नवं पाखरू

स्क्रीनवरच्या नजरा आधी गर्रकन फिरतात...
टवकारले जातात कान... आणि भलेभलेही हरतात...

इश्यूत घुसलेल्या विश्वामित्रांचीही तपश्चर्या होते भंग...
पांढर्‍या केसांवर चढतो गुपचुप गोदरेज हेअर डायचा काळा रंग..

विवाहित टीम लीडलाही हलकेच स्वतःच्या बायकोचा पडतो विसर..
छप्पर उडालेल्या मॅनेजर्सवरही तिच्याच यौवनाचा असर..

टीममधल्या सगळ्यांशीच मग हळूहळू तिची ओळख होते..
"च्यायला कसली भारीय" म्हणत चर्चा भलतंच वळण घेते..

एके दिवशी इनबॉक्समध्ये फाटकन् मेल येऊन पडतो..
लग्नपत्रिका पाहून तिची ओठांपाशीच घास अडतो..

प्रोजेक्टमधलं नवं पाखरू भर्रकन कधीच उडून जातं..
छप्पर उडालेलं बावळट ध्यान मग गुपचुप घरचा डबा खातं..

द्रांक्षांना मग आंबट म्हणत शोधली जाते नवी शिकार..
नवं पाखरू यायचा अवकाश.. प्रोजेक्टमध्ये पारधी आहेत चिक्कार..

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

नव्याने कामावर रुजू होणार्या युवतीं बद्द्ल असलेलं 'बहुतांश पुरुषांचं आकलन (perception) ' बरोबर शब्दात पकडलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0