छायाचित्रण पाक्षिक-आव्हान ८ : पोत (टेक्श्चर)

पुढच्या पंधरवड्यासाठी विषय आहे: पोत (टेक्श्चर)

ऐकण्या-पाहाण्यापेक्षा स्पर्श वास्तवाच्या खूप जवळ जातो. मृगजळ म्हणजे काय? प्रकाशकिरणे दूरवरून डोळ्यांपर्यंत येता-येता प्रतिमा विकृत झालेली असते. ध्वनीसुद्धा दुरून विकृत होऊनच कानांना भेटतो. स्पर्श मात्र अगदी जवळ धडकलेल्या वस्तूचाच होतो. विकार व्हावा इतपत वास्तव आणि ज्ञानेंद्रिय यांत अंतरच नसते.

पोत (Texture) ही बाब स्पर्शाच्या राज्यातली, छायाचित्रणाचा संबंधच काय? असे कोणी म्हणेल. पण कधीकधी चित्रकार अशी काही प्रतिमा समोर ठेवतो, की त्याचा पोत आपल्याला स्पर्श केल्यासारखा जाणवतो. अशा चित्रांत "हे खर्‍यापेक्षाही खरे" असा (hyperreal) अनुभव येऊ शकतो. "ऐसी अक्षरे"चे सदस्य पोत जाणवून देणारी छायाचित्रे येथे देतील असे या आव्हानाकरिता अपेक्षित आहे.

स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत:
१. केवळ स्वतःने काढलेले छायाचित्रच स्पर्धेच्या काळात स्पर्धेसाठी प्रकाशित करावे. मात्र स्पर्धा काळ संपल्यानंतर, निकाल घोषित झाल्यावर त्याविषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही किंवा स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी धरले जाणार नाही.

२. एका सदस्याला जास्तीत जास्त ३ चित्रे स्पर्धेसाठी प्रकाशित करता येतील.

३. आव्हानाच्या विजेत्यास पुढील पाक्षिकात आव्हानदाता आणि परीक्षक व्हायची संधी मिळेल. अर्थात आधीच्या आव्हानाचा विजेता पुढील पाक्षिकाचा विषय ठरवेल आणि विजेता घोषित करेल. (मग तो विजेता त्यापुढील पाक्षिकाचा आव्हानदाता व निरीक्षक असे चालू राहिल.)

४. एक स्पर्धा २ आठवडे चालेल. म्हणजे आज सुरू होणार्‍या स्पर्धेचा शेवट १४ ऑक्टोबर रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल व १५ ऑक्टोबरच्या सोमवारी विजेता घोषित होईल व तो विजेता पुढील विषय देईल.

५. पाक्षिक आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचाराव्यात, निकोप टिपण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी उगाच एखाद्याला टीकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती.

६. आव्हानाचा विजेता घोषित करण्याचे पूर्ण अधिकार आव्हानदात्याचे असतील. त्यासाठी त्याने ठरविकच निकष लावावेत असे बंधन नाही. त्याने आव्हान द्यावे व त्याचे आव्हान कोणी सर्वात उत्तम पेलले आहे ते ठरवावे इतके ते सोपे आहे. शक्यतो ३ क्रमांक जाहीर केले जातील.(मात्र पुढील पाक्षिकात फक्त प्रथम क्रमांकाचा वीरच आव्हानदाता असेल).आव्हानदात्याकडून काय आवडले हे सांगण्याचे बंधन नसले तरी अपेक्षा जरूर आहे.

७. आव्हानदात्याला प्रथम क्रमांकाचा एकच आव्हानवीर घोषित करणे बंधनकारक आहे.

८. आव्हानात स्पर्धेसाठी प्रकाशित चित्रे प्रताधिकाराच्या दृष्टीने निकोप असावीत अशी अपेक्षा आहे.

९. आव्हानदाता स्वतःची चित्रे प्रकाशित करू शकतो मात्र ती स्पर्धेत धरली जाणार नाहीत.

१०. कॅमेरा व लेन्सची माहिती देणे बंधनकारक. शक्य असल्यास एफ्झिफ डेटा द्यावा.
चला तर मग! "पोत (टेक्श्चर)" या विषयाला वाहिलेली छायाचित्रे येऊदेत!

सूचना : 'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावर आपण काढलेले फोटो कसे प्रदर्शित करावेत याबद्दल अधिक मार्गदर्शन या धाग्यावर आहे. त्याचा लाभ घ्यावा.
फोटो अपलोड करताना, अपलोड करणार्‍यांनी जर Width आणि Height (दोन्ही) दिली नाही तर ते फोटो इंटरनेट एक्सप्लोरर (९) वर दिसत नाहीत. (पण फायरफॉक्सवर दिसतात.) यावर उपाय म्हणजे Width आणि Height दोन्ही द्यावेत किंवा त्यांचा उल्लेखच इमेज टॅगमधून डिलीट करावा. कृपया याची नोंद घ्यावी.
मागचा धागा: विषय - भारतीय शिल्पकला आणि धनंजय यांनी टिपलेले विजेते छायाचित्र
सरासरी:

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

सुं - द - र विषय !
तुम्ही शब्दान्त माण्डले देखील छान आहे.
हे छायाचित्रण आव्हान आहे खरे !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अमुकशी १००% सहमत. हा विषय फारच आवडला. काही गोष्टींचे फोटो काढणं डोक्यात आहे, पण एक फोटो तयार आहे तो आधीच टाकते. (मोठ्या चित्रासाठी चित्रावर क्लिक करा.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सिंपली सुपर्ब!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

द्यायचं राहिलेलं होतं.
कॅमेरा: कॅनन टी३, लेन्सः कॅनन किट लेन्स १८-५५ मिमी
ISO: १००, Exposure: १/५० सेकंद, Aperture: ३.५, Focal Length: १८ मिमी, फ्लॅश वापरला नाही. चित्राचा अनावश्यक भाग कातरणे सोडून इतर कोणतेही वेगळे संस्करण केलेले नाही.

अशा प्रकारची झाडं मध्य टेक्ससमधे अनेक ठिकाणी दिसतात, विशेषतः झाडांचा हा काळपट केशरी रंग मातीतही अनेक ठिकाणी दिसतो.

हा माझा दुसरा फोटो. (तिसरा बहुदा काही दिवसांत येईल.)

एक्झिफ:
कॅमेरा: कॅनन टी३, लेन्सः कॅनन किट लेन्स १८-५५ मिमी
ISO: ४००, Exposure: १/४ सेकंद, Aperture: ७.१, Focal Length: ५५ मिमी, Exposure Bias: -1.00 (कॅनन शून्य EV ला फार ब्राईट फोटो काढतो.) फ्लॅश वापरला नाही. Contrast, आणि colour saturation अगदी किंचित वाढवले आहेत; फोटो अर्ध्याधिक कातरला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.


Date: 8/10/12 5:03 PM
Dimensions: 2048 x 1536 pixels
File Size: 570.9K
Camera: Canon PowerShot SX200 IS
Exposure: 0.067 sec (1/15)
Aperture: f/4.5
Focal Length: 25.072 mm
ISO Speed: 400
Exposure Bias: -0.67 EV
Flash Used: No

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काहितरी गडबड झाली का? मी टाकलेला फोटो दिसतोय का?

https://picasaweb.google.com/lh/photo/7T320YT4jdN7H5UQNyx4wETtmNt-81pZ8d...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता फोटो दिसेल असा बदल केला आहे. दोन गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत
१. फोटो अपलोड करताना, अपलोड करणार्‍यांनी जर Width आणि Height (दोन्ही) दिली नाही तर ते फोटो इंटरनेट एक्सप्लोरर (९) वर दिसत नाहीत. (पण फायरफॉक्सवर दिसतात.) यावर उपाय म्हणजे Width आणि Height दोन्ही द्यावेत किंवा त्यांचा उल्लेखच इमेज टॅगमधून डिलीट करावा. कृपया याची नोंद घ्यावी.

२.पिकासा मधील फोटो देत असाल तर ब्राऊझर मधील युआरएल थेट न वापरता, "शेअर धिस" या प्रकारात योग्य तो साईज निवडून मग मिळणारी युआरएल वापरावी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

काही वेळा एकाच फ्रेममध्ये अनेक 'पोत' दिसतात असा अनुभव येतो. कदाचित त्यातला एकच पोत बघताना जास्त नजरेत भरतो. पण नंतर फोटो न्याहाळताना झाकून राहिलेले काही स्पष्ट दिसते आणि पुढच्या वेळी आणखी एखादे दृश्य पाहताना नजरेला वेगळेच काही पडते. ते नेहमीच कॅमे-यात पकडता येतं असं मात्र नाही.

मला दिसलेली काही दृश्यं.

अल्मोडयातून पंतनगरकडे येताना दिसलेली ही एक नदी.

मेघालयात शिलाँगजवळच्या एका खेडयातलं हे एक खासी घर.

आणि पाँडिचेरीजवळच्या एका खेडयात स्वयंपाकाच्या तयारीला लागलेल्या या आजी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भांडी घासणार्‍या आजींच्या चेहेर्‍यावरच्या किंवा हातावरच्या सुरकुत्यांचा क्लोजप बघायला आवडला असता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अपेक्षा योग्यच आहे. पण अनेकदा थेट चेह-याचा फोटो काढताना लोक सावध होऊन वेगळेच भाव चेह-यावर दाखवतात आणि फोटोची वाट लागते. उदाहरणार्थ हे पहा. शिवाय इथं मी 'फोटोग्राफर' या भूमिकेत नसते तर मीच मुख्य संवाद साधत असते. त्यामुळे निवांत माणसांचे फोटो काढायची चैन जरा दुर्मिळच आहे माझ्यासाठी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुरेख विषय निवडल्याबद्दल धनंजयचे आभार! या आवाहनाला साजेशी अनेक चांगली छायाचित्रं पाहायला मिळतील अशी आशा करतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

काय सुंदर विषय निवडला आहे. शब्दमांडणी तर फारच छान.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण या विषयाला अनुसरुन असलेली काही चित्रे इथे देत आहे. क्यामेरा निकॉन डी ६० आणि लेन्स टॅमरॉन १:१ मॅक्रो ९० एम एम

सदर चित्रे टरबुजाच्या सालीची आहेत. खाण्यापूर्वी लक्ष सालीवरच्या नक्षीवर गेले, मग सुरी ठेवली खाली आणि कॅमेरा घेतला हाती.

mm4 lr

mm7 lr

mm10 lr

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अहा!

