अलिकडे काय पाह्यलंत ? - ३

दुसरा धागा बराच मोठा झाल्यामुळे तिसरा धागा सुरू करत आहे. भाग -२

रुचीच्या सूचनेवरून 'कपलिंग' नावाची ब्रिटीश मालिका बघायला सुरूवात केली आहे. दोन दिवसात सहा भागांचा पहिला सीझन बघून संपला. ही मालिका 'सेक्स कॉमेडी' आहे, पण 'अमेरिकन पाय'सारखी गलिच्छ अजिबात नाही एवढं वगळता लिहीण्यासारखं मला फार काही सुचलं नाही. (या वाक्याबद्दलही रुचीचे आभार.) तीन मित्र, तीन मैत्रिणी एकत्र येऊन धमाल करतात हे वाचून 'फ्रेंड्स'ची आठवण होणं अपरिहार्य आहे. पण 'कपलिंग' त्यापेक्षा फारच वेगळी वाटते आहे.

एकटं बसून दारू पिणं अधिक miserable का ही मालिका एकट्याने/एकटीने बघणं हे मला ठरवता येत नाहीये. तेव्हा शक्य तेवढे डांबरट मित्रमैत्रिणी जमवून मालिका पहा, नाहीतर आपल्या नवरा/बायको/पार्टनरसोबत पहा. आपापली निवड.

हा या मालिकेचा यू ट्यूबचा दुवा
http://www.youtube.com/user/coupiing
मालिका नेटफ्लिक्सवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध आहे.
http://movies.netflix.com/WiMovie/70140370?strkid=251452526_0_0&trkid=22...

field_vote: 
0
No votes yet

कन्झुमर बिहेविअरमध्ये ग्राहकांचे वर्गीकरण केलेले आहे. त्यातल्या ल्यागार्डमध्ये मोडणारे आम्ही असल्याने 'प्रेमाची गोष्ट' सगळ्या जगाने बघून झाल्यानंतर काल पाहिला. सागरिका घाटगेच्या उच्चारांबद्दल आधी खूप ऐकले होते. ते काही तितकेसे खटकणारे वाटले नाहीत. मुलगी गोड आहे. तिने कामही समजून केले आहे. काही वेळा तिला बघून कतरिना कैफची आठवण येते हेच काय ते खटकण्यासारखे. सतिश राजवाडेचेही काम चांगले आहे. अतुल कुलकर्णीच्याऐवजी कुणाही गणागणपाला घेता आले असते.
प्रेमाची गोष्टमधले संवाद ऐकून हैराण झालो. 'मोर्‍या आला असेल, मला म्हणाला होता...', 'काय बापूराव?..' 'या, महंमद रफी..' असले 'मुंबईचा जावई' मधले संवाद आठवत होते.
एकूण मराठी सिनेमा बघण्यावर फुली मारण्याचे दिवस येत चालले आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

काही वेळा तिला बघून कतरिना कैफची आठवण येते हेच काय ते खटकण्यासारखे.

आजूबाजूला किती तरूणांची हृदयं बंद पडली असतील याचा थोडा विचार करा! नशीब भारतात येता-जाता (किंवा ह.पा.) खटले ठोकण्याची पद्धत नाहीये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

स्पेशल २६ पाहिला. छान चित्रपट आहे. अक्षयकुमार, किशोर कदम वगैरेची काम चांगली आहेत.
काजल अग्रवालला विशेष काम नसले तरी दिसते मात्र झकास

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

+१.

तंतोतंत.

शोपीसची कामे उत्तम जमतात तिला, अजून एक उदा. म्हणजे सिंघम.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आताच पाहीला स्पेशल २६. मजा आली.
अक्षय, जीमी, मनोज, अनुपम छान दिसतात आणि काम देखील छान केलय.
८०च्या दशकातला लुक अँड फिल आवडला. विशेषकरुन सुरुवातीला चित्रपटाचा जो टिँज आहे तो खूप आवडला. शक्यतो निळे, पिवळे किँवा एकदम कलरफुल चित्रपट पाहुन कंटाळा आलेला.
काजलबिजल, प्रेमबीम, गाणीबीणी नसती तर अजुन छान क्रिस्प थ्रिलर झाला असता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इन्कार आणि टेबल न. २१ कलर्स वाहिनीवर लागोपाठ होते गेल्या रविवारी.
इन्कार बरा वाटला...चित्रान्गदा छान दिसते कार्पोरेट लुक मधे.

टेबल न. २१ ने अपेक्षाभन्ग केला...एवढं वगळता लिहीण्यासारखं मला फार काही सुचलं नाही. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गेल्या रविवारी 'आर्गो' पाहिला. ऑस्कर नॉमिनेशन्समुळे बराच चर्चेत आला आहे...तरी थोडक्यात सांगायचं तर हा सिनेमा एक थरारक नाट्य पडद्यावर उभं करतो. तेहरान मध्ये १९७९ सालात झालेल्या अमेरिकन 'होस्टेज' क्रायसिस दरम्यान कॅनेडियन दूताच्या घरी शरण घेतलेल्या सहा अमेरिकन्सना सुखरूप इराण बाहेर पडण्यासाठी सी. आय. ए. ने रचलेल्या डावाची ही गोष्ट आहे.

पहायला मजा आली. पण एका टप्प्यानंतर 'योगायोग' फार होत आहेत असं वाटलं. नंतर विकिवर वाचल्यावर नाट्यमयतेसाठी खर्या घटनेत घडलेल्या तपशीलांमध्ये बरेच बदल केलेत हे कळल्यावर मग ठीक आहे असं वाटलं...सिनेमातच होऊ शकतील इतक्या नाट्यमय घटना वाटल्या.
तरी सिनेमा मस्त आहे...आवर्जून बघावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********स्पॉयलर अ‍ॅलर्ट**********

नेटफ्लिक्सने बनविलेली नवी सीरीज 'हाऊस ऑफ कार्ड्स'चा पहिला सीझन नुकताच बघुन संपवला (१३ एपिसोड्स). केविन स्पेसीने यात कथानायकाची, फ्रान्सिस (फ्रँक) अँडरवूड, भुमिका केली आहे. तोच अनेकदा यात निवेदकाची भुमिकाही वर्तवतो. फ्रँक हा अमेरीकेच्या House of Representatives मधील डेमोक्राटिक पक्षाचा whip आहे. अमेरीकेच्या दक्षिणेतल्या (http://en.wikipedia.org/wiki/Deep_South) साऊथ कॅरोलायना राज्यातून आलेला, हार्वड लॉ स्कूलचा ग्रॅज्युएट असलेला फ्रँक धूर्त आणि अत्यंत महत्वकांक्षी आहे. राजकारणाच्या पटावरती तो एक महत्त्वाचा खेळाडू आहे आणि इतर चलाख खेळाडूंना मात देण्याकरता खेळणार्‍या धाडसी चालींची कथा म्हणजेच ही मालिका.

दक्षिणेतील डेमोक्राटीक पक्षाच्या राजकारण्याची मानसिकता त्याने चांगली वठवली आहे. फ्रँकची बायको, क्लेअर, एक "एन जी ओ" चालवते. एनजीओचा कारभार हा फ्रँकच्या राजकीय स्वप्नपूर्तीच्या उद्देशांना अनूकूल असा चालवण्याचा प्रयत्न दोघे करत असतात, पण त्यामुळे प्रामाणिकपणे एनजीओचे काम करणार्‍या क्लेअरची चरफड अधूनमधून होत असते. मात्र दोघंही 'ग्रेटर गूड' काय आहे याचा पदोपदी सारासार विचार करताना दाखवले आहेत. त्यांच्या वैवाहिक जीवनात दोघांना पूर्ण स्वातंत्र्य आहे, पण असे असतानाच दोघांनाही आपण एकमेकांना पूरक आहोत याची कल्पना आहे. अधूनमधून घडणार्‍या घटनांमुळे मात्र या आदर्श नवरा-बायकोच्या नात्यांचे रंग बदलतात आणि नात्यातली गुंतागुंत व्यक्त करतात.

खेळातील इतर मोहरेसुद्धा प्रभावीपणे मांडले आहेत. यशस्वी होण्यासाठी काहीही करण्यास तयार असलेली तरूण पत्रकार, झोई, फ्रँक बरोबर झोपून आपल्याला हवे ते साध्य करण्याच्या मागे असते. लॅटिन ओरीजनची आणि स्त्री अशा लिंडाला 'सेक्रेटरी ऑफ स्टाफ' फ्रँकच करवतो (लिबरल राजकारण्यांच्या पांठिब्यासाठी) मात्र लिंडा त्याला वाटतं तितकी सोपी नसते. पुर्वी ज्याला फ्रँकने राजकारणाचं बाळकडू पाजलेलं असतं तो आता स्वतंत्र आणि हुशार लॉबिस्ट झालेला असतो. प्रेसिडेंट असलेला वॉकर जरी आपण फ्रँकच्या खिशात आहोत असे दाखवत असला तरी काहीतरी कुठेतरी मुरतंय हे जाणवत राहतं. फ्रँकचा सेक्रेटरी, चीफ ऑफ स्टाफ आणि त्याच्या सर्व कृत्यांची इत्यंभूत माहिती असणाराच नव्हे तर त्यात महत्त्वाचा रोल बजावणारा 'डग' कुशलपणे प्रकरणं हाताळत असतो.

एकंदरीत पात्रांची मांडणी, अमेरीकेच्या राजकीय इतिहासातील खर्‍या घटनांवर आधारीत घटना, पडद्यामागचे प्रभावी राजकारण यांमुळे मालिका प्रेक्षणीय झाली आहे. कधीतरी फ्रँकचे निवेदन रसभंग करते, ते अधिक प्रभावी करता आले असते असे वाटते. फ्रँक आणि क्लेअरचे नाते रोचक दाखवले आहे, तरीही अधिक प्रभावीपणे मांडता येऊ शकेल. मालिकेच्या शेवटी आणलेला क्लायमॅक्सही रोचक आहे, त्यामानाने सुरुवात थोडी संथ होते. संथ सुरुवातीचे एक कारण, थेट प्रेसिडेंट झाल्यानंतरच मालिकेला सुरुवात केल्याने कथा निर्माण करायला जरा वेळ लागतो, हे असू शकते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

सुमारे पंधरवड्यापूर्वी ही मालिका पाहिली होती. बहुतेक निरीक्षणांशी सहमत आहे.

मात्र,
>>> कधीतरी फ्रँकचे निवेदन रसभंग करते, ते अधिक प्रभावी करता आले असते असे वाटते. <<<

याच्याशी थोडा असहमत आहे. नाट्यामधले एखादेच पात्र प्रेक्षकांना निवेदन करणे या तंत्रालाच बहुदा "ब्रेकिंग द फोर्थ वॉल्" असे नाव असावे. प्रस्तुत सिरियलमधे फक्त केविन स्पेसीचे मध्यवर्ती पात्र हे करते. त्याप्रसंगीचं त्याचं भाष्य निदान मला तरी अतिशय चुरचुरीत वाटलं. त्याच्या बेरकीपणाचा अर्क त्या क्षणांमधे उतरताना जाणवतो.

यंदाच्या १ फेब्रुवारीला या सिरियलचे तेराही भाग उपलब्ध झाले. नुकत्याच झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीच्या, राज्यारोहणाच्या आणि एकंदरीतच गेल्या काही वर्षांमधे अमेरिकन संसदेमधल्या अतिशय कडवटपणे विभागल्या गेलेल्या वॉशिंग्टनमधल्या राजकारणाची गडद छाया प्रस्तुत सिरियलमधे पडलेली आहे यात शंका नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

हे "ब्रेकिंग द फोर्थ वॉल्" फनी गेम्स चित्रपटातपण आहे. त्यातला निळ्या डोळ्याचा, लालचुटुक ओठांचा, सोनेरी केसांचा, बाहुल्यासारखा दिसणारा सिरीअल किलर अधुनमधुन चौथी भिँत मोडतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

केविन स्पेसीचा अभिनय चांगला आहे हे मान्य आहे. त्याचं भाष्यही त्याच्या कॅरॅक्टरला जमून आलं आहे. पण अनेकदा त्याचे निवेदन अनावश्यक वाटते. याचे मुख्य कारण, प्रेक्षकाला काही वेळा मंद समजून केलेले निवेदन. काही डावपेच इ. निवेदन न करता (स्पूनफिडिंट न करता) सांगितले असते तर जास्त मजा आली असती. प्रेक्षकाला विचार करत ठेवल्याने जास्त गुंतवता येते असे माझे मत आहे. (थोड्या स्पष्ट भाषेत सांगायचं तर, मी मूर्ख आहे असे समजून मला सर्व स्पष्ट केल्यासारखे जर वाटत असेल तर त्यात मी फारसा गुंतत नाही) वर म्हणल्याप्रमाणे काही वेळा निवेदन कथेच्या वेग/व्यापकामुळे आवश्यक आहे पण काही ठिकाणी मात्र ते रसभंग करते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

'हाऊस ऑफ कार्ड्स'चे कथानक, हाताळणी शेक्सपियरच्या 'रिचर्ड द थर्ड'वर बेतलेली आहे. थेट प्रेक्षकांशी संवाद साधणार्‍या 'असाईड्स'चा उपयोग थोडा कालविसंगत असला तरी बहुतेक त्या मूळ स्रोताशी असलेलं नातं दाखवून देण्यासाठी केला गेला असावा. तो इतक्या ढोबळपणे न करता अधिक परिणामकारक करता आला असता, याबद्दल सहमत आहे.

बाकी सध्याच्या तणावांचे, ग्रिडलॉक्सचे थेट चित्रण करण्याऐवजी काही प्रश्नांवर नव्वदीच्या दशकातल्या परिस्थितीची छाया पडलेली दिसून येते. उदा. ब्ल्यू डॉग्ज (दक्षिणेतले कॉन्झर्व्हेटिव्ह डेमोक्रॅट्स)चा अजूनही असलेला प्रभाव इ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आयला, हो काय!!!

हाऊस ऑफ कार्ड्स यायला अन रिचर्ड सापडायला.. हा कोणता योग म्हणायचा? Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

शिवाय गेल्या वर्षी स्पेसीने लंडनच्या Old Vic नाट्यगृहात रिचर्डची भूमिका साकारली होती -
http://www.telegraph.co.uk/culture/theatre/theatre-reviews/8606884/Richa...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इथले तीन प्रतिसादक आणि फोनवर चौथीने आणखी थोडं सांगण्यामुळे मी ही 'हाऊस ऑफ कार्ड्स' पाहिलं. आजच्या दिवसात शेवटचे दोन भाग पाहून होतील.

मधला एक भाग मला थोडा घटनारहित वाटला. त्यात फ्रँक कोणावरही कडी करण्याचा प्रयत्न करत नाही, फ्रँक-क्लेअरच्या नात्यातली गुंतागुंत त्यात नाही, कोणीच कोणावरच वरचढ होण्याचा प्रयत्न करत नाही, इ. पण तरीही मालिका आवडते आहे. केव्हिन स्पेसीचं निवेदन काही वेळा फार बाळबोध आहे; काही वेळा विनोदीही आहे. (उदा: वडलांच्या तरूण वयातल्या मृत्युबद्दल तो फार मनापासून भाषण करत असतो. पण निवेदनात सरळच आपले वडील अजिबात कर्तबगार नव्हते असंही काही म्हणतो.)

