छायाचित्रण पाक्षिक-आव्हान ९ : रंग

पुढच्या पंधरवड्यासाठी विषय आहे: रंग

रंग - जर रंग नसले तर? हा अगदी टोकाचा विचार सोडला तरी प्रत्येक वस्तूबरोबर, पदार्थाबरोबर, प्राण्याबरोबर, फुलाबरोबर एक रंग नकळत डोक्यात पक्का झालेला असतो. रंगाचं अस्तित्व विलक्षण. स्पर्श, गंध, स्वाद, नाद या इतकाच रंग महत्वाचा. 'रंग' या विषयाला कसल्याही मर्यादा नाहीत! आकाशातले रंग, पाण्यातल्या प्रतिबिंबांचे रंग, फुले, पक्षी, प्राणी यांचे रंग, कुंचल्यातुन साकारलेले रंग, कृत्रिम रंग. ज्याला जसा वाटेल त्याने तसा साकारावा असा हा विषय. म्हटलं तर सोपा म्हटलं तर महाकठिण विषय!

स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत:
१. केवळ स्वतःने काढलेले छायाचित्रच स्पर्धेच्या काळात स्पर्धेसाठी प्रकाशित करावे. मात्र स्पर्धा काळ संपल्यानंतर, निकाल घोषित झाल्यावर त्याविषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही किंवा स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी धरले जाणार नाही.

२. एका सदस्याला जास्तीत जास्त ३ चित्रे स्पर्धेसाठी प्रकाशित करता येतील. जर/जी छायाचित्रे स्पर्धेसाठी नसतील तर प्रतिसादात ठळकपणे तसे नमुद करावे.

३. आव्हानाच्या विजेत्यास पुढील पाक्षिकात आव्हानदाता आणि परीक्षक व्हायची संधी मिळेल. अर्थात आधीच्या आव्हानाचा विजेता पुढील पाक्षिकाचा विषय ठरवेल आणि विजेता घोषित करेल. (मग तो विजेता त्यापुढील पाक्षिकाचा आव्हानदाता व निरीक्षक असे चालू राहिल.)

४. एक स्पर्धा २ आठवडे चालेल. म्हणजे आज सुरू होणार्‍या स्पर्धेचा शेवट २८ ऑक्टोबर रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल व २९ ऑक्टोबरच्या सोमवारी विजेता घोषित होईल व तो विजेता पुढील विषय देईल.

५. पाक्षिक आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचाराव्यात, निकोप टिपण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी/हरवण्यासाठी उगाच एखाद्याला टीकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती.

६. आव्हानाचा विजेता घोषित करण्याचे पूर्ण अधिकार आव्हानदात्याचे असतील. त्यासाठी त्याने ठरविकच निकष लावावेत असे बंधन नाही. त्याने आव्हान द्यावे व त्याचे आव्हान कोणी सर्वात उत्तम पेलले आहे ते ठरवावे इतके ते सोपे आहे. शक्यतो ३ क्रमांक जाहीर केले जातील.(मात्र पुढील पाक्षिकात फक्त प्रथम क्रमांकाचा वीरच आव्हानदाता असेल).आव्हानदात्याकडून काय आवडले हे सांगण्याचे बंधन नसले तरी अपेक्षा जरूर आहे.

७. आव्हानदात्याला प्रथम क्रमांकाचा एकच आव्हानवीर घोषित करणे बंधनकारक आहे.

८. आव्हानात स्पर्धेसाठी प्रकाशित चित्रे प्रताधिकाराच्या दृष्टीने निकोप असावीत अशी अपेक्षा आहे.

९. आव्हानदाता स्वतःची चित्रे प्रकाशित करू शकतो मात्र ती स्पर्धेत धरली जाणार नाहीत.

१०. कॅमेरा व लेन्सची माहिती देणे बंधनकारक. शक्य असल्यास एफ्झिफ डेटा द्यावा.

चला तर मग! "रंग" या विषयाला वाहिलेली छायाचित्रे येऊदेत!

सूचना : 'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावर आपण काढलेले फोटो कसे प्रदर्शित करावेत याबद्दल अधिक मार्गदर्शन या धाग्यावर आहे. त्याचा लाभ घ्यावा.
फोटो अपलोड करताना, अपलोड करणार्‍यांनी जर Width आणि Height (दोन्ही) दिली नाही तर ते फोटो इंटरनेट एक्सप्लोरर (९) वर दिसत नाहीत. (पण फायरफॉक्सवर दिसतात.) यावर उपाय म्हणजे Width आणि Height दोन्ही द्यावेत किंवा त्यांचा उल्लेखच इमेज टॅगमधून डिलीट करावा. कृपया याची नोंद घ्यावी.

मागचा धागा: विषय - पोत (टेक्श्चर) आणि सर्वसाक्षी यांनी टिपलेले विजेते छायाचित्र

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

चित्रांच्या घटकांची ही वेगळी मिती. विषय आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चित्र १ : घर (मेहकर, जि. बुलढाणा)

कॅमेरा : Olympus FE20
उघडीप : १/३२० सेकंद
छिद्रमान : एफ/५.९
आय एस ओ : ६४
केंद्रमान : १९ मिमि

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आवडले

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चित्र २: शिल्प (सिअ‍ॅटल, वॉशिंगटन राज्य, यू.एस.)

कॅमेरा : Olympus FE20
उघडीप : १/४०० सेकंद
छिद्रमान : एफ/५.३
आय एस ओ : ६४
केंद्रमान : १५ मिमि

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या प्रतिसादातला फोटो स्पर्धेसाठी नाही. ते फोटो नंतर टाकते. हा फोटो मुद्दाम भारतीय रेल्वेबद्दल आवडलेली गोष्ट दाखवण्यासाठी विषयानुरूप वाटला म्हणून टाकते आहे. ही कोलकाता-पुणे दुरोंतो गाडी आहे.

'भारतीय' ट्रेनः

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खूप छान फोटो अदिती ! अतिशय आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

+१

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0


Exif data
Camera Canon PowerShot A550
Exposure 0.001 sec (1/800)
Aperture f/5.5
Focal Length 23.2 mm
ISO Speed 400
Exposure Bias 0 EV
Flash Auto, Did not fire
Orientation Horizontal (normal)
X-Resolution 180 dpi
Y-Resolution 180 dpi
Date and Time (Modified) 2008:02:10 12:26:26
YCbCr Positioning Centered
Date and Time (Original) 2008:02:10 12:26:26
Date and Time (Digitized) 2008:02:10 12:26:26
Compressed Bits Per Pixel 5
Max Aperture Value 5.5
Metering Mode Multi-segment
Color Space sRGB
Focal Plane X-Resolution 54613.33333 dpi
Focal Plane Y-Resolution 54532.54438 dpi
Sensing Method One-chip color area
Custom Rendered Normal
Exposure Mode Auto
White Balance Auto
Digital Zoom Ratio 4
Scene Capture Type Standard
Macro Mode Normal
Self Timer Off
Quality Superfine
Canon Flash Mode Red-eye reduction (Auto)
Continuous Drive Single
Focus Mode Single
Record Mode JPEG
Canon Image Size Large
Easy Mode Full auto
Digital Zoom Other
Contrast Normal
Saturation Normal
Sharpness 0
Camera ISO Auto High
Metering Mode Evaluative
Focus Range Auto
AFPoint Auto AF point selection
Canon Exposure Mode Easy
Lens Type Unknown (-1)
Short Focal 5.8 mm
Focal Units 1000/mm
Max Aperture 5.5
Min Aperture 14
Flash Bits (none)
Focus Continuous Single
AESetting Normal AE
Display Aperture 5.5
Zoom Source Width 768
Zoom Target Width 3072
Spot Metering Mode Center
Manual Flash Output n/a
Focal Type Zoom
Focal Plane XSize 23.39 mm
Focal Plane YSize 17.55 mm
Auto ISO 400
Base ISO 100
Measured EV 8.25
Target Aperture 5.5
Target Exposure Time 1/807
White Balance Auto
Slow Shutter Off
Sequence Number 0
Optical Zoom Code 7
Flash Guide Number 0
Flash Exposure Comp 0
Auto Exposure Bracketing Off
AEBBracket Value 0
Control Mode Camera Local Control
Focus Distance Upper 1.67
Focus Distance Lower 0
Bulb Duration 0
Camera Type Compact
Auto Rotate None
NDFilter Off
Self Timer2 0
Flash Output 0
Canon Firmware Version Firmware Version 1.00
File Number 100-1032
Rotation 0
Canon Model ID PowerShot A550
AFMode Multi-point AF
Num AFPoints 9
Valid AFPoints 9
AFArea Widths 276 276 276 276 276 276 276 276 276
AFArea Heights 41 41 41 41 41 41 41 41 41
Primary AFPoint 5
Date Stamp Mode Off
My Color Mode Off
Firmware Revision 1.00 rev 3.00
Categories (none)
Image Unique ID be7fbe200ccd6a43b22e08b0754d0556
Related Image Width 3072
Related Image Height 2304
Compression JPEG (old-style)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

रंग निसर्गाचे आणि मानवनिर्मित.

कन्याकुमारीच्या समुद्रतीरी दिसलेले वाळूचे रंग.

कर्नाटकमध्ये हरिसंड्रा (उच्चार देवनागरीत लिहिणं अवघड आहे!!) ग्रामपंचायतीत काम करत असताना अचानक वाद्यांचा आवाज येऊ लागला. बाहेर येऊन पाहिलं, तर ही देवतेची मिरवणूक दिसली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ढग्गोबाइने उधळलेला रंग सुर्यकिरणांच्या मदतिने... टिपला आहे पावसाळ्यात एका ढगभरल्या संध्याकाळी. पश्चिमेकडे सुर्य अस्ताला जात असताना हि ढग्गोबाइ पुर्वेकडे रंग उधळत होति.


Camera Canon EOS 1100D
Exposure 0.004 sec (1/250)
Aperture f/5.6
Focal Length 154 mm
ISO Speed 125
Exposure Bias 0 EV
Flash Off, Did not fire

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
माझ २र चित्र

घननिळा

पश्चिमेकडे चुडतांनी कातरलेल्या या ऩक्षीसोबत ढगाला आलेली निळि झाक उठुन दिसतेय. मागच्या चित्रात्ल्या भडक रंगापेक्षा यतिल रंग माइल्ड वाटतायत.

Camera Canon EOS 1100D
Exposure 0.013 sec (1/80)
Aperture f/5.0
Focal Length 55 mm
ISO Speed 125
Exposure Bias 0 EV
Flash Off, Did not fire

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------>.
माझ ३र चित्र

वर्तमानकालिन पटलावार 'विरोधि' असणारे दोन रंग ..या फ्रेममध्ये एकत्र गुणयागोविंदाने नांदत आहेत...
शनिवार्वाड्याच्या आवारातिल हि कोण्या संताचि समाधि मोहरम व दिवळिच्या मुहुर्ताला सजवलि होति.


Camera Nokia 5310 XpressMusic
X-Resolution 300 dpi
Y-Resolution 300 dpi
Orientation Horizontal (normal)
Software Adobe Photoshop CS2 Windows

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रंगांची उधळण करणारे निसर्गाचे असंख्य हातः
१. बंगलोरच्या रामन अनुसंधान संस्थेत हा 'रामन ट्री' म्हणून ओळखला जाणारा एक डौलदार वृक्ष. असं म्हणतात की याला दर बारा वर्षांनी बहर येतो. हा फेब्रुवारी २०११ मध्ये आलेला बहर:

Model NIKON D40X
ISO 100
Exposure 1/500 sec
Aperture 10.0
Focal Length 18mm

२. प्रजापती (बंगाली मधे फुलपाखराला प्रजापती म्हणतात असं ऐकून आहे. या इवल्याशा नजूक जिवाला हे नाव फारच भारदस्त वाटलं.)

फ्लिकर वरून याची महिती काढायचा प्रयत्न करते आहे.

३. रंगांचा प्रतिनिधी म्हणून हा 'नवरंग' (या फोटोत दिसत नसला तरी, हा प्रत्यक्षात अतिशय रंगीत आणि देखणा पक्षी आहे):

Model NIKON D40X
ISO 400
Exposure 1/25 sec
Aperture 7.1
Focal Length 300mm

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रीझोल्युशन जुळत नाहि?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

व्हायची असेल आमच्याकडून काही
चूकभुल द्यावी घ्यावी

अमेय संजय, फोटो चिकटवताना एकतर रूंदी लिहा नाहीतर उंची. दोन्ही लिहायचं असेल तर मूळ फोटोच्या रिझोल्यूशनच्या प्रमाणातच लिहावं लागेल, नाहीतर फोटो विचित्र दिसू शकतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आकाशाचे रंग: चालत्या बस मधून दिसलेले आकाश...

SONY-DSC-35

माझ्या घरासमोरची छान छान फुलं !

SONY-DSC-35

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शैशव.. यौवन.. वार्धक्य.... मृत ..... जीवनाचे रंग!

Camera Canon EOS 1100D
Exposure 0.003 sec (1/320)
Aperture f/5.6
Focal Length 250 mm
ISO Speed 1250
Exposure Bias 0 EV
Flash Off, Did not fire

माझ्या पहिल्या प्रतिसादातील दुसरा फोटो बाद समजावा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या फोटोची कल्पना मला आवडली. डाव्या बाजूला असणारी, फोटोचा मोठा भाग व्यापणारी पानं डीफोकस्ड ठेवण्यामागे काही उद्देश आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सुकलेली पानं स्पष्ट दाखवली असती तर त्यावरच लक्ष विकेंद्रित होउन हिरवा, पोपटि व पिवळा रंग दुर्लक्षित झाला असता आणि जीवनात उदासीनतेचा रंग पसरला असता. ते टाळण्यासाठि कडेच्या सुकलेल्या पानावर भिंग केंद्रित केलं. हिरव्या पानावरही फोकस करता आल असतं पण ते सुकलेल पान मागून पडणार्‍या प्रकाशामुळे प्रकाशमान झालं होतं. त्यामुळे त्यावरच फोकस करायचं ठरवलं त्यावर अल्लाद विसावलेला तो पाण्याचा थेंब चित्राला एक वेगळिच मजा आणतो. तेजस्वी मृत्यू असं काहिस त्यातुन मला अभिप्रेत झालं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Camera SONY
Model DSC-W70
ISO 100
Exposure 1/125 sec
Aperture 5.2
Focal Length 19mm
Flash Used false

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मी साधारणतः छायाचित्रांची पार्श्वभूमी देणे टाळतो पण या चित्रात ती गरजेची आहे असे वाटते
हे चित्र भूतानमध्ये घेतलेले आहे. या छायाचित्रांत एक स्थानिक चित्रकार भित्तीचित्र रंगवत आहे. भुतानी भित्तीचित्रांचे वैशिष्ट्य असे की ते प्रत्येक लेयर स्वतंत्र पण रंगवतात. म्हणजे जर पार्श्वभुमीमध्ये डोंगर आहेत पुढे झाडे आहेत तर ते डोंगर व्यवस्थित रंगवतील मग त्यावर झाडांच्या आकाराचा पांढरा रंग देतील. आणि मग पुन्हा त्यावर झाड काढतील. चित्रात पक्षी काढायच्या भागात पांढरा रंग लावण्याचे काम सुरू दिसते आहे. रंग भरण्याआधी आधीचे रंग झाकले जातायत Smile