सर्वसाक्षी,
तीनही फोटो उत्तम असले तरी या आव्हानाच्या निमित्ताने तुमच्या "पोत"डीत अशीच उत्तमोत्तम अजूनही चित्रे असतील याची खात्री आहे. वरीलपैकी एखादेच स्पर्धेसाठी देऊन अन्य या विषयाशी संलग्न चित्रेही येऊ द्या अशी (काहीशा आगाऊपणे) विनंती करतो! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

फोटो फोनच्या कॅमेर्‍याने काढलेला असल्याने तांत्रिक माहिती देता येणार नाही. आय फोन ४ चा कॅमेरा (५ एम पी.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

बघताक्षणी हात लावण्यास उद्युक्त करणारा मासा.

SONY - DSC-W80 ISO - 400, Exposure 1/20 sec, Aperture 2.8, Focal Length 6mm
_______________________________________________________________________________________________________

पाण्याला काय पोत असणार? पण पाण्याच्या थेंबांमुळे तयार झालेलं आभासी (?) टेक्श्चर ह्या चित्रात टिपण्याचा प्रयत्न केलाय.

SONY - DSC-W80 ISO - 400, Exposure 1/15 sec, Aperture 2.8, Focal Length 6mm
_______________________________________________________________________________________________________

ह्या फुलाचा रेशमी, मुलायमपणा चित्रात टिपण्याचा एक प्रयत्न.

Canon EOS 60D, ISO - 640, Exposure 1/30 sec, Aperture 5.6, Focal Length 64mm

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-अनामिक

पाण्याचे थेंब अप्रतिम!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

पाण्या तुझा पोत कसा?

Model NIKON D40X
ISO 200
Exposure 1/160 sec
Aperture 5.6
Focal Length 55mm

दोन्ही निळेच रंग..पण पोत वेगळे:

Model NIKON D40X
ISO 200
Exposure 1/500 sec
Aperture 5.6
Focal Length 18mm

आणखीन एकः
दुष्काळाचा पोत

Camera Nikon D40X
Exposure 0.004 sec (1/250)
Aperture f/4.5
Focal Length 70 mm
ISO Speed 200

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0


पुदिन्याच्या झाडाची फांदी

कॅमेरा : Canon PowerShot SX40 HS
लेन्स : 4-150mm f/4.5-8

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

मी प्रथमच फोटो अपलोड करायचा प्रयत्न करते आहे.
पण मला पूर्वद्रुश्यात फोटो दिसत नाहिय...
तुम्हाला दिसतो आहे का?


कॅमेरा: कॅनोन पॉवरशॉट एस एक्स१०आयएस

संपादन - दुवा दुरुस्त केला आहे. आता फोटो दिसतो आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अपलोड करताना नेमके काय चुकले ते कळलं नाही.
फोटो अपलोड कसे करावेत ही माहीती वाचूनच केलं सगळं..
पण काहीतरी घोळ झालाच...

@अनामिक :पाण्याच्या थेंबाचे छायाचित्रं छान आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पिकासावर "Copy Image Location" करताना जेपेग दुवा आला नव्हता तर निव्वळ अल्बमचा दुवा आला होता. त्यामुळे फोटो दिसत नव्हता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मणीपूरमधल्या काकचिंग डोंगरावरून दिसलेले दृष्य

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कॅमेरा : NIKON D40
Aperture : 4.5
Exposure Time : 1/1250 (0.0008 sec)
Focal Length : 150.0 mm
लेन्स : Sigma 150mm F2.8 EX DG APO Macro HSM

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोणत्यातरी पानाचा जवळून घेतलेला फोटो.

" >

कॅमेरा : कॅनन १०००डी
लेन्स : टॅमरॉन ९० मीमी मॅक्रो.
शटर 1/125
मॅनूअल फोकस आणि एक्सपोजर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बदामी किल्ल्यातील एक भिंत.

/>

कॅमेरा : कॅनन १०००डी
लेन्स : टॅमरॉन १७-५०,२.८
एक्सपोजर f२.८, १/४००

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऋषिकेशने केलेल्या फर्माईशीनुसार या विषयातले आणखी काही फोटो देत आहे

१) गुळगुळीत - एका रविवार सकाळी केलेला रिकामपणचा उद्योग - लाल व हिरव्या मिरच्यांचा फोटो
mirchi

२) मऊशार - मऊ मऊ पिसांचे गुबगुबीत मकाव
macau lr

३) रेषेदार, चुरचुरीत - पॅपायरसचे लेखनपत्र. इजिप्तमध्ये पॅपायरसचे भूर्जापत्र बनवायची कला पारंपरागत चालत आलेली आहे. या वनस्पतीला सुकवुन, कापडावर दाब देऊन पाणी शोषुन केळीच्या सोपटासारखे लेहन/ रंगकामायोग्य पापुद्रे बनविले जातात आणि त्यावर आकर्षक रंगात चित्रे काढतात.अंगच्या पोतामुळे रंगकामास खास उठाव येतो. याचा पोत काहीसा केळीच्या सुकलेल्या सोपटासारखा असतो.
pap1a

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला आवडलेले मित्रांनी काढलेले काही फोटो:

विषय आणि फोटोंच्या लिंका दिलेल्या आहेत. १५ ऑक्टोबरच्या सोमवारी पूर्ण फोटोही इथे दाखवता येतील.
रांगोळी, शनिवारवाड्याचा दरवाजा
या दोन्ही फोटोंचं क्रेडीटः माईक कीथ

वृद्धा
या फोटोचं क्रेडीटः निसिम काणेकार

असे, या विषयांवर काही फोटो काढणं कोणाला शक्य असल्यास बघायला आवडतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आता देते आहे. आणखीही छायाचित्रे काढली आणि ती मला आवडली तर इथे देईन.

Camera: Canon PowerShot SD850 IS
Exposure: 0.8 sec (1/1)
Aperture: f/2.8
Focal Length: 5.8 mm
ISO Speed: 80
Exposure Bias: -
Flash Used: No
Lens 5.8 - 23.2 mm

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राधिका

"पोत" म्हणताच माझ्यासारख्या लोकांचे हात कॅमेर्‍याला मॅक्रो लेन्स लावायला सरसावतील. संवेद्य वस्तूच्या अगदी जवळ जाऊनच स्पर्श होतो, हे प्रास्ताविकात मी लिहिलेले आहे.

परंतु माझ्या कल्पनाशक्तीच्या मर्यादा रुंदावणारी वाईड-अँगल चित्रे येथे आलेली आहेत. अशाच प्रकारे माझ्या स्पर्श-कल्पनेच्या मर्यादा वाढवल्याचा अनुभव मिळू दे : एखाद-दुसरे चित्र मॅक्रो दिलेले असल्यास तिसरे बिगर-मॅक्रो द्यावे, अशी माझी फर्माईश आहे.

त्याच प्रकारे पुष्कळदा पोत जाणवण्यात रंगांचा अडथळा होतो. आजपर्यंत आलेल्या चित्रांपैकी बहुतेक चित्रांमध्ये या अडथळ्याकडे दुर्लक्ष करायचे ठरवलेले आहे. पण एखाद-दुसरेच चित्र असे भन्नाट आहे : रंगाचा अडथळा सोडा, रंगातून पोत खुलवलेला आहे. अशी चित्रे मला नवी दृक्-स्पृष्टी देत आहेत. (दृक्-स्पृष्टी! हाहा Smile ) अशीही चित्रे येऊ देत, ही आणखी एक फर्माईश.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी एकतर धनंजयचा निषेध. तीनच फोटो ही सरासर नाईन्साफी आहे. आणि आता वर पुन्हा वाईड-अँगल फोटोही म्हणतो आहे. माझा बंडखोरीचा इरादा मी आधीच जाहीर करत आहे. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Je n'ai fait celle-ci plus longue que parce que je n'ai pas eu le loisir de la faire plus courte. (Blaise Pascal, Lettres Provinciales, 1657)
"(हे पत्र) मी इतके लांबलचक लिहिले त्याचे कारण फक्त एवढेच, ते याहून लहान लिहिण्याकरिता माझ्यापाशी सवड नव्हती."

"एकीच दिया पर जो दिया वो शॉल्लेट दिया", असे करण्यासाठी तुम्हा-आम्हा हौशी लोकांकडे सवड नसते, म्हणूनच तर तीन द्यायची मुभा या आव्हानात आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सहमत. विशेषतः रंगांविषयीच्या टिप्पणीवर टाळीच. रंग आणि पोत यात देणाऱ्याची गल्लत होतेय, असे वाटण्याइतके तेजतर्रार रंग काही प्रकाशचित्रांमध्ये प्रभावाने दिसतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

थोडं अधिक जाणून घेण्यासाठी हा प्रतिसाद.

"पोत" जवळून दिसतो - हे म्हणणं थोडं सोपं करुन सांगाल का? मला समजलं नाही तुम्ही काय म्हणताय ते. अनेकदा 'अधिक जवळीक' पोत विचित्र करतं (म्हणजे प्रकाशचित्रात)असाही अनुभव आहे. शिवाय दूरवरुन दिसणा-या दृश्यालाही एक प्रकारचा पोत असतो असंही म्हणता येतं. डोळ्यांना येणारा अनुभव एका अर्थी स्पर्शात मोडतो असं मला वाटतं - त्यामुळे वाईड-अँगल चित्रातही 'पोत' दिसू शकतो - का नाही दिसू शकत? नसल्यास का? असल्यास कसा?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाईड-अँगल लेन्स मधून पोत जरूर जाणवू शकतो. हे जमणे कलाकाराकरिता कठिण असते, पण असे चित्र रसिकाची जाणीव रुंदावणारे असते. म्हणूनच तर "एखादे चित्र वाईड अँगलचेही द्या" अशी माझी लडिवाळ फर्माईश आहे. (तुम्ही खुद्द अनेक वाईड अँगल चित्रे दिलीच आहेत, तर ही फर्माईश अन्य लोकांकरिता आहे.)

जर जवळ जाऊन काढलेले चित्र (कलाकाराला नको असलेला) विचित्रपणा आणत असेल, तर अर्थातच तसे चित्र नको. कलाकाराला कुठली जाणीव हेतुतः रसिकात जागवायची आहे? त्या हेतूचा घात होत असेल, तर तसे तंत्र प्रामादिक मानायला हवे.

"डोळ्यांना येणारा अनुभव एका प्रकारे स्पर्शात मोडतो."

अगदी, अगदी असेच. या आव्हानाकरिता जी चित्रे द्यायची आहेत, त्यात तो स्पर्श-भासणारा अनुभव अधिक-अधिक गडद व्हावा. "चित्र आपण _बघत_ आहोत" ही बाह्य-जाणिव एकीकडे, तर "आपण _दृष्टीपेक्षाही_बलवान_ असा स्पर्श अनुभवत आहोत" अशी अंतर्मनाची जाणीव व्हावी, असे आव्हानाचे मर्म आहे. बाह्य जाणीव आणि आतली जाणीव यांच्यात थोडासा बेबनाव* झाला तर साच्यात रुतलेली अनुभूती मोकळी होते. असे होण्याकरिता "डोळ्यांना येणारा _प्रत्येक_ अनुभवच _नेहमी_ एका प्रकारे स्पर्शात मोडतो" या साच्यापेक्षा पुष्कळ अधिक स्पर्श-भ्रम अंतर्मनाला झाला पाहिजे. नाहीतर " डोळ्यांना नेहमीच होणारा एका प्रकारचा स्पर्श" साच्यातून मोकळीक देत नाही. (*बेबनाव : हा हेतुतः आणि योग्य प्रमाणात असावा. हेतूचा घात करणारा बेबनाव नको.)

क्वचित येणारा साचा-मोडणारा जोड-अनुभव कलाकाराने आपल्याला करून दिला, तर चित्र खर्‍यापेक्षा खरे (हायपर-रियल) होते.

जराशी नाटकी चाचणी सुचवतो : चित्र बघत असताना बोटांना "आपण स्पर्श केला" अशा झिणझिण्या होत आहेत का? (खरोखर बोटे लावायची नसतात. नाहीतरी पटलाला बोटे लावून निराशाच होईल Smile )

आजीच्या सुरकुतलेल्या चेहर्‍याला आणि हाताला मी खुद्द मायेने हात लावलेला आहे. तो स्पर्श आणि नुसते तिच्याकडे बघणे यांत काहीतरी फरक होताच. (नाहीतर तो स्पर्श मला इतका उरात तंतू ताणल्यासारखा मला कसा आठवता?) तिच्या प्रत्येक फोटोमध्ये तो स्पर्श मला जाणवत नाही. काही फोटोंमध्ये जाणवतो म्हणजे "डोळ्यांना येणारा प्रत्येक अनुभव एका प्रकारे स्पर्शात मोडतो" मध्ये सुद्धा कमी-जास्त असते. इतकेच काय अन्य चित्रकारांनी वेगळ्याच कुठल्या वृद्धांची चित्रे काढली असतात, ती बघताना _माझ्या_आजीला_ मायेने स्पर्श केल्याच्या आठवणीसारख्या झिणझिण्या माझ्या बोटांत भासतात. ही चित्रकाराची प्रतिभा होय. एरव्ही वृद्ध काय माझ्या डोळ्यांसमोर येत नाहीत? एरव्ही सुद्धा माझ्या डोळ्यांच्या अनुभव _एका_प्रकारे_स्पर्शात मोडत नाही? पण एखादी प्रतिभावंत चित्रकार या "एरव्ही"पेक्षा अधिक टोकदारपणे, मुलायमपणे असा अनुभव मला जाणवून देते. म्हणजे मी स्वतः आजीचे खरेखुरे प्रकाशचित्र काढले होते, त्याहीपेक्षा "खरा" अनुभव हे ववेगळेच कुठले चित्र बघून होऊ शकतो.

कदाचित या वैयक्तिक उदाहरणावरून थोडे स्पष्टीकरण मिळावे. आव्हान "आजीची आठवण" या एकाच वैयक्तिक मायाळू बाबीत घुटमळायचे नाही आहे - कुठल्याही नेहमीपेक्षा-उत्कट स्पर्श-अनुभवापर्यंत पोचवणारे चित्र हवे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाचतो आहे... प्रतिसाद विचार करायला लावतोय. अर्थात, यातील बऱ्याच गोष्टी पटतात. तसा अनुभवही आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कदाचित थोडं अवांतर होईल. पण प्रकाशचित्रांचा हा ब्लॉग तुम्ही पाहिला आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तीन-चार पाने बघितली. मस्त!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या विषयासाठी मर्यादा वाढवता येईल का?

तसं न झाल्यास, या प्रतिसादातले फोटो स्पर्धेसाठी आहेत. बाकीचे इतर प्रतिसादांत टाकेन.

लोखंडावर चढलेल्या गंजामधून पोत, चित्रविचित्र आकार आणि त्याबरोबर एक रंगसंगती येते. तीनही गोष्टी एकमेकांना पोषक ठरतात, त्याचं वरील चित्र हे मला उदाहरण वाटलं. त्यात गंज चढणं म्हणजे लोखंडाचं ऑक्सिडेशन किंवा मंदज्वलन. त्याने चित्रात दिसणाऱ्या ज्वाळांना एक वेगळा अर्थ येतो.

चामड्याच्या पोताची खुर्चीची पाठ आणि गुळगुळीत टेबलावर पडलेलं प्रतिबिंब.

सॅन्फ्रान्सिस्कोमधील पॅलेस ऑफ फाईन आर्ट्स मध्ये काही जुन्या शिल्पांच्या शैलीत तयार केलेली शिल्पं आहेत. मात्र हे काम दगडी नसून सिमेंटमध्ये केलेलं आहे. ते रंग, आकार व पोत मला कायमच आकर्षक वाटत आलेले आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दुसरा फोटो छान आलय. माझ्या टेबलाचा रंग आहे सेम. सर्वसाक्षी यांचेही फोटो उत्तम

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

.

तुमची तिन्ही प्रकाशचित्रे विषयाला अगदी चपखल आहेत. दुसरे चित्र तर खूप मस्तं जमले आहे. सेटिंग्ज, कॅमेरा वगैरे माहिती उपयुक्त होईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वरील सर्व छायाचित्रांचा कॉंट्रास्ट थोडा वाढवला आहे. पहिल्या छायाचित्राचा शार्पनेस व ब्राइटनेसही वाढवला आहे. तसंच पिकासामधील 'एचडीआरलाइक' प्रोसेसिंग किंचित केलं आहे.
तिसऱ्या फोटोत कॉंट्रास्टव्यतिरिक्त ब्राइटनेसही वाढवला आहे.

फोटो क्र. १

Camera: Canon PowerShot S95
Exposure: 0.033 sec (1/30)
Aperture: f/2.2
Focal Length: 6 mm
ISO Speed: 80
Exposure Bias: -
Flash Used: No

फोटो क्र. २

Camera: Canon PowerShot S95
Exposure: 0.167 sec (1/6)
Aperture: f/4.9
Focal Length: 22.5 mm
ISO Speed: 160
Exposure Bias: -
Flash Used: No

फोटो क्र. ३

Camera: Canon PowerShot S80
Exposure: 0.006 sec (1/160)
Aperture: f/5
Focal Length: 17.458 mm
ISO Speed: -
Exposure Bias: -1.33 EV
Flash Used: No

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नायगारा धबधब्याजवळ खाण्याची जागा होती, तिथे लोखंडी बाक, टेबलं आणि खुर्च्या होत्या. त्यावरचे आकार आणि पोत यांची काही चित्रं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्हटलं तर शिलालेख म्हटलं तर मानवनिर्मित 'साकार' पोत...

Camera SONY
Model DSC-W70
ISO 100
Exposure 1/50 sec
Aperture 2.8
Focal Length 6mm
Flash Used true

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

चित्र मोबाईलवरून काढल्याने योग्य एग्झिफ विदा नाही

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

Camera SONY
Model DSC-W70
ISO 100
Exposure 1/40 sec
Aperture 2.8
Focal Length 6mm
Flash Used true

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ही चित्रे स्पर्धेसाठी देत नाहीये, कारण ज्या दिवशी ही घेतली गेली त्या दिवशी आम्ही तिघं एकच कॅमेरा हाताळत होतो, आणि आता मला मीच सगळी घेतली याची खात्री नाही. तरी धनंजय ने 'पोत' चे केलेले रोचक वर्णन वाचल्यावर राहावले नाही, त्यामुळे फक्त धाग्यात सहभागी होण्यासाठी देत आहे. हे तिन्ही फोटो दिल्लीच्या चाँदनी चौक परिसरातले आहेत.

दरीबा कालान गल्ली:

मिर्झा गा़लिब च्या घराच्या आवारात:

हिवाळ्याच्या कोवळ्या उन्हात चहाबरोबर गरमागरम सामोसा:

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमचे पहिले आणि दुसरे प्रकाशचित्र पाहून राहवले नाही म्हणून -

बल्लीमारां के मुहल्लों की पेचीदा दलीलों की सी वो गलियाँ
सामने टाल के नुक्कड़ पे बटेरों के कसीदे..
गुड़गुडा़ती हुई पान की पींकों मे वह दाद, वह "वाह वाह !"
चंद दरवाजों पर लटके हुवे बोसीदा से कुछ टाट के पर्दे
एक बकरी के ममीयाँने की आवाज़..
और धुंदलाई हुई शामों के बेनूर अँधेरे साये
ऐसे दरवाजों से मूँह जोड़कर चलते हैं यहाँ
चूड़ीवालान के कटरे की बड़ी-बी जैसे -
अपनी बुझती हुई आखों सी दरवाज़े टटोले..

इसी बेनूर अँधेरी सी गली 'क़ासिम' से
एक तरतीब चराग़ाँ की शुरू होती हैं
इक कुरान-ए-सुख़न का सफा खुलता हैं
'असद उल्ला खाँ ग़ालिब' का पता मिलता हैं ..

- गुलज़ार

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गंजलेल्या, गुंता झालेल्या तारांमधून टिपलेल्या चित्रामुळे वाटतं तसं, पण मला तो परिसर तसा बोसीदा आणि बेनूर नाही वाटला खरं तर! हळूच एक वळण घेतलं की १५० वर्षं मागे जाऊन गा़लिब च्या काळची दिल्ली आठवते हे मात्र खरे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खाण्याच्या पदार्थांचे प्रकाशचित्र घेताना तर ह्या विषयाचा बराच विचार करावा लागतो. कुरकुरीत, खुसखुशीत, स्निग्ध, मऊ, खमंग...वगैरे जे स्पर्शाने आणि गंधानेही अनुभवता येते, ते केवळ प्रतिमेतून दाखवायचे तर पोत फारच महत्वाचा वाटतो.

Amaretti-3

पाण्याचा पोत किती वेगवेगळा असू शकतो; पावळणीतून ठिबकणारया पाण्याचा पोत वेगळा, कोसळणारया पावसाचा पोत वेगळा, गवतावर साचलेल्या दवबिंदुंचा वेगळा आणि धबधब्यातून कोसळतानाच थिजून गेलेल्या धारांचा वेगळा!

Icicles

या अतिसंथ, गडद पाचूच्या रंगाच्या तळ्याचा पोत पकडताना, त्यापुढच्या सूचिपर्णींचा काटेरी पोत आणि मागच्या बर्फाच्छदित शिखरांचा पोत सगळे त्यांच्या प्रतिबिंबात मिसळून गेले.

Jasper 410

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाशचित्र १ : ढगांवरून..

तपशील:

Camera : RICOH R8
ISO: 100
Exposure: 1/760 sec
Aperture: 5.4
Focal Length: 27.4mm
----------

प्रकाशचित्र २ : हजारो वर्षांपूर्वीचा पोत.


तपशील :
Camera: OLYMPUS SP600UZ
ISO: 400
Exposure: 1/4 sec
Aperture: 4.7
Focal Length: 19mm
----------

प्रकाशचित्र ३ : स्पर्शाचा पोत ?

तपशील :
Camera: NIKON COOLPIX L120
ISO: 400
Exposure: 1/30 sec
Aperture: 4.7
Focal Length: 23.2mm
-----------

खालील चित्रे स्पर्धेसाठी नाहीत.

१. खडबडीत, गुलगुलीत, कडकडीत


तपशील :
पिकासात दिसत नाही आहे.
कॅमेरा : कॅनन एस्. २ आय्. एस्. एवढे नक्की.
----------

२. 'सनी साइड् अप्' एनीवन् ?

तपशील :

Camera: NIKON COOLPIX L120
ISO: 500
Exposure: 1/8 sec
Aperture: 4.0
Focal Length: 12.6mm
----------

३. स्पर्श केला तर बोटांवरच रंग मागे ठेवून जाणारा पोत..

तपशील :
पिकासात दिसत नाही आहे.
कॅमेरा : कॅनन एस्. २ आय्. एस्. एवढे नक्की.
----------

४. द्विमित की त्रिमित?

तपशील :

Camera: NIKON COOLPIX L120
ISO: 400
Exposure: 1/10 sec
Aperture: 4.4
Focal Length: 9.4mm

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बरेच दिवस हा धागा वाचत होतो, आज शेवटी मुहूर्त लागला.
सर्व फोटो Olympus E-PL1 (micro-four third) with legacy, manual focus lens Vivitar 200mm F3.8 @F8 वर काढले आहेत.
आणि पिकासामधे कातरले आहेत, बाकि काही संस्करण नाही.
एक दोन उत्तम मॅक्रो लेन्स हाताशी असताना, धनंजयांच्या सूचनेवरुन वाईड अँगल घ्यायचा प्रयत्न केला आहे, चित्र मोठे करुन पहावे ही विनंती.

'मउ खेळणे' Smile
OLY41473

ह्या चित्राचे फोकसिंग अजून सुधारता आले असते, पण वारा प्रचंड होता Sad
OLY41463

OLY41460

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अगदी शेवटापर्यंत वाट बघितली, आणखी काही मस्त चित्रे धाग्यावर आली. पुन्हा सगळे बदलावे लागले, याची कल्पना करा...

एकच चित्र निवडायचे, म्हणजे काहीतरी असे निकष करावे लागले, की मलाच माझा मूर्खपणा अचाट वाटतो आहे. पण गत्यंतर नाही. (सर्वसाक्षींनी वगैरे काही चित्रे "स्पर्धेबाहेर" असे सांगून माझे काम थोडे सोपे केले, धन्यवाद.) मग "चित्रातील आनुषंगिक बाबी, पार्श्वभूमी वगैरे भावली नाही, असल्या निकषांवर काही चांगली चित्रे बाजूला ठेवली...
मग पोत खुलवणे हे प्रमुख तंत्र आहे की दुय्यम तंत्र? (प्रमुख तंत्र असल्यास प्राधान्य).
मग पोत हे प्राथमिक तंत्र असले तरी स्पर्धा माहीत नसणार्‍यालाही जाणवेल असे कथानक आहे काय, कथानकाला खुलवणारी आनुषंगिक तंत्रे आहेत काय? पोत आणि अन्य तंत्रे त्या कथानकावर कुरघोडी न करता कथानकाला पुढे करून आपला परिणाम करत आहेत काय?
अशा काही पायर्‍यांनी चित्रे निवडत गेलो.

- - -

वर्गवारीने प्रशंसा केलेली चित्रे येणेप्रमाणे :
झाडाचे खोड वर्ग :
ऋता यांचे तिसरे चित्र "दुष्काळाचा पोत"

अन्न वर्ग :
३_१४ विक्षिप्त अदिती यांचे "हा माझा दुसरा फोटो" हे चित्र (स्ट्रॉबेरी)

पाण्याचा पोत वर्ग :
अनामिक यांचे चित्र "पाण्याला काय पोत असणार?"

छोटे प्राणी/वनस्पती वर्ग :
मयुरा यांचे चित्र

पोत जाणवण्याकरिता रंगांचा सदुपयोग वर्ग :
बोका यांचे "पान"

क्षेत्रचित्र (लँडस्केप) वर्ग :
(आतिवास यांचे ४थे चित्र "काकचिंग डोंगरावरून" चित्र बहुधा स्पर्धेसाठी नसावे)
अमुक यांचे चित्र "ढगांवरून"

शुद्ध पोत वर्ग :
सूर्य यांचे चित्र "माझ्याकडुन एक चित्र" (बदक)

द्वितीय पारितोषिक :
राजेश घासकडवी यांचे चित्र "लोखंडावर चढलेल्या गंजामधून पोत, चित्रविचित्र आकार आणि त्याबरोबर एक रंगसंगती". एक कुंचलाचित्रकारास शोभेल असे चित्र आहे. त्यांच्या कथानकात पोत-जाणवणे हे दुय्यम तंत्र आहे, या निव्वळ तांत्रिक निकषामुळे या स्पर्धेत हे चित्र वरचढ ठरत नाही. (लक्षात असू द्या, पोत हे प्राथमिक तंत्रही हवे, आणि प्राथमिक तंत्र असल्यास कथानकावर कुरघोडी करणारेही नव्हे, असा निकष होता. "पोत हा केवळ तंत्र कथानकापेक्षाही महत्त्वाचा" असे नव्हे. गैरसमज नसावा.)

*******************************************
विजेता
सर्वसाक्षी यांचे खरबुजाचे दुसरे चित्र. या चित्रात मजबूत कथानक आहे. (मला काय कथानक जाणवले ते सांगून अन्य लोकांच्या रसग्रहणावर मर्यादा आणत नाही.) वेगवेगळे पोत आहेत, पण ते पोत एकमेकांना पूरक किंवा विरोधी-पूरक आहेत. या पोतांमध्ये कथानक असे गुंतले आहे, की कथानक आणि तंत्र असे काही वेगळे करता येत नाही. सौम्य आणि जवळजवळ एक-पिवळसर-रंगांची कथानकाला साथ होते आहे, आणि पोत जाणवण्यास विरोध होत नाही. डेप्थ ऑफ फोकस घट्ट असल्यामुळे देठापासून केंद्रोत्सारी भाग धूसर होतो, त्याचा कथानकात उपयोग होतो आहे. (जाताजाता म्हणावेसे वाटते, खरबुजाचे पहिले चित्र आणि तिसरे चित्र बघता ऑट-ऑफ-फोकस भागाने त्या-त्या कथानकांचे पोषण होत नाही. त्या दोन चित्रांचे कथानकही तसे मजबूत नाही. दुसरे विजेते चित्र त्यांच्या मिरच्या आणि पोपटांच्या चित्रांच्या तोडीचे आहे, असे माझे मत आहे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कॅमेरा: कॅनन ४००
बाकी फोटोच्या तांत्रीक बाबतीत काहीही माहीती नाही.
फोटोवर कसलेही तांत्रीक संस्करण करण्याच्या आम्ही विरोधात आहोत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

वा! निवडुंगाचे काटे अगदी बोचतायत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पाषाणभेद यांचे चित्र निकालानंतर आले, छानच आहे.

भा. प्र वेळेच्या मध्यरात्री स्पर्धेची मर्यादा होती, आणि निकाल जाहीर करून प्रतिसाद लिहेपर्यंत भा. प्र. वेळेप्रमाणे पहाट होत आहे, खरे. पण आपणा सर्वा हौशी लोकांत तितके ढोबळमान क्षम्य आहे, नाही का? Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उशीरा छायाचित्र गेले असले तरी माझी स्पर्धेबाहेर राहण्यासाठी अजीबात हरकत नाही. सहभाग महत्वाचा. अन माझ्या जुन्या छायाचित्राला या निमीत्ताने प्रसिध्द करता आले तेही महत्वाचे!
विजेतेपदासाठी सर्वांना शुभेच्छा!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

श्री. सर्वसाक्षी यांचे मनःपूर्वक अभिनंदन. उत्तम फोटो आले आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्हणून....

Camera Canon EOS Kiss Digital X
Exposure 0.01 sec (1/100)
Aperture f/5.6
Focal Length 44 mm
ISO Speed 200
Exposure Bias -1/3 EV
Flash Off, Did not fire

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0