लिंडाचं काम करणारी अभिनेत्री (लॅटिना दाखवलेली असली तरी) हिंदी चित्रपटांमुळे ओळखीच्या सईद जाफरीची मुलगी. ही आपली सहज माहितीची देवाणघेवाण.

फ्रँकच्या नावाची आद्याक्षरं FU असणं मजेशीर आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

गंध हा चित्रपट पाहिला. यापूर्वी त्यातील 'लग्नाच्या वयाची मुलगी' एवढीच कथा पाहिली होती. संपूर्ण चित्रपट पाहिला/ पाहता आला नव्हता. आता सलगपणे पाहिला आणि फार आवडला. विशेषतः 'बाजूला बसलेली बाई' ही चित्रकथा अगदी छान आहे. चित्रपटातील 'औषधे घेणारा माणूस' ही कथा ( कुजलेला उंदीर वगैरे रॉटन रिलेशनशिप?) फारच सांकेतिक वगैरे वाटली. त्या कथेचा शेवटही फारसा झेपला नाही. मिलिंद सोमण त्यात आत्महत्या करतो की केवळ वास येण्याची चाचणी करतो?

हा चित्रपट पाहिल्यावर सचिन कुंडलकर यांचे निरोप आणि रेस्टॉरंट हे दोन सिनेमे पाहिले. निरोप बरा वाटला. रेस्टॉरंट फारच संथ आणि रटाळ. गंध बेस्ट होता. गंध नंतर अय्या हे केवढे मोठे अवमूल्यन आहे याची जाणीव होते.

'रानभूल' हा आणखी एक मराठी सिनेमा पाहिला. चांगला मनोरंजक वगैरे वाटला. टाईमपास म्हणून पाहायला बरा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रेस्टॉरंट फारच संथ आणि रटाळ

रेस्टॉरंट संथ आहे याबाबत सहमत. मात्र, तो खरंच रटाळ का वाटला? या बाबतीत जाणून घ्यायला आवडेल. मला तो चित्रपट आवडला होता असे आठवते.

'निरोप' कुठे मिळाला? टोरेन्ट दुवा आहे?

गंध आणि अय्याची जातकुळीच वेगळी आहे. त्या दृष्टीने तुलना गैरलागु ठरावी असे वैयक्तिक (अर्थातच सापेक्ष) मत. त्याबाबतीत तुमचे मत अनेकांकडून ऐकले असल्याने, ते मत बहुपरिचित आहेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

'निरोप' हा चित्रपट आपलीमराठी डॉट कॉम वर उपलब्ध आहे.

रेस्टॉरंट मला dragging या अर्थाने रटाळ वाटला. संपता संपत नाही. कथेत पुढे काय होणार याची उत्सुकता लागून राहत नाही. थोडक्यात जे काही पडद्यावर चालले आहे ते पुरेसे कंटाळवाणे आहेच, शिवाय पुढे काय होणार याच्या ज्या काही शक्यता आहेत, त्याही पुरेशा बोअरिंगच आहेत. बरे जे काही अंतिम उत्तर निघते तेही फार Innovative वगैरे आहे असे नाही. चित्रपटातील तो गिटार वाजवणारा मुलगा, कामवाल्या बाईची मुलगी आणि नवरा (गिरीश कुलकर्णी) यांच्या पात्रांचे प्रयोजन समजले नाही. समीर धर्माधिकारी फाईव्ह स्टार हॉटेलमधील नोकरी सोडून तिथे येतो यामागे काही विशेष कारण असल्याचे दिसले नाही. एरवी तो तसा बराच logical आणि तारतम्याने विचार करणारा दाखवला आहे. मात्र त्याच्या नोकरीबदलामागे काहीच सबळ कारण दिसत नाही. रेहमानचाचाचा एक protege आहे, त्याला नवीन शेफ येणे वगैरे मंजूर नाही हे ठळकपणे दाखवले आहे. मात्र धर्माधिकारीच्या प्रवेशानंतर त्या मुलाची बरीवाईट काहीच प्रतिक्रिया नाही? मग त्याचे याबाबत काही मत होते हे आधी दाखवण्याचे काही कारणच नव्हते. जरी कोर्टाची केस विरोधात लागली तरी पुरेसे पैसे मिळण्याची शक्यता वकील बोलून दाखवतात. आता यांच्या रेस्टॉरंटमध्ये दोनचार लोक सोडले तर कोणी फारसे दिसत नाही त्यामुळे नक्की काय स्वरुपाची अटॅचमेंट आहे हे कळले नाही. सोनाली कुलकर्णीची आजी तीनचार वेळा 'शून्यापासून सुरुवात' करण्याच्या अनुभवाच्या गोष्टी करते त्यामुळे ही अटॅचमेंटही लाँग टर्म नसावी असे वाटत राहते. याप्रकारच्या अनेक विसंगती आणि बिनबुडाचे fillers असल्याने कंटाळवाणी डोकेदुखी सुरु होते. Reinventing yourself अशी काहीशी थीम असली तर ती फार कंटाळवाण्या स्वरुपात येते.

गंध आणि अय्याची जातकुळीच वेगळी आहे

आक्षेप येथेच आहे. गंधच्या तुलनेत अय्या अगदी बटबटीत आणि cheap वाटतो. मनोरंजक चित्रपट करायला बटबटीतपणाच हवा असे नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रेस्टॉरंट मला dragging या अर्थाने रटाळ वाटला. संपता संपत नाही.

आता (तुमचा प्रतिसाद वाचल्यावर चित्रपटाचे विस्मरणात गेलेले काहि भागही आठवले) सहमत आहे Smile
मात्र मला तो आवडला तो वेगळ्या कारणांनी. उगाच लेक्चर बाजी वगैरे न करणे, प्रत्येक वेळी 'शब्द-संवाद' हेच संवादाचे माध्यम न मानणे, तत्कालीन हिशोबात सुचक तरीही नेटकी फ्रेम, अय्यातही जाणवली तशी फ्रेश रुपके आणि प्रतिमा

बाकी बटबटीतपणा हीच अय्यातील पात्रांची डिमांड आहे असे वाटते. गंधतील पात्रांच्या जातकुळीची तशी डिमांड नाही

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

गंध चित्रपट आवडला होता . त्यातल्या कोकणातल्या घराचे, पावसाचे चित्रीकरण सुरेख झाले होते .
संगीत श्रवणीय होते .सदाशिवपेठ प्रोडक्शनचा सिनेमा आहे हे वाचून हसू आले . फारसा चिक्कूपणा
केला नाही .अगदी कोकणातल्या खोल्यांमध्ये सुद्धा माणसे नीट दिसतील
इतका उजेड ठेवलाय .टायटल केप्शनसोबत इंग्लिश शब्द सूर इतके हिप्नोटिक, घनगंभीर ,पुरुष
स्वरात आहेत कि हे मराठी सिनेमाच्या सुरुवातीला ते प्रथम ग्रासे का आहेत हे आपण विसरूनच जातो.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तो आवाज आणि गाणे लेनर्ड कोहेनचे असावे असा माझा अंदाज आहे. चित्रपट काही बटबटीतपणा सोडल्यास आवडला. सोसो (सोनाली-सोमण) कथा शेवटी असायला हवी होती, असे वाटले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नेटफ्लिक्सवर 'अ पेक ऑन द चीक' हा तमीळ चित्रपट आहे. एका दत्तक घेतलेल्या लहान मुलीची (वय ८) तिच्या आईपर्यंत जाण्याची, तिला भेटण्याची कथा. लहान मुलीने अगदी मस्तं काम केलं आहे. चित्रपट तमीळ असला तरी इंग्रजी सबटायटल्स आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-अनामिक

'कनथ्थिल मुथमित्तल' हाच तो चित्रपट. गाणीही फार सुंदर आहेत या चित्रपटातील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चित्रपटाचे नाव तमिळमध्ये 'कन्नत्तिल मुत्तमिट्टाल' असे लिहिले आहे. एका गाण्यात देखील हे शब्द येतात. चित्रपट छानच आहे. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गेल्या आठवड्यात ब्लॅक स्वान पाहिला. असुरक्षितता आणि परिपूर्णतेचा हव्यास यामुळे बिघडत जाणारी नयिकेची मनस्थिती दाखवणारी उत्कृष्ट कथा, अतिशय प्रत्ययकारी दिग्दर्शन व छायचित्रण आणि नताली पोर्टमनचा अप्रतिम अभिनय यामुळे चित्रपट खूप आवडला.
एखादं पुस्तक वाचावं तसे नायिकेच्या भाव-भावनांचे पदर अक्षरश: कळतात हे फार कमी चित्रपटांमध्ये होतं. अर्थपूर्ण संवादांमुळे ती फक्त नायिकेची कथा न राहता आपण त्यात गुंतत जातो आणि चित्रपटाच्या शेवटी अंतर्मुख होतो. "Insecurity makes people vicious" हे वाक्य बराच काळ मनात रेंगाळत राहिले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

+१ अप्रतिम चित्रपट आहे. मी डाऊनलोडच करून ठेवला आहे. अंतर्मुख व्हायचा मूड आला की बघतो Wink
चित्रपट माध्यमाचा इतका सशक्त वापर फारच कमी बघायला मिळतो

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कधीपासून हा चित्रपट बघायचे मनात आहे पण वेळ असतो तेव्हा आठवणीत न राहिल्याने पाहिला गेला नाही. आता तुम्ही आठवण करून दिलीये तर या विकांतात बघायलाच हवा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

हा चित्रपट हॉरर असल्याचे दिसते. कितपत हॉरर आहे? नंतर अंधारात एकट्याला भीती वाटू शकते का? मला हॉरर चित्रपटांची शक्यतो भीती वाटते. त्यामुळे ब्लेअरविच प्रोजेक्ट नंतर मी हॉरर चित्रपट पाहण्याचे धाडस केलेले नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हॉरर नाहीये कै.. जरूर बघा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

धन्यवाद

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ब्लॅक स्वान पहायला घेतला होता एकदा...पण पाहू शकले नाही फारसा. नायिका तिच्या शरिरावरच्या जखमा सारख्या कुरतडत असते ते पाहून विचित्र वाटायला लागलं आणि पाहू शकले नाही हा सिनेमा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

महेश एलकुंचवार यांच्या अत्म्काथानावर आधारित नाट्य-प्रस्तुती आहे. हे नाट्य चंकू आणि सचिन खेडेकर सादर करतात. खासा एलकुंचवार टच आहे. जरूर पहावे .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अरे वा! मौनराग नुकतेच वाचले आहे. नाटक प्रायोगिक आहे का व्यावसायिक?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नाटक प्रायोगिक आहे का व्यावसायिक?

असं पहा... नाटकाचे प्रयोग होतात का? गल्ला भरतो का?

प्रयोग झाले, तर प्रायोगिक. गल्ला भरला (यानी कि धंदा म्हणजेच 'व्यवसाय' झाला), तर व्यावसायिक. दोन्ही झाले, तर दोन्ही. नाहीतर काही नाही. (बोले तो, 'न-नाट्य'.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खिक् Smile
मी विचारले म्हंजे, व्यावसायिक असल्यास तसे पेप्रात लक्ष ठेवायला. बहुतांशवेळा प्रायोगिक वाले अ‍ॅड देत नसावेत (इतकी महाग असते का एक अ‍ॅड.. कल्पना नाही म्हणून विचारतोय), त्यांना 'आजचे कार्यक्रम' या हुच्चभ्रु कॉलमात बघावे लागते Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

खिक्

तेवढे नका म्हणू हो, प्लीज! ती एक अर्वाच्य शिवी आहे, असे नुकतेच लक्षात आलेले आहे. (शिवीचा अर्थ समजलेला नसला, तरी.)

किंवा मग स्वतःचाच टीआरपी वाढवायचा असेल, नाहीतर 'मान्यवरां'ची वाहवा मिळवायची असेल, तर मग जरूर म्हणा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काल स्टार मूव्हीजवर जाँर्ज क्लूनीचा द डिसेडन्ट पाहिला
जाँर्ज क्लूनी देखणा आहेच पण त्याचा अप्रतिम संयत अभिनय चित्रपट अधिक सुंदर बनवतो

कथा थोडक्यात

मँट (जाँर्ज) होनोलूलू बेटावर स्थायिक झालेला एक वकील
त्याच्या कुंटुंबाचा मालकीचा एक ट्रस्ट असतो
काही कारणामुळे ट्रस्टची जमीन विकावी लागणार असते
मँट प्रोफेशनल आयुष्यात यशस्वी असला तरीही खाजगी आयुष्यात निराश असतो
दोन मुलीँचा बाप असलेला मँट पिता या संकल्पनेपासून कोसो दूर
बायको एलिझाबेथशीही वळीवाचे संबंध

जमिनिचा व्यवहार अंतिम टप्यात आलेला असताना
एलिझाबेथ बोटिँग अँक्सिडेँटमुळे कोमात जाते
पौँगंडाअवस्थेतिल मोठी मुलगी बंडखोर
त्यातच एलिझाबेथच अफेअरचा पत्ता लागतो
आणि मग मँटची परीक्षा सुरु होते

कशासाठी पाहावा
चित्रपटाची कथा सशक्त आहे
कामे ऊत्तम झालेली आहेत
वर म्हटल्याप्रमाणे जाँर्ज प्रभावी ठरलाय
सुरुवातीचा वडील या कल्पनेपासून दूर जाणारा
पण नंतर मुलीँमधे ऊत्तरोतर गुंतत जाणारा बाप त्यान समर्थपणे ऊभा केलाय
आपल्याच मुलीच्या तोँडून आईचे अफेअर ऐकताना त्याची झालेली अवस्था
एलिझाबेथच्या अवस्थेला आपणच कारणीभूत आहोत ही झालेली जाणीव
पत्नीशी असणारे भावबंध त्याने समर्थपणे दाखवलेत

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

द डिसेन्डण्टस पाहिला. झकास आहे. क्लूनी ने चक्क अभिनय केला आहे. स्क्रीनप्ले पण मस्त आहे. सगळ्यात मस्त जमलेला भाग म्हणजे सिनेमॅटोग्राफी. हवाई च चित्रण अप्रतिम आहे. ब्रोकबॅक माउंटन च चित्रीकरण पण असच अफलातून होत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

द डिसेडन्ट, आजच स्टार मुव्हीजवर बघितला. क्लूनीचा सासरा जेंव्हा त्याला, माझी मुलगी फेथफुल होती असे म्हणतो त्यावेळी क्लूनीचा अभिनय बघण्यासारखा आहे. बाकी सर्व पॉइंटस जाईच्या प्रतिसादात आलेच आहेत.
या चित्रपटाला डावलून मागच्या वर्षी 'आर्टिस्ट' ला ऑस्कर मिळाले त्याचे आश्चर्य वाटले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मँट? जाँर्ज???

काय तुम्हीही 'खिक्'पंथीय झालात की काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मँट? जाँर्ज???
काय तुम्हीही 'खिक्'पंथीय झालात की काय?

