ह्या कन्नडीगांना आलाय माज

ह्या कन्नडीगांना आलाय माज

ह्या कन्नडीगांना आलाय माज
तो माज आता काढू मोडून
अर्रे 'देत नाही देत नाही' म्हणता कशाला
चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||धृ||

लई तुरूंगवास करवला रे तुम्ही
काय सहन नाही केलं आम्ही
मराठीसाठी किती रक्त वाहवलं
ह्या कन्नडीगांना आम्हां डिवचलं
लई झालं आता
उठला मराठी माणूस पेटून
चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||१||

अरे गल्या-बोळांना नावं आमची
सार्‍या दुकानांना नावं आमची
सार्‍या शाळा रे आमच्या आमच्या
सारी आडनावं आमची आमची
बेळगाव महानगरपालीका आमची
एका ठरावानं होईल का तुमची?
आता चाला तोडू कर्नाटक विधान भवन
चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||२||

आहे जसं कन्नडी शासन मुजोर
त्याला सामील केंद्रशासन कमजोर
खेळी दोघांनी केली विधानभवनाची
साक्ष आहे जशी उंदराला मांजराची
बास झालं लई झालं
बंद करा तुमचं दडपशाहीचं संमेलन
चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||३||

या सीमेपाई एक पिढी गेली की रं आमची
ही सारी जमीन आमच्या बापजाद्याची
जमवून सारी फौज मराठी माणसाची
ईच्छा पुरी करू महाराष्ट्री जाण्याची
सांगून ठेवतो मुस्कटदाबी करू नका
उगा आमच्यावर वार करू नका
महाराष्ट्रात जाण्यासाठी
आमची तर फोडूच पण तुमचीबी डोकी फोडू
सांगून ठेवतो मिशीला पिळ देवून
चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||४||

-(अपुर्ण - योग आलाच तर पुर्ण करेन)

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी आपण सार्‍या 'ऑनलाईन मराठी कम्युनिटीजनी' मुजोर कर्नाटक, मरगळलेले मराठी नेते अन नाकर्ते केंद्रशासन यांचा ऑनलाईन निषेध करायला हवा.

-पाषाणभेद

field_vote: 
1.5
Your rating: None Average: 1.5 (2 votes)

प्रतिक्रिया

आपापल्या प्रांतिक अस्मिता जपण्याच्या प्रयत्नात राष्ट्रीयत्वाची भावना लोप होत चालली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

हेच काहीसं - "आपापल्या राष्ट्रीय अस्मिता जपण्याच्या प्रयत्नात वैश्विकतेची/माणुसकीची भावना लोप होत चालली आहे." असं पण चालेलच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अगदी बरोबर आहे. पण हा पॅरेडॉक्स झाला.. एक निश्चित तत्व त्यातून बनवता येत नाही.

तसंही तात्विकदृष्ट्या योग्य असतं ते सगळंच आचरणात आणता येत नाही.

तेव्हा एका कोणत्यातरी कुंपणात राहिलंच पाहिजे. अशा वेळी सर्वात मोठं "कंपेलिंग" छत्र म्हणजे देश.. हे युनिट अस्मिता आदिंसाठी घ्यायला जास्त चांगलं.

देश हे कंपेलिंग युनिट अशासाठी की त्याच्या बाहेर संचार करायला कागदपत्रं आणि बंधनं आहेत म्हणून.

एरवी जिल्हा, भाषा, राज्य, जात, गल्ली, वॉर्ड नंबर, गणेशोत्सव मंडळ, लिंग, वयोगट -जनरेशन ग्याप, क्लब - रोटरी मिडटाऊन व्हर्सेस रोटरी साऊथ सिटी, अशा अनेक युनिट्सनी संघर्ष जन्माला घालून पेटत ठेवता येतो.

त्यातल्यात्यात देश ही मर्यादा बरी, लेसर नंबर ऑफ वरीज टू हँडल फॉर सिस्टीम (इफ एनी)..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्वसाधारणपणे तुमच्या प्रतिसादाशी सहमत,

>>तेव्हा एका कोणत्यातरी कुंपणात राहिलंच पाहिजे.