Camera NIKON
Model COOLPIX S60
ISO 400
Exposure 1/30 sec
Aperture 4.5
Focal Length 13mm
Flash Used true

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>>> मी साधारणतः छायाचित्रांची पार्श्वभूमी देणे टाळतो
सहमत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

Camera SONY
Model DSC-W70
ISO 100
Exposure 1/500 sec
Aperture 7.1
Focal Length 6mm
Flash Used false

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अशी काही दृश्य असतात जी फोटोत अतिशय सुंदर दिसतात आणि प्रत्यक्षात तेवढी खास नसू शकतात. पण माझ्या अनुभवात इंद्रधनुष्य जेवढं डोळ्यांना चांगलं दिसतं तेवढं फोटोत पकडता येत नाही.
तुमच्या फोटोतलं इंद्रधनुष्य इतकं छान दिसत असेल तर प्रत्यक्षात किती छान असेल !

आणखीन एक इंद्रधनुष्य :

हा फोटो काढतेवेळी दोन इंद्रधनुष्य डोळ्यांना दिसत होती. अर्थात एक बरच फिकट होतं...पण काही केल्या ते फोटोत पकडता आलं नाही. फिकट रंग छटा पकडण्यासाठी काही क्लृप्ती आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्या फोटो पेक्षा तुमच्या फोटोत इंद्रधनुष्य अधिक स्पष्ट आले आहे. Smile हा सुद्धा सुरेख फोटो आहे.. जरा अंडरएक्सपोज्ड वाटला किंवा बहुदा इंद्रधनुष्यासाठी नंतर प्रोसेसिंग केलं आहे.. हो ना?

फिकट रंग छटा पकडण्यासाठी काही क्लृप्ती आहे का?

+१ मलाही हाच प्रश्न आहे. कोणी मार्गदर्शन करेल काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

फोटो अंडरएक्सपोज्ड वाटतो आहे खरा. फोटोवर काहीच संस्करण केलेलं नाही. हे इंद्रधनुष्य मी पाहिलेल्यांपैकी कदाचित सगळ्यात ठळक असावं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फिकट रंग, गोष्टी पकडण्यासाठी अधिक काळ एक्स्पोजर दिलं तर नको ब्राईट गोष्टी ओव्हर-एक्सपोज्ड दिसतात. त्यासाठी एच.डी.आर. तंत्राचा वापर करता येईल.

तीन फोटो काढायचे, एक 'योग्य' उघडीप असणारा, एक थोडी जास्त उघडीप असणारा (यात फिकट वस्तू, गोष्टी नीट दिसतात), एक 'कमी' उघडीप असणारा. आणि हे तीन फोटो एकत्र करायचे. त्यासाठी तिन्ही फोटोंची 'फ्रेम' एकच असणं अत्यावश्यक आहे. ट्रायपॉड वापरून हे जमतं. HDR फोटो बनवायला जिंपसाठी एक स्क्रिप्ट कोणीतरी लिहीलेलं आहे, त्यातून हे करता येईल. बाकी पैसे टाकून फोटोशॉप, पेंट शॉप प्रो अशी सॉफ्टवेअर्स आहेत ज्यात हे करता येतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तीन फोटो काढायचे, एक 'योग्य' उघडीप असणारा, एक थोडी जास्त उघडीप असणारा (यात फिकट वस्तू, गोष्टी नीट दिसतात), एक 'कमी' उघडीप असणारा. आणि हे तीन फोटो एकत्र करायचे.

या तंत्राला ब्रॅकेटिंग म्हणतात. अधिक माहिती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चित्र क्र. १ - गणेशोत्सवातल्या रांगोळ्या.Nikon D50 - 1/4000s
Focal length - 10mm-f/4.0
Sigma 10-20mm f4-5.6


चित्र क्र. २ कासचे पठारNikon D50 - 1/4000s
Focal length - 62mm-f/8.0
Nikkor 55-200


चित्र क्र. ३ युत्रेखमधली एक रात्र (नेदरलँड).Nikon D50 - 1/4000s
Focal length - 17mm-f/5.6
Sigma 10-20


चित्र. क्र. ४ आगरदांड्याच्या जेट्टीशेजारील बोट व म्हातारीचे केस विकणारा (स्वतः बिस्किट खाणारा) (रायगड)Nikon D50 - 1/1500s
Focal length - 55mm-f/4.0
Nikkor 55-200mm


चित्र क्र. ५ आम्स्तरदामच्या सायकली (अ‍ॅम्स्टरडॅम्)Nikon D50 - 1/60s
Focal length - 28mm-f/4.0
Nikkor 28-80mm


 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रांगोळी आणि सायकली फारच आवडल्या. (दोन्ही शब्द स्त्रीलिंगी आहेत हा निव्वळ योगायोग.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

गणेशोत्सवातल्या रांगोळ्या हे छायाचित्र विशेषतः आवडले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अदिती व सानिया - धन्यवाद.

