आभासी दुनिया: आपल्यापुरती किती खरी आणि किती खोटी?

आभासी दुनिया ही काही नवीन कल्पना नाही. लहानपणी मायावी राक्षस, सुंदर पर्‍या, चेटकिणी आणि जादुगार यांच्या सोबतीने आपण या दुनियेत प्रवेश करतो. पुढे जसजसे मोठे होतो, तसतसे आपल्याला दोन्हीतल्या फरकाची जाणीव होते, आणि वास्तव व आभास यांच्यातली सीमारेखा आपण आपल्यापुरती निश्चित करतो ...किंवा करायचो असे म्हणूया. आंतरजाल आणि फेसबुक यांमुळे वाढत्या वयातली नवीन आभासी दुनिया तयार होत आहे. या दुनियेत प्रत्येकजण जादुगार आहे, स्वता:चे व्यंग, वय, दोष लपवून स्वता:हाला हवे तसे रंगवून स्वता:ची विक्री करण्याचे स्वातंत्र आहे. शिवाय ही जादू वापरून, मैत्री एकदम जोडता किंवा तोडताही येते.

नवीन समाजव्यवस्थेत व्यवसायानिमीत्ते किंवा शिक्षणाकरता कुटूंबापासून लांब रहायला लागण्याचे वारंवार प्रसंग येतात. त्यामुळे मिळणारे स्वातंत्र आणि हातात ही जादू! भुरळ न पडली तरच नवल. हळूहळू आभास आणि वास्तव यांची गल्ल्त होते, आणि मग मनाचा गोंधळ सुरू होतो..काय खरे काय खोटे? माझे खरे स्वरूप काय? हे प्रश्न पडायला लागतात. काही प्रसंगी मनावर न मिटणारे ओरखडे उमटतात.

याचा अर्थ आभासी दुनियेत सगळेच खोटे आहे असे तर नाही. कितीतरी समान आवडी असलेले सुहॄद भेटतात, नवीन माहिती मिळते, जुन्या ओळ्खीच्या मित्र्/मैत्रिणींबरोबर संपर्क ठेवता येतो. केवळ डोळसपणे वापर करण्याची, ही दुनिया म्हणजे वास्तव नव्हे हे भान ठेवण्याची गरज आहे हे नक्कीच!

या आभासी दुनियेच्या नादी लागून आपण स्वता:वर आणि आप्तस्वकियांवर अन्याय तर करत नाही..? तुम्हाला काय वाटतं?

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
2.5
Your rating: None Average: 2.5 (6 votes)

चांगला आणि विचारप्रर्वतक धागा. प्रतिसाद वाचण्यास उत्सुक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आभासी दुनिया खरी कशी होईल?????
चर्चा प्रस्तावाचे शिर्षक चुकीचे आहे.

"दिलास तू शाप जीवनाच्या उनाडकीचा..
विचारला होता मीच प्रश्न तेंव्हा तुला चुकीचा"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

आभासीऐवजी जालीय असायला पाहीजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सविस्तर प्रतीसाद लवकरच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आभासी दुनिया असते खोटीच, पण डोळ्यांवर थ्री डी चष्मा चढवल्यासारखी खरी भासते, म्हणून शीर्षक असे दिले होते. सूचनांबरहुकूम ते बदलून 'आभासी दुनिया: आपल्यापुरती किती खरी आणि किती खोटी?' असे केले आहे.
मात्र चर्चेतील मुद्द्यांवर भाष्य न होता, केवळ शीर्षकावर व्हावे, याचा खेद वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या आभासी दुनियेच्या नादी लागून आपण स्वता:वर आणि आप्तस्वकियांवर अन्याय तर करत नाही..?

हा अन्याय कोठून आला हे कळले नाही!

या दुनियेत प्रत्येकजण जादुगार आहे, स्वता:चे व्यंग, वय, दोष लपवून स्वता:हाला हवे तसे रंगवून स्वता:ची विक्री करण्याचे स्वातंत्र आहे. शिवाय ही जादू वापरून, मैत्री एकदम जोडता किंवा तोडताही येते.

ही दोन वाक्यं आधीचं वाक्य न जोडताही तितकीच खरी आहेत असे मला वाटते. तुम्हाला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

>>>या आभासी दुनियेच्या नादी लागून आपण स्वता:वर आणि आप्तस्वकियांवर अन्याय तर करत नाही..?

