अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. ऐसी अक्षरेवर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी बातमी नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं.
अश्या बातम्यांसाठी या धाग्याचा वापर करावा
=========
आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी सध्या ब्राझिलला आहेत. चीनच्या अध्यक्षांची व त्यांची भेटही झाली. त्याचे कव्हरेज चीनच्या मुख्य पॉपल्स डेलीत आले आहे काय या उत्सुकतेने तिथे गेलो,. त्या वृत्तपत्राने या भेटीची अजून तरी दखल घेतलेली नाही (बीबीसी ने ९ करार केल्याचे म्हटले आहे, पैकी एक संरक्षण क्षेत्राशी संबंधित आहे)
मात्र त्यावेळी पोपल्स डेलीवर लिशुई नावाच्या शहराबद्दल कळले. हे तेथील अमर्त्यांचे शहर आहे :)