पण तुम्हाली ती कॉम्पोझिशन आवडली असं म्हणूयात, ते माझं कौशल्य नाही, रांगोळी काढणार्‍याने रांगोळी काढली, सायकली पार्क्ड होत्या, मी ते कॉम्पोझिशन रेकॉर्ड केलं. मी स्वत: कम्पोझ केलेलं असं चित्र त्यातल्या त्यात बुढ्ढी के बाल आहे. ह्या धाग्यातलं सगळ्यात चांगलं कम्पोझिशन ऋता ह्यांच पहिलं चित्र आहे.

वेगळे रंग एकाच फ्रेम मधे कॅप्चर करण्याचं "कसब" जिथे दिसतं/जाणवतं ते चित्रकाराचं खर कौशल्य आहे, बाकी तो फक्त रेकॉर्डर आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अभिनंदन. या छायाचित्रातले नुसते रंगच नव्हे पण पोत, कॉम्पोझिशनही आवडले. सायकलींवर साचलेले दवबिंदू, पहिल्या सायकलचा वेगळ्या दिशेतला दिवा वगैरे बारीकसारीक गोष्टींनी छायाचित्राची रंगत वाढली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चित्र ३: फुले

एक्सिफ नंतर देईन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कॅमेरा: सोनी सायबरशॉट १२.१ मेगापिक्सेल
4x Wide-Angle Optical Zoom Lens

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उंच माझा झोका....
हॅरिसन फॉली, पांचगणी येथे टिपलेले चित्र.

colour2

Camera Nikon D60
Exposure 0.002 sec (1/640)
Aperture f/8.0
Focal Length 95 mm
ISO Speed 200

रंगीत खाणार त्याला देव देणार

बाजारातुन आल्यावर भाजीची पिशवी वर्तमानपत्रावर उलटी केल्यावर चित्र टिपावेसे वाटले

colours

Camera Nikon D60
Exposure 0.017 sec (1/60)
Aperture f/4.5
Focal Length 28 mm
ISO Speed 100

गरिबीचा रंग

रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झोपडीची ही कापडी भींत..

colour3

Camera Nikon D60
Exposure 0.025 sec (1/40)
Aperture f/8.0
Focal Length 70 mm
ISO Speed 200

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कातरला असला तर पूर्ण बघायला आवडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे एका परेड मधे मुलांसाठी विदूषक आले होते त्यातल्या एकाने दिलेली पोझ

clown at 4th of july parade

Camera: Olympus E-PL1 Lens: Rikenon (manual focus) 35-70mm F3.5
Aperture: f11 Focal length: 50mm ISO: auto, 320

पंचरंगी पोपट Smile
OLY20855
Camera: Olympus E-PL1 Lens:Vivitar Series 1 28-210mm f3.5-4.5
Aperture: f11 Focal length: 85mm ISO: auto, 250

घराच्या खिडकीतून दिसणारे दृश्य, भल्या पहाटे
OLYMPUS E-PL1 with Nikon AIS 35-135mm F3.5
Camera:Olympus E-PL1 Lens:Nikon AIS 35-135mm F3.5
Aperture: f8 Focal length: 50mm ISO: auto, 320

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विदूषक** फार आवडला..चेहरा कितीही रंगवला तरीही डोळे काहीतरी गुपीत उघड करतातच असं या चित्रात बघून वाटलं.

** विदूषक शब्द आला की एक गम्मत आठवतेच. "विदूषी" हा शब्द मराठीच्या पेपरमध्ये 'लिंग बदला' या प्रकारा खाली दिला होता. वर्गातल्या बहुतेकांनी "विदूषक" असं उत्तर प्रचंड आत्मविश्वासानी लिहिलं होतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Snow

एक्सिफ डाटा लवकरच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

TeaParty

एक्सिफ डाटा लवकरच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकदम छान फोटो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकदम टेम्पटिंग फोटो

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

कोलकाता

कॅमेरा: Canon PowerShot S3 IS, ISO: 80, Exposure: 1/200 sec, Aperture: 3.2, Focal Length: 6mm

या दोन्हीचा एक्झिफ डेटा नंतर देते.

जत्रा (रेनेसां फॉरेस्ट फेअर)

या फोटोत गोल फिरवलेल्या कापडाच्या बाहेरचा भाग जिंप वापरून धूसर केला आहे.