म्हणजे समजाला अमुक एका दिशेला हाकत राहिलं पाहिजे असं काय? श्रद्धेशी निगडीत गोष्टी ह्याबहूदा समाजाला कुंपणात बाधायला बर्‍या पडतात म्हणूनच वापरल्या जातात, पण ह्याविरुद्ध विचार केल्यास निर्गुणाकडे/आदर्शवादाकडे झुकणारे विचार कधी-कधी प्रत्येक गोष्टीत अर्थहिनता शोधतात व त्यातून क्रियाशून्यता निर्माण होते असं वाटतं, त्यामुळे तत्वं ही नेहमी सापेक्ष असणंच उत्तम.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाही.. कुंपण हा शब्द मानसिक कुंपण म्हणून वापरलेला नाही. भौगोलिक कुंपण म्हणूनच.. जिथपर्यंत मुक्त संचार आहे तिथपर्यंतची जमिनीने आखलेली मर्यादा म्हणून कुंपण. त्यात हाकण्याचा भाग नसून कुठल्यातरी पातळीवर एकत्र येण्याची (नेसेसरी इव्हिल अशी) गरज आहे.

हे विश्वचि माझे घर म्हणून अराजक माजण्याची भीती आहे.. भीती कसली.. खात्रीच आहे. जर "देश" हे युनिटही मानायचं नाही असं ठरवलं तर मग विश्वबंधुत्वाने सैनिक नावाचा फोर्स एकत्र आणून घडवताच येणार नाही. अस्तित्वासाठी "आपला" आणि "परका" हा भाव कोणत्यातरी सुवर्णमध्य अशा पातळीवर अस्तित्वात ठेवायलाच लागतो दुर्दैवाने.. किंवा दैवाने..

सारी पृथ्वी एक देश झाला तर हा भाव नाहीसा करता येईल (अ‍ॅडमिनिस्ट्रेशनचे प्रश्न सध्या बाजूला ठेवून) ग्रहावरचे सर्व देश एकछत्र झाले तरी मग बाहेरुन येणार्‍या "परक्या" संकटांपासून आणि जीवाणूंपासून "आपली" पृथ्वी वाचवली पाहिजे.. असा भाव तरी राहणारच..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अस्मिता ही भावना आहे, पण ती कायमच सर्वार्थाने लागू असेलच असं नाही. दास्यत्वाच्या संकटापासून वाचण्यासाठी ह्या भावनेची गरज आहे पण कदाचित प्रगतीसाठी ती भावना गैरलागू आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दास्यत्वाच्या संकटापासून वाचण्यासाठी ह्या भावनेची गरज आहे पण कदाचित प्रगतीसाठी ती भावना गैरलागू आहे.

अत्यंत बरोबर बोलताय. ..अस्मिता हे आवश्यक संकट मुळात "बाह्य" संकटापासून वाचण्यासाठीच केवळ... एरवी *प्रगतीसाठी अस्मिता ही भावना दुरितच आहे.. शत्रूच आहे असं वाटतं.
(*प्रगती सर्वांगीण आणि सर्वांची असं धरलं आहे.. नपेक्षा पुन्हा "प्रगती" कोणाची / कोणत्या समूहाची ? एकाची प्रगती म्हणजे दुसर्‍याचं नुकसान का? असे प्रश्न उभे राहू शकतात..)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गविंशी सहमत आहे.

सारी पृथ्वी एक देश झाला तर हा भाव नाहीसा करता येईल (अ‍ॅडमिनिस्ट्रेशनचे प्रश्न सध्या बाजूला ठेवून) ग्रहावरचे सर्व देश एकछत्र झाले तरी मग बाहेरुन येणार्‍या "परक्या" संकटांपासून आणि जीवाणूंपासून "आपली" पृथ्वी वाचवली पाहिजे.. असा भाव तरी राहणारच..

विशेष सहमत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

बाहेरुन येणार्‍या "परक्या" संकटांपासून आणि जीवाणूंपासून "आपली" पृथ्वी वाचवली पाहिजे.. असा भाव तरी राहणारच..

