ह्या खिडकीतून...[part-2]

ध्यान तर लागले.डोळेपण मिटून गेले.झोपेने आपले पाश आवळले.
मग मध्येच जाग आली. डोळे किलकिले करून सहज बघून घेतले.
उंच आभाळात आमचे विमान तरंगत होते.
बाहेर जांभूळ रंगाचा प्रकाश पसरलेला
विमानात हवाई सुंदरीची लगबग चालू होती. ट्राल्या घेऊन काहीकाही देणे सुरु होते...
चहा ,कॉफी ,थंड पेय
मग हलके हलके बाहेर आभाळाचे रंग बदलू लागले .जांभूळ रंग बदलू लागला .तांबूस छटा आभाळात मिसळू लागल्या
मग कधीतरी हलकेच खिडकीची झडप उघडली.
नि भळकन प्रकाश खिडकीतून घुसला .डोळे दिपून गेले. सगळे झोपेत होते.
हवाई सुंदरी लगबगीने जवळ आली. मंजुळ आवाजात किंचाळली -
"नका उघडू खिडकी. सगळे झोपलेत..!"
नि तिनेच सराईतपणे गोल खिडकीचे शटर बंद केले. खिडकीचा डोळा बंद झाला .
किती वाजलेत ..?
प्रश्न पडला.
कुणास ठाऊक..?
काय करावे. कळत नव्हते .मन कंटाळून गेले होते .
मग सहज गंमत म्हणून मी बायकोकडे बघून घेतले.
एक छान जाणवले अशा ह्या मस्त प्रवासात
आपलीच बायको आपल्याला नव्याने सापडून जाते.
खूप निराळी निराळी वाटू लागते.
आपण आभाळात उडणारे निळे निळे पाखरू होऊन जातो
नि ती मस्त झाड होते......!!

मी अगदी सहज घड्याळात डोकावले.
आता वेळेचे गणित बदलले होते.
भारतीय वेळ येथे चालणार नव्हती. भारतात सकाळचे 1o वाजून गेले होते नि येथे पहाट झाली होती.
मी मधूनच खिडकीच्या फटीतून नजर टाकीत होतो.

मनात आले ...
अरे प्रथम प्रवास करतोय विमानाने नि खाली कसली अदभुत दुनिया पसरलीय ते नको बघायला ...?

माझ्या नजरेला दिसणारे ते शुभ्र ढग .
नुसता कल्लोळ ढगांचा.
प्रकाशाचा सुंदर चमक्तार त्या ढगांवर कोसळत होता
ते सगळे बघणे म्हणजे किती स्वर्गीय आनंद ठेवां होता .हे बघितल्या शिवाय कसा जाणवणार..?
मग हलके हलके सगळे डोळे उघडू लागले
प्रातर्विधि आटोपून घेतले
चहाचा गंध मनात झिरपू लागला .
ट्राली आली.
भरलेला नाश्ता घेऊन आली. .स्यांडविच,ब्रेड आम्लेट काय नि काय
थोडासा नाश्ता उरकून घेतला.
चहा घेतला.
विमानातील चहा म्हणजे दिव्यं अमृतानुभव आहे.
मी परत खिडकी हलकीशी किलकिली केली .
मंद प्रकाश बाहेर झिरपत होता.
निळा,जांभळा केशरी ,
कोणी सराईत चित्रकाराने सहज फराटे मारावे तसे आभाळ दिसत होते

खूप खोलवर काळ्याभोर शेताचे तुकडे दिसत होते. आखीव रेखीव अशी छोटी-छोटी घरे दिसत होती.
मलातर आम्ही लहानपणी गणपतीची सजावट करायचो तसे ते गाव वाटत होते. ते डोंगर नद्या तो घाट रस्ता .बोटाने कुरवाळीत नांगरलेले शेत सगळे मस्त वाटत होते
कोठले गाव ,कोठले शहर होते कुणास ठाऊक ?
मलातर खेडेच वाटत होते. टुमदार नि आखीव रेखीव.
मला गाव आवडून गेले.

हलके हलके प्रकाश दाट होत गेला. अजूनही खिडक्या बंद होत्या. काही माणसे झोपेत होती. काही पेंगत होती .
विमानात एक निराळेच निळे निळे वातावरण होते.
हवाई सुंदरीच्या चेहर्यावर छान प्रसन्न स्मित होते.
मग हलके हलके आमचे विमान जरा जरा खाली आलेसे वाटू लागले.
खोलवर नदी असाविसे वाटू लागले. आतातर रस्ते दिसू लागले. ट्रक, गाड्या आगकाडीच्या पेटी एवढ्या दिसू . भासू लागल्या
फ्र्यांकफर्ट आले असावे असे वाटून गेले. आणि मग हलके हलके रस्ते घरे मोठी मोठी दिसू लागली.
विमानाने धावपट्टीवर पळण्यास सुरवात केली . मोठमोठ्या अगडबंब ट्रक विमानासमोर चिमुकल्या वाटू लागल्या.
स्पीकरवर अनौंउन्समेंट होत होती.

पहिला पडाव पार झाला होतो
उतरण्याची कोणीही घाई करीत नव्हता. कोणीही उतरणार नाही असेच वाटत होते.
विमानाच्या दरवाजाजवळ विमानातील २-३ कर्मचारी व पायलट आम्हाला बाय बाय करण्यासाठी उभे होते..मग आम्हीपण त्याना बाय म्हणून खाली उतरलो .
दुसरे विमान कसे पकडायचे ..?
सगळे नवीन. नवखे.
काय करावे समजत नव्हते.
छोट्या पत्र्याच्या बोगद्यातून आम्ही सरकत होतो. वेळ तसा भरपूर होता .छोट्या लॉबीत आलो .तेथून एक जिना वर जातोय नि एक खाली जातोय. कोणीतरी कर्मचारी उभा होता. त्याला विचारले. त्याने बोटानीच खून करून जिना दाखविला. वर मोठा बोर्ड होता. त्यावर विमान नंबर नि गेट नंबर दिलेला होता.
हुष :. सापडला विमान नंबर नि गेट नंबर.
जसा बाण तसे जात राहिलो चालण्यास वेग पकडला .
सुरक्षा गेटमधून आम्ही पुढे सरकलो.

पुढचा प्रवास आठ तासाचा . विमान मिळाले.
आता आम्ही थोडे थोडे हुशार झालो होतो.
आम्ही आमच्या सिटा पकडल्या टोर्याटोला उतरलो. नि तेथून आमच्या मुक्कामी डोम्यास्टिक विमानाने थेट एडमिंटन
आम्ही आमची लढाई जिंकली होती. कारण आमच्या प्रवासाची एकट्याने लढलेली लढाई होती .
तशी सोपी सोपी नि मनात खूपशी अवघड वाटत होती
सल्ले देणारे खूप होते. सांगणारे खूप होते.
आम्ही मोठ्या हॉलमध्ये प्रवेश करताना आमचा पुतण्या आमच्या स्वागताला उभा होता.
सोबत त्याचा मित्र ,मित्राचे आई -बाबा सर्वजण आतुरतेने वाट बघत उभे होते.

[ परत कधीतरी ]

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

खूप छान प्रवासवर्णन. चित्र अगदी डोळ्यांसमोर उभे राहीले. Smile माझ्या आई-बाबांचा प्रवासही अशाच नवलाईत झाला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त. मला आयुष्यातील पहिली-वहिली चेन्नई मुंबई फ्लाईट आठवली. त्या किंगफिशरच्या एअरहोस्टेस आठवल्या की तोंडला अजुनपण पाणी सुटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सारिका नि इंटरनेटस्नेही-मनापासून आभार..!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0