'अमेरिकन' टॉवर

शेवटच्या दोन फोटोंवर मोठ्या फोटोंसाठी क्लिक करावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पहिला फोटो आवडला. गंमत म्हणजे भिंतीवरचे रंगच नव्हे तर डावीकडची पिवळी पाटी ही या धाग्याला अगदी साजेशी आहे - 'कृष्णधवल, रंगित फिल्म येथे धुवून, छापून मिळतात'.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फोटो काढताना खरंतर एवढा विचार केला नव्हता, 'पुणे-कोलकाता भाई-भाई' या विचाराने फोटो काढला आणि नंतर पहाताना या सगळ्या गमती दिसल्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मला आवडलेले इतर काही फोटो. क्रेडीट: सायली घोटीकर-जोशी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

क्रेडीट: सोमनाथ चक्रवर्ती

क्रेडीटः Sylvie Kleinlangevelsloo
कोलकात्यात कुठेतरी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

'रंग' या स्पर्धेचा निर्णय - अपेक्षेप्रमाणे खरोखरीच रंग निरनिराळ्या रुपात पाहायला मिळाले, सर्व स्पर्धकांचे सुंदर चित्रांसाठी आभार आणि अभिनंदन.

सग़ळीच चित्रे सुरेख होती आणि म्हणुनच काम कठीण होते. अखेर काही निकषांवर क्रमवारी लावली. उल्लेखनिय वाटलेली काही चित्रे म्हणजे मी यांची रांगोळी, वाचक यांचे पहाटेचे आकाश, ऋशिकेशचे इंद्रधनुष्य, अनिरुद्ध यांची निळाई.......

तिसर्‍या क्रमांकासाठी मला खरेतर निर्णय घेणे जड गेले. एक चित्र म्हणुन धनंजयची फुले आणि अदितीचा मनोरा तुल्यबळ होते. अखेर लाल रंगाचे आवर्ती भाग, पांढर्‍या ढगांच्या पार्श्वभूमीवरही अस्तित्व टिकविलेला पांढरा रंग, फोटो खालुन वर टिपल्याने निळाई खुलविणारे आकाश आणि या सर्वांचा एकत्रित परिणाम साधणारी रंगसंगती भावली. आणि अदितीचे चित्र पात्र ठरले

२०-२० च्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणार्‍या संघातील एखादा फटकेबाज फलंदाज सामनावीर ठरणार असे वाटत असताना अचानक नंतर फलंदाजी करणार्‍या संघातील एखाद्या फलंदाजाने झंजावाती खेळ करीत अव्वल ठरावे तद्वत ऋताचा वृक्ष प्रथमदर्शनीच भावला होता पण नंतर एक अधिक देखणे चित्र दाखल झाल्याने हे चित्र दुसर्‍या क्रमांकास पात्र ठरले. सुरेख रचना, सुरेख विषय, सुरेख पूरक रंगसंगती आणि प्रभावी उत्कर्षबिंदु प्रशंसनिय आहेत.

प्रथम क्रमांक मी यांच्या सायकलींचा. या चित्राला एक विलक्षण अशी लय आहे. एकतानता आहे. सर्वात जास्त भावले ते रंग म्हणताना जे जे काही डोळ्यापुढे येते त्यापेक्षा भिन्न असा विषय निवडणे आणि त्यातुन रंग खुलविणे. हे चित्र पाहता लक्षात येते की उजव्या वरच्या कोपर्‍यातला ५-७% भाग सोडता हे चित्र श्वेत श्यामल चित्र आहे आणि फोटोशॉप वापरुन जाहिरातीत जसा वस्तुचा विशिष्ठ भागच रंगीत दाखविला जातो तशा रंगीत सायकलींचे रंगीत भाग पार्श्वबूमीतुन प्रकर्षाने उठुन आले आहेत. रंगीत सायकलींमध्ये पांढरी आणि काळी सायकलही गुंफली गेली आहे, अगदी क्रोम विलेपीत भागही श्वेत-श्यामल पार्श्वभूमिला पूरकच आहेत, सगळी चाके एका कोनात वळली आहेत, सगळे दिवे एका दिशेने झुकले आहेत. विषयावरचे जलबिंदु नेमके काळा व क्रोम विलेपित याच भागात असल्याने रंगहीन भासताहेत. एकुणच पाहता क्षणी आवडावे असे चित्र.

सर्वांचे पुन्हा एकदा सर्व स्पर्धकांचे अभिनंदन!

एक आवाहन - परिक्षकांव्यतिरिक्त वाचकांनाही स्वतंत्ररित्या आपली मते मांडायचे आवाहन करावे. परिक्षक अर्थातच त्यांचा निर्णय घेतील, पण प्रेक्षकांना त्यांनी पाहिलेल्या चित्रांवर अभिप्राय दिल तर अधिक मजा येईल. समज ही स्पर्धा नसती आणि केवळ कलाकृति म्हणुन कुणी चित्रे टाकली असती तर प्रतिक्रिया आल्या असत्याच. कृपया विचार करा. यामुळे स्पर्धकांनाही बरे वाटेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'मी' यांचे अभिनंदन!! त्यांची सारीच चित्रे सुंदर होती.. मला त्यांचे बुढ्ढीके बाल वाले चित्र अधिक आवडले होते Smile

या व्यतिरिक्त, मला वैयक्तीकरित्या ऋता यांचे फुलपाखराचे चित्र सुद्धा अतिशय आवडले. इतका 'नेमका' क्षण इतक्या मोहकपणे टिपला आहे की व्वा!