पृथ्वीवरील जीवाणूंपासून "आपली" पृथ्वी वाचवून झाली काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'माज', 'डोकी फोडणं' 'विधान भवन तोडू' .. ही भाषा चिंताजनक वाटली.

इतिहास माहिती आहे आणि ज्यांनी त्यासाठी कष्ट सोसले त्यांच्याबद्दल आदरही आहे.

आता नवे पर्याय शोधावे लागतील. पण ते अशा हिंसेतून मिळणार नाहीत, यातून फक्त आणखी काही डोकी फुटतील - हे आपल्याला कधी समजेल? (आपल्याला म्हणजे फक्त पाषाणभेद यांना नाही, तर आपल्या समाजाला!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'माज', 'डोकी फोडणं' 'विधान भवन तोडू' .. ही भाषा चिंताजनक वाटली.

जाऊ द्या हो! नरभक्षकांकडून याहून वेगळी अपेक्षा ती काय करणार?

('आपलं बाळ यम्मी यम्मी'??? 'यम्मी' - खरे तर 'यमी' - हा शब्द खास करून खाद्यपदार्थांकरिता वापरला जातो, अशी आजवरची समजूत होती. नरभक्षणही एक वेळ समजू शकतो, पण स्वतःचेच मूल? 'यम्मी'? आणि तेही स्वपत्नीसमवेत जिभल्या चाटत? अरारारारा! असो.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>यमी' - हा शब्द खास करून खाद्यपदार्थांकरिता वापरला जातो

मला वाटतं तो शब्द गोरेपणाचे ष्टॅण्डर्ड म्हणून वापरलं जातं (यमीपेक्षा सहापट गोरी)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

म्हणजे (त्या कवितेतले) 'आपले* बाळ' हे 'यम्मी यम्मी' म्हणजे 'यमीपेक्षा दुप्पट गोरे' असावे काय? (म्हणजे कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेच्या एक तृतीयांश गोरे?)

असेलही कदाचित. तसे कवितेतले आपल्याला काही कळत नाही बुवा.
========================================================
* बोले तो, (बहुधा) प्रस्तुत कवीचे आणि (पुन्हा, बहुधा) त्याच्या पत्नीचे. सर्वश्री 'न'वी बाजू आणि नितिन थत्ते यांचे नव्हे. अनावश्यक स्पष्टीकरण समाप्त.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'न'वी बाजू, आपण माझ्या कविताही पाहतात अन त्यांचा नंतरही उल्लेख करण्याइतपत तुमच्या लक्षात राहतात हे पाहून आम्हांस आनंद जहाला आहे. याकारणे आपल्यास आम्ही +१ बक्षिसी म्हणून देतो आहोत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

याकारणे आपल्यास आम्ही +१ बक्षिसी म्हणून देतो आहोत.याकारणे आपल्यास आम्ही +१ बक्षिसी म्हणून देतो आहोत.

थोडक्यात, हुडूत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'न'वी बाजू, तुम्ही थोडेसे पर्सनल जाताय किंवा जाल असे वाटते. आंतरजालावर वावरायचे नियम तुम्हाला ठावूक नसावे याचे आश्चर्य वाटते.
अन वरच्या प्रतिक्रियेला संपादकांनी 'Score: 0 खोडसाळ' असा Score का दिला? तो 'विनोदी' असाही वाटू शकत नाही काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

आंतरजालावर वावरायचे नियम तुम्हाला ठावूक नसावे याचे आश्चर्य वाटते.

'माज आलाय', 'विधानभवन तोडू', 'डोकी फोडू' वगैरे जालनवसौजन्याचे नमुने पाहून गहिवरून आले.

