यम्मी आपलं यामी गौतम खूप आवडली बॉ त्या पिच्चरमध्ये. हजार मौती क्षणभरात मेलो अन जिवंतही झालो Wink आणि अर्थातच "पाणी दा रंग वेख के" हे गाणं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ह्या नायकानेच हे गाणे गायले आहे असे कळते. त्याच्या नवीन नौटंकी साला या चित्रपटातही त्याची एकदोन छान गाणी आहेत. कपूर-खन्ना-खान मंडळींपेक्षा चांगला वाटतो हा प्राणी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही लहान होतो तेव्हा काही चित्रपटांची चर्चा असायची. हे चित्रपट आमच्या वयामुळे तेव्हा पहायला मिळाले नव्हते. (केवळ "प्रौढांसाठी") यातले दोन चित्रपट पाहिले.

१. "द ईव्ह्ल डेड" : १९८१ चा हॉरर सिनेमा. मला आठवतंय आमच्या मित्रांपैकी काही सुदैवी(!) जनांनी ते शाळेत असतानाच हा पाहिला होता. मग त्याचं वर्णन "सॉलिड" "खतरनाक" "गां फा" आहे असं केलं होतं. आम्ही आपले निव्वळ कल्पना करून गप्प बसलेले. कालांतराने रामसे ब्रदर्स यांनी काढलेले काही चित्रपट व्हिडिओवर वगैरे पाहिले तेव्हा अगदीच पोपट असल्याचं तेव्हाही जाणवलं होतं. तरी "द ईव्ह्ल डेड" राहिला तो राहिलाच. तो केवळ चूष म्हणून कालपरवा पाहिला. रामसे ब्रदर्सनी एकंदर प्रेरणा कुठून घेतली असावी त्याची कल्पना आली. अतिशय बटबटीत चित्रण, अभिनय. भूतांचं चित्रण बालनाट्यामधल्या बागुलबुवासारखं. भीतीपेक्षा किळस वाटावी अशी दृष्ये. एकंदर काय तर "It is so bad that it is good" अशी परिस्थिती. हा चित्रपट "Cult Classic" बनला तो नेमका कसा नि काय हे समजून घेणं माझ्या कल्पनेपलिकडचं आहे.

पण एकंदरीत स्पेशल इफेक्ट्सचा जमाना नीटसा सुरू झालेला नसताना कमी बजेट्मधे असले दुय्यम-तिय्यम दर्जाचे सिनेमे निघत कसे असतील याचा काहीसा अंदाज आला. मुख्य म्हणजे या अशा चित्रपटांबद्दल मिटक्या मारणार्‍या शाळकरी बंधूंची आठवण आली नि हसायला आलं.
"द ईव्ह्ल डेड" च्या सिनेमाच्या दिग्दर्शकाचं आडनाव "रेमी" किंवा "रायमी" असं आहे. "रामसे" आडनावाच्या माणसांनी प्रेरणा घ्यावी हा सगळा काव्यात्म न्यायच म्हणायचा.

२. "आय स्पिट् ऑन युअर ग्रेव्ह" : पुन्हा एकदा त्याच शाळूसोबतींकडून काहीशा निराळ्या संदर्भातल्या मिटक्यांनी युक्त असं वर्णन ऐकलेला आणखी एक सिनेमा. पौगंडावस्थेत शिंगे (येथे गरजूंनी योग्य त्या अर्थाचे शब्द वाचावेत) फुटल्यानंतर या सिनेमाबद्दल ऐकलेलं होतं.

हा चित्रपट वाईट नि बटबटीत नि लोबजेट असण्याखेरीज अत्यंत आक्षेपार्ह असा आहे. "ईव्हल डेड" चा USP किळसयुक्त भीती असा असेल तर हा तर सरळसरळ हिंसक बलात्कारावर आधारलेला आणि सरळसरळ त्याच्या जोरावर विक्री करू पहाणारा आहे.

Slasher movies च्या नेहमीच्या फॉर्म्युल्याप्रमाणे एकाकी गावात आलेली (सुंदर इत्यादि) तरुणी आणि तिच्यावर पडलेली दुष्ट आदि व्यक्तींची नजर आणि त्यांनी केलेले अत्याचार आणि तिने घेतलेला बदला असा मामला. सिनेमा shoestring म्हणता येईल अशा बजेट्वर बनलेला. कथानकाशी संबंध नसतानाचं तरुणीचं बिकीनीप्रदर्शन इत्यादि. आणि बलात्काराची दृष्यं प्रदीर्घ, बटबटीत आणि सालंकृत (!) म्हणता येतील अशी आहेत. पात्रांची माणसं म्हणून काही दर्शने अशी काहीच नाहीत. संवादही बेतास बात. थोडक्यात शरीरप्रदर्शन आणि बलात्कार या मेन डिशला तोंडी लावणं म्हणून कथानक, व्यक्तीरेखा, संवाद इत्यादि इत्यादि गोष्टी.

असो. लहानपणी "भारी" "सॉलिड" इत्यादि म्हणून ऐकलेल्या गोष्टींना तसे स्मृतीरूप किंवा कुतुहलवजा पेटार्‍यात सुरक्षित राहू द्यावे, ते उघडणं म्हणजे उंटाच्या बुडख्याचा मुका घेण्यासारखं आहे इतपत "ज्ञान" आम्हाला झाले हेही नसे थोडके.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

>>एकदाचा 'विकी डोनर' पाहिला. ठिक वाटला. जितकी हाईप केली आहे तितका वेगळा वाटला नाही.<<

मला विकी डोनर उत्तम नाही तरी रोचक वाटला त्याची कारणं थोडक्यात -
- पंजाबी संस्कृतीचं 'यशराज'छापाचं ढोबळ उदात्तीकरण करण्यापेक्षा त्यातल्या काही वेगळ्या गोष्टींना उठाव दिला आहे. उदाहरणार्थ, सासू-सुनेत दिवसभर विस्तव जात नसूनदेखील रात्री दोघींनी एकत्र बसून तर्र होणं आणि दारूत वैर डुबवणं. नेहमीच्या पुरुषप्रधान एकत्रकुटुंबपूजक गोग्गोड पंजाबी संस्कृतीपेक्षा स्त्रियांचं हे विश्व दाखवणं मला वेगळं वाटलं.
- संस्कृतीभिन्नता असून समंजसपणा दाखवणं. नायिका बंगाली म्हटल्यावर स्वतंत्र विचारांची आणि स्पष्टवक्ती दाखवली आहे. तिला समजून घेणारा पंजाबी नायक किमान पातळीवर संवेदनशील होताना दाखवला आहे. म्हणजे हळूहळू त्याच्यात बदल होत जातो. ते पंजाबी पुरुषाचं आधुनिकीकरण आहे. एकविसाव्या शतकात हे प्रत्यक्षातही होत असणार, पण त्याला एरवी आपल्या सिनेमात कधीच स्थान नसतं.
- मुळात सिनेमाचा गाभा हा पौरुषाची पारंपरिक संकल्पना, त्याचा आधुनिकतेबरोबर होणारा संघर्ष आणि त्यातून त्या संकल्पनेत होत जाणारे बदल हा आहे. नायकाचं स्पर्म डोनर असणं आणि पंजाबी असणं हे मिश्रण मला म्हणून रोचक वाटलं. तसंच त्याचं बिनापुरुषाच्या घरात, पक्षी आपल्या पायावर उभ्या स्त्रियांच्या राज्यात वाढलेलं असणं आणि एका बाणेदार मध्यमवयीन (त्यातही दुसरेपणाच्या) मुलीच्या प्रेमात पडणं, आणि त्याचा ह्या आधुनिक पौरुषाच्या बदलत्या, प्रवाही संकल्पनेशी लावलेला संबंध मला रोचक वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आभार.. पहिला मुद्दा चित्रपट बघताना जाणवला होता. दुसरे दोनही तेव्हा वेगळेपणाने जाणवले नसले तरी आता वाचल्यावर पटले.

मात्र मला हा 'तितका' न आवडण्याची कारणं अशी:
-- एरवी स्पष्टवक्ती आणि बर्‍यापैकी विचार करणार्‍या नायिकेला स्वतःच्या वागण्यातील विरोधाभास अजिबातच न जाणवणं
-- बरं नाहि तर नाही, तो तिला जाणवून देण्यासाठी शेवटचा इतका मोठा ड्रामा अगदीच 'टिपिकल' आणि रटाळ वाटला.
-- संवाद अगदीच सामान्य वाटले किंबहुना 'टिपिकल' किंवा अगदीच अपेक्षित वाटले.
-- नायिकेच्या पालकांनी सोडा नायकाच्या घरच्यांनीही कसला बिझनेस आहे? हा प्रश्न अजिबातच न विचारणे अगदीच प्लान्ड आणि अविश्वसनीय वाटले

वगैरे वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मला चित्रपट चांगला मनोरंजक वाटला. नवीन कलाकारांमुळे चित्रपटाला फ्रेश लुक आला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'आप्पा आणि बाप्पा' हे नाटक ऑनलाईन पाहिले. उदय नारकरांनी 'द सनशाईन बॉईज' या (कोण्या-मला माहित नसलेल्या) नील सायमन नामक लेखकाच्या नाटकाचे केलेले रूपांतर .
नाटक आवडले. बघणीय (किंवा प्रेक्षणेबल)आहे. दिलीप प्रभावळकर आणि विक्रम गोखले यांच्याइतक्याच ताकदीने दीपक दामले यांनीही अभिनय केल्याचे जाणवले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"टिंकर टेलर सोल्जर स्पाय" : २०११ साली आलेला, जॉन ल कार या ब्रिटीश हेरकथालेखकाच्या कादंबरीवर आधारित चित्रपट.

कथानक १९७३ सालचं. कोल्डवॉर दरम्यान ब्रिटीश हेरखात्याच्या सर्वोच्च वर्तुळामधे शिरलेल्या फितुराचा लावलेला छडा, आणि या निमित्ताने घडलेलं नाट्य असा प्रकार.

गॅरी ओल्डमनने यात प्रमुख भूमिका निभावलेली आहे. चित्रपट आवडण्याचं कारण म्हणजे ओल्डमन आणि इतर नटांचा अभिनय हे आहेच. पण कथानकाची हाताळणी विशेष आवडली. ल कार यांचं कथानक प्लॉट्स-सबप्लॉट्स यांनी भरलेलं, गुंतागुंतीचं असणार यात शंका नाही. चित्रपटामधे अतिशय नाट्यपूर्ण घटना घडतात परंतु त्या एकामागोमाग एक अशा यांत्रिक पद्धतीने येत नाहीत. व्यक्तिरेखा, घटनाप्रसंग यांची गुंफण एका ठाय लयीत घडते. जेम्सबाँडीय किंवा बोर्नीय मारामार्‍या आणि यंत्रसामुग्रीच्या प्रकरणांना पूर्णपणे फाटा देऊन, माणसांची मनं कशी गुंततात याचं चित्रण येतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

चित्रपट बरा आहे, पण 'गॅरी ओल्डमन' वगळता बाकी कलाकारांना फारसा वाव नसल्याने स्क्रिप्ट अजून बरे असते तर 'अजून छान भट्टी जमली असती' असं वाटून जातं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काल बीबीसी वर एन्ड गेम हा ब्रिटिश चित्रपट पाहिला. अतिशय प्रेक्षणीय, विचार करायला लावणारा आणि खुर्चीला खिळून ठेवणारा वाटला.
२००९ सालच्या या चित्रपटात दक्षिण अफ्रिकेतील वंशविद्वेशी राजवटीच्या अखेरच्या दिवसांचं चित्रण आहे. दोन एकमेकांचा तिरस्कार करणार्‍या बाजूंना एकत्र आणून एकमेकांशी संवाद साधायला लावणार्‍या, एकमेकांबद्दल विश्वास निर्माण करायला लागण्यासारखं वातावरण निर्माण करणार्‍या एका मध्यस्थाची ही कथा आहे.
नेल्सन मँडेला आणि बिशप टूटू हे दोघेही कैदखान्यात आहेत. त्यांच्यामध्ये तसेच आफ्रिकन नॅशनल कॉन्ग्रेसच्या इतर नेत्यांमध्ये फूट पाडण्याचा सफेद राजवट पुरेपूर प्रयत्न करतेय. काळ्या लोकांच्या मनात आजवर झालेल्या अन्यायाबद्दल अंगार धुमसतोय तर गोर्‍या लोकांच्या मनात काळ्यांचं राज्य आलं तर सूडसत्र सुरू होईल ही भीती! खुद्द दोन्ही बाजूकडे हिंसावादी ग्रुप्स आहेत जे कोणतीही शांततेची बोलणी सुरुदेखील होऊ द्यायला तयार नाहीत....
अशावेळी कन्सॉलिडेटेड गोल्ड फील्ड्स या दक्षिण अफ्रिकेत बिझनेस असलेल्या एका कंपनीच्या मायकल यंग या एका अधिकार्‍याने स्वतःच्या जिवावर उदार होऊन गुप्तपणे दोन्ही बाजूच्या विचारी लोकांना एकत्र आणून सुरू करून दिलेल्या वाटाघाटींची ही कहाणी....
मी आजवर पाहिलेल्या चित्रपटांमधील एक सर्वोत्कृष्ट चित्रपट! मुद्दाम बघावा अशी शिफारस करतो....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विकांताला सुदर्शनला "कॉलसेंटर" नावाचे प्रायोगिक नाटक/एकांकिका पाहिली.
अगदीच ठिक वाटली. कॉलसेंटरला प्रतिकात्मक ठेऊन ग्लोबलायझेशनचे जीवनावर परिणाम दाखवायचे असावेत असा अंदाज.
काही दृक-परिणाम, काहि तुकड्यातुकड्यात प्रभावी अभिनय, ध्वनी ही जमेची बाजु. संवाद, रंगमंचावरील वावर, पटकथा, मांडणी वगैरे इतर सगळेच यथातथा!
अगदीच कॉलेज लेव्हलवर लिहिली गेलेली पटकथा वाटली. असो, याहुन अधिक लिहिण्यात वेळ दवडत नाही.

त्यांच्याच टिमची "रंग" नावाची अत्यंत बालिश डॉक्युमेंटरीही दाखवण्यात आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

'Atlas Shrugged'चे दोन्ही भाग पाहिले. मुळात जी काही कथा, पटकथा आहे ते सोडून बाकीचं बरंच सुसह्य आहे, त्यातल्यात्यात पहिला भाग. सगळ्या अ‍ॅडल्टांच्या डोळ्यांना पुरेसं सुख असेल याची खात्री केलेली आहे. अमेरिकेतलं नैसर्गिक सौंदर्य, मानवनिर्मिती उंच उंच खोके आणि कलाकुसरही दाखवण्याचा प्रयत्न बरा आहे. नवीन, स्वस्त, टिकाऊ, मजबूत धातू असं ज्याचं वर्णन केलेलं आहे त्याचं रंगरूप विनोदी वाटलं.

प्रलयघंटावाद म्हणजे काय याचं एक उत्तम उदाहरण वाटलं. रिचर्ड डॉकिन्सच्या Greatest show on earth च्या निदान दसपट कंटाळवाणं, एकारलेलं चित्रण.

भारतात 'अध्यात्मिक' लोकं जगबुडीची भीती दाखवतात; अमेरिकेत सगळ्या वस्तू संपतील याची भीती अधिक खपत असावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कालच सुदर्शनला "ओवी ते हायकू" नावाचा अत्यंत नेटका आणि उत्तम सादरीकरण, संकलन असणारा कार्यक्रम बघितला. अतिशय आवडला.
सविस्तर उद्या लिहितो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

थोडं तपशिलातः
मराठी कवितेचा इतिहास कित्येक शतकांचा आहे. ओवी, अभंग, भारूडं, पोवाडे, फटके, पंतकाव्य वगैरे पासून गझला, सुनिते, लावण्या, भावगीते, बालगीते, विडंबनं वगैरे स्टेशनं घेत मुक्तछंद, मुक्तशैली, गद्यकाव्य, हायकु वगैरे पर्यंतचा हा प्रवास अतिशय ताकदीने पेलला आहे. कवितांची निवड अत्यंत वेधक आहेच शिवाय त्याचं सादरीकरण - न्याट्यमय पद्धतीने आवाजाची फेक, वाचिक अभिनयाच्या माध्यमातून पोचवलेली कविता, साजेसं संगीत, सुटसुटीत नेटकं नेपथ्य आणि कसलेले आवाज - वैशिष्ट्यपूर्ण वाटलं

ज्यांना आवड आहे त्यांच्यासाठी २१ एप्रिल रोजी पुन्हा सुदर्शनला संध्या ७ वाजता आणि २७ एप्रिल ला ज्योत्सा भोळे सभागृहात एजून दोन प्रयोग व्हायचे आहेत. एकदा तरी आवर्जून बघा अशी शिफारस!

अवांतरः सणावारांची गाणी, भुपाळ्या, अंगाया वैगैरेंचा समावेश असता तर पूर्णता आली असती असे वाटते. पण २/२:३० तासांत सगळे प्रकार बसणार नाहित याची कल्पना प्रेक्षकांना आणि आयोजकांनाही असल्याने यात गैर वाटत नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अरेच्चा मी एक प्रतिक्रिया मोठ्या कष्टाने लिहिली होती ती सबमिट करताना एरर आला वाटतं. Sad असो. त्याची संक्षिप्त आवृत्ती परत लिहावीशी वाटली.

वीकेंडला फोर्क ओवर नाईव्ज हा माहितीपट पाहिला. प्राणिज प्रथिनांचे आधुनिक जीवनशैलीशी निगडित हृदरोग, रक्तदाब व मधुमेहारारख्या रोगांशी असलेले नाते उलगडून दाखवणारा हा माहितीपट आहे. विशेषतः कर्करोगाचे आहारशैलीशी असलेले नाते फारच रोचक वाटले. सुपरसाईज मी सारख्या इतर माहितीपटांमध्ये सामान्यतः फास्टफूड साखळ्या व तत्सम खाद्यप्रकारांना दोष दिला आहे. मात्र सदर माहितीपटात एकंदर अमेरिकन व पाश्चात्य अन्नसंस्कृती, त्यातील प्राणिज प्रथिनांचा वापर व या प्रथिनांचे रोगांशी असलेले नाते या गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. नाझी जर्मन सैन्याने युरोपातील काही देशांवर हल्ला केल्यानंतर त्या देशातील मांस व दूध हे जर्मन सैन्यासाठी राखून ठेवण्यात आले. व त्यामुळे त्या देशातील नागरिकांना प्रामुख्याने धान्य-पालेभाज्या-फळे हा वनस्पतिजन्य आहार करावा लागला. त्या काळात या देशांमधील नागरिकांच्या हृदरोग व कर्करोगात अभूतपूर्व प्रमाणात घट झाली. जर्मन सैन्याच्या माघारीनंतर हे 'पोषक' अन्न पुन्हा उपलब्ध झाल्यावर या रोगांचे प्रमाण पुन्हा पूर्वीच्या पातळीला लगेचच स्थिरावले. साठीच्या दशकात अमेरिकेच्या केवळ निम्मी लोकसंख्या असणाऱ्या जपानमध्ये केवळ १४ ovarian cancer चे रूग्ण सापडावेत व अमेरिकेत ते १४००० सापडावेत हा निश्चितच योगायोग नाही. शिवाय हेच जपानी व कोरियन स्थलांतरित अमेरिकेत आल्यानंतर त्यांच्या दुसऱ्याच पिढीमध्ये अमेरिकन लोकसंख्येच्या तोडीस तोड हृदरोगी व कर्करोगी सापडतात हेही रोचक आहे.

यासारख्या अनेक ऐतिहासिक गोष्टी निष्कर्ष काढण्यासाठी वापरल्या आहेत. जनतेच्या आरोग्यासाठी (प्रामुख्याने प्रथिनांसाठी) दूध-अंडी-चीज-मांस यांचा सरकारी व खाजगी प्रसारमाध्यमांतून होणारा उदोउदो व सरकारचा वाढत जाणारा आरोग्यखर्च यातील नातेसंबंध धक्कादायक आहे.

सुंदर ऍनिमेशन्स व मनोरंजक स्वरुपात सादर केलेली माहिती यामुळे माहितीपट कोठेही कंटाळवाणा होत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लिंक द्या बघू आधी. प्रतिक्रिया मग देतो Wink हा अतिशय रोचक विषय आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मी अमेझॉन वरुन काहीतरी विकत घेतल्याने मला महिनाभरासाठी अमेझॉन प्राईम मेंबरशिप मिळाली होती. त्यात हा माहितीपट फुकट उपलब्ध होता. बहुधा नेटफ्लिक्सवरही उपलब्ध असावा. (शोधाशोध केल्यास टॉरंटही मिळून जाईल)

आयएमडीबी दुवाः www.imdb.com/title/tt1567233/

माहितीपटाच्या संकेतस्थळाचा दुवाः http://www.forksoverknives.com/

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बहुत धन्यवाद Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हा माहितीपट मी पाहिलेला आहे. अतिशहाणा यांनी या फिल्मचं केलेलं वर्णन यथायोग्य आहे.

यापुढचा किस्सा अवांतर आहे. फिल्मच्या धाग्याशी असंबंधित.

यावरून अलिकडेच घडलेला एक छोटा गप्पांचा भाग आठवला. ऑफिसची पार्टी होती आणि त्यात एका थोड्याशा वयस्क व्यक्तीला नुसतंच उभं राहून गप्पा मारताना पाहिलं नि खाद्यपेय पदार्थांचा आस्वाद घेण्याबद्दल सुचवलं. तेव्हा तो म्हणाला की "मी यापैकी फारच कमी पदार्थ खाऊपिऊ शकतो." तेव्हा मी भिवया उंचावल्या. मग त्याने थोडक्यात सांगितलेली कहाणी अशी :

तो आता पन्नाशीचा आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वीपर्यंत तो २५५ पौंड वजनाचा होता. (सुमारे ११५ किलो) त्याचा आहार बराच मोठा होता आणि सर्व प्रकारचा मांसाहार आणि मद्यपान तो करीत असे. दोन वर्षांपूर्वी त्याला हार्ट अटॅक आला असता डॉक्टरांनी बदलण्यास सांगितल्यावर त्याने ("फोर्क्स ऑव्हर नाईव्ज" या फिल्ममधे सांगितल्याप्रमाणे) मांसाहारच नव्हे तर दूध-अंडी-चीज यांसारखे कुठलेही प्राणिजन्य पदार्थ खाणं थांबवलं आणि मद्याचं सेवनही अत्यंत मर्यादित करून ठेवलं. रोज तो फक्त सुमारे १००० कॅलरींचं सेवन करतो. हे सुरू केल्यानंतर त्याला मांसाहाराच्या भूकेपायी मोठ्या प्रमाणात डोकेदुखीसारखी withdrawal symptoms सुरू झाली. काही महिन्यांनी त्यांनी धावण्याचा व्यायाम सुरू केला आणि अलिकडे त्याने २-३ मॅरेथॉन (म्हणजे सुमारे २६ मैल) शर्यती पूर्ण केल्या. आता तो आठवड्याला सुमारे पंचवीस मैल सहज धावू शकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.