समांतरः

परिक्षकांव्यतिरिक्त वाचकांनाही स्वतंत्ररित्या आपली मते मांडायचे आवाहन करावे. परिक्षक अर्थातच त्यांचा निर्णय घेतील, पण प्रेक्षकांना त्यांनी पाहिलेल्या चित्रांवर अभिप्राय दिल तर अधिक मजा येईल

सहमत आहेच आणि बरे झाला हा मुद्दा पुढे आणलात ते.
सध्या सुद्धा निकोप टिपण्या-मते याला बंदी नाही
नियमाप्रमाणे:

पाक्षिक आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचाराव्यात, निकोप टिपण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी/हरवण्यासाठी उगाच एखाद्याला टीकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती.

तेव्हा जर काहि सदस्यांना नियमाबाबत गैरसमज असतील तर ते या खुलाशाने दूर होतील व पुढील आव्हानापासून चित्रांवर आव्हानकालावधीत तसेच नंतरही निकोप मते व्यकत करतील अशी आशा आके.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ह्या धाग्यावर आलेली छायाचित्रं पाहून मला एक मूलभूत प्रश्न पडला. 'रंग' असा विषय असल्यावर फक्त भडक रंगातली छायाचित्रं दिली पाहिजेत असा पुष्कळशा लोकांचा पूर्वग्रह किंवा अपेक्षा दिसली. ह्याचं कारण काय? एक वेगळं उदाहरण म्हणून खाली एक छायाचित्र दिलेलं आहे -

ह्यातला निळा आणि लाल भडक आहेत, पण ते छायाचित्रात महत्त्वाचे नाहीत. त्यापेक्षा गणवेशाचा काळा आणि पांढरा ह्यांतल्या परस्परविरोधाला ठळक करण्यासाठी त्या भडक रंगांचा किंचित वापर लक्षणीय ठरतो. कॉफी किंवा चॉकोलेटचा रंग, लाकडाचा किंवा दगडाचा रंग हे भडक नसूनही रोचक असू शकतात. उदाहरणार्थ, गुफाचित्राचं हे छायाचित्र पाहा -

दगडाचे नैसर्गिक रंग, त्यांतले हळूहळू होणारे फरक आणि त्यावरच्या चित्राचा फिका गुलाबी असा ह्या रंगांचा एकत्रित परिणाम रोचक वाटत नाही का?

किंवा एकाच रंगाच्या वेगवेगळ्या मिती दाखवण्याचा हा प्रयत्न पाहा -

ह्यात छायाचित्रकाराची वेधक निर्णयक्षमता आणि दृष्टी दिसते. यासारखा काही विचारही कुणी केला असता तर मला ते कदाचित अधिक रोचक वाटलं असतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सरळ आणि उघडपणे रंगीबेरंगी छायाचित्र उठून दिसतेच पण छायाचित्रकाराचे कौशल्य आणि दृष्टीकोनातले नाविन्य तपासले जाते ते उघ्डपणे रंगीबेरंगी नसलेल्या विषयातले रंग आणि त्यांच्यातले परस्परसंबंध सादर करण्याने.
तिसरे छायाचित्र खूपच रोचक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दुसरे, तिसरे चित्र आवडले.

पहिले चित्र : भडक निळ्या-लाल रंगांमुळे सफेद आणि काळे गणवेश अधिक शुद्ध सफेद आणि काळे दिसतात, हा मुद्दा योग्य आहे. पण नको इतके गजबजलेले आहे. काळ्या वर्दीतले तीन्ही व्यक्ती सगळे चित्राबाहेरच्या उजव्या भागाकडे बघत असते, तर काही गर्भित कथानक असते. दोन लाल-सफेद फिती, एक फोकसमध्ये, एक आउट-ऑफ-फोकस, यांनी कुठल्या कथानकाचे सुसूत्रीकरण होते आहे? कला म्हणून मला चित्र भावले नाही, आणि वृत्तांकन म्हणून सुद्धा माझ्याकरिता प्रभावी नाही.

तुम्ही दुसर्‍या चित्रत सुचवता तो "प्रकार पाषाणभेद यांच्या चित्रात (पाण्याखाली दगड) दिसेल. (दोन चित्रांच्या कौशल्याची तुलना नाही. "कोणाला सुचले नाही" असे वाटू नये, इतकेच म्हणायचे आहे.)

तुम्ही दिलेल्या तिसर्‍या चित्रातली एक-रंगाचा भावुक प्रभाव कोणी वापरलेला नाही, ही बाब खरी आहे. लक्षणीय आहे. (येथेसुद्धा निळा रंग चित्राबाहेरील आजूबाजूच्या सफेद रंगामुळे प्रभावी होतो. दृष्टीला रंगाचे रंगपण सापेक्ष कळते, ही जीवशास्त्राची बाब आहे. जुन्या कृष्णधवल दूरचित्रवाणी संचातला "सफेद" निळसर करडा वगैरे असे. पण तो प्रेक्षकांना सफेद म्हणूनच जाणवे.)

एक उपटिप्पणी : "भडक" आणि "संपृक्त" ("सॅच्युरेटेड") रंग, या दोन शब्दप्रयोगांमध्ये गोंधळ करून उपयोगाचा नाही. "भडक" मध्ये निंदाव्यंजकता आहे. ती या टिप्पणीमध्ये असण्याची गरज नव्हती. संपृक्त रंगांची मांडणी जर चित्रकाराच्या हेतूला पोषक असली, तर तीच निवड त्या चित्राकरिता योग्य असते. "भडक" नसते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(जॉर्ज ऑर्वेलचा बोजड शब्द वापरण्याच्या विरोधातला लेख नुकताच वाचला. म्हणून एक परिच्छेद पुन्हा लिहायचा प्रयत्न करतो Smile

पहिल्या चित्राबाबत एकच पटले. भडक लाल-निळे रंग शेजारी असल्यामुळे काळे आणि सफेद गणवेश ठळक होतात. तरी फाजिल गजबजलेले चित्र मला आवडले नाही. काळ्या गणवेशातील सगळेच लोक चित्राबाहेर एका दिशेला बघत असते, तर "बाहेर काय आहे" हे कुतूहल वाटले असते. कल्पनेत कथा खुलली असती. पण तसे काही नाही. चट्ट्यापट्ट्याच्या दोन फिती आडव्या जात आहेत. एक रेखीव फोकसमध्ये आहे, एक धूसर आहे. या दोन फिती आणि त्यांच्यातला फरक डोळ्यांत भरतो. पण हे कुठल्याच कथानकाला बांधत नाही. हे चित्र कला म्हणून मला भावले नाही. वृत्त म्हणूनही प्रभावी वाटले नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सहमत. तिसरे चित्र भावले, रंगांच्या एकापेक्षा अधिक मितींचं कॉम्पोझिशन उत्तम आहे. पहिल्या चित्रात अनेक विषय एकत्र अधिक कंटाळवाण्या स्वरुपात मांडल्याने रंगांची जाणीव काहीशी कमी होते. दुसरे चित्र बरे आहे.

दृश्य स्वरूपाच्या आशयाच्या आकलनाबद्दल मते असू शकतील, पण दृश्य स्वरूप कसे असावे ह्या बद्दलचे मत निव्वळ सापेक्षच असेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दृष्टीने चांगले आहे पण मला तरी त्याच्यावर निळ्या संगाची 'cast' आल्यासारखे दिसते आहे, white balance setting issue असावा असे वाटून गेले. आकाशाचा निळा रंग वेगळा वाटतो

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छाचि आव्हान लेखमालेतील गेल्या दोन तीन भागात स्पर्धकांनी दिलेले फोटो खूप छान आहेत व वर चिंजं यांनी पहील्यापासुन मांडलेल्या विचारांना अनेक स्पर्धकांनी आपल्या चित्रात स्थान दिले आहे असे दिसत आहे.

प्रसिद्ध वॉटरकलरिस्ट(जलरंगचित्रकार?) फ्रँक वेब यांच्या शब्दात [खाली जे लिहले आहे ते छाचि दृष्टीनेही महत्वाचे आहे - असे मला वाटते], "Pictures are not made of flowers, guitars, people, surf or turf, but with irreducible elements of art: shapes, tones, directions, sizes, lines, textuers and color"

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>भडक लाल-निळे रंग शेजारी असल्यामुळे काळे आणि सफेद गणवेश ठळक होतात. तरी फाजिल गजबजलेले चित्र मला आवडले नाही.

ते बरोबरच आहे. ही छायाचित्रं मी चांगल्या छायाचित्रांचे नमुने म्हणून दिली नव्हती, तर असा काही विचार केला जाऊ शकतो हे दाखवण्यासाठी दिली होती.

>>तुम्ही दुसर्‍या चित्रत सुचवता तो "प्रकार पाषाणभेद यांच्या चित्रात (पाण्याखाली दगड) दिसेल. (दोन चित्रांच्या कौशल्याची तुलना नाही. "कोणाला सुचले नाही" असे वाटू नये, इतकेच म्हणायचे आहे.)

हेही बरोबरच आहे. म्हणून मी 'पुष्कळशा लोकांचा पूर्वग्रह किंवा अपेक्षा' असं म्हटलं होतं.

>> "भडक" आणि "संपृक्त" ("सॅच्युरेटेड") रंग, या दोन शब्दप्रयोगांमध्ये गोंधळ करून उपयोगाचा नाही. "भडक" मध्ये निंदाव्यंजकता आहे. ती या टिप्पणीमध्ये असण्याची गरज नव्हती. संपृक्त रंगांची मांडणी जर चित्रकाराच्या हेतूला पोषक असली, तर तीच निवड त्या चित्राकरिता योग्य असते. "भडक" नसते.

हाही मुद्दा योग्यच आहे. मात्र मला 'भडक'मध्ये निंदाव्यंजकता अभिप्रेत नव्हती, कारण मला भडक रंग आवडतात आणि ह्या धाग्यावर आलेली अनेक छायाचित्रंही मला आवडली होती. त्यामुळे निंदाव्यंजकता जाणवली असली तर क्षमस्व.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||