>>>====हा अन्याय कोठून आला हे कळले नाही! <<<<

असा अन्याय होऊ मात्र शकतो.
इतर कोणत्याही व्यसनाप्रमाणेच, आभासी दुनियेत वावरायचे व्यसन/सवय लागल्यावर वा गम्भिर पातळीचे न लागताही, प्रत्य्क्ष आयुष्यातील प्रत्यक्ष आमनेसामने जीवन्त नात्यातील व्यक्तिन्बरोबर बोलायचे त्राण उरत नाही/भान रहात नाही/गरज भासत नाही, व जवळच्या नातेवाईकान्बरोबरचा संवाद धोकादायकरित्या तुटू शकतो.
केवळ संवादच नव्हे, तर त्यान्चेबाबतीत करावयाची अत्यावश्यक कर्तव्ये देखिल विसरली/दुर्लक्षिली जातात.
कारण, व्यक्तिस स्वतःकरता आवश्यक तितका संवाद भासमान जगातच होऊ लागल्यावर प्रत्यक्ष जगातील व्यक्तिन्ची गरजच नाही असे वाटू लागते.
इतर व्यक्तिन्वर हे अन्यायकारक असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वरील अन्यायाचे संदर्भातच, इन्टरनेटच्या आभासी दुनियेच्या "व्यसनाधीनतेतून" मुक्ति मिळविण्यासंदर्भातिल येथिल बातमी पहा http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=192...
पुण्यातील मुक्तांगण केन्द्राने, इंटरनेटच्या व्यसनाधीनतेतुन मुक्त होऊ इच्छिणार्‍यांसाठी व्यसनमुक्ति केंद्र सुरू केले आहे.
मुद्दा इतकाच, की आभासी जगताचे जर "व्यसन" लागले असेल, तर आप्तस्वकियांवर जरुर अन्याय होऊ शकतो. फरक इतकाच की त्याचे दृष्य स्वरुप दारू/वा तत्सम व्यसनान्प्रमाणे मारहाण-आर्थिक तन्गी/मुस्कटदाबी अशा स्वरुपातच होईल असे नाही, तर आप्तस्वकियान्कडे नाते पाळण्याच्या दृष्टीने पुर्णतया दुर्लक्ष संभवू शकते. वैयक्तिक शारिरिक/भावनिक नुकसान वेगळे.

धाग्याच्या विषयावर विचार करताना माझे नजरेसमोर/विचारात, दोन्ही बाजू आल्या, जशा आल्या तशा त्या मांडल्या आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>>> या आभासी दुनियेच्या नादी लागून आपण स्वत:वर आणि आप्तस्वकियांवर अन्याय तर करत नाही..? तुम्हाला काय वाटतं? <<<
१) आभासी आहे म्हणजे तरी नेमके काय? मूळात आभासी आहे, हेच मला पटत नाही. कारण प्रत्येक आयडिच्या मागे भले ती आयडि ड्युप्लिकेट्/ट्रिप्लिकेट असली तरीही, एक जिवन्त व्यक्ति आहे. त्या व्यक्तिचे विचार त्या त्या आयडीमधुन प्रगट होताहेत. जरी आयडी आभासी वाटली तरी "विचार" हे शब्दरूपातील प्रत्यक्ष विचारच असणारेत ना? माझ्या ओन्जळीत कुणी लोट्याने पाणी ओतूदे वा तोटीने, ओन्जळीत पडणारे ते पाणीच ना? मग लोटा की तोटी या आभासात गुन्तायचे कशाला?
बर तर बर, हाती ओन्जळीत पडणारे पाणी, स्वच्छ आहे की गढूळ, पाणीच आहे की अजुन काही, स्विकारार्ह की त्याज्य, हे समजण्याइतकी व त्यापद्धतीने प्रतिक्रियात्मक वागण्याइतकी बौद्धिक क्षमता मला वाटते कायद्यानेच वयवर्षे अठरा नन्तर आलेली असते असे गृहित धरलेच आहे.
२) समजा येथिल जेजे ते सर्व आभासी असे क्षणभर मानू पण मग वास्तवात प्रत्यक्षात भेटणारे स्त्रीपुरुष "मुखवटे" घालुन आपल्याशी वागतबोलत नस्तातच याची खात्री कुणी देऊ शकेल का? किम्बहुना, समाजात वास्तवात देखिल जो ज्या प्रकारचा मुखवटा यशस्वीपणे वापरु शकतो तीच व्यक्ति यशस्वी वा मान्यताप्राप्त मानली जाते. मग येथिल "मुखवट्यान्ची" वा त्यात गुन्तुन पडण्याची भिती का बाळगावी?
३) आप्तस्वकियान्वर अन्याय करायचाच झाल, वा होणारच असला माझे वा कुणाचे हातून, तर अशी गरज नाही की नेट सारख्या आभासी/भासमान जगातच वावरायला हवे. प्रत्यक्ष वास्तवात देखिल जुगार/मटका/दारू/बाई-बाटली/वर्कोहोलिक इत्यादी असन्ख्य छंदीफन्दी वागण्यामुळे आप्तस्वकियान्वर अन्याय होतच असतो. उलटपक्षी, येथिल भासमान दुनियेत वावरले तर "अक्कलेत" बरीच भर पडू शकतेच शकते, शिवाय, चूकुन माकुन वैचारिक एकटेपण आलेले असेल, तर ते देखिल दूर होऊ शकते.

शेवटी, कोणतीही बाब, तुम्ही स्विकारताना काय कशी का कशाकरता स्विकारताय व कशी वापरताय यावर सगळे अवलम्बुन अस्ते.

[दोन दिवसान्नी घातलेली भरः वरील बाजू ही एक बाजू झाली, मात्र आभासी दुनियेची व्यसनाधीनता होऊ शकते, हे जाणवल्यामुळे, याच धाग्यावर अन्य ठिकाणी (येथे http://www.aisiakshare.com/node/123#comment-2099 ) दोन पोस्ट्स टाकल्या आहेत, त्या याच प्रश्नाची दुसरी बाजू मांडतात. मला व्यक्तिशः दोन्ही बाजू मान्य आहेत.]

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रत्येकाला स्वतःला जरुरीनुसार सादर करण्याची कला पूर्वंपार चालत आलेली आहे. हे काही नविन समाजव्यवस्थेनं आणलेलं नाही. आपण नाही कां जाहिरातीवरून वस्तू खरेदी करतो. त्या वस्तू वाईटच असतात असे नाही. तुमच्या म्हणण्यानुसार चुकीचे निर्णय घेतले गेल्यामुळे "मनावर कायमस्वरूपी ओरखडे" उठले जातात. अश्या प्रकारच्या गोष्टी पूर्वीच्या पिढ्यांचा बाबतीतही होत होत्या. आपल्याही हातून अनेकवेळा चुकीचे वाटणारे निर्णय घेतले जातात. त्याची खंत लागून रहाते पण त्या गोष्टी अनुभवाने शहाणे होण्याच्या असतात.

