तृतीयपंथियांना 'तिसरे' लिंग म्हणून सर्वोच्च न्यायालयाची मान्यता

हिजडे व तरललिंगी व्यक्तींना सुप्रीम कोर्टाने 'तिसरे' लिंग म्हणून मान्यता दिलीय. आता त्यांचा समावेश OBC म्हणून केला जाईल व त्यांना शिक्षण, नोकरी इत्यादी ठिकाणी आरक्षणही मिळेल व अधिक महत्त्वाचे व आनंदाचे हे की त्यांना आपले लिंग स्त्री वा पुरूष असे लिहिणे बंधनकारण रहाणार नसून 'इतर'/'टृतीयलिंगी' व्यक्ती म्हणून कायदेशीर रित्या वैध मार्गाने जीवन जगता येणार आहे.

अर्थात या कायदेशीर लढाईनंटर समाज स्वीकारेलच असे नाही पण निदान कायदेशीर बंधनकारक ठरल्याने हाफिसांमध्ये/शाळांमध्ये/कॉलेजांमध्ये हिजड्यांना तसेच तरललिंगी व्यक्तींनाही प्रवेश मिळु लागल्याने सामाजिक अभिसरणाला चालना मिळेल व एक दिवस असा येईल जेव्हा त्यांना 'वेगळे - हीन' वागवले जाणार नाही! आमेन!

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

वेगळे व हीन असे वागवणारे सगळेच असतात असं नाही.
सामान्यतः तृतीयपंथी ज्या पद्धतीने कुणालाही अडवून रक्कम उपटतात, व झटकन मनासारखी रक्कम न दिल्यास जे काही हातवारे व विचित्र हावभाव करतात, त्यामुळे त्यांच्याबद्दल किळस उत्पन्न होते.
किळस ही घृणेला वा हीनत्वाला जन्म देउ शकते, हे मान्य.
पण ह्यात सर्वस्वी दोष हा उर्वरित समाजाचाच आहे; असे नव्हे.
तृतीयपंथी म्हणून जे समोर येतात, त्यांच्या वर्तनाने तो समज पसरला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मुळात हिजडे असणे आणि हिजड्यांचा पैसे मागण्याचा व्यवसाय करणे या भिन्न बाबी आहेत.
धारावीत कित्येक हिजडे उत्तम पर्सेस, बॅगा बनवतात, किंवा पुण्यात एक संस्था त्यांच्याकडून काही कपडे , टिकल्या वगैरे करवून घेते.

पण ह्यात सर्वस्वी दोष हा उर्वरित समाजाचाच आहे; असे नव्हे.

बहुतांश दोष समाजाचा आहेच. त्यांना मुख्य धारेत घेऊन जर योग्य त्या रोजगाराच्या, शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या तर त्यांना असे जबरदस्तीने अंगविक्षेप करत पैसे मागत फिरावे लागणार नाही. एकीकडे समाज त्यांना कोपर्‍यात लोटणार आणि वर त्यांनी गपगुमान तिथेच पडून रहावे अशी अपेक्षा करणार म्हणजे अतीच झाले नाही का?

आतापर्यंत केवळ मुघल राजवटीत त्यांना 'पवित्र आत्मे" वगैरे समजले जाऊन समाजाने एक व्यवसाय मिळवून दिला खरा पण त्या निमित्ताने त्यांना वेगळे काढले गेले. त्यानंतर त्यांना वेगळे ठेवले गेलेच, शिवाय कोणत्याही इतर व्यवसायात शिरू दिले गेले नाही. असे असताना इतर समाज बदलल्यावरही त्यांनी तोच व्यवसाय करत कसे रहावे?

आता आशा करतो येत्या एखाद-दोन दशकात किमान काही सरकारी नोकर्‍यांमध्ये या नागरीकांना संधी मिळेल. आपण पोस्टात जाऊ तेव्हा खिडकीपलिकडे एखादा हिजडा तिकिटे देत असेल, कोणी रेल्वे इंजिन चालवत असेल तर बँकांमध्ये कॅशियर म्हणून दिसेल तर आयटी कंपन्यांमध्येही प्रोजेक्ट्स लीड करत असेल! शतकानुशतके समाजाने दाबून ठेवलेल्या स्त्रियांनी जशी प्रगती केली तशी या ही नागरीकांनी करावी ही सदिच्छा!

तृतीयपंथी म्हणून जे समोर येतात, त्यांच्या वर्तनाने तो समज पसरला आहे.

असेल किंवा नसेलही. पण तो त्यांचा 'दोष' कसा काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ओके, पण म्हणून लागलिच "खोडसाळ" म्हणायचं ? (ऋ "खोडसाळ" म्हणाला असे नाही, जो कुणी म्हणाला असेल तो.)

बाकी सर्व प्रतिसादास :-
ओके.
त्या पर्सेस वगैरे जे कोण बनवत असेल त्यावर कुणाचा आक्षेप असण्याचं कारण नाही.
प्रॉडक्ट खरेदी करताना त्यात ह्या बाबीची आदकाथी व्हायला नको.
(निदान मी तरी खरेदी करताना इतका विचार करत बसत नाही. प्रॉडक्ट आवडले, खरेदी करतो.
स्त्री,पुरुष किंवा अजून कुणीही बनवले असले तरी. मला वाटाते इतरांचेही प्राधान्यक्रम तसेच असणार.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

>> प्रॉडक्ट खरेदी करताना त्यात ह्या बाबीची आदकाथी व्हायला नको.
(निदान मी तरी खरेदी करताना इतका विचार करत बसत नाही. प्रॉडक्ट आवडले, खरेदी करतो. <<

मला वाटतं त्याआधीच्या टप्प्यावर, म्हणजे नोकरी मिळतानाच भेदभाव केला जात असावा. साध्या समलिंगी लोकांविषयीसुद्धा नोकरीच्या ठिकाणी काय बोललं जातं ते मला माहीत आहे. तृतीयपंथी तर अधिकच हिणकस प्रवृत्तींना बळी जात असणार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

बहुतांश दोष समाजाचा आहेच. त्यांना मुख्य धारेत घेऊन जर योग्य त्या रोजगाराच्या, शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या तर ...

एकीकडे समाज त्यांना कोपर्‍यात लोटणार आणि वर त्यांनी गपगुमान तिथेच पडून रहावे अशी अपेक्षा करणार म्हणजे अतीच झाले नाही का?

५ लाख टक्के असहमत.

१) एखादी व्यक्ती तृतीय पंथी म्हणून जन्मास आली हा तिचा दोष नाही. विशेषता नाही.

२) एखादी व्यक्ती ही स्त्री म्हणून जन्मास आली ह्यात तिचे कोणतेही योगदान नाही व कर्तृत्व्/विशेषता नाही. दोष ही नाही.

३) एखादी व्यक्ती ही पुरुष म्हणून जन्मास आली ह्यात तिचे कोणतेही योगदान नाही व कर्तृत्व्/विशेषता नाही. दोष ही नाही.

४) जर एक नागरिक म्हणून मला कोणत्याही व्यक्तीशी Dealings/transactions/contracts/relationships न करण्याचे स्वातंत्र्य आहे व माझ्या सारख्या हजारो व्यक्तींनी त्यांच्या त्यांच्या या स्वातंत्र्याचा वापर करून एका किंवा अनेक तृतीय पंथी व्यक्तींशी Dealings/transactions/contracts/relationships करण्यास नकार दिला - तर तो माझा (व त्या हजारो व्यक्तींचा) दोष होत नाही. Nobody has the authority to force me to deal with the eunuch. व हजारो / लाखो व्यक्तींनी जर दूर सारले (they refused to deal with the eunuch) - तर - त्याचा अर्थ - समाजाने दूर सारले असा होतो. हे जरी सत्य असले तरी मी त्यास समाजाचा दोष मानत नाही. हा समाजाचा दोष असूच शकत नाही. व "तो दोष आहे" "दोष आहे" असे समाजधुरीण जे कंठ्शोष करून सांगतात ते चूक आहे कारण तो दोष समाजातील प्रत्येक व्यक्तीला (विशेषतः नॉन तृतीय पंथी) असाइन केला गेला पाहिजे. व तरच तो दोष असतो. व म्हणून त्या व्यक्तीस मुख्य धारेत आणणे (inclusion) हे समाजाचे (इतरांचे) कर्तव्य अजिबात होत नाही. You are unwittingly imposing the cost of inclusion on to others. (इथे कॉस्ट्स चा अर्थ फक्त अर्थशास्त्रीय मेझरेबल कॉस्ट्स असा नाही.)

५) आता Anti-competitive practices / tactics मधली exclusive-dealing and refusal to deal ही दोन्ही जशी बिझनेसेस ला लावली जातात तशी प्रत्येक व्यक्तीस लावावी असे ठरले तर ... बात अलग है...

---

माझ्या वरील प्रतिसादाशी शंभरापैकी ५ करोड लोक असहमत असणारेत हे मला माहीती आहे.

पण असहमती व्यक्त करताना माझ्या मुद्दा क्र. ४ मधील वाक्यांना नीट वाचून प्रतिवाद करणे. तसेच compassion/kindness/civility/कणव्/परार्थभाव्/अनुकंपा ह्या मुद्द्यांचा वापर करून प्रतिवाद करू नये. त्याचे कारण हे की compassion/kindness/civility/कणव्/परार्थभाव्/अनुकंपा ही मूल्ये आहेत. मूल्ये ही soft-law असतात. They impose constraints. Constraints are (most of the time) costs.

मुद्दा. ४ मधील स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ अधिकार असा नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कल्याणकारी राज्यामधे कल्याणाची किंमत(वेलफेअर एक्स्पेंडिचर) आणि देशाची प्रगती(जिडिपी) ह्यांचे व्यस्त प्रमाण आहे असे सिद्ध करता येईल काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>> जर एक नागरिक म्हणून मला कोणत्याही व्यक्तीशी Dealings/transactions/contracts/relationships न करण्याचे स्वातंत्र्य आहे व माझ्या सारख्या हजारो व्यक्तींनी त्यांच्या त्यांच्या या स्वातंत्र्याचा वापर करून एका किंवा अनेक तृतीय पंथी व्यक्तींशी Dealings/transactions/contracts/relationships करण्यास नकार दिला - तर तो माझा (व त्या हजारो व्यक्तींचा) दोष होत नाही. Nobody has the authority to force me to deal with the eunuch. व हजारो / लाखो व्यक्तींनी जर दूर सारले (they refused to deal with the eunuch) - तर - त्याचा अर्थ - समाजाने दूर सारले असा होतो. हे जरी सत्य असले तरी मी त्यास समाजाचा दोष मानत नाही. हा समाजाचा दोष असूच शकत नाही. व "तो दोष आहे" "दोष आहे" असे समाजधुरीण जे कंठ्शोष करून सांगतात ते चूक आहे कारण तो दोष समाजातील प्रत्येक व्यक्तीला (विशेषतः नॉन तृतीय पंथी) असाइन केला गेला पाहिजे. व तरच तो दोष असतो. व म्हणून त्या व्यक्तीस मुख्य धारेत आणणे (inclusion) हे समाजाचे (इतरांचे) कर्तव्य अजिबात होत नाही. You are unwittingly imposing the cost of inclusion on to others. (इथे कॉस्ट्स चा अर्थ फक्त अर्थशास्त्रीय मेझरेबल कॉस्ट्स असा नाही.) <<

ठीक. आता उदाहरण बदलून काळात थोडं मागे जाऊन पाहू. पेशवाईत महारांना पुणे शहरात वावरताना सोबत झाडू आणि गळ्यात थुंकीपात्र घेऊन वावरावं लागे. त्यांची थुंकी रस्त्यात पडली तर रस्ता उच्चवर्णीयांसाठी अपवित्र होई. त्यामुळे थुंकीपात्र आवश्यक होतं. त्यांच्या पावलांमुळे उच्चवर्णीयांसाठी रस्ता अपवित्र होई. त्यामुळे त्यांना आपल्या पावलांमुळे अपवित्र झालेला रस्ता झाडत झाडत जावं लागे. म्हणून झाडू आवश्यक होता. अस्पृश्यतेअंतर्गतसुद्धा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे महारांना अशा प्रकारे वागवणं हजारो व्यक्तींना तेव्हा मान्य होतं.

 1. तुमच्या मते तो त्या हजारो व्यक्तींचा दोष नाही असं म्हणूयात का?
 2. तुमच्या मते 'तो दोष आहे' हे सांगणारे महात्मा फुल्या ंसारखे समाजधुरीण चूक होते असं म्हणूयात का?
 3. तुमच्या मते महारांवरचे हे निर्बंध नष्ट करून त्यांना मुख्य धारेत आणणं हे तत्कालीन उच्चवर्णीय समाजाचं कर्तव्य नव्हतं असं म्हणूयात का?
 4. अर्थात, मग महारांनी पेशवाईविरोधात इंग्रजांची बाजू घेतली. इंग्रजांनी सत्तेवर आल्यावर हे निर्बंध काढले. हे ठीक झालं, की हा उच्चवर्णीयांच्या आचारस्वातंत्र्यावर घाला होता?
 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

नाय नाय.

तुमच्या प्रश्नांची थेट उत्तरे -

1. तुमच्या मते तो त्या हजारो व्यक्तींचा दोष नाही असं म्हणूयात का? (माझे उत्तर -> नाही. तो त्या हजारो व्यक्तींचा दोष आहे. पण त्याही पेक्षा सत्ताधीशांचा दोष आहे.)
२) तुमच्या मते 'तो दोष आहे' हे सांगणारे महात्मा फुल्या ंसारखे समाजधुरीण चूक होते असं म्हणूयात का? (माझे उत्तर -> ते समाजधुरीण बरोबरच होते.)
३) तुमच्या मते महारांवरचे हे निर्बंध नष्ट करून त्यांना मुख्य धारेत आणणं हे तत्कालीन उच्चवर्णीय समाजाचं कर्तव्य नव्हतं असं म्हणूयात का? (माझे उत्तर -> कर्तव्य होतं)
४) अर्थात, मग महारांनी पेशवाईविरोधात इंग्रजांची बाजू घेतली. इंग्रजांनी सत्तेवर आल्यावर हे निर्बंध काढले. हे ठीक झालं, की हा उच्चवर्णीयांच्या आचारस्वातंत्र्यावर घाला होता? (माझे उत्तर -> इंग्रजांनी ते जे निर्बंध काढले ते सुयोग्य च होते. तो उच्चवर्णीयांच्या आचारस्वातंत्र्यावर घाला नव्हता.)

आता कारणमीमांसा -

पेशवाईत महारांना पुणे शहरात वावरताना सोबत झाडू आणि गळ्यात थुंकीपात्र घेऊन वावरावं लागे. त्यांची थुंकी रस्त्यात पडली तर रस्ता उच्चवर्णीयांसाठी अपवित्र होई. त्यामुळे थुंकीपात्र आवश्यक होतं. त्यांच्या पावलांमुळे उच्चवर्णीयांसाठी रस्ता अपवित्र होई. त्यामुळे त्यांना आपल्या पावलांमुळे अपवित्र झालेला रस्ता झाडत झाडत जावं लागे. म्हणून झाडू आवश्यक होता.

यामधे use of force अंतर्भूत आहे. अधोरेखित भाग हे त्याचे द्योतक आहे.

कृती १) अनेकांनी एकत्र येऊन व / वा न येता एका व्यक्तीशी/गटाशी व्यवहार न करणे. त्या एका व्यक्ती/गटाच्या मनाविरुद्ध. (refusal to deal)
कृती २) अनेकांनी एकत्र येऊन व / वा न येता एका व्यक्तीशी/गटास एक विशिष्ठ वर्तन करण्यास भाग पाडणे. त्या एका व्यक्ती/गटाच्या मनाविरुद्ध. (impose a responsibility)

ह्या दोन मधे प्रचंड फरक आहे.

पेशवाईत महारांना पुणे शहरात वावरताना सोबत झाडू आणि गळ्यात थुंकीपात्र घेऊन वावरण्यास सक्ती करणे - हे कृती २ चे उदाहरण आहे. कृती १ चे नाही.

पेशवाईत महारांना पुणे शहरात वावरताना सोबत झाडू आणि गळ्यात थुंकीपात्र घेऊन वावरण्यास सक्ती करणे - हे किमान काही प्रमाणावर तरी गुलामगिरीचे उदाहरण आहे.

--

दुसर्‍या शब्दात सांगतो -

कल्पना करा की तुमचा एक छोटासा व्यवसाय आहे. घरगुती. तुमच्या व्यवसायासाठी तुम्हाला एका पार्ट टाईम अकाऊंटंट ची गरज आहे. एखाद्या तृतीयपंथी व्यक्तीस त्यामधे अकाऊंटंट म्हणून नोकरीस ठेवणे/न ठेवणे हा तुमचा व्यक्तीगत निर्णय आहे. जर कोणत्याही कारणास्तव तुम्ही त्या तृतीयपंथी व्यक्तीस त्यामधे अकाऊंटंट म्हणून नोकरीस ठेवण्यास नकार दिलात - तर ते तुमचे स्वातंत्र्य आहे. तुमच्या त्या घरगुती व्यवसायात तुम्ही कुणास नोकरीवर ठेवावे व कोणास नाही याबद्दल तुम्हावर कोणी जबरदस्ती करू शकत नाही. व करत नाही.

तुमच्याच प्रमाणे इतरांना ही हे स्वातंत्र्य हवे आहे व त्यांना ते मिळते.

व असे जर इतर लोक जर लक्षावधी असतील तर ? It amounts to exclusion of the तृतीयपंथी person. But these लक्षावधी people cannot be denied their freedom to not employ the तृतीयपंथी व्यक्ती. Nor can these लक्षावधी people be faulted for not employing the तृतीयपंथी व्यक्ती.

---

स्वातंत्र्य (विकल्प), अधिकार व जबाबदारी ह्या तिन भिन्न आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आरक्षणाची 'सक्ती' फक्त सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणाबाबतीत असावी. खासगी उद्योगांमधे कुठेच आरक्षण नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जर एक नागरिक म्हणून मला कोणत्याही व्यक्तीशी Dealings/transactions/contracts/relationships न करण्याचे स्वातंत्र्य आहे व माझ्या सारख्या हजारो व्यक्तींनी त्यांच्या त्यांच्या या स्वातंत्र्याचा वापर करून एका किंवा अनेक तृतीय पंथी व्यक्तींशी Dealings/transactions/contracts/relationships करण्यास नकार दिला - तर तो माझा (व त्या हजारो व्यक्तींचा) दोष होत नाही.

गंमत अशी आहे की सद्यस्थितीत या व्यक्तींना व्यक्ती म्हणूनच कायदेशीर म्हणा किंवा प्रशासकीय म्हणा 'रेकग्निशन' नव्हते!
जर आपला समाज त्यांना एक व्यक्ती म्हणून "स्त्री व पुरूषांइतकेच समान राईट्स असणारी व्यक्ती" म्हणून रेकग्नाईजच करायला तयार नसेल तर तो समाजाचा दोष नाही असे तुमचे म्हणणे आहे काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

गंमत अशी आहे की सद्यस्थितीत या व्यक्तींना व्यक्ती म्हणूनच कायदेशीर म्हणा किंवा प्रशासकीय म्हणा 'रेकग्निशन' नव्हते!
जर आपला समाज त्यांना एक व्यक्ती म्हणून "स्त्री व पुरूषांइतकेच समान राईट्स असणारी व्यक्ती" म्हणून रेकग्नाईजच करायला तयार नसेल तर तो समाजाचा दोष नाही असे तुमचे म्हणणे आहे काय?

तो समाजाचा दोष नाही. किमान प्रजातंत्रात तरी.

व त्यांना प्रशासकीय रेकग्निशन नव्हते हे अर्धसत्य आहे.

उदाहरण देतो. १८ वर्षाखालील मुलांना सगळे अधिकार नसतात. ड्रायव्हिंग व मतदान हे ठळक. हा समाजाचा दोष नाही ... ते संविधानात्मक काँट्रॅक्ट आहे. १८ वर्षाखालील मुले इतर अधिकार एन्जॉय करतात. उदा. पालक हयात असो वा नसो, they have the right to life. अभिव्यक्ती स्वातंत्र्य - जर लहान मूल काहीही अद्वातद्वा बोलत असेल तर सरकार तो गुन्हा मानत नाही. मालमत्तेचा अधिकार - कानूनन बालिग होईपर्यंत मर्यादित असतो पण पूर्ण हिरावून घेतला जात नाही. (हे केवळ उदाहरण म्हणून पहावे. तुलना नाही.)

आता तृतीय पंथीयांबद्दल बोलूया -

१) तृतीय पंथीय व्यक्ती काहीही अद्वातद्वा बोलत असेल तर सरकार तो गुन्हा मानत नाही.
२) तृतीय पंथीय व्यक्ती ची मालमत्ता सरकार कॉन्फिस्केट करत नाही. ती व्यक्ती तृतीयपंथी आहे म्हणून.
३) असेंब्ली - तृतीय पंथीय व्यक्ती एकत्र येऊन गट बनवू शकतात. सरकार मनाई करत नाही.
४) संचार स्वातंत्र्य. पब्लिक प्लेसेस मधे सरकार मनाई करीत नाही.
५) राईट टू लाईफ - तृतीय पंथीय व्यक्ती वर हल्ला झाला तर तो गुन्हा नाही असे म्हणून पोलीस तैकिकात करत नाहीत असे नाही. तैकिकात करतातच. व गुन्हेगारास शासन होईलच.

हे अधिकार आहेतच की.

आता तुम्ही फक्त जबाबदार्‍यांबद्दल विचार जरी केलात तरी तुम्हास लक्षात येईल की - No particular responsibility is imposed on them for being तृतीय पंथीय व्यक्ती.

तेव्हा मी - त्यांना रेकग्निशन नाही हा समाजाचा दोष आहे - हा मुद्दा अति नॉमिनल मानतो. व प्रशासकीय रेकग्निशन नाही हे प्रशासनाचा दोष असेल व्/वा नसेल. तो समाजाचा दोष नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता तृतीय पंथीयांबद्दल बोलूया -

१) तृतीय पंथीय व्यक्ती काहीही अद्वातद्वा बोलत असेल तर सरकार तो गुन्हा मानत नाही.
२) तृतीय पंथीय व्यक्ती ची मालमत्ता सरकार कॉन्फिस्केट करत नाही. ती व्यक्ती तृतीयपंथी आहे म्हणून.
३) असेंब्ली - तृतीय पंथीय व्यक्ती एकत्र येऊन गट बनवू शकतात. सरकार मनाई करत नाही.
४) संचार स्वातंत्र्य. पब्लिक प्लेसेस मधे सरकार मनाई करीत नाही.
५) राईट टू लाईफ - तृतीय पंथीय व्यक्ती वर हल्ला झाला तर तो गुन्हा नाही असे म्हणून पोलीस तैकिकात करत नाहीत असे नाही. तैकिकात करतातच. व गुन्हेगारास शासन होईलच.

हे अधिकार आहेतच पण ते स्त्री म्हणून किंवा पुरूष म्हणून दिलेले अधिकार आहेत. या व्यक्तींना कोणतेही सरकारी फॉर्म्स भरताना स्त्री वा पुरूष निवडावे लागते/लागायचे. आता त्यांना तेच अधिकार एक तृतीयपंथी म्हणून मिळतील.

आता तुम्ही फक्त जबाबदार्‍यांबद्दल विचार जरी केलात तरी तुम्हास लक्षात येईल की - No particular responsibility is imposed on them for being तृतीय पंथीय व्यक्ती.

ते तर एखादी व्यक्ती स्त्री आहे किंवा पुरूष आहे म्हणून कोणत्याही विशिष्ट जबाबदार्‍या दिलेल्या नाहित. मग तृतीयपंथीयांनाच का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

जर एक नागरिक म्हणून मला कोणत्याही व्यक्तीशी Dealings/transactions/contracts/relationships न करण्याचे स्वातंत्र्य आहे

मला वाटतं, इथे सेवादाता आणि ग्राहक यांच्यातील हक्काची सीमारेषा नीट ठरत नाही. ग्राहकाच्या हक्कांचे आणि स्वातंत्र्याचे काय? उद्या अलाबामात भारतीय वंशाच्या नागरिकांना कुठलीही सेवा प्रदान न करण्याचे हक्क ठरवणारा कायदा याच तथाकथित रॉन पॉलीय लिबर्टेरियन संकल्पनेखाली अंमलात आणला तर काय? ती अमेरिकन घटनेची पायमल्ली ठरत नाही का?

न्यू मेक्सिको हायकोर्टाच्या अशाच एका निर्णयात अमेरिकन सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करण्यास दिलेला नकार किंवा अ‍ॅरिझोनाच्या गव्हर्नरने व्हेटो केलेले एस.बी. १०६२ बिल याच सदरात मोडतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद्या अलाबामात भारतीय वंशाच्या नागरिकांना कुठलीही सेवा प्रदान न करण्याचे हक्क ठरवणारा कायदा याच तथाकथित रॉन पॉलीय लिबर्टेरियन संकल्पनेखाली अंमलात आणला तर काय? ती अमेरिकन घटनेची पायमल्ली ठरत नाही का?

ती अमेरिकन घटनेची पायमल्ली ठरेलच. प्रश्नच नाही.

कारणमीमांसा द्यायलाच हवी का ?

१) असा निर्णय सरकार द्वारे राबवणे हे व्यक्तीच्या विकल्पांमधे घटौती आणते. फोर्सफुली. हे स्वातंत्र्य बळजबरीने घटवण्याचे प्रतीक आहे.
२) एखादी सेवा पुरवण्यास नकार देणे हे व्यक्तीच्या विकल्पांमधे अंतर्भूत असतेच. पण विकल्प म्हंजे जबाबदारी नव्हे.
३) कॅलिफोर्निया मधे अनेक हॉटेलात असा बोर्ड टांगलेला असतो - We reserve the right to refuse service to any one. हे स्वातंत्र्याचे प्रतीक आहे.

हा विषय थोडा क्लिष्ट आहे. तेव्हा अवश्य प्रश्न विचारा. मी उत्तर देईन.

Libertarianism continues to be the most misunderstood political movement.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>> Libertarianism continues to be the most misunderstood political movement.

या वाक्यातला 'political' शब्द मला महत्त्वाचा वाटतो. कागदावर एक अर्थशास्त्रातील थिअरी म्हणून ती कदाचित, काही वेळेला पटण्याजोगी आहे. मात्र राजकीयदृष्ट्या, तिचा वापर बॅरी गोल्डवॉटर - रेगन या पिढीने डॉग व्हिसल पॉलिटिक्स म्हणून केला आहे. तीच गत थोड्याफार फरकाने रॉन पॉलचीही म्हणता येईल, असं दिसतं आहे. त्याचे सुपुत्र रँड पॉलबद्दल काय बोलावे? मेन स्ट्रीम मीडियाचं सोडून द्या, अगदी मर्डॉकच्या दावणीतल्या वॉल स्ट्रीट जर्नलने लिहिलेला लेख वाचावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१. हिजडे असणे हे बीसी-ओबीसी प्रमाणे आनुवंशिक नसणार असे वाटते.
२. हिजड्यांनी (विचित्र अंगविक्षेप न करता- पक्षी आपण हिजडे आहोत असं न दाखवता) नोकर्‍या केल्या तर त्यांना कोणी रोखत असेल असं वाटत नाही. यात पोषाखाचाही काही भाग असतो. आज सामान्य माणसांनासुद्धा वाट्टेल तो पोषाख [मला हा पोषाख आवडतो या कारणासाठी] कामाच्या ठिकाणी घालून येता येत नाही. समजा रेलवे तिकीट खिडकीमागे एक हिजडा बसला असेल तर त्याच्याकडून तिकीट घ्यायला प्रवासी ऑब्जेक्शन घेणार नाहीत.
३. आपल्या जालपरिचयातले एक गृहस्थ 'गे' आहेत असं त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. पण त्यांचे जे फोटो मी पाहिले आहेत त्यात ते सामान्य मनुष्यांसारखेच दिसतात. अशा प्रकारे राहणार्‍या व्यक्तीला नोकरी वगैरे करताना कुठला अडथळा येईल असे वाटत नाही.

आपल्याला सामान्यत: दिसणारे हिजडे जसे राहतात - वागतात तसे वागण्याचे स्वातंत्र्य देऊन वर पुन्हा त्यांना खास सवलती देण्याचे काही कारण मला दिसत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अगदी सहमत.

आणखी थोडं मत.

आपल्या दृष्टीने हिजडा म्हणजे सिग्नलवर /ट्रेनमधे दिसणारा किंवा दारोदार येणारा एक प्रकारचा भिकारी क्लासचा मनुष्य.

या भीक मागण्याच्या प्रथेला पूरक असे हावभाव, वागणूक ही अनुकरणाने डेव्हलप झालेला हा वर्ग आहे.

इनफॅक्ट जोपर्यंत हिजडा हा आपण हिजडा असल्याचे लाऊडली आणि प्रयत्नपूर्वक सिद्ध करु जात नाही (पोषाख, हावभाव, बोलणे, टाळी, निर्लज्ज स्पर्श इत्यादि) तोपर्यंत तो हिजडा आहे हे ओळखूही येणार नाही असंच अंदाजे ९५ % हिजड्यांच्या बाबत म्हणता येईल. मला काहीशे हिजडे तरी आजपर्यंत दिसले आहेत. ते सर्व जर ठराविक हावभाव करत नसते, टाळ्या वाजवत नसते, आणि पुरुषासमान दिसत असूनही साडी नेसलेले नसते तर ते हिजडे आहेत असं म्हणता आलंच नसतं. मी त्यातल्या नव्वद टक्क्यांना पुरुष म्हणून, पाच टक्क्यांना बायकी पुरुष विदिन नॉर्मल लिमिट्स आणि उरलेल्या ५ टक्क्यांना पुरुषी बाई अशा क्याटेगरीत टाकून सहज स्वीकारले असते.

पण याखेरीज अर्थातच जन्माने तृतीयपंथी असलेले पण ज्यांना घरातून या कारणाने हाकलून दिले गेले नाही, किंवा येनकेन प्रकारेण ते सामान्य माणसाचं आयुष्य जगले (सिग्नलवर भीक मागायला आले नाहीत) असेही अनेक तृतीयपंथी जगात असणार हे निव्वळ तर्कानेही म्हणता येईल. कारण कोणत्याही लिंगीयाचा जन्म हा कोणत्याही घरात होऊ शकतो (आर्थिक, जाती इत्यादिच्या पार).

असे तृतीयपंथी हे एकतर पुरुषाचा किंवा स्त्रीचा वेष करुन आपल्या आसपास सुमारे नॉर्मल आयुष्य जगत असणारच.. केवळ जननेंद्रियांच्या रचनेत फरक या खाजगी बाबीखेरीज समाजात त्यांना वेगळे काही ओळखले जाणे शक्य नाही. बायकी पुरुष किंवा थोराड मजबूत बांध्याच्या बायका हे नॉर्मल व्हेरियंट्स म्हणून आपण रोजच स्वीकारत असतो. याखेरीज दृश्य बाह्य जगावेगळा विलक्षण फरक तृतीयपंथीयांच्या दिसण्यात नसतो.

असे सामान्य तृतीयपंथी नक्कीच आपल्या आजुबाजूला एक पुरुष किंवा स्त्री बनून वावरत असतात. पण त्यांचे वागणे भीक मागण्यासाठी अ‍ॅडॉप्टेड नसल्याने आपण त्यांना "हिजडा" असे काहीसे तुच्छतावाचक ("डा") संबोधन वापरत नाही.

अशांना दोन्हीपैकी एक कोणतेही लिंग कागदोपत्री लावण्यात प्रचंड अस्मितेची अडचण नसेल तर तसे लावावे.. पण तेवढ्याने आयडेंटिटी क्रायसिस होत असेल तर मग तिसरे लिंग अधिकृतरित्या कागदोपत्री लावूनही वागणूक मात्र नॉर्मल लिमिट्समधल्या मनुष्यप्राण्यासारखी ठेवल्यास कोणालाच स्वीकारार्हतेची किंवा कसली अडचण येऊ नये.

असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी त्यातल्या नव्वद टक्क्यांना पुरुष म्हणून, पाच टक्क्यांना बायकी पुरुष विदिन नॉर्मल लिमिट्स आणि उरलेल्या ५ टक्क्यांना पुरुषी बाई अशा क्याटेगरीत टाकून सहज स्वीकारले असते.

ह्यातच त्यांना आयडेंटिटी क्रायसिस वाटत असल्यास आणि त्यांचे नॉर्मल व्यवहार इतरांना नॉर्मल वाटत नसल्यामुळे ते टिंगल-टवाळीस पात्र झाल्यास(करन जोहर) त्यांचे शोषण होते असे म्हणण्यास पुरेसा वाव आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्वीकारणे याचा अर्थ अत्यंत जवळिकीचे वैयक्तिक संबंध प्रस्थापित करणे असे नव्हे. थोडक्यात म्हणजे मी या लोकांना नेहमीपैकीतल्या एका कप्प्यात टाकून ट्रेनमधल्या / ऑफिसातल्या / रिझर्वेशनच्या रांगेतल्या इतर लोकांप्रमाणेच त्यांना सामान्य मानलं असतं आणि अर्थातच वेगळी तुच्छ आदि ट्रीटमेंट दिली नसती.

याचा मुख्य अर्थ असा की असेही आपण समाजात वावरणार्‍या अन्य सामान्यजनांना कितपत निकटचे मानून काही फरक करतो. एक कलीग, एक सहप्रवासी यांच्याबद्दल जितकी स्वीकारार्हता पाहिजे असते त्या ढोबळ पातळीवर कसला आलाय तृतीयलिंगापर्यंतच्या पातळीचा आयडेंटिटी क्रायसिस ??

येणार्‍याजाणार्‍या जनतेने मला हाडहुड करु नये, तुच्छ लेखू नये किंवा किळसवाणे मानू नये याउपर आपण कोणत्याही लिंगाच्या व्यक्ती अशी काय उच्च अपेक्षा ठेवत असतो ("समाजा"ने स्वीकारणे या व्याख्येबाबत बोलतोय..)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सहमत आहे, पण तृतीय लिंगासाठी नॉर्मल काय हे इतर लिंगांच्या वर्तणुकीतून ठरवणे त्यांच्यासाठी आयडेंटिटी क्रायसिस ठरु शकेल असा मुद्दा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपल्या दृष्टीने हिजडा म्हणजे सिग्नलवर /ट्रेनमधे दिसणारा किंवा दारोदार येणारा एक प्रकारचा भिकारी क्लासचा मनुष्य.
या भीक मागण्याच्या प्रथेला पूरक असे हावभाव, वागणूक ही अनुकरणाने डेव्हलप झालेला हा वर्ग आहे.

दुर्दैवाने हे खरे असले तरी अन्य नोकर्‍यांमध्ये प्रवेश न मिळाल्याने त्यांना या व्यवसायात लोटले गेले आहे असा माझा समज + मत आहे.

इनफॅक्ट जोपर्यंत हिजडा हा आपण हिजडा असल्याचे लाऊडली आणि प्रयत्नपूर्वक सिद्ध करु जात नाही (पोषाख, हावभाव, बोलणे, टाळी, निर्लज्ज स्पर्श इत्यादि) तोपर्यंत तो हिजडा आहे हे ओळखूही येणार नाही असंच अंदाजे ९५ % हिजड्यांच्या बाबत म्हणता येईल.

तसे नसावे. (गे आणि हिजडे वेगळे हे माहिती असेलच). तुम्ही म्हणताय ते गे, लेस्बियन लोकांबाबत खरे आहे. तरललिंगी/हिजडे यांच्यात हे बदल दृश्य असतात. जसे अनेकांना दाढीचीकाही खुंटे उगवतात, मात्र इतर पुरूषी व स्त्रैण अशा दोन्ही सवयींचा/उर्मीचा अभाव असल्याने त्यांचे वागणे हे बहुतांश वेळा स्त्रीपुरूषांपेक्षा वेगळे असते. दुर्दैवाने त्यांना शतकानुशकतके हटकल्याने जे निर्ढावलेपण आले आहे, त्याचा परिपाक म्हणजे तुम्ही म्हणता तसा निर्लज्ज स्पर्श वगैरेत झाला आहे. मात्र हे खास उपखंडातील लक्षण झालं.

एका परदेश वारीत एक बावा शर्ट पँटच घालून ट्रेनमध्ये चढला होता. फक्त त्याने भडक लिपस्टिक लावली होती, कानात डूल होते. 'वेगळेपण' ओळखु येत होते, तरी आपल्याकडे जी बीभत्सता आली आहे तसे नव्हते. ही बीभत्सता हा 'अस्वीकाराचा' (व त्यायोगे येणार्‍या बंडखोरीचा) परिणाम आहे असे माझे मत आहे.

मला काहीशे हिजडे तरी आजपर्यंत दिसले आहेत. ते सर्व जर ठराविक हावभाव करत नसते, टाळ्या वाजवत नसते, आणि पुरुषासमान दिसत असूनही साडी नेसलेले नसते तर ते हिजडे आहेत असं म्हणता आलंच नसतं. मी त्यातल्या नव्वद टक्क्यांना पुरुष म्हणून, पाच टक्क्यांना बायकी पुरुष विदिन नॉर्मल लिमिट्स आणि उरलेल्या ५ टक्क्यांना पुरुषी बाई अशा क्याटेगरीत टाकून सहज स्वीकारले असते.

असेलही, पण त्यांची नैसर्गिक उर्मी त्यांना पुरूष / स्त्री म्हणून जगु देत नसेल तर निव्वळ इतर समाजाच्या दोन कप्प्यांमध्येच त्यांनी जावं/फिट व्हावं हा अट्टाहास झाला. उलट आताच्या युगात त्यांना त्यांचा स्वतंत्र कप्पा ठेऊनही हक्क शाबुत रहायला लावणारा हा निर्णय स्वागतार्ह आहे. तुम्ही म्हणताय त्या क्याटेगरीत न टाकताही समाजाने स्वीकारावे हाच तर मुद्दा आहे.

पण याखेरीज अर्थातच जन्माने तृतीयपंथी असलेले पण ज्यांना घरातून या कारणाने हाकलून दिले गेले नाही, किंवा येनकेन प्रकारेण ते सामान्य माणसाचं आयुष्य जगले (सिग्नलवर भीक मागायला आले नाहीत) असेही अनेक तृतीयपंथी जगात असणार हे निव्वळ तर्कानेही म्हणता येईल. कारण कोणत्याही लिंगीयाचा जन्म हा कोणत्याही घरात होऊ शकतो (आर्थिक, जाती इत्यादिच्या पार).

सहमत

असे तृतीयपंथी हे एकतर पुरुषाचा किंवा स्त्रीचा वेष करुन आपल्या आसपास सुमारे नॉर्मल आयुष्य जगत असणारच.. केवळ जननेंद्रियांच्या रचनेत फरक या खाजगी बाबीखेरीज समाजात त्यांना वेगळे काही ओळखले जाणे शक्य नाही. बायकी पुरुष किंवा थोराड मजबूत बांध्याच्या बायका हे नॉर्मल व्हेरियंट्स म्हणून आपण रोजच स्वीकारत असतो. याखेरीज दृश्य बाह्य जगावेगळा विलक्षण फरक तृतीयपंथीयांच्या दिसण्यात नसतो.

सहमत आहे. हा प्रश्न असे वागणे शक्य असणार्‍यांचा नाहिये. तर बहुसंख्यांसारखे वागता न येणार्‍यांचा आहे.

असे सामान्य तृतीयपंथी नक्कीच आपल्या आजुबाजूला एक पुरुष किंवा स्त्री बनून वावरत असतात. पण त्यांचे वागणे भीक मागण्यासाठी अ‍ॅडॉप्टेड नसल्याने आपण त्यांना "हिजडा" असे काहीसे तुच्छतावाचक ("डा") संबोधन वापरत नाही.

बिंगो.
अर्थात त्यांनी ते हिजडे आहेत हे सांगितले तर वागणूक तीच राहिल का? त्यांना स्त्री अथवा पुरूष नसूनही निव्वळ सामाजिक स्वीकृतीसाठी त्यांच्यासारखे रहावे लागते हे दुर्दैवी नाही काय?

अशांना दोन्हीपैकी एक कोणतेही लिंग कागदोपत्री लावण्यात प्रचंड अस्मितेची अडचण नसेल तर तसे लावावे.. पण तेवढ्याने आयडेंटिटी क्रायसिस होत असेल तर मग तिसरे लिंग अधिकृतरित्या कागदोपत्री लावूनही वागणूक मात्र नॉर्मल लिमिट्समधल्या मनुष्यप्राण्यासारखी ठेवल्यास कोणालाच स्वीकारार्हतेची किंवा कसली अडचण येऊ नये.

मनुष्य प्राण्याच्या 'नॉर्मल लिमिट्स' विस्तारा हेच तर हा निकाल सांगतोय! हे ही त्यांच्यासाठी 'नॉर्मल' आहे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मनोबा, I would like to draw your attention to Retro-causality / reverse-causality !!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तपशीलात बोल की रे बाबा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

एका प्रसिद्ध हिंदी चित्रपटसंगीतातील गाण्याच्या ओळी थोड्या बदलून म्हणावेसे वाटते की,

छक्कोंको बुरा साबित करना
दुनियाकी पुरानी आदत है.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गवि व थत्ते चाचांचे प्रतिसाद समाजातील काही कॉमन गैरसमजांकडे निर्देश करतात. वेळ मिळताच सविस्तर लिहितो.

१. हिजडे असणे हे बीसी-ओबीसी प्रमाणे आनुवंशिक नसणार असे वाटते.

अर्थात. मुळात हिजडे म्हणजे समलैंगिक नव्हे. हिजडे हा प्रकार भारतात (उपखंडात) दोन प्रकारे असतो.
१. नैसर्गिक हिजडे: जेव्हा गर्भ पोटात असतो तेव्हा (बहुदा ६/७व्या) महिन्यात पुरूष गर्भ असेल तर त्याच्या टेस्टिकल्स ओटीपोटातून मुळ पिशवीत संक्रमीत होतात (अर्थात ही सगळी ऐकीव/वाचीव माहिती - मी तज्ज्ञ नाही. तेव्हा तपशीलातील चुका दे.घे.) काही व्यक्तींच्या केसमध्ये लिंग पुरूषाचे असले तरी एकतर टेस्टिकल्स नसतातच किंवा त्या ओटीपोटातच रहातात. अर्थात त्यासोबत येणारे अनेक मह्त्त्वाचे पुरूषी हार्मोन्स तयार होत नाहीत व स्त्री हार्मोन्सही तयार होत नाहीत.
२. कृत्रिम हिजडे: निजामाच्या काळापासून लहानपणीच काही मुलांचे टेस्टिकल्स फोडून हिजडे तयार केले जातात. यांची बायोलॉजिकल केस काँप्लेक्स असते. खाली अडकित्ता यांनी ती एक्सप्लेन केली आहे.

२. हिजड्यांनी (विचित्र अंगविक्षेप न करता- पक्षी आपण हिजडे आहोत असं न दाखवता) नोकर्‍या केल्या तर त्यांना कोणी रोखत असेल असं वाटत नाही.

स्त्रीयांनी आपण स्त्री आहोत असं दाखवत व पुरूषांनी आपण पुरूष आहोत दाखवत नोकर्‍या केल्या तर त्या चालतात, पण यांनी नाही असं म्हणायचंय का?

यात पोषाखाचाही काही भाग असतो. आज सामान्य माणसांनासुद्धा वाट्टेल तो पोषाख [मला हा पोषाख आवडतो या कारणासाठी] कामाच्या ठिकाणी घालून येता येत नाही.

सहमत आहे. पण हिजड्यांना नोकर्‍या दिल्यावर त्यांनी नक्की कसा पोषाख करावा असे तुमचे मत आहे? त्यांनी स्त्रियांप्रमाणे साडी, पंजाबी ड्रेस घातण्यात गैर काय?

समजा रेलवे तिकीट खिडकीमागे एक हिजडा बसला असेल तर त्याच्याकडून तिकीट घ्यायला प्रवासी ऑब्जेक्शन घेणार नाहीत.

अर्थात, पण सध्या त्यांना शासकीय नोकर्‍यांत प्रवेश मिळण्याच्याही आधी जे शिक्षण घ्यावे लागते तिथेच प्रवेश दिला जात नसे.

३. आपल्या जालपरिचयातले एक गृहस्थ 'गे' आहेत असं त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. पण त्यांचे जे फोटो मी पाहिले आहेत त्यात ते सामान्य मनुष्यांसारखेच दिसतात. अशा प्रकारे राहणार्‍या व्यक्तीला नोकरी वगैरे करताना कुठला अडथळा येईल असे वाटत नाही.

गे असणे आणि हिजडे असण्यात मोठा फरक आहे. गे व्यक्ती या "पुरूष" असतात तर लेस्बियन या "महिला" असतात. मात्र तरललैंगिक किंवा भारतापुरते बोलायचे तर हिजडे हे दोन्ही नसतात. ज्या हिजड्यांना लैंगिक भावना असते ते स्त्री वा पुष वा हिजडे यापैकी कोणाकडेही आकृष्ट होऊ शकतात.

आपल्याला सामान्यत: दिसणारे हिजडे जसे राहतात - वागतात तसे वागण्याचे स्वातंत्र्य देऊन वर पुन्हा त्यांना खास सवलती देण्याचे काही कारण मला दिसत नाही.

अजिबातच नाही कळले. काय "खास" सवलती दिल्या आहेत?

गवि यांच्या प्रतिक्रीयेवर पुन्हा सवडीने

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हिजडे म्हणजे काय याबद्दल आडकित्ता यांनी दिलेली माहिती बरीचशी ठाऊकच होती. माझे काही गैरसमज नव्हते.

हिजडे प्रकार १ आणि २ हे दोघेही त्यांनी जाहीर केल्याशिवाय इतरांना कळणे शक्य वाटत नाही.

>>स्त्रीयांनी आपण स्त्री आहोत असं दाखवत व पुरूषांनी आपण पुरूष आहोत दाखवत नोकर्‍या केल्या तर त्या चालतात, पण यांनी नाही असं म्हणायचंय का?

स्त्रियांनी स्त्रीप्रमाणे पोषाख करायला आणि पुरुषांनी पुरुषांप्रमाणे पोषाख करायला परवानगी असते. पण "त्रीयांनी आपण स्त्री आहोत असं दाखवत व पुरूषांनी आपण पुरूष आहोत दाखवत " नोकरी करायला सहसा परवानगी नसते. इथे हिजड्यांनी कोणताही पोषाख करून नोकर्‍या केल्या तर चालतील. त्याबद्दल ऑब्जेक्शन नाही. पण ते साडी नामक जो पोषाख करतात तो स्त्रियांच्या साडीप्रमाणे नसतो असे मला वाटते. त्या पोषाख प्रकारामुळे कदाचित स्वीकृतीस अडचण येत असेल.

>>ज्या हिजड्यांना लैंगिक भावना असते ते स्त्री वा पुष वा हिजडे यापैकी कोणाकडेही आकृष्ट होऊ शकतात.

त्यांनी नोकरीखेरीजच्या काळात कोणाकडेही आकृष्ट व्हावे. नोकरीच्या काळात असे आकृष्ट व्हायला सामान्य स्त्री-पुरुषांनाही परवानगी नसते.

>>काय "खास" सवलती दिल्या आहेत?

ओबीसी मानून आरक्षण दिले आहे.

अवांतर: नाक्यावर दिसणार्‍या हिजड्यांपैकी कित्येक लोक हिजडे नसतात अशीही माहिती आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पण ते साडी नामक जो पोषाख करतात तो स्त्रियांच्या साडीप्रमाणे नसतो असे मला वाटते.

जर ते स्त्रिया नाहित तर त्यांचा पोशाष हा स्त्रियांप्रमाणे का असावा? हेच तर विचारतोय.

त्यांनी नोकरीखेरीजच्या काळात कोणाकडेही आकृष्ट व्हावे. नोकरीच्या काळात असे आकृष्ट व्हायला सामान्य स्त्री-पुरुषांनाही परवानगी नसते.

काहीही काय? आमच्या हाफिसात कित्येक स्त्री-पुरूष कर्मचारी एकमेकांकडे आकृष्ट झालेले माहिती आहेत - अगदी नोकरीच्या काळात, एकाच क्युबमध्ये बसून. पैकी काहिंनी लग्नही केले आहे. त्यांना आकृष्ट होण्यास परवानगी नाही हे विनोदी वाक्य धरावे काय? Wink

ओबीसी मानून आरक्षण दिले आहे.

यात सवलत कोणती? स्त्रीयांनाही लिंगाधारीत आरक्षण आहे. कित्येक मागासलेल्या वर्गाने सामान्य दरापेक्षा अधिक वेगाने प्रगती करावी, त्यांचा सामाजिक वावर+अ‍ॅक्सेप्टन्स वाढावा यासाठी भारतात अनेकांना आरक्षण दिले आहे, मग यांचेच आरक्षण ही सवलत कशी झाली?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>>जर ते स्त्रिया नाहित तर त्यांचा पोशाष हा स्त्रियांप्रमाणे का असावा? हेच तर विचारतोय.

स्त्रियांसारखा (वाटणारा) पोषाख ते करतात... त्यांनी स्त्रियांप्रमाणेच पोषाख करावा हे मी सांगत नाहीये.

>>काहीही काय? आमच्या हाफिसात कित्येक स्त्री-पुरूष कर्मचारी एकमेकांकडे आकृष्ट झालेले माहिती आहेत - अगदी नोकरीच्या काळात, एकाच क्युबमध्ये बसून. पैकी काहिंनी लग्नही केले आहे. त्यांना आकृष्ट होण्यास परवानगी नाही हे विनोदी वाक्य धरावे काय?

आकृष्ट होण्यास परवानगी नाही म्हणजे आकृष्ट झालो आहोत असे दाखवणे, सोलिसिट करणे वगैरेला परवानगी नाही. ते लग्न वगैरे जे आहे ते ऑफिसव्यतिरिक्त आहे.

>>स्त्रियांनाही लिंगाधारीत आरक्षण आहे.
नोकरीत स्त्रियांना लिंगाधारित आरक्षण आहे? कुठे आहे हो?

एव्हरी इंडिव्हिज्युअल इज युनिक असे म्हटले जाते. पण प्रत्येकाच्या युनिकनेसला सांभाळून घेऊन समाजाने वर्तन करावे आणि तो युनिकनेस जपता येईल अशा सोयी समाजाने केल्याच पाहिजेत इतक्या टोकाच्या व्यक्तिवादाचे मला आकर्षण नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

एव्हरी इंडिव्हिज्युअल इज युनिक असे म्हटले जाते. पण प्रत्येकाच्या युनिकनेसला सांभाळून घेऊन समाजाने वर्तन करावे आणि तो युनिकनेस जपता येईल अशा सोयी समाजाने केल्याच पाहिजेत इतक्या टोकाच्या व्यक्तिवादाचे मला आकर्षण नाही.

म्हणजेच अल्पसंख्यांकांनी बहुसंख्याप्रमाणे वागा - फॉल इन लाईन! आम्ही बदलायचा विचारही करणार नाही. जो करतो त्याला काय टोके गाठतोस म्हणून हिणवणार!
असो!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बदलणे* म्हणजे नेमके काय? सविस्तर खुलासा झाल्यास आवडेल.

* जे करण्यास आम्ही नाकारत आहोत असे आपल्याला वाटते....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

बरेच पदर आहेत.
पण समोरच्याचे व्यक्तीस्वातंत्र्य -हे ती व्यक्ती निव्वळ अल्पसंख्य असल्याने- जपायचा विचार करणे हा "टोकाचा व्यक्तीवाद" आहे असे म्हटल्यावर सुरवात म्हणून हे विचार बदलणे सर्वाधिक उपयुक्त व्हावे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

व्यक्तिस्वातंत्र्य जपण्यास काही हरकत नाही. त्यांनी हिजडे असण्यास काही हरकत नाही. पण व्यक्तिस्वातंत्र्य म्हणून मी ऑफीसमध्ये अर्धीचड्डी आणि बनियन घालून येईन इतके व्यक्तिस्वातंत्र्य मान्य नाही. ते मला मिळालेच पाहिजे अशी अपेक्षा मी करत नाही.

व्यक्तिस्वातंत्र्य लिमिटेड असते हे सामान्यांनाही लागू आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

माफ करा, तुमच्या दोघांच्या चर्चेत मध्येच बोलते आहे.

मला वाटतं, अर्धी चड्डी आणि बनियन घालून कचेरीत येण्याचं स्वातंत्र्य म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्य असं ऋषिकेशलाही अभिप्रेत नसावं. सभ्यतेच्या मर्यादेत बसणारे कपडे करून कचेरीत यावं, इतकीच सर्वसाधारण अट असते.

आता - तृतीयपंथी व्यक्ती म्हणून मला रूप पुरुषी असतानाही साडी नेसून यावं असं वाटलं, तर तसा पोशाख करायला बंदी असणार आहे का? माझं रूप पुरुषी, हावभाव काहीसे स्त्रैण - पण पौरुष न लपणारे, आणि पोशाख स्त्रीचा असेल. हे सभ्यतेच्या मर्यादेत बसतं का? साडी हा सभ्य पोशाख आहे, त्यामुळे बसलंच पाहिजे. हां, खोल गळ्याचे ब्लाउज, झिरझिरीत पदर, पदर ढाळण्याची सवय - हे सभ्यतेला सोडून आहे. ते करण्याची परवानगी कुणालाच नाही - स्त्रीला, पुरुषाला, वा तृतीयपंथी व्यक्तीला. ही बंधनं पाळणं म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्याची पायमल्ली नव्हे.

सभ्य पोशाख (उदा. साडी) घालून येण्याचं, सर्वांना उपलब्ध असलेलं लिमिटेड व्यक्तिस्वातंत्र्य आज तृतीयपंथी व्यक्तीनं घेतलं, तर ते सभ्य मानलं जाईल की असभ्य?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

>>सभ्य पोशाख (उदा. साडी) घालून येण्याचं, सर्वांना उपलब्ध असलेलं लिमिटेड व्यक्तिस्वातंत्र्य आज तृतीयपंथी व्यक्तीनं घेतलं, तर ते सभ्य मानलं जाईल की असभ्य?

सभ्य मानलं जावं. पण ऋषिकेशचं म्हणणं असं आहे की सभ्य पोषाख (उदा साडी) नेसायला लागणे हा त्या व्यक्तिच्या स्वातंत्र्यावर घाला आहे. कारण स्त्री नसूनही स्त्री सारखा पोषाख करावा लागतोय.

बाकी पॅण्ट शर्ट घालणारे आणि स्त्रैण दिसणारे अनेक लोक पाहिले आहेत. त्यांना अन्य लोक पुरुष म्हणूनच ट्रीट करतात. आणि त्यांना नॉर्मली वागवतात. ऋषिकेशच्या म्हणण्याप्रमाणे त्याला पॅण्ट शर्ट घालायला लागणे आणि इतरांनी त्याला पुरुष म्हणून ट्रीट करणे हेही अन्यायकारक आहे. तो स्वतःला हिजडा म्हणून जाहीर करणार; हिजड्याचा असा विशिष्ट पोषाख ठरलेला नसल्याने त्याला मनाला वाटेल तो पोषाख घालून येणार आणि इतरांनी त्याला मुद्दामहून हिजडा म्हणूनच ट्रीट करायला हवे असे काहीतरी विचित्र म्हणणे दिसते आहे.

हे मला मान्य नाही. इव्हन सामान्य स्त्रीपुरुषांना ऑफीसमध्ये "माणूस" म्हणूनच ट्रीट करावे असे आपण समजतो. स्त्रीला स्त्री म्हणून वेगळे ट्रीट करू नये असे आपण म्हणातो. त्याच्याशी जरा विसंगत वाटतं आहे.

किंवा मला काहीच कळलेलं नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

तृतीयपंथी व्यक्तीला पुरुषासारखा / स्त्रीसारखा / मिश्र (शर्टपॅण्ट + लिपस्टिक - दोन्ही सभ्य, माइंड यू!) - यांपैकी कुठलाही पोशाख करायला आडकाठी असू नये, असं माझं मत. आज मिश्र पोशाख केल्यास ते सभ्य मानलं जाणार नाही अशी माझी अटकळ. या दोहोंत विसंगती आहे. ती दूर व्हावी.

बाकी ऋषिकेशचं म्हणणं तो मांडेलच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

शर्टपॅण्ट + लिपस्टिक हा पोषाख आज स्त्रिया करतातच की....

बाढलेल्या दाढी मिशा + साडी कदाचित फार विचित्र वाटू शकेल. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

असेलही विचित्र. पण त्याला आडकाठी असता कामा नये, इतकंच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ती व्यक्ती स्वतःला पुरुष समजत नसल्याने ती दाढी मिशा वाढवत नसेल असे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

जर वाढवायच्या असतील आणि साडीही नेसायची असेल, तर त्यास आडकाठी असता नये. कारण दाढी आणि साडी हे दोन्हीही सभ्यतेच्या (लिमिटेड व्यक्तिस्वातंत्र्याच्या) आजच्या कल्पनांना धरून आहे. केवळ एखाद्या व्यक्तीची लैंगिक अस्मिता या दोन्ही गोष्टींचं मिश्रण करू पाहते आणि ते इतरेजनांच्या नजरेला विचित्र दिसतं, एवढ्या एका कारणास्तव त्या मिश्रणाला विरोध असू नये. बाकी त्या व्यक्तीला काय करायचं असू शकेल किंवा नसू शकेल, हे ठरवणं अशक्यप्राय आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

विरोध असू नये हे मान्य.

पण हा थिओरेटिकल प्रश्न आहे असे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मी नोकरीला लागताना, मी कशा स्वरुपाचे कपडे घालणे अपेक्षित आहे हे मला त्या कंपनीने 'ड्रेसकोड' या मुद्यांतर्गत 'सांगितले' होते. मला कोणते कपडे कंफर्टेबल वाटतात हे विचारले नव्हते. त्यामुळे मला धोतर व पगडी हे सभ्य कपडे नियमित घालून दर दिवशी कामास जाणे अशक्य झाले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तृतीयपंथी व्यक्तीला पुरुषासारखा / स्त्रीसारखा / मिश्र (शर्टपॅण्ट + लिपस्टिक - दोन्ही सभ्य, माइंड यू!) - यांपैकी कुठलाही पोशाख करायला आडकाठी असू नये, असं माझं मत. आज मिश्र पोशाख केल्यास ते सभ्य मानलं जाणार नाही अशी माझी अटकळ. या दोहोंत विसंगती आहे. ती दूर व्हावी.

माझे म्हणणे असेच तरीही थोडेसे वेगळे आहे.
तृतीयपंथींचा कोणता पोशाख सभ्य व कोणता असभ्य हे ठरवताना त्यात तृतीयपंथींचे मत ग्राह्य धरून त्यानुसार नियम बनवणे योग्य ठरावे.

समजा स्त्रियांनी लो नेक ब्लाऊज घालणे हल्ली मुंबई-पुण्यात असभ्य समजले जात असेल तर ते बंधन (हाफिसातही) फक्त स्त्रियांवर असावे. उद्या एखाद्या तृतीपयंथी व्यक्तीने लो नेक ब्लाऊज घातला तर ते योग्य की अयोग्य ते ठरवण्याचे मापदंड वेगळे असावेत. लो नेक बाऊज हे स्त्रिया सुद्धा वापरतात व त्यांच्या सभ्यतेच्या (तत्कालीन, तत्स्थानाच्या) मर्यादांचे उल्लंघन करतात म्हणून तोच नियम तृतीयपंथींना तसाच लावावा हे गैर आहे.

एक उदा देतो.
काही पुरूष शर्टाची वरील १-२ बटणे उघडी ठेऊन वावरतात, त्यावर ऑफिसांमध्ये कधीही आक्षेप घेतलेला दिसत नाही. स्त्रियांनी वरील दोन पटणे उघडे ठेऊन चाललेले अशिष्ट समजले जाते. तेव्हा पोशाख तोच पण स्त्री-पुरूषांसाठी मापदंड वेगळे आहेत. तेव्हा स्त्रियांच्या श्लीलाश्लीलतेचे (किंवा पुरूषांच्याही) मापदंड तृतीपयंथीयांवर थोपवू नयेत. मुद्दाम बंडखोरी करून जेजे करण्यापासून स्त्रियांना रोखले जाते ते ते सारे / काहीही तृथीपयंथीयांना करू द्यावे असा त्याचा अर्थ नाही!

समाज म्हटल्यावर नियम येणारच, पण ते व्यक्तीस्वातंत्र्याची बुज राखून बनवावेत.

अजुनही मुद्दा कळलेला नाही?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पूर्ण सहमत. टोकाच्या व्यक्तिवादापुढे सामाजिक जबाबदारी नजरेआड होतेय अशी शंका येतेय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सहमत किंवा असहमत काहिच नाही;
पण अनुप ढेर्‍यांच्या
"कपडे घालायची जबरदस्ती का करण्यात येते ?
स्वातंत्र्याचा संकोच का केला जातो" ह्या प्रश्नाची आठवण झाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

सहमत किंवा असहमत काहिच नाही;

हेच म्हणतो...
अजूनही मला त्या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं.
पाश्चात्य देशात असेही कल्ट आहेत.
http://en.wikipedia.org/wiki/Naturism

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

असे मुद्दे नेमके हिंदू इ. ने कैतरी मूर्खपणा केल्यावरच बरे येतात ते? उद्या आरेसेस एट ऑल यांनी असे काही केले असते तर समस्त सेकुलारिस्ट जन्ता तुटून पडली असती पण इथे मात्र असे मुद्दे येतात हे रोचक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हेच बोल्तो

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

औचित्यभंगाची व्याख्या सामाजिक एकच असु शकते, ती कालानुसार बदलु शकते पण बहुदा एकच राहिल. त्यामुळे कपडे न घालण्याचे स्वातंत्र्य सामाजिक औचित्य भंग करते त्यामुळे ते अनुमत नसावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तेच विचारतोय. अमुक एक गोष्ट औचित्यभंग कशी ठरते; तेही इतर कुणाला काही अपाय /इजा केली जात नसताना ?
कपडे घालायची जबरदस्ती करणारी मंडळी उद्या " पुरुषांनी साडी घातलेली चालणार नाही " असली काही जबरदस्ती वगैरे करु लागली तर ऐकून घ्यायचं का काय ?
उचित्-अनुचित हे कुणी ठरवायचं नेमकं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

उचित्-अनुचित हे कुणी ठरवायचं नेमकं?

आपण सगळे मिळुन(समाज). औचित्यभंगाची व्याख्या सामाजिक एकच असु शकते, ती कालानुसार बदलु शकते पण बहुदा एकच राहिल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हिजडे = तृतियपंथीय नव्हे. नुसताच क्लीब, अथवा, जनानखान्यातला "खोजा" हिजडा होत नाही. हा एक धार्मिक पंथ आहे.

माझ्या आठवणीतून सरळ लिहितो आहे. शाळेत असताना मनोहर मासिकात वाचलेली माहिती असावी.

देवदासी प्रथेप्रमाणेच हिजडे बनवले जातात.
ज्याप्रमाणे काही समाजांत मुलीच्या केसांत गुंतावळ दिसली, तर ते यल्लम्मा देवीचे बोलावणे असे समजून तिला देवीला "वाहिले" जाई, त्याच प्रमाणे हा पंथही नवे रिक्रूट्स देवाच्या नावावर जमा करतो, किंबहुना अजाणत्या मुलांना या प्रकारात ढकलले जाते..
अशा सर्वच लोकांचे पुरुष जननेंद्रिय रिच्युअली कापून टाकलेले नसले, तरी सर्वच लोक क्रॉस ड्रेसर असतात हे नक्की, तसेच काहींचे अ‍ॅम्प्युटेशन केलेले असते हे देखिल नक्की. या रिच्युअलचे तपशीलवार वर्णन त्या लेखांत होते. देवदासी प्रथेबद्दलही त्याच काळी लिहून आलेले आठवतेय. बहुदा मानवत हत्याकांडाच्या काळातला तो लेख असावा.

या अशाप्रकारे हिजडा 'बनविलेल्या' व्यक्तीस पुन्हा सन्मानाने समाजात स्वीकारणे, या बद्दल गब्बर यांना आलेला 'राग' (कदाचित चुकीचा शब्द) हा मुळातच "हिजडे" बनतात कसे, या प्रक्रियेच्या अज्ञानातून आहे, असे सुचवितो.

धन्यवाद!

ता. क.
गूगलून मिळालेला हा ब्लॉग, व त्यातील ही पोस्ट. वाचल्यावर माझी आठवण बरोबर आहे, हेच सुचविते.

ब्लॉगमधे 'बॉबिटायझेशन' च्या क्रीयेस ब्लॉगरने 'सर्जरी' म्हटले असले, तरी हे डॉक्टरने केलेले 'ऑपरेशन' नसून, धर्मगुरूने केलेल्या सुन्ते सारखे, व जीवघेणे ठरू शकणारे प्रकरण असते. याचे डीटेल्स वेळ मिळाला तर नक्कीच देईन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

जननेंद्रिय कापून टाकल्याने शरीररचनेत काही फरक पडतो का? अन जननेंद्रिय कापतात म्ह. वृषणच कापतात की बाकीसुद्धा? दोन्ही वर्णने वाचली आहेत म्हणून विचारतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वृषण, अर्थातच टेस्टिकल्स, ही 'मास्टर टिश्यू' आहे. पेनिस, ही फक्त टेस्टिकल्सनी तयार केलेले शुक्राणू स्त्रीगर्भाशयाच्या तोंडाशी पोहोचविणारी नळी आहे.
तुमच्या प्रश्नाचे विस्तृत उत्तर इथे सापडावे.
कॅस्ट्रेशनचा रोचक इतिहासही तिथे दिसला.

रच्याकने.
शरीररचनेत, अन मानसिक घडणीतही नक्कीच फरक पडतो. गोर्‍हा 'बडविला' की 'बैल' बनतो. यात टेस्टीकल्स क्रश केल्या जातात, त्याने त्या वॄषभाच्या वशिंडापासून इतर शरीररचना व वागणूकीपर्यंत सर्वत्र एक स्त्रैण माईल्डनेस येतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

धन्यवाद आडकित्ताजी. कन्सेप्ट क्लीअर झाली.

बाकी पेनाईल शाफ्ट काढणे इ. रोचक आहे खरेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

विस्तृत माहितीची लिंक न वाचताच फक्त प्रतिसाद वाचून मला नविनच कळलेला मुद्दा
'जन्मतः तरललिँगी हे जैविक/लैँगिक कमतरता असलेले 'पुरुषच' असतात. स्त्री गर्भामध्ये असा काही दोष उद्भवू शकत नाही'.
बरोबर?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'कमतरता' या शब्दावर आक्षेप, पण तो मुद्दा नसल्याने सोडून देतो Wink

बाकी वेगळेपण आले नसते तर गर्भ स्त्री म्हणून वाढला असता, अशी शक्यताही असावी. एकदा या क्षेत्रात काम केलेल्या मैत्रिणीला विचारून मग सांगतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ओके.
ते Biological/sexual deformity च मराठी भाषांतर करुन म्हणलेलं. deformity ला मराठीत काय म्हणायच? व्यंग? व्यंगपेक्षा कमतरता शब्द बराच माइल्ड वाटतो मला. जीवनसत्वाची, हिमोग्लोबीनची कमतरता असते, तशीच ही एक कमतरता. त्या शब्दावर आक्षेप घेण्यासारखं काय?
की ही Biological/sexual deformity नाहीच असं म्हणायचय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जीवनसत्व, हिमोग्लोबीनची कमतरता हा 'विकार' म्हणता येईल. कारण त्यातून आरोग्याच्या समस्या उद्भवतात. जन्मतः तरललिंगी असल्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवत नाहीत. या लोकांना बहुदा नैसर्गिकरित्या पुनरुत्पादन करता येणार नाही. पण त्याला व्यक्तीच्या आरोग्याची समस्या म्हणावं का? माझ्या मते, नाही. कारण पुनरुत्पादन न केल्यामुळे ती व्यक्ती मरते असा प्रकार माणसांमधे नाही. शारीरिकदृष्ट्या सक्षम लोकही पुनरुत्पादन न करण्याचा निर्णय घेतात.

त्यामुळे या प्रकाराला बहुसंख्य लोकांपेक्षा वेगळेपण म्हणता येईल पण deformity - काहीतरी बिघडलं आहे - असं म्हणावं का? माझ्या मते, नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पटले नाही. पुनरुत्पादन न करणे आणि न करु शकणे यात फरक आहे.

१. नैसर्गिक हिजडे: जेव्हा गर्भ पोटात असतो तेव्हा (बहुदा ६/७व्या) महिन्यात पुरूष गर्भ असेल तर त्याच्या टेस्टिकल्स ओटीपोटातून मुळ पिशवीत संक्रमीत होतात (अर्थात ही सगळी ऐकीव/वाचीव माहिती - मी तज्ज्ञ नाही. तेव्हा तपशीलातील चुका दे.घे.) काही व्यक्तींच्या केसमध्ये लिंग पुरूषाचे असले तरी एकतर टेस्टिकल्स नसतातच किंवा त्या ओटीपोटातच रहातात. अर्थात त्यासोबत येणारे अनेक मह्त्त्वाचे पुरूषी हार्मोन्स तयार होत नाहीत व स्त्री हार्मोन्सही तयार होत नाहीत. >> हा मलातरी बर्थ डिफेक्ट/डिफॉर्मिटी वाटतोय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Any contiguous living system is called an organism. Organisms undergo metabolism, maintain homeostasis, can grow, respond to stimuli, reproduce and, through natural selection, adapt to their environment in successive generations. सजीवांचं हे वर्णन या विकीपानावरून.

अनेक स्त्री, पुरुष (ज्यांना पहिल्या दोन लिंगांमधेच मोजता येईल) पुनरुत्पादन करू शकत नाहीत. ज्यांना तरीही पुनरुत्पादन करायचं असतं त्यांच्यासाठी हा बिघाड आहे. ज्या स्त्री-पुरुषांची पुनरुत्पादनाची शारीरिक क्षमता आहे, पण मुलं (कधीही किंवा तेव्हापुरती) नको आहेत त्यांच्यासाठी ही क्षमता असणं हीच अडचण ठरू शकते. काही संप्रेरकांच्या अभावापोटी जर त्यांच्यात मातृत्त्व/पितृत्त्व असावं अशी भावनाच निर्माण होत नसेल तर (फक्त बहुसंख्य लोकांना असं वाटतं म्हणून) त्याला उणीव समजावं का? (उणीव समजलं की ती भरून काढण्याचे वेगवेगळे प्रयत्न होतात, आक्षेप त्याबद्दल असतो.)

ठराविक संप्रेरकांच्या अभावापोटी तृतीयपंथीयांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत असेल तर ती अडचण ठरेल.

सॉफ्टवेअरमधला बग कोणता आणि फीचर कोणतं हे आपापल्या सोयीनुसार आपण ठरवतो. (बघितला नसशील तर X-men ही चित्रपटमालिका पहा. बहुदा त्यातल्या दुसऱ्या चित्रपटात अशा प्रकारच्या विषयाचा उहापोह आहे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हम्म. विचार करतेय.

'जन्मतः तरललिँगी हे जैविक/लैँगिक कमतरता असलेले 'पुरुषच' असतात. स्त्री गर्भामध्ये असा काही दोष उद्भवू शकत नाही'. बरोबर? >>
या प्रश्नाचे उत्तर
www.en.wikipedia.org/wiki/Disorders_of_sex_development इथे मिळाले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दोन्ही वर्णने

"खोजा", नामक प्राणी जनानखान्यातील स्त्रीयांच्या रक्षणासाठी ठेवलेला सैनिक असे. आता, शे-पन्नास राण्या असल्यावर राजा कितपत पर्फॉर्म करील याची शंकाच असे. तेव्हा त्या सैनिकांशी संबंध ठेवता येऊ नये, पण त्याच वेळी त्या सैनिकांची लढण्याची शक्ती, अर्थात आक्रमक 'पौरुषत्व" नष्ट होवू नये म्हणून फक्त पेनाईल शाफ्ट अँप्यूट करण्यात येई असे ऐकून आहे. टेस्टिकल्स इन्टॅक्ट = टेस्टोस्टेरॉन + मेल अ‍ॅग्रेसिव्हनेस इन्टॅक्ट. नो शाफ्ट/ग्लान्स = 'शुद्ध चारित्र्याच्या' राण्या. म्हणे...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

या अशाप्रकारे हिजडा 'बनविलेल्या' व्यक्तीस पुन्हा सन्मानाने समाजात स्वीकारणे, या बद्दल गब्बर यांना आलेला 'राग' (कदाचित चुकीचा शब्द) हा मुळातच "हिजडे" बनतात कसे, या प्रक्रियेच्या अज्ञानातून आहे, असे सुचवितो.

नाय ओ.

समजलेच नाही ... तुम्हास काय म्हणायचे आहे ते. खरंच.

मला जे वाटते ते हे - की - regardless of how an individual becomes a eunuch - त्या व्यक्तीस काही बेसिक अधिकार/विकल्प्/जबाबदार्‍या आहेत. व हे अधिकार/विकल्प्/जबाबदार्‍या सर्वांनाच आहेत. स्त्री, पुरुष व तृतीयपंथीय. तृतीयपंथीय/पुरुष्/स्त्री म्हणून काही कोणत्याही विशेष जबाबदार्‍या लादलेल्या नाहियेत कोणावर (for the most part).

समाजात त्यांना सन्मानाने वागविले न जाणे ह्या बद्दल संपूर्ण समाजास आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणे हे मला अजून तरी पटलेले नाही. I am willing to be convinced but not yet convinced.

तसेच - जर स्त्रिया व पुरुष दोघांना तेच अधिकार असावेत - हे इष्ट असेल तर - स्त्री पुरुष तृतीयपंथीय तिघांना तेच अधिकार असावेत हे इष्ट आहे व असावे. LGBTTTQQIAA मधले Q हे सुद्धा लक्षणीय आहे (एक उदाहरण म्हणून... तुलना म्हणून नाही).

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डॉक (आणि इतर कोणाला माहिती असल्यास त्यांना), प्रश्न आहे.

काही XY व्यक्तींमध्ये Y गुणसूत्राचा ठराविक भाग नसल्यामुळे वृषण निर्माण होत नाहीत, व्यक्ती स्त्रीसारखीच दिसते. XX व्यक्तिंंमध्ये (पहिल्या वाक्यात वर्णन केलेला Y) गुणसूत्राचा भाग चुकून येऊन व्यक्ती पुरुषासारखी दिसते. या लोकांची ओळख काय म्हणून लावतात, मानतात? यांना तृतीयलिंगी मानतात का गुणसूत्रांनुसार (Y गुणसूत्राचा ठराविक भाग आहे का नाही याकडे दुर्लक्ष करून) पुरुष (XY) किंवा स्त्री (XX) असं वर्गीकरण होतं?

---

व्यक्तीची ओळख तिच्या गुणसूत्रांनुसार (XX किंवा XY), लैंगिक कलानुसार होणं हेच मुळात मागास असण्याचं लक्षण वाटतं. व्यक्तीची जात, वर्ण, वंश जन्मजात येतात, त्यानुसार भेदभाव करणं अयोग्य असं मत बहुसंख्य लोकांचं असेल. पण लैंगिक पद्धतीची ओळख मानण्यात गैर वाटत नाही, त्या निकषानुसार भेदभाव होण्याचा इतिहास आहे, अजूनही होतात तरीही. तृतीयपंथीयांच्या बाबतीत ज्यांची अशी ओळख जन्मजात नसेल त्यातल्या बहुतेकांवर हे अजाणत्या वयात, किंवा रूढी-परंपरांमुळे लादलं जातं. पुन्हा तेच, स्वतःचा निर्णय त्यात नाहीच.

व्यक्तीची ओळख कशावरून ठरते असा प्रश्न, या चर्चेच्या निमित्ताने पुन्हा एकदा पडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अँड्रोजन इन्सेन्सिटिव्हिटी सिंड्रोमबाबत प्रश्न आहे का?
विकिपीडिया दुवा
विशेषकरून कम्प्लीट अँड्रोजन इन्सेन्सिटिव्हिटी सिंड्रोम
"स्त्री" ओळख मानणे प्रचलित आहे असे वाटते. पुष्कळदा गुणसूत्रांत काहीर वेगळे असण्याचा काहीही निर्देश मिळत नाही, आणि जन्मापासून पुढेपर्यंत स्त्री म्हणूनच आयुष्य जगतात. काही कारणाने गुणसूत्रांची चाचणी झाली, तरी त्यानंतर स्त्री म्हणूनच ओळख राहाते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुढील सारांश मुद्दे बिंदुमाधव खिरेंच्या फेसबुक पानावरून घेतले आहेत. मी मूळ निकालही वाचला आहे, आणि हा सारांश त्यातील कलम १२९ मध्ये येतो :
We, therefore, declare:
(1) Hijras, Eunuchs, apart from binary gender, be treated as “third gender” for the purpose of safeguarding their rights under Part III of our Constitution and the laws made by the Parliament and the State Legislature.
(2) Transgender persons’ right to decide their self-identified gender is also upheld and the Centre and State Governments are directed to grant legal recognition of their gender identity such as male, female or as third gender.
(3) We direct the Centre and the State Governments to take steps to treat them as socially and educationally backward classes of citizens and extend all kinds of reservation in cases of admission in educational institutions and for public appointments.
(4) Centre and State Governments are directed to operate separate HIV Sero-survellance Centres since Hijras/ Transgenders face several sexual health issues.
(5) Centre and State Governments should seriously address the problems being faced by Hijras/Transgenders such as fear, shame, gender dysphoria, social pressure, depression, suicidal tendencies, social stigma, etc. and any insistence for SRS for declaring one’s gender is immoral and illegal.
Diablo Centre and State Governments should take proper measures to provide medical care to TGs in the hospitals and also provide them separate public toilets and other facilities.
(7) Centre and State Governments should also take steps for framing various social welfare schemes for their betterment.
(8.) Centre and State Governments should take steps to create public awareness so that TGs will feel that they are also part and parcel of the social life and be not treated as untouchables.
(9) Centre and the State Governments should also take measures to regain their respect and place in the society which once they enjoyed in our cultural and social life.
Hon'ble Justice K. S. Radhakrishnan
Hon'ble Justice A. K. Sikri

---------------------

मला वाटते, की त्रास देऊन भीक मारण्यास संरक्षण कुठेच दिलेले नाही. (ज्या प्रमाणे भटक्या/विमुक्त जमातींच्या वैधानिक संरक्षणात त्यांच्यापैकी काही चोर्‍या करतात हा मुद्दा फारच दुय्यम आहे.) (सदस्य मन यांचे मुद्दे)
बळजबरीने खच्चीकरण करणार्‍यांना निकालात संरक्षण दिलेले नाही. (सदस्य आडकित्ता यांचे मुद्दे.)
सदस्य गब्बर सिंग "अमुक तमुक बाबतीत तृतीयपंथी लोकांना मज्जाव नाही" अशी यादी देतात. ज्या बाबतीत फरक आहे, आणि घटनाबाह्य आहे, त्याची यादी न्यायालयाने दिलेली आहे. जर अन्य कुठल्या बाबतीत मज्जाव नसेल, तरी ज्या बाबतीत घटनाबाह्य असमानता आहे, त्या बाबतीत निर्णय देता येतो.
आपली लिंगओळख काळजीपूर्वक लपवल्यास तृतीयपंथी लोकांना नोकरीत किंवा अन्य ठिकाणी दुजाभाव मिळणार नाही, असा सदस्य नितिन थत्ते यांचा मुद्दा - मुद्दा निकालाशी सुसंदर्भ आहे. मात्र लिंगओळख काळजीपूर्वक लपवणे हा अधिक, त्रासदायक, आणि अपमानास्पद बोजा या व्यक्तींवर पडतो, ही असमानता घटनाबाह्य आहे, असे न्ययालयाचे मत दिसते. न्यायालयाच्या मताशी मी सहमत आहे. हा अधिक बोजा त्रासदायक असतो, हे मी समजतो.

वगैरे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सदस्य गब्बर सिंग "अमुक तमुक बाबतीत तृतीयपंथी लोकांना मज्जाव नाही" अशी यादी देतात. ज्या बाबतीत फरक आहे, आणि घटनाबाह्य आहे, त्याची यादी न्यायालयाने दिलेली आहे. जर अन्य कुठल्या बाबतीत मज्जाव नसेल, तरी ज्या बाबतीत घटनाबाह्य असमानता आहे, त्या बाबतीत निर्णय देता येतो.

.

ती यादी शोधून वाचेन आज संध्याकाळी.

---

मात्र लिंगओळख काळजीपूर्वक लपवणे हा अधिक, त्रासदायक, आणि अपमानास्पद बोजा या व्यक्तींवर पडतो, ही असमानता घटनाबाह्य आहे, असे न्ययालयाचे मत दिसते.

१) हे काही पटले नाही. कारणे मी वर माझ्या पहिल्या/दुसर्‍या प्रतिसादात दिलेली आहेतच. तुम्ही न्यायालयाचा निर्णय वाचलेला आहे. आता एक सजेशन - हे वाचून पहा - The problem of social cost _ Ronald Coase. कोस सायबांचा मुद्दा अत्यंत गहन आहे. So do not castigate yourself if you do not understand it in first reading. Smile

२) न्यायालयाचे लाईन ऑफ रिझनिंग समजून घ्यायला आवडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्रासदयक मुद्दा नितिन थत्त्यांकरिता - त्यामुळे त्याबाबत तुमचे प्रतिसाद वाचलेले नाहीत, वाचेन. न्यायालयाचा पूर्ण निर्णय येथे सापडेल :
http://orinam.net/377/wp-content/uploads/2014/04/Judgement_Nalsa_Transge...

कोसच्या मुद्द्याचा या ठिकाणी संबंध काय, तो निर्देश केल्यास निबंध वाचायला सोयिस्कर होईल.
This paper is concerned with those actions of business firms which have harmful effects on others. The standard example is that of a factory the smoke from which has harmful effects on those occupying neighbouring properties.
असे सूतोवाच कोस करतो. त्याच्या सर्व उदाहरणांत वादी-प्रतिवादी खाजगी आहेत. या धाग्यातील खटल्यात प्रतिवादी सरकार/शासन होते. जर कोसचे सूतोवाच माहितीप्रद असेल, तर या ठिकाणी तो निबंध वाचायचे प्रयोजन स्पष्ट नाही. अर्थात एक स्वतंत्र शिफारस असू शकेल, म्हणा, परंतु तुमच्या वाक्यावरून "निर्णय वाचला, आता निबंध वाचा" संबंध सांगायचा आहे, असे वाटते.

निबंध चाळताना डोळे थबकले असे एक गमतीदार वाक्य उद्धृत करतो आहे :
The reasoning employed by the courts in determining legal rights will often seem strange to an economist because many of the factors on which the decision turns are, to an economist, irrelevant.
(परंतु येथेसुद्धा मुद्दा दोन खाजगी व्यक्ती/कंपन्यांमधील कलहाबाबत होता.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुरुषाची नैसर्गिक लिंगओळख/वागणूक ही माजावर आलेल्या प्रत्येक स्त्रीला वश करून तिच्याशी रत होण्याची असते/असायला हवी.

परंतु बहुतांश सुसंस्कृत समाजात (नोकरीच्या ठिकाणीच नव्हे तर सर्वत्र) ही नैसर्गिक ओळख/वागणूक लपवावी लागते. त्याचा कित्येक पुरुषांना खूपच त्रास होतो. ओळख वागणूक काळजीपूर्वक लपवणे हा अधिक, त्रासदायक, आणि अपमानास्पद बोजा या व्यक्तींवर पडतो.

ओळख लपवण्याचा नेमका कितपत त्रास होतो याची वैयक्तिक कल्पना नाही.

नोकरीच्या ठिकाणी आपली तृतीयपंथी अशी ओळख दाखवूनच देण्याची (शो ऑफ करण्याची) कोणती गरज असते हे अजून लक्षात येत नाहीये. राहता राहिला मुद्दा कुठल्या फॉर्मवर लिंग लिहिताना तृतीयपंथी म्हणून उल्लेख करण्याचा ... तर त्याविषयी मला काही ऑब्जेक्शन नाही.
परत एकदा लिहिण्याचा मुद्दा हा की आज आपण स्त्री-पुरुषांनीही नोकरीच्या ठिकाणी समान पद्धतीने वागावे अशी अपेक्षा करत असतो.

या रेकग्निशनने पुढे काही जटील आर्थिक प्रश्न निर्माण होतील किंवा कसे ते ठाऊक नाही.
सध्या आगगाडीत महिलांसाठी वेगळे डबे असतात (पुरुषांसाठी राखीव डबे-जागा नसतात), महिला व पुरुषांसाठी वेगळी स्वच्छतागृहे असतात. तृतीयपंथीयांनी यापैकी कोणत्या स्वच्छतागृहात जावे? की त्यांच्यासाठी यापुढे वेगळे राखीव डबे /वेगळी स्वच्छतागृहे ठेवावी लागतील?

. खरे तर बहुतांश प्राण्यांमधल्या नराची
. माजावर कोण आली आहे हे (संस्कृती- कपडे घालणे वगैरे मुळे)सहज लक्षात येत नसल्याने प्रत्येक स्त्रीला वश करून......
. असा त्रास होणार्‍या पुरुषांचे प्रमाण समाजात एकूण तृतीयपंथीयांच्या प्रमाणापेक्षा नक्कीच जास्त असावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पुरुषाची१ नैसर्गिक लिंगओळख/वागणूक ही माजावर आलेल्या२ प्रत्येक स्त्रीला वश करून तिच्याशी रत होण्याची असते/असायला हवी.

याच्याशीच असहमत आहे, त्यामुळे पुढच्या तर्काशी सहमतीचा संबंधच नाही.

सध्या आगगाडीत महिलांसाठी वेगळे डबे असतात (पुरुषांसाठी राखीव डबे-जागा नसतात), महिला व पुरुषांसाठी वेगळी स्वच्छतागृहे असतात. तृतीयपंथीयांनी यापैकी कोणत्या स्वच्छतागृहात जावे? की त्यांच्यासाठी यापुढे वेगळे राखीव डबे /वेगळी स्वच्छतागृहे ठेवावी लागतील?

यात जटील प्रश्न काय आहेत? तृतीय पंथीयांना यापैकी जिथे जाणे सोयीस्कर पडते तिथे जाऊ द्यावे. जर काही वेगळी योजना आवश्यक असेल तर तसे करावे लागेल? फक्त स्त्रियांना राखीव डबे असतात, तृतीयपंथीयांना सामायिक डब्यातून प्रवास करणे तसेच स्त्रियांच्या डब्यातूनही प्रवास करणे कठीण जात असेल तर त्या व्यक्तींसाठी विकलांगांच्या डब्याइतका वेगळा डबा निर्माण करता येईलच( कारण यांची दर ट्रेन संख्या प्रमाण स्त्री-पुरूषांएवढे नसेल)
आणि काय सोयी हव्यात हे निव्वळ स्त्री पुरूषांनी चर्चा करून ठरवता येणार नाहीच. तृतीय पंथीयांचे मत घेऊन त्याचा निर्णय करावा लागेल

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पुरुषाची१ नैसर्गिक लिंगओळख/वागणूक ही माजावर आलेल्या२ प्रत्येक स्त्रीला वश करून तिच्याशी रत होण्याची असते/असायला हवी.

याच्याशीच असहमत आहे, त्यामुळे पुढच्या तर्काशी सहमतीचा संबंधच नाही.

असोच मग.

>> तृतीय पंथीयांना यापैकी जिथे जाणे सोयीस्कर पडते तिथे जाऊ द्यावे.

अहो पण मग त्यांच्यावर तो अन्याय नाही का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

तृतीय पंथीयांना यापैकी जिथे जाणे सोयीस्कर पडते तिथे जाऊ द्यावे.
अहो पण मग त्यांच्यावर तो अन्याय नाही का?

नाही समजले, कोणावर अन्याय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

यात जटील प्रश्न काय आहेत? तृतीय पंथीयांना यापैकी जिथे जाणे सोयीस्कर पडते तिथे जाऊ द्यावे.

तृतीयपंथीय माझ्या प्रसाधनगृहात येणे मला सोयीस्कर नसल्यास माझ्या व्यक्तीस्वातंत्र्याचा भंग होणार नाही काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बरोबर आहे, होईल. जर हे होणार असेल तर मग त्यांच्यासाठी वेगळि प्रसाधनगृहे काढावी लागतील. खाली धनंजय यांनी दिलेल्या तीन केसेस पुरेषा स्पष्ट आहेत.
अजो म्हणतात तसे, हा काही नवा प्रश्न नाही, यावर उपाय केल्यास ते नवे ठरेल, हा प्रश्न सध्याही अस्तित्त्वात आहेच की!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>> पुरुषाची१ नैसर्गिक लिंगओळख/वागणूक ही माजावर आलेल्या२ प्रत्येक स्त्रीला वश करून तिच्याशी रत होण्याची असते/असायला हवी.

परंतु बहुतांश सुसंस्कृत समाजात (नोकरीच्या ठिकाणीच नव्हे तर सर्वत्र) ही नैसर्गिक ओळख/वागणूक लपवावी लागते. त्याचा कित्येक३ पुरुषांना खूपच त्रास होतो. ओळख वागणूक काळजीपूर्वक लपवणे हा अधिक, त्रासदायक, आणि अपमानास्पद बोजा या व्यक्तींवर पडतो. <<

मला वाटतं की मानवी लैंगिकता ह्यापेक्षा गुंतागुंतीची आहे. प्रत्येक समागमोत्सुक स्त्रीशी समागम करायला उत्सुक आणि तयार असणारा पुरुष माझ्या परिसरात अस्तित्वात नाही. तशा बाता करणारे (विशेषतः दोन पेग मारल्यानंतर) पुरुष आहेत, पण तेदेखील ती कृती प्रत्यक्षात आणत नाहीत. डॉन जुआन किंवा कॅसानोव्हासारख्या गोष्टी हेच दाखवून देतात की असं वर्तन मानवजातीत अपवादात्मक आहे; नियम नाही. बाकी उपहास समजला, पण ते असोच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

>>प्रत्येक समागमोत्सुक स्त्रीशी समागम करायला उत्सुक आणि तयार असणारा पुरुष माझ्या परिसरात अस्तित्वात नाही.

तेच ते.... सुसंस्कृत समाजात तसे करता येत नाही म्हणून नैसर्गिक भावना लपवून ठेवल्या जातात.

भावना होणार्‍यांचे प्रमाण तरुण वयात जास्त असेल आणि प्रौढ वयात कमी असेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

जंतू : >>प्रत्येक समागमोत्सुक स्त्रीशी समागम करायला उत्सुक आणि तयार असणारा पुरुष माझ्या परिसरात अस्तित्वात नाही.

थत्ते : >> तेच ते.... सुसंस्कृत समाजात तसे करता येत नाही म्हणून नैसर्गिक भावना लपवून ठेवल्या जातात. <<

हा पुरेसा प्रतिवाद नाही, कारण मी ज्यांच्याबद्दल बोलतोय ते पुरुष काही समागमोत्सुक स्त्रियांशी (किंवा पुरुषांशी) शरीरसंबंध ठेवतात, पण सर्व नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की संस्कृतीमुळेच नाही, तर लैंगिक कलानुसार, व्यक्तिगत आवडीनिवडीनुसार किंवा इतर कारणांनुसार कुणाकुणाशी संबंध ठेवायचे ते ठरवलं जातं आणि ते खूप गुंतागुंतीचं असतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

(मुद्दा १ गंभीर वाटतो, म्हणून सहज प्रतिसादाचे दोन मुद्दे आधी घेतो, थोडक्यात उत्तर)
२. पैकी "अन्य व्यक्तीला वश करून घेण्याचे स्वातंत्र्य" हे अन्य व्यक्तीच्या "मला वश व्हायची इच्छा नाही" स्वातंत्र्याचे आड आल्यामुळे रद्द ठरते, किंवा मर्यादित ठरते. (कोर्टाचा निकाल "तृतीयपंथीलोकांना अन्य लोकांना त्यांच्या मनाविरुद्ध वश करण्याचा मूलभूत अधिकार बहाल करते" असा काही गैरसमज झालेला आहे का? नाहीतर हा विचार असंदर्भ वाटतो.)
माझ्या ऑफिसात एक पुरुष "आपण मोठे रोमियो आहोत" अशी छबी निर्माण करून होता. गप्पा वगैरे मारे. परंतु ऑफिसातील कुठल्याही विवक्षित स्त्रीला वश करायचा प्रयत्न करत नसे. म्हणून कोणाची तक्रार नव्हती, आणि त्याची नोकरी चालू राहिली. मला वाटते "आपल्याला खूप वेगवेगळ्या स्त्रिया लैंगिकदृष्ट्या आवडतात", इतकेच काय "एक-वर्ग-म्हणून सर्वच स्त्रिया लैंगिकदृष्ट्या आवडतात" ही ओळख सध्या दाखवण्याचे स्वातंत्र्य आहे. कुठल्याही विवक्षित स्त्रीचा हक्क भंग होत नाही, हे कर्तव्य आहे, हक्काचा भंग नाही.

३. जर मुदा २-प्रतिसाद खाली "अशा पुरुषांचे हक्क" बाद होत नसतील, तर "समाजातील प्रमाण" हा विचार नि:संदर्भ आहे. मूलभूत अधिकार व्यक्तीनिहाय असतात. प्रत्येक व्यक्तीला "मी-या-एका-व्यक्तीचे मूलभूत अधिकार सुरक्षित राहातील, आणि त्यांचे उल्लंघन झाल्यास मी-या-एका-व्यक्तीला दाद मागता येईल" अशी अपेक्षा असणे रास्त आहे.

-------------

१. राखीव डब्यांचा मुद्दा स्वतःहून मूलभूत स्वातंत्र्याचा नसावा, मूलभूत स्वातंत्र्यांचे रक्षण करण्याचा सोयीस्कर शासकीय मार्ग असावा. एखाद्या विवक्षित वर्गाने असे दाखवले, की "मूलभूत स्वातंत्र्यांचा संकोच होत आहे", तर मूलभूत स्वातंत्र्याचा संकोच होऊ नये अशी बिगर-आरक्षण शासकीय धोरणे असू शकतात. उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणीचा मज्जाव रद्द करणे, हे तर आरक्षणाच्या विरुद्ध धोरण असते - हे धोरण पुष्कळदा योग्य आणि व्यवहार्य असते. अथवा एखाद्या ठिकाणचा विशेष-जाच रद्द करणे - पोलिसांचा त्रास-निशाणा असला, तर ते बंद करणे - हे धोरणसुद्धा आरक्षणाच्या विरुद्ध आहे. या प्रकारची धोरणे वर्ग-कितीका-लहान-असेना लागू करता येतात. कारण मूलभूत स्वातंत्र्ये ही "व्यक्ती" नामक सर्वात-लहान-वर्गाला लागू आहेत.

अशा "मज्जाव काढणे" वा "विशेष-जाच-रद्द-करणे" धोरणामुळे पुन्हा व्यवहारात मूलभूत स्वातंत्र्य प्राप्त होत नसेल (अनुसूचित जातीजमातींच्या बाबतीत) तर ते स्वातंत्र्य मिळवून देण्याकरिता व्यवहार्य धोरण म्हणून आरक्षणाचा मार्ग वापरतात. शिक्षण आणि सामाजिक बदल झाला आणि स्त्रियांचे सुरक्षिततेचे मूलभूत स्वातंत्र्य सामान्य-रेल्वे-डब्यात अबाधित राहू लागले, तर "राखीव डबे" हे धोरण निरवकाश होते. "राखीव डबे" हा हक्क नाही.

प्रसाधन सुविधा हा प्रश्न आहे खरा. हा व्यावहारिक-आर्थिक प्रश्न आहे. ते सोडवल्याचे पुढील काही प्रकार मी बघितले आहेत.
(अ) ज्या ठिकाणी "स्त्रियांची प्रसाधनगृहात सुरक्षा" ही बाब शिक्षणामुळे किंवा सांस्कृतिक बदलामुळे नेमाची झाली आहे, त्या ठिकाणी प्रत्येक प्रसाधनगृह स्त्री-पुरुष दोघांकरिता खुले ठेवता येते. असे प्रकार काही छोट्या उच्चभ्रू ऑफिसांत बघितलेले आहेत. इमारतीत प्रसाधनगृहांसाठी जागा थोडीच असते, आणि वापरणार्‍यांची संख्याही मोजकी असते.

(आ) सांस्कृतिक परिस्थिती अर्धवट असेल, आणि इमारतीत जागा असेल, तर स्त्री-प्रसाधनगृह, पुरुष-प्रसाधनगृह, आणि कोणीही वापरू शकेल असे प्रसाधनगृह (पुष्कळदा यात गरजेनुसार कमी संडास असतात) असे तीन प्रकार दिसतात. हा प्रकार मी काही सार्वजनिक ठिकाणी बघितलेला आहे. नाहीतरी आधीपासून खुर्ची वापरणार्‍या अपंगांसाठीचे प्रसाधनगृह बहुतेक ठिकाणी स्त्री-वा-पुरुषांकरिता असे. त्यामुळे लिंग-अविवक्षित असे छोटे प्रसाधनगृहसुद्धा असणे, याची व्यवस्था सोपी गेली असावी.

(इ) सदस्य गवि म्हणतात, आणि बहुधा तुम्ही म्हणता ती परिस्थिती महत्त्वाची आहे : ज्या ठिकाणी स्त्रियांना धोका आहे, म्हणून वेगळे स्त्री, पुरुष प्रसाधनगृह आवश्यक आहे, आणि इमारत लहान आहे, आर्थिक चणचण आहे, म्हणून तिसरे लिंगनिरपेक्ष प्रसाधनगृह बांधणे सोयीचे नाही... अशी परिस्थिती भारतात बहुतांश ठिकाणी लागू असेल. शेवटी हा प्रकार "शिक्षणाचा मूलभूत हक्क"सारखा ध्येयनिर्देश असेल. व्यवहार्य होण्यापूर्वीसुद्धा असे मूलभूत हक्क ओळखणे उपयोगी असते. जेणेकरून जेव्हा व्यवहार्य होईल तेव्हा, किंवा जिथे व्यवहार्य होईल त्या ठिकाणी (देशभर व्यवहार्य नसला तरी) हक्काची अंमलबजावणी करता येते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>"तृतीयपंथीलोकांना अन्य लोकांना त्यांच्या मनाविरुद्ध वश करण्याचा मूलभूत अधिकार बहाल करते" असा काही गैरसमज झालेला आहे का? नाहीतर हा विचार असंदर्भ वाटतो.)

+१. तसा काही समज झालेला नाही. पुरुषांनाही स्त्रीच्या मनाविरुद्ध वश करण्याचा हक्क नसतो आणि असूच नये. [अलिकडे (नोकरीच्या ठिकाणी) वश करण्याविषयी विचारण्याचाही हक्क काढून घेतला जात आहे].

तृतीय लिंग म्हणून नोंद करणे, घरांतून बहिष्कृत होत असतील तर ते रोखणे, पोलीस विशेष त्रास देत असतील तर तो बंद करणे इत्यादि (थेट अत्याचारात्मक असलेल्या) बाबी मान्यच आहेत.

थोडेसे निगेटिव्ह वाटणारे प्रतिसाद देण्याचे कारण म्हणजे इतर अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न आहे. या वरच्या बाबींखेरीज इतर प्रश्न हे त्यांनी दोन पैकी एका लिंगात स्वतःला "कोंबल्यास" सुटू शकतात. तसे कोंबून घेण्यात नक्की काय अडचणी असतात ते काही माझ्या लक्षात येत नाहीये.

अवांतर: या कोंबण्यावरून आठवलं- आपण सहसा जेंडर स्टिरिओ टाइपच्या विरोधात असतो. स्त्रियांनी असले कपडे घालू नयेत, पुरुषांनी नटू-मुरडू नये अशा सूचना त्याज्य आहेत असे आपले म्हणणे असते, मग तृतीय लिंगीयांनी आणखी एक स्टिरिओटाइप* निर्माण करावा अशी आपली इच्छा का आहे?

*त्यांनी पुरुषांप्रमाणे राहणे हे अन्यायाचे आहे असे म्हणणार्‍यांना उद्देशून हा प्रश्न आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

कार्यालय-आयुष्य-समतोल ("वर्क-लाइफ बॅलन्स") सुविधा अनुपलब्ध होतात.

विवक्षित कपडे घालणे किंवा नटणे हा तितकासा महत्त्वाचा मुद्दा नाही.

मालक/कंपनीची काही कल्याणकारी धोरणे पगाराला वरकड "बेनिफिट्स" म्हणून असतात. त्या बाबतीत कायदा लागू असू शकतो. उदाहरणार्थ कार्यालयाबाहेरच्या अडचणी लक्षात घेऊन रजा देण्याबाबत धोरणे, वगैरे. विचार केला तर असे बरेच मुद्दे सापडतील. आजकाल माझा विभाग जर पार्टी देणार असेल तर "तुम्ही +१ अतिथी" असे आमंत्रण देते. (पूर्वीच्या काळी "तुम्ही व पत्नी".) येथे पत्नीला दिलेले आमंत्रण केवळ पैशांतच मोललेले नाही, पण पुढील (बिगरकायदा) मुद्द्याशी सुद्धा निगडित आहे.

शिवाय (कायद्याच्या थेट कक्षेच्या बाहेर) कामाच्या ठिकाणी बिगरकाम संवादाची सरमिसळ ही सहकार्‍यांशी मैत्री वाढवणे, "नेटवर्किंग", पुढे बढती वगैरेंकरिता उपयोगी असतात. उदाहरणार्थ, माझ्या कार्यस्थळात लोक अधूनमधून थोडा वेळ आपल्या कुटुंबाबाबत, आपण सुट्यांमध्ये गेलो त्या ठिकाणाबाबत गप्पा मारतात. कितपत सरमिसळ केली तर कामाविषयी मैत्रीपूर्ण संवाद होतो, हे जाणणे एक कला आहे, पण खूप कठिण नाही. पुष्कळ लोकांना जमते. जे लोक काटेकोर कामापुरते "जेवढ्यास तेवढे" बोलतात, ते सहकार्‍यांशी कमी मिसळतात, सहकारी त्यांना कमी प्रकल्पांमध्ये आपणहून सामावून घेतात, वगैरे. सुरुवातीला तरी, किंवा पुढेसुद्धा उपचारापुरते तरी, नव्या सहकार्‍याच्या कार्यालयाबाहेरील जीवनाबाबत विचारपूस होते. अशी विचारपूस सुसंस्कृत आणि कार्यालयीन मैत्रीकरिता चांगली मानली जाते. अशा वेळी "हे विचारायचा तुम्हाला अधिकार नाही" असे म्हणणे कायदेशीर असले, तरी त्यानंतर कार्यालयातील मैत्रीपूर्ण व्यवहार खुंटतो. अशा परिस्थितीत (पूर्वी तरी) "तुम्हाला अधिकार नाही" म्हणण्यापेक्षा खोटे बोलून ("माझे कोणीच नाही", वा आणखी खोटे म्हणजे "माझे अमुकतमुक कोणी आहे, ते तुमच्या अपेक्षेप्रमाणे आहे.") तात्पुरते काम चालवता येते. आणि शिवाय बर्‍याच लोकांना असला खोटेपणा ओळखता येतो. त्यामुळे खोटे बोलूनही "वर्क-लाईफ" सरमिसळीचा काहीच फायदा मिळत नाही.)

बोलके असून घुमेपणा स्वीकारणे, किंवा (अन्य लोक खरे बोलतात त्या परिस्थितीत*) खोटे बोलत राहाणे, हे प्रकार पुष्कळ मानसिक तणाव उत्पन्न करतात.
(*सर्वच लोक खोटे बोलतात, उदा. "गुड मॉर्निंग", "हाऊ आर यू? आय एम फाईन" अशा बाबतीत त्या वाक्यांतील शब्दार्थ पुसून जातात. आणि तशा खोट्या बोलण्याने तणाव वाटत नाही.)
--- वैयक्तिक अनुभब, संदर्भाला आनुषंगिक, थेट तृतीयपंथी नसल्यामुळे केवळ समांतर सुसूत्रता ---
माझा वैयक्तिक अनुभव आहे, की कार्यालयात (आणि कुटुंबातही, हा अवांतर मुद्दा) लैंगिकता-ही-बाब उघड केल्यावर, (आणि त्याचा काहीच दुष्परिणाम न-झाल्यानंतर!) खूपच हलके, मोकळे वाटू लागले आणि पहिल्या कार्यस्थळापेक्षा मी खूपच अधिक सहाकारी-सामाज-प्रिय झालो आहे. "ओळख उघड असणे" याच्यामुळे पेहराव बोलण्याची शैली, वगैरे काहीच बदलले नाही. कार्यालयाच्या पार्टीमध्ये जोडीदाराला नेतो आणि (बाकीच्या जोड्यांइतकाच) खेटून उभा राहातो, असे काही थोडे दृश्य परिणाम आहेत, ते थोडेच.
जर त्यापूर्वीच्या आयुष्यात विचारले असते, तर अशा दररोजच्या तणावाखाली मी वावरतो आहे, असे मला माहीतही नव्हते. परंतु त्यानंतरच्या आयुष्यातील वाटलेल्या मोकळेपणामुळे सिद्ध होते, की पूर्वी तणावाखाली होतो.
---

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कौशल (कलम ३७७) खटल्याच्या निकालामध्ये त्या खंडपीठाने "यामुळे सूक्ष्मातिसूक्ष्म अल्पसंख्येला त्रास होतो, म्हणून त्यांच्या मूलभूत हक्कांकडे दुर्लक्ष करण्यासारखे आहे" असे काहीतरी म्हटले होते.

त्या पूर्ण कातडीबचाऊ* निर्णयात हा मुद्दा सर्वात घटनाविरोधी होता, असे मला तेव्हा जाणवले होते.
(*कातडीबचाऊ - भविष्यात हा हक्क सर्वमान्य झालाच, होईल असेही त्या न्यायाधीशाला वाटते आहे, पण आपण निर्णय देण्याऐवजी "विधिमंडळाने कायदा बदलला तर ठीकच" अशी जबाबदारी झिडकारणे.)
बाकी सर्व कातडीबचाऊ वाक्ये घटनेशी/घटनेच्या व्यवहार्य अंमलबजावणीशी वगैरे सुसंगत होती. "सेपरेशन ऑफ पावर्स"चा पूर्ण मुद्दा भारतीय कायदेप्रक्रियेत इतका बुळबुळीत आहे, की तो मनसोक्त वापरता येतो.

त्या कल्पनेबाबत या निर्णयात सौम्य का होईना ताशेरे नोंदवलेले दिसतात. हिंदू वर्तमानपत्रातील अग्रलेखात त्या ताशेर्‍यांचे उद्धरण असे :
The sentence that transgenders “even though insignificant in numbers… have every right to enjoy their human rights” is a fitting rebuttal to the claim in Koushal that because the LGBT community is a minuscule minority, it could not be held that the Section is invalid.

मूलभूत हक्क हे प्रत्येक व्यक्तीसाठी आहेत याबाबत घटनेत काही संदिग्ध होते, अशी शंकाही कधी मला आली नव्हती. चुकून/ब्रिटिश इंडिया दंडसंहिता सोयीसाठी अख्खी घेतल्यामुळे हक्कांचे उल्लंघन होत असल्यास "उल्लंघन होणार्‍यांची संख्या थोडी की अधिक?" हा प्रश्नच उद्भवायला नको होता. ही बाब प्रस्तुत (तृतीयपंथी) निर्णयातल्या उद्धृत वाक्याने अधोरेखित केलेली दिसते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१. व्यक्तिंना जबरदस्तीने तॄतियपंथी बनवले गेलेले असणे / नसणे.
२. व्यक्ति निसर्गतः तृतियपंथी असणे /नसणे
३. अशा व्यक्तिंचा वैद्यकीय इलाज करून त्यांना पूर्ववत (वा लैंगिक क्रियांस क्षम वा पुनरुत्पादनास क्षम) करणे शक्य असणे /नसणे
४. असा इलाज व्हावा अशी इच्छा असणे / नसणे
५. यासाठी आर्थिक क्षमता असणे/ नसणे

यातल्या
१. आयटम १ च्या बाबतीत कारवाई व्हायला हवी. त्यासाठी सरकारने पोलिसांत एक स्वतंत्र विभाग/कलम काढला पाहिजे.
२. जी व्यक्ति नैसर्गिक तृतियपंथी आहे, ज्यांना (वा पालकांना) इलाज हवा आहे, शक्य आहे त्यांच्यासाठी सुद्धा सरकारने, समाजाने पुढाकार घ्यायला हवा.
३. ज्या व्यक्ति आपल्या नैसर्गिक अवस्थेशी सहज आहेत वा इलाज शक्य नाही, त्यांना तसे असण्याचे स्वातंत्र्य हवे आणि सोबतच त्यांना इतरांप्रमाणे सामाजिक सन्मान हवा.

भारतात
१. तृतियपंथी लोकांची प्रचंड वाईट अवस्था आहे. 'स्त्री वा पुरुषाची सामान्य आढळते तशी मानसिकता नसणे', 'संभोग न करू शकणे', 'पुनरुत्पादन न करू शकणे' हे लैंगिक व्यंग आहे असे मानले तरी इतर व्यंग असलेल्या लोकांना जशी सहानुभूती आढळते वा सहानुभूती नको असेल तर सामान्य व्यवहार आढळतो तसे यांच्याशी होत नाही.
२. या लोकांना पालक, समाजाच्या बदनामीच्या भितीने, त्यागतात.
३. या लोकांना कोणीही जवळ करत नाही.
४. सन्मान हा शब्द हिजडा शब्दाच्या विरोधार्थी आहे.
५. मानसिक स्वास्थ्याचा काही संबंध नसताना, या लोकांना इतकी हिन वागणूक दिली जाते कि आपले मानसिक संतुलन घालवून बसतात.
६. यांची सारी संपत्ती सहसा नातेवाईक लुटतात.
७. नितिनजी म्हणाले तसे साध्या कपडयांत, इतरांना न कळू देता, सभ्यपणे जगणारे असे लोकच नसावेत. एकदा तुम्ही तृतियपंथी सिद्ध झालात (घरात सर्वांना कळते, नोकरीत मेडीकल एक्झाम असते, सर्वत्र बरेच प्रसंग असतात.) कि आयुष्य बरबाद हे निश्चित आहे. शिवाय या लोकांचा आवाज, केस, स्तन, चाल, काही ना काही त्यांचे स्टेटस सिद्ध करते.
८. लैंगिक व्यंग घेऊन जन्माला येणे एक शाप आहे यात कोणाचेच दुमत नसावे.

आपल्या एखादी समस्या सोडवताना एक उदासिनता दिसून येते. म्हणजे अगदी नगण्य खर्चात भारत सरकार सार्‍या भिकार्‍यांचे पुनर्वसन करू शकते. पण पुन्हा तितकेच नविन भिकारी बनतील 'म्हणून' करत नाही. म्हणजे गरीबांकरिता योजना आहेत, पण भिकार्‍यांकरिता नाहीत. पण हे लॉजिक तृतियपंथीयांना लागू होऊ नये. They cannot be replenished.

त्यानंतर प्रश्न येतो तो लैंगिक ओळखीचा, अस्मितेचा. अगोदरच्या काळात स्त्री, पुरुष अशी बायनरी ओळख असे. 'इतरांना' या पैकी एक पर्याय निवडावा लागे. इथे प्रश्न येतो कि माणसाची एकूण लैंगिक ओळख काय असते? जीन्स? लैंगिक अवयव? ते संभोगासाठी क्षम/अक्षम असणे? असे हार्मोन्स? पुरुषी भावना? स्त्रैय भावना? कोणत्या लिंगाचा साथीदार हवा त्याची भावना? शरीराचा बांधा? आवाज? चाल? केस? रजोवृत्ती? स्तन? कटी, नितंब यांची विशिष्ट रचना? पाल्याबद्दलच्या भावना? त्याच्याबद्दलचे प्रेम, त्याग, कर्तव्ये? कोणते विशिष्ट अन्न आवडणे? स्थान आवडणे? शरीरसजावट आवडणे? विशिष्ट प्रकारची सामाजिक वा कौटुंबिक कामे आवडणे? उग्रपणा? हिंसकता? निवृत्तीची आवड? लिबिडोची मात्रा? वगळायची जवळची नाती, जाती, वंश? एकूणात आयुष्यात किती लोकांशी लैंगिक संबंध ठेवायचा ते? एकदाच किती लोकांशी ठेवायचा ते? किती प्रकृतीच्या लोकांशी ठेवायचा ते? यातही काही गोष्टी ऑन/ऑफ वाल्या असतात आणि काही गोष्टी रेंज वाल्या असतात.(तरीही आजच्या किचकट समाजव्यवस्थेशी निगडीत प्रश्न मी इथे शक्यतो टाळतोय, म्हणजे contractual or out-side a contract relation, social status, sharing of wealth and income, etc.) यातलं काही काही निसर्गानं लादलं आहे, काही समाजानं लादलं आहे, नि काही स्वतः चयन करायचं आहे. याने लैंगिक ओळखीचे हजारो permutations, combinations बनतात. म्हणजे आदर्शतः प्रत्येकच व्यक्तिचे लिंग एक वेगळाच प्रकार म्हणावा लागेल. गब्बरजींनी वर LGBTTTQQAII असा शॉर्ट फॉर्म जो वापरला आहे तो प्रचंड अपुरा आहे. आजवर सिद्ध झालेल्या वै़ज्यानिक शोध जे म्हणतात ते आधारभूत ठेऊन आणि समाजास जे सर्वात इष्ट आहे त्या स्थितीस जाणे गरजेचे आहे. आणि भारताच्या बाबतीत या सर्व प्रश्नांपैकी तृतियपंथीयांचा प्रश्न (त्यांच्या जितका अन्याय होतो ते पाहता) सर्वात पहिला ठरावा.

म्हणून -
१. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात जो "recognition" भाग आहे त्याचे मी स्वागत करतो. म्हणजे If I am neither P nor Q then I should not be asked to tell myself one between them. (रेल्वेचे डबे, टॉयलेट, लिंगाधारित शाळा, कक्ष हे आजवर नव्हतेच हे अन्यायाचे प्रतीक आहे. 'त्याचे काय करायचे' ही नवी समस्या नाही, काही केलेच तर तर अन्यायाचे निराकरण आहे.)
२. मी बर्‍यापैकी परंपरावादी आहे. पर्याय/इलाज असेल तर 'तृतीयपंथी राहण्याचे' स्वातंत्र्य व्यक्तिला नसावे असे माझे मत आहे. म्हणजे वैद्यकीय इलाज असताना अगदी बलप्रयोग वा गुन्हेगार ठरवणारा कायदा करावा असे नाही, पण ते करताहेत ते चूक आहे असे ठरवावे. सवलती काढून घेतल्या जाव्यात.
३. या क्षेत्रातले संशोधन चालू ठेवावे.
४. कोणकोणत्या लैंगिक अस्मितांना एक वेगळी कायदेशीर ओळख द्यावी हे डॉक्टरांनी, शास्त्रज्ञांनी, मानसशास्त्रज्ञांनी, समाजशास्त्रज्ञांनी ठरवावे. अभिव्यक्तिस्वातंत्र्यवाद्यांना हे सांगण्याचा अधिकार आहे, असा समज नसावा.
५. सुप्रिम कोर्टाने बर्‍याच पायर्‍या उचलायला सांगीतल्या आहेत. मग दुसर्‍या प्रगत देशांत हे लोक community म्हणून राहतात का हे पहावे. असतील , नसतील तर तिथले त्यांच्याबद्दलचे कायदे, समाजप्रथा आणि जे काही इष्ट आहे ते भारतात आणावे. म्हणजे हे लोक 'एकत्र' राहणेच गरजेचे आहे कि नाही यावर विचार व्हावा. एखादा असा माणूस जिथे जसा जन्मला तिथेच सुखात राहिले तर काय वाईट?
६. यांना चांगले वागवावे असे शाळेत एक आणि कॉलेजात त्यांची शोषणे कशी होतात यावर एक असे किमान दोन धडे असावेत.
७. या लोकांचे प्रबोधन व्हावे. अनोळखी लग्नात घुसणे, सावर्जनिक जागी कपडे काढणे, अंगविक्षेप करणे, इ इ हळूहळू things of the past व्हाव्यात. या लोकांविरोधात पोलिस तक्रार घेत नाहीत ती घ्यावी. बरेचदा हे लोक खुल्याने तर कधी अक्षरक्षः गुन्हेगारी करतात. यावर प्रबोधन गरजेचे आहे. या लोकांशी सामान्यपणे वागू शकणारे सामान्य लोक जिथे भेट देतात अशी सुधारगृहे काढावीत.
८. हे लोक लोकसंख्येच्या १-२% इतके असले तर यांच्यासाठी वेगळे उप्-मंत्रालय काढावे.
९. टीव्हीवर आमिर खानवाल्या जाहिराती देऊन सामान्य लोकांचे प्रबोधन करावे. जिथे शिक्षित लोकही आपल्याच समाजाच्या काही निष्पाप लोकांना अस्पर्श्य समजतात तिथे परिस्थिती अवघड आहे.
१०. या आरक्षणाचा लाभ योग्य लोक उचलत्तात का हे पाहणे रोचक ठरेल.
११. एल, जी या लोकांनी आपले मुद्दे तृतियपंथीच्या मुद्द्यांत मिक्स करू नयेत. Again, I am considerably conservative. The issues of enuchs are grave and need immediate redressal. That is not necessarily the case with gays and lesbians.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अजो _/\_ स्वीकारा!

शेवटचा १ ते ११ मध्ये क्र. २ सोडल्यास सहमती आहे! (अगदी ३, ४ व ११साठी सुद्धा!!)

२बाबत बर्‍यापैकी असहमती आहे.

पर्याय/इलाज असेल तर 'तृतीयपंथी राहण्याचे' स्वातंत्र्य व्यक्तिला नसावे असे माझे मत आहे. म्हणजे वैद्यकीय इलाज असताना अगदी बलप्रयोग वा गुन्हेगार ठरवणारा कायदा करावा असे नाही, पण ते करताहेत ते चूक आहे असे ठरवावे. सवलती काढून घेतल्या जाव्यात.

पैकी एक सुक्ष्मशी असहमती 'इलाज' या शब्दापुरती मर्यादित आहे. कारण हा रोग नाही त्यामुळे इलाज नाही. पर्याय हा तुम्ही योजलेला शब्द त्यातल्यात्यात ठिक आहे.
दुसरी असहमती, त्यात चुक ठरवण्यावर असहमती आहे.
एखाद्या स्त्रीने पुनरुत्पादनक्षम नसणे नैसर्गिक असताना समजा त्यात वैद्यकीय 'बदल' (उपचार वा इलाज नव्हे) शक्य असूनही तसा बदल न करता तीला नि:संतान रहायचे असेल तर ते चुक आहे असे वाटत नाही तो तिचा चॉईस झाला. तद्वत, एखाद्या तृतीयपंथीयांच्या केसमध्ये त्याचे रुपांतर स्त्री वा पुरूषात करणे वैद्यकीय दृष्ट्या शक्य असले तरी त्या व्यक्तीची मर्जी नसल्यास ते न करण्याची मुभा त्यास असावी - ते न करण्यास 'चुक' समजले जाऊ नये. ज्या तृतीयपंथीय व्यक्तीस तसे ऑपरेशन / वैद्यकीय बदल करायचे असेल तर त्यातही काही गैर समजले जाऊ नये. (तसेच स्त्रीयां व पुरूषांच्या लिंगबदल प्रक्रीयेबाबत मत आहे)

तरीही, हे कबूल करतो की या विषयात, इतकी सहमती असणारा प्रतिसाद तुमच्याकडून खरंच अपेक्षित होता! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

एक प्रॅक्टिकल शंका.

वेगळे रेकग्निशन याच्यामधे ज्या काही संख्येने बर्‍याच असलेल्या गोष्टी असतील त्यात वेगळे प्रसाधनगृह हाही एक मुद्दा येईल असं वाटतं. असं आहे का?

रेल्वे, सर्व सार्वजनिक ठिकाणे (इथे तुलनेत सोपे), मध्यम आणि लहान आकाराची हपीसे, सर्व सरकारी कचेर्‍या (जिथे आगोदरच पुरेशी प्रसाधनगृहे नाहीत), शाळा, थिएटरे, बोटी इत्यादि सर्व ठिकाणी आता तिसरे प्रसाधनगृह बांधणे अपेक्षित आणि शक्य आहे का?

कारण वेगळे लिंग आणि तसे अस्तित्व मान्य केल्यावर अन्य लिंगीयांबद्दल संकोच ही स्त्री आणि पुरुषांना असलेली भावना तृतीयलिंगीयांनाही असणे मान्य करावे लागेल. आणि व्यत्यासाने स्त्री / पुरुष यांनाही स्वतःखेरीज अन्य लिंगीय व्यक्ती आपल्या टॉयलेटात आलेली चालणार नाही.

खेरीज.. सर्वच तृतीयलिंगीयांना एकाच प्रकारचे टॉयलेट सोयीचे होईल का? की अवयवांतील फरकानुसार काहींना स्त्रियांसाठी असतात तशी टॉयलेट्स प्रेफर्ड असतील आणि काहींना पुरुषांच्या टॉयलेट्समधे जास्त सोयीचे असेल?

अशा वेळी त्यांना वेगळे टॉयलेट दिले जाईल की त्यांच्या मनानुसार कोणत्याही एकाचा वापर करता येईल.

सर्व जागी असे तिसरे प्रसाधनगृह बनवणे कितपत शक्य आहे..?

प्रश्न फारच तपशिलातला आणि काहीसा अज्ञानजन्य असला तरी रास्त ठरावा.

चुभूदेघे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गविंच्या प्रतिसादात विनोद पाहणारा महानिर्बुद्ध कोण असावा?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मोठ्या इमारतींमध्ये स्त्री-पुरुषांची एकापेक्षा अधिक प्रसाधनगृह-समूह असतात. त्यातलं एखादं प्रसाधनगृह फक्त तृतीयपंथीयांसाठी सोडता येण्याची सोय करता येईल. आहे तेच सगळं, फक्त बाहेरचा बोर्ड बदलणे. कारण वापरकर्ते लोक 5-10% पेक्षा जास्त नसावेत.

जिथे मुळातच प्रसाधनगृह नाहीत, रेल्वेस्टेशनसारख्या ठिकाणी आहे त्यांची अवस्था न वापरण्यासारखी असते तिथे मुळात जागरूकता निर्माण करायची गरज आहे. बाहेर फिरणाऱ्या दुसऱ्या लिंगाच्या व्यक्तींचीही कुचंबणा तशीही होतेच त्याबद्दलही पुरेशी जागरुकता नाही. ती जागरूकता आणताना तृतीय लिंगाबाबतही माहितीवाटप, संवेदनशीलता जागवण्याचा प्रयत्न करता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हिजडे हे अनैसर्गिक प्रकारच आहे. वरती त्याचे वर्तन म्हणजे चार चांद लावणारे असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

हिजड्यांवर इतकी मौलिक चर्चा चालू असताना ती केवळ वाचत रहाणे हेच शहाणपणाचे आहे असे मला वाटते. पण पूर्वीपासून मनांत असलेली एक शंका इथे नक्कीच कोणी दूर करेल अशी आशा आहे.
'हिजरी सनाची गणना' वगैरे जे ऐकलं आहे त्यातल्या 'हिजरी' या शब्दाची व्युत्पत्ती काय ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

येथे पाहा.
http://en.wikipedia.org/wiki/Islamic_calendar

The first year was the Islamic year beginning in AD 622 during which the emigration of the Islamic Prophet Muhammad from Mecca to Medina, known as the Hijra, occurred. Each numbered year is designated either "H" for Hijra or "AH" for the Latin anno Hegirae ("in the year of the Hijra");[3] hence, Muslims typically call their calendar the Hijri calendar.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शंकासमाधान केल्याबद्दल धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आत्ता लोकसभा टीव्हीवर या निर्णयावर विस्तृत चर्चा चालू आहे.

मुंबईतले १८% तृतियपंथी एच आय व्ही ने पिडित आहेत्..नि बरेच काही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.