ती मोबाईलच्या फॉन्टची कृपा आहे. समजून घेणे Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

सेरा के या कवयित्रीचा अनुभव TEDवर पाहिला/ऐकला, त्यात तिने B आणि Hiroshima ह्या दोन कविता सादर केल्या आहेत, त्यातल्या B ह्या कवितेने क्लिपची सुरुवात होते, सादरीकरण व कविता दोन्हीही सुंदर आहे. कविता ऐकण्यासाठी व त्याचबरोबर कवितेचा अविष्कार, गोष्ट सांगण्याची कला कशी असावी हे समजण्यासाठी क्लिप जरूर पहावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आजच हा सिनेमा बघितला. आवडला. साधारण कथानक असं आहे की एक लेखक एका लेखिकेच्या पुस्तकाचं सिनेमाच्या स्क्रीनप्लेसाठी 'ऍडॅप्टेशन' करत असतो. त्या पुस्तकाचं नाव असतं 'द ऑर्किड थीफ'. साधी सरळसोट, कंटाळवाणी वाटणारी कथा. पण गमतीची गोष्ट म्हणजे तो जो स्क्रीनप्ले लिहीत असतो तो या सिनेमाचाच स्क्रीनप्ले आहे. 'ग्योडेल, एश्चर, बाख' मधल्या रिकर्सिव्हिटी आणि सेल्फ रेफरन्सची सगळी गंमत त्यात आलेली आहे. या सिनेमातलं पात्र या स्क्रिप्टविषयी बोलतं, स्क्रिप्ट लिहिण्याचा प्रयत्न करतं, स्क्रिप्ट लिहितं... बरं, हा गोंधळ इतक्याच पातळीवर रहात नाही. त्यात मूळ पुस्तक लिहिणाऱ्या लेखिकेची, ते लेखन करताना काय झालं त्याची गोष्ट आहे. त्या पुस्तकातला ऑर्किड थीफ या स्क्रिप्टमधलं प्रत्यक्ष कॅरेक्टर म्हणून येतं...

ऍडॅप्टेशन या शब्दावर श्लेष आहे - कारण डार्विनच्या भाषेत त्याला वेगळा अर्थ आहे. हा पैलूही यात अतिश छान येतो.

लेखनाविषयी शिकताना, त्या विचित्र ऑर्किडचा पाठलाग करताना हा स्क्रिप्ट रायटर आणि ती मूळ लेखिका दोघेही बदलून जातात... ऍडाप्ट होतात.

चित्रपटाच्या पहिल्या दोन तृतियांश भागात हे रसायन फारच उत्तम जमून आलेलं आहे. नंतरचा भाग काहीसा धक्का देणारा आहे. बदल हा स्थायीभाव असणं अधोरेखित करणारा कदाचित. थोडा गोंधळात टाकणारा. मला तो भाग बघताना सुरूवातीला वाटलं की आत्तापर्यंत जो प्रवाह चालला आहे तो बदलून अचानक विपरित वळण घेतलं की काय.... पण संपूर्ण सिनेमा बघितल्यावर त्या बदलाची गंमत कळते. संपूर्ण सिनेमाची गोष्ट सांगून त्याचं विश्लेषण करणं टाळून यापेक्षा अधिक मला काही लिहिणं शक्य नाही.

जरूर बघावा असा सिनेमा. नेटफ्लिक्सवर आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुन्हा एकदा पाहिला पाहिजे. बरेच वर्षांपूर्वी पाहिला होता तेव्हाही फार आवडला होता.

या चित्रपटाचा लेखक चार्ली कॉफमनचा 'इटरनल सनशाईन ऑफ द स्पॉटलेस माईंड' व्हॅलेन्टाईन डे च्या सुमारास टीव्हीवर लागला होता म्हणून पाहिला. स्पॉयलर अलर्ट. भावनाप्रधान गर्लफ्रेंड तार्किक बॉयफ्रेंडशी भांडून त्याच्याबद्दल असणार्‍या सगळ्या आठवणी पुसून टाकते. उद्वेगाने बॉयफ्रेंडही तिच्या आठवणी पुसून टाकतो. त्याच्या आठवणी पुसणं फार कठीण होतं, पण जमतं. लगेचच हे दोघे एकमेकांना अपरिचित म्हणून भेटतात, ओळख होते आणि एकमेकांकडे आकर्षित होतात. परस्परांना समजून घेण्याच्या गोंधळाची ही साय-फाय विनोदकथा!

त्याचाच 'बिईंग जॉन माल्कोविच'पण अशाच पद्धतीचा साय-फाय विनोदपट आहे. नवरा-बायको आणि नवर्‍याला ऑफिसात भेटणारी मुलगी. त्या तिघांचं आपसांतलं नातं, नवर्‍याचं या दोघींशी असणारं नातं आणि त्यात साय-फायची फोडणी. गोष्ट सांगितल्याशिवाय अधिक सांगता येणार नाही आणि गोष्ट लिहीण्यात मजा नाही. चित्रपटात मजेशीर कथा आणि लोकांचे विचित्र परस्परसंबंध आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

काल गंध अर्धवट पाहिला - पहिली गोष्ट खूप आवडली, पण दुसर्‍या गोष्टीने का कोण जाणे भयानक चिडचिड झाली, वाँग कार वाय आणि कीस्लोव्स्की चे ठळक संदर्भ पाहून, ते अगदी मॉड वातावरण, सोनाली कुलकर्णीचं कृत्रिम 'वाआआआआआव' म्हणणं... आज संध्याकाळी तिसरी गोष्ट पाहीन म्हणते.
पण पहिली गोष्ट छान होती - याच गोष्टीवरून 'अय्या' बनवला गेला का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दुसर्या भागाबद्दल अगदी सहमत, मला आवडलेला भाग म्हणजे शेवटचा. नीना कुलकर्णीचा अभिनय नेहमीप्रमाणेच अतिशय मस्तं आहे, साधी सरळ वाटणारी गोष्ट असली तरी भावभावनांचा गुंता अगदी छान मांडला गेलाय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मीदेखील दुसऱ्या भागाबाबत असेच लिहिले आहे. http://www.aisiakshare.com/node/1602#comment-22235
तिसरा भाग मलाही पहिल्यापेक्षा जास्त आवडला. भावभावनांच्या गुंत्यासोबतच कोकणचे वातावरण वगैरे छान जमून आले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डुप्लिकेट प्रकाटाआ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही डीव्हीडी ग्रंथालयात अचानक दिसली आणि फ्रान्सच्या 'सुपर टॅक्स'मुळे सध्या जेरार्ड दिपार्दुचं नाव फार वेळा वाचलं गेलं आहे म्हणून त्याचा 'Menage' (Evening dress) नावाचा चित्रपट आणला आहे.

उभयलिंगी संबंध ठेवणारा चोर एका मध्यमवर्गीय (= रटाळ आयुष्य, त्यामुळे करवादणारी बायको, तिच्यावर प्रेम असलं तरी ती सुखात नाही म्हणून तोंड लटकवणारा नवरा इ) जोडप्याच्या आयुष्यात येतो. दोघांनाही प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्या दोघांनाही स्वतःसारख्याच, स्थैर्य नसणार्‍या पण थ्रिल वाटणार्‍या आयुष्यातही ओढून आणतो. पुढे या तिघांच्या नात्यात काय मजा होते ते म्हणजे हा चित्रपट. त्यापुढे या चित्रपटाबद्दल कोणाला काही म्हणायचं असेल तर वाचायला आवडेल. जंतू, रुची, रोचना, धनंजय, नंदन ...?

सचिन कुंडलकरला 'कोबाल्ट ब्लू'ची कल्पना या चित्रपटावरूनही सुचली असेल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अवांतर - कोबाल्ट ब्लू माझे खूप आवडते पुस्तक. मी एकदा सचिन चा इंटरव्यू त्याच्या पुण्यात ल्या घरी घेतला होता तेंव्हा त्याचा औटोग्राफ माझया कडच्या कोबाल्ट ब्लू च्या प्रतिवर घेतला होता. बाकी आय्या आणि गंध ची बीज आपल्याला कोबाल्ट ब्लू मध्ये सापडतात. आपल्याला ज्याबद्दल त्याच्या शरीराला येणारा गंध ही थीम कोबाल्ट ब्लू मध्ये पहिले वाचायला मिळते. याच कल्पनेचा विस्तार सचिन ने नंतर गंध मध्ये व आय्या मध्ये केला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

'कोबाल्ट ब्लू' मलाही आवडली होती.

'मेनाज' आणि 'कोबाल्ट ब्लू' दोन्हीमधे फारच कमी साधर्म्य आहे. बायसेक्शुअल माणूस नवरा-बायको आणि बहिण-भाऊ या जोडीच्या आयुष्यात येतो आणि त्यांचं आयुष्य पुढे तसंच मध्यमवर्गीय रटाळ रहात नाही. सचिन कुंडलकरची मुलाखत कुठे प्रसिद्ध केली होती का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सन्डे ब्लडी सन्डे हा आज थोडा पाहिलेला चित्रपट देखील ह्याच धर्तीवर आहे, पूर्ण बघू न शकल्यामुळे चित्रपटाबद्दल अधिक सांगू शकत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अशात गिरिश जोशी-मुक्ता बर्वे ह्यांचं "फायनल ड्राफ्ट" पाहून आलो. आवडलं. मांडाणी छान; कंटाळवानी न होणारी; तरीही हल्ली बोअर होउ नये म्हणून विनोदाच्या नावाखाली नाटकात जो थिल्लरपणा चालतो; ते टाळणारी मांडणी.
सर्वांनी अवश्य पहावं असं सुचवू इच्छितो.
.
मागे एकदा माकडाच्या हाती शॅम्पेन पाहिलं होतं; त्याबद्दलही हेच मत.(त्यात पाच्-सात वेळेस आलेले my fair lady चे उल्लेख त्रासदायक वाटले. "आधी ते वाचून या; मगच नाटकाची मजा घ्या" असे काही नाटककारास सुचवायचे होते काय असे वाटून गेले.)
.
स्प्रुहा जोशी काम करीत असलेलं लाइफ पार्टनर का कुठलसं नाटक पाहिलं. संहितेपासून मुद्दाम आयटी-एम बी ए- मेट्रोअजीवनशैलीचे डोहाळे लागलेल्या मंडळींसाठी "फ्रेश लुक" देण्याचा प्रयत्न अगदि तोच तोचपणा वाटेल इतपत जाणवला. कलाकारांची चूक वाटली नाही.
.
राज्य एकांकिका स्पर्धेत पारितोषिक विजेत्या दोन प्रयोगांचे पुनःसादरीकरण पाहून आलो.
द मा मिरासदार ह्यांच्या कथेवर आधारित "दळण" धमाल; जबरदस्त अशी वाटली. ती कथा वाचून कुणी ह्याला रंगमंचावर मांडायचं म्हटलं तर कस्ली कटकट होइल असेच वाटेल. आधी कथा वाचावी; मगच ह्या चमूनं घेतलेले कष्ट जाणवतील.
.
चेकॉव्ह च्या गाजलेल्या कथांवर आधारित " दोन शूर " हा अप्रतिम एकांकी प्रयोग लगोलग पाहिला. निव्वळ सुम्दर, अप्रतिम. रंगमंचावर कंटाळ्वानी होउ न देता बैलगाडीतील दोन जनाम्च्या रात्रीतल्या गप्पा असा प्रकार आहे आख्ख्या प्रयोगात. तो मस्त जमून आलाय.
.
विनाशकाले विपरितबुद्धी म्हणतात तसे झाले आणि मग काही दिवसांनी inter IT एकांकिका स्पर्धा नामक प्रकार बघण्याचे धाडस केले.
पर्फेक्ट बोलीवूडचे भाउ शोभेल असे प्रकरण. उच्च निर्मितीमूल्ये; चकचकीतपणा; ठोंब्या पण सुबक आकर्षक ललना, काही ताम्त्रिक गिमिक्स; बिनदोक उथळ थिल्लरपणा(थैल्लर्य?) आणि सवंगपणाची भरमार; आणि एकांकिका सुरु असताना अचानक काहीजण कथा थांबवून हिंदी/इंग्लिश गाण्यांवर ड्यान्स करताना दाखवलेत.
ड्यान्स चांगलाच होता; साधारनतः डान्स इंदिया डान्स मध्ये कशी काही "इंडियातील" "यूथ" विविध लवचिक कसरत कवायती करतो ना; अगदि तसेच.
त्यातल्या त्यात शेवटचा प्रयोग cafe wordsworth हा आवडला. थिल्लरपणा जवळपास नव्हताच. अर्थातच त्याला पहिले बक्षिस मिळाले नाही.
.
माझा आवडता प्रकार म्हणजे अभंग ऐकणे. अभंग म्हटले की अजित कडकडे, सुरेश वाडकर ह्यांचीच नावं समोर येतात. मलाही ही मंडळी आवडातात हे नि:संशय.
पण ह्ह्याशिवाय काही अभंग गायक मंडळी मला आवडतात. त्यांच्या चाली ह्या कडकडे-वाडकर ह्यांच्या चालींहून बर्‍याच वेगळ्या आहेत. ग्रामीण ठेका, खर्डा बुलंद आवाज आणी एक रांगडा पण प्रेमळ्/आर्त भाव त्यांच्या गाण्यात मला जाणवला.
.
त्यांचे गायन -वादन ऐकणे ही एक पर्वणी आहे.
.
मला ही मंडळी भेटली दसर्‍याच्या दिवशी. मस्त गाणी म्हणत, घरोघर भिक्षा मागत ही फिरत होती. तो आवाज आणि त्या चाली भावल्याने इतरांपेक्षा मी बरीच अधिक रक्कम स्वतःहून दिली. पुन्हा पुन्हा त्यांचं गायन ऐकत पुढचे काही तास त्यांच्या मागे मागे फिरत होतो.
.

ह्यापुढे मला आवर्जून पहायला आवडेल, पहायचे शिल्लक आहे ते म्हणजे :-
१.अस्सल,पारंपरिक भारुड, भजन , कीर्तन, वासुदेव ह्यांचे सादरीकरण.
२.घाशीराम कोतवाल एकदा तरी पूर्ण पहावयाचे आहे; भलेही नव्या चमूचे का असेना. दीव्हीडीवर का असेना.
३."कळा ह्या लागल्या जीवा " व "चाहूल" बद्दल ऐकलय? नक्की चैन कुठे संपते, गरज् कुठून् सुरु होते ह्याबद्दल डोक्याचा भुंगा करणारी ही नाटके नाण्याच्या बरोब्बर विरुद्ध बाजू मांडतात. नैतिक मूल्ये, त्यांची कालसुसंगतता ह्याबद्दल बोलतात. पुणे ५२ बद्दल वाचल्यापासून हे पहावसं वाटतय.
३. "साठेचं काय करायचं" हे mediocre व्यक्तीची बोच दाखवणारं दोन अंकी.
४ "काटकोन् त्रिकोण " पण बरं आहे म्हणतात.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

माकडाच्या हाती शॅम्पेन हे नाटक मी पाहिलेले नाही. मात्र 'माय फेअर लेडी'च्या उल्लेखावरून 'बदाम राणी गुलाम चोर' हा चित्रपटही या नाटकासारखाच असावा असे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>फ्रान्सच्या 'सुपर टॅक्स'मुळे सध्या जेरार्ड दिपार्दुचं नाव फार वेळा वाचलं गेलं आहे म्हणून त्याचा 'Menage' (Evening dress) नावाचा चित्रपट आणला आहे. <<

हा चित्रपट मला खूप वर्षांपासून पाहायचा आहे. त्यामागची कारणं -
बर्त्राॅ ब्लिए हा त्याचा दिग्दर्शक एकेकाळी फार वेगळे आणि दमदार चित्रपट करत असे. फ्रान्सबाहेर त्याचं नाव अनेक सिनेरसिकांना अपरिचित असतं, पण त्याचा 'ले वाल्सज' हा खुद्द दपार्दिअच्या मते त्याचा अभिनेता म्हणून कस पाहाणारा एक चांगला चित्रपट आहे. त्यातही 'मेनाज'मधली मिऊ-मिऊ ही अभिनेत्री आहे. पात्रिक दवेर हा एक अत्यंत सशक्त अभिनेता त्यात त्रिकोणाचा तिसरा कोन आहे. 1968नंतरच्या लैंगिक स्वातंत्र्याच्या वातावरणात स्त्री-पुरुष संबंधांविषयी जे वेगळे विचार मांडले गेले त्याचं एक टोक या चित्रपटात पाहायला मिळतं. पहिल्या पंधरा मिनिटात 'हे काहीतरी गलिच्छ आहे' असं ठरवून जुन्या पिढीतले लोक बाहेर पडत असत, पण तेव्हाच्या तरुण पिढीत तो बऱ्यापैकी लोकप्रिय झाला. याउलट त्याचा 'ब्यूफे फ्र्वा' हा खूप वेगळ्या शैलीतला, गुंतागुंतीचा पण पुन्हा चांगला चित्रपटही पाहिला आहे. दपार्दिअ, दवेर आणि इतर अनेक नटांच्या करिअर ब्लिएमुळे उभ्या राहिल्या असंही म्हणता येईल. एकंदरीत सत्तरच्या दशकातला एक महत्त्वाचा दिग्दर्शक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सबिहा सुमर या पाकिस्तानी दिग्दर्शिकेचा 'खामोश पानी' (नेटफ्लिक्सवाल्यांसाठी Silent water) पाहिला. (मागे बहुदा ऋषिकेशनेही याच चित्रपटाबद्दल लिहीलं होतं.)