कालानुरुप योग्य काय आणि अयोग्य काय हे फक्त आपणच ठरवू शकतो कां ? जो त्यामधून जात असतो त्यालाही ठरवता आलेच पाहीजे कि. नाही कां ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसाद आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही चर्चा आभासी जगातच मांडली जातेय हा एक मजेशीर पॅरेडॉक्स.
अहो म्हणूनच तर वास्तव कट्टे भरवायचे असतात. चला भेटूया का? मी तरी अमुक संस्थळाचा कट्टा असं न मानता ऑनलाईन मित्रांचा कट्टा असा खरा अर्थ मानतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिकियांबद्द्ल आभार.

आभासी दुनियेतल्या मित्र-मैत्रिणींशी चर्चा आभासी दुनियेतच करणार ना..

समाजात वावरताना अनेकदा मुखवटे वापरून वावरावे लागते. प्रत्यक्षापेक्षा आपण वेगळे आहोत, हे दाखवण्याची, आपल्याला जास्त चांगल्या रूपात सादर करण्याची ही धडपड प्रत्येकजण कमी-अधिक स्वरूपात करतच असतो, याच्याशी सहमत आहे. जेव्हा प्रत्यक्ष सहवास मिळतो, तेव्हा मात्र या गुणांबरोबर दोषही सामोरे येतात. झाकू म्हटले, तरी ते पूर्णतः झाकता येत नाहीत. पण या चर्चेचा मूळ हेतू वास्तवात हे धोके नसतात का? हा नसून आभासी(आंतरजालीय/फेसबुकीय) दुनियेच्या किती आहारी जावे, कुठल्या मर्यादा पाळाव्यात हा होता.

आंतरजालीय/फेसबुकीय दुनियेतही वेगवेगळ्या मुखवटयांखाली प्रत्यक्षातली, हाडामासांचीच माणसे वावरत असतात हे खरे आहे. पण वास्तवात काही क्षणांपुरते का होईना, ते मुखवटे 'जगायला' लागतात. इथे तर केवळ शब्दांचा खेळ असतो. म्हणून या दुनियेला आभासी असं म्हणावसं वाटलं. आंतरजालीय/फेसबुकीय दुनियेत हे दोष झाकण्याची उत्तम/सोपी सोय आहे. इथे आपला फोटो दाखवण्याची(किंवा खरा फोटो दाखवण्याची) गरज नाही, त्यामुळे रूप, वय, व्यंग हे सहजच झाकले जाते, प्रत्यक्षात हे लपवणे इतके सोपे नाही. त्यामुळे समोरच्यावर प्रभाव पाडणे सहज शक्य आहे. पौगंडावस्थेतली कितीतरी मुले, या दर्शनी स्वरूपाला भुलून, फसव्या नातेसंबंधात गुंतू शकतात. कुटूंबापासूम दूर राहणारी, प्रत्यक्ष सहावासाला मुकलेली आणि म्हणून झालेल्या हळव्या मनोवृत्तीची व्यक्तीही दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न करू शकते. कित्येकदा मध्यवयीन ब्यक्ती 'नावीन्याची हौस' या सदरात काही नवे प्रयोग करू शकते. जेव्हा अपेक्षाभंग होतो, तेव्हा मग मनावर ओरखडे उमटू शकतात, नातेसंबंधांवरचा विश्वास उडतो. अर्थातच स्वकीयांवर अन्याय होतो.

जेव्हा आभासी दुनियेतील भावनिक गुंतवणूक वाढते, तेव्हा मग प्रत्यक्ष सहवासातील व्यक्तींना पुरेसा वेळ दिला जात नाही, आणि limbutimbu यांच्या म्हणण्याप्रमाणे, जवळच्या नातेवाईकांबरोबरचा संवाद धोकादायकरित्या तुटू शकतो. केवळ संवादच नव्हे, तर त्यांच्याबाबतीत करावयाची अत्यावश्यक कर्तव्ये देखिल विसरली/दुर्लक्षिली जातात.

ही दुनिया, हे ज्यांच्याशी प्रत्यक्ष भेट शक्य नसते, पण ज्यांच्याशी संवाद साधणे गरजेचे वाटते, अशा मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांच्याशी संवाद साधण्याचे उत्तम साधन आहे. समान आवडी असलेल्या व्यक्तींबरोबर(भौगोलीक अंतराचा विचार न करता) मैत्री करायची संधी आहे. पण या साधनाचा वापर डोळसपणे व्हायला पाहिजे. या दुनियेत फसवता येणे सोपे आहे, म्हणून नवीन मैत्री करताना (वास्तव दुनियेपेक्षा)जास्तीच जागरूक रहायला हवे. दुर्दैवाने म्हणा किंवा सुदैवाने म्हणा, या दुनियेत कायमस्वरूपी राहण्याची सोय नाही, रोजचे व्यवहार/कर्तव्ये चुकत नाहीत, म्हणूनच नवीन मित्र्/मैत्रीणीपुढे मनाची कवाडे उघडताना, आपण त्या व्यक्तीला किती काळ ओळखतो आहे, आपल्या नात्याचे स्वरूप काय आहे? या नात्यातून आपली काय अपेक्षा आहे, या नात्याचे पडसाद प्रत्यक्ष जीवनावर कशा तर्‍हेने पडतील? आपण आपल्याला/इतरांना फसवत तर नाही, हे प्रश्न स्वतःला विचारायला हवेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिवाय ही जादू वापरून, मैत्री एकदम जोडता किंवा तोडताही येते.

आदुगर गळ्यात गळे घालायचे आन मंग यकमेकांचे गळे धरायचे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

आभासी दुनिया ही खरोखरच कितपत आभासी रहाते याबाबतीत मी साशंक आहे. लहान वयातल्या पर्‍या, राक्षस वगैरे संकल्पना मोठेपणी मोडीतच निघतात. इंटरनेटला आभासी दुनिया म्हणणं मला मान्य नाही. तीन वर्ष परदेशातल्या एका निर्जन खेड्यात रहाताना याच इंटरनेटमुळे मी माणसांशी संपर्क राखू शकले. त्यामुळे अवकाश-कालाच्या चार मितींसारखीच सायबर-स्पेस ही पाचवी मिती माझ्यासाठी "नेहेमीचीच" झाली.

एकेकाळी एकत्र कुटुंब पद्धती होती, घरच्या गोष्टी घराबाहेर जाऊ नयेत यासाठी आटोकाट प्रयत्न व्हायचे. त्यात बदल होत गेले आणि आता आपल्या काका-मावश्यांपेक्षा मित्रमंडळात चार गोष्टी बोलून दाखवल्या जातात. इंटरनेटमुळे हे मित्रमंडळ जमवण्यावरचे निर्बंध आणखी सैल झाले आहेत. रोज भेटणार्‍या चार लोकांमधेच मित्र शोधायचं बंधन आता राहिलेलं नाही. एकेकाळी माझ्या मैत्रिणींना माझ्या छंदांमधे काही रस नसतानाही त्याबद्दल गप्पा ऐकाव्या लागत असत; आता इंटरनेटच्या उपलब्धतेमुळे तेच छंद असणार्‍या लोकांशी मला याच गप्पा मारता येतात. पुन्हा खरोखरच मैत्री म्हणावी असं नातं असण्याची सक्तीही नाही. साधारण पंच्यात्तर वर्षांपूर्वी माझ्या आजी-आजोबांचं मित्र-मंडळ फक्त रहात्या गावातच होतं; आज अंटार्क्टीक वगळता बाकी सर्व खंडांमधे माझं मित्रमंडळ आहे. दळणवळणाच्या साधनांची ही देणगी आहे.

गविंनी म्हटल्याप्रमाणे ही चर्चाही आपण सायबरस्पेसमधेच करत आहोत. आणि सायबरस्पेसचा हा छोटा तुकडा मराठी भाषिकांनी अडवला आहे याचंही कारण सायबर-स्पेसमधल्या भेटीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अदितीशी सहमत.
जालावरील वावराला आभासी दुनिया म्हणणे पटले नाही.

किंवा आभासी म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे ते समजले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नेट ही आभासीच आहे.
आभासी आहे म्हणजे काय? आधी तुमच्या मुद्द्यांबद्दल.

नेट मुळे संपर्कात रहाणे: ४० वर्षांपूर्वी तुम्ही पोस्टाने पत्रं लिहून संपर्क साधला असतात. अन अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या पत्रांसारखी तुमची पत्रे प्रसिद्ध झाली असती.
नेटमित्रांना आधी बातमी लागते: बॅड हॅबिट. माझ्या डायरीच्या पहिल्या पानावर लिहीलेलं असतं : "तुम्हास माहिती असलेले सगळेच दुसर्‍यांना सांगून टाकू नका. त्यामुळे तुम्हाला काय माहिती आहे या बरोबरच काय माहिती नाही हेही दुसर्‍यांना कळते."

नेटवर इझीली मित्र जमवणार्‍यांना बाहेर 'रिअल टाईम' मधे मित्र का लवकर मिळत नाहीत?

सिंपल रिझन. नेट कमीत कमी ५०% आभासी आहे.
समोरच्या माणसाला ५०% गुण तुम्ही तुमच्या इमॅजिनेशनने चिकटवता. अन ५०% कॉम्प्रोमाइझ करता. पहा विचार करून.

इंटरनेटच्या उपलब्धतेमुळे तेच छंद असणार्‍या लोकांशी मला याच गप्पा मारता येतात. पुन्हा खरोखरच मैत्री म्हणावी असं नातं असण्याची सक्तीही नाही

समान शीले व्यसनेषु सख्यम्
असं नातं असण्याची सक्ती नाही???? परमेश्वरा! मैत्री म्हणजे काय वाटलं तुम्हाला? नेटवरची मैत्री व्हर्चुअलच असते. खरोखर मित्र असतात ते जीव देतात. लिटरली. फक्त पिक्चर मधे नाही. मी "मित्रश्रीमंत" आहे. इन रिअल वर्ल्ड टू. अन याचा मला भयंकर गर्व, माज इ. इ. इ.. आहे. नेटवरून मस्त मित्र मिळाले म्हणतात, त्यांनी सांगावं की प्रत्यक्ष न भेटाता ते तुमचे उत्तम मित्र झाले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

तुम्हास माहिती असलेले सगळेच दुसर्‍यांना सांगून टाकू नका. त्यामुळे तुम्हाला काय माहिती आहे या बरोबरच काय माहिती नाही हेही दुसर्‍यांना कळते.

एखादी किचकट कविता वाचली आणि समजली नाही तर मला लगेच गुर्जी लोकं आठवतात (हे नेटवरून भेटलेले लोकं).
मला काय माहिती नाही आणि समजत नाही हे दुसर्‍याला समजलेलं उत्तमच आहे की; पुढच्या वेळेस माहिती देताना आणि समजावून सांगताना ते लोकं याचा विचार करतात. (नावं ठेवणारे लोकं माझ्या विषयातलं काडीमात्र समजत नसतानाही नावं ठेवतातच; मला दुर्लक्ष करता येतं.)

नेटवर मित्र मिळवणार्‍यांना प्रत्यक्ष जगात मित्र मिळवता येत नाहीत हे मला मान्य नाही. एखाद्या माणसाशी आपली मैत्री होणं हे आपण कुठे भेटतो यावर अवलंबून असतं असं मला वाटत नाही. आंतरजालावर सगळेच लोकं मुखवटे घालून फिरतात हे ही मला मान्य नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

"अ‍ॅम सॅड.. गॉट माय चम्स..."
असला स्टेटस मेसेज थोबाडपुस्तकावर??
घरदार विसरून उजव्या हातात मोबाईल, डाव्यात लँडलाईन अन मांडीवर लॅपटॉप : फेसबुक?? ८-१० चॅट विंडो ओपन?
हजम नही हुआ.
डेप्थ सुद्धा हवी. बर्‍याच गोष्टी चिंतन मननानंतर उमजतात.
वैखरी ही वाणीची एक्प्रेशन स्टेज आहे. त्या आधी ३ पायर्‍या असतात.(परा, पश्यंती, मध्यमा मग वैखरी) स्फुरलेला विचार मुखातुन उद्घोषित होण्याआधी त्या पायर्‍यांवरून यावाच लागतो. हे नॅचरल फिल्टर असतं. जगातले सगळेच मानव मनकवडे असते तर काय झालं असतं?? अनेक भावना असतात, विचार असतात, जे पूर्ण पक्व झाल्यानंतरच बोलून दाखवायचे असतात. उदा. हापिसात बसलेले आहात. कुणी गरीब कलिग मोठ्या कष्टाचं प्रेझेंटेशन देतोय. अन तुम्ही मनात 'यार.. मला जोरात शी आलिये' हा विचार करता आहात. हा स्फुरलेला विचार परे वरून पश्यंतीपर्यंत तरी पोहोचेल का??
That is what I meant, when I said, तुम्हास माहिती असलेले सगळेच दुसर्‍यांना सांगून टाकू नका."

आता याच्या दुसर्‍या भागावर(त्यामुळे तुम्हाला काय माहिती आहे या बरोबरच काय माहिती नाही हेही दुसर्‍यांना कळते.) चिंतन.

बर्‍यांचदा कारण नसतांना अज्ञान जाहीर करणे हे आपल्याकरता तोट्याचे असते. उदा. मंडईत भाजी घ्यायला गेलात. अमुक नवे भाजी/फळ दिसले. त्या भाजीवालीला, अहो, हे काय आहे?? केवढ्याला दिलंत? असं विचारलं तर काय होईल?
मुद्दाम एकच उदाहरण देतो अन आवरतो.

म्हणून, "तुम्हाला ठाऊक असलेले सगळेच इतरांना सांगून टाकू नका. त्यामुळे तुम्हाला काय माहिती आहे याच बरोबर काय माहिती नाही हेही इतरांना कळते."
तुम्ही शाळेत, किंवा कोणत्याही ज्ञानार्जनार्थ केलेल्या संवादात हे लागू नाही. तिथे याचा व्यत्यासच लागू होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

डागडर बाबू, तुम्ही अंमळ मराठी आंजा लोकांशी (विशेषतः निळ्यासारख्या फुटकळ लोकांशी Wink ) फेसबुकावर मयत-री करा. आणि असल्या स्टेटस मेसेजवरही लोकं किती दंगा करू शकतात हे पहा. परा, ... वैखरी वगैरे सगळं ठीक आहे हो, पण म्हणून सदैव उभ्या चेहेर्‍यानेच किती वावरायचं? टाईमपासही हवाच ना थोडा!

कंप्लिट अ‍ॅडीक्ट लोकांना मी या चर्चेतून थोडी सूट दिली आहे, कारण व्यसनाबद्दल काय बोलायचं. आणि फेसबुक वापरणारे सगळे लोकं व्यसनी असतात असं थोडीच आहे. काही प्रमाणात लोकांना व्यसन लागतं म्हणून सर्व वापरकर्त्यांनाच "घरदार विसरून उजव्या हातात मोबाईल, डाव्यात लँडलाईन अन मांडीवर लॅपटॉप : फेसबुक?? ८-१० चॅट विंडो ओपन?" असं म्हणणं अन्यायकारक आहे.

मंडईत भाजी घ्यायला गेलात. अमुक नवे भाजी/फळ दिसले. त्या भाजीवालीला, अहो, हे काय आहे?? केवढ्याला दिलंत? असं विचारलं तर काय होईल?

मी असं काही वेळा केलं आहे. नॉयडात असताना किवी आणि ब्रॉकली ही नावं इंग्लिशमधे माहित होती, पण "याला हिंदीत काय म्हणतात" असं विचारलं. त्यानेही तत्परतेने 'किवी' आणि 'ब्रॉकली' अशी उत्तरं दिली आहेत. पुण्यात असतानाही याचाच प्रयोग केला आणि हीच उत्तरं मिळाली. नॉयडात मला खरेदी करायची नव्हती. पुण्यात ओळखीच्या फळवाल्याला विचारलं.
फळवाल्याशी ओळख कशी झाली? तर सुरूवातीला तो किंचित महाग फळं द्यायचा हे माहित असून भाव केला नाही आणि नेमाने तिथूनच खरेदी करायचे. हळूहळू तोच सांगायला लागला, आज संत्री चांगली नाहीत, सीताफळं घ्या किंवा काय! भाजीवाल्याशीही अशीच ओळख झाली. माझे दोन-पाच रूपये जास्त गेले तरी फळं, भाज्या आणताना मला डोक्याला ताप नसायचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

५० च्या आसपास असेल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

"माझ्या मरणावर टपेलेल्या गिधाडांनो!
मी सदेह स्वर्गात जाणार आहे!"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

सॉरी! आमच्या इथे वेकन्सी नाही. कॉन्टॅक्ट यमराज प्लीज!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझं नर्कात अ‍ॅडव्हान्स बुकिंग आहे.
विंडो सीट. च्याय्ला! टिकीट डकवु का हितं स्क्यान करुन? x(
तुमी र्‍हावा स्वर्गात. मी येत जाईन सदेह व्हिजीटला. (फी कंपाऊंडर कडे द्यायचं बगा जरा. Wink )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

जालावर बनलेल्या मित्रांबाबत आपल्याला पूर्णपणे माहिती नसते आणि त्यांच्यातले काही गुण आपण इमॅजिन करतो हे मान्य असलं तरी तरी त्याला कॉम्प्रोमाइझ म्हणणं पटलं नाही.

आपल्याला कॉलेजात किंवा ऑफिसात भेटणार्‍या लोकांबद्दल तरी कुठे आपल्याला संपूर्ण म्हणजे १००% माहिती असते? तरी त्यांचे विचार, स्वभाव, इ. पटल्यामुळे आपली त्यांच्याशी मैत्री होते. मी जालावरच्या मित्रांनाही त्याच भावनेने बघते. जर एखाद्याचे विचार मला पटत असतेल, आवडत असतील तर त्याचं वय, रूप, लिंग, वर्ण किंवा व्यंग याच्याशी मला काही घेणं-देणं नसतं.

आपली माहिती दुसर्‍याला सांगण्याबाबतही तेच म्हणता येईल. मला वाटतं वय वर्षे १८+ असलेल्या व्यक्तीला कोणाला काय आणि किती सांगावे याची जाण असतेच. तसेच मला माहिती असलेले सगळेच्या सगळे मी कोणा एका व्यक्तीला ठरवूनही सांगू शकत नाही. मग समोरचा आपाल्याला काय माहिती नाही हे कश्यावरून ठरवणार? तसेच वास्तविक जगातली व्यक्ती आपल्या माहितीचा किंवा अज्ञानाचा गैरफायदा घेणार नाही याची काय शाश्वती??

मला जालावर आणि वास्तविक जगातही भरपूर मित्रमैत्रिणी आहेत. त्या सर्वांशीच केलेल्या गप्पांमधून मला भरपूर माहिती, मदत, आधार आणि मनोरंजन मिळाले आहे. बाकी वाईट अनुभव यायला जालावरच यायला हवे असे नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

जालाचा फार जुना अनुभव मजकडे आहे. हे माझे व्यसनच म्हणा ना!
तर.
तुमचा प्रतिसाद वाचून प्रथमदर्शनी तुमचा जालीय अनुभव मराठी संस्थळांपुरता मर्यादित दिसतो आहे. म्हणजे स्वतःबद्दल बहुधा पुरेशी खरी माहिती सांगणारे, एकमेकांना अहोजाहो संबोधणारे. समजूतदार, परिपक्व इ. प्रकारचे लोक, ज्यांचेवर मॉडरेटर्स अगदी आयपीपर्यंत जाऊन बारीक लक्ष ठेऊन आहेत.

म.सं. सोडून इतर स्थळी भेटून, उदा. चॅटरूम्स. मित्र/मैत्रिणी करून पाहिलेत का? त्यात इमॅजिनेशन किती अन खरे किती? किती % लोक ASL तरी खरे लिहितात/सांगतात? माझ्या अनुभवानुसार फक्त १०-२०%.

बघा विचार करून.

>>

बाकी वाईट अनुभव यायला जालावरच यायला हवे असे नाही.

१००% सहमत. पण जालावर ते यायची शक्यता जास्त. कारण इथे बोलताना समोरच्याची देहबोली आपण 'ऐकत' नसतो Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

म.सं. सोडून इतर स्थळी भेटून, उदा. चॅटरूम्स. मित्र/मैत्रिणी करून पाहिलेत का? त्यात इमॅजिनेशन किती अन खरे किती? किती % लोक ASL तरी खरे लिहितात/सांगतात? माझ्या अनुभवानुसार फक्त १०-२०%.

सहमत आहे आणि यासाठी चॅटरूमवर पडिक असण्याची गरज नाही.

इंटरनेट आणि याहू मेसेन्जर नवीन असतानाची गोष्ट. बहुधा ९९ सालातील असावी. माझे काही कलिग्ज मुलींची नावे घेऊन ऑफिसातील इतरांना बकरे बनवत किंवा जालावर वाह्यात उद्योग करत. हे प्रकार आजही चालतात, गुन्हे घडतात, तरुण मुलांना नादी लावल्याचे किंवा फसवाफसवीची उदाहरणे ऐकू येतात.

एकंदरीत जालावर आपली आयडेंटीटी लपवणे अतिशय सोपे असते त्यामुळे प्रत्यक्ष जीवनापेक्षा येथे असे प्रकार अधिक घडतात.

मराठी संकेतस्थळे म्हणजे जालविश्व नाही या आडकित्त्यांच्या मताशी सहमत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हेच म्हणतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

चॅटरूम्स. मित्र/मैत्रिणी करून पाहिलेत का? त्यात इमॅजिनेशन किती अन खरे किती? किती % लोक ASL तरी खरे लिहितात/सांगतात?

मी सगळ्यात पहिले आंतरजालावर आले ते १२वी दिल्यानंतर. तेव्हा याहू-चॅटरूम्स हा प्रकार बराच जुना झाला होता. माझी चॅटरूम्सशी ओळखच 'टाईमपास करण्याची जागा' अशी झाली. ती ओळख करून देतानाच असे सांगण्यात आले की इथे कोणीच कुणाशी खरं बोलत नाही. त्यामुळे तिथे मैत्र-मैत्रिणी बनवण्याच्या उद्देशाने कधीच गेले नाही. त्यामुळे समोरचाही काही खरं सांगेल अशी माझी अपेक्षाही नव्हती.

तरी सुरुवातीला त्या वयात इतरांप्रमाणे थोडाफार म्हणजे कदाचित १-२ महिने टाईमपास केला, परंतु त्यानंतर त्यातला रस संपला. लवकरच जीमेल, ऑर्कुट, फेसबुक आले आणि याहू, त्याच्या चॅटरूम्सची कधीच गरज भासली नाही. ऑर्कुट/फेसबूकवर तसेच काही ऑनलाईन ग्रुप्सवर (जे नक्कीच मराठी संस्थळं नाहीत) काही अश्या लोकांशी मैत्री झाली ज्यांना मी कधी भेटले नव्हते. तो माझा अनुभव मी सांगितला.
अर्थातच आपली कोणती माहिती, कोठे, किती सांगावी येवढा विचार प्रत्येक व्यक्ती करतच असावी असा माझा समज होता.

पण तुमचा मुद्दाही विचार करण्याजोगा आहे. जर कोणी चॅटरूम्ससारख्या ठिकाणीही आपली खाजगी माहिती प्रसिद्ध करत असेल तर ते धोकादायकच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...

विरंगुळ्याकरता आभासी जग हवे. ४ घटका सकस मनोरंजन व्हावे, मायबोलीतील कथा-कविता , शब्द कानी पडावे म्हणून बाकी फारसा अर्थ नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हवेच!
आभासी जग आहे म्हणून तर आपण आहोत.
पँडोराची पेटी उघडल्यावर बाकी सगळं उडून गेलं. उरली ती आशा!
होप.
आशा हा सर्वात मोठ्ठा आभास आहे, सारीका ताई! अन या आशेवरच जग चालतंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

आशा ही एकच अशी शृंखला आहे की जिच्याने बद्ध असताना मनुष्य मुक्त असतो तर जिच्या बद्धतेविना तो जखडला जातो अशा अर्थाचे सुभाषित आईकडून लहानपणी ऐकलेले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

Smile सुंदर!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डागदरांच्या अनेक मुद्यांना इथे एकत्रच प्रतिसाद देतोय.

नेट मुळे संपर्कात रहाणे: ४० वर्षांपूर्वी तुम्ही पोस्टाने पत्रं लिहून संपर्क साधला असतात. अन अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या पत्रांसारखी तुमची पत्रे प्रसिद्ध झाली असती.

पोस्टाच्या आधी काय करायचे? त्याच्या आधी? त्याच्या आधी? कोणता मार्ग उत्तम? तुम्ही सद्ध्या इमेलपेक्षा पोस्टानेच संपर्क करता काय?
प्रसिद्ध व्यक्तींची फेसबुक पोस्टं, ट्वीट्स किती प्रसिद्ध आहेत माहित आहे का? Smile

नेटमित्रांना आधी बातमी लागते: बॅड हॅबिट. "

कोणती बातमी? आणि अशी कशी काय लागते? माझ्या बातम्या मला कोणाला केव्हा द्यायच्या तेव्हाच लागतात ब्वॉ. मी फेसबुक, संस्थळं इ. वर आहे म्हणून माझी बातमी अशी स्वतःहून लिक होत नाही. सांगायचा मुद्दा काय, कोणती बातमी कोणाला कधी द्यायची याचं भान तुम्हाला हवं, त्यात इंटरनेट माध्यमाचा दोष नाही.

बाकी पुर्वी बायका (मैत्रिणी) झाडाखाली कट्ट्यावर बसत, पुरुष लोक असेच कुठेतरी भेटत. तिथेही अशी बातमी लिक होऊ शकते किंवा दिली जाऊ शकतेच.

"तुम्हास माहिती असलेले सगळेच दुसर्‍यांना सांगून टाकू नका. त्यामुळे तुम्हाला काय माहिती आहे या बरोबरच काय माहिती नाही हेही दुसर्‍यांना कळते."

ह्याच आणि इंटरनेटचा काय संबंध? हे तत्व "खर्‍या" जगात आणि इंटरनेटवर वेगळं अवलंबलं जातं का? ज्या व्यक्तीला अशा प्रकारे सांगून टाकयची सवय असेल (किंवा मनात ठेवायची सवय नसेल) ती "खर्‍या" जगात सुद्धा सांगेलच.

नेटवर इझीली मित्र जमवणार्‍यांना बाहेर 'रिअल टाईम' मधे मित्र का लवकर मिळत नाहीत?

हॅ हॅ हॅ, हे तुम्हाला कोणी सांगितलं? Smile

खरोखर मित्र असतात ते जीव देतात. लिटरली.

फारच भाबडे आहात हो तुम्ही डागदर! माझे खर्‍या जीवनातले अनेक मित्र आहेत. पण सगळ्यांकरता मी जीव देईन, लिटरली तर सोडाच, असे नाही बरं का.

घरदार विसरून उजव्या हातात मोबाईल, डाव्यात लँडलाईन अन मांडीवर लॅपटॉप : फेसबुक?? ८-१० चॅट विंडो ओपन?
हजम नही हुआ

इंटरनेटचे जग म्हणजे "हेच" असे नाही.

बर्‍यांचदा कारण नसतांना अज्ञान जाहीर करणे हे आपल्याकरता तोट्याचे असते.

इथेही, कोणी कुठे कसे अज्ञान जाहीर करावे हा प्रश्न आहे. इंटरनेटचा यात काही दोष् नाही.

म.सं. सोडून इतर स्थळी भेटून, उदा. चॅटरूम्स. मित्र/मैत्रिणी करून पाहिलेत का? त्यात इमॅजिनेशन किती अन खरे किती? किती % लोक ASL तरी खरे लिहितात/सांगतात? माझ्या अनुभवानुसार फक्त १०-२०%.

बघा विचार करून.

फक्त एक उदाहरण म्हणून. कूंटनखान्यात जाऊन किती मित्र/मैत्रिणी करून पाहिल्यात? कीती लोक खरे नाव, पत्ते सांगतील? याहू चॅट किंवा इतर गोष्टी म्हणजे काही आख्खं इंटरनेट नाही. याहूसारख्या चॅटरूम्समद्ये खरी माहिती देणे हा उद्देशच नसतो. तिथे जर तुम्ही मित्र बनवायला गेलात तर चूक तुमची आहे.

इंटरनेट एक माध्यम आहे. पर्सन टू पर्सन, फोन यांसारखंच एक, काही फायदे काही तोटे असलेलं. काय कसं, किती आणि केव्हा वापरायचं हे कळलं की काम झालं. पण ते नाही कळलं तरी काही मोठी गोष्ट नाही. अनेकजण अनेक गोष्टी न कळताही सुखाचे आयुष्य जगतात.

तर मग डागदर साहेब, आभासी मयतरी कर्नार कं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

मला इत्का मोठ्ठा प्रतिसाद आल्याचं ठाउकच नव्हतं.
निळे/नाइलजी,
आभासी मयतरी करायला हर्कत नाही.

याहू चॅटरूम म्हणजे कुटणखाना असतो काय? ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

मला इत्का मोठ्ठा प्रतिसाद आल्याचं ठाउकच नव्हतं.

अर्धा मालमसाला तुमचा आहे त्यातला! Wink

निळे/नाइलजी,
आभासी मयतरी करायला हर्कत नाही.

डन! पण ते जी काढा राव! उगाच काका लोकांच्या पंक्तीत गेल्यासारखं वाटतं! Wink

याहू चॅटरूम म्हणजे कुटणखाना असतो काय?

यू आर लकी इट इज व्हर्चुअल! Wink याहू चॅटरुम्स मधला ९०% ट्राफिक हुकअप्स+विडिओ(ऑनलाईन) सेक्स+रोलप्ले चॅट वगैरेंसाठी असतो. (असा आमचा दावा आहे! Wink )

पण मूद्दा असा आहे की, भौतिक जगात आणी इंटरनेटवर दोन्ही ठिकाणी अशा गोष्टी आहेत जिथे खरी माहिती उघडी करु नये. उदाहरणच द्यायचे तर मराठी संस्थळांवरील बहुसंख्य जण एकमेकांना खर्‍या नावाने जाणतात, बहुतेकांना एकमेकांचे फोन नं इ. माहित आहे वगैरे. पण त्याच वेळेला हेच लोक अशाही फोरम्स वर असतील (मी आहे) जिथे त्यांनी ही माहिती खाजगीच ठेवली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

आता,
निळ्या बरोबर की नाय्ल्या? ह्ये पन खरं खरं सांगून टाका.

याहू चॅट किंवा इतर गोष्टी म्हणजे काही आख्खं इंटरनेट नाही. याहूसारख्या चॅटरूम्समद्ये खरी माहिती देणे हा उद्देशच नसतो. तिथे जर तुम्ही मित्र बनवायला गेलात तर चूक तुमची आहे.

म्हंजे मग ते इंटर्नेट म्हंतात ते नक्की काय आहे? म्हणजे जर याहू चॅट हा कांद्याचा एक पापुद्रा झाला, थोबाडपुस्तक हा दुसरा पापुद्रा! तर मग नेट नेट ते नक्की काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

निळ्या बरोबर की नाय्ल्या? ह्ये पन खरं खरं सांगून टाका.

नथिंग इज ब्लॅक अँड व्हाईट, इट्स ब्लू टू! Wink काही म्हणा हो, मला कळल्याशी मतलब.

तर मग नेट नेट ते नक्की काय?

इंटरनेटवर सर्च करुन बघा ना. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile