"नॉट विदाऊट....." दुसरी बाजू
स्नेहांकिता यांचा असा हा प्रतिसाद आहे की, ज्याचे मनापासून स्वागत करणे गरजेचे आहे. प्रथमच कुणी वाचक 'नॉट विदाऊट....' हे कथन दुसर्या अंगानेही वाचण्याचा प्रयत्न करीत आहे असे दिसले.
आपल्या भारतीय वाचकांची अशी एक मानसिकता बनली आहे की ज्या ज्या वेळी जिथे जिथे एका 'आई' चा आपल्या अपत्यासाठीचा झगडा समोर येतो, त्या त्या वेळी वाचकांचा [पुरुष्/स्त्री दोन्ही] सहानुभूतीचा ओढा त्या स्त्रीकडेच वळतो आणि मग त्या कहाणीतील 'बाप...नवरा...पुरुष = खलनायक' असेच चित्र समोर येऊन थांबते. त्यामुळे या पुस्तकाच्या विरोधात काहीसे हलकेही लिहणे म्हणजे आपण जणू गुन्हेगार आहोत की काय असाच समज निर्माण होत राहिला आहे. तरीही या धाग्याच्या निमित्ताने "नॉट विदाऊट माय डॉटर...." प्रकरणाची दुसरी बाजूही वाचनप्रेमीना पाहिजे असाही मनी विचार आलाच.
बेटी मेहमूदीच्याबाबतीत नेमके हेच घडले आहे. तिने ज्यावेळी इराणी डॉक्टर सईद मेहमूदीशी विवाह केला होता त्याचवेळी तिला 'इराण आणि अमेरिका' यांच्यातील राजकीय तणावाचे वातावरण माहीत नव्हते असे म्हणणे/मानणे दूधखुळेपणाचे होईल. तरीही सईद अमेरिकेत कायमस्वरूपी राहील या आशेवर तिने संसारात पाऊल टाकले असे मानू या. एखादी अमेरिकन/युरोपिअन स्त्री एखाद्या भारतीय युवकाशी विवाह करते त्यावेळी ती नक्कीच भारतीय संस्कृतीविषयी, इथल्या कुटुंबव्यवस्थेविषयी माहिती करून घेतेच, भले ती भारतात वास्तव्याला येवो अथवा ना येवो. [अशी तीन उदाहरणे मला माहीत आहे, पैकी एका उदाहरणातील मी मॅरेज रजिस्ट्रार कार्यालयातील सहीचा साक्षीदारही आहे.....या कॅनेडिअन युवतीने - जरी ती आता पतीसमवेत अहमदाबाद येथील वास्तव्यास असली तरी....गारगोटीसारख्या ग्रामीण चेहर्याच्या गावात एक नाही तर चक्क अडीच वर्षे पतीच्या आई-वडिल, दोन लहान भाऊ, एक बहीण....शेतीवाडीचे वातावरण....यांच्यासोबत राहिली. मराठी तर शिकलीच, शिवाय पिठले-भाकरीही करायला शिकली होती....कोल्हापूरात अपत्याला जन्म दिला....थोडक्यात, मनापासून संसार करायचा झाल्यास बाकी सार्या गोष्टी दुय्यम ठरू शकतात.]
बेटी इराणला गेली, त्याला कारण डॉ.सईद हे अमेरिकेतील हॉस्पिटलमधील त्यांच्या 'इराणी' पणावर होत असलेल्या टोमण्यांना वैतागले होते. त्यांची एकमेव चूक कुठली असेल तर ती त्यानी पत्नीला 'आपण कायमचे इराण वास्तव्याला जात आहोत...' ही गोष्ट सांगितली नाही [हे त्यानी स्वतः एका मुलाखतीत कबूल केले होते]. पण त्याना मनी कुठेतरी खात्री होतीच की, एकदा तेहरानला पोचलो की पत्नीला सारे काही रीतसर समजावून सांगून तिचे मन वळविता येईल. अशा कित्येक अमेरिकन तरुणी इराणी तरुणासमवेत विवाह करून इराणचे नागरिकत्व स्वीकारून तिथे आनंदाने राहत होत्याच.
पण...बेटीला अमेरिकेलाच परतायचे असल्याने मग 'इराण हा किती भयंकर देश आहे...किती घाणेरडापणा तिथे रुतून बसला आहे...किती अशिक्षता...किती पुरुषप्रधान संस्कृती...खाण्यापिण्याच्या आवडीनिवडीविषयी नाराजी...आदी बाबीबाबत तिने सविस्तर लिहून वाचकांचा कल स्वतःच्या निर्णयाकडे वळविणे...इ.इ. गोष्टी मग साहजिकच येत राहतात. माणसे एका देशातून दुसर्या देशात स्मगल करणार्या व्यक्तीशी ती संपर्क साधून तुर्कस्थानच्या अमेरिकन वकिलातीपर्यंत कशी पोचते, हा एक चित्तथरारक भाग झाला आहे हे जितके खरे, तितकेच हेही खरे की दुसरीकडे डॉ.सईद मेहमूद आपल्या मुलीसाठी...मेहताब... व्याकुळ होणे.
अमेरिकेला त्या दोघी परतल्यानंतरही डॉ.सईद यानी मुलीला पाहण्याची आशा सोडली नव्हती व जवळपास १६ वर्षे त्यानी आपल्या हक्कासाठी विविध पातळीवरून लढा दिला...तो अर्थातच अयशस्वी झाला. त्यांची या 'नॉट विदाऊट माय डॉटर...' बाबत काय भूमिका होती ?...बेटीने तसेच मुलीने इराणमध्येच राहावे यासाठी डॉक्टरानी कसे आणि किती प्रयत्न केले ?...त्या प्रयत्नाची पातळी काय होती?...यावर फिनलंड फिल्म इन्स्टिट्यूटच्या साहाय्याने 'विदाऊट माय डॉटर' नावाची एक डॉक्युमेन्टरी तयार केली...त्यामध्ये या प्रकरणाची दुसरी बाजूही अमेरिकन जनतेला समजली.
एक लक्षात घेणे गरजेचे आहे...ती म्हणजे बेटी मेहमूदी यांच्या आत्मकथनपर पुस्तकाला भारतात जितकी प्रसिद्धी मिळाली तितकी खुद्द अमेरिकेत मिळाली नसून कित्येक समीक्षकांनी दोन राष्ट्रांत अकारण तेढ निर्माण होईल अशी अतिरंजीत वर्णने लेखिकेने त्यात केली आहेत असेही समीक्षेत म्हटले होते. या पुस्तकावर सॅली फिल्ड अभिनीत हॉलीवूड चित्रपटही निघाला होता, त्याचेही अमेरिकेत थंडे स्वागत झाले.
[अवांतर : मुलीच्या ध्यासाने अस्वस्थ झालेल्या डॉ.सईद मेहमूद यानी दुसरा विवाह केला नाही...अखेरपर्यंत ते मुलीचा आवाज किमान टेलिफोनवर ऐकण्यासाठी धडपडत राहिले आणि शेवटी २२ ऑगस्ट २००९ रोजी त्यांचा मृत्यू झाला.]
================
संपादकः चर्चा रंगत चालल्याने तसेच मुळ धाग्याला अवांतर होईल या सार्थ भितीने नवे समांतर मुद्दे येण्याचे टळू नये म्हणून चर्चा वेगळी काढत आहे. या निमित्ताने एकूणच मुस्लिम राष्ट्रे व त्यांच्या भोवती फिरणार आंतरराष्ट्रीय राजकारण - समाजकारण यावर साधकबाधक चर्चा आता इथे करता येईल
आभार
दुसर्या बाजुचे माहित नव्हते. डॉक्युमेंटरीबद्दलही ऐकले नव्हते. आता शोधुन बघायला हवी. पाटीलकाकांचे आभार!
मी हे पुस्तक पहिल्यांदा ११वीत असताना वाचले होते. त्यावेळी माझी आंतरराष्ट्रीय राजकारणाची समज तितपतच असल्याने (आता मला समज फार आहे असा दावा नाही - पण तेव्हापेक्षा अधिक असावी असा समज तरी आहे ) पुस्तक खटकणे सोडाच अतिशय आवडले होते! इतके की मुस्लिम देशांविरूद्ध काहिशी घृणा उत्पन्न झाली होती.
पुढे इराणी चित्रपट, इतर समांतर पुस्तकांचे वाचन केल्यावर मात्र हेच पुस्तक परत वाचताना स्नेहांकिता म्हणतात त्याप्रमाणे काही विचार मनात आले. काही जुनाट रुढी, त्याचा झालेला लेखिकेला त्रास वगैरे निश्चितच वाईट असले तरी त्यासाठी एकूण देशाबद्दल गैरसमज करून घेणे आततायी ठरावे असे दुसर्या वाचनात वाटले होते. आता तुमच्या प्रतिक्रीयेनंतर दुसरी बाजुही प्रकाशात आली आहे हे वाचून उत्सूकता चाळवली आहे. डॉक्युमेंटरी युट्युब वर आहे का? नसेल तर कुठे मिळेल शोधायला हवी
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
दुसर्या बाजुचे माहित नव्हते.
असेच म्हणतो.
जुन्या परंपराप्रिय आणि रूढीग्रस्त समजाचा त्रास होणार हे मान्य व्हायला हरकत नाही, शिवाय अमेरिकन समाजातल्या व्यक्तिवादाच्या अतिरेकात वाढलेल्या व्यक्तीला जास्त त्रास होत असेल हेही समजण्यासारखे आहे. पण म्हणून हे देश आपण समजतो तितके असंस्कृत नसावेत असेच वाटते.
ही माहिती मिळाल्याने सरसकटीकरण करू नये हे पुन्हा एकदा प्रकर्षाने कळले.
प्रश्न विवेकाचा
थॅन्क्स, ऋषिकेश....नगरीनिरंजन
इराणच नव्हे तर कोणत्याही 'मुस्लिम' राष्ट्राविषयी वा तेथील राजकीय्/सामाजिक स्थितीबद्दल, संस्कृतीबद्दल, रितीरिवाजाबद्दल अमेरिका वा युरोपमध्ये विरूद्ध बाजूने लिहिले गेले की का कोण जाणे आम्हा भारतीय वाचकांना त्याबद्दल [लिखाणाबद्दल...] भरतेच येते आणि मग सारीच मुस्लिम राष्ट्रे व्यक्तिस्वातंत्र्याची कशी गळचेपी करतात, अन्य राष्ट्रापेक्षा आमचाच धार्मिक अजेंडा किती आणि कसा महत्वाचा आहे हेच ठरविण्याचा ते राष्ट्रे यत्न करीत असतात असा एक सोयिस्कर समज इथे निर्माण झालेला आहे.
'फिक्शन' आणि 'रीअॅलिटी' यामध्ये फरक मानण्याचा विवेक बाळगणे नितांत गरजेचे आहे. इस्त्रायलचे गोडवे आम्ही गातो, पण दुसरीकडे पॅलेस्टिनींचीही काहीतरी त्यासंदर्भात न्यायपूर्ण भूमिका असू शकेल का ? या शक्यतेकडे कसा काय काणाडोळा होता इथे ?
बेटीने 'हुसेन' या माणसे स्मगल करणार्या दलालामार्फत यशस्वी पलायन केले हे कथनात जसे आले आहे तसेच चित्रपटातही आहे. पण दोन्हीकडे त्याला असा रंगविला गेला आहे की जणू काय 'बेटीच्या झगड्याचा तो तारणहारच...' वाटावा. अशी स्मगल करणारी जमात ढाक्यात आणि अरुणाचल प्रदेशात आहे, आणि त्याना आम्ही आपल्या देशाचे गुन्हेगार मानतो, पण 'हुसेन' ला त्या लेखनशैलीमुळे मानायचे नाही, हा विरोधाभास लक्षणीय होतो....केवळ एकच बाजू समजावून घेतल्यास.
असो. यूट्यूब वर 'विदाऊट माय डॉटर...' एकूण ६ भागात उपलब्ध आहेच.
आभार
आज घरी येऊन लगेच युट्युबवर भाग बघु लागलो.. आता तिसरा भाग बघतोय.
सत्य या दोन्हीच्या मधे असणार असे वाटते आहे
बाकी पॅलेस्टाईनच्या बाबतीत मात्र बर्यापैकी नंतर विविध नजरेतून लेखन वाचायला मिळालेच शिवाय या विषयावर बर्यापैकी उशीरा वाचल्याने एकांगी कंडिशनिंग होण्यापासून वाचलो असे वाटते.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
धन्यवाद अशोक काका : एकच लिंक
अशोककाका,
तुमचा प्रतिसाद एका दमात वाचून काढला. हा प्रकार खरे तर नवा नाहिये. साहित्याच्या , चित्रपटाच्या, इत्यादी जमेल त्या माध्यमा मार्फत लोकांमध्ये इराणविषयक (किंवा आपल्याला हवे ते विचार) प्रसृत करण्याची एक अमेरिकन (कदाचित थिंकटँकची) परंपरा आहे.
पण दुसरी बाजू लेखिकेने विचारात घेतली नाही कारण ती पूर्ण अमेरिकन प्रभावाखाली गेलेली होती. दुर्दैवी पित्याच्या काळजाची अवस्था समजणे त्या स्त्रीला अवघडच असेन. सुदैवाने इराण व भारत हे संबंध चांगले आहेत. पण दुर्दैवाने अमेरिकेच्या पंज्याखाली आपली परराष्ट्र नीती चालली आहे. हे काही चांगले लक्षण नाहिये. असो... या धाग्यावर विषयांतर नको. नॉट विदाऊट माय डॉटर, मयादा, डेबोरा एलिसचे ब्रेडविनर व त्याच स्टोरीला पुढे नेणारी अजून २ पुस्तके. अशा प्रकारच्या इस्लामी राजवटीत पिडल्या गेलेल्या कित्येक कथांची मोठ्या प्रमाणावर पब्लिसिटी होते आहे. (इथेच काहीतरी मुरते आहे याची शंका येते)
युट्युबवर एकाच भागात हा संपूर्ण चित्रपट आहे
हा तो दुवा
आणि मग सारीच मुस्लिम राष्ट्रे
आणि मग सारीच मुस्लिम राष्ट्रे व्यक्तिस्वातंत्र्याची कशी गळचेपी करतात, अन्य राष्ट्रापेक्षा आमचाच धार्मिक अजेंडा किती आणि कसा महत्वाचा आहे हेच ठरविण्याचा ते राष्ट्रे यत्न करीत असतात असा एक सोयिस्कर समज इथे निर्माण झालेला आहे.
अशोककाका, “नॉट विदाऊट...” ची लेखिका जसे इराणचे अतिरंजित वर्णन करते, त्याप्रमाणेच आपले वरचे वाक्य आहे असे मला वाटते. अर्थातच डॉ.सईद मेहमूद यांचीही बाजू असणार आणि ती ही योग्य असू शकते, त्यांनी परत लग्न केले नाही इ. पण ह्या एका (किंवा आणखी काही नगण्य) उदाहरणावरून “सारीच मुस्लिम राष्ट्रे व्यक्तिस्वातंत्र्याची कशी गळचेपी करतात” याविषयी सोयिस्कर समज निर्माण होतो असे आपण आरोप करता, खरेच सांगा अशा किती मुस्लीम राष्ट्रात स्त्रियांना व्यक्तिस्वातंत्र्य असते? जे खरे आहे आहे (म्हणजे बहुतांश मुस्लीम राष्ट्रात स्त्रियांना व्यक्तिस्वातंत्र नगण्य असते) ते नाही का म्हणायचे?
“अन्य राष्ट्रापेक्षा आमचाच धार्मिक अजेंडा किती आणि कसा महत्वाचा आहे हेच ठरविण्याचा ते राष्ट्रे यत्न करीत असतात” ह्या वाक्यात आपण धार्मिक अजेंडा म्हणता तो व्यक्तिस्वातंत्र्याबद्दल किंवा इतर नागरी कायद्याबद्दल आहे का? जर असेल तर हे ही वाक्य अतिरंजितच म्हणावे लागेल. अमेरिकेत व्यक्तिस्वातंत्र्य किंवा इतर नागरी कायदे बायबल वरून ठरले/घेतले असतील असे वाटत नाही. बेटी इराणला जाण्यापूर्वी अमेरिकेत राहत होती म्हणून अमेरिकेचे उदाहरण घेतले आहे.
बाकी आपण दुसरी बाजू, जी कळणे खरेच गरजेचे होते ती दाखवल्याबद्दल आभार.
>>पण...बेटीला अमेरिकेलाच
>>पण...बेटीला अमेरिकेलाच परतायचे असल्याने मग 'इराण हा किती भयंकर देश आहे...किती घाणेरडापणा तिथे रुतून बसला आहे...किती अशिक्षता...किती पुरुषप्रधान संस्कृती...खाण्यापिण्याच्या आवडीनिवडीविषयी नाराजी...आदी बाबीबाबत तिने सविस्तर लिहून वाचकांचा कल स्वतःच्या निर्णयाकडे वळविणे.
इराण खूप सुंदर देश आहे आणि इराणी लोकही खूप काईंड, कम्पोज्ड अँड नाईस आहेत असे ठाम मत यानिमित्ताने नोंदवतो.
आक्षेप निराधार वाटत नाही
काल ही डॉक्युमेंटरी पाहिली. डॉ. मेहमुदी यांच्या बहिणीचा "पैसे कमावण्यासाठी बेटी यांनी मुळ कथेत अमाप मसाला तर भरलाच शिवाय तिच्या सहलेखकाची पार्श्वभुमी बघता एकूणच मुस्लिम राष्ट्रांना वाईट रंगात रंगवण्याचा कल - आवड स्पष्ट दिसते" हा आक्षेप अगदीच निराधार वाटत नाही.
शिवाय ती खरेच पर्वतरांगांतून पळाली असेल असे तिच्या बहिणीला वाटत नाही, तर अमेरीकन सरकारनेच मदत करून तिला पळवले असेल व त्याबदल्यात तिच्या पुस्तकाने लोकांचे कंडिशनिंग केले असेल असाही तर्क तिच्या बोलण्यातून जाणवला. मला तो कल्पनाविलास वाट असला तरी या पुस्तकाने इराणच्या इमेजला धक्का पोचला हे नक्की
बाकी, काही अमेरिकन व्यक्तीचे (नाव विसरलो) "अमेरिकेला द्वेष करण्यासाठी कोणीतरी लागतेच. पूर्वी रशिया होता - कम्युनिझम होता. आता ती जागा मुस्लिम देशांनी घेतली आहे" हे निरिक्षण मार्मिक वाटते.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
हे पुस्तक दहावीला असताना वाचल
हे पुस्तक दहावीला असताना वाचल होतं
वर ऋषिकेश यांनी म्हटल्याप्रमाणे पुस्तक वाचून एक नकारात्मक प्रतीमा डोक्यात तयार झाली होती
पण या लेखामुळे दुसरी बाजू समजली
याच पुस्तकावर आधारित भारतातही एक पिक्चर निघाला होता
मला वाटत त्यात नाना पाटेकर करिष्मा कपूर आदी मंडळी होती
बिहारच्या पार्श्वभूमीवर आधारित होता
या पुस्तकापेक्षा मला डाँ ऊज्ज्वला दळवी लिखित सोन्याच्या धुराचे ठसके जास्त रोचक वाटलं
.
प्रकाशझोत टाकणारा लेख.
काही दिवसांपूर्वी मी इराणच्या पार्श्वभूमीवरील एक पुस्तक वाचले होते. (नाव आता आठवेना.) त्यावरून इराणविषयी पुष्कळ पॉझिटिव्ह माहिती मिळाली. त्यामुळे 'नॉट विदाऊट्..'फारसे भावले नाही. अशोकजी, तुमच्या लेखाने याला पुष्टी मिळाली. तसेच कोणतेही पुस्तक वाचताना पूर्वग्रहाचे ढापण लावू नये, हा दृष्टीकोनही.
कृपया जमल्यास ते नाव जरा
कृपया जमल्यास ते नाव जरा आठवाल का. ह्या अश्या देशांबद्दल 'पॉझीटीव्ह' वाचण्यासाठी मी फार उत्सुक आहे.
आता बघा ना, गुगल वर प्रतिमा शोधतांना फक्त 'pakistan' असं टाकलं की नुसते दंगे, आंदोलनं, जाळ-पोळ, लाठीमार, कचरा-घाण, रक्त ह्याचेच फोटो दिसतात (आणि अर्थात नकाशे) पण तेच जर 'सर्च' मधे एकच अजुन शब्द मिळवला 'beautiful' म्हणजे 'beautiful pakistan' तर किती सुंदर फोटो दिसतात. तर प्रश्न हा असतो की आपल्याला काय पहायचयं त्याचा किंवा जे काही पाहतोय तेच सत्य नसतं तुमचा शोध वाढवला किंवा वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिलं तर एक वेगळी बाजूही दिसते
धागा आवडला
सर्वप्रथम अशोक काकांचे आभार की ही दुसरी बाजु उलगडून दाखवली. एकाच गोष्टीच्या अन्य बाजु लोकांसमोर आल्या पाहीजे हेच खरे आंतरजालावर लेखनाचे बलस्थान आहे.
प्रतिसादाचा स्वतंत्र धागा केल्याबद्दल ऐसी संपादकांना धन्यवाद व त्यांचे अभिनंदन.
बहुदा उल्लेख केलेली डॉक्युमेंटरी ही असावी
नॉट विदाऊट माय डॉटर हे पुस्तक
नॉट विदाऊट माय डॉटर हे पुस्तक बर्याच वर्षांपूर्वी वाचले आहे. तुम्ही म्हणता तसे अतिशयोक्ती केली असण्याची शक्यता लक्षात घेऊन देखील लेखिकेबद्दलची सहानुभूती कमी होत नाही. प्रत्येकजण आपली कहाणी सांगताना थोडाफार तरी बायस होत असणारच, कारण जिथे सर्वस्व गुंतले आहे आहे,अशी घटना, किंवा कालखंडाचे वर्णन करताना सर्वसामान्य माणूस तटस्थ राहणे अवघडच नाही तर अशक्य असते (काही सन्माननीय अपवाद असतीलही). त्यामुळे ही कहाणी जर एकांगी वाटली तर तो लेखिकेचा दोष असे मला तरी म्हणता येणार नाही.
तुम्ही लिहिलेले आहे कि डॉ महमुदीची एकच चूक झाली की त्याने आपण कायमचे इराणला जात आहोत हे आपल्या पत्नीला सांगीतले नाही. तुम्ही ही चूक अगदी निग्लीजिबल आहे असे मानता का? इराणला गेल्यावर तिचा पासपोर्ट तिच्याकडून काढून घेण्यात आला होता, बाहेरच्या जगाशी संपर्काची कुठलीही साधने तिला उपलब्ध नव्हती. ही साधी घटना आहे असे मला तरी वाटत नाही. आणि तिच्या मुलीला संपूर्णपणे एक इराणी मुस्लीम स्त्री बनवण्याची प्रक्रीया सुरू झाली होती. हे कुठल्याही व्य्क्तीस्वातंत्र्याची ओळख असलेल्या आईला मान्य होणे शक्यच नाही. बेटी त्या डॉ ची पत्नी असली तरी तिच्या आयुष्याचा एव्हढा मोठा निर्णय त्यांनी तिला न विचारता घेणे हे मला तरी अजिबात समर्थनीय वाटत नाही. कदाचित इराणसारख्या मुस्लीम देशामधेच या वागण्याचे समर्थन होऊ शकते.
लेखिका ही अमेरिकन आहे म्हणून तिने इराण मधील स्थितीचे अवास्तव वर्णन केले असावे असे तुम्ही लिहिले आहे. मग तुम्ही जीन ससून याचे प्रिन्सेस किंवा डॉटर्स ऑफ अरेबिया वाचले आहे का? ती सौदीमधील एका राजघराण्यातील स्त्री ने कथन केलेली कहाणी आहे. ती अमेरिकन नाही. तसेच ब्रेड विनर हे पुस्तक वाचले तर त्या मधे असलेले मुस्लीम स्त्रियाच्या आयुष्याचे वास्तव आणि बेटी मेहमुदीने वर्णन केलेली परिस्थिती यात काही तफावत आढळत नाही. (त्यांचे देश जरी वेगळे असले तरी ते सर्वच कट्टर इस्लामी देश आहेत)
त्या मुळे हा अमेरिकन प्रचार असावा या विचाराशी मी सहमत होऊ शकत नाही.
आणि राहता राहीले डॉ मेहमुदींचे पित्याचे र्हुदय वगैरे... तर ते तसे असेलही. आपल्या मुलीला भेटायला न मिळाल्याने ते दु:खी असतीलही. मानवी भावभावना सगळीकडे समान असणार. पण तरीही जे झाले त्यात त्यांची चूक फार मोठी होती असे मला वाटते.
त्या मुळे या कहाणीची दूसरी बाजू असलीच, तरी ती फारच कमकुवत आहे असेच मला वाटते.
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||
सहमत आहे.अमेरिकन लोक असले
सहमत आहे.
अमेरिकन लोक असले खोटारडे प्रचार करत नाहीत वगैरे माझे म्हणणे नाही.
पण अमेरिकन अजेंडा आणि महमूदींची गोष्ट या दोन निराळ्या गोष्टी आहेत. अमेरिकेला इराणची बदनामी करण्यात मोठा रस आहे, हे डॉ. महमूदींच्या वागण्याचे समर्थन कसे काय होऊ शकते? पत्नीला एवढा मोठा निर्णय सांगितला नाही ही ('एवढीच काय ती') चूक अक्षम्य आहे. विशेषत: अमेरिकेसारख्या देशातून इराणसारख्या देशात राहण्यामध्ये स्त्री म्हणून राहणीमानाच्या प्रचंड मोठ्या बदलांना पत्नीला सामोरे जावे लागणार असताना.
इराणमधले लोक प्रेमळ, दिलदार वगैरे असतीलही. तसे जगातले कुठलेच लोक मनानी वाईट असत नाहीत.
पण ते काही त्यांच्या अन्यायकारक चालीरितींचे समर्थन असू शकत नाही.
बाकी चालू द्या...
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
बहुदा
मी हे पुस्तक वाचलेले नाही किंवा चित्रपटही पाहिलेला नाही.
अमेरिकेला कशात रस आहे यातून महमुदीच्या वागण्याचे समर्थन होत नाहीच; पण तो फक्त महमुदी असेल तर. तो 'इराण'चा महमुदी असेल तर प्रश्न येणार; समर्थनाचा प्रयत्न म्हणून नव्हे, पण प्रश्न येणार. ही फॅलसी आहेच, पण माणसं केवळ लॉजिकल चालत नसतात, त्यामुळं ती होणार.
दोन पैसे
अशोक काका उत्तर देतीलच.
माझेही दोन पैसे:
डॉ. मेहमुदी यांची जी चुक आहे ती लहानशी आहे असे म्हणणे नाहीच. मात्र त्या चुकीचे भांडवल करून, एखाद्या अनुभवावरून देशाबद्दल असत्य निरिक्षणे नोंदवणे - पसरवणे हेही समर्थनीय असु शकत नाही. बेटी यांच्या संघर्षाची कथा आणि त्यांनी पाहिलेल्या इराणची कथा असे मुळ पुस्तकात दोन भाग आहे. यातील (महिन्यातून एकदाच शॉवर घेणारे इराणी ते बेटीला शाळेत डॉ.मेहमुदींनी मारहाण करण्यापर्यत) अनेक तपशील चुकीचे आहे असा दावा या प्रतिवादात आहे.
हा संघर्ष डॉ. मेहमुदी व त्यांच्या कुटुंबियांनी केलेला छळ इतकाच सिमीत राहिला असता तर अधिक योग्य होते. पण हा "इराणी पुरूष कसे वागतात बघा..." अश्या पद्धतीने केलेल्या कथनामुळे सगळ्या इराणी पुरुषांबद्दल जी कल्पना लोकांच्या मनात तयार होते तसे करणे अयोग्य वाटते
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
सहमत
दुसर्या बाजूचा खूप विचार केला इतके दिवस. पण मनात खटकणारे तुम्ही योग्य शब्दात मांडलेत.
तरीही.......
मागे एक लेख वाचला होता अनेक वर्षांपूर्वी. लेखक आठवत नाहीत. पण फार वेगळे निरिक्षण होते. इराण मधे लेखक काही कारणाने गेला होता. त्याला एके ठिकाणी जायचे होते पण कसे जायचे हा प्रश्न पडला तेव्हा बाजूला एक गाडी येऊन उभी राहिली. ती एक एकटी इराणी महिला चालवत होती, व तिने लेखकाला त्याच्या गंतव्यस्थानाकडे जाण्यासाठी लिफ्ट देण्याचे मान्य केले. इराणमधे एकटी महिला एकट्या परपुरुषाला स्वतःच्या गाडीत लिफ्ट देते हे वाचून इराणबद्दल मत थोडे बदलले होते हे खरे. ही घटना खरी की खोटी तो लेखकच जाणे.
+
हे पुस्तक लोकप्रिय होण्यात त्यातला "ते" कसे वाईट असतात हा सूर महत्त्वाचा होता असे वाटते. स्त्रीवरचा अन्याय किंवा स्त्रीची लढाई यापेक्षा......
इराण आणि महमूदी नसते तर पुस्तक कदाचित गाजले नसते.
(तीच गोष्ट लज्जा या तसलीमा नसरीन यांच्या पुस्तकाची)
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
इराण आणि पुरुषप्रधान संस्कृती
याच्याशी सहमत.
इराण किंवा इतर मध्यपूर्वेतले देश आणि त्यांच्या संस्कृतीतलं स्त्रियांचं स्थान अशा दिशेनं ही चर्चा चालली आहे म्हणून काही स्त्रीकेंद्री इराणी चित्रपटांमधलं स्त्री-पुरुष संबंधांचं चित्रण आठवलं -
सारा - दारियुश मेहेरजुई (इब्सेनच्या 'डॉल्स हाऊस'चं रूपांतर)
स्वतःला एक व्यक्ती म्हणून उभं करू पाहणारी स्त्री. तिचा नवरा हे शक्य होऊ देत नाही म्हणून ती घराबाहेर पडते.
ऑफसाइड - जाफर पनाही
फूटबॉलची मॅच पाहायला इराणमध्ये स्त्रियांना बंदी आहे त्यामुळे पुरुषाच्या वेशात मॅचला जाऊ पाहाणारी मुलगी.
अॅपल - समीरा मखमलबाफ
जन्मापासून वयाची अकरा वर्षं वडिलांनी घरात डांबलेल्या मुली आयुष्यात पहिल्यांदा घराबाहेर पडतात त्याची गोष्ट.
आता या सिनेमांच्या गोष्टी वाचल्या तरीही हे लक्षात यावं की खुद्द इराणमधल्या रसिकमान्य दिग्दर्शकांनी जी स्त्री-प्रतिमा दाखवली आहे ती मुक्त स्त्रीची नसून बध्द स्त्रीची आहे. आता विकीपीडियावरच्या या एंट्रीतून काही उद्धृतं -
"Bad hijab" ― exposure of any part of the body other than hands and face – is subject to punishment of up to 70 lashes or 60 days imprisonment.
In May 2006, a group of women's movement activists in Iran initiated the "Stop Stoning Forever" campaign. The campaign claims it has succeeded in saving 5 women from stoning up to March 2008, in association with the Volunteer Lawyers' Network.
The "One Million Signatures" campaign aims to end legal discrimination against women in Iranian laws by collecting a million signatures. Examples of such laws include one that gives lower value to legal testimony by women than to legal testimony by men, and one that limits punitive damages in cases of the wrongful injury or death of a woman to half of that of a man.
अनेक गोष्टी यातून स्पष्ट झाल्या असतील अशी आशा आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
पुढील चर्चा
सर्वप्रथम संपादक मंडळाचे मनःपूर्वक आभार...एवढ्यासाठी की त्यानी 'हा' विषय स्वतंत्र चर्चेचा होऊ शकतो म्हणून त्याला स्वतंत्र अस्तित्व देणे गरजेचे आहे असे मानून त्याप्रमाणे लागलीच कार्यवाही केली. झालेही अगदी तसेच असेच त्यानंतर आलेल्या प्रतिसादांवरून तसेच त्यातील मताची घनता पाहून. थॅन्क्स.
सर्वश्री ऋषिकेश, सागर, स्नेहांकिता, मेघना, प्रसाद, अर्धवट, सहज, जाई, श्रावण मोडक, नितिन थत्ते, चिंजं...आदी मान्यवरांनी विषयवाढीबाबत जी भर घातली त्याबद्दलही आभार. मनिषा यानी मांडलेला विचारही मी मान्य करताना, त्याला तसेच अन्य मतांच्या अनुषंगाने हा विषय पुढे नेत आहे....
एकटया बेटीच्या उदाहरणावरून इराण-अमेरिकन नात्याचे वा सामंजस्याचा सिद्धांत मांडणे धाडसाचे होईल. आज अमेरिकन समाजामध्ये इराणी रक्ताचे इतके प्राबल्य आहे की तेथील इराण्यांची लोकसंख्या [आजमितीस ५ लाखापेक्षा जास्त आहे] पाहता या दोन राष्ट्रांमध्ये कधी वितुष्ट होते का ? याचीच शंका मनी यावी. आज स्थिती अशी आहे की जगातील अन्य कोणत्याही देशापेक्षा अमेरिकेतच इराणी अधिक संख्येने वास्तव्यास आहेत आणि ज्याना 'प्रतिष्ठित' म्हटले जाते अशा मेडिसिन, प्रोफेसर्स, इंजिनिअरिंग, व्यापारउदीम क्षेत्रात ही मंडळी नावलौकिक मिळवून आहेत. मूळ अमेरिकन नागरिकांना बेटीच्या कथनामधील खटकलेला मोठा भाग म्हणजे तिला मेहमूदी कुटुंबियांकडून आलेले अनुभव [तिच्या भाषेतील] हे व्यक्तिगत स्वरूपाचे न मानता तिने 'इन टोटो' त्या देशाच्या संस्कृतीबद्दल रंगविले. म्हणजे 'मी म्हणते तसाच सारा इराण आहे' हा हट्ट...जो ना सर्वसामान्य अमेरिकन वाचकाला पटला, ना समीक्षकांना. वर काही सभासद म्हणतात तसे या प्रकरणातील दुसरी बाजू...डॉ.सईद मेहमूदी यांची...जशीच्यातशी स्वीकारणे जड जाईल....मान्य, पण म्हणूनच इथे मुद्दा येतो तो 'विवेका'चा. दोन्ही बाजू ऐकल्यानंतरच आपण एखाद्या देशाच्या चालीरितीविषयी भाष्य करू शकतो. त्यातही 'मुस्लिम देशांचे कल्चर' म्हणजे ते परंपरावाद्यांचे आगरच असणार तसेच पूर्णतः पुरुषप्रधान असणार हा आपला भारतीयांचा दृष्टिकोण आपण बाजूला ठेवू शकत नाही अशीच स्थिती आहे. 'अ' राष्ट्राची संस्कृती 'ब' राष्ट्रापेक्षा भिन्न आहे म्हणून 'ब' ने स्वत:च्या पुरोगामित्वाचा डिंडीम मारण्यात अर्थ नसतो. ज्याचे झाड त्याची फळे...मग त्या फळाची चव मालकाला गोड वाटत असल्यास वाटसरूने त्या चवीला नाक मुरडण्यात कसली दृष्टी नाही.
बेटीच्या पुस्तकाच्या आधारे काही अमेरिकन वाचकांच्या प्रतिक्रिया मी एकत्रीत केल्यात...त्या जशाच्यातशा इथल्या सदस्यांनी स्वीकाराव्यात असा माझा आग्रह नाही, पण किमान त्या अनुषंगाने तेथील...अमेरिकन...वारा तरी लक्षात येईल :
१. The untruths begin with the cover of the book, which features the image of a woman who is dressed in a manner which is decidedly not Iranian. So, even before you have read a single word, you have been given an image that is not authentic. The book is carefully packaged to cater to the American people's fears and prejudices. Also, the book isn't an isolated phenomenon. It's a product of a veritable cottage industry of horror stories and black-and-white portrayals of Muslim societies (Persepolis, Reading Lolita in Tehran, etc.).
२. Why would anybody fabricate such horror stories? Because there's a market for it. These books wouldn't sell as well otherwise. If one of countless Muslim women who live fulfilling lives of achievement wrote a story in which religious Muslims didn't come across as demons, it would be simply discounted as propaganda; there would be no market for it. Only that which is considered true that conforms to the prejudices and stereotypes.
३. There are many things the author wrote about that are very typical of Iranian behavior, things that I have grown to love about the culture (the best food, the love of tea, the strong family unit, the way they seem like they're arguing when they're talking). My husband agreed that for the most part, it did represent the culture accurately. (Except for the uncleanliness part - my husband's family are all very clean, almost afraid of germs.) With this book you have to keep in mind the time in which it takes place. It's a time of turmoil and war. Things were chaotic. It was also written before things like the Internet. We all know Iran has its problems. You can't base a whole culture on one crazy family. Remember also, the people are just like us, but it's their government that has the guns and unfortunately, the fanatical people run the government.
वरील प्रतिक्रिया ह्या सार्या 'फीमेल' वाचकांच्या आहेत...यातील एक वाक्य, "You can't base a whole culture on one crazy family"....मला फार रोचक आणि प्रातिनिधिक वाटते. कारण राजस्थानातील खाप पंचायत निवाड्यातील एका 'ऑनर किलिंग' प्रश्नावरून सार्या भारताला "मागासलेले" म्हणण्यात हशील नाही.
या 'ऑनर किलिंग' वरून आणखीन् एक खास अमेरिकन फॅब्रिकेशनचा किस्सा आठवला...जो 'नॉट विदाऊट...' संदर्भात बोलका ठरू शकतो.
"नॉर्मा खौरी' या अमेरिकन महिलेने [जी मूळची जॉर्डन देशातील...पण वयाच्या तिसर्या वर्षापासून अमेरिकन नागरिक झाली...लग्नही तिथल्याच तरुणाशी झाले]. पतीसमवेत ऑस्ट्रेलियातील मुक्कामात तिने 'जॉर्डनमधील एका मैत्रिणीची हॉनर किलिंगची एक सत्यकथा" म्हणून "Forbidden Love" नामक एक पुस्तक लिहिले जे रॅण्डम हॉऊसने प्रसिद्ध केले. जॉर्डन हा मुस्लिम देश आणि तेथील 'ऑनर किलिंग' हा अमेरिकन आणि युरोपिअन्स देश इथे चघळण्यास चांगला विषय म्हणून नॉर्माचे हे पुस्तक भलतेच गाजले. पण सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या माल्कम नॉक्स या संपादकाला ही ऑनर किलिंगची सत्यकहाणी एकप्रकारची फसवी कहाणी (Hoax) असल्याच्या संशयावरून त्याने त्या दृष्टीने "फॉरबिडन लव्ह" मधील घटनांचा प्रत्यक्ष मागोवा घेतला आणि २४ जुलै २००४ रोजीच्या सिडनी पुरवणीत नॉर्मा खौरी या लेखिकेने समस्त वाचकवर्गाला कसे फसविले आहे याचा वृत्तांत सोदाहरणासह प्रसिद्ध केला. खुद्द रॅण्डम हाऊसही त्यामुळे अडचणीत आले कारण त्यांच्या स्पॉन्सरशिप योजनेंतर्गतच नॉर्मा ने त्या पुस्तकाचे लिखाण पूर्ण केले होते. हे "Hoax" प्रकरण आपल्या अंगी शेकणार असे दिसल्यावर मग लेखिका नॉर्माने जाहीररित्या पुस्तक लिहिताना आपण 'लिटररी लायसेन्स" घेतले होते हे मान्य केले.
"The Best-Seller's Lie Exposed" या शीर्षकांतर्गत ही 'नॉर्मा' कहाणी http://www.smh.com.au/articles/2004/07/23/1090464851887.html?oneclick=true या लिंकवर अधिक अभ्यासासाठी वाचता येईल.
~ अशी अनेक 'जादाची भरती' केलेली पुस्तके अमेरिकन मार्केटमध्ये कित्येकदा 'सेन्सेशन' निर्मितीकरीता आणली जातात, त्याला जितका लेखक/लेखिका जबाबदार तितकेच पब्लिशिंग हाऊसेसदेखील. कोणत्याही प्रकारे आपल्या हाऊसचे पुस्तक हे 'साप्ताहिक बेस्ट सेलर्स' च्या यादीत अग्रक्रमाने कशारितीने राहील याकडी त्यांचे पीआरओ लक्ष देत असतील तर मग पुस्तकातील मजकुरामध्ये 'लोकप्रिय' समजला जाणारा मसाला कशारितीने भरला पाहिजे याची कार्यशाळा ते नवोदित लेखकांसाठी नित्यनेमाने चालवित असतातच.
बेटी आणि नॉर्मा म्हणजे कुणी ब्रॉन्टे सिस्टर्स नव्हेत....एकदोन पुस्तकांपुरतीच त्यांची लेखनसीमा...त्यामुळे जितके 'लिटररी फ्रीडम...लायसन्स' घेता येते तितके त्यानी त्या त्या वेळी घेतले असणार हे मान्य करण्यास हरकत नसावी. झालाच गोंधळ काहीसा...तर माफी मागून सुटका करून घेता येतेच...दुसरीकडे जितक्या आवृत्या निघायच्या तितक्या निघालेल्या असतातच.
~ असो. मी डॉ.सईद महमूदी यांची बाजू मांडली म्हणजे तो कुणी 'पंख छाटलेला देवदूत' होता असा माझा बिलकुल दावा नाही. फक्त बेटीच्या 'सुटके' च्या कहाणीच्या भोवर्यात वाचकाने स्वतःला अडकवून न घेता किनार्यावरून या घटना पाहिल्या तर योग्य त्या निर्णयाप्रत येण्यास तो/ती यशस्वी होऊ शकतो/शकते...इतकेच.
प्रतिसाद
प्रतिसाद उत्तम. अशोक पाटील या नावाला साजेसा.
अवांतर: सिडने मॉर्निंग हेरॉल्डचा उल्लेख वाचून एक आठवण आली. अ लॉंग वे गॉन किंवा अशाच नावाचं सिएरा लेओनमधल्या एका बालसैनिकाचं एक आत्मकथन प्रसिद्ध झालं होतं. त्यात त्या बालसैनिकाने सिएरा लेओनमधल्या युद्धाच्या स्थितीची वर्णनं केली होती. तेव्हा मला वाटतं, ऑस्ट्रेलियननं त्याची पोलखोल केली होती. अमेरिकेतून येणारी पुस्तकं आणि ऑस्ट्रेलियातील दैनिकं असं काही सूत्र आहे की काय इथं! त्या पुस्तकाचा लेखक संयुक्त राष्ट्राचा बालहक्क विशेष प्रतिनिधी वगैरे झाला होता नंतर.
+१
सहमत उत्तम प्रतिसाद
अवांतर: अजून एक आठवले ते "मुलगा माझाच" हे विजया जोशी यांनी लिहिलेले पुस्तक.
त्याचा परिचय इथे वाचता येईल
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
मार्मिक प्रतिसाद
अशोक काका,
तुम्ही मांडलेले मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. अतिशय मार्मिक प्रतिसाद. तुम्ही दिलेल्या मुद्द्यांवरुन थोडी भर.
मूळ अमेरिकन नागरिकांना बेटीच्या कथनामधील खटकलेला मोठा भाग म्हणजे तिला मेहमूदी कुटुंबियांकडून आलेले अनुभव [तिच्या भाषेतील] हे व्यक्तिगत स्वरूपाचे न मानता तिने 'इन टोटो' त्या देशाच्या संस्कृतीबद्दल रंगविले. म्हणजे 'मी म्हणते तसाच सारा इराण आहे' हा हट्ट...जो ना सर्वसामान्य अमेरिकन वाचकाला पटला, ना समीक्षकांना.
येथे एक बाब वाचकांच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. नॉट विदाऊट माय डॉटर या पुस्तकाचे सहलेखक विलियम होफर हे आहेत. ज्यांच्या मिडनाईट एक्स्प्रेस या पुस्तकावर चित्रपट निर्मिती झालेली आहे. त्यामुळे मूळ तपशीलाला भडक स्वरुप देण्यात या सहलेखकांचा सहभाग नक्कीच असणार आहे. अर्थात बेट्टी मेहमूदी वर झालेल्या अन्यायाचे मी समर्थन करीत नाहिये. पण प्रस्तुत पुस्तकात जसे अतिरंजित स्वरुप देण्यात आले आहे, ज्यावरुन इराणी लोकांविषयी वाचकांच्या मनात पराकोटीचा तिरस्कार निर्माण होऊ शकेल. हा हेतू अगोदरच साध्य झालेला आहे. अशा पार्श्वभूमीवर अमेरिकन सरकारची सध्याची इराण विरोधाची भूमिका लोकांच्या गळी उतरवण्यासाठी बरेचसे सोपे होते. राजकारण कुठे कुठे प्रवेश करेल व त्यासाठी कोणाच्या भावनांच्या आहुत्या दिल्या जातील याची कल्पना कोणीच करु शकत नाही.
यातील एक वाक्य, "You can't base a whole culture on one crazy family"....मला फार रोचक आणि प्रातिनिधिक वाटते. कारण राजस्थानातील खाप पंचायत निवाड्यातील एका 'ऑनर किलिंग' प्रश्नावरून सार्या भारताला "मागासलेले" म्हणण्यात हशील नाही.
या एकाच वाक्यात इराणविरोधी भूमिकेची विकेट घेण्यात आलेली आहे.
वरील या एका प्रतिसादात अर्ध्याने म्हटल्याप्रमाणे इराणी लोक अदबीने व व्यवस्थित वागतात. (वाचकहो त्याच्यावर विश्वास ठेवा, हा प्राणी अर्धे जग भटकून आलेला आहे. त्याचा अनुभव आपल्यापेक्षा नक्कीच वास्तव असणार आहे )
कसचं कसचं देवा.. जात असतो
कसचं कसचं देवा.. जात असतो टीचभर पोटासाठी इकडंतिकडं कुठंतरी..
<जाहिरात रिक्षा मोड > माझ्या इराणमधील वास्तव्यातील अनुभवांवर एक लेखमाला लिहिली होती मागे एकदा, आत्ता शोधून दुवा द्यायचा कंटाळा आला आहे <जाहिरात रिक्षा मोड >
तिथल्या बर्याच लोकांशी, राजकीय आणि वैयक्तिक स्वरूपाची चर्चा बरीच घडली होती, अगदी मोकळेपणाने, तिथे जाण्याआधी असं बरंच काहीबाही वाचून मतांधळा होऊन गेलो होतो, पण तिथल्या वास्तव्यात मात्र मत संपूर्ण बदललं
इराण हे आधुनीक जगाचे नंदनवन आहे असा दावा करण्याएवढा मी मूर्ख नाही, पण त्या पुस्तकात रंगवल्याप्रमाणे रौरवनरक नक्की नाही यावर ठाम आहे,
बाकी पुस्तक, त्याची प्रसीद्धी आणि त्यातील सर्वांच्या भूमीका व योग्यायोग्यता, यावर बरीच चर्चा झडलीच आहे त्यात आणि माझी भर कशाला. असो.
याचसाठी केला होता हा अट्टाहास
<जाहिरात रिक्षा मोड > माझ्या इराणमधील वास्तव्यातील अनुभवांवर एक लेखमाला लिहिली होती मागे एकदा, आत्ता शोधून दुवा द्यायचा कंटाळा आला आहे <जाहिरात रिक्षा मोड >
ही माहितीच मला नवी आहे आता तर तू शोधच त्या लेखमालेचा दुवा. किंवा इथे परत पोस्ट कर. म्हणजे माझा दुवा तुला मिळेल
इराण हे आधुनीक जगाचे नंदनवन आहे असा दावा करण्याएवढा मी मूर्ख नाही, पण त्या पुस्तकात रंगवल्याप्रमाणे रौरवनरक नक्की नाही यावर ठाम आहे,
याचसाठी वाचकांचे लक्ष तुझ्याकडे वेधत होतो. प्रत्यक्ष अनुभव आणि तार्कीक मते यातील फरक लगेच स्पष्ट होतो.
अदब आणि दाक्षिण्य
हे खरंच आहे, पण त्यामुळे नक्की काय सिद्ध होतं? भारतात पाहुण्यांशी अदबीनं आणि व्यवस्थित वागणारे लोक आपल्या बायकोशी किती वाईट वागू शकतात ते अनेकांनी पाहिलं असेल.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
विधान शंभरटक्के मान्य.. आणि
विधान शंभरटक्के मान्य..
आणि त्याच अनुषंगाने याच विधानाचा व्यत्यासही मान्य होण्यास हरकत नसावी
म्हणजे काय?
म्हणजेच इराणी स्त्रियांना आपल्या घरात कसं वागवलं जातं याविषयी त्या विधानातून काहीच सिध्द होत नाही. हेच मी म्हणत होतो.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
अर्धवटशी सहमत असण्याचे कारण
म्हणजेच इराणी स्त्रियांना आपल्या घरात कसं वागवलं जातं याविषयी त्या विधानातून काहीच सिध्द होत नाही. हेच मी म्हणत होतो.
येथे इराणी हा शब्द लागू होतो असे मला वाटत नाही. भारतातही स्त्रियांना दिल्या जाणार्या वागणूकीचे चित्र कसे आहे हे सांगायची गरज नाही. म्हणूनच अर्धवटने मांडलेल्या "आणि त्याच अनुषंगाने याच विधानाचा व्यत्यासही मान्य होण्यास हरकत नसावी" या मताशी सहमत होता येईल.
शेवटी स्त्रियांना कसे वागवायचे हे प्रत्येक व्यक्तीच्या आत काय दडलेले आहे ते व्यक्तीमत्त्व ठरवते संस्कृती नाही. स्वतःला हवे ते करण्यासाठी असे राक्षस संस्कृतीचा आधार मात्र नक्की घेतात.
+१
ह्याच निरिक्षणसंदर्भात अतिवासतैंनी इथेच एक " केंद्र परिघाचं नातं" अशा शीर्षकाचा एक सुरेख लेख लिहिलाय.
मुद्दा पटला.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
चर्चा चांगली.
वाचतो आहे.
फुरसतीत परतून भर टाकतो.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
व्यक्ती की समष्टी
विधान आणि त्याचा व्यत्यास : प्रत्येक पुरुषाचं वर्तन त्याच्या संस्कृतीच्या वारशाच्या भिंगातून पाहता येईलच असं नाही, पण ह्याचा अर्थ असाही होत नाही की संस्कृतीमुळे अजिबातच फरक पडत नाही. दोन्ही बाजूंचं सरसकटीकरण अयोग्य ठरेल. आणि तरीही असं म्हणता यावं : पुरुषप्रधान संस्कृतीतून येणारी स्त्रीवरची पारंपरिक बंधनं पाश्चात्य देशांत जितकी सैल झाली आहेत, तितकी ती भारतात किंवा इराणमध्ये झालेली नाहीत. हे लक्षात यावं म्हणून मी सिनेमांचे उल्लेख केले होते. लोकप्रिय खेळाचा सामना स्त्रीला पाहायला मिळणं ही गोष्ट आज काही विशेष (आपल्यालाही) वाटत नाही. त्यावर त्या समाजात असलेल्या बंधनावर एक चित्रपट पाहण्यात येतो तेव्हा ह्या आणि अशा बंधनांची जाणीव होते. चित्रपट अतिरंजित असू शकतो; पण हे बंधन अतिरंजित नाही, तर प्रत्यक्षात अस्तित्वात आहे. त्यामुळे बंधनांविषयीची ही जाणीव सापेक्ष नाही. कादंबरीबद्दलदेखील अशी शक्यता नाकारता येत नाही (मी कादंबरी वाचलेली नाही. त्यामुळे अधिक ठाम विधान करू शकत नाही.) त्यामुळे पाश्चात्य संस्कृतीत वाढलेल्या स्त्रीला आपल्या पोटची पोर अशा संस्कृतीत (पक्षी : बंधनांत) वाढू नये असं वाटणं काहीसं साहजिक ठरावं.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
सहमती
पण हे बंधन अतिरंजित नाही, तर प्रत्यक्षात अस्तित्वात आहे.
या मुद्द्यावर सहमती आहेच.
चिंजंच्या बहुतेक सर्व
चिंजंच्या बहुतेक सर्व मुद्द्यांशी सहमत आहेच.
व्यत्यास मांडताना अशा अर्थाने मांडला होता,
"जसे एखाद्या देशातील जनरल माणसे दिलदार, मनमिळावू असली म्हणून ती माणसे नवरा म्हणून बाय डीफॉल्ट चांगली असायचे कारण नाही"
हे विधान जसे मान्य आहे, तसेच
"नवरा म्हणून काही माणसे नालायक असली तरी त्यामूळे तो सगळा देश रानटी व रौरवनरक ठरत नाही"
इतकेच सांगायचे होते.
सदर पुस्तकामधे आणि त्या अनुषंगाने काही प्रतिसादांमधून अशा अर्थाचे जनरलइज्ड लिखाण दिसून आले म्हणून रहावले नाही इतकेच.
थोडक्यात काय.. चिंजंनी नोंदवलेला 'दोन्ही बाजूंचं सरसकटीकरण अयोग्य ठरेल." हाच मुद्दा मी वेगळ्या शब्दात मांडला इतकंच.
बाकी मुद्द्यांशी सहमत आहेच...
रोचक चर्चा. मनिषा, मेघना,
रोचक चर्चा.
मनिषा, मेघना, प्रसाद आणि चिँजं शी सहमत!
मी पुस्तक वाचले नाही आणि सिनेमाही पाहीला नाही.
पण थोडाफार तसाच शक्ती पाहिलाय. त्यात संजय कपूर(नवरा) टोळीयुद्धात मरतो. आणि नाना पाटेकर(सासरा) आपल्या वंशाच्या दिव्याला ठेउन घ्यायचा प्रयत्न करतो. शेवटी थोडीशी दुसरी बाजू अशी दाखवलीय की, नाना 'अगर मैँने उनको नही मारा तो वो मुझे मार डालेँगे, त्यामुळे मी आणि माझं घराणं या टोळीयुद्धात अडकलेलंच राहणार पण तू इसको लेके जा' म्हणतो आणि सून, नातू ला जाउ देतो. सून ही 'बेटा दादाजी को प्रणाम करो' म्हणते
मला खुदा के लिये मधला हिरोइन चा बाप पण आठवला. स्वतः अमेरीकन (की ब्रिटीश?) स्त्रियां शी २ लग्न+ घटस्फोट आणि तिसर लिव इन केलेला. पण मुलीचा बॉयफ्रेंड अमेरीकन(की ब्रिटीश?) आहे हे कळल्यावर, तिला पाकिस्तानातील आदिवासी भागात नेउन, धर्माँध चुलतभावाशी लग्न लाउन देतो. आणि इथले टॉइलेट ठीक नाहीत म्हणुन दुसर्या दिवशी परत अमेरीका(की ब्रिटन?) मधे जातो.
मारहाण
जो पुरुष आपल्या पत्नीला मारहाण करतो त्याचे समर्थन कसे होऊ शकते ? ज्या देशात 'हिजाब' पाळावा लागतो, स्त्री स्वातंत्र्यावर असंख्य बंधने आहेत, त्या देशात कायमचे राहायला जाताना, ते पत्नीला न सांगणे, हा अक्षम्य गुन्हा आहे. इथे इराण या देशाचा प्रश्न नाही. अशा तर्हेने पत्नीशी वागणार्या प्रत्येक पुरुषाचा, मग तो कुठल्याही देशाचा असो, धिक्कारच आहे.
काही प्रथांवरून एका समाजाची
काही प्रथांवरून एका समाजाची पूर्ण संस्कृतीच कशी रानटी आहे, असं सरसकटीकरण करणं चूक आहे हे मला मान्य आहे. त्याबद्दल काही म्हणणं नाही. किंबहुना अफगाणी स्त्रियांचा छळ या एकाच गोष्टीचा यूसपी करून पिळणार्या कादंबर्यांचा हल्ली मला मनस्वी वीट आला आहे (मग कुणाला मी कितीही निष्ठुरहृदयी वाटो.)
पण -
चर्चेत एकाएकी असे प्रतिसाद येत होते, की कशी बेटी मेहमूदीच कांगावखोर आहे, सासरच्या कुठल्याच गोष्टी न आवडणार्या बायकाच कशा फाजील असतात, इत्यादी. शब्द निराळे वा चेष्टेच्या सुरातले असतीलही. पण ते दुसर्या टोकाचे सरसकटीकरण वाटायला लागले होते, म्हणून विरोध नोंदवला, इतकेच.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
इतका प्रखर विरोध नाही, मेघना
मेघना....
मी तुमच्या [वरील] प्रतिसादाबद्दल इतकेच म्हणू शकतो की, खुद्द मी स्वतःच अगदी घाबरत होतो बेटीच्या पुस्तकाविरोधात काही लिहायचे म्हटल्यास....[इथे 'विरोध' म्हणजे सर्वार्थाने नव्हे, पण ज्यावेळी मी कथनाचे इंग्रजी रुप वाचले त्याच सुमारास मला वाटत राहिले की, हे फार एकांगी लिखाण होत चालले आहे....सोहोनीबाईंनी केलेला अनुवाद मी वाचलेला नाही, पण मूळ इंग्रजी संहितेचा मराठी 'अनुवाद' करताना तो अनुवादक स्वत:च्या बुद्धीने किती शब्दयोजना करतो वा 'मेहता' गृहाकडून आलेल्या 'मार्गदर्शनपर तत्वांचा' किती वापर करतो इकडेही दोन्ही व्हर्जन्स वाचणार्यांनी अधूनमधून लक्ष देणे नीतांत गरजेचे आहे, असे माझे मत बनत गेले आहे....असो, तो एक वेगळा विषय आहे, सोदाहरण कधीतरी घेता येईल इथल्या पटलावर], त्याला कारण म्हणजे त्या पुस्तकातील कथनाची एकूणच मराठी मनाला पडलेली भुरळ होय....मी स्नेहांकिता यानी काहीसे वेगळे लिहिल्याचे पाहिले त्या 'सध्या काय वाचताय ?' धाग्यावर आणि खरंच सांगतो, मला काहीसा आनंद झाला की किमान एक तरी वाचक [त्यातही स्त्री] आपल्या मताशी पूरक लिखाण करीत आहे. मग तो पुढील प्रपंच घडला.
तुम्ही नोंदविलेले "चर्चेत एकाएकी असे प्रतिसाद येत होते, की कशी बेटी मेहमूदीच कांगावखोर आहे, सासरच्या कुठल्याच गोष्टी न आवडणार्या बायकाच कशा फाजील असतात, इत्यादी. शब्द निराळे वा चेष्टेच्या सुरातले असतीलही....." काहीसे प्रखर असल्याचे मला जाणवते, कारण मला नाही दिसले असे कुणी सरळसोट बेटीवर कांगावखोरीचे आरोप केले आहेत. फक्त इतके झाले की या धाग्याच्या निमित्ताने बर्याच सदस्यांनी हे कबूल केले आहे की अशा 'सत्यकथना'तील दुसरी बाजूही समोर आल्यास कुणा एकावर अन्याय होऊ नये यासाठी दुसर्याच्या कथनावर त्याची/तिची बाजू सरसकट घेतली जाणार नाही. सत्य घटनांवर लिहिल्या जाणार्या पुस्तकांच्याबाबतीत हे भान वाचकाने ठेवणे फार गरजेचे आहे......'फिक्शन' बाबत कमालीचे स्वातंत्र्य घेतले गेल्यास त्याविरूद्ध कुणी तक्रार करीत नाही.
अवांतर होईल काहीसे, पण तरीही मिडिया असल्या घटनांचा 'मतलबी' फायदा कसा उठवितात, त्याचे एक उदाहरण....[हे उदाहरण 'ऐसी अक्षरे' च्या नियमात बसत नसेल, तर काढून टाकण्यास हरकत नाही]
~ हिंदी चित्रपटसृष्टीतील काही काळ आघाडीवर असलेली 'रीना रॉय' नामक अभिनेत्री आठवत असेल तुम्हाला. बडा गाजावाजा करून पाकिस्तानचा क्रिकेटपटू मोहसिन खान हिच्याशी तिने विवाह केला [ती मुस्लिमच असल्याने हिंदू-मुसलमान विवाह असा काही प्रकार नव्हता]. एक मुलगी झाली....आणि मग मुंबई बॉलीवूड धमाक्यात स्वैर दिवस काढलेल्या रीनाबाईला अचानक मोहसिनने आपल्याला रावळपिंडीच्या घरी जणू कैदेतच ठेवल्याचा साक्षात्कार झाला. लग्नाला साताठ वर्षे झाली असतील नसतील तर लागलीच तिला 'स्वतंत्रतेची' उबळ आली...पुढील सहा महिने 'बेटी' धर्तीच्या घटना मोहसिनच्या घरी घडल्या...हे नंतर रीनानेच टीव्हीवरील मुलाखतीत, स्टार अॅण्ड स्टाईल मॅगेझिनमध्ये, अगदी चेहर्यावर सार्या दुनियेचे दु:ख गोळा करून, उसासे सोडत सांगितले. पुढे पाकिस्तानी कायद्यानुसार खान जोडप्याला घटस्फोट मिळाला; पण मुस्लिम लॉ अंतर्गत अपत्याचा ताबा बापाकडेच जातो....जो बेटीच्याबाबतीत होईल असे तिच्या अमेरिकन एम्बसीच्या अधिकार्यांने स्पष्ट सांगितले होते....तसा मुलीचा ताबा मोहसिनकडे गेला व रीनाबाई भारतात परतल्या....मिडियाला काय असे आयते चविष्ट घबाड हवेच असते. तिने डोळ्यात पाणी आणून सांगितल्या गोष्टीवर '....अग्गाई, असं असं होतं पाकिस्तानमध्ये स्त्रीयांचं ? कमालच झाली बाई, त्या पुरुषप्रधान संस्कृतीचे...' असे टिपिकल मतप्रदर्शन झालेही. दिल्लीच्या 'रोली' प्रकाशनने रीना रॉयला 'रावळपिंडी' अनुभवावर पुस्तक लिहिण्याची ऑफर [अर्थातच घसघशीतच असणार] दिली....रीनाबाई ठिय्या मारून बसल्या असत्याच, पण तिकडे दुसरीकडे मोहसीन खान दुसर्या विवाहाच्या तयारीत असल्याची वार्ता आल्यावर हिच्या वकिलांनी तसे झाल्यास मुलीचा ताबा मूळ आईकडे येतो, असे सांगून त्या दरम्यान काही 'प्रक्षोभक' लिहू नये अशी योग्य ती सूचना दिल्याने तो प्रोजेक्ट बासनात गेला....अन्यथा आपल्याला खास भारतीय बेटी व्हर्जन वाचायला जरूर मिळाले असते. लोक तरी काय, मिळते काही तरी चमचमीत वाचायला....लोकलच्या प्रवासात, म्हणून स्वागत करीत असतात असल्या फुगलेल्या बेडूक कहाण्यांचे.
बाकी ठीक. पण अवांतराबद्दलः
बाकी ठीक. पण अवांतराबद्दलः रीना रॉयला आपल्यावर अन्याय होतो आहे, असा (थोडा उशिरा) साक्षात्कार झाला नि त्याबद्दल तिने बोंबाबोंब केली तर ती फुगलेली बेडूक कहाणी का होते ते कळलं नाही. ती नटी आहे म्हणून, भारतीय बाई आहे म्हणून की मिडियाने तिची गोष्ट वापरून घेतली म्हणून?
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
बेडूक कहाणी
थॅन्क्स मेघना....
'फुगलेली बेडूक कहाणी' होते यामुळे की अत्यंत व्यवहारी अशा बॉलीवूडमध्ये आपल्या करीअरला आकार दिलेल्या अभिनेत्रीला शेजारील राष्ट्रातील कौटुंबिक चालीरिती बिलकुल माहीत नसतील यावर एखादा अडाणीही विश्वास ठेऊ शकणार नाही. सारे प्रोज अॅण्ड कॉन्स विचारात घेऊनच तिने [वा अन्य कुणी तसा विवाह केला असल्यास] मोहसिनच्या घरी पाऊल टाकले असणार हे तरी मान्य करू या. मग पुढे पाक पुरुषप्रधान कुटुंबव्यवस्थेत तिच्या व्यक्तीस्वातंत्र्याची घुसमट होत राहीली यावर आपल्या मिडियातील कॉलमबहाद्दरांनी कलमे कशासाठी झिजवायची ? हा खरा तर प्रश्न असतो. त्यावर उत्तर मिळत नाही, पण संधी मिळते...केव्हा ? तर रीना परत सहार विमानतळावर एकटीच बॅग घेऊन उतरते त्यावेळी.....त्यावेळी तिच्याकडे काही सांगण्यासारखे असेल...अन् ते जर एका ग्लुकोजच्या चमच्याएवढे असेल तर तेवढ्याने 'पाक परिस्थिती' वर मोठे आर्टिकल कसे होईल ? मग तिच्या सो-कॉल्ड दर्दभर्या कहाणीच्या बेडकाला आपल्यातील कॉलमताकदीने फुगवायचे ही सिनेमॅगेझिन्स परंपरेची थोरवी आहेच.
हाच तो हेतू.
पुस्तक वाचलंय. पण बेटीच्या
पुस्तक वाचलंय. पण बेटीच्या नवर्याला तिने तिच्या इच्छेने इराणमधे रहावं असं वाटत होतं तर तिचा पासपोर्ट का तिच्या हातात दिला नाही? तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यासाठी असलेल्या परदेशात डांबुन पडायची वेळ का आणली?
दुसरी बाजु म्हणाल तर बिन लादेनला पण दुसरी बाजु आहेच की! लेख अज्जिबात पटला नाही.
"संसारासाठी" बायकोनेच सगळं काही सोडलं पाहीजे हीच ती पुरुषप्रधान मानसिकता ! (संदर्भ - गारगोटीत राहीलेली परदेशी महीला)
http://shilpasview.blogspot.com
मी पुस्तक वाचलेलं नाही, पण
मी पुस्तक वाचलेलं नाही, पण चित्रपट पाह्यलाय. जेवढं आठवतं त्याप्रमाणे बेटीला अमेरिकेत परत येण्यासाठी ना नव्हती. ना होती ती मुलीला बरोबर नेण्यासाठी. बेटीला मुलीला घेऊनच अमेरिकेत परतायचं होतं... तेही कायमचं!
-अनामिक
थोडक्यात आईला लेकीपासुन
थोडक्यात आईला लेकीपासुन कायमचं तोडायचं ! तिला फसवुन परदेशात आणुन तिचे संपर्काची साधने तोडुन बळजबरीने एकतर नवर्याबरोबर रहा किंवा लेकीला सोडुन जा असं सांगायचं ! आणि पुन्हा लोकांना यात "दुसरी बाजु" जी "योग्य" वाटते ती पण दिसते.
http://shilpasview.blogspot.com
पुरुषप्रधान मानसिकता
जे पटले नाही ते थेट सांगण्याची आपली शैली मला आवडली, शिल्पा. आणि त्यात गैर काहीच नाही...जे आवडले ते जसे सदस्य सांगतात, त्याचप्रमाणे जे आवडले नाही ते दाराच्या आडून न सांगता सरळ सांगितले तर ते भावतेच. असो.
मी वर वेळोवेळी स्पष्ट केले आहे की डॉ.सईद महमूदी यांचीही बाजू या प्रकरणासाठी विचारात घ्यावी लागेल....म्हणजे एकांगी मत तयार होत नाही. बेटी महमूदीच्या कहाणीचे अन्यत्र कसे मिश्र स्वागत झाले आणि भारतातच तिच्याच बाजूने सर्व मत कसे होत गेले हा माझ्यासाठी कुतूहलाचा विषय झाला होता. त्याच्या मागोव्यातच या मूळच्या प्रतिसादाची गंगोत्री आहे....[तुम्ही ज्याला 'लेख' असे नाम दिले आहे, ते मुळात स्नेहांकिता या सदस्येच्या प्रतिसादाला दिलेले उत्तर आहे. ऐसी...च्या संपादक मंडळाने त्या उत्तराला स्वतंत्र धाग्याचे रूप दिले आहे, त्याच्या कारणमीमांसेसह.]
"पुरुषप्रधान मानसिकते'चा आणखीन् एक मुद्दा तुम्ही वर प्रतिसादात घेतला आहे. त्याबद्दल स्वतंत्र लेख होऊ शकतो...इथे त्यावर इतकेच म्हणतो की माझ्या परिचिताच्या सूनबाईनी {कॅनेडिअन युवती} भारतात पाऊल टाकण्यापूर्वी इथल्या रितीरिवाजाचे मोठ्या आपुलकीने आणि मनापासून वाचन-मनन केले होते. आमच्या मनोहरने तिच्या लग्नाच्या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी तब्बल तीन महिन्याचा अवधी दिला होता; कारण तो मॉन्ट्रियल इथे कायम राहू शकत नव्हता ही बाब तिलाही माहीत होतीच. तिचा निर्धार पक्का होता. इकडे तिच्यावर कोणत्याही प्रकारे घाटगे कुटुंबाने 'भारतीय परंपरे'ची बंधने घातलेली नव्हती....तसे करू नये म्हणून आम्ही तीन मित्रांनी त्याना वेळीच सक्त ताकीद दिली होती. इथल्या मातीतील हवेतच राहणे हा त्या मुलीने घेतलेला निर्णय....अगदी टॉयलेटचादेखील....त्याला कुणी मोडता घातला नाही, हे मी मान्य करतो. असे जर तिच्याच मर्जीने चालत होते, तर मग इथे पुरुषप्रधान मानसिकता कुठून येणार, शिल्पा ?
तुम्हाला मुद्दा समजलेलाच नाही
तुम्हाला मुद्दा समजलेलाच नाही असं दिसतंय.
कोणी स्वत:च्या मर्जीने असा काही निर्णय घेत असेल तर काहीच हरकत नाही / नसावी.
पण जर कोणी दुसर्यावर जबरदस्ती करत असेल तर त्याचा विरोध केलाच पाहीजे.
बाकी : बेटीला इराणमधे काहीच चांगलं कसं दिसलं नाही, नुसता अमेरीकेला जायचा ध्यास होता असं म्हणणार्या लोकांची कीव करावी तेवढी थोडीच.
अपहरण केलेल्या व्यक्तीला भले ती जागा नंदनवन का असेना नाहीच आवडणार अन ती व्यक्ती "घरी" जायचाच ध्यास घेणार हे योग्यच आहे.
http://shilpasview.blogspot.com
>>अपहरण केलेल्या व्यक्तीला
>>अपहरण केलेल्या व्यक्तीला भले ती जागा नंदनवन का असेना नाहीच आवडणार
अगदी बरोबर, आवडूही नयेच,
पण पुस्तक, मूळ लेख, आणि बाकीची माध्यमांनी, अपहरणावर काही उद्बोधक चर्चा वा ठाम निषेध करण्यापेक्षा थेट त्या देशावर जनरलाईज्ड टीका करण्यात जास्त रस दाखवल्याची शंका आल्याने पुढचे मुद्दे लिहावेसे वाटले.
>>अन ती व्यक्ती "घरी" जायचाच ध्यास घेणार हे योग्यच आहे.
अगदी योग्यच, मीही तेच केले असतं,
कदाचीत अजून काही जहाल पावलेही उचलली असती,
फक्त आतापर्यंतच्या माझ्या कंडीशनींग व विचाराच्या पॅटर्न पाहता - आय वूड हॅव लेफ्ट बोथ कंट्रीज आऊट ऑफ अवर पर्सनल रेज अॅण्ड बॅटल.
वेगळे वळण ?
मला वाटतं या चर्चेला निष्कारण वेगळे वळण लागत आहे. बेटी महमुदी यांनी केवळ ‘इराणी पुरुषी वर्चस्व’ याविरुद्ध लिहिलेले नसून एकूणच इराणमध्ये वास्तव्याच्याच विरोधात लिहिलेले दिसते. डॉ. महमुदीसोबत अमेरिकेत रहात असताना बेटी याना त्यांच्या कोणत्याही वागण्याबद्दल कसला आक्षेप असल्याचे लिखाणावरून दिसत नाही. मात्र इराणमध्ये गेल्या गेल्या लगेच मतभेदाला सुरुवात होते. Crazy family चे वर्णन सुसंगत व तार्किक वाटत नाही. तसेच इराणमधील वास्तव्याच्या अखेरीस डॉ. महमुदी यांचे वागणे पूर्ववत (अमेरीकेतल्यासारखे) झाल्याचे बेटी लिहितात. मग पुन्हा ते मारहाण करतात यात विसंगती वाटते. अन तरीही त्यांचे सहकार्य मिळवण्याचा प्रयत्नसुद्धा बेटी करत नाहीत.
सर्व पुस्तकभर अमेरिकेत परत जाणे हे एकच उद्दिष्ट व्यापून राहिलेले दिसते.
लेखनावरून दिसलेल्या विसंगती मी मांडल्या आहेत. यात व्यक्तिगत मताचा संबंध नाही.
<<<. अन तरीही त्यांचे सहकार्य
<<<. अन तरीही त्यांचे सहकार्य मिळवण्याचा प्रयत्नसुद्धा बेटी करत नाहीत.
पुस्तक पुन्हा वाचा.
http://shilpasview.blogspot.com
ह्या प्रतिसादामुळे कोणाचा
ह्या प्रतिसादामुळे कोणाचा गैरसमज झाला असेल तर ती फक्त एक कोपरखळी होती आणि बेटी मेहमुदी किंवा इतर कोणाही व्यक्तिकडे रोखून केलेली नव्हती हे स्पष्ट करू इच्छितो. त्यातल्या सत्याच्या अंशामुळेच ती विनोदी वाटते हे लक्षात येईलच.
मुळात बेटी महमुदी यांनी कांगावा केला आणि तिच्या नवर्याचं बरोबर आहे किंवा इराणमध्ये सगळं आलबेल आहे असं इथे कोणालाच म्हणायचं नसेल असे वाटते.
मुद्दा एवढाच आहे की एका घरात घडलेल्या गोष्टी अशा पद्धतीने रंगवल्या आहेत की त्या देशात पाऊल ठेवायलाही कोणालाही भीती किंवा घृणा वाटेल.
पुस्तक वाचताना सुरुवातीला लेखिकेबद्दल सहानुभूति आणि इतर लोकांबद्दल घृणा निर्माण झाली तरी हळूहळू त्याचा अतिरेक होतोय हे लक्षात येते आणि शेवटी लेखिकेच्या सुटकेचे फारसे समाधान वाटत नाही असा मला पुस्तक वाचताना अनुभव आला.
स्लमडॉग मिलियनेअर पाहून कोणत्याही सुजाण भारतीयाला जे वाटेल तेच हे पुस्तक वाचून कोणत्याही इराण्याला वाटेल असे वाटते.
असो.
बाकी कोणावरही काहीही शिक्का मारायला सगळेच स्वतंत्र असतातच. इराणी लोक रानटी आहेत, भारतीय घाणेरडे आहेत आणि अमेरिकन सुसंस्कृत,स्वच्छ आणि स्वतंत्र आहेत असे कोणाला म्हणायचे असेल तर म्हणोत बापडे.
@अशोक पाटीलआपण दोन बाबींमधे
@अशोक पाटील
*आपण दोन बाबींमधे गल्लत करतो आहोत, असं मला वाटतं.
एखाद्या माणसावर लहान / मोठा / अपेक्षित / अनपेक्षित / सुसह्य / असह्य (हे सगळे सापेक्ष) अन्याय होणे - त्याने त्याविरोधात आवाज उठवणे - अन्यायग्रस्त असल्यामुळे बरेचदा त्याचा सूर काहीसा कंठाळी-एकांगी असणे.
आणि
याचा वापर करून घेऊन तिसर्याच व्यक्तीने अन्याय करणार्या व्यक्तीची (/संस्थेची / देशाची / समाजाची) रितसर बदनामी करणे.
तुमच्या रीना रॉयच्या उदाहरणातूनही हेच जाणवलं. मिडिया कसा अन्यायनिवारक-दुर्जनसंहारक-सज्जनतारक आहे असं कुणाचंच म्हणणं नसावं (शक्यतादर्शक). फक्त त्यामुळे रीना रॉयवर अन्याय झालाच नाही असं म्हणू नये (होय, तिला सगळं आधी ठाऊक होतं, असं गृहित धरू. पण आपल्यावर अन्याय होणारेय हे आधी ठाऊक असलं तरी तो प्रत्यक्ष भोगल्यावर त्यातून बाहेर पडावंसं वाटूच नये, असं म्हणणं अमानुष होईल.) तिच्यावरच्या अन्यायाचं 'वेटेज' (मराठी शब्द?) कमी असेल, पण त्याला मिळालेली अवास्तव प्रसिद्धी ही तिची चूक कुठल्याही परिस्थितीत असू शकत नाही.
बेटी महमूदीच्या उदाहरणात तर तिला आपल्यावर अन्याय होणार आहे याची कल्पनाही नसणार (मी पुस्तक साधारण दहा वर्षांपूर्वी वाचलं आहे, चूकभूल देणेघेणे). म्हणून इराण सरसकट वाईट ठरत नाही हे खरं, पण अन्यायग्रस्त माणसाला सारासार विचार करून सर्वांना न्याय देणारं असं काही म्हणणं कठीण-दुर्मीळ असतं हेही खरंच. शिवाय अमेरिकन प्रचाराला कितपत गंभीरपणे घ्यावं, हेही तारतम्यानंच ठरवायचं.
@ननि
छे छे! ती प्रतिक्रिया विनोदातून आहे हे मला कळत होतं, पण आधी बेटीकडे झुकणारी सहानुभूतीची लाट एकदम डॉ. मेहमूदींकडे झुकत चालल्यासारखं (दोन्ही चूकच, हे मान्य आहे) त्या प्रतिक्रियेपासून जाणवलं, म्हणून तिचं निमित्त झालं, इतकंच.
बाकी, आता (माझ्याकडून) पुरे.
*पुरवणी: गोष्टी इतक्या वॉटरटाईट कंपार्टमेंट्समधे नसतात, आणि सगळ्याचा सगळ्याशी अंतिमत: संबंध असतोच, त्यामुळे या दोन गोष्टी एकमेकींत गुंतणार हे मला मान्य आहे. पण पत्रकार वा समीक्षकानं जितपत होता होईतो त्रयस्थपणे वर्तमानाकडे पाहावं अशी अपेक्षा असते, तितपत त्रयस्थपणा वापरून आपण गुंतागुंत 'होता होईतो' टाळावी, असं मत आहे, म्हणून गल्लत टाळायचा प्रयत्न.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
कविता...
प्रत्येकाला समजलेली , जाणवलेली कविता वेगळी असते असे म्हणतात. म्हणजे जी कविता मला आवडली तीच कविता अ पा काकांनाही किम्वा जून कोणाला आवडली असेल तरी कारणे वेगळी असू शकतात. जो तो आपापले भावविश्व, अनुभव, कल्पना, संकल्पना कवितेशी जोडून पहात असतो, म्हणून असं होतं म्हणे.
अमूर्त चित्रे,संगीत ह्यातही बरेच "वैयक्तिक जाणिवे"च्या पातळीवर बरेच असते.(चित्रगुप्त, चि.जं आणि सर्व्च वाचकांनी अवश्यक असल्यास दुरुस्ती करावी. )
.
एकंदर चर्चेचा सूर पाहता कमी अधिक फरकाने सर्वांचच बरोबर वाटतय. कारण ज्याची त्याची घडण वेगळी. ज्यानी त्यानी भोगलेलं आयुष्य, आयुष्याकडं पहायचा दृइष्टीकोन, कधी शासक म्हणून काढलेला काळ आणि कधी शासित म्हणून काढलेला काळ ह्यापैकी जो जास्त, त्याबाजूला त्याचे मत कललेले असणार.
चूक्-बरोबर असे काहीच नाही.
.
थोडक्यात, गद्य पुस्तकांचे आकलनही ज्याचे त्याचे स्वतंत्र असू शकते असेच वाटते.
.
Unix is simple but it needs a genius to understand its simplicity!
--Dennis Ritchie
टिपः- मी पुस्तकवेडा नाही, वाचन इथल्या दिग्गजांच्या मानाने नगण्य आहे. निदान हे पुस्तक तरी वाचलेले नाही. त्यामुळे गपगुमान चर्चेच्या वाचकाच्या भूमिकेत होतो. पण वाचलं नसलं पुस्तक आणि नसला बघितला पिक्चर, तरी मताची प्पिंक टाकायची उबळ दाबता आली नाही.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
झकास चर्चा ... पुस्तक फार
झकास चर्चा ...
पुस्तक फार पूर्वी वाचलंय पण इराणविषयी वाईट इमेज सोडून जातं पुस्तक नक्कीच, हे आठवतंय...
दुसरी बाजू फारशी बळकट नसली तरी बाजू आहे हे नक्की...
कुतूहल
प्रस्तुत पुस्तक मी वाचलेले नाही, वाचण्यात रसही नाही. परंतु येथे चाललेल्या चर्चेने एक कुतूहल चाळवले.
डॉ. मेहमूदींनी या विषयी (आपली बाजू मांडणारे, किंवा अन्यथाही) काही पुस्तक लिहिलेले आहे काय? त्यांना तशी गरज वाटली असावी/नसावी/किंवा कसे?
अर्थात, डॉ. मेहमूदींनी असे काही पुस्तक लिहिले असल्यास तेही वाचण्यात मला स्वारस्य नाही, हेही तितकेच खरे. परंतु असे कुतूहल चाळवले, हेही खरे.
अतिअवांतर - १: 'नवराबायकोंच्या भांडणात पब्लिशरचा लाभ' अशी काही नवी म्हण या संदर्भात रूढ करता यावी काय?
अतिअवांतर - २: बाकी पब्लिकला काय, काहीतरी मसालेदार चघळायला हवेच असते, झाले. (नवराबायकोच्या भांडणाइतके - प्रेझेंट पार्टीज़ एक्सेप्टेडचा न्याय सर्वत्र लागू आहे - मसालेदार जगात दुसरे काय असावे बरे? त्यात पुन्हा कष्टडी, अपहरण (?), आणि त्यातही इराण - यानी कि सोने पे सुहागा.)
असो.
ता.क.:
मूळ लेखातील हा भाग आत्ताच वाचला. "डॉक्युमेंट्र्या - त्याही फिनलंड फिल्म इन्स्टिट्यूटच्या - तशाही कोण पाहतो?" या प्रश्नास जरी बगल द्यायचे ठरवले, तरीही "कशासाठी???" हा मूलभूत प्रश्न भेडसावल्याशिवाय राहत नाही. म्हणजे, अमेरिकन जनतेला - किंवा फॉर द्याट म्याटर कोणत्याही जनतेला - या अत्यंत खाजगी बाबीतील दुसरी बाजू समजावण्याची गरज काय? नि अमेरिकन जनतेला (युअर्स ट्रूली इन्क्लूडेड) काय वाटते याने नेमका काय फरक पडतो?
किंचित अवांतर
१. एका व्यक्तीच्या अनुभवावरून देशाबद्दल सरसकट मतं बनवावीत का? (अनेक लोक बनवतात हे मान्य आहे.)
२. मला भारतात भेटलेल्या इराणी मुलींनी स्त्री-स्वातंत्र्याचा विषय निघाल्यावर "भारतातल्या मुलींना काय वाट्टेल ते कपडे घालून बाहेर पडता येतं; आमच्याकडे हे स्वातंत्र्य नाही" अशी सरळसरळ तक्रार करून माझ्या भारतीय समाजाबद्दल असणार्या संबंधित तक्रारींना कचर्याची टोपली दाखवली होती.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
(अवांतर)
हे तितकेसे खरे नाही. म्हणजे, 'मराठी तालिबान'ची आवृत्तीही याचि देही याचि डोळां पाहिलेली आहे.
अनेकदा ती (बोले तो, 'मराठी तालिबान'ची आवृत्ती) मुलीचा बाप अथवा भाऊ या स्वरूपात दिसून येते, असे निरीक्षण आहे.
अर्थात, परिस्थिती सार्वत्रिक असेलच असे नाही, आणि हे सर्व सापेक्ष असते, हे आगाऊ मान्य आहे.
ष्टॅण्डर्ड
वाट्टेल ते कपडे हे तिने तिकडच्या ष्टॅण्डर्डप्रमाणे म्हटले असावे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
खरे आहे, पण...
ही शक्यता आहेच, आणि म्हणूनच "हे सर्व सापेक्ष असते" हे आगाऊ मान्य केले होते.
पण याशिवाय "पलीकडचे गवत हे नेहमीच हिरवे असते"-घटकही येथे कामी येत असावा किंवा कसे, ते कळत नाही.
या तालिबान्यांचं अस्तित्त्व
या तालिबान्यांचं अस्तित्त्व मलाही माहित आहे, अगदी घरातल्या नाही तरी आजूबाजूच्या. आणि ते पण फर्स्ट हँड. (माझा हाच मुद्दा होता.) पण या तालिबान्यांना भारतात कायदेशीर पाठबळ नाही. (यावर माझी बोलती बंद झाली.)
मनोबा, लज्जारक्षणास्तव पुरेसे कपडे घालून घराबाहेर पडल्यास भारतात कायदा त्रास देत नाही. "शर्ट आणि शूज असलेच पाहिजेत" अशी पाटी माझ्या पहाण्यात भारतात नाही. लग्नात (त्या दिवशी प्रचंड उकडत होतं म्हणून) घरात घालायचा टीशर्ट (आणि जीन्स) घालणारा सख्खा मेव्हणा पाहून नवरदेवाने "आपली तर बुवा फार जळजळ झाली" अशी कबुली बहिणीसमोर दिली होती. या टीशर्टधार्याची इमेजही विक्षिप्त अशीच असल्यामुळे त्याला त्याबद्दल कोणी एका शब्दानेही विचारलं नाही. विचित्र नजरांबद्दल भारतात रहाणार्या, राहिलेल्या मुली, स्त्रियांकडे पुरूषांनी तक्रार करून फार सहानुभूतीची अपेक्षा ठेवू नये; विचित्र नजरा त्या अनेक वर्ष सहन करतात.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
माझ्या मैत्रिणींचा निर्देश
माझ्या मैत्रिणींचा निर्देश अशा गोष्टींकडे होता:
स्रोतः http://www.npr.org/blogs/thetwo-way/2012/09/20/161463174/cover-your-eyes...
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
छे छे...
"भारतातल्या मुलींना काय वाट्टेल ते कपडे घालून बाहेर पडता येतं; आमच्याकडे हे स्वातंत्र्य नाही"
ह्याबद्दल समोरुन येत असलेला नेहमीचा प्रतिवादः-
अशी बंधनं फक्त मुलींवरच आहेत असं नाही. मुलांनाही बाहेर जाता येत नाहिच की.बलदंड बाहूंचे प्रदर्शन करणारे बिन्बाह्ह्याचे टी शर्ट घालतो म्हटलं तर लोक विचित्र पाहतात.
मुलींनी स्कर्ट घातलेली आवडत नसेल तर मुलं तरी कुठं बर्म्युडा स्टाइल चड्डीवर(किम्वा त्याहून लहान कपड्यात) एखाद्या स्मारंभात वगैरे, किंवा नाटक सिनेमाला जाउ शकतात?
मर्यादा त्यांनाही आहेच की.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
अवांतर : एकदम लहान कपड्यात
अवांतर : एकदम लहान कपड्यात नाटकाला आणि समारंभाला जायचा हट्ट धरणारे मनोबा दिसले आणि ड्वॉले पानावले...
आठवणी आणि डॉक्युमेन्टरी
वर श्री.'न'वी बाजू यानी डॉ.मेहमूदी यानी या संदर्भात काही पुस्तक वगैरे लिहिले आहे का ? तसेच त्या फिनिश डॉक्युमेन्टरी संदर्भातही केलेली पृच्छा काहीशा उशीराने मी पाहिली. त्या संदर्भातील माझ्याकडे जी माहिती आहे, ती थोडक्यात खालीलप्रमाणे 'न'वी बाजू तसेच या विषयात स्वारस्य असू शकणार्या अन्य सदस्यांसाठीही देत आहे.
१९९० मध्ये सॅली फिल्ड अभिनीत 'नॉट विदाऊट माय डॉटर...' हा अमेरिकन चित्रपट सर्वत्र प्रकाशित झाला. मूळ पुस्तक आणि हा चित्रपट यामुळे 'इराण' देश आणि तेथील नागरिक यांच्याविषयी खूप गैरसमज प्रसृत होत आहेत [त्यातही इराणीयन संस्कृतीचे विद्रुपीकरण आणि इराणीयन नवरा म्हणजे हा कसा स्टीरिओटाईप 'वाईफ-बीटर' दाखविला गेला आहे] हे पाहिल्यावर त्याला उत्तर म्हणून वस्तुस्थितीजन्य त्या देशाचे दर्शन घडविणे क्रमप्राप्त आहे असे युरोपमध्ये वास्तव्यास असलेल्या मूळच्या इराणीयन नागरिकांच्या एका गटाने डॉ.सईद मेहमूदी यांच्या साहाय्याने 'विदाऊट माय डॉटर' ही ९० मिनिटांची डॉक्युमेन्टरी तयार केली. या गटाचे प्रमुख होते अलेक्सिस कुरोज; जे फिनलंडचे नागरिक बनले होते. डॉक्युमेन्टरी तयार करण्याचा प्रमुख उद्देश्य अर्थातच सॅली फिल्डच्या चित्रपटातील अमेरिकन प्रोपोगंडा किती खोटारडा आहे तसेच त्या प्रकरणाची दुसरी बाजूही जगाला समजणे गरजेचे आहे, हे त्यानी डॉक्युमेन्टरी प्रदर्शनादरम्यान भरलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते [सदरच्या डॉक्युमेन्टरीजचा खर्च युरोपमध्ये वास्तव्यास असलेल्या मूळच्या इराणीयन नागरिकांनी केला असून इराण सरकारकडून त्याना कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नव्हती]. कुरोज यांच्या म्हणण्यानुसार डॉ.सईद मेहमूदी एक भूलतज्ज्ञ म्हणून जितके अमेरिकन सोसायटीमध्ये प्रसिद्ध होते, तितकीच मान्यता आणि आदर त्याना तेहरान हॉस्पिटलमध्येही मिळत होता. डॉक्युमेन्टरीमध्ये पतीपत्नीना ओळखणार्या अमेरिकन आणि इराणीयन्स यांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. त्यापैकी कुणीही डॉ.सईद मेहमूदीवर ते 'वाईफ-बीटर' असल्याच्या शक्यतेवर होकारार्थी मत व्यक्त केलेले दिसत नाही. खुद्द डॉक्टरांनी या डॉक्युमेन्टरीशिवायही एकूणच त्यांचे अमेरिकन जीवन तसेच तेहरानमधील बेटी, मेहताब यांचा सहवास तसेच फारकत यावर 'आठवणी' लिहिण्याचा संकल्प जाहीर केला होता जो इंग्लिश व फारसी मध्ये प्रकाशित होईल असे म्हटले गेले होते. त्याचे पुढे काय झाले याचा विदा उपलब्ध नाही, कारण आता खुद्द डॉ.मेहमूदीच हयात नाहीत.
डॉ.सईद मेहमूदी आपल्या कन्येच्या {मेहताब} फोटो आणि त्या डॉक्युमेन्टरी पोस्टरसोबत
आपल्या डॉक्युमेन्टरीला आणखीन् अधिकृतता प्राप्त व्हावी यासाठी कुरोज यानी बेटी मेहमूदी तसेच या जोडप्याची कन्या 'मेहताब मेहमूदी' [जी त्यावेळी २३ वर्षाची झाली होती] यांच्याशी हरेक प्रकारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तथापि बेटीने त्याना काहीच प्रतिसाद दिला नाही, इतकेच नव्हे तर मेहताबलादेखील टीमच्या कोणत्याही सदस्याशी बोलण्यास मनाई केली होती.
[अवांतर : 'विदाऊट माय डॉटर....' या डॉक्युमेन्टरीपूर्वी डॉ.कुरोज यानी 'वेटिंग फॉर गोदो इन द गॉल.....' नावाची डॉक्युमेन्टरी तयार केली होती जी एका अशा इराणीयन इसमाच्या सत्यकथेवर आधारित होती की ज्याला काही आंतरराष्ट्रीय तांत्रिक अडचणीमुळे पॅरिसच्या विमानतळावरील गोडाऊनमध्येच चक्क १८ वर्षे राहाणे भाग पडले होते. त्याच्या [करीमी नासेरी] कहाणीवरील ही डॉक्युमेन्टरी इतकी गाजली की त्यावर स्टीव्हन स्पीएलबर्गने टॉम हॅन्क्सला त्या भूमिकेसाठी निवडून 'द टर्मिनल' नावाचा चित्रपट तयार केला होता.]
अवांतराबद्दल धन्यवाद. "वेटींग
अवांतराबद्दल धन्यवाद. "वेटींग .." ची माहीती नव्हती.
डॉक्युमेंटरीमधे तुम्ही म्हणताय तसं मेहमुदी वाईफ बीटर नसल्याचं दाखवलंय. आता ज्यांच्या मुलाखती घेतल्या ते अमेरीकेतले लोकं असतील. परदेशात तिथल्याच मुलीशी लग्न करुन वगैरे तिच्यावर हात उगारण्याइतके मेहमुदी वेडे नसावेत...दुसरं म्हणजे संस्कृती. अमेरीका अन इराणची संस्कृती वेगवेगळी आहे. त्या त्या लोकांबरोबर राहण्याचा प्रभाव पडतोच. अजुन एक म्हणजे घरात समजा काही झालं असेल अन अगदी गंभीर काही नसेल तर नवरा बायको ते बाहेर लोकांना कशाला सांगतील? त्यामुळे मलातरी या डॉक्युमेंटरीत फारसं तथ्य वाटत नाही.
http://shilpasview.blogspot.com
डॉक्युमेन्टरीतील तथ्य
"...त्यामुळे मलातरी या डॉक्युमेंटरीत फारसं तथ्य वाटत नाही...."
थॅन्क्स शिल्पा. डॉक्युमेन्टरीज हा प्रकारच असा असतो की [आय मीन, जगभर ज्या विविध विषयावर वेळोवेळी त्या त्या सरकारतर्फे वा खाजगी संस्थामार्फत वा गटामार्फत काढण्यात येणार्या डॉक्युमेन्टरीज] त्यामध्ये नक्कीच काहीतरी 'प्रचार' तरी असतो वा 'खर्याचे खोटे तसेच खोट्याचे खरे' दाखविणे हा हेतूही प्राधान्याने निर्मात्यासमोर असतो. काही डॉक्युमेन्टरीज प्रचारकी थाटाच्याही असतात. अर्थात हा सर्वस्वी वेगळा विषय जरी असला तरी एखाद्या पक्षाला आपली भूमिका त्या माध्यमाद्वारे लोकांच्यासमोर आणण्यात नक्कीच स्वारस्य असते....सोईचेही पडत असणार. त्यातील 'कन्टेन्ट्स' कुणी कसे घ्यावे वा घेतील यावर रसिक प्रेक्षकाचाच अधिकार असल्याने तुम्ही म्हणता त्यानुसार 'अ' जर त्यातील विषय भावला म्हणजे 'ब' ची देखील तशीच भूमिका राहील असे कदापिही घडत नाही.
[बाकी...'गोदो....' बद्दल खरे सांगायचं झाल्यास मलाही जास्त माहिती नव्हते....'टर्मिनल' चित्रपट संदर्भात स्पीएलबर्गने त्याचा कुठेतरी पुसटसा उल्लेख केल्याचे डोक्यात होते. 'विदाऊट....' संदर्भात डॉ.कुरोज यांच्याविषयीची जादाची माहिती गोळा करीत असतानाच 'गोदो...' चा उल्लेख समोर आल्यावर मला खरंच खूप आनंद झाला होता....असो. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.]
वाईफ बीटर बहुधा नसतील/नसणार
वाईफ बीटर बहुधा नसतील/नसणार असं परिचितांनी सांगणं हे कदाचित गैरसमजावर आधारित असू शकेल. कारण अशा गोष्टी बाहेर कळत नसण्याची बरीच शक्यता आहे.
परंतु सगळी डॉक्युमेंटरी राइट ऑफ करण्याची आवश्यकता नाही असे वाटते.
आधीच्या पिक्चरमध्ये पतीची बाजू नाही आणि या डॉक्युमेंटरीत पत्नीची बाजू नाही (कारण तिने संपर्कास नकार दिला असावा). तेव्हा दोन्ही टाकाऊ म्हणायचे का?
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
आधीच्या पिक्चरमध्ये पतीची
आत्ता बोला म्हणावं!!!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
दोन देशांचा/संस्कृतीँचा
दोन देशांचा/संस्कृतीँचा संघर्ष याऐवजी फक्त दोन व्यक्तीँमधला संघर्ष असे पाहता, काही प्रश्न पडले. त्याची कोणी उत्तरे देउ शकेल का?
१. डॉ सईद इराण मधे जन्मले-वाढले आणि मग बेटर प्रोस्पेक्टस् साठी अमेरीकेत गेलेले का?
२. इराण-अमेरीकेतला राजकिय तणाव आणि दोन्ही संस्कृतीँमधला फरक लग्न करायच्या आधी दोघांनाही माहीती असावा. त्याने फार फरक पडणार नाही असे वाटल्याने त्यांनी लग्न केले असावे. की ग्रिन कार्ड साठी?
३. अमेरीकेत गेल्यानंतर किती वर्षाँनंतर डॉ सईद वर इराणी पणाचे टोमणे सुरु झाले? की जाणवायला लागले? की टोमण्यांचा त्रास सुरु झाला?
४. मनापासुन संसार करायचा असल्यास ते टोमणे दुर्लक्ष करणे सोपे गेले नसते का? की मुलगी मोठी व्हायला लागली आणि तिने अमेरीकन संस्कृतीत वाढू नये हाच उद्देश इराणला परतण्यामागे होता?
५. तसे असेल तर अमेरीकन बायको चालते पण अमेरीकन मुलगी नको हा दांभिकपणा नाही का?
६. बेटी, सईद यांनी दोघांनी एक एक पाउल मागे येउन काही मध्यम मार्ग काढायचा प्रयत्न केलेला का? उदा. इराण/अमेरीका ऐवजी कोणत्या तिसर्याच देशात राहणे.
आठवणीतून ...
पुस्तक वाचून बरीच वर्ष झाली.
सईद महमूदी यांचं वागणं इराणमधे गेल्यानंतर आधी बरंच सौम्य होतं पण पुढे नातेवाईकांच्या, मित्राच्या गोतावळ्याचा त्यांच्यावर बराच प्रभाव पडला (असावा). या प्रभावाखालीच बेटी आणि मुलीवर अधिक बंधनं लादली गेली (असावी). पुस्तकाच्या सुरूवातीलाच सईद थोडे मूलतत्त्ववाद्यांच्या संपर्कात आल्याचे उल्लेख आहेत.
इराणी असण्याबद्दल टोमणे किती वर्षांनी सुरू झाले या प्रश्नाच्या उत्तराला फार महत्त्व नाही. नोकरी बदलणे, सहकारी बदलणे इ. कारणांमुळे असे त्रास कधीही सुरू होऊ शकतात. अगदी अमेरिकेत जन्मलेल्या, घरातलं वातावरण वगळता (नागरिकत्त्वासकट) पूर्ण अमेरिकन असणार्या पण कॉकेशन वंशाचे नसणार्या अनेक मुलांनाही असा त्रास निश्चितच होत असावा. (हीच गोष्ट इतर देशांमधल्या 'विस्थापित' लोकांच्या मुलांबद्दलही.) अनेक भारतीय कुटुंबही पाश्चात्य देशांमधून भारतात परत येतात, मुलं, विशेषतः मुली, भारतीयच असाव्यात, अमेरिकन/ब्रिटीश होऊ नयेत म्हणून. हे या वागण्याचं समर्थन नाही, पण असे पॅटर्न्स अगदी आपल्या देशातही दिसतात. 'संस्कृती सांभाळण्याची धुरा' जिथे प्रकर्षाने मुली, स्त्रियांच्या डोक्यावर लादली जाते तिथे असे प्रकार दिसणं सामान्य आहे.
(या पार्श्वभूमीवर ओसामा बिन लादेनच्या एका सावत्र भावाच्या स्विस-इराणी बायकोने, कारमेन बिनलादिन, हिने स्वतः आणि मुलींबद्दल काही लिहीले आहे त्या पुस्तकाची आठवण झाली (साम्राज्य पडद्याआडचे, मेहता प्रकाशन). तिने सौदीबद्दल बेटीसारखे कडवट आणि अनुदार उद्गार काढलेले नाहीत. विशेषतः सौदी अरेबिया हा देश समाज म्हणून इराणपेक्षा प्रचंड जास्त मागास असेल अशी माझी कल्पना आहे. (इराणमधे स्त्रियांना डोक्यावरून रूमाल वगैरे बंधनं आहेत पण बुरखा, अबाया अत्यावश्यक नाही; कार चालवणे, शिकणे, शिकवणे यात कायदेशीर अडचणी नाहीत.) त्याचं मुख्य कारण तिच्या नवर्याची, येस्लाम बिनलादिन, तिच्याशी वागणूक सईद मेहमूदीपेक्षा बरीच बरी होती. सौदीमधे असताना ती अनेकदा अमेरिका आणि मायदेश स्वित्झर्लंड इथे जाऊनही येत असे. नवरा-बायकोतले संबंध बिघडल्याने ती वेगळी झाली; पण मुलींच्या कब्जासाठी तिला काही प्रमाणात झगडावं लागलं. पोटगीबद्दलही तिने तक्रार केली आहे, पण ती फार ठोसपणे मांडलेली नाही.)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हो रेसीझम चे टोमणे कधीही मिळू
हो रेसीझम चे टोमणे कधीही मिळू शकतात. त्यामुळेच तर ७/८ (अंदाजे) वर्षाँनी इराणला परतण्याचा निर्णय (बायकोला न सांगता/विचारता) घेण्याएवढं ते असह्य होइल असं वाटत नाही.
बरेच भारतीय, मुलं थोडी मोठी झाली की आपल्या देशात परत येतात हे अगदी मान्य. पण ते आधीच ठरवलेलं असतं. अचानक ठरत नाही. आणि शक्यतो अशी लोकं भारतीयाशीच लग्न करतात.
बायकोला न विचारता इराणला
बायकोला न विचारता इराणला जायचे ठरवले हे कन्फर्म का?
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
तसं अशोक पाटील यांनी लेखात
तसं अशोक पाटील यांनी लेखात लिहिलय की... डॉ सईद यांनी स्वतः एका मुलाखतीत मान्य केलं होतं म्हणुन...
अंदाज, समर्थन नाही.
१. अचानक सुरू झालेल्या टोमण्यांमुळे सुप्त देशप्रेम जागृत होऊन त्यातून रेडीओवर मूलतत्ववाद्यांनी चालवलेली रेडीओ स्टेशन्स ऐकणे अशी एक शक्यता नाकारता येत नाही.* यातला नक्की कार्यकारणभाव काय आहे हे पुस्तकातून स्पष्ट होत नाही. त्याआधीच लग्न केलेलं असल्यास त्याबद्दल बोलता येत नाही.
२. आपल्याकडे काही लोक लग्नानंतर स्त्रीची जात/पोटजात बदलते असं समजतात. गैरइस्लामी स्त्रीशी लग्न करताना अनेक मुस्लिम पुरूष स्त्रीला इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडतात. मग मूळ राष्ट्रीयत्त्व, विचारधारा काय याचा फार विचार करत नाहीत.
३. नवरा-बायको हे नातं रक्ताचं नाही त्यामुळे नैसर्गिक नाही. पण मुलगी ही रक्ताचीच असल्यामुळे हे नातं अधिक नैसर्गिक आहे. या नात्याबद्दल अधिक 'आपले'पणा जाणवणं शक्य आहे. शिव्या देतानाही रक्ताच्या नात्यातल्या स्त्रियांवरून शिव्या आहेत; मेव्हणी, सासू अशा "मानलेल्या" नात्यांमधल्या स्त्रियांबद्दल नाहीत.
*स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदू महासभा आणि तत्सम हिंदुत्त्ववादी संघटनांमुळे सामान्य मुस्लिम जनता मुस्लीम लीगकडे खेचली गेली, पर्यायाने फाळणीची मागणी अधिक जोराने झाली हे ही एक कारण समजलं जातं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
चर्चेच्या अनुषंगाने दोन शब्द.....
सर्वश्री नितिन थत्ते, अस्मिता आणि अदिती-३१४ यानी मांडलेल्या विचारांच्या अनुषंगाने ही चर्चा पुढे नेण्याचा हा प्रयत्न.
१. "वाईफ बीटर बहुधा नसतील/नसणार असं परिचितांनी सांगणं हे कदाचित गैरसमजावर आधारित असू शकेल......" ~ नक्कीच नितिन जी. शेजारच्या घरात काय घडते यावर भाष्य करण्यास कुणी मला सूचना केली आणि तेथील 'सुधाकर' त्याच्या 'सिंधू' वर नित्यनेमाने हात टाकत असला तरी मी विचारणार्याला थेट तसे कधीच सांगू शकणार नाही. हा एक सामाजिक सौजन्याचा भाग असतो, शिवाय खास मध्यमवर्गीय पळवाट....{'कशाला परक्याच्या झेंगटात आपण पडा ?" असा सोयिस्कर विचार} देखील असते. फक्त हा जो कुणी विदा गोळा करणारा/विचारणार असतो त्याच्या विवेकावर अशा मौखिक मुलाखतीतून नेमके काय सार काढावे यावर बरेचसे अवलंबून असते. मेट्रो निर्मित 'नॉट विदाऊट....' ही एका पुस्तकावर आधारित 'पटकथा' असून त्यामध्ये धंद्यासाठी 'फिक्शन सदृश्य' बरेचसे स्वातंत्र्य घेतले जाणार हे उघडच आहे. स्मगलर हुसेनला 'गुड सॅमॅरिटन' म्हणून रंगविणे हे जसे बेटीच्या दृष्टीने योग्य तसेच अमेरिकन मनालादेखील 'असेही कुणी खुदाई खिदमदगार इराणमध्ये आहेत जे तिथे अडकलेल्या बिचार्या अमेरिकन नागरिकाला सर्वतोपरी साहाय्य करण्यास पुढे येतात....' इ.इ. पण असे स्मगलर हे शेवटी पैशासाठी काय वाट्टेल ते करायला तयार असतात हे चित्रपटात कुठेच अधोरेखीत होत नाही....त्याला कारण म्हणजे दिग्दर्शकाला त्या प्रकरणातील उजवी बाजूच दाखविणे सोयीचे होते. पण 'डॉक्युमेन्टरी' मध्ये असे स्वातंत्र्य घेता येत नाही हे उघडच आहे. तिथे 'पटकथा' हा प्रकार नसतो. उपलब्ध व्यक्ती आणि जी काही कागदपत्रे असतात त्याच्याच आधारे दुसरी बाजू दाखविण्याचा प्रयत्न......जो तुम्ही म्हणता तसे तिथे 'पत्नी'ची बाजू आलेली नाही. त्याचे कारण बेटी वा मेहताबने डॉ.कुरोज या दिग्दर्शकाच्या विनंतीला रुकार दिला नाही, इतकेच म्हणता येईल. दोन्ही रुपांना 'टाकावू' कुणी म्हटलेले नाही, हे तर पुस्तकाच्या प्रथम प्रकाशनापासून सिद्ध झाले आहेच.
ओप्रा विनफ्रे, लॅरी किंग, डोनाव्ह्यू बार्बरा वॉल्टर्स, सॅली राफायल आदी जगप्रसिद्ध मुलाखतकर्त्यांनी 'टीव्ही टॉक शो' अंतर्गत बेटी यांची थेट स्टुडिओत मुलाखती घेऊन परतपरत जशी तिची बाजू अमेरिकन जनतेसमोर मांडली, तसेच डॉ.सईद मेहमूदी याना बोलावून त्यांचीही या प्रकरणी बाजू जनतेला त्यांच्या मुखातून सांगण्याची संधी होती....ज्यासाठी फक्त ओप्राने आवश्यक ते प्रयत्न केले होते, पण अमेरिकन सरकारने डॉ.मेहमूदीना अमेरिकेत पाय ठेवण्यास मज्जाव केला असल्याने तो प्रयत्न तसाच अपुरा राहिला.
अस्मिता यानी मांडलेले काही प्रश्न...
१. डॉ सईद इराण मधे जन्मले-वाढले आणि मग बेटर प्रोस्पेक्टस् साठी अमेरीकेत गेलेले का?
~ डॉ.सईदच नव्हे तर इराणच्या शाह यांच्या 'राजघराणे' शाही काळात अमेरिका आणि इराण यांच्यात कमालीचे सख्य होते. इराणची 'मॉडर्न कल्चर कंट्री' अशी प्रतिमा तयार करण्यासाठी 'अमेरिकनाईज्ड वेस्टर्न' विचाराच्या शाहनी अमाप संपत्तीच्या आधारे जे साधार प्रयत्न केले त्यामध्ये इराणी तरुणांनी उच्चविद्याविभूषित व्हावे म्हणून त्याना अमेरिका इंग्लंड अशा देशात उच्च शिक्षणासाठी जाण्याकरीता कित्येक प्रकारच्या आर्थिक सोयीसवलती जाहीर केल्या होत्या. दुसरीकडे अमेरिकेलाही गल्फ राजकारणात {विशेषतः तेलसंदर्भात} असा एक 'गलेलठ्ठ' मित्र हवाच असणार हे उघड असल्याने स्पॅनिश, आफ्रिकन रक्तामागोमाग मग इराणीयन रक्ताला देखील अंकल सॅमच्या अंगणात मुक्त प्रवेश मिळाला.
ज्याला उच्च पदस्थ म्हटले जाते, अॅकॅडेमिकली साऊंड, तसेच मेडिसिन क्षेत्र इथे इराणी युवकांनी अमेरिकेत आपले झेंडे रोवले. तिथले मोकळे वातावरण त्याना हवेहवेसे वाटत गेले यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. तशातच इकडे मूलतत्ववाद्यांनी शाहचा पश्चिमेकडील वाढता घरोबा पाहून 'इस्लामला धोका निर्माण होत आहे....' अशी हाकाटी उठवून त्यांच्याविरूद्ध रान पेटविले आणि मग आयातुल्ला खोमेनी सत्तेवर आल्यावर पुरोगामीवाद्यांची जी मुस्कटदाबी तिथे सुरू झाली त्याबाबतचा माहिती इथे देणे म्हणजे परत एक नवीन लेखच तयार होईल. थोडक्यात जे अमेरिकेत त्या स्थित्यंतराच्या काळात राहिले, ते तेथील नागरिकत्व स्वीकारूनच राहिले आणि मग साहजिकच संसारही अमेरिकन युवतींसमवेत सुरू झाले. इराणी युवा पिढीची त्या त्या क्षेत्रातील कर्तबगारी हा अमेरिकन युवतीला आकर्षित करून घेणारा एक विशेष मुद्दा होताच, शिवाय पर्शियन परंपरेची छापही अमेरिकन समाजमनावर होतीच...नव्हे आजही आहेच. बेटीसारख्या हजारो तरूणींनी अशा इराणीयन तरुणांशी विवाह केले आहेत...त्यापैकी कित्येक तरुणी त्यानंतर तेहरान इथे जाऊन राहिल्याही आहेत....[हे डॉक्युमेन्टरीमध्ये दाखविले गेले आहे.].
ऑस्कर विजेती 'जीना डेव्हिस' ही अभिनेत्री तुम्हा सदस्यांना माहीत असेल असे गृहित धरतो.....['लॉन्ग किस गुडनाईट...ची नायिका, तसेच 'अॅक्सिडेन्टल टुरिस्ट' मधील भूमिकेसाठी ऑस्कर मिळविणारी]. हीचा नवराही इराणी असून अमेरिकेत तो प्लॅस्टिक सर्जन आहे. एक मुलगीही आहे. अशी अनेक सुखी संसाराची उदाहरणे देता येतील. थोडक्यात डॉ.सईद बेटर प्रोस्पेक्ट्ससाठीच अमेरिकेत गेले होते असे म्हणून चालणार नाही, तर ती त्यांच्या काळातील एक सहज घडत गेलेली प्रक्रिया होती, जी त्यानी स्वीकारली आणि तिथे भूलतज्ज्ञ म्हणून नावही कमाविले होते.
२. इराण-अमेरीकेतला राजकिय तणाव आणि दोन्ही संस्कृतीँमधला फरक लग्न करायच्या आधी दोघांनाही माहीती असावा. त्याने फार फरक पडणार नाही असे वाटल्याने त्यांनी लग्न केले असावे. की ग्रिन कार्ड साठी?
~ दोन राष्ट्रातील तणाव 'खोमेनी' काळात सुरू झाला, त्यावेळी डॉ.सईद अमेरिकेत सेटल झालेच होते, विवाहही झाला होता. राहता राहिला 'कल्चर क्लॅश' प्रश्न. तर तो दोघेही सुशिक्षित आणि समंजस असल्याने तो विषय त्या त्या वेळी दोघांत चर्चीला गेला असणार असे गृहितक मांडले तर ते चुकीचे म्हणता येणार नाही. 'ग्रीन कार्ड' चा तर प्रश्न नव्हतात. इराणी नागरिकांचे 'शाह रेजिम' दरम्यान अमेरिकेत दिलखुलास स्वागत होत होतेच.
३. अमेरीकेत गेल्यानंतर किती वर्षाँनंतर डॉ सईद वर इराणी पणाचे टोमणे सुरु झाले? की जाणवायला लागले? की टोमण्यांचा त्रास सुरु झाला?
~ खोमेनी राजवटीने ज्यावेळी 'अॅन्टी-अमेरिकन प्रोपोगंडा' जाहीरपणे सुरू करून आपल्या देशाला इस्लामी परंपरावादाचे रूप देण्यास सुरुवात केली, बुरखा पद्धती, पुरुषप्रधान संस्कृती आणण्याचे काम सुरू झाले, त्यावेळेपासून अमेरिकन-इराण नात्यात दुफळी पडत गेली आणि मूळ अमेरिकन्सना आपल्या देशात फोफावत चाललेले हे इराणी पीक डोळ्यात सलू लागले. 'टोमणे टोचे' हा सिव्हिल लाईफमधील एक नित्याचा भाग होता. एम.डी. क्वालिफिकेशन्सच्या डॉक्टरला जर तो नोकरी करीत असलेल्या दवाखान्यातील कम्पाऊंडरदेखील मनी लागेल असे टोमणे मारत असेल तर त्या डॉक्टराचे अस्वस्थ होत जाणे नैसर्गिक प्रक्रिया मानावी लागेल. हॉस्पिटलमधील बदलते वातावरण आणि काम करण्याचा ताण या गोष्टी सईद यानी बेटीशी शेअर केल्या होत्याच.
४. मनापासुन संसार करायचा असल्यास ते टोमणे दुर्लक्ष करणे सोपे गेले नसते का? की मुलगी मोठी व्हायला लागली आणि तिने अमेरीकन संस्कृतीत वाढू नये हाच उद्देश इराणला परतण्यामागे होता?
~ मान्य. पण दुसरीकडे बदलत्या राजकारणी अवस्थेतील तेहरानच्या बातम्याही काहीशा हार्दिक वा सुखकारक नव्हत्या. तिथे डॉक्टरांची आई होती, छोट्या बहिणी होत्या, भाऊ होते...त्यांचीही खबरबात घेणे जर एक मुलगा या नात्याने सईद याना वाटले तर त्याबाबत त्याना कसा दोष देता येईल ? टोमण्याकडे सुरुवातीला दुर्लक्ष केले गेले असणारच. ती काय एका रात्रीची कथा नव्हती....प्रमाण आणि टोमण्यातील विखार वाढत गेल्यानंतरच त्यानी मनोमनी काही निर्णय घेतले असणार हे उघड आहे. मुलगी त्या वातावरणात वाढावी की नाही, हा प्रश्न निदान त्या क्षणी तरी त्यांच्यासमोर असेल नसेल, पण एकदा तेहरानला परतल्यानंतर मात्रे मेहताबने आपल्याजवळच राहावे असा त्यांचा निर्णय होता.
५. तसे असेल तर अमेरीकन बायको चालते पण अमेरीकन मुलगी नको हा दांभिकपणा नाही का?
~ याला उत्तर काय देणार ? फक्त इतकेच म्हणतो की त्यानी बायको आणि मुलगीनेही आपल्यासोबत इराणमध्ये राहावे असे वाटत होते....यात दांभिकपणा नसावा. शिवाय कायदाही त्यांच्या बाजूनेच आहे, असे तेहरानमधील खुद्द अमेरिकन एम्बॅसीच्या अधिकारी व्यक्तीने बेटीला प्रत्यक्ष मुलाखतीत सांगून 'तुम्हाला डायव्होर्स मिळू शकतो, पण इराणी कायद्यांतर्गत मुलीचा ताबा पित्याकडे जातो....जो आपण मानला पाहिजे...' अशी स्पष्ट चेतावणीही दिली होती....जी बेटीने अर्थातच मानली नाही.
६. बेटी, सईद यांनी दोघांनी एक एक पाउल मागे येउन काही मध्यम मार्ग काढायचा प्रयत्न केलेला का? उदा. इराण/अमेरीका ऐवजी कोणत्या तिसर्याच देशात राहणे.
~ चर्चा नक्कीच झाल्या असणार, पण मेहमूदी यानी आपली मेडिकल करीअर तेहरान इथेच व्यतीत करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे अन्य विकल्प खुंटले गेलेच.
बेटीने तरी असे काय प्रयत्न केले होती की ज्यामुळे मेहमूदी घरातील लोकांना तिच्याविषयी आपुलकी वाटावी ? मुक्कामास सुरुवात केल्यापासून ड्रेसपासून ते स्वयंपाकघरातील पदार्थ यावर तिने खास 'अमेरिकन छाप' उमटविण्यास सुरुवात केली होती. तुम्हाआम्हाला सर्वांना माहीत आहे की मुस्लिम धर्मात 'बीफ' मटण निषिद्ध मानले जाते. अशा घरात मटण खायचेच असेल तर अन्य विकल्प उपलब्ध असतानाही बेटीने स्वतः बाजारात जाऊन 'बीफ' आणले आणि स्वतःसाठी व मुलीसाठी ते शिजवत ठेवले. हा प्रकार घरातील अन्य ज्येष्ठ मुस्लिम स्त्रीयांना किळसवाणा आणि धर्मशिकवणविरोधी वाटला नसेल ? 'बीफ' मुस्लिम धर्मात चालत नाही, ही बाब एका सुशिक्षित अमेरिकन युवतीला माहीत नसेल ?
इराणी घाणरडेपणाबद्दल लिहिताना बेटीने ' हे लोक वर्षातून एकदा आंघोळ करतात....' असे जे वक्तव्य केले आहे, त्यात किती तथ्य असू शकेल ? कुणीही कुठल्याही देशातील स्त्री-पुरुष वर्षभर आंघोळीशिवाय राहू शकतील ? दिवसातून पाच वेळा नमाज पढणारे हे मुस्लिम लोक प्रत्येक नमाजाच्या अगोदर स्वच्छ पाण्याने अंग धुवून पुसून घेतातच...ती एक प्रथाच आहे. शिवाय बेटीने डॉ.सईद यांच्यासमवेत पती-पत्नी दरम्यान होत असलेल्या शरीरसंबंधाचे वर्णन केले आहे, ते करताना तिने कबुलीही दिली आहे की, 'प्रत्येक सेक्सनंतर सईद लागलीच बाथरूममध्ये जाऊन आंघोळ करत....' हे वर्णन जसे अमेरिकेन जीवनाला लागू असेल तसेच तेहरानमधीलही....आणि जर डॉ.सईद प्रत्येक सेक्सनंतर आंघोळीला जात असतील....त्या आवश्यकतेबद्दल इस्लाममध्ये म्हटले गेले आहे....तर त्या न्यायाने तेहरानमधीलच काय पण इराणमधील प्रत्येक पुरुष निदान त्या अॅक्टनंतर का होईना आंघोळ करीत असेल हे ओघाने आलेच. मग बेटीला 'घाणेरडापणा' दिसला तो नेमका कसला ?
असो...इतपर्यंत ठीक आहे.
एक खुस्पट फक्त.इस्लाममध्ये
एक खुस्पट फक्त.इस्लाममध्ये बीफ निषिद्ध नसून पोर्क निषिद्ध आहे.
बाकी चालूद्या.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
प्रश्न बीफचा
बॅटमन....तुमच्या आक्षेपाला विविध संस्कृतीचा एक अभ्यासक या नात्याने मी तरी कधीच 'खुस्पट' असे म्हणणार नाही [अन्य सदस्याही म्हणणार नाहीत असा विश्वास आहे]. किंबहुना यामुळे का होईना मला 'इराण' विषयावरील अभ्यास वाढविण्याची संधी मिळाली. मी 'इस्लाम' प्रामुख्याने नजरेसमोर न ठेवता 'इराण' खाण्यापिण्याचे रितीरिवाज समोर ठेवून 'बीफ' चा उल्लेख केला होता. 'पोर्क' इस्लाममध्ये निश्चितच त्याज्य आहे [त्याची कारणमीमांसा आता इथे नको] पण म्हणून एकजात सारे मुस्लिम 'बीफ' खात असतात असा निष्कर्ष काढता येत नाही.
इराण खाद्यसंस्कृतीमध्ये ग्रीक आणि भारतीय संस्कृतीचे दाट मिश्रण सापडते. भारतीय मसाले तिकडच्या स्वयंपाकात सर्रास वापरले जातात. सुवासिक तांदळाच्या भातासमवेत चीझ, योगर्ट, ताजी फळे, मटार आणि भाजीपाल्यांचा भरपूर वापर हे इराणी जेवणाचे आणखीन् एक वैशिष्ट्य. मांसामध्ये कोकरू, बकरे आणि कोंबडी या तीन घटकांचे प्राबल्य असून मला कुठेही 'बीफ' चा उल्लेख सापडलेला नाही हे मुद्दाम नमूद करीत आहे. याचाच दुसरा अर्थ असा की जर इराणीयन कुटुंबात बीफ ची रीत नसेल आणि एखादी व्यक्ती घरी बीफ आणत असेल तर त्याला मूळ इराणी स्त्री/पुरुषाने आक्षेप घेतला तर तो त्यांच्या रिवाजाचा एक भाग नक्कीच होऊ शकतो.
असो.
हरकत नाही. पण सहज शोधताना
हरकत नाही. पण सहज शोधताना दिसले, की इराणी पाककृतींमध्ये बीफचा अंतर्भाव आहे.
http://10.0.0.103:15871/cgi-bin/blockpage.cgi?ws-session=2838362918
तसेच इराणात बीफची मागणी खूप जास्त आहे.
http://www.ft.com/cms/s/0/5f26d4fa-d890-11e0-8f0a-00144feabdc0.html#axzz...
असो इतकेच. हा विषय अवांतराकडे जाईल म्हणून आता अलम् विस्तरेण
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
बीफ आणि पोर्क फरक
थॅन्क्स फॉर द लिंक्स, बॅटमॅन.
तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मूळ विषय दुसरीकडे भरकटेल अशी भीती वाटते, तरीही तुमच्या माझ्या 'बीफ' आणि 'पोर्क' संदर्भातील समजुती दरम्यान काही धुके राहू नये यासाठी हा प्रतिसाद देणे मला अत्यंत गरजेचे वाटते.
मी 'बीफ' चा जो उल्लेख केला होता त्या मागे दुसरेतिसरे कुणी नसून खुद्द बेटी मेहमूदीच आहे. आय मीन, ते 'मीट' खरेदी प्रकरण बेटीच्याच पुस्तकात असल्याने ते नाम डोक्यात घट्ट बसले होते. मी परत इथे लिहितो की, मी मूळ इंग्रजी आवृत्तीबद्दल बोलत असून मराठीमध्ये लीना सोहोनी यानी काय आणि कसे त्या 'बीफ' घटनेचे चे भाषांतर केले आहे त्याची माहिती माझ्याजवळ नाही. सो ओव्हर टु बेटी हरसेल्फ इन धिस रीगार्ड :
".....बेटीला स्मरते तिने एकदा तेहरानच्या घरी स्वतःच पतीच्या कुटुंबासाठी अमेरिकन पद्धतीचे जेवण बनविण्याचा केलेला प्रयत्न. तिने त्यासाठी 'बीफ' खरेदी करून आणल्याचे पाहाताच तिच्या नणंदेने घरात नापंसतीचा सूर लावला. बेटीला 'बीफ' आणि 'पोर्क' मधील फरक माहीत होताच, पण ही मेहमूदी मंडळी 'बीफ' ला का रीजेक्ट करीत आहेत हे तिला उमजेना [Beef Rejection हा शब्दप्रयोग बेटीचाच आहे]. नंतर तिला समजले की, इराणमध्ये 'बीफ' कडे 'लोअर-क्लास पीपल' साठी उपलब्ध असलेले मटण म्हणून पाहिले जाते. मेहमूदी कुटुंब स्वत:ला 'उच्चवर्णीय मुस्लिम' समजत असत आणि त्यामुळे कनिष्ठवर्णीयासाठी असलेले 'बीफ' या घरात चालणार नाही अशी त्यांची पक्की समजूत होती....."
ही बाब बेटीला खटकली....कारण ती स्वतः अमेरिकन लाईफमध्ये बीफ मीट एन्जॉय करीत असे....हे 'लो' अॅण्ड 'हाय' क्लास कॅटेगरायझेशन तिला अन्यायकारक वाटले.
या संदर्भातून मी 'बीफ' चे प्रयोजन केले होते. असो.
...
हो.. शक्य आहे. अशा समजुती असतात.
उदा. आमच्या कोंकणात मोरीचं मटण निम्नवर्गीयांच्यात खाल्लं जातं असं समजून उच्चवर्गीय ते खात नाहीत. पण मोठे झिंगे, शेवंड वगैरे खातात.
काही भागांत, उदा. खानदेश, बाजरी गरीबाचं अन्न समजून ती तथाकथित उच्च लोक टाळतात आणि ज्वारी खातात.
-(मोरीचं कालवण आणि बाजरीची भाकरी आवडणारा निम्नवर्गीय) गवि
बीफ, ज्वारी अन समजूती.
आजकाल बाजरी ज्वारी दोन्ही गव्हापेक्षा महाग आहेत. सबब आजकाल बाजरीची भाकरी खाणारे श्रीमंत असतात.
बीफ खाण्यामागे आपल्याकडेतरी (भरतात) 'स्वस्त' हे लॉजिक जास्त चालत असावे. २० रुपयांत पावशेर बीफ येते. त्या भाजीत ३ मोठे अन २ लहान (साबा/नवरा/बायको/२मुले) इतके लोक जेवतात. हेच शाकभाजी आणायची झाली तर ४० रुपये खर्च येतो. असा रीसेन्ट हिशोब एका मुस्लिम मध्यमवर्गियाने ऐकवलेला आठवतो आहे.
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
बीफ आणि भारतीय मुसलमान
इराणप्रमाणे भारतातही खानदानी मुस्लिम कुटुंबांत बीफ 'लो क्लास' म्हणून टाळतात. बीफ स्वस्त असतं हे खरंच आहे. मात्र मला हे माहीत नाही की ते स्वस्त आहे म्हणून 'लो क्लास' आहे की 'लो क्लास' आहे म्हणून स्वस्त आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
ओह अच्छा बीफला इराणात
ओह अच्छा बीफला इराणात उच्च-नीचपणाचा पैलू आहे तर ....हे रोचक आहे. मूळ इंग्रजी पुस्तक नाही वाचले, शिवाय मराठी भाषांतर वाचूनदेखील बरीच वर्षे झाली. आता मुद्दा क्लीअर झाला, मूळ पुस्तकातील संदर्भाकरिता बहुत धन्यवाद
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
आपल्याकडील पद्धती
गवि....आडकित्ता....बॅटमॅन.
धन्यवाद....'बीफ' चर्चेला चांगलाच आकार दिल्याबद्दल.
मटणामध्येही 'उच्च-नीचता' असते हा प्रकार केवळ मुस्लिम देशातच असतो असे नसून आपल्या मातीतही त्याबाबतीत डावेउजवे केले जाते. उदा. आमच्या कोल्हापूरात मांसाहारी जेवणाचे, पदार्थाचे किती प्राबल्य आहे हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. किंबहुना पुणे मुंबई सारख्या मेट्रो सिटीत 'कोल्हापूरी तांबडा-पांढरा रस्सा' अशा नावाने नॉन-व्हेज. हॉटेल्सच्या जाहिरातीही पाहायला मिळतात.
कोल्हापूरातील मटण विक्रेते दुकानाच्या बाहेर मोठ्या अक्षरात "आमच्याकडे बोकडाचे....बोलाईचे...पालव्याचे ताजे मटण मिळेल" असा बोर्ड लटकवितात....एवढ्याने भागत नाही म्हणून की काय एखादा जादाचा हुशार खाटिक त्या वाक्यानंतर ".....नराचे मटण' अशीही जोड देतो. आता बोकड आणि पालवे हे नरच असतात हे जणू काही गिर्हाईकाला समजणार नाही अशीच याची कल्पना असते. सांगायचा मुद्दा असा की, 'शेळी, मेंढी, बकरी' हे 'स्त्रीलिंगी' घटक Sheep या कॅटेगरी/फॅमिलीतील असूनसुध्दा कुणी 'मला एक किलो शेळीचे मटण द्या' अशी ऑर्डर देत नाही. म्हणजेच 'शेळी मेंढीचे मटण' खाणे म्हणजे एक प्रकारे 'त्याज्य' ठरविलेला घटक स्वीकारणे अशीच समजूत आहे. पण ज्याअर्थी शेळ्यामेंढ्यांची लेंढारे धनगर लोक खाटक्यांच्या दारात आणून लावतात, त्याअर्थी त्यांचा खप समाजातील कुठल्यातरी अन्य घटकात नक्कीच होत असणार. [विशेषतः फासेपारधी, रामोशी, माकडवाले, डोंबारी....अशाप्रकारची भटकी जमात...या भागातील...अशा मटणाचे हक्काचे गिर्हाईक आहे. नराच्या तुलनेत मादी घटकाचे मटण स्वस्तही देतात.....तुडुंब भरून वाहात असलेल्या इथल्या मटणाच्या खाणावळीतील ताटात काय येईल हे रामदेखील जाणू शकत नाही. ताटात आलेले मटण हे नराचेच आहे अशी सोयिस्कर समजूत करून घेऊन गिर्हाईक त्यात चपाती बुडवितो.]
एकप्रकारे म्हटले तर मटणाच्याबाबतीतील हा देखील सांप्रत महाराष्ट्रात रुढ असलेला 'उच्चनीचतेचाच' प्रकार म्हणावा लागेल.
रोचक. सहमत आहे.
रोचक. सहमत आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
प्रतिसाद रोचक आहे. बरीच नवीन
प्रतिसाद रोचक आहे. बरीच नवीन माहीती कळाली.
देश/संस्कृती असे संदर्भ (म्हणजे अमेरिकन कसे स्वच्छ, इराणी कसे घाणेरडे किँवा अमेरिकन कसे व्यक्तिस्वातंत्र्याचा अतिरेक करतात, इराणी कसे काइंड कम्पोज्ड असतात) किँचीत बाजुला ठेउन फक्त एक व्यक्ती म्हणुन डॉ सईद यांची बाजू/मानसीकता जाणायचा प्रयत्न करत होते.
सद्ध्या एकच प्रश्न (बाकीचे नंतर विचारेन) 'इराणी कायद्यांतर्गत मुलीचा ताबा पित्याकडे जातो' हे असंच आहे की 'इराणी कायद्यांतर्गत मुलीचा ताबा पिता/माता पैकी जो कोणी इराणी आहे त्याच्याकडे जातो' असं आहे?
इराणी कायदा....अपत्याबाबत
"'इराणी कायद्यांतर्गत मुलीचा ताबा पिता/माता पैकी जो कोणी इराणी आहे त्याच्याकडे जातो...."
~ इराणी कायद्याला 'शरियत लॉ' असे ओळखले जाते आणि अन्य कित्येक मुस्लिम राष्ट्राच्या स्थापित संकल्पनेनुसार इथेही पुरुषी वर्चस्वाला वजन दिल्याचे दिसते, जरी वर्तणूक आणि राहणीमान यावर अमेरिकन जीवनशैलीचा पगडा असला तरी. शरिअतनुसार जो पतीचा धर्म तोच 'बाय डीफॉल्ट' पत्नीचा होतो, जरी तिने इस्लाम स्वीकारला असेल वा नसेल तरीही. त्यामुळे 'पुरुष' हाच कुटुंबप्रमुख आणि 'कर्ता' मानला गेला आहे. त्या न्यायाने मुलांचा [चाईल्ड असा उल्लेख केला गेला आहे, कायद्यात] ताबा विवाहविच्छेदनानंतर पित्याकडेच जातो. इतकेच नव्हे तर घटस्फोटानंतर जर पित्याचा मृत्यू झाला तर अपत्याचा ताबा हयात असलेल्या पत्नीकडे न जाता पतीच्या नातेवाईकांकडे दिला जातो....त्यातही प्राधान्याने आजोबाकडे.
१९७९ नंतर त्या देशाच्या 'फॅमिली प्रोटेक्शन अॅक्ट' अंतर्गत ज्या कलमांचा उल्लेख केला गेला आहे, त्यानुसार 'आर्थिकदृष्ट्या सक्षम' असलेल्या व्यक्तीकडे अपत्याची जबाबदारी दिली जावी असे म्हटले आहे. पण पतीपत्नी यापैकी आर्थिकदृष्ट्या सक्षम कोण आहे हे ठरविण्याची जबाबदारी तेथील कोर्टाची आहे. चर्चेसाठी आपण असे गृहित धरू की कोर्टाने वडील सक्षम आहेत असा निर्णय दिला, अन् पुढे पत्नीने रिट अर्ज दाखल करून 'माझे घटस्फोटीत पती आता या क्षणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल झाले असल्याने मुलाचा/मुलीचा ताबा माझ्याकडे द्यावा...' अशा अर्थाची कैफियत दाखल केली तरीही कोर्ट तिच्याकडे थेट ताबा न देता मुलाच्या आजोबाकडे वा काकांकडे जबाबदारीबाबत विचारणा करेल. तिकडून [सहसा] होकार येतोच येतो....कारण घराण्याच्या कामासाठी मुले हवी असतातच.... तसा होकार आला की मग परत आईचा त्याबाबतच हक्क संपुष्टात येतो.
जर सईद यांच्या जागी इराणी
जर सईद यांच्या जागी इराणी स्त्री असती आणि बेटी यांच्या जागी अमेरीकन ख्रिश्चन पुरुष तर शरीयत लॉ नुसार मुल कोणाकडे गेले असते?
मी पुस्तक वाचले नाही आणि
मी पुस्तक वाचले नाही आणि त्यातील घटना कधी घडल्या हे देखील माहीत नव्हता. त्यामुळे फक्त मूळ लेख व काही प्रतिसाद यावरुन अशी समजूत झालेली की १. सईद यांचा जन्म-वाढ प्रतिगामी इराण मधली २. इराण-अमेरीका संबंध बिघडलेले असले तरीही त्यांनी अमेरीकेत जाण्याचा, तिथल्याच स्त्री शी लग्न करण्याचा असे हटके निर्णय घेतलेले.
त्यामुळे अशा ओपन माइंडेड डॉ सईद नी, अचानक टोमणे टोच्यामूळे परत प्रतिगामी देशात जायचा निर्णय कसा काय घेतला हेच कळत नव्हते...
आता इराणमधील राजकीय उलथापालथ ऐकल्यावर एक वेगळा दृष्टिकोन मिळाला.
विकीनुसार बेटी १९८४ ते १९८६ साधारण १८ महीने इराण मधे होती. आणि तेव्हा त्यांची मुलगी ५ वर्षाँची होती. म्हणजे बेटी सईद लग्न आणि इराण रिवोल्युशन साधारण एकाच वेळी झाले.
शाह यांच्या काळातला इराण जसा खोमेनी यांच्याकाळात पूर्णपणे बदलला तसेच डॉ सईद देखील बदलत गेले. टोमणेटोचे ही साधारण तेव्हाच चालु झाले.
आणि अमेरीका-इराण संबंधाप्रमाणेच बेटी-सईद नाते देखील बदलले.
दुसरी बाजू जर ही अशीच असेल तर... समजली पण फारशी पटली नाही...
धन्यवाद अशोक पाटील आणि इतर
धन्यवाद अशोक पाटील आणि इतर सर्व प्रश्नकर्ते ....
ही अशी चर्चा वाचत राहायला आवडेल...
वाचनखुणेत अजून एक धागा अॅडवल्या गेला आहे...
उत्तम चर्चा... दुसरी बाजू
उत्तम चर्चा... दुसरी बाजू उत्तमप्रकारे समोर आणल्याबद्दल धन्यवाद.
बिपिन कार्यकर्ते
इराणी नवरी, ख्रिश्चन नवरा
अस्मिता यानी विचारणा केलेला "जर सईद यांच्या जागी इराणी स्त्री असती आणि बेटी यांच्या जागी अमेरीकन ख्रिश्चन पुरुष तर शरीयत लॉ नुसार मुल कोणाकडे गेले असते?...." हा प्रतिसाद काहीशा उशीराने पाहिला. त्या संदर्भातील हे उत्तर :
~ इंग्रजीत ज्याला Highly improbable situation म्हटले जाते तशीच ही शक्यता आहे i.e. इराणी स्त्री ने अमेरिकन ख्रिश्चन पुरुषाशी विवाह करणे. असा विवाह इराणच काय पण जॉर्डन, अमान, लेबॅनॉन, सिरिया इथेही बिलकुल मान्य होत नाहीत. त्यातल्या त्यात तुर्कस्थान काहीसे लिबरल आहे अशा आंतरधर्मीय विवाहाच्याबाबतीत. पण जर आपण 'इराण' हाच देश नजरेसमोर आणला तर त्या देशातील तरुणीने परधर्मीयाशी 'इराण'मध्येच राहून लग्न करणे म्हणजे केवळ बहिष्कृतीचीच शिक्षा नव्हे तर प्रसंगी 'स्टोनिंग' देखील होऊ शकते....झालेल्या घटनाही आहेत. याबाबतीत इराणी शरिअत लॉ फार फार कठोर आहे, अस्मिता.
शरियतनुसार लग्नाबाबत 'धर्मबुडवेपणा' करणार्या तरुणीला 'झिना' असे संबोधिले जाते. 'झिना = बिनमाफीचा अपराध'. याचाच दुसरा अर्थ पकडले गेल्यास तिला वा तिच्यावतीने पतीला वा अन्य नातेवाईकाला त्या संदर्भात रदबदली करता येणार नाही. विवाहच लॉ रुल्सच्या विरोधात आहे म्हणजे त्याला कायद्याची मान्यता नाही, दुसरीकडून साहजिकच होणारे अपत्य हे अनौरस समजले जाईल आणि त्याची रवानगी थेट शासकीय अनाथालयात...इतकी कडक अनुशासन पद्धती आहे या संदर्भात. त्यामुळे मुलगी कितीही धाडसी, बंडखोर विचाराची असली तरी इराणमध्ये राहताना ती असे जीवाला येणारे धाडस करू शकते नाही.
मात्र हीच इराणी युवती कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड आदी देशात शिक्षणासाठी आहे, आणि तिथे तिने स्थानिक ख्रिश्चन युवकाशी [धर्म न बदलता] विवाह केला आहे - अशी उदाहारणे घडलेली आहेत - आणि विवाहानंतर जर ती परत तेहरानमधील कुटुंबियांना भेटायला त्या ख्रिश्चन नवर्यासह आली तर विमानतळाच्या बाहेर पडण्यापूर्वी नवर्याला 'मी या क्षणापासून इस्लाम धर्म स्वीकारला आहे' याचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागते. विमानतळावर अशी मौलाफौज विनंतीवरून हजर होते आणि अवघ्या १५ मिनिटाच्या सोपस्कारानंतर हे धर्मांतर होऊन जाते. नवर्यालाही त्यात काही वावगे वाटत नाही कारण त्याला माहीत असतेच की व्हिसाची मुदत संपल्यानंतर पत्नीसह तो परत आपल्या देशात परतणार आहे, त्याच्या ख्रिश्चानिटीला धक्का न लागता.
ही सोय दोन्ही बाजूनी उपयुक्त ठरते. अशा केसेसमध्ये जर घटस्फोटाची बाब आलीच तर ज्या देशात ती प्रक्रिया घडेल तेथील रितिरिवाजानुसार अपत्याबाबत निर्णय होतो. उदा. तेहरानमध्ये घटस्फोट केस चालू असेल तर परत शरिअतनुसार त्या अपत्याचा ताबा [मूल ७ वर्षाच्या आत असेल तर थेट...] बापाकडे जाईल...कारण बाप तांत्रिकदृष्ट्या का असेना आता तो 'मुस्लिम' झाला आहे म्हणून शरिअतच्या कायद्यातील तरतुदी त्याला लागू असतील. ऑस्ट्रेलियात घटस्फोट केस चालू असेल तर तेथील रिवाजाप्रमाणे आर्थिकदृष्ट्या [आणि मेन्टलीही] सक्षम असलेल्या व्यक्तीकडेच अपत्याचा ताबा जातो.
थोडक्यात...इराणी तरुणी तेहरानमध्ये असली काय किंवा टोकिओत असली काय...शरिअतच्या नजरेत तिच्यावर कायमस्वरुपी 'सेकंड सेक्स' म्हणूनच शिक्कामोर्तब होईल; म्हणून अपत्यावर ती हक्क सांगू शकणार नाही.
अवघड आहे... धन्यवाद पाटील
अवघड आहे...
धन्यवाद पाटील काका अत्यंत माहितीपूर्ण प्रतिसाद!
माझ्या एका इराणी मैत्रिणीने
माझ्या एका इराणी मैत्रिणीने बंगाली मित्राशी लग्न केलं; त्याआधी इराणमधे जाऊन पासपोर्ट वगैरे कागदपत्रांची येत्या दहा वर्षांची सोय लावून आली. त्यांनी तिथे लग्न करावं असा तिच्या आईवडलांचा आग्रह होता, पण ही धर्माची भानगड मधे येईल म्हणून ते या दोघांनीही नाकारलं. तो कॉन्फरन्स व्हीजावर इराणमधे जाऊनही आला. शेवटी लग्न पुण्यात झालं आणि तिचे जवळचे नातेवाईक भारतात येऊन गेले.
नेमकं मधल्या काळात भारतीय ब्यूरॉक्रसीनेही तिला हिसका दाखवायला सुरूवात केली आहे. तिचा स्टुडंट व्हीजा तीन वर्षांचा होता, तो रिन्यू करायला नकार दिला आहे. (तिच्याबरोबर व्हीजा मिळालेल्या, भारतात ठिकठिकाणी शिकणार्या अनेक इराणी नागरिकांची अशीच अडचण आहे.) ती आता डिपेंडंट व्हीजावर भारतात आहे; तिचं काम ती करते आहे, पण आता तिला पगार मिळत नाही. पुन्हा अर्ज करून तिला स्टुडंट व्हीजा मिळेपर्यंत कदाचित तिची पीएच.डी. पूर्णही होईल. वेगवेगळ्या पातळ्यांवर नोकरशहांनी छळ करावा आणि आपण त्यात काहीही करू शकत नाही अशी हतबलता तिच्याकडे बघून अनेकदा वाटते. नको तिथे आपला राजकीय दबदबा दाखवणार्या पुण्यातल्या या नामांकित संशोधन संस्थेने तिच्या बाबतीत पूर्ण हात झटकले आहेत. अमेरिकन सरकार आणि इराणमधलं अहमदिनेजाद सरकार यांच्यातल्या मारामार्यांचा सामान्यांना फटका बसतो तो असा, असा जवळच्या काही लोकांचा अंदाज आहे.
शरियामधे मुस्लिम नवरी, गैरमुस्लिम नवरा अशी परिस्थिती असेल असं वाटत नाही. मुलींना नवरा निवडण्याचं स्वातंत्र्य शरियाच्या परिघाच्या बाहेरचं असेल असं वाटतं. जिथे स्त्रियांच्या कपड्यांवरही टिप्पणी होते तिथे त्यांना नवरा निवडण्याचं स्वातंत्र्य कुठचं असणार?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
एक बारीकशी शंका/चौकशी (अवांतर)
हे अमान (अम्मान?) त्या जॉर्डनपासून साधारणतः किती दूर आहे हो?
अम्मान
"...हे अमान (अम्मान?) त्या जॉर्डनपासून साधारणतः किती दूर आहे हो?....'
~ वॉव...यू कॉट मी नॅपिंग, नवी बाजू....ओमान आणि अम्मान {होय अम्मानच} नावात फसगत झाली.