चंद्राचे फोटो

खाली चंद्राचा टेलिस्कोप वापरून काढलेला फोटो देत आहे. फोटो काढण्याच्या प्रक्रियेची माहिती द्यायची इच्छा आहे, पण ते फारच वेळखाऊ काम असल्याने ते पुन्हा केव्हातरी.





वरील फोटो चंद्राच्या २२० फ्रेम्स एकत्र करून बनवला आहे.
मोठ्या आकारतला फोटो येथे पहा.

याच तंत्राने काढलेला अजून एक फोटो.


हा फोटो सुमारे १६०० फेम्स एकत्र करून बनवला आहे.


तुमच्या मते तांत्रिकदृष्ट्या कोणता फोटो जास्त चांगला आहे? (म्हणजे कोणत्या फोटोत चंद्राची विवरं चांगली/स्पष्ट आहेत? विवरांची तुलना करताना साधारण एकाच आकाराचे विवर दोन्ही फोटोत पाहिल्यास तुलना जास्त योग्य होईल.)

field_vote: 
3.625
Your rating: None Average: 3.6 (8 votes)

प्रतिक्रिया

दोन्ही फोटो सुरेखच आहेत. अर्थात पहिला फोटो जास्त चांगला (क्रिस्पी) वाटतोय. विवरांचा कडा तिथे जास्त ठळक आहेत.
फोटो काढण्याच्या तंत्राविषयी जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

सुंदर
हाफिसतून पहिलाच फोटो दिसतोय.. तो लय आवल्डा!!

बाकी तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी वेळ काढच हा आग्रह!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

दुसरा फोटो इथे दिसेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

भार्री फोटु!

दुसर्‍या फोटोमध्‍ये विवरं जास्‍त स्‍पष्‍ट दिसत आहेत..
पहिल्‍या फोटोमध्‍ये चंद्राचा फार थोडा भाग दिसतो...
‍दुसर्‍या फोटोत ते फुटबॉलच्या मैदानासारखं दिसतंय ते आटलेले समुद्र आहेत काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्याबद्दलचे स्पष्टीकरण येथे पहा.
http://en.wikipedia.org/wiki/Lunar_mare

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

पहिला फोटो पृथ्वीच्या उपग्रहाचा वाटतोय तर दुसरा "चंदामामा"चा! आता तुम्हीच ठरवा तुम्हाला कोण हवंय ते!:)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नक्कि काय बदल केले गेलेत ? कारण दोन फोटोमधे चद्रांवरील तो मोठासा खड्डा वेग वेगळ्या स्थानी दिसत आहे ? दूसरा फोटो अर्थातच मोठा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोन्ही फोटो सुंदर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

सुंदर. दुसरा फोटो आधी पाहिला होता. पहिला अधिक आवडला. दुसऱ्यात कदाचित जास्त फ्रेम्स घेतल्यामुळे पांढुरका आणि कमी रेझोल्यूशनचा दिसतो आहे का? पहिल्यात खूपच जास्त बारकावे दिसत आहेत.

लेखाला आत्ता श्रेणी देत नाही. हे फोटो कसे काढले हे समजावून सांगितलं तर ५ श्रेणी देता येईल. नाहीतर चारच द्यावी लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाटाआ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त आलेत फोटु!! फोटो काढायचे तंत्र इथेच सांगितले असते तर बरे झाले असते!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोन्ही फोटो अप्रतिम आले आहेत. मला त्यातला दुसरा जास्तं आवडला, त्यात प्रकाश जरा जास्तं आहे असे वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

माझ्या पटलावर जितपत दिसते, तेवढ्या रेझोल्यूशनमध्ये मला तरी रेखीवपणात फरक कळून येत नाही.

दोन्ही चित्रांत फक्त ~२५६ करड्या छटा आहेत - डिजिटल चित्रांत हेच असते, "फक्त" हा अपशब्द नाही. जर दोन चित्रांत मूळ सिग्नल-टु-नॉइझ कमी-अधिक असेल तर त्या फरकाची मात्रा १ करड्या छटेपेक्षा खूपच कमी आहे.

*सिग्नल-टु-नॉइझ हा फ्रेम-संख्येच्या वर्गमूळाच्या मानाने बदलेल. (बाकी गोष्टी समान ठेवल्यास.) त्यामुळे पार्शभूमीतील/एका फ्रेममधील नॉइझ लेव्हल जी काय असेल, तिच्या ~१/१५ नॉइझ पहिल्या चित्रात आहे, आणि साधारणपणे ~१/४० नॉइझ दुसर्‍या चित्रात आहे. पण हे झाले फक्त फ्लोटिंग पॉइंट नॉइझचे. जर मूळ नॉइझ लेव्हल 'क्ष' करड्या छटा असेल, आणि क्ष/१५ आणि क्ष/४० हे दोन्ही << १ करडी छटा इतके असतील, तर डिजिटल नॉइझच्या समानतेमध्ये अ‍ॅनालॉग नॉइझचे कमीअधिक कळून येणार नाही.*

पहिल्या चित्राचे करडे क्षेत्र (डायनॅमिक रेंज ऑफ ग्रे स्केल) हे दुसर्‍या चित्रापेक्षा कमी आहे. (कमी भासते आहे, खरे तर कमी नाही. दोन्ही चित्रात चंद्रकोरीच्या प्रकाशित भागाची सीमा जळजळीत सफेद आहे, आणि अंधार पूर्ण काळा आहे. पण पहिल्या चित्रात मधील भागात तितका पांढुरकेपणा नाही.) या कारणाने मला पहिल्या चित्रात रेखीवपणाचा आभास अधिक झाला. नाइल यांनी "विवरांची तुलना करा" म्हटले, त्यापेक्षा वेगळा - सैल - मानसिक निकष असलेला हा आभास आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निळ्या, ४ स्टार दिलेत हां!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अति प्रकाश वगळता, मला दुसरा फोटो जास्त आवडला. त्यात एक विवर अगदी सुस्पष्ट दिसते आहे. तर पहील्या फोटोत अनेक विवरे स्पष्ट दिसत आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चंद्रचातुर्य आवडले. तांत्रिक माहिती नाही पण पहिल्याला मत देत आहे. दुसर्‍या चित्रातील काळसर ठिपके उथळ विवरे आहेत का? तसे असल्यास पहिल्या चित्रात ते अधिक स्पष्ट आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसाद आणि मत दिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. लवकरच थोडक्यात माझा सेटअप आणि फोटो काढण्याची पद्धत यावर लिहायचा प्रयत्न करतो. त्यासाठी अजून थोडे प्रयोग आधी करावे लागतील असे दिसते.



फोटोंबद्दल.
चंद्राची कोर अर्ध्यापेक्षा मोठी झाली की प्रकाश फारच प्रखर होतो. दुसर्‍या फोटोवेळी प्रकाश कमी करण्याकरता कॅमेरावर फिल्टर लावलेला होता. हे फिल्टर चंद्राकडून येणारा प्रकाश काही टक्क्यांनी ब्लॉक करतात. यामुळे ग्लेअर कमी होतो आणि कॉन्ट्रास्ट वाढायला मदत होते. कॅमेराच्या सेन्सरचे आयएसओ इ. सेटिंग्ज दोन्ही वेळांकरता मध्ये सारखेच ठेवलेले होते.

पहिला आणी दुसरा फोटो काढताना कॅमेर्‍याची जागा बदलल्याने फोटो एकमेकांशी ९० कोनात आहेत. पण त्याचा इथे काही संबंध नाही.

दोन फोटोतला मुख्य फरक हा फोटोवरील संस्कारांमध्ये आहे. दुसर्‍या फोटोवेळी मी ही संस्कारक्रीया शिकत असल्याने केलेल्या संस्कारामध्ये माझे योगदान फारसे नव्हते, सॉफ्टवेअरच्या डिफॉल्ट सेटिंग्ज वापरल्या (म्हणजे वापरणार्‍याचे कौशल्य किमान). पहिल्या फोटोत मात्र मी संस्कार करताना संगणकाला किमान काम पडेल अश्या सेटिंग्ज वापरल्या (म्हणजे वापरणार्‍याचे कौशल्य जास्त लागावे हा हेतू). ह्या दोन प्रकियांमध्ये तुलना करणे हा माझा मुख्य हेतु होता. साधारण अर्धातास संस्कार केल्यानंतर मला असे जाणवले की मला स्वतःला जाणवण्याइतके बदल होत नाहीएत. हे माझ्या डोळ्यांना सवय झाल्यामुळे असावे काय? हा ही एक प्रश्न होता. लोकांना विचारल्यावर याचे उत्तर काय मिळेल असा विचार केल्याने दोन्ही फोटो टाकले.

मला अर्थातच पहिला फोटो जास्त चांगला आहे असेच वाटते, नाहीतर मी तो टाकलाच नसता. (कोणता फोटो आधीचा, नंतरचा हे मी मुद्दाम लिहले नाही. त्याने मतांमध्ये फरक पडू नये हा उद्देश होता.)

धनंजय म्हणतात त्याप्रमाणे पहिला फोटो 'अ‍ॅस्थेटिकली' चांगला आहे, हे खरे आहे. तशी काळजी मी घेतली होती. (फोटोची प्रखर प्रकाशाची कडा मात्र घालवण्यात मला यश आलेले नाही.) पण तरीही केलेल्या 'संस्कारांमुळे' दुसर्‍या फोटोपेक्षा पहिला फोटो चांगला आहे असे माझे मत आहे. हा फरक मी केलेल्या संस्कारांमध्येच असावा, कारण बाकी सर्व परिस्थिती, अगदी नगण्य परिणाम सोडता, सारखीच असावी. हे संस्कार म्हणजे कॉन्ट्रास्ट, ब्राईटनेस किंवा शार्पनेस नव्हे ह्याची कृपया नोंद घ्यावी.

हे संस्कार म्हणजे http://en.wikipedia.org/wiki/Stationary_wavelet_transform. दुसर्‍या फोटोच्यावेळी मी ट्रायल अँड एररने वेगवेगळ्या फ्रिक्वेंसी वापरून चांगल्यात चांगला फोटो मिळेल अश्या सेटींग्ज शोधल्या. पहिल्या फोटोवेळी मात्र मी एक मध्यम फ्रीक्वेंसी निवडली आणि उरलेल्या सॉफ्टवेअरने त्यानुशंगाने निवडू दिल्या. (हे काम मिनिटभरात झाले.)

वेव्हलेट ट्रान्स्फॉर्म आधीचा फोटो खाली देतो आहे. या इमेजमधला फक्त शार्पनेस वाढवून पहिल्या फोटोइतका स्पष्ट फोटो मला मिळू शकला नाही.




खाली मी दोन्ही फोटो २००% झूम करून एकाच फ्रेममध्ये दिले आहेत. त्यावरून पहिला फोटो जास्त स्पष्ट आहे असे मला वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile