संगीतकला चित्रकलेपेक्षा प्रभावी आहे का?

पार्श्वभूमी - या धाग्यावर 'इतर कलांचं लोकशाहीकरण झालं त्याप्रमाणे चित्रकलेचं झालं नाही' असा एक मुद्दा मांडला गेला होता. हे लोकशाहीकरण न होण्याची कारणं देताना शुभा गोखलेंनी सदोष शिक्षणपद्धतीचा मुद्दा मांडला होता. त्या अनुषंगाने चर्चा करताना सर्वसामान्य मराठी रसिकाची मनोभूमिका हाही मुद्दा पुढे आला. विशेषतः संगीत ऐकण्यासाठी हौशीने जाणारा मध्यमवर्ग त्याहून अगदी कमी खर्च करूनही चित्रं पाहण्यासाठी जात नाही. आणि या पारंपारिक मनोभूमिकेतून चित्रकलेच्या लोकशाहीकरणाला अडथळा आल्याचा मुद्दाही मांडला गेला. 'हे थोर थोर चित्रकार जी उत्कृष्ट म्हणून चित्रं काढतात, ती उत्कृष्ट का आहेत हे आम्हाला समजत नाही' ही सर्वसामान्यांची तक्रार. त्याचबरोबर, 'सर्वसामान्यांना चित्रकलेतलं सौंदर्य पुरेसं कळत नाही' ही चित्रकार मंडळींची तक्रार.

या पार्श्वभूमीवर 'यात नक्की दोष कोणाचा?' हा प्रश्न उभा राहणं साहजिक आहे. दोन्ही पक्षांच्या तक्रारी समान असल्या तरी त्यासाठी द्यायचा 'दोष' किंवा ही परिस्थिती सुधारण्याची जबाबदारी ही दुसऱ्या पक्षाकडे टाकलेली दिसते. दोष देणं, नक्की जबाबदार कोण हे शोधून काढणं महत्त्वाचं असतं. पण ते करण्याआधी नक्की घोटाळा काय आहे, किंवा घोटाळा आहे का याचा विचार करणंही आवश्यक ठरतं.

सर्वप्रथम चित्रकलेची तुलना आपण इतर कलांशी करतो तेव्हा ती तुलना योग्य आहे का हे तपासून पहायला हवं. दोन उदाहरणं देऊन हा मुद्दा समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. 'गेल्या दोनशे वर्षांत इंग्रजी भाषेचा जितका प्रसार झाला तितका मराठी भाषेचा का झाला नाही?' असा प्रश्न विचारता येतो. यात दोन प्रकारचे मुद्दे येतात. एक म्हणजे भाषा म्हणून इंग्रजी व मराठी यांमध्ये कितपत फरक आहे, जेणेकरून या भाषांच्या प्रसारांमध्ये फरक पडेल? दुसरा मुद्दा असा की या भाषा बोलणाऱ्या लोकांनी असं काही वेगळं केलं का जेणेकरून या भाषांचा प्रसार व्हायला कमीअधिक मदत झाली? पहिला प्रश्न भाषांमधल्या फरकाबाबत आहे, तर दुसरा त्या फरकांशी संबंध नसलेला आहे. पहिला भाषांतर्गत आहे, तर दुसरा भाषाबाह्य आहे. किंवा अजून एक उदाहरण पाहू. साखर आणि सुका बोंबील. दोन्ही खाद्यपदार्थ आहेत. पण ते किती प्रमाणात खाल्ले जातात यामध्ये तफावत आहे. साखर सगळेजण खातात, तर सुका बोंबील फारच थोडे लोक खातात. असं का? साखरेची वाटपपद्धती नावाजण्यासारखी आहे, आणि बोंबलांच्या बाबतीत मात्र वाटपपद्धती सदोष आहे का?

इंग्रजी आणि मराठीबाबत आपल्याला सकृत्दर्शनी जाणवतं की त्यांच्या प्रसारातला फरक हा भाषेमुळे नसून, तर ती भाषा बोलणारांनी ज्या कृती केल्या त्यामुळे उद्भवलेला आहे. याउलट साखर अधिक लोकांना सहज आवडते, आणि बोंबील कमी लोकांना आवडतात याचं कारण मुख्यत्वे त्यांच्या चवीशी निगडित आहे. उत्क्रांतीच्या प्रक्रियेत माणूस बनला तोच साखरेची ओढ घेऊन. याउलट सुक्या बोंबलांची आवड ही काहीशी संस्कारांतून येते, शिकून घ्यावी लागते. भाषांमधला फरक हा प्रसारमाध्यमाचा आहे, तर चवींमधला फरक हा त्या दोनमधल्या क्षमतांचा आहे.

चित्रकेलच्या प्रसाराबद्दल विचार करतानाही याच दोन मुद्द्यांचा विचार करावा लागतो. सोयीसाठी आपण इतर कलांऐवजी केवळ संगीताचा विचार करू. चित्रकला व संगीत या दोन्हींना हजारो वर्षांची परंपरा आहे. दोन्ही कला जगातल्या सर्व संस्कृतींमध्ये विकसित झालेल्या आहेत. दोन्ही कलांमध्ये अनेक प्रयोग झाले आहेत, कलाकारांनी आपल्या शैली निर्माण केल्या आहेत. थोडक्यात दोन्ही कला तुलना करण्याजोग्या आहेत.

मात्र संगीताचा जितक्या प्रमाणावर प्रसार झालेला दिसतो तितक्या प्रमाणात चित्रकलेचा झालेला दिसत नाही. प्रसार होणं म्हणजे काय हे इथे स्पष्ट करायला हवं. एखादं गाणं ऐकणं, किंवा संगीत ऐकणं यासाठी सर्वच वर्गातली, सर्वच समाजातली माणसं पैसे काढून द्यायला तयार असतात. संगीत ऐकण्यासाठी स्वतंत्र वेळ काढतात. चार लोकं जमलेले असताना एकमेकांना हौशीने आपण ऐकलेली गाणी ऐकवून दाखवतात. चित्रांचं तसं होत नाही. गाण्यांचा संग्रह अनेक लोकांकडे दिसतो. मात्र चित्रांचा संग्रह दिसत नाही. (याला अपवाद छायाचित्रांचा - पण बहुतांशी हे संग्रह वैयक्तिक आठवणींचे असतात) पार्टीला काही मिनिटं केवळ सुंदर चित्रं बघत बसलेले आहेत असं दिसत नाही.

याचं कारण शोधायला गेलं तर लक्षात येतं की संगीत आणि चित्रकला यांमध्ये तीन फरक आहेत. एक म्हणजे चित्र हे स्थिर असतं. त्यातले ज्या 'हालचाली' आहेत त्या कॅनव्हासवरच्या मर्यादित अवकाशात झालेल्या हालचाली आहेत. त्यात काळाचा संदर्भ येत नाही. तर संगीत हे काळातल्या हालचालींचंच माध्यम आहे. दुसरा फरक असा की संगीत हे आसपासचा आसमंत भरून रहातं. उदबत्तीच्या धुराप्रमाणे दरवळतं. चित्राचं तसं नाही. तुम्ही जाणूनबुजून त्या दिशेने बघितल्याशिवाय ते तुम्हाला दिसत नाही. संगीताप्रमाणे ते तुमच्या ज्ञानेंद्रियांचा ताबा घेत नाही. यामुळे आणखीन एक फरक असा होतो की घरबसल्या एका गाण्याचा आस्वाद दहा लोक जितक्या सहजपणे घेऊ शकतात तितक्या सहजपणे चित्राचा आनंद घेऊ शकत नाहीत. तिसरा फरक असा की चित्राचा अनुभव हा वैयक्तिक असतो, तर संगीताचा अनुभव हा अधिक समाजिक होऊ शकतो. म्हणजे गाणं चालू असताना त्यावर शरीर आपोआप हेलकावतं, त्यातून सगळ्यांचीच शरीरं एका वेळी नाचू शकतात. आणि इतरांच्या नाचातून तो अनुभव अधिक मोठा (ऍंप्लिफाय) होतो. एक प्रकारचा बाह्य फीडबॅक मिळतो.

हे फरक या दोन कलांतर्गत फरक झाले. त्यांचा मानवी मनावर परिणाम होण्याची क्षमता वेगवेगळी आहे का? याचा पुरेसा अभ्यास झालेला नाही. जर झाला असेल तर त्याची पुरेशी माहिती मला नाही. पण आपल्याला संगीताने सहज हेलावून जायला होतं. एखाद्या गाण्याने आनंदी व्हायला होतं, किंवा एखाद्या स्वरानेदेखील काळजावर ओरखडा होऊ शकतो. चित्रातल्या एखाद्या रेषेच्या वळणाने हे कमी प्रमाणात होतं. शुभा गोखलेंनी म्हटलं आहे,

"गायतोंड्यांच्या किंवा आरांच्या एखाद्या चित्रासमोर मी तासभर उभा राहिलो आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं," असं कोणी म्हणालं तर मी खरंच पाय धरीन त्याचे! पण हे पोहोचलंच नाहीये.

कदाचित अशीही शक्यता आहे की मानवी मेंदूची रचनाच अशी आहे की ज्यावर स्वरांचा परिणाम प्रभावी आणि चित्रांचा कमी प्रभावी आहे. कदाचित आर्त स्वरांनी जितक्या सहजपणे पाणी येऊ शकतं तितक्या सहजपणे, तितक्या अधिक लोकांना चित्रांमुळे पाणी येत नसेल. यात 'संगीत चित्रकलेपेक्षा श्रेष्ठ' असं म्हणण्याचा प्रयत्न नाही. वर जे साखर आणि बोंबीलांचं उदाहरण दिलं ते विचारात घ्यायला हवं. पुन्हा, संगीत म्हणजे साखर म्हणजे गोड, आणि चित्रकला म्हणजे बोंबील म्हणजे वाईट वासाचे म्हणजे वाईट इतकी उथळ तुलना करायची नाही. तर मनुष्यप्राण्याच्या मेंदूत 'हे आवडलं' असा विचार होण्यासाठी साखरेचा मार्ग निसर्गानेच सुकर करून ठेवलेला आहे. याउलट बोंबीलांसाठी वाटेत अडथळे आहेत. 'साखर घरोघरी पसरलेली दिसते, पण बोंबीलांचा प्रसार तितका झालेला दिसत नाही' असं म्हणताना निव्वळ बोंबलांची डिस्ट्रिब्यूशन सिस्टिम तितकी चांगली नाही असं म्हणून चालत नाही. (पुन्हा यात बोंबील किती प्रमाणात मिळतात, सुकवायला कसे कठीण असतात यात शिरायचं नाही. साखर आणि बोंबील हे एक उदाहरण आहे. हे उदाहरण पूर्णपणे चपखल नाही. कदाचित इतर कुठची जोडी अधिक चपखल ठरेल. )

या विषयावर झालेल्या अभ्यासाची उदाहरणं फार नसावीत. कारण तुलनात्मक अभ्यास करताना संगीतानुभवाचं एकक आणि चित्रानुभवाचं त्याच तुलनेचं एकक कोणतं असावं हाही प्रश्नच आहे. इथे केलेल्या अभ्यासानुसार अगदी लहानपणी ऐकलेलं संगीतही पुन्हा ऐकल्यावर त्या स्मृती जाग्या करण्यात प्रभावी असतं. अशा स्मृतींना, भावनांना हात घालण्याची चित्रकलेची किती शक्ती आहे याबद्दलच्या अभ्यासाबाबत मला माहिती नाही.

घटकाभर आपण मानून चालू की 'भावनांना हात घालण्यात, मनावर परिणाम करण्यात, स्मृती जागवण्यात संगीत हे चित्रकलेपेक्षा अधिक प्रभावी आहे'. हे गृहितक घेतलं तर आज आपल्या डोळ्यांसमोर जे चित्र दिसतं ते समजणं सोपं जातं. चित्रकलेचा प्रसार कमी का आहे? कारण कमी प्रभावी माध्यम कमी पसरणार हे उघड आहे. चित्रकलेचा प्रसार करणारी यंत्रणा सदोष आहे का? शिक्षणपद्धती कमी परिणामकारक आहेे का? हे प्रश्न जवळपास नष्ट होतात. कारण पुन्हा तेच, कमी प्रभावी माध्यम कमी प्रसारित झालं यात प्रसारकांचा दोष असेलच असं नाही. मराठी माणसाच्या मनात चित्रांबद्दल अनास्था आहे का? एका अर्थाने हो, पण तसं असणं स्वाभाविक आहे. त्यामुळे अनास्था असण्याचं विधान प्रश्नाची मांडणी करणारं विधान न ठरता अपेक्षित सत्याचं कथन करणारं विधान होतं. थोडक्यात चित्रकलेच्या विश्वातले प्रस्थापित आणि इतर सामान्य रसिकजन यांमध्ये एकमेकांना दोष देण्याचं कारण संपून जातं.

माझ्या मते आपल्या आसपास जे दिसतं त्यावरून संगीतकला ही मूलतः चित्रकलेपेक्षा मानवी मनावर अधिक परिणामकारक आहे हे विधान सत्य म्हणून विचारात घ्यायला हरकत नाही. तुम्हाला काय वाटतं?

(पुन्हा एकदा एक श्रेष्ठ, दुसरी कनिष्ठ अशी कलांची प्रतवारी करण्यात मला रस नाहीये. सर्वसाधारण एककाचा मानवी मेंदूवर किती परिणाम होतो याची तुलना इतपतच माझी मांडणी मर्यादित आहे)

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3.6
Your rating: None Average: 3.6 (5 votes)

लेखाला चांगलं म्हणण्याव्यतिरिक्त ह्या विषयावर अधिक काहीच बोलू शकत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हा! रोचक विषय अन लेख आहे खरा. यावर काय चर्चा होते हे वाचण्यास बराच उत्सुक आहे. ज्ञानात भर पडेल असा विश्वास आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हा धागा वाचून ताबडतोब जो विचार आला तो इथे मांडते. - आजूबाजूला विविध सुंदर कलाकृती, व्यक्ती , पेहेराव, वस्तू दिसल्यामुळे नेत्रसुखाची गरज यथेच्छ भागते. तसे श्रवणसुखाचे होत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भारताबद्दल बोलताय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मन, भारत अथवा अन्य देश, हाच अनुभव आहे की येता जाता सुमधुर संगीत, काव्य कानावर पडत नाही पण दृष्टीसुख यथेच्छ मिळतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अरब जगताबद्दल काय म्हणणं आहे ? Wink
चिल.
कै नै. फक्त टांग खेचतोय Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

प्रकाटाआ

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला वाटतं कि कुठलीही कला आवडायला काही संदर्भ असावा लागतो. म्हणजे गाण्याबाबत म्हणायचं झालं तर गाण्याल शब्दं असतात. जेव्हा एखादी व्यक्ती गाणं ऐकते तेव्हा त्या संगीताला गाण्यातल्या ओळींचा संदर्भ असतो. आणि बहूदा त्यामुळे गाणं पटकन आवडत असावं आणि जास्तं वेळ डोक्यात बसत असावं. आणि म्हणूनच इंस्टृमेंटल थोडसं एलिटिस्ट वाटतं.
चित्रं बघताना , ग्यालर्‍यांमध्ये वगैरे, असा काही संदर्भ लागत नाही खूप वेळा. आता , ऐसी वरच्याच, तीन म्हातार्‍या धाग्यावरचं चित्र त्या गोष्टीशिवाय जर एखाद्याला दाखवलंच तर फार बोध होईल असं वाटत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

दोन्ही पक्षांच्या तक्रारी समान असल्या तरी त्यासाठी द्यायचा 'दोष' किंवा ही परिस्थिती सुधारण्याची जबाबदारी ही दुसऱ्या पक्षाकडे टाकलेली दिसते.

या वाक्यातून शुभा गोखले आणि त्यांच्यासारख्या लोकांपर्यंत पोहोचू पहाणाऱ्या इतर कलाकार आणि कलासमीक्षकांवर अन्याय होतोय असं वाटतं.

बाकी मेंदूच्या आत काय संरचना असते किंवा मानवी मनावर चांगली चित्रं आणि चांगलं संगीत याचे काय परिणाम होतात, काय प्रकारची रसायनं स्रवतात अशा प्रकारचा काही अभ्यास झाला असेल तर ते या संदर्भात वाचायला आवडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बाकी मेंदूच्या आत काय संरचना असते किंवा मानवी मनावर चांगली चित्रं आणि चांगलं संगीत याचे काय परिणाम होतात, काय प्रकारची रसायनं स्रवतात अशा प्रकारचा काही अभ्यास झाला असेल तर ते या संदर्भात वाचायला

आवडेल.

मलाही. माझ्या माहितीप्रमाणे, आवाजाचा आपल्या मज्जासंस्थेवर जसा प्रत्यक्ष परिणाम होतो, तसा दृश्याचा होत नाही. त्यामुळे आवाज ऐकल्याक्षणी शरीराची हालचाल होणे स्वाभाविक आहे. अर्थातच संगीताचा प्रभाव पडल्यावाचून रहात नाही.

माझ्यापुरतं म्हणाल, तर दैनंदीन कामे करताना संगीत ऐकायला मला आवडतं, मात्र जेव्हा माझ्या आवडीचे असे काही मी ऐकत असेन, किंवा संगीतातल्या एखाद्या जागेने माझं लक्ष वेधलं असेल, तर मी हातातले काम बाजूला ठेऊन पूर्ण लक्ष देऊन ते परत एकदा ऐकते.

अवांतरः आवाजाचा मेंदूवर कसा प्रत्यक्ष परिणाम होतो याची कल्पना येण्याकरता हे वाचू शकता. http://members.chello.nl/~p.kavelaars/auditory_processing.html

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कुठलाही हॉरर, थ्रिलर हा त्यातील आवाज-दृश्य ह्याच्या रचनेने प्रभावी होतो हे मान्य.
मी अशी कल्पना केली की कुणी भन्नाट भयपट बनवायचं टह्रवलं; व चित्ररुपानं ते मला अंधार्या थेट्रात दाखवलं; तर माझी ग्यारंटीड दातखीळ बसेल का?
मला वाटतं; नाही बसणार. अगदि कितीही भयंकर अ‍ॅनिमेशन वगैरे असलं तरी माणूस ते पचवू शकेल.
.
पण तेच सगळं ऑडियो माध्यमातून केलं; गोष्ट सांगताना भयावह आवाज वगैरे काढले, तर माणूस नक्कीच दचकेल.
.
भूल भुलैय्या नावाचा एक चित्रपट (खरं तर अक्षयपट) दोन्-पाच वर्षाखाली आला होता. त्यात एक दृश्य आहे.
विद्या बालन मनोरुग्ण म्हणा किम्वा भुतानं झपाटलेली म्हणा; तशी आहे.
ती शायनी आहुजाशी बोलत उभी असताना तिची सटकते.
एकदम भयानक आवाज काढत, डोळे मोठ्ठे करत, दात ओठ खात ती एका हातात पलंगाची एक बाजू वर करते.
माझा भाचा ह्या दृश्याला जाम घाबरतो. पण तरी नको म्हटलं तरी पुन्हा पुन्हा असले पिच्चर पाहतो.
त्यानं एक दोनदा त्या सीनला म्यूत करुन निवांत पिच्चर पाहिला. त्याला भ्या वाटलं नाही.
नंतर एकदा तेच त्याला काय खाज होती देव जाणे, चित्रपट सुरु असताना इकडे बघत होता; बाजूच्या वृत्त्पत्राकडे वगैरे. ह्यावेळी चित्रपट म्यूट केलेला नव्हता.
नेमका त्या सीनच्या वेळी विद्याच्या त्या तसल्या आवाजाने ज्याम घाबरला.
अर्थात, तरी पुन्हा पुन्हा हॉरर बघण्याचे खूळ काही त्याचे जात नाही ते नाहिच.(मिरची तिखट लागली; डॉल्यातून पाणी यायला लागले तरी पब्ल्लिकल बचकाभर मिरची खाण्यात काय मजा येते देव्/मिरची च जाणे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

'संगीतकला ही मूलतः चित्रकलेपेक्षा मानवी मनावर अधिक परिणामकारक आहे हे विधान सत्य म्हणून विचारात घ्यायला हरकत नाही.'
डोळे जसे मिटता येतात तसे कान मिटता येत नाहीत हे एक कारण असू शकेल या दोन कलांच्या परिणामकारकतेत फरक असण्यामध्ये. हॅमरिंग ज्याचं जास्त होतं ते शेवटी काहीतरी परिणाम करून जातच. तसंच डोळे मिटून अधिक तल्लीन होऊन ऐकता येतं. पण तसं कान मिटून घेऊन डोळ्यानी पहात राहिलय हे करता येत नाही तितक्या सहजपणे.

चर्चा विषयासंदर्भात आणखी काही विस्कळीत मुद्दे:
लहानपणी चित्रांची पुस्तके असतात पण वय वाढतं तसं फक्त चित्रांची पुस्तकं म्हणजे ती आपल्यापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी असतात असा समज करून दिला जातो. छोट्या मुलांना मोठ्या मुलांच्या पुस्तकातले लिहिलेले कळले नाही तरी चित्र पहा नुसती असे म्हणतात. म्हणजे शब्द जास्त जास्त कळू लागतील ती प्रगती असे समीकरण बनते. ते थोड्याफार प्रमाणात प्रौढ झाल्यावर नुसती चित्रे पहाण्यातला निरूत्साह वाढण्याला जबाबदार आहे असे वाटते.
प्रसिद्ध कलाकारांच्या चित्रांची (कॉपी असलेली, रंगित) पुस्तकं स्वस्त नसतात. त्यामुळे तशी सर्वसामान्य घरी असणे दुरापास्त असते. शाळेत तर निदान माझ्या अनुभवात तरी कधी नुसती चित्रे पहाणे आणि त्याबद्द्ल चर्चा वगैरे आठवत नाही. आता इंटरनेट उपलब्ध आहे त्यांना नुसती चित्रे पहाणे करता येईल...पण आधी तसेही करावे हे सुचले पाहिजे.
संगीताचा अभ्यास नाही पण आवड ह्या पातळीवर संगीत प्रत्येक घरात असते.....आवडते गायक गायिका यांविषयी चर्चा होते-आवडते चित्रकार म्हणून किती जणं चर्चा करतात? कमी प्रसारामुळे चित्रकला रोजच्या रोज बोलण्यात अनुभवात येत नाही असे मला वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डोळे जसे मिटता येतात तसे कान मिटता येत नाहीत हे एक कारण असू शकेल या दोन कलांच्या परिणामकारकतेत फरक असण्यामध्ये. हॅमरिंग ज्याचं जास्त होतं ते शेवटी काहीतरी परिणाम करून जातच.

हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ध्वनीची पोच तशी अधिक अंतरापर्यंत कार्य करते. पंचवीस फुटावर कोणी गात असेल तर सहज कानावर पडू शकतं. मुख्य म्हणजे त्यात रमून जाण्यासाठी डोळे आपल्या आत्ताच्या कामावरून हलवण्याची गरज नसते.

संगीताचा अभ्यास नाही पण आवड ह्या पातळीवर संगीत प्रत्येक घरात असते.....आवडते गायक गायिका यांविषयी चर्चा होते-आवडते चित्रकार म्हणून किती जणं चर्चा करतात? कमी प्रसारामुळे चित्रकला रोजच्या रोज बोलण्यात अनुभवात येत नाही असे मला वाटते.

घरोघरी संगीत पसरण्यासाठी आवश्यक असलेला एक महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे स्वतः सामान्य प्रतीचं का होईना, पण संगीत निर्माण करणं अत्यंत सोपं असतं. गाणी गुणगुणणं जितकं सोपं असतं तितकं चित्र रेखाटणं सोपं नसतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वर्षभरात आर्ट गॅलरी किंवा म्युजियम यांना चित्रं पाहण्यासाठी गेला आहात काय? असा प्रश्न ऑफिसातल्या १६ सहकार्‍यांना विचारला. सहकार्‍यांत नुकतेच विद्यार्थीदशेपासून कामाला लागलेल्यांपासून निवृत्त होण्याच्या मार्गावर असलेले सर्व वयोगटातले लोक आहेत. जवळजवळ सर्वांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे व अमेरिकेतील मध्यमवर्गात मोडत असावेत. आसपास सहज जाण्यासारख्या अनेक ग्यालर्‍या, विद्यापीठे व म्युजियम्स आहेत. तर सोळातील सात लोक चित्रं पाहण्यासाठी कमीत कमी एकदा गेलेले आहेत. अनेक बायसेस गृहीत धरूनही हा आकडा मला भारतापेक्षा अधिक आश्वासक वाटतो. (मी नाशिकमध्ये असतांना पंधरा-सतरा वर्षांमागे महापालिकेने एक कलादालन सुरू केले होते. तेथे काही महिन्यांतच भांड्या-कपड्यांचे भव्य सेल सुरू झाले होते. आजकाल काय चालते ते माहीत नाही.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वर्षभरात आर्ट गॅलरी किंवा म्युजियम यांना चित्रं पाहण्यासाठी गेला आहात काय? असा प्रश्न ऑफिसातल्या १६ सहकार्‍यांना विचारला.

उत्तम. काहीतरी विदा गोळा करण्याचा प्रयत्न आवडला. याच १६ सहकाऱ्यांना 'वर्षभरात म्युझिक कंसर्ट किंवा कुठच्याही लाइव्ह परफॉर्मन्सला गेला आहात काय?' हा प्रश्न विचारता आला तर बघा. यात घरगुती पार्ट्यांमध्ये गाणी ऐकणं, त्यावर नाच करणं हे अंतर्भूत नाही. त्यामुळे तसंही ऍपल टू ऍपल तुलना होत नाही. पण तरीही उत्तरं रोचक असतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

म्युझिक कॉन्सर्टविषयी प्रश्न विचारला नाही कारण एखाद-दुसरा अपवाद वगळता सर्वांनीच एखाद्या लाइव पर्फॉर्मन्सचा आनंद घेतला असावा. (चार-पाच जणांबरोबर मीच एकदा गेलेलो आहे.)

संगीत आणि चित्र या भिन्न कला आहेत. संगीताचा आनंद लोक चित्रकलेपेक्षा आणखी वारंवार घेत असतात, हे बहूधा सर्व समकालीन संस्कृतींबाबत खरे असावे. इतर संस्कृतींच्या तुलनेत चित्रकला भारतात अधिक दुर्लक्षित आहे का? हा प्रश्न मला सुसंदर्भ वाटतो. या प्रश्नाचे उत्तर अर्थातच साखर-बोंबिल दृष्टांतात नाही म्हणून मला माझे छंदेक्षण 'बरेचसे अवांतर' वाटले होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझ्या अवतीभोवती असणार्‍या १० पैकी ३ जणांची चित्रकला ठीक आहे, ठीक म्हणजे रेषा, प्रपोर्शन, आकार ह्यांच असलेलं मुलभूत ज्ञान बर्‍यापैकी आहे. १० पैकी ८ जण वर्षभरात निदान १-३ संगीत मैफिलीला जातात, आणि १० पैकी १-२ जणांना गाता किंवा वाजवता येतं. पण १० पैकी ९ जण वर्षभरात निदान ५-६ लोकप्रिय सिनेमे/नाटके नक्कीच पहातात.

तीव्र गतीचे इंद्रिय अनुभव (तरुण पिढीला?) जास्त अपिलिंग असतात असे लक्षात घेतल्यास तीव्र गती-मध्यम गती-मंद गतीच्या संगीताची लोकप्रियता त्या उतरंडीवर असण्याचे कारण लक्षात येते, चित्राचा अनुभव ह्याच स्वरुपात लक्षात घेतल्यास एब्स्ट्रॅक्ट चित्रांबद्दल असलेली आवड कमी असण्याचे कारण लक्षात येतं.
मंद गतीच्या आविष्कारांचा प्रसार ह्याच कारणास्तव कमी होणार व साहजिकच त्याचे लोकशाहीकरण कमी होणार. 'सहेला रे' हे 'वाका-वाका' पेक्षा कमी लोकप्रिय असण्याचे कारण सहजी लक्षात येते.

मध्यम गती किंवा मंद गती जाणिव-अमेचर/जाणिव-अविकसीत मेंदूला भावणार नाही, ह्या जाणिवा समृद्ध करण्यासाठी कलाकार तसेच विचार-समृद्ध प्रेक्षकाने/दर्शकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. एकदा वाचून पुस्तक नीटसे समजले नाही तर अनेकदा वाचणारे आपण दृश्यकला समजत नाही म्हंटल्यावर पुढच्या पानावर जातो हे बरोबर नाही.

मेंदू आणि दृष्य/कला ह्याचा अभ्यास न्युरोअस्थेटिक शाखेअंतर्गत होतो, अभ्यासकांसाठी अधिक माहिती इथे मिळेल.

एक रोचक संशोधन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अनेक प्रकारचे आणि अनेक बाजूंनी प्रतिसाद शक्य आहेत, पण सध्या फक्त 'मेंदूचा प्रतिसाद' ह्या मुद्द्याच्या चौकटीत प्रतिसाद देतो. कारण -

>> कदाचित अशीही शक्यता आहे की मानवी मेंदूची रचनाच अशी आहे की ज्यावर स्वरांचा परिणाम प्रभावी आणि चित्रांचा कमी प्रभावी आहे. >> अशा स्मृतींना, भावनांना हात घालण्याची चित्रकलेची किती शक्ती आहे याबद्दलच्या अभ्यासाबाबत मला माहिती नाही. >> बाकी मेंदूच्या आत काय संरचना असते किंवा मानवी मनावर चांगली चित्रं आणि चांगलं संगीत याचे काय परिणाम होतात, काय प्रकारची रसायनं स्रवतात अशा प्रकारचा काही अभ्यास झाला असेल तर ते या संदर्भात वाचायला आवडेल.

सर्वप्रथम,

>> पण आपल्याला संगीताने सहज हेलावून जायला होतं. एखाद्या गाण्याने आनंदी व्हायला होतं, किंवा एखाद्या स्वरानेदेखील काळजावर ओरखडा होऊ शकतो. चित्रातल्या एखाद्या रेषेच्या वळणाने हे कमी प्रमाणात होतं.

हे विधान व्यक्तिगत अनुभव आहे, संस्कृतिविशिष्ट आहे की वैश्विक, वैश्विक असलं तर त्याला काय आधार आहे ते इथे स्पष्ट नाही. उदाहरणार्थ, मला ज्यामुळे हेलावून जायला होईल असं संगीत जर भारतीय शास्त्रीय संगीत असेल, तर एखाद्या परदेशी माणसाला कदाचित त्यानं हेलावून जायला होणार नाही. भैरवी ऐकून रडणारे लोक मला माहीत आहेत; तसंच, कोणत्याच प्रकारच्या संगीतानं हेलावून जात नाहीत, पण एखाद्या चित्रानं हेलावतात अशा व्यक्तीही मला ठाऊक आहेत. Neuroestheticsचा उल्लेख आलाच आहे. त्यात अशा प्रकारच्या उत्प्रेरणा-प्रतिसादांचा अभ्यास केला जातो. मार्सेल प्रूस्तच्या महाकादंबरीत अशा, म्हणजे विविध संवेदनांच्या मानवी मनावर होणाऱ्या परिणामांचा उहापोह आहे. त्यात गंधसुद्धा आहे. गंधानं हेलावून जाणं शक्य आहे, पण सहसा गंध कलाप्रकारांमध्ये गणला जात नाही. असो.

>> घटकाभर आपण मानून चालू की 'भावनांना हात घालण्यात, मनावर परिणाम करण्यात, स्मृती जागवण्यात संगीत हे चित्रकलेपेक्षा अधिक प्रभावी आहे'. हे गृहितक घेतलं तर आज आपल्या डोळ्यांसमोर जे चित्र दिसतं ते समजणं सोपं जातं. चित्रकलेचा प्रसार कमी का आहे? कारण कमी प्रभावी माध्यम कमी पसरणार हे उघड आहे.

'चित्रकलेचा प्रसार कमी असणं' ही समस्या वैश्विक आहे असं इथे गृहीत दिसतंय, पण मला दिसणारी समस्या वैश्विक नाही, तर संस्कृतिविशिष्ट आहे. अक्षय पूर्णपात्रे ह्यांच्या प्रतिसादात जो मुद्दा येतो तसाच माझाही इतर संस्कृतींबद्दल अनुभव आहे. (किंचित अपवाद ब्रिटिशांचा, पण त्यांच्यातही १९७० किंवा नंतर जन्मलेल्या पिढीत दृश्यकलांबद्दल अधिक आस्था आढळते.)

इथे 'चित्रकला' असा मुद्दा घेण्यापेक्षा 'मेंदूचा प्रतिमांना प्रतिसाद' हा मुद्दा घेतला तर ते अधिक योग्य ठरेल. कारण काय, ते उरलेला प्रतिसाद वाचून समजेल असं वाटतं.

समीर झेकी आणि व्ही. एस्. रामचंद्रन ह्यांचं ह्या क्षेत्रातलं काम महत्त्वाचं मानलं जातं. रामचंद्रन ह्यांचा 'हेरिंग गल' प्रयोग उदाहरणार्थ इथे पाहू. ह्या जातीच्या पक्षांत मादीच्या पिवळ्या चोचीवर लाल ठिपका असतो. पिलाचा जन्म होताच आईच्या चोचीवरच्या लाल ठिपक्यावर आपल्या चोचीनं धडका द्यायची अंत:प्रेरणा पिलात जन्मजात असते. ही धडक मिळताच आई पिलाला घास भरवते. म्हणजे पिलाला जिवंत राहण्यासाठी ही प्रेरणा आवश्यक आहे. रामचंद्रन ह्यांनी केलेल्या प्रयोगात पिलांना चोचीसारख्या पिवळ्या रंगाची आणि लाल ठिपक्याची काडी दाखवण्यात आली. पिलांनी त्याला आईची चोच समजून प्रतिसाद दिला. खरी गंमत पुढे झाली. पिवळ्या काडीवर लाल ठिपक्याऐवजी तीन लाल रेघा अोढल्या, तर पिलांनी त्याला चोचीसारख्या काडीहूनही अधिक जोमानं प्रतिसाद दिला. म्हणजे एक तर पिलांच्या प्रतिसादासाठी प्रत्यक्ष आईची गरज नव्हती, तर लाल ठिपक्याची पिवळी काडी, म्हणजे आईच्या चोचीसारखी प्रतिमा पुरेशी होती; दुसरं म्हणजे 'वास्तवासारख्या' प्रतिमेपेक्षा लाल रंगाचं प्राबल्य अधिक असलेल्या, म्हणजे अतिवास्तव म्हणता येईल अशा प्रतिमेला पिलाचा मेंदू अधिक जोमानं प्रतिसाद देत होता; तिसरं म्हणजे ती पिवळी काडी हे कदाचित त्या पिलासाठीचं अॅबस्ट्रॅक्ट आर्ट म्हणता येईल, कारण वास्तव (आईची चोच) ते प्रतिमा (काडी) ह्यात बरंच अंतर होतं.

अशा प्रकारच्या निरीक्षणांचा संबंध रामचंद्रन मानवी संस्कृतीतल्या कलानिर्मितीच्या काही घटकांशी लावतात. उदाहरणार्थ, भारतीय मूर्तिकलेतल्या पुष्ट वक्ष-नितंबांच्या स्त्रियांच्या प्रतिमांना देवी म्हणून पुजलं जाणं, किंवा युरोपातल्या मातृदेवतांच्या मूर्तींचे पुष्ट वक्ष-नितंब ह्यांचा संबंध अशा प्रकारच्या 'वास्तवाहून उत्कट' प्रतिमांशी लावला जातो. अन्नासाठी दाहिदिशा फिरायला लागे अशा काळात पुष्ट अवयव हे समृद्धीचं लक्षण होतं. अंगावर किती चरबी साठवलेली असेल, ह्यावरून तुम्ही अन्नाच्या दुर्भिक्ष्याला सामोरे जाण्यात किती यशस्वी ठरता हे अवलंबून होतं. उत्क्रांत होताना मानवी मेंदू त्यामुळे कदाचित विशिष्ट प्रकारच्या देहाच्या प्रतिमेला 'चांगली' मानू लागला. 'चांगली प्रतिमा' ते 'पूजनीय प्रतिमा' ते 'कलात्मक प्रतिमा' असा त्याचा प्रवास झाला असण्याची शक्यता आहे. अर्थात, निव्वळ उत्क्रांती किंवा जनुकीय 'प्रोग्रॅम'मुळेच सगळ्या प्रतिमांचे प्रतिसाद ठरतात, असं नाही. सध्या असलेलं 'थाय गॅप'चं फॅड हे प्रजननासाठी प्रतिकूल स्त्री शरीरांना 'सेक्सी' मानतं असं म्हणता येईल. वगैरे.

सांगायचा मुद्दा असा की रेषा, रंग, आकार, अवकाश अशा प्रतिमाघटकांना, पर्यायानं प्रतिमांना (आणि अगदी अवास्तव किंवा अ‍ॅब्स्ट्रॅक्ट प्रतिमांनासुद्धा) मेंदू आकर्षक/अनाकर्षक किंवा इतर प्रतींचे प्रतिसाद देत असतो. कोणती गोष्ट कलात्मक हे ठरण्यामागे जनुकीय किंवा संस्कृतिविशिष्ट कारणं असू शकतात. त्यामुळे अमुक कला तमुक कलेपेक्षा प्रभावी हा निवाडा करणं गुंतागुंतीचं होतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हे विधान व्यक्तिगत अनुभव आहे, संस्कृतिविशिष्ट आहे की वैश्विक, वैश्विक असलं तर त्याला काय आधार आहे ते इथे स्पष्ट नाही.

'एखाद्या स्वराने जसं हेलावून जायला होतं, तसं रेषेने होत नाही' हे वैश्विक विधान म्हणून केलेलं आहे.

उदाहरणार्थ, मला ज्यामुळे हेलावून जायला होईल असं संगीत जर भारतीय शास्त्रीय संगीत असेल, तर एखाद्या परदेशी माणसाला कदाचित त्यानं हेलावून जायला होणार नाही.

अर्थातच. मात्र 'एखादा स्वर' हे तितकं स्पेसिफिक नव्हतं. 'एखाद्या पदार्थाच्या वासाने तोंडाला पाणी सुटतं' हे विधान जसं वैश्विक आहे तसं. यात पदार्थ हा जसा 'थालिपीठ'सारखा विशिष्ट पदार्थ नाही, तसाच स्वर हा अमुकतमुक स्वर नाही.

'चित्रकलेचा प्रसार कमी असणं' ही समस्या वैश्विक आहे असं इथे गृहीत दिसतंय, पण मला दिसणारी समस्या वैश्विक नाही, तर संस्कृतिविशिष्ट आहे.

'चित्रकलेचा प्रसार संगीतापेक्षा कमी असणं' असं वाचावं. संस्कृतीविशिष्ट फरक असणार याबद्दल वाद नाही. मात्र सर्वच संस्कृतींमध्ये संगीताचा प्रसार चित्रकलेच्या मानाने अधिक आहे असा मुद्दा आहे. हा प्रसार कसा मोजावा?
१. चित्र पहाण्यासाठी घालवला जाणारा वेळ
२. चित्रांच्या खरेदीसाठी खर्च होणारा पैसा
३. बाजारात दरवर्षी उपलब्ध असलेली चित्रं वा त्यांचे अल्बम आणि त्यांचा खप.
४. उत्तम चित्रं कुठे पहायला मिळेल यावर वृत्तपत्रांनी खर्च केलेली कॉलम इंचं.
५. सर्वोत्तम चित्रांच्या आठवड्याला बदलत्या टॉप टेन लिस्ट्सचं अस्तित्व
६. कॉलन्यांमधून दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रमांत स्टेजवर चित्र सादर करणाऱ्या तरुणांचं प्रमाण
वगैरे वगैरे मोजता येतील. अर्थात यादी वाचूनच लक्षात येतं की ही मोजमापं न करताही आपल्याला संगीताचा प्रसार अधिक प्रमाणात आहे हे जाणवतं.

याचं मुख्य कारण असं मांडलं आहे, की संगीत हे जात्याच प्रसार व्हायला सुकर आहे.

गणिती भाषेत माझा मुद्दा जरा अधिक रेखीवपणे मांडता येईल.
For most people, it is true that there exists a (tune, melody, song etc.) T such that, when it (tune, melody, song etc.) is heard, they are moved emotionally.
Let I(Pj,Ti) be the intensity of response to such tune Ti for person Pj.
Sigma[I(Pj,Ti)] for all i,j is the sum of all emotional response for music. The contention is that if we were to find a similar sum for paintings, it will be much smaller than that for music.

आता हा रिस्पॉन्स मोजणारच कसा? वगैरे प्रश्न मान्य आहेत. मोजमापं काहीच नाहीत, म्हणूनच तर चर्चेला जागा आहे.

बाकी मेंदूवर होणाऱ्या प्रतिमांच्या परिणामांबद्दल - ज्ञानग्रहणाचा प्रचंड हिस्सा दृक्माध्यमातून होतो याबद्दल वादच नाही. आणि म्हणूनच कला म्हणून विचार करता संगीताचा इतका प्रचंड जास्त प्रसार असणं हे आश्चर्यकारक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चित्रकला ही एक्स्प्रेशनला अवघड आहे.
एखादे गाणे समजा पाच मिनिटे चालत असेल तर त्या पाच मिनिटांत एक नॆरेशन होऊ शकते. चित्र हा स्नॅपशॉटच असू शकतो. त्यातून चित्रकार काय सांगत आहे ते 'नॅरेट' करता येत नाही. [ज्यात नॅरेशन नाही असे संगीत उदा. शुद्ध रागदारी तितके लोकप्रिय नसते. उलट व्यंगचित्रे बरीच लोकप्रिय असतात].

दुसरा भाग चित्रकलेच्या आणि संगीताच्या डिस्ट्रिब्यूशनचा आहे. संगीत पूर्वीपासूनच बरेच स्वस्त आहे.

तिसरा भाग 'लोकाभिमुखतेचा' आहे. एखादी गोष्ट 'आपल्यालाही जमेल' असे लोकांना वाटले तर लोक ती करून पाहतात आणि ती लोकप्रिय होत जाते. अर्थात याविषयी खात्री नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

>>दुसरा भाग चित्रकलेच्या आणि संगीताच्या डिस्ट्रिब्यूशनचा आहे. संगीत पूर्वीपासूनच बरेच स्वस्त आहे.

संगीतात* एकाच कलाकृतीच्या प्रती** काढून त्या विकण्याची पद्धत आहे तशी चित्रकलेत नाही (कारण काय ते ठाऊक नाही). तशी सोय झाल्यास प्रसार अधिक प्रमाणात होईल काय?

*साहित्यात आहे अलिकडे नाटकाच्या बाबतीत सुद्धा उपलब्ध आहे.
**या प्रतींचा आस्वाद अर्थातच गुणात्मकदृष्ट्या मूळ कलानुभवाशी म्हणजे संगीत लाइव्ह ऐकणे, नाटक प्रत्यक्ष पाहणे याच्याशी सममूल्य समजल्या जात नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मुद्दा अतिशय रोचक आहेच पण तो मूळ कारणाच्या जवळ जाणाराही असु शकेल.
'राजा रवि वर्मा' येईपर्यंत शाळा शाळांत वीणावादन करणारी सरस्वती दिसत नव्हती किंवा नाण्यांच्या धबधब्याला जन्म देणार्‍या लक्ष्मीचे पूजनही व्हायचे होते. त्यांनी आपल्या चित्रांच्या प्रती काढून विकणे चालु केले आणि चित्रकलेची जनसामान्यांतली प्रतिमा आणि पोच (रीच या अर्थाने आणि समज या अर्थानेही) यात लक्षणीय फरक पडला.
या उलट 'पिकासोछाप' या शब्दा इतकी त्याची चित्रे मात्र लोकांनी पाहिली नाहीत. भारतात पिकासोचे स्थान एक 'वाक्प्रचार' म्हणूनच सिमीत राहिले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>> संगीतात* एकाच कलाकृतीच्या प्रती** काढून त्या विकण्याची पद्धत आहे तशी चित्रकलेत नाही (कारण काय ते ठाऊक नाही). तशी सोय झाल्यास प्रसार अधिक प्रमाणात होईल काय?

मग राजा रविवर्मानं आपल्या शिळा छापखान्यात काय केलं होतं? त्याची चित्रं मराठी घराघरांत पोहोचली ती प्रतींमुळेच. आजही पिक्चर पोस्टकार्ड, पोस्टर, फ्रेम करता येतील अशा प्रिंट्स, छायाचित्रं अशा अनेक स्वरूपांत कलाकृतींच्या प्रती विकल्या जातात, विकत मिळतात. अगदी 'शिव सागर'सारखी टिनपाट हॉटेलंदेखील 'इंटीरिअर'च्या नावाखाली कमनीय राजस्थानी युवतींच्या चित्रांना वगैरे फ्रेम करून हॉटेलात लावतात त्या कुणाच्या तरी चित्राच्या प्रतीच असतात. भारतात कुठेही रस्त्यांवर मिळतात ती पोस्टर्स म्हणजे काय असतं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

तुमच्यासारखे लोक बाजारू पोस्टर्सना चित्र'कला' म्हणू लागले, तर आम्ही कोणाकडे पाहायचे हो?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अगागागागागा ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>>मग राजा रविवर्मानं आपल्या शिळा छापखान्यात काय केलं होतं? त्याची चित्रं मराठी घराघरांत पोहोचली ती प्रतींमुळेच. आजही पिक्चर पोस्टकार्ड, पोस्टर, फ्रेम करता येतील अशा प्रिंट्स, छायाचित्रं अशा अनेक स्वरूपांत कलाकृतींच्या प्रती विकल्या जातात, विकत मिळतात.

तोच तर पॉइंट आहे. असे सर्वच चित्रांच्याबाबतीत झाले तर चित्रकलेचा प्रसार होईल ना !! पण चित्रकलेबाबत असे होत नसावे. पिकासोच्या चित्राची कॉपी कोणी विकत घेत नसेल.

संगीतकलेत आणखी एक प्रकार आहे तो म्हणजे कलाकार एकाच कलाकृतीचं वारंवार लाइव्ह प्रदर्शन करतो. यमन रागाचेच वेगवेगळ्या कार्यक्रमात सादरीकरण करतो. जे दरवेळी थोडे का होईना वेगळे होत असणार. तसं चित्रकार बहुधा करत नसावा (करण्यास स्कोप नसावा/करण्याची गरज नसावी)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

कुठल्याही लोकसंगीतातच चटकन ग्रिप घेणारा एक भाग दिसतो.
(पंजाबी असू देत, तमिळी,तलगू नाय तर मराठ मोळी धोलकीची थाप. अगदि पाअश्चात्त्य केल्टिक्/सेल्टिकही ह्याला अपवाद नसावे*)
बव्हम्शी तो थेका,ताल, लय हाच असतो. त्यात काही नॅरेट केलेले नसले तरी पाय थिरकतात, मनाचा ठाव घेतात.
कुठल्या तरी (बहुतेक १९९८ च्या विश्वचषक अँथम साँग गाजले. त्यात फक्त "ब्रझीलssssला ला ला ...
ला ला " इतकीच व्यंजने ऐकू येतात. बाकी सगळाच ठेका.)
तोच प्रकार हल्ली बॉलीवूड काबीज केलेल्या पंजाबी गाण्यांबाबत. डिस्को वगैरे मध्ये किम्वा बँडमध्ये कित्येकदा त्याचे शब्द बंद करुन नुसते संगीत, त्यातही ठेका सुरु ठेवतात.
त्यात नॅरेशन नसते. तरी त्याला अपील असते.
दलेर मेहन्दीची गाणी आमच्या औताडे काकांच्या घरात आडगावात, लग्नविधीत चालणार्‍या पब्लिकला सगळीच समजत होती की नाही ह्याबद्दल साशंक आहे.
पण ती मंडळी भजन्,किर्तन ह्यात तल्लीन होतात तशीच पंजाबी भांगड्यावर आणि नंतर पाश्चात्त्य ब्रझ्झीsssल वगैरे वर तितक्याच तन्मयतेने नाचत होती.
.
मागच्या दशकात "आ आंण्टे आमलापुरो उ आआंण्टे हिच्चम्पुरो गुचि गुचि गुच्चामकुर्रो" असे काहिसे बोल असणारे गाणे ऐकून कॉलेज ग्यादरिंगचा क्राउड बेभान होउन नाचे.
किंवा "रणु रा रन्तुनि सिन्नssssदो सिन्नदो
गुडी कोच्चि सिन्नदे" असे काहिसे बोल असणारे गाने सुप्पर हिट्त होते आख्ख्या भारतात.
त्यातही नॅरेशनला गैरतेलगु क्राउअडच्या मते झाट्ट महत्व नव्हते.
कानाला बरे वाटते. लयीत हातपाय हलवता येतात; इतकेच त्याचे महत्व.
.
तस्मात्, नॅरेशनला प्रतिसादात लिहिले तितके आणि तसे महत्व असेलच असे वाटत नाही. गाण्यातून नॅरेशन न होताही कान तृप्त होतात; मास अपील बनवतात.
.
*the corrs हा ग्रुप केल्टिक म्युझिक वाजवितो असे वाटते. चुभूद्या ग्या.
.
.
.
दुसरा भाग चित्रकलेच्या आणि संगीताच्या डिस्ट्रिब्यूशनचा आहे. संगीत पूर्वीपासूनच बरेच स्वस्त आहे.

ह्यातही ठेक्याचा भाग येतो. ठेका रिप्रद्युस करु शकणार्‍यांची संख्या तुलनेने प्रचंड आहे. कितीही चांगले चित्र दाखवले तर ते तितक्याच चांगल्या ताकदीने रिप्रड्युस करु शकणारे त्या तुलनेत अत्यल्प आहेत.
ठेका हिट्ट व्हणारच. भरपूर मागणी आणि बह्रपूर पुरवठा असला तर वस्तू आवाक्याबाहेर महाग राहत नाही. niche रहात नाही.
.
.
तिसरा भाग 'लोकाभिमुखतेचा' आहे. एखादी गोष्ट 'आपल्यालाही जमेल' असे लोकांना वाटले तर लोक ती करून पाहतात आणि ती लोकप्रिय होत जाते.
नक्कीच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

बरोबर.

घासकडवींनी दोन अंगांनी हा लेख लिहिला आहे.

दोन कलांमधील अंतर्गतच फरक आणि दोन कलांच्या बाजारव्यवहारातील फरक.

तुम्ही म्हणता तो ठेका वगैरे चित्रकला आणि संगीतकला यांच्यातला मुळातलाच फरक आहे.

तरीही ही ठेकावाली गाणी (शब्द न कळणारी) तात्पुरतीच लोकप्रिय असतात. पण नॅरेशन असलेली गाणी (भावगीते) दीर्घकाळ लोकप्रिय राहतात. [ठेका नसलेली आणि शब्द नसलेली गाणी - शास्त्रीय संगीत- लोकप्रियच नसतात. ती फक्त कलेचे जाणकारच आस्वादू शकतात].

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

तरीही ही ठेकावाली गाणी (शब्द न कळणारी) तात्पुरतीच लोकप्रिय असतात. पण नॅरेशन असलेली गाणी (भावगीते) दीर्घकाळ लोकप्रिय राहतात. [ठेका नसलेली आणि शब्द नसलेली गाणी - शास्त्रीय संगीत- लोकप्रियच नसतात. ती फक्त कलेचे जाणकारच आस्वादू शकतात].

याच चालीवर फारसा अर्थ नसलेली केवळ 'चान चान' प्रकारची चित्रे तात्पुरती लोकप्रिय असतात. पण अधिक अर्थ/गुढार्थ/भावार्थ/संदेश/भक्तीमूल्य/भावमूल्य असणारी चित्रे दिर्घकाळ टिकतात. ठराविक आकारविहीन चित्रे - जसे गायतोंडे - किंवा (त्यात्या भागापुरत्या) अपरिचित मितीत काढलेली चित्रे - जसे भारतात पिकासो - लोकप्रिय नसतातच ती फक्त कलेचे जाणकार आस्वादू शकतात.

पण म्हणून संगीत दृश्यकलांपेक्षा अधिक 'प्रभावी' कसे ते समजले नाही

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

प्रभावी म्हणजे ज्याचा आस्वाद घ्यायला अधिक लोक पुढे येतात. घासकडवींनी लेखाचं शीर्षक प्रभावी असं घेतलं आहे पण आत प्रसाराची चर्चा केली आहे. म्हणून प्रभाव = प्रसार असं धरता येईल

मुख्य फरक मला वाटतं कलाकृती समजण्याचा आहे. समजणारी चित्रं उदा लॅण्डस्केप वगैरे लोक वाजवी किंमतीला विकत घेतील. न समजणारी चित्रं वाजवी* किंमतीलासुद्धा घेणार नाहीत. तसेच न समजणार्‍या शास्त्रीय संगीताच्या कलाकृती सुद्धा फारसे लोक विकत घेत नाहीत.

*ग्राहकासाठी त्या चित्राची कुठलीही किंमत वाजवी नसेल.

चित्रगुप्त यांनी जी चित्रे/पोस्टर प्रतिसादात दाखवली आहेत तसली चित्रे लोक विकत घेतात असे वाटते. एक तर ती (संगीताएवढीच) स्वस्त मिळतात. आणि ती समजण्यासारखी असतात. त्यात मानवी आकृत्या सामान्य मानवांसारख्या** असतात. सूर्यास्ताचे चित्र सूर्यास्तासारखेच दिसते.

**देवांची चित्रे सोडून द्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मर्लिन मन्रोच्या वर उडणर्‍या झग्याच्या फटुचा खप जास्त असेल की पिकासोच्या अमूर्त चित्राच्या रंगीत फोटोकॉपीचा?
जे कळते ते खपते.
हिमेसभाईची विक्री राहुल देशपांड्याच्या (किंवा खुद्द वसंतरावांच्या) विक्रीपेक्षा ज्यादाच राहणार.
कारण मला राहुल समजत नाही. हिमेसचं "आँ ओं आं उं म्यं" ही आशिक बनाया आपने च्या आधीची सिग्नेचर बांग प्यारी वाटते.
फ्याक्ट ही फ्याक्ट आहे; आवडो नै तर न आवडो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

म्हणून प्रभाव = प्रसार असं धरता येईल

हे बरोबर नाही. प्रसार हा आपल्याला दिसणारा परिणाम आहे, तर प्रभाव हे प्रस्तावित कारण आहे. लेखात 'कलांतर्गत आणि कलाबाह्य' या दोन प्रकारच्या भिन्न कारणपरंपरा असल्याची मांडणी केलेली आहे, हे तुम्ही म्हटलेलं आहेच. विशिष्ट कलाकृतीचा आस्वादकावर होणारा परिणाम याला मी प्रभाव म्हणतो आहे. ही कलांतर्गत बाब आहे. डिस्ट्रिब्यूशन, शिक्षण, कलानिर्मितीचा खर्च वगैरे कलाबाह्य कारणं आहेत. या दोन्हींचा मिळून दिसणारा परिणाम म्हणजे त्या कलेचा प्रसार. माझा प्रस्ताव असा आहे की 'चित्रकला व संगीत यांची तुलना करताना त्यांच्यातला प्रसारभिन्नतेसाठी आपण केवळ कलाबाह्य कारणांचा विचार करतो. कदाचित कलांतर्गत कारणं अधिक महत्त्वाची असावीत.'

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रभावी आहे का काय ते ठाउक नाही.
पण mass reach संगीताचा ज्यास्त आहे.
माणसाला उठून ते नाचायला लावू शकते.
अंमली पदार्थानंतरची "हाय" होण्याची फिलिंग नुसते संगीत ऐकून येउ शकणारय पब्लिकची संख्या प्रचंड आहे.
(ती इडा पिङ्गला , सुषुम्ना नाडी, कु़ञ्डलिनी जागृती वगैरे दुसरं कै नै, कीर्तनाच नाचून नाचून जास्ती "हाय " वाटणंच आहे अशीही थिअरी ऐकली आहे. खखोदेजा खरे खोटे देव जाणे)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

??

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

>> 'एखाद्या स्वराने जसं हेलावून जायला होतं, तसं रेषेने होत नाही' हे वैश्विक विधान म्हणून केलेलं आहे.

'एखाद्या स्वरानं हेलावून जायला होतं' हे वैश्विक विधान आहे का? आणि म्हणजे नक्की काय? एक दोन उदाहरणं देतो -

आज माझ्या आजूबाजूला असलेल्या एका मोठ्या वर्गाचं संगीताशी असलेलं नातं काहीसं असं आहे : त्यांचं संगीत दमदार ठेक्याचं असतं. ते डाॅल्बीच्या मोठ्या भिंतींवर लावायचं असतं. भरपूर लोक जमा करून ते संगीत लावून बेधुंद नाचायचं असतं. शक्यतो रस्त्यावर. त्यासाठी निमित्त पुरवतात ते कुटुंब, धर्म किंवा देश. म्हणजे लग्नसमारंभाचे प्रसंग, गणपती-नवरात्र वगैरे प्रसंग, किंवा भारतानं वर्ल्ड कप जिंकणं, अणुस्फोट करणं, पाकिस्तानला हरवणं वगैरे प्रसंग. आता इतकी माणसं रस्त्यावर नाचतात तेव्हा काय होतं, तर त्यांना एरोबिक व्यायाम घडतो. त्यामुळे त्यांना प्राणवायूची गरज भासते. पण तो पुरेसा मिळत नाही. मग काय होतं? तर देवीसमोर घागरी फुंकून बायकांना उन्मादावस्था येते आणि आपण त्याला 'अंगात येणं' म्हणतो तशी त्यांना उन्मादावस्था येते. अनेकदा मद्यप्राशनानं ती अवस्था आणखी वाढवली जाते. थोडक्यात, त्यांचं संगीताशी नातं असं आहे आणि त्यातून ते हेलावून जातात. हा वर्ग मुख्यत: तरुण आहे, संख्येनं तसा खूप मोठा आहे आणि अनेक जातींमध्ये पसरलेला आहे. मराठा, दलित, ओबीसी आणि काही ब्राह्मण तरुणसुद्धा आता पुण्यात असं वागताना दिसतात. तुम्हाला हे नातं अभिप्रेत आहे का?

ह्याउलट, आज माझ्या परिसरात तुलनेनं अल्पसंख्य असा उच्चमध्यमवर्गीय गट आहे. त्यांच्यापैकी बरेचसे ह्या उन्मादाकडे पाहून नाकं मुरडतात. पण खुद्द ते कोणत्याही प्रकारच्या संगीताशी किंवा इतर कलेशीही असं (म्हणजे हेलावून जाण्याचं किंवा उन्मादावस्थेत जाण्याचं) नातं दूरान्वयानंही ठेवत नाहीत. किंबहुना, कलाव्यवहारांशी असं हृदयाचं नातं ठेवणारे लोक त्यांना संशयास्पद आणि कम्युनिस्ट किंवा अॅनार्किस्ट वगैरे वाटतात. त्यातले काही (पण थोडेच, म्हणजे अल्पसंख्यातले अल्पसंख्य) दर वर्षी 'सवाई'ला वगैरे जातात आणि (पुणेकरांना न शोभणारी) खुल्या दिलानं दाद वगैरेही देतात. पण ते काही मी आधी म्हटलं तसे भैरवी ऐकून रडणारे वगैरे नसतात. थोडक्यात, तुमच्या वैश्विकतेला छेद देणारा हा एक वर्ग मला दिसतो.

पुढचं उदाहरण : एखाद्या मुलीनं वयाच्या सोळाव्या वर्षी आपल्या बाॅयफ्रेंडबरोबर 'साऊंड आॅफ म्यूझिक' सिनेमा पाहिलेला आहे. त्यातल्या 'आय अॅम सिक्स्टीन' गाण्याच्या वेळी आपण कसे 'त्या'च्या हातात हात घालून होतो ह्याची स्मृती तिच्या मनात घर करून आहे. आता तिचं वय काय आहे, किंवा ती त्याच मुलाबरोबर संसार करते आहे की इतर कुणाबरोबर वगैरे तपशील तिच्या दृष्टीनं गौण आहेत. केव्हाही ते गाणं ऐकलं की ती त्या स्मृतींनी हेलावून जाते. असं हेलावून जाणं त्या वैश्विकतेत अंतर्भूत आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

'अंगात येणं' म्हणतो तशी त्यांना उन्मादावस्था येते. अनेकदा मद्यप्राशनानं ती अवस्था आणखी वाढवली जाते.....तुम्हाला हे नातं अभिप्रेत आहे का?

ऑक्सिजन पुरेसा न मिळणं वगैरे कारणपरंपरा ताणलेली वाटली. उन्मादाने नाचणाऱ्यांचा वर्ग डोळ्यांना दिसणारा आणि खुपल्यामुळे अधिक लक्षात रहाणारा असावा. घरात गाणी लावून बसणारे, खिशात म्यूझिक प्लेयर घेऊन फिरणारे असा प्रचंड मोठा वर्ग आहेे. डॉल्बीच्या भिंती येण्याआधीही आवडीने रेकॉर्ड्सचा घरगुती संग्रह करणाराही वर्ग होता. माझ्या मामाची आठवण सांगतो. तो चाळीतल्या दोन खोल्यांत सहा लोक रहातात अशा कुटुंबात मोठा झाला. तरी सकाळी तयारी करताना रेडियो लावून गाणी ऐकायची ही आजीच्या घरची पद्धत होती. मामाला संगीताची फार जाण नसली, त्याचा आवाज तितका चांगला नसला तरी तो हौशीने गाणी म्हणायचा. प्रयोग म्हणून गाण्यांच्या चाली मुद्दाम बदलून म्हणायचा. अनेक गायकांच्या शैलीची नक्कल करायचा प्रयत्न करायचा. मावश्या त्याची त्याच्या गाण्यावरून माफक चेष्टाही करायच्या. आजी, मावश्या आणि मामा कुठच्याही निकषाने बेगडी कलासक्त उच्चवर्गीय किंवा उन्मादप्रिय धिंगाणाखोर नव्हते. आणि आजीच्याच घरातनं नाही, तर चाळीच्या खोल्याखोल्यांमधून गाणी ऐकू यायची.

केव्हाही ते गाणं ऐकलं की ती त्या स्मृतींनी हेलावून जाते. असं हेलावून जाणं त्या वैश्विकतेत अंतर्भूत आहे का?

हो. स्वरांशी, गाण्यांशी, पर्यायाने संगीताशी अनेक स्मृती जुळलेल्या असतात. मनुष्याच्या मेंदूत पक्की जागा करणं हे संगीताला अधिक सहज जमतं असाच माझा प्रस्ताव आहे. या मुलीचं उदाहरण बदलून 'त्याने माझा हात हातात घेतला तेव्हा एक गडद मोरपिशी रंग डोळ्यासमोर होता. त्यामुळे तो रंग दिसला की मला थेट त्याच क्षणाची आठवण होते.' हे ऐकायला मिळत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

संगीत आणि चित्रकला यांपैकी चित्रकलेचा म्हणता येणार नाही पण दृश्यकलेचा माणसावर अधिक प्रभाव आहे असे म्हणता यावे. (संगीताला प्रभाव टाकायची संधी दृश्यकलांपेक्षा अधिक मिळते हे मात्र मान्य. मात्र म्हणून ते अधिक 'प्रभावी' आहे असे म्हणणे धाडसाचे ठरावे)

एखादा अपरिचित ध्वनी कानावर पडला तर तो 'कोठून' आला आहे हे पहाणे आपल्याला महत्त्वाचे वाटते. मात्र एखादे अपरिचित दृश्य बघताना ध्वनी आला नाही तरी फार फरक पडत नाही.

संगीताचा रीच अधिक असल्याने त्याच्याशी ओळख सहज होते असे म्हणता यावे पण त्याचा अर्थ त्याचा 'प्रभाव' अधिक आहे असे नव्हे. रस्त्यावर केवळ लाल रंगाचा दिवा जे काम करतो ते हवालदाराच्या सततच्या शिट्यांनी करणे अनेकदा कठिण दिसते. केवळ फोन वरील गप्पा आणि प्रत्यक्ष भेट यातील फरक हा दृश्याचा (आणि कदाचित स्पर्शाचा) असतो.

अवांतरः आपल्या जाणीवांपैकी माणसाच्या भावनांवर सर्वाधिक प्रभाव 'गंधा'चा असतो अश्या अर्थाची डॉक्युमेंटरी काही वर्षांपूर्वी डिस्कवरीवर बघितली होती. त्याच्या खालोखाल स्पर्श होता. बाकी तीन जाणीवांचा क्रम सांगितला नव्हता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ज्येष्ठ समीक्षक माधव आचवलांनी चित्राच्या संदर्भात केलेली खालील टिप्पणी या चर्चेत भर घालू शकेल :

एखादी गाण्याची बैठक चालू असावी. जीव तोडून गायक गात असतो. गाणे कुठे 'पोचते' आहे का, याचा अंदाज घेत असतो. पण समोरचे चेहरे सगळे ठोकळ्यासारखे, मख्ख असतात. कुणी आपसांत बोलतात. कॉफी कां अजून येत नाही, म्हणून कोणी दाराकडे वळून पाहत असतात. कोपऱ्यात तंबाखू चोळीत प्रचलित राजकारणावर कुजबुज चाललेली असते. निराश होऊन गायक चीज आवरती घेतो, थांबतो. साथीदाराकडे वळून वैतागाने म्हणतो, "अरे यार, वो लोग क्या समझेंगे - उन्हे तो दर्द ही नही है!" कशी असणार? गाण्याच्या आनंदाचें नांव नाही पण "आज आमच्याकडे अमक्याअमक्यांचे गाणें झाले" याची जाहिरात करणारे 'मालिक' आणि त्यांच्या 'पोझिशन' चा विचार करून गाण्याला आलेले श्रोते. दर्द आणणार कुठून?

पण कलास्वादात - मग ती संगीतकला असो की चित्रकला - ही 'दर्द' महत्वाची. ती नाही, तर कांहीच नाही. कोणतीही कलाकृती ही स्वतःचे अस्तित्व, स्वभाव, आणि व्यक्तिमत्व असणारी एक जिवंत गोष्ट आहे. जसें एखाद्या मित्राशीं बोलताना आपण आपल्या विश्वात असून चालत नाही, तसेच चित्रासमोरही. हे हस्तांदोलन, हा संवाद, स्वभावतःच दोघांचा आहे, आणि इतर सगळ्या गोष्टी बाजूला सारून मन मोकळे, आतुर आणि सज्ज केल्याशिवाय चित्राची प्रचीती तर राहो, चित्र बघताही येणार नाही. रेडिओवर ज्याप्रमाणे ट्यूनिंग बरोबर झाले तरच गाणें ऐकू येते नाही तर नुसती खरखर! कलेशीं असे 'ट्युनिंग' होणे हा खरे तर एकेकाच्या व्यक्तिमत्वाचा भाग असतो. पण ते सहज होऊ शकले तर या कलाप्रांताचा उंबरठा ओलांडता आला. आता पुढे किती जाता येईल हे प्रेमांवर, प्रयत्नांवर अवलंबून.

संदर्भ: किमया - रूप पाहता लोचनी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>> उन्मादाने नाचणाऱ्यांचा वर्ग डोळ्यांना दिसणारा आणि खुपल्यामुळे अधिक लक्षात रहाणारा असावा. घरात गाणी लावून बसणारे, खिशात म्यूझिक प्लेयर घेऊन फिरणारे असा प्रचंड मोठा वर्ग आहेे. डॉल्बीच्या भिंती येण्याआधीही आवडीने रेकॉर्ड्सचा घरगुती संग्रह करणाराही वर्ग होता. माझ्या मामाची आठवण सांगतो.

ह्या वर्गातली प्रत्येक व्यक्ती रस्त्यावर येऊन नाचत नाही. पानाचे ठेले, चहा-भजी-मिसळीची हॉटेलं अशा अनेक ठिकाणी आता हे असं, म्हणजे ज्यावर थिरकता येईल असं संगीत ऐकू येतं. 'श्रोतेहो, आता आपण *** यांनी स्वरबद्ध केलेलं, *** यांनी लिहिलेलं आणि *** यांनी स्वरांचा साज चढवलेलं *** चित्रपटातलं गाणं ऐकणार आहोत' अशा शांत निवेदकांची आणि अनिल विश्वास, रोशन, गुलाम मोहम्मद वगैरेंची गाणी ऐकवणारी विविधभारती आता अपवादानंच ऐकू येते. रिक्षा, टॅक्सी, सहासीटर, भाडेतत्त्वावर कंपन्यांना दिल्या जाणाऱ्या तवेरा, इंडिका प्रभृती गाड्या अशा सगळ्या ठिकाणी हे संगीत डोकं उठवत असतं. तुम्ही तक्रार केली, तर तुमच्याकडे परग्रहवासी असल्यासारखं पाहिलं जातं. मॉल, मल्टिप्लेक्स, आय.टी. कंपन्या अशा ठिकाणी वावरणारी उच्चमध्यमवर्गीय तरुणाईही ह्याला अपवाद नाही. महागड्या स्मार्टफोनमधलं संगीत आपल्या ब्लूटूथ हेडसेटनं ती ऐकत असतात तेव्हा शेजारी उभं राहिलेल्या तुम्हाला तो थिरकी ठेका ऐकू येत राहतो आणि ह्यांच्या कानांचं नक्की काय होत असेल असा प्रश्न पडत राहतो. निम्नवर्गीय ते उच्चमध्यमवर्गीय अशा स्तरांत पसरलेला हा समाजगट संख्येनं मोठा आहे. त्यांच्या गोंगाटापुढे आपण अल्पसंख्य आहोत ही जाणीव सतत होत राहते. हे माझ्या परिसरातलं आजचं वास्तव आहे. त्यात तुमचं वैश्विक विधान कुठे बसतं ते मला कळत नाही.

ह्याउलट तुम्ही जो वर्ग सांगता (माझा मामा, घरी रेकॉर्ड् संग्रह वगैरे) ते माझंही वास्तव होतं, पण ते आता अल्पसंख्य आहे.

>> हो. स्वरांशी, गाण्यांशी, पर्यायाने संगीताशी अनेक स्मृती जुळलेल्या असतात. मनुष्याच्या मेंदूत पक्की जागा करणं हे संगीताला अधिक सहज जमतं असाच माझा प्रस्ताव आहे. या मुलीचं उदाहरण बदलून 'त्याने माझा हात हातात घेतला तेव्हा एक गडद मोरपिशी रंग डोळ्यासमोर होता. त्यामुळे तो रंग दिसला की मला थेट त्याच क्षणाची आठवण होते.' हे ऐकायला मिळत नाही.

एकाशी भावना / स्मृती जुळलेल्या असतात अन् दुसऱ्याशी नसतात असं म्हणण्यात अंमळ गोंधळ वाटतो आहे. कारण सांगतो -

मनीषा ह्यांच्या दिवाळी अंकातल्या लेखातलं हे चित्र पाहा -

ह्यातल्या आकाशाची आणि पर्वतराजीची निळाई, वृक्षांची हिरवाई ह्यांचा मारियाची उत्फुल्लता दाखवण्यात काहीच वाटा नाही असं तुम्हाला वाटतं का? इतकंच नाही, तर 'केसरी' किंवा तत्सम प्रवास कंपन्यांना विचारलंत तर तुम्हाला कळेल की मराठी माणसं गर्दी करून अॉस्ट्रियाच्या सहलीला जातात त्याचं कारण तिथला हा निसर्ग. त्यांना 'साऊंड अॉफ म्यूझिक' आवडत असतो आणि तो निसर्ग प्रत्यक्षात अनुभवायचा असतो. म्हणजे स्मृती आणि भावना दोहोंचं इथे मिश्रण झालेलं आहे. यश चोप्रांच्या सिनेमांच्या लोकप्रियतेमुळे हॉलंडमधले ट्युलिपचे मळे असे लोकप्रिय झाले.

वरच्या एका प्रतिसादात मी मार्सेल प्रूस्तच्या कादंबरीचा उल्लेख केला होता तोदेखील ह्या संदर्भात महत्त्वाचा आहे. आपल्या स्मृतींचा धांडोळा घेत त्यातला निवेदक अखेर सर्जनाच्या गाभ्याशी पोहोचतो. त्यातल्या स्मृती ह्या सर्व संवेदनांशी संबंधित आहेत. त्यात वाग्नरचं संगीत आहे, जिओत्तो, व्हरमीर किंवा बोतिचेल्लीची चित्रं आहेत, एखाद्या चर्चचा स्तूप पाहून मनात निर्माण झालेल्या उर्मी आहेत आणि आणखी बरंच काही. एखाद्या विशेष सुंदर नसलेल्या स्त्रीच्या मोहात एखादा पडू शकतो आणि त्याचं कारण तिच्या एखाद्या हालचालीत किंवा तिनं माळलेल्या एखाद्या फुलात असू शकतं. ते पाहून मनात नकळत जाग्या झालेल्या स्मृती तुम्हाला प्रथमदर्शनी प्रेमात पाडण्याची ताकद बाळगू शकतात. प्रूस्तच्या कादंबरीतल्या एका गाजलेल्या प्रसंगात पॅरिसच्या (आता कुप्रसिद्ध) 'ब्वा द बूलोन्य' ह्या जंगलवजा सार्वजनिक उद्यानात मध्यमवयीन निवेदक फिरत असतो. त्याच्या तरुणपणी तो आपल्या मैत्रिणीबरोबर तिथे येत असतो. आता अनेक गोष्टी बदललेल्या असतात. पण त्या अवकाशात आल्यामुळे त्याच्या स्मृती छेडल्या जातात आणि आपल्या तरुणपणचं जग आणि ती स्त्री आता अस्तित्वात नाही ही जाणीव त्याच्या हृदयाला तडे पाडते.

हे सगळं केवळ कादंबरीतलं स्वप्नरंजन नाही, तर आपल्याला नित्य जगण्यात असे अनुभव येत असतात. नक्की कोणत्या संवेदनेतून कुणाच्या कोणत्या स्मृती आणि भावना जाग्या होतील हे अर्थात व्यक्तिसापेक्ष असतं. कारण त्याचा संबंध तुमच्या परिसराशी, त्यातल्या संवेदनांशी, त्याविषयीच्या तुमच्या अबोध किंवा सुबोध स्मृतींशी आणि तुमच्या त्या सगळ्याशी असलेल्या नात्याशी असतो. 'दो बिघा जमीन'मधला सायकल रिक्षाचा प्रसंग पाहून कुणाला सायकल रिक्षात बसण्याची तीव्र अनिच्छा वाटेल, तर कुणाला 'साउंड ऑफ म्यूझिक' पाहून ऑस्ट्रियाला जावंसं वाटेल. ही व्यक्तिसापेक्षता मान्य करता येते, पण रंग, आकार, अवकाश अशा दृश्य घटकांत फारशी भावनिक ताकद नाही असं सरसकट विधान वैश्विक म्हणून मान्य करणं अंमळ धाडसाचं वाटतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ह्याउलट तुम्ही जो वर्ग सांगता (माझा मामा, घरी रेकॉर्ड् संग्रह वगैरे) ते माझंही वास्तव होतं, पण ते आता अल्पसंख्य आहे.

सत्तरच्या दशकापासून आजपर्यंत नक्की काय बदललं हा वेगळा प्रश्न आहे. त्यावेळी जी चित्र-संगीतातली तफावत दिसत होती ती सांस्कृतिक कारणांनी कशी समजावून घ्यावी? माझ्या प्रातिनिधिक मामाकडे त्यांच्यासाठी महाग असा रेडियो होता. पण जिथे रोज प्रत्येकाला चित्र काढता येतील असा भिंतीवर एक फळा नव्हता.

एकाशी भावना / स्मृती जुळलेल्या असतात अन् दुसऱ्याशी नसतात असं म्हणण्यात अंमळ गोंधळ वाटतो आहे.

माझ्या मांडणीत 'आहे-नाही' असं काळंपांढरं विभाजन अपेक्षित नाही. 'कमी-अधिक' अशी प्रमाणाची मांडणी आहेे. सुंदर रंगांनी मनाला आल्हाददायक वाटतं याबद्दल दुमत नाही. मात्र स्मृतींशी जोडलं जाण्याची शक्ती संगीतात अधिक आहे (असावी) असं म्हणणं आहे. त्यामुळे तुम्ही दिलेली उदाहरणं बरोबरच असली तरी मूळ मुद्द्याला बाधा येत नाही.

पण त्या अवकाशात आल्यामुळे त्याच्या स्मृती छेडल्या जातात

हेही मान्यच. माझ्या लेखाचा रोख सर्वसाधारण दृक्कलांविषयी नव्हता. दृक्कलांमध्ये चित्रपट, नाटक, आर्किटेक्चर, शिल्पकला अशा इतरही कला सामावतात. माझा रोख पारंपारिक चित्रकला - द्विमितीय पृष्ठभागावर केलेली रंगरेषापोताची मांडणी - यावर होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अतिअतिअतिअवांतरः

>> याउलट साखर अधिक लोकांना सहज आवडते, आणि बोंबील कमी लोकांना आवडतात याचं कारण मुख्यत्वे त्यांच्या चवीशी निगडित आहे. उत्क्रांतीच्या प्रक्रियेत माणूस बनला तोच साखरेची ओढ घेऊन. याउलट सुक्या बोंबलांची आवड ही काहीशी संस्कारांतून येते, शिकून घ्यावी लागते. भाषांमधला फरक हा प्रसारमाध्यमाचा आहे, तर चवींमधला फरक हा त्या दोनमधल्या क्षमतांचा आहे.

लेखात बोंबलाचा उल्लेख आहे आणि घाटपांडेकाकांनी त्यावर काहीच म्हटले नाही म्हणजे आश्चर्य आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

लेखात बोंबलाचा उल्लेख आहे आणि घाटपांडेकाकांनी त्यावर काहीच म्हटले नाही म्हणजे आश्चर्य आहे.

इथल्या बोंबलाचा प्रसार फार न झाल्याने घाटपांडेकाकांना ते कळालेच नसावे(प्रभावी ठरले नाही), लेखाचे शिर्षक 'बोंबील भारी का साखर' असे ठेवले असते तर गोष्ट वेगळी होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>> पिकासोच्या चित्राची कॉपी कोणी विकत घेत नसेल.

परदेशातल्या म्यू़झियम्समध्ये पिकासोच्या प्रिंट्स उपलब्ध असतात आणि अनेक लोक त्या घेतातही. मुळात 'पिकासोछाप' चित्रांबद्दल कुंडलकरांनी जे लिहिलं आहे ती मराठी लोकांची अडचण आहे. आता हे चित्र पाहा -

हे पिकासोचं आहे. त्याच्या प्रिंट्स विकत घेऊ नयेत असं लोकांना वाटावं असं त्यात काय बरं आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अगदिच पैसे देउन घ्यावेत असं तरी काय आहे?
(जे काही आहे, ते जाणकाराला कळू शकेल, मला एक ढोबळ रेखाटन दिसते आहे कबूतराचे.
पण असा फार आनंद वगैरे होत नाही. किंवा इतर संवेदना वगैरे जाग्या झाल्या नाहित.)
.
माझ्यासारखीच अवस्था इतर मराठी जनांची असणं शक्य आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

पिकासोचं हे कबूतर म्हणजे पाश्चात्य संस्कृतीतली एक आयकॉनिक प्रतिमा आहे. 'one of the world's most recognisable symbols of peace' असं त्याचं वर्णन केलं जातं.
अधिक माहिती

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

चला त्यानिमित्तानं एक शांततेसंदर्भात वेगळीच माहिती तरी मिळाली त्या दुव्यातून.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

या चित्राच्या (आणि त्याच्या आयकॉनिक महत्त्वाच्या) चर्चेतून माझा आधीचा एक मुद्दा पुढे येतो आहे. चित्रातून हे सारे नॅरेशन होत नाही जे संगीतातून होऊ शकते.

मिले सुर मेरा तुम्हारा हे सांगितिक मूल्याच्या दृष्टीने या कबुतरासारखंच सामान्य गीत असेल. पण त्यातील एकात्मतेच्या संदेशाचं नॅरेशन त्यातून स्पष्ट होतं म्हणून ते आयकॉनिक बनतं आणि बनलं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ते चिन्हात्मक बनलं कारण चाल कॅची होती, एकात्मतेचा संदेश वगैरे नॅरेशन असणार्‍या असंख्य दृकश्राव्य फिता उपलब्ध असतील पण हीच का आवडावी वगैरे.

तसेच हे वरच्या गितामधे वापरलं असेलच असं नाही पण ध्वनी काय करु शकतो ह्याची एक झलक म्हणून- An appoggiatura is a type of ornamental note that clashes with the melody just enough to create a dissonant sound. "This generates tension in the listener," said Martin Guhn, a psychologist at the University of British Columbia who co-wrote a 2007 study on the subject. "When the notes return to the anticipated melody, the tension resolves, and it feels good."

अधिक माहिती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>> चित्रातून हे सारे नॅरेशन होत नाही जे संगीतातून होऊ शकते.

मिले सुर मेरा तुम्हारा हे सांगितिक मूल्याच्या दृष्टीने या कबुतरासारखंच सामान्य गीत असेल. पण त्यातील एकात्मतेच्या संदेशाचं नॅरेशन त्यातून स्पष्ट होतं म्हणून ते आयकॉनिक बनतं आणि बनलं

मुळात दुसरं महायुद्ध आणि त्यात युरोपचं बेचिराख होणं ह्याचा संदर्भ ह्या चित्राला आहे. ज्या संस्कृतीनं ते भोगलं त्या संस्कृतीनं 'पुन्हा हे नको; आता आम्हाला शांतता हवी आहे.' ह्या तीव्र इच्छेतून पिकासोचं हे चित्र आयकॉनिक बनवलं. ही ह्या चित्रामागची गोष्ट (तुमच्या शब्दांत- नॅरेशन) आहे. त्या संस्कृतीला ते चित्रापलीकडचं नॅरेशन माहीत असतं. त्यामुळे ह्या चित्राला भावनिक ताकद प्राप्त होते आणि ते प्रचंड प्रमाणात आजही विकलं जातं. त्याच्या लोकप्रिय होण्यामागे हा संदर्भ आहे. आज ते चित्र आणि त्यामागचे संदर्भ भलेही तुम्हाला माहीत नसतील, पण कबुतराला शांततेचं प्रतीक मानलं जातं एवढं तरी तुम्हाला माहीत असेल अशी आशा आहे. त्या प्रतीकाला जुने संदर्भ आहेत, पण आधुनिक काळात त्याचं जनकत्व पिकासोकडे जातं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

>

हे चित्र म्हणून किती छान आहे, हे अधिक महत्वाचे आहे. पिकासोने काढलेले म्हणून छान आहे, असे नाही. एखादी कलाकॄती बघण्यार्‍याला/ ऐकणार्‍याला किती समाधान देते, ते अधिक महत्त्वाचे आहे (आणि प्रत्येकजण ते स्वतः ठरवणार), त्याचा कलाकार कोण आहे ते तितके महत्त्वाचे नाही. आणि नेमका इथेच कलाकार आणि प्रेक्षक यांच्यात मतभेद होतो. कलाकार म्हणतात, आम्ही इतकं जीव तोडून गाणं गातो, चित्रं रंगवतो, पण कोणाला त्याची कदर नाही, किंमत नाही. (कदाचित मनात म्हणत असतील, आमच्या माघारीच तुम्हाला किंमत कळेल). पण एखादी कलाकॄती छान आहे की नाही, ते लोकांनी ठरवायचे असते. (असे माझे मत आहे Smile )

उदा: खालील २ चित्रे बघा:
पहिले आहे (Still life, 1918) Oil on canvas

दुसरे (Still life: The table, 1928) Oil on canvas

पहिले आहे पिकासोचे आणि दुसरे आहे Georges Braque चे. केवळ पिकासोचे आहे, म्हणून पहिले जास्त वरचढ होते का? मला व्यक्तिशः दोन्ही आवडतात. दुसर्‍याची style पहिल्यासारखी वाटते (किमान मलातरी). जर मला परवडत असेल तर मी १५-२० पट किंमत देऊन पहिले चित्र घेईन, नाहीतर दुसरे. It's all relative. पण मी जेव्हा म्हणतो, काय एकदम पिकासोची स्टाईल आहे, तेव्हा मी खरंतर त्याचीपण स्तुतीच करत असतो.

व्यक्तिशः सांगायचे झाले तर मला साल्वादोर दाली याची चित्रे आवडतात, पण त्याचे The persistence of memory मला नाही आवडले. का तर ते आकाराने खूप लहान आहे (जेमतेम १०" x १३") (एखादे चित्र/गाणे का आवडते किंवा नाही, ते मी नक्की सांगू शकणार नाही तरी). तसंच वॉरहॉलचे केळ्याचे चित्र खूप प्रसिद्ध आहे, पण मला काही समजत नाही की ते इतके भारी का? याउलट मला Harley Schwadron ची कार्टून्स आवडतात, म्हणून मी त्याची सही असलेले कार्टून पैसे देऊन घेतले किंवा मारिओ मिरांडाचे चित्र घेतले. कोणाला वाटेल की मी मूर्खासारखे पैसे घालवले, पण शेवटी समाधान आणि आनंद हे व्यक्तिसापेक्ष आहे. एखादा कलाकार प्रसिद्ध आहे, म्हणून त्याच्या सर्वच कलाकॄती छान आहेत, असे म्हणणे बरोबर नाही. आणि त्याची कला सर्वांना तितकीच आवडली पाहिजे किंवा समजली पाहिजे, असं म्हणणं तर अजिबातच बरोबर नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे चित्र पाहून माझ्यासारख्या कलानिरक्षराला "ऊं! हे चित्र तर काय आम्हीही काढू शकतो, त्याचं काय कौतुक?" असे वाटले तर त्यात चूक ते काय? भले पिकासोसारख्या रेषा नि ब्रशस्ट्रोक्स व काय जे असेल ते जमणार नै पण आवर्जून संग्रही ठेवण्यासारखे या चित्रात तरी काही वाटत नाही, त्या खालच्या सहीशिवाय. असे वाटले कुणाला तर त्याची मूर्खात गणना करणे कितपत बरोबर? जे आपल्याला आरामात जमेल, आपल्या लेखी कै नॉव्हेल्टीमूल्य दिसत नै तर कशाला कुणी घेईल? हेच जर एखादे वैचित्र्यपूर्ण किंवा श्रद्धेय व्यक्ती/देवांचे असेल तर लोक घेतील. पण श्रद्धेचा भाग बाजूला ठेवला तर 'सेक्युलर' चित्राकडून काही कळणारे वैचित्र्य, काही रिचनेस प्रतीत व्हावा अशी अपेक्षा रास्त नाही काय? असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मला चित्रकलेतलं खरोखरच काही कळत नाही. पण हे चित्र (कॉपी) मी दहा* रुपयांना का विकत घ्यावे असा प्रश्न मला पडेल.
एखाद्या चित्रकाराने कबुतराचं चित्र काढलं तर मी त्यात अधिक डिटेल्स, किंवा नॉव्हेल्टीची अपेक्षा करेन.

*दहा (किंवा जी काही रक्कम असेल ती) अगदीच क्षुल्लक रक्कम वाटून घेईन सुद्धा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

नेमके!!! पिकासोने काढलं नसतं तर कोण ढुंकून तरी पाहिलं असतं का त्या कबुतराकडे? शंकाच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

इथे पिकासोछाप चित्रावर येणार्‍या प्रतिक्रीया साधारणपणे कडू कॉफी पिण्याबद्दल,सुशी खाण्याबद्दलपण असतात, खाणारे मात्र 'टेस्ट' डेव्हलप करायला पायजे असं म्हणतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खुद्द दारुबद्दलही न पिणार्‍यांच्या ह्याच प्रतिक्रिया* असतात. (हो. बीयर पण "दारु" ह्या ब्रॉड अम्ब्रेला टर्म मध्येच येते. "बीयर म्हणजे काही दारु नाही रे" असलं काही ऐकलं की गंमत वाटते. "दारु म्हणजे नक्की काय " हे विचारलं तर कुणीच काही सांगत नाहित.("दारु म्हणजे रे काय भाऊ", "रें...ते एक पेय्य्य अस्ते" ह्या निरागस संवादाची आठवण होत आता विषयांतर होणार बहुतेक.) )
.
*दारु कडू/कडवत असते वगैरे. आता वोडका वगैरे मध्ये कधी कधी रोझ वगैरे फ्लेवर टाकून पितात, पण त्यात ती मजा नाय, वरिजन्यालिटीही नाय,अस्सलता नाय असा आरोप होतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

चला थोडं देशीपणं झोडुयात - मुळा/शेपु/नवलकोल वगैरे भाज्या फारश्या लोकप्रिय नसण्याची कारणं बटाट्याएवढी 'टेस्ट' डेव्हलप्ड नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह्या विषयावर एका मुद्द्याचा कुणाकडून उल्लेख होईल का, ह्याची वाट मी इतके दिवस पाहत होतो, पण अपेक्षाभंग झाल्यामुळे अखेर मीच तो मांडतो आहे. 'चित्रकलेचा प्रसार तितकासा नाही', 'चित्रकलेचा प्रभाव तितकासा पडत नाही', 'भावनांना हात घालण्यात, मनावर परिणाम करण्यात, स्मृती जागवण्यात संगीत हे चित्रकलेपेक्षा अधिक प्रभावी आहे की काय' असे काही मुद्दे इथे मांडले गेले. त्यावर मर्यादित प्रमाणात चर्चाही झाली. 'मला चित्रकलेतलं काही कळत नाही बुवा' असं म्हणत अनेकांनी आपापली वैयक्तिक मतं इथे मांडली खरी, पण चित्रकलेतलं फारसं कळत नसलं तरीही निव्वळ सामान्यज्ञान म्हणून खरं तर इथल्या सगळ्यांना माहीत असणारा मानवी संस्कृतीच्या इतिहासातला एक फार महत्त्वाचा भाग ह्या चर्चेत आतापावेतो जवळपास अनुल्लेखानं मारला गेला आहे. त्याच्या उल्लेखाशिवाय ही चर्चा अपुरी राहील असं मला वाटतं.

मेंदूविज्ञान, तत्त्वज्ञान, चिन्हविज्ञान (semiotics) अशा ज्ञानशाखा जेव्हा अस्तित्वातदेखील नव्हत्या तेव्हापासून माणूस प्रतिमांच्या प्रभावाखाली आहे. जगातल्या सर्व आदिम संस्कृतींमध्ये प्रतिमानिर्मिती झाली. जेव्हा माणसाचं आयुष्य खूप खडतर होतं, अन्न-वस्त्र-निवारादि गरजांसाठी खूप धडपड करायला लागत होती, तेव्हाही त्या धबडग्यात माणसांनी प्रतिमा निर्माण केल्या. लास्को, अल्तामिरा, भोपाळजवळ भीमबेटका अशा अनेक ठिकाणी गुफाचित्रं पाहायला मिळतात. लास्कोचा काळ पंधरा ते अठरा हजार वर्षांपूर्वीचा आहे. जेव्हा तंत्रज्ञान फारसं विकसित झालेलं नव्हतं अशा काळात निर्माण केलेल्या ह्या प्रतिमा अनेक सहस्रकं टिकल्या. कदाचित इतर काही टिकल्या नसतील. ज्या टिकल्या त्या टिकाव्यात म्हणून त्या अप्रगत संस्कृतींनी विशेष कष्ट घेतले होते. का? कारण त्यांच्या लेखी ह्या प्रतिमा महत्त्वाच्या होत्या. ज्या काळात मनुष्य आपल्या आदिम प्रेरणांनीच जगत होता त्या काळात ही चित्रं निर्माण झाली हेदेखील लक्षात घ्यायला हवं.

ह्या प्रतिमांच्या अर्थनिर्णयनाविषयी आज अंदाज केले जातात. त्यांना काही तरी प्रतीकात्मक मूल्य होतं असं मानलं जातं. हा धागा मानवी संस्कृतींत कायम राहिलेला दिसतो - म्हणजे ज्यांना केवळ 'दिसतं आहे ते' एवढंच नव्हे, तर प्रतीकात्मक मूल्य आहे अशा प्रतिमा मानवी संस्कृतीच्या सर्व टप्प्यांत आणि जगभर निर्माण झाल्या. किंबहुना 'कला' म्हणजे काय ह्याची ही एक प्रकारची अभिजाततावादी व्याख्याच मानता येईल. अजिंठ्याची भित्तिचित्रं, आफ्रिकन मुखवटे, वारली किंवा बस्तरच्या आदिवासींची कला असे अनेक नमुने त्यात येतात. म्हणजे अशा प्रतिमा निर्माण करणं आणि त्या टिकवणं ही माणसाची अगदी मूलभूत आणि वैश्विक गरज होती असं दिसतं.

'आपल्या' प्रतिमा टिकवण्याच्या ह्या असोशीला अर्थात दुसरी बाजूही आहे. दुसऱ्यांच्या स्त्रियांवर अत्याचार करणं ही जशी युद्धादि संघर्षांतली एक खेळी असते, तशीच दुसऱ्यांच्या प्रतिमांचं भंजन करणं हीदेखील एक खेळी होती; आजही आहे. ख्रिस्ती धर्माचा उदय झाला तेव्हा त्यांनी आधीच्या पेगन धर्माच्या प्रतिमांचं भंजन केलं, पण धर्मप्रसारासाठी ख्रिस्ती धर्माला स्वत:चं प्रतिमाविश्व निर्माण करावं लागलंच; आणि तेही इतकं भव्यदिव्य आणि सुंदर की लोकांनी तोंडात बोट घालावं. आज जगभरातून ख्रिस्ती नसलेले लोकसुद्धा लाखोंच्या संख्येनं मध्यपूर्व आणि युरोपात जाऊन किंवा देशोदेशींच्या संग्रहालयांना भेटी देऊन ते पाहतात. प्रेषिताची प्रतिमा बनवणं आणि प्रतिमांची पूजा करणंच इस्लामनं निषिद्ध मानलं. अन् तरीही इस्लामला सुंदर प्रतिमा निर्माण कराव्या लागल्याच. देवाचा शब्दच त्यांनी सुलेखनाद्वारे इतका सुंदर करून सोडला, की कुराणातल्या सुरांचीच चित्रं झाली. चिनी-जपानी संस्कृतींतही सुलेखनाला झेन तत्त्वज्ञानाचं वाहक मानलं गेलं. त्यातून जे निर्माण झालं त्याला स्वतंत्र चित्रकृतीचं स्थान मिळावं इतकं ते सुंदर होतं. हे सौंदर्य निर्माण करता यावं म्हणून लोक देशोदेशी जाऊन शिकत. ही तंत्रं शिकवण्यात आणि शिकण्यात लोक अनेक वर्षं, अख्खी हयात किंवा अनेक पिढ्या घालवत असत; नवीन तंत्रं घडवत असत. हा ध्यास प्रचंड आहे, पण तो मानवी संस्कृतीचं एक मूलभूत अंगच आहे असं इतिहास सांगतो. धर्माश्रय, राजाश्रय अशा अनेक मार्गांनी त्या ध्यासाला आर्थिक पाठबळ मिळे. आजही कमीअधिक प्रमाणात मिळतं.

आता हा प्रश्न पडतो - प्रतिमांमध्ये जर फारशी (किंवा संगीताइतकी, किंवा तुमच्या पसंतीचं दुसरं एखादं विशेषण वापरा) ताकद नसती, तर प्रागैतिहासिक काळापासून आजतागायत मानवानं त्यांत इतकी गुंतवणूक – आणि तीदेखील सर्वार्थानं, म्हणजे आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक, भावनिक, कलात्मक वगैरे – का केली असती?

आज एकविसाव्या शतकात तर आपण अतिशय प्रतिमासंपृक्त जगात जगतो. फ्रेममध्ये कापड ताणून लावून त्यावर रंगवलं म्हणजे चित्र ही व्याख्याच आता कालबाह्य झाली आहे. कला कुठे संपते आणि जाहिरात किंवा प्रचार (propaganda) कुठे सुरू होतो हेदेखील आज सांगता येत नाही. त्यामुळे आज जगणाऱ्या माणसाला दृश्यभाषेत इतकं निरक्षर असणं खरं तर परवडणारं नाही. पण ते असो. मराठीतल्या चर्चेत लोकांना नव्याविषयी कुतुहल / आस्था / ज्ञान असावं अशी अपेक्षा नव्हती, पण वर म्हटल्याप्रमाणे जुन्याविषयी थोडी जाणीव असायला हरकत नव्हती असं वाटलं म्हणून हा प्रतिसाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अशा प्रतिमा निर्माण करणं आणि त्या टिकवणं ही माणसाची अगदी मूलभूत आणि वैश्विक गरज होती असं दिसतं.

याबद्दल काही वादच नाही. पुन्हा सांगतो - चित्रकला ०, संगीत १ असं काळंपांढरं चित्र मांडायचं नाहीये.

संगीत आणि चित्र यांमध्ये जे लेखात फरक सांगितलेले आहेत, त्यात एक महत्त्वाचा फरक राहिला. संगीत उदबत्तीच्या धुरासारखं दरवळत असलं, तरी ते क्षणभंगूर असतं. धुरासारखंच हवेत विरून जातं. याउलट चित्रं (किंवा मूर्त प्रतिमा, स्थापत्यकलांचे भव्य नमुने) ही अनेक वर्षं टिकून राहतात. त्यामुळे सामाजिक पातळीवर एक 'आपलेपणा' निर्माण करू शकतात. हा अर्थातच कलांतर्गत महत्त्वाचा फरक झाला. आणि जेव्हा एखाद्या समाजाला आपली ओळख म्हणून चिरकाल टिकेल असं काही तयार करायचं असेल तेव्हा चित्र, प्रतिमा, मूर्ती, स्थापत्य अशा दृक् माध्यमांना स्वीकारलं जातं.

यावरून मला एक वेगळा मुद्दा सुचतो. एके काळी चित्रकारांच्या कामांपैकी मोठं काम म्हणजे पोर्ट्रेट्स काढून देणं हे असायचं. आपलं अस्तित्व पुढच्या पिढ्यांपर्यंत टिकून रहावं या इच्छेपोटी ज्यांना परवडेल ते आपापली पोर्ट्रेट्स रंगवून घ्यायचे. ही पद्धत आता जवळपास कालबाह्य होत असावी. चित्रकला, चित्रकार टिकून राहण्यासाठी या व्यवहाराचा मोठा फायदा होत असे. हे घटल्यामुळे चित्रकलेचा ऱ्हास झाला असावा का?

जेव्हा माणसाचं आयुष्य खूप खडतर होतं, अन्न-वस्त्र-निवारादि गरजांसाठी खूप धडपड करायला लागत होती, तेव्हाही त्या धबडग्यात माणसांनी प्रतिमा निर्माण केल्या.

दुर्दैवाने या फरकामुळेच आपल्याला ऐतिहासिक, प्रागैतिहासिक काळाबाबत चित्रांमधली गुंतवणुक किती आणि संगीतातली गुंतवणुक किती याचा अभ्यास करत नाही. त्याच खडतर आयुष्याच्या धबडग्यात किती गाणी म्हटली याची नोंद नसते. कारण इथे सर्व्हायव्हलशिप बायस येतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>> केवळ पिकासोचे आहे, म्हणून पहिले जास्त वरचढ होते का? मला व्यक्तिशः दोन्ही आवडतात. दुसर्‍याची style पहिल्यासारखी वाटते (किमान मलातरी). जर मला परवडत असेल तर मी १५-२० पट किंमत देऊन पहिले चित्र घेईन, नाहीतर दुसरे. It's all relative. पण मी जेव्हा म्हणतो, काय एकदम पिकासोची स्टाईल आहे, तेव्हा मी खरंतर त्याचीपण स्तुतीच करत असतो.

इथे काही मुद्दे स्पष्ट करायला लागतील.

ब्राक हा 'क्युबिस्ट' चळवळीत पिकासोइतकाच महत्त्वाचा मानला जातो. कलेच्या इतिहासात क्युबिझमला आणि त्यामुळे पर्यायानं ब्राकला महत्त्वाचंच, किंबहुना अनन्यसाधारण स्थान आहे. जगभरातल्या अनेक संग्रहालयांतला क्युबिस्ट चित्रांचा संग्रह मी पाहिलेला आहे - बहुतेक सर्व ठिकाणी ब्राकची चित्रं पिकासोशेजारीच आणि तितक्याच मानानं लावली जातात. त्यामुळे क्युबिस्ट शैलीसाठी ब्राकची स्तुती करणं हे सर्वार्थानं योग्य ठरतं. क्युबिस्ट शैलीत काम करणारे इतरही कलाकार होते. किंबहुना पॅरिसच्या मोंमार्त्र आणि मोंपार्नास भागात त्या काळात कलाकारांचा जो गट होता (म्हणजे फक्त चित्रकार किंवा दृश्यकलाकार नाहीत) त्यांच्यापैकी अनेकांनी आपापल्या माध्यमांत आणि शैलींत क्युबिस्ट प्रयोग केले. ह्या इतरांवर तर ब्राकपेक्षाही अधिक अन्याय होतो.

मात्र, पिकासो आणि ब्राकमध्ये एक मोठा फरक आहे. ब्राक हा क्यूबिस्ट शैलीसाठीच ओळखला जातो. त्याउलट पिकासोनं आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत (सुमारे १९०१ ते मरेपर्यंत, म्हणजे १९७३) अनेक वेगवेगळ्या शैली आणि माध्यमांत प्रचंड, म्हणजे राक्षसी म्हणावं इतकं काम केलं. त्यापैकी क्युबिस्ट काम हे साधारण १९०९ ते १९१९, म्हणजे १०-११ वर्षंच केलं. म्हणजे ७० वर्षांच्या कारकीर्दीत फक्त १०-११ वर्षं. पण त्याच्या प्रत्येक कालखंडात त्यानं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण काम केलं. काही शैली आणि माध्यमं तर त्यानं स्वत:च निर्माण केली. त्यामुळे पिकासोचं दृश्यकलाक्षेत्रातलं स्थान फारच महत्त्वाचं आहे.

आता ह्यातून काही अडचणी निर्माण झाल्या. त्यापैकी एक म्हणजे लोकांना पिकासो जितका माहीत असतो, तितका ब्राक माहीत नसतो. पण दुसरी आणि मला मराठी माणसांत विशेष प्रादुर्भाव झालेली अडचण म्हणजे पिकासोची चित्रं माहीत असलीच, तर क्युबिस्ट शैलीतलीच चित्रं माहीत असतात. त्यामुळे 'पिकासोछाप' किंवा 'पिकासोची चित्रं' असं म्हणत लोक खूप सरसकट विधानं करतात. क्युबिस्ट शैलीच्या चौकटीबाहेर त्यांना फारसा अर्थ नसतो.

तुमचा पुढचा मुद्दा हा विकत घेण्याविषयीचा आहे. हा मुद्दा खूपच गुंतागुंतीचा आहे. शुभा गोखल्यांच्या मुलाखतीवरच्या एका प्रतिसादात मी मांडलेला मुद्दा सर्वप्रथम पुन्हा उद्धृत करतो -

कलेचाच काय, पण कसलाही बाजार मांडला की त्याला त्याची गती असते आणि त्याचे चढउतार असतात. त्याचा कलास्वादाशी आणि कलाकाराशी संबंध असेलच, असं नाही.

मुद्रणकला अस्तित्वात येण्यापूर्वी चित्राची प्रत काढणं हे कष्टाचं काम होतं, कारण मूळ चित्रकाराची नक्कल करू शकेल एवढ्या तोलाच्या माणसालाच ते उत्तमरीत्या करता येई. त्यामुळे फक्त राजे-उमराव-धर्मगुरु वगैरेंना मोठा मोबदला देऊन चित्रांच्या प्रती करून संग्रही ठेवणं शक्य होतं. मुद्रणामुळे प्रती काढणं सोपं झालं. त्यामुळे ते तुलनेनं स्वस्तसुद्धा झालं. तेव्हा मध्यमवर्गाला ते परवडू लागलं. आता तर स्कॅन करून किंवा इंटरनेटवरून चांगल्या दर्जाची प्रत मिळवून त्याची रंगीत प्रिंट काढणं घरच्याघरी होऊ शकतं, किंवा २० ते शंभर रुपयांत ते करून देणाऱ्या सेवा उपलब्ध आहेत. त्यामुळे गंमत अशी झाली आहे की चित्र पिकासोचं असो किंवा ब्राकचं किंवा तुमच्या पोटच्या पोराचं, प्रतीची किंमत तेवढीच. इथे ते कायदेशीर आहे किंवा नाही हा मुद्दा गौण आहे. हौसेपोटी पायरेटेड सिनेमे पाहणं शक्य आहे तद्वत हेदेखील शक्य आहे एवढाच मुद्दा आहे. त्या शक्यतेमुळे ' जर मला परवडत असेल तर १५-२० पट किंमत देऊन मी ते घेईन' हा तुमचा मुद्दा केवळ मूळ चित्राच्या बाबतीतच संभवतो. आणि मी वर म्हटल्याप्रमाणे त्या बाजारातल्या घडामोडी वेगळ्याच प्रकारे होत आहेत. त्यांचा कलाकृतीचा दर्जा वगैरेंशी संबंध असेलच असं नाही.

>> तसंच वॉरहॉलचे केळ्याचे चित्र खूप प्रसिद्ध आहे, पण मला काही समजत नाही की ते इतके भारी का? याउलट मला Harley Schwadron ची कार्टून्स आवडतात, मला वाटतं तुम्ही एखाद्या कलाकृतीचं किंवा शैलीचं ऐतिहासिक महत्त्व आणि वैयक्तिक आवडनिवड ह्यांची इथे गल्लत करत आहात. पण ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ज्यांचं ऐतिहासिक महत्त्व मला मान्य आहे, पण जे मला व्यक्तिश: फारसे प्रिय नाहीत असे कलाकार आहेत आणि असं असण्यात काहीच गैर नाही. ह्याउलट एखादा तुलनेनं कमी प्रसिद्ध कलाकार मला आवडू शकतो (अर्थात, त्यामुळे उच्चभ्रूपणाचे आरोपसुद्धा होऊ शकतात, पण त्यांची मला सवय आहे Lol त्यात पुढचा आणखी एक मुद्दा म्हणजे आवडेल ते सगळंच भिंतीवर लावण्यासारखं असतंच असं नाही. एखादं चित्र माझ्या दृष्टीनं अतिशय ताकदवान असू शकतं, पण त्याची ताकद प्रचंड वेदनादायी असू शकते. अशी वेदना माझ्या भिंतीवर शोभेसाठी लावणं मला गैरसुद्धा वाटू शकतं आणि त्रासदायकसुद्धा. त्यामुळे आवडत असूनदेखील त्याची प्रत मी कदाचित विकत घेणार नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

>>जगभरातल्या अनेक संग्रहालयांतला क्युबिस्ट चित्रांचा संग्रह मी पाहिलेला आहे - बहुतेक सर्व ठिकाणी ब्राकची चित्रं पिकासोशेजारीच आणि तितक्याच मानानं लावली जातात. मी ब्राकची चित्रे पाहिली आहेत आणि इतरांची सुद्धा. माझा मुद्दा इतकाच आहे की जर कोणाला क्युबिझमबद्दल आवड असेल तर मग कलाकार कोण आहे, त्याने फरक पडू नये. जर एखादे चित्र कोणाला आवडले, तर मग ते पिकासोने काढले काय किंवा ब्राकने काढले काय किंवा जहांगीर आर्ट गॅलरीसमोर फूटपाथवर आपले प्रदर्शन लावलेल्या नवशिक्या कलाकाराने काढले काय. Judge the art on the basis of its quality and ability to give you pleasure, not on the basis of artist/ कलाकृतीचं ऐतिहासिक महत्त्व.

>>आता ह्यातून काही अडचणी निर्माण झाल्या. त्यापैकी एक म्हणजे लोकांना पिकासो जितका माहीत असतो, तितका ब्राक माहीत नसतो. पण दुसरी आणि मला मराठी माणसांत विशेष प्रादुर्भाव झालेली अडचण म्हणजे पिकासोची चित्रं माहीत असलीच, तर क्युबिस्ट शैलीतलीच चित्रं माहीत असतात. त्यामुळे 'पिकासोछाप' किंवा 'पिकासोची चित्रं' असं म्हणत लोक खूप सरसकट विधानं करतात. क्युबिस्ट शैलीच्या चौकटीबाहेर त्यांना फारसा अर्थ नसतो. हा प्रकार "ब्रँडिंग"मुळे होतो. आपण सुंदर वाजणारी सनई ऐकली, की आपल्या डोक्यात पटकन बिस्मिला खानच येतात, रमेश खळदकर येत नाहीत. असेच काहीसे आहे ते. पण म्हणून रमेश खळदकरसुद्धा तितकेच छान वाजवतात, ही शक्यता नाकारू नये.

>> यामुळे गंमत अशी झाली आहे की चित्र पिकासोचं असो किंवा ब्राकचं किंवा तुमच्या पोटच्या पोराचं, प्रतीची किंमत तेवढीच. या बाबतीत पण सहमत नाही. मागे लिहिलेलंच परत लिहितो: एखादा कलाकार प्रसिद्ध आहे, म्हणून त्याच्या सर्वच कलाकॄती छान आहेत, असे म्हणणे बरोबर नाही. जर मुलाचे चित्र मला खरोखर आवडले तर ते लावायला काहीच हरकत नसावी. केवळ पिकासोने काढले म्हणून ते चित्र खूप भारी आणि (स्वतःच्या किंवा दुसर्‍याच्या) 'मुलाने' काढले म्हणून फडतूस, असे नसावे.

>>मला वाटतं तुम्ही एखाद्या कलाकृतीचं किंवा शैलीचं ऐतिहासिक महत्त्व आणि वैयक्तिक आवडनिवड ह्यांची इथे गल्लत करत आहात. पण ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. कॉमन मॅनला शैलीचं ऐतिहासिक महत्त्व कदाचित कळत नसेल, पण त्याला काय आवडते आणि आवडत नाही ते पटकन कळते. अंबानीची "अंटेलिया" आवडत नाही, पण "राजाबाई टॉवर" आवडतो, असे तो म्हणू शकतो.

साधारणपणे आपण आधी चित्र बघतो, गाणे ऐकतो, एखादा पुतळा बघतो. मग अंदाज घेतो की अरेच्या, ही स्टाईल अमक्या कलाकारासारखी वाटतेय (पिकासो किंवा बेगम अख्तर/आशा खाडिलकर किंवा हेन्री मूर किंवा बिस्मिला खान वगैरे). मग कलाकार बघतो. एकदा सवय झाली की पटकन कळते, पण कधीकधी नवीनच कलाकार कळतो (Jean Dubuffet, रमेश खळदकर वगैरे). मग पुढच्या वेळी रिदम हाऊस किंवा अलुरकरांकडे गेलो की आपण रमेश खळदकरांचं काही मिळतय का? ते बघतो. अशा प्रकारे कलाविश्वातला प्रवास सुरु राह्तो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>> जर कोणाला क्युबिझमबद्दल आवड असेल तर मग कलाकार कोण आहे, त्याने फरक पडू नये. जर एखादे चित्र कोणाला आवडले, तर मग ते पिकासोने काढले काय किंवा ब्राकने काढले काय किंवा जहांगीर आर्ट गॅलरीसमोर फूटपाथवर आपले प्रदर्शन लावलेल्या नवशिक्या कलाकाराने काढले काय. Judge the art on the basis of its quality and ability to give you pleasure, not on the basis of artist/ कलाकृतीचं ऐतिहासिक महत्त्व.

>> एखादा कलाकार प्रसिद्ध आहे, म्हणून त्याच्या सर्वच कलाकॄती छान आहेत, असे म्हणणे बरोबर नाही. जर मुलाचे चित्र मला खरोखर आवडले तर ते लावायला काहीच हरकत नसावी. केवळ पिकासोने काढले म्हणून ते चित्र खूप भारी आणि (स्वतःच्या किंवा दुसर्‍याच्या) 'मुलाने' काढले म्हणून फडतूस, असे नसावे.

>> कॉमन मॅनला शैलीचं ऐतिहासिक महत्त्व कदाचित कळत नसेल, पण त्याला काय आवडते आणि आवडत नाही ते पटकन कळते.

वैयक्तिक आवडनिवड आणि कलेच्या इतिहासात एखाद्या कलाकृतीचं स्थान हे दोन अक्ष मानता येतील. कोणत्याही एकाच अक्षाला कवटाळणं हे एकारलेलं होऊ शकतं. निव्वळ इतिहासातल्या स्थानमहात्म्याला कवटाळून वैयक्तिक आवडीनिवडीकडे दुर्लक्ष करणं कसं एकारलेलं होतं हे तुमच्या अनुभवावरून दिसतं. इथे मी दुसरं टोक गाठण्याचे, म्हणजे निव्वळ वैयक्तिक आवडीनिवडीला कवटाळण्याचे धोके एक-दोन उदाहरणांतून दाखवतो.

मुंबईतल्या जहांगीर कलादालनाला एक वलय आहे. त्यामुळे तिथे आपल्या कलेचं प्रदर्शन भरावं ह्यासाठी अनेक कलाकार उत्सुक असतात. आजच्या कलाबाजारपेठेच्या न्यायानुसार जो कलादालनाचं भाडं भरून तारखा बुक करेल तो तिथे प्रदर्शन लावू शकतो. जहांगीरच्या वलयामुळे तिथे सारखी नवनव्या कलाकारांची प्रदर्शनं पाहायला मिळतात. ती जर नियमितपणे पाहिली तर त्यात काही पॅटर्न्स पुन्हापुन्हा दिसू लागतात. समकालीन भारतीय कलेविषयी किंचित माहिती असेल, तर हे लक्षात येऊ शकतं की हे पुन्हापुन्हा दिसणारे पॅटर्न्स म्हणजे कुठल्या तरी सुप्रसिद्ध कलाकाराच्या शैलीची भ्रष्ट नक्कल आहे. गायतोंडे आणि हुसेन ह्यांची नक्कल ह्यात विशेषत: दिसते. आता समकालीन भारतीय कलेत पुष्कळ चांगले चित्रकार आहेत. मग ह्याच दोघांची नक्कल जास्त का दिसते? तर बाजारपेठेचं तर्कशास्त्र हे त्याचं उत्तर आहे. सध्या बाजारात ह्या दोघांची चलती आहे. मग आपण त्यांची नक्कल केली तर ज्यांना ह्या दोघांची चित्रं परवडत नाहीत असे काही लोक आपली चित्रं विकत घेतील असा त्यामागचा स्पष्ट विचार आहे. तसं प्रत्यक्षात होतं का, ते मला माहीत नाही. पण मुळात ही नक्कल समजून-उमजून केलेली नसल्यामुळे ती केविलवाणी किंवा भ्रष्ट ठरते. पिकासो-ब्राकसारखी, म्हणजे एकाच शैलीत दोन कलाकारांनी एकमेकांसोबत विचार करत, एकमेकांच्या प्रभावाखाली काम केल्यामुळे कलाकृतीला जी उर्जा किंवा उंची लाभते, ती त्यात नसते.

आता एखाद्याला गायतोंडे किंवा हुसेनची चित्रं माहीतच नसतील, तर त्याला ही चित्रं आवडू शकतीलही. आणि त्यात काही मूलत: गैरही नाही. पण मूळ कलाकृती आणि त्यांची भ्रष्ट नक्कल ज्याला दिसते त्याला ते आवडणार नाही. अशा एखाद्या माणसासमोर हा इतिहासाशी अनभिज्ञ माणूस जर 'क्षितिजावर एका नव्या थोर कलाकाराचा उदय झाला आहे' अशा थाटात ह्या नकलांबद्दल बोलू लागला, तर मात्र गोंधळ होईल. निव्वळ वैयक्तिक आवडीनिवडीला कवटाळण्यातून असा धोका निर्माण होतो.

दुसरं उदाहरण : पहिल्या महायुद्धात ज्या प्रमाणात हिंसा झाली आणि त्याचे जे पश्चात-परिणाम झाले (उदा : शेल-शॉक) ते भयावह होते. ह्या युद्धानंतर अनेक युरोपिअन कलाकारांच्या कलाकृतींमध्ये खिन्नता, हिंसा, भेसूरपणा, भयावहता, किळसवाणेपणा असे घटक मोठ्या प्रमाणात आले. कलेतल्या अनेक चळवळींत त्याचं प्रतिबिंब पडलं. ह्याचा गंधही नसलेल्या एखाद्या सुखवस्तू माणसानं आज अशी चित्रं पाहिली, तर कदाचित तो म्हणेल की ही चित्रं मला विद्रूप वाटली, किंवा मला ती विकत घ्यावीशी आणि माझ्या भिंतीवर लावावीशी वाटत नाहीत. पण ज्या चौकटीत ती चित्रं निर्माण झाली ती मुळात लोकांना ती चित्रं सुंदर वाटावीत, किंवा त्यांनी ती आपल्या सुशोभित दिवाणखान्याच्या भिंतीवर लावावीत म्हणून निर्माणच केलेली नव्हती. हे माहीत असलं, तर कदाचित त्या चित्रांकडे निव्वळ शोभेची वस्तू म्हणून पाहिलं जाणार नाही आणि पर्यायानं त्या चित्रांबद्दलच्या निव्वळ वैयक्तिक आवडीनिवडीतून आलेल्या वरच्या विधानातून नकळत निर्माण झालेलं क्रौर्य लक्षात येईल. म्हणजे निव्वळ वैयक्तिक आवडीनिवडीला कवटाळण्यापेक्षा तिला ऐतिहासिक ज्ञानाची जोड मिळाली, तर पाहणाऱ्याचा दृष्टिकोन बदलेल आणि अधिक व्यापक होईल अशी शक्यता निर्माण होते.

थोडक्यात, वैयक्तिक आवडनिवड आणि कलेच्या इतिहासात एखाद्या कलाकृतीचं स्थान हे दोन अक्ष वेगळे आहेत, पण परस्परपूरक आहेत असं त्यांकडे पाहिलं तर ते अधिक सुजाणपणाचं ठरेल असं वाटतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||