मनातले छोटे मोठे प्रश्न - भाग १७

व्यवस्थापकः ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.

=========
मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे - ऐसीकर मित्र-मैत्रिण निवडीमध्ये कशा प्रकारचा चोखंदळपणा दाखवतात? म्हणजे काय बघतात? बहुश्रुतता, वाचनाची आवड, ईमानदारी (लॉयल्टी), निस्वार्थीपणा, सेन्स ऑफ ह्युमर की अन्य काही?
मला सहसा सेन्स ऑफ ह्युमर अन स्पॉन्टेनिटी, फोर्थराईट (स्पष्ट्वक्तेपणा) हे गुण अतिशय आवडतात.

field_vote: 
0
No votes yet

असे नै सांगता येणार. एकतर ठरवून मैत्री होत नाही हे खरे असले तरी सबकॉन्शसली समोरची व्यक्ती आणि आपले ट्युनिंग किती जमतेय हे पाहिले जात असावे. मात्र त्याचा नक्की अल्गोरिदम माहिती नाही व विचारही केला नाही.

माझ्या मित्रपरिवाराचा ल.सा.वि. बहुदा मला येणारी किमान एक भाषा बोलता येणारा मनुष्य असा निघेल.
अजून एकमेकांची भाषा न येणार्‍याशी 'मैत्री' झालेली नाही. बाकी सगळे नमुने आहेत Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मी तरी असे लोक बघतो जे अधिकाधिक उसने पैसे मला देउ शकतील.
त्यातही रक्कम देउन विसरुन जाणारे असले तर उत्तमच.
मग त्या त्या हिशेबानं त्यांना मस्का मारत रहायचा इतिहास - संगीत्-साहित्य्-गणित्-चित्रपट किंवा टार्गटपणा...
त्या - त्या व्यक्तीच्या आवडत्या क्षेत्राला मस्का मारत राहयचा आणि अधिकाधिक उसन्याची व्यवस्था करायची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

४ जुलैच्या वीकेंडचा उपयोग घर आवरण्यासाठी करावा असा एक प्रस्ताव माझ्याकडून मंजूर करवून घेण्यात आला. काय आवरायचे आहे याचा विचार करताना खालील गोष्टी समोर आल्या

कपडेः
१. ३४ शर्ट्स, १४ टीशर्ट्स, ३ ट्रॅडिशनल ड्रेसेस, २० पॅँट्स, ६ जीन्स, २ ऑफिस फॉर्मल ड्रेसेस (ब्लेझर वगैरे), आतले कपडे, बर्म्युडा चड्ड्या, रुमाल, सॉक्स वगैरे गोष्टींची एकूण संख्या ४०. २ स्पोर्ट शूज, २ फॉर्मल शूज, १ फ्लोटर, २ स्लीपर्स
३. यापैकी किमान १० शर्ट्स, ३ टीशर्ट्स, ६ हातरुमाल, ६ सॉक्स एकदाही वापरलेले नाहीत. (त्यांचे किंमतीचे लेबलही काढलेले नाही). आणि उरलेल्यापैकी ट्रॅडिशनल ड्रेसेस वगैरे १दा. ऑफिस फॉर्मल ५-६ वेळा व लग्नाच्या वेळेला केलेले कपडे फक्त लग्नाच्याच वेळी वापरले आहेत. बहुतेक कपडे वाढदिवस-सणवार वगैरे वेळी भेट मिळाले आहेत.
४. बायकोच्या कपड्यांचे विवरण मांडत नाही. पण माझ्यापेक्षा कमी नाहीत.

किचन
१. १ छोटा फ्राईंग पॅन, १ मोठा फ्राईंग पॅन, ३ सॉस पॅन्स, २ मोठ्या कढया, २ कास्ट आयर्न तवे. चहासाठी दोन वेगळी भांडी आहेत. शक्यतो लोखंडी तवे वापरण्याकडे कल असल्याने बाकीचे पॅन्स आता तीनचार महिने पडूनच आहेत.
२. उलथणे, डाव, हत्ती वगैरे हलवाहलवीचे दांडीवाले ८ प्रकार. (पोळी भाजण्यासाठी चपटे उलथणे व भाजी परतायला नॉन स्क्रॅचेबल किंचित वाकडे उलथणे वगैरे विविधता). झारा आहे पण दोन वर्षात फ्राईड फूड टाळण्यासाठी एकदा-दोनदाच तळणीचा प्रकार केलाय.
३. १२ चमचे, १२ फोर्क्स, ६ नाईव्ज
४. क्रोकरीमध्ये ताटवाट्या वगैरे ४ बाहेर काढून ठेवले आहेत. व 'अडीअडचणीला पाहुणे आल्यावर' लागतील म्हणून ४ ठेवणीतले ठेवले आहेत. तीच गोष्ट पाण्याच्या ग्लासांची, चहाच्या कपबशांची.
५. २ कुकर (१ छोटा व १ मोठा - इडली वगैरेसाठी लागतो). हौस म्हणून एक स्लो कुकरही घेऊन ठेवला आहेच.

इले. गॅजेटे
१. ३ ट्रॅडिशनल सेलफोन, १ स्मार्टफोन, २ आयपॉड, १ आयपॅड, १ डिजि कॅमेरा, ३ पेनड्राईव, २ लॅपटॉप, ३ पोर्टेबल हार्डडिस्क ऑफिसचा वेगळा लॅपटॉपही कायम सोबत असतोच. प्रत्येक लॅपटॉपचा वेगळा चार्जर. (एकमेकांना कंपॅटिबल आहेत!)
२. मिनियूएसबी केबल्स ६ आहेत. प्रत्येक गॅजेटसोबत १ अशी आलेली. हेडफोन्स-इयरफोन्स ५
३. एचडीएमआय केबल्स २

मिस्क
१. २० पेन्स. (यातील १५ पेन्स भेट म्हणून मिळाले आहेत.) उरलेले ५ ऑफिसातून कागदपत्रांसोबत घरी आलेले
२. ४ लेदर कवर्ड रायटिंग पॅड्स
३. ५ फ्लॉवरपॉट्स

यात फर्निचर टाकलेले नाही. तरी सामान्य मध्यमवर्गीयांकडे असते तसे सोफा-खुर्च्या-डायनिंगटेबल-बेड-साईडटेबल असे माफक फर्निचर आहेच. लाईट लावायचे खांब ३ आहेत. स्वतःचा मायक्रोवेव घेतला आहे पण आमच्या अपार्टमेंटवाल्यांनी सर्व घरांमध्ये त्यांच्यातर्फेच मायक्रोवेव बसवून दिले आहेत.

भारतातून येताना ४ बॅगांमध्ये नवराबायको असे आमचे दोघांचे सगळे सामान बसले होते. त्या सामानावर दोनमहिने सुखात जातच होते. एक वर्षानंतर मूव केले तेव्हा एक छोटी व्हॅन घेऊन सामान हलवले होते. मागच्या वर्षी १४ फूट लांब ट्रक लागला होता. आता पुढच्या वर्षी २१ फूट ट्रक लागतो की काय अशी भीती आहे.

कशासाठी ही सगळी अडगळ गोळा करुन ठेवली आहे असा प्रश्न पडतो. फेकून द्यायचे जिवावर येते.

काहीतरी उपाय सांगा बॉ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गुड्विल ला डोनेट करा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाटाआ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

भाज्या हलवायच्यात ओ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इचिभना कुणाची काय दु:खं!

४ लेदर कवर्ड रायटिंग पॅड्स

मला पाठवून द्यावेत Wink

Books are conspicious by absence.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

books are conspicious by absence.

वरील यादीत किंडल लिहायचा राहिलाच. किंडलमुळं बरीच जागा वाचली. तरीही २५ च्या आसपास मराठी पुस्तकं इथं आहेतच. भारतात आणखी ८०० पुस्तकं आहेत. त्या पुस्तकांना गेल्या दोन वर्षात कोणीही हात लावलेला नसेल याची खात्री आहे. कॉलेजपासूनची ३०-४० रेफरन्स बुक्स (फाईल स्ट्रक्चर, डेटाबेस, ऑपरेटिंग सिस्टम, प्रोग्रॅमिंग लॅँगवेज) नंतर कधीतरी लागतील म्हणून ठेवली आहेत. आता रद्दीतच द्यावी लागतील. वेळोवेळी घेतलेल्या ट्रेनिंगचे मॅन्युअल्स वगैरे उजळणी करायला उपयोगी पडतील म्हणून ठेवले आहेत पण एकदाही उघडून पाहिलेले नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो. घर बदलताना सामानाची हलवाहलव मलाच करावी लागते. खरंतर माणसाला एका बॅकपॅकमध्ये बसेल इतक्या वस्तू पुरायला हव्यात. नुसती पेनं बघितली तरी प्रत्येक भेटवस्तू म्हणून मिळालेल्या पेनाबरोबर काही आठवणी निगडित आहेत. एक पेन मित्राने, दुसरा चांगल्या मॅनेजरने, तिसरा खडूस मॅनेजरने, चौथा पेन माझ्या एका अंध मॅनेजरने स्वतः सुतारकाम करुन घरी बनवलेला, एक पेन मेव्हण्याने, एक बायकोने, एका पेनला पेनड्राईव इनक्लुडेड आहे, दुसऱ्या पेनला स्टायलस, एक पेन कॅल्विन क्लेन ब्र्याँडचा काही वर्षापूर्वी मित्राच्या आग्रहाखातर विकत घेतलेला.

आणि वापरायची वेळ येते तेव्हा कंफर्टइन वगैरे हॉटेलमधील रुममधून ढापलेलाच पेन हाताशी असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वर्षातून एकदा घर आवरायचे आणि गेल्या वर्ष दोन वर्षात न वापरलेल्या वस्तू घराबाहेर काढायच्या म्हणजे जास्त सामान वाढत नाही. इकडे मोलकरीण, वॉचमनला देता येते. तिकडे काय करता येइल माहित नाही.
महागाच्या चांगल्या अवस्थेतल्या इले, किचन वस्तू रिसेल करू शकाल असे वाटतेय. किंवा शेजार, कलिग्जमधे कोणाला हवे असल्यास देऊन टाका. ल्यापटॉप मला पाठवून द्या. गरीबाच्या दुवा मिळतील Wink
भारतातली पुस्तकं वाचनालयाला डोनेट करू शकता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लॅपटॉपची खरंतर गंमत आहे. मी हा लॅपटॉप २००६ साली विकत घेतलाय. वजन फक्त ४.५ किलो. अजून बॅटरीसकट व्यवस्थित चालू आहे. फक्त त्याच्यावर विंडोज चालत नाही. फार जुने कॉन्फिगरेशन असल्याने लिनक्सच चालते. मी तो एकदाचा लुडकायची वाट बघतोय. म्हणजे तो फेकून देता येईल. परत लॅपटॉप घेणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तरीही तुमच्याकडे मेणबत्त्या, लेगो, DIY ची उपकरणं, सायकली, सायकल गाडीला अडकवायचा स्टँड, अन्न आणि माणसांसाठी निराळे वजनकाटे, बाल्कनीत ठेवायच्या खुर्च्या, फोटोफ्रेम्स, पंखे, प्रिंटर, कपडे वाळवायचा एअरर अशा अडगळीच्या गोष्टी नाहीत तर!

गेल्या दोन वर्षांत न वापरलेल्या वस्तू काढून टाकायचा कार्यक्रम आम्ही, गेल्या वर्षी घर हलवल्यानंतर केला. यापुढे दरवर्षातून एकदा करायचा निर्धार तरी केला आहे. कागदपत्रांबाबत हे बरंच जास्त वेळा होतं. सध्या जरा कंटाळा आला, उदास वाटलं की मेणबत्त्या जाळून संपवून टाकते. न‌‌वीन काही वस्तू आणावी असं वाटलं की मला गेल्या वर्षी आम्हीच सामान हलवलं होतं त्याची आठवण होते. (पुढे चार दिवस पेलाभर पाणी पितानाही जन्मदात्री आठवत होती.) आपसूक घरात कमी सामान येतं; मोडकी यंत्रं, भांडी, चमचे भंगारात जातात. पुस्तकांबद्दल मी फार विचार करत नाही, विशेषतः हाफ प्राईस बुक्स नामक दुकानात. पुस्तकं जड असली तरीही रचून ठेवणं, खोक्यात भरून हलवणं फार कठीण नसतं. घरात पुस्तकं मांडून ठेवली की कूल पॉईंट्ससुद्धा मिळतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बाल्कनीत ठेवायच्या खुर्च्या सुरुवातीला घेतल्या होत्या. नंतर मूव करताना नवीन घराला बाल्कनीच नव्हती त्यामुळे कोणते सामान न्यायचे नाही हा विचार करताना त्या विकून टाकल्या. आताच्या घराला बाल्कनी आहे पण स्टिंक बग्जच्या त्रासामुळे बाल्कनीत बसता येत नसल्याने खुर्च्या घेतल्या नाहीत. माणसांचा वजनकाटा आहे. २ पंखेही आहेत. पण एसीपेक्षा पंखा लावणे सोयीचे व स्वस्त पडते त्यामुले ते आवश्यक वाटतात. माणसांचा वजनकाटा वापरुन डॉक्टरची बिलेही कमी झाली आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय गं त्या सुगंधी मेणबत्त्या. मी अमेरीकेत आल्या आल्या फार आकर्षण होतं. पण आता गुदमरायला होतं त्यांच्या उग्र पण सुगंधी वासाने Sad
मला मेणबत्त्यातला, "फ्रेश लिनन" सेंट त्यातल्या त्यात बरा वाटलेला. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या विषयावर पॉल ग्रॅहम यांनी छान लेख लिहिला आहे. पुस्तकांबाबत त्यांचे मत पटण्यासारखे आहे.
http://www.paulgraham.com/stuff.html

खालील दुव्यावरील लेखही छान आहे. त्यातील विशेषतः घरातील अडगळींची चित्रे प्रचंड आवडली. आमच्या शेजाऱ्यापाजाऱ्यांची घरे अशीच आहेत.
http://magazine.ucla.edu/features/the-clutter-culture/index.html

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पॉल ग्रॅहॅमचा लेख फारच आवडला.

The worst stuff in this respect may be stuff you don't use much because it's too good. Nothing owns you like fragile stuff.

हे तर अगदीच पटलं. उन्हाळ्यात रोजच्या वापरासाठी आणि बाहेर जाण्यासाठीही दोन पांढऱ्या विजारी आणल्यापासून हा प्रकार माझ्याबाबतीत बराच कमी झाला आहे. "पांढरा रंग खराब झाला तर धुवून टाकू किंवा टाकून देऊ" असा विचार करायला लागल्यावर बऱ्याच बाबतीतला हा ताप कमी झाला.

या गप्पांवरून ऑस्टीनमधलं 'भंगाराचं देऊळ' (The Cathedral of Junk) आठवलं. हे तिथले फोटो. दुमजली देवळाच्या पहिल्या मजल्याची स्लॅब आणि पायऱ्यांचा काही भाग फक्त सिमेंट ओतून बनवला आहे. बाकी सगळं भंगार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अहो, अमेरिकन ना तुम्ही? नवीन मोठे घर घ्या. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमेरिकेत बोहारणी असतात का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

उमेरीका जाऊदेत. इकडे आपल्या ब्रह्मांडाच्या केंद्रात जुने स्टीलचे डब्बेडुब्बे देऊन नवीन काहीतरी घ्या असा काही पर्याय कुठे आहे का? जुन्याची किंमत कशी ठरवतात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जुने कपडे देऊन भांडी घेण्याची सोय आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मोड* घालता येते(तुळशीबाग, लक्ष्मी रोडचे उपरस्ते) , दुकानदार/ग्राहक मिळवून किंमत ठरवतात.

* मोड साधारणपणे तांब्या/पितळ्याची घालतात, पण स्टील चालुन जावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो क्रेगबाबाने सोय करुन ठेवली आहे न?, जमेल त्या गोष्टी फुकट द्या, जमेल त्या स्वस्तात विका, गॅरेज सेल लावा, कपडे छान धुवून इस्त्री करुन भारतातल्या सेवाभावी संस्थांना कुरिअर करा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भवानराव पंतप्रतिनिधींच्या "स्वतंत्रपूर" नावाच्या open prison experiment वर एकादं पुस्तक/सिनेमा**/माहितीपट आहे का?

-------
** दो आंखे बारा हात वगळता

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

खरोखरच उपाय करायचे असतील तर स्वयंशिस्त आवश्यक. काही नियम घालुन घ्यावेत.

उदा. आम्ही फक्त एक गोदरेजचे कपाट दोघांसाठी मिळून घेतले आहे. त्यात दोघांचेही कपडे (इस्त्रीचे + बिना इस्त्री), डॉक्युमेंट्स व लॉकरमध्ये लहानसहान दागिने वगैरे सगळे ठेवायचे असते. कोणताही नवा कपडा घ्यायची वेळ आली की आधी कपाटात जागा करावी लागते. तेव्हा कमी वापरातले/न वापरातले कपडे बोहारीण/इतर कष्टकरी व्यक्ती/संस्था यांना दिले तरी जातात नैतर भाज्यांच्या पिशव्या/साडी व/वा शर्ट कव्हर्स वगैरे शिवले तरी जातात नैतर मग अगदीच रिसायकल होण्यासारखे नसेल तर फाडून त्याची फडकी केली जातात वा कार पुसणार्‍या मुलाला गाड्या पुसायला दिले जातात. तेव्हा दिड आडव्या खणात मावतील एवढेच कपडे दोघांचेही असतात.
इतर वस्तुंचेही तसेच डुप्लिकेट वस्तु होता कामा नये व जी वस्तु सहामहिना-वर्षभरात एकदाही वापरली नसेल तिला डिस्कार्ड करावे.

पुस्तकांसाठी मात्र वेगळे कपाट आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

खरंय. कपडे अगदी फाटेपर्यंत वापरायची मध्यमवर्गीय वृत्ती सोडायला हवी. २००५-२००६ला घेतलेले कपडे अजूनही चांगले आहेत. वापरतोय. पण मधल्या काळात - विशेषतः लग्नाच्या वेळी - इतके कपडे आले की विचारता सोय नाही. कपडे नाही इतर वस्तू भेट म्हणून दिल्या जातात. विकत घेतलं नाही तरी वस्तू येतच राहतात. नाकारल्या तर भेट देणाऱ्याला राग येतो. वापरता न येणाऱ्या शाल-टोपी वगैरे गोष्टी पटकन देता येतात. नारळ वगैरेंच्या खोबऱ्याच्या वड्या करता येतात. पण चांगले शर्ट-पॅँट टाकून द्यायचे म्हणजे माज आल्यासारखे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही वापरण्याची शक्यता नसणार्‍या भेटवस्तु अनेकदा दुसर्‍यांकडे फिरवतो. म्हणजे बायकोच्या नातेवाईकांकडून आलेल्या वस्तु माझ्या नात्यात व व्हायसे वर्सा. Blum 3
फक्त अशी गिफ्ट वेगळी काढून ठेवतो व कोणते कोणी दिलेय याची एक चिठ्ठी टाकून ठेवतो.

माझ्या सासुबाई नको असलेल्या साड्यांपासून साडी कव्हर्स, शर्ट कव्हर्स, पिशव्या, इतरही पर्सेस वगैरे शिवतात. बरेच जण न आवडणार्‍या रंगाच्या साड्या आल्या, शर्टपीसेस आले की त्याचे असेही करून घेतो अधिक चांगला उपयोग होतो. Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तंतोतंत. Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

तुला साड्या भेट म्हणून देतात? हौ डेअर दे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

'मार्मिक' श्रेणी दिलेली आहे. Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अगदी अगदी..

तुला साड्या देतात भेट म्हणून आणि तू गपचूप स्वीकारतेस?

छे.. बांगड्या भर हातात..!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बांगड्या! मला आवडतात बांगड्या. पण बांगड्या घालून एकदा कीबोर्डावर काम करून पाहा... मग कळेल. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

किंवा कुणाची धुलाई करतानाही ह्या मेल्या बांगड्या फारच मधे मधे करत असतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हिंसा और मैं? कभ्भी नही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

वाक्यात "अ" हा prefix राहून गेला काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

"मुळ्ळीच नाही." Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

साड्यांपासून उत्तम सलवार-खमीस-ओढणीसकट / कुर्ते शिवले जाऊ शकतात, हे ज्ञान तुम्हांला अद्याप झाले नाही काय? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाउस का नाही येत ?
कुणी आहे का इकडे? जे माझ्या सारखं गाडी धुण्यासाठी पावसाची वाट पाहत आहे Wink
(एक अरसिक चातक ) सिफ़र

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गाडी घेऊन मुंबईला या, पाऊस चालू झाला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मुंबैत पाउस नसला तरी गाडी धुतली जाउ शकते -- समुद्रात गाडी घालून!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

बरेच लोक अंघोळीसाठी थांबलेत, तुम्हाला काय गाडीची पडली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आंघोळ केली नाही तर कै बिघडत नै.... डिओ असतात की !!! Smile

पण गाडी घाण असेल तर लोक वैट नजरांनी पाहतात. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अन त्या ***ना फाट्यावर सहजी मारताही येत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मोदी सरकारला एक महिना होऊन गेला.
यादरम्यान सर्वात कार्यक्षम व उत्तम कामगिरी कोणाची झाली आहे असे तुमचे मत आहे? (पंतप्रधानांना पकडून सर्व मंत्री)

----

माझ्या मते परराष्ट्र मंत्री श्रीमती सुषमा स्वराज यांची कामगिरी इतरांच्या कैक योजने उजवी आहे. पहिल्याच दिवशी सार्क देशांच्या राष्ट्रप्रमुखांच्या भेटींनी सुरू झालेली कारकिर्द, नंतर मोदीं समवेत भूतान, नंतर एकट्याने बांगलादेश वारी करून त्या संबंधीचे प्रश्न हाती घेणे काय, चीनशी बदलते संबंध नी त्याच बरोबर जपानशी सुधारत ठेवलेले संबंध/वाटाघाटी, ममता ब्यानर्जींना फोनवून बांगलादेश सीमाप्रश्नावर त्यांची सहमती मिळवणे काय, अफगाणिस्तानमध्ये भारत घेऊ पाहत असलेली नवी भुमिका, इराकमधील भारतीयांचा प्रश्न हाताळणे, डिफेन्स सेक्टरमध्ये शस्त्रास्त्र निर्मितीत प्रायवेटायझेशनचे मधाचे बोट लावल्यावर लागलेली पाश्चात्यांची रीघ (उदा. सध्या मॅकेन पायर्‍या झिजवत आहेत. त्यांचे राज्य शस्त्रनिर्मितीत बरेच पुढे आहे ना!) व्यवस्थित हाताळात भारताचा फायदा बघणारे प्रस्ताव मांडणं काय एका महिन्यात सर्वाधिक काम आणि सर्वात निगुतीने काम त्यांनी केले आहे असे मला वाटते.

तुम्हाला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बांगलादेश सीमाप्रश्नाबाबत त्यांनी नक्की काय केले ते जाणण्यास उत्सुक आहे.

माझ्या माहितीप्रमाणे, गेल्या UPA सरकारने ठरवलेल्या एन्क्लेव सभोवतीच्या राष्ट्रांत विसर्जित करायच्या प्रस्तावाला भाजपाने सर्वाधिक विरोध केला होता.

आता त्या धोरणात नक्की काय बदल झाला आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धोरणात बदल नाही.
भाजपाने काँग्रेसचेच धोरण पुढे नेले आहे. (जे योग्यही आहे असे माझे मत. तेव्हाचा विरोध हा मुर्खपणा होता - अर्थात हे ही माझेच मत)

फक्त फरक अंमलबजावणीत आहे. सगळ्या स्टेकहोल्डर्सना बरोबर घेऊन यावेळी पावले उचलली जाताहेत.
स्वराज केवळ हसीना यांना न भेटता तेथील विरोधी पक्षनेत्यांना भेटून त्यांच्याशीही या विषयावर बोलल्या असे समजते. शिवाय ममता बॅनर्जींना पहिल्यापासून लूपमध्ये ठेवल्याने गेल्यावेळ प्रमाणे त्या फियास्को करणार नाहीत अशी आशा आहे (तिस्ता प्रश्नावर अजूनही त्या राजी नाहीत, त्यात स्वराज बैंची कसोटी लागेल).

दुसरी महत्त्वाची घटना म्हणजे विजा नॉर्म्स काहीसे सोपे केल्याने तयार झालेले गुडविल आहेच, शिवाय मनमोहन सिंग सरकारने बहुदा १० बिलीयनची लाईन ऑफ क्रेडीटचे अ‍ॅग्रीमेंट केले होते. प्रत्यक्षात शेवटच्या गव्हर्नन्स पॅरालिसीसच्या काळात त्यावर पुढे काहीच झाले नव्हते. त्या कर्जाची काही रक्कमही मोकळी केल्याचे समजते. यामुळे बांगलादेशातील रस्ते व रेल्वेला मदत होणार आहे. शिवाय आपल्याकडील पुर्वोत्तर राज्यांना जोडणारे रस्ते बांधले जाणार आहेत ज्यामुळे तेथील व्यापाराला संधी मिळेल.

यातील सगळे निर्णय नवे आहेत असे नाही. ज्या नव्या उत्साहाने व धडाडीने त्या राबवताहेत त्याचे कौतुक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

एन्क्लेव विसर्जित करण्याला विरोध का आहे ते समजलं नाही. तो विभाग तसाही संलग्न नाही. फार तर तत्रस्थ नागरिकांना भारतात आणून भूभाग तेवढा बांग्लादेशला दिला तरी ठीक असं वाटतं. कारण भूभाग आणि लोक दोघेही लै कमी आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

विरोधासाठी म्हणून विरोध, हे एक कारण असू शकते. शिवाय, भारतातील बांगला एन्क्लेवची संख्या आणि क्षेत्रफळ हे बांगलादेशातील भारतीय एन्क्लेवपेक्षा कमी आहे. तेव्हा शेवटी भारताचे क्षेत्रफळ कमी होईल (बांगलादेशचे वाढेल), हेदेखिल कारण असू शकेल.

अशा (दुखर्‍या) बाबी "उजवे" सरकार सत्तेवर असतानाच सुटल्या तर सुटतात!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हम्म.माहितीकरिता धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अहो, त्या प्रधानबाबांवरची आशंका कधी जाणार आणि भुवया कधी खाली येणार ते सांगा. ROFL ROFL ROFL ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अरुणजोशींची मॉडर्न जमान्याबद्दलची आशंका आणि ऋषिकेशची मोदीबद्दलची आशंका बहुधा एकाच वेळी लय पावाव्यात ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अगदी अगदी !! पण समजा दोनपैकी एक आधी लयाला जाईल. ती कुठली असेल? फॉर्मर की लॅटर?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

एकवेळ ऋषिकेश मोदीसमर्थक होईल (स्वारी बरंका ऋ), पण अरुणजोशी हे (जुन्या काळातल्या हाल अपेष्टा भोगाव्या लागत नसल्याने) नव्या जमान्याबद्दल चांगले बोलणे अशक्य!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

A small, little, cute change here -

नव्या काळातल्या हाल अपेष्टा भोगाव्या लागत असल्याने

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

जुन्या काळातल्या हाल अपेष्टा भोगाव्या लागत नसल्याने जुन्या जमान्याबद्दल वाईट बोलणे अशक्य.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तर्क प्रचंडच आवडला.
हे असं नेमकं कसं होतं? वाद कसे होतात? वेगळ्याच भावना त्याच काळाबद्दल इतक्या वेगवेगळ्या असण्याचं कारण काय?
बेरजेतला नेमका कोणता हातचा धरायचा राहून गेलाय म्हणून असं होतं?
अशा विविध प्रश्नांची नेमकी उत्तरं सदर तर्क देतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

इराकमध्ये अडकलेल्या व परतू इच्छिणार्‍यांना, एक चेहरा व अधिकृत व्यवस्था नसणार्‍या व्यक्तींशी यशस्वी वाटाघाटि करून पुन्हा आणणे हे अतिशय कौशल्याचे काम स्वराज यांनी अगदी निगुतीने केलेले दिसतेय. त्यांचे विशेष अभिनंदन!

पुरवणी: वाचा: दक्षिणेतील राणी/देवी सुषमा Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

प्रेयसी आणि प्रियकर ऐवजी प्रेयसी आणि प्रेयस असे का म्हणत नाहीत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कल्पना नाही. पण अर्थदृष्ट्या 'प्रेयस' म्हणायला खरोखरच प्रत्यवाय नसावा.
१. <नंदन> फारसे प्रेयस्कर नसावे <नंदन> Wink
२. <३_१४ विक्षिप्त अदिती> तरी बरं प्रियकर-प्रियकरीण म्हणत नाहीत ते.. <३_१४ विक्षिप्त अदिती> Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> प्रेयसी आणि प्रियकर ऐवजी प्रेयसी आणि प्रेयस असे का म्हणत नाहीत? <<

माझ्या माहितीनुसार 'प्रेयस्' अमूर्त संकल्पनेसाठी वापरतात. उदा : इथे पाहा. त्यामुळे सजीव पुरुष अभिप्रेत असतो तेव्हा 'प्रियकर' हा वेगळा शब्द प्रचलित आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सहमत. श्रेयस्-प्रेयस् अशी ती जोडी असते. प्रेयस् म्ह. जे चांगले वाटते ते पण जे खरे तर लाँग टर्म/ब्रॉडर पिच्चरमध्ये हानिकारकच असते ते आणि श्रेयस् म्ह. लाँगटर्म, ब्रॉडर पिच्चर, इ. निकषांवर योग्य असते ते. उदा. मसालेदार अर्बटचर्बट खाणे हे प्रेयस् तर हेल्दी, 'गवताळ' खाणे हे श्रेयस्. इ.इ.इ. कठोपनिषदात यासंबंधीचा श्लोक आहे.

विकी दुवा.

श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यमेतः
तौ सम्परीत्य विविनक्ति धीरः ।
श्रेयो हि धीरोऽभि प्रेयसो वृणीते
प्रेयो मन्दो योगक्षेमाद्वृणीते ॥ ॥ कठ उपनिषद् – 1.2.2 ॥

Translation:

The righteous and the pleasurable approach man.
The intelligent one examines both and separates them.
Yea, the intelligent one prefers the righteous to the pleasurable,
(whereas) the ignorant one selects the pleasurable
for the sake of yoga (attainment of that which is not already possessed)
and kshema (the preservation of that which is already in possession). – Katha Upanishad – 1.2.2 [10]

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>> the intelligent one prefers the righteous to the pleasurable,
(whereas) the ignorant one selects the pleasurable <<

इथेच भारतीय संस्कृती मार खाते आणि मग बिचारी आजची तरुणी मिनिस्कर्टवर पबमध्ये जाऊ शकत नाही. सांगा बरं भारतीय संस्कृतीचा अभिमानी असलेला कुणी हुशार पुरुष तिची निवड करेल का? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

करेल की, न करायला काय झालं? आता तो निवडकर्ता हुषार आहे किंवा कसे हा दुस्रा भाग झाला.. Wink

(संस्कृत्यभिमानी पुरुष) बॅटमॅन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ते ठीके ओ, पण प्रेयस् हा शब्द नपुंसकलिंगी आणि प्रेयसी हा स्त्रीलिंगी असेल तर त्याचे पुल्लिंगी रूप नाहीच का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे

यापूर्वीचा प्रश्न काय होता?

ऐसीकर मित्र-मैत्रिण निवडीमध्ये कशा प्रकारचा चोखंदळपणा दाखवतात? म्हणजे काय बघतात? बहुश्रुतता, वाचनाची आवड, ईमानदारी (लॉयल्टी), निस्वार्थीपणा, सेन्स ऑफ ह्युमर की अन्य काही?

१. मित्र वैगेरे असलेल्या लोकांमधून निवडावे लागतात. म्हणजे मी मित्राचे स्पेसिफिकेशन्स लिहिले तरी असा व्यक्ति मी शोधत फिरत नाही. जे कोणी आहेत त्यातून फार फार समाईक काय निघते ते पाहतो.
२. त्यानंतर प्रथमतः मित्रांचे चयन हे गुणात्मक नसतेच असे मला वाटते, सहसा ते प्रसंगात्मक असते. जितक्या रोचक प्रसंगात कोणी भेटला तितका तो जवळचा वाटतो. लोक वा मित्र प्रसंगांनीच दुरावतात. प्रसंग लोकांकडून विशिष्ट प्रकारे वागवून घेतात.
३. आता इथे चॉइस असेल तर सहसा काही विशिष्ट गुणांचे लोक मित्र होण्यापेक्षा सर्वप्रथम समान अस्मितांचे लोक मित्र होतात.
४. त्यानंतर समान व्यसनांचे, सवयींचे, रुचींचे, इ इ मित्र होतात.
५. इतके सारे करून झाल्यावर आपला मित्र कोण असावा आपेक्षा आहे तो मित्र कसा असायला पहिजे होता असे वाटते.
६. काळाचाही महिमा आहेच, पण त्यावर संपर्काने प्रचंड परिणाम होतो असे जाणवले आहे.
आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर. ज्याच्याशी मी कोणती म्हणजे कोणती म्हणजे कोणतीही गोष्ट शेअर करू शकतो, जो ती समजून घेतो, त्याच अपेक्षा माझ्याकडून करतो, इ इ. त्यानंतर जो माणूस माझ्याशी 'हिशोब' करत नाही त्याला मी खरा मित्र मानतो. हिशोब न करण्याला वास्तवाच्या मर्यादा आहेत, पण तशी आंतरीची इच्छा असणे मला आवडते. अजून एक गोष्ट आहे. माणूस इतरांना कसे वागवतो! सहसा मला सर्वांना चांगले वागवावे वाटणारे लोक आवडतात. 'दे आर नॉट अवर क्लास' वृत्ती टर्न ऑफ करते.

मला सहसा सेन्स ऑफ ह्युमर अन स्पॉन्टेनिटी, फोर्थराईट (स्पष्ट्वक्तेपणा) हे गुण अतिशय आवडतात.

माझ्या असेसमेंट प्रमाणे मित्र 'चांगला मनुष्य' असणे मला गरजेचे वाटत नाही. 'चांगला मित्र' पुरेसे आहे. काही गुणांप्रमाणे काही अवगुण असणेही मी पसंद करतो (त्यांना उपदेश वैगेरे करायला मजा येते.).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

रोज एखाददोन सिनेमे उतरवून घेणे आणि जनरल सर्फिंग करणे यासाठी किती जीबीचा (पर मंथ) प्ल्यान पुरेसा ठरेल? मला काही अंदाजच येत नाहीय. घरच्या एमटीएनएलनं वारंवार राम म्हणायला सुरुवात केलीय आणि बाकीच्या प्रोव्हायडर्सचे प्ल्यान्स बघून मी गोंधळलेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

रोज एखाददोन सिनेमे उतरवून घेणे

बाब्बौ!! घरचं नेट पाहिजे की हाष्टेलातलं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

घरचं. वायफाय. रोज एखाददोन म्हणजे फार होतं नाही?! आठवड्याला एखाददोन तर कुठ्ठेच नाही गेले. Tongue

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

या हिशेबाने महिन्याला १० जीबीपेक्षा जास्त लागेल किमान. तसे प्लॅन्स आहेत-काही मित्रांनी महिन्याला ८० जीबीचा प्लॅन घेतला आहे, त्याला किती पडतात ते पाहिलं पाहिजे. कमीतकमी २००० तरी आरामात लागावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

रोज एखाददोन सिनेमे

!!! बापरे, तरी कोणत्या दर्जाचे? एचडि रिप? ब्लुरे रिप? साधारण १ गिगाबाइटचा एका सिनेमा असा हिशोब धरला तर तुम्हाला अनलिमिटेड वाला प्लानच उपयोगी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो, अनलिमिटेडच हवाय. माझ्याकडे मटनलचा ४९९ रुपयेवाला प्ल्यान होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पण रोज १,२ सिनेमे उतरवायला बॅन्डविड्थ वरची पाहिजे, निदान ४एमबिपिएस ची लाईन हवी. एकुण काय 'होउ द्या खर्च', बिएसएनलचा ९०० चा प्लान घेतला तर निदान २-३ दिवसात एखादा सिनेमा मिळेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डेटा क्याल्कुलेट करताना फक्त पिच्चर साईज क्याल्कुलेट नका करू कारण टोरेंटवरून डाऊनलोड करताना डेटा अपलोडपण होत असतो. भरपूर पिच्चर पाहिजे असतील तर अन्लिमितेड प्ल्यानच बेष्ट. स्लो असला तरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अनलिमिटेडच घ्यायचाय. पण किती जीबीचा घ्यावा, असा प्रश्न.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अनलिमिटेडच घ्यायचाय. पण किती जीबीचा घ्यावा, असा प्रश्न.

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

द मा मिं च्या "भोकरवाडीच्या गोष्टी" मधला बाबू पैलवान उपोषणाला बसतो. कोणीतरी त्याला विचारतं - उपोषण प्राणांतिक का लिमिटेड?

बाबू म्हणतो
"पहिले दोन-चार दिवस प्राणांतिक करून पहाणार. उपेग झाला तर ठीक. नाहीतर लिमिटेड."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हसा च्यायला. प्रामाणिकपणे प्रश्न विचारला तर हसतंय पब्लिक. अशानी कुणी कशा शंका विचारणार हितं? संपादक, सं-पा-द-क. संऽऽऽपादक!
मला हे बघून प्रश्न पडलायः http://tikona.in/for-home/broadband-plans/plans/

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

2Mbps , 50GB
" 900
Per Month
Post 50 GB,
Unlimited usage
@512 Kbps

हा घेऊन टाका. बेष्ट आहे. जर क्लेम केलेले स्पीड खरच मिळत असतील तर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

धन्यवाद. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

हा प्लान ठिक वाटतोय, पण तिकोनाचा रिव्ह्यू कसा आहे ते तपासुन पहा.

4Mbps , 10GB
" 700
Per Month
Post 10 GB,
Unlimited usage
@512 Kbps

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हां, मलापण हाच भारी वाटलेला. ५० जीबी जरा जास्त वाटतायत. रिव्यू पाहते. हाबार्स. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ROFL

पण अगदीही वाईड बॉल नैये म्हणा तो प्रष्ण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बघ की! इथे मी गोरीमोरी होऊन पटकन आल्ट्+टॅब मारला लोकांना हसताना बघून. च्यायला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

गोरीमोरी

उपवास प्रकरणात एच्च० मंगेशराव आणि वरदाबाई येऊन "पंत, एक थोडं डिव्होशनल साँग म्हणायचं इच्छा आहे" म्हणून गाणं सुरू करतात. तेव्हा मंगेशराव कसल्याश्या ठुमरीत शिरले आणि वरदाबाईंनी 'तुम्बिन मोरी'त तोंड घातले, ते या निमित्ताने आठवले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ह्या बॅटमन(बॅटोबा रेगे) ला प्रसंगाचं गांभिर्य म्हणून नाही. Smile हलकेच घ्या हो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गांभीर्य नसल्यावर हलके घेणार नैतर काय जड Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

इंग्लंडातली poundland म्हणून दुकानं ठौक होती. तिथं एक पौंड इतक्याच किमतीतल्या वस्तू मिळायच्या.
आपल्याकडे "हरमाल पंधरा रिकिया/रुपिया" म्हणत हातगाडीवाले प्लास्टिकची खेळणी/वस्तू विकायला येतात ना, तसच.

त्याच धर्तीवर पौड रस्त्यावर एका दुकानावर दिसली :-
rs45 to 95 & above

आँ?
95& above म्हणजे नेमकं काय ?

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ऑ> अनलिमितेड आणि जीबीचअम लिमिट? समजा नहि मेरेको

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अनलिमिटेड प्लॅनमध्ये, सुरवातीच्या काही जीबीपुरता ठीकठाक स्पीड अन पुढे 'अनलिमिटेड' ला उंदीरमुतवणी स्पीड असा फंडा असतो म्हणताना प्रष्ण बरोबर आहे.

हा शब्द गोनीदांकडून साभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वायफाय घेतला असेल तर डेटा लिमिट नसते. कितीही डेटा तितक्याच स्पीडला मिळतो.

माझ्याकडे ७००० रु वर्षाला असा प्लॅन आहे. साधारण १ एमबीपीएस स्पीड मिळतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हम्म मग बरोबरे. मी डाँगल स्कीमबद्दल बोलत होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

यक्क
.
.
छी....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

फॅलोमेनियाकस मनोबस कुठला.

(बॅटस खौचट्टिकस).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

दादा काय सांगता, कोण तो सर्वीस प्रोवायडर??? ७के वर्ष आणि एक एमबीपीएस??? लै म्हणजे लैच भारी!!!!! फर्स्ट इयर ला मित्राबरोबर बियेस्णेलला चुना लावायला शिकलेलो तेव्हाच इतकं स्वस्त नेट मिळालेलं.
बरेचसे प्लॅन वरती म्हणाल्याप्रमाणे काही ठराविक जीबी नंतर स्पीड हुकावणारे असतात. सध्या त्यातलाच एक वापरत आहे. मोबाईल ला एक डोंगलाला दुसरा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वायफाय मध्ये असा स्पीड हुकण्याचा अनुभव नाही. सुमारे सहा महिने वापरत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

बीएसेनेल्चा होम अनलिमिटेड घ्या.
भयंकर परवडतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

This comment has been moved here.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

This comment has been moved here.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0