(बाकी, आजकाल काहीही 'कविता' म्हणून खपते, नि कोणीही 'कवी' म्हणून मिरवतो झाले. ज़माना बदल गया है, हं?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नरभक्षक वगैरे म्हणणं अस्थानी वाटलं. नीट न जमलेल्या का होईना, पण विनोदाने तुम्ही म्हटलेलं आहे हेही स्पष्ट होत नाही. असे शब्द वापरून विनोद करणार असाल तर तो विनोद आहे हे स्पष्ट होईल इतक्या तरी दर्जाचा असावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नरभक्षक वगैरे म्हणणं अस्थानी वाटलं. नीट न जमलेल्या का होईना, पण विनोदाने तुम्ही म्हटलेलं आहे हेही स्पष्ट होत नाही.

अहो चालायचेच. आता वरील कवितेचेच घ्या ना! त्यातील 'माज आलाय', 'विधानभवन तोडू', 'डोकी फोडू' यांसारखे उत्कृष्ट जमलेले अतिसटल विनोद हेही विनोद आहेत, हे मला जिथे स्पष्ट झाले नाही (आमची विनोदबुद्धी यथायथाच, त्याला काय करणार?), तिथे आमच्या भिकार विनोदांची काय कथा?

त्यामुळे, आमचे नीट न जमलेले विनोद हे विनोद आहेत, हे जर तुम्हाला स्पष्ट झाले नाही, तर त्याबद्दल निदान मी तरी तुम्हाला दोष देऊ शकत नाही. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कशाला तोच तोच प्रश्न आपटायचा?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हीच कविता काही शब्द बदलून (म्हणजे जहालभाषाचिकित्सक नव्हे- जहाल भाषा तीच फक्त प्रदेशांची नावं बदलून) वाचून पाहिली.;)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

महाराष्ट्रात ती धमक उरलेली नाही हेच खरे. बाकी जाऊदे, धड विदर्भाला नीट इंटिग्रेट करू शकलो का आपण? सांस्कृतिकदृष्ट्यादेखील जमलेले नाहीये आजिबात. आणि हे सगळे मराठीभाषक असूनसुद्धा. बेळगाव भागाचे काय कप्पाळ इंटिग्रेशन करणार आहोत?? सगळे साले करंटे, घाला त्यांना १२ गडगड्याच्या विहिरीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

काश्मिर, बेळगाव, जेरूसलेम या तिघांत पहिला प्रश्न कोणता सुटेल बरे? Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

स्वतःचे टाळके फुटण्याची जोवर सुतराम् शक्यता नसते, तोवर मुंबईत/पुण्यात/नाशकात बसून बरळायला छान कविता आहे.

याला एक उपाय आहे. या असल्या कविता पाडणार्‍यांना बेळगावात टाळके फोडून घ्यायला पाठवून देऊन, त्यानंतर मग बॉर्डर सध्या आहे त्या स्थितीत कायमची सील करणे. फिर एक आदमी उधर का इधर नहीं आएगा, और एक आदमी इधर का उधर नहीं जाएगा| निपटा लो फिर जो कुछ भी निपटा लेने का उधरइच - फिर आयंदा इधर वापस नहीं आने का|

(हे सर्व मलाही इथे अटलांटात बसून बरळायला काहीच जात नाही, हा भाग अलाहिदा.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या कवितेची (प्रत्युत्तरात्मक?) कन्नड आवृत्ती काहीशी अशा धर्तीवरची असू शकेल काय? (कडव्यांच्या शब्दांकडे नीट लक्ष द्यावे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कविते बद्दल काय प्रतिसाद द्यावा समजत नाही कदाचित माझी तेवढि वैचारिक पात्रता नसेल परंतु प्रकाश घाटपांडे साहेबांचा प्रतिसाद छान वाटला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

देवगिरीचं राज्य कर्नाटकात पसरलेलं होतं. विजयनगरचे राजे मराठीच. शहाजीराजांची जहागिरी कर्नाटकातही होती, जिंजीपर्यंत स्वराज्य होतं, तर मग कर्नाटक परकं कसं? कर्नाटकही आपलंच आहे. त्यांना आपलंच म्हणा.

बरं या कवितेत स्यान होजे, बे एरिया आणि मुंबई या ठिकाणच्या लोकांबद्दल काहीही सहानुभूती नसल्यामुळे कविता आवडली नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

विजयनगरचे राजे मराठीच.

नाही हो. कोणी सांगितली ही चुकीची माहिती? विजयनगरचे राजे कन्नडच होते.विजयनगरचे राज्य स्थापन झाले होते हंपीमध्ये आणि हंपी हे कोप्पळ-बेल्लारी पट्ट्यात येते म्हणजे बेळगाव,निपाणी,भालकी पासून बरेच दूर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझी पुण्याचे वटवाघूळ,आयाळ वाढलेला सिंह आणि जिभल्या चाटणारा बोका ही इतर नावे आहेत.भविष्यात नव्या मराठी संकेतस्थळांवर मला "दोन मदारींचा उंट","लांब मानेचा जिराफ","जाड कातडीचा गेंडा" आणि "दाट केसांचे अस्वल" ही नावे घ्यायची आहेत. ही नावे कॉपीराईटेड आहेत.

कन्नडा आणि मराठी या वेगवेगळ्या भाषा झाल्या खूप अलिकडच्या काळामधे. ज्ञानेश्वरांच्या लिखाणात पहा, "कानडाऊ विठ्ठलु" येतं आणि आता विठ्ठल महाराष्ट्रातल्या पंढरपुरात आहे, अनेक ठिकाणी आताच्या कन्नडात आहेत तसे उकार येतात त्यामुळे कन्नडा आणि मराठी या भाषा अतिशय आधुनिक काळात वेगळ्या झाल्या आहेत.
लवकरच मी यावर एक पुस्तक लिहून प्रसिद्ध करणार आहे. त्यात वेगवेगळे २७१ संदर्भांची यादीही आहे. याशिवाय ३ परिशिष्ट आणि १४ पुरवण्याही आहेत. ते (विकत घेऊन) वाचा, मगच तुमचा विश्वास बसेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ज्ञानेश्वरांच्या लिखाणात पहा, "कानडाऊ विठ्ठलु" येतं

ज्ञानेश्वरांच्या लिखाणातील कानडाऊ विठ्ठलु मधील "कानडाऊ" चा अर्थ विठ्ठल कानडी आहे असा होतो की माझ्या विठ्ठलाचे रूप चांगले आहे असा होतो? बाकी कोल्हापूरची अंबाबाई ही तिरूपतीच्या बालाजीची पत्नी आहे असे म्हणतात. म्हणजे त्या अर्थी महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश हे कर्नाटकापेक्षा अधिक जवळचे झाले Smile

लवकरच मी यावर एक पुस्तक लिहून प्रसिद्ध करणार आहे. त्यात वेगवेगळे २७१ संदर्भांची यादीही आहे. याशिवाय ३ परिशिष्ट आणि १४ पुरवण्याही आहेत.

अरे वा पुस्तकाची वाट बघत आहे.

ते (विकत घेऊन) वाचा, मगच तुमचा विश्वास बसेल.

विकत घेऊन हे मुद्दामून कशाला सांगायला हवे? Smile

(धडका देणारा) पिसाळलेला हत्ती

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझी पुण्याचे वटवाघूळ,आयाळ वाढलेला सिंह आणि जिभल्या चाटणारा बोका ही इतर नावे आहेत.भविष्यात नव्या मराठी संकेतस्थळांवर मला "दोन मदारींचा उंट","लांब मानेचा जिराफ","जाड कातडीचा गेंडा" आणि "दाट केसांचे अस्वल" ही नावे घ्यायची आहेत. ही नावे कॉपीराईटेड आहेत.

ज्ञानेश्वरांच्या लिखाणातील कानडाऊ विठ्ठलु मधील "कानडाऊ" चा अर्थ विठ्ठल कानडी आहे असा होतो की माझ्या विठ्ठलाचे रूप चांगले आहे असा होतो?

ठीक.

मग त्यापुढील 'करनाटकू'चा अर्थ 'फार नाटके करतो बुवा!' असा घेता यावा काय?

शक्य आहे. माऊली आणि विट्ठलामधील लाडिक प्रेमाचे द्योतक असावे बहुधा ते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सकाळीच खुदकन हसवलेत.. धन्यवाद.. लई भारी..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मग त्यापुढील 'करनाटकू'चा अर्थ 'फार नाटके करतो बुवा!' असा घेता यावा काय?

अहो वरवर कानडू, करनाटकू असे शब्द असले तरी त्याचा आध्यात्मिक गूढ अर्थ वेगळाच आहे!! मग कसला महाराष्ट्र आणि कसले कर्नाटक!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझी पुण्याचे वटवाघूळ,आयाळ वाढलेला सिंह आणि जिभल्या चाटणारा बोका ही इतर नावे आहेत.भविष्यात नव्या मराठी संकेतस्थळांवर मला "दोन मदारींचा उंट","लांब मानेचा जिराफ","जाड कातडीचा गेंडा" आणि "दाट केसांचे अस्वल" ही नावे घ्यायची आहेत. ही नावे कॉपीराईटेड आहेत.

आता तुम्हीच म्हणताय. पण मराठीत अध्यात्मिक भाषेत जर करनाटकु, कानडाऊ याचे अर्थ प्रेमळ होत असतील तर मग प्रश्नच कसला? (प्रेमळ, भले अर्थ नसतील तर ज्ञानेश्वर काय विठ्ठलाची संभावना करत होते त्याला कन्नडीगा म्हणत?) कन्नडीगाही आपलेच झाले की. त्यांना आपलं म्हणा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कन्नडीगाही आपलेच झाले की. त्यांना आपलं म्हणा!

अहो मी सगळ्या भारतीयांना आपलेच म्हणत आहे म्हणजे त्यात कन्नडिगाही आलेच.आणि अभारतीयांपैकीही आपल्याशी आपण भारतीय आहोत या कारणावरून वैर न बाळगणारेही आपलेच की!!

या कवितेत "आपण" विरूध्द "ते" हा सूर जाणवत आहे तो नक्कीच खटकतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझी पुण्याचे वटवाघूळ,आयाळ वाढलेला सिंह आणि जिभल्या चाटणारा बोका ही इतर नावे आहेत.भविष्यात नव्या मराठी संकेतस्थळांवर मला "दोन मदारींचा उंट","लांब मानेचा जिराफ","जाड कातडीचा गेंडा" आणि "दाट केसांचे अस्वल" ही नावे घ्यायची आहेत. ही नावे कॉपीराईटेड आहेत.

कन्नडा आणि मराठी या वेगवेगळ्या भाषा झाल्या खूप अलिकडच्या काळामधे.

होय, फक्त गेल्या दीडेक हजार वर्षांतच फरक पडलाय Smile

लवकरच मी यावर एक पुस्तक लिहून प्रसिद्ध करणार आहे. त्यात वेगवेगळे २७१ संदर्भांची यादीही आहे. याशिवाय ३ परिशिष्ट आणि १४ पुरवण्याही आहेत. ते (विकत घेऊन) वाचा, मगच तुमचा विश्वास बसेल.

विश्वास गेला पानिपतावर!!!!!!! Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

होय, फक्त गेल्या दीडेक हजार वर्षांतच फरक पडलाय

मग काय तर! विश्व जन्माला आलं १३ अब्ज वर्षांपूर्वी, सूर्याचा जन्म पाच अब्ज वर्षांपूर्वीचा, पृथ्वीचा ४.५ अब्ज, आणि शेतीचा शोधही काही दशहजार वर्षांपूर्वीचा, त्या तुलनेत दीड हजार म्हणजे छाटछूटच की! आणि तुम्ही अजून भाषा आणि राज्य, देश यावरून भांडत बसा! उद्या उपमा म्हणयचं का उप्पीट, तो लसूण का ती लसूण यावरून भांडत बसाल. क्षुद्र कुठचे!!

(अवांतर: यावरून निष्कारण अनेक वर्षांपूर्वी मनातल्या मनात झालेली तुलना आठवली. बाहेरून म्हैसूरचा राजवाडा पाहिला आणि बकिंगहॅमही! म्हैसूरचा राजवाडा हा राजवाडा असेल तर बकिंगहँमला सर्व्हंट क्वार्टर म्हणायला हरकत नाही, असा विचार बाहेरून बघूनच आल्यामुळे दमडा मोजून बकिंगहॅमच्या आतमधे गेले नाही. तेव्हा तुलना करायला "आपला" रायगड आठवला नाही ना देवगिरी! )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ज्ञानेश्वरांच्या लिखाणात पहा, "कानडाऊ विठ्ठलु" येतं आणि आता विठ्ठल महाराष्ट्रातल्या पंढरपुरात आहे

"पंढरपूर, आळंदीसह संयुक्त कर्नाटक झालाच पाहिजे." *

========================

* थोडक्यात मराठी गोषवारा. मूळ कन्नड तर्जुमा कोणी उपलब्ध करून दिल्यास आगाऊ ऋणनिर्देश.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी 'ऐसी अक्षरे' वर पाळत ठेवणारा कर्नाटक सरकारचा हेर अाहे, हे माझ्या अाडनावावरून सुज्ञांनी अोळखले असेलच. तदनुसार या कवितेचे (यमकांसकट) कन्नडमध्ये भाषांतर करून अात्ताच मी ते 'कर्नाटक राज्य सचिवालय, प्र. के. अत्रे मार्ग, बेंगलोर' या पत्त्यावर पाठवले अाहे. याउपर कर्नाटक सरकार जो काही निर्णय घेईल तो सिद्धीस नेणेस श्रवणबेळगोळस्थित श्री बाहुबली समर्थ अाहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी (होमपेज)

प्र. के. अत्रे मार्ग

रोचक! Biggrin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गूगलकाकांच्या म्हणण्यानुसार कर्नाटकची विधान सौदा (विधानसभा) आणि उच्च न्यायालयही डॉ. बी. आर. आंबेडकर रस्त्यावर आहे.

काय फरक पडतो, अत्रे असोत वा आंबेडकर, माणूस मराठीच नाही का!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बेळगाव सीमाप्रश्नी अत्रे म्हणजे महाराष्ट्राच्या बाजूने कडकडून भांडणारे. आंबेडकरांना सीमाप्रश्नी काही घेणेदेणे असल्यास (बहुधा नसावे!) त्याबद्दल निदान मी तरी काही ऐकलेले नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू होण्याआधीच (किंवा होता-होताच) ना आंबेडकरांचे देहावसान झाले? लढायचें म्हटलें तरी आंबेडकर कसें हों लढणार होतें?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पण संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू होण्याआधीच (किंवा होता-होताच) ना आंबेडकरांचे देहावसान झाले?

सुटले बिचारे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भाषावार प्रांतांवर अंबेडकरांचे विचार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही यमकांसकट (मी आधी 'यम संकट' असे वाचले) कविता इथेही द्यावी ही नम्र विनंती. या कन्नड भाषेत आमच्या मराठी मिशांची आणि यमकांची जादू उतरते का हे पाहण्यास उत्सुक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ಆದರೆ ಬೆಳಗಾವಿ ಸೇರಿದಂತೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಇರ್ಬೇಕು !!!!!! Wink

(ಒಂದು ಜಜ್ವಲ್ಯ ಮರಹಟಾ- ಗೋಥಮಪಲ್ಲಿನ ಬ್ಯಾಟ್ ಮ್ಯಾನಪ್ಪಾ )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ब्याटम्यानप्पा, हे म्हणजे फारच झालं हं! आमचेच ब्रीद वाक्य, तेही शत्रूच्या भाषेत! चोलबे ना चोलबे ना! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हँ ताइ तो बोलछि!! आमादेर ब्रीदो-बाक्को शोत्रू-एर भाषाय बोललेइ ओदेर माथा खाराप होई जाबे Smile

(बेलगामेर जोन्नो जेदी माराठा- गॉथमपुरेर बादुड़ बाबू ) Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बेलगामेर जोन्नो जेदी माराठा

बेलगामेर जोन्नो के? कॅमोन माराठा?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पाने