१९७९ साली घडणारी कथा. पाकिस्तानातलं एक पंजाबी खेडं. सुरुवात पाहून हे पाकिस्तान आहे का भारत हे समजूही नये एवढे तिथले लोक, विशेषतः स्त्रियाही पंजाबी. तिथे रहाणारी आयेशा चाची सगळ्यांना धरून असणारी, सगळ्यांचं तिच्याबद्दल मतही चांगलं. इस्लामाबादमधे अचानक झुल्फिकार अली भुत्तोच्या जागी झिया उल हक येतो आणि या खेड्यामधे लाहोरचे दोन तरूण. गावातलं वातावरण बदलू लागतं. आयेशाचा तरूण मुलगा या बाहेरच्या मूलतत्त्ववाद्यांच्या कळपात दिसू लागतो. आई आणि प्रेमिकेच्या समजावणीकडे साफ दुर्लक्ष करून तो 'देशासाठी' काहीतरी म्हणून मुलींच्या शाळेसमोर असणारी भिंत, मुलींच्या रक्षणासाठी उंच करणे वगैरे कामं करायला लागतो.

(किंचित रहस्यभेद असल्यामुळे पुढचा परिच्छेद करड्या रंगात लिहीलेला आहे.)
आयेशा बाकी फार मनमिळाऊ, प्रेमळ स्त्री असली तरीही तिचाही एक हळवा कोपरा आहे. ती कधीच विहीरीवर जात नाही. तिचा भूतकाळ सतत वेगवेगळ्या प्रतिमांमधून आता तिला छळायला लागतो. गावात जेव्हा शीख यात्रेकरू येतात तेव्हा तो भूतकाळ पारच उघडा पडतो. वीरो म्हणून शीख घरात जन्माला आलेली ती, फाळणीच्या वेळेस विहीरीत जीव देत नाही. पळून जाते. मुस्लिम हिंसक तरूणांपासून तिला वाचवणार्‍याशी ती आयेशा बनून लग्न करते. ही माहिती उघड झाल्यानंतर मुलगा तिच्यापासून दुरावणं आणि गावाने तिला वाळीत टाकल्यागत वागणं तिला सहन होत नाही.

विहीरीतलं पाणी १९४७ ते १९७९ शांत असतं. ते पुन्हा एकदा डुचमळतं. ज्या विहीरीपासून वीरो पळून जाऊन जीव वाचवते तीच विहीर, तेच पाणी आयेशाला शांत करतं.

फाळणीच्या वेळेस सक्तीने झालेलं स्थलांतर, कुटुंबाची इभ्रत राखण्याकरता झालेल्या (शीख) स्त्रियांच्या कत्तली आणि 'वाचलेल्या' स्त्रियांवर झालेले अत्याचार तीस वर्षांत लोकांनी मागे टाकलेले आहेत. खेडं पाकिस्तानातलं असो वा भारतातलं तिथे रहाणार्‍या सामान्य लोकांना धर्म, धार्मिक प्रचार यांच्याशी काहीही घेणं देणं नाही. आपल्या घरात येणार्‍या गव्हाचा भाव त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाचा आहे. अशा गावातल्या तरूणांना पट्टी पढवून कडवे धार्मिक, मूलतत्त्ववादी बनवणं आणि त्यांनीही या गोष्टींना बळी पडणं, सामान्य लोकांना बसलेली दहशत आणि या सगळ्या मूलतत्त्ववादासमोर मान न झुकवणारे मोजकेच लोक हतबल असणं या बाबतीतही पाकिस्तान काय, भारत काय!

यूट्यूबवरही 'खामोश पानी' सलग फीतीत उपलब्ध आहे.

'अ वेन्सडे' किंवा 'मुंबई मेरी जान' बनवताना भाषणबाजी केलीच पाहिजे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

'खामोश पानी' आणि 'पिंजर' एकाच वर्षात आले होते, हाही अर्थपूर्ण योगायोग. मला फार आवडतात हे दोन्ही सिनेमे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

२००९ सालचा चित्रपट.

आशयसूत्र देतो आहे. ज्यांना चित्रपट पहायचा आहे त्यांनी उत्कंठा कायम राखायच्या दृष्टीने न वाचलेलं चालेल.
आशयसूत्र : सुरवात

खोट्या आरोपाखाली अडकलेला, पदच्युत झालेला एक प्रामाणिक आणि धाडसी पत्रकार. बालपणापासून हालहाल झालेली आणि त्यामुळे बनलेल्या धारदार, टोकाच्या गुंतागुंतीच्या व्यक्तित्त्वाची एक "कंप्यूटर हॅकर" मुलगी - ड्रॅगनटॅटूवाली.

एका अतिश्रीमंत घराण्यातल्या, सुमारे पंचेचाळीस वर्षांपूर्वी हरवलेल्या मुलीच्या शोधात असलेला तिचा काका. त्या घराण्यातर्फे एक व्यक्ती या पत्रकाराचा शोध घेत येते. या शोधप्रक्रियेचं काँट्रॅक्ट मिळालेली उपरोक्त मुलगी त्या पत्रकाराचा कंप्य्युटर हॅक करते. हरवलेल्या मुलीच्या शोधप्रक्रियेत त्या पत्रकाराला सामील होते नि त्याच पत्रकारामधे गुंतल्यासारखी होते.

हरवलेल्या मुलीच्या शोधाची गुंतागुंतीची प्रक्रिया रक्तलांच्छित प्रकरणांनंतर यशस्वीरीत्या संपते. पत्रकाराच्या आयुष्याच्या सावलीत काही काळ राहिलेली कंप्यूटर हॅकर ड्रॅगनटॅटूवाली कुठल्याच बंधनात न अडकण्याकरता निघून जाते...

आशयसूत्र : अखेर

नंतर वाचताना कळलं की युरोपमधे हा सिनेमा भरपूर लोकप्रिय झालेला होता. याचाच अमेरिकन रिमेकही बनला परंतु फारसं यश मिळालेलं दिसत नाही. मेटाक्रिटीक् आणि रॉटन टमेटोज् या सायटींवर या स्वीडीश सिनेमाला मिळालेलं गुणांकन चांगलं आहे.

आजवर भारतीय, हॉलीवूड आणि युरोपीय चित्रपट पहायच्या (अतिमर्यादित) अनुभवांनंतर मला असं जाणवतं की माणसांच्या एकमेकांशी असलेल्या संबंधांचं चित्रण या तीन प्रकारांमधे क्रमाक्रमाने कमी मेलोड्रमॅटिक, अधिकाधिक "ग्रिटी" झालेलं मला जाणवलं. चित्रपटातल्या नायकाचा भाग महत्त्वाचा असला तरी (अगदी) नावापासून हा चित्रपट नायिकेचा आहे यात कसलीच शंका नाही. (गंमत अशी की, नायिकेचा "स्क्रीन टाईम" नायकापेक्षा नक्कीच कमी आहे. ) वर उल्लेख केलेली दोन-तीन कथानके एकमेकांमधे फारच चांगली गोवली आहेत. कथानकाचा वेग चांगला; परंतु कुठेही कथानक घिसाडघाईत संपवल्यासारखं वाटलं नाही. (म्हणूनच अडीच तास सिनेमा चालतो.) नायक-नायिकेच्या संबंधांच चित्रण निश्चितच अनोखं, वेधक झालेलं आहे. एक छोटासा(पण कदाचित नातेसंबंधांच्या बाबतीत कळीचा) प्रसंग मांडतो नि थांबतो.

तरुणशा नायिकेपेक्षा वयाने बराच मोठा पत्रकार नायक एका छताखाली राहत आहेत. त्यांच्यात आजवर कुठलीही नाजूक देवाणघेवाण झालेली नाही. (नायिकेच्या बाबत "नाजूक" असं काही नाही. सारं एकदम थंड सुरीच्या धारेसारखंच.) एका रात्री नायक दमून झोपतो. नायिका त्याच्याजवळ येते. त्याच्यावर स्वार होते. दोघांचा समागम सुरू व्हायच्या आधी नायक "तुझी नक्की खात्री आहे ना ?" अशा अर्थाचं विचारतो. ती हुंकार भरते. समागम झाल्यावर ती आपल्या खोलीत झोपायला निघून जाते. दुसर्‍या दिवशी सकाळी नायक तिला ब्रेकफास्ट बनवून द्यायच्या वेळी स्मितहास्य करत काहीबाही विचारतो. ती काहीही नवं न घडल्यासारखी हो नाही करते. या प्रसंगातला नर्मविनोद फारच आवडला.

असो. चित्रपट मनोरंजक आणि अनोखा वाटला. शिवाय आठ मार्चला अभावितपणे नायिकाप्रधान सिनेमा पाहायचं पुण्यही मिळवून देणारा Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

Smile चित्रपट पाहीले नाहीत पण सिरीज वाचली आहे. लिसबेथ खूप खूप आवडली.
स्विडिश मधे तिन्ही चित्रपट आलेत. इंग्रजीमधे पहिल्याच चित्रपटाने गल्ला न जमवल्याने (डार्क मुवी ख्रिसमसला रिलीज केल्यावर काय होणार? परत ब्रुटल रेप चे फार एक्स्प्लिसीट सीन आहेत) पुढचे बनतील की नाही शंका होती, पण fb वर काही दिवसांपुर्वी वाचलेलं की, पुढच्या दोन्हीवर काम सायमल्टेनिअसली चालु केलेलं आहे. २०१४ मधे येतील. समिक्षकांनी चित्रपटाच, खास करुन रुनी चं फार कौतुक केलेलं, ऑस्कर नॉमिनेशन देखील होतं.
imdb वर देखील स्विडीश ला जास्त रेटिँग आहे. पण सिनॉप्सिस वाचल्यावर मला इंग्रजी चित्रपट पुस्तकाशी जास्त प्रामाणीक वाटला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुळचा स्विडीश सिनेमा (भाग १) चांगला आहे, मात्र भाग २ 'a girl who played with fire' निराशा करतो, कथेत दम नाही किंवा/व सादरीकरण थोडेफार बॉलीवूड-टाईप वाटले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यु ट्यूबवर मिळणाऱ्या सिरिअल्स बघणे चाललंय, डीटेक्टीव्ह व्योमकेश बक्षि, हम सब एक है, इत्यादी
लहानपणी बघितल्या असाव्यात, आता आठवत पण नाहीये,मजा येतीये ..

या आधी प्रिझन ब्रेक संपवली. इथे कधी उल्लेख झालेलं नाहीये पण बहुतांश मंडळीनी बघितली असावी असे उगाच वाटतंय. प्रिझन ब्रेक पलायन कथा आहे..एखाद्या गोष्टीपासून दूर, मनासारख्या जागी जाण्यासाठी केले जाणारे प्रयत्न..डेझरर्टरमध्ये गन्थर युद्धापासून दूर, आपल्या आईकडे जाण्यासाठी पळत असतो. इथे कथानकाचे हिरो तुरुंगातून दूर, सामान्य आयुष्यासाठी पळत असतात...त्यात आलेल्या अनपेक्षित प्रसंगांमुळे सिरिअल फार सुंदर बनली आहे...
बहुतांश लोकांना तुरुंगातल्या घटना असेलेला भाग जास्त आवडतो, मला प्रिझन फोडल्यावर हिरोच्या मागे त्याच्या इतक्या डोक्याचा एफबीआय एजंट लागतो तिथला भाग सर्वोत्तम वाटला..अप्रतिम कामे आहेत. शेवटपर्यंत बघायला लावणे,उत्सुकता टिकवणे, हेच या प्रकाराचे यश असते,आणि यात प्रिझन ब्रेक संपूर्णपणे यशस्वी झालेली आहे..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शटर आयलंड पिच्चर पाहिला. मस्त खिळवून ठेवणारा आहे. पण शेवटच्या अनिश्चिततेने बॉलिवुडी मनाला वेदना झाल्या. लिओनार्डोबद्दल वाटत राहणारी सहानुभूती तशीच राहते पण डागदर वैग्रे लोक हरामी आहेत असे वाटते ते नंतर कळते की ते तादृश हरामी नस्तात. पण जॉर्ज नॉइस आणि रेचेल सोलँडो यांचे गूढ नै उकलले. अंमळ डोसक्याला तरासच झाला म्हटले तरी चालेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आशयसूत्र म्हणावं तर इतकंच की ब्रिटनमधून काही पेन्शनर्स राजस्थानमधल्या एका हॉटेलात रहायला येतात. हॉटेलची अपुरी परंतु रंजक व्यवस्था आणि त्यांच्या उत्तरायुष्यामधे या वास्तव्यानिमित्त घडलेलं नाट्य - आयुष्याला लागलेली वळणे.

चित्रपटाचं वर्णन "फील गुड" सिनेमा इतपत करता येईल. उत्तम नट-नट्या घेतल्यामुळे त्यांच्या अभिनयाची लज्जत लुटली. बाकी अनेक ठिकाणी "समजून घेत घेत" सिनेमा पाहिला.

बर्‍याचदा सिनेमे पाहिल्यावर त्याच्याबद्दलची माहिती मी वाचतो. प्रस्तुत चित्रपट पाहताना जी नाट्यपूर्ण कलाटणी माझ्यापर्यंत पोचू शकली नव्हती ती त्याच्याबद्दल वाचताना जाणवली. सिनेमा फक्त १० मिलियन डॉलर्समधे बनला आणि त्याच्या सुमारे पंधरापट उत्पन्न त्याने मिळवलं. अनेक स्टुडिओजनी चित्रपट बनवायला नकार दिला होता. आता याचा सीक्वेल बनायच्या दृष्टीने तयारी चालू आहे ! (तो सीक्वेल फारसा उत्साहवर्धक नसेल ही बाब निराळी !) Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

The Best Exotic Marigold Hotel

फारश्या अपेक्षा न ठेवता पाहिलात तर मजेशीर आहे. करमणूक करेल.

पण फार खोलात जाऊ नका. आता भारतासारख्या एक्झॉटिक देशात आलेले म्हातारे ब्रिटिश लोक. त्यांची सेल्फ डिस्कवरी झाल्याशिवाय दिग्दर्शक त्यांना सोडेल का? तो "प्रवास" वगैरे होताना इंग्लिश्/अमेरिकन प्रेक्षकवर्गाला भारतावरच्या चित्रपटाकडून असणार्‍या अपेक्षा पूर्ण करत करत एकेक चेकमार्क (टिकमार्क) देत कथा पुढे जाते:

- रेसिस्ट स्त्रीचे परिवर्तन, चेक! त्यात सूक्ष्म वर्णवर्चस्ववाद (subtle racism) वगैरे नाही. रेसिस्ट म्हणजे कल्लू डॉक्टरच्या रंगावर उघड केलेली कॉमेंट. कोणाला शंका राहायला नको.
- भारतात आल्या आल्या रस्त्यावर हत्ती, चेक. नंतर उंट? चेक!
- गाडीकडे धावणारी गरीब मुले
- एक "एक्झॉटिक" मृत्यू, मग दहन वगैरे
- भरपूर रंग
- एक 'गे' व्यक्ती
- आवडत नसताना चुकीच्या लग्नात अडकलेले नवराबायको वेगळे होणे, दोघांना लागलेला स्वतःचा शोध ई.
- स्टीरीओटाईप "भारतीय" लूक असलेली हीरॉइन. बॉलीवूड मधे ज्याप्रमाणे "सर्वसाधारण भारतीय तरूणी" ही कत्रिना/करीना/दीपिका/ऐश्वर्या सारखी दिसली पाहिजे हा हट्ट असतो तसाच या परदेशी चित्रपटांत ती मिसिसिपी मसालातील सरिता चौधरी सारखी दिसली पाहिजे हा असतो.
- अरेंज्ड मॅरेज वरची चर्चा

मात्र टॉम विल्किन्सन क्रिकेट खेळतो तेव्हा अस्सल वाटतो. एक बॉल मारल्यावर पुढचा चॅलेंज म्हणून टाकलेला बॉल तो न मारता बाजूला का होतो? काहीतरी सखोल गूढ कारण असावे. तो यॉर्कर मला बाउन्सर गेला Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा चित्रपट रांगेतून बाद केला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अदिती, तो वाईट नाही चित्रपट. नक्कीच बघण्यालायक आहे Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ते चेकलिस्ट कथा म्हटलेलं अगदी पूर्ण पटलं. पहायला हवाच असा मुळीच नाही...पण पहिला, तर थोडी करमणूक नक्की होईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बहुचर्चित बालक पालक (बीपी) हा चित्रपट पाहिला. खूपच आवडला. हॅट्स ऑफ टू रवी जाधव. चित्रपटाचे चित्रीकरण (सिनेमॅटोग्राफी) अत्यंत उच्च दर्जाचे वाटले. चित्रपटातील गाणी विशेष आवडली. कल्ला, ढिंचॅक-ढिंचॅक आणि सुसंगती सदा घडो ही तीन गाणी अनेकदा ऐकावीशी वाटली. सर्वच मुलांनी फार छान कामे केली आहेत. चिऊचे काम करणारी मुलगी मस्त गोड आहे. संवाद अगदी जिवंत खरेखुरे वाटावेत अशा मराठीत आहेत. अवश्य पाहावा असा चित्रपट. संधी मिळाल्यास थिएटरमध्येच पाहावा. मला दुसरा पर्याय नसल्याने टॉरंटवर एक वाटरमार्क असणारी बरी प्रत मिळाली होती त्यावर भागवावे लागले.

या चित्रपटाने पौगंडावस्थेतल्या अनेक आठवणी जागवल्या. 'सुसंगती सदा घडो'ची एक आठवण झाली. लहानपणी यातील 'विषय सर्वथा नावडो'चा अर्थ कळत नसल्याने 'विषय' म्हणजे काय हा प्रश्न विचारून अस्मादिकांनी पिताश्रींचे (विनाकारण) रट्टे खाल्ले होते हे आठवले. शेवटी आम्ही आमचा एक विशू शोधून विषयासंबंधी आवश्यक ते(!) ज्ञान प्राप्त केले व विषय हा अत्यंत आवडीचा विषयही काही वर्षे झाला. प्रसंगोपात हळूहळू घरी प्रश्न विचारणे बंदच झाले व त्या विषया संबंधातील चर्चांमधील गंमतही कमी झाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा सिनेमा कुठे/कशावर पाहिला सांगता येईल का ?

ता क . सॉरी. तुम्ही ते प्रतिसादामधे म्हण्टलं आहे. नीट वाचलं नव्हतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

latestmovieblast.blogspot.in येथे मला त्याचा दुवा मिळाला. त्यातील 'पूर्ण फाईल' स्वरुपाची प्रत उतरवून घेतल्यास पाहता येईल. शक्यतो व्हीएलसी प्लेअरवर पाहावे म्हणजे एनकोडिंग वगैरेच्या अडचणी येणार नाहीत. मात्र या प्रतीत 'For Festival' नावाचा एक वॉटरमार्क पूर्ण चित्रपटभर दिसत राहतो. तो आपणास दिसतच नाही असे मानून चालायचे. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

+१०००००००००००००००००००.

अप्रतिम पिच्चर आहे. नासदीयसूक्तभाष्यामुळे विशू बनण्यास अस्मादिकांना कोणतीही अडचण आली नाही. शिवाय कधी काही विचारले तरी तीर्थरूपांचे रट्टेही कधी खावे लागले नाहीत. तसे ते लैच समजूतदार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

चिऊः अरे ह्याला नासदीयसूक्तभाष्य पण माहिती आहे.
विशूः हो, कारण विषय नासदीयसूक्तभाष्याचाच आहे.

Wink

विशूची एण्ट्री लईच जबऱ्या राव. आज परत एकदा बघणार. कारण विषयच ऐतिहासिक आहे. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा हा हा Wink लय जबर्‍या पिच्चर आहे Smile

चिऊ-विशू स्टाईल जमलीय एकदम Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

The two most important days in your life are the day you are born and the day you find out why - Mark Twain

Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सदर चित्रपटाचे एक उत्कृष्ट परीक्षण येथे वाचले. पुणे ५२ च्या धर्तीवर चिंतातुर जंतू यांनीही या चित्रपटासंदर्भात काहीतरी लिहावे असे वाटते.

http://apalacinemascope.blogspot.com/2013/01/blog-post.html

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ज्यावर हा 'बीपी' चित्रपट बेतला आहे, ती मूळ 'बीपी' नावाची महाविद्यालयीन एकाङ्किका काही वर्षाम्पूर्वी पाहिली होती. नुसत्या नांवावरून त्यावेळी काही कळले नव्हते. एकाङ्किका सम्पल्यावर 'बीपी'चे 'ब्लू-प्रिण्ट' ('ब्लू-फिल्म'जवळ जाणारे) हे उलगडलेले नांव असावे का, असा थोडा कयास बान्धला होता. पण पटले नव्हते. तसा उल्लेख संवादान्त आल्याचे आठवत नाही. 'बालक-पालक' असे अपेक्षित होते हे आत्ता चित्रपट आल्यावर कळले. पण 'बीपी'चा अजून छुपा अर्थ असावा असे वाटते. त्यावेळी ती एकाङ्किका विषयाच्या हाताळणीमुळे आणि प्रश्नाला थेट सामोरे जाऊन लिहीलेल्या संवादाम्मुळे आवडली होती. काम करणारी मुले तर एकाङ्किकेत अक्षरशः सळसळत होती. चित्रपट पाहायला हवा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आमच्या काळी बीपीचा उलगडा हा भक्त प्रल्हाद असा होत असे. काही मुले ब्लू पिच्चर असेही म्हणत मात्र भक्त प्रल्हाद या उलगड्याला बऱ्यापैकी सर्वमान्यता होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आमच्या वेळीही हा उलगडा सर्वमान्य होता. २००५ पर्यंतच्या मिरजेबद्दल मी खात्रीशीर सांगू शकतो. नंतरचे माहिती नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बघेन बघेन करत राहून गेलेला एकदाचा ओह माय गाँड बघितला
मस्त पिक्चर आहे
कानजी व्हर्सेस कानजी या मूळच्या गुजराती नाटकाचे चित्रपटीकरण आहे
मराठीतही मकंरद अनासपुरेचे केशवा माधवा हे नाट्यरुपांतरण आहे

कथा थोडक्यात
कांजीलाल हा नास्तिक मनुष्य देवाच्या मूर्त्या विकण्याचा बिझनेस असलेल्या व्यापारी
ऐके दिवशी भुकंपाचा धक्क्याने त्याचे दुकान ऊध्दवस्त होते
इन्शुरस कंपनीच्या भूकंपाला अँक्ट आँफ गाँड ठरवण्याच्या आणि पर्यायाने भरपाई न देण्याच्या निर्णयाने तो खवळतो
आणि देवाला कोर्टात खेचण्याचा निर्धार पक्का करतो.
त्याच्या हा लढा म्हणजेच ओह माय गाँड

कशासाठी पाहावा
परेश रावलसाठी
छान अभिनय करतो नासिरच्या सर या चित्रपटानंतर प्रथमच आवडला
मध्यतरी हेराफेरी रिटर्न्स वगैरे मुळे हरवलेली लय त्याला पुन्हा सापडली असावी
कमालीचा नास्तिक त्याचवेळेला धंदेवाईक टिपीकल मध्यमवर्गीय गुज्जु छान साकारलाय
विशेषत कोर्टरुम ड्रामातला अभिनय टाळ्याखेचक

अक्षयकुमार छोट्याशा भूमिकेत आहे पण लक्षात राहतो

गोविँद नामदेवची धर्मगुरु भूमिका अपेक्षेप्रमाणे
मिथुन चक्रवर्तीची श्री श्री रविशंकरची काँपी हास्यास्पद वाटली
पूनम झंवरची राधेमाँ विशेष काम नाही पण तिचा मेकप डिट्टो आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

वरातीमागून घोडे ही परंपरा पाळत परवा हे दोन अंकी नाटक पाहिले. नाटकातल्या ब्राह्मण, मराठा, शिवसेना यांच्या प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष विरोधाबद्दलच जास्त चर्चा झालेली आहे. नाटक काहीसे प्रचारकी ढंगाचे असले तरी आवडले. दलित आणि मुस्लिमांच्या व्यथा मांडायच्या तर त्यासाठी ब्राह्मणांना टार्गेट केलेच पाहिजे का वगैरे असे काही मूलभूत प्रश्न डोळ्यांआड करता आले ('संभाजी महाराजांना ज्या पद्धतीने मारले ती बघता तिच्यामागे मनुवाद्यांचा हात दिसतो' वगैरे ताबडतोब बालीश तर्क वगैरे) तर नाटक मनोरंजन करते. फक्त मनोरंजनच. विचारांची घुसळण वगैरे करायला लावण्याच्या दृष्टीने बाकी हे नाटक उथळच वाटते. शिवाजी या माणसाचे आणि कल्पनेचे अपहरण करणार्‍या शिवसेनेवर थेट भाष्य आणि टीका करण्याचे धाडस नाटककर्त्यांनी दाखवले आहे हे विशेष. शिवसेनेने राडा करुन या नाटकाचे प्रयोग बंद पाडलेले नाहीत यावरुन ही टीका थोडीशी क्रिप्टीक आणि विचार करणार्‍यांनाच समजणारी अशी आहे, हे ध्यानात येते. शिवाजी या कल्पनेला आता दलित आणि मुस्लिम यांनी एकत्र येऊन मराठ्यांकडून-शिवसेनेकडून परत हिसकावून घ्यावे असला काही रामदास आठवले टाईप आक्रस्ताळा संदेश या नाटकातून जात असेल तर मग मात्र कठीण आहे.
प्रेक्षागृहात शंभर-दीडशे प्रेक्षक होते. चुकीच्या जागी, खांडेकरी दवणट वाक्यांना टाळ्या वगैरे प्रकार आता सवयीचे झालेले आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

आजकाल पुरोगामी म्हणवायचं तर त्या अटींमध्ये शिवाजी 'क्षत्रियकुलावतंस गोब्राह्मणप्रतिपालक' नव्हता हे सिद्ध करायच्या मागे लागायचे हे एक कलम वाढवले आहे.
खरं म्हणजे, सात आंधळे हत्तीला शोधतात तसे आहे शिवाजीचे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

+१.

सात आंधळ्यांचा दृष्टांत एकदम चपखल आहे. बाकी आजकाल पुरोगामी म्हणवून घेण्यासाठी प्रत्यक्ष इतिहासातील पुराव्याला बगल देणारेही लै झालेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आर्गो पाहिला. मस्त टाईट पिच्चर आहे. पण टिपिकल हॉलीवुडी आहे. अशा पिच्चरांमधूनही बाहेर यावे असे वाट्टे अलीकडे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

"बरन" : इराणी दिग्दर्शक मजिद मजिदी यांचा २००१ चा सिनेमा.

दिग्दर्शकाबद्दल ऐकलं होतं पण पहायचा योग येत नव्हता. पण अलिकडे पाहिलेल्या अ सेपरेशन या इराणी चित्रपटानंतर औत्सुक्य नक्की वाढलं होतं.

"बरन" ने माझी बिलकुल निराशा केली नाही. चित्रपट अतिशय आवडला.

स्पॉईलर : सुरवात

१९७७ च्या रशियन आक्रमणानंतर अफगाणिस्तानातले लाखो लोक - त्यापैकी अनेक कुर्द वंशाचे लोक - शेजारच्या राष्ट्रांमधे बायकामुलांसकट पळून गेले. यापैकी काही इराणमधे आले. या लोकांच्या पुढच्या पिढ्या इराणमधेच वाढल्या.

असं असूनही या "निर्वासित" अफगाण लोकांना इराणसारख्या ठिकाणी दुय्यम स्वरूपाचं नागरिकत्वच मिळालं. त्यांना त्यांची वेगळी ओळखपत्रं दाखवणं आवश्यक बनलं. या बहुतांश लोकांची आर्थिक स्थिती निम्नस्तराचीच राहिली.

कथानक घडतं इराणमधल्या एका इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी. एका अफगाण मजूराचा काम करताना पाय मोडतो. दुसरे दिवशी त्याच्या मुलीला - मुलाचा वेष परिधान करून - दुसरा एक बुजुर्ग कामाला आणतो. बांधकामाच्या ठिकाणी एक पोरगेलेसा इराणी मुलगा चहा-नाश्ता पुरवण्याचं काम करत असतो. त्याच्या स्वतःच्या काहीशा माथेफिरू स्वभावामुळे त्याची भांडणं होतात नि एके दिवशी त्याची चहा-नाश्ता बनवायची नोकरी जाते नि त्याला कष्टाची कामं करायला सुरवात करावी लागते. या प्रसंगी केवळ निमित्तमात्र ठरलेल्या या नव्या "पोराला" ती चहा-नाश्ता बनवण्याची नोकरी मिळते नि त्यामुळे इराणी मुलगा या नव्या पोरावर दांत ठेवून असतो.

एके दिवशी त्या इराणी पोराला कळतं की हा नवा अफगाण पोरगा म्हणजे पोरगीच आहे. तो या मुलीच्या एकतर्फी प्रेमात पडतो. कामावर असताना तिच्या मागेमागे जाऊ पहातो. पण संवाद असा शक्य होत नाही.

या बांधकामात अफगाणी कामगारांचं काम करणं बेकायदेशीर असतं. एक दिवस अचानक बांधकाम विभागाचे अधिकारी इन्स्पेक्शनला येतात नि या नव्या अफगाण "पोरा"ला पकडू पहातात. इराणी मुलगा त्या अफगाण पोरीला सुटायला मदत करतो नि या भानगडीत त्याला अधिकार्‍यांमार्फत दंड सोसावा लागतो, मालकाची कानउघाडणी ऐकावी लागते.

सर्वच अफगाण मजूरांच्या नोकरीवर गंडांतर येते. पर्यायाने "ती" अफगाण मुलगीही निघून जातेच. इकडे हा इराणी पोरगा तिच्याकरता व्याकूळ होतो. सुटी काढून तिचा पत्ता शोधत येतो. तिला कळू न देता तिच्या हालअपेष्टा दूरून पहातो. आणखी कष्टी होतो. गुप्तपणे तिच्या कुटुंबाला मदत करू पाहतो. त्यापाई आपली जन्माची कमाई गमावतो, इतकंच नव्हे तर आपला कामाचा परवानाही जामीन ठेवतो. या सार्‍या देवाणघेवाणीत त्या मुलीशी एकही शब्द बोलणं काही त्याला जमत नाही. शेवटी शेवटी त्या मुलीला "हा आपली मदत करतो आहे" इतपत कळतं इतकंच.

शेवटी त्याच्या मदतीनंतर त्या अफगाण मुलीचं कुटुंब मायदेशी जायला निघतं. त्यावेळी मूकपणे एकमेकांबद्दलच्या कोमल भावना एकमेकांपर्यंत काही क्षणांपुरत्या व्यक्त केल्या न केल्याशा होतात. पावसात उमटलेल्या तिच्या पावलाकडे तो पाहताना चित्रपट संपतो.

स्पॉईलर : अखेर

अनेकानेक बाबींमुळे चित्रपट आवडला. यातल्या काही बाबी "अ सेपरेशन" या सिनेमाशी मिळत्याजुळत्या वाटल्या.

कथानकाची, प्रसंगाची हाताळणी कुठेही मेलोड्रमाटीक नाही. सर्व पात्रे अत्यंत नैसर्गिक अभिनय करतात. "नायकाच्या मनात नायिकेबद्दल वाजलेली सतार ...." इत्यादि घोळ नाहीत. पार्श्वसंगीताचा जवळजवळ अभावच. त्यामुळे नाचगाणी वगैरे सोडूनच द्या.

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीचं चित्रण करतानाही त्यातली दृश्यात्मक श्रीमंती - किंवा प्रगल्भता - जाणवते. दृश्यात्मक श्रीमंती म्हणजे एकतर स्पेशल इफेक्ट्स्चा भडीमार किंवा स्वित्झर्लंड वगैरे वगैरे रमणीय दृष्ये या ठाशीव संकल्पनांना छेद देणारी ही प्रगल्भता आहे.

इराणच्या या प्रदेशातल्या बदलत्या ऋतुमानाचा - विशेष करून थंडीचा, प्रसंगी होणार्‍या हिमसेकाचा वापर मला आवडला. त्यात "दाखवेगिरी" , खोटेपणा कणाचा वाटला नाही.

इराण-अफगाणिस्तानातल्या राजकीय सामाजिक परिस्थितीचं, या परिस्थितीचा सर्वात वाईट फटका ज्या वर्गाला दशकानुदशकं बसतो आहे त्या परिस्थितीचं चित्रण कुठेही बटबटीतपणे , प्रचारकी पद्धतीने झालेलं नाही. उदाहरणार्थ त्या मुलीने मुलगा म्हणून - आणि तेही अफगाण व्यक्तीने असं वावरावं - यातला प्रचंड मोठा धोका हा अध्याहृत धरलेल्या राजकीय-धार्मिक-सामाजिक वास्तवाचा परिपाक आहे. हा धोका प्रस्तुत चित्रपटाचा जणू केंद्रबिंदू. पण त्याची वाच्यताही कुणी करत नाहीत. सर्वजण अपरिहार्यपणे घडत्या नाट्यामधे सामील होतात - किंवा त्याचे साक्षीदार असतात.

एकूण "बरन" म्हणजे माझ्यालेखी चित्रपट पहाण्याचा एक श्रीमत् अनुभव.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

मी जे दोन इराणी सिनेमे पाहिले त्यात वास्तववादी चित्रण असलं तरी (विशेषतः "बरन"मधे) अतिशय काव्यात्म अनुभव मला आला. एखाद्या व्यक्तीबद्दलच्या नाजूक भावना, तिच्यापर्यंत पोचायची धडपड , त्या प्रवासामधली अपरिहार्यता, ऋतुचक्राच्या अबोल चित्रणाचा सहजसुंदर उपयोग..... हे आपल्याकडे इतकं अभावानेच का जाणवावं असा प्रश्न मला राहून राहून पडतो खरा.

मजिदी इत्यादि प्रभृती जे सादर करतात त्यामधे जे असतं तो "मिनिमालिझम"चाच एक नमुना, असं म्हणता येईल का ? इथल्या जाणकारांकरवी मला जाणून घ्यायला आवडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

>>मी जे दोन इराणी सिनेमे पाहिले त्यात वास्तववादी चित्रण असलं तरी (विशेषतः "बरन"मधे) अतिशय काव्यात्म अनुभव मला आला. एखाद्या व्यक्तीबद्दलच्या नाजूक भावना, तिच्यापर्यंत पोचायची धडपड , त्या प्रवासामधली अपरिहार्यता, ऋतुचक्राच्या अबोल चित्रणाचा सहजसुंदर उपयोग..... हे आपल्याकडे इतकं अभावानेच का जाणवावं असा प्रश्न मला राहून राहून पडतो खरा.

मजिदी इत्यादि प्रभृती जे सादर करतात त्यामधे जे असतं तो "मिनिमालिझम"चाच एक नमुना, असं म्हणता येईल का ?<<

माजिदीच्या आणि इतर बऱ्याचशा इराणी चित्रपटांची शैली 'निओ-रिअलिझम' म्हणता येते. याची काही वैशिष्ट्यं म्हणजे सामान्य माणसांच्या जगण्यातल्या साध्यासुध्या सुखदु:खांच्या गोष्टींना काव्यात्म करणं आणि त्यांद्वारे प्रेक्षकाच्या हृदयाला स्पर्श करणं. चकचकीत हिंदी किंवा अमेरिकन सिनेमापेक्षा अर्थात हा सिनेमा दिसायला वेगळा असतो. त्यातलं नाट्य किंवा तिढा हादेखील आपल्या सवयीच्या व्यावसायिक चित्रपटांतल्या मेलोड्रामापेक्षा छोट्या जिवाचा असतो. 'बायसिकल थिफ'सारखा सिनेमा हा याचा आद्य आदर्श. आपल्याकडे बिमल राय ('दो बिघा जमीन') किंवा सत्यजित राय (अपू त्रिधारा) ही याची परिचित रूपं म्हणता येतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

परीक्षण आवडले!!!! अवश्य बघेन मिळाला की.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आताच पाहीला बरन युट्युबवर. डब किँवा सबटायटल्स नव्हते पण संवाद कमीच असल्याने फार फरक पडला नाही.
तुम्ही ' "नायकाच्या मनात नायिकेबद्दल वाजलेली सतार ...." इत्यादि घोळ नाहीत.' असं लिहीलय, पण नायक नायिकेला केस विँचरताना पाहील्यावर बरंच टिँगटिँगटिँग संगीत आहे Sad
आणि मला ते अफगाण कामगार गरीबपण वाटले नाही (कदाचीत अंगभर कपडे असल्याने). आपल्याकडचे सलाम बॉम्बे मधले गरीब लगेच दरीद्री भिकारी दिसून येतात. दो बिघा जमीनमधे पण गरीब शेतकरी लगेच जाणवतो. या बरनमधले गरीब, गाल आत गेलेले वगैरे दिसतात पण कपडे बरेच असतात त्यांच्याकडे.
एकंदर प्रेमकथा असल्याने चित्रपट आवडला नाहीच. शेवट मात्र तरल आहे. बहुतेक ही इराणी काव्यात्म शैली माझ्यासारख्यांसाठी नसावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>आणि मला ते अफगाण कामगार गरीबपण वाटले नाही (कदाचीत अंगभर कपडे असल्याने). आपल्याकडचे सलाम बॉम्बे मधले गरीब लगेच दरीद्री भिकारी दिसून येतात. दो बिघा जमीनमधे पण गरीब शेतकरी लगेच जाणवतो. या बरनमधले गरीब, गाल आत गेलेले वगैरे दिसतात पण कपडे बरेच असतात त्यांच्याकडे.<<

थंड हवेच्या ठिकाणी हे बऱ्यापैकी नाॅर्मल आहे. काश्मीरमधले लोकदेखील गरीब असले तरी जिवंत राहण्यासाठी अंगभर कपडे घालतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हम्म. डोळ्यांना 'असे' गरीब पहायची सवय नसल्याने मला ते एक्सेप्ट करता आले नसावे.
आणि प्रेमकथा असल्याने अजुनच नावडता विषय Sad
माजिदीचा दुसरा कोणतातरी चित्रपट पाहुन ठरवेन इराणी/माजिदच्या चित्रपट मला झेपतात की नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माजिदी म्हणजे इराणी चित्रपट असं समजू नकोस. जाफर पनाही आणि असगर फरहादीचे दोनच चित्रपट बघूनही ते माजिदीपेक्षा खूप वेगळे आणि प्रगल्भ आहेत हे लक्षात आलं. असगर फरहादीच्या 'अ सेपरेशन'बद्दल जंतूने आधीच लिहीलेलं आहे. त्यातल्या लेयला हतामीने तिच्या पंचविशीत काम केलेला 'Leila' नावाचा चित्रपट मिळाला होता. रोम्यांटीकपणा पक्का नावडीचा असेल तर इराणी चित्रपटाचं सांपल म्हणून तो बघायला हरकत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

.....'Leila' नावाचा चित्रपट मिळाला होता. रोम्यांटीकपणा पक्का नावडीचा असेल तर इराणी चित्रपटाचं सांपल म्हणून तो बघायला हरकत नाही.
..............म्हणणे कळले नाही. थोडे अधिक स्पष्ट करू शकाल ? चित्रपट पाहिला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रोमँटिकपणा म्हणून सगळं, निदान शेवट गोड होतो, असं या चित्रपटात काही नाही. उलट एकमेकांवर प्रेम करणार्‍या लेयला आणि तिच्या नवर्‍याने एकमेकांसाठी, दुसर्‍यावरच्या प्रेमाखातर केलेल्या तडजोडींमधून शेवटी दोघेही दु:खातच रहातात. मला हा चित्रपट फारच उदास वाटला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

काही दिवसांपुर्वी 'द कुक, द थिफ, हिज वाईफ अँड हर लवर' नावाचा अनरेटेड चित्रपट पाहीला. या चित्रपटात खूप नग्नता आणि हिँसाचार आहे. त्यामुळे X किँवा अनरेटेड असं रिलीज करण्यास परवानगी दिली. निर्मात्यांनी अनरेटेड निवडलं.
'डंबलडोअर' थिफ आणि 'क्विन' त्याची बायको झालीय. अशा तगड्या अभिनेत्यांनी हा X रेटेड चित्रपट केला, म्हणजे नक्कीच काहीतरी रोचक असेल, नाही का?
मला या चित्रपटाची सिनेमटोग्राफी आणि बेकग्राउंड स्कोअर खूप हाँटिँग वाटला.
चित्रपट युट्युब वर आहे. वॉच इट अॅट युअर ओन रिस्क Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'द कुक, द थीफ...' हा पीटर ग्रीनवेनं दिग्दर्शित केलेला चित्रपट आहे. जागतिक सिनेमाचा इतिहास लिहायचा झाला तर त्यात ह्याचा समावेश करणं माझ्या मते क्रमप्राप्त ठरेल. युरोपियन कलेचा खूप वेगळ्या पद्धतीनं वापर करून एक परिणामकारक दृश्यसौंदर्यशास्त्र त्यात घडवलं आहे. ८०च्या दशकातल्या थॅचर सरकारच्या सत्तेतल्या ब्रिटनमधल्या भांडवलवादी आणि चंगळवादी संस्कृतीवर त्यात बोचरी टीका आहे. मोठ्या पडद्यावरच पाहावा अशी शिफारस करेन, कारण एखादा भव्य ऑपेरा पाहिल्याचा अनुभव यावा इतकी दृकश्राव्य ताकद त्यात आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

जंतूंच्या या परीक्षणामुळे हा पिच्चरही पहावा असे वाटू लागलेय. सहीच!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

"८०च्या दशकातल्या थॅचर सरकारच्या सत्तेतल्या ब्रिटनमधल्या भांडवलवादी आणि चंगळवादी संस्कृतीवर त्यात बोचरी टीका आहे." >>
ही माहीती माझ्यासाठी पुर्णपणे नवीन आहे. धन्यवाद.
चित्रपट पाहील्यानंतर जे फार थोड वाचन केलं, त्यातुन सिम्बॉलिझम बद्दल कळलेलं. रेस्टॉरंटचे निरनिराळे भाग निळा, हिरवा, लाल आणि पांढरा रंगात दाखवण्यामागचा उद्देश इ.
या चित्रपटावर लेख लिहावा ही विनंती. खरं तर 'जागतिक सिनेमाचा इतिहास लिहायचा झाला तर त्यात ज्या चित्रपटांचा समावेश असेल' त्यावर एक लेखमालाच येउद्या Smile

प्रेक्षक जर विज्युअल इंपेक्ट साठी तयारीने बसला असेल तर चित्रपट मोठ्या पडद्यावर पहायला हरकत नाही. माझ्यासारख्या सर्वसामान्य, अनप्रिपेअर्ड व्यक्तीची, लहानशा पडद्यावर पाहील्यानंतरची प्रतिक्रिया 'वॉट द हेल डिड आय जस्ट सी' अशी होती...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Les Enfants Terribles (लेझान्फाँ तेरिब्ल?) नावाचा कृष्णधवल फ्रेंच चित्रपट पाहिला. जाँ कॉक्तू याच्या कादंबरीवर आधारित चित्रपट कॉक्तूचा म्हणायचा का जाँ पिअर मेल्व्हिलचा म्हणायचा हा वादही म्हणे त्या काळात रंगला होता. चित्रपटाची कथा इथे आहे.

प्रचंड आक्रमक स्वभावाची बहिण एलिझाबेथ आणि तिच्यासमोर स्वतःला प्रस्थापित करण्याचे क्षीण प्रयत्न करणारा भाऊ पॉल ही यातली 'भयंकर मुलं'. त्या दोघांचे आपसांतले शारीरिक संबंध incest (मराठी?) म्हणता येण्यासारखे नाहीत, पण मानसिक संबंध तसेच. एलिझाबेथ मृत्युदूत म्हणावी अशी आक्रमक. आणि एकमेकांवर कुरघोडी करण्याचे त्यांचे खेळ असा हा चित्रपट आहे. चित्रपट एकीकडे सस्पेन्स थ्रिलर वाटतो, दुसर्‍या बाजूने मानवी नातेसंबंधांमधला असणारी रस्सीखेच, चढाओढ असं काहीतरी. १९२९ च्या आसपास कादंबरी प्रसिद्ध झाली तेव्हा फ्रान्समधे काय लक्षवेधी घटना सुरू होत्या ते माहित नसल्यामुळे चित्रपट नक्की कशाबद्दल आहे हे मात्र समजलं नाही. पण तरीही चित्रपटाला फार गती आहे त्यामुळे "पुढे काय?" ही उत्कंठा टिकून राहिली.

"आकर्षक" नावामुळे आणलेला दुसरा चित्रपट A French gigolo (मूळ शीर्षक Cliente) फारसा आवडला नाही. टाकाऊही नाही. पात्रिक उर्फ मार्कोला त्याच्या बायकोच्या व्यवसायासाठी पैसे हवे आहेत म्हणून तो नाखुशीनेच जिगोलोचं काम करतो. त्याची घटस्फोटित क्लायंट जुडीथ त्याच्या प्रेमात पडते. त्याच्या बायकोला आधी हे माहित नसतं, पण समजल्यानंतर प्रेम, लग्न का पैसे असा तिचा तिढा यासंदर्भात हा चित्रपट आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पण समजल्यानंतर प्रेम, लग्न का पैसे असा तिचा तिढा यासंदर्भात हा चित्रपट आहे.
सदर चित्रपट अनिल कपूर, श्रीदेवी, उर्मिला मातोंडकर ह्यांच्या "जुदाई" ह्या अभिजात भारतीय पटांतून उचललेला दिसतोय. अर्थातच वरिजनलची सर ह्या भ्रष्ट नकलेस येणार नाही.त्यातही श्रीदेवीचं मानसिक द्वंद्व आणि असच चित्रित केलय. संयत हाताळणी, चित्रपटाचा सौम्य बाज, त्याला अल्लाद असलेली सूचक पार्श्वसंगीताची डूब आणि एकूण सामाजिक स्थितीचं भान असलेल्या परेश रावलचे मार्मिक प्रश्न चित्रपटाला वेगळीच उंची देउन जातात. जॉनी लिव्हर नेहमीप्रमाणेच भूमिका अक्षरशः जगलाय. आक्रमक विनोद वात्याला येउनही कुथेही आक्रस्ताळेपण नहई; मद्रासीपण नाही.
वैश्विक संयत हाताळणीसाठी प्रसिद्ध अशा सर्वोत्तम चित्रपटात मी त्याचे(म्हंजे पिच्चरचे; जॉनीचे नव्हे) नाव घेइन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अशी तुलना (किंवा उचलेगिरी) होईल अशी कल्पनाच नाही केली. अनिल कपूर पैशांसाठी देहविक्री करतो आणि कोणा रस्त्याकडेच्या गिगोलोला त्याच्याबद्दल असूया वाटते हे माझ्या कल्पनेपलिकडचं आहे. कोणाला किती पैसे पुरेसे वाटतात हे सांगणं किंवा आपसांत तुलना करणं कठीण आहे. पण पन्नाशीच्या जुडीथचं तिशीच्या मार्कोच्या प्रेमात पडणं आणि अनिल कपूरपेक्षा दहा-पंधरा वर्ष तरूण दिसणार्‍या उर्मिलाचं त्याच्या प्रेमात वेडं होणं याची तुलना करणं कठीण वाटतं.

'जुदाई' फारच तुपकट आणि गोग्गोड आहे या फ्रेंच चित्रपटाच्या तुलनेत. त्यातल्यात्यात "मुझे प्यार हुआ अल्लामियां" गाण्यात आणि संबंधित गोंधळातच काय ती गंमत होती!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

A French gigolo वरुन काही अंशी ढापलेला चित्रपट म्हणजे देसी बॉइस. अक्षय आणि जॉन अब्राहम लीड मध्ये असणारा हा चित्रपट डेविड धवन यांचे सुपुत्र रोहित धवन यानी केला आहे. या चित्रपटमधला जॉन अब्राहम चा ट्रॅक याच स्टोरीलाइन वरुन घेतला आहे. फक़त यात मुख्य पात्र गिगोलो नसून स्त्रियांसाठी कपडे काढून नाचणारे (Male Stripper) दाखवले आहे. भारतीय मेनस्ट्रीम पब्लिक ला गिगोलो पचणार नाही असे वाटले असेल. बाकी चित्रपट डेविड धवन च्या चित्रपतांप्रमाणेच आचराट आणि बटबटीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

मला आठवतंय, १९८९ साली दूरदर्शनवर "द वर्ल्ड धिस वीक" नावाचा कार्यक्रम सादर व्हायचा, प्रणॉय रॉयचा. (बहुदा दर शुक्रवार रात्री.) १९९० च्या ऑस्करमधे सर्वोत्कृष्ट नटाचं पारितोषिक डॅनियल डे लुईसला "माय लेफ्ट फूट" करता मिळाल्याची बातमी तेव्हा पाहिलेली आठवते आहे. हा सिनेमा आज पहाण्याचा योग आला.

सेरेब्रल पाल्सी या मेंदूच्या विकाराने ग्रस्त असलेल्या क्रिस्टी ब्राऊन नावाच्या आयरीश पेंटर/लेखकाची कहाणी. "अमुक अभिनेता अमुक भूमिका जगलेला आहे" अशा प्रकारची वाक्यं आपण पुष्कळ वाचतो. त्याचा प्रत्यय इतक्या प्रकर्षाने हा असा सिनेमा पहाताना येतो खरा.

मी नंतर कधीतरी या चित्रपटनिर्मितीच्या वेळच्या काही कथा (काही वर्षांपूर्वी) कुठेतरी वाचल्या होत्या. सेटवरील जवळजवळ प्रत्येकजण डे लुईसच्या बाबत प्रचंड वैतागलेला होता. याचं कारण म्हणजे (म्हणे) हा माणूस सबंध चित्रिकरणादरम्यान त्या व्यक्तिरेखेसारखाच वागत होता ! डावा पाय वगळतां , संपूर्णपणे विकलांग शरीराने आठवडेच्या आठवडे तो कसा काय वावरला असेल याची मी कल्पनाच करू शकत नाही.

असो. ही भूमिका अविस्मरणीय आहे यात शंका नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

'लिङ्कन'च्या भूमिकेसाठीही तो चित्रीकरण चालू असेपर्यन्त असाच वावरला, असे ऐकून आहे.

(अवान्तर : What's Eating Gilbert Grape [1993] या चित्रपटात मतिमन्द 'आर्नी'ची व्यक्तिरेखा अवश्य पाहा. लिओनार्दो-दि-काप्रिओ त्यावेळी कुणास माहीतही नव्हता.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'भूमिका जगण्या'बद्द्ल असच पीटर सेलर्स या अभिनेत्याबद्द्ल म्हटलं जात असे.'द लाइफ अँड डेथ ऑफ पीटर सेलर्स' ह्या सिनेमात पीटर सेलर्सची आई त्याला सेटवर भेटायला येते आणि तिला भेटतं ते फक्त त्याचं पात्र (तिचा मुलगा नव्हे) असा सीन आहे...जरूर पहावा.

अवान्तरात आलेला सिनेमा जॉनी डेप मुळे पहायला घेतला होता आणि लिओनार्डो लक्षात राहिला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.'द लाइफ अँड डेथ ऑफ पीटर सेलर्स' आणि "गिल्बर्ट ग्रेप" यादीत टाकतो आहे. थँक्स.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

अवांतर: लेफ्ट फुट आणि ऑस्कर वरुन आठवले, गेल्या वर्षी धुमाकुळ घालणारा 'जोली तैँ चा राइट लेग' कुठे दिसला नाही यावर्षी...
बादवे 'हंगर(?) गेम्स' मधल्या 'गोबर्या गालांच्या गुटगुटीत बाळ' जेनिफर लॉरेन्सला सिल्वर लाइनिँग प्लेबुक साठी यावर्षीचे सगळे पुरस्कार मिळाले... मला खरं तर ती ऑस्कर नॉमिनेशन मिळालेली ९ वर्षाँची छोकरी फार आवडलेली...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>> 'जोली तैँ चा राइट लेग' कुठे दिसला नाही यावर्षी.. <<<<

(घसा खाकरून) मी पण तेच म्हणत होतो... असो. मराठीत "एखादी तरी स्मितरेषा" नावाचं काहीतरी पुस्तक आहे त्या धर्तीवर "एखादा तरी पाय...." असो असो.

>>>मला खरं तर ती ऑस्कर नॉमिनेशन मिळालेली ९ वर्षाँची छोकरी फार आवडलेली... <<<

"बीस्ट्स ऑफ द सदर्न वाईल्ड" लवकरच पाहण्यात येईल. - आय मीन पाहण्यात आल्या जाईल. त्याबद्दलचा फीडब्याक देण्यात आल्या जाईलच Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

कालच लिंकन पाहिला...आधी थोडं त्याबद्द्ल (त्या काळाबद्द्ल) वाचून गेले होते त्यामुळे फायदा झाला. डे लुईसचा अभिनय सुंदर...त्यासाठीच मुख्यत्त्वे हा चित्रपट पाहिला. संवाद विशेष आवडले; परत घरी सीडी/डीव्हीडी वर इंग्लिश सबटायटल्स सकट पहायचा आहे.
मोठ्या पडद्यावर जरूर पहावा हा चित्रपट एकदा तरी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अलिकडच्या एका लांबच्या विमानप्रवासात "लिंकन" उपलब्ध होता. पण दुर्दैवाने, सबटायटल्सशिवाय. त्यामुळे तो तेव्हा पाहिला नाही. आधीच फ्लाईटमधली ती दिव्य साऊंड सिस्टीम आणि ते छोटेसे इयरफोन्स. आणि त्यात आमची दिव्य श्रवणशक्ती - आणि माझा अंदाज आहे की सिव्हिल वॉरच्या वेळचे अ‍ॅक्सेंट पण "स्पेशल" असणार.

तस्मात् "लिंकन"ची डीव्हीडी जेव्हा केव्हा येईल तिथवर थांबणें.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

Jeanne Dielman, 23 Quai du Commerce, 1080 Bruxelles (1975)

३ तास १५ मिनिटाचा चित्रपट. कहाणी एका विधवेची तीच्या तीन दिवसांची. पुर्ण चित्रपटभर ती तीचे दैनंदीन घरकाम करताना दाखवली आहे. सोबत आहे तीचा टीनएज मुलगा. पहिल्या दिवसानंतर दुसर्‍या आणि तिसर्‍या दिवसात तिच्यात येणारा बदल आणि शेवट तर भन्नाट आहे. हा चित्रपट बनला तेव्हा त्या डायरेक्टर चे वय २५ होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

In Time नावाचा अ‍ॅन्ड्र्यू निकोल नामक लेखक/दिग्दर्शकाचा जस्टिन टिंबर्लेक अभिनित विज्ञानकथापट पाहण्यात आला.
भविष्यात लोकांचं २५ नंतर शारीरिक वय वाढणे बंद होईल अशी सोय जेनेटिक इंजिनिअरिंग करून केलेली असते त्यामुळे सगळे लोक नेहमीच पंचविशीचे तरूण असतात. पण त्यात एक मेख असते की २५ वर्षे वय झाल्यावर माणूस एकच वर्ष जगणार. अर्थात त्यापुढे जास्तीचा वेळ 'कमावण्याची' सोय असतेच. त्यामुळे वेळ हाच अक्षरशः पैसा असतो. जगाचे टाईम झोन केलेले असतात. बक्कळ कमाई असलेले हजारो वर्षे जगू शकणारे जवळजवळ अमर लोक झोन १ मध्ये राहतात, तर मिळेल ते काम करून रोजंदारीवर जगणारे बाराव्या झोनमध्ये राहतात. बाराव्या झोनमध्ये राहणार्‍या काही तासांवर गुजराण करणार्‍या नायकावर १०६ वर्षांची संपत्ती असलेल्या माणसाच्या खुनाचा आळ येतो. पुढे काय होते ते चित्रपटात पाहणेच योग्य.
अभिनय, छायाचित्रण वगैरे फार काही विशेष नसले तरी मला कथेमुळे चित्रपट आवडला. चलन म्हणून काळाची देवाणघेवाण पाहून नकळत काळ आणि पैसा याची तुलना होते. भ्रष्टाचार, गरीब लोकांचे शोषण आणि भाववाढ वगैरे प्रकार फारच परिणामकारक ठरतात. आपण वेळ घालवून पैसा कमावतो हे कुठेतरी डाचायला लागतं.
उदा. नायकाची आई काम संपवून नायकाला भेटायला निघते. तिचा वाढदिवस ते साजरा करणार असतात. नेहमीची तिची बस येते. बसमध्ये चढल्यावर ड्रायव्हर म्हणतो की तिकीटाचे भाव वाढले आहेत. तिच्याकडे द्यायला तेवढा वेळ नसतो (सकाळीच नायकाला तिने उधार दिलेला असतो). ती म्हणते, "I've got just one hour and its a two hour walk"
"You better run then", ड्रायव्हर थंडपणे म्हणतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रोचक दिसतोय पिच्चर एकदम!!!

आता हा पाहणे आले. धन्यवाद Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

+१

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

या धाग्यात विशेष आवडलेल्या सिनेमांबद्दल आपण सर्वजण लिहितो आहोत. (असा माझा समज आहे. ) न आवडलेल्या चित्रपटांबद्दल आवर्जून लिहावं असं वाटत नाही पण त्यातही उल्लेखनीय सिनेमे जेव्हा आवडत नाहीत तेव्हा लिहावंसं वाटतं. आपल्याला का आवडले नाहीत त्याची मीमांसा इतर लोकांच्या मताशी तपासून पहावीशी वाटते.

"बीस्ट्स ऑफ द सदर्न वाईल्ड" : यंदाच्या ऑस्कर यादीतला एक सिनेमा. यातल्या (आता नऊ वर्षांच्या असलेल्या) एका लहान मुलीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या श्रेणींत मानांकन मिळाल्यामुळे थोडी अधिक उत्सुकता होती. अलाबामा (की लुईझियाना ?) भागातल्या सखल भागात रहाणार्‍या एका मुलीच्या, तिच्या वडलांच्या आणि परिसराच्या बाबत एका मोठ्या पूराच्या निमित्तानं घडलेल्या घटना असं त्याचं स्वरूप.

या सर्व व्यक्तिरेखांच्या आयुष्याचं चित्रण प्रसंगी भीती वाटेल अशा प्रकारच्या दारिद्र्याचं आहे. "अस्तिवाच्या सीमारेषेवरचं जीवन" असं वर्णन करता येईल असं. अनारोग्य, मूलभूत गरजांच्या पूर्तीचा अभाव, संगोपन सुरक्षितता आणि पोषणादि गोष्टींकडे असलेल्या एकंदर दुर्लक्षामुळे असलेली भयंकर अवस्था, परंतु या सार्‍यामधे आयुष्याकडे नुसतं खेळकर नजरेनेच नव्हे तर अत्यंत अभिमानाने पहाण्याची वृत्ती, या वृत्तीला साजेसं त्या अल्पवयीन मुलीचं प्रथमपुरुषी काव्यात्म निवेदन. एकंदर कॅमेरावर्क कवितेच्या अंगाने जाणारं आहे हे खरं आहे, परंतु एकंदर एका चित्रपटाकडे अशा काव्यात्म दृष्टीने पहायला एक प्रेक्षक म्हणून मी पुरेसा तयार नाही याचं मला प्रत्यंतर आलं. सिनेमा मी पाहिला, पण विशेष एंजॉय केला नाही हे मान्य करतो.

वर "अमुक" या सदस्याने दिलेल्या सूचनेवरून टेरेन्स मलिक यांच्या "द थिन ब्लू लाईन" सिनेमाच्या बाबतही अगदी असाच मिळताजुळता अनुभव आला.

या निमित्ताने जाणवलं ते हे की आपण एखादं अमूर्त चित्रांचं प्रदर्शन पाहू शकतो, वेगळ्या धाटणीच्या कवितेला सामोरं जाऊ शकतो. पण "कथना"पलिकडचे दृष्यसौंदर्यवजा अनुभव देऊ पहाणारे चित्रपट आस्वादण्याइतकी आपली मनोभूमिका काही तयार झालेली नाही.

येथील सदस्यांपैकी कुणी हा चित्रपट पाहिला काय ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

मी हा चित्रपट पाहिला आहे. कत्रिना जेव्हा न्यू आॅर्लीन्सवर येऊन थडकलं होतं तेव्हाची दूरचित्रवाणीवरची दृश्यं अजूनही डोक्यात घर करून आहेत. निसर्गाच्या अशा उद्रेकातून माणसाची होणारी ससेहोलपट भारतासारख्या गरीब देशाला नवीन नाही, पण अमेरिकेसारख्या एरवी सधन आणि प्रगत समजल्या जाणाऱ्या देशाचं तेव्हा झालेलं ते दर्शन अजब होतं, कारण ती एक वेगळीच ('द अदर' ह्या अर्थानं) अमेरिका होती. न्यू आॅर्लीन्सची फ्रेंच संस्कृती, तिथलं जाझ वगैरेंबद्दल ऐकीव माहितीतून डोक्यात निर्माण झालेलं काहीसं रोमॅन्टिक चित्र आणि दारिद्र्य-हलाखीचं हे वास्तव यांतलं अंतर भीषण होतं. पण या दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी असण्यासाठी माणसांमध्ये जे काहीतरी अन्योन्य असायला लागेल ते काय असेल, याची कल्पना 'बीस्ट्स ऑफ द सदर्न वाईल्ड' पाहून येते. त्यातली माणसं आणि त्यांचं वर्तन पाहाता ते वास्तववादी चित्रण नाही, हे सहज लक्षात येतं. पण तरीही माणसातला एक रोमॅन्टिक आणि तरीही वास्तव असा जागृत निखारा त्यात तग धरताना दाखवला आहे. ते एकाच वेळी हृदयस्पर्शी आणि काव्यात्म होतं. मला त्यातली काव्यात्मता आणि त्यातलं दृश्यसौंदर्य कथनापलीकडचे वाटले नाहीत, तर त्याउलट कथनातल्या पात्रांच्या एरवी अविवेकी आणि अतार्किक वाटू शकेल अशा वर्तनाची एकमेव तर्कशुद्ध संगती लावणारे वाटले, आणि कदाचित म्हणूनच अधिकच भिडले. असे सिनेमे निर्माण होतात म्हणून अमेरिका ह्या देशाबद्दल थोडी आशा मनात बाळगता येते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

.....येथील सदस्यांपैकी कुणी हा चित्रपट पाहिला काय ?....
..........पाहिला आहे.
त्यावेळी 'कत्रिना' वादळाची पार्श्वभूमी नीटशी ठाऊक नव्हती. तरी एका मैत्रासोबत आधी बोलणे झाल्याने थोडेफार कळले होते. तुम्ही म्हटता तसे छायाङ्कन उजवे असलेला चित्रपट आहे आणि ते गोष्टीशी सुसङ्गत आहे. कथेतल्या अनेक गोष्टी माझ्यासाठी अनाकलनीय राहिल्या. एक म्हणजे इतक्या अनारोग्य आणि दारिद्र्यात राहण्याचा तेथल्या रहिवाश्याञ्चा अभिमान आणि गरज समजू शकली नाही. नायिकेचा बाप तिला परिस्थितीशी लढण्याचे धडे देतो पण जेंव्हा सरकारी (की एन्.जी.ओ.) मदत मिळते, वा विस्थापनाच्या गोष्टी वर येऊ लागतात, त्यावेळी तो रुग्णालयातून पळ काढतो. जर त्याची मालमत्ता वा रोजगाराची साधने हिरावली जाणार असती तर विस्थापनाला विरोध समजू शकतो. पण तसे काहीच नाही आहे. मालमत्ता म्हणजे ज्या ठिकाणी तो राहत आहे तो डम्पर. उदरनिर्वाहाचे त्याच्याकडे कुठलेही साधन नाही. मुलीवर अपार प्रेम तर आहे; पण मग परिस्थितीशी लढण्याचे धडे देताना तो परिस्थिती सुधारण्याचा सन्धी असूनही काहीच प्रयत्न का करीत नाही ? ते कळले नाही.
दुसरी न कळलेली गोष्ट म्हणजे 'बीस्ट्स्'ची दन्तकथा. ती आता नीट आठवतही नाही आहे त्यामुळे त्याबाबत लिहून फायदा नाही. पण एकूणच चित्रपटातले त्या कथेचे रुपक कळले नाही.
एक-दोन ठिकाणी प्रसङ्ग भावले. उदा. ती मुलगी आणि तिची आईसदृरुश असणारी एक बाई तिच्यासाठी खाणे बनविते, कडेवर घेते, इ. ते चित्रण माझ्यासाठी फार हृदयस्पर्शी होते.

अवान्तर:
.....वर "अमुक" या सदस्याने दिलेल्या सूचनेवरून टेरेन्स मलिक यांच्या "द थिन ब्लू लाईन" सिनेमाच्या बाबतही अगदी असाच मिळताजुळता अनुभव आला......
मी आधी सुचविलेला चित्रपट - 'थिन् रेड् लाईन्'; ब्लू नव्हे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अमुक यांनी लिहिल्याप्रमाणेच माझी "बीस्ट्स" बद्दलची भावना होती. त्यांनी माझ्या मनातलं नेमकं मांडलं. (याला "मनींच्या तारा जुळणं" म्हणतात असं काहीसं ऐकून आहे Smile ) पण जंतुंचा प्रतिसादसुद्धा आवडला.

आणि मलिक यांच्या चित्रपटाच्या नावाबद्दल घातलेल्या गोंधळाबद्दल दिलगीर आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

"बीस्ट्स ऑफ द सदर्न वाईल्ड" कालच पाहिला. खूप आवडला असं म्हणता नाही येणार पण नक्की कोणती बाजू कमकूवत वाटली चित्रपटाची?असं कोणी विचारलं तर तसं काहीच चटकन 'हे आवडलं नाही' असं सांगायला सुचत नाही. कॅमेर्‍याचे अगदी संकुचित फील्ड ऑफ व्ह्यू आणि सतत बोटीत असल्यासारखं हलतं चित्र असल्यामुळे डोळ्यांना जरा त्रास झाला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'मख्खी' चित्रपट पाहीला.
नायक, नायिका, खलनायक अशी सुरुवातीची टिपीकल ४० मिनीटं बोअर झाली. पण एकदा का मख्खीची एंट्री झाली की धमाल मजा येते. मस्त एनिमेशन केलंय.
चित्रपट युट्युब वर आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"एकच प्याला" बालगंधर्वला पाहिलं.

लागे हृदयी हुरहूर, सत्य वदे वचनाला, कशि या त्यजूं पदाला ही अजरामर पदे ऐकली. मस्त मजा आली. काही ठिकाणी काळ किती बदलला हे कळून आल्याने जरा बोअर झाले, काही ठिकाणी मौज वाटली. पण बाकी काही असो, नट मंडळी तयारीची वाटली. त्यांचे गाणे मस्त आवडले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कुणाचं प्रॉडक्शन आणि कुणी कामं वगैरे केली त्याबद्द्दल सांगता काय ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

चित्तरंजन कोल्हटकर दिग्दर्शित नाटक. सिंधूचे काम करणार्‍या कुणी सुचेता अवचट म्हणून आहेत. तळीराम लैच भारी वठवलाय, अ‍ॅक्टरचे नाव विसरलो Sad इतकेच लक्षात आहे.

@विक्षिप्तबै: येस्स, पुढच्या एंट्रीला लक्षात ठेवेन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

(तुझ्याकडे पुरेसं मट्रियल नसेल असं समजून) याचा पुढचा धागा उघडून तिथेच का लिहीत नाहीस? इथे १०० च्या वर प्रतिसाद झालेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मख्खी हा चित्रपट खरच भन्नाट आहे . व्यक्तिरेखा सरसकट काळ्या-गोरया रंगात असणे, दक्षिण भारतीय चित्रपटात असणारा थोडा भडकपणा, आणि पुनर्जन्म सारखी अशास्त्रीय कल्पना या गोष्टी एकदा मान्य करून सिनेमाला बसलो की पुढचा अडीच तास कसा जातो ते काळात नाहीत. मनोरंजन वॅल्यू या फक़त एका निकषावर हा सिनिमा बघण्यासारखा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

अमुक :

>>कथेतल्या अनेक गोष्टी माझ्यासाठी अनाकलनीय राहिल्या. एक म्हणजे इतक्या अनारोग्य आणि दारिद्र्यात राहण्याचा तेथल्या रहिवाश्याञ्चा अभिमान आणि गरज समजू शकली नाही. नायिकेचा बाप तिला परिस्थितीशी लढण्याचे धडे देतो पण जेंव्हा सरकारी (की एन्.जी.ओ.) मदत मिळते, वा विस्थापनाच्या गोष्टी वर येऊ लागतात, त्यावेळी तो रुग्णालयातून पळ काढतो. जर त्याची मालमत्ता वा रोजगाराची साधने हिरावली जाणार असती तर विस्थापनाला विरोध समजू शकतो. पण तसे काहीच नाही आहे. मालमत्ता म्हणजे ज्या ठिकाणी तो राहत आहे तो डम्पर. उदरनिर्वाहाचे त्याच्याकडे कुठलेही साधन नाही. मुलीवर अपार प्रेम तर आहे; पण मग परिस्थितीशी लढण्याचे धडे देताना तो परिस्थिती सुधारण्याचा सन्धी असूनही काहीच प्रयत्न का करीत नाही ? ते कळले नाही.<<

मुकतासुनीत :

>>अमुक यांनी लिहिल्याप्रमाणेच माझी "बीस्ट्स" बद्दलची भावना होती. त्यांनी माझ्या मनातलं नेमकं मांडलं. <<

मी यासाठी वरच्या प्रतिसादात असं म्हटलं होतं - 'डोक्यात निर्माण झालेलं काहीसं रोमॅन्टिक चित्र आणि दारिद्र्य-हलाखीचं हे वास्तव यांतलं अंतर भीषण होतं. पण या दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी असण्यासाठी माणसांमध्ये जे काहीतरी अन्योन्य असायला लागेल ते काय असेल, याची कल्पना 'बीस्ट्स ऑफ द सदर्न वाईल्ड' पाहून येते.' जगात (आणि विशेषत: अमेरिकेत) निव्वळ वरच्यासारखा, म्हणजे भौतिकवादी, विचार करून जगणारी माणसं नाहीत; तर त्याहून वेगळं काहीतरी पाहाणारी आणि वेगळं जगणारी माणसं आहेत हे एरवी लक्षात येत नाही, पण अशी माणसं पाहिल्यावर ते लक्षात यावं. हलाखीत जगणाऱ्या माणसांनासुद्धा आपल्या तोडक्यामोडक्या झोपडीविषयी आपुलकी वाटू शकते आणि विस्थापित व्हायला ते नकार देऊ शकतात, हे भारतीयांना तरी नर्मदा बचाओ आंदोलनासारख्या चळवळींमुळे कळायला हरकत नाही असं वाटतं. नदीतले मासे मारून खाणं आणि सख्यासोबत्यांच्या साथीनं जगणं एवढ्यानं काही माणसं सुखी होऊ शकतात. मग ते कळून घ्यायला आपण नकार का देतो?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

____/\____

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

+१.

जंतूंना येक साष्टांग दंडवत. _/\_

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

+२

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

चिंतातुर जंतू : ....हलाखीत जगणाऱ्या माणसांनासुद्धा आपल्या तोडक्यामोडक्या झोपडीविषयी आपुलकी वाटू शकते आणि विस्थापित व्हायला ते नकार देऊ शकतात, हे भारतीयांना तरी नर्मदा बचाओ आंदोलनासारख्या चळवळींमुळे कळायला हरकत नाही असं वाटतं. नदीतले मासे मारून खाणं आणि सख्यासोबत्यांच्या साथीनं जगणं एवढ्यानं काही माणसं सुखी होऊ शकतात. मग ते कळून घ्यायला आपण नकार का देतो?
........ कळून घ्यायला नकार अजिबात नाही. उलट उत्सुकताच आहे. माझ्या प्रतिसादात 'मालमत्ता = डम्पर' हे कमी लेखण्याच्या दृष्टीने लिहीले नव्हते, तर मालमत्ता = डम्पर हे समीकरणाच्या दृष्टीने लिहीले होते. तिथे राहणार्‍याला आपली झोपडी प्रिय आहे हे तर साहजिकच आहे. तो एकटा - विनापत्य असता तर मला तसा प्रश्नही पडला नसता. पण चित्रपटात अनेकदा आपल्या पोरीला दूर ठेवून, रागे भरून जरी त्याचे वर्तन वरवर आदीम/रानटी वाटले तरी आपल्या पोरीचे भले व्हावे ही कळकळ एक बाप म्हणून अनेक प्रसङ्गान्तून वर येत राहते. चित्रपटात हीच गोष्ट मुख्य आहे आणि ती मी तशी स्वीकारलीही. ती बापाची ओढाताण खूपच ठळक आणि जिवघेणी आहे. परन्तु पडलेला प्रश्न पोरीच्या भवितव्याचा आहे. अनेकदा समाजात आपण व्यसनधीन बाप पाहतो. व्यसन सुटता सुटत नाही पण मुला-बाळान्ना चाङ्गले जग दाखविणे हे ते सचोटीने करतात. भले ते रात्री-अपरात्री पिऊन शिव्यागाळ करतील पण शुद्धीत असताना प्रसङ्गी चार फटके लगावून आपल्या मुलान्ना दारूपासून दूर ठेवण्याचे व्रत ते कटाक्षाने पाळतात, निदान तसा प्रयत्न तरी करतात. या चित्रपटातला बाप अश्याच जातकुळीतला दाखवायचे आहे असे वाटले. त्यामुळे पोरीच्या बाबतीत त्याचे वर्तन अनाकलनीय वाटले, पण अस्वीकार्य मुळीच नाही. तुमच्या मार्मिक प्रतिसादाबद्दल आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'कपलिंग' पाहायला घेतली. वाह्यात धमाल आहे. धन्स अदिती!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन