Partial Existence

Fantasy land मधे जेव्हा भुकंप होतात...
तेव्हा तोकडया झग्यातली एक किरीस्ताव म्हातारी,
माझ्या पायथ्याशी आशाळभुतपणे येऊन उभी रहाते!
माझ्यातलं काहीतरी काढुन नेते
काळ्या पिशवीत grams मधे ....
मी स्वताशीच हसतो
आणि शिव्या वगळुन sonnets गात रहातो
Macbeth च्या आवाजात....
जुन्या डायरीच्या आत दडवलेलं
गुलाबी symbolic असत्य
चोरट्या नजरेने उराशी कवटाळुन
मी fantasy land ची वाट धरतो...
वेशीपाशी दिसते अवजड विटांची भिंत!
त्यावर लटकलेली असंख्य घड्याळं.....
काळाला नागवु पहाणारी,
त्यांची स्थितप्रद्न्य निर्ल्लज्ज भुतावळ
वेड्या आशेने मी घेतॊही अंगावर ....
आधारासाठी चाचपडताना हाती लागतो,
संपलेला काळ,
छिन्न भिन्न अस्तित्व,
मी गमावलेलं आयुष्य जे
ash tray मध्ये ५-५ मिनिटांच्या तुकड्यात,
इतस्थतः विखरुन पडलयं...
मी तुकडे मोजु लागतो.
माझी टिकटिक वाढु लागते...
टिकटिक......टिकटिक.....!

field_vote: 
2.5
Your rating: None Average: 2.5 (4 votes)

प्रतिक्रिया

कविता आवडली.

मी गमावलेलं आयुष्य जे
ash tray मध्ये ५-५ मिनिटांच्या तुकड्यात,
इतस्थतः विखरुन पडलयं...
मी तुकडे मोजु लागतो.

हे मस्तय.
मॅकबेथ वाचला नाहीये,तेव्हा रिलेटेड ओळी कळल्या नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझी कविता राहु देत बाजुला पण तुम्ही मॅकबेथ वाचा जरुर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

“I am alone in the midst of these happy, reasonable voices. All these creatures spend their time explaining, realizing happily that they agree with each other. In Heaven's name, why is it so important to think the same things all together. ”
― Sartre

आता रिटायरमेटनंतरच वाचू मेकबेथ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कवीतेचं नावही मस्त अन् ओळन ओळही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता खरेच आवडली.
इंग्रजी शब्द देवनागरीतच लिहिले असते तरी चालले असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

मस्त कविता आवडली
शेवटचे कडवे प्रभावी आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

असा संदेश आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असा संदेश द्यायचे महापातक मी नाही करु शकत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

“I am alone in the midst of these happy, reasonable voices. All these creatures spend their time explaining, realizing happily that they agree with each other. In Heaven's name, why is it so important to think the same things all together. ”
― Sartre

>>मॅकबेथ वाचला नाहीये,तेव्हा रिलेटेड ओळी कळल्या नाहीत.<<

मॅकबेथमध्ये सुरुवातीला तीन चेटकिणी येऊन 'तू राजा होशील' अशी भविष्यवाणी करतात. राजाचा खून करण्याचा विचार मॅकबेथच्या मनात येण्यामागे हा प्रसंग कळीचा आहे. मॅकबेथच्या मनात आधीपासून घर करून असलेल्या राजसत्तेच्या आसक्तीला खतपाणी घालून त्या चेटकिणी मॅकबेथच्या अंतिम र्‍हासाची पायाभरणी करतात. या कवितेत सुरुवातीला एक 'आशाळभूत किरीस्ताव म्हातारी' येते. म्हणजे आपला मॅकबेथ होणार की काय या कल्पनेनं 'मी स्वताशीच हसतो आणि शिव्या वगळुन sonnets गात रहातो Macbeth च्या आवाजात....' असं मला वाटलं.

इथे अधिक वाचता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

to चिंतातुर जंतू,
spot on!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

“I am alone in the midst of these happy, reasonable voices. All these creatures spend their time explaining, realizing happily that they agree with each other. In Heaven's name, why is it so important to think the same things all together. ”
― Sartre

कविता चांगलि आहे. आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भिंतीवरची असंख्य घड्याळे वाचुन साल्वादोर दालीच्या चित्रांची आठवण झाली. काळ हातातुन निसटुन जात असल्याने हतबल झालेल्या मनोस्थितीची काव्यात्मक मांडणी छान केलीय. आपले नाव सार्थ करणारि कविता. आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साल्वादोर दालीचे चित्र..म्हणजे 'पर्सिस्टन्स ऑफ मेमरी' याबद्दल म्हणताय का?